Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहरात चोरांचा धुडगूस कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा धुडगूस सुरू आहे. शहरातील एका रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचे प्रवासा दरम्यान सोन्याचे दागिने चोरण्यात आले. तसेच एका मंगल कार्यालयातून कापडी पिशवीत ठेवलेली रोख रक्कम आणि चांदीचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली आहे. वाढत्या चोऱ्यांची प्रकरणे ही शहर पोलिसांसाठी आव्हान ठरत आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते सव्वासातच्या वाजेच्या दरम्यान मैनाबाई महादेव तांगडे (वय ४५, रा. न्यायनगर, गट नंबर ९) या सिडको बसस्टॅण्ड रोडहून ते हनुमान नगर मार्गावर रिक्षामध्ये या प्रवास करीत होत्या. या प्रवासादरम्यान कापडी बॅगमधील चॉकलेटी पाऊचमध्ये ठेवलेली सोन्याची पोतसह अंदाजे ९२ हजार रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविले. या प्रकरणात मैनाबाई महादेव तांगडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य एका घटनेत वासंती मंगल कार्यालय बीड बायपास रोड येथे श्याम प्रभाकरराव जोशी यांच्या मुलाचे लग्नविधी १५ फेब्रुवारी रोजी सुरू होते. यावेळी जोशी यांच्या पत्नीने त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम, लग्नात आलेली भेट, तसेच चांदीचे दागिने एका कापडी बॅगमध्ये ठेवले होते. त्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये रोख रक्कम, तीन हजार रुपयांची भेट आणि दोन हजार रुपये किंमतीची चांदीची भेटवस्तू असा एकूण ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय सलीम अली सरोवर येथे एका मोटारसायकल चालकाला लुटल्याची घटना घडली.

……

नागरिकांनी पकडले बकरी चोर

बेगमपुऱ्यातील दिगंबर गल्लीतील सुनील कुंडारे यांच्याकडे आठ बकऱ्या असून रविवार (१७ फेब्रुवारी ) सकाळी त्यांनी घरामागील मैदानात चरण्यासाठी सोडल्या होत्या. बकऱ्या विद्यापीठ गेट जवळील महाराष्ट्र बँकेसमोर चरत असताना भावसिंगपुरा येथील सागर मोरे व त्याचा तीन साथीदारांनी बकऱ्या कारमध्ये कोंबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. बकरी कारमध्ये (एमएच-२०-वाय-८३२९) कोंबत असताना परिसरातील नागरिकांना त्यांचा संशय आला. त्यांनी आरडाओरड सुरू करताच सागर मोरेसोबत असलेले तीन साथीदार पळुन गेले. तर नागरिकांनी सागर यास ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलिसांच्या हवाली केले. छावणी आणि बेगमपुरा परिसरात बकरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सुनील कुंडारे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीचा खून करून आईची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन वर्षांच्या मुलीचा खून करून आईने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी पाचच्या सुमारास उघडकीस आली. बेगमपुरा परिसरातील थत्ते हौद परिसरात गणपती मंदिरासमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अमृता किशेार मुळे (२२) असे विवाहितेचे नाव असून, अवंतिका किशोर मुळे असे तीन वर्षांच्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार; अमृत मुळे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांनी व त्यांचे पती किशोर यांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. नेहमीप्रमाणे अमृता दुपारी दीडच्या सुमारास मुलीला घेऊन दुसऱ्या मजल्यावर बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेल्या. किशोर मु‌ळे हॉलमध्ये झोपले होते. दुपारी पाच वाजले तरी अमृता आणि आवंतिका या उठल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांनी बेडरुमचा दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मि‌‌ळाला नाही. अखेर किशोर आणि इतरांनी बेडरुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अवंतिका आणि अमृता लटकलेल्या अवस्थेत आढळले. छताला असलेल्या लोखंडी झोक्याच्या हुकाला साडीच्या साह्याने गळफास घेतला होता. या घटनेची माहिती तात्काळ बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद बदक आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अमृता व अवंतिका यांना घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

\Bसासरे पोलिस विभागात कार्यरत\B

अमृता यांचे सासरे दिलीप शंकरराव मुळे हे शहर पोलिस दलात सहाय्यक फौजदार आहेत. त्यांना किशोर व ईश्वर ही मुले आहेत. त्यांना दोन मुली असून, त्यांचे विवाह झाले आहेत. सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वी किशोर आणि अमृता यांचा विवाह झाला. अमृता यांचे माहेर बीड जिल्ह्यातील केज येथे आहे. तिला वडील नसल्याचेही नातेवाईकांनी सांगितले. ईश्वर यांची पत्नी देखील बीडची असून, अमृता यांची नातेवाईक असल्याचे स्थानिकांनी सांगितले. किशोर खासगी कंपनीत नोकरी करतात. बीबी का मकबरा येथील पार्किंग कंत्राटदराकडे ते नोकरीला होते. बदली ड्रायव्हर म्हणून देखील चे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

\Bआत्महत्यचे कारण अस्पष्ट\B

मुळे कुंटुबीय या भागात सर्वांशी मिळून मिसळून वागतात. या घरात भांडण किंवा वाद कधीही ऐकू आली नसल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. शिवाय घटनास्थळी रविवारी संध्याकाळपर्यंत एकही चिठ्ठी किंवा अन्य काही वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्या. कोळसे यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी

$
0
0

परभणी :

वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्यायमूर्ती बी. जी. को‌‌ळसे पाटील, जालन्यातून शरदचंद्र वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद, जालन्यासह बीड आणि उस्मानाबाद मतदारसंघांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. काँग्रेसबरोबर चर्चा करत असताना उमेदवार जाहीर केलेल्या जागा सोडूनच चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या सभेत चार मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, बीड मतदारसंघातून कैकाडी समाजाचे नेते प्रा. विष्णू जाधव, उस्मानाबाद मतदारसंघातून धनगर समाजाचे नेते अरुण सलगर, जालना लोकसभेसाठी विश्वकर्मा समाजाचे शरदचंद्र वानखेडे यांची नावे अॅड. आंबेडकर यांनी जाहीर केली. आघाडीने आतापर्यंत राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. ‘जाहीर केलेल्या ११ मतदारसंघांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही,’ असे सांगत त्यांनी काँग्रेसला इशाराच दिला आहे. महाआघाडीबाबत ते म्हणाले, ‘त्यांच्यात आघाडीचा काय फॉर्म्युला निश्चित होतो, तो बाहेर येऊ द्या. त्यामध्ये मी खडा मारणार नाही.’

महाआघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश करण्याची चर्चा आहे. ‘मनसेला वंचित बहुजन आघाडीमध्ये मनसेला निमंत्रण देणार का,’ या प्रश्नावर त्यांनी, ‘ज्यांची ताकद आहे, त्यांना आम्ही बोलावतो. ज्यांची ताकद नाही, त्यांना आम्ही बोलावत नाही,’ असे उत्तर दिले.
जाहीर सभेमध्येही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘भाजपकडे परराष्ट्र धोरण नाही. म्हणूनच जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर हल्ला झाला. देश ‘राम भरोसे’ चालला आहे. सध्या ना हुकूमशाही आहे, ना लोकशाही. राष्ट्रीय स्वयंसेवकचे धोरण हुकुमशाहीचे आहे. त्यामुळे आपल्याला जगातील हुकुमशहासोबत अंतर्गत हुकुमशाहीविरुद्ध लढायचे आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नी, सासऱ्यास मारहाण; पतीला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आमच्यावर केस का केली' असे म्हणत माहेरी राहणाऱ्या पत्नी, सासरा व मेहुणीला रस्त्यात अडवून मारहाण, शिविगाळ करणारा आरोपी पती रहिमोद्दीन सलीमोद्दीन शेख याला सोमवारी (१८ फेब्रुवारी) अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (२० फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी सय्यद हसन सय्यद इब्राहिम (६५, रा. कोपरगाव, जि. नगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी शाहीन हिचे लग्न आरोपी रहिमोद्दीन सलीमोद्दीन शेख (मूळ रा. मालेगाव, ह. मु. छा‌वणी, औरंगाबाद) याच्याशी २०१६मध्ये झाले होते. मात्र, तो तिला नीट वागवत नसल्याने त्याच्याविरुद्ध कोपरगाव कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे. तेव्हापासून शाहीन ही माहेरी राहते. नऊ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी हा शाहीन व कुटुंबियांसह चारचाकी वाहनातून जात असताना, आरोपी रहिमोद्दीन व रोहिसा अलमोद्दीन हे आपल्या कुटुंबासह आले आणि त्यांनी कोपरगाव येथील लोखंडी पुलाच्या परिसरात फिर्यादीची गाडी अडवली. 'तुम्ही आमच्यावर केस का केली' असे म्हणत फिर्यादीसह शाहीन व तिच्या बहिणीला शिविगाळ व मारहाण केली. तसेच फिर्यादीचा २३ हजार रुपयांचा मोबाईल व शाहीनच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली.

\Bसोन्याची पोत जप्त करणे बाकी

\Bया प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा होऊन आरोपी रहिमोद्दीन याला सोमवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून, सोन्याची पोत हस्तगत करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक दिले तरच कामे; कंत्राटदारांनी केली कोंडी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्याने कंत्राटदारांचा पालिकेच्या कारभारावर विश्वास राहिलेला नाही. पोस्ट डेटेड चेक दिले, तरच डिफर्ड पेमेंटची कामे करू, अशी अट त्यांनी पालिका प्रशासनाला घातली आहे. कंत्राटदारांनी अशा प्रकारची अट घालण्याची पालिका इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

महापालिका प्रशासनाने डिर्फड पेमेंटच्या माध्यमातून ६९ कोटींच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठीच्या पॅकेजनिहाय निविदा न काढता, त्या रस्तेनिहाय काढण्यात आल्या. कंत्राटदारांनी निविदा भरल्या, पण काम सुरू करण्यासाठी त्यांनी प्रशासनासमोर अनोखी अट घातली आहे. केलेल्या कामाचे पेमेंट मिळण्याची शक्यता नाही. दीडशे कोटींच्या बिलांसाठी कंत्राटदार गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. हे थकीत पेमेंट मिळावे म्हणून कंत्राटदारांनी उपोषण केले, आत्मदहानाचा इशारा देखील दिला. यानंतरही सर्व कंत्राटदारांचे पेमेंट अद्याप मिळालेले नाही. ही बाब लक्षात घेवून डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करू इच्छिणाऱ्या कंत्राटदारांनी प्रशासनासमोर अट घातली आहे. पोस्ट डेटेड चेक दिले, तर डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करू असे कंत्राटदारांनी म्हटले आहे. या अटीबद्दल आयुक्त कंत्राटदारांशी चर्चा करणार आहेत. डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून २१ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे केली जाणार आहेत.

सव्वाशे कोटींमधून ७९ रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यांची यादी अंतिम करण्यात आली असून तांत्रिक मान्यतेसाठी यादी पीएमसीकडे पाठवण्यात आली आहे. आठ दिवसांत तांत्रिक मान्यता मिळेल. त्यानंतर यादी शासनाला सादर केली जाईल. रस्त्यांची यादी तयार करताना सर्व नगरसेवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात सातारा - देवळाईमधील काही रस्त्यांचा समावेश आहे.

- नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी योजनेसाठी ६८२ कोटींचा खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (एमजेपी) ६८२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ते अंदाजपत्रक सोमवारी मराठवाडा विकास मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सोबतच लातूर शहर पाणीपुरवठ्यासाठी ५८२ कोटी रुपयांतून जलवाहिनीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासमोर बुधवारी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत दोन्ही अंदाजपत्रके मांडण्यात येणार आहेत.

औरंगाबाद महापालिकेच्या समांतर जलवाहिनी योजनेचे काम रखडले असल्यामुळे जीवन प्राधिकरणाकडून अंदाजपत्रक तयार करून त्याआधारे योजना बनविण्यात यावी, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे झाले. त्यानंतर प्राधिकरणाकडे अंदाजपत्रकासाठी विकास मंडळाने प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ६८२ कोटी रुपयांतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे अंदाजपत्रक 'एमजेपी'ने तयार केले आहे. योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागेल. लातूरसाठी उजनीतून पाणी देण्याची योजना राबविली तर त्यासाठी ५८२ कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्री आणि राज्यपालांची बुधवारी भेट घेऊन अर्थसंकल्पात दोन्ही योजनांसाठी तरतूद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराबाहेरील गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गेल्या काही दिवसांत चोऱ्या-घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापैकी काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. महत्त्वाची बाब म्हणजे या गुन्ह्यांत स्थानिक गुन्हेगारांऐवजी बाहेरगावचे, तसेच इतर राज्यातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यात बाहेरगावच्या पाच टोळ्यांना विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात समर्थनगर भागात भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत या घरफोडीचा छडा लावत चौघांच्या टोळीला अटक केली. बुलडाणा जिल्ह्यातील कुख्यात घरफोड्या किशोर वायाळ याने साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी शहरातील बँकाना 'क्लोन चेक'द्वारे गंडा घालणाऱ्या सात आरोपींच्या टोळीला अटक केली होती. हे सर्व आरोपी मुंबई आणि उत्तरप्रदेश येथील रहिवासी होते. तसेच नोव्हेंबर महिन्यात एपीआय कॉर्नर येथील व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून ३० लाखांची बॅग पळवण्यात आली. या गुन्ह्यामध्ये मूळ आंध्रप्रदेश व सध्या मुंबईतील रहिवासी कुख्यात गुन्हेगार सॅम्युअल परेरा टोळीचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. परेराची पत्नी व मेहुण्याला गुन्हे शाखेने अटक केली, परेरा हा अद्याप पसार आहे. शहरातील बन्सीलालनगर भागात घरफोडीची मोठी घटना घडली होती. या गुन्ह्यामध्ये हरियाणातील गुन्हेगारांचा समावेश होता, या आरोपींना देखील अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध लग्न समारंभातून दागिने लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत. गुरू लॉन्स, जबिंदा लॉन्स या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यास देखील पोलिसांना यश आले आहे. मध्यप्रदेशतील राजगड जिल्ह्यातील ही टोळी असून या आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे एक पथक मध्यप्रदेशात ठाण मांडून आहे.

शहरातील अनेक गुन्ह्यामध्ये बाहेरगाव, तसेच इतर राज्यातील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बहुतांश गुन्ह्यांतील आरोपींची ओळख पटली असून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. परराज्यातील आरोपींना अटक करण्यासाठी मात्र पोलिसांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही, तर अशा आरोपींना अटक करणे सहज शक्य होत नाही.

मधुकर सावंत, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांची वानवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठा विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे, अशी व्यथा कार्यकारी अभियंत्यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. पुरेसे अधिकारी-कर्मचारी मिळाले तर पाणी पुरवठ्याचे काम योग्य प्रकारे करता येईल, असे संकेत त्यांनी दिले.

सोमवारी झालेल्या महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका जयश्री कुलकर्णी यांनी बाटलीत दूषित पाणी आणून वॉर्डातील पाण्याचा विषय गांभीर्याने मांडला. वारंवार तक्रार करूनही दूषित पाण्याची समस्या सुटलेली नाही, असे त्या म्हणाल्या. शाखा अभियंता के. एम. फालक यांनी याबद्दल खुलासा करताना सांगितले, 'दूषित पाण्याचा स्त्रोत शोधण्यासाठी दहा ठिकाणी खड्डे केले आहेत, पण अद्याप स्त्रोत सापडला नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत.' यावर सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी मजुरांची संख्या वाढविण्याचे आदेश दिले. स्वाती नागरे यांनी सिडकोतील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मांडताना सिडकोचे जलकुंभ उशीरा भरले जात असल्याने पाणी पुरवठ्यात चार-चार तासांचा गॅप निर्माण होतो, अशी तक्रार केली. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी याबद्दल खुलासा करताना सांगितले की, सिडकोतील पाणी पुरवठा फक्त एक दिवस चार तास बंद होता. वीज पुरवठ्याची समस्या आली होती. त्यानंतर पाणी पुरवठ्यात गॅप पडलेला नाही. पाणी पुरवठ्याचा दररोजचा अहवाल आम्हाला मिळतो. पाणी पुरवठा विभागाला फक्त एकच उपअभियंता आहे. आणखी चार उपअभियंत्यांची गरज आहे. कनिष्ठ अभियंत्यांची संख्या देखील फारच कमी आहे. उपअभियंते देण्याबद्दल अस्थापना विभागाला पत्र दिले आहे, पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.' त्यावर सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला आवश्यक ते कर्मचारी देण्याचे आदेश दिले.

पार्किंगच्या जागांची माहिती गुलदस्त्यात

शहरातील पार्किंगच्या जागांची माहिती गुलदस्त्यात असल्याचे या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नगरसेविका शिल्पाराणी वाडकर याबाबत म्हणाल्या, 'पार्किंगच्या जागांची माहिती गेल्या काही बैठकांपासून मी मागत आहे, परंतु प्रशासनाने माहिती दिली नाही.' त्यावर सभापतींनी मालमत्ता अधिकारी डी. जी. निकम यांना खुलासा करण्यास सांगितले. निकम म्हणाले, 'वाडकर यांना माहिती पाठविली आहे.' त्यावर वाडकर यांनी अद्यापही माहिती न मिळाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर निकम यांनी संबंधित लिपिकाला फोन लाऊन विचारणा करीत लवकरच माहिती दिली जाईल, असे सांगितले. सिद्धार्थ उद्यानाच्या पार्किंगबद्दल देखील माहिती मिळाली नसल्याचे गजानन बारवाल यांनी सांगितले. सिद्धार्थ उद्यानाचे पार्किंग बीओटीवर आहे आणि बीओटीसाठी अधिकारी नाही, असे बैठकीत स्पष्ट झाले. यावर सभापती म्हणाले, 'एखाद्या विषयात आपण आदेश देतो आणि पुढच्या बैठकीपर्यंत अधिकाऱ्यांची बदली होते. रोज नवनवीन आदेश आयुक्त काढतात.'

दिलेल्या पेमेंटचे ऑडिट करा

लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी कंत्राटदारांना दिलेल्या पेमेंटचे ऑडिट करा, असे आदेश सभापती रेणुकादास वैद्य यांनी मुख्य लेखापरिक्षकांना दिले. गजानन बारवाल यांनी बिलांचा मुद्दा मांडला होता. नगरसेविका राखी देसरडा म्हणाल्या, 'बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार काम करण्यास तयार नाहीत. काम होत नसल्याने आम्ही कर कशासाठी भरायचा असा सवाल नागरिक करीत आहेत. वॉर्डातील पथदिवे योग्य प्रकारे चालू-बंद होत नाहीत. एलइडीचा एक दिवा लागल्यानंतर तो दहा दिवसांनी बंद पडतो, एलइडी दिव्यांचा दर्जा तपासला पाहिजे, अशी मागणी शिल्पाराणी वाडकर यांनी केली.

एसटीपीच्या पाण्यातून भाजी-पाला

झाल्टा येथील एसटीपीच्या पाण्यातून शेतकरी भाजी-पाला पिकवित आहेत. दूषित पाण्याच्या शेतीमुळे कर्करोगासारखे आजार बळावू लागले आहेत. झाल्टा येथील एसटीपीमधून ३५ दशलक्ष लिटर पाण्यावर रोज प्रक्रिया केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात चार ते पाच दशलक्ष लिटर पाण्यावरच प्रक्रिया होते. शेतकरी ड्रेनेजच्या चेंबरमधील पाणी मोटार लावून उपसतात आणि त्यावर शेती करतात. प्रशासनाचा त्यावर वचक नाही. एसटीपीच्या माध्यमातून किती पाण्यावर प्रक्रिया होते याचे ऑडिट करा, अशी मागणी नगरसेविका राखी देसरडा यांनी केली. ऑडिट न केल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्याच्या विरोधात पोलिसात आपण तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला. यावर कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी यांनी खुलासा केला. काही शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदाराने फोरक्लोजर करण्याची मागणी केली आहे, असे ते म्हणाले. यावर सभापती म्हणाले, 'उर्वरित कामे न करता कंत्राटदाराचे फोरक्लोजर कसे करता. उर्वरित कामे कंत्राटदाराकडून करून घ्या. कंत्राटदार काम करण्यास तयार नसेल तर कंत्राटदाराचे डिपॉझिट जप्त करा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, व्याख्यान, वाहनेफेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आज विविध पक्ष, संघटनातर्फे वाहनफेरी, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, व्याख्यान, महाप्रसाद यासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य मिरवणूक राजा बाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथून सुरू होणार आहे. नवीन औरंगाबादेत सायंकाळी सहा वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समिती अध्यक्ष प्रा. रवींद्र बनसोड यांनी दिली. सकाळी नऊ वाजता क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाची सुरवात करण्यात येणार आहे, तर संस्थान गणपती राजाबाजार येथून सायंकाळी चार वाजता मुख्य मिरवणुकीस प्रारंभ होईल. विद्यार्थी, युवक पारंपरिक मराठमोळी वेशभूषा परिधान करून सहभागी होणार असून, कोल्हापूरचा देखावाही सादर केला जाणार आहे. घोडे, मावळ्यांचा सहभाग लक्षवेधी ठरेल, असे त्यांनी नमूद केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, अब्दुल सत्तार, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विक्रम काळे, इम्तियाज जलील, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.

\Bनवीन औरंगाबाद शिवजयंती महोत्सव समिती\B

गजानन महाराज मंदिर चौक येथे सकाळी नऊ वाजता शिवरायांच्या प्रतिमेचे अनावरण केले जाणार आहे. त्यानंतर वाहनफेरी काढण्यात येणार आहे. पुंडलिकनगर, जयभवानीनगर तेथून पुन्हा गजानन महाराज मंदिर चौक, आकाशवाणीमार्गे जाणाऱ्या फेरीची सांगता क्रांती चौक येथे होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिर चौक येथे शिवभूषण व हिरकणी पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिकनगरमार्गे काढण्यात येणार या मिरवणुकीची सांगता जयभवानी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे होईल, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील यांनी दिली. मिरवणुकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित असणार आहे.

\Bसार्वजनिक छत्रपती शिवजयंती समिती\B

जयभवानीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी सात वाजता शिवपूजन सोहळा होणार असून, जिजाऊ वंदना, शिवपरिपाठ होणार आहे. व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाणार आहे. दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार असून, सकाळी नऊपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी चार वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे.

\B

पिसादेवी येथे पूजन

\Bछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने पिसादेवी येथे सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे; तसेच पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती अजिनाथ धामणे व भाऊसाहेब काळे यांनी दिली.

\Bकष्टकरी कामगारांतर्फे वाहनफेरी\B

मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, स्वराज अभियान, स्वराज इंडियातर्फे वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शहागंज येथील महात्मा गांधी पुतळा येथून वाहनफेरी काढण्यात येणार आहे. भडकलगेट, मिल कॉर्नर, औरंगपुरा मार्गे काढण्यात येणाऱ्या या फेरीची सांगता क्रांती चौक येथे होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनानंतर नारळीबाग येथील युनियन कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर या विषयावर मान्यवर मार्गदर्शन करतील, अशी माहिती देविदास किर्तीशाही यांनी दिली.

\Bबुलंद छावा\B

टीव्ही सेंटर परिसरातील छावा संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजता शिवरायांची आरती व अभिवादन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे डॉ. एम. व्ही. गरड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख, नगरसेवक शिवाजी दांडगे, संघटनेचे प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, संघटक मनोज गायके, ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती असेल. कार्यक्रमानंतर महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समिती अध्यक्ष रत्नाकर म्हस्के, स्वागताध्यक्ष अनिल तुपे, कार्याध्यक्ष विशाल वेताळ, धृपत वेताळ, सुरेश बोरुडे, प्रदीप हारदे, काकासाहेब जाधव यांनी केले आहे.

\Bयुवा क्रांती संघटना\B

संघटनेतर्फे टीव्ही सेंटर येथे सकाळी साडेनऊ वाजता शहीद जवानांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर येथील छत्रपती संभाजी महाराद यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्वधर्म समभाव एकता फेरी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सिटी चौक, गुलमंडी, पैठणगेटमार्गे निघणाऱ्या या फेरीची सांगता क्रांती चौकात होणार आहे, अशी माहिती मराठवाडा अध्यक्ष अजय शिंदे, राज्य संपर्क प्रमुख बापू सोनवणे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टफोनमुळे बहिरेपणा; तरुणाईला इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्टफोनसह सर्व प्रकारच्या ऑडिओ उपकरणांच्या अतिरेकी वापरामुळे बहिरेपणा येऊ शकतो. या उपकरणांच्या अतिरेकी वापरामुळे जगभरातील १२ ते ३५ वयोगटातील एकूण संख्येपैकी निम्म्या म्हणजे एक अब्ज व्यक्ती या श्रवणदोषाच्या उंबरठ्यावर आहेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. अशा उपकरणांचा ६० टक्के व्हॉल्युम व ६० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापर हा कानांसाठी घातक ठरू शकतो. केवळ उपकरणांचा मोठा आवाज नव्हे, तर स्मार्टफोनमधून बाहेर पडणारे रेडिएशनही बहिरेपणाला आमंत्रण देणारे ठरू शकते, असा इशारा शहरातील वैद्यकांनी दिला आहे.

या संदर्भात 'डब्ल्यूएचओ' व 'इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन'ने संपूर्ण तरुणांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सर्व उपकरणांची ८५ डेसिबल आवाजाची पातळी व ८ तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी वापर किंवा १०० डेसिबल आवाजाची पातळी केवळ १५ मिनिटांसाठीसुद्धा बहिरेपणाला आमंत्रण देणारी ठरू शकते, असे 'डब्ल्यूएचओ'ने म्हटले आहे. या संदर्भात शहरातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ़. रमेश रोहिवाल म्हणाले, स्मार्टफोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे कानाच्या आतील द्रव घटक उष्णतेने अतिशय गरम होतात व त्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. तसेच कोणत्याही उपकरणांचा ६० टक्के व्हॉल्यूम व ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर हा कानांसाठी धोकादायक ठरू शकतो, हेही सिद्ध झाले आहे. स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांच्या मोठ्या आवाजामुळे कानांमध्ये शिट्टीसारखा आवाज येणे, तसेच चिडचिडेपणा, आम्लपित्त, अस्वस्थता वाढणे, असे विविध त्रास होऊ शकतात. त्यामुळे स्मार्टफोनसह इतर उपकरणांचा मर्यादित वापर करणे तसेच स्पिकरवर बोलणे, टेक्स्ट मेसेजचा वापर करणे यासारख्या उपाययोजना कराव्यात, असे डॉ. रोहिवाल यांनी 'मटा'ला सांगितले.

स्मार्टफोनमधील रेडिएशनमुळे मेंदुच्या ट्युमरची शक्यताही बळावू शकते. तसेच अविवेकी वापर म्हणजेच ६० मिनिटांपेक्षा जास्त वापर हा श्रवणदोषांना किंवा थेट बहिरेपणालाही आमंत्रण देणारा ठरू शकतो. मात्र असे असताना तरुणाई ही मोबाईल फोन किंवा ऑडिओ उपकरणांच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. 'ईअर प्लग'मुळे अपघात होण्याचीही शक्यता बळावते आणि आतापर्यंत असंख्य अपघात हे अशा उपकरणांमुळे झाले आहेत, असे शहरातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. संजय मोतीवाले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. केवळ स्मार्टफोन नव्हे तर आयपॉड, एमपी-थ्री प्लेयर व इतर उपकरणांचा अतिरेकी वापर कानांसाठी तितकाच धोकादायक असल्याचे अमेरिकेतील संशोधनातून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.

\Bआभासी जगात वावरण्याचा धोका

\Bस्मार्टफोनच्या अविवेकी वापरामुळेच एकाग्रता भंग पावणे, अभ्यासात लक्ष न लागणे आणि खोट्या व आभासी जगात वावरणे असेही दुष्परिणाम समोर येत आहे. मोबाइलमुळेच प्रत्यक्ष संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. त्यातही प्रौढांपेक्षा तरुण वयोगटातील व्यक्तींमध्ये या प्रकारचे दुष्परिणाम जास्त तीव्रतेने दिसून येत आहेत. त्यामुळे तरुणांनी वेळ‌ीच सावध होऊन मोबाइलचा कमीत कमी व विवेकी वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असेही डॉ. मोतीवाले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रिक सिटीबसचा प्रस्ताव पाठवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून इलेक्ट्रिक सिटी बस सुरू करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सिटी बसमधून बुधवारपासून रिंगरोड बस सेवा सुरू करण्याचे देखील यावेळी ठरविण्यात आले.

स्मार्ट सिटी मिशनमधून मार्च अखेरपर्यंत शंभर सिटी बस सुरू होणार आहेत. या सेवेत दीडशे बस सुरू करण्यात येमार आहे. त्यापैकी ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका व स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय झाला. सध्या सुरू असलेल्या सिटी बसमधून एक रिंगरोड बस सेवा सुरू करण्याचे परिवहन समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. रेल्वेस्टेशन, बसस्थानक, हर्सूल, गरवारे कंपनी, सिडको बस स्टँड, चिकलठाणा, आकाशवाणी, महावीर चौक ते रेल्वेस्टेशन अशी रिंगरोड बस चालवली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. शालेय बस रविवारी बंद न ठेवता शहरातील विविध मार्गांवरून चालवणे, जुने बसथांबे तात्काळ दुरुस्त करणे, सिटी बसची उत्पन्न वाढ योजना तयार करणे, बससेवाच्या नुकसानीची रक्कम शासनाकडे मागणे आदी निर्णय देखील परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आले. बैठकीला स्मार्ट सिटी मिशनच्या एसपीव्हीचे मुख्याधिकारी, पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, महापौर नंदकुमार घोडेले, पालिकेचे सभागृहनेते विकास जैन, अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, एम. आर.खिल्लारे, ललित ओस्तवाल, एम. आर. थत्ते आदी उपस्थित होते.

\Bएसपीव्हीची बैठक २८ रोजी\B

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या 'एसपीव्ही'ची बैठक २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या बैठकीला 'एसपीव्ही'चे मेंटॉर संजय कुमार उपस्थित राहणार आहेत. स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत करावयाच्या विविध कामांबद्दल यावेळी निर्णय घेतले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून बकरीची चोरी; दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारमधून बकरी चोरून नेणाऱ्या टोळीतील सागर कचरू मोरे व नदीम नईम शेख यांना रविवारी (१७ फेब्रुवारी) अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्यांना मंगळवारपर्यंत (१९ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी सोमवारी दिले.

या प्रकरणी गितेश सुनील कुंडारे (२६, रा. ढिंबरगल्ली, बेगमपुरा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी फिर्यादीची बकरी विद्यापीठातील महाराष्ट्र बँकेसमोरून चोरून नेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. या प्रकाराने सजग झालेल्या नागरिकांनी पाठलाग करून कारला अडवले. मात्र कारमधील तिघे पसार झाले, तर आरोपी सागर कचरू मोरे (२२, रा. श्रावस्ती कॉलनी, भावसिंगपुरा) हा स्थानिकांच्या हाती लागला व नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला अटक करून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी मोरेने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याचा साथीदार आरोपी नदीम नईम शेख (२४, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) याला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या फरार साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींनी यापूर्वी काही गुन्हे केले आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती विशेष सहाय्यक सरकारी वकील उद्धव वाघ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी, हातगाड्यांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या कारवाईनंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व हातागाडीधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शनिवारी विविध भागात ही कारवाई करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी पडेगाव, मिटमिटा, शरणापूर परिसरात हॉटेलवर छापे टाकले. यामध्ये सूर्या ढाबा, पडेगाव, शरणापूर येथील न्यू साईकृपा हॉटेल आणि मिटमिटा येथील रॉयल व्हिला ढाब्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकासह चौदा जणांना ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये चारजण मद्यप्राशन केलेले आढळून आल्याने त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच शनिवारी शहरातील टी. व्ही. सेंटर, गारखेडा, काल्डा कॉर्नर, उस्मानपुरा, टिळकपथ आदी ठिकाणी असलेल्या वाइन शॉपसमोर असलेल्या आम्लेट विक्रीच्या हातगाड्यांची तपासणी करण्यात आली. अधिक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद फटागंडे, प्रकाश घायवट, महेश पतंगे, जावेद कुरेशी यांच्या तीन पथकांनी ही कारवाई केली. यामध्ये दुय्यम निरीक्षक राहुल रोकडे, के. पी. जाधव, मोहन मातकर, आशिष महेंद्रकर, देविदास नेहुल, राख यांच्यासह इतर जवानांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरट्यांना दंडासह सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेस्थानकावर भाऊजीला सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून त्याचा १४ हजारांचा मोबाइल हिसकावून नेणारे लक्ष्मण भाऊसाहेब घुले व सनी नरेश गड्डम यांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी ठोठावली.

या प्रकरणी दीपक किरण भुरेवार यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन नोव्हेंबर २०१८ रोजी भाऊजीला परभणीला जायचे असल्याने फिर्यादी त्यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी आला होता. मात्र, परभणीला जाणाऱ्या ताडोबा एक्सप्रेसला उशीर झाल्याने, फिर्यादी व त्याचे भाऊजी हे प्लॅटफार्म क्रमांक दोनवर गेले. थोड्यावेळाने फिर्यादी हा स्थानकावरील वॉश बेसिंगकडे गेला असता, आरोपी लक्ष्मण भाऊसाहेब घुले (२४, रा. हमालवाडा) व सनी नरेश गड्डम (१९, रा. पदमपुरा) हे तिथे आले आणि त्यांनी फिर्यादीला मारहाण करून त्याच्या पँटच्या खिशातील १४ हजारांचा मोबाइल हिसकावून घेतला. फिर्यादीने आरडा-ओरड केल्याने त्याचे भाऊजी व औरंगाबाद रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई मोहिनी बिक्कड यांनी फिर्यादीकडे धाव घेत आरोपी घुले याला पकडले. मात्र, दुसरा आरोपी गड्डम हा मोबाइल घेऊन पसार झाला. आरोपी घुलेने दिलेल्या माहितीच्या आधारे तासाभरात दुसरा आरोपी गड्डम याला अटक करुन त्याच्याकडून मोबाइल हस्तगत करण्यात आला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन औरंगाबाद रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bशिपाईची साक्ष ठरली महत्वाची

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात फिर्यादीसह त्याचे भाऊजी व महिला पोलिस शिपाईची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३९२ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनकचरा व्यवस्थापनाचे काम वेगात करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील घनकचरामुक्तीच्या कामाला वेग द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त तथा घनकचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुनील केंद्रेकर यांनी केल्या आहेत. शहरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या समस्येला १६ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. तरीही कचऱ्याची समस्या अद्याप कायम आहे त्यामुळे शासनस्तरावरून याप्रकरणी विचारणा होत असल्याने आयुक्तांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह नगर पालिका प्रशासन व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉलिथीन तसेच प्लास्टिक कचऱ्याच्या नियोजनावरून विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी महापालिकेतील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. शासनाच्या प्लास्टिकमुक्तीच्या नियमाचे किती पालन होते? शहरात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता? महापालिकेचे यावर किती नियंत्रण आहे, असे प्रश्न आयुक्तांनी विचारले. बैठकीनंतर आयुक्तांनी चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. येथे त्यांना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, पॉलिथीन पिशव्या दिसून आल्या, येथील परिस्थिती पाहून केंद्रेकर यांनी पॉलिथीन बँगचे डिलर्स, सप्लायर्स व ट्रेडर्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पॉलिथीनच्या कचऱ्याबाबत लोकांच्या मागे न लागता प्रशासनाने काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी पडेगाव येथील प्रक्रिया प्रकल्प तसेच कांचनवाडी येथील प्रक्रिया केंद्राच्या कामाची परिस्थितीबद्दल माहिती घेतली.

\Bसंनियंत्रण समिती कार्यान्वीत \B

शहरातील कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत ९ मार्च २०१८ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला कचरा व्यवस्थापनाबाबत अधिकार देण्यात आले होते. सुरुवातीचे काही दिवस ही समिती आणि सदस्यांमध्ये सुरळीत बैठक झाली. एकीकडे कचरा समस्या वाढत होती, तर दुसरीकडे समितीची बैठक अनियमित झाली. या पार्श्वभूमिवर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी बैठक घेऊन शून्य कचरा मोहीम राबविण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘महात्मा फुले’त मेंदुची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेंदुच्या गाठीची क्लिष्ट शस्त्रक्रिया रुग्णाच्या जागेपणीच कवटीच्या विशिष्ट ठिकाणी भूल देऊन यशस्वी करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरचे व्यंगत्व टाळण्यासाठीच रुग्णावर जागेपणी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकारची शस्त्रक्रिया ही मराठवाड्यातील पहिलीच आहे, असाही दावा एम्स हॉस्पिटलचे मेंदुशल्यचिकित्सक डॉ. गणेश हरिश्चंद्र राजपूत यांनी केला आहे.

रुग्ण मंगला बारवाल यांच्या मेंदुमध्ये कॅन्सरसदृश गाठ आढळून आली होती व व्यंगत्व टाळण्यासाठी रुग्णाच्या जागेपणीच 'अवेक क्रेनिओटॉमी थ्रू आऊट' ही दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान मंगला या पूर्णपणे जाग्या होत्या व शारीरिक हालचाल करीत डॉक्टरांशी संवाद साधत होत्या. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळेच हाता-पायांची जाणारी ताकद, स्पर्श वाचवण्यात यश आले व अपंगत्व टळले. शरीराचे व हाता-पायांचे नियंत्रण करणाऱ्या आणि मेंदुच्या मध्यभागी असलेल्या 'मोटार एरिया' या भागात असलेली गाठ काढण्यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. कैलास मांगरुळकर व हॉस्पिटलचे संचालक डॉ. विरेंद्र जैस्वाल यांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरले, असेही डॉ. राजपूत यांनी कळविले आहे.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या वतीने स्वरराज करंडक जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि जागतिक मराठी भाषा दिनानिमित्ताने स्वरराज करंडक-२०१९ जिल्हास्तरीय आंतरशालेय लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता विभागीय क्रीडा संकुल गारखेडा येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. आयोजकाच्या वतीने सोमवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

ही स्पर्धा शालेय स्तरावरील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली राहणार आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक क्रमांक पटकाविणाऱ्या संघास अनुक्रमे दहा हजार एक रुपये, पाच हजार एक रुपये व तीन हजार एक रुपये आणि स्मृतीचिन्ह पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. तीन उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन मनसे नेते अभिजित पानसे, राजू पाटील, राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांच्या हस्ते होणार असून पारितोषिक वितरण अभिनेते रमेश परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इंटरनॅशनल स्पोर्टस, कॅनाट गार्डन, सिडको येथे नोंदणी करता येणार आहे. या पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष राहुल पाटील, प्रविण मोहिते, विजय बरसमवार आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तुमचं आमचं नातं काय ?, जय जिजाऊ जय शिवराय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवे फेटे, पारंपारिक वेशभुषा अन् 'तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगणभेदी घोषणा देत क्रांती चौक तरुणाईने सळसळला. विविध कॉलेजांमधून विद्यार्थ्यांनी काढलेल्या पालख्या, मिरवणुकांमध्ये शिवाजी महाराजांची वेशभुषा करून तरुण सहभागी झाले. यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत पाकिस्तानचा निषेध करण्यात आला.

शहरातील विविध भागातून तरुणांचे लोंढे क्रांती चौकाकडे येत होते. परिसराची सजावट, भगवे पताके, शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या घोषणा विविध संस्था, संघटनाच्या व्यासपीठावरून सुरू असलेले पोवाडे यामुळे वातावरण भारलेले होते. शिवाजी महाराजांचे छायाचित्र, गड-किल्ले अन् जाणता राजा, जगदंब असे लिहिलेले झेंडे दुचाकी, चारचाकी वाहनांवर लावलेले युवक, युवतींमुळे क्रांती चौकात गजबजून गेले. उत्साहाने भारलेला प्रत्येक क्षण मोबाइलमध्ये प्रत्येकाना टिपला.

देवगिरी कॉलेजच्या तरुण-तरुणींनी लक्षवेधक फेरी काढली. कॉलेजमधून निघालेली ही फेरी कोकणवाडी, उस्मानपुरामार्गे क्रांती चौकात पोहचली. भगवे फेटे, पारंपरिक वेशभुषेत विद्यार्थी-विद्यार्थिंनी सहभागी झाले. यासह कॉलेजच्या ढोल पथकावर सादर करण्यात आलेल्या पारंपरिक कवायती पाहण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा गर्दी झाली. स्वामी विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पालखी काढली. यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत सजीव देखावा सादर करण्यात आला. शासकीय 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांनी भगवे, निळे फेटे परिधान करत 'एकता रॅली' काढली.

\Bशिवचरित्र, संविधानाचे वाटप

\B

क्रांती चौकात अखिल भारतीय मराठा महासंघ, आर. आर. पाटील फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, शिवस्वराज्य बहुजन पक्षांनी शिवपीठ उभारले होते. या शिवपीठावरून मिरवणुकीने येणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सवाचा पाळणा जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी, उपस्थित महिलांनी गायला. उपस्थितांना शिवचरित्र, भारतीय संविधानाची प्रत देण्यात आली. यावेळी डॉ. संजय बागल, रमेश गायकवाड, हेमा पाटील, बाबासाहेब दाभाडे, रेखा वहाटुळे, वैशाली कडू, आर. एस. पवार, रेणुका सोमवंशी यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी नागरिकांची माहिती लपवली, गुन्हा दाखल

$
0
0

औरंगाबाद: गेल्या तीन महिन्यापासून शहरात येमेन देशाचे तीन नागरिक वास्तव्य करून आहेत. या विदेशी नागरिकांची माहिती लपवणाऱ्या घरमालकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री अकरा वाजता ही रोहिला गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली. अब्दुल रशीद मोहम्मद हाशम (वय ५०, रा. प्लॅट क्रमांक १३, नोबल पॅलेस) यांच्या घरात येमेन देशाचे रहिवासी फातेमा अली ओमर अली मामारी (वय ७६), मोहम्मद सईद अल हेझम (वय २३) आणि अब्दुल मोहम्मद अल राई (वय ३४) हे तिघे मेडिकल व्हिसावर भारतात आल्याचे आढळले. त्यांना हे घर १२ ऑक्टोबर २०१८ रोजी भाड्याने दिले होते. पोलिस कॉन्स्टेबल बालाजी तोटेवाड यांच्या तक्रारीवरून घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपनिरीक्षक डुकरे तपास करित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहिदांना श्रद्धांजलीसाठी आज मानवी साखळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवी साखळी करून बुधवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ठिक दहा वाजता नागरिकांनी असेल तेथे रस्त्यावर येऊन मानवी साखळीमध्ये सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील काही देशप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, बुधवारी सकाळी दहा वाजता 'ऐ मेरे वतन के लोगों' हे देशभक्तीपर गीत वाजण्यास सुरुवात होणार आहेत. यावेळी नागरिकांनी गाणे संपेपर्यंत शांतपणे उभे राहायचे आहे. यानंतर 'अमर रहे, अमर रहे, वीर जवान अमर रहे' ही घोषणा तीन वेळा देण्यात येणार आहे. यानंतर या मानवी साखळीचा समारोप होणार आहे. यावेळी नागरिकांनी पुढील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नागरिक घराबाहेर मानवी साखळी करतील, शासकीय कार्यालय, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या समोरील रस्त्यावर, व्यापारी दुकानासोर मानवी साखळी करतील, कोणताही फोटो या कार्यक्रमात नसेल, मानवी साखळीमध्ये कोणत्याच प्रकारच्या विरोधातील घोषणा, पक्षाच्या घोषणा दिल्या जाणार नाहीत, असे कळवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>