Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अनुदानाचे १६ टक्के तुंबले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दुष्काळी मदतीसाठीची १०५० कोटी रक्कम दोन हप्त्यात मिळाली. ५२५ कोटींचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर तीन आठवड‌यात मदतीचा ५२५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही मिळाला. मात्र, पहिल्या टप्प्यातील १६ टक्के अनुदान वाटप शिल्लक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे करपली झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. हे शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत होते. अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात ५२५ कोटी २९ लाख ३६ हजार रुपये रक्कम मिळाली. त्यातील ४५५ कोटी ५१ लाख ४२ हजारांचे वाटप झाले असून, ६९ कोटी ७८ लाख रुपये रक्कम अजूनही पडून आहे. त्यामुळे अनुदान ज्यांना मिळाले नाही, ते शेतकरी प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे आता दुसऱ्या टप्प्यातील अनुदानही मराठवाड्याला प्राप्त झाले असून, प्रत्येक जिल्ह्यांना अनुदान देण्यात आले आहे. मराठवाड्याला आवश्यक असलेल्या दोन हजार ५६४ कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी एक हजार ५० कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. यातील पहिल्या टप्प्यासाठी ५२५ कोटी २९ लाख, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही तितकेच अनुदान मिळाले आहे. या दुष्काळामध्ये २९ लाख ६५ हजार हेक्टरवर कोरडवाहू पिके, दोन लाख ८० हजार हेक्टवरील बागायती पिके तर एक लाख २६ हजार हेक्टरवरील फळबागांना मोठा फटका बसला आहे.

---

\Bमटा भूमिका

\B---

\Bशेतकऱ्यांना दिलासा द्या

\B---

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम गेला. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळी तब्बल दोन मीटरने खोल गेली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. इतके गंभीर संकट असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीने दुष्काळाचा निधी दिला. या निधीच्या वाटपात प्रशासनाकडून दिरंगाई सुरू असल्याचे दिसते. अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील १६ टक्के रक्कम ही दुसऱ्या टप्प्यातील रक्कम येऊनही वाटप नाही, म्हणजे हे अती झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपणही थोडे संवेदनशील व्हावे. कुणाच्या घराची चूल आपल्या कामामुळे पेटेत असेल तर याहून मोठे आणि आनंददायी काम अजून कोणते? अशीच भावना ठेऊन प्रशासनाने काम करावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

---

\Bजिल्हानिहाय मिळणारी रक्कम (दुसरा टप्पा)

\B---

जिल्हा.....................एकूण मदत.................मान्यता दिली.................. दुसरा हप्ता

---

औरंगाबाद..................५४५.१३.......................२२३.२८...................१११.६४

जालना.......................४७८.०३......................१९५.८०..................९७.९०

बीड...........................६१९.८३.......................२५३.८८..................१२६.९४

लातूर........................१६.२१...........................६.२१......................३.३१

उस्मानाबाद..................३४१.७१......................१३९.९६..................६९.९८

नांदेड..........................१२५.७६.....................५१.५१....................२५.७५

परभणी..........................२६२.५६.....................१०७.५४..................५३.७७

हिंगोली........................१७५.६८.......................७१.९५...................३५.९७

----

एकूण.........................२५६४.९१....................१०५०.५८...................५२५.२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्युरोथेरपीद्वारे रुग्णांना मिळतोय दिलासा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉ. लजपतराय मेहराज् न्युरोथेरपी'द्वारे नेमक्या कोणत्या अवयवांच्या अकार्यक्षमतेमुळे आजार उद्भवला हे शोधून संबंधित आजाराला कारणीभूत असलेलेल्या पेशी-अवयव आणि शरीरातील सभोवतालच्या भागाला विशिष्ट दाबतंत्राद्वारे उत्तेजित करून अकार्यक्षम अवयवांना कार्यक्षम केले जाते. याच पद्धतीने कुठल्याही औषधांशिवाय रुग्ण हळूहळू व्याधीमुक्त होतो आणि आतापर्यंत असंख्य रुग्णांना या न्युरोथेरपीद्वारे मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात सुमारे दोन हजार केंद्र आणि त्यात सेवा देणारे सुमारे पाच हजार न्युरोथेरपिस्टद्वारे ही उपचारपद्धती लोकांपर्यंत नेत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला.

'सुशुम्न वेलनेस'तर्फे न्युरोथेरपी शिबिर नुकतेच शहरात घेण्यात आले. या शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यासाठी आलेले मुंबई येथील कमलेश चव्हाण व राकेश विश्वकर्मा, तर शहरातील 'सुशुम्न वेलनेस'चे गोविंद आपटे यांनी 'मटा'शी संवाद साधला. "(कै.) डॉ. लजपतराय मेहरा यांच्या तीन-साडेतीन वर्षांच्या मुलीचा औषधांच्या दुष्परिणामांमुळे (साईड इफेक्ट) मृत्यू झाला. त्यामुळे औषधांशिवाय उपचार पद्धतीचा डॉ. मेहरा यांनी ध्यास घेतला आणि आयुर्वेद, अॅलोपॅथी व इतर पॅथींचा दीर्घ अभ्यास करून ही न्युरोथेरपी विकसित केली. अॅलोपॅथीच्या निरनिराळ्या औषधांच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणारी विविध प्रकारची रसायने, एन्झाईम्स व इतर घटकांची निर्मिती ही आपल्याच शरीरामध्ये होते; परंतु संबंधित पेशी-अवयव अकार्यक्षम झाल्यामुळे अशा घटकांची निर्मिती होणे थांबते आणि त्यामुळेच वेगवेग‌ळ्या व्याधींचा जन्म होतो, असे डॉ. मेहरा यांचे मत झाले. त्यामुळे शरीरात अशा निरनिराळ्या घटकांची निर्मिती होण्यासाठी कोणकोणत्या पेशी-अवयव जबाबदार आहेत, हे डॉ. मेहरा यांनी शोधून काढले. त्यानंतर संबंधित आजाराला जबाबदार असलेले संबंधित अवयव विशिष्ट दाबतंत्रामुळे उत्तेजित करून कार्यक्षम होऊ शकतात आणि असे अवयव कार्यक्षम झाले की आजार कमी-कमी होऊन नाहिसे होतात, असे डॉ. मेहरा यांनी सप्रयोग सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्याधीग्रस्तांना याच दाबतंत्राद्वारे दिलासा दिला. यात अनेकजण व्याधीमुक्तही झाले आणि हीच उपचार पद्धती 'डॉ. लजपतराय मेहराज् न्युरोथेरपी' या नावाने ओळखली जाऊ लागली. याच नावाने 'आयुष'अंतर्गत या उपचार पद्धतीची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे", असे कमलेश चव्हाण व राकेश विश्वकर्मा यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\Bसंधीवात, हायपोथायरॉईडचे लाभार्थी मोठे

\Bमूत्रपिंडविकार,'लिव्हर सिऱ्हॉसिस'पासून मतिमंदत्वापर्यंत सर्व प्रकारचे आणि सर्व वयाचे रुग्ण या उपचार पद्धतीचा लाभ घेत आहेत. त्यातही संधीवात, हायपोथायरॉईड, किडनीस्टोन, हृदयविकार, मधुमेह यासारख्या व्याधीग्रस्तांनी या उपचार पद्धतीचा मोठा लाभ घेतला आहे. मात्र सांगितल्यानुसार ही उपचार पद्धती घेतली पाहिजे तरच याचे शंभर टक्के लाभ मिळतात. या उपचार पद्धतीचे पदविका अभ्यासक्रमही चालवले जातात, असेही गोविंद आपटे व राकेश विश्वकर्मा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: जमिनीवर बसून सोडवला १२वीचा पेपर

0
0

औरंगाबाद:

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असा दावा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केला असला तरी तो फोल ठरल्याचं चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळालं. येथून चाळीस किलोमीटरवर असलेल्या पोरगाव येथील केसाबाई हाईस्कूल परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींनी चक्क जमिनीवर बसून इंग्रजीचा पेपर सोडवला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा गुरुवारपासून सुरुवात झाली. औरंगाबाद विभागात १ लाख ६८ हजार २५१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. औरंगाबादजवळील पैठण तालुक्यातील केसाबाई हायस्कूल पोरगाव येथील केंद्रावर विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. विद्यार्थी जमिनीवर बसूनच परीक्षेचा पेपर सोडवत होते. आसनव्यवस्था अपुरी होती. एका बाकावर तीन विद्यार्थी बसले होते. तर शिक्षकच काही प्रश्नांची उत्तरे सांगत होते. महसूल विभागाचे पथक, भरारी पथकही तिथे नव्हते. त्यामुळं कॉपीमुक्त परीक्षा केवळ कागदावरच असल्याचं चित्र होतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडून आलो नाही, तरी पाडू शकतोः आठवले

0
0

औरंगाबादः

राज्यात भाजप-शिवसेना युतीने लोकसभा जागा वाटपात ‘रिपाइं’ला डावलले, ही धक्कादायक बाब आहे. आम्ही नाराज आहोत. स्वतंत्र निवडून येऊ शकत नसलो, तरी पाडू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. भाजपचा आम्ही सन्मान करतो त्यांनी ‘रिपाइं’ विचार करावा. एक जागा मागितली, त्यातही डावलणे म्हणजे ही अवहेलना व अन्याय असल्याचेही ते म्हणाले.

औरंगाबादमध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपच्या नेत्यांना भेटून दक्षिण मध्य मुंबईची एक जागा ‘रिपाइं’साठी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. असे असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह राज्यात येतात, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन युती जाहीर केली जाते. त्यात ‘रिपाइं’ला डावलले गेले, हे मनाला खटकणारे आहे. आम्ही काही त्यांना अडचणीत आणले नाही. मात्र, आमच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात सहा महिन्यात स्थान देण्याचे मान्य केले होते. ते सहा महिने उलटून गेले. याबाबत २५ फेब्रुवारी रोजी ‘रिपाइं’च्या काही महत्वाच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. २०१९ मध्ये त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. राफेलबाबत राहूल गांधी गैरसमज पसरवत आहेत, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ

पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. पाकिस्तान नियम तोडून हल्ले करतोय. यापूर्वीही अनेकदा केले. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज असून, पाकला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. एकदा आर-पारची लढाई गरजेची आहे. पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावित, असेही केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य मेळाव्यात सर्व व्याधींची तपासणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शनिवारी (२३ फेब्रुवारी) सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत खडकेश्वर मैदानावरील मंदिर परिसरात एकदिवसीय नि:शुल्क महाआरोग्य मेळावा होणार आहे. सुमारे शंभर तज्ज्ञ डॉक्टर तपासणी व उपचार करणार आहेत. सहभागी रुग्णांना चहा, नाष्टा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त सुनील केंदेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त निपुण विनायक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळाव्यासाठी २५ छोटे कॅबिन तयार केले जाणार आहेत. 'एचएलएल'मार्फत सीबीसी, एचबीएवनसी, थायरॉईड आदी तपासण्या, 'ईसीजी'ची सोय आहे. पाच डेंटल चेअर असून १२ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय, महापालिका व खासगी तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जी. एम. कुडलिकर, डॉ. संतोष नाईकवाडे यांनी बुधवारी (२० फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

\Bया आजारांची तपासणी \B

मेळाव्यात रुग्णांची भीषक तपासणी, स्त्रीरोग व गरोदर महिलांचे आजार, बालरोग, नेत्ररोग, मोतीबिंदू, कान-नाक-घसा, दंतरोग, मुखरोग, त्वचारोग, अस्थिरोग, लैंगिक आजार, हिवताप, हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार, क्षयरोग, मानसिक आजाराची तपासणी व उपचार होतील. आयुष (आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी), तंबाखू नियंत्रण, एड्स मार्गदर्शन केंद्र, लसीकरण, कुटुंब कल्याण नियोजन व समुपदेशन, आहार मार्गदर्शन आदी कक्ष राहणार आहेत.

\B१२ लाख मुलांना जंतनाशक औषध देणार

\Bराष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शुक्रवारी (२२ फेब्रुवारी) जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच शाळांमधील एक वयोवर्षापासूनच्या १२ लाख ५० हजार ९३० मुलांना जंतनाशकाच्या गोळ्या तसेच औषधी दिली जाणार आहे. या उपक्रमात महापालिकेचा आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सहभागी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श शिक्षक समितीतर्पे उद्या अधिवेशन, शिक्षण परिषद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे पहिले राज्य अधिवेशन व शिक्षण परिषद २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित असणार आहेत, अशी माहिती समितीचे संस्थापक दिलीप ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर हे अधिवेशन होणार आहे. सकाळी ११ वाजता पहिल्या सत्रात 'आजची शिक्षण व्यवस्था व समाज' विषयावर व्याख्याते गणेश शिंदे, तर डॉ. मंजुषा क्षीरसागर या 'शिक्षक चळवळीतील महिलांचे योगदान व अडचणी' विषयावर मार्गदर्शन करणार आहे. उपक्रमशिल शाळा यांनी केलेल्या कामगिरीची चित्रफित शिक्षकांना दाखविण्यात येणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता उद्घाटन सत्र होणार आहे. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असेल. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष शिरीष बोराळकर आहेत. जुनी पेन्शन, बदली धोरणातील अन्यायकारक त्रुटी दूर करणे, विस्थापित शिक्षकांना त्यांच्या मुळ तालुक्यात दुरुस्तीने पदस्थापना देणे, चटोपाध्यय वेतनश्रेणी विनाअट लागू करणे, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिपाई, लिपिक पदे निर्माण करून भरणे, वस्तीशाळा शिक्षकांची मुळ सेवा ग्राह्य धरणे आदी बाबींवर चर्चा, मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष अंकुश काळे, उपाध्यक्ष गिरीष नाईकडे, के. सी. गाडेकर, सुषमा राऊतमारे, पुष्पा दौड, जयश्री दहीफळे, बबीता नरवटे, सुरेशा पाथ्रीकर, पदमा वायकोस, अंजुम पठाण, संतोष बरबंडे, राजेश आचारी, संजीव देवरे, राजेंद्र डमाळे, शिवाजी एरंडे, संतोष जाधव, भरत सदभावे, शाकीर सय्यद, छोटु पटेल, बाबुलाल राठोड, ज्ञानेश्वर पठाडे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन हडपण्याचा प्रयत्न; नियमित जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात आरोपी निसारबेग अजीजबेग मिर्झा याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमुदी यांनी गुरुवारी (२१ फेब्रुवारी) फेटाळला.

या प्रकरणी पार्वताबाई लाला सलामबाद (४६, रा. गोलवाडी, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मौजे वळदगाव येथे वडिलोपार्जित ६० आर शेतजमीन आहे. आरोपी निसारबेग अजीजबेग मिर्झा (४९, रा. गाढेजळगाव ता. जि. औरंगाबाद), सांडू खान, मोहम्मद जहीर, साजिद गुलाम व एक अनोळखी व्यक्ती अशा पाचजणांनी मिळून बनावट कागदपत्रांच्या आधारे इसारपावती तयार करुन फिर्यादीची फसवणूक केली. तसेच आरोपी मिर्झा निसारबेग याने साथीदारांसह फिर्यादीच्या शेतात जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता कोर्टाने तो फेटाळला. विशेष सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांचा प्रश्न ७० टक्के मार्गी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील औषधांचा प्रश्न ७० टक्के मार्गी लागला असून, 'हाफकिन'मार्फत औषधी व वैद्यकीय साहित्य पुरवठा सुरळीत होत आहे. सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांतील उपचारांचा दर्जा आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात चार ठिकाणी उभारल्या जात असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी तसेच कॉर्निया ट्रान्स्प्लान्ट होणार आहे. येत्या तीन वर्षात जे. जे. हॉस्पिटलमध्ये हार्ट, लिव्हर व बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट सुरू केले जाणार आहे, यामुळे गोरगरीब रुग्णांवर कमी खर्चात उपचार होतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) प्रभारी संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी दिली.

एका कार्यक्रमानिमित्त शहरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. लहाने म्हणाले, 'एमसीआय'च्या निकषांनुसार सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आहे. अजूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत प्राथमिक स्तरांवरील उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे 'टर्शरी केअर सेंटर' असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत अधिकाधिक विशेष व अतिविशेष आणि दर्जेदार उपचार देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद, लातूर, अकोला व अमरावती येथे 'पीएमएसएसवाय'अंतर्गत होणाऱ्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड व बुब्बळ प्रत्यारोपण होणार आहे. त्यादृष्टीने चारही ठिकाणी मनुष्यळनिर्मिती व नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये ११०० कोटींच्या निधीतून उभे राहात असलेल्या स्वतंत्र सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये हेलिपॅडही तयार केले जाणार आहे. यामुळे अत्यवस्थ रुग्णाला वैद्यकीय दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या 'गोल्डन अवर'मध्ये एअर अॅम्ब्युलन्सद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर ब्रेन डेड रुग्णांच्या अवयवांची वाहतूक करण्यासाठी एक स्वतंत्र एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कंपनीशी करार करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. तसेच येत्या तीन वर्षात 'जे. जे.'मध्ये हृदय, यकृत व बोन मॅरो प्रत्यारोपणही सुरू केले जाणार आहे, ज्यामुळे वरील तिन्ही प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया गोरगरीबांच्या आवाक्यात येतीतल, असेही डॉ. लहाने म्हणाले. समन्वयातून जिल्हा रुग्णालयांमध्ये रिट्रायव्हल सेंटर (अवयवदानाच्या शस्त्रक्रिया होणारे केंद्र) अधिकाधिक कार्यशील करण्याचाही प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.

\Bपरभणीत कॉलेजसाठी चाचपणी

\Bनंदूरबार, बारामती व सातारा येथे घोषित झालेले नवीन मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्यातील परभणी येथे नवीन मेडिकल कॉलेज सुरू करावे का, याबाबत चाचपणी व सर्वेक्षण केले जात आहे. या नवीन कॉलेजांच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना सौर कृषी पंप १६ हजारांत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शेतकऱ्यांना तीन 'एचपी'चा सौर कृषी पंप फक्त १६ हजार ५६८ रुपयांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौर उर्जा पंपासाठी काढण्यात आलेल्या निविदेत सौर संचाची किंमत कमी आल्याने याचा लाभ थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषी पंपाची किंमत तीन एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ रुपये व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ रुपये एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी तीन एचपी डीसी पंपासाठी आधारभूत किंमत दोन लाख ५५ हजार रुपये व पाच एचपी डीसी पंपासाठी तीन लाख ८५ हजार रुपये होती.

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी तीन एचपीसाठी २५ हजार ५०० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ७२५ रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० रुपये व आठ हजार २८० रुपये एवढी भरावी लागणार आहे. तर पाच एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना पूर्वी ३८ हजार ५०० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती/जमाती गटातील लाभार्थ्यांना १९ हजार २५० रुपये एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे २४ हजार ७१० रुपये व १२ हजार ३५५ रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे.

जिल्ह्यातून ५३३ शेतकऱ्यांनी भरले पैसे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी सुमारे ५३३ शेतकऱ्यांनी पैसे भरले असून लवकरच या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाद्वारे वीज जोडणी देण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in/solar या महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सासरे जावयाची समजूत काढतील’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'खैरेंना पाडण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांची समजूत त्यांचे सासरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे काढतील,' असा विश्वास खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना काढला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. ते म्हणाले, अशी चर्चा आहे की, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत आणि खासदार रावसाहेब दानवे यांना वरिष्ठ पातळीवरून बोलावण्यात आले होते. तुमचे जावई जे करत आहेत ते अयोग्य असल्याचे दानवे यांना समजावले आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपला खासदारांची संख्या वाढवावी लागणार असून त्यांना प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून दानवे यांनी जाधव यांचे कान टोचले आहेत. परिणामी, येत्या निवडणुकीत जाधव यांचा अडसर राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. 'आता कोणीही उमेदवार आला तरी फरक पडणार नाही, मी जिंकणारच,' असा दावा केला. निवडणुकीत भाजप पदाधिकारी तुमचे काम करणार काय? या प्रश्नावर युती झाली नसती तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे काम केले असते, असे अनेक पदाधिकारी फोन करून सांगत आहेत, असे त्यांनी सांगितले.

'राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपैकी कोणाला जागा सुटणार याचा निर्णय अद्याप झाला नाही. राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या विरोधातील गटासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. काँग्रेसचे शिष्टमंडळही दोन दिवस दिल्लीला माझ्या निवासस्थानी होते,' असा दावा खैरे यांनी केला.

\Bखोतकर काँग्रेसमध्ये जाणार नाहीत\B

अर्जुन खोतकर कुठेही (काँग्रेसमध्ये) जाणार नाहीत. ते फक्त बोलतात. ते फुटू शकत नाहीत. त्यांना कॅबिनेट किंवा इतर काही मिळण्याची अपेक्षा आहे. युती झाली तरी मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचे अस्तित्व दाखवून दिले जाईल, या दिशेनेचे काम करण्यात येईल, असे खैरे यांनी स्पष्ट केले.

\B'ते' राजीनामे देणार नाहीत\B

शिवसेना-भाजपचे फिस्कटल्यानंतर जिल्हा परिषद, तसेच काही नगर पालिकांमध्ये शिवसेना-काँग्रेसची युती झाली आहे. आता पुन्हा भाजप- शिवसेनेचे जमल्यामुळे काँग्रेस सोबतच्या युतीचे काय?, असा प्रश्न विचारला असता, आता आम्ही भाजप सोबत युती केली आहे. जर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला तरच तेथे निवडणुका होतील अन्यथा कालावधी पूर्ण होईपर्यंत ते खुर्ची सोडणार नाहीत, असे खैरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सुरूच

0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सध्या सुरू असून या धामधुमीत चोरांनी नागरिकांना लुबाडण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना चाकुचा धाक दाखवून लुबाडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. बुधवारी रात्री जुना मोंढा भागात पिग्मी एजंटावर चाकुहल्ला करीत ४० हजार रुपये लांबविण्यात आले. तसेच अन्य एका घटनेत विद्यार्थ्यावर चाकुहल्ला करीत मोबाइल पळवण्यात आले.

पिग्मी एजंटला लुबाडण्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजता जुना मोंढा भागातील रुपेश ट्रेडिंग सेंट्रल समोर घडली. दिलीप शांतीलाल पांडे (वय ५५, रा. श्रीकृष्णनगर) हे दुकानदारांकडून पिग्मी कलेक्शन करतात. बुधवारी रात्री जुना मोंढा भागात एका रद्दी दुकानदाराकडून त्यांनी कलेक्शन केल्यानंतर दुचाकीवर जात होते. यावेळी अंधारात पाठीमागून एका दुचाकीवर तीन अनोळखी तरुण त्या ठिकाणी आले. या तरुणांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. पांडे यांच्या दुचाकीवर तसेच हातावर त्यांनी चाकुचा वार करीत त्यांच्याजवळ असलेली कलेक्शनची ४० हजार रुपये असलेली बॅग हिसकावून ते पसार झाले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजता एन चार भागात घडली. भूषण चंद्रकांत जोशी (वय १८, रा. एन २) हा विद्यार्थी अभ्यासिकेतून अभ्यास करून मित्रासोबत घरी जात होता. यावेळी तीन अनोळखी आरोपींनी त्याला अडवत मोबाइलची मागणी केली. भूषणने त्यांना नकार दिला असता त्यापैकी एकाने चाकुने भूषणच्या मांडीवर वार करीत जखमी केले. यानंतर त्याचे मोबाइल हिसकावून घेत आरोपी पसार झाले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेत राहुल साहेबराव शिंदे (वय ३५, रा. शिवशंकर कॉलनी) यांचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या दोघांनी लांबविला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता चेतक घोडा चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधिकारी बदल्यांच्या गडबडीत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात सध्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. यामध्ये काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या अंतर्गत शहरात करण्यात आल्या असून काही अधिकाऱ्यांच्या बदल्या शहराबाहेर करण्यात आल्या आहेत. अधिकारी बदल्यांमध्ये व्यस्त असल्याने गुन्हेगारी कृत्याकडे त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. याचा परिणाम गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटी मिशनच्या बैठकीत बस थांबे, स्मार्ट रस्त्यांचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या बैठकीत 'एमएसआय' (मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर), स्मार्ट बस थांबे यासह स्मार्ट रस्ते आणि रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून वारसास्थळांच्या कामांचा प्रस्ताव मांडला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आचारसंहितेपूर्वीची ही अखेरची बैठक असल्याने जास्तीत जास्त कामांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न बैठकीत केला जाणार आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक २८ फेब्रुवारी रोजी मेंटॉर संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची बैठक असल्याने जास्तीत जास्त कामांना मंजुरी मिळावी यासाठी 'एसपीव्ही'च्या संचालक मंडळाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. स्मार्ट सिटी मिशनमधून सिटी बस सुरू केली असून अद्याप बस थांब्यांची व्यवस्था झालेली नाही. ५७ स्मार्ट बस थांबे उभारण्याचे नियोजन सिटी बस प्रकल्पात आहे. त्याचा प्रस्ताव 'एसपीव्ही'च्या बैठकीत ठेवला जाणार आहे. 'एमएसआय'च्या माध्यमातून शहरात ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय कचरा वाहतूक करणारी वाहने, पाण्याचे टँकर, सिटी बसमध्ये 'जीपीएस' यंत्रणा बसवली जाणार आहे. या शिवाय 'एमएसआय' मधून करावयाच्या अन्य कामांच्या नियोजनाचे सादरीकरण नुकतेच पार पडले. त्यानंतर एजन्सी निश्चितीचा प्रस्ताव बैठकीत आणला जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

'ग्रीनफिल्ड'च्या ऐवजी 'रेट्रोफिटिंग' करण्यास केंद्र सरकारने 'एसपीव्ही'ला मान्यता दिली आहे. 'रेट्रोफिटिंग'च्या माध्यमातून वारसास्थळांचा विकास करण्याचे नियोजन आहे. याबद्दलचा प्रस्ताव बैठकीत येईल. त्याच बरोबर स्मार्ट रोडच्या कामाचे प्रस्तावही मांडले जातील, असे संकेत मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत लेक्चर थिअरसाठी हवा सात कोटींचा निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) परिसरातील पार्किंगच्या जागेत प्रशस्त लेक्चर थिअटर उभे केले जाणार असून, त्यासाठी 'सीएसआर'च्या माध्यमातून सात कोटींचा निधी उभा केला जाणार आहे. याच थिअटरसाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या महाविद्यालयात तीन ठिकाणी व्याख्यान कक्ष आहे; परंतु या तीन कक्षांमध्ये एकाचवेळी दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थी बसू शकत नाही. त्यामुळे 'एमसीआय'च्या निकषांनुसार व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर यांच्या मार्गदर्शनानुसार लेक्चर थिअटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लेक्चर थिअटरसाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उभा करण्याचा प्रयत्न आहे, असे घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाला उत्तरप्रदेशच्या ठगांचा ऑनलाइन पावणेसहा लाखांचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योजकाला उत्तरप्रदेशच्या दोन जणांनी ऑनलाइन पावणेसहा लाखांचा गंडा घालत फसवणूक केली. पेब शेडचे काम करून देण्याचे आश्वासन देत हा प्रकार १३ फेब्रुवारी २०१७ ते ८ सप्टेंबर २०१७ या कालावधीत घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुधाकर पंढरीनाथ चामले (वय ५०, रा. रायगडनगर, सिडको, एन ९) यांनी तक्रार दाखल केली. चामले यांची अंतापूर भेंडाळा येथे सुरज ब्लो प्लास्ट नावाने कंपनी असून ही कंपनी पेट बॉटल तयार करून फार्मा कंपनीला त्याचा पुरवठा करते. चामले यांना त्यांच्या कंपनीमध्ये पेब शेडचे काम करायचे होते. इंटरनेटवर त्यांनी सर्च केले असता त्यांना जोया इंटरप्रायजेस ही मेरठ, उत्तरप्रदेश येथील कंपनी आढळून आली. या कंपनीशी त्यांनी संपर्क करीत शेडच्या कामाचे कोटेशन मागितले. जोया कंपनीचे दानीश सिद्दीकी आणि परवेज सिद्दीकी यांनी मेलवर त्यांना कोटेशन पाठवले. यानंतर त्यांनी चामले यांच्याशी वारंवार संपर्क साधत विश्वास संपादन केला. शेडच्या कामापोटी चामले यांनी विविध टप्प्यात जोया कंपनीला आरटीजीएस आणि ऑनलाईन पद्धतीने ५ लाख ८५ हजार रुपये पाठविले. रक्कम मिळाल्यानंतरही जोया इंटरप्रायजेसने शेडच्या कामाला सुरुवात केली नाही. चामले यांनी पाठपुरावा केला असता त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन जोया कंपनीच्या वतीने देण्यात आले. यानंतर चामले यांचा फोन उचलणे सबंधित अधिकाऱ्यांनी बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने चामले यांनी सायबर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून जोया इंटरप्रायजेसच्या दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक शेषराव उदार तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदर्भात रस्ते होतात, शहरात का नाही?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'जालना रोड आणि बीड बायपासचे काम कधी पूर्ण होणार? जालना रोडचा खर्च ४५० कोटींवरून आधी २४५ व त्यानंतर आता ७७ कोटींवर आला आहे. नाशिक व विदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते कसे होतात, असा सवाल करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या रखडेल्या कामांवर जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बीड बायपासवर दररोज अपघात होत असून या रस्त्याचे काय करणार याचे उत्तर मागत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिऱ्यांना धारेवर धरले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी खैरे म्हणाले, औरंगाबाद हे औद्योगिक शहर असून पर्यटन आणि शिक्षणाचे केंद्र आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत नाशिकमध्ये मोठ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा पुल गावातून जात असून त्याचा नागरिकांना खूप लाभ होणार आहे. तसा लाभ आपला का होऊ शकत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. सुरू असलेल्या ठिकाणी माती टाकून काम केले जात आहे; यासाठी पाणी नाही, असे सांगत पालिकेच्या एसटीपी प्लांटमधून रस्त्यासाठी पाणी घेण्याचे काय झाले, असा सवाल केला. एसटीपी प्लांटचे पाणी रस्त्यासाठी वापरण्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दौलताबाद येथील रस्त्यावरील ऐतिहासिक दरवाजा मोडकळीस आला आहे, या रस्त्याच्या कामाबाबत गडकरींशी बोलणे होऊनही रस्ता पूर्ण होत नाही; हा दरवाजा लवकरच पडू शकतो. त्यामुळे येथून मोठ्या वाहनांना मज्जाव करण्यासाठी बायपास काढण्याचे निर्देश खासदारांनी दिले.

\Bनाले कोरडे का झाले नाहीत?\B

शहरात भूमिगत गटार योजनेचे काम २०१४ पासून सुरू असून २०१७ पर्यंत योजना पूर्ण करायाची होती. त्यावेळी सांगितल्यानुसार, शहरातील नाले कोरडे का झाले नाहीत, अशी विचारणा खैरेंनी केली. यावर पालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आतापर्यंत ३६१ कोटी रुपये खर्च करून योजनेचे ८८.५ काम पूर्ण झाले आहे. त्यात तीन 'एसटीपी प्लांट' तयार झाले, बनेवाडी येथील प्लांट तयार व्हायचा आहे. सातारा, देवळाई संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून १८० कोटी रुपयांचा 'डीपीआर' शासनाला सादर केला आहे. सातारा, देवळाई भागातील सर्व पाणी कांचनवाडी येथील प्लांटमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नाले कोरडे का झाले नाहीत याचे उत्तर दिले नाही.

\B'एसटीपी'चे पाणी स्मार्ट सिटी \B

'एसटीपी प्लांट'मध्ये प्रक्रिया केलेले पाणी केवळ रस्त्यांकरिता न वापरता येत्या काळात स्मार्ट सिटीसाठी वापरण्याबद्दल विचार सुरू असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विनायक यांनी सांगितले. सिद्दीकी यांनी प्रतिहजार लिटर व दहा हजार लिटरच्या टँकरसाठीची किंमत सांगितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्ही पाडू शकतो; आठवलेंचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीने लोकसभा जागा वाटपात 'रिपाइं'ला डावलले, ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. स्वतंत्र निवडून येऊ शकत नाही, पण पाडू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. भाजपचा आम्ही सन्मान करतो त्यांनी 'रिपाइं'चा विचार करावा. आम्ही केवळ एक जागा मागितली. त्यातही डावलणे म्हणजे, ही अवहेलना व अन्याय असल्याचेही ते म्हणाले.

औरंगाबादमध्ये कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'भाजपच्या नेत्यांना भेटून दक्षिण मध्य मुंबईची एक जागा 'रिपाइं'साठी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. असे असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह राज्यात येतात, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन युती जाहीर केली जाते. त्यात 'रिपाइं'ला डावलले गेले. हा मनाला खटकणारा निर्णय आहे. आम्ही काही त्यांना अडचणीत आणले नाही, मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात सहा महिन्यांत स्थान देण्याचे मान्य केले होते. ते सहा महिने उलटून गेले आहेत. याबाबत २५ रोजी 'रिपाइं'च्या काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे.'

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम चांगले आहे. त्यांनी एवढे काम केले आहे की, २०१९मध्ये तेच पंतप्रधान होण्यापासून कोणती अडचण नाही. राफेलबाबत राहुल गांधी गैरसमज पसरवत आहेत, असेही ते म्हणाले.

\Bपाकिस्तानला धडा शिकविण्याची वेळ

\Bपुलवामा हल्ल्यात ४० जवान धारातीर्थी पडले. पाकिस्तान नियम तोडून हल्ले करतोय यापूर्वीही अनेकदा केले. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज असून, आता पाकला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. एकदा आर-पारची लढाई गरजेची आहे. पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावीत, असेही केंद्रीयमंत्री रामदास आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेस अर्वाच्च शिविगाळ; ज्येष्ठ नागरिकाला कारावास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरासमोर उभ्या असणाऱ्या विवाहितेला अर्वाच्च व अश्लील भाषेत शिविगाळ करणारा ज्येष्ठ नागरिक व आरोपी देविदास श्यामा राठोड याला एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी ठोठावली.

या प्रकरणी ३५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १६ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी चार-साडेचारला फिर्यादी विवाहिता ही घरासमोर उभी असताना आरोपी देविदास श्यामा राठोड (६२, रा. बंजारा कॉलनी) हा तिथे आला आणि त्याने फिर्यादीला अर्वाच्च व अश्लील भाषेत शिविगाळ करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या ३५४, ३५४ (अ) कलमान्वये क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक मयुरी पवार यांनी तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यावेळी, सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. यात एक ज्येष्ठ साक्षीदार फितूर झाला. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३५४ कलमान्वये एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ पदवी परीक्षा येत्या १६ मार्चपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवीची परीक्षा १९ मार्च आणि पदव्युत्तर वर्गाची परीक्षा २६ मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षा विभागाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेसाठी दोन लाख अतिरिक्त उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यात येणार आहे. जुन्या २३ लाख उत्तरपत्रिकाच परीक्षेसाठी वापरण्यात येतील असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले.

विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा १९ मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी राहणार असल्यामुळे नियोजनासाठी प्राचार्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. परीक्षा केंद्र किती आणि कोणते असावे यावर बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. काही महाविद्यालये परीक्षा केंद्र देण्यास सहमत नसल्याने प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेतला जाणार आहे. कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रात 'सीसीटीव्ही' लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मागील वर्षी सूचना करूनही बहुतेक महाविद्यालयांनी 'सीसीटीव्ही' लावले नव्हते. यंदा सूचनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. पदव्युत्तर वर्गाची परीक्षा २६ मार्चपासून सुरू होणार आहे.

दरम्यान, विद्यापीठाकडे २३ लाख जुन्या उत्तरपत्रिका आहेत. या उत्तरपत्रिका परीक्षेसाठी वापरण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला होता. नवीन खरेदीचा प्रस्ताव नव्हता. ऐनवेळी उत्तरपत्रिका कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे दोन लाख अतिरिक्त उत्तरपत्रिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉक शो रविवारी

0
0

औरंगाबाद: स्व. महेंद्र कुरुंदकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ औरंगाबाद डेस्टिनेशन नेक्स्ट आणि कबीर आर्ट अँड एंटरटेनमेंटच्या वतीने टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीत रविवारी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम होईल. 'औरंगजेबाची नियती आणि मराठेशाहीचा पराक्रम' या विषयावर अमेय दक्षिणदास यांचे व्याख्यान होईल. महेश अचिंतलवार 'सुख ऑनलाईन आहे' टॉक शो सादर करणार आहेत. रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. यानुसार मराठवाड्यातील अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये विभागातील २४ उपजिल्हाधिकारी, ४२ तहसीलदार तर दोन अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या अधिकाऱ्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बदल्यांमध्ये औरंगाबादचे अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांची बदली अहमदनगरला तर तेथील भानुदास पालवे यांची बदली औरंगाबादला करण्यात आली आहे. तर जालन्याचे प्रकाश खपले यांची विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (पुनर्वसन) या पदावर बदली झाली आहे. राज्यातील एकूण १३ अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बदल्यात समोवश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागातील २४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्याही बदली करण्यात आली आहे.

यामध्ये रोहयो उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांची बदली सहाय्यक आयुक्त (मावक) औरंगाबाद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांची बदली निवासी उपजिल्हाधिकारी जालना येथे करण्यात आली आहे. यासह जालन्याच्या तीन, बीडच्या पाच, लातूरच्या चार, उस्मानाबादच्या तीन, नांदेडच्या तीन, परभणी आणि हिंगोलीच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. यासह तहसीलदार संवर्गातील ४२ अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीच्या तहसीलदार संगिता चव्हाण यांची गेवराईला, कन्नडचे तहसीलदार महेश सुधळकर यांची जालन्याला तर जिल्हाधिकारी कार्यालयातील डीसी मेंडके यंची जाफ्राबादला बदली करण्यात आली आहे. यासह मराठवाड्यातील नांदेडच्या सर्वाधिक १२, लातूरच्या आठ, बीडच्या सात, उस्मानाबाद, जालना आणि परभणीच्या प्रत्येकी तीन तर हिंगोलीच्या एका तहसीलदाराचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images