Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; आठ दिवसांत निविदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची निविदा येत्या आठ दिवसांत काढण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिली. निवडणूक आचारसंहितेपूर्वी अल्प मुदतीची निविदा काढा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.

एमजीएम परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामाचा मुद्दा सभागृह नेते विकास जैन यांनी मांडला. 'शासनाने स्मारकाकरिता पाच कोटी रुपये दिले आहेत. निधी प्राप्त होऊनही अद्याप स्मारकाच्या कामाची निविदा प्रशासनाने काढली नाही. निविदा केव्हा काढणार आणि काम केव्हा सुरू करणार याचा खुलासा प्रशासनाने द्यावा,' अशी मागणी त्यांनी केली.

महापौरांनी दक्षता कक्षाचे प्रमुख एम. बी. काजी यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले. 'स्मारकाच्या कामासाठी ६५ कोटींची अंतिम मान्यता मिळाली असून निविदा प्रक्रिया आता सुरू केली जाईल, असे काजी यांनी सांगितले. त्यावर, आठ दिवसांत निविदा काढली पाहिजे, अशी जैन यांनी मागणी केली. निवडणूक आचारसंहितेपूर्वी अल्पमुदतीची निविदा काढून स्मारकाचे काम लवकर सुरू करा, असे निर्देश महापौरांनी दिले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'इयर ऑफ द आयकॉन पुरस्कार' मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहिदांच्या कुटुंबीयांना नगरसेवक, अधिकाऱ्यांची मदत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुलवामा हल्ल्याचा महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दहशतवादी कारवायांबद्दल पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला. वीर माता आणि वीर पत्नींना मदत व्हावी यासाठी नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन, तर अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देण्याचे यावेळी मान्य केले.

शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव मांडला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवावा, असा उल्लेखही त्यांनी प्रस्ताव मांडताना केला. जंजाळ यांच्या प्रस्तावाला भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांच्यासह कैलास गायकवाड, अॅड. माधुरी अदवंत, 'एमआयएम'चे गटनेते नासेर सिद्दिकी, विरोधी पक्ष नेते जमीर कादरी, सभागृह नेते विकास जैन यांनी अनुमोदन दिले. नगरसेवक रावसाहेब आमले यांनी वीर माता आणि वीर पत्नींना मदत करण्यासाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्याचा प्रस्ताव मांडला, अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, पाषाणालाही पाझर फुटावा, अशी ती घटना आहे. त्या घटनेमुळे संपूर्ण देश दु:खात आहे. जवानांवर झालेल्या हल्ल्याचा महापालिकेचे सभागृह निषेध करते. वीर माता आणि वीर पत्नींना नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन देण्यात येईल असे महापौरांनी जाहीर केले. अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार व माजी अध्यक्ष सखाराम पानझडे यांनी परस्पर विचार करून वर्ग १ ते वर्ग ३ पर्यंतच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याची घोषणा केली.

आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, सैन्यात तरुणांच्या भरतीचे प्रमाण फार कमी झाले असल्याने भरती होऊ इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालिकेने हातभार लावला पाहिजे. त्यासाठी पालिकेने आर्थिक मदत केली पाहिजे. सर्वसाधारण सभेत निर्णय झाल्यास वेगळी तरतूद करणे शक्य होईल.

\Bकारगिल उद्यानाला राठोड यांचे नाव\B

गारखेड्यातील नाथप्रांगण येथील कारगिल स्मृती उद्यानाला शहीद नितीन राठोड यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी मांडला. राठोड यांचे शिक्षण औरंगाबादेत झाले आहे, त्यामुळे उद्यानाला त्याचे नाव द्यावे, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोरगाव परीक्षा केंद्राचे संचालक बदलले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या पोरगावच्या कै. केसरबाई हायस्कूल परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकाचा कारभार शिक्षण मंडळाने तडकाफडकी काढून घेतला आहे. पुढील वर्षी या शाळेत परीक्षा केंद्र असणार नाही, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना द्यावा लागलेला इंग्रजीचा पेपर, दुकानाच्या 'शटर'मध्ये भरविण्यात आलेले परीक्षा केंद्र हे प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघड केल्यावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.

बारावी परीक्षेचा बाजार मांडणाऱ्या औरंगाबादपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोरगाव येथील कै. केसाबाई हाईस्कूल परीक्षा केंद्रावर पहिली कारवाई मंडळाने केली आहे. बारावीच्या परीक्षार्थींना जमिनीवर बसून इंग्रजीचा पेपर सोडवावा लागला. त्यासह 'शटर'मध्ये बसून विद्यार्थी परीक्षा देत होते आणि त्यांना शिक्षकच प्रश्नांची उत्तरे सांगत होते. या ठिकाणी महसूल विभागाचे बैठे पथक, मंडळाचे भरारी पथकही नव्हते. कॉपीमुक्त परीक्षा केवळ कागदावरच असल्याचे चित्र होते. हे वास्तव समोर आणल्यानंतर शिक्षक मंच, शिक्षण मंडळ आणि महसूल विभाग खडबडून जागा झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी मंडळाने आता परीक्षा केंद्रांचा आढावा घेत कॉपीमुक्त परीक्षेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पोरगावच्या परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालक राठोड यांचा कारभार काढून घेत त्या ठिकाणी नवीन केंद्रसंचालक नेमण्याचा निर्णय मंडळाने घेतला आता किरण मास्ट यांच्याकडे केंद्र संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. औरंगाबाद विभागात एक लाख ६८ हजार २५१ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

\Bइतर केंद्रांचाही आढावा

\Bपोरगावसह शेणपुंजी रांजणगाव, बिडकीन अशा वेगवेगळ्या केंद्रांचा आढावाही शिक्षण मंडळ घेत आहे विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा नसणे हे प्रकरण आणि इतर विषयांबाबत मंडळाने अशा परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्याचे काम शुक्रवारी दिवसभर केले. काही परीक्षा केंद्रांचे संचालक बदलण्याची कार्यवाही मंडळाकडून करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरी करताना चोरट्याना पकडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरट्यांना दोन विविध घटनां चोरी करताना नागरिकांनी पकडले. मध्यवर्ती बसस्थानक आणि पाटोदा शिवारात हे प्रकार घडले. चोरट्याना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मध्यवर्ती बसस्थानक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरीचा पहिला प्रकार घडला. मोईन खान सादिक खान (वय ३६, रा. भडकलगेट) यांनी त्यांची दुचाकी बसस्थानकाच्या आवारात असलेल्या पाणपोयीपाशी उभी करून कोल्ड्रिंक आणण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. काही वेळाने मोईनखान बाहेर आले असता त्यांच्या दुचाकीचे हँडल लॉक तोडून दोन चोरटे दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने मोईन खान यांनी संशयित आरोपी भारत सुरेश विधाटे (वय २१, रा. टिळकनगर, श्रीरामपूर) आणि प्रसाद पांडव (रा. शिर्डी) यांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांना पकडण्याचा दुसरा प्रकार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पाटोदा शिवारात घडला. अरुण लक्ष्मण डोळस (वय ३७ रा. पाटोदा) या शेतकऱ्याने त्याच्या शेतात इलेक्ट्रिक पाण्याची मोटार बसवलेली होती. ही मोटर संशयित आरोपी असलम शाहनूर सय्यद आणि अजय नानाभाऊ डोळसे (वय ३०, रा. रांजणगाव) यांनी काढून घेत चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्याने अरुण डोळस यांनी गावकऱ्यांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नगरसेविकेचा आत्मदहनाचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारंवार तक्रार करूनही पाण्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याने शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी महापौर व आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिला. अन्य नगरसेवकांनी सुद्धा दूषित पाण्यासह पाणी पुरवठ्याच्या समस्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले.

नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांनी दोन बाटल्यांत दूषित पाणी आणून महापौर आणि आयुक्तांना दिल्या; दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. मनीषा मुंडे यांनी त्यांच्या वॉर्डातील पाणीप्रश्न मांडताना काही महिन्यांपासून हा प्रश्न सुटावा यासाठी सतत मुद्दे मांडत आहोत, पण अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. या वॉर्डातील रखडलेल्या कामांबद्दल भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजू शिंदे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. राजेंद्र जंजाळ यांनी मीना गायके यांच्या वॉर्डातील दूषित पाण्याचा प्रश्न मांडला. गायके यांच्या वॉर्डात दोन दिवसांपूर्वी शहर अभियंता पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यानंतरही प्रश्न कायम आहे; शहर अभियंत्यांनी वॉर्डात पर्यटन केले का, असा सवाल जंजाळ यांनी केला. यानंतर गायके म्हणाल्या, दूषित पाण्याचा प्रश्न मी गेल्या काही सर्वसाधारण सभांपासून मांडत आहे, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वॉर्डात आतापर्यंत एकही काम झालेले नाही, त्यामुळे आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे खुलासा मागितला. पानझडे म्हणाले, गायके यांच्या वॉर्डात दोन-तीन दिवसांत काम सुरू केले जाईल.

\Bमहापोरांचे अधिकारी ऐकेनात: सुरे \B

शिवसेनेचे सीताराम सुरे यांनी त्यांच्या वॉर्डातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, सहा फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत वॉर्डातील कामे करण्याबद्दल महापौरांनी आदेश दिले होते. महापौरांच्या आदेशानंतरही कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी काम केले नाही, काम होणे शक्य नाही, असा शेरा त्यांनी लिहिला आहे. महापौरांचे आदेश अधिकारी ऐकत नसतील, तर कसे होणार, असा सवाल त्यांनी केला. सुरे यांच्या वॉर्डात तातडीने सुरू करण्याचे आदेश महापौरांनी पुन्हा एकदा दिले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ अनुदानाचे आणखी ७२२ कोटी आले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील ३२ लाख दुष्काळी शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान वाटपाचे दोन टप्प्यांतील अनुदानाची रक्कम दिल्यानंतर आता नव्याने ७२२ कोटी रुपयांचा निधी मराठवाड्याला देण्यात आला आहे. आता विभागात दुष्काळी अनुदानाचे एक हजार ७७२ कोटी रुपये मिळाले आहेत.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर महिन्याभराने मराठवाड्याला ५२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५२५ कोटी रुपयांचा दुसरा तर आता २१ फेब्रुवारी रोजी विभागातील शेतकऱ्यांसाठी ७२२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रथम देण्यात आलेल्या एक हजार ५० कोटी रुपयांपैकी आतापर्यंत सुमारे ६३० कोटी रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले असून, आता नव्याने मिळालेल्या अनुदानाचे वितरणही संबंधित जिल्ह्यांना करण्यात आले आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके करपली असून, ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. हे शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत होते, आता टप्प्याटप्प्यांने अनुदान वाटप होत असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

\Bजिल्हानिहाय अर्थसाह्य\B

जिल्हा.................रक्कम

औरंगाबाद.............१५३.४७६

जालना.................१३४.५८५

बीड.....................१७४.५०७

लातूर...................४.५७६

उस्मानाबाद...........९६.२०५

नांदेड..................३४.४०६

परभणी................७३.९२१

हिंगोली................४९.४६१

एकूण..................७२२.१२५

(अर्थसाह्य कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप करुन मी रुग्णांना बरं करतो! खैरेंचा दावा

0
0

औरंगाबाद:

आपल्या विधानांनी कायम चर्चेत राहणारे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरै यांनी आज औरंगाबादेत चक्क विज्ञानाला आव्हान देणारं वक्तव्य केलं. 'मी रुग्णाची नाडी धरली आणि जप केला की रुग्ण बरा होतो,' असा अजब दावा खैरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे ते राज्य सरकारच्या आरोग्य मेळाव्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या समोर हे विधान करत होते.

'आतापर्यंत केवळ एकदाच मला अपयश आले, ते भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या बाबतीत. त्यांना मला थेट रुग्णालयात आत जाऊन प्रत्यक्ष भेटता आले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी महाजन रुग्णालायत असताना मला काहीतरी करा असं म्हटलं होतं. मी राहुल याला आई जगदंबेची एक पुडी देऊन ती महाजनांच्या उशीखाली ठेवण्या सल्ला दिला. ते त्यानंतर १२ दिवस जिवंत होते. मात्र नाडीला हात लावून जप न झाल्याने त्या तेवढ्या बाबतीत मला अपयश आले. डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते,' असं अजब तर्कट खैरे यांनी मांडलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर कॉँग्रेसशिवाय इतरांसोबत आघाडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आघाडीत सहभागी होण्याबाबत अनुकुलता दर्शविली होती. मात्र, काँग्रेसकडून कोणतीही चर्चा केली जात नाही. यामुळे काँग्रेससोबत आघाडी झाली तर ठिक. नाही तर लोकसभा निवडणुकीत अन्य पक्षांसोबत आघाडी करून दहा जागांवर निवडणूक लढवू,' असा निर्धार शनिवारी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी व्यक्त केला.

आझमी किराडपुरा येथे आयोजित सभेसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. आझमी म्हणाले, 'सध्या कॉँग्रेसच्या महाआघाडीला विरोधी पक्षाकडून नाव ठेवली जात आहेत. वास्तवात मोदी यांनीच अनेक पक्षांशी आधीच आघाडी केली आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष हा मोठा आहे. त्या प्रमाणे काँग्रेसला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची शक्ती कमी आहे. यामुळे राज्यात मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेससमोर एक जागेचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून कोणतीही चर्चा आमच्यासोबत झालेली नाही. काँग्रेसला मुस्लिम समाज आपल्या सोबत येणार असल्याची खात्री वाटत आहे. यामुळे काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी केली नाही, तर आगामी लोकसभेत समाजवादी पक्ष राज्यातील अन्य पक्षांसोबत निवडणुकीच्या रंणागणात उतरेल. महाराष्ट्रात दहा जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत,' असेही आझमी म्हणाले.

एकत्र येण्याचे आवाहन


'एमएलए' आणि समाजवादी पक्षाच्या वतीने किराडपुरा येथे सभा घेण्यात आली. या सभेत सध्याच्या परिस्थितीत जात, धर्म किंवा पंथाचा वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज अबू आझमी यांनी व्यक्त केली. यावेळी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आरटीई’ प्रवेशाचा मार्ग सुकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आरटीई' अंतर्गतच्या प्रवेशाचा मार्ग आता अगदी सुकर करण्यात आला आहे. शिक्षण विभाग यंदा 'ऑटो रजिस्ट्रेशन' करणार आहे. त्यासाठी २० सदस्यीय पडताळणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जी कागदपत्र तपासून विद्यार्थ्यांना पात्र ठरवेल. समितीने पात्र ठरविलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळांना कागदपत्रे तपासणी करता येणार नाहीत.

मोफत प्रवेश प्रक्रियेत पात्र ठरल्यानंतर ही विद्यार्थ्यांची शाळास्तरावर कागदपत्रे तपासली जात. त्यामुळे अनेकांना शाळा परत पाठवित होत्या. विद्यार्थी, पालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. शिक्षण विभाग, शाळा असे हेलपाटे मारावे लागायचे. यंदापासून या प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले आहेत. मागील वर्षाप्रमाणे अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली नाही. यंदा अशा शाळांची शिक्षण विभागाच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहे. यासह प्रवेश प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यीय पडताळणी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये गट शिक्षणाधिकारी यांच्यासह केंद्र प्रमुख, शासकीय शाळा, अनुदानित शाळा, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था यांच्यातून प्रत्येकी दोन सदस्य यासह एक विस्तार शिक्षण अधिकारी यांचीही नेमणूक असणार आहे. हीच समिती कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. त्यामुळे शाळास्तरावर पालकांना अडचणी येणार नाही. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गटशिक्षण अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन शाळेत जातील. समितीने पात्र ठरवलेल्या या विद्यार्थ्याचे शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. यासह कागदपत्र तपासणीत समितीने विद्यार्थ्यास अपात्र केले, त्यांची निवड रद्द केली, तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे.

\Bअशी लागतील कागदपत्रे

\Bनिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन देयक, घरपट्टी, गॅस बुक, बँक पासबुक, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आदींपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. यासह जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा २०१७-१८ किंवा २०१८-१९ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरला जाईल. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा (जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय), एसईबीसी प्रवर्गाचा समावेश वंचित गटात करणे आदीबाबी स्पष्ट करण्यात आले आहेत.

\B२०१८-१९ची आकडेवारी

\Bपात्र शाळा....... ५६५

एकूण जागा..... ६३७५

अर्ज संख्या...... ११७६४

एकूण प्रवेश झाले.. ३७१४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी कल्याण हाच मूलाधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बौद्ध सौंदर्यशास्त्रात रूपापेक्षा आशयाला महत्त्व देणे आवश्यक आहे. मानवी कल्याणाची सूत्रे हाच सौंदर्यशास्त्राचा मूलाधार आहे. ही मूल्ये हातून निसटल्यास जीवनमार्ग हातून निसटेल' असे प्रतिपादन बौद्ध साहित्याचे अभ्यासक प्रा. देवेंद्र उबाळे यांनी केले. ते चर्चासत्रात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गौतम बुद्ध अध्यासन केंद्राच्या वतीने 'बौद्ध सौंदर्यशास्त्र' या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. आजीवन शिक्षण व विस्तार विभागाच्या सभागृहात शनिवारी चर्चासत्र झाले. यावेळी प्रा. देवेंद्र उबाळे यांचे बीजभाषण झाले. मंचावर उदघाटक डॉ. मुस्तजिब खान, डॉ. उत्तम अंभोरे, संचालक डॉ. संजय मून यांची प्रमुख उपस्थिती होती. सौंदर्यशास्त्रावर प्रा. उबाळे यांनी यांनी भाष्य केले. 'बौद्ध साहित्याचे सौंदर्यशास्र तयार करायचे असल्यास अनुभूती प्रमुख मानावी लागेल. 'थेरीगाथा'सारख्या आत्मकथनपर ग्रंथातून अनुभवाचे चित्रण आहे. कारण अनुभव तेच जे सत्य आहे. काल्पनिक गोष्टीतून मनोरंजन होईल. पण, त्या सत्य ठरणार नाहीत. भरतमुनी यांनी नाट्यशास्त्रात आठ रस मानले आहेत. बौद्ध साहित्य त्यात नववा 'शांत' रस जोडते. एखादी कलाकृती वाचून वा अनुभवून शांतता लाभते. शांतता देणे हा बौद्ध साहित्याचा स्थायीभाव आहे. त्रासाचे उदात्तीकरण आणि हार पत्करली हे सांगणारी कलाकृती बुद्ध विचारांची नसते. तर दु:खातून मार्ग काढणारी असते. या साहित्याला आंबेडकरी साहित्य, दलित साहित्य, फुले-आंबेडकरी साहित्य अशी वेगवेगळी नावे आहेत. रूप की आशय, कशाला महत्त्व द्यावे असा पेच असल्यास आशयाला द्यावे. रूपाला महत्त्व दिल्यास आपण लालित्य आणि सजावटीत अडकतो' असे उबाळे म्हणाले. या चर्चासत्रात प्रा. आशालता कांबळे, अरविंद सुरवाडे आणि डॉ. नवनाथ गोरे यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य प्रभाकर बागले आणि डॉ. अशोक देशमाने यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. डॉ. आनंद वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांनी कामात सुधारणा कराव्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयुक्तांच्या वेळकाढूपणामुळे विकास कामांवर परिणाम होत आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असल्यामुळे त्यांनी प्रशासकीय कामात योग्य सुधारणा कराव्यात,' असे शरसंधान शनिवारी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य यांनी एका खरमरीत प्रत्रातून साधले. स्वच्छ चारित्र्याचे आणि नियमानुसार काम करणारे, अशी ख्याती असलेल्या डॉ. निपुण विनायक यांच्यावरील या टीकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आयुक्तांच्या नावे दिलेल्या पत्रात वैद्य यांनी म्हटले आहे की, 'महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर आपली कामाची पद्धत व सचोटी ही आपल्या नावलौकिकाप्रमाणे असल्याचा प्रत्यय महापालिकेचा ट्रस्टी व स्थायी समितीचा सभापती म्हणून आम्हाला येत आहे. मात्र, आपल्या कार्यकाळात शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा काही मुद्यांवर गतीने काम न झाल्याचे काही मुद्यांवरुन दिसून येते. कचराकोंडीचा प्रश्न एक वर्ष उलटल्यानंतरही जैसे थे आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावणे अपेक्षित असताना आपल्या वेळकाढू कार्यशैलीमुळे औरंगाबाद शहराच्या चारही बाजूस 'नारेगाव'सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची खरेदी करण्यात आली. ही खरेदी करताना विहित पद्धतीचा अवलंब करून पारदर्शक पद्धतीने खरेदी करणे शक्य होते. पालिकेच्या अस्थापनेवर जी पदे मंजूर नाहीत अशा विविध पदांवर बेकायदेशी नियुक्त्या केल्या. आयुक्त म्हणून महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ६७ (३) नुसार आपण कार्यकारी अधिकारी आहात. आपली जबाबदारी मोठी आहे, पण जबाबदारीपासून अलिप्त राहण्याचे धोरण आपण स्वीकारले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणावे तसे यश आलेले नाही. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला साडेचार कोटींचा आयकर भरावा लागला. यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला. याची प्रथमदर्शनी जबाबदारी प्रशासनाची आहे,' असा आरोपही पत्रात केला आहे.

\Bसगळीकडे केले दुर्लक्ष

\Bवैद्य यांनी पत्रात म्हटले आहे की, 'निविदा प्रक्रिया अंतिम करताना केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणे, स्थायी समितीच्या बैठकीला गैरहजर राहणे, पालिकेचे विविध महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात अनस्था असणे, पालिकेच्या महसुली उत्पन्नाकडे दुर्लक्ष करणे, नगरसेवक व जनतेसाठी कार्यालयात उपस्थित नसणे, दूरध्वनीवर देखील उपलब्ध नसणे हे चिंताजणक आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचा भार ५६ कोटींनी जड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरवासीयांची हात जोडून जाहीर माफी मागतली. त्यानंतर या प्रश्नाची वर्षपूर्ती साजरी होऊनही ही कोंडी सत्ताधाऱ्यांना फोडता आली नाही. आता तर घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तब्बल ५६ कोटींनी वाढला असून, या किमतीला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

नारेगाव येथील कचराडेपो बंद झाल्यामुळे शहरात १६ फेब्रुवारी २०१८ पासून कचराकोंडी सुरू झाली. कचराकोंडीची वर्षपूर्ती झाल्यानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही. ही कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने इंदूर येथील इको प्रो इन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस या शासनमान्य संस्थेची प्रकल्प सल्लागार व्यवस्थापन (पीएमसी) म्हणून नियुक्ती केली आहे. या संस्थेने सुरुवातीच्या काळात घनकचरा व्यवस्थापनाचा ९१ कोटी रुपये किमतीची डीपीआर तयार केला. त्यात अनेक त्रुटी असल्याचे लक्षात आल्यावर सुधारित 'डीपीआर' तयार करण्याचे आदेश प्रशासनाने 'पीएमसी'ला दिले. त्यानुसार सुमारे तीन महिने काम केल्यावर 'पीएमसी'ने १४८ कोटी रुपयांचा सुधारित 'डीपीआर' तयार केला. यामुळे मूळ 'डीपीआर'मध्ये ५६ कोटींची वाढ झाली आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. ९१ कोटींचा मूळ 'डीपीआर' दोन एप्रिल २०१८ रोजी तयार करण्यात आला होता. त्यात घनकचरा प्रक्रिया केंद्राचे स्थापत्य व विकास काम करणे, चिकलठाणा व पडेगाव येथे प्रत्येकी १५० टन प्रति दिवस क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारणे, त्यासाठी यंत्र सामुग्री पुरविणे, प्रक्रिया केंद्राची चाचणी घेणे, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया करणे या कामांचा समावेश करण्यात आला होता. एन. के. कन्स्ट्रक्शन व मायो वेसल्स अँड मशीन्स प्रा. लि. या दोन कंपनींना हे काम देण्यात आले होते. प्रत्यक्ष काम करताना 'डीपीआर'मध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश नसल्याचे लक्षात आल्यावर सुधारित 'डीपीआर' तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

\Bनव्या कामांना होणार सुरुवात

\Bसुधारित 'डीपीआर'नुसार मूळ 'डीपीआर'मधील कामांच्या व्यतिरिक्त हर्सूल येथे कचरा प्रक्रिया केंद्र विकसित करणे, कांचनवाडी येथे बायोमिथेनायझेशन प्रकल्प उभारणे, नारेगाव येथील कचराडेपोमध्ये असलेल्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, घनकचरा व्यवस्थापनाबद्दल जनजागरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे. वाढीव 'डीपीआर'ला शासनाने मंजुरी दिल्यावर ही कामे सुरू केली जाणार आहेत.

\B...बघा हे ओझे

\B- ९१ कोटींचा मूळ 'डीपीआर'

- २ एप्रिल २०१८ला तयार

- ५६ कोटींनी केली वाढ

- २२ फेब्रुवारी २०१९चा निर्णय

- १४७ कोटींचा 'डीपीआर'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत ‘सीएनजी’ पेट्रोल पंप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात येत्या चार महिन्यांत सीएनजी पट्रोल पंप उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा बसेल,' अशी माहिती शनिवारी औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अब्बल म्हणाले, 'शहरात एलपीजी गॅस सेंटर सुरू करण्याबाबत अनेक पंप चालकांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र. अंबेवाडीकर यांगॅस पेट्रोल पंपाबाबत झालेल्या वादानंतर या पंपावरील गॅस पंप बंद केले. या वादानंतर महापालिकेनेच शहरात पेट्रोल गॅस पंप देण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. यामुळे भविष्यात पेट्रोल पंपावर गॅस पंप उभारण्याचे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी शहरात सीएनजी पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही पेट्रोल पंपाची निवड केली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. '……तेल कंपन्यांची शहरात पेट्रोल पंप, गॅस यांची वेगळी कार्यालये आहेत. त्याप्रमाणे सीएनजी गॅस कार्यालयही लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक वाहनांची इंधन क्षमता वेगळी असते. याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी तेल कंपन्यांनी पुढाकार घ्यावा,' असे आवाहनी यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला हितेन पटेल, अर्चना देवरे, ऋषिकेश मोरे, सूर्यकांत अंबरवाडीकर यांच्यासह अन्य पेट्रोल पंप चालकांची उपस्थिती होती.

\Bपंपासाठी जागा लागते कमी

\Bएलपीजी गॅससाठी जमिनीत टँक तयार करावा लागतो. मात्र, सीएनजी पंपासाठी सीएनजीचे गॅस असलेले बॉटल किंवा सिलेंडर पाठविण्यात येत असतात. यामुळे पेट्रोल गॅसपेक्षा सीएनजी गॅससाठी जागा कमी लागते, अशी माहिती पंप चालकांकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत ‘सीएनजी’ पंप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात येत्या चार महिन्यांत सीएनजी पंप उभारण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा बसेल,' अशी माहिती शनिवारी औरंगाबाद पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अब्बास म्हणाले, 'शहरात एलपीजी गॅस सेंटर सुरू करण्याबाबत अनेक पंप चालकांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र. अंबेवाडीकर या गॅस पंपाबाबत झालेल्या वादानंतर या पंपावरील गॅस पंप बंद केले. या वादानंतर महापालिकेनेच शहरात पेट्रोल गॅस पंप देण्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतला. यामुळे भविष्यात पेट्रोल पंपावर गॅस पंप उभारण्याचे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांनी शहरात सीएनजी पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काही पेट्रोल पंपाची निवड केली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. '……तेल कंपन्यांची शहरात पेट्रोल पंप, गॅस यांची वेगळी कार्यालये आहेत. त्याप्रमाणे सीएनजी गॅस कार्यालयही लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक वाहनांची इंधन क्षमता वेगळी असते. याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी तेल कंपन्यांनी पुढाकार घ्यावा,' असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेला हितेन पटेल, अर्चना देवरे, ऋषिकेश मोरे, सूर्यकांत अंबरवाडीकर यांच्यासह अन्य पेट्रोल पंप चालकांची उपस्थिती होती.

\Bपंपासाठी जागा लागते कमी

\Bएलपीजी गॅससाठी जमिनीत टँक तयार करावा लागतो. मात्र, सीएनजी पंपासाठी सीएनजीचे गॅस असलेले बॉटल किंवा सिलेंडर पाठविण्यात येत असतात. यामुळे पेट्रोल गॅसपेक्षा सीएनजी गॅससाठी जागा कमी लागते, अशी माहिती पंप चालकांकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेडिट कार्डद्वारे लुबाडले; आरोपीला पोलिस कोठडी

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट क्रेडिट कार्ड तयार करून पेटीएमद्वारे बँक खात्यावर रक्कम हस्तांतरित केली आणि जालन्यातील तिघांना सव्वातीन लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी एकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी शनिवारी दिले. प्रीतम सुरेश शर्मा (रा. प्लॉट क्र.५२, गट क्र. २८, शहानुरवाडी, देवानगरी, दर्गा रोड) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड विभागाच्या कायदेशीर सल्लागार अपूर्वा अविनाश मानवतकर (२९, रा. चैतन्यपुरी सोसायटी, पुणे) यांनी तक्रार दिली. आठ दिवसांपूर्वी गणेश विश्वनाथ खिचडे (रा. जालना) यांनी 'एसबीआय'च्या क्रेडिट कार्ड विभागाशी संपर्क साधून आपल्यावर खात्यावरील रक्कम परस्पर गायब झाल्याची तक्रार केली होती. त्यानुसार अपूर्वा यांनी 'एसबीआय'च्या बँक क्रेडिट कार्ड फसवणूक तपासणी विभागाने चौकशी केली. त्यात खिचडे यांना दिलेले क्रेडिट कार्ड त्यांच्या मालकीचे नसून, त्यांनी दाखल केलेल्या फॉर्मवर प्रीतम शर्मा याचा मोबाईल क्रमांक होता. तसेच त्याने खिचडे यांच्या नावे बनावट क्रेडिट कार्ड तयार केले. त्यावरून शर्माने पेटीएमव्दारे कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात परस्पर रक्कम हस्तांतरीत केली. अशा प्रकारे आरोपी शर्मा व फारुख नूर या दोघांनी देविदास भट्टाजी पवार व रेखा अजय पवार (दोघेही रा. जालना) यांची कागदपत्रे हस्तगत करून रक्कम हस्तांतरित केल्याचे उघड झाले. पेटीएमद्वारे या दोघांनी तीन लाख २६ हजार ९४ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bतपास सुरू आहे...

\Bपोलिसांनी तपास करून आरोपी प्रीतम शर्मा याला शुक्रवारी अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. आरोपींनी फसवणूक केलेल्यांची कागदपत्रे कोठून व कशाप्रकारे हस्तगत केली याचा तपास करणे आहे. आरोपीचा साथीदार पसार असून त्याचा शोध घेऊन त्याला अटक करणे आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले क्रेडिट कार्ड हस्तगत करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदारांच्या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जप करा आणि बरे व्हा, असे वादग्रस्त खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी आरोग्य मेळाव्यात केले होते. खासदार खैरे यांच्या विधानाची रविवारी दिवसभर फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर अनेकांनी खिल्ली उडवली. पुडिवाले, नाडीवाले बाबा म्हणून अनेकांनी त्यांच्या या वादग्रस्त विधानावर टीका केली.

जप केल्याने रुग्ण बरे होतात, असे विधान खासदार खैरे यांनी डॉक्टर मंडळीसमोरच केले होते. खासदार असलेल्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी असे विधान केल्याने सोशल मीडियावर दिवसभर या विषयाची चर्चा रंगली हेाती. भस्म टाकून शहरातील खड्डे बुजतील का, नळाला पाणी येईल का, कचऱ्याच्या ढिगाचे खत होईल का, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आले. एकाने तर शहराची नाडी नीट पकडली असती तर, शहराचा नक्कीच विकास झाला असता, असे म्हणत नाडीवाले बाबा म्हणून खिल्ली उडवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात भरदिवसा घरफोडी; ३४ हजारांचा ऐवज लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा येथे घरफोडीत चोरट्यांनी भगवान बुद्धांच्या दोन मूर्तींसह ३४ हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी भरदिवसा घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली. ही महिला शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बहिणीकडे गेली होती. यावेळी चोरट्यांनी तिच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील रोख १८ हजार रुपये, दहा हजारांचे सोन्याचे दागिने, चार हजारांचे चांदीची चेन आणि दोन हजार रुपयांच्या भगवान बुद्धांच्या दोन पितळी मूर्ती, असा एकूण ३४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही महिला घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याण मटका चालवणारे गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन कल्याण मटका चालवणाऱ्या दोघांना जिन्सी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी जिन्सी परिसरात करण्यात आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजयनगर भागात दोन जण ऑनलाइन चिठ्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. संशयित आरोपी शेख मोहमंद शेख मिया (वय ६० रा. संजयनगर) आणि शेख खालेद शेख पाशू (वय ३२ रा. जिन्सी) यांच्या झडतीमध्ये पोलिसांना रोख रक्कम आणि आणि मटक्याच्या चिठ्या आढळून आल्या. या प्रकरणी पोलिस नाईक संजय गांवडे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार हेमंत सुपेकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्र्यांनी एकतर्फी वेतनवाढीची घोषणा केली. या घोषणेप्रमाणे कामगारांना अपेक्षित वेतन वाढ मिळालेली नाही. या निर्णयातील त्रुटी दूर करून कामगारांच्या वेतनवाढ जाहीर करावी. ही त्रुटी दूर न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपावर जाणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे.

एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासन यांच्यातील बोलणी फिसकटल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी; तसेच एसटी प्रशासनाने एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी चार हजार ८४९ कोटीचा वेतन वाढीचे पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजमधून कर्मचाऱ्यांना ३२ ते ४८ टक्के वेतन वाढ जाहीर होणार होती. या पॅकेजनुसार वेतनवाढ मिळत नसल्याने आठ आणि नऊ जून रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता. या संपानंतर एसटी कामगार संघटना आणि एसटी प्रशासनाची पुन्हा चर्चा करण्यात आली. या चर्चेत कामगार संघटनेनं चार हजार ८४९ कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कामगार संघटनेच्या सूत्रानुसार कामगारांना अधिक वेतन वाढ होणार आहे. हा प्रस्ताव एसटी प्रशासनाकडून मान्यता मिळालेली नाही. चार हजार ८४९ कोटी रुपयांचे पूर्ण वाटप होणार नसल्याने या करारावर अद्याप कामगार संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही. ही बाब न्यायलयाच्याही निर्दशनास आणून देण्यात आली आहे. यामुळे या वेतन करारामधील विसंगती दूर झाल्या नाही, तर संघटना कायदेशीर तरतुदीच्या अधिन राहून संपासह अन्य आंदोलन मार्गाचा विचार करीत आहे. याबाबत एसटी कामगार संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

……

\Bएसटीच्या खाजगीकरणाचा प्रयत्न\B

परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाला भाडेतत्वावर घेतलेल्या बस परवडणाऱ्या नाहीत, अशी माहिती देऊन भाडेतत्वावर बस न घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय फिरवून परिवहन मंत्र्यांनी शिवशाहीच्या माध्यमातून भाडेतत्वावर बस घेतल्या असून, त्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. याशिवाय एसटीत स्वच्छता करण्याचे कंत्राट ४४६ कोटी रुपयांत देण्यात आले आहे. हा प्रकार एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने असल्याचा आरोपही कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन ब्रास वाळूसह दोन टेम्पो जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

गोदावरी नदीतून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे दोन टेम्पो उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी वीरगाव फाटा व सिरजगाव येथे पकडले. पथकाने दोन चालकांना अटक केली असून त्यांच्याकडून वाहनासह दोन ब्रास वाळू, असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रवीण थोरात (रा. वीरगाव), गणेश खर्डे, (रा. सिरजगाव) व भरत गलांडे (रा. सराला ता. श्रीरामपूर) अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी गौतम पवार हे जिल्हा गस्तीवर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आत्माराम पैठणकर, अजयसिंह गोलवाल, कर्तारसिंग नायमाने हे होते. पथक वीरगाव हद्दीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने सिरजगावकडे जाऊन एक टेम्पो (एम एच १७ ए जी ५५२३) पकडला. याप्रकरणी आत्माराम पैठणकर यांनी चालक प्रवीण थोरात व गणेश खर्डे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वीरगाव पाटीजवळ पहाटे दुसरा टेम्पो (एम एच २० टी ई ३८५३) अडवून पकडला, एक ब्रास वाळू मिळून आली. टेम्पोचालक मालक भरत गलांडे याला वीरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अजयसिंह गोलवाल यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images