Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कोर्टात चाकू घेऊन प्रवेश करणाऱ्याला केली अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टात चाकू घेऊन प्रवेश करणारा मच्छिंद्रसिंह कालुसिंह भोंड (रा. मानवत, जि. परभणी) याला जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षा पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात चेकिंग गार्ड ड्युटीवर असलेले हवालदार संजय मोहन राठोड यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, सहाय्यक फौजदार दिनेश भुरेवाल, हवालदार संजय राठोड, सारिका गायकवाड व वृषाली भांबरे हे जिल्हा न्यायालयाच्या एचएमटी गेटवर येणाऱ्या लोकांची अंगझडती घेण्याच्या कर्तव्यावर होते. दरम्यान, आरोपी मच्छिंद्रसिंह हा आईसोबत न्यायालयात आला. त्याची अंगझडती घेतली असता त्याने आणलेल्या पिशवीमध्ये लाकडी मुठ असलेला ३५ सेंटिमीटरचा चाकू सापडला. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फ्लॅट खरेदीत बिल्डरकडून ग्राहकाची एकोणीस लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फ्लॅट खरेदीच्या व्यवहारात बिल्डरने ग्राहकासोबत करारनामा करून घेत फ्लॅट न देता १९ लाख २१ हजारांची फसवणूक केली आहे. फेब्रुवारी २०१३ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत सातारा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी बिल्डरविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विनोद रामदास बोरसे (वय ४५, रा. उर्जानगर, सातारा परिसर) यांनी तक्रार दाखल केली. बोरसे हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत. बोरसे यांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये बिल्डर अब्दुल मतीन अब्दुल मौजुद (रा. जहागीरदार कॉलनी) याच्याकडून तुळजाई अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक ४०२ खरेदीचा करारनामा केला होता. यावेळी त्यानी अब्दुल मतीनला १९ लाख २१ हजार रुपये दिले होते. यानंतर अब्दुल मतीन यांनी फ्लॅटचा ताबा बोरसे यांना दिला नाही. बोरसे यांनी पाठपुरावा केला असता अब्दुल मतीनने त्यांना भेटण्यास टाळाटाळ केली. अखेर बोरसे यांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करीत या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पीएसआय डोईफोडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद पोलिस कॉन्स्टेबलचा धुडगूस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या पीएसआय आणि कर्मचाऱ्यांसोबत झोंबाझोंबी केली. मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता उल्कानगरी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी पोलिसाविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मनोज राधेशाम अकोले (वय ४२, पोलिस ठाणे जवाहरनगर) या कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली. अकोले आणि पीएसआय काशीनाथ महांडुळे हे मंगळवारी सायंकाळी उल्कानगरी भागात गस्त घालत होते. यावेळी साईशरण पेट्रोलपंपाजवळून एक बुलेटस्वार जोरात जात होता. अकोले याने त्याला थांबवत बुलेटच्या सायलेन्सरच्या आवाजाबाबत विचारणा केली. यावेळी बुलेटस्वार संशयित आरोपी विशाल कौतिकराव थोरात (रा. देविगिरी हिल्स, शिवाजीनगर) हा मद्यप्राशन केलेले आढळून आला. त्याने उर्मटपणे गणवेशात असलेल्या पीएसआय महांडुळे यांनाच आपण पोलिस असल्याचे सांगत तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली. तसेच अकोले सोबत झटापट करीत त्यांना बोचकारत जखमी केले आणि त्यांचा टीशर्ट फाडला. या प्रकरणी आरोपी विशाल थोरात यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय बाळासाहेब आहेर याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हाधिकारी हाजीर हो ...’

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

आदेश देऊनही उत्तर दाखल केले नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी १३ मार्चपर्यंत शपथपत्र दाखल न केल्यास व्यक्तीश: हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांच्या खंडपीठाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

पैठण येथील नाथ सागरात मच्छिमारीच्या पारंपरिक हक्काबाबत बजरंग लिंभोरे व इतर कहार समाज बांधवांनी खंडपीठात याचिका केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने यापुर्वी वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार नाथ सागरात मच्छिमारीस पूर्णत: बंदी घातली आहे. मागील २० वर्षांपासून नाथ सागरात मच्छिमारीस कायद्याने प्रतिबंध आहे. नाथ सागर हे 'पक्षी अभयारण्य' म्हणून केंद्र व राज्य शासनाने जाहीर केले आहे. कहार समाजाच्या मच्छिमारीच्या पारंपरिक अधिकाराच्या अनुषंगाने विधानसभा व लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले होते. जुलै २०१७ ला केंद्र शासनाने 'वन संरक्षण कायद्यातील' तरतुदीनुसार अध्यादेश काढला असून मच्छिमारीवरील प्रतिबंध उठविला आहे.

नाथ सागर परिक्षेत्रासाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने हा विषय अटी व शर्तींसह, पक्षी अभयारण्य या संकल्पनेस बाधा येऊ न देता नियंत्रित स्वरुपात, केंद्र शासनाच्या पूर्व परवानगीने परवाना देण्याची तरतूद आहे. राज्य शासनाच्या वन तसेच मत्स्य विभागातर्फे आजपर्यंत संपूर्ण पत्रव्यवहार राज्य शासनासोबत झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मच्छीमारीबाबत केंद्र शासनाकडे प्रस्तावच दाखल केला नाही, म्हणून याचिका करण्यात आली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे बी. एल. सगर किल्लारीकर, राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर आणि केंद्र शासनातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडी मृतसाठ्याकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याकडे जात असून सध्या केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. येत्या १५ दिवसांत पाणी पातळी मृतसाठ्यापर्यंत जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शहरातील पाण्याची मागणी तब्बल २३ दशलक्ष लिटरने वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात आपतकालीन यंत्रणा सुरू करण्यासाठी पालिकेची धावाधाव सुरू झाली आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढू असून जायकवाडीतील पाणीसाठा कमी होत आहे. पाण्याची वाढती मागणी आणि धरणातील कमी होत असलेला साठा याची सांगड घालण्याकरिता महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (२७ फेब्रुवारी) पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पाणी पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण स्पष्ट झाले. पाणी पुरवठ्याबद्दल नगरसेवकांची ओरड सुरू झाली आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक होऊन पालिका प्रशासनाला कोंडीत पकडत आहेत. पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (२८ फेब्रुवारी) होत आहे. या सभेतही पाणी पुरवठ्याची समस्या मांडली जाण्याची शक्यता असल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापौरांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. या बैठकीला कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, पद्मे, घुले आदी उपस्थित होते.

आपत्कालीन पंपहाउस सुरू करण्याची तयारी

नगरसेवकांनी मागणी केल्यानुसार, 'नो नेटवर्क एरिया'त ८१ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकव्या लागणार आहेत. हे काम काही भागात सुरू झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी २३ दशलक्ष लिटरने वाढेल. जायकवाडी धरणात सध्या ५.९५ टक्के उपयुक्त पाणी साठा आहे. येत्या १५ दिवसांत धरणातील पाणी पातळी मृतसाठ्यापर्यंत येईल; त्यानंतर धरणातील पाणी उपसून पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणावर पालिकेचे आपत्कालीन पंपहाउस सुरू करण्यारिता १९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आपत्कालीन पंपहाउसचे काम लगेच सुरू करावे लागेल, असे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले.

\Bशहराची पाण्याची गरज - २०३ दशलक्ष लिटर

उपलब्ध होणारे पाणी - १२५ ते १३५ दशलक्ष लिटर

पाण्याची वाढलेली मागणी - २३ दशलक्ष लिटर\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदिव्यांची दुरुस्ती करण्यास नकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करण्यास एलईडीच्या कंत्राटदाराने नकार दिला आहे. त्यामुळे या कामाची झोन कार्यालय निहाय निविदा काढण्याचा निर्णय महापालिकेच्या प्रशासनाने घेतला असून, एका झोन कार्यालयासाठी सुमारे २५ लाख रुपये या प्रमाणे नऊ झोन कार्यालयांसाठी निविदा काढण्यात येणार आहेत.

महापालिकेने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम लहान लहान कंत्राटदारांना दिले होते. काँम्प्रेसिव्ह मेंटेनन्स असा उल्लेख या कामासाठी केला जात होता. गेल्या काही वर्षांपासून पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाची पालिकेत अशीच पद्धत होती. गेल्या माहिन्यात ही पद्धत मोडून काढण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले. एलईडी दिवे लावण्याचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे, त्याच कंत्राटदाराने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करावे, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र, आता एलईडीच्या कंत्राटदाराने पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिला आहे. ही बाब विद्युत विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता शेख खमर यांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितली. त्यामुळे या देखभाल दुरुस्तीसाठी लवकरच झोन कार्यालय निहाय निविदा काढण्यात येणार आहे.

\Bकंत्राटदाराला नोटीस

\Bकंत्राटदाराने आतापर्यंत २३ हजार एलईडी दिवे लावले आहेत. त्यापैकी ८५० दिवे बंद आहेत. बंद दिव्यांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे महापालिकेतर्फे कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. बंद पडणारे दिवे, दिव्यांचा अंधुक प्रकाश या बद्दल नागरिक आणि नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यागी गँगच्या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंटेनरमधील सुमारे ८५ लाखांचे कॉपर वायर चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज त्यागी गँगच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२ मार्च) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी बुधवारी (२७ फेब्रुवारी) दिले.

वाळूज परिसरातील साऊथ सिटी येथे असलेल्या मोकळ्या मैदानात कॉपरचे बंडल वायर विक्री करण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन त्यागी गँगच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. यात मनोज ऋषिपालसिंग त्यागी (५०, रा. गुडगाव, दिल्ली), शिवदत्त रामकिशन शर्मा (४८, रा. उत्तर प्रदेश), मुकीम फेकू खान (३६, रा. कलमबोली मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), धर्मेंद्र रामतीर्थ पाल (३२, रा. उत्तर प्रदेश), योगेश तुळशीराम पठाडे (३३, रा. नाईकनगर, दवळाई परिसर, औरंगाबाद) या आरोपींना २३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. गुजरात येथील शक्ती फॉरवर्ड कंपनीने औरंगाबादमधील भारत इन्सुलेशन कंपनीसाठी पाठविलेले कॉपर वायर कंपनीत न पोहोचवता त्याची परस्पर विक्री करण्यासाठी ही टोळी घेऊन जात होती. या टोळीच्या ताब्यातून ८४ लाख ८२ हजार ३२२ रुपये किंमतीच्या कॉपर वायरच्या ६ बंडलसह मोबाईल फोन, रोख रक्कम असा मिळून ८५ लाख ३५ हजार ५०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. प्रकरणात ट्रान्सपोर्ट कंपनीचे हनुमानमल पोकरराम चौधरी (३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (२७ फेब्रुवारी) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींचे साथीदार ताज व इजरार यांना अटक करणे तसेच आरोपी कुणाला मुद्देमाल विकणार होते, चोरलेला मुद्देमाल कोणाच्या गोडाऊनमध्ये ठेवणार होते, गुन्ह्यात वापरलेली क्रेन कोणाच्या मालकीची आहे आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाशे कोटींचे रस्ते; दोन दिवसांत यादी रवाना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची यादी येत्या दोन दिवसांत शासनाला सादर केली जाणार आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही यादी शासन दरबारी पोहचावी यासाठी पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यानुसार प्रशासनाने देखील कामाची गती वाढवली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमधील रस्त्यांच्या कामासाठी सव्वाशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली. किती रस्त्यांची कामे करायची याची यादी तयार करा. यादीला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेवून ती यादी शासनाला पाठवा, लगेचच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी महापौरांशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापौर व सर्व पदाधिकारी, गटनेत्यांनी परस्पर चर्चा करून ७९ रस्त्यांची यादी तयार केली आहे. तयार केलेली यादी पडताळून पाहण्याचे काम सध्या प्रशासनाच्या स्तरावर सुरू आहे. रस्त्यांच्या कामात अडथळे येणार आहेत का, भूसंपादन करावे लागणार आहे का, अतिक्रमणे हटवावी लागणार आहेत का, या बाबी तपासून पालिका प्रशासन रस्त्यांची अंतिम यादी दोन दिवसांत शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. रस्त्यांच्या यादीला शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर यादी सर्व नगरसेवकांना दिली जाईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स.भु.’ केंद्रावर २७ कॉपीबहाद्दर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत कॉपी करणे सुरूच असून औरंगाबाद शहराजवळ असलेल्या बिडकीन येथील सरस्वती भुवन कनिष्ठ महाविद्यालय या एकाच परीक्षा केंद्रावर तब्बल २७ विद्यार्थी कॉपी करताना सापडले. भरारी पथकाने ही कारवाई केली.

बारावीच्या परीक्षांना २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासून धक्कादायक गैरप्रकार समोर येत आहेत. जमिनीवर बसून परीक्षा देण्यासह शिक्षकच कॉपी पुरविल्याचेही समोर आले. त्यातच बुधवारी (२७ फेब्रुवारी) झालेल्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरलाही कॉप्या करण्यात आल्या. बिडकीन येथील सरस्वती भुवन कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपी करताना सर्वाधिक २७ विद्यार्थी भरारी पथकाला सापडले. या विद्यार्थ्यावर पथकाने कारवाई केली. या केंद्रावर ३४७ परीक्षार्थी असून एकाच केंद्रावर सर्वाधिक कॉपी बहाद्दर सापडण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. त्यासह जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक ३९ विद्यार्थ्यांवर बुधवारी प्रथमच कारवाई करण्यात आली. विभागात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नऊ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. औरंगाबाद विभागात बिडकीन येथील कारवाईची चर्चा दिवसभर होती. औरंगाबाद विभागात सकाळी झालेल्या विविध विषयांच्या पेपरला ४५ विद्यार्थी कॉपी करताना आढळले. सकाळच्या सत्रात रसायनशास्त्र, वाणिज्य संघटन, तर दुपारच्या सत्रात इतिहास विषयांची परीक्षा होती. दुपारच्या सत्रात पाच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. सकाळच्या सत्रात बीड जिल्ह्यात सहा, परभणी जिल्ह्यात पाच कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली.

\Bभरारी पथक बसूनच; 'एका बाकावर दोन'\B

कॉपीमुक्त परीक्षा केवळ कागदावरच राहिली आहे. 'एका बाकावर एक विद्यार्थी'चा दावा मंडळाने केला. मात्र, पथकाच्या पाहणीतही एका बाकारवर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे स्पष्ट झाले. गैरप्रकार, सामूहिक कॉपीचे प्रकार लक्षात घेऊन भरारी पथक केंद्रावर गेल्यानंतर संपूर्ण पेपर संपेपर्यंत बसून राहत असल्याचे पथकातील सदस्यांनी 'मटा'ला सांगितले.

\Bबुधवारीची कारवाई

औरंगाबाद जिल्हा....३९

बीड.....................६

परभणी..................५\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूचना पाळल्या नाहीत, तर केंद्र संचालकांवर कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत दिलेल्या सूचनांना अनेक केंद्रांनी केराची टोपली दाखवल्यामुळे संतापलेल्या मंडळाने दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास केंद्रसंचालकांना जबाबदार धरण्यात येईल, असा कडक इशारा दिला आहे. पुरेशी बैठक व्यवस्था नसेल तर, आत्ताच सांगा, अन्यथा कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले असून बाक उपलब्ध करून घ्या, अडचण असेल, तर ही बाब गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणू द्या, असे कळवण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र घेताना भौतिक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन परीक्षा केंद्राकडून देण्यात येते. शिक्षण विभाग सुविधा आहे की नाही, याची खातरजमा करण्याकडे दुर्लक्ष करते. परिणामी, अनेक केंद्रावर विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बारावी परीक्षेत काही केंद्रावर चक्क जमिनीवर बसून परीक्षा घेण्यात आली. बैठक, जनरेटर, पिण्याचे पाणी, विद्यार्थी संख्येएवढे बाक, संरक्षण भिंत, सीसीटीव्ही आदी सुविधी असणे आवश्यक आहे. 'एका बाकावर एकच विद्यार्थी बसावा' असे मंडळाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानंतरही हे नियम पाळले जात नाहीत. बारावी परीक्षेतील असे प्रकार समोर आल्याने दहावीत असे प्रकार होवू नयेत यासाठी मंडळाने दहावी परीक्षा केंद्रसंचालकांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.

\Bमंडळाच्या सूचना \B

एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसून परीक्षा देणार नाही, बाकाची कमतरता असल्यास संलग्न शाळेच्या विद्यार्थी संख्येएवढे बाक उपलब्ध करून घ्यावेत, बाकांबद्दल सहकार्य मिळत नसेल तर गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना कळवून बाक उपलब्ध करून घ्यावेत, याची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास केंद्रसंचालकास जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई केली जाईल.

केंद्रसंचालकांना बैठक व्यवस्थेबाबत सूचनापत्र पाठवले आहे. त्यांनी बैठक व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे बाक उपलब्ध करून घ्यायचे आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्यात यावा. कोणत्याही परिस्थित एका बाकावर एकापेक्षा जास्त विद्यार्थी बसणार नाहीत याची काळजी केंद्रसंचालकांनी घ्यायची आहे.

-सुगता पुन्ने, विभागीय सचिव

\Bदहावीचे परीक्षा केंद्र…...६१६

परीक्षार्थी............१८६६७३\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले जुवेकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यावर उलटलेली कार पाहून सिनेकलावंत संतोष जुवेकरने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सिल्लोड जवळील आळंद येथे हा प्रकार घडला. कारमधील महिला, मुलांना सुखरूप बाहेर काढत त्यांना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रवाना केल्यानंतर जुवेकर सिल्लोड येथील कार्यक्रमाला रवाना झाले.

जुवेकर सिल्लोड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. मनसेचे जिल्हा संघटक आणि हेल्प रायडर्स ग्रुपचे समन्वयक संदीप कुलकर्णी, मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम नवले-पाटील, सार्थक देशपांडे आणि प्रथमेश कोलते यांच्यासमवेत कारने ते सिल्लोडकडे रवाना होत होते. सिल्लोड महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. सिल्लोडच्या अलीकडे आळंदजवळ समोरून एक व्हॅगन आर कार वेगाने आली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अचानक ही कार खड्ड्यामध्ये आदळून पलटी झाली. हा प्रकार पाहताच जुवेकर यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितली. जुवेकर, संदीप कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. कारमध्ये चालक, एक महिला आणि दोन लहान मुले होती. कारचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरवाजा उघडत नव्हता. अखेर पलटी झालेली कार उचलून सरळ करण्याचा निर्णय सगळ्यांनी घेतला. जुवेकर यांच्यासह सगळ्यांनी कारची एक बाजू उचलून धरत कार सरळ केली. कारमधील सर्व प्रवासी घाबरले होते. कार सरळ केल्यानंतर दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना धीर देण्यात आला. रुग्णवाहिका बोलावून कारमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना दवाखान्यात रवाना करण्यात आले. यानंतर जुवेकर पुढील कार्यक्रमासाठी सिल्लोडला रवाना झाले. जुवेकरसारखा कलावंत मदतीला धावून आला हे पाहून ग्रामस्थांनाही घटनेचे अप्रुप वाटले.

अपघात झाल्याचे पाहताच संतोष जुवेकर यांनी चालकाला कार थांबवण्यास सांगितले. दरवाजा उघडून पळतच त्यांनी धाव घेतली. कार सरळ करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या वागण्यातून एक सेलिब्रेटी असूनही त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन यावेळी घडले.
- संदीप कुलकर्णी, जिल्हा संघटक, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीला पेटवले, पत्नीसह दोन मेव्हण्यांना सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून आपल्या दोन भावांच्या मदतीने पतीला पेटवून देणारी पत्नी कांचन उर्फ हिराबाई संजय सरोदे हिच्यासह तिचे भाऊ संजय दामोधर साठे व अशोक दामोधर साठे यांना प्रत्येकी दहा वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. दिग्रसकर यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) ठोठावली. या गुन्ह्यात पती ५० टक्के भाजला; पण डॉ. अविनाश ये‌ळीकर यांनी तात्काळ दिलेल्या उपचारांमुळे वाचला, हे विशेष.

या प्रकरणात नागरिकांनी आग विझवून पीडित संजय रमेश सरोदे (३३, रा. पवन नगर, एन-९, सिडको) यांना सिडको पोलिस ठाण्यात आणले होते व त्यानंतर पीडित संजय सरोदे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ४ ऑक्टोबर २०१५ रोजी फिर्यादीच्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त फिर्यादीची पत्नी व आरोपी कांचन उर्फ हिराबाई संजय सरोदे (२९) हिने तिचा आरोपी भाऊ संजय दामोधर साठे (३२) व आरोपी भाऊ अशोक दामोधर साठे (३५), आई कांताबाई (५५) व वडील दामोधर मरिभा साठे (६५, सर्व रा. आंबेडकरनगर) यांना घरी बोलावले होते. सर्व आरोपी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादीच्या घरी आले असता, फिर्यादी हा इमरतीच्या तिसऱ्या मजल्यावर झोपलेला होता. त्यावेळी कांचन हिने सर्व आरोपींना फिर्यादीच्या खोलीत नेले. तिथे अशोक याने फिर्यादीला लाथ मारुन उठविले व शिविगाळ करीत 'माझ्या बहिणीला त्रास का देतो' असे म्हणत फिर्यादीला अशोक व त्याच्या आई-वडिलांनी घट्ट पकडले, तर कांचन हिने फिर्यादीच्या अंगावर रॉकेल ओतले व पेटवून दिले. फिर्यादीने आरडा-ओरड केल्यामुळे सर्व आरोपींनी तिथून धुम ठोकली व शेजाऱ्यांनी धाव घेतली. शेजारच्या नागरिकांनी फिर्यादीला लागलेली आग विझवून फिर्यादीला सिडको पोलिस ठाण्यात आणले. तिथे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन कलमान्वये शिक्षा

खटल्यावेळी, जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात डॉ. अविनाश ये‌ळीकर यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने तिघा आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३०७ कलमान्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त सक्तमजुरी, ३२३ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०४ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली. तर, आरोपी कांताबाई व दामोधर साठे या दोघांना संशयाचा फायदा देत कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. खटल्यात अॅड. अविनाश देशपांडे यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तिकर विभागाचे शाळांवर छापे

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

करचुकेगिरी केल्याच्या संशयावरून सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या केंब्रिज स्कूल, सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी शाळांसह जळगाव तसेच बंगळुरू येथील शाळेवर प्राप्तिकर विभागाने कारवाई करत महत्त्वाचे दस्तवेज जप्त केले. अधिकाऱ्यासह ४५ कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत एकाच वेळी कारवाई केली जात असून रात्री उशिरापर्यंत 'ऑपरेशन सर्वे' सुरू होते. दरम्यान, करप्राप्त उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळपासून येथील सेंट लॉरेन्स एज्युकेशन ट्रस्टच्या शाळांची तपासणी केली जात आहे. जालना महामार्गवरील केंब्रिज स्कूल, सिडको परिसरातील सेंट लॉरेन्स मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा यासह जळगाव व बंगळुरू येथील, अशा ट्रस्टच्या पाच शाळांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. पथकामध्ये औरंगाबाद व नाशिक येथील कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. देणगी, प्रवेश शुल्क यासह आर्थिक व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. संस्थेचे संचालक कॉलिन यांचा जबाब घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हे 'सर्वे ऑपरेशन' सुरू होते. अतिरिक्त आयुक्त साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता ते उपल्बध न झाल्याने अधिकृत तपशील समजू शकला नाही.

\Bकरचुकवेगिरी करणाऱ्या संस्था रडारवर

\B

२०१५-१६पासून धर्मादाय संस्थांसाठी प्राप्तिकर विभागाने स्वतंत्र संचालनालय सुरू केले आहे. औरंगाबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या १३ जिल्ह्यांचा समावेश आहे. करचुकवेगिरी केल्याच्या संशयावरून गेल्या सात ते आठ महिन्यांत औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, अहमदनगर आदी जिल्ह्यातील ७ धर्मादाय संस्थांची तपासणी केली. यात सुमारे १३० कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न हुडकण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले. या करपात्र उत्पन्नावर आतापर्यंत २० कोटी रुपयांचा कर वसूल झाला असून अजून वसुली केली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुपरस्पेशलिटी’ला मिळाला राज्याकडून १४ कोटींचा निधी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरात उभे राहात असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राज्य शासनाच्या वाट्यातून नुकताच १४ कोटी रुपयांचा निधी मिळाला. हा निधी एचएलएलएम कंपनीकडे वर्ग केला जाणार असून, या निधीतून यंत्रसामुग्री व फर्निचरची खरेदी केली जाणार आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) स्पष्ट केले.

'पीएमएसएसवाय'अंतर्गत १५० कोटींच्या निधीतून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहात आहे. यात केंद्र सरकारचा १२० कोटी रुपये, तर राज्य शासनाचा ३० कोटी रुपयांचा वाटा आहे. २५३ खाटांच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम एचएससीसी या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याच हॉस्पिटलसाठी राज्य शानाच्या ३० कोटींच्या वाट्यापैकी १४ कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे. या निधीमध्ये यंत्रसामुग्री व फर्निचर खरेदी केली जाणार आहे. हा निधी लवकरच कंपनीकडे वर्ग केला जाणार आहे. हॉस्पिटलचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच उर्वरित कामही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असेही डॉ. येळीकर म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगाने जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता जालना रोडवरील केंब्रीज चौकात हा अपघात घडला. मृत दुचाकीस्वाराची ओळख अद्याप पटली नसून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळवरून चाणक्य ट्रॅव्हल्सची बस औरंगाबाद मार्गे मुंबईला जात होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही बस जालन्याकडून केंब्रीज चौकात आली. यावेळी नारेगाव बायपासकडून एक दुचाकीस्वार अचानक बस समोर आला. बस चालकाने बसला ब्रेक लावत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत दुचाकीस्वार बसला धडकून चिरडला गेला हेाता. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. दरम्यान, रात्रपाळीला गस्तीवर असलेले विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नाही. विनोद शंकर चौहान (रा. पुसद) असे बसचालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेती विक्रीच्या व्यव्हारात ऑनलाइन विस हजाराचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेती विक्रीच्या व्यवहारात एका ठगाने नागरिकाला २० हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. मोबाइलवर २० लाख रुपये जमा झाल्याचा फेक मेसेज पाठवित त्याने हा प्रकार केला. डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवाजी सदाशिव कदम (वय ५४, रा. जे सेक्टर, एन २, सिडको) यांनी तक्रार दाखल केली. कदम यांचे भाऊ विठ्ठल कदम यांनी दाभरुळ शिवारातील त्यांची तीन एकर जमीन विकण्यासाठी एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातीमध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकावर गणी नजीर पटेल (रा. कारकीण, ता. पैठण) याचा फोन आला. तुमची जमीन आम्ही घ्यायला तयार आहोत, पार्टी पाहून ठेवली आहे. तुमचा अकाऊंट क्रमांक द्या, २० लाखांचे टोकन तुमच्या अकाऊंटवर जमा करतो, अशी थाप मारली. कदम यांनी त्यांचा अकाऊंट क्रमांक दिला असता आरोपीने विठ्ठल कदम यांच्या भावाच्या मोबाइलवर २० लाख जमा झाल्याचा फेक मॅसेज पाठविला. यानंतर आरोपी गणीने कदम यांना फोन करून समोरच्या पार्टीला काही पैसे द्यायचे आहे तरी तुम्ही माझ्या एसबीआय बँकेच्या खात्यावर ११ हजार ३०० रुपये भरा असे सांगितले. या गोष्टीवर विश्वास ठेवून कदम यांनी ही रक्कम भरली. थोड्या वेळाने आरोपी गणीने अजून नऊ हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. कदम यांच्या मुलाने ही रक्कम देखील भरली. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे कदम यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय बांगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांसमोर कामांसाठी ठेवली नोटांची गड्डी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंत्राटदारांनी कामाचे बिल थकल्याने महापालिकेची कामे थांबवली आहेत. त्यामुळे संतापलेले काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी नोटांचे बंडल महापौरांसमोर भर सभेत डायसवर ठेवले. हे पैसे अधिकारी, कंत्राटदाराला द्या आणि वॉर्डातील काम सुरू करा, अशी मागणी केली.

पानचक्की परिसरातील प्रबुद्धनगर येथील पाइपलाइनचे काम अर्धवट ठेवले आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याबाबत अनेकदा आदेश दिल्यानंतरही काम सुरू झाले नाही. बिल न मिळाल्याने कंत्राटदारांनी कामे अर्धवट ठेवल्याचे नगरसेवकांना कळले. सर्वसाधारण सभेत नगरसेवक अफसर खान यांनी वॉर्डातील हा प्रश्न मांडत संताप व्यक्त केला. दहा पैकी चार पाइपच आणले. उर्वरित काम अर्धवट ठेवले. या पाइपांसाठी पालिकेकडे पैसे नसतील तर हे माझ्याकडून पैसे घ्या, परंतु वॉर्डातील काम करा असे सांगत खान यांनी नोटांचे बंडल महापौर नंदकुमार घोडेले यांच्या समोर डायसवर ठेवले. हे पैसे अधिकाऱ्यांना द्या, पण काम करा, असे संतापलेल्या खान यांनी सुनावले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस रहिवासी प्रमाणपत्राची विक्री; पित्रा-पुत्राला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बोगस रहिवासी प्रमाणपत्राची निर्मिती तसेच विक्री केल्याच्या प्रकरणात इरफान खान माजिद खान व सैफ खान इरफान या पिता-पुत्राला बुधवारी (२७ फेब्रुवारी) अटक करुन गुरुवारी कोर्टात हजर केले असता, दोघांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुनिल मल्हारी जाधव यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २७ फेब्रुवारी २०१९ रोजी किराडपुरा परिसरात जनता मल्टी सर्व्हिसेस झेरॉक्स दुकानावर बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरुन, पोलिसांनी वरील ठिकाणी छाापा मारला असता, त्या दुकानात आरोपी इरफान खान माजिद खान (४२) व सैफ खान इरफान खान (१९, दोघे रा. किराडपुरा फैज कॉम्प्लेक्समागे) आढळून आले. तसेच आरोपी सैफ खान हा लॅपटॉपवर बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करण्याचे काम करीत असल्याचे आढळून आले व त्याच ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्राच्या प्रिंट काढलेल्या दिसून आल्या. प्रकरणात दोघांना अटक करुन सुमारे २० हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप, स्कॅनर, पेन ड्राईव्ह, रबर स्टँप आदी साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर केले असता, लॅपटॉपवर वापरलेले फॉरमॅट सिडको बजरंग चौकातील ओंकार गॅससमोरील श्रीनिवास बागन्ना उल्लेवार याच्याकडून आणल्याचे आरोपींनी सांगितले असून, त्याचा तपास करणे बाकी असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

\Bकिती दिवसांपासून उद्योग?

\Bया प्रकरणात, आरोपींनी कितीजणांना बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करुन विक्री केले, आरोपी हा उद्योग किती दिवसांपासून करत आहेत, स्कॅन-प्रिंटर-लॅपटॉप कुठून आणले, कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायके, पाटलांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव गायके व नानासाहेब माणिक पाटील यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

सुरेश पाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी सदाशिव गायके व नानासाहेब पाटील यांना अटक करुन कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना गुरुवारी कोर्टात हजर केले असता, पोलिस कोठडीदरम्यान दोघांनी तपासामध्ये सहकार्य केले नाही. २० वर्षांपासून छळ करण्यामागचा उद्देश तपासण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीमध्ये तीन दिवसांची वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. तर, पोलिसांच्या ताब्यात असताना सहकार्य केले, तपासाच्या नावावर पोलिसांनी जून्याच मुद्यावर पोलिस कोठडीची मागणी केली असून पोलिस कोठडीची गरज नसल्यामुळे पोलिस कोठडी देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. एस. एस. लड्डा यांनी केला. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद गृह्या धरुन कोर्टाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्दयी मातेने मृत नकोशीला टाकले उघड्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील महुनगर भागात मृत नवजात बालिकेचा मृतदेह झुडपात आढळून आला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा परिसरातील शहाशोक्ता दर्गा पुलाखाली झुडपात हे अर्भक आढळून आले. नागरिकांनी हा प्रकार सातारा पोलिसांना कळविला. पोलिसांनी अर्भकाला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अनैतिक सबंधातून या अर्भकाचा जन्म झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या अर्भकाला फेकणाऱ्या अज्ञात मातेविरुद्ध सहायक फौजदार त्रिंबक पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार भोसले या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images