Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नोकरभरतीवरून ‘ स्थायी’त प्रशासन धारेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कनिष्ठ अभियंतापदासाठीच्या परीक्षेत एका बाकावर तीन विद्यार्थी बसविल्याने पारदर्शकता राहिली नाही म्हणत नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रशासनाला धारेवर धरले.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेवक गजानन बारवाल यांनी कनिष्ठ अभियंतापदाच्या भरती प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित केला. अकरा कनिष्ठ अभियंत्यांच्या पदासाठी महापालिकेतर्फे रविवारी देवगिरी महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी दोन हजार ९३ उमेदवार उपस्थित होते. लेखी परीक्षेच्या नंतर नऊ जणांना सोमवारी थेट नियुक्तीपत्र देण्यात आले. या सर्व प्रक्रियेबद्दल बारवाल यांनी आक्षेप घेतला. एका बाकावर तीन - तीन उमेदवार होते, त्यांनी लेखी परीक्षा दिली. वास्तविक पाहता एका बाकावर एकच उमेदवार बसायला हवा होता, पण तसे झाले नाही. त्यामुळे पारदर्शकता राहिली नाही. ही भरती रद्द करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला द्यावेत अशी मागणी बारवाल यांनी केली. सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी या बद्दल उपायुक्त मंजुषा मुथा यांना खुलासा करण्यास सांगितले. मुथा म्हणाल्या, लेखी परीक्षेबद्दल आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली होती. एक - दोन हॉल वगळता अन्य हॉलमध्ये अन्य हॉलमध्ये एका बाकावर एकच उमेदवार बसवण्यात आला होता. परीक्षेची व नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती, असा दावा त्यांनी केला.

\Bनाराजी आयुक्तांना कळवा

\Bमुथा यांनी केलेल्या खुलाशावर बारवाल यांचे समाधान झाले नाही. एकाच बाकावर तीन - तीन उमेदवार बसल्याची छायाचित्रे त्यांनी दाखवली व प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. भरती प्रक्रियेबद्दल नगरसेवकांची नाराजी आयुक्तांना कळवा, अशी सूचना सभापतींनी उपायुक्तांना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा छावणीसाठी पालकमंत्र्यांचे प्रमाणपत्र, राज्य शासनाला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

चारा छावणी सुरू करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची अट लागू केल्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत राज्य शासनासह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी दिले.

बीड जिह्यातील शिरूर कासार येथील मेहबूब शेख यांनी याचिका केली आहे. १९ जानेवारी २०१९ रोजी शासनाने चारा छावणीसंदर्भात सुधारित परिपत्रक काढले. त्यात चारा छावणी मंजूर करण्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे नाहरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आले. त्याविरोधात याचिका करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट घातल्यामुळे पारदर्शकता कमी होऊन व राजकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता असल्याचा युक्तीवाद सुनावणी दरम्यान करण्यात आला. अट रद्द करण्याची विनंती करण्यात आली. या प्रकरणात बीड जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली. याचिकार्त्यातर्फे गिरीश नाईक-थिगळे यांनी तर सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले. या याचिकेवर १२ मार्च रोजी सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६५ हजारांची चोरी, आरोपीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुरिअर वाटपाचे काम करताना मोबाईल, टॅब, घड्याळ आदी ६५ हजार रुपयांच्या वस्तू असलेली बॅग लंपास केल्याप्रकरणात आरोपी अमोल परमानंद तांगडे याला गुरुवारी (२८ फेब्रुवारी) दुसऱ्या गुन्ह्यातून अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीला शनिवारपर्यंत (२ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी शिवाजी गंगाधर राठोड (२९, रा. सुरेवाडी, हर्सूल) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा एका खासगी कंपनीत कुरिअर वाटपाचे काम करतो. ९ नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी हा पार्सल डिलिव्हरीच्या कामासाठी निघाला होता व त्याच्यासोबत आरोपी अमोल परमानंद तांगडे (२२, मूळ रा. बुलडाणा, ह. मु. पुणे) याला फिर्यादीच्या व्यवस्थापकाने कुरिअर वाटपाच्या कामासाठी पाठवले होते. दोघे वेगवेगळ्या दुचाकींवर कुरिअर वाटप करीत सिडको एन-पाच परिसरातील एलआयसीच्या कार्यालयात दुपारी सव्वादोन वाजता पोहोचले. त्यावेळी फिर्यादीने त्याची कुरिअर बॅग आरोपीकडे सोपवली व तो टपाल देण्यासाठी कार्यालयात गेला. बाहेर आल्यावर आरोपी फिर्यादीच्या बॅगसह पसार झाल्याचे स्पष्ट झाले. बॅगेसह बॅगेतील पाच मोबाईल, एक टॅब, हातातील घड्याळ आदी ६५ हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दिल्यावरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात पुण्यामध्ये अटकेत असलेला आरोपी अमोल याने सिडकोतील संबंधित गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सात हजार रुपयांचा मोबाईल काढून दिला. प्रकरणात आरोपीला गुरुवारी अटक करुन कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून उर्वरित वस्तू जप्त करणे बाकी आहे. आरोपीने संबंधित वस्तू कुठे ठेवल्या किंवा कुणाला विकल्या, यासह आरोपीचे कुणी साथीदार आहेत का, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारूची चोरी; आरोपीला अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवळाई परिसरातील वाईन शॉपमधून १९ हजार ८८५ रुपयांच्या दारू चोरल्याप्रकरणी संशयित आरोपी ज्ञानेश्वर मनोहर यादव याला बुधवारी (२७ फेब्रुवारी) अटक करून कोर्टात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (२८ फेब्रुवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणी वाईन शॉपचा व्यवस्थापक प्रल्हाद उत्तम वाणी (वय २९, रा. दहेगाव, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री साडेदहाला ते दुकान बंद करुन गेले होते. दुसऱ्या दिवशी दुकानाचे शटर उचकटलेले दिसले व १९ हजार ८८५ रुपयांच्या दारुची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानेश्वर मनोहर यादव (वय २७, रा. जयभवानीनगर) याला बुधवारी अटक करण्यात आली. आरोपीला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १४ टक्के पाणी दूषित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सरासरी १४ टक्के पाणी नमुने दूषित आढळून आले असून वैजापूर तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्याठिकाणी घेतलेल्या नमुन्यापैकी ४१ टक्के दूषित आढळले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जानेवारी महिन्यात नमुने घेतले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यानुसार, वैजापूर पाठोपाठ खुलताबाद तालुक्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित आढळले. जिल्ह्यातून एकूण ७०५ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १०२ नमुने (१४ टक्के) दूषित आढळले. वैजापूर तालुक्यातून घेतलेल्या २२ पैकी ९ नमुने (४१ टक्के) दूषित आढळून आले आहेत. खुलताबादेतील ६२ पैकी २० नुमने दूषित आढळून आले आहेत. औरंगाबाद १९० पैकी १६ नमुने दूषित आढळून आले (८ टक्के), गंगापूर ४८ पैकी ५ (१०टक्के), पैठण तालुक्यात घेण्यात आलेल्या ८३ पैकी १८ नमुने (२२ टक्के), सिल्लोड ३५ पैकी ११ नमुने (३१ टक्के), फुलंब्रीमधील १०८ पैकी ४ नमुने (४ टक्के), सोयगाव तालुक्यातील १८ पैकी केवळ २, तर कन्नड तालुक्यातील ३५ पैकी ११ नमुने दूषित आहेत. दरम्यान, या दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार पसरण्याचा धोका वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने हा धोका ओळखून वेळीच पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरतीच्या सोळा उमेदवारांवर फसवणुकीचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्य भरतीमध्ये नोकरीसाठी वर्णी लागावी म्हणून १६ उमेदवारांनी वय कमी दाखविण्यासाठी चक्क दहावीची परीक्षा दुसऱ्यांदा देत उतीर्ण झाले. त्यांनी यापूर्वी भरतीसाठी प्रयत्न केले असल्याने त्यांच्या वयातील तफावत भरती अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीमध्ये लक्षात आली. १६ उमेदवारांवर या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी कर्नल साकल शहा कलिया यांनी तक्रार दाखल केली. कर्नल साकल शहा हे सेना भरती कार्यालयात भरती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात सैन्यभरतीसाठी ऑनलाइन जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये अनेक उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरले होते. यामध्ये १६ बेरोजगारांचा देखील समावेश होता. यापैकी १४ जणांची भरतीसाठी निवड देखील झाली होती. या उमेदवारांनी यापूर्वी देखील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केले होते. या अर्जाची पडताळणी करत असताना कर्नल शहा यांना या १६ जणांच्या दहावीच्या प्रमाणपत्रात वयामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. अधिक चौकशीत या १६ जणांनी वयोमर्यादा उलटल्याने वय कमी दाखवण्यासाठी दहावीची परीक्षा दुसऱ्यांदा देत कमी वयाचे प्रमाणपत्र सादर केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन काकासाहेब भोसले, किरण सुरेश पाटील, अमोल जाधव, ज्ञानेश्वर भिसन, अनिल निकम, प्रमोद राऊत, दीपक भोकरे, बाबुलाल नागलोद, अक्षय देशमुख, द्वारकादास जाधव, विठ्ठल डांगे, संदिप बारवे, भिकन लेनकर, रविंद्र गरुड, अमोल आमटे, राहुल हवाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मनोज पगारे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून माजी नगरसेवकांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी जनजागरण समिती महाराष्ट्रच्या वतीने जकात नाका येथील महापालिका पशुचिकित्सालयासमोर निदर्शने करण्यात आली.

गुरुवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जनजागरण महाराष्ट्र समितीचे मोहसीन अहेमद यांच्यासह माजी नगरसेवक मोहसीना बिल्कीस, आबेदा बेगम, माजी नगरसेवक शेख मुनाफ, फजलुल्लाह खान, मीर हिदायत अली, सलमा बानो, यांच्यासह काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष हमद चाऊस, अश्फाक अहेमद एकबाल, अब्दुल जब्बार, एजाज अन्सारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.

जकात नाका रोडवर कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. या कुत्र्यांमुळे वाहन चालक आणि विद्यार्थी यांच्या दहशत निर्माण झाली आहे. अन्य परिसरातून पकडून आलेले कुत्रे जकात नाका येथे सोडण्यात येत आहेत. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ज्या लोकांवर हल्ला झालेला आहे, त्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा १५ मार्च रोजी बेमुदत निर्दशने करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

नसबंदी की घोटाळा

मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात महापालिका खर्च करीत आहे. हा खर्च योग्य होतोय किंवा नाही याची तपासणी करावी? यात मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा; दोघांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइलवर क्रिकेट ऑनलाइन अॅप डाऊनलोड करून त्या आधारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. बुधवारी सायंकाळी विठ्ठलनगर, मुकुंदवाडी भागात भारत ऑस्ट्रेलिया सामन्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठलनगर भागात दोनजण क्रिकेट सामन्यावर व्हॉटस्अॅपच्या सहायाने ऑनलाइन सट्टा चालवत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीआधारे बुधवारी सायंकाळी भारत ऑस्ट्रेलियाचा सामना सुरू असताना संशयितांवर छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपी संभाजी दत्तात्रय डोंगरे आणि बाळासाहेब विठ्ठल खडके (दोघे रा. विठ्ठलनगर) यांना अटक करण्यात आली. या दोघांचे मोबाइल जप्त करण्यात आले. या दोघांनी मोबाइलवर ऑनलाइन क्रिकेट अॅप असलेले मिंटो आणि सेवन हे अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपची लिंक व्हॉटस्अपद्वारे त्यांनी इतरांना पाठविली होती. या लिंकचा युजर आयडी आणि पासवर्ड जुगार खेळणाऱ्या मंडळींना देण्यात येत होता. त्यांनी सट्ट्याची लावलेली रक्कम आरोपींच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यावर जमा होत होती. या लिंक व युजर आयडीचा वापर करून हे आरोपी ऑनलाईन सट्टा चालवित होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय बांगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरक्षा प्रकल्प ५८ कोटींनी वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत मास्टर सिस्टीम इंटीग्रेटरच्या (एमएसआय) माध्यमातून अंमलात आणला जाणारा शहर सुरक्षेचा प्रकल्प ५८ कोटींनी वाढला आहे. या प्रकल्पाची निविदा मंजूर करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या स्मार्ट सिटी मिशनसाठी स्थापन केलेल्या स्पेशल पर्पज व्हेकलची (एसपीव्ही) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. एसपीव्हीचे मेंटॉर संजयकुमार यांनी मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) एसपीव्हीच्या संचालकांशी संवाद साधला. बैठकीला एसपीव्हीचे मुख्याधिकारी व पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक, संचालक महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, स्वतंत्र संचालक भास्कर मुंडे, सभागृहनेते विकास जैन, पालिकेचे विरोधीपक्षनेते जमीर कादरी, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप उपस्थित होते. बैठकीमध्ये प्रामुख्याने 'एमएसआय'च्या निविदेबद्दल चर्चा झाली. 'एमएसआय'च्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. मुळात हा प्रकल्प १२० कोटींचा होता. निविदा काढल्यानंतर मात्र या प्रकल्पाची किंमत १७८ कोटी रुपयांवर पोचली. तीन कंपन्यांनी निविदा दाखल केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. केसीएन इंटरनॅशनल कंपनीने १७८ कोटींची निविदा भरली. ऑरियनप्रो सोल्युशन्स या कंपनीने १९८ कोटींची, तर एनईसी टेक इंडिया या कंपनीने ३२३ कोटींची निविदा भरली. तीन कंपन्यांच्या तुलनेत केसीएन इंटरनॅशनल या कंपनीची निविदा तुलनेने कमी दराची आहे, अशी माहिती डॉ. निपुण विनायक यांनी बैठकीत दिली. तेव्हा जादा दराविषयी संजयकुमार यांनी 'पीएमसी'च्या प्रतिनिधीकडे खुलासा मागितला. डॉ. निपुण विनायक यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. दर्जा आणि कामाची पद्धत यामुळे दर वाढल्याचे संजयकुमार यांच्या लक्षात आणून देण्यात आले. तेव्हा या निविदेबद्दल निर्णय घेण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. समितीने तीन दिवसांत निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले. समितीमध्ये डॉ. निपुण विनायक यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, 'पीएमसी' म्हणून काम करणाऱ्या 'सीएचटूएमएल' कंपनीचा प्रतिनिधी व 'एनआयसी'चा प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला, ही माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना दिली.

\Bसवलतीचा प्रस्ताव शासनाला पाठवा

\Bस्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत सिटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, महिलांना तिकिटांमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव 'एसपीव्ही'च्या बैठकीत मांडण्यात आला होता. सवलत दिल्यामुळे जे आर्थिक नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी शासनाने मदत करावी, असे मत महापौरांनी या बैठकीत मांडले. या बद्दलचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवा, त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन संजयकुमार यांनी 'एसपीव्ही'च्या संचालकांना दिले.

\B'एमएसआय'मधून होणारी कामे

\B- २ कंट्रोलरूम

- ८०० सीसीटीव्ही कॅमेरे

- ५७ स्मार्ट बस स्टॉप

- ११० - डिजिटल डिस्प्ले

- ७०० वायफाय झोन

- कचरा वाहनांवर जीपीएस

- पाणी टँकरवर जीपीएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांस विक्रेत्यांना मोबदला; प्रस्ताव चेंडू आयुक्तांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील कत्तलखाना परिसरात मांस विक्रेत्यांना देण्यात आलेल्या भूखंडांची तब्बल तीन कोटी ४९ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्तांकडे टोलवला. पालिकेच्याच भूखंडाला पालिकेनेच भरपाई द्यावी, हा प्रशासनाच्या या उफराट्या प्रस्तावाला नगरसेवकांनी विरोध दर्शवला.

पडेगाव येथे महापालिकेची ३६ एकर जागा आहे. यापैकी १८ एकर जागेवर कत्तलखाना उभारण्यात आला आहे. याच परिसरात मांसविक्रेत्यांना २००६ यावर्षी २०३ भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. १५८ विक्रेत्यांनी महापालिकेकडे भूखंडांचे पैसे भरले. सीडेतीन ते चार हजार रुपये प्रति भूखंड या दराने त्यावेळी विक्रेत्यांना भूखंड देण्यात आले. भूखंड देताना महापालिकेने विक्रेत्यांशी कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. एक वर्षापूर्वी शहरात कचराकोंडी निर्माण झाल्यावर महापालिकेने याच परिसरात कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. त्याला मांस विक्रेत्यांनी आक्षेप घेतला आणि न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला, असे असताना देखील या जागेचा वाद सुरुच आहे. त्यामुळे कचरा प्रक्रिया केंद्राचे काम रखडले आहे. त्या भूखंडांसाठी मांस विक्रेत्यांना तीन कोटी ४९ लाख १८ हजारांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. पालिकेच्याच मालकीच्या भूखंडासाठी एवढी मोठी नुकसान भरपाई कशासाठी द्यायची, असा सवाल नगरसेवक गजानन बारवाल यांनी विचारला. विक्रेत्यांना नुकसान भरपाई देणे किंवा जागा देणे असे दोनच पर्याय आहेत, असे उपायुक्त वसंत निकम यांनी स्पष्ट केले. तेव्हा या बद्दलचा योग्य तो निर्णय आयुक्तांनीच घ्यावा, असे सांगून सभापतींनी हे प्रकरण आयुक्तांकडे टोलवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन हजार पथदिवे बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील ६४ हजार पथदिव्यांपैकी तब्बल साडेतीन हजार दिवे बंद असल्याची कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत एलईडी दिव्यांवरून नगरसेवक अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. अधिकारी देखील जमेल तसे उत्तर देवून वेळ मारून नेतात. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी एलईडी दिव्यांचा मुद्दा मांडला. एलईडी दिवे लागतच नाहीत, लावले की आठ दिवसात बंद पडतात, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी देखील हाच विषय मांडला. त्यांच्या समर्थनगर वॉर्डातील बंद पडलेले एलईडी दिवे त्यांनी यावेळी लक्षात आणून दिले. ज्या ठिकाणी पन्नास वॅटचे दिवे लावायला पाहिजेत त्या ठिकाणी तीस वॅटचे दिवे लावले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे अंधुक प्रकाश पडतो. एलईडी दिवे लावण्याचा हेतू साध्य होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या बद्दल सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी संबंधित अधिकाऱ्याला खुलासा करण्यास सांगितले. प्रभारी कार्यकारी अभियंता शेख खमर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, शहरात ६४ हजार पथदिवे आहेत. त्यापैकी चाळीस हजार पथदिव्यांवर एलईडी लावण्यात येणार आहेत. चाळीस हजारांपैकी आतापर्यंत २३ हजार दिवे लावण्यात आले आहेत. त्यापैकी ८५० दिवे बंद आहेत. उर्वरित २४ हजार पथदिव्यांपैकी साडेतीन हजार पथदिवे बंद आहेत. या पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी झोन कार्यालय निहाय निविदा काढण्यात आली आहे. पाच मार्च ही निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर सात मार्च रोजी निविदा अंतिम होतील.

\Bकंत्राटदाराला नोटीस\B

२३ हजार एलईडी दिव्यांपैकी ८५० दिवे बंद आढळल्यामुळे एलईडीच्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे शेख खरम यांनी स्पष्ट केले. कंत्राटदारावर कारवाई काय करणार, असा प्रश्न सभापतींनी विचारला होता. तेव्हा खमर बोलत होते. एक वर्षानंतर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करता येईल, असे शहर अभियंता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही कारवाई देखील केले जाईल, असे खमर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी जागांमुळे शिक्षक भरतीवर बेरोजगार नाराज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाने शिक्षक भरतीची जाहिरात गुरुवारी प्रसारित केली असली तरी, कमी जागा असल्याने बेरोजगार विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी शब्द पाळला नसल्याचा आरोप डीटीएड, बीएडधारकांनी केला असून याबाबत ते शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कळते.

शिक्षक भरती प्रक्रिया आठ वर्षांपासून असून शासनाने गुरुवारी १० हजार १ जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येतील, असे स्पष्ट केले. भरतीची प्रक्रियेसाठी बेरोजगार अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. अखेर सरकारने किती जागा भरणार, प्रवर्गनिहाय किती जागा असतील याचा तपशील जाहीर केला. २४ हजार, २० हजार, १८ हजार जागा भरल्या जातील, असे आश्वासन सरकारकडून वारंवार दिले जात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी पवित्र पोर्टलद्वारे १८ हजार जागा भरल्या जातील, असे स्पष्ट केले होते, तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २४ हजार जांगाचे वक्तव्य केले होते. रोस्टर प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी सरकारकडून आलेला आकडा निम्म्याने कमी असल्याचे सांगत बेरोजगार विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतके दिवस आश्वासन देऊनही निम्म्या जागांवरच प्रक्रिया होणार असल्याने बेरोजगारांमध्ये रोष आहे, तर काहींनी स्वागत केले. बेरोजगारांची संख्या पाहता स्पर्धा तीव्र राहील, आठ वर्षे प्रतीक्षा करूनही एवढ्या कमी जागा भरणार, मग त्या घोषणांचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

\B१० हजार पदासाठी सव्वालाख रांगेत\B

पवित्र पोर्टलवर शिक्षक पात्र परीक्षा, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा पात्र विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यभरातून एक लाख २३ हजार ६३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे शिक्षण आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले. दहा हजार जागा भरण्यात येणार आहेत. दहा हजार जागांसाठी जवळपास सव्वालाख बेरोजगार रांगेत आहेत. एका जागेसाठी बारा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे.

पवित्र पोर्टलद्वारे आलेले अर्ज

१,२३,६३०

'टीईटी-१…………'

१९०८४

'टीईटी-२…'

१८९२६

शिक्षणमंत्री वारंवार २४ हजार जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा १८ हजार जागांवर भरती करू, अशी घोषणा केली होती. आता प्रत्यक्षात १० हजार १ जागा भरण्याची प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांत रोष आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या रोस्टर घोटाळ्यामुळे जागा कमी आल्या, त्यांनी केलेल्या चुकांचा फटका बेरोजगारांना बसला आहे. त्यामुळे शासनाने ज्या जिल्ह्यात ५० टक्के कपात केली, तेथे प्रतीक्षा यादी लावून चौकशी नंतर त्यांना नियुक्त्या द्याव्यात.

-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाकडून घेतली लाच; जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतर जिल्हा बदलीसाठी माजी सैनिकाकडून १५ हजार रुपयांची लाच मागणारा व प्रत्यक्षात १४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती विभागाचा वरिष्ठ सहाय्यक संजीव रामभाऊ इंगळे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

या प्रकरणी माजी सैनिक व धर्माबाद (जि. नांदेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिचर शालिग्राम त्र्यंबक शेवाळे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा १३ फेब्रुवारी २०१४ पासून परिचर म्हणून काम करतो. घरगुती कारणांमुळे औरंगाबाद जिल्ह्यात बदली करण्याची विनंती फिर्यादीने नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती व त्यांनी आंतर जिल्हा बदलीची संमती दिली होती. मात्र तरीसुद्धा बदली आदेश न मिळाल्याने त्याबाबत चौकशी करण्यासाठी फिर्यादी हा औरंगाबाद येथील आस्थापना विभागात आला होता. तिथे आरोपी व पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक संजीव रामभाऊ इंगळे (३५, रा. हर्सूल सावंगी) याने तातडीने बदली आदेश मिळवून देण्यासाठी फिर्यादीकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली. मी माजी सैनिक असून पैसे देऊ शकत नाही, असे फिर्यादीने आरोपीला सांगितले; परंतु पैसे न दिल्यास किती वेळ लागेल, हे सांगू शकत नाही, असे आरोपीने सांगून टाकले. नंतर तडजोडीअंती १४,५०० रुपये देण्याचे ठरले. प्रकरणात लाचलुचपत विभागाने सापळा रचून २७ फेब्रुवारी २०१९ रोजी आरोपीला १४,५०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली होती.

आरोपी करू शकतो हस्तक्षेप

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, प्रकरणात तपास करणे बाकी असून, आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो हस्तक्षेप करू शकतो, पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायके, पाटलांचा हर्सूल जेलमधील मुक्काम वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव गायके आणि नानासाहेब माणिक पाटील या आरोपींच्या नियमित जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या कोर्टामध्ये मंगळवारी (५ मार्च) एकत्रित सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींचा हर्सूल कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

सुरेश पाटील यांनी २५ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आरोपी सदाशिव गायके व नानासाहेब पाटील यांना अटक करुन मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांच्या कोर्टात हजर केले असता, त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे दोघांना गुरुवारी कोर्टात हजर केले असता, दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सदाशिव गायके व नानासाहेब पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या कोर्टात नियमित जामीन अर्ज सादर केला असता, कोर्टाने पोलिसांचे म्हणणे मागवले. पोलिसांचे म्हणणे ऐकून कोर्टाने दोन्ही आरोपींच्या नियमित जामिनावर मंगळवारी (५ मार्च) एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आरोपी नानासाहेब पाटील याने यापूर्वी मुख्य न्यायदंडाधिकारी काकडे यांच्या कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या संदर्भात, जिल्हा कोर्टात जामीन अर्ज सादर करण्याची विनंती करणारा अर्ज पाटील याच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात सादर करण्यात आला. त्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने संमती दिल्यानंतर पाटील याच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायाधीश महाजन यांच्या कोर्टात नियमित जामीन अर्ज सादर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रश्न सोडवून दाखवू

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

'शहरातील पाणी समस्या, कचरा, रहदारी अशा अनेक प्रश्नांनी बिकट स्वरूप धारण केलेले असले आणि ते निवारण करण्याचे उद्दिष्ट कठीण असले, तरी या सर्व विषयांशी संबंधित आम्ही सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करून हे प्रश्न सोडवून दाखवू,' अशी हमी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली.

शहरातील विविध नागरी समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयात वेळोवेळी दाखल झालेल्या ३७ जनहित याचिकांवर शुक्रवारी न्या. संभाजी शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्यासमोर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. गेल्या वेळच्या सुनावणीवेळी खंडपीठाने कचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे सूचविले होते. हे सर्वजण शुक्रवारी खंडपीठात हजर राहिले. खंडपीठाने सुरुवातीलाच स्पष्ट केले, की या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नोटीस काढून बोलावले नसून, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, सोसावा लागणार त्रास यावर उपाययोजना करण्याकरिता पाचारण केले आहे. मराठवाड्यासाठी शासनाचे सर्वोच्च अधिकारी आणि घनकचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या नात्याने विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी स्वतः आपले म्हणणे मांडले.

केंद्रेकर यांनी सांगितले, ११ फेब्रुवारी रोजी आपण पदभार स्वीकारल्यानंतर कचरा समस्येवर विचारविनिमय करण्यासाठी तीन वेळा अधिकारी-पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, तसेच कचरा टाकला जातो त्या जागांची पाहणी केली. शहरात दररोज ४५० टन कचरा निर्माण होतो, असे सांगितले होते. प्रत्यक्षात हा आकडा शास्त्रीय पद्धतीने काढलेला नसल्याने त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. येत्या चार महिन्यांत चिकलठाणा आणि पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येतील, असे केंद्रेकर यांनी सांगितले.

कचरा संकलनाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे, परंतु विलगीकरणाचा फारसे समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी कचरा एकत्रितच टाकला जातो. त्यामुळे कचरा संकलन करणारे कर्मचारी आणि कारवाई पथकातील जवानांची बैठक आपण रविवारी (३ मार्च) घेणार आहोत. हा प्रश्न सोडविण्यासाठी कठोर भूमिका आवश्यक आहे. एकत्रित कचरा न स्वीकारणे आणि सार्वजनिक जागांवर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावीच लागेल. कचरा विलगीकरणासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व अधिकारी, स्वतः प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले. कचऱ्याची समस्या ही ५० टक्के प्लास्टिक कचऱ्यामुळे निर्माण होते, असे निरीक्षण नोंदवत त्यांनी राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही त्याचा वापर सर्रास सुरू असल्याचे दिसून येते. अशा लोकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.

कचरा प्रश्न सोडविण्यात कचरा वेचकाची भूमिका महत्त्वाची आहे, एकत्रित कचऱ्यातून त्यांना दिवसाला ३०० रुपये मिळतात. तर वेगळा केलेला कचरा मिळाल्यास एक हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात, असे त्यांनी सांगितले. हर्सूल येथे कचरा साठविल्यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्याचे म्हणणे त्यांनी खोडून काढले. या संदर्भातील पाहणी शास्त्रीय पद्धतीने झाली नसल्याचे ते म्हणाले. पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्र उभारावयाच्या ठिकाणी काही घरे आहेत, ती जागा ताब्यात घेण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. कचरा प्रक्रिया केंद्राभोवती घनदाट झाडी असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कचरा निर्मूलनाकरिता शासनाने मंजूर केलेल्या ९० कोटी रुपयांपैकी २६ कोटी रुपये प्राप्त झाले असून, ते १५ मार्चपर्यंत खर्च होऊ शकतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावर खंडपीठाने सांगितले, की सर्वसामान्य नागरिक आणि न्यायालयालाही आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. सर्वसामान्यांचे मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी काम करताना तुम्हाला कोणताही अडथळा येत असेल, तर तो तुम्ही न्यायालयासमोर निःसंकोच मांडावा.

महापालिकेशी संबंधित पार्किंग आणि पिण्याचे पाणी या प्रश्नांवरील याचिकांवर २० मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. मूळ याचिकाकर्ता राहुल कुलकर्णी यांच्यातर्फे देवदत्त पालोदकर, हर्सूलच्या नागरिकांतर्फे प्रज्ञा तळेकर, तिसगावच्या नागरिकांतर्फे चंद्रकांत थोरात, राज्य शासनातर्फे अमरजितसिह गिरासे, केंद्र शासनातर्फे संजीव देशपांडे, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उत्तम बोदर, तर महापालिकेतर्फे राजेंद्र देशमुख, जयंत शहा, विजय लटांगे, अमित वैद्य, नहर-ए-अंबरी तर्फे प्रदीप देशमुख आणि सलीम अली सरोवरप्रश्नी महेश भारस्वाडकर यांनी काम पहिले.

\Bजायकवाडी ते फारोळा जलवाहिनीची मागितली परवानगी \B

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले, की पाणी प्रश्नासंदर्भात आम्ही तज्ज्ञांची नेमणूक केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यात चार एमएलडी वाढ झाली आहे. समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी ३०० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आम्ही कायदेतज्ज्ञांचे मत घेतले असून, समांतर पाणीपुरवठा योजना आता पूर्वीच्या कंपनीबरोबर राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे जायकवाडी ते फारोळा जलवाहिनी टाकण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

\B दर १५ दिवसांनी अहवाल \B

महापालिकेतील अनेक रिक्त पदे का भरली जात नाहीत, अशी विचारणा राज्य शासनाकडे करण्यात आली. शहरातील बेशिस्त वाहतुकीबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. विभागीय आयुक्तांनी आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांशी या संदर्भात चर्चा करून योग्य ती उपाययोजना करावी, असे खंडपीठाने सुचविले. शुक्रवारी सुनावणी झालेल्या विषयांवर दर १५ दिवसांनी कामाबाबत प्रगती अहवाल खंडपीठात सादर करण्याचे तोंडी निर्देश या वेळी देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कल्याणनिधीत बारा हजार रुपये भरा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

खुलताबाद पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तडजोड झाली असल्याने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल फौजदारी अर्जावर, न्या. संभाजी शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी चार आरोपींना प्रत्येकी तीन हजार असा एकूण १२ हजार रुपये पोलिस कल्याण निधीमध्ये जमा करावेत असा आदेश दिला. पोलिस आणि न्यायपालिकेचा बहुमूल्य वेळ खर्ची घातल्यामुळे त्यांनी आरोपींना हा आदेश दिला. तसेच त्यांचा गुन्हा रद्द करण्यासाठीचा अर्ज मंजूर केला.

खर्डी येथील मुरलीधर पुंजाजी मातकर (७०) यांना आरोपींनी शेताच्या वादातून मारहाण केली होती. त्यांनी या प्रकरणात खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रामनाथ कोडींबा मातकर यांच्यासह इतर तिघांनी सदर गुन्हा रद्द करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. आरोपी व फिर्यादी यांनी आपसात तडजोड केली आहे, त्यामुळे गुन्हा रद्द करावा, अशी विनंती आरोपींनी केली.

सुनावणीअंती खंडपीठाने आरोपींची गुन्हा रद्द करण्याची विनंती मान्य केली. मात्र, तपास यंत्रणा आणि न्यायपालिकेचा वेळ खर्ची घातल्याप्रकरणात चौघांना प्रत्येकी तीन हजार याप्रमाणे एकूण १२ हजार रुपये पोलिस कल्याण निधीसाठी दोन आठवड्यात ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप यशवंत महाजन यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुरा यात्रेतीला कचरा कंत्राटदाराला भोवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा यात्रेमध्ये वृक्षतोडीसह कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता चक्क कचरा जाळल्याप्रकरणात कंत्राटदाराला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावून उर्वरित अनामत रक्कम परत करण्याचे आदेश छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी शुक्रवारी (एक मार्च) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत दिले.

सर्वसाधारण सभेला छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर पात्रा यांच्यासह उपाध्यक्ष पद्मश्री जैस्वाल, छावणीचे सदस्य किशोर कच्छवाह, संजय गारोल, प्रशांत तारगे, मिर्झा रफत बेग, शेख हनिफ, कर्नल दिपककुमार शर्मा, अतिरिक्त जिल्हा अधिकारी भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, कार्यालयीन अधीक्षक वैशाली केणेकर आदींची उपस्थिती होती. सभेत दंडाचा निर्णय महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी छावणी हद्दीतील वाहतूक कराच्या वसुलीचे कंत्राट पुढील महिन्यात संपत असल्यामुळे नव्याने कंâत्राट देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव सभेत ठेवण्यात आला. वाहतुकीचा कर वसूल करणारा कंत्राटदारा हा वारंवार सवलत मागत आहे. परिणामी, छावणी परिषदेला मोठा आर्थिक फटका बसतो. हा आर्थिक फटका दूर करण्यासाठी छावणी परिषदेने छावणीच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण करून एक ठराविक रक्कम घोषित करून नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत इतर विकास कामांच्या प्रस्तावावर चर्चा करून महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सभेत प्रारंभी अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांना ब्रिगेडिअर पात्रा यांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडेच दोन कोटींची थकबाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेच दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असल्याचे लेखा परीक्षणात स्पष्ट झाले आहे. विविध कामांसाठी घेतलेल्या अग्रीम रक्कमेचे समायोजन न झाल्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे एक कोटी ८३ लाख १७ हजार ८३७ रुपये बाकी आहेत. याशिवाय ४९ कर्मचाऱ्यांना ११ लाख ७२ हजार ४५७ रुपये जास्तीची रक्कम दिल्याचा ठपका लेखा परीक्षणात ठेवण्यात आला आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. नागरिकांनी स्वत: कर भरावा यासाठी दंड, व्याजात सूट देवून विशेष वसुली मोहीम दोन वेळा राबवण्यात आली. मार्च महिन्यात पुन्हा मोहीम राबवण्याचे ठरत आहे. यंदा मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ४५० कोटी रुपये असून आतापर्यंत केवळ ८५ कोटी वसूल झाले आहेत. पाणीपट्टीचे उद्दिष्ट शंभर कोटी रुपये असून आतापर्यत २५ कोटी वसूल झाल्याचे सांगितले जाते. वसुलीच्या तुलनेत थकबाकी जास्त असल्याने मार्चमध्ये वसुलीवर भर देण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. या परिस्थितीत पालिकेच्याच अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे अग्रीम रक्कमेपोटी घेतलेल्या रक्कमेचे समायोजन न झाल्याने दोन कोटींच्या घरात थकबाकी असल्याचे लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे.

पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांचे लेखा परीक्षण करून हा अहवाल स्थायी समितीला सादर केला. २०१६-१७ मध्ये १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक कोटी १५ लाख ८६ हजार ३६२ रुपयांच्या अग्रीम रकमेचे समायोजन झालेले नाही. ही रक्कम त्या त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावे दिसून येते. २०१७-१८ या वर्षात ७२ अधिकारी कर्मचाऱ्यांनी ६६ लाख ८६ हजार ४७५ रुपयांची अग्रीम रक्कम घेतली, पण त्याचे समायोजन केलेले नाही.

\Bयांनी घेतली अग्रीम रक्कम \B

-विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सुमारे सव्वा लाख रुपयांची अग्रीम रक्कम घेतली, त्याचे समायोजन झालेले नाही.

-२०१६-१७ या वर्षात नालासफाईकरिता विविध अभियंत्यांनी सुमारे ४० लाख रुपयांची अग्रीम रक्कम घेतली.

-बांबू खरेदीसाठी वॉर्ड अभियंता इक्लास सिद्दिकी यांनी दोन वर्षात एक लाख ४० हजार रुपये अग्रीम घेतले.

-पालिका वर्धापनदिनानिमित्त जनसंपर्क अधिकारी अहेमद तौसीफ यांनी दोन लाख २५ हजार रुपये अग्रीम घेतले.

-क्रीडाधिकारी संजीव बालय्या यांनी शालेय क्रीडा स्पर्धेसाठी दोन लाख रुपये अग्रीम घेतले.

-जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी विविध मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुमारे अडीच लाख रुपये अग्रीम रक्कम घेतली. यात दीपक कुदळे, संजीव सोनार, संगीता ताजवे, शैलजा शेळके, संतोष तपकिरे, देवेंद्र सोळुंके, रेखा वारे, रिझवाना बेगम आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास कामांचे आज भूमिपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन शनिवारी (दोन मार्च) करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणे व चौकाचे सुशोभिकरण करणे या कामाचा शुभारंभ सकाळी नऊ वाजता महर्षि दयानंद चौकात होणार आहे. संत एकनाथ रंगमंदिरात वातानुकूलित यंत्रणा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ दहा वाजता केला जाणार आहे. शहरातील विविध ठिकाणचे दुभाजक व चौक सौंदर्यीकरणासाठी दत्तक देण्याचा शुभारंभ ११ वाजता सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ होणार आहे. १५ सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाचा शुभारंभ दुपारी सव्वाबारा वाजता टीव्ही सेंटर चौकात केला जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पालिकेचे सर्व पदाधिकारी, शहराशी संबंधित असलेले आमदार व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राकाज्’साठी हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वादग्रस्त कारणांमुळे बंद करण्यात आलेले राकाज् क्लब पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहे. त्यासाठी महापालिकेत हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. महापौरांनी 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी) तत्वावरील प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

ज्योतीनगरातील राकाज् क्लब महापालिकेने 'बीओटी'तत्वावर चालवण्यासाठी दिले होता. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी वादग्रस्त कारणांमुळे क्लब बंद केले. त्यामुळे सुमारे तीन वर्षांपासून हा क्लब बंदच आहे. मध्यंतरीच्या काळात क्लब सुरू करण्याच्या दृष्टीने महापौरांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या आयोजनासाठी सभागृहनेते विकास जैन यांनी पुढाकार घेतला होता. तडजोड करून क्लब सुरू करता येतो का, याबद्दल यावेळी चाचपणी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी 'बीओटी' प्रकल्पांच्या आढाव्यासाठी बैठक झाली. राकाज् क्लब सुरू करण्याबद्दलचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडा, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिकेने शहरातील महत्त्वाचे भूखंड 'बीओटी' तत्वावर विकसित करण्यासाठी विकासकांना दिले आहेत, पण १३ वर्षांनंतरही या प्रकल्पांचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत चार महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

\B'बीओटी'वरील रखडलेले प्रकल्प\B

- सिद्धार्थ उद्यानातील ३१ हजार चौरस मीटरपैकी सात हजार चौरस मीटर जागा बीओटी प्रकल्पासाठी २००६मध्ये देण्यात आली. या ठिकाणी वाहनतळाचे काम पूर्ण झाले, पण मनोरंजन केंद्राचे काम बाकी आहे. वाहनतळाचे पैसे संबंधित कंत्राटदाराने महापालिकेकडे भरलेले नाहीत. त्यामुळे सुमारे ३५ लाख रुपये कंत्राटदाराकडे थकित आहेत.

- वेदांतनगर येथे चार हजार ६१ चौरस मीटर जागा एसबीएस असोसिएट या संस्थेला विकासासाठी देण्यात आली होती. २०१६मध्ये पोण्याच्या तलावासह अन्य सुविधा उभारण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते, पण या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.

- सिडको टाउन सेंटर परिसरात देखील याच संस्थेला स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जागा देण्यात आली होती. २०१६पर्यंत काम पूर्ण होणे गरजेचे होते. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे.

- शहागंज भाजी मंडईतील बीओटी प्रकल्पाचे काम न्यायप्रविष्ट झाले आहे.

- वसंतभवन येथील पाटील कस्ट्रक्शनला दिलेले काम थांबलेले आहे.

- औरंगपुरा येथील भाजी मंडईचे काम देखील न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images