Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आरोग्य उपसंचालकांवर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, कुटुंब कल्याण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी आणि प्रशासकीय अधिकारी आर. एम. मोहिते यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात अॅट्रासिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मागासवर्गीय असल्याने सरकारी नोकरी करता येऊ नये, या दृष्टीने मानसिक आणि आर्थिक त्रास देणे, अश्लील शब्द बोलून अपमान करणे आदी आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या तक्रारीनुसार तिन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस ठाण्यासमोर चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील मैदानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत रोख साडेअठरा हजार रुपयांसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिन्सी पोलिस ठाण्यासमोर मोकळे गिरणी मैदान आहे. या मैदानावरच गेल्या काही दिवसापासून पत्त्यांचा जुगार सुरू होता. गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणारे आरोपी शेख फिरोज शेख युनूस, शेख महेबुब शेख इमाम, सलमानखान मोहम्मदखान इम्रानखान बिस्मीलाखान, अक्रमखान हिदायतखान आणि जावेद खान मोहम्मद खान यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून रोख साडेअठरा हजार, सहा मोबाइल हँडसेट आणि दुचाकी असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, पीएसआय विजय जाधव, शेख अफरोज, जमादार सुभाष शेवाळे, समद पठाण, सुरेश काळवणे, राजू सोळूंके, प्रमोद चव्हाण, भाऊसिंग चव्हाण आणि संदीप बिडकर आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवासी महिलेच्या ओळखीचा फायदा घेत ट्रॅव्हल्स मालकाने लग्नाचे आमीष दाखवित बलात्कार केला. ऑक्टोबर २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत हा प्रकार विविध ठिकाणी घडला. पीडित महिलेची तक्रार जिन्सी पोलिसांनी घेतली नसल्याने या महिलेने अखेर कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशाने या प्रकरणी गुरुवारी जिन्सी पोलिस ठाण्यात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

३८ वर्षाची पीडित महिला टाईम्स कॉलनी भागातील रहिवासी असून सूरत येथून कपडे आणून शहरात विक्रीचा व्यवसाय करते. पीडित महिला पतीपासून विभक्त राहत असून तिचा मुलगा बडोदा येथे नोकरीला आहे. सूरत येथे व्यवसायाच्या कामासाठी ही महिला नियमित अदालत रोडवरील सागर ट्रॅव्हल्सच्या बसने जात होती. यामुळे ट्रॅव्हल्सचा मालक मोहम्मद इकरामखान अब्दुल समदखान याच्याशी तिचा परिचय झाला. ही महिला इकरामखानसोबत कारने बडोद्याला गेली होती. यावेळी रस्त्यात एका हॉटेलमध्ये मुक्काम करीत तिच्या जेवणामध्ये गुंगीचे औषध देत इकरामखानने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे. यानंतर लग्नाचे आमीष दाखवून विविध ठिकाणी या महिलेवर अत्याचार करण्यात आला. यानंतर महिलेने लग्नाबाबत विचारले असता त्याने याबाबत टाळाटाळ केली तसेच महिलेला व तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेने जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता तत्कालीन पोलिस निरीक्षकाने तिचा गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे देखील महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने जिन्सी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी मोहम्मद इकरामखान विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय साईनाथ गिते या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराची विनाकारण बदनामी नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत आपण येण्याच्या अगोदर अनेक अधिकारी आले आणि चांगले काम करून गेले. त्यामुळे या महापालिकेत कुणीच येऊ इच्छित नाही, असे म्हणून शहराची विनाकारण बदनामी करू नका, असा इशारा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिला आहे.

डॉ. निपुण विनायक यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेत राजू वैद्य यांनी त्यांना १३ कलमी पत्र दिले होते. डॉ. विनायक यांना अकार्यक्षम ठरवण्याचा प्रयत्न या पत्रातून झाला होता. डॉ. विनायक यांनी या पत्राला गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सविस्तर उत्तर दिले. वैद्य यांनी घेतलेले आक्षेप खोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी वैद्य सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे वैद्य यांनी शुक्रवारी आयुक्तांना पुन्हा एक पत्र दिले आहे. या पत्राकडे आरोप म्हणून न पाहता सूचना म्हणून पहा आणि सकारात्मक कार्यवाही करा, अशी अपेक्षा वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

वैद्य यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरातील समस्यांबाबत आपले लक्ष वेधणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. जनतेने खूप विश्वासाने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, पण आम्हाला कर्तव्यात कसूर करता येणार नाही.

आयुक्तांच्या पाठीशी आपण उभे राहिलो, असे पत्रात नमूद करताना वैद्य यांनी म्हटले आहे की, कचराकोंडी सोडवण्यासाठी सकाळी सहापासून जनतेत जाऊन त्यांची समजूत काढणे असेल, स्थायी समितीमध्ये आपण दिलेले प्रस्ताव असतील, त्यामध्ये सदस्यांनी कंपनी ब्लॅकलिस्ट आहे असा मुद्दा लावून धरल्यावर देखील आपल्या मदतीने त्यांची समजूत घालून त्याला मंजुरी देणे असेल, विनानिविदा तीन संस्थांना जनजागरण करण्याचे काम देणे असेल, रत्नाकर वाघमारे हे नांदेड येथील लिपिक ते उपायुक्त असा वादग्रस्त प्रवास करणारे अधिकारी आहेत. त्यांना तज्ज्ञ म्हणून नेमणूक देणे असेल अशा कितीतरी बाबतीत आम्ही नेहमीच तुमच्या योजनांना पाठिंबा दिला आहे. कचऱ्यावरील प्रक्रिया करण्याबद्दलचा 'डीपीआर' इंदूर येथील संस्थेने तयार केला आहे. त्यातच मशीन खरेदीचा मुद्दा आहे. त्यामुळे मशीन खरेदी करून लवकर कचरा मुक्ती व्हावी यासाठी पदाधिकारी पाठपुरावा करीत होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना चुकीचे ठरवणे योग्य नाही. सिटी बस सुरू केल्याबद्दल अभिनंदन, पण बसचे काम टाटा कंपनीलाच मिळावे यासाठी निविदा प्रक्रियेत काही अटी टाकल्याबद्दल आक्षेप घेतले गेले. त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही तुमच्या सोबत राहिलो, असे वैद्य यांनी पत्रात नमूद केले आहे. महापालिकेत २५ वर्षांनंतर भरती केली, पण त्यात योग्य प्रकारे आसन व्यवस्था नव्हती, याबद्दल सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर ते आयुक्तांना सांगा, असे म्हणणे चुकीचे आहे का, असा सवाल देखील वैद्य यांनी उपस्थित केला आहे.

\Bवर्षभरापासून प्रश्न 'जैसे थे'\B

शहरातील समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी आम्ही प्रशासनाच्या बरोबरीने काम केले. वर्ष झाले तरी प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. अनेक नगरसेवक त्यांच्या भागातील समस्या वारंवार मांडतात. वर्षानुवर्षे त्या सुटत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, हे आपल्या निदर्शनास आणले त्यात गैर काय आहे? नागिरकांच्या समस्या सोडवण्यासाठी घटनेने दिलेल्या अधिकाराचा लोकप्रतिनिधी म्हणून वापर करीत राहणे याच चुकीचे काही नाही. आपणही हे समजून घ्यावे. शहराचा खेळखंडोबा होताना उघड्या डोळ्याने हे पाहणे शक्य नाही म्हणून हा पत्रप्रपंच, असे वैद्य यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीवर वारंवार बलात्कार; तरुणाचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आपल्याच नात्यातील २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत आणखी बदनामी करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपी नितीन नारायण वाव्हुळे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला.

या प्रकरणी शहरातील पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी तरुणी मुंबईला परीक्षा देण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचा नातेवाईक असलेला आरोपी नितीन नारायण वाव्हुळे (३०, रा. मुंबई) याने तिला परीक्षा केंद्रावर नेले. त्यानंतर तरुणीसोबत जवळीक करुन फोटो काढल्यानंतर त्याने तिच्या मोबाईलवर वारंवार संपर्कâ केला. त्यानंतर शहरात येऊन फिर्यादी घरात एकटी असल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने सोशल मीडियावर तिचा अर्धनग्न फोटा अपलोड केला. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादीला धक्काच बसला. त्यानंतर आरोपीकडे असलेले इतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याच्या फिर्यादीच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात आरोपीला अटक करुन त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

\Bजिवाला होऊ शकतो धोका

\Bया प्रकरणी कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, आरोपी बाहेर आल्यास फिर्यादी तरुणीच्या जिवाला धोका निर्माण करू शकतो आणि त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्णपुरा यात्रेतील कचरा कंत्राटदाराला भोवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कर्णपुरा यात्रेमध्ये वृक्षतोडीसह कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता चक्क कचरा जाळल्याप्रकरणात कंत्राटदाराला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावून उर्वरित अनामत रक्कम परत करण्याचे आदेश छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी शुक्रवारी (एक मार्च) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत दिले.

सर्वसाधारण सभेला छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर पात्रा यांच्यासह उपाध्यक्ष पद्मश्री जैस्वाल, छावणीचे सदस्य किशोर कच्छवाह, संजय गारोल, प्रशांत तारगे, मिर्झा रफत बेग, शेख हनिफ, कर्नल दिपककुमार शर्मा, अतिरिक्त जिल्हा अधिकारी भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, कार्यालयीन अधीक्षक वैशाली केणेकर आदींची उपस्थिती होती. सभेत दंडाचा निर्णय महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी छावणी हद्दीतील वाहतूक कराच्या वसुलीचे कंत्राट पुढील महिन्यात संपत असल्यामुळे नव्याने कंâत्राट देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव सभेत ठेवण्यात आला. वाहतुकीचा कर वसूल करणारा कंत्राटदारा हा वारंवार सवलत मागत आहे. परिणामी, छावणी परिषदेला मोठा आर्थिक फटका बसतो. हा आर्थिक फटका दूर करण्यासाठी छावणी परिषदेने छावणीच्या हद्दीतून जाणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण करून एक ठराविक रक्कम घोषित करून नव्याने निविदा प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत इतर विकास कामांच्या प्रस्तावावर चर्चा करून महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सभेत प्रारंभी अतिरिक्त जिल्हाधिकारी पालवे यांना ब्रिगेडिअर पात्रा यांनी सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किडनीथॉन’मध्ये धावणार हजारावर औरंगाबादकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किडनी प्रत्यारोपणानंतर प्रत्यारोपित रुग्ण तसेच किडनीदान करणारे दाते हे अधिकाधिक सक्रिय राहू शकतात, हे समाजासमोर यावे आणि अवयवदान चळवळ अधिकाधिक वृद्धींगत व्हावी, या हेतुने गेल्या तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेला 'किडनीथॉन' हा उपक्रम रविवारी (३ मार्च) शहरात होणार आहे. सिग्मा हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, नेफ्रॉन किडनी केअर व नेफ्रॉन एक्सचेंज ट्रान्स्प्लान्ट प्रोग्रामच्या वतीने हा उपक्रम होणार आहे.

जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून मूत्रपिंड (किडनी) निरोगी ठेवण्यासाठी सुद‍ृढ जीवनशैलीचे महत्त्व, विविध अवयवांच्या प्रत्यारोपणाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारी पहाटे साडे पाचपासून दोन, पाच व दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात धावण्यासाठी आतापर्यंत १५४३ व्यक्तींनी नोंदणी केली असून, यात २१० प्रत्यारोपित रुग्ण व दात्यांचाही समावेश आहे. या उपक्रमात दोन्ही फुफ्फुसे व हृदयाचे ज्यांच्यावर एकाचवेळी यशस्वी प्रत्यारोपण झाले त्या सातारा येथील कोमल गोडसे, तसेच यकृत प्रत्यारोपण झालेले उद्योजक गौतम नंदावत व हिंदू-ख्रिश्चन कुटुंबामध्ये 'स्वॅप ट्रान्स्प्लान्ट' यशस्वी झालेले कुटुंबीय हे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उपक्रमात सहभागी होणार आहेत, असे 'युनायटेड सिग्मा'च्या संचालक डॉ. मनिषा टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सचिन सोनी व डॉ. श्रीगणेश बर्नेला यांनी शुक्रवारी (एक मार्च) पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्यांसाठी निवारागृहाची प्राणीमित्रांची सूचना

$
0
0

औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे कुत्र्यासाठी शहराच्या बाहेर निवारागृह उभारा, अशी सूचना प्राणीमित्रांनी शुक्रवारी महापालिकेला केली आहे. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून काही प्राणीमित्रांनी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भटकी कुत्री उपाशीपोटी फिरत असतात त्यामुळे ते आक्रमक होतात. त्यांना पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होत नाही. बहुसंख्य नागरिक विदेशी कुत्रे पाळतात. विदेशी कुत्र्यांच्या तुलनेत स्वदेशी कुत्रे काटक असतात, पण या कुत्र्यांकडे दुर्लक्ष केले जाते. विदेशी कुत्र्यांचा जन्मदर जास्त आहे, पण त्यांची विक्री केली जाते. कुत्र्यांबद्दल सद्भावना निर्माण करण्यासाठी महापालिकेने जनजागृती करावी. निवेदनावर प्रकाश कुलकर्णी, धनंजय साखरे, सागर शेलार, डॉ. कादरी, सुनीता गिरी यांच्यासह अन्य प्राणी मित्रांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एलईडी’च्या तक्रारी असूनही कंत्राटदाराला १६ कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वारंवार बंद पाडणारे 'एलईडी' दिवे बसविणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने सहा महिन्यांत १६ कोटी ३२ लाख रुपये दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कंत्राटदाराला दर महिन्याला पेमेंट होत असताना 'एलईडी'च्या दिव्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. बंद पडणारे दिवे, कमी व्होल्टेजचे दिवे यामुळे सामान्य नागरिकांसह नगरसेवक व पदाधिकारी देखील त्रस्त झाले आहेत.

'एलईडी' दिव्यांबद्दल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. खांबावर 'एलईडी'चा दिवा लावल्यावर आठ - पंधरा दिवसांत तो बंद पडतो, अशा तक्रारी आहेत. त्याशिवाय दिव्यांचा प्रकाश पुरेसा पडत नाही, अशाही तक्रारी आहेत. मोठ्या 'डीपी' रस्त्यावर कमी वॅटचे दिवे बसवण्यात आल्याचा आरोप देखील केला जातो. या आरोपांना प्रशासनाकडून ठोस उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे 'एलईडी'बद्दल संशय वाढू लागला आहे.

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 'एलईडी' दिव्यांचा लेखाजोखा प्रभारी कार्यकारी अभियंता शेख खमर यांनी मांडला. ते म्हणाले, 'एलईडीच्या माध्यमातून ४० हजार पथदिवे सुरू केले जाणार आहेत. त्यापैकी २३ हजार दिवे लावण्यात आले आहेत. लावण्यात आलेल्या दिव्यांपैकी ८५० दिवे बंद आहेत. ते सुरू करण्याबद्दल कंत्राटदाराला कळवले आहे. कंत्राटदाराशी महापालिकेने केलेल्या करारानुसार महापालिकेने दर महिन्याला दोन कोटी ७२ लाख रुपये कंत्राटदाराला द्यायचे आहेत. ऑगस्ट ते जानेवारी यादरम्यान तब्बल १६ कोटी ३२ लाख रुपयांचे पेमेंट कंत्राटदाराला देण्यात आले आहे. वाढत्या तक्रारींमुळे फेब्रुवारी महिन्याचे पेमेंट मात्र करण्यात आले नाही. कंत्राटदारावर कारवाई करण्याची करारात तरतूद नाही. कंत्राटदाराला केवळ दंड करता येतो. दंड करण्याबद्दल कार्यवाही केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निवडणुकीतून माघार नाहीः खोतकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

लोकसभेच्या निवडणुकीतून आपण माघार घेतली, असं कुठेही आपण सांगितलं नाही. माझी भूमिका मी दोन दिवसात सांगणार आहे. आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्याशी या सगळ्या विषयावर बोलत आहेत. उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जालन्यात थांबायला सांगितले आहे. मला माहित नाही काय आहे त्यांच्या मनात. मुख्यमंत्री उद्या एखादे शिष्टमंडळ माझ्याकडे पाठवण्याची शक्यता आहे. मला ते जाणवते. मुख्यमंत्री आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. त्यांचा आदेश मानणारा मी आहे, असं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले.

अर्जुनराव खोतकर मॅनेज झाले आहेत, अशी चर्चा जालन्यात सुरू आहे. या संदर्भात खोतकर यांना प्रश्न विचारण्यात आला. या सगळ्या चर्चेला काय अर्थ आहे. चर्चा काहीही होतात. खासदार रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना आपल्याला पाडायला सगळे चोट्टे एकत्र आले आहेत, असे म्हटले आहे. तर मोठ्या मानसाने असे बोलायला नको आहे, या संदर्भात त्यांना काय चिमटे घ्यायचे त्यांचे कान, हात धरायचे ते धरू आम्ही, असे उत्तर खोतकर यांनी दिले.

जालन्यातील रोग निदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शनिवारी दानवे आणि खोतकर एकत्र आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते एकाच वाहनातून खासदार दानवे यांचे बंधू भास्करराव पाटील दानवे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे बंद खोलीत त्यांची चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एककडे लघुशंकेसाठी गेलेल्या एकाला मारहाण करून पैसे हिसकावून घेणाऱ्या दोघा आरोपींना एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी दिले. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिना वीस दिवसांतच न्यायालयाने प्रकरण निकाल काढले. रमेश अण्णा फुलपगारे (२३, आंबेडकरनगर) व मनोज मुक्ता तेलारे (२२, रा. हमालवाडा, रेल्वेस्थानकाजवळ) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात विजयसिंग रामआसरे सिंग यांनी तक्रार दिली होती. ८ जानेवारी २०१९ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास विजयसिंग यांना मुंबईला व त्यांचा मित्र गणेश सारंगधर बोरगे याला वैजापूर येथे जायचे असल्याने ते दोघे रेल्वे स्थानकाकडे गेले होते. विजयसिंग यांना लघुशंका आल्याने त्यांनी एका व्यक्तीला विचारपूस केली असता त्या व्यक्तीने प्लॅटफार्म क्रमांक एककडे जाण्यास सांगितले. त्यानुसार विजयसिंग गेले असता, त्यांच्यामागे ती व्यक्ती देखील आली. लघुशंका झाल्यानंतर त्या व्यक्तीसह त्याच्या साथीदाराने विजयसिंग यांचे हात पकडून खिशातील ८७० रुपये बळजबरी हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. विजयसिंग यांनी आरडा-ओरड केल्याने दोघा आरोपींनी तेथून धूम ठोकली. तर आरडा-ओरड ऐकु आल्यानंतर लोहमार्ग पोलिस शिपाई सुनील नलावडे व रविकांत बनगर यांनी विजयसिंग यांच्याकडे धाव घेतली. पोलिसांनी विचारपूस केली असता दोन्ही आरोपी प्लॅटफार्म क्रमांक एकवर बसलेले असल्याचे लोकांनी सांगितले. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले नाव रमेश फुलपगारे व मनोज तेलारे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात बळजबरी हिसकावून घेतलेले ८७० रुपये सापडले. औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून कलम ३९४ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्याकैदेची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैनिक भरती फसवणूक; दोन मुख्याध्यापकांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैनिक भरतीतील मैदानी चाचणी व लेखी परीक्षा उर्तीण झालेल्या १६ उमेदवारांनी इयत्ता दहावीची वेगवेगळी जन्म तारीख असलेले बोर्डाचे प्रमाणपत्र सादर कjtन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी फुलंब्री व खुलताबाद तालुक्यातील दोन मुख्याध्यापकांना शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी शनिवारी दिले.

भगवान खंडोबा मिसे (३३, रा. मसनेरवाडी ता. गंगाखेड, जि. परभणी, ह. मु. विरमगाव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) व गणेश आबाराव काळे (३४, रा. ताजनापूर, ता. खुलताबाद जि. औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी विठ्ठल लक्ष्मण धनगे (२५, रा. सारोळा, ता. कन्नड जि. औरंगाबाद), सचिन काकासाहेब भोसले (२३, रा. आडगाव ता. कन्नड), रवींद्र अण्णा गरुड (२५, रा. केळगांव ता. सिल्लोड) व दीपक संतोष बोखारे (२४, रा. कळमसर, ता. पाचोरा जि. जळगाव) या आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने चारही आरोपींना सात मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणात सैन्य भरती कार्यालयाचे कर्नल सावलशहा कलिया यांनी तक्रार दिली होती. पोलिस कोठडी दरम्यान चौघा आरोपींनी दुसऱ्यांदा दहावीत प्रवेश घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी यशवंत माध्यमिक विद्यालय आश्रमशाळा खांमगाव (ता. फुलंब्री) येथील मुख्याध्यापक भगवान मिसे व शांताई उच्च माध्यमिक विद्यालय ताजनापूर (ता. खुलताबाद) येथील मुख्याध्यापक गणेश आबाराव काळे या दोघांना शुक्रवारी रात्री अटक केली. दोघा आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे संबंधित उमेदवारांना प्रवेश दिल्याची कबुली दिली. दोघा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी हे जबाबदार पदावर असताना देखील त्यांनी संबंधित उमेदवारांच्या बनावट टी. सी आधारे जन्म तारखेत फेरफार करून इयत्ता दहावीत प्रवेश दिला. या उमेदवारांनी दिलेली बनावट टी.सी. व इतर कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत करणे आहे. आरोपी मुख्याध्यापकांनी अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांआधारे किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला याबाबत तपास करणे आहे. आरोपींनी जन्मतारखेत बदल केला तो कोठे व कसा, कशाच्या आधारे केला तसेच गुन्ह्यात आरोपींना कोणी कोणी मदत केली याबाबत तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रवींद्र आवसरमोल यांनी न्यायालयाकडे केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली.

\Bप्रकरण काय?

\Bसैन्य भरतीसाठी २०१८ मध्ये ऑनलाईन फार्म भरण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांची मैदानी व लेखी चाचणी घेण्यात आली होती. या परीक्षांमध्ये मेरिटमध्ये उर्तीण झालेल्या उमेदवारांची निवड यादी बनविण्यात आली. त्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासण्यात आली असता त्यात १६ उमेदवारांनी इयत्ता दहावीची वेगवेगळी जन्म तारीख असलेले बोर्डाचे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणुक केल्याचे आढळून आले. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४६८,४७१, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरेंनी चकवा दिल्याने सावे महापौरांवर भडकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार अतुल सावे यांना चकवा दिला आणि सावे महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावर भडकले. ही घटना शनिवारी संत एकनाथ रंगमंदिरात घडली. त्यामुळे नेते - पदाधिकाऱ्यांमध्ये थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महर्षी दयानंद चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यावर संत एकनाथ रंगमंदिरातील वातानुकूलित यंत्रणेच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी सर्व नेते व पदाधिकाऱ्यांनी रंगमंदिरात जावे, अशी सूचना संयोजकांकडून करण्यात आली. त्यानुसार आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अॅड. माधुरी अदवंत व अन्य काही पदाधिकारी संत एकनाथ रंगमंदिराकडे रवाना झाले. महर्षी दयानंद चौकात जमलेल्या नागरिकांशी बोलून पुढच्या कार्यक्रमासाठी निघण्यास खैरे यांना थोडा उशीर झाला. तोपर्यंत सावे व अन्य पदाधिकारी रंगमंदिरात पोचले होते. दरम्यानच्या काळात महावीर पाटणी यांचे महर्षी दयानंद चौकात आगमन झाले. त्यांनी खैरे यांना गळ घालून प्रथम माहेश्वरी समाजाच्या कार्यक्रमाला या असे सांगितले. त्यामुळे खैरे माहेश्वरी समाजाच्या कार्यक्रमासाठी सेव्हन हिल्स् येथे रवाना झाले. त्यांच्याबरोबर महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन देखील होते. बराच वेळा झाला तरी खैरे संत एकनाथ रंगमंदिरात आले नाहीत म्हणून सावे यांनी महापौरांना फोन लावला, 'तेव्हा आम्ही माहेश्वरी समाजाच्या कार्यक्रमाला आलो आहोत', असे महापौरांनी सावे यांना सांगितले. यामुळे सावे संतापले.

\Bखैरेंनी केले शांत

\Bमाहेश्वरी समाजाचा कार्यक्रम सावे यांच्या विधानसभा मतदार संघात होता. 'माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मलाच डावलता. मला न सांगता तुम्ही कसे काय गेलात', असा सवाल त्यांनी महापौरांना केला. महापौरांनी सावे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सावे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे खैरे स्वत: सावे यांच्याशी बोलले. 'तुम्ही या तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणार नाही', असे सांगितले. त्यानंतर सावे संत एकनाथ रंगमंदिरातून सेव्हन हिल्सला रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईने पैसे न दिल्याने युवकाची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी आईने पैसे न दिल्याने एका १८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सैय्यद फैजान सैय्यद एजाजुद्दीन (रा. काळादरवाजा, किलेअर्क) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. तो नेहमी तिला महागड्या वस्तू भेट म्हणून देत होता. शुक्रवारी रात्री प्रेयसीला भेटवस्तू घेण्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली. मात्र, आईने एवढे पैसे कुठे खर्च करतो अशी विचारणा करीत त्यास खडसावले व पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या फैझानने त्याच्या खोलीतील छताच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यावर सैय्यद फैजानच्या आईने त्याला नातेवाईकांची मदतीने उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक संजय बहुरे करीत आहेत.……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पो-दुचाकीची धडक

$
0
0

औरंगाबाद : दुचाकी टेम्पोवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दौलताबाद-औरंगाबाद रोडवरील मिटमिटा गावाजवळ घडला. जखमीतील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शरद नाना आहेर (वय ३०) सचिन बाबासाहेब आहेर (वय २०, दोघे रा. पेंढेफळ, ता. वैजापूर), सुभाष अण्णा वाघ (वय ४०, रा. जिरोळा, ता. वैजापूर) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे दुचाकीवरून (एमएच २० ईडी १८०८) वैजापूरहून औरंगाबादकडे येत होते. त्यांची गाडी औरंगाबादहून दौलताबादकडे जाणाऱ्या टेम्पोवर (एमएच २१, डी. ९०९२) आदळली. जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी घाटीत दाखल केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्ताधारी पक्षांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजप-शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. वीस मागण्यांपैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत घोर फसवणूक केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलद्वारे दहा हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे जाहीर केले. त्यापूर्वी अध्यादेश काढून मराठा समाजातील 'एसईबीसी'तून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्‍तीपत्र देऊ नये, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुलाबविश्व मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या बदलणाऱ्या धोरणावर चर्चा झाली. तसेच लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनात दाखल झालेले गुन्हे, ४२ हुतात्म्यांना आर्थिक मदत, वसतिगृहाचे बांधकाम या बाबींची पूर्तता सरकार सहज करु शकत होते. पण, जाणीवपूर्वक करण्यात आल्या नाही अशी भूमिका डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडली. येत्या पाच मार्चला औरंगाबादेत राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल. एकाच वेळी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी राज्यव्यापी बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, असे प्रा. चंद्रकांत भराट यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे पद

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद एका महिन्यात निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत. निर्माण झालेली टंकलेखकांची ही १८०१ पदे त्यानंतर एक महिन्यात भरण्याचेही आदेश खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या प्रासकीय विभागाला दिले आहेत.

राजेंद्र रामाजी ढवळे व इतर कनिष्ठ न्यायालयातील लघुलेखकांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत प्रातिनिधीक स्वरुपात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार न्या. शेट्टीआयोगाच्या शिफारशी एक वर्षात लागू करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २००३साली दिला होता. महारष्ट्राशिवाय देशातील इतर राज्यात या आदेशाची अंमलबजावणी झाली. लघुलेखकांनी २०१३ साली मुंबईला दाखल केलेली ही याचिका २०१५ साली औरंगाबाद खंडपीठाकडे हस्तांतरीत करण्यात आली. दरम्यान न्या. शेट्टी आयोगाचे प्रस्ताव जिथेकुठे प्रलंबित असतील, तेथे तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असा दुसरा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, १५ सप्टेंबर २०१८च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये (प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ते सत्र न्यायालयांपर्यंत) ४५ दिवसांत त्रिस्तरीय स्टेनोग्राफर्सची पद्धत अंमलात आणावी, असा आदेश उच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारीला दिला होता. त्यानंतर एक मार्च रोजी टंकलेखकांची पदे भरण्याबाबत खंडपीठाने आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फे प्रज्ञा एस. तळेकर, शासनातर्फे विशेष सरकारी वकील व्ही. जे. दीक्षित आणि उच्च न्यायालयातर्फे राजेंद्र एस. देशमुख यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंग करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेली ४५ वर्षीय महिला एकटी असल्याची संधी साधत तिच्याशी अंगलट करून तिचा विनयभंग करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी शनिवारी दिले. योगेश शिवाजी सांगळे (२६, वांजरवाडी, ता. जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात दोलताबाद परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडिता ही परिसरातील एका व्यक्तीच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जात होती. त्यावेळी आरोपी योगेश सांगळे हा दुचाकी घेवुन तेथे आला. त्याने पीडितेला मी देखील त्या शेताकडेच चाललो असल्याचे सांगत पीडितेला दुचाकीवर बसण्यास सांगून तिला शेतात सोडले. शेतात पीडिता एकटीच असल्याची संधी साधत आरोपीने तिच्याशी अंगलट करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून कलम ३५४ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठाविली. या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे राजेश वाघ यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापाऱ्याच्या गाडीतून एक लाख लंपास

$
0
0

औरंगाबाद : व्यापाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखाची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी समर्थनगरमध्ये गडली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडको, मयूरनगर भागात राहणारे निखिल रामचंद्र खांड्रे यांचा सीसीटीव्ही कॅमेरे विक्री करण्याचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (दोन मार्च) सकाळी त्यांनी घरगुती कामासाठी शरद हॉटेलजवळील सारस्वत बँकेतून एक लाख काढले. ही रक्कम त्यांनी खिशात न ठेवता दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. सकाळी ११च्या सुमारास ते समर्थनगरातील अनुविहार कॉम्प्लेक्समधील मित्र प्रशांत खंडेलवाल यांना भेटण्यासाठी आले. आपली दुचाकी (एमएच २० बीएस २१४४) कॉम्प्लेक्ससमोर उभी करून ते मित्राच्या घरात गेले. तेव्हा चोरट्यांनी डिक्तीतून रक्कम लंपास केली. अर्ध्या तासानंतर खांड्रे हे दुचाकीजवळ आले असता त्यांना रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ताहेर पटेल यांनी गुन्हा दाखल करून परिसरातील तसेच बँकेसमोरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, या कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही चोरट्यांनी कारमधून लाखो रुपयांच्या बॅग लंपास केलेल्या आहेत. मात्र, एकही गुन्हा उघड करण्यास पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही.

\Bतपास सुरू आहे...

\B- कोकणवाडी : व्यापाऱ्याचे साडेचार लाख पळवले

- जालना रोड : पाच लाख रुपयांची बॅग पळवली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रज्ञा शोध’च्या यादीत औरंगाबादचे ५९ विद्यार्थी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या (एनटीएस) राज्यस्तरीय निवड यादीत ३८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ५९ विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 'एनटीएस'परीक्षेची निवड यादी व शाळा निहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ८६२८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून ३८७ विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी करण्यात आली. ही परीक्षा १२ मे २०१९ रोजी होणार आहे. राज्यस्तरीय ओपन मेरीट साठी १९६ विद्यार्थ्यांचा कोटा होता. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४५ विद्यार्थीचा समावेश झाला आहे. ओबीसी कोट्यासाठी १०४ विद्यार्थी संख्या देण्यात आली होती, त्यात औरंगाबाद जिल्ह्यातून ११ विद्यार्थ्यांचा तर अनुसूचित जातीसाठी २९ विद्यार्थ्यांचा कोटा होता. त्यात तीन विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातून निवडले गेले. गतवर्षी महाराष्ट्रातून या परीक्षेत राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेसाठी ९२ विद्यार्थी निवडण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images