Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्राधिकरणांच्या गर्दीत अडकले पर्यटन

0
0
सर्वात जास्त पर्यटनस्थळे असलेल्या जिल्ह्यांपैकी आणि जागतिक दर्जाची दोन पर्यटनस्थळे असलेल्या औरंगाबादला सरकारने राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा दिला; मात्र घोषणेच्या पलीकडे सरकारच्या पातळीवर फारशा घडामोडीही घडल्या नाहीत. पर्यटन क्षेत्राचे महत्त्व विचारात घेऊन पर्यटन प्राधिकरणाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पाठविला.

वाहनधारकांचा श्वास कोंडलेलाच

0
0
क्रांती चौकाकडून येणारी सिटी बस पूर्वी पैठणगेटवरून खाली उतरून बाराभाई ताजियामार्गे फुले चौकाकडे तसेच गुलमंडी मार्गे गोमटेश मार्केट समोरून जात होती. खरे वाटत नाही ना! परंतू, हे खरे आहे. याच मार्गाची स्थिती आता बदलली आहे. रुंदीकरण होऊनही जुन्या बाजारपेठेत वाहतुकीची घुसमट कायमच आहे.

सोन्यासाठी अपहरण आणि हत्या

0
0
एक ग्रॅम सोन्यासाठी चौथीत शिकणा-या सदानंद शृंगारेचे (१०) अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. ही घटना लातूरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी दिपक सुरवसे (१९) याला अटक केली आहे.

संपाचा ३९ हजार बालकांवर परिणाम

0
0
अंगणवाडी सेविकांचा संप दहा दिवसांपासून सुरू आहे. या संपाचा तालु्क्यातील सहा वर्षापर्यंतच्या ३९ हजार १८१ बालकांना फटका बसला आहे. सहा वर्षापर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित राहत आहेत.

खळवट लिमगावमध्ये एकाचा खून

0
0
जत्रेवरून आपल्या मोटार सायकलवर गावाकडे निघालेल्याचा खळवट लिमगाव येथील चौकामध्ये हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केला. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

मतदारांसाठी महाविद्यालयात कार्यक्रम

0
0
निवडणूक आयोगाने दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदारांच्या जनजागृतीसाठी या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी धीरजकुमार यांनी दिली.

एसटीकडूनच पर्यटनवाढीला खोडा

0
0
अजिंठा लेणी ते फर्दापूर टी पॉइंटपर्यंत प्रदूषणविरहीत बसेस एसटी प्रशासनाने अंतराचे कारण पुढे करून सोयगाव आगाराला दिल्या. मात्र, या आगारात बसेसची देखभाल-दुरुस्तीची पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने एसटीकडून खोडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

२८० शाळांत `लेक शिकवा अभियान`

0
0
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आमुलाग्र प्रगती झाली असली तरी महिलाच्या शिक्षणाबाबत अजूनही ग्रामीण भाग मागासलेलाच आहे. येत्या काळात महिलांचा शैक्षणिक टक्का वाढविण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

महिलेला लुबाडणाऱ्याचा स्केचद्वारे शोध सुरू

0
0
एन २, महाजन कॉलनी भागातील जेष्ठ नागरीक महिलेला लुबाडणाऱ्या आरोपीचा स्केच पोलिसांनी तयार केला आहे. या स्केचवरुन आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मकर संक्रातीच्या दिवशी हा प्रकार घडला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0
वडिलाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे खोटे सांगून घरातून नेऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. हिवरखेडा (नांदगीरवाडी) येथील मुलींसोबतची ही घटना खुलताबादला तालुक्यातील राजेराय टाकळी येथे घडली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी निवडला डाळिंबाचा पर्याय

0
0
कमी पाणी आणि कमी कालावधीचे फळपीक असलेल्या डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा जिल्ह्यात लागवड झालेल्या फळबागांच्या तीनशे एकर क्षेत्रापैकी २५० एकरवर डाळिंब लागवड झाली आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेले तिघे जेरबंद

0
0
मुकूंदवाडी रेल्वेस्टेशनजवळ प्रवाशांना लुबाडणाऱ्या व दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना मुकूंदवाडी पोलिसांनी अटक केली. हायकोर्टाजवळ गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. याप्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अट्टल दुचाकीचोराला अटक

0
0
शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल आरोपीला पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने गजाआड केले आहे. या आरोपीकडून दहा दुचाकी तसेच दुचाकीचे सुटे भाग हस्तगत करण्यात आलेत. या आरोपीकडून दुचाकी चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

आयुक्त बॅकफुटवर, पेडगावकर कार्यमुक्त

0
0
नगरसेवक आक्रमक झाल्यामुळे पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना गु्रुवारी बॅकफुटवर यावे लागले. उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय त्यांना सर्वसाधारण सभेत घ्यावा लागला.

टेंडर मंजुरीत गैरव्यवहाराचा आरोप

0
0
कचरा वाहतुकीसाठी टिप्परच्या टेंडर मंजुरीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज (गुरुवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी केला. स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे ज्या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत त्याच पतसंस्थेच्या सचिवांशी संबंधित असलेल्या संस्थेला टेंडर देण्यात आले असल्याचा गौप्यस्फोट करून राजू शिंदे यांनी कुचे यांच्यावर निशाणा साधला.

चल दोस्ता, गावाकडं, हुरडा पार्टी करू

0
0
चला थोड्या वेगळ्या वाटेने. घनगर्द जंगलाच्या, डोंगराच्या आणि उत्साहाने भरलेल्या शेताच्या. तुम्ही म्हणाल का? त्याला कारण कशाला हवे आहे? मनसोक्त आनंद लुटण्यासाठी कुठलेही निमित्त पुरेसे. अगदी हुरडा पार्टीचेही!

डांबरीकरण होणार; १ कोटीचा खर्च

0
0
किराणाचावडी ते अभिनय टॉकीज या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरुवारी मंजरी दिली. १ कोटी ७७ हजार रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत. ‘मटा’ने ‘बिघडलेले रस्ते, उखडलेले नागरिक’ या वृत्तमालिकेंतर्गत या रस्त्याच्या दुर्दशेचा प्रश्न मांडला होता. नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी उपोषणाचा इशारा दिला होता.

आचारसंहितेपूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार

0
0
नॅशनल हायवे २११ वरील येडशी ते औरंगाबाद या टप्प्याची निविदा प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी पूर्ण केली जाणार आहे. आचारसंहिता लागू होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास हे काम आणखी सहा महिने पुढे जाऊ शकते.

...तर गुंठेवारी विभाग बंद करा

0
0
कामच करायचे नसेल, लोकांना वेठीसच धरायचे असेल, तर गुंठेवारी विभाग बंद करा, अशी मागणी करीत नगरसेवकांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.

अनुदानासाठी ‘बालविकास’चे धरणे

0
0
अनुदानाचे वाटप नियमित करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी बालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images