Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बाळासाहेबांच्या शिल्प उभारणीकडे शिवसेना नगरसेवकांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिल्प उभारणी सोहळ्याकडे शनिवारी शिवसेनेच्या बहुसंख्य नगरसेवकांनी पाठ फिरवली. शिवसेनाप्रमुखांमुळे सुमारे तीन दशकांपासून महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र, असे असतानाही शिवसेनेच्याच नगरसेवकांनी कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

जालना रोडवरील महर्षी दयानंद चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या कामाचे भूमिपूजन १७ नोव्हेंबर २०१३ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी शिल्प उभारण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका महापालिकेने सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व शहरातील संबंधितांना दिल्या होत्या. महापालिकेत शिवसेनेचे २९ नगरसेवक आहेत. या कार्यक्रमाला किमान शिवसेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील येवढेच शिवसेनेचे नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेता विकास जैन, राजेंद्र जंजाळ, स्वाती नागरे यांचे पती किशोर नागरे, बन्सी जाधव, गजानन मनगटे, कमलाकर जगताप, सचिन खैरे, मकरंद कुलकर्णी, शिल्पाराणी वाडकर, स्मिता घोगरे, सुनीता आउलवार, नितीन साळवी, सुमित्रा हळनोर यांचा समावेश होता. त्यांच्याशिवाय शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, आर्य समाजाचे दयाराम बसैये, जगन्नाथ बसैये, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, माजी महापौर कला ओझा, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता देव, राखी परदेशी यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

\Bखैरेंचे दोन तास उशिराने आगमन

\Bकार्यक्रमाची वेळ सकाळी नऊ वाजेची होती. नेहमीच्या पद्धतीनुसार साडेनऊ - दहावाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होईल असे मानले जात होते. मात्र, पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी साडेदहाच्या सुमारास कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्यानंतर अकरा वाजता खासदार चंद्रकांत खैरे यांचे आगमन झाले. काही नागरिक मात्र साडेनऊ वाजेपासून कार्यक्रम स्थळी हजर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवखंडा मशिदीस ७० जणांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकमेकांच्या धर्माविषयी माहिती व्हावी व मुस्लिमेत्तरांना मशिदीची माहिती होण्यासाठी रविवारी नवखंडा येथील 'मशीद दर्शन'चा उपक्रम घेण्यात आला. यावेळी ७०पेक्षा जास्त मुस्लिमेत्तर नागरिकांनी मशिदीची पाहणी केली. हे आयोजन 'पयामे इन्सानियत' यांच्या रविवारी (तीन मार्च) करण्यात आले. यावेळी संयोजकांनी मशिदीचे नियम, वजू कसे करतात, तिलावत म्हणजे धार्मिक ग्रंथांचे पठण कसे केले जाते, याची माहिती नागरिकांना दिली. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया रजिस्टरमध्ये नोंदवल्या. यापूर्वी अनेकांनी लग्नानिमित्त मशिदीत प्रवेश केला होता, मात्र तेव्हा मशिदीबाबत माहिती मिळाली नव्हती, ती मिळाल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद भाई. अब्दुल हाई, नजीर खान, वसीम भाई, मलीक सहाब यांच्यासह इतरांतनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशवाणीच्या लेखाधिकाऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आकाशवाणी औरंगाबाद कार्यालयात कार्यरत असलेल्या लेखाधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. गोपाळ शिवप्रसाद मुंदडा (वय ४७, रा. आकाशवाणी क्वार्टर्स) असे मृत लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुंदडा हे आकाशवाणीच्या क्वार्टर्समध्ये पत्नी आणि मुला-मुलीसोबत राहत होते. पत्नीच्या वडिलांचे वर्षश्राद्ध असल्याने त्या रविवारी सकाळी मुलांसोबत नांदेडला गेल्या होत्या. मुंदडा यांनीच त्यांना नांदेडला जाण्यासाठी बसवून दिले होते. घरी परतल्यानंतर घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी घराचा दरवाजा उघडाच होता. काम करणारी महिला मुंदडा यांच्या घरी दुपारी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिने शेजाऱ्यांना ही माहिती दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. जवाहरनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंदडा यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\Bआत्महत्येचे कारण अस्पष्ट\B

मुंदडा गेल्या १८ वर्षांपासून आकाशवाणीमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद, नांदेड येथे काम केले आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली मात्र त्यामध्ये काही आढळले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी जगाची भाषा, प्रभुत्व हवेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विचारांवर भाषा प्रभाव पाडत असते, जे लोक खुप चांगले आणि दर्जेदार बोलतात त्या व्यक्ती प्रभावी असतात. त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात. भाषेवर प्रभुत्व नसेल, तर आपणास व्यक्त होता येत नाही. इंग्रजी भाषा जगाची भाषा असून संपूर्ण भारताला जोडणारी भाषा आहे. या भाषेचा केवळ न्यायालयातच नाही, तर विज्ञान, अर्थशास्त्रासह इतर विषयांमध्येही वापर होतो त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अत्यंत आवश्यक आहे,' असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तसेच महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती आर. बानुमती यांनी केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात 'कायदा आणि साहित्यातील संबंध' या विषयावर आयोजित एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन रविवारी (३ मार्च) बानुमती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबादचे प्रभारी कुलगुरू डॉ. के. कोंडय्या, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, आर. सी. कृष्णय्या यांची उपस्थिती होती.

इंग्रजी ही जगाची भाषा असल्यामुळे विज्ञान, अर्थशास्त्र तसेच समाजाच्या बहुतांश क्षेत्रामध्ये इंग्रजीचा वापर होतो, या शिवाय न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही योग्य व अचूक शब्दाचा वापर करता येतो. आज विद्यार्थी इंटरनेट आणि मोबाइलच्या मागे लागले आहेत. यामुळे वाचन कमी होत आहे. लोक एकमेकांपासून दूरावत असल्यामुळे प्रत्यक्षात बोलणेही कमी होते. या सर्व प्रकारामुळे इतर बाबींचे ज्ञानही मिळत नसल्याचे बानुमती यांनी सांगितले. यावेळी बानुमती यांनी औरंगाबाद येथील विधी विद्यापीठाच्या कॅम्पसची स्तुती करत समाधान व्यक्त केले.

\Bसंगीतकारप्रमाणे इंग्रजीचा सराव आवश्यक \B

आर. बानुमती म्हणाल्या, भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, प्रत्येकाला प्रादेशिक भाषा बोलता येईलच असे नाही. मात्र भारताच्या कोणत्याही राज्यात इंग्रजी भाषा बोलता आली, तर संभाषणाची अडचण दूर होते, भाषेवर प्रभुत्व नसेल तर आपल्याला विचार मांडता येत नाही. मोबाइलवर मॅजेज टाइप करणे, कामापुरते बोलणे तसेच लिहिण्याऐवजी सखोल इंग्रजीच्या ज्ञानासाठी इंग्रजीचे दर्जेदार साहित्य वाचणे आवश्यक आहे. संगीतकार ज्या प्रमाणे दररोज सराव करतात त्याप्रमाणे इंग्रजीचाही सराव करावा, यासाठी दररोजचे वर्तमानपत्र वाचावे. दररोज आपण काय केले याचा आढावा घेण्यासाठी रोजनिशी तयार करावी, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेवाची मिरवणूक

$
0
0

औरंगाबाद : श्री जय चतुर्थी प्रतिष्ठाण व भोलेश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महादेवाची मिरवणूक व नगर प्रदक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी १२ वाजता या मिरवणुकीची सुरुवात भोलेश्वर मंदिर सुपारी हनुमान रोड ते गुलमंडी, शनीचौक, पानदरिबा व मछलीखडक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत महाआरती व रात्री साडेआठ वाजता फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी शंकर भुरेवार, नगरसेवक सचिन खैरे,

महेशगुरुजी देशपांडे, सुभाष टेटवार, शाम टेटवार, राहुल घोंगते, हरिष बोंबले, गणेश ढोकरट, मगन गणेशलाल दीपवाल मित्र मंडळ, पावन गणेश मंडळ, सुपारी हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृती ही सृजनशील मनाची निर्मिती

$
0
0

औरंगाबाद :

संस्कृती ही सृजनशील मनाची निर्मिती असते, असे प्रतिपादन सूरत येथील अॅरो युनिव्हिर्सिटीचे कुलगुरू डॉ. अवधेशकुमार सिंग यांनी केले. डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने ट्रेंड्स अॅण्ड ट्रान्स्फॉर्मेशन्स इन इंडियन लिट्रेचर या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

परिषदेचे उद्घाटन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरूवअनंतपुरम केरळ येथील प्राचार्या डॉ. शुभा नारायण यांनी केले. यावेळी मराठवाडा लिगल अॅण्ड जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. जे. के. वासडीकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. महानंदा दळवी यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. अवधेशकुमार म्हणाले की, 'संस्कृती ही सृजनशील मानाची निर्मिती असते. रामायण, महाभारताच्या पुराणकथेतील वास्तव साहित्याच्या माध्यमातून जाणून घेता येते.' त्यांनी भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून ते सद्यकालीन साहित्याचा प्रवास विषद केला.

प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित यांनी महाविद्यालयाचा प्रगतीचा आढावा घेत या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा हेतू सांगितला, यावेळी त्या म्हणाल्या की, 'या परिषदेचा विषय जाणिवपूर्वक निवडला असून तो संवेदनशील आहे. साहित्यामधून समाज जीवन प्रतिबिंबीत होत असते. साहित्यामध्ये सातत्याने परिवर्तन घडून येत असते. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय साहित्यातून राष्ट्रभक्ती व देशप्रेम प्रतिबिंबित होत होते. त्यानंतरच्या काळात लेखकांचे साहित्य हे अधिकाधिक जीवनाभिमुख असलेले आढळले.'

अध्यक्षीय समारोप करताना अॅड. जे. जे. वासडीकर यांनी जागतिक साहित्याचा आढावा भाषांतराच्या माध्यमातून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध भागातून मोबाइल चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. या दोघांनी देान मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची कबुली देत दोन मोबाइल पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाला पंढरपूर येथील आकाश राजू गायकवाड (वय २३ रा. फुलेनगर, पंढरपुर) याच्याकडे चोरीचा मोबाइल असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून आकाशला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तीन हजार रुपये किंमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला. या मोबाइल चोरीप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे; तसेच अन्य एका घटनेत उस्मानपुरा येथील शुभम दीपक पंडित उर्फ धीरज (वय २२, रा. नागसेननगर) याला ताब्यात घेण्यात आले. शुभमने देखील मोबाइल चोरीची कबुली देत साडेसहा हजार रुपये किंमतीचा मोबाइल पोलिसांच्या स्वाधीन केला. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, जमादार नितीन मोरे, मनोज चौहान, भगवान शिलोटे, शेख हकीम, संजय खोसरे, संतोष सुर्यवंशी,चंद्रकांत सानप आदींनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नासाठी आलेल्या तरुणाचा दुचाकी घसरल्यामुळे मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेहुणीच्या लग्नासाठी शहरात आलेल्या तरुणाचा दुचाकी घसरल्याने मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता चिकलठाणा येथे सुखना नदीच्या पुलाजवळ घडला. या अपघातात त्याचा मेहुणा जखमी झाला. मोहसीन युसूफ अत्तार (वय २४, रा. आडूळ ता. पैठण) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

चिकलठाणा येथील हिनानगरात मोहसीन याची सासरवाडी आहे. मेहुणीच्या लग्नासाठी मोहसीन सासरवाडीला आला होता. रविवारी सकाळी मेहुणा सोहेल (वय १२) याला सोबत घेऊन दुचाकीवर तो चिकलठाणा बाजारात खरेदीसाठी गेला. तेथून परतत असताना सुखना नदीच्या पुलाजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. सुमारे ५० फुटांपर्यंत तो फरफटत जाऊन दुभाजकावर आदळला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मोहसीनचा जागीच मृत्यू झाला, तर सोहेल किरकोळ जखमी झाला. अपघाता घडल्यानंतर नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत मोहसीनला घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याची अपघातग्रस्त दुचाकी चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

\Bदीड महिन्याची मुलगी\B

मोहसीनचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आडूळ येथे तो एका फरसाणच्या दुकानावर मार्टवर तो कामाला होता. दीड महिन्यापूर्वीच त्यांच्या घरी चिमुकलीचा जन्म झाला आहे. या घटनेमुळे आडूळ गावात शोककळा पसरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज राष्ट्रवादी अर्बन सेलची बैठक

$
0
0

औरंगाबाद,

राष्ट्रवादी अर्बन सेलची सोमवारी (४ मार्च) जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी भवन येथे दुपारी अडीच वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीसाठी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा खा. वंदना चव्हाण, प्रदेश उपाध्यक्षा आ. विद्या चव्हाण, आ. सतीश चव्हाण, दौरा समन्वयक सुरेश पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्यांसह कार्यकर्त्यांशी वंदना चव्हाण संवाद साधणार आहेत. तसेच बुथ नियुक्त्या, संघटना वाढीसंदर्भात त्या जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पिण्याच्या बहाण्याने ३० हजारांचा ऐवज लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन आरोपीने ३० हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी साडेआठ वाजता हडकोतील संत ज्ञानेश्वरनगर भागात घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वत्सलाबाई विठ्ठलराव कुंटे (वय ७६, रा. संत ज्ञानेश्वरनगर) यांनी तक्रार दाखल केली. वत्सलाबाई शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घरासमोरी ओट्यावर बसलेल्या होत्या. यावेळी १६ ते १७ वर्षांच्या अनोळखी मुलांने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. वत्सलाबाई पाणी आणण्यासाठी घरात गेल्या. यावेळी मदतीच्या बहाण्याने या मुलाने घरातील २४ हजारांचे मंगळसूत्र; तसेच सहा हजाराची अंगठी असा एकूण ३० हजारांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वत्सलाबाई यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक वाघ तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपी ट्रकचालकावर तीन गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहनधारकांना उडवत एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मद्यपी ट्रकचालकाविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन तर, हर्सूल पोलिस ठाण्यात एक तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, लोकांच्या मदतीला धावणाऱ्या के. के. ग्रुपचा सदस्य शेख मोहसीन याच्या मृत्यूमुळे मित्रपरिवारात शोकाकूल वातावरण आहे.

फुलंब्री येथून शनिवारी रात्री मद्यपी ट्रकचालक प्रवीण मोरे आणि अविनाश शिंदे यांनी अनेक वाहनांना उडवत चेलिपुऱ्यात घुसले होते. हर्सूलपासून हा ट्रकचालक हातगाडी, पादचारी, दुचाकीस्वारांना उडवत चेलिपुऱ्यात घुसला. त्याचा दुचाकीवरून अनेकजण पाठलाग करीत होते. या पूर्ण घटनेत शेख मोहसीन शेख आमीन (वय २६, रा. मिलकॉर्नर) यांचा मृत्यू झाला. किमान ४० जण जखमी झाले आहेत. चेलिपुऱ्यामध्ये ट्रक थांबल्यानंतर नागरिकांनी चालक मोरे आणि त्याचा सहकारी अविनाश शिंदे यांना बेदम चोप दिला. या घटनेनंतर वातवरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी मोठ्या बंदोबस्तासह घटनास्थळ घाटले. जखमी ट्रकचालकाला व साथीदाराला ताब्यात घेत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये हर्सूल येथे एका दुचाकीस्वाराने ट्रकने उडवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सिटीचौकात एका रिक्षाचालकाने ट्रकने धडक दिल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, तिसरा गुन्हा अपघातात ठार झालेल्या शेख मोहसीन याच्या कुटुंबीयांनी ट्रकचालकाविरुद्ध दाखल केला आहे.

मोहसीन यांच्या मृत्यूमुळे हळहळ

अपघातात ठार झालेल्या मृत शेख मोहसीन हा घाटीत रुग्णांना मदत करणाऱ्या के. के. ग्रुपचा सदस्य आहे. मोहसीन याचा कपड्याचा व्यवसाय आहे. शनिवारी त्यांच्या मित्रांना बाहेर जेवणासाठी जायचे होते. मोहसीन याने दुचाकीत पेट्रोल नसल्याने शहागंज येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून येतो असे मित्रांना सांगत शहागंजमध्ये आला होता, मात्र यावेळी मद्यपी ट्रकचालकाच्या रुपाने त्याच्यावर काळाला घाला घातला. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे के. के. ग्रुपचे सदस्य देखील धास्तावले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ अनुदानाचा तिसरा हप्ता तिजोरीत पडून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अत्यल्प पावसाने खरिपाचा पेरा हातचा गेला. आता शेतकऱ्यांना केवळ सरकारी मदतीचाच आधार आहे. महिन्याभरापासून तीन टप्प्यांत मराठवाड्यात खरीप दुष्काळ निधीचे तब्बल एक हजार ७७२ कोटी रुपये मिळाले, मात्र आतापर्यंत एक हजार २०२ कोटी रुपयांचेच वाटप करण्यात आले असून, तिसऱ्या हप्त्याचे साडेपाचशे कोटी रुपये वाटपाअभावी सरकारी तिजोरीत पडून आहेत.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर महिन्याभराने मराठवाड्याला ५२५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळाला त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी ५२५ कोटी रुपयांचा दुसरा, तर आता २१ फेब्रुवारी रोजी विभागातील शेतकऱ्यांसाठी ७२२ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीचे अत्यंत संथ गतीने वाटप सुरू आहे. सरकारकडून निधीचे वितरण होत असताना वाटपामध्ये मात्र स्थानिक प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण रकमेपैकी आतापर्यंत केवळ १२०२ कोटी (६७.८५ टक्के) बँकेत जमा करण्यात आल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांची दुष्काळामुळे धूळधाण झाली असून, एकूण ३६ लाख २७ हजार शेतकऱ्यांपैकी तब्बल ३२ लाख ५५ हजार (९० टक्के) शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला. यापैकी प्रशासनाने ३२ लाख १४ हजार ८२९ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवले आहे. यापैकी आतापर्यंत २५ लाख ६९ हजार ५१४ शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या दुष्काळ निधीची रक्कम मिळाली आहे. दुष्काळाने होरपळलेला प्रत्येक गावातील शेतकरी जाहीर झालेल्या अनुदानाची वाट पाहत असून, केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अनुदानाची वाट पहावी लागत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

मराठवाड्याला आवश्यक असलेल्या दोन हजार ५६४ कोटी रुपयांच्या मदतीच्या रकमेपैकी एक हजार ५० कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. ही संपूर्ण रक्कम प्राप्त झाली असून वाटपही झाले आहे, मात्र तिसरा हप्ता मिळून दहा दिवस उलटून गेल्यानंतरही यातील अत्यल्प रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. या दुष्काळामध्ये २९ लाख ६५ हजार हेक्टरवर कोरडवाहू पिके, दोन लाख ८० हजार हेक्टवरील बागायती पिके, तर एक लाख २६ हजार हेक्टरवरील फळबागांना फटका बसला.

\Bजिल्हानिहाय मिळालेली रक्कम\B

जिल्हा.....................एकूण मदत.................बँकेत जमा...........वाटपाचे प्रमाण

बीड........................ ४२८३३.९४ ...............२३६५९.२१.........६६.२३

औरंगाबाद..................३७६७६.१०...............२५४०५.८०..........६७.८३

जालना......................३३०३८.६०................१६६२९.०८.........५०.३३

उस्मानाबाद................२३६१६.९४................१८९९२.६२.........८०.८२

परभणी......................१८१४६.५६................१५१५८.२४.........८३.५३

हिंगोली......................१२१४१.९५...............१०६३९.९२..........८७.६३

नांदेड........................८६९१.७३.................८६७७.९७............९९.८४

लातूर.........................११२०.३६................११२०.३२............१००

एकूण..................१७७२७१.१८..................१२०२८६.१६........६७.८५

(रक्कम लाख रुपयांत, वाटपाचे प्रमाण टक्क्यांमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांतीमोर्चाची बैठक उद्या आयोजित

$
0
0

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीचे मंगळवारी (पाच मार्च) सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयटी महाविद्यालयात मोझाइक प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयटी महाविद्यालयाच्या वास्तू विशारद विभागातर्फे मोझाइक या वार्षिक महोत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने वास्तू विशारद विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची विविध विषयांवरची चर्चासत्र, अभ्याससत्र, कार्यशाळा, प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या विविध कामांचे सादरीकरण देखील या महोत्सवात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी 'सावंतवाडी' येथील सहलीचे सादरीकरण प्रदर्शनात केले. महाविद्यालयाचा वास्तू विशारद विभाग आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. हे प्रदर्शन चार मार्च पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनासाठी संस्थेचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे, शकुंतला लोमटे, संस्थेचे महासचिव मुनीश शर्मा, संचालिका बिजली देशमुख, प्राचार्य डॉ. नीलेश पाटील, विभागप्रमुख कुलदीपकौर भाटीया, अन्य विभागप्रमुख, प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. आजी-माजी विद्यार्थी, पालक या प्रदर्शनासाठी हजेरी लावत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान प्रवास प्रचंड महागला

$
0
0

पाच मार्चपासून तिकिटांचे दर वाढणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद दिल्ली मार्गावरील विमान प्रवास प्रचंड महाग झाला आहे. येत्या पाच मार्चपासून औरंगाबाद-मुंबई-दिल्ली या प्रवासासाठी विविध श्रेणींसाठी ४० ते ४९ हजार रुपये तिकीट दर होणार आहे. आगामी काही दिवस दरांची स्थिती अशीच राहील, अशी शक्यता विमान कंपन्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर प्रिमियम क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४९ हजार १७८ रुपये तिकिटासाठी द्यावे लागणार आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, पदाधिकारी अशा अनेक दिल्लीवारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय सैन्य दलातील अधिकारी, महत्त्वाच्या खात्यांचे प्रमुख, उद्योजक आणि व्यवसायिक यांचाही दिल्ली प्रवास सुरूच आहे. या प्रवाशांना महाग विमान तिकीटाचा फटका सहन करावा लागत आहे. यातील अनेक जणांचा प्रवास पूर्वनियोजित होता. मात्र, ऐनवेळी जाणाऱ्यांना महागड्या किंमतीत विमान प्रवासाची तिकीटे खरेदी करावी लागत आहेत.

औरंगाबाद ते दिल्ली या एअर इंडियाच्या विमानातून चार मार्च रोजी प्रवास करण्यासाठी प्रती प्रवासी २३ हजार ६८१ रुपये मोजावे लागणार आहेत. यातही इकॉनॉमी क्लासची तिकीटे पूर्ण विकण्यात आलेली आहेत. तसेच अन्य क्लासची तिकीटे उपलब्ध नसल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. पाच मार्चपासून मात्र, तिकीट दरात प्रचंड तफावत होणार आहे. औरंगाबादवरून दिल्लीला जाण्यासाठी एअर इंडिया विमानाचे तिकीट महाग झाले आहे. पाच मार्च रोजी औरंगाबाद-मुंबई-दिल्ली या विमान प्रवासासाठी ३३ ते ४७ हजार रुपये असा दर ऑनलाइन विमान तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीच्या वेबसाइट देण्यात आला आहे. एका विमान कंपनीच्या संकेत स्थळावर इकॉनॉमी क्लासची तिकीटे विकण्यात आली आहेत. तर प्रिमीयम क्लासमध्ये पाच मार्च रोजी प्रवाशांना ४९ हजार १७८ रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबईतून विमान फेऱ्या रद्द केल्याचा फटका

मुंबई विमानतळावरील रन वे सकाळी ११ ते सायंकाळी पाच या दरम्यान रन वेच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे या सहा तासांत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानाच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे मुंबईतून दिल्लीला जाण्यासाठी एकतर ११ वाजेच्या पूर्वी किंवा पाच वाजेच्या नंतरच्या विमान फेऱ्यांवर विमान प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे या काळातील विमानांच्या फेऱ्यांवरील प्रवासी संख्या अचानकपणे वाढली आहे. त्यामुळे तिकीट जास्त दराने विकले जात असल्याची माहिती विमान कंपन्यांच्या सूत्रांनी दिली.

दर जास्त घेण्याचा अधिकार

विमान कंपन्यांमधील ९० टक्के जागा या विविध सवलत आणि अडव्हॉन्स बुकिंग मध्ये भरण्यात येत असतात. रिक्त राहिलेल्या पाच टक्के किंवा नऊ टक्के जागा या चढत्या किंमतीत विक्री करण्याचा अधिकार विमान कंपन्यांना देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाशिवरात्रीनिमित्त शहरातील मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोमवारी महाशिवरात्र उत्सव आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासह शहरातील विविध शिवमंदिरात या उत्सवानिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वेरूळ येथे तीन दिवसीय मोठी यात्रा भरत असल्याने या मार्गावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच शहरातील शिवमंदिरात देखील भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने मोठी यात्रा भरते. रविवार ते मंगळवार या दरम्यान ही यात्रा भरणार आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. घृष्णेश्वर मंदिर, वेरुळ तसेच तीर्थ कुंड ही स्थाने धुळे सोलापूर महामार्गालगत येत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनाची वाहतूक सुरू असते. यात्रे दरम्यान वाहनांची कोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून या मार्गावरील वाहतुकीत तीन दिवस बदल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत.

बंद मार्ग आणि पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत.
बंद मार्ग
- दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ
- फुलंब्री ते खुलताबा

- औरंगाबाद कन्नड धुळेकडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉइंटपासून माळीवाडा, आनंद धाबा, कसाबखेडा फाटा मार्गे वेरूळ कन्नडकडे जातील.
- कन्नडकडून येणारी सर्व जड वाहने वेरूळ,कसाबखेडा फाटा, शरणापूर मार्गे औरंगाबादकडे येतील.
- फुलंब्री मार्गे येणारी सर्व जड वाहने औरंगाबादमार्गे जातील.


खडकेश्वरला यात्रेचे आयोजन
शहरातील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरासोबत इतर मंदिरात देखील महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पिसादेवी येथील पारदेश्वर मंदिर, उल्कानगरी येथील ओंकारेश्वर मंदिर, टिळकपथ येथील नर्मदेश्वर मंदिर आदी मंदिरांचा यामध्ये समावेश आहे. खडकेश्वर मंदिराच्या प्रांगणात देखील भाविकांची मोठी गर्दी होऊन या ठिकाणी यात्रा भरते. या यात्रेची पूर्वतयारी झाली असून विविध दुकाने थाटण्यात आली असून आकाश झुला, जंपिंग जॅक आदी यांत्रिक खेळणी उभारण्यात आली आहे.

पारदेश्वरला धार्मिक कार्यक्रम
पळशी रोडवर पारदेश्वर शिवमंदिर आहे. येथील शिवलिंग पाऱ्यापासून तयार करण्यात आले आहे. हरिद्वारनंतर देशात परभणी आणि औरंगाबाद येथे पारदेश्वर शिवलिंग मंदिर आहे. या मंदिर परिसरात सरस्वती, लक्ष्मी, शनिदेव कार्तिक स्वामी, कुबेर आदी देवतांची मंदिरे आहेत. सोमवारी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक विधीचे आयोजन या मंदिरात करण्यात आले आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिरात गर्दी करतात. यामध्ये महिलांचा देखील समावेश असतो. यावेळी होणाऱ्या मंगळसूत्र चोरी तसेच इतर अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुन्हे शाखा तसेच विशेष शाखेच्या पथकाचाही यामध्ये समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाशिवरात्रीसाठी रताळी बाजारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपवासाच्या पदार्थांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे रताळे बाजारात दाखल झाले आहे. खास महाशिवरात्रीसाठी रताळांची वाढलेली मागणी लक्षात घेऊन जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रताळ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्याबरोबच केळी, बटाटे यांची मागणीही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

जाधववाडी येथील बाजार समितीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून रताळांची आवक वाढली आहे. शनिवारी बाजारात ९७५ क्विंटल रताळे दाखल झाले असून किमान भाव एक हजार ४०० तर कमाल दर हा क्विंटलमागे एक हजार ६०० रुपये मिळाला. तर सरासरी भाव एक हजार ५०० रुपये प्रती क्विंटल असल्याचे समितीने सांगितले. त्या बरोबरच बटाट्याची आवकही वाढली असून ९०० क्विंटल आवक झाली असून सरासरी दर हा क्विंटलमागे ९०० रुपये आहे. चवीला काहिसे गोड असलेल्या रताळ्यांना उपवासाच्या पदार्थांमध्ये स्थान असल्यामुळे महाशिवरात्री निमित्ताने त्यास मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रती किलो दराने त्यांची विक्री होत असल्याचे विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले. दरम्यान, उपवास निमित्ताने साबुदाणा, शेंगदाणे, भगर यासह उपवासाचे तयार पीठ यास मागणी वाढली आहे. साबुदाणा प्रती किलो ६० रुपये, शेंगदाणे ८० ते ९५ रुपये किलो तर भगरचे भाव किलोमागे ८० ते ९० रुपयांच्या घरात असल्याचे किराणा व्यापारी शैलेद्र पाटणी यांनी सांगितले.

उपवास निमित्ताने केळीला जास्त मागणी असून भावही काहिसे वधारले आहे. ३० ते ५० रुपये डसन या भावाने त्याची विक्री होत असून यासह दही, खजूर, टरबूज, सफरचंद यासह अन्य फळांना मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महादेवाची मिरवणूक

$
0
0

औरंगाबाद : श्री जय चतुर्थी प्रतिष्ठाण व भोलेश्वर महादेव मंदिर यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महादेवाची मिरवणूक व नगर प्रदक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी १२ वाजता या मिरवणुकीची सुरुवात भोलेश्वर मंदिर सुपारी हनुमान रोड ते गुलमंडी, शनीचौक, पानदरिबा व मछलीखडक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत महाआरती व रात्री साडेआठ वाजता फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुजारी शंकर भुरेवार, नगरसेवक सचिन खैरे,
महेशगुरुजी देशपांडे, सुभाष टेटवार, शाम टेटवार, राहुल घोंगते, हरिष बोंबले, गणेश ढोकरट, मगन गणेशलाल दीपवाल मित्र मंडळ, पावन गणेश मंडळ, सुपारी हनुमान मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्मीर फेस्टिवलला उत्तम प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा चौकातील गोपाल कल्चरल हॉल येथे आयोजित काश्मीर फेस्टिवलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन चार मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये महिलांसाठी विविध उपयोगी वस्तू उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनामध्ये काश्मीर येथील ३०हून अधिक कारागिरांचा सहभाग आहे. काश्मीर फेस्टिवलमध्ये पश्मिना शॉल, स्टॉल्स, कानी जमावर शॉल्स, एम्ब्रायडी साडी, ड्रेस मटेरियल, सूटस, कुर्तीज, सिल्क व कॉटन साडी, एम्ब्रायडरी जॅकेट, कुशन कवर्स, स्टोन व सिल्वर ज्वेलरी, एम्ब्रायडरीज बॅग, पेपर मैशी, बाल हैगिंग साड्यांमध्ये पश्मिना प्रिंटेड साडी, जूट साडी, कप्तात साडी, गिफ्ट आइटम उपलब्ध आहे. काश्मीरमधील विविध भागातून सरकारद्वारा पुरस्कृत विणकर या प्रदर्शनात आले आहेत. या प्रदर्शनात एक हजारपेक्षा जास्त वस्तू उपलब्ध आहेत. या प्रदर्शन व विक्रीचा लाभ घ्यावा, असे संचालक शौकत वरगर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Danve-Khotkar: दानवे-खोतकर वादावर तोडगा नाहीच!

$
0
0

जालना:

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. वाद मिटवण्यासाठी बंद दाराआड झालेल्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आजच्या चर्चेनंतरही दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढण्यावर खोतकर ठाम असल्यानं गुंता वाढला आहे.

दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची गर्जना खोतकर यांनी केली आहे. शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर ते माघार घेतील अशी चर्चा होती. मात्र, खोतकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा वाद मिटावा यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठीच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज खोतकर यांच्या जालन्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे हे देखील त्यांच्या सोबत होते. तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. मात्र, त्यातून ठोस काही पुढं आलं नाही.
68251755

देशमुख यांनी हा मात्र सगळं काही व्यवस्थित होईल, असा विश्वास बोलून दाखवला. 'खोतकर यांच्या नसानसांत शिवसेना भिनलेली आहे. ते कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. आपल्याला पक्षाचं काम करताना मतभेद होत असतात. आता युती झाली आहे. त्यामुळं लवकरच दानवे व खोतकर जालन्यात युतीचं काम सुरू करतील, असं ते म्हणाले. खोतकर यांनी मात्र आपण लोकसभेच्या मैदानातून अद्याप माघार घेतली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं पेच वाढला आहे.

कोण? काय? म्हणाले!





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images