Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना जागा पुरेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वक्फ बोर्डाने राज्यातील सहा प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना औरंगाबाद मुख्यालयात परत बोलविण्याचे आदेश दिले. या आदेशांची अंमलबजावणी झाली. मात्र, वक्फ बोर्ड कार्यालयात अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. सध्या या प्रादेशिक अधिकाऱ्यांना संगणक कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वक्फ बोर्डाशी संबंधित असलेली कामे लवकरात लवकर व्हावीत. यासाठी प्रादेशिक कार्यालये तयार करण्यात आली होती. या प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर, अमरावती, मुंबई (कोकण), पुणे, नाशिक अशी कार्यालये तयार करण्यात आली होती. या कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे वक्फ बोर्डाशी संबंधित कामे देण्यात आली होती. ही कामे व्यवस्थितरित्या पार पाडली जात नसल्याचा आरोप बोर्डाच्या काही सदस्यांनी केला होता. तसेच कोणत्याही कामाबाबत या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते काम औरंगाबाद मुख्यालयाकडे काम असल्याचे सांगत असल्याचाही आरोप करण्यात आला होता.

ही सर्व कार्यालये औरंगाबादला आणण्याचा निर्णय वक्फ बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर नागपूर, अमरावती, मुंबई (कोकण), पुणे आणि नाशिक प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना औरंगाबादला बोलविण्यात आले आहे. हे अधिकारी औरंगाबादला दाखल झाले. या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी तात्पुरती जागेची व्यवस्था संगणक कक्षात करण्यात आली आहे. सध्या संगणक कक्षात जुन्या कागदपत्रांची स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी प्रादेशिक अधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा देण्यात आली आहे. या प्रादेशिक कार्यालयाकडे असलेल्या फाइलही जमा करण्यात आलेल्या आहेत. नागपूर, अमरावती किंवा मुंबईहून आलेल्या नागरिकांना प्रादेशिक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी संगणक कक्षात जाऊन संपर्क साधावा लागत आहे. यामुळे शहराबाहेरून आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये करणार व्यवस्था

वक्फ बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष एम. एम. शेख यांच्यासाठी वक्फ बोर्डात एक केबिन तयार करण्यात आली आहे. या केबिनच्या जागेवर प्रादेशिक अधिकाऱ्यांना बसण्याची जागा करून देण्याची कार्यवाही सुरू आल्याची माहिती वक्फ बोर्डाच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुटखा विक्रेत्याला पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंज परिसरातील बॉम्बे सुपारी स्टोअरमधून जप्त करण्यात आलेल्या ५५ हजार ६१८ रुपयांच्या गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला प्रकरणात आरोपी श्रेणिक सुरेशचंद्र सुराणा याला रविवारी (तीन मार्च) अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (सहा मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार; दोन मार्च २०१९ रोजी शहागंज येथील बॉम्बे सुपारी स्टोअरमधून विमल पान मसाल्याची १३९ पाकिटे, व्ही-एक सुगंधित तंबाखुची १३९ पाकिटे, विमल गुटख्याची (निळ्या रंगाची) २२ पाकिटे, विमल पान मसाल्याची ५० पाकिटे, राज निवासपान मसाल्याची ४८ पाकिटे, एम पी-०१ सुगंधित तंबाखुची १०४ पाकिटे (एकूण किंमत सुमारे ५५ हजार ६१८ रुपये) जप्त करण्यात आली.

या प्रकरणात आरोपी श्रेणिक सुरेशचंद्र सुराणा (३५, रा. प्रणव प्लाझा, भाजीमंडईसमोर, औरंगपुरा) याला ताब्यात घेण्यात आल्याविषयी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव यांनी फिर्यादीला तीन मार्च २०१९ रोजी फोनवर कळविले. फिर्यादीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, आरोग्यास धोकादायक व प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे आढळून आले. प्रकरणात आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपीने हा गुटखा-तंबाखुचा साठा कोठून आणला, कुणाला विक्री करणार होता, आणखी कोठे साठा करून ठेवला आहे का, कोणी साथीदार आहेत का आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा बकऱ्यांची चोरीप्रकरणी आरोपीस ठोकल्या बेड्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळ्या व्यक्तींच्या दहा बकऱ्या चोरल्याप्रकरणात आरोपी नीलेश सोमिनाथ दहिहंडे याला सोमवारी (४ मार्च) अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (६ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

या प्रकरणी वसीम याकुब कुरेशी (२६, रा. पुष्पक गार्डन, चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादीनुसार, फिर्यादी हा चिकलठाणा परिसरात मटनाचे दुकान चालवतो. फिर्यादीने दहा बकऱ्या पाळल्या असून, त्यापैकी दोन बकऱ्या चरत असताना त्यांची चोरी झाली. तसेच गावातील शेख युनुस शेख महेबुब यांच्या दोन, मच्छिंद्र कांब‌ळे यांच्या चार, तर मुस्तकिमो मुसा कुरेशी यांच्या दोन बकऱ्यांचीदेखील चोरी झाली. तीन मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी व वरील तिघे बकऱ्यांचा शोध घेत असताना त्यांना पुष्पक गार्डन परिसरात आरोपी नीलेश सोमिनाथ दहिहंडे (२५, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) हा एक बकरी घेऊन जाताना दिसला. त्याच्याजवळ जाऊन पाहिले असता, ती बकरी फिर्यादीचीच असल्याचे लक्षात आले. प्रकरणात तक्रार दिल्यावरून आरोपीला अटक करून कोर्टात हजर केले असता, आरोपीकडून नऊ बकऱ्या हस्तगत करणे बाकी असून, बाहेरगावी बकऱ्यांची विक्री केल्याचे आरोपीने सांगितल्याने त्यांचा शोध घेणे, तसेच इतर कोणत्या प्राण्यांची चोरी केली आहे का, कोणी साथीदार आहे का आदी बाबींचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकान फोडले; तिघांना अटक, पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रेडिमेड कपडे व रोख रक्कम असा सुमारे ८२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणात निलेश संजय श्रीसुंदर, विक्रम विष्णू वायाळ व गौरव तुकाराम निकम यांना रविवारी (तीन मार्च) अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवारपर्यंत (सहा मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

या प्रकरणात लखबीरसिंग बिंद्रा मनजितसिंग बिंद्रा यांनी फिर्याद दिली होती. औरंगपुऱ्यातील कापड दुकान बंद करून ते १३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊला घरी गेले होते. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून रेडिमेड कपड्यांसह दुकानातील रोख रक्कम चोरीस गेला. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन निलेश संजय श्रीसुंदर (वय २२, रा. करमाड) विक्रम विष्णू वायाळ (वय १९) व गौरव तुकाराम निकम (वय १९, दोघे रा. घाटी रुग्णालय क्वार्टर) या तिघांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकी, दोन जीन्स पॅन्ट, एक शर्ट व टी-शर्ट, असा सुमारे ६३ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत (६ मार्च) पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनट्टके यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला १४ लाखांचा गंडा; आरोपीच्या कोठडीमध्ये वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिला डॉक्टरला ठोक व किरकोळ औषधी विक्री व्यवसायात भागीदार करून १४ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणात संशयित आरोपी स्वप्नील पंडित बुटले याच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (सहा मार्च) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

डॉ. कावेरी केदारे-निळ यांनी बुटले याच्यासोबत उल्कानगरीमध्ये हा व्यवसाय करारनामा करून सुरू केला होता. डॉ. कावेरी यांचे पती नंदकुमार निळ यांनी व्यवसायासाठी दुकानाच्या बँक खात्यात १४ लाख रुपये जमा केले होते. मात्र त्यातून काय खरेदी केली, किती विक्री झाली याचा हिशेब बुटले देऊ शकला नाही. त्याने गैरव्यवहार केल्याचे समोर आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. चौकशीमध्ये स्वप्नीलने बँक खात्यातून पैसे काढले, दुकानातील साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या संगणकात बनावट एंट्री केल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला २८ फेब्रुवारी रोजी अटक करून सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या ताब्यातून १४ लाख रुपये हस्तगत करावयाचे आहेत, अकाउंटिंगसाठी वापरलेल्या सॉफ्टवेअरची तपासणी करावयाची आहे, तसेच खरेदी-विक्री केलेल्या औषाधांची पडताळणी करावयाची असल्यामुळे पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल शॉपीमध्ये चोरी; दुसऱ्या आरोपीला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल शॉपीमधून मोबाइल, इतर वस्तू व रोख रक्कम असा ६० हजारांचा ऐवज चोरल्याप्रकरणात आरोपी अजय गमतीदास काळे याला रविवारी (तीन मार्च) रात्री अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीला बुधवारपर्यंत (सहा मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले. याच प्रकरणात यापूर्वी आरोपी संजय उर्फ पप्पू पवार याला अटक करण्यात आली होती व कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत (पाच मार्च) पोलिस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्वर मुळे (२४, रा. मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री साडेदहाला फिर्यादी नेहमीप्रमाणे शॉपीला कुलूप लावून घरी गेला असता, चोरट्यांनी शॉपीचे शटर उचकटून नवीन व जुन्या मोबाइलसह रोख पैसे व इतर साहित्य असा सुमारे ६० हजारांचा ऐवज चोरून नेला. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी संजय उर्फ पप्पू पवार (२६, रा. माऊलीनगर, मुकुंदवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिस कोठडीदरम्यान आरोपी संजयने दिलेल्या माहितीवरून आरोपी अजय गमतीदास काळे (२६, रा. माऊलीनगर, मुकुंदवाडी) याला रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्याने साथीदार राहुल राणा, ज्ञानेश्वर यादव, गणेश उर्फ बंबई छगन मुन्ने व अनिल उर्फ पिल्लेवान दादाराव अव्हाड यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील ९०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्याला सोमवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. आरोपीने गुन्ह्यातील ऐवज कुठे ठेवला; तसेच व गुन्ह्यात कुठल्या वाहनांचा वापर केला याबाबत तपास करावयाचा बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी सैनिकाकडून लाच; जामीन फेटा‌ळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतर जिल्हा बदलीसाठी माजी सैनिकाकडून १५ हजार रुपयांची लाच मागणारा व प्रत्यक्षात १४,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेला जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती विभागाचा वरिष्ठ सहाय्यक संजीव रामभाऊ इंगळे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

या प्रकरणी माजी सैनिक व धर्माबाद (जि. नांदेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिचर शालिग्राम त्र्यंबक शेवाळे यांनी फिर्याद दिली होती. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्याने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला. तेव्हा प्रकरणात तपास करणे बाकी असून, आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो हस्तक्षेप करू शकतो, पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या ट्रकचालक, क्लिनरला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीचालकास चिडणाऱ्या आणि अनेक वाहनांना धडक देणारा ट्रकचालक प्रवीण परमेश्वर मोरे व क्लिनर अविनाश भास्कर शिंदे यांना अटक करून कोर्टात हजर केले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत (आठ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी दिले.

सिल्लोड येथून मका घेऊन निघालेल्या ट्रकने हर्सूल ते चंपा चौकात अनेक वाहनांना धडक दिली. यात दुचाकीस्वाराला चिरडून रिक्षासह पाण्याच्या टँकरला धडक दिल्याने दोन्ही वाहने उलटली. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यासह हर्सूल पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिटीचौक पोलिसांनी ट्रकचालक प्रवीण मोरे व क्लिनर अविनाश भास्कर शिंदे यांना अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता, ट्रकची कागदपत्रे हस्तगत करणे, अवजड वाहनास बंदी असताना गर्दी व बाजारपेठेतून जाणीवपूर्वक वाहने नेऊन मनुष्यवध करण्याचा नेमका काय हेतू होता, ट्रकमधील मका कुठून खरेदी केला का तो मका चोरीचा आहे आदी बाबींची तपासणी करायची असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुद्रा’साठी बनवेगिरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुद्रा लोनसाठी बनावट कोटेशन; तसेच कागदपत्रे देणाऱ्या दोन आरोपीविरुद्ध पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार पाच फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान एन-चार येथील युनियन बँकेच्या शाखेत घडला. बँक अधिकाऱ्यांच्या तपासणीमध्ये हा प्रकार उघड झाला.

याप्रकरणी युनियन बँकेचे मॅनेजर तपनकुमार श्रीरामनंदन प्रसाद (वय ४१ रा. पुंडलिकनगर) यांनी तक्रार दाखल केली. प्रसाद यांच्या शाखेमध्ये महेश आसाराम शिंदे (वय २५, रा. जयभवानीनगर) आणि सिद्धार्थ ठोकळ यांनी महेश शिंदे यांची मुद्रा लोनसाठी प्रस्ताव (फाइल) सादर केला होता. या फाइलमधील कागदपत्रांची पडताळणी व्यवस्थापक प्रसाद आणि सहकारी अधिकाऱ्यांनी केली. यावेळी फाइलमध्ये शिंदे याच्या दुकानाचे नाव रोहिदास फूट वेअर दाखवले होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दुकानाच्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता, त्यांना तेथे अशा नावाचे कोणतेही दुकान नसून, शिंदे यांचे घर असल्याचे आढळले. यानंतर फाइलमध्ये जाधवमंडी येथील चंद्रा ट्रेडर्स नावाच्या फर्मचे कोटेशन होते. अधिकाऱ्यानी चंद्रा टेडर्स गाठून माहिती घेतली. यावेळी त्या दुकानाचे मालक मनोज लखवानी यांनी हे कोटेशन आमच्या दुकानाचे असले तरी, हे आम्ही महेश शिंदे नावाच्या कोणत्याही व्यक्तीला दिलेले नाही; तसेच यावरील मजकूर किंवा सही देखील आमची नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकारानंतर शिंदे आणि ठोकळ यांनी बनावट दस्ताऐवज लोनसाठी दिल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय सोनवणे या प्रकरणी तपास करीत आहेत.

\Bबँक मॅनेजरला दिली धमकी\B

संशयित आरोपी महेश शिंदे हा सिद्धार्थ ठोकळ याला घेऊन पाच फेब्रुवारी रोजी बँकेमध्ये आला होता. व्यवस्थापक प्रसाद यांच्या दालनात त्यांना न विचारता शिंदे आणि ठोकळ घुसले होते. ठोकळ याने व्यवस्थापक प्रसाद यांना दमदाटी करीत,'शिंदे याची मुद्रा लोनची फाइल का नाही करत, मी तुम्हाला बघून घेईल,' अशी धमकी देखील दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पडेगावात आढळला संशयास्पद मृतदेह

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव भागात ५० वर्षांच्या रविवारी दुपारी नागरिकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. विनोद गोपाळराव जाधव (वय ५०, रा. पडेगाव) असे या नागरिकाचे नाव आहे. जाधव यांच्या डाव्या हाताची रक्तवाहिनी कापलेली होती. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विनोद जाधव हे रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास पडेगाव येथील कासंबरी दर्गाह परिसरात एका झाडाखाली बेशुद्धावस्थेत पडलेले होते. पेट्रोलिंग करीत असलेल्या दामिनी पथकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. जाधव यांच्या डाव्या हाताची रक्तवाहिनी कापलेली; तसेच जवळच इंजेक्शनचे सिरिंज पडलेले होते. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालेल्याचे पोलिसांना आढळले. दामिनी पथकाने त्यांना तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विनेाद जाधव हे गारखेडा भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. जाधव यांनी आत्महत्या केली अथवा हा घातपाताचा प्रकार आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मॉर्निग वॉक’ला गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

0
0

वाळूज महानगर : वाळूज येथे औरंगाबाद - नगर महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक महिला ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (चार मार्च) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली़

जुबेदा जलील शेख (४५, रा़ आण्णाभाऊ साठेनगर, वाळूज, ता़ गंगापूर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, नंदाबाई बाळू राऊत (५०, रा़ वाळूज, ता़ गंगापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. या दोघी 'मॉर्निंग वॉक'ला गेल्या होत्या. महामार्गावरून जात असताना औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची घडक दिली होती. यात दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सहायक उपनिरीक्षक नारायण बुट्टे यानी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जुबेदा शेख यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नंदाबाई राऊत यांच्या पायाचे हाड मोडले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे़ याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रीती फड या करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या प्रवेशद्वाराला अतिक्रमणाचा विळखा

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

घाटी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराला पुन्हा एकदा हॉटेल, टपऱ्या, फेरीवाले आणि अॅटोरिक्षाचालकांच्या अतिक्रमणाने विळखा घातला आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात ही अतिक्रमणे पूर्णपणे साफ करण्यात आली होती. पुन्हा एकदा या अतिक्रमणांनी ठाण मांडले असून वाहतुकीला यामुळे अडचण होत आहे.

घाटी हॉस्पिटल मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय हॉस्पिटल आहे. आजुबाजूच्या जिल्ह्यातून देखील या हॉस्पिटलमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना घाटी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच अतिक्रमणांचा सामना करावा लागतो. प्रवेशद्वारासमोर शासकीय क्वाटर्स असून या क्वाटर्सच्या कंपाऊंड वॉलला खेटून अनेक हॉटेल थाटण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशद्वाराला खेटूनच अनेक टपऱ्यांनी बस्तान मांडले आहे. सुरुवातीला तात्पुरती असलेली ही अतिक्रमण आता कायमस्वरुपी झाली आहेत. या अतिक्रमणासोबत फेरीवाले तसेच ऑटोरिक्षाचा गराडा प्रवेशद्वाराला कायम पडलेला असतो. प्रवेशद्वारामधून आतमध्ये जाताना वाहनधारकांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांच्या कार्यकाळात घाटी हॉस्पिटलला भेट दिली होती. यावेळी अवघ्या काही तासात येथील अतिक्रमण मनपाच्या मदतीने त्यांनी पूर्णपणे काढली होती. रिक्षाचालकांवर देखील कारवाईची मोहीम राबविण्यात आली. सध्या मात्र या अतिक्रमणाकडे पोलिस तसेच मनपाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

वाहतूक शाखेचा कानाडोळा

वाहतूक शाखेच्या वतीने नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी उचलण्यात येतात. घाटी हॉस्पिटलच्या आवारातून देखील या दुचाकी मोठ्या प्रमाणावर उचलण्यात येतात. दुचाकी उचलल्यानंतर दंड वसूल करण्यात येतो. वाहतूक शाखेला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी दिसून येतात, मात्र घाटीच्या प्रवेशद्वारासमोर होत असलेल्या अतिक्रमणाकडे त्यांना कानाडोळा होताना दिसत आहे.

घाटी हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या ऑटोरिक्षांवर सातत्याने कारवाई करण्यात येते. या रिक्षाचालकांना दंडाच्या पावत्या देखील देण्यात आल्या आहेत. यापुढे देखील वाहतुकीला अडचण ठरणाऱ्या रिक्षाचालक, फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राजश्री आडे, पोलिस निरीक्षक, बेगमपुरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीला सिटी स्कॅन,. एमआरआयची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील ६४ स्लाईस सिटी स्कॅन बंद पडून तब्बल सहा महिने लोटले असून, नवीन १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशीनच्या खरेदीसाठी 'डीपीसी'तून ७ कोटी रुपये मिळून तब्बल वर्ष लोटले असले तरी अद्यापही हे मशीन घाटीमध्ये उपलब्ध झालेले नाही. त्याचवेळी ३ टेस्ला एमआरआय मशीनच्या खरेदीसाठी शिर्डी संस्थानकडून तब्बल १५ कोटी रुपये मिळून सहा महिने लोटले आहेत. मात्र 'सिटी स्कॅन'सह 'एमआरआय' मशीनचाही पत्ता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, सिटी स्कॅन मशीनची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी हे मशीन घाटीमध्ये उपलब्ध होण्यासाठी मे किंवा जून महिना उजाडू शकतो, असेही समजते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) क्ष-किरण विभागामध्ये सद्यस्थितीत एकच सिटी स्कॅन मशीन चालू आहे. ६४ स्लाईस सिटी मशीन कायमस्वरुपी बंद पडून सहा महिने लोटले आहे. या मशीनच्या सेवेचा कालावधी संपल्याचा निष्कर्ष काढण्यात येऊन जुन्या मशीनच्या दुरुस्तीऐवजी नवीन व अद्ययावत अशा १२८ स्लाईस सिटी स्कॅन मशीनच्या खरेदीचा प्रशासनाने निर्णय घेतला. सुदैवाने जिल्हा नियोजन मंडळाने (डीपीसी) या मशीनच्या खरेदीसाठी ७ कोटींचा निधी मार्च २०१८ मध्येच सुपूर्द केला व हा निधी राज्य शासनाला तेव्हाच वर्गही करण्यात आला. मात्र हा निधी मिळून तब्बल वर्ष लोटल्यानंतर आतापर्यंत केवळ निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबरच हे मशीन घाटीमध्ये उपलब्ध होण्यासाठी मे किंवा जून महिना उजाडणार असेही समजते. नवीन मशीन उपलब्ध होईपर्यंत एकमेव ६ स्लाईस सिटी स्कॅन मशीनवर रुग्णांच्या चाचण्या होणार आहे. या अतिरिक्त ताणामुळे मशीन बिघडले तर काय, या प्रश्नाचे उत्तर आजतरी प्रशासनाकडे नाही.

\B'एमआरआय'चा मुहुर्त लांबच

\Bनवीन सिटी स्कॅन मशीन येत्या तीन ते चार महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी एमआरआय मशीनचा मुहूर्त अजून तरी बराच लांब असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन ३ टेस्ला क्षमतेच्या अद्ययावत एमआरआय मशीनच्या खरेदीसाठी शिर्डी संस्थानने १५ कोटी रुपयांचा निधी घाटीला दिला आणि घाटीच्या इतिसाहातील ही एवढी मोठी देणगी पहिलीच ठरली. हा निधीदेखील ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र या मशीनची खरेदीही 'हाफकिन'कडे अडकली असल्याचे समजते. सद्यस्थितीत घाटीमध्ये जुन्या १.५ टेस्ला क्षमतेच्या एमआरआय मशीनवर सर्व चाचण्या केल्या जात आहे.

……

सिटी स्कॅनसह एमआरआयची खरेदी प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन दोन्ही उपकरणे घाटीत दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. आधीची उपकरणे कार्यरत असल्याने रुग्णांची गैरसोय होत नाही.

\Bडॉ. कैलास झिने\B, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी अधिकाऱ्यांना प्रशासनाचे अभय

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्य लेखापरीक्षकांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालाकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. अहवालात अनेक अधिकाऱ्यांना ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाईची शिफारस केलेली असताना अद्याप कुणावरी कारवाई झालेली नाही. त्यामुळे लेखापरीक्षणाचा अहवाल सोपस्कार आहे का, असे आता बोलले जात आहे. दरम्यान, या अहवालावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी २०१६ - १७ आणि २०१७ - १८ या दोन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल तयार केला आहे. हा अहवाल आयुक्तांसह स्थायी समितीला कारवाई करण्यासाठी सादर करण्यात आला. स्थायी समितीने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा अहवाल स्वीकारला, पण त्यावर चर्चा केली नाही. लेखापरीक्षण अहवालावर अभ्यास करण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली आणि सभापतींनी आठ दिवसांचा वेळ सदस्यांना अभ्यासासाठी दिला. त्यानंतर उद्या मंगळवारी स्थायी समितीची बैठक होत आहे. त्यात लेखापरीक्षण अहवालावर चर्चा होईल असे मानले जात आहे. लेखापरीक्षण अहवालात विविध विभागांच्या कामांबद्दल त्रुटी काढण्यात आल्या आहेत. आविष्कार कॉलनीतील व्यायाम शाळेत साहित्य पुरविण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. स्पील ओव्हरच्या कामात देखील अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्पील ओव्हरमध्ये एक काम दाखवून दुसरेच काम केल्याचा ठपका, तसेच साठा नोंद वहीत साहित्य पुरवठा केल्याबद्दलच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत, असेही काही प्रकरणात अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या पद्धतीवर देखील आक्षेप घेण्यात आला आहे. सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या पद्धतीवर नगरसेवकांनी अनेकवेळा आक्षेप घेतला, सुरक्षारक्षकांनी देखील वेतनाच्या बद्दल वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. लेखापरीक्षण अहवालाची दखल घेवून दोषींवर कारवाई होत नसल्यामुळे अहवाल सादर करण्याचा सोपस्कार केला जातो का, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

\Bफटाका आग प्रकरणातही कारवाई नाही

\Bजिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केटला आग लागली. या प्रकरणात अग्निशमन विभागाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे आढळून आले होते. अग्निशमन विभागाने त्रुटींची पुर्तता होत नसल्याबद्दल मार्केटमधील व्यावसायिकांवर कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करणे अपेक्षित होते, पण तशी कारवाई करण्यात आली नाही. अग्निशमन विभागाच्या नोंदीमध्ये देखील खाडाखोड दिसून येते, दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राप्रमाणे फटाका असोसिएशनकडून अटींचे पालन झाले नाही, अटींचे उल्लंघन करण्यात आले, असेही लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाजेड हल्ला प्रकरणाचा तपास पोलिसांनी गुंडाळला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उद्योगपती छाजेड कुटुंबावरील हल्ल्याच्या प्रकाराला महिना उलटला आहे. या गुन्ह्याचा तपास जिन्सी पोलिस आणि गुन्हे शाखा दोघांकडूनही थंडावल्याचे दिसत आहे. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉडदेखील छाजेड यांच्या घराच्या छतावरच आढळला होता. या संशयास्पद हल्ल्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून, याच्या तपासाचा देखील कोणताही पाठपुरावा तक्रारदारांकडून होत नसल्याचे दिसत आहे.

जालना रोडवरील रघुवीरनगर येथील रहिवारी उद्योगपती पारस छाजेडच्यासह तिघावर यांच्यावर ३० जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या घटनेत छाजेड यांच्यासह, त्यांच्या पत्नी शशिकला आणि नातू पार्थ गंभीर जखमी झाले होते. त्यांची सून विधी या वरच्या मजल्यावर पळाल्याने बचावल्या होत्या. छाजेड यांचा मुलगा आशीष यावेळी बाहेर गेलेला होता. छाजेड यांच्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून, ते सर्व बंद होते. उद्योगपतीच्या घरामध्ये घुसून हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र छाजेड यांच्या घराच्या छतावरच लपवून ठेवले होते. ते तीन दिवसांनंतर पोलिसांना सापडले. हे शस्त्र तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. सुरुवातीला गुन्हे शाखा; तसेच जिन्सी पोलिसांनी तपासासाठी जीवाचे रान केले होते. काही दिवसांनी मात्र हा तपास पूर्णपणे थंडावल्याचे दिसून येत आहे. या घटनेबद्दल माहिती देताना देखील अनेक वरिष्ठ अधिकारी मौन साधत असल्यामुळे हा तपास थंडावला का थांबवण्यात आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापती-आयुक्तांत वाद; पालिकेत अस्थिरता

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थायी समिती सभापती रेणुकादास (राजू ) वैद्य आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यातील वादामुळे महापालिकेत अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोघांत दरी निर्माण झाल्याचा परिणाम विकास कामांवर होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

सभापती वैद्य यांनी काही दिवसांपूर्वी १३ कलमी पत्र लिहून आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. कामाची गती फारच मंद असून आयुक्तांनी गती वाढवली पाहिजे, हे पत्र सकारात्मक दृष्टिने घेवून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली होती. या पत्राला आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत सविस्तर उत्तर देताना ९० मिनिटे मनोगत व्यक्त केले. सभापतींचे आरोप खोडून काढत केलेली कामे सांगितली. काम करूनही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला जात असेल, तर मनोधैर्य खचते, अशी वेदना व्यक्त केली होती. आयुक्तांच्या या उत्तराला वैद्य यांनी पुन्हा एक पत्र लिहून विनाकारण शहराला बदनाम करू नका, असा इशारा दिला होता.

या वादामुळे पालिकेत अस्थिरता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. आयुक्तांसह प्रतिनियुक्तीवरील अधिकारी पालिकेत टिकत नाहीत; त्यांना टिकू दिले जात नाही, असा आरोप सातत्याने पालिका पदाधिकारी, नगरसेवक व काही अधिकाऱ्यांवर केला जातो. कंत्राटदारांची थकबाकी अदा करण्यासाठी काही दिवसांपासून आयुक्तांना घेरले जात आहे, यामागे काही अधिकारी असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमिवर सभापतींनी आयुक्तांवर साधलेले बाण कोणते लक्ष्य भेदणार याबद्दल पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

\Bखैरेंचे ऐकणार का?\B

शनिवारी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात खासदार चंद्रकांत खैरे यांनी सभापती-आयुक्तांतील वादाची दखल घेत पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. सभापती हे खैरैंचे ऐकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता ‘अर्बन सेल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केवळ ग्रामीण भागापुरते मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेसने आता 'अर्बन सेल'ची (शहरी विभाग) स्थापना केली असून या माध्यमातून नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनासमोर जाणार आहे. या विभागात शहरातील २० सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाच्या अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी चव्हाण म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहेच, पण सध्या राज्यातील ५० टक्के नागरिक शहरात राहतात. शहरांतील वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, रस्ते, सुरक्षा, आरोग्य आदी प्रश्न सोडवण्यात महापालिका कमी पडत आहेत. त्यामुळे शहरी भागातील प्रश्नांची सोडवण्याकरिता व नागरिकांना सोबत घेऊन काम करण्यासाठी हा विभाग स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येक नगर पालिकास्तरावरही हा विभाग स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

या विभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहरातील २० सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी एक मोबाइलचा ग्रुप तयार करून एक समन्वयक नेमला जाणार आहे. समितीच्या माध्यमातून दर आठवड्याला शहरातील समस्यांबाबत महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे, असे खासदार चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सेलचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, केंद्रीय समितीचे नवीन ओबेरॉय, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, दत्ता भांगे, मयूर सोनवणे आदींची उपस्थिती होती.

\Bसरकारने केला शहरांचा बट्ट्याबोळ\B

राज्य सरकारने महापालिकांकडे दुर्लक्ष केले असून शहरांचा बट्ट्याबोळ केला आहे, असा आरोप खासदार चव्हाण यांनी केला. औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटीचे काय करायचे हेच पालिकेला माहित नाही; सरकारनेही केवळ स्मार्ट सिटी नाव दिले आहे; शिवसेना-भाजप सरकारने शहरासाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणात सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात घुसून 'तुझा मुलगा सागर आमच्या मुलीची छेडछाड का काढतो', असे म्हणत महिलेसह दोघांना गंभीर मारहाण करणारा आरोपी सुनील शंकर जाधव याला दोन वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी ठोठावली.

या प्रकरणी इंदुबाई राजू चव्हाण (३४, रा. शिवगड तांडा, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २ मे २०१६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी सुनील जाधव (३२, रा. शिवगड तांडा) हा इतर पाच ते सहा आरोपींसह फिर्यादीच्या घरात शिरला आणि 'तुझा मुलगा सचिन आमच्या मुलीची छेडछाड का काढतो', असे म्हणत घरातील फिर्यादी व राजू पंडित चव्हाण यांच्या हाता-पायांवर काठीने मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी सुनील याला भारतीय दंड संहितेच्या ४५२ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरी, भारतीय दंड संहितेच्या ३२६ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

\Bदीड हजार भरपाईचे आदेश

\Bयाच प्रकरणात नुकसान भरपाई म्हणून दंडातील एक हजार रुपये फिर्यादीला, तर पाचशे रुपये राजू पंडित चव्हाण यांना देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एस. पी. निर्मळ यांनी काम पाहिले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाची आज बैठक

0
0

औरंगाबाद:

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीचे मंगळवारी (पाच मार्च) सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको बसस्थानकाजवळील हॉटेल विंडसर कॅसल येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीसाठी राज्यातील सर्व समन्वयकांची उपस्थिती राहणार आहे. मराठा समाजासाठी राज्य शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी तसेच इतर विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपने रविवारी ‘विजय संकल्प रॅली’ काढली. या ‘रॅली’त दुचाकीवर स्वार झालेल्या अनेकांनी हेल्मेट घातले नव्हते. एकीकडे हेल्मेटसक्तीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना दंड आकारला जातो. दुसरीकडे भाजपच्या ‘रॅली’तील दुचाकीस्वारांवर मात्र गुन्हे दाखल झाल्याचे दिसले नाही. ‘रॅली’तील दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा राज्यातील हेल्मेट सक्ती रद्द करावी, अशी मागणी किसान क्रांती संघटनेने केली आहे.

संघटनेचे जयाजी सूर्यवंशी यांनी पोलिस महासंचालकांना ई मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की भाजपच्या ‘विजय संकल्प रॅली’ला आमचा आक्षेप नाही, पण त्यात सहभागी झालेले दुचाकीस्वार विनाहेल्मेट होते. राज्यात सगळीकडे हेल्मेटसक्ती न पाळणाऱ्या नागरिकांना दंड आकारला जातो. कालच्या ‘रॅली’त भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते हेल्मेट न घालता सहभागी झाले होते.

सर्वसामान्य नागरिकांवर दंड आकारून गुन्हे दाखल केले जातात. तसा प्रकार भाजपच्या ‘रॅली’बाबत दिसून आला नाही. कालच्या ‘रॅली’त कायद्या मोडल्याचे गुन्हे दाखल करावेत आणि दंड वसूल करावा, अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल. सरकार गुन्हे दाखल करण्यास सक्षम नसेल तर, ज्या ठिकाणी हेल्मेटसक्ती केलेली आहे ती मागे घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांवर घरी असताना ३५३चे गुनहे दाखल करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा व अन्य आंदोलकांवर पोलिस गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखविली गेली. मग भाजपच्या नेत्यांना यातून सूट का? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनावर किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजी सूर्यवंशी, जिल्हा समन्वयक महेश गुजर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images