Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

केंद्रेकर म्हणतात, कचराप्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे म्हणत एकट्या महापालिकेलाच दोष देऊन चालणार नाही, अशी स्षष्ट भूमिका विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. 'तूर्त योग्य मार्ग बघू, अन्यथा सर्वसामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरण्याचा अधिकार मलाही आहे व त्यानुसार, रस्त्यावर उतरू शकतो,' असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

'रस्त्यावर कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. मी ज्या शहरात राहतो तेथे माझ्या शेजारी कचराकुंडी नको, मी कचराकुंडीत राहणार नाही,' असे केंद्रेकर म्हणाले. 'शहराचा कचराप्रश्न सोडवण्यासाठी जवान, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, मात्र बैठकीला उपस्थित केवळ घनकचरा व्यवस्थापक नंदकिशोर भोंबे उपस्थित राहतात. ' असे म्हणत, 'मी आधी स्वत:कडे शहराचा नागरिक म्हणून पाहतो; त्यानंतर अधिकारी. जर महापालिकेने कचराप्रश्न तातडीने सोडवला नाही, तर मी अधिकारी म्हणून नाही, तर शहराचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरेल, मात्र तशी वेळ येणार नाही. कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर समस्या आटोक्यात आलेली असेल,' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

प्लास्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी एक दिवस आगोदरच प्लास्टिकबंदी संदर्भात बैठक घेत अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. या बैठकीनंतर महापालिकेने शहरात तत्काळ कारवाई सुरू केली होती. प्लास्टिक पिशव्यांबाबत कारवाई करताना पाण्याच्या बाटल्यासंदर्भात काय ? असे आयुक्तांना विचारले असता, एकुणच प्लास्टिकबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका केंद्रेकरांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॅन्सर’च्या उपकरणांची खरेदी ‘टाटा’च्या धर्तीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईच्या 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'च्या धर्तीवर राज्य कर्करोग संस्था अर्थात शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमधील ४३ कोटी रुपयांच्या उपकरणांची खरेदी होणार असून, यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी (आठ मार्च) काढण्यात आला आहे. परिणामी, हॉस्पिटलमध्ये नवीन उपकरणे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी विस्तारित हॉस्पिटलचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर होण्याची प्रतीक्षा असून, 'डीपीआर' मंजूर होताच हॉस्पिटलचे विस्तारित बांधकाम सुरू होईल, अशीही चिन्हे आहेत. या संदर्भात, विस्तारित बांधकाम दोन आठवड्यात सुरू होईल, असा विश्वास 'टाटा'चे संचालक व राज्य सरकारचे समन्वयक डॉ. कैलाश शर्मा यांनी व्यक्त केला.

'टाटा'च्या धर्तीवर कॅन्सर हॉस्पिटलमधील उपकरणांची खरेदी व्हावी, जेणेकरुन उपकरणे हॉस्पिटलमध्ये लवकर उपलब्ध होतील, यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याने; तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहयोगामुळे व डॉ. शर्मा यांच्या पाठपुराव्यामुळे या विषयीचा शासन आदेश शुक्रवारी काढण्यात आला. परिणामी, कॅन्सर हॉस्पिटलमधील उपकरणांच्या खरेदीचा मार्ग सुकर झाला आहे. आता ही उपकरणांची खरेदी 'टाटा'च्या मंजूर 'परचेस ऑर्डर'नुसार होतील, असेही सांगण्यात येत आहे. याबाबत डॉ. शर्मा यांना छेडले असता, आता लवकरात लवकर उपकरणे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतील. तसेच ४३ कोटींच्या उपकरणांमधून प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी, रेडिओथेरपी, रेडिओलॉजी आदी विभागांचे अद्ययावतीकरण होईल, असेही त्यांनी सांगितले. तर, विस्तारीकरणानंतर राज्य कर्करोग संस्था ही देशातील एक सर्वोत्तम कर्करोग संस्था म्हणून लौकिकास पात्र ठरेल, असे हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.

\Bनिधी उपलब्ध, कधीही बांधकाम शक्य\B

सद्यस्थितीत राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारित बांधकामासाठी सुमारे १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध असल्याने विस्तारित बांधकाम कधीही सुरू होऊ शकते, अशी एकंदरीत स्थिती आहे. अर्थात, 'डीपीआर' मंजूर होणे बाकी असले तरी ही औपचारिकता पूर्ण होण्यासाठी फारसा कालावधी लागणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण समाजाचा जूनमध्ये मूक मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी येत्या चार जून रोजी औरंगाबाद येथे मूक मोर्चा आयोजित केला आहे. हा मोर्चा पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघणार आहे. हा निर्णय ब्राह्मण समाजाच्या राज्य समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याची माहिती शुक्रवारी समस्त ब्राह्मण समाज या संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मुंबई येथे २२ जानेवारी रोजी समाजाचे धरणे आंदोलन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनाची अधिकृत घोषणा किंवा समिती स्थापन केलेली नाही. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू आहे, असे सांगण्यात आले. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, शनिवारवाड्यात श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या युद्धाचे ऐतिहासाचे संग्रहालय पेशवे सृष्टी निर्माण करावी, ब्राह्मण समाज-महापुरुषांवर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी महापुरूष बदनामी विरोधी कायदा करावा, ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधावे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान असलेली जागा शासनाने खरेदी करून स्मारक करावे, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आदी मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सचिन वाडे पाटील, दीपक रननवरे, विश्वजीत देशपांडे, अनिल मुळे, विजया कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, सुरेश मुळे, अर्चना सुरडकर, पंकज कुलकर्णी, श्रीकांत जोशी आदींची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचना विभागामुळे पालिकेचे नुकसान

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगररचना विभागाने व्यावसायिकांना निवासी दराने बांधकाम शुल्क आकारल्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

मुख्य लेखा परीक्षकांनी २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल दोन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीला सादर केला होता. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. मुख्य लेखा परीक्षक देवतराज यांनी काही ठळक मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, नगररचना विभागाने व्यावसायिकांकडून निवासी दराने बांधकाम शुल्क वसूल केल्यामुळे पालिकेला एक कोटी ४२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सिडको-हडको भागातील बांधकामांना कमी दराने शुल्क आकारल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. नगररचना विभागाकडे स्वतंत्र कॅश रजिस्टर असले पाहिजे, या विभागाचा लेखा विभागाशी समन्वय असला पाहिजे. या विभागाचे लेखा परीक्षण करताना मोबाइल टॉवर्स, रेखांकनाच्या फाइल, 'टीडीआर'च्या फाइल उपलब्ध झाल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले. २०१५-१६मध्ये ११७९ बांधकाम परवानग्या दिल्या, यापैकी किती जणांनी भोगवटा प्रमाणपत्र दिले याबद्दल शंका आहे. मालमत्तेचे दोन-तीन वेळा नामांतर होते, पण नामांतर शुल्क एक वेळीच आकारले जाते, अशी नोंद अहवालात केल्याचे त्यांनी सांगितले.

कोंडवाडा शुल्क वसुली नियमानुसार होत नाही. वॉर्ड 'अ' कार्यालयातून मागणी रजिस्टर प्राप्त झाले नाही. एकाच मालमत्तेला मालमत्ता कराच्या दोन पावत्या दिल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी नालासफाई न करता मे महिन्यात नालासफाईची निविदा काढून पुढे चार महिने हे काम केले जाते. त्यामुळे मान्सूनपूर्व नालासफाई होत नसल्याचा निष्कर्ष अहवालात काढला आहे.

\Bअर्थसंकल्प वास्तववादी असावा \B

अर्थसंकल्पात ११ ते ४० टक्क्यांची तफावत आहे. तफावत निर्माण होऊ नये यासाठी वास्तववादी अर्थसंकल्प असावा, अशी सूचना मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीला केली. लेखा परीक्षणाकरिता विविध विभागांकडून वार्षिक लेखे विलंबाने मिळाल्याने अहवाल तयार करण्यास उशीर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांना बोलू दिले, तरच त्या सक्षमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नाव मोठे झाले हरकत नाही, पण काम मोठे व्हायला पाहिजे. मुली, महिलांना बुवाबाजीकडे नेऊ नका, तर विज्ञान प्रदर्शन दाखवा, व्याख्यान ऐकण्यास न्या. त्यांना बोलू द्या, संवादी होऊ द्या, तरच त्या खऱ्याअर्थाने सक्षमा होतील,' असे प्रतिपादन ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक शेतकरी वैशाली येडे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्ताने महात्मा गांधी मिशनतर्फे शुक्रवारी रुक्मिणी सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सक्षमा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सोहळ्याचे उद्घाटन येडे यांच्या हस्ते झाले. अनुराधा कदम, शशिकला बोराडे, शोभा कक्कड, डॉ. प्राप्ती देशमुख यावेळी उपस्थित होत्या. येडे यांच्यासह आंबेडकरी गीत गायन करणाऱ्या कडूबाई खरात, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सदस्या सक्षणा सलगर आणि परिएड फेलो रूपल देशमुख यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सक्षमा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी येडे म्हणाल्या, 'एक दिवस महिलांचा सन्मान केला जातो. अन्य दिवसांचे काय ? एकल महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत. समाजाने त्यांचा सन्मान करावा. यासाठी एकल महिला संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू असल्याचे नमूद केले. नाव मोठे झाले हरकत नाही, पण काम मोठे व्हायला हवे,' असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कार्यकर्त्या रूपल देशमुख म्हणाल्या, 'सुमारे ७१ टक्के मुलींना पहिली मासिक पाळी येईपर्यंत याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक पॅड, स्वच्छ कपडेही मिळत नाहीत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक व्यापक काम होण्याची गरज आहे,' असे त्या म्हणाल्या. सामाजिक कार्यकर्त्यां रेणुका कड यांनीही महिलांचे प्रश्न व त्यावर सुरू असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. गायिका खरात यांनी सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी दाद दिली. एमजीएमचे सचिव अकुंश कदम, विश्वस्त प्राचार्य प्रताप बोराडे, अपर्णा कक्कड, प्राचार्य रेखा शेळके यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्विनी दाशरथे, डॉ. आशा माने यांनी केले.

\B'तेरवं'चे सादरीकरण

\Bपुरस्कार सोहळ्यानंतर श्याम पेठकर लिखित व हरीष इथापे दिग्दर्शित तेरंव या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. एकल महिला असलेल्या शेतकरी वैशाली येडे यांच्यासह १३ महिला व त्यांच्या मुलींनी दमदार अभियनाद्वारे शेतकऱ्यांची परवड, एकल महिलांची होणारी परवड व त्यातून पुढे जाण्यासाठी केलेला यशस्वी संघर्ष मांडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेणीत बेवारस बॅग

0
0

फर्दापूर येथे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शुक्रवारी सकाळी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम केली. लेणी परिसरात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली. फर्दापूर पोलिसांनी विविध पथकांच्या मदतीने दिड ते दोन तासात बॅग ताब्यात तपासणी केली. हा पोलिसांच्या सरावाचा भाग असल्याचे सांगितल्यावर पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर मेहताला अटकेची फ्लॅटधारकांची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर. के. कान्स्ट्रोचा संचालक समीर मेहता याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट निघालेले असून, पसार मेहताला अटक करण्याची मागणी फ्लॅटधारकांनी केली आहे. या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेत निवेदन सादर केले.

मेहता याने चिकलठाण्यापुढील हिरापूर येथे ४५२ फ्लॅटचा प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पामध्ये अनेकांनी गुंतवणूक करीत फ्लॅट बुक केले होते, मात्र मेहता याने हा प्रकल्प पूर्ण केला नसल्याने गुंतवणुकदारांची या प्रकरणात फसवणूक झाली होती. मेहता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील करण्यात आली होती. गुंतवणुकदारांनी मेहता विरोधात ग्राहक पंचायतीमध्ये देखील दावा दाखल केला होता. मेहता याच्याविरुद्ध २२ फेब्रुवारी २०१८ रोजी अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तेव्हापासून मेहता पसार आहे. पसार समीर मेहताला अटक करण्यात यावी याकरीता गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेत मागणी केली. यावेळी शिष्टमंडळात नरेंद्रसिंह मौर्य,जग्गनाथ मुंडे, चंद्रशेखर काकडे, प्रवीण पारिक, अमोल चव्हाण, अशोक देशमुख, सचिन बालटे, वाल्मिक जगाडे, संजिव पारिक यांच्यासह इतरांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेत घसरगुंडी का?; उत्तर देणारे अधिकारी गैरहजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबादचा क्रमांक शेवटून दुसरा आला. स्वच्छतेसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला असताना शहराची 'अशी प्रगती' कशी झाली, असा सवाल शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत विचारण्यात आला. पण त्याचे उत्तर देण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने सभापतींनीच वेळ मारून नेली.

शहरात चार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत असून तेथे वजन काटा लावण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने बैठकीत ठेवला होता. यासाठी एन्डेवर इन्स्ट्रुमेंट प्रा. लि. कंपनीची निविदा स्वीकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. यावेळी गजानन बारवाल यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालाचा मुद्दा उपस्थित केला. 'कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने ९१ कोटींचा निधी देऊन मदत केलेली असताना चांगले काम होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून औरंगाबादचा नंबर शेवटून दुसरा व देशात २२० वा आला. शहराची एवढी घसरण कशी झाली,' असा मुद्दा मांडत त्यांनी खुलासा मागितला. मात्र, खुलसा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे सभापती रेणुकादास वैद्य यांनी भूमिका स्पष्ट केली.

\Bसभापतींकडून सारवासारव \B

अचानक कचराकोंडी निर्माण झाल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. ही समस्या एका वर्षात सुटणे शक्य नाही, त्यामुळे शेवटून पहिला क्रमांक आला असता, तरी आश्चर्य वाटले नसते. पुढील वर्षी आपले शहर पहिल्या दहामध्ये येईल, अशी अपेक्षा सभपती वैद्य यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चारा, पाण्याची सोय करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपुऱ्या पडलेल्या पाऊसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर, रब्बीची पेरणीही करता आली नाही. आता दुष्काळाचे चटके अधिक जाणवू लागले असून, पाण्यासह जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने याची तातडीने दखल घेत उपाययोजना कराव्यात, अशी विनंती पळशी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत करत दुष्काळामुळे निर्माण झालेली विदारक परिस्थितीबाबत माहिती दिली.

शहरापासून जवळ असलेल्या पळशी येथील बहुतेक शेतकरी भाजी-पाल्याचे उत्पादन घेतात. शेतकऱ्यांकडे सुमारे दीड हजारांवर जनावरे आहेत, परंतु भीषण दुष्काळामुळे शेतकरी हैराण झाल्याचे किसान सेनेचे उप जिल्हा प्रमुख नानासाहेब प‌ळसकर यांनी सांगितले. पावसाळ्यात गाव परिसरात जेमतेम पाऊस पडला. खरिपाचे नुकसान झाले, तर रब्बीची पेरणीही करता आली नाही. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असून, आता विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गाव परिसरात ६० ते ७० शेततळी आहेत. काही अपवाद वग‌ळता शेततळ्यांतही पाणी नाही. फळबागा कशा जगवायच्या याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे.

त्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका हा मुक्या जनावारांना बसत असल्याचे नानासाहेब पळसकर व संतोष काजळे यांनी सांगितले. चारा नाही आणि पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत असून, हाती पैसा नसल्याने महागडा चारा, पाणी कुठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याचे त्यांनी नमूद करत जनावरे कशी जगावायची, असा प्रश्न त्यांनी केला. चारा, पाणी प्रश्नामुळे नुकतीच गाय विक्री करावी लागल्याचे शिवाजी पळसकर या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. ५५ हजार रुपयास घेतलेली गाय नाइलाजाने २५ हजार रुपयांस विकावी लागल्याची माहिती त्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. दररोजचा खर्च भागविण्यासाठी पैसे नाही, अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न सुद्धा रखडत आहे. शेतकऱ्यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. मुक्या जनावरांसाठी त्वरित चारा छा‌वणी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. सुभाष लहाने, बाबासाहेब पळसकर, कचरू पळसकर, संजय पळसकर, राजेंद्र पळसकर, मन्सूर शहा, सोमिनाथ पळसकर, आसाराम शेळके यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

\Bगावाला टँकरद्वारे पाणी\B

तहानलेल्या गावाला सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी आठ-आठ दिवसानंतर मिळते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

\Bदुष्काळाकडे दुर्लक्ष होण्याची भीती\B

लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. आता प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त राहिल. त्यामुळे दुष्काळाकडे दुर्लक्ष होण्यार नाही ना, असा प्रश्नही ग्रामस्थांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सळया कापण्यासाठी चक्क विजेची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

महावितरणच्या कन्नड उपविभांतर्गत अंबाडी धरणालगत पाण्याचा जार कारखाना व शिऊर बंगला ते सिल्लोड रस्त्यावरील पुलाचे गज कापण्यासाठी आकडे टाकून विजेची चोरी सुरू होती. महावितरणने केलेल्या कारवाईत सुमारे ४२ हजार ६९० रुपयाची वीजचोरी पकडण्यात आली आहे.

महावितरणचे नव्यानेच रुजू झालेले कन्नड विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस व उपकार्यकारी अभियंता विजय दुसाने यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक शाखेस भेट देत आहेत. चापानेर शाखेकडे जाताना बनशेद्रा येथील शाळेसमोर शिऊर बंगला ते सिल्लोड या राज्य महामार्गाच्या पुलाचे काम चालू असल्याचे दिसले. तेथे पुलाच्या स्लॅबसाठी लागणाऱ्या लोखंडी सळया कापण्यासाठी बांधकामाचे तात्पुरते विजेची जोडनी न घेता, थेट आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळले. या रस्त्याचे काम मे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे असल्याचे कळाले. त्यांची वीजचोरीची रक्कम २५ हजार ५८० रुपये होती; तसेच दुसऱ्या घटनेत गोकुळ निमचंद राठोड (रा. तेलवाडी) यांनी अंबाडी धरणाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या लगत 'चैतन्य अक्वा' या नावाने फिल्टर व थंड केलेले पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी , लघुदाब वाहिनीवर थेट आकडा टाकून वीज चोरली आहे. त्यांनी रक्कम १७ हजार २९० रुपयांची वीजचोरी केल्याचे दिसून आले.

दोन्ही प्रकरणांत वीजचोरी व तडजोडीच्या रकमेसह एकूण ५७ हजार ६९० रुपये दंडाचे बिल दिले आहे. त्यांनी तीन दिवसांत वीज बिल न भरल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. ही दंडात्मक कारवाई सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता संजय आकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्क अभियंता सचिन केदारे व योगेश चेंडके यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तब्बल ७५ योजनांचे उद्घाटनही नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाने होरपळ होत असलेल्या मराठवाड्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधीं निधी मंजूर होऊनही गेल्या दोन वर्षांत १५५ पाणीपुरवठा योजनांपैकी ७५ योजनांचे उद्घाटनही झाले नाही. त्यामुळे या अपूर्ण योजनांची कामे तत्काळ सुरू करा, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

दुष्काळाला तोंड देण्यासाठी शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मराठवाड्यात कासवगतीने योजना पूर्ण होत आहेत. नवनियुक्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे अपूर्ण असलेल्या योजनांची कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. या बैठकीसाठी विकास नियोजन उपायुक्त सुर्यकांत हजारे यांचीही उपस्थिती होती. गेल्या दोन वर्षांमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत एक एप्रिल २०१८ पर्यंत जिल्हा परिषदेच्या १४६, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तीन अशा एकूण १४९ योजनांचे काम पूर्ण करावयाचे होते. २०१८-१९मध्ये जिल्हा परिषदेच्या सहा अशा एकूण १५५ योजनांचे काम पूर्ण करावयाचे होते. मात्र, फेब्रुवारी २०१९पर्यंत जिल्हा परिषदेच्या ४७, तर 'एमजेपी'ची एक अशा केवळ १४८ योजना पूर्ण आहेत. आता प्रशासनासमोर १०७ योजना पूर्ण करावयाचे टार्गेट असून, यापैकी जिल्हा परिषदेच्या ३० तर एमजेपीच्या दोन अशा ३२ योजनांचेच काम सुरू आहे. तर जिल्हा परिषदेच्या ७५ योजनांचे अजून उद्घाटनही झालेले नाही. कामे पूर्ण न झाल्याची कारणे संबंधित विभागांनी दिली असून यामध्ये उद्भव कोरडा असणे (४ प्रकरणे), जागेचा वाद (५), पाणीपुरवठा समितीकडून प्रतिसाद नसणे (२६), न्यायालयीन प्रकरणे (१५), वनविभागाची परवानगी नाही (२), खर्च वाढल्यामुळे सुधारित अंदाजपत्रकांअभावी प्रलंबित असलेल्या सात, तर इतर कारणांमुळे सात योजनांच्या कामाला अद्यापही हात लावण्यात आलेला नाही.

\B...तर कामे झेडपीकडे

\Bपाणीपुरवठा समितीने कामे करण्यास असमर्थता दर्शवल्यास ही कामे जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजनांची स्थिती तुलनेत बरी असून, या अंतर्गत जिल्हापरिषदेच्या १९१ योजनांपैकी १७७ योजनांसाठी कार्यारंभ आदेश दिले आहेत. नांदेड आणि औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलस्वराज प्रकल्पासाठी दोन्ही जिल्ह्यांना प्रत्येकी सात अशा १४ योजना मंजूर असून, यापैकी १२ योजनांसाठीचे कार्यारंभ आदेशही दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकने चिरडल्याने महिला ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपासवरील एमआयटी कॉलेजजवळ शुक्रवारी दुपारी दीड वाजता ट्रकने चिडल्याने दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर पती जखमी झाला. स्नेहल मनोज बावळे (वय २७, रा. गोल्डन सिटी, ईटखेडा) असे मृत महिलेचे नाव आहे.

स्नेहल बावळे आणि त्यांचे पती मनोज बावळे शुक्रवारी दुपारी अॅक्टिव्हा मोपेडवर शिवाजीनगरमध्ये खरेदीसाठी गेले होते. तेथून तीन मोठे सामानाचे बॉक्स घेऊन मोपेडवर ते बीड बायपासमार्गे ईटखेडा येथे जात होते. एमआयटी कॉलेजच्या सिग्नलजवळ त्यांच्या मोपेडवरील बॉक्सचा धक्का बाजूने जाणाऱ्या ट्रकला लागला. यावेळी मोपेड खाली कोसळली. यावेळी स्नेहल यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर मनोज यांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ओढल्याने ते किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसीपी ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मनोज यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात ट्रकचालकावर अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

\Bबळींचे सत्र सुरूच

\Bबीड बायपास रोड गेल्या काही वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. दरवर्षी या ठिकाणी प्राणांतिक अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत बळीने शंभराचा आकडा ओलांडला आहे. २००३पासून आतापर्यंत या भागात तब्बल ९८ जणांचे बळी गेले आहेत. तरीही येथे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

---

वर्ष मृतांची संख्या

---

२००३ १

२००४ ५,

२००५ ३,

२००६ ५

२००७ ५

२००८ ७

२००९ ४

२०१० २

२०११ ५

२०१२ ६

२०१३ १०

२०१४ ६

२०१५ ६

२०१६ ८

२०१७ १६

२०१८ ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरते स्वच्छतागृह, व्हॅक्युम, जेटिंग मशीनचे दर दुप्पट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फिरते स्वच्छतागृह, व्हॅक्युम व जेटिंग मशीनचे शुल्क महापालिकेने दुप्पटीपेक्षा जास्त वाढवले आहे. ही दर‌वाढ दहा वर्षांनंतर होत असल्याने स्थायी समितीने मान्यता द्यावी, अशी विनंती प्रशासनाने स्थायी समितीला केली.

महापालिकेतर्फे सभा, समारंभ, यात्रांसाठी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले जाते. सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्युम मशीन, ड्रेनेज लाइनचे चोकअप काढण्यासाठी जेटिंग मशीन शुल्क आकारून दिले जाते. या शुल्कात २००८ वाढ केलेली नव्हती.

\Bअशी आहे दरवाढ \B

फिरत्या स्वच्छतागृहाचे शुल्क पाचशे रुपयांवरून १२५० रुपये केले आहे. व्हॅक्युम मशीनचे शुल्क सात रुपये प्रति घनफूटवरून १७ रुपये प्रति घनफूट केले आहे. जेटिंग मशीनचे शुल्क ३५ रुपये रनिंग फूट वरून ६५ रुपये रनिंगूफुट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार खैंरेंची माझ्याकडे संपूर्ण कुंडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'खासदार चंद्रकांत खैरे यांची कुंडली माझ्याकडे आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सुभाष पाटील यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे,' अशी माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

राणे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पाच जागा लढवणार आहोत. जेथे शिवसेना लढणार तेथेच उमेदवारी दिली जाईल. औरंगाबादेतून पहिली उमेदवारी जाहीर केली. सुभाष पाटील यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. जिल्ह्याला ते नवखे नाहीत. पक्षाचे निवडणूक चिन्ह आठवडाभरात येईल. येथून खैरेंना पराभूत करावयाचे आहे, असे ते म्हणाले. २०१९च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येईल, भाजपला २०० जागा मिळू शकतात, असा दावा राणे यांनी केला. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, असे वाटते. राज्यात शिवसेना-भाजपची युती जबरदस्तीने, नाईलाजाने झाली आहे. साडेचार वर्षे शिवसेना-भाजपने एकमेकांना शिव्या घातल्या आणि आता सत्ता मिळवण्यासाठी ते एकत्र आले. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे, असे विचारले असता राणे यांनी नाव समोर आले असल्याचे सांगितले. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी महापौर सुदाम सोनवणे यांची निवड नारायण राणे यांनी जाहीर केली.

\Bमराठा आरक्षण कोर्टात टिकेल \B

मराठा आरक्षण कोर्टात टिकेल काय? या प्रश्नावर राणे म्हणाले, मराठा आरक्षण कोर्टात टिकेल. राज्य सरकाने यासंदर्भात नेमलेल्या समितीचा मी अध्यक्ष होतो. सर्व कायद्याचा अभ्यास करून आरक्षण जाहीर केले होते. सत्तांतर झाले. ठराविक कालावधीपर्यंत प्रतिज्ञापत्र या सरकारने न दिल्याने स्थगिती आली. पण पुढे अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भाशयाच्या कर्करोगाचा वेध घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगाचा समग्र वेध घेणाऱ्या डॉ. विणू अग्रवाल यांनी लिहिलेल्या 'कॅन्सर सर्व्हिक्स : अ कम्प्लिट अॅप्रोच' या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (आठ मार्च) घाटीतील महात्मा गांधी सभागृहात झाले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा प्रकाशन सोहळा घेण्यात आला, हे विशेष.

याप्रसंगी 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल'चे सैक्षणिक संचालक व राज्य सरकारचे समन्वयक डॉ. कैलाश शर्मा, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, 'टाटा'तील किरणोपचार विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश अग्रवाल, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, किरणोपचार विभागप्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. मंगला बोरकर, डॉ. प्रभा खैरे, डॉ. ओ. टी. अग्रवाल, डॉ. सोनाली देशपांडे, ऋषिकेश खाडीलकर, डॉ. अर्चना राठोड आदींची उपस्थिती होती.

यासंदर्भात लेखिका व कॅन्सर हॉस्पिटलमधील किरणोपचार विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विणू अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, 'सामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय विद्यार्थी, गर्भाशयाच्या कर्करोगाचे उपचार करणारे स्त्रीरोगतज्ज्ञ, इतर डॉक्टर, ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका आदी सर्वांसाठीच या पुस्तकाद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल सर्व प्रकारची सविस्तर माहिती अतिशय सोप्या भाषेत देण्यात आली आहे. केवळ २० चॅप्टरद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाची व्याप्ती, त्याच्यावरील नवनवीन उपचार पद्धती, संशोधन, अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांनी घ्यावयाची काळजी आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. एरवी या आजाराबाबत वेगवेगळ्या पुस्तकांमधून संदर्भ शोधावे लागतात, ही गरज ओळखून एकाच पुस्तकामध्ये सर्व संदर्भ देण्याचा प्रयत्न केला.'

डॉ. नाझनीन सिद्दिकी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ. शुभांगी घुले, डॉ. पूजा तोतला, डॉ. ज्योती कोडगिरे, डॉ. तेजल वधान, डॉ. पूजा मोते, डॉ. सोनल पाचोरे, श्रीमती सामरा यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपट समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चित्रपट किंवा लघुपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते संवेदनशील समाजनिर्मितीचे प्रभावी माध्यम आहे' असे प्रतिपादन 'मावा'चे संस्थापक अध्यक्ष हरिश सदानी यांनी केले. ते चित्रपट महोत्सवात बोलत होते.

जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, आजीवन शिक्षण व विस्तार विभाग, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग आणि मेन अगेन्स्ट व्हॉयलेन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्यूझ् (मावा) या संस्थेच्या वतीने 'जेंडर डायव्हर्सिटी फिल्म फेस्टिव्हल' आयोजित करण्यात आला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी विभागाच्या सभागृहात शुक्रवारी महोत्सवाचे केले. यावेळी कुलसचिव डॉ. साधना पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, वैशाली खापर्डे, अधिष्ठाता डॉ. संजय सोळंके, डॉ. वाल्मिक सरवदे, आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. संजय मून, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाच्या डॉ. संध्या मोहिते व 'मावा'चे संस्थापक हरिश सदानी, प्रवीण थोटे उपस्थित होते. उदघाटन सत्रानंतर स्त्रियांच्या पारंपरिक व कौटुंबिक श्रमावर भाष्य करणारा 'ज्यूस' लघुपट दाखवण्यात आला. या लघुपटात सार्वजनिक अवकाशातील पितृसत्ताक राजकारणावर भाष्य आहे. समलैंगिक व तृतीयपंथीय नागरिकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणारा 'एनी अदर डे' व 'सुंदर' लघुपट दाखवण्यात आले. चित्रपटांवरील चर्चेत माध्यम अभ्यासक प्रा. जयदेव डोळे व डॉ. संजय मून, प्रा. मुस्तजीब खान, प्रा. प्रकाश शिरसाठ, डॉ. आनंद उबाळे यांनी सहभाग घेतला. महोत्सवाला वैशाली मुळे, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. निर्मला जाधव, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. मंजुश्री लांडगे, डॉ. सविता बहिरट, अनिता देवळे यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

\Bसमारोप आज

\Bचित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप होणार आहे. यात एक इन्कलाब और आया, नेटिझन्स, एन्ड बिगिनिंग, द वर्ल्ड बिफोर हर, नकुसा, डेव्हलपमेंट रिव्होलेशन, शी ऑब्जेक्ट्स, कन्व्हरसेशन अबाउट कॉनसंट अ‍ॅन्ड रिजेक्शन, एस. दुर्गा चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. विद्यार्थी व रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापन परिषदेत खडाजंगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्व. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत फक्त ३० विद्यार्थी शिकत असताना २८ पदांची जाहिरात देण्याचा निर्णय राजकीय दबावातून झाल्याचा आरोप व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केला आहे. दोन गटातील मतभेदानंतर मतदान प्रक्रिया राबवून पद भरतीला मान्यता देण्यात आली.

विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेची बैठक वादळी ठरली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्व. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेतील विविध पदांच्या २८ रिक्त जागा भरण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. या जागा भरण्याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी आग्रह धरला होता. या प्रस्तावाला विरोध झाल्यामुळे ऐनवेळचा विषय म्हणून विषय मांडण्यात आला. बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे ११ मतांचे बहुमत मिळवत निर्णयाला मान्यता घेण्यात आली. भरती प्रक्रियेनंतर विद्यापीठाला वेतनापोटी दरमहा १७ लाख रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. आतापर्यंत संस्थेला फक्त ६० लाख रुपये निधी मिळाला असून, ४० लाख रुपये खर्च झाला आहे. फक्त ३० विद्यार्थ्यांसाठी वर्षाला एक कोटी ३० लाख रुपये खर्च करणे योग्य नसल्याचे डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. हा ठराव मतदानासाठी टाकण्याचा निर्णय कुलगुरू व कुलसचिव यांनी घेतला. त्यामुळे असहमती (डिसेंट नोट) देत असल्याचे संजय निंबाळकर, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, डॉ. नरेंद्र काळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, प्रा. राहुल म्हस्के, सुनील निकम, डॉ. राजाभाऊ करपे यांनी निर्णयाला विरोध केला. निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी हा निर्णय झाल्याचा आरोप करपे यांनी केला. कुलगुरू व कुलसचिव यांनी चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गटाच्या बाजूने मतदान करून घेण्याबाबत निर्णय घेतल्याचे पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तांच्या कामावर विभागीय आयुक्त नाराज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे म्हणत एकट्या महापालिकेलाच दोष देऊन चालणार नाही, अशी स्षष्ट भूमिका घेतली आहे. त्याचवेळी त्यांनी पालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. 'तूर्त योग्य मार्ग बघू, अन्यथा सर्वसामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर उतरण्याचा अधिकार मलाही आहे व त्यानुसार, रस्त्यावर उतरू शकतो,' असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

'रस्त्यावर कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे ही जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांचीही आहे. मी ज्या शहरात राहतो तेथे माझ्या शेजारी कचराकुंडी नको, मी कचराकुंडीत राहणार नाही,' असे केंद्रेकर म्हणाले. 'शहराचा कचराप्रश्न सोडवण्यासाठी जवान, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, मात्र बैठकीला उपस्थित केवळ घनकचरा व्यवस्थापक नंदकिशोर भोंबे उपस्थित राहतात. आयुक्त कुठे तर मुंबईला, हे औरंगाबाद शहरात कमी आणि इतरत्रच अधिक दिसतात,' असे म्हणत, 'मी आधी स्वत:कडे शहराचा नागरिक म्हणून पाहतो; त्यानंतर अधिकारी. जर महापालिकेने कचराप्रश्न तातडीने सोडवला नाही, तर मी अधिकारी म्हणून नाही, तर शहराचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरेल, मात्र तशी वेळ येणार नाही. कचऱ्यावर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर समस्या आटोक्यात आलेली असेल,' असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

\Bप्लास्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी\B

विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी एक दिवस आगोदरच प्लास्टिकबंदी संदर्भात बैठक घेत अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. या बैठकीनंतर महापालिकेने शहरात तत्काळ कारवाई सुरू केली होती. प्लास्टिकबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी भूमिका केंद्रेकरांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालकाला लुटणारे तिघे गजाआड

0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रकचालकाचे दोन हजार लुबाडणाऱ्या तीन आरोपींना सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली असून, दारू पिण्यासाठी आरोपींनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

याप्रकरणी मनोज रघुनाथ परदेशी (वय ३२, रा. विहारा गाव, जि. तापी) यांनी तक्रार दाखल केली. मनोज हा ट्रकचालक असून, बुधवारी एमआयडीसी भागातील जॉलीबोर्ड कंपनीमध्ये ट्रकमध्ये माल आणला होता. ट्रकमधील माल काढण्याचे काम पूर्ण झाल्याने मनोज हा कंपनीसमोर ट्रक उभा करून जेवण करण्यासाठी पायी नारेगावला गेला होता. जेवण केल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता तो ट्रककडे परतत होता. यावेळी रस्त्यामध्ये तीन अनोळखी आरोपींनी त्याला अडवले. यावेळी एका आरोपीने,'विष्णू तुम्ही याला पकडून ठेवा,' असे म्हणत त्याला धाक दाखवला व त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून पसार झाले होते. मनोजने सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणी तात्काळ तपास सुरू केला.

मनोजला लुबाडणारे आरोपी नारेगाव येथील देशी दारुच्या दुकानासमोर उभे असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकाने सापळा रचून संशयित आरोपी सुनील सिद्धार्थ नवतुरे (वय ३२) विष्णू श्रीराम ढेपे (वय ३१) आणि किशोर म्हसू पगारे (वय ३२, सर्व रा. ब्रिजवाडी) यांना अटक केली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली देत दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने मनोजला लुबाडल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, सुरेश जारवाल, जमादार मुनीर पठाण, शाहेद शेख, गणेश राजपूत, शिंदे आणि सुंदर्डे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समिती सभापती आयुक्तांपुढे हतबल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी स्थायी समितीला शेवटी हाबाडाच दिला. त्यामुळे सभापतींसह स्थायी समितीचे सदस्य हतबल झाले. अतिरिक्त आयुक्तांच्या आधारेच त्यांना स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीचे कामकाज करावे लागले.

आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या केलेल्या नियुक्त्या, कंत्राटदारांची थकबाकी यासह प्रशासकीय कामकाजाबद्दल आयुक्तांनी स्वत: स्थायी समितीच्या बैठकीत खुलासा करावा, अशी मागणी सभापती व समिती सदस्य काही महिन्यांपासून करत आहेत. आयुक्तांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे पत्र सभापती रेणुकादास वैद्य यांनी आयुक्त कार्यालयाला दिले होते. पण आयुक्तांनी या पत्राची दखल घेतली नाही. त्यांनी बैठकीला त्यांचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंत्यांना पाठवले. दरम्यान, सभापतींनी आयुक्तांवर 'लेटर बॉम्ब' टाकत त्यांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला. त्याला आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत सविस्तर उत्तर दिले.

त्यानंतर सभापतींनी पुन्हा पत्र देवून शुक्रवारच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आयुक्तांना सूचवले होते. मात्र, ते बैठकीला गैरहजर राहिले. ते बाहेरगावी गेल्याची व ते शहरातच असून इतर महत्त्वाच्या कामात गुंतले असल्याचे बोलले जात होते. कारण काहीही असले तरी त्यांनी सभापतींच्या पत्राला किंमत दिली नाही, हे वास्तव आहे. कोणत्या अधिकाऱ्याला कोणते काम द्यायचे, हा आयुक्तांचा अधिकार आहे, असा खुलासा सर्वसाधारण सभेत करून आयुक्तांनी नियुक्त्यांबद्दलचा आक्षेप खोडून काढला होता. लेखा परीक्षण अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठकीला येवून अहवालाबद्दल खुलासा करावा, असे प्रयत्न होते. पण, त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवून सभापतींची चाल मोडित काढल्याचे बोलले जात आहे. विद्यमान सभापतींच्या काळात दुसरी बैठक होण्याची शक्यता नाही. बैठक झालीच, तर ती अर्थसंकल्पाची असेल आणि तिचे स्वरुप तांत्रिक असेल. या बैठकीत आयुक्त अर्थसंकल्प सादर करतील, पण सभापती व सदस्यांना त्यांना इतर मुद्यांवर घेरता येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images