Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कुलगुरूंना दाखवले ‘संकेत’ !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थायी परीक्षा संचालक व कुलसचिव नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, साडेचार वर्षे प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार चालवणाऱ्या कुलगुरूंना कार्यकाळाच्या शेवटच्या दोन महिन्यात अधिकारी नेमण्याची घाई का झाली, असा सवाल राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केला आहे. कुलगुरू आणि राज्यपालांना दिलेल्या पत्रात शितोळे यांनी कुलगुरूंना अलिखित संकेतांची आठवण करून देत प्रक्रियेला विरोध केला आहे.

विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक पद रिक्त असल्यामुळे साडेचार वर्षे प्रभारी अधिकाऱ्यावर कारभार चालवण्यात आला. आतापर्यंत नऊ संचालकांनी चोपडे यांच्या कार्यकाळात काम केले. अनेकदा मागणी होऊनही स्थायी अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ जून महिन्यात पूर्ण होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात चोपडे यांनी दोन्ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, शेवटी पदे भरण्याची घाई कशासाठी असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रक्रियेला राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी विरोध केला आहे. याबाबत चोपडे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन संचालक आणि कुलसचिव अशा प्रमुख पदांची नियुक्ती नवीन कुलगुरूंनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या टीमची निवड करावी असा संकेत आहे. तुमचा कार्यकाळ मे २०१९मध्ये संपणार आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात भरती प्रक्रिया करणे योग्य नाही. नवीन कुलगुरूंसाठी हा पर्याय राखून ठेवणे योग्य असेल. राज्यपालांचा प्रतिनिधी या अधिकाराने हे सूचवित आहे, असे शितोळे यांनी पत्रात म्हटले आहे. मागील पाच वर्षांत या जागा पूर्णवेळ न भरता प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने कामकाज चालवले आहे. आता शेवटच्या दोन महिन्यात घाई करणे योग्य दिसणार नाही, असे शितोळे यांनी सूचवले आहे. शेवटच्या कार्यकाळात मोठे आर्थिक व धोरणात्मक निर्णय घेणे, नवीन प्राधिकरणे व समित्या नेमण्याचे निर्णय घेऊ नयेत असा अलिखित संकेत आहे. अत्यंत निकडीचा निर्णय असल्यास माझ्याशी व व्यवस्थापन परिषदेशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, असे शितोळे यांनी कुलगुरूंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची एक प्रत राज्यपालांना पाठवली आहे. कुलसचिव पदासाठी ३१ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर परीक्षा व मूल्यापन संचालक पदासाठी १६ अर्ज आले आहेत. या पत्रामुळे कुलगुरू कोंडीत सापडले असून प्रक्रिया बारगळण्याची शक्यता आहे.

\Bवशिलेबाजीची खुली चर्चा

\Bकुलगुरू चोपडे यांच्या कार्यकाळाचे शेवटचे दोन महिने शिल्लक आहेत. या टप्प्यात त्यांच्या निकटवर्तीय अधिकारी व प्राधिकरण सदस्याची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होण्याची विद्यापीठात चर्चा सुरू आहे. या प्रकाराची चर्चा वाढल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनिमित्त शितोळे यांनी पत्र देऊन चोपडे यांच्या प्रक्रियेला 'ब्रेक' लावले आहे.

\Bव्यवस्थापन परिषदेत चर्चा\B

विद्यापीठात शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मागील ६५ विषयांना मान्यता देण्यात आली. तसेच परीक्षा केंद्रावर अनेक वर्षांपासून लिहिलेल्या जुन्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पडले आहेत. या उत्तरपत्रिका परीक्षा विभागाने नियमानुसार नष्ट कराव्यात असा ठराव घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरपंच मनीषा शिंदे यांना दिलासा

$
0
0

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी येथील सरपंच मनीषा दिलीप शिंदे यांना औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सरपंच व सदस्य पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. न्या.सुनील पी.देशमुख यांनी या प्रकरणात पुढील कार्यवाही न करण्याचे आदेश दिले आहेत.

११ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासनाच्या आदेशानुसार, सरपंच शिंदे यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयश आले. दोन फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले. त्यांनी याचिका दाखल केली. महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती(सुधारणा) अध्यादेश २०१९ नुसार, वैध कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास, सदर पद अनर्ह ठेवता, येत नाही. तसेच या सुधारित अध्यादेशामुळे शिंदे यांना १४ मे २०१९ रोजीपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येईल, असा युक्तीवाद सरपंचाचे वकील रवींद्र गोरे यांनी केला. सुनावणीअंती खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करू नये, असे आदेश दिले. गोरे यांना नारायण मातकर व चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले. या याचिकेवर २५ मार्च रोजी सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोसले वंशज मेळाव्यासह शहाजी राजे जयंती महोत्सव

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदा शहाजी राजे जयंती महोत्सवाचे १८ मार्च रोजी आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात भोसले कुळ वंशज मेळावा आणि दीपोत्सव होणार आहे, अशी माहिती शहाजीराजे भोसले स्मारक सल्लागार समितीचे सदस्य किशोर चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत शहाजी राजे भोसले उत्सव समितीची कार्यकारिणीही घोषित करण्यात आली. या समितीचे अध्यक्षपद प्रा. रवींद्र बनसोडे - पाटील यांना देण्यात आले आहे. स्वागत अध्यक्ष विलास पांगरकर, कार्याध्यक्षपदी राजेंद्र पवार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची नावेही घोषित करण्यात आली. यंदाच्या उत्सवामध्ये महाराज मुधोजी राजे भोसले, जिजाऊ मॉँ साहेब यांचे वंशज राजे शिवाजीराव जाधव, महामंडलेश्वर १००८ शांतीगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय शहाजीराजे भोसले जयंती निमित्त शिवशाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर येथील पंडित पोवार आणि त्यांच्या समूहाच्या वतीने शिवकालीन युद्ध नीतीपथकाकडून शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्याक्षिक होणार आहे. तसेच प्रा. रवींद्र बनसोडे पाटील यांचे शहाजीराजे भोसले यांचे स्वराज्यातील योगदान या विषयावर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १७ मार्च रोजी शहाजी राजे भोसले यांच्या स्मारकावर दीपोत्सव कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च रोजी कुळ वंशज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कर्नाटकचे होतगिरी वंशज, नागपूरचे मदोजी राजे भोसले, व्यंकोशी राजे भोसले हे भाग घेणार आहेत. उत्सव कार्यक्रमासाठी कर्नाटक आणि पानीपत येथून शिवज्योत वेरूळ येथील शहाजीराजें गढीवर पोहोचणार आहे. कर्नाटक येथील होतगिरी येथे शहाजी राजे यांची समाधी आहे. या समाधीच्या जवळ शहाजी राजेंचा पुतळा व्हावा, याचीही मागणी या उत्सावादरम्यान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला राजेंद्र दाते पाटील, विजय काकडे, योगेश केवारे, अशोक खानापुरे, परमेश्वर नलावडे, नितीन कदम उपस्थित होते.

\Bजिल्हाधिकाऱ्यांविरोधात करणार आंदोलन

\Bशहाजी राजे भोसले यांच्या स्मारक विकासासाठी अनेक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात रखडलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हे प्रस्ताव राज्य व केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेले नाहीत. शहाजी राजे यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवप्रेमींच्या मनात निर्माण होत आहे. स्मारकाच्या विकासाचे प्रस्ताव पाठविले नाही, तर आगामी काळात जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीतर्फे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कारखाने जात्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लास्टिक बंदी असूनही या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्यांवर शनिवारी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाने कारवाई केली. त्यात पाणी पाऊच तयार करणाऱ्या कारखान्यांसह ४२ दुकाने, हातगाडी चालकांकडून दंड वसूल करण्यात आला.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील वॉटर बॉटलिंग व वॉटर सप्लायर्सची तपासणी पालिकेच्या पथकाकडून करण्यात आली, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. धोत्रे वॉटर सप्लायर्सची तपासणी करण्यात आली, या ठिकाणी पाणी पाऊचचा साठा आठळून आला. पाणी पाऊच तयार करण्याचे मशीन देखील आढळून आले. पंचनामा करून पाणी पाऊचचा साठा आणि मशीन जप्त करण्यात आले. धोत्रे वॉटर सप्लायर्सचे कपिल संजय धोत्रे यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शीतल जलधारा या कंपनीची देखील तपासणी करण्यात आली. या कंपनीला पूर्वी दंड आकारण्यात आला होता. आता पुन्हा या कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत भोंबे यांच्याबरोबर वॉर्ड अधिकारी मीरा चव्हाण, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, कृष्णा विसपुते, एस. आर. परदेशी, काकडे उपस्थित होते.

प्लास्टिक पाऊच निर्माण करणारे कारखाने व प्लास्टिक डिलर्सला पत्र देवून प्लास्टिक विक्री न करण्याबाबत व साठा न करण्याबाबत कळविण्यात आले आहे. याशिवाय विविध झोन कार्यालयांच्या माध्यमातून प्लास्टिक विक्री करणाऱ्या ४२ दुकानांवर, हातगाड्यांवर कारवाई करून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

- नंदकिशोर भोंबे, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन कक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कांसाठी पदवीधर लोकसभेच्या रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र पदवीधर हक्क संरक्षक समिती लोकसभा निवडणूक लढवणार आहे. समितीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून औरंगाबाद मतदारसंघातून जया देसाई निवडणूक लढवणार आहेत. पदवीधरांच्या हक्कांसाठी निवडणूक लढवत असल्याचे समितीने जाहीर केले आहे.

सेट-नेट, डीटीएड, बीएड, एमएड, राज्यसेवा व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पदवीधरांच्या हक्काकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. प्राध्यापक व शिक्षक भरती झाली पाहिजे, राज्यसेवा व इतर स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती काढाव्यात आणि पदवीधरांची पदभरती करा या पदवीधारकांच्या प्रमुख मागण्या आहेत. अर्ज, निवेदने आणि आंदोलनातून मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला. पण, शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, अशी टीका महाराष्ट्र पदवीधर हक्क संरक्षक समितीने केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागण्या मान्य केल्याचा आभास तयार केल्याचा आरोप समितीने केला आहे. पदवीधरांच्या न्याय-हक्कांचे संरक्षण करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र पदवीधर हक्क संरक्षक समितीने घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत हनुमंत कंधारकर (नांदेड), रवीराज राठोड (वाशीम- यवतमाळ), डॉ. एस. एन. जाधव-पाटील (पुणे), डॉ. किशोर खिलारे (सोलापूर), प्रा. सुरेश देवढे-पाटील (अहमदनगर दक्षिण), प्रा. अनिल झेंडे (हातकणंगले), भीमाशंकर गायकवाड (उस्मानाबाद), डॉ. दत्तात्रय सावंत (माढा), जया देसाई (औरंगाबाद) आणि डॉ. राज चव्हाण (कोल्हापूर) या उमेदवारांचा समावेश आहे. या बैठकीला डॉ. किशोर खिलारे, महावीर साबळे, रोहिदास दुधाटे, डॉ. शिवाजी बल्लोरे, डॉ. राजेश कुंटुरकर, डॉ. परमेश्वर पौळ, डॉ. प्रविण शिंदे- पाटील, डॉ. शैलेश अत्राम, डॉ. प्रमोद तांबे, डॉ. अमोल पवार, डॉ. दादासाहेब रणदिवे आदी उपस्थित होते.

\Bरिक्त पदे भरण्याचे आश्वासन

\Bपदवीधर समितीने जाहीरनाम्यात पदवीधरांच्या प्रमुख मागण्या अधोरेखित केल्या आहेत. शासकीय व निमशासकीय आस्थापनावरील रिक्त पदे कायमस्वरुपी भरण्यात येईल, शासकीय सेवेत कंत्राटीकरण हद्दपार कराण्यात येईल. समाजातील सर्व घटकांना रोजगाराची हमी देण्यात येईल. शिक्षणावरील खर्च १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल, शिक्षणातील भ्रष्टाचार हद्दपार केला जाईल असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध वाळू वाहतूकप्रकरणी हायवा चालकासह क्लिनरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा चालकासह क्लिनरला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास अटक केली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी शनिवारी दिले.

हायवा चालक सुनील धोंडिबा हिवराळे (३९, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) व क्लिनर तुकाराम अशोक गायकवाड (वय २८, रा. कल्याणनगर, पाचोड ता. पैठण) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिस नाईक सुनील आप्पासाहेब गोरे (वय ३२) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ताईतवाल व त्यांचे सहकारी वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार ताईतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चितेगावकडून औरंगाबादकडे वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारा हायवा आडगाव फाटा येथे पकडला. हायवाच्या चालकासह क्लिनरची चौकशी केली असता वाळूची रॉयल्टी नसल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून हायवा व १५ हजार रुपयांची तीन ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी वाळू कोठून चोरली व कोणाला विक्री करणार होते याचा तपास करणे आहे. आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, हायवाची कागदपत्र हस्तगत करणे आहे, तसेच हायवाचा मूळ मालक कोण आहे याबाबत तपासणी करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. डी. वरपे यांनी केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवीगाळ करणाऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळला. सूरज उर्फ बल्ली भगवान साळवे (३१, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात निशिकांत राजू शिर्के (२१, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) याने तक्रार दिली. त्यानुसार १८ जानेवारी २०१९ रोजी शिर्के व त्याचा मित्र रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवर घरी परतात असताना आरोपी सूरज उर्फ बल्ली साळवे याने शिर्केची दुचाकी अडविली व दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, शिर्के याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी साळवे याने शिवीगाळ करत लोखंडी गजाने बेदम मारहाण करत शिर्केला गंभीर जखमी केले. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी साळवेला सहा मार्च रोजी अटक केली, तर न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले असता आरोपीने तत्काळ नियमित जामीनीसाठी अर्ज दाखल केला. अर्जाच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण विरुद्ध शहर पोलिसांत जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भावसिंगपुरा येथील २२ एक्कर जागेचा मालक कोण, या वादावरून आता ग्रामीण पोलिस विरुद्ध शहर पोलिस असा जंगी सामना रंगला आहे. हा वाद थेट पोलिस महासंचालकांपर्यंत पोहोचला आहे.

औरंगाबाद शहर व जिल्ह्यासाठी १९९०पूर्वी एकच पोलिस अधीक्षक कार्यालय अस्तित्वात होते. त्यानंतर या कार्यालयाची विभागणी होऊन ग्रामीण भागासाठी पोलिस अधीक्षक (ग्रामीण), पोलिस आयुक्त कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. भावसिंगपुरा येथील गट क्रमांक नऊमध्ये ८९९ चौ. मी. (२२ एकर नऊ गुंठे) जागा आहे. ही जागा १९९०पासून पोलिस आधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी राखीव ठेवली होती. सध्या या जागेवर मालकी हक्क म्हणून 'सरकार' असे नाव आहे. आता ही जागा ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नावाने करावी, असा अर्ज ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. मात्र, याच जागेवर शहर पोलिसांनी गृहप्रकल्प उभारायाचा आहे. त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी शहर पोलिस आयुक्त कार्यालयाने थेट पोलिस महासंचालकांकडे धाव घेतली आहे. शहर पोलिस आयुक्तांनी ही जागा शहर पोलिसांना द्यावी, अशी विनंती एका पत्राद्वारे केली आहे. तसेच २०१६मध्येच ही जागा शहर पोलिस आयुक्तालयाला देण्यास ग्रामीण पोलिसांनी नाहरकत दिले असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुमार कॉलेजांना धसका !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाविद्यालय शैक्षणिक मूल्यांकन प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात सकारात्मक अहवाल प्राप्त झाले आहेत. तब्बल १२० सदस्यांच्या वेगवेगळ्या समित्यांनी ४० महाविद्यालयांचे मूल्यांकन पूर्ण केले. सुमार दर्जाच्या महाविद्यालयांचे पुढील टप्प्यात मूल्यांकन करून कारवाईचा बडगा उगारावा, असा अभिप्राय प्रशासनाला मिळाला आहे. काही प्राचार्यांनी उणिवा दडवण्याचा प्रयत्न केल्याचेही प्रकार घडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांची शैक्षणिक मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा एक ते नऊ मार्च या कालावधीत राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात एकूण ४० महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेसाठी राज्यातील आठ विद्यापीठांचे १२० तज्ज्ञ सदस्य नियुक्त करण्यात आले होते, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली. एका समितीत तीन सदस्य असून त्यांनी पडताळणी पूर्ण केली आहे. महाविद्यालयांपासून समितीच्या सदस्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील ४० महाविद्यालयांना भेट देत समितीने अहवाल तयार केला. महाविद्यालयाची स्थिती, कायमस्वरुपी कर्मचारी, प्रयोगशाळा, ग्रंथालय, उपक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अशा निकषांवर गुण देण्यात आले. हा सीलबंद अहवाल समितीने प्राचार्यांकडे सोपवला असून, प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाला सादर केला आहे. शैक्षणिक मूल्यांकनात ७६ ते १०० टक्के गुण मिळालेल्या महाविद्यालयाला 'अ' श्रेणी, ६१ ते ७५ टक्क्यांसाठी 'ब' श्रेणी, ५१ ते ६० टक्क्यांसाठी 'क' आणि ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या महाविद्यालयांना 'ड' श्रेणी दिली जाणार आहे. 'ड' श्रेणीच्या महाविद्यालयांना श्रेणीत सुधारणा करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी आहे. मूल्यांकन प्रक्रियेत ४१९ महाविद्यालयांपैकी १४८ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. इतर महाविद्यालयांना एप्रिल महिन्यात पुन्हा आवाहन करण्यात येणार आहे. यावर्षी १२५ महाविद्यालयांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात येईल, असे तेजनकर यांनी सांगितले. 'नॅक'च्या धर्तीवर मूल्यांकन प्रक्रिया राबविल्यामुळे काही प्राचार्यांनी समाधान व्यक्त केले. त्रुटी असलेल्या महाविद्यालयांनी तक्रारी केल्या आहेत. १४ ते १६ मार्च या कालावधीत ३३ महाविद्यालयात मूल्यांकनाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. मूल्यांकन अहवालाची पाहणी करण्यासाठी विद्यापीठाने १५ सदस्यांची समिती नेमली आहे. प्र-कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय समिती श्रेणी निश्चित करणार आहे.

\Bसंलग्नीकरण काढणार

\Bविद्यापीठाची संलग्नीकरण समिती दरवर्षी महाविद्यालयांची तपासणी करीत असते. सर्व काही 'आलबेल' असल्याचे पूर्वनियोजित अहवाल सादर करण्यात येतात. काही महाविद्यालयांना दर्जा सुधारण्यासाठी सलग एक ते तीन वेळेस नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीची माहिती प्र-कुलगुरूंनी शैक्षणिक विभागाकडे मागितली आहे. त्यानुसार तीन वेळेस नोटीस बजावूनही सुधारणा नसलेल्या महाविद्यालयांचे संलग्नीकरण येत्या जून महिन्यापासून काढण्यात येणार आहे. या महाविद्यालयांना प्रथम वर्षाचे प्रवेश देण्यात येणार नाही, असे तेजनकर यांनी सांगितले.

शाखानिहाय महाविद्यालयांच्या ऑडिटसाठी त्याच विषयाचे तज्ज्ञ समितीत आहेत. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. प्रशासन नियमांची पुरेपूर अंमलबजावणी करणार आहे.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : वायरशी खेळताना विजेच्या धक्‍क्‍याने भाजल्या गेलेल्या युवकाचा शनिवारी ( ९ मार्च ) घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस संजय क्षीरसागर (वय १८, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस हा १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हडको, टी. व्ही. सेंटर चौकात वायंडिंग वायरशी खेळत होता. तेव्हा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने तो भाजला गेला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी त्याचा घाटीत मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालत्या कारने घेतला पेट

$
0
0

औरंगाबादच्या शोरूममधून सर्व्हिसिंग करून बाहेर पडताच गजानन कुडके यांच्या चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी (९ मार्च) दुपारी अडीचच्या सुमारास एपीआय कॉर्नर उड्डाणपुलाखाली घडली. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील दोघेजण सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आग विझेपर्यंत कार पूर्णपणे जाळून खाक झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या महिन्यापूर्वी तरुणीचा करुण अंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाला अवघा एक महिना राहिला असताना कपडे धूत असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या अंगावर विजेची वायर पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (८ मार्च) भावसिंगपुरा भागात घडली. मोनिका सुभाष मिसाळ (रा. भावसिंगपुरा, औरंगाबाद) असे मृत तरुणीचे नाव आहे.

एक महिन्यापूर्वीच मोनिकाचा साखरपुडा झाला होता. येत्या सहा एप्रिल रोजी तिचे लग्न होणार होते. त्यामुळे घरचे सर्व सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. घरातील लगबग वाढली होती. एक आनंदाचे वातावरण घरात होते. मात्र, भावी आयुष्याचे स्वप्न रंगवणाऱ्या तरुणीच्या मृत्यूने आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलले. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मोनिका वाड्यात कपडे धूत असताना अचानक वाड्यातील झाडाची फांदी तुटल्याने ती वायरवर पडली व वीज प्रवाह असलेला वायरचा स्पर्श झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघुपटांची सैद्धांतिक मांडणी करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'नवोदित चित्रकर्मी लघुपटाचे माध्यम खुबीने हाताळत आहेत. मात्र, आता सृजनशील दिग्दर्शक-कलाकार आणि अभ्यासकांनी एकत्रितपणे लघुपटाच्या शास्त्राची निर्मिती करणे आवश्यक आहे. ही सैद्धांतिक मांडणी नवोदितांसाठी मार्गदर्शक ठरेल', असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक प्रा. मुस्तजिब खान यांनी केले. ते क्लॅप शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन केल्यानंतर बोलत होते.

नवव्या 'क्लॅप नॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलला शनिवारी सुरुवात झाली. एमजीएम फिल्म आर्टसच्या व्ही. शांताराम थिएटरमध्ये सकाळी महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला चित्रपट अभ्यासक प्रा. मुस्तजीब खान, एमजीएम फिल्म आर्टसचे संचालक शिव कदम, परीक्षक संतोष पाठारे, अमेय दक्षिणदास, संयोजक विनय जोशी व अक्षय वाळिंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. खान यांनी औरंगाबाद शहरात रुजलेल्या शॉर्टफिल्म प्रवाहावर भाष्य केले. 'लघुपट महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट संस्कृती रुजत आहे. लघुपटांचे वैविध्य पाहिल्यास त्यांचे महत्त्व लक्षात येईल. महोत्सवात आतापर्यंत दाखवलेल्या लघुपटांचा संग्रह आवश्यक आहे. हे डॉक्युमेंटेशन सर्वांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल. अभ्यासक आणि सृजनशील चित्रकर्मींनी एकत्रितपणे सैद्धांतिक मांडणीचा आराखडा निश्चित करावा', असे खान म्हणाले. 'एमजीएमने फिल्म विभागाद्वारे शहरात फिल्म मेकिंग ते सेन्सॉर प्रमाणपत्रापर्यंतच्या सुविधा उभ्या केल्या आहेत. दर्जेदार चित्रपट निर्मितीची इच्छा असलेल्या चित्रकर्मींनी त्याचा निश्चित फायदा घ्यावा' असे प्रा. शिव कदम म्हणाले. कुणाल लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले आणि विनय जोशी यांनी आभार मानले. दरम्यान, पहिल्या दिवशी महोत्सवात ४० लघुपट दाखवण्यात आले. नेदरलँड, श्रीलंका, स्पेन, आबुधाबी देशासह कर्नाटक, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू, दिल्ली राज्यातील चित्रकर्मींचे लघुपट दाखवण्यात आले. 'अकल्पित रात्र', 'क्लिन इंडिया', 'रुम शिफ्टींग', 'ओझं', 'सेकंड प्राइज', 'अधीन', 'विठा', 'फोनयुग', 'जीव', 'तरंग' अशा लघुपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात दर्जेदार लघुपट पाहण्यासाठी विविध महाविद्यालये व नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

\Bसमारोप आज

\Bक्लॅप शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचा रविवारी सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रमाने समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला दिग्दर्शक मंगेश जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, सादिक अन्वर पलगिरी आणि प्राचार्या रेखा शेळके उपस्थित राहणार आहेत. तीन सर्वोत्कृष्ट लघुपट आणि वैयक्तिक सहा पारितोषिके दिली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा रेल्वे मार्गांना सरकार पावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्ग, रोटेगाव - कोपरगाव कॅडलाइन मार्ग, लातूर रोड ते गुलबर्गा, रोटेगाव ते कोपरगाव आणि औरंगाबाद ते चाळिसगाव या रेल्वेमार्गांसाठी ५० टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.

मराठवाड्यातील लातूर रोड ते गुलबर्गा हा रेल्वे मार्ग जोडण्यासाठी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागणी केली होती. हा मार्ग जोडल्याने लातूर रोड ते गुलबर्गा प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. याशिवाय औरंगाबाद ते चाळीसगाव मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचतील. रोटेगाव कोपरगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे शिर्डी दर्शनासाठी येणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वे सुविधा मिळणार आहे. या दोन्ही रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाबाबत रेल्वे संघर्ष समितीचे अनंत बोरकर यांनी 'पीएमओ' कार्यालयाकडे विचारणा केली होती. हा मार्ग रद्द झाल्याचे उत्तर बोरकर यांना देण्यात आले होते.

'मटा'ने हे वृत्त प्रकाशित केल्यानंतर मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, अनंत बोरकर यांनी या मार्गाचा पाठपुरावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता. दौलताबाद - चाळीसगावसह रोटेगाव कोपरगाव कॅडलाइन रेल्वे मार्गासाठी ओमप्रकाश वर्मा, प्रल्हाद पारटकर, संतोष भाटीया, चंद्रकांत मेने, वर्धमान जैन यासह आमदार अतुल सावे यांनी प्रयत्न केले होते. या दोन्ही मार्गाच्या अनुषंगाने रेल्वे संघर्ष समितीचे अनंत बोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुभाष भांबरे, आमदार पाटील यांच्याकडे मागणीबाबत चर्चा केली होती. यासाठी विजया रहाटकर यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनीही प्रयत्न केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या मार्गासाठी पन्नास टक्के निधी देण्यास कसलिही अडचण नसल्याचे कळवले आहे.

---

मटा भूमिका

---

उशिरा दिला न्याय

---

मराठवाड्याला रेल्वे मार्गाबाबत संघर्षाशिवाय आजवर काहीही मिळाले नाही. दौलताबाद - चाळीसगाव रेल्वे मार्गासाठीही आमदार प्रशांत बंब यांचा गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. दौलताबाद ते चाळीसगाव रेल्वे मार्ग हा ९० किलोमीटरचा आहे, तर रोटेगाव- कोपरगाव रेल्वे २२ किमीचा आहे. या मार्गाला गेल्या दोन वर्षात मंजुरी मिळाली असती, तर निश्चितच आतापर्यंत रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी मान्य केल्याने मराठवाड्याला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्ते नाराजीमुळे भन्साळींची उचलबांगडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदावरून मनीषा भन्साळी यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या जागी अॅड. माधुरी अदवंत यांची शनिवारी निवड करण्यात आली. भन्साळींच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक मंडळ अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भन्साळी शहराध्यक्षपदी असताना त्या कोणाला विश्वासात घेत नसत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक महिला मंडळ अध्यक्ष नाराज होत्या. त्यांनी याबाबतची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यामुळे त्यांची गच्छती करण्यात आली असून, त्यांच्या जागी अॅड. अदवंत यांची नियुक्ती करण्यात आली. महापलिकेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असलेल्या अॅड. अदवंत या १९९३पासून भाजपत सक्रिय आहेत. महिला मोर्चाच्या हडको मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस, भाजप शहर उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली असून, २०१३ ते २०१५ या काळात त्यांनी महिला मोर्चाचे शहराध्यक्षपदे भुषवली आहेत. उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अॅड. अदवंत यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विमल तळेकर यांचा सत्कारही करण्यात आला. सरचिटणीस कचरू घोडके, रेखा पाटील, साधना सुरडकर, सविता कुलकर्णी, कल्पना त्रिभुवन, अमृता पालोदकर, स्वाती कुलकर्णी, रूपाली वाहुळे, वंदना कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात भन्साली यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.

भन्साळींचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्याकडे प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाची जबाबदारी आहे. प्रदेशाच्या जबाबदारीसाठी त्यांची शिफारस केली आहे.

- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

संघटनात्मक बांधणीवर अधिक भर देत महिला मोर्चा अधिक सक्षम करणे हे लक्ष आहे. आगामी काळात ते पूर्ण करण्यावर भर असेल.

- अॅड. माधुरी अदवंत, अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या केंद्रातून महापौरांचा बूट चोरीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रातून शनिवारी महापौरांचे बूट चोरीला गेल्याची घटना घडली. केंद्रात सुरक्षा रक्षकांचा राबता असतो. अन्य कर्मचारी देखील सतत ये - जा करतात, तरीही शहराच्या प्रथम नागरिकाचा बूट चोरीला जाणे लाजीरवाणी बाब समजली जात आहे.

पालिकेच्या बालवाडी शिक्षिकांचे मानधन पाच हजार रुपयांवरून दहा हजार करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व १३२ बालवाडी शिक्षिकांच्यावतीने शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महापौरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती अर्चना नीळकंठ, नगरसेविका सीमा खरात, ज्योती पिंजरकर यांच्यासह अन्य नगरसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रम सुमारे दोन तास चालला. कार्यक्रम आटोपल्यावर महापौर संशोधन केंद्राबाहेर आले तेव्हा त्यांना आपला बूट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांसह आजुबाजूला बुटाचा शोध घेतला, पण सापडला नाही. त्यामुळे ते अनवाणी पायानेच गाडीत जावून बसून निघून गेले. बूट चोरीला गेल्याबद्दल घोडेले यांनी आश्चर्य व्यक्त केले.

\Bदुसरी घटना

\Bपालिकेचे तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची बदली झाल्यामुळे पालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार नवल किशोर राम यांच्याकडे होता. स्मार्ट सिटी मिशनच्या बैठकीसाठी नवल किशोर राम डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आले होते. त्यावेळी त्यांचाही बूट चोरीला गेला होता. त्यांनाही अनवाणी पायाने परतावे लागले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप महिला मोर्चा शहराध्यक्षपदी अदवंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षपदी मनीषा भन्साळी यांना पायउतार करून अॅड. माधुरी अदवंत यांची शनिवारी निवड करण्यात आली. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी हे फेरबदल केले.

महापलिकेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असलेल्या अॅड. माधुरी अदवंत १९९३पासून भाजपत सक्रिय आहेत. महिला मोर्चाच्या हडको मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीस, भाजप शहर उपाध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली असून, २०१३ ते २०१५ या काळात त्यांनी महिला मोर्चाचे शहराध्यक्षपदे भूषवले आहे. उस्मानपुरा येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अॅड. अदवंत यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विमल तळेकर यांचा सत्कारही करण्यात आला. सरचिटणीस कचरू घोडके, रेखा पाटील, साधना सुरडकर, सविता कुलकर्णी, कल्पना त्रिभुवन, अमृता पालोदकर, स्वाती कुलकर्णी, रूपाली वाहुळे, वंदना कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, यासंदर्भात भन्साली यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.

भन्साळींचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्याकडे प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाची जबाबदारी आहे. प्रदेशाच्या जबाबदारीसाठी त्यांची शिफारस केली आहे.

- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

संघटनात्मक बांधणीवर अधिक भर देत महिला मोर्चा अधिक सक्षम करणे हे लक्ष आहे. आगामी काळात ते पूर्ण करण्यावर भर असेल.

- अॅड. माधुरी अदवंत, अध्यक्ष, भाजप महिला मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपासवर शंभर बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपास रोडवर आठवड्यात दोघांचा अपघाती मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांपासून हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरला आहे. महानुभाव चौक ते देवळाई चौक पाच किलोमीटरच्‍या अंतरात गेल्या पंधरा वर्षात तब्बल शंभर लोकांचे बळी गेले असून, दीड वर्षात ७१ अपघातांत २२ जणांचा जीव गमावावा लागला आहे. मात्र, अजूनही पोलिस विभागाला या मार्गावरील बेशिस्त वाहतूक सुरळीत करण्यात यश आले नाही.

शहरातील वाहतुकीला पर्याय म्हणून बीड बायपास रोडची सुविधा वाहनधारकांसाठी उपलब्ध आहे. मात्र, या मार्गावरून जड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर होते. गेल्या काही वर्षांपासून या रोडवर वाहतूक करणे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरत आहे. बायपासच्या दोन्ही बाजूला गेल्या मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभारल्या गेल्या. या भागात व्यापारी प्रतिष्ठाने, मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल, शैक्षणिक संस्था देखील वाढल्या. यामुळे या भागात वाहतुकीची वर्दळ मोठया प्रमाणात होते. त्यामुळे बेशिस्त वाहतूक, अपघात आणि त्यात मृत्यू पडण्याऱ्यांची संख्याही वाढली. या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात अपघाताची काही ठिकाणे धोकादायक ठरत आहेत. यामध्ये एमआयटी चौकात ११ जणांना जीव गमवावा लागला. त्याखालोखाल देवळाई चौकात आठ, तर रेणुका माता कमानीसमोर आतापर्यंत चार जणांचे प्राण गेले.

…बायपासच्या अलीकडे शहराचा जुना भाग तर पलीकडच्या बाजूला सातारा परिसर व नवीन वसाहती आहेत. सातारा परिसरातील नागरिकांना शहरात यायचे असल्यास बीड बायपासवरून येण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे या रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दैनंदिन वाहतूक करणाऱ्यामध्ये कामगार, विदयार्थी, नोकरदार वर्ग आदींचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय आहे.

\Bराँगसाइड वाहतूक; पोलिसांचे दुर्लक्ष

\Bबीड बायपास रोडवर आणखी एक बाब म्हणजे राँगसाइड होणारी वाहतूक. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बायपास रोडवर अनेक ठिकाणी दुभाजकामध्ये असलेले वळण रस्ते बंद केले होते. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दुचाकीस्वार लांबचा वळसा टाळण्यासाठी अनेक वेळा राँगसाइड वाहतूक करताना दिसून येतात. यामुळे देखील अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषत: या मार्गावर पोलिसांचे नियोजन पूर्णत: बारगळले आहे. संग्रामनगर उड्डाणपूल चौकात सिग्नलची व्यवस्था योग्य नाही. तसेच जड आणि भरधाव वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

बीड बायपास सहा पदरी होणार ही घोषणा अनेक महिन्यापासून एकतो आहे. प्रत्यक्षात हे काम कधी होणार हा प्रश्न आहे. अवजड वाहनांची वाहतूक अजूनही सर्रास सुरू आहे. बायपासवर अपघाताची मालिका थांबवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. अवजड वाहनांच्या गतीवर यासाठी मर्यादा आणायला हवी.

- प्रवीण मोहिते, नागरिक

बायपासवर लग्नसराईच्या काळात वाहतूक कोंडीचा मोठा फटका या भागातील नागरिकांना सहन करावा लागतो. या रोडवर अनेक लॉन्स, मंगल कार्यालय आहेत. रस्त्यावरच लग्नाला येणाऱ्या वाहनांची पार्किंग करण्यात येते. यामुळे रस्त्यावरील वाहनांना जाण्यासाठी जागा उरत नाही. पोलिसांनी या बाबीकडे लक्ष द्यावे.

- अमोल रगडे, नागरिक

---

चौकट

---

वर्ष मृतांची संख्या

---

२००३ १

२००४ ५

२००५ ३

२००६ ५

२००७ ५

२००८ ७

२००९ ४

२०१० २

२०११ ५

२०१२ ६

२०१३ १०

२०१४ ६

२०१५ ६

२०१६ ८

२०१७ १६

२०१८ ९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाचा ऐवज लांबवणारा रिक्षाचालक गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रवाशाचा ऐवज साथीदारांच्या मदतीने लांबवणाऱ्या रिक्षाचालकाला क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. शुक्रवारी दुपारी बाबा पेट्रोल पंप ते अमरप्रीत चौकाच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी संतराम पंढरीनाथ साळुंके (वय ५१, रा. मालुंजा खुर्द, ता. गंगापूर) या शेतकऱ्याने तक्रार दाखल केली होती. साळुंके यांचा मुलगा आजारी असून त्याच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साळुंके हे शुक्रवारी दुपारी गावाकडून बाबा पेट्रोलपंप येथे आले. बाबा पेट्रोल पंपापासून ते अमरप्रीत चौकाकडे येण्यासाठी रिक्षामध्ये बसले. यावेळी त्यांच्या पँटच्या खिशातील अठरा हजार रुपये चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करीत संशयित आरोपी शेख समीर शेख रसूल (रा. मिसारवाडी) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत शेख समीरने त्याचा साथीदार रिक्षाचालक शेख भिकन शेख नभी (रा. बायजीपुरा) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक उत्तम मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल सूर्यतळ, सय्यद सलीम, राजेश फिरंगे, गजानन मांटे, विनोद नितनवरे, संतोष रेड्डी, सतीश जाधव, गणेश वाघ, राजेश चव्हाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटीपी’चे पाणी महागले दुपटीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात सिवरेज ट्रिटमेंट प्लांटचे पाणी आता महागले असून, त्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. या प्रकल्पाचे वीजेचे बिल देण्यासाठी पाण्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दरवाढीमुळे वीज बिलासाठी लागणारी रक्कम जमा व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

पालिकेने भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले आहेत. कांचनवाडी येथे १६१ दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प, झाल्टा येथे ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचा, तर पडेगाव येथे १० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प बांधण्यात आला आहे. या तिन्हीही प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ८० ते ८५ दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेले पाणी नदीमध्ये सोडण्यात येते. हे पाणी समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला 'एसटीपी'पासून पाच रुपये प्रति हजार लिटर या दराने प्रक्रिया केलेले पाणी देण्याचे ठरविण्यात आले होते. त्याशिवाय शहरातील पाण्याचे दुर्भीक्ष लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांना देखील हे पाणी वापरण्याबद्दल आवाहन करण्यात आले होते. बांधकाम परवानगी देताना सर्वसामान्य नागरिकांना व बांधकाम व्यावसायिकांना 'एसटीपी'चे पाणी वापरणे बंधनकारक करण्याबद्दल नगररचना विभागास विनंती करण्यात आली आहे. तिन्ही प्रकल्पाचे वीज बिल दर महिन्याला सुमारे साठ ते सत्तर लाख रुपये येते. वीज बिलाचा खर्च पाणी विक्रीतून निघावा, या उद्देशाने पाण्याची विक्री करण्याचा निर्णय पालिकेच्या प्रशासनाने घेतला आहे.

\Bहजार लिटरसाठी दहा रुपये

\B'एसटीपी'मधील पाणी विक्रीच्या संबंधी पालिका प्रशासनाने तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेतली. 'पीएमसी'बरोबर देखील चर्चा केली. त्यानंतर बल्क कंझ्युमरसाठी पाच रुपये प्रति हजार लिटर ऐवजी दहा रुपये प्रति हजार लिटर दर निश्चित करण्यात आला. किरकोळ ग्राहकांसाठी सात रुपये प्रति हजार लिटर ऐवजी १५ रुपये प्रति हजार लिटर एसटीपी पाण्याचा दर करण्यात आला आहे. ग्राहकांची संख्या वाढल्यास एसटीपीच्या वीजेच्या बिलाचा खर्च त्यातून निघेल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images