Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निर्वासितांच्या प्रश्नांची उकल व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'निर्वासितांच्या प्रश्नांबद्दल सखोल चिंतन करण्याची गरज आहे. या प्रश्नांची योग्य उकल झाल्यास स्थलांतर, नागरिकत्व आणि इतर आव्हाने निश्चित कमी होतील' असे प्रतिपादन व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी केले. ते कार्यशाळेचे उदघाटन केल्यानंतर बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात 'निर्वासित-स्थलांतरित नागरिकत्व - प्रश्न व आव्हाने' या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उदघाटन कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्रो. संजय साळुंखे, डॉ. एस व्ही गुंजाळ, टिळक विद्यापीठाचे डॉ. विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 'समाजशास्त्र समजून घेऊन सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे. गंभीर प्रश्नांची जाण समाजशास्त्रातूनच होते. या समस्येची उकल करण्याचा मार्गसुद्धा समाजशास्त्रात आहे. योग्य आकलनाद्वारे तो समजला पाहिजे. युरोपही निर्वासितांना सामावून घ्यायला तयार नाही. भारत याबाबत उदारमतवादी आहे. १९६६च्या ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीच्या करारानुसार निर्वासितांना जागा द्यावी, माणुसकीची वागणूक द्यावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजना आखाव्यात, तात्पुरते कालमर्यादेचे ओळखपत्र द्यावे अशी आचारसंहिता सभासद राष्ट्रांना आहे. दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी नाही' असे शितोळे म्हणाले. या कार्यशाळेला प्रा. डॉ. स्मिता अवचार, डॉ. शुभांगी गोटे, डॉ. पद्माकर सहारे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस स्थानकासमोरील दुभाजक तोडण्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद : मुख्य बस स्थानकाच्या समोरील दुभाजक तोडून बस वळविण्यासाठी पूर्वीप्रमाणे व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका नसरीन बेगम समद यारखान यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. मुख्य बस स्थानकासमोरील दुभाजक पूर्वी बंद नव्हते. त्यामुळे बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस दुभाजक ओलांडून महावीर चौकाकडे जाऊ शकत होत्या. आता दुभाजक बंद केल्यामुळे मिल कॉर्नरहून बस वळवाव्या लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. शिवाय अपघात देखील होतात. वाहनांच्या गर्दीत रुग्णवाहिका अडकून पडल्यामुळे रुग्णांचे देखील हाल होतात. त्यामुळे बस स्थानकासमोरील दुभाजक तोडून तो पूर्ववत करावा, अशी मागणी नसरीन बेगम समद यारखान यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा जाळल्यामुळे झाडे जळाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झाडाच्या बुंध्याशी कचरा साचवून तो जाळल्याने झाडे जळाल्याची घटना रोकडिया हनुमान कॉलनीमध्ये घडली आहे. त्यामुळे नागरिकांत संताप आहे. कॉलनीमध्ये चार वर्षांपूर्वी नागरिकांनी एक पिंपळ व तीन कडुलिंबाचे झाडे लावली होती. कॉलनीमधील ज्येष्ठांनी पाणी घातल्याने ही झाडे दहा ते बारा फुट उंच वाढली आहेत. सकाळच्या वेळी या भागात बकऱ्या चरण्यासाठी आणल्या जातात. बकऱ्या आणणाऱ्यांनी झाडांच्या बुंध्यांजवळ कचरा जमा करणे सुरू केले. कचरा वाळल्यानंतर तो जाळण्यात येऊ लागला. त्यामुळे लिंबाचे व पिंपळाचे झाड बुंध्यापासून जळाले. आता कडूलिंबाच्या झाडाच्या बुंध्याजवळ कचरा टाकणे सुरू झाले आहे. हा कचरा वाळल्यावर तो देखील जाळला जाईल आणि त्यात हे झाड देखील जळून खाक होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएमची आज तपासणी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाकडून प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट (बीयू) व कंट्रोल युनिट (सीयू) या मतदानयंत्रांची मंगळवारी (१२ मार्च) प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) सुरू करण्यात येणार आहे. किलेअर्क येथील शासकीय कला महाविद्यालयात सकाळी दहापासून 'एफएलसी' सुरू होणार आहे. यावेळी राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही ही प्रक्रिया पाहू शकणार आहेत. ईव्हीएम मशीनची योग्यता व सचोटीबद्दल; तसेच मॉकपोलबद्दल खात्री, निकाल पडताळणीही करता येणार आहे. संपूर्ण 'एफएलसी'ची प्रक्रीया सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकासह दोघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पत्नीच्या राजीनाम्यासाठी चाकूहल्ला करणारे तत्कालीन प्राध्यापक डॉ. अब्दुल हफीज अब्दुल कासीम शेख व मुनवर अहमद नईम अहमद यांना दोन वर्षे सक्तमजुरी व एकूण तीन हजार रुपयांचा दंड जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी (११ मार्च) ठोठावला.

या प्रकरणी मिर्झा झकी उल्लाबेग मिर्झा फसी उल्लाबेग (५४, रा. भडकलगेट) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा एमआयडीसी वाळूज येथे सुपरवायझर म्हणून काम करतो, तर त्याची पत्नी शेख सल्मा ही बुढीलेन येथील जिया उल उल्लम उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. २२ फेब्रुवारी २०१० रोजी फिर्यादीच्या घरात काम करणाऱ्या सुताराचा मुलगा वसीम खान नूर खान हा फिर्यादीच्या घरी आला होता. त्याच्याशी कामाचे बोलणे झाल्यावर फिर्यादी व वसीम खान हे भडकल गेट परिसरात चहा पिण्यास गेले. रात्री सव्वादहाला मौलाना आझाद महाविद्यालयातील तत्कालीन प्राध्यापक व आरोपी डॉ. अब्दुल हफीज अब्दुल कासीम शेख (५४, रा. रवींद्रनगर) व आरोपी मुनवर अहमद नईम अहमद (३५, रा. न्यू एसटी कॉलनी, कटकटगेट) हे फिर्यादीकडे आले. या वेळी आरोपी मुनवर याने फिर्यादीला बाजूला बोलावून घेतले असता, फिर्यादीने त्याच्यासोबतच्या वसीमला तिथेच बसवले व तो आरोपी मुनवर सोबत बाजूला आला. त्यावेळी 'तुझ्या बायकोला राजीनामा देण्यास सांग, तिला राजीनामा देण्याचे समजत नाही का', असे म्हणत आरोपी मुनवर याने फिर्यादीचे हात पकडले, तर आरोपी डॉ. अब्दुल हफीज याने धारदार चाकूने फिर्यादीच्या मानेवर वार केला. फिर्यादीने वार चुकवला असता, तो वार फिर्यादीच्या छातीवर बसला व त्याचवेळी आरोपींनी फिर्यादीच्या पोटातही बुक्क्या मारल्या. त्यामुळे फिर्यादी खाली कोसळला. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत फिर्यादीला घाटीत दाखल करण्यात आले होते. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या ३०७, ३२३, ५०४, २०१, ३४ कलमान्वये सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bदंड न भरल्यास आणखी शिक्षा

\Bखटल्यावेळी, जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात दोन साक्षीदार फितूर झाले. मात्र, दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी दोन महिने सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या २०१ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीशी छेडछाड; रिक्षाचालकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मैत्रिणीसोबत शाळेत जाणाऱ्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीशी छेडछाड काढणारा रिक्षाचालक जितेंद्र दिलीप गावंडे यास तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटोदकर यांनी सोमवारी (११ मार्च) सुनावली.

२४ जून २०१३ रोजी औरंगाबाद तालुक्यातील विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी मैत्रिणीसोबत निघाली होती. त्यासाठी दोघी ऑटोरिक्षात बसल्यानंतर आरोपी रिक्षाचालक जितेंद्र दिलीप गावंडे हा रिक्षात येऊन बसला. रिक्षा काही अंतरावर गेल्यावर रिक्षाचालक जितेंद्र याने संबंधित विद्यार्थिनीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला असता, तिने प्रतिकार केला. त्याचवेळी आरोपी जितेंद्रने लज्जास्पद कृत्य केल्यामुळे पीडित मुलगी जोरात ओरडली आणि आरोपी रिक्षातून उडी मारून पळून गेला. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी चार साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांरून कोर्टाने आरोपीला 'पोक्सो' कायद्यान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार दंडाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड बायपासवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या बीड बायपास रोडवरील एमआयटीच्या समोरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही अखेर आज सुरू झाली. पोलिस आयुक्त चिंरजीव प्रसाद हे स्वत: बीड बायपासवर दाखल झाले आणि त्यांनी पाहणी केल्यानंतर घटनास्थळी महापालिकेचे अधिकारीही दाखल झाले.

बीड बायपास रोडवरील अपघात कमी करण्यासाठी यापूर्वी अनेक बैठका झाल्या आहेत. तरीही सर्व्हिस रोडचा प्रश्न निकाली निघत नव्हता. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थातूरमातूर कारवाई केली जात होती. अखेर सोमवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेऊन महापालिकेला पोलिस बंदोबस्त देऊन आजच्या आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण हटवा, असे बजावल्यानंतर महापालिकेचे अधिकारी कामाला लागले. महापालिकेचे अधिकारीही ही मोहीम पार पाडण्यासाठी घटनास्थळी उपलब्ध होते. नरेशसिंग जाबिंदा यांनी त्यांच्या ताब्यातील जागा सर्व्हिस रोडसाठी देण्याचे मान्य करीत त्यावर मुरूमही टाकून देऊ, असा शब्द दिला. मात्र, महापालिकेने या रस्त्यासाठी एफएसआय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यासह अन्य मालमत्ताधारकांच्या समोरील सर्व्हिस रोडवरील जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू झाली. अतिक्रमण करणाऱ्यांनी रस्त्याची जागा सोडली नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश दिल्याने मालमत्ताधारकांनी अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली.

१२ वर्षांचा लढा झाला यशस्वी

१२ वर्षांपासून सातारा भागातील नागरिक बीड बायपास रोडला सर्व्हिस रोड द्यावा, अशी मागणी करीत आहेत. पोलिस आयुक्तांच्या पुढाकारामुळे एका बाजुची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे गेल्या १२ वर्षांपासूनचा लढा यशस्वीतेकडे चालला असल्याची प्रतिक्रिया एमआयटीचे प्रा. प्रशांत अवसरमल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३९५ दात्यांनी केलेल्या रक्तदानातून श्रद्धांजली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

के के ग्रुपचे सदस्य मोहसीन शेख यांचा ट्रक अपघातात मुत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ व घाटी रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी ग्रुपच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले़ भडकल गेट येथील आयटीआय मुलींच्या महाविद्यालयात झालेल्या शिबिरात ३९५ दात्यांनी रक्तदान करुन ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली़

शिबिरासाठी ग्रुपचे अध्यक्ष अखिल अहमद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, सोहेल सिद्दीकी, अनवर खान, शब्बू पटेल, रिजवान खान, मोहसीन खान, डॉन भाई इतियाज, अमजद खान, इरफान खान, रियाज खान, युनुस गुड्डू, शेख सिराज, जुनेद शेख, मोहम्मद आसिफ यांनी पुढाकार घेतला. शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत रुळे, डॉ. शैलेश पाटील, डॉ़ स्वप्नील झंवर, डॉ़ स्मिता हिलारपुरे, डॉ़ अमृता सिंग यांनी रक्तसंकलन केले़ शिबिरादरम्यान महापौर नंदकुमार घोडेले, आमदार हर्षवर्धन जाधव, घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ़ कैलास झिने, मिलिंद दाभाडे यांनी भेट दिली़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आयएमए’च्या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना नवनवीन टिप्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दैनंदिन रुग्णसेवा व रुग्णालयांच्या एकूण व्यवस्थापनाबरोबरच आपत्कालिन परिस्थिती नेमकी कशी हाताळावी, याविषशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी 'आयएमए'च्या शहर शाखेच्या वतीने विशेष कार्यशाळा घेण्यात आली. यात कर्मचाऱ्यांना नवनवीन टिप्सही मिळाल्या.

'आयएमए'च्या शहर शाखेच्या वतीने वेगवेगळे व उपयोगी उपक्रम घेण्यात येत असून, याच शृंखलेमध्ये हॉस्पिटल स्टाफसाठी नुकतीच एक नावीन्यपूर्ण कार्यशाळा घेण्यात आली. यात शहरातील विविध हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट व इतर स्टाफने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या वेळी, कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी संवाद कसा साधायचा, रुग्णालयांमध्ये वादविवाद झाल्यास कशाप्रकारे त्याला सामोरे जायचे, 'डॉक्युमेंटेशन'कसे करायचे, या व इतर अनेक गोष्टींचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या प्रसंगी 'आयएमए'चे शहर सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी 'हाऊ टू टॅकल डेथ' (रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास रिसेप्शनिस्टची भूमिका) याविषयी व्याख्यान दिले, डॉ. शितल वैद्य चक्रवर्ती (मुंबई) यांनी रुग्ण संवाद कसा साधावा आणि रुग्णालयात काही अप्रिय घटना घडल्यास कशा प्रकारे त्याला सामोरे जावे, याविषयी व्याख्यान दिले. डॉ. राजेंद्रसिंह परदेशी यांनी 'मेडिको लिगल रिस्पॉसिबिलिटी ऑफ रिसेप्शनिस्ट' (रुग्णालयातील रिसेप्शनीस्ट ची वैद्यकीय कायदे विषयक जबाबदारी) याविषयी माहिती दिली. मानसरोगतज्ञ डॉ. अमोल देशमुख यांनी ओपीडीमध्ये खूप गर्दी झाल्यावर रुग्णालयाच्या स्टाफने वर्तणूक कशी ठेवावी, यावर मार्गदर्शन केले, तर सीए योगेश भारतीय यांनी प्राप्तिकर कायद्याविषयीची माहिती दिली. 'आयएमए'चे शहराध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ यांनी अध्यक्षीय भाषण केले, तर सचिव डॉ. यशवंत गाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सहसचिव डॉ. अनुपम टाकळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन उपस्थितांचे आभार मानले. या वेळी सहसचिव डॉ. हर्मित बिंद्रा कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यशाळेत शहरातील ३०० पेक्षा जास्त हॉस्पिटल्स स्टाफने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे संयोजन सहसचिव डॉ. अनुपम टाकळकर यांनी केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेमुळे महापालिकेत शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे महापालिकेत शुकशुकाट पसरला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक सुट्टीवर गेले आहेत, तर पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली आहेत. अधिकारी देखील मोजून मापून काम करू लागले आहेत.

रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता आदी प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांची संख्या महापालिकेत जास्त असते. सकाळपासूनच नागरिक विविध शिष्टमंडळाच्या माध्यमातून महापालिकेत येत असतात. काही संघटना उपोषणाचा मार्ग स्वीकारतात त्यामुळे त्यांचे उपोषण महापालिकेच्या मुख्यालयासमोर सुरू असते. विविध समस्यांची निवेदने आयुक्त व महापौरांना देण्यासाठी नागरिकांची गर्दी कायम असते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारपासून लागली आणि महापालिकेतील गर्दी एकदम कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच आयुक्त डॉ. निपुण विनायक सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी १७ मार्चपर्यंत रजा घेतली असल्याचे सांगण्यात आले. आयुक्त सुट्टीवर गेल्यामुळे प्रशासकीय बाजू एकदम शांत होती.

आचारसंहिता लागू झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांची दालने देखील ओस पडली आहेत. महापौर नंदकुमार घोडेले दुपारच्यानंतर कार्यालयात आले नाहीत. सभापती रेणुकादास (राजू) वैद्य सोमवारी महापालिकेत आलेच नाहीत, अशी माहिती मिळाली. सभागृहनेते व उपमहापौर देखील महापालिकेत आले नाहीत. विरोधी पक्षनेते जमीर कादरी पालिकेत होते, पण त्यांच्या दालनात त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवार हा महापालिकेच्या दृष्टीने कामकाजासाठी पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी कमालीचा शुकशुकाट पसरल्यामुळे २३ एप्रिलपर्यंत असेच चित्र राहील का? अशी चर्चा महापालिकेच्या वर्तुळात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्तांचे प्रश्न दुर्लक्षित राहण्याची भीती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'देशभरात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि याच काळात मराठवाडा भीषण दुष्काळाला तोंड देत आहे. निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळग्रस्तांचे प्रश्न दुर्लक्षित राहण्याची भीती आहे. सजग नागरिक म्हणून आपण प्रश्न लावून धरण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे यांनी केले. ते व्याख्यानात बोलत होते.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या आइन्स्टाइन सभागृहात सोमवारी सकाळी लोमटे यांचे व्याख्यान झाले. 'दुष्काळाच्या झळा व निवडणुकांचे राजकारण' या विषयावर त्यांनी विचार मांडले. यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे, विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, सुहास तेंडुलकर, शिव कदम, डॉ. संदीप शिसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोमटे यांनी महाराष्ट्रात आजवरच्या दुष्काळाचा आढावा घेतला आणि तत्कालीन सुधारक आणि राज्यकर्त्यांनी दुष्काळाबाबत घेतलेल्या दूरगामी विचाराची मांडणी केली. महात्मा फुले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज यांच्या मूलगामी कामावर प्रकाश टाकला. 'मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणाचा सातत्याने विचार झाला. आता दुष्काळ निर्मूलनाचा विचार करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीच्या धडाक्यात दुष्काळग्रस्तांचे प्रश्न अडगळीत पडू नये म्हणून सजग नागरिकांनी प्रश्न लावून धरावे' असे लोमटे म्हणाले. सवाई एकांकिका स्पर्धेत मॅट्रीक एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल नाट्य दिग्दर्शक प्रवीण पाटेकर यांचा लोमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुबोध जाधव, विशाखा गारखेडकर, उमेश राऊत, अक्षय गोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गजल म्हणजे कवितेची कविता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गजल म्हणजे कवितेची कविता आणि प्रासादिक शब्दांची पेरणी असते. जीवनाचे सप्तरंग खुलवणारा इंद्रधनुष्य म्हणजे गजल असते, असे प्रतिपादन गजलकार ए. के. शेख यांनी केले. ते कार्यशाळेत बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलल हिंदी विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने गजल कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन ए. के. शेख यांनी केले. यावेळी डॉ. शेख इक्बाल मिन्ने, मुकुंद राजपंखे, विभागप्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे व संयोजक डॉ. भगवान गव्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेख यांनी विद्यार्थ्यांना कविता आणि गजल यातील मूलभूत फरक सांगितला. 'भावनांचा अर्क म्हणजे कविता आणि कवितेचा अर्क म्हणजे गजल असते. गजल लिहिताना शब्दांचे अर्थ समजून घ्या. शब्द-शब्द अंतर्मनात साठवून ठेवा. दुसऱ्याचे सुख-दुःख समजून घेतल्यास उत्तम गजल लिहिता येईल, असे शेख म्हणाले.

दुसऱ्या सत्रात मुकुंद राजपंखे यांनी 'मी आणि माझी गजल' या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिसऱ्या सत्रात शेख इक्बाल मिन्ने यांनी जीवनानुभव ते गजलानुनभव या विषयावर मांडणी केली. गजल सादरीकरणाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. ए . के. शेख, रमेश ठोबरे, गिरीश जोशी, अजय त्रिभुवन व मुकुंद राजपंखे यांनी गजल सादर केल्या. करिश्मा पठाण, दत्ता किटाले, बन्सी भोई सूत्रसंचालन केले आणि प्रदिप खिल्लारे, टिपू सुल्तान यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मराठी विभागप्रमुख अशोक देशमाने, डॉ. गणेशराज सोनाळे, डॉ. राजकुमारी गडकर, डॉ. भारती गोरे , डॉ न. पु . काळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेतून चव्हाण की झांबड, जालन्यातून सत्तार की काळे?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, उमेदवारांच्या नावांबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण किंवा आमदार सुभाष झांबड यांचे नाव लवकरच निश्चित होऊ शकते. जालन्यातून आमदार अब्दुल सत्तार किंवा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक झाली. त्यात निश्चिती होऊन मंगळवारी किंवा बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.

आघाडीच्या जागावाटपात नगर आणि औरंगाबादचा तिढा अजून कायम आहे. सद्यस्थितीला औरंगाबादेतून आमदार सुभाष झांबड यांच्या नावाची चर्चा आहे. जालन्यातूनही काँग्रेसच्या उमेदवाराबाबत अजून निश्चिती झालेली नाही. मात्र तिथून आमदार अब्दुल सत्तार किंवा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यापैकी एक उमेदवार असू शकतो, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्याने सांगितले. दुसरीकडे नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार याबाबत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्पष्ट केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; नगरमधून इच्छुक असलेले सुजय विखे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढावे, त्याबदल्यात औरंगाबादेतून आमदार सतीश चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव आघाडीत सोमवारी देण्यात आला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे दिल्लीत गेले आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. सायंकाळी सोनिया गांधी यांच्यासमवेत बैठक झाल्यानंतर मंगळवारी हे नेते मुंबईत परततील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा होऊन हा प्रस्ताव मान्य करायचा की नाही हे ठरणार आहे. जर, हा प्रस्ताव मान्य झाला नाही तर औरंगाबादेतून आमदार झांबड आणि जालन्यातून आमदार अब्दुल सत्तार किंवा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होऊ शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहावी, बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांना संस्थाचालक, प्रशासनाकडे जाण्याची वेळ आली आहे. तपासणीचा पेच लक्षात घेत शिक्षकांना सूचना द्या, गठ्ठे स्वीकारा अशी विनवणी करत शाळा, कॉलेजांची भेट आहेत. गठ्ठे परत येणे सुरूच असून सोमवारी उत्तरपत्रिकांच्या गठ्यांच्या संख्येत ३७५ गठ्यांची भर पडली. ७५ हजारपेक्षा अधिक उत्तरपत्रिका परत आल्याचे सूत्रांनी सांगितले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी, बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंडळाची लगबग सुरू आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजांमधून उत्तरपत्रिका तपासणीविना परत येत आहेत. मागील आठवड्यात हा आकडा ५०० वर पोहचला. तर, सोमवारपर्यंत ३७५ ची भर पडली. गठ्ठे मोठ्या प्रमाणात परत येत आहेत तर दुसरीकडे निकाल वेळेत लावण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी शहरातील मोठ्या तपासणी केंद्रावर जात संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्यांची भेट घेत अतिरिक्त पेपर तपासण्याची विनंती केली. तशा प्रकारचे पत्रही देण्यात आले. काही संस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 'मटा'ला सांगितले. ज्या केंद्रावर नियमित तपासणीची प्रक्रिया सुरू आहे तशा काही तपासणी केंद्रावर अधिकच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कळते. त्याची प्रक्रिया दोन दिवसात करण्यात येणार आहे.

विक्रेंदीकरणानंतरही अडचणी

उत्तरपत्रिका तपासणीसाठी मंडळ पूर्वी केंद्रीय पद्धत अवलंबित असे. त्यावेळी जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी शिक्षकांना बोलावून उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया होत असे. महिनाभरापेक्षा अधिक कालावधी त्यासाठी लागत होता. त्यावेळीही शिक्षकांकडून अनेक अडचणी निर्माण केल्यानंतर विकेंद्रीकरण करण्यात आले. ठराविक ठिकाणी तपासणी केंद्र देण्यात आले. यामध्येही सर्रास तपासणीस नकार देण्याचे प्रकार समोर येत आहेत.

७५ हजार उत्तरपत्रिका!

औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून मंडळाकडे सोमवारपर्यंत गठ्ठे परत येण्याचे प्रकार सुरूच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७५ हजार उत्तरपत्रिका परत आलेल्या आहेत. अनेकांनी थेट आरोग्याची कारणे पुढे करत तपासणीस नकार दिला. अनेक वर्षांपासून शिक्षकांची न झालेली भरती प्रक्रिया, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित संस्थांची वाढती संख्या त्यांच्याकडे नसलेले पात्र शिक्षक यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

विभागातील अनुदानित संस्था..

जिल्हा..... दहावी...बारावी..

औरंगाबाद.. ५०३..... ९५

बीड...........४८६.....१०२

जालना........२१३....४३

परभणी........२८८.....४७

हिंगोली........१०७......१९

...

एकूण माध्यमिक शाळा... २५३९

एकूण उच्चमाध्यमिक शाळा... १२२४

..

दहावी विद्यार्थी संख्या........१८६०६६

बारावी............................१६८४२४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवरा, बहीण गेली; लेकरांचा बळी जाणार का?

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साहेब, माझा नवरा आणि बहीण बायपासवर झालेल्या अपघातात गेले. आता आमच्या लेकराबाळांचाही जीव जाणार का,' असा संतप्त सवाल बीड बायपासवर सोमवारी झालेल्या सभेत स्मिता पाठारे यांनी सोमवारी केला. तेव्हा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट आणि महापौर नंदकुमार घोडेले अक्षरश: निरुत्तर झाले.

बीड बायपास रोडवरील अपघातचक्र थांबत नाही. आठवड्यात दोन महिलांचा बळी गेला. त्यामुळे संतापलेल्या सातारा-देवळाई भागातील नागरिकांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता जाबिंदा लॉन्स येथे सभा घेतली. नागरिकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की, सभेसाठी जाबिंदा लॉन्सच्या शेजारी मंडप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, संतप्त सातारावासियांनी याला नकार देत उन्हातच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती. सभेत प्रशांत अवसरमल यांनी प्रास्ताविक केले. 'वारंवार होत असलेल्या अपघातामुळे सातारा - देवळाई परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढा,' असे आवाहन केले. यावेळी अनेक महिलांनी आपले मत मांडले. यावेळी संतप्त झालेल्या स्मिता पाठारे म्हणाल्या, 'माझा नवरा, बहीण बायपासवर अपघातात गेले. आता आमच्या लेकरांचा बळीही असाच जाणार का,' असा भावनिक सवाल केला. तेव्हा पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट आणि महापौर नंदकुमार घोडेले यांचे चेहरे क्षणात उतरले. यावर काय उत्तर द्यावे, कुणालाही सुचले नाही. त्यानंतर सविता कुलकर्णी ,ज्योती अवसरमल, शोभा सुंभ, रेखा सोनवणे, मीना भोसरे, मंगल दरे, मधू गोरे यांच्यासह इतर महिलांनी पाठारे यांच्या भावनेला प्रतिसाद देत आपले म्हणणे मांडले. नागरिकांचा तीव्र संताप पाहून आमदार संजय शिरसाट यांनीही वारंवार होत असलेल्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी काही नागरिकांनी सर्व्हिस रोडबाबत अजूनही काहीच निर्णय होत नाही. बायपासचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लावावा. वाहनांच्या वेगावर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली. अपघात झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप निर्माण होतो. तेव्हा कारवाई करण्याबाबत प्रशासनाला जाग येते. गेल्या काही वेळेपासून हे वारंवार होत आहे. आजच्या आज बीड बायपासच्या समस्येवर तोडगा काढा, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली. उसळलेला जनक्षोभ पाहता पोलिस आयुक्तांनी या मागण्यांवर त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शोभा यादव, गोदावरी गायकवाड, अनामिका अंकुश, रमेश वाहुळे, रणजित ढेपे, अल्ताफ बागवान, अभिजित देशमुख, अजिंक्य गायकवाड, नगरसेवक सायली जमादार, प्रदीप बुरांडे, राजेंद्र राठोड, कृष्णा दुधमल, संभाजी हाके, प्रा. साद लोधी, कांता कदम, सविता देशमुख यांच्यासह सातारा देवळाई परिसरातील अन्य नागरिकांची उपस्थिती होती.

\Bपालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा

\Bबीड बायपास रोडवर अपघात दोघांचा बळी गेल्यानंतर रविवारी सातारा देवळाई भागातील काही नागरिकांनी सातारा पोलिस ठाणे गाठले. बायपास रोडवरील अपघात हे महापालिकेच्या चुकीमुळे होत आहेत. त्यायामुळे महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमदारांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

\Bजनक्षोभानंतर चार तास पाहणी

\Bबायपासवरील सभेत नागरिकांनी केलेल्या आगपाखडीमुळे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीड बायपास रोडची चार तास पाहणी केली.

सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी मालमत्ताधारकांना दम दिला. अतिरेक करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी 'पोलिसी' भाषेत समज दिली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण हटविले नाही, तर गुन्हे दाखल करू असा इशाराही त्यांनी दिला.

\Bअपघात रोखण्यासाठी उपायोजना...

\B- जनक्षोभानंतर पोलिस कामाला. उपायोजना केल्या जाहीर.

- जड वाहनांची प्रवेश बंदी अजून एक तास वाढविण्याचा निर्णय.

- वाहनांचा वेग कमी करण्यासाठी झिग झॅग बरिगेटस लावणार.

- माऊलीनगर ते महानुभव चौकापर्यंत हा प्रयोग तूर्तास सुरू करणार.

- रस्त्यावरील डिवायडरजवळ गतिरोधक टाकण्याचा विचार सुरू

- देवळाई चौक ते एमआयटी हा सर्व्हिस रोड खुला करणार.

- देवळाई ते महानुभव आश्रम दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोड करणार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आचारसंहितेत अडकले महत्त्वाचे प्रकल्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे महत्त्वाचे प्रकल्प आचारसंहितेत अडकले आहेत. हे प्रकल्पा मार्गी लागण्यासाठी आता किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चर्चा आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशे कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा केली होती. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसह रस्त्यांची यादी शासनाकडे पाठवा, त्या यादीला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत रस्त्यांची यादी तयार केली व प्रशासकीय मान्यतेसाठी यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली. प्रशासनाने या यादीवर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. तांत्रिक मान्यता देखील रस्त्यांच्या यादीला मिळालेली नाही. त्यामुळे यादी शासनाकडे सादर करण्यात आली नाही.

कचरा प्रक्रिया प्रकल्प उभे करणे देखील मागे पडले आहे. चिकलठाणा येथील जागेवर प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असले तरी हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथील प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झाले नाही. हर्सूलसाठी पालिका हालचाल करीत असली तरी प्रकल्प उभारणीत या ठिकाणी अडचणी येत आहेत. पडेगाव येथे नागरिकांचा विरोध कायम आहे.

रस्ता, कचरा यांबरोबरच पाण्याचा प्रश्न देखील रेंगाळला आहे. समांतर जलवाहिनीसंदर्भात कंपनीशी चर्चा करून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. पालिका प्रशासनाने देखील यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा केला नाही. कचरा वाहतूक व संकलनाचे काम देखील पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. केवळ तीन झोन कार्यालयांच्या क्षेत्रात कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. शहरातील महत्त्वाचे चौक आणि रस्ता दुभाजक दत्तक देण्याची योजना देखील पालिका प्रशासनाने आखली होती, पण ही योजना देखील अद्याप अंमलात आलेली नाही. दत्तक योजनेचे पत्र संबंधितांना देवून करारनामे देखील करण्यात आलेले नाही. आता या सर्व कामांना लोकसभा निवडणुकीच्या नंतरच गती मिळेल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीत पुन्हा धुसफूस!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेसाठी राज्यात शिवसेना-भाजप युती झाली, तरी स्थानिक पातळीवर मात्र युतीच्या नेत्यांचे मनोमिलन झालेले नाही. जिल्हा परिषदेत कॉँग्रेससोबतची आघाडी तोडण्यात शिवसेनेने ठोस पाऊल उचलले नाही. त्यामुळे हा वाद भाजपकडून समन्वय समितीच्या कोर्टात नेण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

भाजप - शिवसेना युती म्हणून केंद्रात, राज्यात एवढेच नव्हे तर येथील महापालिकेतही आम्ही सत्तेत एकत्र आहोत. आता लोकसभा निवडणुकीला युती म्हणून सामोरे जात आहोत. काँग्रेससह इतरांच्या विरोधात लढत असतानाच जिल्हा परिषदेत मात्र शिवसेना काँग्रेससोबत आहे. हे चित्र योग्य नाही. त्याचे निवडणुकीत चांगले परिणाम होणार नाही. याचा विचार खासदार चंद्रकांत खैरे यांनी करावा, असा सल्लाही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी तर सेनेने दुटप्पी धोरणाचा त्याग करत जिल्हा परिषदेमधील काँग्रेससोबतची अभद्र आघाडी तातडीने तोडावी, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यास शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी 'मटा'शी बोलताना म्हणाले, 'भाजपने केलेली मागणी ही युतीच्या हितासाठी आहे. कोणाही व्यक्तिगत घेऊ नये. युतीचा खासदार निवडणून आणणे, हेच लक्ष असून त्यादृष्टीने जोमाने काम सुरू आहे. मात्र त्याच वेळी शिवसेना जिल्हा परिषदेत जर काँग्रेससोबत सत्तेत कायम राहणार असेल, तर निश्चितच यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.' दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप हा वाद समन्वय समितीच्या कोर्टात नेणार आहे. तिथल्या निर्णयानंतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणूक कामात सक्रिय होतील, अशी शक्यता आहे.

भाजपने केलेली मागणी ही युतीच्या हितासाठी आहे. मात्र शिवसेना जिल्हा परिषदेत जर काँग्रेससोबत सत्तेत कायम राहणार असेल, तर निश्चितच यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

- शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते

\B...तर झेडपीत युतीची सत्ता

\Bजिल्हा परिषदेत भाजपचे २३ सदस्य आहेत. त्याखोलाखोल शिवसेनेचे सदस्य असून, त्या ठिकाणीही युती सत्तेवर येऊ शकते. याचा चांगला संदेश जनतेत जाईल, असे मतही भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य उपसंचालक पदाचा मालेंकडे कार्यभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद विभागाच्या आरोग्य उपसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हा लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांच्याकडे सोपवण्यात आला. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यावर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांवर असामान्य ‘एमआरपी’; ३००० टक्क्यांनी जादा दराने विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधी उत्पादक कंपन्या औषधांवर असामान्य एमआरपी छापून ज्या किंमतीत वितरकांना औषध विकतात, तेच औषध किरकोळ विक्रेत्यांकडून जनसामान्यांना वितरकांपेक्षा ३००० टक्क्यांपर्यंत जादा किंमतीने विकले जाते, असा आरोप 'दि निझामाबाद चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'चे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोमाणी यांनी सोमवारी (११ मार्च) पत्रकार परिषदेत केला. ही देशातील सव्वाशे कोटी जनतेची फसवणूक असून, या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तक्रार केल्यानंतर अॅन्टी कॅन्सरची ४५ प्रकारची औषधे ८५ टक्क्यांनी स्वस्त झाल्याचा दावाही सोमाणी यांनी केला आहे.

या धक्कादायक प्रकारामुळेच १०० रुपयांचे औषध हे किरकोळ विक्रेत्यांकडून तब्बल ३००० रुपयांपर्यंत जास्त किंमतीने विकल्या जात आहे आणि हेच अनेक वर्षांपासून देशभर सुरू आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या सोयीसाठीच औषधी कंपन्यांकडून औषधांवर असामान्य किंमती छापल्या जात आहेत. वेगवेगळ्या सहा कंपन्यांचा उल्लेख करीत वितरकांना मिळणारे औषध जनसामान्यांना कसे २००० ते ३००० टक्क्यांपर्यंत जादा दराने विकल्या जाते, हे सोमाणी यांनी औषधांच्या नावासहीत सांगितले. याबाबत पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्यानंतर, ८० टक्के औषधांवर कोणतेच नियंत्रण नसल्याचे खुद्द सरकारने मान्य केल्याचे ते म्हणाले. औषधांच्या पाठपुराव्यामुळेच अॅन्टी कॅन्सरची ४५ प्रकारची औषधे ही ८५ टक्क्यांनी स्वस्त केल्याचा दावाही सोमाणी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षाला सक्षमपणे सामोरे जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीवनात अनेकदा संघर्षाचे क्षण येतात. त्यांना न घाबरता सक्षमपणे सामोरे जायला हवे. परिस्थितीशी लढायला शिका यश तुमचेच आहे, अशा शब्दात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी सोमवारी मार्गदर्शन केले.

शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, उपसंचालक डॉ. महेश शिवणकर, प्राचार्य डॉ. उमेश कहाळेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे रवी वैद्य, डॉ. एम. जी. शेख, डॉ. ए. एस. भालचंद्र, डॉ. आर. एम. दमगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, शिक्षण सर्वस्व आहे. चांगले शिक्षण घेऊन समाजात चांगले बदल घडविण्यासाठी प्रयत्न करा. घरातील मोठ्यांना आई-वडिलांना, गुरुजनांना मान द्या. खडतर परिस्थितीवर मात करत चांगले यशस्वी व्यक्ती होण्यासाठी मेहनत करा. आज असलेली परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्यात असते, ती ओळखायला शिका. मलाही परिस्थितीतून बाहेर येण्यास मोठा संघर्ष करावा लागला, असे सांगत त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनाचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.

उपजिल्हाधिकारी धानोरकर म्हणाल्या, कला, संस्कृती, परंपरा जपण्याबाबत अभियांत्रिकीचे विद्यार्थी दक्ष आहेत ही कौतुकाची बाब आहे. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पक वाळुंज, अमोल बडक, ज्ञानेश्वर कोहाळे, राहुल गव्हाळे, विकास जगदाळे, गौरव भटाने, संकेत टेकावडे, महेश दळवी, विजयसिंह माने, तृप्ती कौशिके, आकांशा पवार, दिवेकांत त्रिवेदी, प्रतिक्षा पवार, अंकिता पाटील, नेहा गुरसाल, अश्विनी निळ, योगेश्वर ढेपे, कल्पेश राजपूत, अजित बचाटे, धनंजय बोबडे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images