Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘ईव्हीएम’कडे राजकीय पक्षांची पाठ

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (ईव्हीएम) जिल्हा प्रशासनाने तपासणी सुरू केली आहे. या तपासणीकडे राजकीय पक्षांनी मात्र पाठ फिरविली.

गाळात रुतलेल्या दोन कोटींना दणका

$
0
0
राज्य सरकारने तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केलेल्या निधीतून आता निकड व निकषानुसारच कामांची निवड करण्याचे सक्त आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी गाळात रुतलेल्या दोन कोटींना सीओंचा दणका दिला आहे. यामुळे शुक्रवारी होणारी सभेत या विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

हमी योजनेमागे ससेमिरा

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (एमआरईजीएस) कामांबाबत केलेल्या तक्रारी मागे घेणाऱ्या सराईत तक्रारदारांना पायबंद घालावा, अशी शिफारस या योजनेच्या तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

उड्डाणपुलाजवळ रोजचेच मरण

$
0
0
संग्रामनगर उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरूच आहे. रेल्वेचे फाटक पडले, हमखास वाहतूक कोंडी होते. मग कुणाला ऑफिसला जायला उशीर, तर कुणाला हॉस्पिटलला जायला. पेशंट असो, वा ठणठणीत व्यक्ती त्यांच्या पदरी रोजचेच मरण, अशा प्रतिक्रिया वैतागलेल्या नागरिकांतून येताहेत.

उड्डाणपूल तयार

$
0
0
संग्रामनगर उड्डाणपूल बांधून पूर्ण झाल्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनचालकांची एक आठवड्यात सुटका होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुलाचे उद‍्घाटन करावे,

शिपाईच करतात कराची आकारणी

$
0
0
‘महापालिकेच्या कर आकारणी विभागाकडे तांत्रिक कर्मचारी नाहीत. शिपाईच कर आकारणीचे काम करतात,’ असा आरोप करीत नगरसेवकांनी कर आकारणी विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला.

जायकवाडीला २२.५ टीएमसी पाणी द्या

$
0
0
गेल्या पावसाळ्यात वापरण्यात आलेल्या पाण्याचा हिशेब करून जायकवाडी प्रकल्पासाठी वरील धरणांतून २२.५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे.

तुळजाभवानी मूर्तीवर दुग्धाभिषेकच

$
0
0
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील मुख्य मूर्तीर्ची होणारी झीज थांबविण्यासाठी श्री त‌ुळजाभवानी मातेच्या मुर्तीला पंचामृताऐवजी केवळ दुधाचा अभिषेक घालण्यावरून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.

बस नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

$
0
0
वीरगाव-औरंगाबाद एसटी बस अचानक बंद करण्यात आल्यामुळे परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास २६ जानेवारी रोजी वीरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे आगारप्रमुखांना देण्यात आला आहे.

‘घटकापुरते मर्यादित करणे चुकीचे’

$
0
0
देशातील सर्वच उपेक्षित आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. त्यांना केवळ एका जातीपुरते अथवा घटकापुरते मर्यादित करणे अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठीचे प्रा. डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

तहसीलदारांना माहिती न दिल्यामुळे दंड

$
0
0
माहितीच्या अधिकाराखाली मागण्यात आलेली माहिती वेळेत न दिल्यामुळे राज्य महिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाचे आयुक्त पी. डब्ल्यू. पाटील यांनी गंगापूर येथील तत्कालीन तहसीलदारांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पहायला गेले; लग्न लावून परतले

$
0
0
शहरातील मगनपुरा येथील देशपांडे कुटुंबातील मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी चिखलवाडीत गेलेल्या वराकडील मंडळी लग्न उरकूनच परतली. ही घटना गुरुवारी घडली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

तहसीलदारांसह ३३ कर्मचारी गैरहजर

$
0
0
लोहा तालुक्यातील तहसील, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी, कोषागार कार्यालयात गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी पडताळणी केली. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे यांच्यासह ३३ कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आले आहे.

लोकसभेसाठी भाजपची दमछाक

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असताना मराठवाड्यात भारतीय जनता पक्षावर मात्र उमेदवारांचा शोध घ्यावा लागण्याची नामुष्की ओढावली आहे. उमेदवार शोधताना नांदेड आणि लातूर जिल्ह्यात या पक्षाच्या नेत्यांची दमछाक होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे.

सौरदिव्यांच्या वादावरून युतीमध्ये पडला ‘उजेड’

$
0
0
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत खरेदी केलेल्या सौर दिवे खरेदी प्रकरणावरून गेल्या वेळची सर्वसाधारण गाजली होती. सभा तहकूब झाली होती. ती सभा शुक्रवारी दुपारी वादानेच सुरू झाली.

रणरागिणींनी ‘झेडपी’मध्ये दाखविले पाणी

$
0
0
दुष्काळी जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून औरंगाबादला आलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून निवडक सदस्यांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. यास जिल्हा परिषदेतील सर्वपक्षीय महिला सदस्यांनी आक्षेप घेऊन सभागृहाची कोंडी केली. प्रशासनही सदस्यांसमोर हतबल झाले.

वाहनचोरांची टोळी जेरबंद

$
0
0
झोन टू पोलिसांनी वाहनचोरांची टोळी जेरबंद केलेली असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही तीन अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पूर्णा येथे रेल्वेचा नवा झोन स्थापावा

$
0
0
मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटना तसेच, कर्नाटक रेल्वे प्रवासी संघटनेच्या संयुक्त शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना भेटून पूर्णा येथे नवीन झोन स्थापन करण्याची मागणी केली.

शारीरिक शिक्षण महाविद्यालय अधांतरी

$
0
0
शालेय शिक्षण विभागाने वर्ग केले परंतु, उच्च शिक्षण विभागाने स्वीकारले नाही. अशा अवस्थेत राज्यातील शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमांचे कॉलेज अडकले आहेत. ‌दोन्ही विभागांमध्ये समन्वय नसल्याने आपण कोठे आहोत?

झालर गैरव्यवहाराची राज्य सरकारकडून विचारणा

$
0
0
सिडकोच्या झालर क्षेत्र प्रारूप आराखड्यातील गैरव्यवहाराच्या तक्रारींची राज्य शासनाने दखल घेतली आहे. त्यासोबतच अनेकांकडून आराखडा रद्द करण्याच्या मागणीवरही सिडकोची काय भूमिका असू शकते याची चाचपणी करण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images