Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘बीड बायपासला सर्व्हिस रोड होणारच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या दतीने बीड बायपासवरील अतिक्रमणे हटवून तेथे सर्व्हिस रोड नक्कीच करण्यात येणार आहे. या करिता तेथील नागरिक, लोकप्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंवजीप्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयुक्तांनी बीड बायपास भागात अतिक्रमणाच्या पाडापाडीची पाहणी केली.

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी बीड बायपास रोड येथे पाहणी करताना न काढलेली अतिक्रमित बांधकामे काढण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या. त्यांच्यासोबत पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, पोलिस निरीक्षक भारत काकडे, अशोक मुदीराज आदींची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, बीड बायपास भागातील कारवाईत नागरिकांचे सहकार्य उत्तम राहिले आहे. यापुढील काळात अतिक्रमणे हटविताना नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेला पोलिस बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पडेगाव तसेच हर्सूल येथील अतिक्रमणामुळे देखील वाहतुकीस अडचण होत असून अपघात होत आहेत. या अतिक्रमित रस्त्यावर देखील आगामी काळात कारवाई करणार असल्याचे संकेत त्यांनी दिली. लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा जालना रोडला पर्यायी रस्ता असलेले काम रखडले आहे. हे काम नेमके कशामुळे रखडले आहे, याची माहिती घेणार असल्याचेही आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुचर्चित हिवाळे लॉन्सवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लागोपाठ दोन दिवस झालेल्या अपघातात दोन महिलांचा बळी गेल्यानंतर पोलिस प्रशासनाने पालिकेची मदत घेत बीड बायपासच्या अतिक्रमणावर कठोर कारवाई हाती घेतली आहे. शुक्रवारी बहुचर्चित हिवाळे लॉन्सच्या सहा मजली बिल्डिंगच्या अवैध बांधकामावर हातोडा घालण्यात आला. यावेळी हिवाळे लॉन्सची कमान तोडण्यात आली. त्यापूर्वी एमआयटी कॉलेजच्या सरंक्षक भिंतीवर बुलडोझर फिरवण्यात आला. कडक पोलिस बंदोबस्तात सुरू असलेली ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

गेल्या चार दिवसांपासून बीड बायपासचा सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी अतिक्रमण हटावची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी घेतलेल्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. शुक्रवारी सकाळी पालिकेच्या पथकाने एमआयटी कॉलेजची सरंक्षक भिंत पाडण्याची कारवाई केली. यावेळी दोन जेसीबी आणि ट्रकचा वापर करण्यात आला. येथील हिवाळे लॉन्सचे अतिक्रमण पडणार की नाही याबाबत नागरिकांत शंका होती. शुक्रवारी सायंकाळी पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हिवाळे लॉन्स येथे पोहचले. येथे पालिकेचे प्रभारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी भेट दिली.

या कारवाईत अतिक्रमण विभाग प्रमुख अविनाश देशमुख, दक्षता पथक प्रमुख एम. बी. काझी, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, अतिक्रमण पथक प्रमुख प्रभाकर पाठक, शाखा अभियंता संजय चामले, कोंबडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, एस. एल. कुलकर्णी, मजहर अली, विनोद पवार, पी. बी. गवळी, अतिक्रमण हटाव पथकाचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्यासह ५० पोलिसांचा ताफा, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

\Bप्रभारी पालिका आयुक्त घटनास्थळी \B

विनायक हिवाळे यांनी इमारतीमधील साहित्य काढून घेण्यासाठी वेळ मागितला व पंचनामा करावा, मोबदला मिळावा, अशी मागणी केली. महापालिकेचे प्रभारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पथकाला तातडीने पाडकाम करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय पालिका प्रशासन नियमानुसार कारवाई करेल, असे स्पष्ट केले. यानंतर पोकलेनच्या मदतीने हिवाळे लॉन्सची कमान पाडण्यात आली. ही कमान पाडल्यानंतर काम थांबवण्यात आले.

\B४ दिवसांतील कारवाई

८६ मालमत्ता जमीनदोस्त

१४० मालमत्ताधारकांना नोटीस \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी वाढले ३६१ मतदान केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रशासनाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. वाढलेल्या मतदारसंख्येमुळे मराठवाड्यातील मतदान केंद्रांमध्ये गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदा ३६१ केंद्रांची भर पडली आहे. यावेळी १६ हजार २०८ मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.

वाढलेल्या मतदार संख्येनुसार सर्वाधिक मतदान केंद्रांची वाढ औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे. यानुसार आता औरंगाबाद जिल्ह्यात सर्वांत जास्त तीन हजार ६२ मतदान केंद्र असून, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी एक हजार ६० अशी मतदान केंद्र राहणार आहेत. मराठवाड्यात यंदाही तीव्र दुष्काळ आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदानकेंद्रांवर सुविधांचा वाणवा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदान केंद्रांवर पाणी, वीज तसेच अपंग मतदारांसाठी रॅम्प, झोननिहाय वैद्यकीय मदत आदीच्या सुविधा करण्यात येणार आहेत. या शिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये संपर्कासाठी मोबाइल फोनची कनेक्टिव्हिटी बाबतही काम सुरू आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधील सर्व मतदान केंद्रांवर टूजी कनेक्टिव्हिटी असल्याने किमान संभाषणास कोणतीही अडचण राहणार नाही. जिल्ह्यामध्ये मतदारसंघांना कनेक्टिव्हिटीच्या अडचणी दूर करण्यासाठी १७१ डार्क झोन होते. दोन महिन्यांपूर्वी 'बीएसएनएल'ने बूस्टर यंत्रणा लावल्यामुळे कनेक्टिव्हिटीची अडचण दूर झाली आहे. याच प्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांच्या संदर्भामध्ये काम सुरू आहे. मराठवाड्यामध्ये २०१४च्या लोकसभेमध्ये एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत १५ हजार ८४७ मतदान केंद्र होते. मात्र, यावर्षी वाढलेल्या मतदारसंख्येमुळे मतदान केंद्रांमध्येही वाढ करण्यात आली आहे. यानुसार संपूर्ण मराठवाड्याच्या ग्रामीण भागात १५१, तर शहरी भागात २१० मतदान केंद्रांची भर पडली आहे. लातूर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागामध्येही सर्वाधिक मतदान केंद्रांची वाढ झाली आहे.

---

\Bजिल्हानिहाय मतदान केंद्र

\B---

जिल्हा.........................नवीन मतदान केंद्र..................... एकूण केंद्र

----

औरंगाबाद..........................१०५.....................................३०६२

जालना..............................१६३३....................................१६७८

परभणी.............................३८........................................१५४२

बीड...............................२२...........................................२३३३

लातूर.............................६६...........................................२०६१

हिंगोली............................५९..........................................१०६०

नांदेड.............................२०..........................................२९७५

उस्मानाबाद.......................०६........................................१४९७

--------

एकूण............................३६१......................................१६२०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वाकोटीची फसवणूक; महिलेस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास रक्कम दुप्पट करून देण्याचे आमीष दाखवून आठ महिलांना तब्बल सव्वाकोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणातील आरोपी सुवर्णा संजय मनगटे हिला अटक करून कोर्टात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (१९ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी शुक्रवारी (१५ मार्च) दिले.

या प्रकरणी शुभांगी चंद्रकांत कुलकर्णी (वय ४५, रा. दशमेशनगर) यांनी फिर्याद दिली होती. कुलकर्णी यांचा साडीचा व्यवसाय असून संशयित आरोपी अनुराधा सुरेश पवार (वय ४२, रा. पुंडलिकनगर) हिने स्वत:चा साडीचा व्यवसाय असल्याचे सांगत तिच्या व्यवसायात रक्कम गुंतवल्यास रक्कम दुप्पट करुन देण्याचे आमीष दाखवले होते. त्यामु‌ळे कुलकर्णी यांनी आधी ३ लाख रुपये, नंतर ५ लाख रुपये, १ लाख ६० हजार रुपये, ११ लाख रुपये, अशी रक्कम विविध मार्गे गुंतवली. नंतर पैसे मागितले असता, अनुराधाने बहीण सुवर्णा संजय मनगटे (रा. सिडको एन-तीन) हिच्याकडे नेले. सुवर्णा हिने स्वत:चा शासकीय गुत्तेदारीचा व्यवसाय असल्याचे सांगून, 'अजून कुणाला पैसे गुंतवायचे असतील तर गुंतवा, दामदुपटीने पैसे परत करते', असे आमीष दाखवले व कुलकर्णी यांचा विश्वास मिळवला. त्यानंतरही कुलकर्णी यांच्याकडून रक्कम घेत एकूण २५ लाख ९५ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मात्र आरोपीने नंतर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. कुलकर्णी यांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर काही धनादेश दिले, जे बँकेत वटले नाहीत. तसेच आरोपीने फिर्यादीला सावकारीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात फिर्यादीसह एकूण आठ व्यक्तींची एक कोटी २४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.

\Bरकमेची विल्हेवाट लावली कशी?

\Bप्रकरणात संशयित आरोपी सुवर्णा मनगटे हिला गुरुवारी अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, आरोपी अनुराधा ही फरार असून, आरोपींनी फसवणुकीच्या रकमेची विल्हेवाट कशी लावली, काही मालमत्ता खरेदी केली का व आरोपींनी आणखी कितीजणांची फसवणूक केली, याचाही सखोल तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील अडित अंकुश यांनी केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपी मनगटेला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्य स्मृती पुरस्कार अरविंद वैद्य यांना जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यंदाचा आठवा अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरविंद गंगाधरराव वैद्य यांना जाहीर झाला आहे. एकवीस हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

औरंगाबाद शहरातील पत्रकारितेच्या विश्‍वात 'मोठे वैद्य' म्हणून सुपरिचित असलेल्या आणि 'मराठवाडा' दैनिकाचे संपादक राहिलेल्या अरविंद आत्माराम वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी त्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. याच काळात 'छोटे वैद्य' असे नामाभिधान मिळालेल्या ज्येष्ठ पत्रकार अरविंद गं. वैद्य यांना यावर्षी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी वि. वि. करमरकर, निळू दामले, शांतारामबापू जोशी, जीवनधर शहरकर, विद्याभाऊ सदावर्ते, गोपाळ साक्रीकर आणि नागनाथ फटाले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दोन वर्षांपासून युवा पत्रकारासही पाच हजार रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा तरुण पत्रकार विद्या गावंडे या पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत. महिला, बालकल्याण आणि शिक्षण या विषयातील लिखाणाने त्यांनी अल्पावधीतच पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. टिळकनगर येथील जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात २९ मार्च या अरविंद वैद्य स्मृतिदिनीच सायंकाळी सहा वाजता या दोन्ही पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

अल्प परिचय

औरंगाबादच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर अरविंद गंगाधरराव वैद्य यांनी १९७० साली नाशिक येथून पत्रकारितेची सुरुवात केली. तब्बल साडे चार दशके या क्षेत्रात रमलेल्या वैद्य यांनी दैनिक 'गावकरी', 'मराठवाडा', 'लोकसत्ता', 'लोकमत', 'वीरराष्ट्र', 'शिवशक्ती', 'विशाल सह्याद्री', 'देवगिरी तरुण भारत', 'नागपूर पत्रिका' या दैनिकांबरोबरच यू.एन.आय. या वृत्तसंस्थेसाठीही काम केले. चित्रपट आणि क्रीडा हे त्यांच्या आवडीचे विषय. चित्रपट आणि चित्रपट संगीतावर त्यांनी विपुल लेखन केले. त्याचबरोबर 'आकाशवाणी'वर गीतांचे रसग्रहणही केले. 'दै. सकाळ'च्या औरंगाबाद आवृत्तीत त्यांनी दीर्घकाळ स्तंभलेखन केले. त्याचीच पुढे 'निमित्त' आणि 'दिल की कलम से' ही पुस्तके प्रकाशित झाली. तत्पूर्वी 'छोड गये बालम' हे पुस्तकही प्रसिद्ध झाले. २००१ पासून निवृत्तीनंतर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचेही काम त्यांनी केले. २०१२ मध्ये त्यांना 'नारद पुरस्कारा'नेही गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार, कुऱ्हाडीने हल्ला; तिघांचा जामीन नामंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलीला दुचाकीवर घेऊन जाताना ब्रिजवाडी परिसरात तलवार, कुऱ्हाड, सळई, काठ्यांनी पित्यावर गंभीर हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी यादव श्रवण पाखरे, प्रकाश यादव पाखरे व मंगेश अशोक साबळे यांनी दुसऱ्यांदा सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी फेटाळला.

या प्रकरणी व्यापारी अनुराग दामोधर जाधव (३२, रा. ब्रिजवाडी) यांनी फिर्याद दिली होती. २६ नोव्हेंबर २०१८ रोजी जाधव हे त्याच्या मुलीला दुचाकीवर घेऊन जात असताना, ब्रिजवाडी परिसरात जुन्या भांडणावरुन अडवून यादव श्रवण पाखरे (वय ५८), प्रकाश यादव पाखरे (वय ३८), मंगेश अशोक साबळे (सर्व रा. ब्रिजवाडी) व इतर सहा आरोपींनी तलवार, कुऱ्हाड, सळई व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाला. प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ कलमान्वये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, वरील तिन्ही आरोपींनी दुसऱ्यांदा नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, गुन्हा गंभीर असून, यातील आरोपी रवी साबळे हा अजूनही फरार आहे; तसेच आरोपी व फिर्यादी हे एकाच भागात राहात असल्यामुळे आरोपींना जामीन मंजूर केल्यास फिर्यादीवर पुन्हा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीत दोन लाचखोर पोलीस निरीक्षकांना अटक

$
0
0

उस्मानाबाद

ढोकी पोलीस स्टेशनच्या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आलं.

बेंबळी पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना नुकतंच पकडण्यात आलं होतं. त्याची शाई वाळते न वाळते तोच ढोकीच्या दोन लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं आहे.

तक्रारदार यांच्या पत्नीने ढोकी पोलीस स्टेशनमध्ये एनसी दाखल केलीय. गैर अर्जदार यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी ढोकी पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी गणपत धनसिंग जाधव आणि जोतीराम गणपत कवठे यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. यापैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून आज त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात ढोकी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीच्या मेळाव्यात चक्क मित्रपक्ष वंचित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी युती पदाधिकाऱ्यांचा मराठवाडास्तरीय मे‌ळावा होत आहे. मात्र, या मेळाव्यापासून महायुतीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम आणि रयत क्रांती संघटनेला दूर ठेवण्यात आल्याने, नाराजीचा सूर तीव्र झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर मराठवाड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पहिलाच संयुक्त मेळावा होत आहे. शहानूरवाडी येथील श्रीहरी पॅव्हेलियन येथे सकाळी ११ वाजता मेळावा सुरू होणार असून, शिवसेना भाजपचे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित यावेळी राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या युतीच्या या संयुक्त मेळाव्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना किंवा किमान स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण असेल, असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही. महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंला या मेळाव्यापासून दूरच ठेवण्यात आले आहे. आठ‌वले गटाचे अनेक प्रमुख पदाधिकारी औरंगाबादेत राहतात. मात्र, असे असतानाही मेळाव्यासंदर्भात सेना व भाजपकडून त्यांना साधा निरोपही गेला नाही. याबाबत रिपाइंचे (आठवले गट) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, बैठकीबाबत कोणताही निरोप मिळाला नसल्याचे नमूद केले. पक्षाने राज्यात लोकसभेच्या किमान दोन जागेची मागणी केली आहे. अन्याय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले असताना त्यांचे मात्र उमेदवारही जाहीर होत आहेत. रिपाइंचे कार्यकर्ते या सर्व प्रकारामुळे अस्वस्थ असून डावलण्यात येत आहे, असा कार्यकर्त्यांमध्ये समज निर्माण होत आहे, असे कदम यांनी सांगितले. दरम्यान, रयत क्रांती संघटनेचे नेते आणि जिल्हाध्यक्ष विनायक पाटील यांनी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचे सांगतानाच युतीचा संयुक्त मेळावा शहरात होत असताना किमान निरोप मिळेल, अशी अपेक्षा होती, असे नमूद केले. तर शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

महायुतीची घोषणा २४ मार्चला

संयुक्त मेळाव्यापासून घटक पक्षांना दूर ठेवण्यात आले आहे, तर दुसरीकडे महायुतीची घोषणा येत्या २४ मार्च रोजी करण्यासाठी सेना भाजपकडून जोमाने तयारी सुरू झाल्याचे समजते. यासंदर्भात भाजप प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही मुंबई येथे महायुतीची लवकरच घोषणा होणार असल्याचे नमूद केले.

रविवारी होणाऱ्या बैठकीबाबत कोणताही निरोप आम्हाला मिळाला नाही. अन्याय होणार नाही, असे मुख्यमंत्री आश्वासन देतात. मात्र, दुसरीकडे त्यांचे मात्र उमेदवार जाहीर होत आहेत. रिपाइंचे कार्यकर्ते या प्रकारामुळे अस्वस्थ आहेत. त्यांच्यात डावलण्यात येत असल्याचा समज निर्माण होत आहे.

- बाबूराव कदम, प्रदेश कार्याध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पडेगावातील अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या १८ एकर जागेत केलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेने शनिवारी हातोडा मारून तब्बल २८ अतिक्रमणे साडेतीन तासांत जमीनदोस्त केली.

कचरा प्रश्न गंभीर झाल्यानंतर पालिकेने विविध भागांमध्ये प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पडेगाव येथील जागा निश्चित केली. मात्र, त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम उभारण्यात आले होते. शनिवारी पालिकेचे अतिक्रमण पथक सकाळी आठ वाजता पडेगाव येथे पोहचले. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. सुरुवातीला घटनास्थळावर विरोध झाला. पोलिसांचा बंदोबस्तात पालिकेने धडक कारवाई केली. साडेअकरा वोजपर्यंत ही कारवाई सुरू होती. या जागेवरील सुमारे अठ्ठावीस अनधिकृत बांधकामे पथकाने साडेतीन तासांत भुईसपाट केली. कारवाईनंतर बांधकामाचे साहित्य संबंधित घेवून गेले. अतिक्रमण काढण्यात आल्याने कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीतील मोठा अडसर दूर झाला आहे. आगामी काळात लवकरच हे केंद्र सुरू करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे.

\Bपालिकेची कडक कारवाई

\B- ६६, ६७ गटक्रमांक

- १८ एकर जागा

- २८ अतिक्रमणे

- ३ तासांत भुईसपाट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाथषष्ठी सोहळ्याचे बुधवारपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संत एकनाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त बुधवारपासून (२० मार्च) भजन, कीर्तन, पालखी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शनिवारी औरंगपुरा येथील श्री संस्थान एकनाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. सदाशिवराव देवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रतिष्ठाननगरी पैठणप्रमाणे औरंगपुरा येथील श्री संस्थान एकनाथ मंदिरात दरवर्षी एकनाथ षष्ठी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बुध‌वारी सकाळी नऊ वाजता अॅड. गंगाधर महाराज घुगे यांच्या हस्ते कलश पूजन, ध्वजारोहण व ग्रंथ पूजनाने सोहळ्यास सुरुवात होईल. सकाळी सात ते बारा कृष्णा महाराज आरगडे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत भजन होईल. रात्री आठ वाजता गायक अभिजित शिंदे यांचा 'आलाप' हा भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे. २१ मार्च रोजी रात्री सात वाजता पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे. २२ मार्चला संत तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्त सकाळी दहा वाजता कृष्णा महाराज आरगडे यांचे कीर्तन, तर रात्री सात वाजता भारतीताई महाराज गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे. श्री क्षेत्र पैठण येथील नाथ वंशज प्रवीण महाराज गोसावी यांचे शनिवारी रात्री सात वाजता कीर्तन होणार आहे. रविवारी (२४ मार्च) भागवताचार्य माधव महाराज पैठणकर आणि सोमवारी अरुणनाथगिरी महाराज यांचे कीर्तन होईल. २६ मार्च रोजी सकाळी काकडा आरती व भजन झाल्यानंतर सकाळी सात वाजता श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. कुंभारवाडा, मछली खडक, सराफा, शहागंज, राजाबाजार, किराणा चावडी, पानदरीबा, सुपारी हनुमान, गुलमंडी, औरंगपुरामार्गे काढण्यात येणाऱ्या पालखीची सांगता मंदिर परिसरात होणार आहे. दुपारी बारा वाजता पादुका अभिषेक महापूजा व त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. रात्री सात वाजता रामराव महाराज हेडगे यांचे किर्तन होईल, अशी माहिती देवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष रवींद्रकुमार बडे, सचिव लक्ष्मण थोरात, सहसचिव विष्णू जाधव उपस्थित होते.

\Bपुलवामा शहिदांच्या कुटुंबांना आर्थिक मदत

\B२७ मार्च रोजी नाना महाराज कदम यांचे कीर्तन होणार असून, २८ मार्च रोजी दुपारी तीन नवनाथ महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. सोहळ्यानिमित्ताने रक्तदान शिबिर यासह अन्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे. सोहळ्यादरम्यान रोज पहाटे चार वाजता काकडा आरती, सकाळी सहा वाजता विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ७ ते ११ पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर गाथाभजन, दुपारी १२ वाजता विविध महिला भजनी मंडळांची भजने, सायंकाळी पाच वाजता हरिपाठ व रात्री सात वाजता कीर्तन आणि दहा वाजता जागराचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरतीप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सैन्य भरतीत बनावट शैक्षणिक कागदपत्रांआधारे जन्मतारखेत बदल केल्याप्रकरणात जळगाव येथील किरण सुरेश पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी शनिवारी फेटाळला.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे. आरोपीकडून इयत्ता दहावीचे प्रमाणपत्र जप्त करणे आहे. आरोपीने बोगस प्रमाणपत्र कोठे तयार केले याचा तपास करायचा असल्याने आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागुला यांनी केली. या प्रकरणात सैन्य भरती कार्यालयाचे कर्नल सावलशहा कलीया यांनी तक्रार दिली होती. त्यांच्याकडे नऊ जिल्ह्यातील सैन्य भरतीचे कामकाज आहे. सैन्य भरतीसाठी २०१८मध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यात आले होते. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी नोव्हेंबर २०१८मध्ये जळगाव येथे झाली. उर्तीण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा औरंगाबाद येथील छावणीत झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे डॉमिसाइल, जात प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र व इतर कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात जन्मतारखेत बदल असल्याचे दिसून आले. त्याआधारे त्यांच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याआधारे विठ्ठल लक्ष्मण धनगे (२५, रा. सारोळा, ता. कन्नड), सचिन काकासाहेब भोसले (२३, रा. आडगाव ता. कन्नड), रवींद्र आण्णा गरुड (२५, रा. केळगांव ता. सिल्लोड) व दीपक संतोष बोखारे (२४, रा. कळमसर, ता. पाचोरा जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या हर्सूल कारागृहात आहेत. त्यांचा नियमित जामीन अर्ज सात मार्च रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोलीभाषांचे स्तरीकरण समोर आणा !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'प्रमाणभाषा व बोलीभाषेच्या खेळात प्रमाणभाषेला अधिमान्यता मिळते. मात्र, समांतर समूहाच्या भाषा दुय्यम स्वरुपात गणल्या जातात. त्यांचा अभ्यासही होत नाही. या परिस्थितीत व्यवहारासाठी मान्यभाषा आणि समाजभाषा हे स्तरीकरण पुढे आणण्याची गरज आहे', असे प्रतिपादन समीक्षक डॉ. केशव तुपे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

प्रा. ज्ञानेश्वर गवळीकर लिखित 'समाजभाषा आणि ग्रामीण कादंबरी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर 'मसाप'चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, न्यायमूर्ती किशोर सोनवणे, प्रा. एस. टी. जगताप, डॉ. राजश्री पवार व ज्ञानेश्वर गवळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. तुपे यांनी पुस्तकावर सविस्तर भाष्य केले. 'देशी भाषांना उतरती कळा लागली असून, त्या नष्ट होत असल्याची बाब सर्वांपर्यंत पोहचली आहे. भाषेच्या दृष्टिने ही गंभीर गोष्ट आहे. अशा काळात समाजभाषा आणि ग्रामीण कादंबरी अशा विषयावर संशोधन करणे दखल घेण्यासारखे आहे. वेगवेगळ्या स्तरीकरणातून आलेल्या भाषांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. शुद्ध-अशुद्ध भाषेचे वादसुद्धा निकाली निघत आहेत. दबलेल्या वर्गातील भाषेची ओळख ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातून झाली. 'बारोमास'सारखी कादंबरी मान्य भाषा व प्रमाणभाषेचे उत्तम उदाहरण आहे', असे तुपे म्हणाले.

\Bभाषा कशा जगतील...?

\B'भाषा कशा जगतील याची चिंता अभ्यासकांना वाटत आहे. भाषा व्यवहारात संपुष्टात येत असल्याची वस्तुस्थिती आहे. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्यासोबत भाषासुद्धा नष्ट होते. त्यामुळे कादंबरीचा विचार समाजभाषेच्या अंगाने होणे महत्त्वाची बाब आहे' असे कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी साहित्य रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपासवर पालिकेची नसती उठाठेव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपासवरील अतिक्रमण हटाव कारवाई शनिवारीही पूर्ण झाली नाही. दरम्यान, कर्तव्यदक्ष प्रशासनाने रस्त्यालगतचे पाच एकर खासगी भूखंडावरील अतिक्रमण काढून दिल्याची नसती उठाठेव केल्याने नव्याच चर्चेला तोंड फुटले आहे. मूळ कारवाई सोडून या वादग्रस्त जागेचे 'काम' कोणासाठी आणि कशासाठी केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बायपासवरील अपघातात बळी गेल्यानंतर जाग आलेल्या पालिकेने अतिक्रमणांवर कठोर कारवाईचा बडगा उचलला. शनिवारी सातारा परिसरात पालिकेचे पथक पोहचल्याचे समजताच अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले. मात्र, पथकाने दुपारच्या वेळी मूळ कामाला बगल देत चक्क एका मोकळ्या जागेवरील अतिक्रमण काढून दिले. एमआयटी कॉलेजच्या बाजूला असलेला हा मोकळा भूखंड गुलबर्ग सोसायटीचा असल्याची माहिती समोर आली. या ठिकाणी अनेक कुटुंबांनी दहा किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांपासून ठिय्या मांडला होता. पन्नासपेक्षा अधिक कुटुंब या जागेवर राहत होती. शहरातील विविध रस्त्यावर काम करून पोट भरणारे सुमारे चारशे, पाचशे जण या भूखंडावर राहत होते. पालिकेचा जेसीबी त्या कुटुंबाच्या घरांवरही फिरला. ही पाच एकर जागा असून, या जागेचा वाद सुरू आहे. मात्र, कोणाच्या सांगण्यावरून प्रशासनाने रस्ता सोडून हे काम केले, याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या जागेतील एक एकर जागा पालिकेची असल्याने ही कारवाई केल्याचे अतिक्रमण विभागीतल अधिकारी वामन कांबळे यांनी सांगितले. या कारवाईचा मोठा गाजावाजा होत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने लवाजम्यासह काढता पाय घेतला. सातारा परिसरात कारवाई सुरू असताना उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांनीही हजेरी लावली. किती अतिक्रमणे काढण्यात आली, याबाबत मात्र, पुरेसी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

जयभवानीनगर, शिवाजीनगरमध्येही कारवाई

प्रशासनाला कारवाई नेमके कोठे करायची आहे, याबाबतही साशंकता असल्याचे समोर आले. अतिक्रमण पथकाने शनिवारी सायंकाळी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन, जयभवानीनगर, शिवाजीगर भागात कारवाई केली. साताऱ्यातील कारवाई संपत नाही तोच सायंकाळी गाड्या शिवाजीनगरकडे वळल्या. जयभवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वस्टेशन रोडवरील ओटे, अतिक्रमणे काढली.

कारवाईचा फोकस हा बीड बायपास रोडवरच असणार आहे. बायपासवर एक पाच एकरचा खासगी भूखंड रिकामा केल्याचे माझ्याही कानावर आले. मी दुपारनंतर आढावा घेतला नव्हता. उपस्थितांकडून त्याचा आढावा घेतला जाईल.

- ओमप्रकाश बकोरिया, प्रभारी आयुक्त, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वंचित’च्या पहिल्या यादीनंतरही पेच !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने ३७ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. काही मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्यामुळे उमेदवारांबाबत मतदारात संभ्रम वाढला आहे. मराठवाड्यातील सात मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले असून, औरंगाबाद मतदारसंघाचे त्रांगडे कायम आहे. वंचित बहुजन आघाडीने समविचारी पक्षांचे सहकार्य घेताना गुंतागुंत वाढवल्याचे नेत्यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी एकाही टप्प्यावर यशस्वी बोलणी झाली नसल्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीने ३७ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने सतत तीन वेळेस हरलेल्या मतदारसंघातील १२ जागा सोडण्याची 'वंबआ'ची मागणी होती. प्रत्यक्षात चार जागांवरही एकमत होऊ शकले नाही. परिणामी, ३७ उमेदवारांची घोषणा करून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मतदारसंघात काँग्रेस आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. विशेषत: बौद्ध, मुस्लिम, ओबीसी मतदारांवर 'वंबआ'ची भिस्त आहे. या मतदारांच्या एकत्रिकरणीतून राज्यात नवीन राजकीय प्रयोग करीत असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मात्र, युती-आघाडीच्या प्रस्थापित उमेदवारांना तगडे आव्हान देईल, अशा उमेदवारांची 'वंबआ'कडे कमतरता जाणवत आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सक्षम उमेदवार निवडण्यात आघाडी कमी पडल्याची चर्चा सुरू आहे. काही मतदारसंघात 'वंबआ'चे उमेदवार युती-आघाडीसमोर आव्हान उभे करणारे आहेत. पण, त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. समविचारी पक्षांची मदत घेताना विविध जातीच्या संघटना आणि सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा करण्यात आली. मुख्य प्रवाहातील पक्षांशी चर्चा करताना व एकत्र निवडणूक लढवण्यासाठी एकमत करण्यात आघाडी अपयशी ठरली. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि पक्षाचे अनुयायी संभ्रमात आहेत. विशेषत: मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्रचार सुरू झाल्यानंतर चित्र सकारात्मक करण्याचे अॅड. आंबेडकर यांच्यासमोर आव्हान आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही मतदारसंघात कमी प्रभाव असलेले उमेदवार जाहीर झाल्यानंतर इतर पक्षातील उमेदवारांनी प्रचाराची रणनीती बदलली आहे.

\Bमताधिक्य घटण्याची शक्यता

\Bभारिप बहुजन महासंघ पक्ष आता वंचित बहुजन आघाडीत विलीन करून याच नावाने पक्ष ठेवण्याचे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. या मतावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आंबेडकरी चळवळीत 'भारिप'चे स्वतंत्र स्थान असून ते कायम ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. एमआयएम आणि जनता दल यांच्याकडे औरंगाबादच्या जागेचा निर्णय सोपवून 'वंबआ'ने पेच वाढवला आहे. दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असून 'वंबआ'च्या पाठिंब्यासाठी प्रयत्नशील आहेत. दलित-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्यास दोन्ही पक्षांचे मताधिक्य घटण्याची शक्यता आहे.

\Bमराठवाड्याचे उमेदवार

\B- डॉ. शरदचंद्र वानखेडे (जालना)

- मोहन राठोड (हिंगोली)

- प्रा. यशपाल भिंगे (नांदेड)

- आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (परभणी)

- प्रा. विष्णू जाधव (बीड)

- अर्जुन सलगर (उस्मानाबाद)

- राम गारकर (लातूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगात वाहन चालवले; ११ जणांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढत्या अपघातांना खीळ घालण्यासाठी बीड बायपास रस्त्यावर पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनी 'स्पीड गन' प्रयोगाची सुरुवात केली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून हा प्रयोग सुरू करण्यात आला असून, यात शनिवारपर्यंत ११ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

बायपासवर होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सर्व्हिस रोड तयार करण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे. दुसरीकडे शहर वाहतूक विभागाने पुन्हा एकदा स्पीड गन लावून वाहन वेग मर्यादा मोजण्याची कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सायंकाळी स्पीड गनच्या माध्यमातून वेगात वाहन दामटणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारपर्यंत एकूण अकरा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात कार आणि दुचाकींचा समावेश असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडे एकूण सहा स्पीड गन आहेत. यापैकी पाच गन नादुरुस्त आहेत. त्यामुळे बायपास रोडवर एकमेव स्पी डगनचा उपयोग सुरू आहे.

\B

दुभाजक केले बंद\B

बीड बायपास रोडवर वाहनांचे अपघात होऊ नये यासाठी या रस्त्यावरील मिनाज हॉटेल, बजाज हॉस्पिटल तसेच कासलीवाल अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक बंद करण्यात आले आहेत. याशिवाय सिडको हद्दीत असलेल्या बीड बायपास रोडवरही अशीच कारवाई करण्यात आली.

\B……

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रँकरने दुचाकीस्वाराला चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समर्थनगरातील अंबिया मशीद येथे नमाजसाठी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पाण्याच्या टॅँकरने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. यात सय्यद सोहेलउद्दीन सय्यद शफिउद्दीन (वय ३१, बारापुल्ला गेट, मिलकॉर्नर) यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद सोहेलउद्दीन हे टेडी डायपर कंपनीत सेल्समन म्हणून नोकरी करायचे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ते कंपनीसाठी डायपरच्या ऑर्डर घेत जुनाबाजार भागात किड्‌स केअर येथे पोहचले. त्यांच्या दुकानात त्यांनी ऑडर घेऊन दुकानमालक खमर खान यांना नमाज पठणासाठी समर्थनगर येथील अंबिया मशीद येथे जात असल्याचे सांगितले. दुपारी सव्वाच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने (एमएच २० ईव्ही ५०२६) निघाले. काही वेळाने ते सावरकर चौक येथे पोहचले. त्यावेळी कोटला कॉलनी येथून भरून आलेल्या पाण्याच्या टॅँकरने (एमएच २० एफ ६८२२) त्यांना चिरडत फरफटत नेले. त्यात सोहेलच्या छातीसह पोटाला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरच्या काही तरुणांनी जखमी सोहेलला घाटीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा डॉक्‍टरांनी सोहेल याला तपासून मृत घोषित केले.

\Bटँकरचालक टँकरसह फरार

\Bअपघाताची माहिती समजताच क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहचेपर्यंत टॅँकरचालक टॅँकर घेऊन फरार झाला होता. चालक व टॅँकरचा शोध सुरू आहे, असे पोलिस उपनिरीक्षक राऊत यांनी सांगितले. हा टॅँकर महापालीकेचा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याची याबाबतची कोणीतीही ठोस माहिती पोलिसांनी दिली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार

$
0
0

अहमदनगर

अहमदनगर-जामखेड रोडवर झालेल्या ट्रक आणि इर्टिका कारच्या भीषण अपघातात कारमधील चौघे ठार झाले. आज पहाटे चारच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पोखरी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. सर्व मृत एकाचा कुटुंबातील आहेत. नागेश चमकुरे चालक, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे (वय ७ वर्षे), अनिकेत चमकुरे अशी मुतांची नावे आहेत.

भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि इर्टीका कारची समोरासमोर टक्कर होऊन हा भीषण अपघातात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. सर्वजन नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पिरजादे येथील रहिवाशी आहेत.

68447748


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Arjun Khotkar- Raosaheb Danve : जालन्याचा तिढा सुटला, खोतकर यांची माघार

$
0
0

औरंगाबाद:

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना येथून लोकसभा निवडणूक लढवण्याची गर्जना करणारे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळं आता जालन्याचा तिढा सुटला असून, दानवे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दानवे यांच्या विरोधात जालन्यातून निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम होते. भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर ते माघार घेतील, अशी चर्चा होती. मात्र, खोतकर यांनी युती झाल्यानंतरही निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला होता. त्यामुळं भाजपच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. हा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू होत्या. अखेर हा जालन्याचा तिढा सोडवण्यात वरिष्ठांना यश आलं आहे. अखेर दानवे आणि खोतकर यांच्यात दिलजमाई झाली आहे. आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं खोतकर यांनी औरंगाबादमधील युतीच्या मेळाव्यात जाहीर केलं. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा धर्म समजावून सांगितला. उद्धव ठाकरे यांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. त्यामुळं आपण माघार घेत आहोत. युतीचं काम करणार असून, देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे. मी कडवट सैनिक असून, दगाफटका करणार नाही. पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दानवे यांना रान मोकळे आहे,' असं खोतकर म्हणाले.

भाजप-शिवसेना युतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. भाजप आणि शिवसेना युतीप्रमाणे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचाही फेविकॉलचा मजबूत जोड आहे, असं फडणवीस म्हणाले. तर मराठवाड्यातील आठही जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Devendra Fadnavis: कितीही काडी केली तरी सगळे सोबत: फडणवीस

$
0
0

औरंगाबाद:

भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. २४ तारखेला कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला. तुम्ही कितीही काडी केली तरी सगळे सोबत राहणार आहेत, असं ते म्हणाले.

युतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. खोतकर-दानवे हे एकत्र आल्यानं औरंगाबाद आणि जालन्यातील सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला. भाजप-शिवसेना युतीप्रमाणे खोतकर आणि दानवे यांच्यात फेविकॉलचा मजबूत जोड झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप आणि शिवसेना एकमेकांना बोलले. पण मनाने कधीच वेगळे झालो नव्हतो. सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष कधीच एकत्र आले नाहीत. मातृभूमीवर प्रेम करणारे नेहमीच एकमेकांच्या सोबत राहतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठवाड्यातील आठही जागा भाजप-शिवसेनेच्या निवडून येतील यात अजिबात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी फडणवीस यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना मिळाली नाही, इतकी मदत युती सरकारने दिली. ७० हजार कोटींची कर्जमाफी केली असं शरद पवार सांगतात, पण महाराष्ट्रात फक्त चार हजार कोटी रुपये दिले, हे ते सांगत नाहीत. १५ वर्षांत फक्त एकदा दिले तर डांगोरा पिटतात. पण आता तर दरवर्षी ७० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. 'आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असं आवाहन त्यांनी युतीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं. आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे, पडणार ते नक्कीच, असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावला. मी शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की ज्यांच्या आशीर्वादाने हा भगवा फडकतोय त्या मायबाप जनतेची फक्त मते नकोत, त्यांचे आशीर्वाद पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला शिकवले आहे, असं त्यांनी सांगितलं. भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असं ते म्हणाले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे, खोतकर वादावर १७ मिनिटांत पडदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

युती झाल्यानंतरही जालना लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढतीसाठी गेल्या काही महिन्यापासून जोमाने तयारी लागलेल्या शिवसेना नेते, मंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी अखेर तलवार म्यान केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दानवे व खोतकर वादाबाबत बैठक झाली. 'युतीच्या धर्माचे पालन करा,' असे आदेश देत अवघ्या १७ मिनिटांत युतीच्या नेत्यांनी या वादावर तोडगा काढला आणि दानवे यांचा चेहरा फुलला.

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद गेल्या काही महिन्यांत वाढला होता. त्यांच्यात जुने राजकीय वैर आहे, परंतु खोतकर यांनी थेट 'दानवे विरोधात लोकसभा निवडणूक लढविणार,' अशी घोषणा केल्याने हा वाद अधिक पेटला. युतीची घोषणा झाल्यानंतर खोतकरांनी माघार घेतली नाही. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासमवेत भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बैठक झाली आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादेत बैठक घेण्याचे निश्चित ठरले. त्यानुसार जालना रोड येथील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दानवे, खोतकर यांच्या वादावर आयोजित या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच युतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी बैठकस्थळी गर्दी केली होती. सकाळी सुमारे सव्वाअकरा वाजता खोतकर यांचे येथे आगमन झाले. थोड्या वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आगमन झाले. शिवसेना नेते खोतकर यांनी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. हॉटेलमध्ये येताच मुख्यमंत्री रूम क्रमांक ३४८मध्ये तर ठाकरे हे रूम क्रमांक ३२५मध्ये गेले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनतर मुख्यमंत्र्यांसह मुंडे, दानवे आदी भाजप नेते ठाकरे यांच्या रुममध्ये गेले आणि बंद दाराआड युतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, खोतकर आदी यावेळी उपस्थित होते. सुमारे १७ मिनिटांनंतर ही बैठक संपली.

चेहऱ्यावर स्मित हास्य

बैठक संपताच सर्व जण मेळाव्याच्या दिशेने रवाना झाले. 'बैठकीत काय तोडगा निघाला,' असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना केला असता त्यांनी स्मित हास्य करत 'चेहऱ्यावर काय दिसते,' असे सांगत वाद मिटला असल्याचे सूचित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images