Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

प्रणव प्लाझात पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा येथील प्रणव प्लाझा या तीन सेक्टरच्या अपार्टमेंटमध्ये पाणीबाणी निर्माण झाल्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांनी मंगळवारी महापालिकेत धाव घेतली. पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली. गुरुवारी पाणी आले नाही तर शुक्रवारी प्रणव प्लाझामधील सर्व रहिवासी डब्बे घेऊन महापालिकेत येऊन बसतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रणव प्लाझा अ, ब, क सेक्टर ही इमारत औरंगपुरा भागात भाजी मंडईच्या परिसरात आहे. औरंगपुरा भागास ज्युबलीपार्क येथील जलकुंभातून पाणी पुरवठा होतो. प्रणव प्लाझाला देखील याच जलकुंभातून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या चार-सहा महिन्यांपासून प्रणव प्लाझामध्ये पाणीच येत नसल्यामुळे येथील रहिवाशांनी मंगळावारी थेट महापालिकेत धाव घेतली. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. यावेळी उपमहापौर विजय औताडे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी उपस्थित होते. रहिवाशांनी महापौरांबरोबर पाणीबाणी बद्दल चर्चा केली. प्रणव प्लाझाला मुद्दाम पाणी दिले जात नाही, असा आरोप करीत त्यांनी पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चार-सहा महिन्यांपासून पाणी येत नाही. टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते, असे त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. आता गुरुवारी पाण्याचा दिवस आहे. गुरुवारी योग्यप्रकारे पाणी पुरवठा न झाल्यास शुक्रवारी मुलाबाळांसह डब्बे घेऊन आम्ही महापालिकेत येऊन बसू असा इशारा देण्यात आला. पाणी प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. गुरुवारी पाणी पुरवठा निश्चितपणे होईल, असे ते म्हणाले.

महापौरांची भेट घेण्यासाठी मंगल खिवंसरा, प्रशांत भूमकर, जब्बार, भाग्यश्री बावस्कर, मंगल भालेराव, स्नेहल कुलकर्णी, रेखा मुंडे यांच्यासह अन्य रहिवासी पालिकेत आले होते. त्यांच्या बरोबर त्यांची लहान लहान मुले देखील होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरीपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलने करूनही शेतीसाठी पूरक धोरण राबविले जात नाही. देशभरात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांबाबत सहवेदना व्यक्त करीत शेकडो शेतकरीपुत्रांनी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन केले.

१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली होती. राज्यातील ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. या दुर्घटनेनंतर सतत शेतकरी आत्महत्या सत्र सुरू राहिले. शेतीपूरक धोरण राबविण्यात सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले. या दुर्लक्षाचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला. प्रतिकूल आयात-निर्यात धोरणही शेतीच्या देशोधडीला कारणीभूत ठरले. सद्यस्थितीतही शेतकरी बिकट परिस्थितीत संघर्ष करीत आहे. शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करीत शेकडो शेतकरीपुत्रांनी 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन केले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रांगणात मंगळवारी सकाळी ११ ते चार या वेळेत आंदोलन करण्यात आले. विविध क्षेत्रातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेत सहवेदना व्यक्त केल्या. किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनाने आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, प्रा. श्रीराम जाधव, कौतिकराव ठाले पाटील, जयश्री गोडसे, डॉ. फुलचंद सलामपुरे, विकास देशमुख, नितीन देशमुख, अॅड. महेश भोसले, श्रीकांत उमरीकर, संदीप वाघ, बालाजी मुळीक, प्रा. हंसराज जाधव आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी अपघात विमा योजनेचा फज्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावापैकी तब्बल १०८ प्रकरणे निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. यामुळे संबंधित पीडित शेतकरी कुटुंब भरडले जात आहे.

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला, तर त्याच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी त्यासाठी सरकारकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. त्यात विजेच्या धक्याने, सर्पदंश, पाण्यात बुडून आदी अपघाताने मृत्यू ओढविल्यास शासनाकडून दोन लाखांची आर्थिक मदत वारसांना विमा कंपन्याकडून दिली जाते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अपघातात मृत शेतकऱ्यांचा विमा मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येतो. या प्रस्तावात पंचनामा, मृत्यूचे कारण, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आदींचा समावेश करून कृषी विभागाकडे सादर करण्यात येतो. कृषी विभागाकडून पडताळणी केल्यानंतर हे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात येतात. कृषी विभागाच्या विभागीय सहायक संचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातून २०१७ - २०१८ या वर्षात औरंगाबादेतून १०२, जालन्यातून ९३ व बीड १४३ असे एकूण ३३८ प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी १५२ प्रस्ताव संबंधित अर्जदारांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता न केल्याने प्रलंबित आहेत. त्यात औरंगाबादेतील ५७, जालना ४३ व बीड जिल्ह्यातील ५२ प्रकरणे आहेत. तर विमा कंपनीकडे कागदपत्राची पूर्तता होऊन देखील तब्बल १०८ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

\Bदोन प्रकरणे नाकारली

\Bजालन्या जिल्ह्यातील दोन प्रकरणे विमा कंपनीने नाकारले असून, एकूण प्रस्तावापैकी ७६ मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तर २०१८-१९ या वर्षात आतापर्यंत जालन्यातून एक प्रस्ताव सादर झाला असून, तो कार्यवाहीसाठी विमा कंपनीकडे सादर झाला आहे. दरम्यान, अनेक प्रस्तावावर कार्यवाही तातडीने होत नसल्याने मृत शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजावे लागत आहेत.

\Bजिल्हानिहाय प्रस्ताव

\B- १४३ बीड

- १०१ औरंगाबाद

- ९३ जालना

- ३३८ एकूण

- १०८ प्रलंबित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोर सोडून संन्याशाला फाशी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

'चोर सोडून संन्याशाळा फाशी' ही म्हण प्रत्यक्षात याची देही, याची डोळा सोदाहरण दाखविण्याचे महान काम प्रशासनाने केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे विनापरवाना डिजिटल बॅनर शहरात लावले आहेत. या प्रकरणी हे बॅनर लावणारे राजकीय पुढारी मोकळे सोडून प्रशासनाने चक्क डिजिटल बोर्ड तयार करणाऱ्या कारागिरांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या धडाकेबाज कारवाईची मोठ्या चवीने चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात साजरा झाला. साहजिकच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपमधील शिलेदार सरसावले. त्यांनी शहभर मोठमोठे होर्डिंग लावले. त्यावर रावसाहेब दानवे यांच्यासोबत शुभेच्छुक म्हणून भाजप कार्यकर्ते कल्याण गायकवाड यांचाही फोटो आहे. 'शुभेच्छुक म्हणून पैठण विधानसभा मतदार संघातील सर्व नेते व कार्यकर्ते' असा उल्लेख आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर कुणाचीही परवानगी न घेता शहरात लावले. त्यामुळे रविवारी (१७ मार्च) संध्याकाळी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने हे सर्व बॅनर काढून जप्त करण्यात आले होते. हे लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांना पुन्हा हुरूप चढला. त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, संभाजी चौक व खंडोबा चौकात पुन्हा हेच बॅनर झळकावले. याबाबत माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी पुन्हा एकदा बॅनर काढून जप्त केले. विशेष म्हणजे हे बॅनर कोणी लावले हे शोधून काढणे दूरच तर या प्रकरणी हे डिजिटल बॅनर तयार कारागिर योगेश टेकाळे यांच्याविरोधात विरोधात पैठण पोलिस ठाण्यात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगर परिषद कर्मचारी अश्विन गोजरे यांच्या फिर्यदिवरून योगेश टेकाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\B

शुभेच्छुक मोकाट

\Bभाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या डिजिटल बोर्डवर भाजप कार्यकर्ते कल्याण गायकवाड यांचा फोटो छापण्यात आला होता. 'शुभेच्छुक म्हणून पैठण विधानसभा मतदार संघातील सर्व नेते व कार्यकर्ते' असा उल्लेख होता. मात्र, भाजप शहर आणि तालुका कार्यकारिणीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे धाडस प्रशासनाने दाखविले नाही. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षपातीपणा करणाऱ्या या कारवाईविरोधात जनतेमध्ये संताप आहे.

…\Bनियम काय सांगतो?

\Bनिवडणूक काळात आचार संहिता सुरू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला परवानगीशिवाय प्रचार, भाषण करता येत नाही. याकरिता उमेदवाराने आपल्या सभांसाठी तसेच होर्डिंग लावण्यासाठी प्रशासनाचे स्वीकृतीपत्र मिळवणे आवश्यक असते. अन्यथा प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येतो. आता या प्रकरणात प्रकाशक आणि शुभेच्छुक म्हणून पैठण विधानसभा मतदार संघातील सर्व नेते व कार्यकर्ते असा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. मात्र, हे नेते आणि कार्यकर्ते शोधून काढणे म्हणले तर तसे सोपे आणि अवघडही. त्यामुळे हा धोका पत्करायला प्रशासन तयार नाही.

खासदार रावसाहेब दानवे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे डिजिटल बोर्ड लावण्याची परवानगी मिळावी यासाठी योगेश टेकाळे यांनी नगर पालिकेत अर्ज दिला होता. मात्र, नगरपालिकेची परवानगी मिळण्याच्या अगोदर त्याने विनापरवानगी डिजिटल बोर्ड लावल्याने आम्ही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, नगर परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसाचे घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस कॉन्स्टेबलचे घर फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. रविवारी दिवसा बेरीबाग, हर्सूल येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख कलीम शेख सलीम (वय ३२, रा. बेरीबाग, प्लॉट क्रमांक ०७, हर्सूल) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख कलीम हे ग्रामीण पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. रविवारी त्यांच्या भावाचा बाहेरगावी साखरपुडा होता. शेख कलीम हे कुटुंबासह घराला कुलूप लावून सकाळी दहा वाजता साखरपुड्याला गेले होते. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोख ३५ हजार आणि दागिने असा दोन लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला. या दागिन्यात सोन्याची पोत, पॅडल, नेकलेस, अंगठी, सेव्हनपिस, सोन्याचा मनी आणि पत्ता, कानातले, नथ, चांदीचे पैंजण, जोड, कडे, चैन आदी दागिन्यांचा समावेश आहे. सायंकाळी सहा वाजता शेख कलीम घरी परतले. यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय भागिले तपास करीत आहेत.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट अधांतरी, पालिकेचे आता लेखानुदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेचे बजेट अधांतरी राहिले आहे. वेळेत बजेटचे काम होऊ न शकल्यामुळे आता लेखानुदान मांडण्याची तयारी केली जात आहे. पुढील आठवड्यात स्थायी समितीच्या समोर पालिका आयुक्त लेखानुदान सादर करतील, अशी माहिती मिळाली आहे.

महापालिकेच्या प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात चालू वर्षाचे सुधारित आणि नवीन वर्षाचा मूळ अर्थसंकल्प सादर करणे नियमानुसार गरजेचे आहे, परंतु औरंगाबाद महापालिकेत कधीच फेब्रुवारी महिन्याची डेडलाइन पाळण्यात आली नाही. मार्च महिन्याच्या अखेरीसच अर्थसंकल्प सादर केला जातो. यंदाही त्याच दृष्टीने अर्थसंकल्प तयार करण्याचे काम पालिकेतर्फे करण्यात आले, परंतु दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सुधारित व मूळ अर्थसंकल्प सादर न करता चार महिन्याच्या खर्चाचे लेखानुदान सादर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाला करावा लागणारा बांधील खर्च आणि सुरू असलेल्या विकास कामांच्या अनुशंगाने करावा लागणारा अत्यावश्यक खर्च याचा समावेश लेखानुदानात असणार आहे. किमान ४०० कोटींचे लेखानुदान पुढील आठवड्यात स्थायी समितीला सादर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात काँग्रेसची धावपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याबाबत अंदाज चुकल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आता अखेरीस लोकसभेसाठी उमेदवाराचा शोध घेण्याची शेवटच्या क्षणी जबाबदारी आमदार अब्दुल सत्तार आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल या दोन नेत्यांच्या खांद्यावर टाकली आहे. सोमवारी रात्री उशिरा आमदार सत्तार हे जालन्यात आले. त्यावळी काँग्रेसच्या संतापलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी त्यांना, खोतकरांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या आणि त्यानंतर एकूणच काँग्रेसच्या तत्वाविरोधात वागण्याच्या त्यांच्या भूमिकेविषयी जाब विचारला, मात्र गोरंट्याल यांनी मध्यस्थी करून,'हा वाद आता नको,' असे म्हणत प्रसंग सांभाळून घेतला.

गोरंट्याल यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची सत्तार यांनी मते ऐकून घेतली. मंगळवारी दिवसभर गोरंट्याल हे औरंगाबादच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत होते एकंदरितच काँग्रेसच्या गोटात उमेदवार शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी माजी आमदार कल्याण काळे यांच्या नावाला सर्वाधिक पाठिंबा आहे, मात्र काळे यांना फुलंब्री विधानसभेच्या निवडणुकीत जास्त रस आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नावाची चर्चा झाली, मात्र गोरंट्याल हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. शेवटचा पर्याय म्हणून आमदार सत्तार यांनीच लोकसभा लढवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. विलास औताडे यांच्या नावावर चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि माजी आमदार अरविंद चव्हाण यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

\Bसत्तार यांना सुनावले\B

'जालन्यातील राजकारणात दररोज ज्यांच्या सोबत आम्ही संघर्ष करतो आहोत त्यांच्या गळ्यात गळे घालून तुम्ही फिरता आणि सगळे तिकडे औरंगाबादहून ठरवता. मग इथे कशाला येता,' अशा शब्दांत आमदार सत्तार यांच्यासमोर जालन्यातील काँग्रेसच्या अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान,'झाले गेले विसरून जा. आपल्या नेत्यांनी त्यांना पाठवले आहे. कोणी जास्त बोलायचे नाही,' असे सांगून माजी आमदार गोरंट्याल यांनी स्थानिक कार्यकर्ते व नगरसेवकांना शांत केले. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड हे जालन्यात कधीच येत नाहीत. त्यांचा आमदारीचा निधी देत नाहीत, अशा तक्रारी अनेक नगरसेवक, कार्यकर्त्यांनी केल्या.

......

यावेळी बैठकीत काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जेष्ठ नेते डाॅ संजय लाखे पाटील, विमलताई आगलावे, रामराव पाटील खडके,शहराध्यक्ष शेख महेमूद, नगरसेवक महावीर ढक्का यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरा शेजारच्या वीज तारा हटवा

$
0
0

औरंगाबाद : शहरात अनेक ठिकाणी लघु-उच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या तारा घरांना लागून, कमी उंचीवर असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे घरांना लागून असलेल्या विद्युत तारा तत्काळ हटवा, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महावितरणचे मुख्य अभियंता, विभागीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे सोमवारी सहकारनगर येथे राहणारे निवृत्त अधिकारी जयराज पाथ्रीकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीलगत उच्चदाबाची विद्युत वाहिनीच्या तारा अनेक दिवसांपासून लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्या तारा हटवण्याची मागणी जयराज पाथ्रीकर यांनी महावितरणकडे वारंवार करूनही त्या हटविल्या नाहीत. त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अनेक विद्युत वाहिन्यांच्या तारा जीर्ण व जुनाट झाल्याने वारंवार खंडीत होतात. परिणामी अनेक नागरिकांच्या अंगावर विद्युत तार पडल्याच्या देखील घटना शहरात घडल्या आहेत. महावितरण अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार? त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेता विद्युत तारा हटवण्यासंदर्भात महावितरणने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पत्रातून केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यपानाचा जाब विचारताच पत्नीचा जाळून खून करणारा पती राजू रघुनाथ दाभाडे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी ठोठावली.

या प्रकरणात पीडित विवाहिता सुनीता राजू दाभाडे (२६ , रा. घारेगाव एकतुनी, ता. जि. औरंगाबाद) हिच्या मृत्युपूर्व जबाबावरून करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार, आरोपी राजू रघुनाथ दाभाडे (३५, रा. वरीलप्रमाणे) याला दारू पिण्याची सवय होती व त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत. २५ मार्च २०१७ रोजी आरोपी राजू हा रात्री साडेदहाच्या सुमारास घरी दारू पिऊन आला. त्याला पत्नीने दारू पिल्याचा जाब विचारताच आरोपीने रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तिने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तसेच शेजाऱ्यांनी तिला विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ती ४५ टक्के भाजली होती. त्यानंतर तिला घाटीत दाखल करण्यात आले होते. पोलिस नाईक एस. बी. पाटील यांनी तिचा मृत्युपूर्व जबाब नोंदवला व तिच्या जबाबानुसार भारतीय दंड संहितेच्या ३०७ कलमान्वये करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा १८ एप्रिल २०१७ रोजी मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला होता.

\Bमृताच्या आईची साक्ष ठरली महत्वाची

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील शरद बांगर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मृत सुनीताची आई व पोलिस नाईक पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा घडल्यापासून आरोपी अटकेत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्रांतीनंतर पुन्हा जेसीबीचा नांगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपासवरील अतिक्रमण हटाव मोहिमेला दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी पुन्हा सुरूवात करण्यात आली. हिवाळे लॉन्सच्या अंतर्गत भिंती पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोबतच सिल्कमिल्क कॉलनीतील पटेल, बिलाल आणि सह्याद्री लॉन्सच्या संरक्षण भिंतीवर जेसीबीचा नांगर फिरवण्यात आला.

बायपासवरील अतिक्रमणावर कारवाई सुरू केल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत थांबा असे सांगितल्याने मोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी कोर्टाच्या आदेशाने पुन्हा सर्व्हिस रोडचा रस्ता मोकळा करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात करण्यात आली. हिवाळे लॉन्स शेजारी असलेली बन्नेखान यांची दुमजली इमारत दोन जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आली. यावेळी पिलर कोसळल्याने ही इमारत काही मिनिटांत जमीनदोस्त झाली. या इमारतीशेजारी हिवाळे लॉन्स ही सहा मजली इमारत आहे. या इमारतीचा अतिक्रमित भागही पाडण्यात येणार आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यापासून सुरुवात करण्यात येणार असून इमारतीच्या अंतर्गत भिंती पाडण्याचे काम पालिकेच्या मजुराकडून सुरू करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांत नव्वद मालमत्ता या कारवाईत पाडण्यात आल्या आहेत. या कारवाईसाठी चार पोलिस निरीक्षक, स्ट्रायकींग फोर्स आदी बंदोबस्त देण्यात आला असल्याची माहिती एसीपी ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.

\Bभूसंपादनासाठी पन्नास कोटी द्या

\Bबीड बायपासच्या सर्व्हिस रोडसाठीच्या भूसंपादनासाठी पन्नास कोटींचे विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी महापालिकेकडून शासनाकडे केली जाणार आहे. बांधकामे पाडण्यास आमचा विरोध नाही, पण पालिकेने रितसर भूसंपादन करून जागा ताब्यात घ्याव्यात. भूसंपादन केलेल्या जागेचा मोबदला द्यावा, अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. त्याची दखल घेत पालिकेने मोबदल्यासाठी आवश्यक असलेली रक्कम शासनाकडे मागण्याचा निर्णय घेतला आहे. मोबदल्याच्यारुपात रोख रक्कम देणे पालिकेला शक्य नाही. त्यामुळे शासनाने या कामासाठी पन्नास कोटींची मदत करावी असा प्रस्ताव दिला जाणार आहे. रोख रकमेशिवाय टीडीआर आणि एफएसआयच्या स्वरुपात मोबदला देण्याची तरतूद आहे.

\Bमोकळा श्वास

\B- १३४ मालमत्ता बाधित

- २ दिवसांपासून कारवाई

- ९० मालमत्ता पाडल्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंबर दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा एमआयडीसीमधील पॉवरलूम जवळ ड्रेनेज लाइनच्या चेंबरमध्ये पडून दोन शेतकऱ्यांचा सोमवारी मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी दिले आहेत. घडलेले घटना फारच गंभीर असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भूमिगत गटार योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या मोठ्या व्यासाच्या ड्रेनेज लाइनवर चेंबरचे बांधकाम करण्यात आले आहे. या चेंबरमध्ये पडून दोन शेतकरी मरणपावले. मंगळवारी आणखी एकाचा याच घटनेत मृत्यू झाला. या घटनेबद्दल मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक व महापौर नंदकुमार घोडेले यांच्यात चर्चा झाली. घडलेली घटना फारच गंभीर असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी भावना महापौरांनी व्यक्त केली. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. चेंबर तयार करण्यात काही त्रुटी राहून गेल्या का, चेंबरवरचा ढापा योग्य प्रकारे लावण्यात आला होता का, निकषानुसार ढाप्याचे काम करण्यात आले आहे का, आदी बाबींची चौकशी केली जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मला बीपी, शुगर... इलेक्शन ड्यूटी नको...'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मला शुगर, बीपीचा त्रास आहे... मतदानादरम्यान अडचण आल्यास काय करू?', ' मे महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे, आतापासूनच तयारी करावी त्यामुळे निवडणुकीची काम जमणार नाही,' यांसह अनेक कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून सुटका करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या खेट्या सुरू झाल्या असल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

निवडणुकीचे नाव काढले की अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. काहींची खरोखर अडचण असले, पण अनेक जण निरनिराळी, खोटी कारणे सांगून इलेक्शन ड्यूटी टाळण्याचा प्रयत्न करतात. अनेक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीची कामे टाळण्यासाठी अनेक सबबी पुढे केल्या आहेत. 'मला केंद्रप्रमुख केले आहे, त्याऐवजी इतर ड्यूटी द्या,' अशी मागणी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

निवडणुकीचे काम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. यंदा निवडणुकीसाठी सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, प्रशासनाकडे ३० हजार ५०० कर्मचारी उपलब्ध आहेत. निवडणूक प्रशिक्षणासाठी यातील अनेकांना पत्रेही पाठविण्यात आली आहेत, मात्र ही पत्रे मिळाल्यापासून अनेक कर्मचाऱ्यांच्या इलेक्शन ड्यूटीतून सुटका मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खेट्या सुरू झाल्या आहेत. अर्जदार कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या कारणांची खातरजमा करूनच त्यांचे अर्ज तूर्त प्रशासनाकडून स्वीकारण्यात येत आहेत. प्रशासनाकडे निवडणुकीच्या कामाला आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकचे कर्मचारी उपलब्ध असले तरी, निवडणुकीची जबाबदारी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार काय, असा प्रश्न आहे.

अडचण विचारात घेऊनच ड्यूटी

जिल्हा प्रशासनकडून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी कार्यालये, खाजगी शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांचे पद व वय आदी माहितीनुसारच कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्यूटी देण्यात आली आहे. निवृत्त होत असलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना निवडणुक ड्यूटीतून वगळण्यात आले आहे. महिला कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांच्या बोटाला शाई लावण्याची (ऑफिसर क्रमांक तीन) जबाबदारी देण्यात येणार आहे. या शिवाय महिला कर्मचाऱ्यांना शहरातच ड्यूटी देण्यात येणार असल्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना 'पोलिंग पार्टी'सोबत मतदान केंद्रावर जाण्याऐवजी मतदानाच्या दिवशी थेट मतदान केंद्रांवर जावे लागणार आहे. एका मतदान केंद्रावर मतदारसंख्येनुसार एक केंद्रप्रमुखासह तीन किंवा चार सहाय्यक अधिकारी राहतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर महिलेचा दोन कोटी रुपयांसाठी छळ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेरून दोन कोटी रुपये घेऊन येण्याची मागणी करीत सासरच्या मंडळीनी डॉक्टर महिलेचा छळ केला; तसेच विवाहितेच्या मनाविरुद्ध दोन वेळा गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आला. १८ मे २०१७ ते १२ मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार एन-चार भागात घडला, अशी तक्रार डॉक्टर महिलेने केली आहे. त्यावरून डॉक्टर पती, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असलेला सासरा, दीर, नणंद आणि सासू यांच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या पीडित विवाहितेचे माहेर कंधार (जि. नांदेड) येथील आहे. या विवाहितेचा विवाह १८ मे २०१७ रोजी नांदेड येथील ओम गार्डन येथे डॉ. महेश हिरालाल जाधव याच्यासोबत पार पडला. सुरुवातीचा एक महिना चांगला गेल्यानंतर या विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून छळ सुरू झाला. चारित्र्यावर संशय घेत मारहाण करण्यात आली. मोबाइल देखील काढून घेऊन तिला माहेरच्यांशी देखील संपर्क करू देण्यात येत नव्हता. पीडित विवाहितेच्या आई, वडिलांनी समजूत काढल्यानंतर सासरची मंडळी काही दिवस शांत राहिली मात्र, नंतर पुन्हा त्रास सुरू झाला.

ही विवाहिता दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतरही तिच्या मनाविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात करण्यात आल्याचे विवाहितेने तक्रारीत नमूद केले आहे. या विवाहितेचा तब्येत बरी नसल्याचे सांगत तिला माहेरी पाठवण्यात आले. ही महिला पुन्हा सासरी परतल्यानंतर तिच्याकडे, नवीन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी; तसेच स्कोडा कार घेण्यासाठी माहेरून दोन कोटी रुपये घेऊन येण्याची, मागणी करण्यात आली. पैसे आणले नाही तर घरात घेणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून पीडित विवाहितेने अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेत कैफियत मांडली. तिच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी डॉ. महेश हरिलाल जाधव, हरिलाल रामसिंग जाधव, दिनेश हरीलाल जाधव (सर्व रा. पारिजातनगर, एन चार, प्लॉट क्रमांक ४८), सासू आणि दोन नणंदांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, मनाविरुद्ध गर्भपात करणे, मारहाण करणे, धमक्या देणे; तसेच कौटुंबीक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारच्या नावाने शिमगा..!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्यामुळे सरकारच्या नावे बोंब मारून मराठा क्रांती मोर्चाने एसबीओए चौकामध्ये सरकारची होळी केली.

सरकारने दिलेले मराठा आरक्षण फसवे असून, कोपर्डीच्या नराधमाला फाशी मिळाली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफीही झाली नाही, स्वामीनाथन आयोगाचीही अंमलबजावणी झाली नाही, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील कर्जप्रकरणे 'जैसे थे' आहेत. ७० टक्के शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यामुळे मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारची मराठा क्रांतीमोर्चाने होळी केली. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची हमी सरकारने घ्यावी, समृद्धी महामार्गाला राष्ट्रामाता मॉ जिजाऊ साहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.

होळी पेटवताना सरकारच्या विरोधात बोंब मारण्यात आली. एसबीओए चौकामध्ये करण्यात आलेल्या होळीच्या प्रसंगी सरकारने दिलेल्या विविध आश्वासनांच्या पत्रकाचेही दहन करण्यात आले. यावेळी सुरेश वाकडे, मनोज गायके, विजय काकडे, रमेश गायकवाड, प्रदीप हारदे पाटील, सतीश वेताळ, मिलिंद साखळे, आत्माराम शिंदे, रवींद्र वहाटूळे, सुनील कोटकर, राहुल बनसोड, रवींद्र बोचरे, वैभव बोडके, मयूर पाटील, रेखा वहाटुळे, मनिषा पवार, रेणुका सोमवंशी, अनुराधा ठोंबरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचा जोर सोमवारपासून वाढणार

$
0
0

नांदेड : वंचित बहुजन आघाडी वगळता अन्य पक्षांनी आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली नसली तरी, प्रचाराला अप्रत्यक्षपणे प्रारंभ केला आहे. काँग्रेसने बुधवारी लिंगायत समाजतल्या प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. रंगपंचमी व शुक्रवार-शनिवार सुट्टी असल्याने प्रचाराचा खरा जोर सोमवारपासून दिसेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; खासदार अशोक चव्हाण हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर फॉर्मची विक्री झाली असली तरी, केवळ एका अर्ज दाखल केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच १८ एप्रिल रोजी मतदार होणार आहे. काँग्रेसतर्फे विद्यमान अशोक चव्हाण तर, भाजपतर्फे त्यांचे कट्टर विरोधाक आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांचे नाव जवळपास निश्‍चित आहे. अधिकृत घेाषणेची औपचारिकता बाकी आहे. हे दोन विरोधक आमने-सामने येणार असल्याने राजकीय धुळवडही जोरात होणार आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही लोकसभा निवडणुकीसाठी स्वारस्य नसल्याचे सुरुवातीला स्पष्ट केले होते, पण आता दोघांनीही श्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानत निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

मंगळवार भाजपने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या. स्वतः पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी वेगवेगळया पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. शिवाजीनगर परिसरातल्या एका हॉटेलमध्ये दिवसभर भाजप पदाधिकाऱ्यांची रेलचेल होती. सर्वांनी प्रमाणिकपणे पक्षाचे काम करण्याचा निर्धार यावेळी केला. एकीकडे भाजप बैठका घेत असताना दुसरीकडे काँग्रेसनेही प्रचार यंत्रणा राबविण्याबाबत खलबत केली.

ए. के. संभाजी मंगल कार्यालयात बुधवारी लिंगायत समाजतल्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या भागातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. काँग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी आम्ही चव्हाण यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत त्यांनी आश्‍वस्थ केले. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागातील बुद्धीवंतांशी चर्चा केली. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची घोषणा न झाल्याने खुल्या प्रचाराला प्रारंभ झाला नाही. रंगपंचमी त्यानंतर शनिवार, रविवार, सोमवार (स्थानिक सुट्टी) सलग सुट्या आल्याने त्यानंतरच प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मर्सिडीजमध्ये सापडली दोन कोटींची रोकड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने स्थापन करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथकाने पाटोदा तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे एका मर्सिडीज बेंज कारमधून नेण्यात येत असलेली दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार; जिल्ह्यातील बीड अमळनेरमार्गे अहमदनगर रोडवरील पांढरवाडी फाटा येथे अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मर्सिडीज बेंज कार (एमएच २३ यू २०००) या वाहनात गोणी; तसेच दोन बॅगांमध्ये भरून ठेवून नेत असलेली रक्कम आढळली. 'एसएसटी' पथक प्रमुख ए. राख यांनी साक्षीदारांसमोर पंचनामानंतर जप्त केली. या वाहनात कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य आढळून आले नाही. नियमानुसार ही रक्कम पुढील कार्यवाहीसाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या वाहनावर पुढील काचेवर डाव्या बाजूस 'प्रेस' असे लाल अक्षरात लिहिलेले आढळून आले आहे. निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये ही रक्कम सापडल्याने नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिवाळे लॉन्सजवळील मंदिर हटवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड बायपासचा सर्व्हिस रोड मोकळा करण्यासाठी सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत बुधवारी हिवाळे लॉन्सच्या जवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिर पूजा करून हटविण्यात आले.

बायपासवर विनायक हिवाळे यांची सहा मजली इमारत आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यावर इमारतीचे कॉलम आणि बिंब नेमके कुठे आहेत हे कळाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील अंतर्गत भिंती पाडण्यास सुरुवात केली. एक - एक मजला पाडला जाणार आहे. तळमजल्यावरील दुकाने रिकामी करण्यात आली. या संपूर्ण कामासाठी २५ मजूर लावण्यात आले आहेत.

हिवाळे लॉन्सच्या शेजारील दक्षिणमुखी हनुमान मंदिर हटविण्यापूर्वी मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर हिवाळे यांनी मूर्ती ताब्यात घेतली.

सर्व्हिस रोडमध्ये बाधीत होणारी सर्वाधिक बांधकामे सिल्कमिल कॉलनी भागात आहेत. ही बांधकामे पाडण्यासाठी पालिकेचे पथक पोचले तेव्हा नागरिकांनी स्वत:हून बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली. सिल्कमिल कॉलनीमधील ९० मालमत्ता बाधीत होत आहेत. त्यापैकी सत्तर मालमत्ताधारकांनी बांधकामे पाडून घेण्यास सुरुवात केली. त्यात विविध दुकानांचा देखील समावेश आहे. पालिकेच्या पथकाने आदर्श लॉन्स, कोहिनूर लॉन्सची संरक्षक भिंत पाडली. एका शोरुमचे बांधकाम देखील पाडण्यात आले. कोहिनूर हॉलवर टॉवर असल्यामुळे हॉल पाडण्यापूर्वी टॉवर पाडावे लागणार आहे. कोहिनूर लॉन्सच्या शेजारच्या इमारतीवर देखील टॉवर आहे. ते पाडल्याशिवाय इमारत देखील पाडता येणार नाही. टॉवर काढून घेतल्यावर कोहिनूर लॉन्सचा हॉल आणि त्या शेजारची इमारत पाडण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ हजारांचा गुटखा जप्त; दुसरा आरोपी हर्सूलमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

२६ हजार ९२० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त केल्याच्या प्रकरणात दुसरा आरोपी सीतल बाबुलाल बोहरा याला मंगळवारी (१९ मार्च) अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आठ मार्च २०१९ रोजी आरोपी संदीप हिरालाल मंत्री (४०, रा. चेलिपुरा) हा सिडको परिसरातील सावरकर चौकातून दुचाकीवरून जात असताना त्याच्याकडून २६ हजार ९२० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आला होता. त्याला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान, १९ मार्च रोजी आरोपी मंत्री याने सिडको पोलिस ठाण्यात हजर होऊन आरोपी सीतल बाबुलाल बोहरा (३६, रा. अरिहंतनगर) याच्याकडून माल खरेदी केल्याचे सांगितले. मात्र बोहराच्या धाकामुळे याआधी ही माहिती पोलिसांना दिली नसल्याची कबुलीही आरोपी मंत्री याने दिली. त्यानंतर बोहराला मंगळवारी अटक करून बुधवारी कोर्टात हजर केले असता, बोहराची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार वाहनांच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार; तसेच निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या प्रतिनिधींकडून वाहनांवर घोषणा, जाहिराती प्रदर्शित केल्या जातात. या वाहनांसाठी परवाने देण्याची व्यवस्था एक खिडकी योजनेंतर्गत करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय; तसेच आरटीओ कार्यालयात ही योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या सर्व संभाव्य उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारादरम्यान वेगवेगळया पक्षांच्या; तसेच माहितीच्या व घोषणांच्या जाहिराती वाहनावर प्रदर्शित केल्या जातात. अशा सर्व वाहनांसाठी मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून (आरटीओ) शुल्क भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रदर्शनासाठी ऑटोरिक्षा या वाहनासाठी ५०० रुपये, कार, जीप या वाहनासाठी एक हजार रुपये व इतर वाहनांसाठी दोन हजार रुपये शुल्क राहील.

निवडणुकीदरम्यान परवानगी घेऊनच वाहने वापरावीत. तपासणीदरम्यान विनापरवानगी वाहने आढळून आल्यास नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संघर्षनगर भागात माथेफिरुंने घरासह दुचाकी पेटविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संघर्षनगर, मुकुंदवाडी भागात माथेफिरुने घरासह दुचाकी पेटवून दिली. बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रमेश लक्ष्मण राणगोते (वय ४८, रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दाखल केली. राणगोते या ठिकाणी २१ वर्षांपासून राहत असून सुतार काम करून उदरनिर्वाह चालवितात. मंगळवारी रात्री राणगोते पत्नी आणि तीन मुलासह घरात झोपले होते. मध्यरात्री एक वाजता त्यांचा मुलगा साहील हा लघुशंकेसाठी उठला. यावेळी त्याला घराच्या समोरील भागाला आग लागल्याचे दिसले. त्याने घरातील सर्वांना उठविले. घराच्या मागील दरवाजाने सर्वजण बाहेर आले. शेजाऱ्यांनी पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला फोन करून माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत आगीमध्ये घरातील दिवाण, कपाट, एलइडी, लाकडी देवघर, पलंग लाकडी फर्निचर मोबाइल, कपडे, संगणक, फॅन, कुलर आदी साहित्य जळून खाक झाले होते. राणगोते यांच्या घरासमोर उभी असलेली त्यांची दुचाकी देखील पूर्णपणे जळाली होती. या प्रकरणी राणगोते यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोडसाळ मुलांनी आग लावल्याचा संशय

…या भागात संजयनगर तसेच संघर्षनगर येथील मुले दारू प्राशन करून रात्री गोंधळ घालतात. यापैकी कोणीतरी खोडसाळपणे ही आग लावल्याचा संशय राणगोते यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. तसेच तानाजीनगर, रामनगर येथे देखील दुचाकी जाळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live