Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘जीटीएल हटाव’ साठी निदर्शने

$
0
0
जीटीएलच्या विरोधातील वीज ग्राहकांचा रोष वाढत आहे. जीटीएलविरोधी नागरी कृती समितीने शुक्रवारी महावितरणच्या परिमंडळ कार्यालयासमोर संतप्त निदर्शने करून जीटीएलकडील फ्रॅन्चाइसी रद्द करण्याची मागणी केली.

महिलांची पालिकेवर धडक

$
0
0
पाण्यासाठी जुना भावसिंगपुरा भागातील नागरिकांनी शुक्रवारी पालिकेवर धडक मारली. महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी यांनी पाण्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.

पाण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
कोल्हापुरी बंधाऱ्यातून पाणी आणण्यासाठी पाइप लाइन टाकावाी आणि गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा, या मागणीसाठी विहामांडवा येथील नागरिकांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

लाचखोर तलाठी, पोलिस पाटील जेरबंद

$
0
0
सातबारा उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्यासह एका पोलिस पाटलांस अॅन्टी करप्शन ब्युरोने शुक्रवारी जेरबंद केले. रमेश पांडुरंग सोनवणे (वय ४२, रा. मिटमिटा) आणि पंढरीनाथ रंगनाथ जैतमहाल (वय ३७, रा. गेवराई पायडा) अशी आरोपींची नावे आहेत.

महावितरण इन्फ्रा योजनेत गैरव्यवहार

$
0
0
महावितरण कंपनीने जालना जिल्ह्यात मंजूर केलेल्या पायाभूत आराखडा योजनेत (इन्फ्रा) मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. ज्या ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर बसवणे गरजे होते त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविले नाहीत.

पेडगावकरांच्या कार्यमुक्तीचे आदेश निघालेच नाहीत

$
0
0
पालिकेचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शुक्रवारीही काढले नाहीत. पेडगावकर यांच्याबद्दल गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होऊनही पेडगावकरांच्या कार्यमुक्तीचे आदेश न निघाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासकीय ‘GR’ला ‘IMA’चा विरोध

$
0
0
होमिओपॅथी व आयुर्वेदीक डॉक्टरांना मॉडर्न मेडीसीन (अॅलोपॅथी) प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या औरंगाबादच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

‘आउटसोर्सिंग’च्या नावाखाली बनवाबनवी

$
0
0
शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये परिसर स्वच्छतेसाठी ‘आउटसोर्सिंग’ने सुविधा पुरविण्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याने ठरविले आहे. मात्र, हे करताना वैद्यकीय शिक्षण खात्याने बनवाबनवी केली आहे. १४ पैकी आठ रुग्णालयांचीच निवड करण्यात आली आहे.

फार्मसीला स्वतंत्र ‘CET’ नको

$
0
0
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांना स्वतंत्र सीईटी घेण्याच्या तंत्रशिक्षण विभागाच्या निर्णया विरोधात खाजगी कॉलेजांनी दंड थोपटले आहेत. अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होत असलेल्या जेईई(मेन), एआयपीएमटी व एमएच-सीईटीच्या माध्यमातूनच ही प्रवेश प्रक्रिया घेण्याची मागणी केली आहे.

छंदातून अभिनय प्रगल्भ करा

$
0
0
‘प्रत्येक कलाकारासाठी अभिनय महत्त्वाची बाब आहेच; पण लेखन, चित्रकला किंवा इतर छंदाची जोड मिळाल्यास अभिनय अधिक प्रगल्भ होतो. त्यामुळे प्रत्येक कलाकाराने छंदाची जोपासना करावी’ असे मत अभिनेत्री विभा छिब्बर यांनी व्यक्त केले. ‘मिसेस कौशिक की पाँच बहुएँ’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी शहरात आल्या असता त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बातचीत केली.

रजिस्ट्री महसुलात ५९ कोटींची वाढ

$
0
0
रजिस्ट्रीच्या माध्यमातून मुद्रांक शुल्काच्या रुपाने गेल्यावर्षभरात जिल्ह्यात २५५ कोटी रुपायांचा महसूल मिळाला. एका वर्षात या महसुलात ५९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

‘की’मुळे रस्त्यांचे टेंडर अडकले

$
0
0
पालिकेच्या र्इ-टेंडरिंगची की फक्त आयुक्तांकडेच असल्यामुळे दोन दिवसांपासून रस्त्यांचे टेंडर्स या ‘की’मध्ये अडकले आहेत. हे टेंडर्स शनिवारी पूर्णपणे उघडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खैरेंकडून सभापतींची कान उघाडणी

$
0
0
पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांची खासदार रावसाहेब दानवे यांनी कानउघाडणी केली. कचरा वाहतुकीसाठीच्या टिप्पर्सच्या टेंडरवरून गुरुवारी सर्वसाधारण सभेत झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, कानउघाडणी केल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातही ‘वाह उस्ताद वाह’

$
0
0
शहरातील विद्यार्थ्यांचा गीत-संगीताकडे ओढा वाढलाय. तबला, गायन, नृत्य या कलाप्रकारात विद्यार्थ्यांसोबत पालकही अभिरूची दाखवतायत. त्यामुळे शहरात गल्लोगली संगीत विद्यालय आणि कोचिंग क्लासेस दिसताहेत.

स्वतःतील राजहंस शोधा

$
0
0
‘अजय-अतुल यांच्यासारखे संगीत देता येत नाही किंवा स्वप्नील बांदोडकरसारखे गाता येत नाही असा विचार तुमच्या मनात असेल तर, योग्य विचार आहे. कारण, तुमच्यात वेगळेपण असले तरच संधी मिळते.

बलात्कार प्रकरणी गुन्हा

$
0
0
लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्ष बलात्कार केल्याप्रकरणी, दोन जणांविरूद्ध सिल्लोड न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील नगरपालिकेचे कर्मचारी विनायक भुजंग शिर्के (रा. शिवाजीनगर) व त्याला मदत करणारे ज्ञानेश्वर सांडू जाधव (रा. बोरगाव कासारी) हे दोघे पीडित महिलेस २६ फेब्रुवारी २०१२ रोजी मांढर (ता. पुरंदर, जि. सातारा) येथे घेऊन गेले.

विवाहितेचा छळ : ७ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0
पैशासाठी एका २८ वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सात जणांवर मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरहून तीन लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला, जीवे मारण्याची धमकी देत घराबाहेर हाकलून दिले, अशी तक्रार सिडको एन चार येथील महिलेने केली.

कापसाला क्विंटलमागे ५,३०० रू. भाव

$
0
0
कापसाचे दर वाढतील या आशेवर बसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर. सिल्लोड जिनिंगवर कापसाला क्विंटलमागे ५३०० रुपयांचा भाव मिळाला आहे. या हंगामातील कापसाचा हा सर्वात जास्त भाव आहे. मकरसंक्रांतीनंतर भाव वाढीचा शेतकऱ्यांचा अंदाजही खरा ठरला आहे.

लोमटे औरंगाबादेतून लोकसभेच्या रिंगणात

$
0
0
कष्टकऱ्याचे नेते साथी सुभाष लोमटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असा ठराव समाजवादी जनपरिषदच्या बैठकीत पारित करण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अॅड. सुभाष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नारळीबाग येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक झाली.

अतिक्रमण पाडा, झाडे तोडू नका हो

$
0
0
साईनगर येथे सिडको प्रशासनकडून अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामात झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोध केला आहे. अतिक्रमण पाडा, पण झाडे तोडू नका अशी मागणी येथील संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images