Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

डांबेचा शोध लागेना; धुळ्याचे पथक माघारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पॉवरलूम येथील ड्रेनेज चेंबरमध्ये वाहून गेलेल्या रामेश्वर डांबेचा शोध लावण्यामध्ये पाचव्या दिवशी देखील पथकाला यश आले नाही. धुळे येथून आलेले राज्य आपत्ती निवारण दलाचे पथक देखील प्रयत्न करून परतले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या वतीने अद्यापही डांबे याचा शोध सुरूच आहे.

सोमवारी दुपारी सुखना नदीच्या पात्रात सात शेतकरी विद्युत मोटारीचा फूटबॉल सुधारण्यासाठी उतरले होते. यामध्ये रामेश्वर डांबे याचा देखील समावेश होता. डांबे हा ड्रेनेजच्या पाण्यात पडून वाहून गेला. त्याचा पाच दिवसांपासून शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी अग्निशमन दलाने प्रत्येक चेंबर तपासले तसेच पाइप लाइन देखील फोडली. हे पाणी ज्या ठिकाणी पोहचते तो एचटीपी प्लँट देखील तपासण्यात आला. मात्र, अद्यापही डांबेचा शोध लागला नाही. डांबेच्या शोधासाठी धुळे येथून राज्य आपत्ती निवारण पथक देखील आले होते. या पथकात ३० जवान होते. या पथकाने देखील दोन दिवस सर्व पद्धतीने डांबेचा शोध घेतला मात्र, त्यांना देखील यश आले नसल्याने हे पथक माघारी परतले. अग्निशमन दलाच्या वतीने डांबे याची शोध मोहीम सुरुच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठ्यासाठी आता अधिकाऱ्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात पाणीटंचाईची सातत्याने होणारी ओरड दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी बैठक घेतली. नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना कामांची मोठी यादी दिली. मुख्य वितरणासाठी शहर अभियंत्यांसह पाच जणांवर जबाबदारी देण्यात आली आहे. सिडकोसाठी स्वतंत्र कार्यकारी अभियंता व टॅंकरने पाणी वितरण करण्यासाठी उपायुक्तांची टीम नियुक्त केली आहे. कधी नव्हे ते प्रथमच अवैध नळ शोधून कारवाई करण्यासाठी देखील स्वतंत्र अधिकारी तैनात करण्यात आला आहे.

शहराचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. वर्षभर सातत्याने नागरिक, नगरसेवक पाणीप्रश्नी ओरड करत आहेत. पण वितरणव्यवस्थेत कुठलीच सुधारणा झालेली नाही. ठराविक कालावधीनंतर तांत्रिक अडचण समोर येते आणि चार दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात खंड पडतो. तो दूर होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. तोवर शहरवासियांची परवड होते. सातत्याने होणारी ही अडचण पालिका प्रशासन अद्याप दूर करू शकलेले नाही. या अडचणी लक्षात घेऊन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी स्वतंत्र बैठक घेतली. उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन नवीन उपाययोजना सूचविण्यात आल्या. पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर होती. त्यांच्याकडे काम करण्यासाठी अधिकारीच नव्हते. त्यामुळे आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी समन्वयक म्हणून सहाय्यक आयुक्त किरण जाधव नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत आता शहर अभियंत्यांवर देखील जबाबदारी देण्यात आली आहे. या तिघांनी मुख्य जलवाहिनीच्या गळती थांबविणे, आपत्कालीन योजनेचे सहा पंप सुरू करणे, अॅप्रोच चॅनेलमध्ये बंधाऱ्याचे काम करणे, उद्‌भव विहिरीतील गाळ काढणे, जायकवाडी येथे नवीन प्रस्तावित पंपगृह उभारण्यासाठी उपाययोजना करणे आदी कामे देण्यात आली आहे.

टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची जबाबदारी उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे असेल. शाखा अभियंता अमोल कुलकर्णी यांचे पथक सोबत असेल. टँकरवरील जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करुन रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे व रोजचा अहवाल पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात आयुक्तांच्या परवानगीशिवाय रजा मिळणार नाही, हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे. बेकायदा नळांचा शोध घेऊन थेट कारवाई करावी, असे आदेश दिले असून कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांची नेमणूक त्यासाठी केलेली आहे.

सिडकोची स्वतंत्र जबाबदारी

सिडको-हडको भागात पाणीपुरवठ्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे या भागासाठी स्वतंत्र अधिकारी देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. उपअभियंता ए. बी. देशमुख व वॉर्ड अभियंता एस. डी. काकडे यांच्याककडे सुद्धा पाणी पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉयर्स चेंबर्सच्या कामास सुरुवात

$
0
0

म. टा. औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठ परिसरातील लॉयर्स चेंबर्सच्या कामास प्रारंभ झाला आहे. या कामाची पाहणी मुबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील सोमवारी सायंकाळी करणार आहेत.

याप्रसंगी न्या. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत खंडपीठाच्या मध्यवर्ती सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अतुल कराड यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

खंडपीठ वकील संघाच्या विनंतीवरून रविवारी न्यायमूर्ती पाटील शहरात सायंकाळी ४.५० वाजता येत आहे. रविवारचा वेळ त्यांनी वकील संघासाठी राखून ठेवल्याचे कराड यांनी सांगितले. मुख्य न्यायमूर्ती पाटील यांनी खंडपीठात वकिली व्यवसायास प्रारंभ केला. नंतर न्यायमूर्ती झाल्यानंतर त्यांनी खंडपीठात न्यायदानाचे कामही केले. हायकोर्टाच्या बिल्डिंग कमिटीचे सदस्य न्या. पाटील होते. आठ मजली लॉयर्स चेंबर्स खंडपीठाच्या आवारात तयार करण्यात येणार असून यातील दोन मजले चारचाकी व दुचाकींसाठी वाहनतळ असणार आहे. इतर सुविधांमध्ये कॅन्टीन, वायफाय सुविधा, कॉन्फरन्स हॉल, लिफ्ट, वेटिंग लाऊंज, बँकेचे काऊंटर तसेच वकिली व्यवसायाशी संबंधित पूरक सुविधा देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सचिव कमलाकर सूर्यवंशी, सुश्मिता दौंड, उपाध्यक्ष राम शिंदे, मंजुषा जगताप, सहसचिव अनुपमा गंगाखेडकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अॅप’द्वारे तक्रार केल्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा फोटो व राजकीय पक्षाचे चिन्ह वाहनाच्या मागच्या बाजूला विना परवानगी लावल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (१९ मार्च) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 'सीव्हिजिलन्स' या अॅपवर एका नागरिकांना तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, शहरातील खुलताबाद ते वेरूळ मार्गावरील शंजरी हॉटेलजवळ एमएच २० सीएस ४६६७ या वाहनाच्या मालकाने वाहनाच्या पाठीमागच्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचा फोटो व राजकीय पक्षाचे चिन्ह विनापरवाना लावले होते. याबाबत एका जागरूक नागरिकाने निवडणूक आयोगाच्या 'सीव्हिजिलन्स' या अॅपवर हा फोटो अपलोड केला होता. याची दखल घेऊन गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांनी या वाहनाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आदर्श आचारसंहिता केल्याप्रकरणी 'एफएसटी'प्रमुख पांडुरंग लहाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाहन मालकाच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढाई बहुजन वंचित विकास आघाडीशीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला अजूनही उमेदवार शोधता आलेला नाही. हताश झालेल्या काँग्रेससोबत आपली लढाई नसून मुख्य लढाई बहुजन वंचित विकास आघाडीशीच असल्याचे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे काँग्रेसच्या गोटात नैराश्य पसरले असल्याने त्यांच्याकडून मतदारसंघात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागलेला आहे. या संभ्रमास पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. लातूर लोकसभेकरिता भाजपने सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी शहरातील ग्रँड हॉटेल येथे भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या आयोजित व्यापक बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते.

यावेळी लोकसभा निवडणूक देशहितासाठी अत्यंत महत्त्वाची असून, देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी या निवडणुकीची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन करून गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळेच जागतिकस्तरावर आज भारत देश एक महाशक्ती म्हणून उदयास येवू लागला असून या महाशक्तीला अधिक मजबूत करण्यासाठी आगामी निवडणुकीची लढाई कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकावीच लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आगामी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाच वर्षात अनेक लोकहिताचे निर्णय घेतलेले असून, त्याचे परिणाम दिसू लागले असल्याचे पालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, अभिमन्यू पवार, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, प्रणिता चिखलीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. प्रभारी अ‍ॅड. मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या सावकारी करणाऱ्या तसेच भिसी चालविणाऱ्या महिलेविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने महिलेच्या घर झडतीमध्ये विविध बाँड पेपर, खरेदीखत, गहाणखत, चेक आदी ऐवज जप्त केला. शुक्रवारी सातारा परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी तक्रार दाखल केली. आर्थिक गुन्हे शाखेकडे काही महिलांनी या संदर्भात तक्रार अर्ज दिला होता. यामध्ये संशयित आरोपी आशा बद्रीनाथ दुबीले (रा. ज्योतीनगर, सातारा परिसर) ही महिलांची भिसी चालविते. तसेच गरजू लोकांना व्याजाने पैसे देत दहा टक्के दराने वसुली करते, व्याजाने पैसे दिल्यानंतरही ही महिला अवैधरित्या बाँडवर गहाणखत, करारनामा करून घेते, अशा स्वरुपाची ही तक्रार होती. पाच महिलांनी या संदर्भात आर्थिक गुन्हेशाखेकडे धाव घेतली होती. आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाच्या परवानगीने आशा दुबीलेच्या घराची झडती घेतली. यावेळी उपनिबंधक सहकारी संस्थेचे अधिकारी डॉ. मुकेश एस. बारहाते आणि सुनील एन. बारगजे यांची उपस्थिती होती. यावेळी घर झडतीमध्ये पोलिसांना पाच बाँड पेपर, ९० हजार रुपयांचा दुसऱ्याकडून घेतलेला चेक, तीन भिसीचे रजिस्टर, दोन दुचाकीची दुसऱ्याच्या नावावर असलेली कागदपत्रे आणि रोख ८८ हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी अवैध सावकारी केल्याप्रकरणी आरोपी आशा दुबीलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळवड उत्सवाला गालबोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे शहरात धूलिवंदनाचा सण उत्साहात साजरा होत असताना काही ठिकाणी जुन्या वादातून मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागले. याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मारहाणीची पहिली घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता अंबिकानगर भागात घडली. येथील शंकर हरिभाऊ घोगरे (वय ५७ रा. अंबिकानगर) यांना कारण नसताना तिघांनी लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी घोगरे यांच्या तक्रारीवरून संशयित विशाल पवार, योगेश जाधव आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची दुसरी घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मुकुंदवाडी भागात घडली. दिनेश बाबुराव चांदणे (वय ३०, रा. फाजलपुरा) यांना दीपक संतोष जाधव आणि बळीराम वाडीकर यांनी मारहाण केली. याप्रकरणी देखील मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची तिसरी घटना गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता गुलमोहर कॉलनी येथे घडली. गौरव सुनील देशमुख (वय २७, रा. गुलमोहर कॉलनी) याला जुन्या वादातून नितीन देशपांडे याने मारहाण केली. गौरवचा मित्र विजय हरिदास सिंग याला देखील यावेळी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचा चौथा प्रकार गुरुवारी दुपारी तीन वाजता हडको नवजीवन कॉलनी येथे घडला. संदीप एकनाथ खोतकर (वय ३४, रा. एन बारा) हे मेहुणे रत्नाकर गोविंद जाधव यांच्या घरी जेवणाचा डबा घेऊन गेले होते. यावेळी काही तरुणांनी रंग खेळताना जाधव यांना शिवीगाळ केली. खोतकर यांनी त्यांना मनाई केली असता त्यांनी खोतकर आणि जाधव यांना मारहाण केली. याप्रकरणी संशयित अरुण ढेकळे, प्रतीक ढेकळे आणि विक्की पाटील (सर्व रा. नवजीवन कॉलनी) यांच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bरंग खेळताना भांडण

\Bजयभवानीनगर चौकात रंग खेळत असताना मारहाणीचा पाचवा प्रकार घडला. विजय राजेंद्र खरात (वय १७, रा. जयभवानीनगर) याला रंग खेळण्यास विरोध करीत दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी खरात याच्या तक्रारीवरून संशयित आरोपी बंटी खरात आणि एका अनोळखी आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावर पोलिसांचे मॉकड्रिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा विमानतळावर शुक्रवारी दुपारी पोलिसांचे मॉकड्रिल करण्यात आले. दहशतवादी घटना घडल्यास सर्व यंत्रणा तत्पर असावी या हेतुने हे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलिसांनी या प्रात्यक्षिकाला सुरुवात केली. या प्रात्यक्षिकामध्ये बाँबशोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल, स्ट्रायकिंग फोर्स, क्विक रिस्पॉन्स टिम, श्वान पथक आदींचा सहभाग होता. विमानतळामध्ये दहशतवादी शिरल्यास त्याचा बिमोड कसा करायचा, हे या प्रात्यक्षिकामधून दाखवण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ. राहुल खाडे, एसीपी गुणाजी सावंत, एसीपी गोवर्धन कोळेकर, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्यासह पथकाचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कल्पना बक्षी यांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शैक्षणिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना बक्षी यांना पहिल्या 'तीर्थरुप उषा-शरद स्मृती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला. या पुरस्काराबद्दल बक्षी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

उषा-शरद स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पहिला 'तीर्थरुप उषा-शरद स्मृती पुरस्कार' प्रदान सोहळा पार पडला. कलश मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर पुरस्काराच्या मानकरी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना बक्षी, चित्रलेखा मेढेकर, डॉ. रश्मी बोरीकर आणि अंजली पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती. मेढेकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन बक्षी यांना सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील कामाची दखल घेऊन सन्मान करण्यात आल्याबद्दल बक्षी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी वर्षश्राद्ध घालतात. पण, सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्याचा निर्णय घेतला, असे सुजाता पाठक यांनी प्रास्ताविकात सांगितले. पद्मनाभ पाठक यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. दरम्यान, पुरस्कार प्रदान सोहळ्यापूर्वी विश्वनाथ दाशरथे आणि सहकाऱ्यांनी 'स्वरांजली' कार्यक्रम सादर केला. श्रीकांत उमरीकर यांनी निवेदन केले. यावेळी रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रचार करू, नंतर विसरू नका’

$
0
0

नांदेड : आघाडीचा धर्म पाळून आम्ही प्रचार यंत्रणा राबवू अशा शब्दांत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आश्‍वस्त करत निवडणूक निकालानंतर मात्र, विसर पडू देऊ नका, अशा शब्दांत कान टोचले.

नांदेडच्या स्थानिक राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. अनेक निवडणुकांत हे दोन्ही पक्ष आमने-सामने लढले. मागच्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षामधील नेत्यांची दरी आणखीणच वाढली. काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर हे एकमेकांचे विरोधक मानले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसने उमेदवारांचा सस्पेन्स कायम ठेवला आहे, पण खासदार अशोक चव्हाण किंवा आमदार अमिता चव्हाण यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल, हे स्पष्ट आहे.

काँग्रेसने खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून प्रचाराला प्रारंभ केला आहे. लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात मेळावे घेऊन काँग्रेसने वातावरण निर्मिती केली आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी, आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची मनधरणी सुरू करण्यात आली आहे. खासदार चव्हाण आपल्या निवडक सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांच्या निवासस्थानी पोचले. आमदार अमर राजूरकर, डी. पी. सावंत, शाम दरक यांच्यासह खासदार चव्हाण यांनी गोरठेकर यांच्यासोबत आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा केली.

फारसे राजकीय सख्य नसलेल्या या दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. 'आघाडीचा धर्म पाळून आम्ही प्रमाणिकपणे प्रचार करू. आमच्या भागातून अधिकाधिक मतधिक्य मिळवून देऊ,' अशा शब्दांत गोरठेकर यांनी खासदार चव्हाण यांना आश्‍वस्थ केले. 'राष्ट्रवादी काँग्रेस सर्व भागातील कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी कामाला लागतील. वाड्यावरून दिलेला शब्द आम्ही पाळतो. निवडणूक निकालानंतर मात्र, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा विसर पडू देऊ नका,' असा सल्ला गोरठेकरांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रमेश सरोदे, जगन शेळके यांची उपस्थिती होती.

\Bमनोमिनल कायम राहिल का?\B

गोरठेकर-चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाले असले तरी, भविष्यात यांचे मनोमिनल कायम राहिल का, हे मात्र आगामी काळच ठरविणार आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे अन्य राजकीय पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. आजच्या चर्चेनंतर ते कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच भागातील पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणेत स्वतःला झोकून दिल्यास त्याचा फायदा निश्‍चितपणे काँग्रेसला होईल, असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांच्या उमेदवारीनंतर जल्लोष

$
0
0

नांदेड : नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मरगळ आलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. आमदार पाटील शनिवारी नांदेडात दाखल होणार असून, त्यानंतर प्रचारयंत्रणा राबविण्यातबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर या तालुक्यांचा समावेश आहे. मोदी लाट असतानाही २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी पक्षावर आगपाखड करत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. सध्या भाजपमध्ये असलेले माजी खासदार वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु जिल्ह्यातल्या चारही आमदारांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. शिवसेनेतला प्रवेश लांबणीवर पडल्याने सध्या वानखेडे निवडणुकीच्या रणधुमाळीपासून दूर आहेत.

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी हेमंत पाटील यांच्यासह वसमतचे आमदार व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती, परंतु उमेदवारी मिळविण्यात आमदार पाटील यांना यश आले. शिवसेना शाखा प्रमुख ते आमदार असा राजकीय प्रवास असलेल्या आमदार पाटील यांच्यावर मातोश्रीची मेहरनजर आहे. त्याने आपले वजन वापरून उमेदवारी मिळवत पहिली लढाई जिंकली आहे. वसमत, हदगाव, हिमायतनगर, बाळापूर, हिंगोली आदी भागात शिवसैनिकांचे संघटन चांगले आहे.

\Bचुरशीच्या लढतीचा अंदाज\B

काँग्रेसतर्फे अद्याप उमेदवाराची घोषणा झाली नाही. विद्यमान खासदार राजीव सातव यांचे निवडणूक लढविण्यासंदर्भात तळ्यात-मळ्यात सुरू आहे. माजी खासदार वानखेडे यांच्यानतर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडे तगडा नेता नव्हता. आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने मरगळ आलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला एकतर्फी निवडणुक होईल, अशी चर्चा होती, परंतु शिवसेनेने आमदार पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने तुल्यबळ लढत होईल असे मानले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका कर्मचाऱ्यांना लवकरच ड्रेस कोड

$
0
0

पालिका कर्मचाऱ्यांना

लवकरच ड्रेस कोड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक चांगली शिस्त लागावी, यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ड्रेसकोडची संकल्पना समोर आणली आहे. वर्ग एक ते तीनच्या अधिकाऱ्यांचा ड्रेसकोड ठरविण्यासाठी शुक्रवारी बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यात स्काय ब्लू शर्ट व निळी पॅंट या पेहरावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद महापालिकेतील कर्मचारी, अधिकारीही ड्रेस कोडमध्ये दिसणार आहेत.

शहराच्या पायाभूत सुविधांशी दैनंदिन संबंध असलेल्या महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दररोज हजारो नागरिकांशी संपर्क होतो. आपली कामे घेऊन आलेल्या शहरवासियांना मात्र पालिका मुख्यालयात आल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पालिकेचे काम शिस्तीत व्हावे यासाठी यापू्र्वी कामावर वेळेत हजर नसलेल्या, वारंवार दांड्या मारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दंड आकारण्यात आला. तरीही अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पदभार घेतल्यापासून अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. काही अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षणासाठी पाठविले होते. त्यात आता ड्रेसकोडची संकल्पना समोर आणली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड आहे. मात्र औरंगाबाद महापालिकेने अद्याप ड्रेसकोड निश्‍चित केलेला नाही. रस्त्यावर उतरून अधिकारी-कर्मचारी काम करतात, तेव्हा अनेकांना अधिकारी कोण? नागरिक कोण? हे लवकर समजत नाही. त्यामुळे ड्रेसकोड निश्‍चित करण्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यात ड्रेसचा रंग व महापालिकेचा लोगो अंतिम करण्यात आला, मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सहा एप्रिलला गुढीपाडवा आहे. त्या दिवशीपासून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील मैदानावर टाकला कचरा

$
0
0

जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील

मैदानावर टाकला कचरा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा कचराप्रश्न वर्ष उलटून गेले तरी सुटण्याची चिन्हे नाहीत. विविध पर्याय तपासूनही पालिका प्रशासनाला कचरा टाकण्यासाठी हमखास जागाच उपलब्ध नाही.चार दिवस साचलेला कचरा जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील जिनिंग प्रेसिंगच्या मैदानात टाकल्याचे शुक्रवारी दिसून आले.

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात पाच दिवसांपासून कचरा टाकण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. बुधवारी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात चिकलठाण्यासह पडेगाव येथे कचरा टाकणे सुरु केले. मात्र चार दिवस साचलेला कचरा जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील मैदानात टाकल्याचे निदर्शनास आले.

चिकलठाणा येथे कचाऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवडयात आंदोलन छेडले होते. बुधवारी चिकलठाणा व पडेगाव येथे पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. पणत्या कालावधीत साचलेला कचरा जागा दिसेल तिथे टाकण्यात आला. जिन्सी पोलीस ठाण्यासमोरील जिनिंग प्रेसिंगच्या मैदानावर मोठया प्रमाणावर कचरा साठविण्यात आला आहे. याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा विभागाचे किरण चव्हाण सीइओ

$
0
0

पाणीपुरवठा विभागाचे

किरण चव्हाण सीइओ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या पाणीपुरवठा विभागातून उन्हाळ्याचा काळात सुलभपणे पाणीवितरण व्हावे, यासाठी पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सहायक आयुक्त किरण चव्हाण यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या समन्वयाने पाणी वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी चव्हाण यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. यासोबतच विभागात दोन कनिष्ठ अभियंत्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

शहराची पाणी वितरण व्यवस्था आजवरच्या इतिहासात कधीच म्हणावी तेवढी सुरळीत झालेली नाही. पाण्याची मागणी आणि पुरवठा याचे गणित अजूनही महापालिकेला कळालेले नाही. उपलब्ध पाण्यातून विनातक्रार वितरण करण्याबाबत अनेक प्रयत्न करून झाले पण त्यास यश आले नाही. मागील दीड वर्षापासून शहराची पाणी वितरण व्यवस्था विस्कळित झालेली आहे. पाणीपुरवठ्यासाठी विविध प्रयोग करण्यात आले पण ते यशस्वी ठरले नाहीत. पालिकेकडून सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात तब्बल सहा किंवा सात दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहरवासियांना अनेकदा निर्जळीचा सामना करावा लागतो. मनुष्यबळ कमी असल्याने हतबल झाल्याचे कारण पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून दिले जाते. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत चार उपअभियंता देण्याची मागणी केली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर आयुक्तांनी पाणी पुरवठा विभागाचे समन्वयक म्हणून सहाय्यक आयुक्त किरण चव्हाण यांच्याकडे जबाबदारी दिली असून गेल्या महिन्यांत सरळ सेवेने भरती केलेल्या संदेश येरगेवार आणि प्रियंका दिनकर या कनिष्ठ अभियंत्यांचीही पाणी पुरवठा विभागात पदस्थापना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन एमएलडी पाण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करणार

$
0
0

दोन एमएलडी पाण्यासाठी

नव्याने प्रस्ताव सादर करणार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि जायकवाडीत उपलब्ध झालेला कमी पाणीसाठा यामुळे शहराला मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. शहरवासियांची तहान भागविताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रचंड मागणी व तोकडी यंत्रणा यामुळे त्रस्त असलेले अधिकारी-पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून एमआयडीसीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आता दोन एमएलडी पाण्यासाठी नव्याने प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

शहरात दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. पालिकेंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या दोन्ही पाणी पुरवठा योजना जीर्ण झाल्या आहेत. नाथसागरात पाणी असूनही ते शहरापर्यंत येऊ शकत नाही. नवी पाणीपुरवठा योजना होईपर्यंत नागरिकांना मुबलक पाणी मिळणे शक्‍य नसल्यामुळे इतर पर्यायावर चर्चा सुरू आहे. त्यातील एक पर्याय म्हणून एमआयडीसीकडून पाणी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एमआयडीसीकडून पाच एमएलडी पाणी मिळावे, असा प्रस्ताव महापौर नंदकुमार घोडेले यांनी राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता प्रशासनामार्फत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको भागात टँकर भरण्यासाठी एक एमएलडी पाणी मिळावे तसेच बीड बायपास भागातील काही वसाहतीसाठी एक एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी प्रस्तावात केली जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांशी चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी कुणाला जाहीर होणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केली होती. त्यापुढे जात गुरुवारी जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेडमध्ये जाऊन अशोक चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. श्रेष्ठींकडे आपल्या भावना कळवू. उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे चव्हाणांनी उपस्थितांना सांगितले.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, काँग्रेस अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सरोज मसलगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती धनराज बेडवाल, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे, किरण डोणगावकर, अनिल श्रीखंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला. काँग्रेसची उमेदवारी कुणाला द्यायची, कोण प्रबळ ठरू शकतात, बलस्थाने कोणती, याबाबत चव्हाणांनी काहींना वैयक्तिक भेटीत विचारणा केली. नेत्यांशी त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली. पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या कुणालाही उमेदवारी द्यावी, आम्ही एकदिलाने काम करू अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी चव्हाणांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात वरिष्ठांकडे भावना कळविल्या जातील. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरे, जाधव पुन्हा रिंगणात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने शुक्रवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी येथील उमेदवारांची घोषणा केली. औरंगाबादेतून सलग पाचव्यांदा खासदार चंद्रकांत खैरे यांना तर, परभणीतून विद्यमान खासदार संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे. हिंगोलीतून आमदार हेमंत पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. उस्मानाबादमधून मात्र विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारून माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांना मैदानात उतरवले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपची युती झाल्यानंतर मराठवाड्यातील शिवसेनेच्या जार जागांसाठी उमेदवारांची चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे औरंगाबादमधून खासदार चंद्रकांत खैरेंची उमेदवारी जाहीर झाली. खैरे पाचव्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसमधून कोण टक्कर देणार हे मात्र अजून ठरलेले नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय (बंडू) जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर जाधव यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना दरवेळी परभणीत रंगतो.

शेजारच्या हिंगोली मतदारसंघात शिवसेनेने आमदार हेमंत पाटील यांना मैदानात उतरविले आहे. हिंगोलीत काँग्रेसकडून विद्यमान खासदार राजीव सातव रिंगणात उतरणार की नाही, याबाबत अजून निश्चित झालेले नाही. परिणामी, काँग्रेसची उमेदवारी जाहीर होईपर्यंत शिवसेनेसमोर कुणाचे आव्हान असणार हे स्पष्ट होणार नाही. उस्मानाबाद लोकसभेसाठी विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारली. या जागेसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र शिवसेनेने माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे केले आहे. २०१४मध्ये औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद या जिंकलेल्या जागा यंदा राखत हिंगोलीची जागा पुन्हा ताब्यात घेण्याचे कडवे आव्हान शिवसेनेसमोर असेल.

\B- मुंडे दानवे, निलंगेकरांची सत्वपरीक्षा... पान ४\B

\Bयुतीच्या दोन गायकवाडांना डच्चू\B

मराठवाड्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. त्यात भाजपने लातूरचे विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड व शिवसेनेने उस्मानाबादचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड या दोघांना उमेदवारी नाकारली आहे.

\Bभाजपतर्फे दावने, डॉ. मुंडे, श्रृंगारे\B

भारतीय जनता पक्षाने जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बीड मतदारसंघातून डॉ. प्रितम मुंडे या विद्यमान खासगारांना पुन्हा संधी दिली आहे. त्याचबरोबर लातूरमधून जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाने गुरुवारी उमेदवारांची यादी जाहीर केली.

\Bखैरेंच्या कार्यालयात गर्दी\B

खासदार चंद्रकांत खैरे यांना औरंगाबादची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. उमेदवारीची घोषणा होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी पक्षाने मला पुन्हा दिली आहे. ते निश्चितपणे पूर्ण करू,' असे खैरे यांनी मटाशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’ जाहीरनामा : धोरणाअभावी पर्यावरणाचा अक्षम्य ऱ्हास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पर्यावरण विज्ञानाचे भान नसल्याची भयंकर स्थिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि नेत्यांपासून नागरिकांपर्यंत आहे. ५० कोटी वृक्षलागवडीसारख्या भंपक घोषणांमुळ‌े वनआच्छादित क्षेत्र अवघ्या काही टक्क्यांवर आले आहे. जवळजवळ सगळेच नैसर्गिक स्रोत प्रदूषित झाले आहेत, ते पर्यावरणाचे राष्ट्रीय धोरण आणि पर्यावरण कुठल्याच राजकीय पक्षांचा अजेंडा नसल्यामुळे. या अक्षम्य दुर्लक्षामुळ‌ेच मधुमेही पीडितांपासून ते कॅन्सर पीडितांपर्यंतच्या असंख्य रोगट फौजा तयार होत आहेत आणि तरीही आम्ही बेभान आहोत,' असा परखड सूर 'मटा राऊंड टेबल'मध्ये निसर्गप्रेमी व पर्यावरणतज्ज्ञांमधून उमटला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने घेण्यात आलेल्या 'राऊंड टेबल'मध्ये तज्ज्ञ बोलते झाले आणि दुर्लक्षित पर्यावरणाची भयंकर स्थिती त्यांनी मांडली. सध्याच्याच नव्हे तर आधीच्या केंद्र-राज्यातील सरकारांनी पर्यावरण रक्षणासाठी काय केले असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे विश्लेषण तज्ज्ञांनी केले. 'महा'वृक्षारोपण व 'महा'वृक्षलागवडीसारख्या भंपक योजनांवर सडकून टीका करताना निसर्गप्रेमी रंजन देसाई म्हणाले, 'सरकारच्या 'कथनी-करनी'मध्ये भलामोठा फरक आहे. मोठा बँडबाजा वाजून ५० कोटी वृक्षलागवडीची घोषणा केली खरी; परंतु आज काय परिस्थिती आहे. ५० कोटींपैकी काही लाख तरी वृक्षलागवड झाली का, असा प्रश्न पडावा, अशी दारुण स्थिती आहे. वृक्षलागवड करताना रोपे किमान तीन फुटांची हवी, पण अवघ्या पाच-सहा इंचाची रोपे लावून आकडे मोजण्याची सरकारची पद्धत आहे. त्यात पुन्हा वृक्षलागवडीसाठी पाण्याचे नियोजन आवश्यक असते, निदान 'ऑक्टोबर हिट'साठी तरी पाण्याचे नियोजन आवश्यक ठरते. मात्र, वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनही तेवढेच महत्वाचे आहे, याचे भान आहे कुठे? तरीही वृक्षतोड अमाप आणि अनिर्बंध पद्धतीने होत आहे. त्याचवेळी वनक्षेत्र मोजण्याची सरकारी पद्धतदेखील चुकीची व दिशाभूल करणारी आहे.'

देवगिरी महाविद्यालयाचे पर्यावरण विभागप्रमुख डॉ. मुकेश नाईक म्हणाले 'रस्ते बांधणीकडे किंवा इतर विकासकामांकडे काही प्रमाणात का होईना लक्ष दिले जाते; परंतु पर्यावरणासंदर्भात पदोपदी दुर्लक्ष जाणवल्याशिवाय राहात नाही. साध्या कचऱ्याचा प्रश्नदेखील तब्बल ५० ते ६० वर्षांत शास्त्रीय पद्धतीने सोडवलेला नाही आणि ही स्थिती काही एकट्या औरंगाबादची नसून थेट दिल्लीपर्यंत कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. काही अपवाद असतील, पण जवळजवळ अशीच स्थिती सगळीकडे दिसते. एकीकडे कचऱ्याची अशी स्थिती आहे, तर दुसरीकडे कडक इस्त्रीचे कपडे घालून स्वच्छ अभियान राबवले जाते. कचऱ्याच्या विल्हेवाटीची निम्मी जबाबदारी सरकारची आहे, असे देखील गृहीत धरले तरी सरकार ती जबाबदारी पार पाडते का, याचे उत्तर नाही असेच आहे. अर्थात, जनतेलाही स्वत:च्या जबाबदारीचे भान कमीच आहे, हेही तितकेच खरे. पुन्हा कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसतानाच कचरा मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्रास जाळता जातो. त्यामुळे औरंगाबादमध्ये धुरांचे लोट दिसतात आणि पंजाब-हरियाणाच्या शेकडो एकरांवर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दिल्लीतही दरवर्षी धुक्याची गंभीर स्थिती येऊन ठपते. मुळात कचरा जाळण्यामुळे अत्यंत घातक वायू बाहेर पडतात; पण त्याची फार कमी जाणीव नागरिकांना आहे. केवळ वायू प्रदूषणाचा नव्हे तर ध्वनी प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे आणि नियंत्रण-नियमनाची जबाबदारी असलेली सरकारी मंडळे केवळ औपचारिकता पूर्ण करत असल्याचे दिसते,' असेही डॉ. नाईक म्हणाले.

\Bविकासाची मानकेच चुकीची

\B'श्रीलंकासारख्या छोट्या-छोट्या देशांमध्येही कचऱ्याचा प्रश्न यशस्वीपणे हाताळला जातो, पण आपल्या देशात तो हाताळला जाऊ शकत नाही,' अशी नाराजी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, 'आपल्याला कचऱ्याचा प्रश्न असो किंवा पर्यावरण-प्रदुषणाचे इतर प्रश्न असो, त्याची कारणे व त्यावरील उपायदेखील माहीत आहेत. मात्र, तरीही त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही किंवा आजपर्यंत झालेली नाही. याचा साकल्याने विचार केल्यावर असे लक्षात येते की मुळात आमची विकासाची मानकेच चुकीची आहेत. आपल्या भारतात जैवविविधता अतिशय विपुल प्रमाणात आहे; परंतु ज्या देशांमध्ये जैवविविधता खूप कमी आहे आणि त्यामुळेच कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, अशा देशांचे आम्ही वर्षानुवर्षे अंधानुकरण करत आहोत. हे अंधानुकरण आम्हाला घातक ठरत आहे, हे लक्षात घ्यायला कोणीही तयार नाही. त्यात पुन्हा पर्यावरणासंबंधी आजही ब्रिटिशकालीन कायदे तसेच कायम आहे आणि आपल्या देशात पर्यावरणासंबंधी कोणतेच राष्ट्रीय धोरण नसल्याने पर्यावरण रक्षणासाठी राजकीय निर्णयक्षमताही दिसून येत नाही. बहुतेक नैसर्गिक स्रोत प्रदूषित होताना किंवा झालेले असताना हे स्त्रोत टिकवून ठेवण्यासाठी कोणतेच धोरण नाही. मानवासाठी नैसर्गिक जलस्रोतांचे महत्व अनन्यसाधारण असतानाही सांडपाण्याच्या प्रदूषणामुळेच जलस्रोतांची अपरिमित हानी होत आहे. मुळात पर्यावरण विज्ञानाबाबत असलेली सर्वस्तरीय निरक्षरताच या सर्वांमागे आहे. या निरक्षरतेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणूनच पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेला लोकसहभाग दिसून येत नाही. राजकीय अजेंड्यावरही पर्यावरण कधीच नसते. अजूनही पीयूसी प्रमाणपत्र नियमबाह्य पद्धतीने घेणाऱ्यांचे प्रमाण किती अवाढव्य आहे, यावरून पर्यावरण-प्रदूषणाबाबत आपण किती सजग आहोत, हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही,' अशीही टिपण्णी डॉ. खोब्रागडे यांनी केली.

\Bजगण्याचे शास्त्र म्हणून मनात बिंबणे गरजेचे\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश पाटील म्हणाले, 'पर्यावरणासंबंधी आपल्या देशात दोनशेपेक्षा जास्त कायदे-नियम आहे. तसेच पर्यावरणासंबंधी आपण अनेक करारदेखील केलेले आहेत. मात्र, आजच्या राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेमध्ये या कायद्यांची, नियमांची किती प्रभावी अंमलबजावणी होते, याचे उत्तर नाही असेच आहे. मुळात पर्यावरण शास्त्र हे जगण्याचे शास्त्र झालेले आहे. हे प्रत्येकाच्या मनात बिंबणे आवश्यक आहे. मात्र, दुर्दैवाने पर्यावरण ही प्रत्येकाला आपली जबाबदारी वाटतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे नैसर्गिक स्रोत अतिशय मर्यादित आहेत; किंबहुना हे स्रोत नष्ट होत चालले आहेत. हे स्रोत टिकले पाहिजेत आणि शुद्ध स्वरुपात टिकले पाहिजेत, यासाठी काहीही होताना दिसत नाही. मीच माझ्या कचऱ्याचा निर्माता असेल, तर मीच माझ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे, हे समाजभान अजूनही आलेले नाही. या बेफीकीर व बेजबाबदार वृत्तीमुळेच नैसर्गिक स्रोत, निसर्ग, पर्यावरण दूषित होत आहे आणि यावर सरकारचा खूप काही 'फोकस' नाही. त्यामुळेच २०१३मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये औरंगाबाद १४ व्या क्रमांकावर होते, तर २०१८मध्ये आपले शहर क्रमवारीत काहीसे पुढे गेले असले तरी प्रदूषणाचे प्रमाण ७७.१४ टक्क्यांवरुन ७२.१६ टक्क्यांवर अजूनही आहेच. महत्त्वाचे म्हणजे आमचे बलस्थान काय आहे, हे लक्षात न घेता आम्ही अंधानुकरण करत आहोत. कृषी हा देशाच्या अर्थकारणाचा खऱ्याअर्थाने कणा असतानाही कृषीकडे नकारात्कमदृष्ट्या पाहिले जाते. कृषी हे निर्विवादपणे आमचे बलस्थान असताना त्यामध्ये 'इनोव्हेशन' कमी व दुसरीकडे जास्त होते.'

पर्यावरण विज्ञानाची जाणीव जागृती शेवटच्या व्यक्तीपर्यंत होण्यासाठीच पर्यावरणासंबंधी राष्ट्रीय धोरण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे आणि सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्र बसून हे धोरण ठरवले गेले पाहिजे. शिखर समितीद्वारे अशा प्रकारच्या धोरणाची निश्चिती होऊन प्राधान्यक्रमानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.

\B- डॉ. क्षमा खोब्रागडे\B, पर्यावरणतज्ज्ञ \B

\Bनैसर्गिक स्रोतांची जपवणूक करण्याच्या हेतुने व नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास थांबवण्यासाठी गरजा कमी करण्याच्या धोरणालाही प्राधान्य द्यावे. आपले बलस्थान शेती असेल तर शेतीसंदर्भात अधिकाधिक संशोधन होऊन नवनवीन तंत्रज्ञान वाढले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी झेपेल तसे तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे.

\B- डॉ. सतीश पाटील\B, पर्यावरणतज्ज्ञ

'आरएसपीएम' हा धोकादायक घटक हवेत नेमका किती आहे, याची प्रामाणिकपणे तपासणी होऊन खरे आकडे जनतेसमोर यावेत, जे होताना दिसत नाही. बाजारातील फटाक्यांची मैदानावर चाचपणी केली जाते व ध्वनीप्रदूषण मर्यादेत असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात कितीतरी जास्त डेसिबलच्या फटाक्यांची विक्री होते.

\B- डॉ. मुकेश नााईक\B, पर्यावरणतज्ज्ञ

विकासाच्या नावाखाली नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होत आहे, वाट्टेल तशी वृक्षतोड होत आहे. याच धोरणामुळे ३३ टक्के क्षेत्र वनआच्छादित असणे अपेक्षित असताना ते काही टक्क्यांवर आले आहे. धक्कादायक म्हणजे वृक्षलागवडीच्या नावाखाली तुतीच्या झाडांची लागवड केली जाते व त्याची चक्क गणनादेखील केली जाते.

\B- रंजन देसाई\B, निसर्गप्रेमी

\Bमटा जाहीरनामा

\B- पर्यावरणासंबंधी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे

- नैसर्गिक स्रोतांची शुद्ध स्वरुपात जपवणूक करणे

- जैवविविधता जपण्यासह बलस्थानानांना प्राधान्य देणे

- कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण संशोधनाला अग्रक्रम देणे

- सर्व प्रकारचे प्रदूषण घटवणे, कमीत कमी करणे

- डिझेल वाहने संपवण्यासह वाहन प्रदूषण घटवणे

- प्रदूषण घटवण्यासाठी समांतर व्यवस्था उभी करणे

- वृक्षारोपणासह परिपूर्ण वृक्षसंवर्धनावर भर देणे

- पर्यावरण हा जगण्याचा विषय मनमनांत बिंबवणे गरजेचे

- पर्यावरण रक्षण करणे ही प्रत्येकाला आपली जबाबदारी वाटणे

- पर्यावरणाविषयी व्यापक समाजभान जागृत करणे गरजेचे

- पर्यावरण हादेखील राजकीय पक्षांचा अजेंडा असला पाहिजे

- पर्यावरणाच्या प्रत्येक कृतीमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे

\Bसरकारला तज्ज्ञांनी दिलेले दहापैकी गुण

\B- संरक्षण, अंतर्गत सुरक्षा.....५/१०

- परराष्ट्र धोरण.................५/१०

- आर्थिक नीती..................४/१०

- वाहतूक आणि दळवळण......६/१०

- सामाजिक सलोखा.............३/१०

- पर्यावरण, ऊर्जा..................४/१०

- कृषी...............................४/१०

- सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता.......३/१०

- शिक्षण...............................६/१०

- महिला................................५/१०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवजयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शनिवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त राजाबाजार येथून निघणाऱ्या मुख्य मिरवणुकीसोबतच सिडको हडको आणि गारखेडा भागात देखील मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणूकीदरम्यान वाहतुकीला अडचण नको म्हणून काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शनिवारी बंद असलेले आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

बंद मार्ग

- राजाबाजार चौक, संस्थान गणपती, शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटीचौक, गुलमंडी, बाराभाई ताजीया, पैठणगेट, सिल्लेखाना, क्रांतीचौक ते भडकल गेट

- एन-१२ नर्सरी, टीव्ही सेंटर, जिजामाता चौक, एम २, शिवनेरी कॉलनी, पार्श्वनाथ चौक, बळीराम पाटील चौक, ओंकार चौक, बजरंग चौक, अविष्कार चौक, शिवाजी महाराज पुतळा ते चिश्तिया चौक

- जयभवानीनगर चौक ते गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हनहिल उड्डाणपूल ते जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील चौक

पर्यायी मार्ग

- शहागंजकडून सिटीचौककडे येणाऱ्या वाहनांनी चेलिपुरा, लोटाकारंजा, कामाक्षी लॉज चौक या मार्गाचा वापर करावा.

- क्रांतीचौक, गुलमंडी सिटीचौककडे येणाऱ्या वाहनांनी सावरकर चौक, कार्तिकी हॉटेल चौक, मिलकॉर्नर, भडकलगेट या मार्गाचा वापर करावा.

- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या वाहनांनी अण्णाभाऊ साठे चौक, उद्धवराव पाटील चौक, सिद्धार्थ चौक या मार्गाचा वापर करावा.

- जयभवानीनगर चौकाकडून गजानन महाराज मंदिर चौकाकडे येणारी वाहनांनी जालना रोडचा वापर करावा.

- जवाहरनगरकडून सेव्हनहिल चौकाकडे येणाऱ्या वाहनांनी माणिक हॉस्पिटल, रोपळेकर चौक, अमरप्रित चौक, आकाशवाणी चौक या मार्गाचा वापर करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांत राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सरकारी, निमसरकारी कार्यालये, विश्रामगृहे येथे राजकीय पक्षांनी, उमेदवारांना बैठका घेऊ नयेत. तेथे पोर्टर, बॅनर, होर्डिंग लावू नये, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत शहर पोलिस प्रशासनाने देखील विविध आदेश जारी केले आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी हे आदेश जारी केले असून, यामध्ये आचारसंहिता पालन करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. यामध्ये आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, विश्राम गृह या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या हितचिंतकानी विनापरवाना सभा घेणे, मिरवणूक काढणे, पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्पलेट, होर्डिंग लावणे यांना मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी नमुना मतपत्रिका छापताना निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, निश्चित आकारात मतपत्रिका छापणे बंधनकारक केले आहे.

निवडणुकीच्या काळात छपाई किंवा प्रकाशन करणाऱ्यांनी सर्व प्रकाशनावर आणि छापण्यात येत असलेल्या निवडणूक पुस्तिका आणि पोस्टरवर नाव, पत्ता छापणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपकाचा वापर सबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय करू नये, सकाळी सहापूर्वी, रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवणारे उमेदवार यांना निश्चित केलेल्या ठिकाणीच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा, या ध्वनीक्षेपकांशी सबंधित परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images