Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील दुष्काळामुळे कृषि विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळण्यात आले असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी यांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती चिंताजनक आहे. जवळपास १३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. अशी परिस्थिती असतांना महसूल विभाग निवडणुकीच्या कामाला लागला असून निवडणुकीत दुष्काळ, टंचाई निवारण्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून कृषि विभागाचे कर्मचारी निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत यंदा जिल्हा प्रशासनाने ३० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण लवकरच घेण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली अशांना नोटिसा बजावण्यात येणार असून पहिल्या सत्रात गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी भांडणारे खरे हिरो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगागाबाद

'समन्यायी पाणी वाटपाबाबत कायद्याच्या माध्यमातून वर्षानुवर्षे संघर्ष करीत समाजामध्ये जलसाक्षरता वाढवण्याबरोबरच विविधांगी गरजेच्या कायद्यांविषयी जनजागृती करण्याचा अॅड. प्रदीप देशमुख यांचा प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे. त्यामुळे ते पाण्यासाठी भांडणारे खरे हिरो आहेत,' अशा शब्दांत आणि अनेक रंगतदार किस्स्यांची बरसात करीत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी अॅड. देशमुख यांचा गौरव केला.

अॅड. देशमुखलिखित 'जाणिवेची क्षितिजे' व 'गोविंद गीतांजली' या दोन पुस्तकांचे व सीडीचे प्रकाशन शुक्रवारी (२२ मार्च) तापडिया नाट्य मंदिरात झाले. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ गायक पं. नाथ नेरळकर, प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे, स्वरुप प्रकाशनचे वासुदेव मुलाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रसिकांची मने जिंकत आणि खास मराठवाडी शैलीत अनेक किस्स्यांची बरसात करीत आणि रसिकांना खळखळून हसायला लावत अनासपुरे यांनी अॅड. देशमुख यांच्या पुस्तकांचा वेध घेतला. तसेच नेहमीच दुष्काळाचा कठीण सामना करणाऱ्या मराठवाड्यामध्ये जलसाक्षरता आज कशी काळाची गरज बनली आहे, याचेही महत्व मकरंद यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. त्याचबरोबर कायद्याची आज कशी गरज आहे आणि अॅड. देशमुख यांनी कायद्यासह जलसाक्षरतेचे भान देण्याचा कसा प्रयत्न केला, याकडेही त्यांनी रसिकांचे लक्ष वेधले. टाळ्या अन् हशांचा पाऊस पडत असतानाच प्रा. फ. मुं. शिंदे यांनीही हास्यविनोदांची फटकेबाजी करीत अॅड. देशमुख यांच्या पुस्तकांचा गौरव केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वासुदेव मुलाटे यांनी प्रास्ताविक केले. याच कार्यक्रमात अॅड. देशमुख यांचा अनासपुरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कारही करण्यात आला, तर गायिका वैशाली कुर्तडीकर, साऊंड रेकॉर्डिस्ट स्वाती कुलकर्णी, बालकलाकार सक्षम सोनवणे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात गायक-संगीतकार अतुल दिवे यांच्या मैफलीने रंग भरले. कस्तुरी कुलकर्णी-जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्य मंदावत असल्याने वातावरणात मोठे बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सूर्यावरील कमी होत असलेल्या डागांमुळे संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम होत असून, संपूर्ण जग लघू हिमयुगाकडे सरकत आहे. यंदा लांबलेली थंडी याचेच उदाहरण आहे. घसरलेल्या सौरडागांमुळे उन्हाची तीव्रता कमी होणार असल्याने याचा परिणाम वातावरणासह मानवी आरोग्यालाही होणार असल्याचा दावा संशोधक करत आहेत.

सौर अभ्यासकाच्या अंदाजाप्रमाणे सध्या सूर्यावर सुरू असलेली साखळी २०२२-२३मध्ये न्यूनतम पातळीवर असेल, असा अंदाज आहे. सूर्य न्यूनतम पातळीकडे जात असल्याने येणाऱ्या काळात याचे वातावरणावर मोठे बदल होणार असून, ही चिंतेची बाब असल्याचे हवामान अभ्यासक सांगतात. 'सूर्य, पृथ्वी आणि वातावरण' ही जागतिक हवामान दिनाची यंदाची संकल्पना आहे. सूर्यावरील सौरडाग कमी झाले असून, सूर्य जेव्हा किमान पातळीकडे जातो, तेव्हा वैश्विक किरणांचा मोठ्या प्रमाणावर मारा पृथ्वीवर होतो. सौरडाग कमी झाल्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता कमी आहे. पाऊस झाला नाही तरीही थंडी वाढते आहे; तसेच फेब्रुवारीमध्ये उन्हाळा सुरू होऊनही त्यापुढील मार्च महिन्याचे काही दिवस थंडी कायम होती. ही स्थिती जागतिक तापमान घसरण सुरू झाल्यामुळे असून, संपूर्ण जग हे लहान हिमयुगाकडे जात असल्याचे चित्र आहे.

जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाढलेले शहरीकरण, पाण्याचा अपव्यय, प्रदूषण आदी बाबींमुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. २००७पासून सौरडागांची संख्या कमी होण्यास सुरुवात झाली असून, २०३२पर्यंत ही साखळी सुरू राहणार आहे. २०२२ व २३ या कालावधीत ही साखळी तीव्र राहण्याचा अंदाज आहे. काही अभ्यासकांनुसार ही साखळी २०५२पर्यंत सुरू राहील.

सौरडागांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे जागतिक पातळीसह भारतावरही याचे परिणाम होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात थंडी वाढण्याची शक्यता आहे, या शिवाय पूर्वमोसमी पावसाची शक्यताही मंदावणार आहे. सौरडागांच्या संख्येत होत असलेल्या घटीचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. लघू हिमयुग अवतरत असेल तर, 'इंटर ट्रॉपिकल कन्झर्वेशन झोन' हा पावसाळ्याच्या काळात भारताच्या उत्तरेकडे सरकतो त्याचा परिणाम हिमालयामध्ये; तसेच उत्तर भारतामध्ये बर्फ पडण्याच्या कालावधीमध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट होते. एकूणच या स्थितीचा परिणाम मराठवाड्यासह विदर्भ, तेलंगणा व आंध्र प्रदेश या प्रदेशालाही बसत असून, या प्रदेशांमध्ये कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत.

सौरडागांच्या घसरणीमुळे पृथ्वीच्या वातावरणातील तापमानात मोठी घट होत असून, ही बाब येत्या काळामध्ये हवामानासाठी चिंता व्यक्त करणारी आहे. येणाऱ्या काळा लघू हिमयुग असल्यामुळे अनेक जागतिक संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्यास या संकटाला सामोरे जाऊ शकू.

- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्निया परिषदेचे उद्या आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्नियावर गेल्या सात ते आठ वर्षांत यशस्वीरित्या विकसित झालेल्या जाळीच्या (मेष) तंत्रज्ञानाबाबत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील शल्यचिकित्सकांमध्ये मंथन घडवून आणण्यासाठी 'हर्निया अपडेटस् २०१९' ही एक दिवसीय परिषद रविवारी (२४ मार्च) हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल व कृपामयी हॉस्पिटलच्या वतीने ही परिषद होत आहे.

सर्वसाधारणरपणे दोन ते तीन टक्के सर्व वयातील नागरिकांमध्ये हर्निया दिसून येतो आणि पोटाच्या कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर हर्नियाची समस्या निर्माण होण्याचे प्रमाणही २० ते ३० टक्के आहे, तर हर्नियाची शस्त्रक्रिया केल्यानंतरदेखील पुन्हा हर्नियाची समस्या उद्भवण्याचे प्रमाणही काहीअंशी आहे. यात पूर्वीच्या शस्त्रक्रियेची पद्धत अधिक क्लिष्ट व अधिक खर्चाची होती. तसेच पूर्वीच्या पद्धतीत ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे केली जात होती आणि अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी शल्यचिकित्सांना काही मर्यादा येत होत्या. मात्र, गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये नायलॉनची (पॉलीप्रॉपीलिन) जाळी बसवून शस्त्रक्रियेचे नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे, जे कोलकात्याचे जगविख्यात शल्यचिकित्सक डॉ. बी. रामण्णा यांनी विकसित केले आहे. या नवीन तंत्रामुळे अवघ्या सात ते आठ हजारांमध्ये ही शस्त्रक्रिया होऊ शकते, ज्यासाठी पूर्वी ४० हजारांचा खर्च येत होता. तसेच नवीन तंत्रामुळे रुग्ण एक-दोन दिवसांत घरी जाऊ शकतो. या नवीन तंत्राविषयी शल्यचिकित्सकांना मार्गदर्शनासह प्रात्यक्षिकेही परिषदेत दाखवली जाणार आहे. परिषदेत ८० वर्षांच्या रुग्णासह २२ वर्षांच्या तरुणावरही शस्त्रक्रिया केली जाणार आहे व ही शस्त्रक्रिया प्रक्षेपित केली जाणार आहे. विशेष म्हणजे डॉ. रामण्णा हे परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत व ३०० पेक्षा जास्त सर्जन परिषदेत सहभागी होतील, असे 'हर्निया सोसायटी ऑफ इंडिया'चे मानद उपाध्यक्ष व परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय बोरगावकर व सचिव डॉ. निखिल चौहान यांनी शुक्रवारी (२२ मार्च) पत्रकार परिषदेत सांगितले. परिषदेत एशिया पॅसिफिक हर्निया सोसायटीचे महासचिव डॉ. राजेश खुल्लर (दिल्ली), हर्निया सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव डॉ. दीपराज भांडारकर (मुंबई), सदस्य डॉ. सर्फराज जलील बेग (कोलकाता), डॉ. रमेश पुंजानी (ठाणे), डॉ. प्रमोद शिंदे (नाशिक), डॉ. समीर रेगे (मुंबई) हेदेखील परिषदेत सहभागी होतील, असेही सांगण्यात आले.

\Bपोटात वाढलेले प्रेशर हेच कारण

\Bपोटाच्या आतमध्ये वाढलेले प्रेशर, हेच हर्नियाचे मुख्य कारण आहे. हे प्रेशर वाढून आतडी बाहेर येतात आणि त्या ठिकाणचा भाग कमकुवत होतो. जांघेमध्ये हर्निया दिसून येण्याचे प्रमाण खूप जास्त सामान्य आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी अवघ्या १५ ते २० ग्रामची अतिशय मजबूत अशी जाळी टाकून शस्त्रक्रिया केली जाते. मधुमेह, व्यायाम न करणे, धुम्रपान ही हर्निया होण्यामागची प्रमुख कारणे आहेत. हर्नियाची शस्त्रक्रिया लवकर न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊन विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असेही डॉ. बोरगावकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सु-संस्कारातूनच मुलांची जडणघडण शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

'मानवाच्या मनात आईच्या पोटातूनच भावना आणि संस्कार जमा होतात. जर मनात चुकीच्या भावना किंवा कुसंस्कार जमा झाले तर आपोआपच मुलांच्या वागण्या, बोलण्यातून भय किंवा क्रोध दिसतो. मनात योग्य भावना किंवा सु-संस्कार जमा झाले तर आपोआपच मुलांच्या वागण्या बोलण्यातून शांती आणि आनंद दिसतो,' असे प्रतिपादन डॉ. सचिन देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्स आणि लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल (नागेश्वरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने तापडिया रंगमंदिरात 'पालकत्वाचे विज्ञान' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाला लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष सुधीर शास्त्री, मुख्याध्यापिका योगिता शास्त्री यांची उपस्थिती होती. डॉ. सचिन देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि लिखाणातून तयार झालेला 'पालकत्वाचे विज्ञान' दृक-श्राव्य कार्यक्रम त्यांनी स्वत: सादर केला. 'आपले शरीर हे बायो-विद्युत उर्जेवर चालते. म्हणून आपल्या शरीराकडून होणाऱ्या कृती विद्युत वेगाने घडतात. म्हणून त्या आपल्याला कळायच्या आतच घडून देखील जातात. जसे की, आपल्या गाडीसमोर आले, तर आपल्याला कळण्याच्या अगोदरच ब्रेक लागून, पण जातो किंवा पायऱ्या उतरताना आपला तोल गेला तर, आपल्याला कळायच्या आताच तोल सांभाळण्याची कृती घडून जाते. त्याच प्रमाणे गैरसमज जर अंतर्मनात जाऊन बसले तर, आपले शरीर आपल्या नकळत चुकीच्या कृती करायला लागते,' असे मार्गदर्शन करून डॉ. सचिन देशमुख यांनी मन, विचार, भावना, संस्कार आणि त्यांच्यामुळे शरीरात घडणाऱ्या चांगल्या अथवा वाईट प्रतिक्षिप्त क्रियांच्या बाबतीत सविस्तर माहिती दिली. 'भारतीय संस्कृतीने जगाला प्राणायाम, योगासने आणि ध्यान दिले. जगात शारीरिक किंवा मानसिक व्याधींपासून मुक्ततेसाठी या उपचार पद्धती प्रचलित आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये शारीरिक किंवा मानसिक व्याधींपासून बचावासाठीसुद्धा 'सु-संस्कार'ही उपचार पद्धती उपलब्ध आहे. मात्र, दुर्दैवाने हे 'संस्कारांचे विज्ञान'बऱ्याचअंशी गैरसमजांमध्ये गुरफटून राहिले आहे. म्हणून अजूनपर्यंत भारतातसुद्धा हे विज्ञान नीटसे वापरल्या गेलेले नाही. पालक हे त्यांच्या बालकांवर 'संस्कार'करण्यासाठी जबाबदार असतात. मात्र, त्यांना स्वत:लाच 'संस्कार म्हणजे नेमके काय?' हे माहिती नसल्याने चुकून का होईना, पण बालकांच्या नाजुक मनात 'कु-संस्कार' घडवल्या जातात. मनाच्या मातीत पडलेले हे संस्कारांचे बीज कालांतराने वृक्षात रूपांतरित होते. जसजसे हे बालक वयाने वाढायला लागते, तसतसे त्याच्या वागण्या-बोलण्यातून या संस्कारांच्या वृक्षाला लागणारी फळे दिसून यायला लागतात,' असेही डॉ. सचिन देशमुख यांनी नमूद केले. सेमिनारला शहरातील असंख्य पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मानसी चार्ल्स यांनी केले.

\Bसंस्काराचे विज्ञान काळाची गरज

\Bडॉ. देशमुख म्हणाले, 'शांत आणि संयमी स्वभाव हा मनात असलेले 'सु-संस्कार'दर्शवतो, रागीट आणि घाबरट स्वभाव मनात असलेले 'कु-संस्कार'दर्शवते. खरे तर 'कु-संस्कार'हेच मानसिक आणि मनोकायिक आजारांचेसुद्धा एकमेव कारण आहे. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर लगेचच लक्षात यायला लागते की, आजचा समाज रागीट आणि घाबरट तसेच मानसिक आणि मनोकायिक आजारांच्या विळख्यात सापडलेला आहे. म्हणून आजच्या पालकांनी हे 'संस्कारांचे विज्ञान'जाणून घेणे ही काळाची गरज बनली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

loksabha election 2019 औरंगाबाद काँंग्रेसमध्ये बंडाळी, सत्तार लढणार अपक्ष

$
0
0

औरंगाबाद:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात बंडखोरीचे वारे वाहत आहेत. औरंगाबादमध्ये काँग्रेसला असाच झटका मिळाला आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसने शुक्रवारी उशिरा उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात राज्यातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे. औरंगाबादेतून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले आहेत.

झांबड यांच्या उमेदवारीबाबत आपल्याला विश्वासात घेतला नसल्याचा सत्तार यांचा दावा आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. झांबड आणि सत्तार यांच्यातला उभा वाद आता विकोपाला पोहोचला आहे.

दरम्यान, औरंगाबादेतल्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही इच्छुक होती. राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू होते. पण काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा प्रचार, भाजप अंतर ठेवून!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेनेने औरंगाबाद मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते निवडणुकीच्या मानसिकतेत आल्याचे मानले जात आहे. मात्र, भाजप सध्यातरी अंतर ठेवून असल्याचे चित्र आहे.

निवडणुकीत शिवसेना - भाजपची युती झालेली असल्यामुळे युतीचा मराठवाडास्तरीय मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. अर्जुन खोतकर - रावसाहेब दानवे यांच्या दिलजमाईचीच चर्चा या मेळाव्यात जास्त झाली. असे असले तरी फडणवीस - ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचा मंत्रही दिला. त्यानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विधानसभा मतदारसंघनिहाय मेळाव्यांचे नियोजन केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या सहाही मतदारसंघात शिवसेनेच्या संपर्कनेत्यांनी जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेवून प्रचाराचा अनौपचारिक शुभारंभ केला आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची उभारणी देखील पुरेशी अगोदर झाल्यामुळे प्रचाराच्या दृष्टीने ती एक जमेची बाजू असल्याचे मानले जात आहे. शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असली तरी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र अद्याप सक्रिय झाल्याचे चित्र नाही. त्यांची धिमी चाल शिवसेनेच्या तंबुत चिंता निर्माण करू शकेल अशी चर्चा आहे. हे चित्र बदलण्यासाठी कोणती व्यूहरचना करायची याचा खल सध्या सेनेच्या तंबुत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुंगीच्या औषधीची विक्री; पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नशा आणि गुंगी आणणाऱ्या औषधी व गोळ्यांची विक्री करणाऱ्याच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले. सागर बाबूराव शिंदे (४५, रा. मयूरनगर, हडको) असे आरोपीचे नाव आहे.

शहरात नशेच्या गोळ्या आणि गुंगी आणणाऱ्या औषधींची अवैधरित्या विक्रीप्रकरणी पोलिसांनी बुधवारी सापळा रचून आरोपी सागर शिंदे याला अटक केली होती. आरोपीच्या बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये जवळपास ७७ हजार ७८० रुपये किमतीच्या नशेच्या आणि गुंगीच्या गोळ्या मिळून आल्या. आरोपीच्या घराची झडती घेतली असता घरातून एक लाख ५० हजार रुपये किमतीच्या गोळ्यांचा साठा मिळाला. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले. आरोपीकडे अनधिकृत गर्भपात व सेक्स उत्तेजीत करण्याच्या गोळ्या कोणाकडून व कशा आणल्या, त्याला कोणी मदत केली का? याबाबत तपास करणे आहे. आरोपी हा पीएसआय कंपनीचा अधिकृत विक्रेता असल्याचे सांगत असल्याने कंपनी बाबत तपास करणे आहे. आरोपीने जालना, नांदेड, लातूर व नागपूर येथील काही साथीदारांची नावे सांगितली असून त्याअंगाने तपास करणे आहे. आरोपीने डॉक्टरांना विनापावती अबॉर्शन किट विक्री केल्याचे समोर आले असून, त्याचा तपास करणे आहे. तसेच आरोपीच्या घर झडतीत शिंदे एजन्सी नावाचे बिल बुक सापडले असून त्याबाबत तपास करणे असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा चालकाला शिवीगाळ, दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसात तक्रार का दिली म्हणत मावस साडूसह चौघांनी रिक्षा चालकाला शिवीगाळ करून काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात पोलिसांनी चौघापैकी दोघांना शुक्रवारी रात्री अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी शनिवारी दिले.

भारत सांडू साळवे (२५, रा. चांदई थोंबरी ता. भोकरदन जि. जालना) व सुभाष धर्माजी साबळे (५२, रा. बुटखेडा ता. जाफ्रराबाद जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात रिक्षा चालक राजेंद्र लक्ष्मण नवतुरे (३७, रा. गीता नगर, आझाद महाविद्यालयासमोर) यांनी तक्रार दिली होती. पाच मार्च रोजी दुपारी चार वाजता नवतुरे हे रिक्षा घेवून बेगमपुरा परिसरातील एका रिक्षा स्टँडवर असताना तेथे त्यांचा मावस साडू भारत साळवे, सुभाष साबळे, गंगासागर शालीग्राम दांडगे व अश्विनी भरत साळवे असे चौघे जण आले. तू आमच्या विरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात तक्रार का दिली म्हणत चौघांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच तक्रार मागे घे नाहीतर तुला जिवे मारून टाकू व तुझी रिक्षा जाळून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपी भारत साळवे व सुभाष साबळे या दोघांना अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यार जप्त करणे आहे. आरोपीच्या दोन साथीदारांचा शोध घेवून त्यांना अटक करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विक्री केलेल्या कापसाचे पैसे डिक्कीतून चोरणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना तब्बल दीड वर्षानंतर यश आले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिला. राहुल उर्फ गोपाल उर्फ खटमल उर्फ बोंबील संजय नेतलेकर (२६, रा. जाकणीनगर, कंजरवाडा जि. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपी विकास राजू गुमाने (२४), संजय बिरजू गारुंगे (३१), गोपाल दशरथ माचरे (३७) व अजय बिरजू गारूंगे (२६, सर्व रा. तांबापूर, कंजरवाडी जळगाव) या चौघांना अटक केली होती. या प्रकरणात संदीप पंढरीनाथ भवार (३४, रा. लांझी, वाळूज ता. गंगापूर) यांनी तक्रार दिली होती. भवार यांचे कृषी सेवा केंद्र नावाचे कापूस खरेदी-विक्रीचे दुकान आहे. आठ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी भवार हे विक्री केलेल्या कापसाचे सहा लाख १६ हजार १०० रुपय घेवून दुचाकीवर घरी निघाले होते, मात्र भवार यांचे वडील ओअ‍ॅसीस चौकात ट्रॅक्टरचे टायर बदलण्याचे काम करत असल्याने भवार तेथे गेले. त्यांनी दुचाकी गणेश टायर्सच्या दुकानासमोर उभी केली व ते टायरचे पैसे देण्यासाठी दुकानात गेले असता दुकानात एक इसम आला व त्याने भवार यांना तुमच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग दोन चोरट्यांनी चोरल्याची माहिती दिली. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी नोव्हेंबर २०१७मध्ये चौघा अरोपींना अटक केली होती. तर पाचव्या आरोपीला एमआयडीसी जळगाव पोलिस ठाण्यातून ताब्यात घेत २२ मार्च रोजी वाळूज पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव, धुळे, नाशिक व पुणे जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यात आरोपींनी चोरलेली रक्कम हस्तगत करणे आहे. गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांचा आठवावा प्रताप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर- हर महादेवच्या गजरात शनिवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. राजाबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

क्रांतीचौक येथील छत्रपतींच्या पुतळ्यास सकाळी अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास श्री संस्थान गणपती मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करून मिरवणूक सुरू झाली. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अभयसिंग गायकवाड, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, संतोष जेजूरकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेते विकास जैन, नगरसेवक ऋषिकेश खैरे, सचिन खैरे, माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे उपस्थित होते. सजवलेल्या चांदीच्या रथात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात आली. रथासमोर सनई चौघड्यासह पिंप्री राजा येथील बँड पथक होते. नाशिकच्या श्री साक्षी महिला व पुरुष ढोल ताशा व झांज पथकाने सर्वांचे वेधले. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी भगवे फेटे बांधले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भगवामय झाले. क्रांतीचौकात मिरवणुकीची सांगता झाली.

\Bभाजपची पाठ, नगरसेवकांचीही अनुपस्थिती

\Bशिवसेनेने पुढाकार घेवून आयोजित केलेल्या शिवजंयती मिरवणुकीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. भाजपचा एकही पदाधिकारी मिरवणुकीकडे फिरकला नाही. शिवसेनेच्या नगरसेवकांची अनुपस्थिती देखील प्रकर्षाने जाणवली. ऋषिकेश खैरे, सचिन खैरे वगळता शिवसेनेचा एकही नगरसेवक मुख्य मिरवणुकीत सहभागी झाला नाही. मिरवणुकीवर निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाकोट हल्ला यशस्वी: माजी हवाईदल प्रमुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पुलवामा पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर केलेला हल्ल्याच्या पुरावे, राजकारण यात मी नाही. मात्र, बालाकोट हल्ला यशस्वी झाला आहे,' असे प्रतिपादन शनिवारी निवृत्त हवाई दलप्रमुख भूषण गोखले यांनी केले. ते देवगिरी अभियांत्रिकी कॉलेजच्या स्नेहसंमेलनात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विंग कमांडर अभिनंदन यांचे सासरे निर्भय मारवा, विवेक भोसले, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर, शहीद नितीन राठोड व संजय राजपूत यांचे कुटुंब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गोखले म्हणाले, 'पुलवाम्याच्या भ्याड हल्लाला आपण चोख प्रत्यूत्तर दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपण पाकिस्तानला उघडे पाडले. अभिनंदनच्या वेळी जागतिकस्तरावरील सर्व देशांचा दबाव आपण पाकिस्तानवर टाकू शकलो. पाकिस्तानला आपण वेळोवेळी त्यांची जागा दाखवून दिली. मात्र, काश्मिरमधील एक तृतीअंश भाग पाकव्याप्त काश्मिर अजूनही त्यांच्याकडे आहे. जेव्हा जवान देशासाठी शहीद होतो तेव्हा दु:ख होते, पण जेव्हा समाज त्यांना विसरतो तेव्हा जास्त दु:ख होते,' अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी संयोजक अच्चुत भोसले, उपप्राचार्य डॉ. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, डॉ. राजेश औटी, प्रा. उमेश पाटील, डॉ. सुनील शिंदे, प्रा. रूपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले. ट्विंकल मदान, श्रृती सोनवणे या विद्यार्थिंनींनी आभार मानले.

\Bशहिदांच्या कुटुंबांना सात लाखांची मदत

\Bदेवगिरी अभियांत्रिकी कॉलेजने यावर्षी स्नेहसंमेलन साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेत या खर्चातून पाच लाख रुपये पुलवामा हल्ल्यातील शहिदांना देण्याचा निर्णय घेतला. हा धनादेश देताना शनिवारी समाजातील दानशूरांनी आणखी दोन लाख १३ हजारांचा धनादेश दिला. यामध्ये रोहित जानगीड, जगदीश जानगीड यांनी एक लाख दोन हजार आणि भगीरथ जाठ, ओमप्रकाश जाठ, सुरेंद्र जाठ यांनी शहीदांच्या कुटुंबियांना एक लाख ११ हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे प्रत्येकी सुमारे साडेतीन लाखांची मदत शहिदांच्या कुटुंबियांना मिळाली. कॉलेजतर्फे प्रत्येकी अडीच लाखांचा धनादेश शहीद नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्यात आले. राठोड कुटुंबियांकडून गंगाताई पवार यांनी तर राजपूत यांच्या कुटुंबियांमध्ये यश राजपूत यांनी धनादेश स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांच्या फौजेपुढे पाण्याचा यक्षप्रश्न!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळ्यात केवळ पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून महापालिका आयुक्तांनी या कामासाठी अर्धाडझन अधिकाऱ्यांची फौज उभी केली. मात्र, त्यानंतरही पाणीप्रश्न कायम राहण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावरच अवलंबून होता. पालिकेतील अन्य ज्येष्ठ अधिकारी या विभागापासून अंतर ठेवून होते. या विभागात कर्मचाऱ्यांची संख्याही कमी असल्यामुळे मोठ्या अडचणीतून विभागाचे काम सुरू होते. ही अडचण लक्षात घेता आयुक्तांनी अर्धा डझन अधिकाऱ्यांची फौज पाणी या विभागात नियुक्त केली. कोल्हे यांच्या बरोबरच सहाय्यक आयुक्त करणकुमार चव्हाण व शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी दिली. त्याशिवाय सिडको - हडकोच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, उपअभियंता ए. बी. देशमुख, वॉर्ड अभियंता एस. डी. काकडे यांच्याकडे दिली. या तिन्हीही अधिकाऱ्यांनी यापूर्वी पाणी पुरवठा विभागात काम केले नाही. त्यामुळे सिडको - हडकोच्या पाणी पुरवठ्याचे नेटवर्क त्यांना माहिती असण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. या भागाच्या पाणी पुरवठ्याचे आव्हान या तीन अधिकाऱ्यांवर असल्याचे मानले जात आहे. टँकरची जबाबदारी उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे देण्यात आली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांचे एकमेकांशी असलेले सख्य लक्षात घेता एकाच कामासाठी अर्धा डझन अधिकाऱ्यांची केलेली नियुक्ती शहराच्या पाणी पुरवठ्याला कितपत न्याय देणार, असा सवाल देखील विचारला जात आहे. पालिकेतील कार्यपद्धती लक्षात घेता अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर देखील पाणी प्रश्न कायम राहील असे मानले जात आहे.

\Bआपत्कालीन पंप झाले सुरू

\Bमहापालिकेच्या जायकवाडी येथील आपत्कालीन पंपहाऊसचे टेस्टिंग झाले असून, सहा पैकी एक पंप देखील सुरू करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात आपत्कालीन पंप हाऊस पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. जायकवाडीतील पाणी साठ्यात झपाट्याने घट होत असल्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्य पंपहाऊस जवळील आपत्कालीन पंपहाऊस सुरू करण्याचा निर्णय घेतला. आठ ते दहा दिवसांपासून या पंपहाऊसचे काम करण्यात येत होते. आपत्कालीन पंपहाऊसमध्ये ७५ एचपीचे आठ पंप बसण्याची क्षमता आहे. त्यापैकी सहा पंप सध्या बसवण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पंपांपैकी दोन पंपांचे टेस्टिंग झाले आहे. एक पंप शनिवारी सुरू झाला.

\B...तर ताण होणार कमी

\Bआपत्कालीन पंपहाऊसचे सर्व पंप फ्लोटिंग आहेत. मुख्य पंपहाऊस आणि आपत्कालीन पंपहाऊस याच्यात सुमारे पाचशे मीटरचे अंतर आहे. या पंपांच्या माध्यमातून जायकवाडी धरणातील पाणी उपसून ते मुख्य पंपहाऊसमध्ये आणले जाते व तेथून ते मुख्य जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरापर्यंत पोचवले जाते. आपत्कालीन पंपहाऊस मध्ये बसवण्यात आलेल्या सहा पंपांपैकी दोन पंपांचे टेस्टींग झाले आहे. उर्वरित चार पंपांचे टेस्टिंग दोन दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर हे पंपहाऊस पूर्ण क्षमतेने सुरु केले जाणार आहे. आपत्कालीन पंपहाऊस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर शहराच्या पाणी पुरवठ्यावरील ताण काही प्रमाणात कमी होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपड्या युगूलाची उत्कट प्रेमकथा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशाच्या मागे धावणारा संगीतकार आणि अभिनेत्रीचा संघर्षशील प्रवास मांडणारा 'ला ला लँड' चित्रपट रसिकांना खिळवून ठेवणारा ठरला. या संगीतमय चित्रपटाची कथा सामान्यांच्या जीवनातील नैतिक नात्यांवर नेमका प्रकाश टाकते. ही खेळकर प्रेमकथा प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण अनुभूती देणारी होती.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि एमजीएम फिल्म आर्ट्स विभागाच्या वतीने 'चित्रपट चावडी' उपक्रमात बहुचर्चित 'ला ला लँड' हा अमेरिकन चित्रपट दाखवण्यात आला. एमजीएम कॅम्पसमधील व्ही. शांताराम प्रेक्षागृहात शनिवारी सायंकाळी उपक्रम झाला. लॉस एंजेलिस शहरात घडणारे व्यामिश्र भावनांचे कथानक प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण अनुभव ठरले. स्वप्नांचा पाठपुरावा करताना नकळत प्रेमात पडलेल्या प्रेमी युगूलाची ही कथा आहे. कॉफी शॉपमध्ये अर्धवेळ नोकरी करून चित्रपट क्षेत्रात धडपडणारी मिया आणि नवोदित संगीतकार-पियानोवादक सेबस्टीनची उत्कंठावर्धक धडपड उत्तम मांडली आहे. सतत ऑडिशन देऊनही यश हुलकावणी देत असल्याने नाट्य लेखनाकडे वळलेली मिया त्यातही पुरेशी यशस्वी ठरत नाही. सेबस्टीनच्या प्रयत्नातून एका टप्प्यावर तिला संधी मिळते. मात्र, गैरसमजातून दोघांचे नाते संपते. अत्यंत साधे कथानक प्रभावी संवाद आणि लक्षवेधी छायांकनाने प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करते. २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्री एम्मा स्टोन व अभिनेता रॅन गॉसलिंग यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. इतर १४ नामांकने मिळाल्यामुळे 'ला ला लँड' जगभर चर्चेत होता. दरम्यान, जाई कदम यांनी प्रास्ताविक केले आणि सुबोध जाधव यांनी आभार मानले. या उपक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित बहुजन आघाडीचा पेच ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या लढतीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची उत्सुकता कायम आहे. 'एमआयएम'ने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर 'वंबआ' दुसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे.

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेसने चर्चेचे गुऱ्हाळ थांबवत अखेर सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने पाचव्यांदा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली. झांबड विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत. ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असलेल्या झांबड यांनी प्रचाराची यंत्रणा राबविली आहे. तर दोन दशकांपासून एकहाती सत्ता असलेल्या खैरे यांच्या मतांचे समीकरण वेगळे आहे. दोघे तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरताच लढत अटीतटीची होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मतदारसंघातील मुस्लिम व दलित मतदार कुणाकडे वळणार हा तिढा कायम आहे. वंचित बहुजन आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसल्यामुळे उमेदवार कोण असेल ही उत्सुकता कायम आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना 'एमआयएम'ने विरोध केल्यानंतर वंबआने निर्णायक भूमिका घेतली नाही. तसेच जनता दलाने पाठिंबा मागितल्यानंतरही दिला नाही. सद्यस्थितीत आमदार इम्तियाज जलील 'वंबआ'कडून लढण्याची चर्चा जवळपास थांबली आहे. या आघाडीच्या उमेदवारीसाठी माजी खासदार उत्तमसिंह पवार प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरही निर्णय होऊ शकला नाही. राज्यभरातील ३७ उमेदवार जाहीर करताना वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील सर्व मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले. औरंगाबाद मतदारसंघात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कायम आहे. या उमेदवारावर शिवसेना व काँग्रेसच्या राजकीय समीकरणात बरेच बदल होणे अपेक्षित आहे.

\Bमतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा ?

\Bवंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सर्वाधिक मुस्लिम आणि दलित मते मिळवण्याची शक्यता आहे. नेहमीच्या धार्मिक मतांच्या बेरजेवर काही उमेदवारांचे भवितव्य निश्चित होते. पण, यावेळी मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा कुणाला होणार हा पेच आहे. काँग्रेसचा पारंपरिक मतदार इतरत्र वळल्यास त्यांच्या उमेदवाराला फटका बसणे स्वाभाविक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेसच्या नेत्यांवर ‘अंगाऱ्याची’ जादू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वाधिक चर्चेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांचा औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीचा पत्ता कापला गेला. या कुरघोडीच्या राजकारणाचे खापर चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर फोडले. जनता परिवर्तनाची इच्छा बाळगून असताना काँग्रेसमधील काही नेत्यांवर 'अंगाऱ्याची' जादू चालते अशी खरपूस टीका चव्हाण यांनी केली. उमेदवारीच्या राजकारणातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत झांबड यांची वर्णी लागली. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षात काही लोकसभा मतदारसंघांची अदलाबदल होण्याची चर्चा सुरू होती. यात उस्मानाबाद आणि औरंगाबाद मतदारसंघांचा समावेश होता. पण, हा बदल प्रत्यक्षात करण्यात आला नाही. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार दिल्यास विजय शक्य असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने चव्हाण यांच्या नावाचा आग्रह धरला होता. पण, पारंपरिक मतदारसंघ देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध होता. सतत चार निवडणुकीत पराभव होऊनही काँग्रेसने जागा सोडली नसल्याबद्दल चव्हाण यांनी जाहीर पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. '१९९९पासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. सलग चार वेळेस काँग्रेसचा उमेदवार येथे पराभूत झाला. परंतु, आमच्या मित्रपक्षाला आत्मपरीक्षणाची गरज वाटत नाही. जनता परिवर्तन म्हणते. पण, जिल्हा काँग्रेसमधील काही व्यक्तींवर 'अंगाऱ्याची' जादू चालते. म्हणून कायमच हे वेळेवर उमेदवार लादतात. परिणामी पूर्ण तयारीअभावी जागा गमवावी लागते', अशी टीका चव्हाण यांनी केली.

जो जिंकू शकतो, तोच उमेदवार या भूमिकेतून शरद पवार यांनी माझ्या उमेदवारीचे संकेत दिले होते. या विश्वासाचे समाधान असल्याचे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. 'अंगाऱ्याचा' उल्लेख करून चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे खैरे व काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मधुर संबंधावर बोट ठेवल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकीपूर्वी बेबनाव वाढल्याने आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

\Bबूथनिहाय बांधणी व्यर्थ

\Bउमेदवारी मिळण्याची शक्यता आणि पक्षाने तयारीचे आदेश दिल्यानंतर सतीश चव्हाण यांनी अख्खा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता. गावनिहाय भेटी घेऊन कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. मतदान केंद्रनिहाय यंत्रणा उभी करण्यातही त्यांना यश आले होते. ही तयारी अंतिम टप्प्यात असतानाच उमेदवारी नाकारण्यात आली.

गेल्या तीन-चार महिन्यांपासून मतदारसंघात परिपूर्ण तयारी केली होती. परंतु, जिल्हा काँग्रेसमधील काही व्यक्ती हा मतदारसंघ जिंकण्यापेक्षा 'स्व-हिताआड' कुणी येऊ नये यासाठी अधिक तत्पर असतात.

- सतीश चव्हाण, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एन्ड्युरन्समध्ये १५६ दात्यांनी केले रक्तदान

$
0
0

औरंगाबाद : एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनीमध्ये १५६ दात्यांनी रक्तदान केले. वाळूज एमआयडीसीमध्ये येथील कंपनीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अनुरंग जैन यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राम मार्लापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गाढे उपस्थित होते. यावेळी कैलास मोहिते, अविनाश देशपांडे, अरविंद खटी, अनिल पवार, शंकर पवळे, प्राजक्ता मिरीकर, भगवान वाघ, प्रवीण देशमुख, अविनाश पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबीरामध्ये १५६ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. औरंगाबाद ब्लड बँकेच्या वतीने डॉ. नरेंद्र गोयल, शामराव सोनवणे, बाबासाहेब कळमकर, मनोज चव्हाण, जाकेर शेख, माधव गौरकर यांनी रक्तसंकलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जन्सनी विद्यार्थी बनून तंत्रज्ञान स्वीकारावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शल्यचिकित्साशास्त्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान येत आहे आणि जुने तंत्रज्ञान बाजुला पडत आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे किंवा बाजुला फेकले जाणे, हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर शल्यचिकित्सकांनी विद्यार्थी बनून अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे, असा सूर शहरात रविवारी (२४ मार्च) झालेल्या हर्निया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रख्यात शल्यचिकित्सकांमधून उमटला.

औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल व कृपामयी हॉस्पिटल्सच्या वतीने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे 'हर्निया अपडेस् २०१९' ही एक दिवसीय वैद्यकीय परिषद झाली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी खासदार राजकुमार धूत, कोलकाता येथील एडब्ल्यूआर न्यासाचे संस्थापक व विश्वस्त डॉ. बी. रामण्णा, एशिया पॅसिफिक हर्निया सोसायटी ऑफ इंडियाचे महासचिव डॉ. राजेश खुल्लर (दिल्ली), हर्निया सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष व परिषदेचे संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विजय बोरगावकर, सचिव डॉ़ दीपराज भांडारकर (मुंबई), डॉ. समीर रेगे (मुंबई) आदींच्या उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. खासदार धूत यांच्या हस्ते परिषदेचे डिजिटल पद्धतीने दिपप्रज्ज्वलन झाले. या वेळी हर्नियावरील विशिष्ट मेष तंत्रज्ञान विकसित केलेले प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. बी. रामण्णा म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि पूर्वीचे तंत्रज्ञान निरुपयोगी ठरत आहे. शल्यचिकित्साशास्त्रात व हर्नियावरील शस्त्रक्रियेमध्येही विविध आधुनिक पद्धती विकसित झाल्या आहे. हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे हे शल्यचिकित्सकांसाठी प्रत्येक वेळी आव्हानात्मक असते. मात्र हे तंत्रज्ञान न स्वीकारल्यास शल्यचिकित्सकदेखील जुन्या तंत्रज्ञानाप्रमाणे बाजुला फेकले जातील. त्यामुळे विद्यार्थी बनून प्रत्येक वेळी नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारणे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत राहणे गरजेचे आहे, असेही मत डॉ. रामण्णा म्हणाले. नवनवीन तंत्र शिकणे आणि पुन्हा पुन्हा शिकणे आणि खऱ्याअर्थाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असेही डॉ. खुल्लर म्हणाले. आमच्या रुग्णालयात हर्नियाच्या शस्त्रक्रिया होतात; परंतु मलाही हर्नियावरील शस्त्रक्रियांबाबत फारसे काही माहीत नव्हते. या परिषदेमुळे त्याचे महत्व व गांभीर्य कळाले, असे खासदार धूत म्हणाले. डॉ. भांडारकर यांनीही मनोगत व्यक्त केले, तर डॉ़ बोरगावकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विकास देशमुख यांनी आभार मानले. दिवसभर परिषदेत विविध विषयांवर मंथन झाले आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले.

\Bडॉ. बोरगावकर हे सर्वोत्तम विद्यार्थी

\Bपरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी, सर्वात ज्येष्ठ असूनही वेळोवेळी तंत्रज्ञान स्वीकारणारे डॉ. विजय बोरगावकर हे समस्त शल्यचिकित्सकांमधील एक सर्वोत्तम विद्यार्थी आहेत, अशा शब्दांत डॉ. रामण्णा यांनी डॉ. बोरगावकर यांचा गौरव केला. डॉ. बोरगावकर यांचा हा गुण घेतल्यास समस्त शल्यचिकित्सक आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करू शकतील आणि त्याचा लाभ खऱ्याअर्थाने रुग्णांना होईल. याच प्रेरणेतून मुंबईत मे २०२० मध्ये 'हर्निया ऑलिंपियाड' होणार असून, तब्बल तीन हजार शल्यचिकित्सकांचे मंथन घडवून आणण्यात येणार असल्याचेही डॉ. रामण्णा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. औरंगपुरा येथील सिमंत मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. दोन सत्रात पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये संघटनात्मक रचना, कार्यप्रणालीसह दहा टक्के आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नविन पदाधिकाऱ्यांच्या यावेळी नियुक्त्या करण्यात आल्या.

या मेळाव्यात प्रथम सत्रात संघटनात्मक रचना आणि कार्यप्रणालीवर संस्थापक अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले, तर सवर्णाच्या दहा टक्के आरक्षणावर प्रदेशाध्यक्ष उदय महा यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात उद्योजकता विकास या विषयावर गणेश उपाध्ये, संवाद कौशल्य प्रणवजी जोशी तसेच आयात निर्यात संधी या विषयावर सुरेश पारीख यांनी मार्गदर्शन केले. तसेच वधू-वर निवड समस्या आणि निवारण या विषयावर शंतनू चौधरी यांनी माहिती दिली. या मेळाव्याचे अध्यक्षीय भाषण डॉ. स्वाती शिरडकर यांनी केले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सुनील कादी, मिलिंद पिंपळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी केले. तर सूत्रसंचालन मधुरा दीक्षित, सुरेखा पारवेकर आणि वर्षा कुलकर्णी यांनी केले. द्वितीय सत्रामध्ये पद नियुक्तीचा कार्यक्रम घेण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन सुधीर नाईक, स्मिता दंडवते यांनी केले होते. या मेळाव्यासाठी डॉ. संतोष सवई, अंजली गोरे, किरण शर्मा, शरद कुलकर्णी, श्रीधर बक्षी आणि आकाश हरसुलकर यांनी परिश्रम घेतले. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव, नगरसेवक राजू वैद्य यांनी देखील या मेळाव्याला हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार चव्हाण अद्याप आशावादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. गेल्या सहा महिन्यांपासून मी निवडणुकीच्या तयारीला लागलो होतो. मात्र काँग्रेसने हेका सोडला नाही. यापूर्वी उमेदवार केवळ उभे राहत होते, मला मात्र लढायचे होते. ते शक्य झालं नाही. थोडी खंत असली तरी आम्ही आघाडीचा धर्म पाळू व काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराचे काम करू,'असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मात्र, मला वरिष्ठ पातळीवरून आदेश आला, तर यंत्रणा तयार असून मी शंभर टक्के लढणार आहे, असे सांगत त्यांनी अद्याप आशावादी असल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेसने आमदार सुभाष झांबड यांची शुक्रवारी रात्री उशिरा उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदार चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची व पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सर्व काही शेवटच्या क्षणी ठरते. ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याची काँग्रेसची परंपराच आहे. गेल्यावेळीही शेवटच्या दिवशी 'एबी' फॉर्म दिला होता. त्यामुळे उमेदवाराला नीट प्रचारही करता आला नाही; पराभवाचे हेही एक कारण होते. सध्या काँग्रेसमध्ये घरचे भांडण सुरू असून त्यांचे जिल्हाध्यक्ष मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळे झांबड यांच्या हातात एबीफॉर्म येत नाही तो पर्यंत काही खरे नाही. मलाही काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव अशोक चव्हाण तसेच अब्दुल सत्तार यांनी दिला होता, परंतु हा प्रस्ताव मी नाकारला, असे त्यांनी सांगितले.

गेल्या वीस वर्षांत या मतदारसंघात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. प्रगती, विकासापेक्षा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग औरंगाबाद शहरात नेहमीच होत आहे. मी हा प्रयोग रोखला असता, धार्मिक कार्ड खेळायचे आणि सत्ता मिळवायची, या प्रकारामुळे विकास खुंटला, अशी टीका त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर केली.

\B'समांतर', रस्त्याच्या कामात अंगारा वापरा'\B

जेथे अंगारा लावायला पाहिजे, तेथे ते लावत नाहीत. त्यांनी रस्त्याच्या कामात, ड्रेनेजच्या कामात तसेच 'समांतर'ला अंगारा लावला पाहिजे, असा टोला आमदार चव्हाण यांनी खासदार खैरे यांना लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images