Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तलवारीने सपासप वार करून राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या

$
0
0

बीड: परळी येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची अज्ञात इसमांनी तलवारीने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटे झालेल्या या हल्ल्याने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. काही अज्ञात इसमांनी गायकवाड यांच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. त्यामुळे ते जागीच ठार झाले. या हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अंतर्गत वादातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या विद्यमान नगरसेविका आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


abdul sattar: भाजपमध्ये जाणार नाही, पण शुक्रवारी निर्णय जाहीर करणार: सत्तार

$
0
0

औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली तरी भाजपमध्ये जाण्याचा माझा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या शुक्रवारी २९ मार्च रोजी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, असं काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आज स्पष्ट केलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आपले नेते आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र येत्या २९ मार्च रोजी मेळावा आयोजित केला असून कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढचा निर्णय घेतला जाईल, असं सत्तार म्हणाले. दरम्यान, आपल्या बंडानंतर काँग्रेसने औरंगाबादची ऑफर दिली होती, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागचा खुलासाही केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांसाठी मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठीच त्यांची भेट घेतली, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची आज नगरला जाऊन भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचं तिकीट हवं होतं. पण तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनाम दिला होता. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Prakash Ambedkar: काँग्रेसनेही घटना बदलण्याचा प्रयत्न केला, आंबेडकरांचा आरोप

$
0
0

उस्मानाबाद: भाजपच्या आधी काँग्रेसनेही घटना बदलण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी हा दावा केला आहे.

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने एमआयएमशी युती करून संविधानाचा खून केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी हा खळबळजनक आरोप केला. 'ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आम्हाला संसदीय लोकशाही नकोय. आम्हाला अध्यक्षीय लोकशाही आणायची आहे, असं म्हटलं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विचारूनच हे वक्तव्य केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे घटना कुणाला बदलायची होती, हे स्पष्ट होतं, 'असं सांगतानाच 'इतरांची मेमरी शॉर्ट आहे, पण माझी मेमरी लाँग आहे,' असा टोलाही आंबेडकारांनी शिंदे यांना लगावला.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि दिवंगत पँथर नेते नामदेव ढसाळ, राजा ढाले यांची भाषा एकच असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही आमचं संरक्षण करू, पोलिसांनीमध्ये येऊ नये, असं ढाले-ढसाळही म्हणाले होते. पोटतिडकीतून त्यांनी हे विधान केलं होतं. दलित समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारातून त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. मुस्लिमांवर अन्याय होत असल्याने ओवेसीही तेच वक्तव्य करत आहेत. पण ढाले-ढसाळ बौद्ध असल्याने ते हिंदू डेफिनेशनमध्ये येतात म्हणून त्यांना एक मापदंड आणि ओवेसी मुस्लिम असल्याने त्यांना दुसरा मापदंड लावला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ओवेसींच्या भाषेवर आक्षेप घेतला जातो, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाषेवर आक्षेप का घेतला जात नाही? संघावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवालही त्यांनी केला.

सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे बुजगावणे

दुसऱ्याच्या जीवावर जगणारे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे बुजगावणे आहेत, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली. सुशीलकुमार शिंदेंना आम्ही दलितांचा नेता मानत नाही. ते जर दलितांचे नेते असतील तर त्यांनी चर्मकार, ढोर, मातंग आणि बौद्धांसाठी किती मोर्चे काढले? त्यांचे किती प्रश्न धसास लावले आणि केंद्रीय गृहमंत्री असताना बीएसएफच्या लेदरचं किती टक्के काम चर्मकार समाजाला दिलं? याची माहिती द्यावी, असं आव्हानच त्यांनी शिंदे यांना दिलं.

त्यांच्या उमेदवारांची जात सांगणार

आम्ही आमच्या उमदेवारांची जात जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपनेही त्यांच्या उमेदवारांची जात सांगावी. अन्यथा आम्ही त्यांच्या उमेदवारांच्या जाती सांगू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रश्नपत्रिकाची पाकिटे वेळेपूर्वी फोडली

$
0
0

एमपीएससी परीक्षेवेळी अंबडमधील प्रकार

म. टा. प्रतिनिधी, जालना
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये, वेळ सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिकांची पाकिटे फोडण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याविषयी विचारणा केली असताना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली असून, या प्ररणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आणि सहायक अधिकारी या सगळ्या पदांसाठी रविवारी अंबड येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेत परीक्षा पार पडली. सकाळी १०.३० वाजता सर्व परीक्षार्थी मत्स्योदरी महाविद्यालयाच्या संबंधित वर्गात उपस्थित होते. प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका वर्गात सीलबंद पाकीट आणून संपूर्ण परीक्षार्थीना त्याचे सील दाखवून त्यांची खात्री पटल्यास परीक्षार्थींच्या दोन प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते सील फोडण्यात यावेत, असा नियम आहे. मात्र, या प्रश्नपत्रिका वर्गात आणण्यापूर्वीच सील फोडलेल्या अवस्थेत होत्या. परीक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली आणि नंतर दमदाटी केली. त्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली असता, त्यांनीही अरेरावीची भाषा वापरली, असा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. परीक्षेच्या वेळेत वर्गात बायोमेट्रिक उपस्थिती घेण्याचे काम सुरू होते, अशीही परीक्षार्थ्यांनी तक्रार केली. या वर्गांतील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता सगळा गोंधळ उजेडात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रश्नपत्रिका फुटलेल्या अवस्थेत वर्गात आणल्यावर सकाळी ११ वाजून २ मिनिटे झाली. त्यानंतर दोन परीक्षार्थ्यांच्या दमदाटी करून सह्या घेण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात संबंधित परीक्षार्थ्यांनी केली.


एमपीएससीच्या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी बसत असून, त्यांच्याकडून सर्वस्व पणाला लावून अभ्यास करण्यात येतो. त्यामुळे, परीक्षार्थींच्या भविष्यासोबत खेळण्याचा हा प्रकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
- कृष्णा सवने, भाऊसाहेब कुटे,
परीक्षार्थी

घडलेल्या प्रकारासंदर्भात मत्स्योदरी शिक्षण संस्थेचा कोणताही संबंध नाही. हे सर्व काम जिल्हा प्रशासनाने केले आहे.
- डॉ. बी. आर. गायकवाड,
प्रशासकीय अधिकारी, मत्स्योदरी शिक्षण संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIMचे आमदार जलील औरंगाबादमधून लढणार

$
0
0

म.टा. प्रतिनिधी । औरंगाबाद

एआयएमआयएम पक्षाकडून औरंगाबाद लोकसभेत उमेदवार देण्याचा निर्णय अखेर पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीर केला. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या वतीने आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा हैदराबाद येथील पक्ष कार्यालयात रात्री उशिरा केली.

गेल्या काही दिवसांपासून एमआयएम पक्षाकडून आमदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करणार किंवा नाही याबाबत चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी दारूस सलाम येथे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमधील एमआयएम नगरसेवक, आमदार तसेच पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ओवेसी यांनी नगरसेवक तथा पदाधिकारी यांच्यासोबत औरंगाबाद लोकसभेबाबत माहिती घेतली. निवडणूक जिकंण्यासाठी कशी रणनिती ठरविण्यात आली आहे, याचीही माहिती खासदार ओवेसी यांनी घेतली. ही बैठक साधारणत: एक तास चालली. या बैठकीत जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील २२ शहरांत भीषण पाणीटंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीचे वारे तापत असतानाच मराठवाड्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. चार जिल्ह्यांतील गावांना उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. आता मार्च महिन्यांत गावांसोबत शहरांनाही पाणीटंचाईने कवेत घेतले आहे. मराठवाड्यातील ५० नगर पालिका आणि २५ नगर पंचायतींपैकी २२ शहरांमध्ये भीषण पाणीटंचाई, तर २१ शहरांत तीव्र पाणीटंचाई असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाला मिळाला आहे. मराठवाड्यातील चार महापालिकांची स्थितीही फार वेगळी नाही.

शहरांसाठी पाणीपुरवठा योजना असताना प्रकल्पांमध्ये पाणीच नसल्याचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील अनेक शहरांना दहा ते बारा दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भीषण टंचाई असलेल्या २२ शहरांना पाणीपुवठा करणाऱ्या स्त्रोतात मार्च अखेरपर्यंतच पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, सिल्लोड, वैजापूर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर व घनसावंगी, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड व पालम, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, बीड जिल्ह्यातील बीड शहर, गेवराई, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार, लातूर जिल्ह्यातील औसा, देवणी, जळकोट, चाकूर व रेणापूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा शहराचा समावेश आहे. यापैकी अनेक शहरांत दहा ते पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा साठा शून्यावर आला आहे, मृतसाठ्यात मुबलक पाणी असले तरी केवळ महापालिकेच्या ढिसाळपणामुळे शहराला सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. या शिवाय विभागातील ३२ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांत जून व जुलैपर्यंतचा पाणीसाठा असला तरी तेथे सौम्य पाणीटंचाई आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर जालना जिल्ह्यातील जालना शहर, अंबड, परतूर व मंठा, परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत व पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी वैजिनाथ, माजलगाव, केज, व किल्लेधारूर, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा व शिरूर अनंतपाळ, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, मुरूम, भूम, परंडा, वाशी व नळदुर्ग या शहरांचा समावेश आहे.

पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बहुतांश शहरांत सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जूनपर्यंत उपाययोजना करण्यासाठी काही नगर पालिकांनी टँकर, विहीर अधिग्रहण, विंधन विहीर तसेच प्रकल्पात चर खोदण्याचा प्रस्ताव दिला आहे. एकूणच मराठवाड्यातील ७९ शहरांपैकी बहुतांश शहरी भागांत पाणीटंचाई असून नागरिकांना पिण्याचे पाणी खरेदी करावे लागत आहे.

\Bमहिनानंतर २१ शहरांत बिकट स्थिती \B

तीव्र पाणीटंचाई असलेल्या २१ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमध्ये एप्रिल अखेरपर्यंतचा पाणीसाठा आहे. त्यानंतर स्थिती बिकट होऊ शकते. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री व सोयगाव, पाथरी, सोनपेठ, नांदेड जिल्ह्यातील कंधार, कुंडलवाडी, देगलूर, धर्माबाद, बिलोली, लोहा, उमरी, हदगाव, भोकर, मुखेड, मुदखेड, अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, नायगाव, तर लातूर जिल्ह्यातील उदगीर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब या शहरांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नॅक’ मूल्यांकनात देखाव्याची गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनात पहिल्या दिवशी समितीने शिक्षकेतर कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाची बलस्थाने आणि उणिवा जाणून घेतानाच अपेक्षांवर चर्चासुद्धा केली. शैक्षणिक कामगिरीवर चर्चा करण्यावर भर देताना समितीच्या सदस्यांनी बडेजावाकडे पूर्णत: दुर्लक्ष केले तर, समितीसमोर उत्तम कामगिरीचा 'देखावा' उभा करताना काही विभागांची दमछाक झाली.

विद्यापीठाच्या 'नॅक' मूल्यांकनाची प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली. ही प्रक्रिया २५ ते २७ मार्चदरम्यान होणार आहे. या समितीत एकूण सहा सदस्यांचा समावेश आहे. राजस्थान येथील बनस्थली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्य शास्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सेंट्रल कॉलेज बेंगळुरू येथील माजी प्रोफेसर डॉ. रामचंद्र स्वामी, हरियाणा येथील कुरूक्षेत्र विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. मंजुळा चौधरी, मिझोराम विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. श्रीनिवास पथी, बनारस हिंदू विद्यापीठाचे डॉ. वशिष्ठ त्रिपाठी आणि अमृतसर येथील गुरू नानकदेव विद्यापीठाच्या डॉ. गुरुप्रित कौर या सदस्यांचा समावेश आहे. पहिल्या सत्रात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी समिती सदस्यांसमोर विद्यापीठाच्या कामगिरीचे सादरीकरण केले. त्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह परीक्षा संचालक, अधिष्ठाता, विभागप्रमुख यांच्याशी महात्मा फुले सभागृहात 'नॅक' समितीने संवाद साधला. विद्यापीठाची बलस्थाने, परीक्षा पद्धती, विद्यार्थ्यांना रोजगार देण्याचे प्रमाण या मुद्द्यांवर समितीच्या सदस्यांनी चर्चा केली. त्यानंतर कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

दुपारच्या सत्रात समितीच्या सदस्यांनी प्राणीशास्त्र विभाग, पत्रकारिता विभाग, विधि विभाग, ग्रंथालयशास्त्र, भौतिकशास्त्र विभाग आदी विभागांना भेट दिली. संशोधक विद्यार्थ्यांशीही संवाद साधण्यात आला. तुम्हाला या विद्यापीठातच संशोधन का करावेसे वाटते, संशोधनासाठी पुरेशा सुविधा आहेत, अशी विचारणा समितीच्या सदस्यांनी केली. यावर विभागातच ग्रंथालय असावे, स्वतंत्र संगणक कक्ष असावा, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नाट्यगृहात सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली. समितीच्या सदस्यांची बडदास्त ठेवताना विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती.

दरम्यान, 'नॅक' समितीच्या सदस्यांच्या स्वागतासाठी विद्यापीठ कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. शिवाय, स्वागत फलकांची गर्दी वाढल्यामुळे हा देखावा चांगलाच चर्चेत आहे.

\Bहा झगमगाट कशासाठी?\B

'नॅक' मूल्यांकनासाठी विद्यापीठ परिसर सजवण्यात आला आहे. वाय कॉर्नर परिसर, मुख्य प्रशासकीय इमारतीत रेड कार्पेट अंथरले आहे मात्र, या झगमगाटाबद्दल समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 'थाटमाट पाहण्यासाठी आलो नाही. तुमची शैक्षणिक कामगिरी दाखवा,' असे एका सदस्याने स्पष्ट सांगितले; तसेच स्वागतावेळी सदस्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

\Bकाही ठिकाणी बनवाबनवी\B

'नॅक'च्या धास्तीमुळे काही वर्षांपासून बंद असलेल्या प्रयोगशाळा, ग्रंथालये, स्टुडिओ, अभ्यास कक्ष चक्क उघडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. वृत्तपत्रविद्या विभागातील महागडी व सुसज्ज संगणक प्रयोगशाळासुद्धा काही महिन्यांनी उघडली गेली. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करार असलेली कंपनी दर ११ महिन्यांनी बदलता का, असा प्रश्न समितीच्या सदस्यांनी विचारला. त्यावर प्रत्येकवेळी कंपनी बदलल्याचे कुलसचिव डॉ. पांडे यांनी सांगितले. प्रत्यक्षात २०१२पासून एकाच कंपनीशी विद्यापीठ करार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पालखी सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्री संत एकनाथ महाराज षष्ठी सोहळ्यानिमित्ताने औरंगपुरा येथील श्री संस्थान एकनाथ मंदिरात २० मार्चपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. सदानंद देवे यांनी दिली.

औरंगपुरा येथील श्री संस्थान एकनाथ मंदिरात दरवर्षी एकनाथ षष्ठी सोहळा उत्साहात साजरा केला जातो. बुधवारपासून या सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. पहाटे ४ वाजता काकडा आरती, सकाळी ६ वाजता विष्णुसहस्त्रनाम, सकाळी ७ ते ११ पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर गाथाभजन, दुपारी १२ वाजता विविध महिला भजनी मंडळांची भजने, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ व रात्री ७ वाजता हरिकीर्तन आणि रात्री १० वाजता जागर असे दैनंदिन कार्यक्रमाचे या निमित्ताने आयोजन केले जात असून आज मुख्य पालखी सोहळा होणार आहे.

काकडा आरती व भजन झाल्यानंतर सकाळी सात वाजता श्री संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होईल. कुंभारवाडा, मछली खडक, सराफा, शहागंज, राजाबाजार, किराणा चावडी, पानदरीबा, सुपारी हनुमान, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे काढण्यात येणाऱ्या पालखीची सांगता मंदिर परिसरात होणार आहे. दुपारी बारा वाजता पादुका अभिषेक महापूजा व त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल. रात्री सात वाजता हभप रामराव महाराज हेडगे यांचे कीर्तन होईल, अशी माहिती देवे यांनी दिली. तर २७ मार्चला हभप नाना महाराज कदम यांचे कीर्तन होणार असून २८ मार्चला दुपारी ३ वाजता हभप नवनाथ महाराज म्हस्के यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा आयकर अधिकाऱ्यांची नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून याशिवाय आयकर विभागातील दहा अधिकाऱ्यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. हे अधिकारी विधानसभा मतदार संघनिहाय उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणे आणि त्यांनी सादर केलेली माहिती पडताळून पाहणार आहेत. उमेदवार तसेच पक्षाने दिलेल्या खर्चात तफावत आढळल्यास थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करतील. तसेच निवडणूक खर्च कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या माहितीची देखील ते उलट तपासणी करतील. आयकर विभागाच्या दहा अधिकाऱ्यांसाठी लवकरच निवडणुकीबाबत प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासऱ्याचा खून, जावयाला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सासऱ्याचा चाकुने भोसकून खून करणारा जावई शब्बीर उर्फ पांगळ्या लक्ष्मण उर्फ लालचंद भोसले याला सक्तमजुरीसह जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी (२५ मार्च) ठोठावली.

या प्रकरणी मृत हस्तीमल उत्तम चव्हाण (७०, रा. करमाड झोपडपट्टी) यांची पत्नी पुष्पाबाई हस्तीमल चव्हाण (६०) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची मुलगी लोटाबाई हिचे लग्न आरोपी शब्बीर उर्फ पांगळ्या लक्ष्मण उर्फ लालचंद भोसले (३५, रा. लासूर स्टेशन, ह. मु. करमाड झोपडपट्टी) याच्याशी झाले होते व त्यांना तीन मुले आहेत. घटनेपूर्वी दोन महिन्यांपासून लोटाबाई ही पती शब्बीर याच्यासह फिर्यादीच्या घरी राहण्यासाठी आली होती. १७ मे २०१७ रोजी सकाळी फिर्यादी बाहेर गेली होती. त्यावेळी फिर्यादीच्या शेजारी राहणारा सुरेश खिल्लारे व मुलगा अन्वर हे दुचाकीवर आले आणि शब्बीरने हस्तीमल यांना चाकुने भोसकून गंभीर जखमी केल्याचे दोघांनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने घटनास्थळी धाव घेतली असता, हस्तीमल हे जखमी अवस्थेत खाली पडल्याचे दिसून आले. त्याबाबत फिर्यादीने लोटाबाईला विचारले असता, 'शब्बीर मला शिविगाळ व मारहाण करीत असताना पिता हस्तीमल यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, शब्बीरने त्यांना चाकुने भोसकून गंभीर जखमी केले' असे लोटाबाईने फिर्यादीला सांगितले. त्यानंतर हस्तीमल यांना करमाडच्या सरकारी रुग्णालयात व तिथून घाटीत दाखल केले असता, उपचार सुरू असताना हस्तीमल यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात लोटाबाईसह दोन साक्षीदार फितूर झाले; परंतु शेजारी राहणारा सुरेश खिल्लारे व फिर्यादीची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष पुराव्यांवरुन कोर्टाने शब्बीरला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ कलमान्वये सक्तमजुरीसह जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. अॅड. देशपांडे यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

\Bसहा महिन्यांनी शब्बीरला अटक

\B१७ मे २०१७ रोजी चाकुने भोसकून खून केल्यानंतर शब्बीर तिथून पळून गेला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजेच २९ नोव्हेंबर २०१७ रोजी शब्बीरला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन गटांत हाणामारी; चौघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन गटांत शनिवारी (२३ मार्च) रात्री झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणात फैय्याज बशीर पठाण, फिरोजखान जहूर खान पठाण, शेख अमजद उर्फ अज्जू शेख खैरू व शेख मोहसीन शेख बागवान यांना रविवारी अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, चौघांना शुक्रवारपर्यंत (२९ मार्च) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

प्रकरणात दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यावरुन दोन्ही गटांवर जिवे मारण्याचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अज्जू लाल याला मजुरीचे पैसे मागितल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करुन घराचा पडदा जाळला, असे रियाज शेख रहिम याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर, जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल चाबुकस्वार व त्याच्या साथीदारांनी तलवार, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे शेख मुन्शी शेख भिक्कन पटेल याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणात फैय्याज बशीर पठाण (३०, रा. बायजीपुरा), फिरोजखान जहुर खान पठाण (२२, रा. हुसेन कॉलनी), शेख अमजद उर्फ अज्जू शेख खैरू (२७, रा. हुसेन कॉलनी) व शेख मोहसीन शेख बागवान (२३, रा. जवाहर कॉलनी) यांना अटक करुन सोमवारी कोर्टात हजर केले असता कोर्टाने चौघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकरणात सहाय्यक सराकरी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी तापले @ ४१.४

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाचा कडाका सुरू झाला असून परभणी शहरात सोमवारी (२५ मार्च) ४१.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. औरंगाबाद शहरातही तापमान वाढत असून शहराचे तापमान ३८.४ अंशावर पोचले.

काही दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने सकाळी नऊ पासूनच उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. वातावरणातील उकाडा वाढला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून परभणी, तसेच औरंगाबाद शहराचे तापमान ३५ अंशापेक्षा अधिक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत परभणी शहरात तापमान ३९ ते ४१, तर औरंगाबादमध्ये ३७ ते ३८ अंश सेल्सियस दरम्यान तापमान नोंदवले जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग मतदार नोंदणीचे प्रशासनासमोर आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा प्रशासनकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भात जोरदार नियोजन सुरू आहे. परंतु, जनगणनेप्रमाणे दिव्यांग मतदारांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.

जिल्हा प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यात २० हजार दिव्यांग मतदार असून त्यात वाढ होत आहे. मात्र २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात २० वर्षांवरील दिव्यांगांची संख्या सुमारे ६५ हजार आहे. दिव्यांगांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाल्याचे ग्रहित धरले तरी संख्येत मोठी तफावत आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मतदार नसलेल्या दिव्यांगांची मतदार म्हणून नोंद घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. यंदा दिव्यांग मतदारांसाठी विविध सुविधा देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी 'क्यू जंपिंग' ही स्पेशल रांग लावण्यात येणार आहे.

\Bएनएसएस, स्काउट गाइडची मदत\B

मतदान केंद्रांबाहेर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा स्वयंसेविका विशेष काळजी घेणार आहेत. याशिवाय मतदारांना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), स्काउट गाइडचे विद्यार्थी मदत करणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिव्यांगांना मतदानावेळी द्यावयाच्या सुविधांचा आढावा त्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक, तिघे पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. रविवारी सायंकाळी पैठण पाचोड रोडवरील कुतूबखेडा फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बीड पोलिसांना मोक्काच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या कुख्यात दरोडखोर राजेश काळेचा समावेश आहे.

ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक रविवारी सायंकाळी पैठण भागात गस्त घालीत होते. यावेळी कुतूबखेडा फाटा येथे काही संशयित व्यक्ती दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले तर तिघे पसार होण्यामध्ये यशस्वी झाले. पकडण्यात आलेल्या आरोपीमध्य कुख्यात दरोडेखोर राजेश उर्फ राजा उर्फ हिंदीवाला दिलीप उर्फ ठकसेन भोसले उर्फ मुकेश दिलीप पवार उर्फ राजेश उघड्या उर्फ हिंदी पवार उर्फ राजू काळे (वय २७ रा. गंगापूर) तसेच नितीन मिस्त्रीलाल उर्फ मिस्त्र्या चव्हाण (वय २३, रा. गेवराई) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय भगतसिंग दुलत, गणेश जाधव, रतन वारे, संजय काळे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, गणेश गांगवे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, प्रमोद साळवे, राहूल पगारे आणि लटपटे यांनी केली.

दोन वर्षापासून काळे वाँटेड

पकडण्यात आलेला आरोपी राजेश काळे उर्फ राजा याच्यावर गेवराई जि. बीड येथे मोक्का कायदानुसार गुन्हा दाखल आहे. यापूर्वी देखील त्याच्यावर चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनासह दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. बीड पोलिस गेल्या दोन वर्षापासून काळेचा शोध घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणघातक शस्त्र बाळगणारा चिकलठाणा पोलिसांकडून गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राणघातक शस्त्रे घरात बाळगणाऱ्या आरोपीला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळी गारखेडा क्रमांक एक, चित्ते पिंपळगावजवळ ही कारवाई करण्यात आली. सचिन सुदाम सरोदे (वय ३२, रा. गारखेडा) असे आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून दोन तलवारी आणि लोखंडी कत्ती जप्त करण्यात आली.

ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. चित्ते पिंपळगाव जवळील गारखेडा येथे सचिन सरोदे या तरुणाच्या घरी प्राणघातक शस्त्रे लपवून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना गस्ती दरम्यान मिळाली होती. या माहितीआधारे पथकाने सचिनच्या घरावर छापा टाकला. यावेळी छाप्यामध्ये त्यांना दोन तलवारी आणि एक लोखंडी धारदार कत्ती आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली. आरोपी सचिनविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, जमादार थोटे, राठोड, इंगळे, नरवडे, बागल, ईजुलकंठे, सुराशे, राठोड आणि घुगे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद पालिकेची अर्धवट कामे युतीच्या मुळावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला औरंगाबाद शहरातून ग्रामीण भागाच्या तुलनेत नेहमीच कमी मते मिळाली आहेत. त्यातच यावेळी शहरातील अनेक अर्धवट कामांचा फटका युतीला सहन करावा लागेल, असे बोलले जात आहे. त्याचे खापर महापालिकेच्या कारभारावर फुटण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघ औरंगाबाद शहराशी संबंधित आहेत. या मतदारसंघांचा सेवा-सुविधांच्या दृष्टीने महापालिकेशी संपर्क येतो. महापालिकेने काही प्रमुख कामे अर्धवट सोडली आहेत. त्यामुळे पैसा, तर खर्च झाला पण केलेल्या कामांचा उपयोग झाला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या स्थितीत आहे. पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने समांतर जलवाहिनीची योजना आखली होती. २००६ पासून समांतर जलवाहिनी योजनेवर काम सुरू आहे, पण योजना पूर्ण झालेली नाही. या योजनेचे काम करण्यातून संबंधित कंपनीने आता माघार घेतली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होणारी की नाही, अशी अवस्था आहे. सध्या संपूर्ण शहराला चौथ्या दिवशी पाणी पुरवठा केला जातो. पाणी टंचाईची भीषणता वाढली, तर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढेल, असे मानले जात आहे. समांतर जलवाहिनीसोबतच भूमिगत गटार योजनेचे काम देखील अर्धवट राहिले आहे. सुमारे ७५ किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकाणे शिल्लक असताना योजनेचे काम कंत्राटदाराकडून काढून घेवून त्याला कार्यमुक्त करण्याचा घाट घातला जात आहे. ७५ किलोमीटरची ड्रेनेज लाइन टाकण्यासोबतच योजनेची अनेक कामे अपूर्ण आहेत. परिणामी, पावसाळ्यात अनेक वसाहतींमध्ये धोकादायक स्थिती निर्माण होते.

\Bमतपेटीतून रोष व्यक्त होण्याची शक्यता \B

शहरातील रस्त्यांची कामे देखील मंदावली आहेत. शासनाने शंभर कोटी रुपयांचा निधी देऊनही रस्त्यांच्या कामांनी वेग घेतलेला नाही. कचऱ्याचा प्रश्न नागरिकांना त्रस्त करत आहे. कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरच्या सव्वा वर्षानंतरही नागरिकांना कचराकोंडीला तोंड द्यावे लागत आहे. कोणतेही कचरा प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यामुळे प्रक्रिया केंद्रांवर कचऱ्याचे डोंगर दिसत आहेत. या शिवाय शहरातील दिवाबत्तीचा प्रश्न देखील कळीचा मुद्दा बनला आहे. नागरिकांशी निगडित प्रश्न पूर्णपणे सोडवण्यात महापालिकाला अपयशी ठरल्यामुळे मतदारांत नाराजी आहे. ही नाराजी मतपेटीतून व्यक्त होईल, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बायबापवर पाडापाडीला वेग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा एकदा बीड बायपास रोडच्या सर्व्हिस रोडसाठी बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू केली. रेणुकामाता मंदिराच्या रस्त्यावरील मार्बलच्या दुकानांचा वाढीव भाग पाडण्यात आला. या भागातील तीन अतिक्रमणे पाडण्यात आली.

सर्व्हिस रोडवरील अतिक्रमित व अतिरिक्त बांधकामे पाडण्याची कारवाई महापालिकेने ११ मार्चपासून सुरू केली आहे. आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त बांधकामे पाडण्यात आली आहेत. सोमवारी पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली. रेणुका माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पारस मार्बल, सुपर मार्बल अँड ग्रेनाइड, श्रीनिवास मार्बल या तिन्ही दुकानांची जास्तीची बांधकामे पाडण्यात आली. प्लॉटिंगला करण्यात आलेले तारेचे कुंपण देखील काढून टाकण्यात आले. एमआयटी कॉलेजजवळ असलेल्या एका शोरुमचे जास्तीचे बांधकाम पाडण्यात आले. कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या रस्त्यावरील दोन मोठ्या इमारतींचा समोरचा भाग पाडण्यात आला.

विनायक हिवाळे यांची सहा मजली इमारत पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सहाव्या मजल्यावरील संरक्षक भींत पाडण्याचे काम केले जात आहे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील अंतर्गत भिंती देखील पाडल्या जात आहेत. यासाठी २५ मजुरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल टॉवर काढणे सुरू

सिल्कमिल कॉलनी येथे कारवाई सुरू होताच अनेक मालमत्ताधारकांनी बांधकामे स्वत:हून काढून घेतली आहेत. याच भागातील पटेल यांच्या दोन इमारतींवर मोबाइल टॉवर्स उभारण्यात आले आहेत, टॉवर्स काढून घेण्याबद्दल संबंधित कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यावर कंपनीने टॉवर्स काढण्याचे काम सुरू केले. टॉवर्स काढल्यावर इमारत पाडण्याची कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी केल्यानंतर पुन्हा ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आपण हा गुन्हा का केला, आपणावरील आरोप मान्य आहे का,' असे १४ प्रश्न प्रश्नपत्रिकेतील सोडवले की, शिक्षा ठरलेलीच. हे प्रश्न आहेत, दहावी, बारावीत गैरप्रकार करणाऱ्या परीक्षार्थींसाठीच्या प्रश्नावलीत. या परीक्षार्थींना सोमवारपासून विभागीय मंडळात येवून 'परीक्षा' द्यावी लागते आहे. बहुतांशी कॉपी बहाद्दरांची उत्तरेही तेवढिच मजेशीरच असतात.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीची परीक्षा संपली. यंदा राज्यात औरंगाबाद विभाग कॉपी प्रकरणांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत भरारी पथकांनी कारवाई केलेले कॉपी बहाद्दर असतील किंवा उत्तरपत्रिकेत खाडाखोड, इतर मजकूर त्यात गीत, संदेश असे सगळे गैरप्रकारात मोडते. अशा परीक्षार्थींची सुनावणी सोमवारपासून विभागीय मंडळाच्या कार्यालयात सुरू झाली. सुनावणीदरम्यान विद्यार्थ्यांना मंडळाने नेमलेल्या समितीसमोर प्रश्नावली सोडवून द्यावी लागते. समितीत मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी, विषयतज्ज्ञांचा समावेश असतो. प्रश्नावलीतील प्रत्येक प्रश्न हा गैरप्रकाराची माहिती जाणून घेण्यासाठीचा असतो. परीक्षार्थी या प्रकरणात किती दोषी हे यातून जाणून घेतल्या जाते. त्यासाठी त्याला १४ प्रश्न लिहून सोडवावे लागतात. त्यात अनेकांची भंबेरी उडते. परीक्षेनंतर ही पुन्हा 'परीक्षा' ठरते. पाल्यासह पालकही उपस्थित होते. पहिल्या दिवशी १३४ विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. 'संबंधित कॉपीप्रकरणी माझा संबंध नाही. माझ्या मागच्याने कॉपी टाकली, पहा मी, कॉपी लिहिली का,' अशी उत्तरेच समितीला अनेकांकडून मिळाली.

\B

असे होते प्रश्न...\B

प्रश्नावलीतील प्रश्नांची चर्चा आहे. प्रश्नांमध्ये आपल्याला कारणे दाखवा नोटीस केंव्हा मिळाली, विषयाच्या परीक्षेच्या दिवशी पेपर लिहीत असताना परीक्षागृहात आपणाजवळ कॉपीचे मटेरियल बाळगल्याचे आढळून आले हे आपणास मान्य आहे काय, आपणास कोणाची उलट तपासणी करावयाची आहे काय, आपणास आणखी काही सांगायचे असल्यास ते नमूद करावे, परीक्षा केंद्रावर कॉपी मटेरियल आपण परीक्षागृहात जवळ बाळगले असल्याचे कबूल केले आहे काय, नक्कल पकडणाऱ्या अधिकाऱ्याच्या अहवालाबाबत काय म्हणावयाचे आहे, आपल्यावरील आरोप मान्य नसल्यास त्याबाबत आपणास आणखी काही सांगावयाचे आहे काय, आदी प्रश्न सोडवावे लागतात.

विभागात कॉपी प्रकरणी कारवाई..५१३

सोमवारी उपस्थिती...................१३४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचे दिग्गजांचा बसपच्या संपर्कात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उत्तर प्रदेशाप्रमाणे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रातही आघाडी केली असून समाजवादी पक्षा चार, तर उर्वरित ४४ जागांवर बसप निवडणूक लढवणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक दिग्गज बसपच्या संपर्कात असल्याची माहिती बसपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

समाजवादी पक्ष नांदेड, बीड, भिवंडी आणि दक्षिण मुंबई या चार मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. बीड लोकसभा मतदार संघातून येत्या २४ तासांत उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. नांदेड, भिवंडी आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाचे उमेदवार लवकर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती समाजवादी पक्षाचे सय्यद मोईन यांनी दिली.

बहुजन समाज पक्षाकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी अनेकांनी दाखविली आहे. यापैकी काही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. येत्या ३० मार्चपर्यंत सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल, अशी माहिती बसपचे प्रदेश कोषाध्यक्ष नदीम अख्तर चौधरी यांनी 'मटा'ला दिली.

………

\Bमायावतींची नागपुरात चार एप्रिलला सभा \B

राज्यातील उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी बसप अध्यक्ष मायावती यांची नागपूर येथए चार एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. गरज पडल्यास त्यांच्या सभांचे महाराष्ट्रात इतरत्र आयोजन करण्यात येणार आहे.

……

\Bवंचित आघाडीचा परिणाम शून्य \B

या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा कोणत्याही परिणाम समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या मतदारांवर होणार नाही. समाजवादी पक्ष सोबत असल्याने बसपच्या उमेदवारांच्या विजयाची शक्यता वाढल्याचा दावा नदीम अख्तर चौधरी यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखानुदानाची पालिकेत लगबग

$
0
0

औरंगाबाद : लेखानुदान सादर करण्याची महापालिकेत लगबग सुरू झाली आहे. स्थायी समितीला शुक्रवारपर्यंत लेखानुदान सादर केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पालिका प्रशासनाला संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. त्यामुळे लेखानुदान सादर केले जाणार आहे. लेखानुदान तयार करण्यासाठी सोमवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या उपस्थितीत लेखा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; मंगळवारी लेखानुदान अंतिम केले जाईल. २५० ते ३०० कोटी रुपयापर्यंतचे लेखानुदान स्थायी समितीला सादर केले जाईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार, नगरसेवकांचे मानधन याशिवाय अत्यावश्यक खर्चाचा समावेश लेखानुदानात केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images