Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठात आज व्याख्यान

$
0
0

औरंगाबाद : एसएफआय आणि पर्यावरण विद्यार्थी संघर्ष मंच, विद्यमाने 'बदलते पर्यावरण आणि दुष्काळ आव्हाने व उपाय' या विषयावर शुक्रवारी (२९ मार्च) व्याख्यान - चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, राज्यशास्त्र विभागातील ज. रा. शिंदे सभागृहात दुपारी ३ वाजता हे व्याख्यान होणार आहे. मुंबई येथील पर्यावरणतज्ज्ञ शिरीष मेंढी हे प्रमुख व्याख्याते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठ पर्यावरण शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एन. एन. बंदेला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाच्या मुंडावळ्या आधी लोकशाहीच्या मुंडावळ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'आधी लगीन लोकसभेचं, मग आपलं' हा नवीन युगाचा नवीन संदेश घेऊन जालन्यात प्रहार संघटनेशी संबंधित एक नवरदेव कार्यकर्त्याने चक्क वऱ्हाड व मित्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप प्रदेशाध्यक्ष, विद्यामान खासदार रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना 'साले' अशी शिवी दिल्यामुळे निवडणूक लढवत असल्याचे नवरदेवाने स्पष्ट केले.

जालना तालुक्यातील धारकल्याण या गावातील सुदाम भाऊराव इंगोले यांचे उज्जैनपुरी (ता. बदनापूर) येथील रामदास भाऊराव काळे यांची मुलगी शीतल ऊर्फ भाग्यश्री काळे यांच्यासोबत गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजता लग्न पार पडले. मात्र, नवरदेव सुदाम इंगोले हे दुपारी नातेवाईक, मित्रांसोबत तयार होऊन उज्जैनपुरीकडे रवाना झाले. त्यानंतर तेथून नवरदेवाचे वाहन दुपारी दोनच्या सुमारास जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आली. मुंडावळ्या बांधलेल्या नवरदेवाने लोकसभा निवडणुकीत जालन्यातून निवडणूक लढवण्याचा उमेदवारी अर्ज घेऊन लगेच भरला. त्यांनी हा अर्ज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे दाखल केला.

या निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे हेच आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना 'साले' म्हणून शिवी दिल्यामुळे ही निवडणूक लढवत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर नवरदेवाचे वाहन उज्जैनपुरीकडे रवाना झाले. आता आज पासून लग्नात प्रचाराला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

\Bएक लाख मताधिक्याने विजयी होणार \B

'आपण प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहोत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण एक लाख मताधिक्य मिळवून विजयी होणार आहोत,' असा दावा सुदाम इंगोले यांनी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी,औरंगाबाद

मराठा आरक्षणामधून मेडिकल कॉलेजमध्ये मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू नये. यावर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रवेश नाकारण्यास स्पष्ट नकार दिला व याचिका फेटाळून लावली. या निर्णयाला याचिकाकर्त्यांने आव्हान दिले, तर आमचीही बाजू ऐकून घ्यावी म्हणून आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केली आहे.उदय गोविंदराव ढोपले यांनी याचिका केली होती. त्यांची याचिका फेटाळून लावली. विनोद पाटील यांची बाजू यतीन मोहनराव जगताप व अक्षय कपाडिया मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२ लाखांची दारु चोरीला, आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

३२ लाख १६ हजार रुपये किंमतीची दारु असलेला ट्रक घरा समोरून चोरी गेल्याचा बनाव करणाऱ्या ट्रक चालकासह ट्रक मालक व ट्रान्सपोर्टच्या मालकाला पोलिसांनी बुधवारी अटक केली. या तिघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एस. खांडबहाळे यांनी गुरुवारी दिले.

ट्रक चालक बाळकृष्ण शंकर इंगळे (२९), ट्रक मालक प्रमोद यादव चोरमारे (३३) व शिवनेरी ट्रान्सपोर्टचा मालक जगन्नाथ शंकर सोनवणे (२८, सर्व रा. बजाज नगर, एमआयडीसी वाळुज) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात नंदकिशोर कैसाल सिन्हा (४९, रा. त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी) यांनी तक्रार दिली. सिन्हा आधुनिक ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. २० जानेवारी रोजी सिन्हा यांच्या ट्रान्सपोर्टने एमआयडीसी वाळूज येथील शिवनेरी ट्रान्सपोर्टला युनायटेड स्पीरिट कंपनीतुन दारुचे बॉक्स कोल्हापूर घेऊन जाण्याचे सांगितले. त्यानुसार १८ जानेवारी रोजी शिवनेरी ट्रान्सपोर्टने चोरमारे याच्या मालकीचा ट्रक कंपनीत पाठविला. ट्रकवर चालक म्हणून बाळकृष्ण इंगळे होता. ट्रकमध्ये ३२ लाख १६ हजार ३५७ रुपये किंमतीचे २० प्रकारचे सुमारे ५५५ बॉक्स लोड केल्यानंतर रात्री ट्रक कोल्हापूरला जाण्यासाठी निघाला. मात्र १९ जानेवारी रोजी आरोपी शिवनेरी ट्रान्सपोर्टचा मालक सोनवणे याने आधुनिक ट्रान्सपोर्ट कंपनीत फोन करून सदरील ट्रक मालासहित चोरीला गेल्याचे सांगितले. त्यानुसार सिन्हा यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीने चौकशी केली. त्यानंतर एमाआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करून आरोपींना बुधवारी अटक केली. तर न्यायायलयाने या आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब, पक्षाच्याच तिकीटावर लढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'साहेब, तुम्ही लोकसभेची निवडणूक पक्षाच्या तिकीटावरच लढा,' असा कौल काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी दिला. अपक्ष निवडणूक लढण्याबाबत सत्तार समर्थकांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. यामुळे निवडणुकीत पक्षाच्या तिकीटावर उभे राहायचे किंवा नाही, याचा निर्णय समर्थकांनी आमदार सत्तार यांच्यावर सोडला आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी (२९ मार्च) समर्थकांचा आमखास मैदानावर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील सत्तार यांचे समर्थक उपस्थितीत होते. यावेळी रामकृष्ण बाबा पाटील यांनी विविध समाजाचे मतदार सत्तार यांच्या पाठिशी असल्याने त्यांना मदत करण्याचे जाहीर केले. समर्थकांसमोर बोलताना आमदार सत्तार यांनी 'एमआयएम' आणि त्या पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्यावर टिकास्त्र सोडले. 'एमआयएम'ने आधी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले, पण जिंकण्यासाठी नव्हे तर मला रोखण्यासाठी 'एमआयएम' निवडणूक लढत असल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस उमेदवार माझ्यासाठी जागा सोडण्याचे सांगत आहेत, पण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याने त्यांनी निवडणूक लढवावी असे आवाहन केले. 'गेल्या २५ वर्षांत खासदार चंद्रकांत खैरे यांना शहराचा पाणी, रस्त्याचे प्रश्न सोडवता आले नाहीत. खैरेंमुळे औरंगाबाद शहर ही कचऱ्याची राजधानी झाली. ते फक्त भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवतात, त्यांनी पाच मोठी विकासकामे दाखवावीत,' अशी टीका खासदार खैरे यांच्यावर केली.

\Bसत्तारांचे प्रश्न, समर्थकांचे उत्तर \B

आमदार सत्तार: लोकसभा निवडणूक लढवावी का?

समर्थक: (हात उंचावून) हो

आमदार सत्तार: पक्षाच्या तिकीटावर लढवावी का?

समर्थक: (हात उंचावून) हो

आमदार सत्तार: अपक्ष लढवावी का?

समर्थक: नाही

त्यावर आमदार सत्तार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

………

\Bआमदार जलील हे तर रणछोडदास \B

आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून 'एमआयएम' आणि आमदार इम्तियाज जलील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी हैदराबाद येथील 'रिमोट'बाबत मत व्यक्त केले. आमदार जलील हे रणछोडदास आहेत. कटकट गेटचा चिल्लर रस्ता करून विकास केल्याचा आव आणत आहेत. आगामी औरंगाबाद मध्य विधानसभा क्षेत्रातून आमदार जलील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या तंबीनंतर ‘पीएमसी’ला जाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर रस्त्यांच्या कामांसाठी नेमलेली पीएमसी आता 'रस्त्यावर' आली आहे. महापालिका आणि पीएमसीच्या अभियंत्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. एकमेकांवर कामे ढकलू नयेत. वेळेत काम पूर्ण करावे आणि ते करताना दर्जात तडजोड करू नका, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

औरंगाबादमधील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटींच्या विशेष निधीतून ३० रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यापैकी सहा रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या रस्त्यांच्या कामांची गती घेतली नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला तेव्हा रस्त्यांच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या श्रीखंडे असोसिएटस् या संस्थेची 'पीएमसी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे अभियंते व अधिकारी रस्त्यांची कामे पाहण्यासाठी उपलब्ध होत नाहीत, त्यांचे दुर्लक्ष आहे, असे लक्षात आले. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी आयुक्तांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना 'पीएमसी'ला दंड आकारण्याचे आदेश दिले. तरीही 'पीएमसी'च्या कामात सुधारणा झाली नाही तर, काळ्या यादीत टाका आणि पोलिसात गुन्हा देखील दाखल करा असे, त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते.

आयुक्तांच्या तंबीनंतर पीएमसी 'रस्त्यावर' आली आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. निपुण विनायक यांनी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. त्याबद्दल त्यांनी 'मटा' ला माहिती दिली. ते म्हणाले, 'रस्त्यांच्या कामाच्या पाहणीच्या वेळी महापालिकेचे अभियंते उपस्थित होतेच, पण त्याच बरोबर पीएमसीचे अभियंते देखील उपस्थित होते. सहा - सात अभियंते व अधिकारी 'पीएमसी'ने रस्त्यांच्या कामासाठी आता नियुक्त केले आहेत. प्रत्येक रस्त्याच्या कामाचे पंधरा दिवसांचे नियोजन करा, रस्त्यांच्या कामांचा प्राथमिक अहवाल द्या, असे 'पीएमसी'च्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे आयुक्त म्हणाले. रस्त्यांच्या कामात तडजोड केली जाणार नाही, 'पीएमसी'सह पालिकेच्या अभियंत्यांना स्पष्ट सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. 'पीएमसी' व पालिकेच्या अभियंत्यांनी परस्पर समन्वय ठेवावा, एकमेकांवर काम ढकलू नये, वेळकाढूपणा करू नये असे स्पष्ट आदेश दिल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

रस्त्यांची कामे पाहण्यासाठी दर सात दिवसांनी आपण फिल्डवर जाणार आहोत. रस्त्यांच्या कामाचे थर्डपार्टी इन्स्पेक्शन करण्याचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी मान्य केले आहे. पुढील आठवड्यात रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी सीईओपीचे पथक येणार आहे. त्याशिवाय पालिकेचे दक्षता पथक देखील कामावर देखरेख करणार आहे.

\B- डॉ. निपुण विनायक, आयुक्त, महापालिका

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतरसाठी ‘यूडी’ अनुकूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने समांतर जलवाहिनीसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाबद्दल राज्य शासनाचा नगरविकास विभाग (अर्बन डेव्हलपमेंट) अनुकूल आहे. पुढील आठवड्यात याबद्दल मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यात समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दल ठोस निर्णय होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसपीएमएल (सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमिटेड) या कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे समांतर जलवाहिनीबाबत नवीन प्रस्ताव सादर केला आहे. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी शासनाने दिलेल्या निधीतील सुमारे ३५० कोटी रुपये महापालिकेकडे जमा आहेत. या रक्कमेतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मान्यता द्या, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. समांतर जलवाहिनीसाठी उभारण्यात येणाऱ्या अन्य पायाभूत सुविधांसाठी ४०० कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी देखील शासनाने द्यावा, अशी विनंती प्रस्तावाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. औरंगाबाद शहराच्या विस्तारित भागात समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करायचा झाल्यास आणखी ४०० कोटींची तरतूद शासनाने करावी, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी हा एकत्रित प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी शासनाकडे पाठवला, परंतु शासनाकडून अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

यासंदर्भात 'मटा' प्रतिनिधीशी बोलताना डॉ. निपुण विनायक म्हणाले,'समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रस्तावाबद्दल त्या अनुकूल आहेत. पुढील आठवड्यात त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यावर अनेक बाबी स्पष्ट होतील आणि प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आदेश देखील मिळू शकतील.'

\Bउपाययोजना सुरू : आयुक्त\B

सध्या शहरात निर्माण झालेला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गळत्या शोधून त्या दुरुस्त करण्यावर भर दिला जात आहे. जलवाहिनीच्या गळत्या बंद झाल्यावर पाणीपुरवठ्यात बराच फरक पडेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारसंहितेत ३४ लाख ७५ हजारांची रोकड जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच भरारी पथकाद्वारे बेहिशेबी पैशांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसांत या पथकांनी चार प्रकरणांमध्ये ३४ लाख ७५ हजार ७०० रुपयांची रोकड, तर ९ हजार ८०५ रुपयांचा दारू साठा जप्‍त केला.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण मतदारसंघात विधानसभानिहाय भरारी पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बेहिशेबी रोख रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यासाठी तीन पथक, तर संशयित वाहनांच्या चित्रीकरणासाठी व्हिडिओ चित्रकीकरणाचे पथक तैनात करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी सिल्लोडमध्ये एका कारमधून २८ लाख ७१ हजार १०० रुपयांची रोकड जप्त केली. याशिवाय वैजापूर तालुक्यात २० मार्च रोजी एका वाहनातून एक लाख रुपये, त्याच दिवशी गंगापूर तालुक्यात एका वाहनातून एक लाख ५४ हजार ६०० रुपये पकडले, तर २३ मार्च रोजी पुन्हा गंगापूर तालुक्यात कारमधून साडेतीन लाख रुपये जप्त करण्यात आले. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये ९ हजार ८०५ रुपयांचा दारू साठाही जप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच भरारी पथकाने केलेली ही कारवाई योग्य आहे. आचारसंहिता लागू होताच अंमलबजावणीसाठी पथके सक्रिय होतात. जप्त करण्यात आलेल्या पैशांचा हिशोबाबातचा खुलासा संबंधितांना करावा लागणार आहे. ही कारवाई नियमांनुसारच आहे.

-नीलेश श्रींगी, निवडणूक उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडून शहराची जबाबदारी तनवाणींकडे

$
0
0

औरंगाबाद : शिवसेना भाजप युतीत योग्य तो समन्वय राखण्यासाठी तालुकानिहाय समन्वयकाची यादी तयार करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शहराची जबाबदारी घेतली असून, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर हे लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक असणार आहेत. समन्वयक निवडीसाठी शिवसेना उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून भाजपला पत्र पाठविण्यात आले होते. त्यात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नावेही सुचविण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, ग्रामीण भागातील समन्वयकांची यादी गुरुवारी रात्री जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी औरंगाबाद शहरातील समन्वयकांची नावे भाजप शहर कार्यकारणीने निश्चित केले. शहर समन्वयक म्हणून तनवाणी यांनी जबाबदारी घेतली असून, औरंगाबाद पूर्वचे समन्वयक म्हणून आमदार अतुल सावे, पश्चिम विधानसभा मतदारसंघ समन्वयकाची जबाबदारी शहर सरचिटणीस सुरेंद्र कुलकर्णी यांच्याकडे तर, समीर राजूरकर यांच्याकडे मध्य विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्याकडे संपूर्ण लोकसभा मतदारसंघ समन्वयकाची जबाबदारी दिली आहे. माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे हे उमेदवार खैरे यांच्यासोबत असतील, असे भाजप सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी भागविणार तहान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाची तीव्रता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे शहरात टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करून शहरवासीयांची तहाण भागवण्यासाठी 'एमआयडीसी'च्या पाण्याची मदत घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. 'एमआयडीसी'च्या पाण्यावर २५ टँकरद्वारे रोज १०० फेऱ्या केल्या जाणार आहेत.

पाण्याच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे शहरात टंचाईसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयावर रोज मोर्चे आणले जात आहेत, निदर्शने केली जात आहेत. यातून मार्ग काढून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अधिकाऱ्यांना विविध कामांच्या जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास वैद्य, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विशेष कार्यअधिकारी करण चव्हाण, उपअभियंता के. एम. फालक आदी उपस्थित होते.

बैठकीबद्दल महापौरांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'शहरात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाल्यामुळे किमान पाच"एमएलडी' पाणी देण्याची विनंती 'एमआयडीसी'ला करण्यात आली होती. 'एमआयडीसी'ने त्याला मान्यता दिली आहे. वाळूज आणि सिडको येथे 'एमआयडीसी'चे टँकर फिलिंग पॉइंट आहेत. तेथे टँकर भरण्याची परवानगी त्यांनी दिली आहे. दोन्ही ठिकाणाहून २५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाईल. २५ टँकरच्या रोज १०० फेऱ्या करतील. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. एका टँकरची क्षमता १२ हजार लिटरची असणार आहे.

महापालिकेसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे 'एमआयडीसी'ने मान्य केले असले तरी, पालिका प्रशासनातर्फे अद्याप अधिकृत पत्र 'एमआयडीसी'ला देण्यात आले नाही. प्रशासनाने तात्काळ पत्र द्यावे, अशी सूचना महापौरांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी पालिका देणार ‘एमआयडीसी’ला ‘एनओसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुस्तफाबादला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी भेट दिली आणि पाणीपुरवठ्याच्या समस्येबद्दल तेथील नागरिकांशी चर्चा केली. या परिसराला 'एमआयडीसी'च्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेतर्फे ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

बीड बायपासलगतच्या मुस्तफाबाद आणि आजुबाजुच्या परिसरात पाण्याची समस्या गंभीर आहे. महापालिकेची जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी नगरसेविका शोभा बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन आयुक्तांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी मुस्तफाबादला भेट दिली. यावेळी शोभा बुरांडे यांच्यासह प्रदीप बुरांडे, किशोर शितोळे व अन्य नागरिक उपस्थित होते.

मुस्तफाबाद परिसराला पाणीपुरवठा करण्याची तयारी 'एमआयडीसी'ने दाखवली आहे. महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यास 'एमआयडीसी' पाणी देण्यास तयार आहे, ही बाब नागरिकांना आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. महापालिकेतर्फे तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे प्रदीप बुरांडे यांनी सांगितले. 'एमआयडीसी'ने पाणी दिले तरी महापालिकेला अंतर्गत पाइप लाइन टाकावी लागणार आहे. अंतर्गत पाइप लाइन टाकण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकर तयार केला जाईल. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेऊ असेही आयुक्तांनी सांगितल्याचे बुरांडे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच मराठा उमेदवारांना प्रवेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच मराठा उमेदवारांना पदव्युत्तर दंतचिकित्सा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातून विशेष आर्थिक मागास प्रवर्गात अंतर्भाव करून प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराले व न्या. सुनील कोतवाल यांनी दिले. वैधता प्रमाणपत्राअभावी संबंधितांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात आला होता.

दंतचिकित्सा विभागात पदवी प्राप्त केल्यानंतर घेण्यात आलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेत पाच मराठा उमेदवारांनी विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केले होते. यामध्ये डॉ. युगंधरा देसरकर, डॉ. नीलेश उबाळे, डॉ. माया शिंदे, डॉ. गणेश कलंदर व डॉ. रूपाली आदी पदव्युत्तर दंतचिकित्सा अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षेत पात्र ठरले होते. प्रवेश अर्जासोबत मराठा जातीचे प्रमाणपत्र दाखल केले होते, परंतु वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते. वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांना खुल्या प्रवर्गात गृहित धरण्यात आले होते. विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावा असी विनंती त्यांनी खंडपीठात डॉ. संतोष डांबे यांच्यावतीने दाखल केली होती. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७ ते १२ मार्च दरम्यान कागदपत्रांची पडताळणी ठेवण्यात आली होती. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मराठा समाजासाठी विशेष आर्थिक मागास प्रवर्गाचे आरक्षण देण्यात आलेले आहे. संबंधित मराठा उमेदवारांनी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र काढले होते. प्रमाणपत्र वैधता समितीकडे पडताळणीसाठी प्रलंबित असल्याने सादर करता आले नाही, परंतु विहित मुदतीच्या नंतर वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून विशेष आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती. खंडपीठाने यासंबंधी वरीलप्रमाणे आदेश दिले. राज्यशासन व प्रवेशपूर्व पात्रता परीक्षा विभागास नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री लोणीकर अखेर प्रचारात

$
0
0

परभणी: लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चबांधणी केलेले इच्छुक उमेदवार राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना उशिरा का होईना शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारात उतरावे लागले. त्यांनी परतूर येथील भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

परतूर येथे झालेल्या बैठकीला शिवसेनेचे जालना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उमेदवार खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, भाजप तालुकाध्यक्ष रमेश भापकर, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक आघाव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की, परभणी लोकसभा मतदार संघात हजारो कोटींचा निधी खर्च झाला असून रस्ते, वीज, पाणी, आणि सिंचन सुविधा अशी कामे प्रगतीपथावर असून अनेक पूर्ण झाली आहेत. युती अभेद्य असल्याने परभणीचा गड जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. संपर्कप्रमुख घोसाळकर म्हणाले की, जनतेसमोर जाताना कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे सांगावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार, खून; जामीन फेटा‌ळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधवेवर दोनदा बलात्कार करुन तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याप्रकरणातील आरोपी संजय जयसिंग निंभोरे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला.

या प्रकरणी मृत महिलेच्या दिराने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, पतीच्या निधनानंतर संबंधित विधवा ही तिच्या मुलांसह फिर्यादीच्या घराशेजारी राहात होती. २६ जानेवारी २०१९ रोजी ती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून गेली व परतलीच नाही. दरम्यान, देवळाई परिसरातील साईटेकडी जवळील एका खदानीत महिलेचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला होता. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल होऊन आरोपी संजय जयसिंग निंभोरे (वय २३, रा. गल्ली नं.४, मिसारवाडी) याला अटक करण्यात आली होती. त्याने बलात्कार करुन खून केल्याची कबुली दिली होती व वैद्यकीय अहवालामध्येही बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आरोपीची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, कोर्टाने तो फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुलेटचोरासह तलवार बाळगणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुलेट चोरणाऱ्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली. तसेच तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला देखील अटक करण्यात आली. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. बुलेट चोरणाऱ्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

बुधवारी रात्री पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीतून बुलेट चोरीस गेली होती. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये असलेले संशयित आरोपी कार्तिकी हॉटेल चौकात शुक्रवारी पहाटे येणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी आरोपी शेख समीर शेख रज्जाक (वय २५, रा. वडोदबाजार) आणि शाहरुख अख्तर शहा (वय ३१, रा. फकीरवाडी, हर्सूल) यांना अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून एक हिरोहोंडा दुचाकी जप्त करण्यात आली तसेच चोरीची बुलेट देखील लासूर गावातून हस्तगत करण्यात आली. या आरोपींवर ट्रॅक्टर चोरीचे देखील गुन्हे दाखल असून यापूर्वी त्यांच्या ताब्यातून आठ ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शेळके, विष्णु मुंढे, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, जालींदर मांटे यानी केली.

तलवार बाळगणारा गजाआड

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पथक गुरुवारी रात्री गारखेडा, पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेजजवळ गस्त घालीत होते. यावेळी त्यांना संशयित आरोपी गणेशअप्पा कठाळे (वय २४, रा. कर्णपुरा) हा आढळून आला. कठाळेची झडती घेतली असता त्याच्याजवळ धारदार तलवार आढळून आली. कठाळेला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दारू पिण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकांवर आणि मद्यपींवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. सात ठिकाणी केलेल्या या कारवाईत ७६ मद्यपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम जोरदारपणे हाती घेतली आहे.

एमआयडीसी वाळूज हद्दीत पथकाने हॉटेल ओमसाई येथे छापा मारला. या ठिकाणी महादेव खेडकर या हॉटेल मॅनेजरसह तीन ग्राहकांना अटक करण्यात आली. एपीआय कॉर्नर येथे हॉटेल सारा येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बाळू धोंडीराम साळवे या हॉटेलचालकासह २९ ग्राहकांना अटक करण्यात करण्यात आली. पडेगाव भागात हॉटेल राज येथे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी १७ मद्यपींना अटक करण्यात आली. गारखेडा भागात हॉटेल शिव मराठा येथे छापा टाकून नऊ ग्राहकांना अटक करण्यात आली. हर्सूल हद्दीत साई श्रध्दा हॉटेलवर छापा टाकून चौदा ग्राहकांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, पीएसआय विजय पवार, अमोल देशमुख, अनिल वाघ आणि विजय जाधव यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे झांबड करणार सोमवारी अर्ज दाखल

$
0
0

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार सुभाष झांबड सोमवारी (१ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते क्रांतीचौक येथून मिरवणुकीने जाऊन अर्ज दाखल करतील. लोकसभेची उमेदवारी काँग्रेसकडून कुणाला मिळणार याची उत्सकुता होती. अपेक्षेप्रमाणे श्रेष्ठींनी झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. सोमवारी सकाळी दहा वाजता क्रांतीचौकातून मिरवणुकीने जाऊन अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार दानवेंचा मंगळवारी अर्ज

$
0
0

जालना: भाजपचे उमेदवार खासदार रावसाहेब पाटील दानवे हे मंगळवारी (२ एप्रिल) सकाळी ११ वाजता मिरवणुकीद्वारे दाखल करणार आहेत. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. विजया रहाटकर, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्यासह आमदार, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही मिरवणूक मामा चौकातून सकाळी १० वाजता निघून सिंधी बाजार, फुलबाजार, सराफा रोड, कादराबाद पोलिस चौकी, मस्तगड, गांधीचमन, शनी मंदिर, अमृतेश्वर महादेव मंदिर मार्गे कल्याणराव घोगरे स्टेडियम, जुना जालना येथे पोहोचणार आहे. मिरवणुकीचा समारोप जाहीर सभेत होणार असल्याची माहिती प्रचार समन्वयक देवीदास देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेद म्हणजे मानवी जीवनाची आचारसंहिता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेद हे अपौरुषेय, सर्वज्ञ व शाश्वत आहेत तसेच वेद हे मानवी जीवनाची आचारसंहिता होय, असे प्रतिपादन हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

समर्थनगर येथील श्रीराम मंदिर सभागृहात संत एकनाथ संशोधन मंदिर आयोजित तीन दिवसीय प्रवचनमालेचा समारोप नुकताच झाला. त्याप्रसंगी निरुपण करताना ते बोलत होते. प्रारंभी धुळे येथील हभप धनंजय दादा देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

हभप देगलूरकरांनी निरुपणासाठी संतश्रेष्ठ संत एकनाथ महाराज रचित 'धन्य माय व्याली सुकृताचे फळ । फळ ते निर्फळ हरिवीण' हा अभंग घेतला. ते म्हणाले की, वेदांचे मूळ नामात आहे. तसेच वेदांचे बीज ही हरी या अक्षरात आहे. कलीयुगात नामस्मरणाने भगवत प्राप्ती होते म्हणून या युगात नामाचाच विचार करा अन्यथा भगवंत प्राप्ती होणार नाही. नाममहात्म्य वर्णन करताना ते म्हणाले की नामाला अन्य साधनेची जोड आवश्यक नाही. भगवंताने ब्रम्हदेवाला वेदाची प्राप्ती नामातूनच दिली. संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या संताच्या विविध रचनेतून दाखले देत नामाचे निरुपण केले. मानवी जीवनाची धन्यता नामस्मरणात आहे, असेही ते म्हणाले.

हभप सविता मुळे, गजानन केचे. प्रमोद जोशी, श्रीरंग सुरवसे आदी गायिकांनी याप्रसंगी अभंग सादर केले. डॉ. म.ह. सावजी, श्यामल भोगले, नीता कुलकर्णी, जनार्दन गोडबोले, ज्योती चिटगोपेकर, कमलाकर पेरे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निवेदिता सराफ यांनी केले. पसायदानाने प्रवचनमालेची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया केंद्र दहा एप्रिलपर्यंत सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रश्नावरून राजकीय कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया केंद्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करा, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला केली. हे केंद्र दहा एप्रिलच्या सुमारास सुरू होईल असे मानले जात आहे.

चिकलठाणा येथे रोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री बसवण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम केले जात आहे. संथ गतीने काम सुरू असल्यामुळे मशीन बसवून प्रत्यक्ष काम केव्हा सुरू होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे महापौरांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेवर मशीन बसवण्यासाठी आवश्यक ती कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे युद्धपातळीवर काम करून दहा एप्रिलपर्यंत प्रक्रिया केंद्र सुरू करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

\Bकचरा संकलन, वाहतूक वाढविणार\B

महापालिकेने बेंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कचरा वाहतूक आणि संकलनाचे काम दिले आहे. सध्या या कंपनीच्या माध्यमातून दोन, सात आणि नऊ झोन कार्यालयांतर्गत कचरा संकलन व वाहतुकीचे काम केले जात आहे. या कंपनीला आखणी एका झोन कार्यालयाचे क्षत्र कचरा संकलन व वाहतुकीसाठी द्यावे, असे प्रशासनाला सांगण्यात आले होते, पण प्रशासनाकडून यासाठी चालढकल केली जात होती. सुमारे दीड महिन्यापासून कंपनीतर्फे तीनच झोन कार्यालयाच्या क्षेत्रात काम केले जात होते. आता एक एप्रिलपासून झोन क्रमांक तीनचा परिसर कंपनीच्या ताब्यात देण्याचे आढावा बैठकीत ठरविण्यात आले. एका झोन कार्यालयाच्या क्षेत्रातून रोज सरासरी ४० टन कचऱ्याचे संकलन केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>