Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अन्न व्यावसायिकांना खासगी संस्थांनी लुबाडले

$
0
0
नोंदणी किंवा परवान्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निर्धारीत केलेल्या सेवाशुल्कापेक्षा अधिक रक्कम घेत, काही संस्थांनी अन्न व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकी किती रुपयांची फसवणूक झाली, याचा तपशील समजला नाही.

बनावट दारूचा साठा रोटोगावात जप्त

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रोटेगाव (ता. वैजापृर) येथे घरावर छापा टाकून बनावट देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. या दारूची किंमत तीस हजार रुपये आहे. याप्रकरणी शिवकुमार व्यंकटेश सुद्दाल याच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहवाल पाठवण्यात आयुक्तांची दिरंगाई

$
0
0
उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या संदर्भात सर्वसाधारण सभेने घेतलेल्या ठरावाबद्दलचा अहवाल पाठवण्यासाठी पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिरंगाई केल्याचे आता उघड झाले आहे. अहवाल पाठवण्याबद्दल शासनाने पाठवलेले पत्रही थप्पीला लावले गेले.

गृहपालाकडूनच विद्यार्थिनीचा विनयभंग

$
0
0
शासकीय मुलींच्या वसतिगृहातील प्रभारी गृहपाल शेख अयुब याने वसतिगृहातील निवासी असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी भोकरदन येथे घडली.

अखेर पालिकेने टेंडर्स उघडली

$
0
0
महापालिकेच्या प्रशासनाने शनिवारी अखेर रस्त्यांच्या कामांचे टेंडर्स उघडले. डांबरीकरणाच्या कामासाठी १८ तर व्हाइट टॉपिंगच्या कामासाठी तीन टेंडर्स प्राप्त झाले आहेत.

ज्युनिअरच्या शिक्षकांचा सोमवारी मोर्चा

$
0
0
मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही राज्यसरकारने ते पाळले नसल्याचे सांगत राज्यातील ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत.

घाटी रुग्णालय होणार आता चकाचक

$
0
0
सर्वसामान्यांचा आधार असेलेल्या घाटी रुग्णालयाला पंतप्रधान स्वास्थ योजनेतून दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या निधीच्या माध्यमातून घाटीत सर्जिकल इमारत, रेकॉर्डरुम, दोन नवीन वसतीगृह तसेच शवागार तयार करण्यात येणार आहे.

चोरीचा लाखो रुपयांचा माल भंगारमध्ये

$
0
0
शहरातून चोरलेला लाखो रुपये किंमतीचा माल भंगार असल्याचे भासवत त्यांची ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून परराज्यात विक्री करणारे एक रॅकेट उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

ठाकरे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

$
0
0
परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत आदित्य ठाकरे यांनी मंचावरुन खाली उतरून संवाद साधला. मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे, मी तुमच्या मध्ये येऊन बोलणार असे म्हणत आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांमध्ये गेले.

तुम्हीच उद्याच्या भारताची ताकद

$
0
0
कर्तव्य आणि अधिकाराबाबत शाळेत विचारले जाते. मात्र अद्याप अनेकांना या बाबत माहिती नाही. ‌‌विद्यार्थ्यांनो तुम्हीच उदयाच्या भारताची ताकद असून तुम्हाला कर्तव्य आणि अधिकाराबाबत माहिती झाली तर उद्याचा भारत तयार होईल असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केले.

विद्यापीठ प्रशासनाला ‘बेशरमाचे’ झाड

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएच.डी. पूर्व ‘पेट-२’ परीक्षा होऊन वर्ष उलटले तरी संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी अद्याप जाहिर केलेली नाही. ती यादी जाहीर करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड भेट म्हणून दिले.

पर्यटनाला अनधिकृत गाइडचा फटका

$
0
0
शहरात जर्मनी, जपान, फ्रान्स, अमेरिका यांच्यासह विविध राष्ट्रांमधून पर्यटक ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी येतात. त्यांना त्यांच्या भाषेत औरंगाबादचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या अधिकृत गाइडची संख्या तशीच कायम असून, अनाधिकृत गाइडची संख्या मात्र वाढत आहे. टुरिझम विभागाकडे ६६ आणि ८ गाइडची नोंद आहे.

समाजकल्याण विभाग ‘चकाचक’

$
0
0
जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग आता खऱ्या अर्थाने ‘पॉश’ झाला आहे. रंगरंगोटी, अंतर्गत फर्निचर, लॅनद्वारे कम्प्युटर जोडणी, येणाऱ्या पाहुण्यांना बसण्यासाठी पॉश खुर्च्या अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात पाणी महागणार

$
0
0
जलसंपदा विभागाकडून घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी विकण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा, त्याचबरोबर उद्योगांसाठीच्या जलदरात कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठोक पाणीशुल्क निश्चितीचे निकष जाहीर केले आहेत.

परळी केंद्रात ३ दिवसांचाच कोळसा

$
0
0
बीड जिल्ह्यातील परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला सध्या कोळसा टंचाईच्या झळा बसत आहेत. या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राकडे सध्या तीन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे केंद्राच्या वीजनिर्मितीत घट झाली आहे.

निवडणुकीपासून दमानिया लांबच

$
0
0
भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करून लक्ष वेधून घेणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’च्या (आप) नेत्या अंजली दमानिया यांनी आता मात्र निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

पंधरवडा संपला, आता वर्षभर धिंडवडे

$
0
0
उस्मानाबादसह राज्यात नुकताच रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा पंधरवडा निरर्थकच ठरणार, अशी चिन्हे पंधरवडा सुरू असतानाच दिसून आली.

पैठण नगरपालिकेच्या विषय समितीची निवडणूक रद्द

$
0
0
पैठण नगर पालिकेच्या विविध विषय समितीच्या निवडणुकीत ठराविक वेळेत एकही नामांकन दाखल न झाल्याने, शनिवारी विषय समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली.

समता परिषद लढवणार कन्नडची निवडणूक

$
0
0
अखिल भारतीय समता विकास परिषदेने कन्नड विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाणा येथे झालेल्या चिंतन मेळाव्यात ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष बापुसाहेब भुजबळ यांनी ही भूमिका जाहीर करून परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

खुलताबाद तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0
तालुक्यात चोरट्यांनी भरदिवसा अक्षरशः धुमाकूळ घातला. चोरट्यांनी खुलताबाद, कसाबखेडा, भांडेगाव, वडोद कान्होबा येथे दोन दिवसांत चांगलाच धुमाकूळ घातला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images