Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खैरेंच्या पहाट भेटीने शांतिगिरी ‘संतुष्ट’!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेरूळ आश्रमात दिलेल्या पहाट भेटीने अखेर शांतिगिरी महाराज 'संतुष्ट' झाले असून, त्यांचे लगेच मतपरिवर्तन झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून 'आपण फक्त आशीर्वाद देऊ' असे म्हणत आपली तलवार म्यान केली.

शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार फार मोठा आहे. 'जय बाबाजी' या नावाने तो ओळखला जातो. धार्मिक, अध्यात्मिक कामात गुंतलेले महाराज २००९मध्ये राजकीय पटलावर आले. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्यावेळचे शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. खैरे आणि शांतिगिरी महाराज यांचीच चर्चा त्यावेळी होती. शांतिगिरी महाराजांना त्यावेळी एक लाख ४२ हजार मते मिळाली, पण ते विजयी होऊ शकले नाहीत. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा खैरे यांच्या विरोधात उभे राहण्याची तयारी त्यांनी केली होती. त्याच उद्देशाने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज देखील नेले. खैरेंविरोधात यावेळी काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीकडून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच अंर्तगत नाराजी व विरोधामुळे खैरे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत शांतिगिरी महाराजांनी पुन्हा एकदा उमेदवारी दाखल केली तर, आपल्याला धोका होऊ शकतो हे खैरे यांनी जाणले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खैरे यांनी बुधवारी भल्या पहाटे शांतिगिरी महाराज यांचा वेरूळचा आश्रम गाठला आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. खैरेंच्या भेटीमुळे 'समाधानी' झालेल्या महाराजांनी खैरेंच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. खैरेंच्या सोबत उभे राहून फोटोसेशनही केले.

\Bअहो, आश्चर्यम्

\Bशांतिगिरी महाराज आणि चंद्रकांत खैरे यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. महाराजांनी खैरेंच्या विरोधात वेळोवेळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते यावेळीही खैरेंच्या विरोधात निवडणूक लढवतील असे बोलले जात होते, पण त्यांनी निवडणूक न लढवता आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली. या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आठवी होमोग्राफ्ट बँक शहरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशभरातील लहान मुलांमधील गुंतागुंतीच्या हृदयविकारांवर जीवनदायी ठरणाऱ्या होमोग्राफ्टची सुविधा औरंगाबाद शहरात उपलब्ध झाली असून, त्यासाठी देशातील आठवी व महाराष्ट्रातील पहिलीच 'होमोग्राफ्ट बँक' ही औरंगाबादेतील युनायटेड सिग्मा हॉस्पिटल लवकरच सुरू होत आहे. अलीकडेच मान्यता मिळालेल्या बँकेत ट्रान्स्प्लान्ट न झालेल्या ब्रेन डेड रुग्णांच्या हृदयाचे विच्छेदन करून होमोग्राफ्ट हे उणे १५४ अंश तापमानात संवर्धित होऊन मागणीनुसार रुग्णांना पुरवण्यात येणार आहेत.

या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकांनी होमोग्राफ्ट बँकेला नुकतीच मान्यता दिली आहे. या बँकेत होमोग्राफ्ट (हृदयाचा काही भाग) हे पाच वर्षांपर्यंत टिकवता येऊ शकतात व गरजेच्या आकारातील होमोग्राफ्ट रुग्णांना देता येऊ शकतात; तसेच अपेक्षित तापमान राखत आठ ते १२ तासांपर्यंत होमोग्राफ्टची वाहतूकही करता येऊ शकते. गुंतागुंतीचे हृदयविकार असलेल्या मुलांसह काही प्रमाणातील प्रौढ रुग्णांनाही होमोग्राफ्टचा म्हणजेच 'व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट' किंवा 'रूट'चा मोठा लाभ होऊ शकतो. प्राण्यांपासून तयार केलेल्या किंवा कृत्रिम होमोग्राफ्टपेक्षा मानवी म्हणजेच ब्रेन डेड रुग्णांचा होमोग्राफ हा कधीही चांगला व दीर्घ काळ टिकणारा ठरतो. एरवी ट्रान्स्प्लान्ट न होणाऱ्या ब्रेन डेड रुग्णाचे हृदय वाया जाते; परंतु होमोग्राफच्या माध्यमातून त्याचा जीवनदायी वापर होऊ शकतो, असे रुग्णालयाचे हृदय शल्यचिकित्सक तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिले हार्ट ट्रान्स्प्लान्ट करणारे डॉ. आनंद देवधर यांनी बुधवारी (३ एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी रुग्णालयाचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, मुख्य कार्यकारील अधिकारी डॉ. अजय रोटे, फिजिशियन-इन्टेसिव्हिस्ट डॉ. समीध पटेल, भूलतज्ज्ञ डॉ. बालाजी आसेगावकर व डॉ़. प्रमोद अपसिंगेकर यांची उपस्थिती होती.

\B'इकमो'मुळे वाचले मुलीचे प्राण

\Bडेंगी, स्वाईन फ्लू आदी प्रकारच्या गंभीर आजारांमुळे (एआरडीएस) जेव्हा फुफ्फुस व हृदयाचे कार्य थांबते आणि रुग्णाच्या शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा करणे व्हेंटिलेटरच्या आवाक्याबाहेर जाते, तेव्हा इकमो या उपकरणाद्वारे रुग्णांना अनेक दिवसांपर्यंत बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करणे व जिवित ठेवणे शक्य होते. याच उपकरणामुळ‌े रुग्णालयात दाखल १२ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवणे शक्य झाले. हे इकमो उपकरण आता रुग्णालयात उपलब्ध झाले आहे, असेही डॉ. देवधर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाकाबंदीदरम्यान १८ लाख रुपये जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरात सध्या नाकाबंदीची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने बुधवारी पहाटे नाकाबंदीदरम्यान एपीआय कॉर्नर येथे १८ लाख ३६ हजार ९३० रुपयाची रक्कम जप्त केली. या रक्कमेची रितसर नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करून ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या रकमेची वाहतूक करण्याचे प्रकार घडतात. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार भरारी पथक तयार करण्यात आले असून, त्यांच्याकडून वाहनांची तपासणी सुरू आहे. एपीआय कॉर्नर येथे बुधवारी पहाटे पथकाचे प्रमुख सी. एस. बेग सहकाऱ्यांसह वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी दीपक त्रिंबकदास मुंदडा हे चिकलठाण्याकडून सिडको चौकाच्या दिशेने कारमधून (एमएच २० ईवाय ८१२३) जात होते. पथकाने त्यांची कार अडवून तपासणी केली असता कारमध्ये १८ लाख ३६ हजार ९३० रुपयाची रक्कम आढळली. ही रक्कम पथकाने रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जमा केली. सकाळी ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

मुंदडा यांची सिडको एमआयडीसी कंपनीत बॉटलिंगची कंपनी आहे. ही रक्कम व्यवसयाशी संबधित असल्याची माहिती त्यांनी पथकाला दिली, मात्र आचारसंहितेमध्ये रोख रक्कमेची वाहतूक करता येत नाही. दहा लाखापेक्षा कमी रक्कम असल्यास महसूल विभाग तर, दहा लाखापेक्षा अधिक रक्कम असल्यास प्राप्तिकर विभागाकडून त्याची चौकशी करण्यात येते. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा संकलकांची पिळवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम खासगीकरणाच्या माध्यमातून सुरू करून दोनच महिने झालेले असताना कामगारांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (३ एप्रिल) कचरा संकलनाचे काम सुमारे दोन तास बंद पाडले.

महापालिकेने कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्याच्या कामाचे खासगीकरण केले आहे. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला हे काम दिले आहे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने काम सुरू केले आहे. दोनच महिन्यात कंपनीला कामगाराच्या रोषाला सामोरे जावे लागले. जे कामगार सध्या कंपनीसाठी काम करीत आहेत तेच कामगार पूर्वी महापालिकेसाठी कचऱ्याच्या गाड्यांवर काम करीत होते. महापालिकेसाठी काम करताना पगार जास्त मिळत होता, आता पगार कमी मिळतो; कंपनीने पगार वाढवावा, अशी मागणी कामगारांनी केली. कामाच्या वेळा ठरवून दिल्या पाहिजेत अशी मागणी होती. आठ तास काम करण्याचा कायदा आहे, असे असताना दहा-दहा तास काम करावे लागते, अशी तक्रार कामगारांनी केली. कंपनी व्यवस्थापनाकडून मानसिक त्रास देखील दिला जातो. कचऱ्याने गाडी पूर्णपणे भरून आणण्याची सक्ती केली जाते, असे विविध मुद्दे उपस्थित करून कामगारांनी सकाळच्या सत्रात दोन तास कचरा वाहतुकीच्या गाड्या बंद पाडल्या.

\Bसमन्वयाचा वायदा \B

या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी कामगारांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली, त्यानंतर कामगारांनी गाड्या सुरू केल्या. बहुजन कामगार शक्ती संघटनेच्या नेत्यांनी सायंकाळी कामगार आणि रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. समन्वयाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी समिती सदस्य निवड; येत्या बुधवारी विशेष सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी येत्या बुधवारी (१० एप्रिल) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थायी समिती सदस्यांशिवाय पाच विषय समितीच्या सदस्यांची निवड देखील याच दिवशी जाहीर केली जाणार आहे. एका विषय समितीमध्ये नऊ सदस्य असतात.

स्थायी समितीमधून रुपचंद वाघमारे (शिवसेना पुरस्कृत), स्वाती नागरे (शिवसेना पुरस्कृत), ऋषीकेश खैरे (शिवसेना) , रेणुकादास वैद्य (शिवसेना), सिद्धांत शिरसाट (शिवसेना), सय्यद मतीन रशीद (एमआयएम), शेख नर्गिस सलीम (एमआयएम), राखी देसरडा (भाजप) हे आठ सदस्य येत्या १ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी बुधवारी विशेष सभा होणार आहे. स्थायी समितीमधून शिवसेनेचे पाच सदस्य निवृत्त होत असल्यामुळे शिवसेनेचेच पाच सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहेत, एमआयएमचे दोन आणि भाजपचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये जाणार आहे. पाच विषय समितीचे सदस्य देखील याच सर्वसाधारण सभेत निवडले जाणार आहेत.

\Bएवढ्या सदस्यांची निवड \B

विषय समित्या ५

एकूण सदस्य ४५

स्थायी समिती ८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत जलवाहिन्यांना लिकेज, दूषित पाणी पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याची नासाडी करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा इशारा महापालिकेने दिला असताना दुसरीकडे सिडको परिसरातील वॉर्डातील अंतर्गत जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी छोटे-छोटे लिकेंज आहेत. परिणामी, काही भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे. याकडे महापालिकेचा दुर्लक्ष होत असल्याची तक्रर आहे.

सिडको एन ८ मधील बॉटनिकल गार्डनच्या छोट्या प्रवेशद्वाराजवळून जलवाहिन्या जातात. त्यापैकी एका जलवाहिनीला गेल्या काही दिवसापासून लिकेंज आहे, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली. वॉर्ड परिसरातील अंतर्गत जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी लिकेंज आहेत, असे भाजप नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. सावरकरनगर, विजयश्री कॉलनीतील लिकेंज व गुलमोहर कॉलनी, बजरंग चौकातील व्हॉल्व्ह दुरुस्ती आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सिडको एन ६ मधील मथुरानगर, सिडको एन ७ येथील त्रिवेणीनगरमध्ये काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे. अंतर्गत जलवहिन्यांच्या लिकेंजमुळे हे घडत असून त्याकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी चंद्रकांत गिरी यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर झांबडच काँग्रेसचे उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून अखेर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सुभाष झांबड यांच्यावर बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी मिळेल ही शक्यता संपुष्टात आली. सत्तार यांनी झांबड यांना बी फॉर्म मिळाल्यानंतर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

औरंगाबादेतून काँग्रेसची उमेदवारी झांबड यांना मिळाल्यानंतर सत्तार नाराज झाले आणि पक्षत्याग केला. मी सूचविलेल्या उमेदवाराचा विचार झाला नाही असा त्यांचा आक्षेप होता. मीच आता निवडणूक रिंगणात उतरणार हे जाहीर करून त्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली. दरम्यान २९ मार्च रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली. काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केली. अर्ज दाखल करताना एक एप्रिल रोजी त्यांनी बी फॉर्मविना अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अधिकृत उमेदवारीबाबत चर्चा सुरू होती. पक्षाकडून मात्र दोन दिवसांत झांबड यांच्याकडे बी फॉर्म पाठवला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी झांबड यांना बी फॉर्म प्राप्त झाला. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारीची चर्चा संपुष्टात आली. दुपारी सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा पावित्रा घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्सिड मोबिलिटी’तर्फे ‘सेल्फी विथ यामाहा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'एक्सिड मोबिलिटी' व 'टाइम्स ग्रुप' यांच्यातर्फे तीन दिवसांचे वाहन प्रदर्शन व विक्री उपक्रम राबवण्यात येत आहे. चार ते सहा एप्रिलदरम्यानत उस्मानपुरा येथे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यलयासमोर हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी 'सेल्फी विथ यामाहा' या अनोख्या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. सर्वोत्तम सेल्फी काढणाऱ्या ग्राहकाला बक्षीस देखील मिळणार आहे. याशिवाय गुढीपाडव्यानिमित्त दुचाकीची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक सूट देण्यात येईल, असे 'एक्सिड मोबिलिटी'चे संचालक सामी शेख यांनी सांगितले.

साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला महत्त्व आहे. या दिवशी नवीन खरेदी शुभ मानली जाते. म्हणून बहुतांश खरेदी-विक्रीचे व्यवहार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले जातात. आपल्या पसंतीची मोटारसायकल खरेदी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या ग्राहकांसाठी जालना रोडवरील आकाशवाणी चौकातील 'एक्सिड मोबिलिटी'तर्फे यामाहा कंपनीच्या मोटारसायकल व स्कुटर प्रदर्शनात ठेवल्या आहेत. चार, पाच व सहा एप्रिल याकालावधीच चालणाऱ्या या उपक्रमात आपल्या पसंतीची दुचाकी बुक केल्यास आकर्षक सवलत (डिस्काउंट) मिळणार आहे. या प्रदर्शनात यामाहा वायझेडएस, यामाहा आर १५, यामाहा एमटी १५, यामाहा एफझेड या मोटारसायकलसह फॅसिनो स्कुटर देखील विविध रंगात पाहायला मिळतील. जास्तीत जास्त औरंगाबादकरांनी 'एक्सिड मोबिलिटी'च्या ''सेल्फी विथ यामाहा' उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलील लोकसभेच्या रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमआयएम, वंचित बहुजन आघाडीचे संयुक्त उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी ११ वाजेच्या सुमारास जलली यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणूक जुना बाजारमध्ये आल्यानंतर विविध भागातून वंचित बहुजन आघाडीसह एमआयएमचे कार्यकर्ते सहभागी झाले. सिटीचौक येथे पोचल्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांची संख्या शेकडोंवर पोचली. जलील यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. 'बाबासाहेबांचे स्वप्न कोण पूर्ण करणार, आमदार जलील पूर्ण करणार,' 'कौन आया कौन, शेर आया शेर आया' अशा नारेबाजीसह ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक सराफा रोडमार्गे गांधी पुतळा येथे पोहोचली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गांधी चमन, शहागंज, चेलिपुरा मार्गे मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोचली. या ठिकाणी जलील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. एकेकाळी 'एमआयएम'मध्ये सक्रिय असलेले मुकुंद सोनवणे यांनी मिरवणुकीत हजेरी लावली. २०१४ची विधान सभा निवडणूक संपल्यानंतर 'एमआयएम'ची विजयी सभा आमखास मैदानावर झाली होती. यावेळी खासदार ओवेसी यांनी पश्चिम विधानसभा क्षेत्रातून मुकुंद सोनवणेंचे नाव आगामी विधानसभेत घोषित केले हाते. यानंतर कालांतराने सोनवणे यांनी 'एमआयएम'ला सोडचिठ्ठी दिली. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सोनवणे यांनी पुन्हा 'एमआयएम'ला जवळ केले आहे. याशिवाय माजी नगरसेवक नासेर कुरैशी यांचीही उपस्थिती होती.

\Bभगवा कोणाची जहागिरी नाही...

\Bजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जलील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'भगवा कोणाची जहागिरी नाही. सर्व समाजाला विकास हवा आहे. यासाठी सर्वजण एकत्र येत आहोत. लोकसभा निवडणूक झांकी है,… विधान सभा बाकी है. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. मिरवणुकीत आलेले सर्व जण उत्स्फूर्तपणे आले आहेत. यामुळे परिवर्तनाची मोठी आशा निर्माण झाली आहे. औरंगाबादला कसे पुढे घेऊन जायचे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता हिंदू मुस्लिमांच्या नावावरचे राजकारण बंद झाले पाहिजे. किती दिवस भीतीचे राजकारण करणार ? औरंगाबाद व औरंगाबादचे नागरिक कसे सुरक्षीत राहतील हा आमचा मुद्दा राहणार आहे.'………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलील, सत्तार यांची कोटींची उड्डाणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील तसेच काँग्रेसचे बंडखोर उमदेवार आमदार अब्दुल सत्तार हे दोघेही कोट्यधीश आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

जलील यांची स्थुल मालमत्ता ५१ लाख ३४ हजार ७६८ एवढी तर, स्थावर मालमत्ता १ कोटी ८० लाख आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडे ३ कोटी ६९ लाख ९३ हजार ९४१ जंगम संपत्ती आहे व स्थावर संपत्तीचा आकडा ८ कोटी ३९ लाख ९६ हजार ८९१ रुपयांचा आहे. जलील यांच्यावर ६८ लाख रुपयांचे कर्ज असून त्यांच्याकडे डस्टर, टाटा सफारी या चारचाकी तर बुलेट, सुझुकी अ‍ॅक्सेस या दुचाकी आहेत. त्यांच्याकडे सोने नाही. मात्र, पत्नी रूमी फातेमा यांच्याकडे २ लाख ७० हजार रुपये किमतीचे ८० ग्राम सोने असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. पत्नीकडे एकूण संपत्ती सुमारे ६४ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. तर सत्तार यांच्याकडे फॉर्च्युनर, टाटा सफारी, ट्रॅक्टर ही वाहने त्यांच्याकडे आहेत. सत्तार कुटुबियांकडे सोने ३५ तोळे ५ ग्रॅम सोने, आणि २५ तोळे चांदी आहे. त्याची किंमत १० लाख ६५ हजार ८०० रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. पत्नी नफीसा बेगम यांची संपत्तीही कोटींच्या घरात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक बाउन्सप्रकरणी ७५ लाखांचा दंड, सक्तमजुरी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनादेश अनादरप्रकरणात विद्युत कंत्राटदार नंदकुमार भानुदास कुलकर्णी याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने ठोठावलेली सहा महिने सक्तमजुरी व ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा ही तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. टी. घाडगे यांनी कायम ठेवली.

या प्रकरणी विद्युत कंत्राटदार विश्वास भार्गव जोशी (६५, रा. नागेश्वरवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, शिक्षा ठोठावण्यात आलेला विद्युत कंत्राटदार नंदकुमार भानुदास कुलकर्णी (६५, रा. सिडको एन-पाच) याने महापालिकेकडून एक कोटी दहा लाख रुपयांच्या कामाचे कंत्राट घेतले होते व त्या कामाचे उपकंत्राट फिर्यादीला दिले होते. फिर्यादीने काम पूर्ण केल्यानंतर कुलकर्णीने महापालिकेकडून पूर्ण पैसे घेतले व फिर्यादीला ६० लाख रुपयांचा धनादेश दिला, जो वटलाच नाही. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने नंदकुमार कुलकर्णीला १९ जुलै २०१७ रोजी सहा महिने सक्तमजुरी व ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम फिर्यादीला देण्याचेही आदेश दिले. त्या आदेशाला कुलकर्णीने जिल्हा न्यायालयात आव्हान दिले असता, सबळ पुराव्यांच्या आधारे कनिष्ठच्या न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम केली. फिर्यादीतर्फे श्रीनिवास तलवार यांनी काम पाहिले. दरम्यान, कुलकर्णी हा तारखेला हजर न झाल्याने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी काढण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३३ लाखांचा गंडा; मॅनेजरला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाईन शॉपच्या व्यवस्थापनाचे काम दिलेल्या व्यवस्थापकाने ३३ लाख ६७ हजारांचा अपहार केल्याप्रकरणात आरोपी व्यवस्थापक अक्षय अरविंद सबनीस याला मंगळवारी (२ एप्रिल) रात्री अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला सोमवारपर्यंत (आठ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी बुधवारी दिले.

याप्रकरणी प्रशांत तेजराव वाघ (३३, रा. म्हाडा कॉलनी, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादा हा अमरदीपसिंग त्रिलोकसिंग सेठी यांच्या सिडको एन तीन परिसरातील 'सत्यम स्पिरिट प्रायव्हेट लिमिटेड' येथे लेखापाल म्हणून काम करतो. 'सत्यम'मार्फत परवानाधारक दारुच्या दुकानांना मद्याचा पुरवठा केला जातो. सेठी यांचे मित्र अनिल प्रल्हाद नागराणी व किशोर मार्तंड कळकर (रा. भुसावळ, जि. जळगाव) यांच्या मालकीच्या देवळाई परिसरातील 'थ्री स्टार वाईन शॉ'चे व्यवस्थापन करण्यासाठी सेठी यांनी त्यांच्याकडे कामाला असलेला आरोपी अक्षय अरविंद सबनीस (२३, रा. सातारा) याच्याकडे 'थ्री स्टार'च्या व्यवस्थापनाचे काम दिले. अक्षयने सहा एप्रिल २०१८ ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीतील पैसे सेठी यांना दिले, मात्र नंतरचे पैसे दिले नाही. त्यामुळे सेठी यांनी अक्षयला अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे दोन्ही दूरध्वनी क्रमांक बंद होते. हिशेब तपासणीत अक्षयने ३३ लाख ६७ हजार २२३ रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले.

\Bयापूर्वी जामीन फेटाळला\B

प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात यापूर्वी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपीला अटक होऊन कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत (आठ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावली. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितेच्या पाडव्याचे साहित्य पुरस्कार घोषित

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

'उर्मी' आयोजित कवितेच्या पाडव्याचे साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आले असून, प्रा. डॉ. सुधीर रसाळ, पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. मकरंद कांजाळकर, राजेंद्र अत्रे, प्रा. डॉ. पी. विठ्ठल यंदाचे मानकरी ठरले असल्याचे माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात शनिवारी (सहा एप्रिल) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुरेंद्र जायस्वाल, डॉ. सतीश जाधव, प्राचार्य अशोक आहेर यांची उपस्थिती राहणार आहे.

आम्ही कवितेचे देणे लागतो या भूमिकेतून गेल्या २४ वर्षांपासून उर्मी आयोजित कवितेच्या पाडवा हा कवी आणि कवीतेचा सन्मानात आयोजित करण्यात येतो. यंदा कवितेच्या पाडव्यात कवी इंदर बोराडे यांच्या पारुंब्या कविता संग्रह प्रकाशन सोहळा 'एमजीएम'चे अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्राचार्य प्रतापराव बोराडे यांची उपस्थिती राहणार आहे.

यावेळी कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले असून, कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. एकनाथ पांडवे राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेसाठी प्रा. जयराम खेडेकर, इंदर बोराडे व प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या तोंडावर प्रतिबंधात्मक कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

लोकसभा निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस प्रशासन सरसावले असून, सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५९४ गुन्हेगारांवर शांतता भंग होऊ नये म्हणून कलम १०७अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी दिली.

चांगल्या वर्तणुकीचे बॉँड लिहून घेत कलम ४८ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशावर कारवाई करण्यात आली. सतत अवैध दारू विक्री करणारे, पोलिस दप्तरी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या ५७ जणांवर कलम ९३नुसार तडीपारी प्रस्तावित आहे. माराहाण करून दुखापत करणाऱ्या सहा जणांविरोधात हद्दपारचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, अजिंठा पोलिस ठाणे, फर्दापूर पोलिस ठाणे व सोयगाव पोलिस ठाणे या पाच पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी चार पथकांत २१ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाची गुन्हेगार, अनोळखी व्यक्ती, अवैध धंदे, चोरटी वाळू वाहतूक यासह गुन्हेगारी वृतीच्या लोकांवर करडी नजर राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वतंत्र भारत’चे पाच उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतंत्र भारत पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, मराठवाड्यात पाच उमेदवार उतरविले आहेत. यात औरंगाबादमधून शेतकरी अन्वर मुसा शेख यांना तर, जालना मतदारसंघातून त्र्यंबक जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती पक्ष नेते कैलास तवार व श्रीकांत उमरीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भात समविचारी पक्ष, संघटनांनी मिळून विदर्भ महा निर्माण मंचाची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी सात जागा लढविणार असल्याचे उमरीकर यांनी सांगितले. 'स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देणाऱ्या पक्ष, संघटनांचा यात समावेश असून पुण्यातही स्वंतत्र भारत पक्षाचा उमेदवार असणार आहे. मराठवाड्यात औरंगाबादेतून गंगापूर तालुक्यातील जांबगाव येथील शेतकरी अन्वर मुसा शेख यांनी उमेदवारी देण्यात आली असून, जालना लोकसभा मतदारसंघातून त्र्यंबक जाधव, लातूरमधून रूपेश लंके, परभणीतून अप्पासाहेब कदम, उस्मानाबादेतून शंकर गायकवाड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे. आम्हाला भीक नको तर, घामाचे दाम पाहिजे. कर्जमाफी नव्हे तर, कर्जमुक्ती शेतकऱ्यांना हवी. शेतीविरोधी सर्व कायदे रद्द करा, बाजाराचे, शेतकऱ्यांना व्यापाऱ्याचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य पाहिजे. याच प्रमुख मुद्यावर निवडणूक लढवत आहोत,' असे उमरीकर यांनी सांगितले. अन्वर शेख, त्र्यंबक जाधव, जिल्हाध्यक्ष जे. पी. कदम, शेख रशीद मौलाना आदी यावेळी उपस्थित होते.

\Bस्वतंत्र मराठवाडा राज्यसाठी आग्रह

\Bशेतकरी संघटनेचे प्रवक्ते उमरीकर यांनी यावेळी बोलताना, 'छोट्या छोट्या राज्याचा पुरस्कार पक्षाने नेहमीच केला आहे. स्वतंत्र विदर्भाप्रमाणे स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीला आमचाच पाठिंबाच आहे,' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्हॉल्व्ह खराब; शहागंजमध्ये पाण्याचे पाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्यासाठी नागरिकांचे दररोज आंदोलन सुरू असताना बुधवारी (३ एप्रिल) शहागंजमधील जलकुंभाचा व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत असल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

शहागंज जलकुंभाजवळचा व्हॉल्व्ह बुधवारी खराब झाला. या जलकुंभात क्रांती चौकातील जलकुंभातून पाणी आणले जाते. या दोन्ही जलकुंभाला जोडणाऱ्या जलवाहिनीवरचा व्हॉल्व्ह खराब झाल्याचे लक्षात आले. व्हॉल्व्ह दुरुस्तीकरिता संपूर्ण जलवाहिनी रिकामी करणे गरजेचे होते. त्यामुळे जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर सोडण्यात आले. रस्त्यावर पाण्याचे पाट वाहू लागले. शहागंज येथील भाजी मंडईजवळ जलकुंभ आहे. जलकुंभाला जोडणारी जलवाहिनी रिकामी केल्यामुळे चेलिपुरा पोलिस चौकीपर्यंत पाणी वाहत गेले.

जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमालीची घटली असल्याने महापालिकेला सध्या मृतसाठ्यातून पाणी उपसा करावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध होणारे पाणी कमी झाले आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली असून ती पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. त्याचे रुपांतर आंदोलनांत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूक झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

जालना:

खरपुडी येथील नियोजित सिडको प्रकल्पाने एका शेतकऱ्याचा गुरुवारी पहिला बळी घेतला. यलो झोनमधील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किंमतीत विकत घेऊन राजकीय दलाल आणि व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याने अस्वस्थ झालेल्या या शेतकऱ्यांने आपली जीवनयात्रा संपवली. अनंता यशवंत सवडे (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

जालन्यातील सिडकोच्या प्रकल्पाच्या जागेचे आतापर्यंत तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर झाले आहे. राजकीय नेते आणि त्यांच्या दलालांकडील काळ्या पैशाचा पांढरा पैसा करण्यासाठी तसेच कोट्यवधी रुपयांची सरकारी लूट करण्यासाठी अगदीच उघडपणे हे सगळे गैरकारभार जालन्यात सुरु आहेत. आता गैरकारभारात एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेला आहे. खरपुडीच्या यलो झोन भागातील सर्व जमीन शेतकऱ्यांकडून कवडीमोल किंमतीत घेण्यात आल्या आहेत. तर, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धमक्या देऊनही बळजबरीने व्यवहार करण्यात आला. हे व्यवहार होईपर्यंत शेतकऱ्यांना या ठिकाणी होणाऱ्या प्रकल्पाची माहिती नव्हती. त्यानंतर, सिडकोने जमीन मोजणी करण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रकल्पाबाबत माहिती समजली.

आपल्या कुटुंबाच्या भविष्याची आपणच वाताहात केली, मुलांना त्यांच्या हक्काची जमीन शिल्लक राहिली नाही अशी अपराधीपणाची खंत अनंता सवडे यांना होती. व्यापाऱ्यांनी, दलालांनी टाकलेल्या दबाव यामुळेच बिघडलेल्या मनःशांतीमुळे अनंता यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप खरपुडीचे सरपंच प्रदीप देठे व अनंता सवडे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वधू मिळवून देऊ; लग्नाळू तरुणांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काही जातींमध्ये लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे वधू मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवाभावी संस्थेने काही तरुणांकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोपाळ येथील समायरा जनकल्याण सेवा समितीच्या तीन महिलांना रेल्वे स्टेशन भागातील एका लॉजमधून वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार खुलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्याने या महिला, तसेच फसवणूक झालेल्या तरुणांना खुलताबाद पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.

भोपाळ येथे समायरा जनकल्याण सेवा समिती ही संस्था आहे. या संस्थेची तरनुम्माखान नावाची महिला इतर महिलांसह वेदांतनगर भागातील पद्मावती लॉज येथे घेऊन आली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ग्रामीण भागातील काही तरुणांनी या हॉटेलवर धाव घेतली. कन्नड, खुलताबाद, गंगापूर, सिल्लोड, भोकरदन, सोयगाव या भागातील हे अविवाहित तरूण होते. या महिलांनी लग्नासाठी सेवाभावी संस्थेतर्फे सामूदायिक विवाह लावून देतो असे आमिष दाखवत प्रत्येकी २० हजार रुपये घेतल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. हा गोंधळ वाढल्याने त्याची माहिती वेदांतनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या महिलांना पोलिस ठाण्यात आणले. या महिलांनी विवाहासाठी रक्कम घेतली, मात्र लग्न लावून देत नसल्याचा आरोप या तरुणांनी पोलिसांकडे केला.

महिला, तरुणांना पाठवले खुलताबाद पोलिसांकडे

तरनुम्माखान हिने आपल्या सेवाभावी संस्थेची नोंदणी मध्यप्रदेशात असून आपण गरीब कुटुंबातील मुलींचे सर्वेक्षण करून त्यांचे लग्न सामूदायिक विवाह समारंभात करून देतो, अशी माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. हा प्रकार खुलताबाद पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने फसवणूक झालेले तरूण आणि सबंधित संस्थेच्या महिलांना खुलताबाद पोलिस ठाण्यात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सुषमा पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे माझे मित्र, मला कुणाचे बंधन नाही!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकसभेसाठी मी अपक्ष म्हणून रिंगणात आहे. आता मी स्वतंत्र आहे. कोणासोबत जाण्याला बंधन नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक वाटेल त्यांच्याकडून मदत घेईन. पूर्वी रावसाहेब दानवे यांच्यासोबत राजकीय लडाई होती. आता ते माझे मित्र आहेत,' असे मत कॉँग्रेसचे बंडखोर उमेदवार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड यांना अधिकृत उमेदवारीबाबतचे पत्र मिळताच सत्तार यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर रात्री ११.३०च्या सुमारास विशेष विमानाने ते रावसाहेब दानवेंसोबत मुंबईला रवाना झाले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या घडामोडीबाबत सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, '३६ वर्षांपासून मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता होतो. या कामाची पक्ष नेत्यांनी मला पावती दिली आहे. काँग्रेसच्या बंधनातून मी आता मुक्त झालो आहे. यामुळे मी आता कोणाशीही भेटू शकतो. मुख्यमंत्री किंवा अन्य कोणाकडून मदत मिळाल्यास ती घेण्यात तयार आहे. दानवेयांच्या विरोधात काँग्रेस पक्षात असल्याने मी काम करित होतो. आता ते माझे मित्र आहेत.' दुसरीकडे दानवे यांचे निकटवर्तीय मात्र, 'दोघांनाही मुंबईतला जायचे होते. हा फक्त योगायोगाचा प्रवास होता,' असे मत व्यक्त करतात.

\Bभाजपमध्ये जाणार नाही

\Bसिल्लोड नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच बाजार समितीवर सत्तार यांचे वर्चस्व राहिले आहे. आता काँग्रेस सोडल्यानंतर सिल्लोड नगरपरिषदेसह अन्य बाबींचा विचार करणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, 'याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, भाजपमध्ये जाणार नाही. आता अब्दुल सत्तार मित्र मंडळ क्रियाशिल करणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बसप’तर्फे कुंडल निवडणूक रिंगणात

$
0
0

औरंगाबाद : अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन समाज पक्षाच्या वतीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून जयराज कुंडल यांनी अर्ज दाखल केला.

राज्यात बसप आणि सप या दोन पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. या आघाडीत समाजवादी पक्षाला चार जागा देण्यात आलेल्या असून, उर्वरित सर्व जागांवर बसपचे उमेदवार देण्यात आलेले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. अनेक जणांनी बसपकडून तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडे अर्जही केला होता. अखेर पक्षाने कुंडल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images