Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाढदिवस – रेणुकादास (राजू) वैद्य – स्थायी समिती सभापती, महापालिका.


अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आतापर्यंत सर्वाधिक १६ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले.

यामध्ये कल्याण पाटील, साजीद बेगू पटेल, इम्तियाज जलील सय्यद, शेख खाजा शेख कासिम किस्मतवाला, सुभाष पाटील, हबीब गयास शेख, सुभाष माणकचंद, शेख नदीम शेख करीम, पुरुषोत्तम सिंग ठाकूर, मोहम्मद जाकीर अब्दुल कादर, रवींद्र काळे, जगन साळवे, प्रकाश गायकवाड, खान शहानवाज खान अब्दुल रहेमान, बबन सदाशिवे, विष्णू कदम, राहुल मानकर, विजय भालेराव, सुनील मोरे, शारदा चव्हाण, कृष्णा डोईफोडे यांचे अर्ज दाखल झाल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळवले आहे. यातील काही उमेदवारांनी उमेदवारी अर्जाचा दुसरा संचही दाखल केला आहे. २८ मार्चपासून उमेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत (४ एप्रिल) औरंगाबाद लोकसभेसाठी ४२ उमेदवारांचे ६२ अर्ज दाखल झाले आहेत. आता पाच एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून, आठ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या टँकरला बिडकीनचा रस्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नक्षत्रवाडी येथील पंप हाउसवरून भरले जाणारे जिल्हा परिषदेचे पाण्याचे टँकर आता बिडकीन येथून भरण्याचा निर्णय महापालिका आणि जिल्हा परिषदेने संयुक्तपणे घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध होणारे सुमारे एक एमएलडी पाणी सिडकोसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सिडको-हडकोचा पाणी पुरवठा गंभीर झाला असून सिडको एन ५ व सिडको एन ७ च्या जलकुंभावर दररोज नागरिकांचे आंदोलन होत आहे. परिमाणी, पालिकेची यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. पाण्याचे नीट नियोजन कराण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहरात निर्माण झालेल्या पाणीप्रश्नाबद्दल पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी 'मटा' ला माहिती दिली. ते म्हणाले, ग्रामीण भागासाठी नक्षत्रवाडीच्या पंप हाउसवरून भरल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे टँकर संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली. हे टँकर बिडकीन येथून भरण्याची विनंती त्यांना केली. ही विनंती त्यांनी विनंती मान्य केली. त्यामुळे नक्षत्रवाडी येथे सुमारे एक एमएलडीपर्यंत पाणी उपलब्ध होणार आहे, ते सिडकोसाठी देणे शक्य आहे. याशिवाय विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे. सध्या जायकवाडी धरणातून १२० ते १२३ एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरात जेवढे पाणी येते तेवढे वितरीत केले जाते. जायकवाडी धरणातील पंप हाउसमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी पाणबुडे बोलविले आहेत. अडचणींवर मात करीत पाणी पुरवठा केला जात आहे. सिडकोतील पाणी समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

गॅप वाढवण्याचे नियोजन नाही

शहरात सध्या चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात आणखी 'गॅप' वाढवण्याचे कोणतेही नियोजन नाही. सध्याचाच 'गॅप' खूप मोठा आहे, त्यामुळे त्यात आणखीन वाढ करणे योग्य अयोग्य ठरेल, असे आयुक्त डॉ. विनायक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ साठी मिळेना नगरविकास सचिवांना वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या नवीन प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या सचिवांना वेळ मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाठपुरावा केल्यानंतरही सचिवांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

समांतर जलवाहिनीच्या संदर्भात दोन एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता पुन्हा चार आठवड्याने सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार आहे. तोपर्यंत महापालिका आणि समांतर जलवाहिनीचे काम करण्यासाठी नेमलेल्या कंपनीला ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पालिकेने शासनाकडे समांतर जलवाहिनीचा स्वतंत्र प्रस्ताव पाठवला आहे. समांतर जलवाहिनीसाठी शासनाने दिलेले सुमारे साडेतीनशे कोटी रुपये पालिकेकडे जमा आहेत. त्या निधीतून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे. पालिकेचा हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला आहे. दोन महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी नगरविकास खात्याच्या सचिवांना वेळ मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिकेने पाठपुरावा केला पण सचिवांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सध्या औरंगाबाद शहरात पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. या प्रश्नातून दिलासा देण्यासाठी नगरविकास खात्याने समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नी नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीप्रश्नी सिडकोतील काही नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असून, याबद्दल शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नगरसेवकांनी राजीनामे दिल्यास पालिकेच्या यंत्रणेसाठी ही बाब नामुष्कीची ठरू शकते.

सिडको - हडकोचा पाणीप्रश्न दहा महिन्यांपासून गाजत आहे. एन पाच येथील जलकुंभावरून सिडको - हडकोला पाणीपुरवठा केला जातो. येथूनच दिल्लीगेट, किराडपुरा, हर्सूल, चिकलठाणा, मुकुंदवाडी आदी भागाला देखील पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण भागात सहा ते सात लाख लोकसंख्या असल्याचे मानले जाते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी किमान ३५ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, एवढे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. नागरिक आणि महापालिकेचे प्रशासन यांच्यात समन्वय ठेवता ठेवता नगरसेवकांचा मात्र कस लागत आहे. आपल्या वॉर्डात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नगरसेवकांना रात्री - अपरात्री जलकुंभावरच बसून रहावे लागत आहे. त्यामुळे नगरसेवक कमालीचे त्रस्त आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांबरोबर या भागातील नगरसेवकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अनेकवेळा बैठका झाल्या, पण त्यातून प्रश्न सुटला नाही. त्यामुळे सिडको - हडकोतील काही नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारीच नगरसेवक महापौरांकडे राजीनामे देणार होते. मात्र, परंतु काही नेत्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे बुधवारचा मुहूर्त टळला आहे. आता शुक्रवारी नेतेमंडळींबरोबर चर्चा करून राजीनामा देण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. सिडको - हडको भागातील नागरिक शिवसेना - भाजप युतीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. महापालिकेत युतीची सत्ता असताना या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आता राजीनाम्याचे अस्त्र बाहेर काढले जाण्याची शक्यता आहे.

- संबंधित वृत्त : पान तीन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी शाळांच्या मालमत्ता करातील तफावत दूर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठी शाळांच्या इमारतींना व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारू नये, मालमत्ता करातील राज्यातील तफावत दूर करावी, वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. यावर निर्णय न घेतल्यास अवमान याचिका दाखल करण्याच्या पर्यायावर विचार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची विभागीय बैठक गुरुवारी व्ही. एन. पाटील लॉ कॉलेजमध्ये घेण्यात आली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अनुदान आणि शाळांच्या मालमत्ता कर या विषयावर चर्चा करण्यात आली. मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था लक्षात घेऊन करात सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मालमत्ता कराबाबत जिल्हा बदलला की, कराचे दर वेगवेगळे आहेत. महापालिकेचे दर ही अधिक असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद महापालिकेने अमरावती, नागपूरचा महापालिकेप्रमाणे निर्णय घ्यावा, असे मांडण्यात आले. यासह अनुदानाबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतरही शासनाकडून प्रक्रिया न झाल्याने अवमान याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मिलिंद पाटील, वाल्मिक सुरासे, एस. पी. जवळकर, प्रा. मनोज पाटील, उद्धव भवलकर, शिवाजी बनकर, चंद्रकांत भराट, महेश पाटील, शैलेश विठोरे, आसाराम शेळके, पी. एन. जाधव, विक्रम देशमुख, शेख मन्सूर, उन्मेष शिंदे, नानासाहेब झिंजुर्डे, किरण बोडखे, संध्या काळकर, हेमलता आगडे, सलीम मिर्झा बेग, शिवाजी बनकर, महेश पाटील, आसाराम शेळके, विक्रम देशमुख, हेमलता आगडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला आढळला गुटखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या वाहन तपासणीत चक्क लाखोंचा गुटखा वाहतूक होत असल्याचे समोर आले. बीड बायपास रोडवर वाहन तपासणी करताना कारमधून अशा प्रकारची वाहतूक होत असल्याने पथकाला आढळले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला बोलावण्यात आले. यावेळी तपासणी केली असता एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

करमाड, वाळूजमधील कारवाई नंतर गुरुवारी बीड बायपासवर कारमधून गुटखा वाहतूक होत असताना कारवाई करण्यात आली. कारमधून पान मसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची तपासणी सुरू होती. त्यावेळी एका सँट्रोकारची तपासणी सुरू होती. त्यामध्ये प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखू आढळून आली. त्यावरून अन्न व औषध विभागाला बोलावण्यात आले. त्यानी कारची झडती घेतली असताना जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा प्रतिबंधीत पान मसाला, सुगंधी तंबाखू आणि कार जप्त केली. अन्न सुरक्षा अधिकारी फरीद सिद्दीकी यांनी पंचनामा करून आरोपी हामेद अलि अमजद अली आणि सय्यद अहसान रहेमतुल्ला दोघे, राहणार सिल्क मिल कॉलनी यांच्या विरूद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात कलम ३२८, २७३ व १८८ नुसार आणि अन्न सुरक्षा मानदे कायदा-२००६ चे कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुलेलाल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

$
0
0

औरंगाबाद: सिंधी समाजातर्फे शनिवारी (सहा एप्रिल) सिंधी दिवस, झुलेलाल जयंतीनिमित्त झुलेलाल सेवा समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी प्रभात फेरी, संध्याकाळी सात ते ११ या वेळेत सिंधी कॉलनी येथे 'फनफेअर'चे आयोजन केले आहे. सकाळी साडेअकरा वाजता कंवर कुटिया येथून जवाहर कॉलनी, क्रांती चौक, सिटी चौक, सराफा, शहागंज, लक्ष्मण चावडी येथून सिंधी कॉलनी येथे वाहन फेरीची सांगता होणार आहे. संध्याकाळी पाच पासून वरूणदेव जलाश्रम शहागंज येथून शोभा यात्रा काढण्यात येणार असल्याचे झुलेलाल सेवा समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळच्या प्रश्नावर १० एप्रिलला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या प्रश्नांवर येत्या दहा एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सीटू, किसान सभा व शेतमजूर युनियनने पत्रकान्वये दिली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बुधवारी सीटू कार्यालयात झालेल्या बैठकीला सीटूचे राज्य सचिव अण्णा सावंत, किसान सभेचे राज्य सहसचिव विलास बाबर, किसान सभेचे भगवान भोजने, सुभाषराव काळदाते, एसएफआयचे अनिल मिसाळ आदी उपस्थित होते.

मराठवाड्यात दुष्काळ गंभीर असून पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, रोजगार आदी प्रश्न तीव्र झाले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन व प्रशासनस्तरावर अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. प्रत्येक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तत्काळ पाणी पा‌ळी घ्या, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करा, स्थलांतर थांबवा, दावणीला चारा द्यावा, निम्म दुधना धरणातून दुधना नदी पात्रात पाणी सोडावे, आदी मागण्यांवर चर्चा झाल्याची माहिती भवलकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक खिडकी’तून १०५ परवाने

$
0
0

औरंगाबाद: निवडणूक अधिसूचना जारी झाल्यापासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक प्रचार, मिरवणुका, मिरवणुका, कार्यालय सुरू करणे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील 'एक खिडकी्र सुरू केली आहे. आतापर्यंत १०८ अर्जांपैकी १०५ प्रकरणात परवानगी देण्यात आली आहे. यात निवडणूक प्रचारार्थ वाहनांना देण्यात येणाऱ्या परवानगींची संख्या सर्वाधिक आहे.

ध्वनीक्षेपकासाठी २३, निवडणूक प्रचाराच्या वाहनांवर बॅनर, झेंडा, पताका लावणे ३९ अर्जांत परवानगी दिली आहे. चौक सभा व सर्व प्रकारच्या जाहीर सभेसाठी दोन अर्ज आले, त्यापैकी एक परवानगी देण्यात आली. सभेसाठी महापालिकेची नाहरकत एक, प्रचार कार्यालयाच्या नाहकरतीसाठी एक परवानगी देण्यात आली. प्रलंबित अर्जात चौक सभा व सर्वप्रकारच्या जाहीर सभेची एक, तात्पुरते प्रचार कार्यालय तसेच सभेसाठीचा एक अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन - मच्छिंद्र जगदाळे

$
0
0

औरंगाबाद : सावंगी येथील रहिवासी मच्छिंद्र लक्ष्मण पाटील जगदाळे (वय ६५) यांचे गुरुवारी (चार एप्रिल) निधन झाले. गावातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन भाऊ, सुना, नातू, पुतणे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीडीआर प्रकरणात अभियंता, अनुरेखकाचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित मंजूरपुरा टीडीआर प्रकरणात अखेर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शाखा अभियंता शिवदास राठोड आणि अनुरेखक अझहर अली मोहम्मद अली यांच्या निलंबनाचे गुरुवारी आदेश काढले. 'महाराष्ट्र टाइम्स'ने हे प्रकरण उघड केले होते.

आयुक्तांनी काढलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, 'पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये नगर भूमापन क्रमांक ७६६१मधील इमारतीचे १४४.८० चौरस मीटर क्षेत्र बाधित होते. त्या मालमत्तेच्या मालकांनी बाधित क्षेत्र खासगी वाटाघाटीनुसार दोन एप्रिल १९९७मध्ये पालिकेला हस्तांतरित केले. त्यावेळी मालमत्ताधारकास आठ लाख २५ हजारांचा मोबादला पालिकेने दिला. त्यानंतरही संबंधिताच्या वारसाने पुन्हा त्याच जागेचा टीडीआर स्वरुपात मोबदला मिळण्यासाठी २६ जून २०१६ प्रस्ताव दाखल केला. प्रस्तावाची पाहणी न करता नगररचना विभागातील आवक विभागात तो स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. आरोपीस मदत व्हावी या उद्देशाने या दोन्हीही कर्मचाऱ्यांनी काम केल्याचे दिसून आले. पोलिस तपासाअंती आरोपीस गुन्हा करण्यास सहाय्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पाच डिसेंबर २०१८ रोजी अटक करून सात डिसेंबर रोजी जामिनावर मुक्तता केली. या प्रकारामुळे महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९च्या प्रकरण दोनमधील नियम चारच्या तरतुदीनुसार अटक केल्यापासून (पाच डिसेंबर २०१८) निलंबित करण्यात येत आहे.

निलंबनाचे आदेश निघेपर्यंत हे दोघेही कार्यरत होते का ? या काळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल पालिकेचे प्रशासन आता काय निर्णय घेणार ? या दोन्हीही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या कालावधीपर्यंतचा पगार उचलला असेल तर, त्याचे समायोजन पालिका कसे करणार, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. आयुक्तांनी या दोघांना तत्काळ निलंबित का केले नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविष्कार कॉलनीत फुटली जलवाहिनी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडकोतील अविष्कार कॉलनीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी (चार एप्रिल) रात्री नऊच्या सुमारास फुटली. या भागाला आठ दिवसानंतर पाणी पुरवठा होणार होता. गुरुवारी पाणी पुरवठा झाल्यानंतर जलवाहिनी फुटल्याने अविष्कार कॉलनीतील नागरिकांना पुन्हा चिंता लागली आहे.

सिडको परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने सतत आंदोलन केले जात आहे. अविष्कार कॉलनी वार्डाला गुरुवारी आठ दिवसानंतर पाणी पुरवठा करण्यात आला. या भागातील एका नागरिकाने त्यांच्या घरी बोअर मारला आहे, त्याचा गाळ जलवाहिनीत गेल्यामुळे जलवाहिनी तुंबली व गुरुवारी दुपारी रामेश्वर मेडिकल समोर फुटली होती. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पुन्हा अविष्कार कॉलनी भागातील महादेव मंदिरासमोर जलवाहिनी फुटली. यामुळे आठ दिवसानंतर पाणी मिळालेल्या नागरिकांना आता पुन्हा कधी पाणी मिळणार, याची चिंता सतावत आहे.

अविष्कार कॉलनीत सात दिवसानंतर पाणी पुरवठा होतो. पालिकेचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभारामुळे या परिसराची अवस्था एखाद्या खेड्यासारखी झाली आहे. बेकायदा नळ व नियोजन नसल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

-नारायण आल्हाड पाटील, संतप्त नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांना सुविधा द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व यंत्रणांनी काम करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक ब्रज मोहन कुमार यांनी नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या.

गुरुवारी ब्रज मोहन यांनी नोडल अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे व औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी ब्रज मोहन कुमार म्हणाले, प्रशासनाने मतदानपूर्व आणि मतदानानंतर करावयाची सर्व कामे वेळेत व नियोजनपूर्वक करावीत. पोलिस प्रशासनाने उत्सव, सण आणि जयंती व निवडणूक आदींबाबत पुरक पोलिस बंदोबस्त ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असे नियोजन करावे. स्वीपच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेवटच्या मतदारांपर्यंत मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. मतदान केंद्रांवर संपर्क व्यवस्था, वीज आणि पाण्याबरोबरच महिला आणि दिव्यांग मतदारांना आवश्यक व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी कार्यवाही पार पाडावी. मतदारांना मतदान करताना आवश्यक असलेल्या ओळखपत्रांबाबतही जागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार घेऊन दहशत पसरवणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तलवार बाळगत शहरात दहशत पसरवणाऱ्या कुख्यात गुन्हेगार राहुल संजय सदावर्ते (वय २२ रा. समतानगर) याला क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुधवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अटक केली. याप्रकरणी त्याच्या विरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार राहुल संजय सदावर्ते (वय २२ रा. समतानगर) हा मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मिटकर हॉटेल मागे तलवार घेऊन नागरिकांना धमकावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहून राहुल याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पाठलाग तलवारीसह पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, एसीपी हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक उत्तम मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहुल सूर्यतळ, सय्यद सलीम, राजेश फिरंगे, गजानन मांटे, सतीश जाधव, राजेश चव्हाण, संतोष रेड्डी, विनोद नितनवरे, देवानंद मरसाळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका भरणार वाळूजमधून टँकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ५ आणि एन ७ येथील जलकुंभावरील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी वाळूज एमआयडीसीमधून पाण्याचे टँकर भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याची सुरुवात शनिवारपासून होण्याची शक्यता आहे.

सिडको एन ५ आणि एन ७ येथील जलकुंभावरून ५० टँकरद्वारे दररोज सुमारे ४०० खेपा केल्या जातात. टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यासाठी एन ५ येथील जलकुंभावरून रोज तीन एमएलडी पाणी वापरले जाते. त्यापैकी निम्मे पाणी वाचले, तर सिडको-हडको भागासाठी थोडासा दिलासा मिळेल, असे गृहित धरून पालिकेने एमआयडीसी बरोबर बोलणी केली. एमआयडीसीने किमान पाच एमएलडी पाणी द्यावे, अशी विनंती केली होती. ते मान्य करून एमआयडीसीने वाळूज येथून टँकर भरून घ्या, असे कळविले होते. मात्र, तेथून टँकर भरून आणणे अंतराच्या दृष्टीने अवघड असल्यामुळे एमआयडीसीने सिडको किंवा चिकलठाणा भागात फिलिंग पॉइंट द्यावा, असे प्रयत्न पालिकेने करून बघितले. पण, त्यास यश आले नाही. त्यानंतर पालिकेने आता वाळूज येथून टँकर भरून आणण्याचे ठरविले आहे. तेथून आणलेले पाणी प्रामुख्याने सिडको भागात वितरित केले जाणार आहे. या पद्धतीमुळे सिडको एन ५ जलकुंभावरील ताण काही प्रमाणात कमी होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिन्यांच्या गळत्या तत्काळ दुरुस्त करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पुरवठा योजनेवरील गळत्या तत्काळ दुरुस्त करा आणि पाण्याची उपलब्धता वाढवा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सर्व अधिकाऱ्यांना गुरुवारी दिले.

शहरात पाणी समस्या निर्माण झाल्याने डॉ. विनायक यांनी गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्तांनी गेल्या आठवड्यात पाणी पुरवठ्याच्या कामासाठी काही अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती केली व त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले होते. दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडा, त्यात कसूर ठेऊ नका, असे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. गळती शोधण्यासाठी, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी, दंड आकारण्यासाठी नऊ झोन कार्यालयाच्या अंतर्गत नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांनी देखील नेमून दिलेले काम करावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, विशेष कार्य अधिकारी करणकुमार चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साजापूरमध्ये गुटखा पकडला

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील साजापूर येथे गुटख्यासह सुगंधित तंबाखू असा सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचा मुद्देमालासह एका आरोपीस बुधवार एप्रिल रोजी संध्याकाळी ताब्यात घेतले आहे.

साजापूर येथे बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा बेकायदा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राहुल रोडे यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. या माहितीवरून पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी अन्न औषध प्रशासन विभागास मााहिती देऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचला होता. या पथकाने अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांसह साजापूर येथील जामा मशीद समोर छापा मारला. यावेळी अझरोद्दीन अहेमद बेग (वय २९, भारतनगर, वाळूज, ता. गंगापूर) याला ताब्यात घेतले असून, त्याचा लहान भाऊ आश्रफ हा अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातून निसटला. यावेळी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी करून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गुटखा आणि सुगंधित तंबाखू असा एक लाख ६८ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा माल आरोपीने शेख नदीम नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल रोडे, वरिष्ठ पोलीस हवालदार वसंत शेळके, रामदास गाडेकर, पोना सुधीर सोनवणे, प्रकाश गायकवाड, बाबासाहेब काकडे, शैलेन्द्र अडियाल, बंडू गोरे, मनमोहन कोलमी, राजकुमार सूर्यवंशी, बाळू लहरे, दीपक माने आदींच्या पथकाने केली.

\Bआणखी आरोपी निष्पन्न होतील : पोलिस\B

याप्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागाचे योगेश यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राहुल रोडे हे करीत आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याचे दोघे साथीदार पसार झाले आहेत; तसेच या पदार्थांचा साठा बाळगून त्याची चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर हल्लाप्रकरणी तिघांचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरी जाणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून रस्त्यात अडवून रिव्हॉल्व्हर लावत लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने माराहण केल्याच्या प्रकरणात रतन हिरालाल अग्रवाल, शुभम रतन अग्रवाल व निलंबित पोलिस शिपाई सचिन एकनाथ पालेजा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी फेटाळला.

याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक रवींद्र बाळासाहेब तोगे (३६, रा. विष्णुनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १६ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादीला त्याचा मित्र घरी सोडण्यासाठी जात होता. त्यावेळी संदीप शिंदे याने फिर्यादीची गाडी अडवून फिर्यादीला रिव्हॉल्व्हर लावत मारहाण केली व 'तुला याआधी समजून सांगितले, तुला जीवदान दिले, तरी समजत नाही,' असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी आरोपी रतन हिरालाल अग्रवाल (५०), शुभम रतन अग्रवाल (२०, दोघे रा. विष्णुनगर) व सचिन एकनाथ पालेजा (२९, रा. अरिहंतनगर) या तिघांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला लोखंडी रॉड व हॉकी स्टिकने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले; तसेच फिर्यादीची दहा ग्राम सोन्याची साखळी व खिशातील साडेनऊ हजार आरोपींनी हिसकावून घेतले. फिर्यादीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणात रतन, शुभम व सचिन या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांच्या समस्यांचा शास्त्रीय उहापोह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठांच्या शारीरिक-मानसिक समस्या तरुण किंवा मध्यमवयीन लोकांपेक्षा निश्चितपणे वेगळ्या असतात, त्यावर घाटीमध्ये गुरुवारी (चार एप्रिल) झालेल्या परिषदेत लक्ष वेधत शास्त्रीय पद्धतीने उहापोह करण्यात आला. देशातील शासकीय रुग्णालयांमधील तिसऱ्या, तर महाराष्ट्रातील पहिल्याच वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) विभागात ही परिषद घेण्यात आली.

घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. राजन बिंदू व डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, परिषदेच्या निरीक्षक डॉ. वर्षा रोटे आदी उपस्थित होते. परिषदेत घाटीच्याच वेगवेगळ्या विभागांच्या प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. वार्धक्यशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा राव यांनी, ज्येष्ठ रुग्णांसाठी कमी तीव्रतेच्या, कमीत कमी दुष्परिणाम होणाऱ्या व मर्यादित औषधांचा उपयोग करावा, असे सांगितले. वयानुसार क्षीण होणारी दृष्टी, मोतीबिंदू, काचबिंदू व इतर नेत्रविकारांकडे नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ-वृद्धांना घालून-पाडून किंवा टाकून बोलू नये, असे सांगतानाच मुलांना आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे कायद्यानुसार कसे बंधनकारक आहे, याची जाणीव रोगप्रतिबंध व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. स्मिता आंदुरकर यांनी करून दिली. ज्येष्ठांची शरीरक्रिया व शरीररचनेविषयी डॉ. अंजली शेटे व डॉ. लईक मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले. वयाच्या ७० ते ७५ वर्षांनंतर ३५ ते ४० टक्के वृद्धांना ऐकू येण्याची समस्या उद्भवते. श्रवणयंत्रांची गरज व प्रकारांवर कान-नाक-घसा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. वसंत पवार यांनी मार्गदर्शन केले. वार्धक्यशास्त्राच्या आजच्या काळाच्या गरजेविषयी डॉ. बोरकर यांनी मार्गदर्शन केले.

\Bज्येष्ठांना बोला, ऐका, वेळ द्या\B

प्रत्येक घरात ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांना अडगळ न मानता, ज्येष्ठांचे ऐकून घ्या, त्यांच्या बोला, बोलते करा व त्यांना दररोज थोडा का होईना जरूर वेळ द्या, असेही आवाहन डॉ. येळ‌ीकर यांनी परिषदेत केले. या परिषदेचा दीडशेपेक्षा जास्त डॉक्टरांनी लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images