Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मोदींनी केसाने गळा कापला- राज ठाकरे

$
0
0

नांदेड :

'नरेंद्र मोदी या माणसावर मी विश्वास टाकला होता मात्र त्यांनी केसाने गळा कापला. मोदी आणि शहांबद्दल माझ्या मनात प्रचंड राग आहे. त्या रागातूनच लोकसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचा उमेदवार उभा नसतानाही मी प्रचारात उतरलो आहे', अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमधील सभेतून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

मी कुणाचाही प्रचार करायला आलो नाही. मोदी-शहा ही दोन नावे देशाच्या राजकीय क्षितिजावरून दूर जाणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण मतदान करावे, ही माझी विनंती आहे, असे आवाहन राज यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांच्या राजस्थानातील चुरू येथील भाषणाचा दाखला देत राज यांनी टीकास्त्र सोडले. चुरू येथील व्यासपीठावर शहीद जवानांचे फोटो लावण्यात आले होते. त्यावर बोट ठेवत 'शहीद जवानांचे फोटो लावून भाषणे करायला लाजा वाटत नाहीत का?' असा संतप्त सवाल राज यांनी केला.

राज यांचे फटकारे...

> बेरोजगारीचे आकडे लपवत आहेत. शेतकरी आत्महत्यांचे आकडे लपवले जात आहेत. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. तुम्हाला आयुष्यभर मोदी आणि शहांचे गुलाम बनून राहायचे आहे का?

> नरेंद्र मोदींच्या सभेत म्हणे कोणी काळा शर्ट घालून आला तरी बाहेर काढलं जात आहे. पंतप्रधान काळ्या रंगाला का घाबरतात? याला कारण जे २०१४ला बोलले होते ते पूर्ण करता आले नाही म्हणून आता हे घाबरलेत.

> योगी आदित्यनाथ म्हणाले, देशाची सेना ही म्हणे मोदींची सेना आहे आणि आज मोदींनी नव-मतदारांना आवाहन केलं की तुमचं पहिलं मत हे बालाकोटचा एअरस्ट्राइक करणाऱ्या सैन्यासाठी, पुलवामाच्या वीर शहिदांसाठी द्या. जवानांच्या नावावर मत मागताना लाज नाही वाटत?

> नोटबंदीमुळे जवळपास ४ कोटी लोकांचा रोजगार गेला, हा अधिकृत आकडा आहे पण ह्या विषयावर मोदी बोलायला तयार नाहीत.

> 'मन की बात' ही कल्पना मुळात हिटलरची आहे.

> मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत, स्वत:च्या कामाबद्दल ते कधी बोलणार? बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार?

> संपूर्ण बहुमताचं सरकार देशाने मोदींच्या हातात दिलं पण त्यांनी काय केलं? नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलं.

> बीडमध्ये महिलांची गर्भाशयं विकली जात आहेत, चौकीदार करतो काय?

> नरेंद्र मोदी नांदेडला येऊन गेले पण शेतकऱ्यांबद्दल बोलले नाहीत. मोदी-फडणवीस सत्तेत आल्यापासून १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. दुष्काळामुळे गावंच्या गावं विस्थापित होत आहेत. हेच का अच्छे दिन?

> भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणतात की, सैन्याच्या कारवाईचे पुरावे शहिदांचे नातेवाईक मागत असतील तर ते देशद्रोही आहेत! ही असली विधानं करवतात कशी या भाजपच्या नेत्यांना.

> महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडतोय आणि दुसऱ्या मार्गाने पाणी गुजरातला वळवलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यावर काहीच बोलत नाही कारण हा तर बसवेलला मुख्यमंत्री.

पाहा: राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोदींच्या खोटेपणाचा राज ठाकरेंकडून पंचनामा

$
0
0

नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातील विसंगती चव्हाट्यावर आणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या खोटेपणाचा पंचनामा केला आहे. राज यांनी जाहीर सभांमध्ये मोदींच्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून मोदींची पोलखोल करण्याचा सपाटा लावल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

राज ठाकरे यांची आज नांदेडला प्रचंड मोठी सभा झाली. या सभेत राज यांनी मोदी आणि त्यांच्या पाच वर्षाच्या कारभारावर टीका करतानाच मोदींच्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणातील विसंगतीचे व्हिडिओ दाखवून मोदी कसे खोटे बोलून जनतेची फसवणूक करत आहेत हे दाखवून दिले. शहीद भगत सिंग यांना तुरुंगात भेटण्यासाठी नेहरु कधीच गेले नव्हते, असा दावा मोदींनी केला होता. मोदींचा हा दावा फेटाळून लावतानाच त्याकाळातील 'ट्रिब्यून' या इंग्रजी वर्तमानपत्राचा राज यांनी दाखला दिला. मोदींचा इतिहास कच्चा आहे. नेहरु एकदा नाही तर दोनदा भगत सिंग यांना भेटून आले होते. तशी बातमीच ट्रिब्यूनमध्ये छापून आली होती, असं सांगत राज यांनी मोदी धादांत खोटं बोलत असल्याची टीका केली.

मोदींची पोलखोल

>> एका सभेत मोदी म्हणाले की, माझ्या जीवाला धोका आहे. तर दुसरीकडे मोदी म्हणाले, देश माझ्या हातात सुरक्षित आहे. काय बोलताय... एकदा म्हणता माझ्या जीवाला धोका आहे आणि दुसरीकडे म्हणत आहेत देश सुरक्षित आहे, नक्की काय खरं आहे? बरं हे बोलताना मागे फोटो शहीद जवानांचे फोटो लावलेत. लाज नाही वाटत?, असं सांगत राज यांनी मोदींच्या या दोन्ही भाषणांचे व्हिडिओ दाखवले.

>> बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडेही नाही. पण २५० माणसं मारली गेली असा दावा अमित शहा करत आहेत. शहांना कुठून मिळाला हा आकडा?, असा सवाल त्यांनी केला.

>> मोदींनी जे प्रधानसेवक आणलं, ते वाक्यही जवाहरलाल नेहरुंचं आहे. दिल्लीतल्या स्मृती भवनमध्ये मोठी पाटी आहे, त्या पाटीवर पंडित नेहरुंचं वाक्य लिहिलं आहे. फक्त त्यांनी वेगळा शब्द वापरला आहे. नेहरुंचं वाक्य असं आहे, 'यह देश की जनता मुझे प्रधानमंत्री कहके ना पुकारे, इस देश की जनता मुझे प्रथमसेवक कहके बुलाए.' ते 'प्रथमसेवक' यांनी 'प्रधानसेवक' केलं,' असं सांगत नेहरुंवर टीका करणारे त्यांचीच कॉपी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कुठे आहेत एक लाख विहिरी?

यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडतोय आणि दुसऱ्या मार्गाने गुजरातला पाणी वळवलं जात आहे. त्यावर फडणवीस काहीच बोलत नाहीत. कारण हा तर बसवेलला मुख्यमंत्री, असा टोला राज यांनी हाणला. राज्यात १ लाख २० हजार विहिरी खणल्याचं फडणवीस म्हणतात. कुठे आहेत या विहिरी? फडणवीस काय आणि मोदी काय दोघेही देशानं बहुमत दिल्यानंतर काम करायचं सोडून खोटं बोलत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्रात २४ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. मग तुम्ही पाण्यावर काय काम केलं? ही राज्याची अवस्था... काय करत आहेत फडणवीस. बीडमध्ये महिलांचं गर्भाशयं विकली जात आहेत, चौकीदार करतो काय?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीवर चाकूने वार; पतीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिविगाळ करीत पत्नीवर चाकूने वार करून तिला जखमी करणारा मद्यपी पती सय्यद नय्युम सय्यद चांद याला सहा महिने सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठाविली. दंडाच्या रकमेपैकी दीड हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

या प्रकरणी २५ वर्षीय पीडित पत्नीने तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीनुसार, १५ मार्च २०१६ रोजी पीडिता घरी असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आरोपी पती सय्यद नय्युम सय्यद चांद (२९, रा. इंदिरानगर, गारखेडा) हा दारू पिऊन आला. त्याने पत्नीला 'घरातून जा, पैसे आण' असे म्हणत वाद घालत पत्नीला शिविगाळ करून चाकूने वार केला. तसेच याबाबत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. प्रकरणात पीडितेने दिलेल्या तक्रवारीवरुन आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ३२४, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या ३२४ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, ५०४ कलमान्वये ५ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व कलम ५०६ अन्वये ५ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई मन्सूर हुसेन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचे अपहरण, अत्याचार; दोघांना सात वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर विविध ठिकाणी अत्याचार करणारे फकीरचंद पांडुरंग दाभाडे व पंढरीनाथ भीमराव हिवर्डे यांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली.

ही पीडित मुलगी सायंकाळपर्यंत घरी परतली नाही म्हणून तिच्या वडिलांनी मुकुंâदवाडी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती. दरम्यान, १४ ऑगस्ट २०१५ रोजी तक्रारदाराने पुरवणी जबाब नोंदविला असता, त्यात फकीरचंद पांडुरंग दाभाडे (वय ५५, रा. मुकुंâदनगर) याने दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले. दाभाडेने मुलीला त्याचा मित्र पंढरीनाथ भीमराव हिवर्डे (वय ३२, रा. राजणगांव) याच्या खोलीवर नेले. त्यानंतर दाभाडेने बजाजनगरात खोली भाड्याने घेतली व त्या ठिकाणी तो मुलीला घेऊन राहू लागला. त्याच खोलीत त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर पंढरीनाथ हिवर्डेच्या कारमधून बुलडाणा जिल्ह्यातील सुंदरवाडी येथे देवदर्शनाला नेले. त्यावेळी दाभाडे काही कामानिमित्त बाहेर गेला असता हिवर्डेनेही तिच्यावर अत्याचार केले, असे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम ३६३, ३६६, ३७६ (ड) तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\B... तर आणखी एक वर्ष शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहायक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात पीडित मुलगी, वडील, खोली मालकाची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यावरून न्यायालयाने दोघांना भारतीय दंड संहितेच्या ३७६ (ड) कलमान्वये सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरी, तर भारतीय दंड संहितेच्या ३६६ कलमान्वे दोघांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करचुकवेगिरी करणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ई - वे बfल नियमांचे पालन न करता करचुकवेगिरी करणाऱ्या पाच वाहनांविरोधात केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने (सीजीएसटी) कारवाई केली. संबंधितांकडून कर व दंडासह एकूण तीन लाख ४५ हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला असून, दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती आयुक्त के. व्ही. एस. सिंग यांनी दिली.

एक जून २०१८पासून सर्वत्र जीएसटी कायद्यांतर्गत ई - वे बिल प्रणाली लागू झाली आहे. नियमांचे पालन न करता करचुकवेगिरी करणाऱ्यांवर सीजीएसटी विभागाने करडी नजर ठेवली आहे. त्यानुसार विभागाने औरंगाबाद जालना महामार्गावर सहा तसेच दहा एप्रिल रोजी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली. त्यात पाच वाहनधारकांनी ई - वे बिल नियमाचे पालन केले नसल्याचे आढळून आले. ट्रकमधील माल व त्यांच्या किंमतीनुसार ई - वे बिल भरणे आवश्यक होते. करचुकवेगिरीचा प्रकार लक्षात येताच 'सीजीएसटी'च्या अधिकाऱ्यांनी त्वरित या वाहनांवर कारवाई केली. यात पहिल्या कारवाईमधील तीन वाहनामध्ये २८ टन स्टील असून त्याची वाहतूक पुणे वैजापूर, पारनेर, गोंदिया व औरंगाबाद येथे करण्यात येत होती. या वाहनधारकांकडून कर व दंडासह एकूण पावणे चार लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.

तर दुसऱ्या घटनेत दोन वाहनांवर कारवाई केली. याही वाहनातून सुमारे २८ टन स्टीलची वाहतूक केली जात होती. वाहनचालकांकडे ई - वे बिल नसल्याचे समोर आले असून, एक चालक पसार झाला आहे तर दोन्ही वाहने कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी रावसाहेब खेडकर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले असून, अध्यक्षपदी रावसाहेब खेडकर तर सचिवपदी विनोदकुमार लोहाडे यांची झाली.

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात सहकार पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणी निवडीत अध्यक्ष म्हणून रावसाहेब खेडकर, सचिव विनोदकुमार लोहाडे, कोषाध्यक्ष निखिल सारडा, उपाध्यक्ष शैलेंद्र रावत यांची निवड करण्यात आली. उर्वरित पदाधिकाऱ्यांमध्ये ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी अजहर खान, सहसचिव शहर नितीन दांडगे, ग्रामीण सागर पाटील, कार्यकारिणी सदस्य पवनचंद सिगी, मनोहर कोरे, बाबुराव सोनवणे, शेख अब्दुल रईस, कपिल टिबडीवाला, किरण जोशी, सुनील देशमुख, प्रभू गिरी, जुगलकिशोर लोहिया, सुरेश बोरसे, अशोक धस यांची निवड करण्यात आली. निवडणूक प्रकियेसाठी जालना केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष साईनाथ पवार व पदाधिकारी तसेच मराठवाडा केमिस्ट असोशिएनचे अध्यक्ष चंद्रशेखर गाडे, संघटन मंत्री सुधीर मंत्री, सचिव दिलीप ठोले, बद्रीनाथ तोष्णीवाल यांचे सहकार्य मिळाले. राजन हौजवाला व महावीर डोसी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या कमी खेपांमुळे टंचाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

तालुक्यात टँकरच्या मंजूर खेपा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करताना प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे आहे. या टंचाई काळात अधिग्रहण विहीर मालक, टँकरचालक वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप आहे.

यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यात बहुतांश जलसाठे कोरडे पडल्याने दिवाळीपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. काही गावात तर पावसाळ्यात ही टँकर सुरू होते. सध्या तालुक्यातील ८१ गावांना १५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये एकूण दोन लाख ७५ हजार नागरिक राहतात. या १५२ टँकरच्या ३०४ खेपा मंजूर आहेत. जांभई, केळगाव, गोकुळवाडी व पिशोर, नेवपूर (ता. कन्नड) येथून टँकर भरले जातात. परंतु, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने नियोजित खेपा पूर्ण होत नाहीत. यात अधिग्रहण केलेल्या विहिरींचे मालक एक-दोन टँकर भरून देत आहे. वास्तविक पाहता टंचाई काळात अधिग्रहण विहिरीचे अधिकार हे प्रशानाच्या हाती राहतात. परंतु, विहीर मालक त्याला न जुमानता मनमानी करीत असल्याचा आरोप आहे. जांभई येथील जलशुद्धीकरण केंद्रावर २५ ते ३० गावांचे टँकर भरले जातात. परंतु, येथे दिवसभरात १५ ते २० टँकर भरले जात असल्याने निम्मे टँकर भरले जात नाहीत. येथे दिवसभर टँकरची रिघ लागलेली असते. अशा अनेक अडचणींमुळे नियोजित खेपा होत नसल्याने टंचाईच्या गावांमध्ये नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

\Bटँकरलॉबीचे उखळ पांढरे \B

नियोजित खेपा पूर्ण करण्यात टँकरचालक ही आपली मनमानी करीत वेळकाढूपणा करीत आहेत. वेगवेगळी कारणे पुढे करीत पाणी टंचाईत भर घालत आहे. टंचाई काळात आपले उखळ पांढरे करण्याचे काम टँकरलॉबी करीत असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरज आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

याबाबत मला माहीत नाही. टँकर भरण्यास अडचण निर्माण होणार नाही. यासाठी सर्वतोपरी नियोजन करीत आहोत. तरी देखील नियोजित खेपा होत नसतील, तर याची माहिती घेऊन तत्काळ नियोजन केले जाईल व पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.

-प्रकाश दाभाडे, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स व्यवसायात फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवणूक करावयास भाग पाडून दोघांची पावणे बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जून २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत हा प्रकार उल्कानगरी, खिंवसरा पार्क येथे घडला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोहन अप्पासाहेब हाडे (वय ५० रा. श्रीहरी पार्क, श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) यांनी तक्रार दाखल केली. हाडे हे एसएफएस स्कूलमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. संशयित आरोपी अनिल नवनाथ गिरी (रा. श्रीकृष्णनगर) हा त्यांच्या जुन्या परिचयाचा होता. हाडे यांनी त्यांचे मित्र कैलास पवार यांनी गिरी सोबत टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी हाडे आणि पवार यांनी वारंवार रक्कम गुंतवली. या तिघांच्या फर्मचे संयुक्त खाते विजया बँकेत उघडण्यात आले. मात्र सहलीपोटी जमा झालेल्या रक्कमा गिरी याने त्याच्या जुन्या एक्पाँडेबल हॉलिडे नावाच्या खात्यावर जमा केल्याचे हाडे यांना दिसून आले. हाडे यांनी त्याला त्यांच्या ११ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली असता गिरी याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे हाडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत चौकशी केल्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपी अनिल गिरी विरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर हे तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीदार लढ्यासाठी नगरसेवकांचा शड्डू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीप्रश्नावर वेगवेगळे आंदोलन करून काहीच तोडगा निघत नसल्याने, आता एकत्रित येऊन पाण्यासाठी पाणीदार लढा उभारण्यासाठी सिडको - हडकोतील नगरसेवक आणि नागरिक नियोजनाची मोट बांधत आहेत. हे आंदोलन ऐन मतदानाच्या तोंडावर करायचे की मतदानानंतर पालिकेच्या यंत्रणेला कोंडीत पकडायचे, या बद्दलचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाणार आहे.

सिडको -हडको भागातील तीव्र पाणी टंचाईमुळे एन पाच आणि एन सात येथील जलकुंभावर जावून नागरिक आंदोलन करीत आहेत. मात्र, प्रश्न सुटत नसल्याने आता त्या - त्या वॉर्डच्या नगरसेवकांना देखील त्यांच्याबरोबर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. काही नगरसेवक थेट जलकुंभाचा ताबा घेऊन टँकरचा पाणीपुरवठा बंद करणे, इतर भागासाठी होत असलेला पाणीपुरवठा बंद करून आपल्या वॉर्डसाठी पाणी वळविणे असे प्रकार सुरू आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी तेवढ्यापुरती सोय करतात, पण त्यानंतर पाणीप्रश्न पुन्हा जैसे थे राहतो. त्यामुळे आता वेगवेगळे आंदोलन न करता सिडको - हडकोतील नागरिक व नगरसेवकांनी एकत्रित येत महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची रणनीती आखली जात आहे. या संदर्भात नगरसेवक शिवाजी दांडगे म्हणाले, 'पालिका प्रशासनाने पाणीप्रश्नातही फोडा आणि झोडा नीती अवलंबली आहे. त्यामुळे प्रश्न सुटत नाही, उलट नगरसेवक व नागरिकांमध्ये भांडणे लागतात. पालिका प्रशासनाची ही नीती आमच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता सिडको - हडकोतील सर्व नगरसेवक व नागरिक पालिकेच्या विरोधात एकत्रित आंदोलन करतील. या आंदोलनाचा निर्णय सर्वांशी चर्चा करून लवकरच घेतला जाणार आहे. एकीची ताकद दाखवून दिल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. तशी नागरिकांची मानसिकता देखील तयार झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांना देखील आता मागे राहता येणार नाही.'

सिडको-हडको भागातील पाणीप्रश्न मोठे आंदोलन उभारल्याशिवाय सुटणार नाही. यात नगरसेवकांनाही मागे राहता येणार नाही. त्यामुळे आंदोलनाबाबतचा निर्णय सर्वांशी चर्चा करून लवकरच घेणार आहोत.

- शिवाजी दांडगे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बस पोल उभारणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी बससाठी स्मार्ट बसथांबे बांधण्याच्या कामाला विलंब लागत असल्यामुळे बसथांब्यांच्या जागेवर बस पोल उभारण्याचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. शहरभरात ३७० पोल उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १५० पोल पहिल्या टप्प्यात उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. १५० पैकी २५ टक्के बस पोल उभारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी बस पोल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मार्गावर बस पोल उभारण्यात येत आहेत त्या पोलवर सिटी बसचे क्रमांक लिहिले जाणार आहेत. प्रवाशांना बस क्रमांकावरून कोणती बस कुठे जाणार आहे हे लक्षात येणार आहे. बस पोलच्या जागी सिटी बस उभी करण्यासाठी पिवळ्या रंगात विशिष्ट प्रकारचे मार्किंग करण्यात आले आहे. केलेल्या मार्किंगमध्येच सिटी बस उभी करावी, असे बस चालक आणि वाहकाला सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध भागातून मिरवणूका निघणार आहेत. मुख्य मिरवणूक ही क्रांती चौक येथून सुरुवात होऊन पैठणगेट, गुलमंडी, सिटी चौकमार्गे भडकल गेट येथे समारोप करण्यात येणार आहे. या मिरवणुकीच्या काळात वाहतुकीस गैरसोय होऊ नये म्हणून काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यावेळी बंद करण्यात आलेले आणि पर्याय मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. ही व्यवस्था रविवारी सकाळी दहापासून रात्री बारापर्यंत करण्यात आली आहे. यातून पोलिस, रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाच्या वाहनांना वगळले आहे.

\Bबंद मार्ग\B

- क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक, जुना बाजार आणि भडकलगेट

- शहागंज, गांधीपुतळा, सराफा, सिटी चौक

- औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजिया

- एन १२ नर्सरी ते गोदावरी पब्लिक स्कूल, टीव्ही सेंटर, सिडको एन ९, आयोध्यानगर, शिवनेरी कॉलनी, सिडको एन ७ शॉपिंग सेंटर या मिरवणूक मार्गावरील वाहतूक मिरवणूक सुरू असेपर्यंत एकेरी मार्गावरून वळवण्यात येईल.

\Bपर्यायी मार्ग\B

- सतीष मोटार्स, सावरकर चौक, निराला बाजार, औरंगपुरा

- चेलीपुरा कामाक्षी लॉज, महापालिका कार्यालय

- जळगावकडून येणारी वाहने हर्सूल टी पॉइंट, जळगाव टी, क्रांती चौक उड्डाणपुलावरून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातील. तसेच मिलकॉर्नर येथून वळून याच मार्गे जातील.

- अहमदनगरकडून येणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टी, हर्सूल टी पॉइंटमार्गे जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक हजार मतदारांनी घेतली मतदानाची शपथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम कम्युनिटी रेडिओच्या वतीने मतदारांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने युवक, प्राध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांना शुक्रवारी (१२ एप्रिल) मतदानाची शपथ देण्यात आली. यामध्ये जवळपास एक हजार मतदारांनी सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, विषेश पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांची उपस्थिती होती.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. येत्या २३ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे व इतरांनाही मतदान करण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन उदय चौधरी यांनी केले. औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी उपस्थित मतदार, विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाने मतदान करावे, ते प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहेच. त्यातूनच बळकट लोकशाही निर्माण होण्यास मदत होते. मतदान करण्याबाबत इतरांनाही त्यांच्या या हक्काबाबत सांगावे. समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहनही सिंघल यांनी केले. या कार्यक्रमास एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. अपर्णा कक्कड, एच. एम. देसरडा, डॉ. पी. वाय. कुलकर्णी, ॲड. एस. के. कदम, एमजीएमच्या जनसंवाद व वृत्तपत्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रेखा शेळके, रेडिओ कम्युनिटी सेंटरच्या कार्यक्रम प्रमुख अश्विनी दाशरथे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात हल्ला; दोघांना अटक, पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिसांसमोर हल्ला केल्याच्या प्रकरणात कुख्यात बाबला याचा पिता असद उर्फâ शेख मोहसीन शेख लाला व शमशुद या दोघांना अटक करुन कोर्टात हजर केले असता, दोघांना शनिवारपर्यंत (१३ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिले. शेख जब्बार खून खटल्याची सरतपासणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या कोर्टात झाली. या खून खटल्याची साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेला व एका पुरुषाला शिविगाळ करत कुख्यात आरोपी बाबला, अमजद व त्याच्या वडिलाने लाथाने तुडवुत मारहाण केली. शेख सत्तारच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात बाबलाचा पिता असद उर्फ शेख मोहसीन शेख लाला (६२, रा. जटवाडा), शमशुद या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोघांना अटक करुन कोर्टात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन टॉवर कंपन्यांनी चार कोटी कोर्टात भरले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंडस टॉवर आणि एटीसी टॉवर या कंपनींनी टॉवर्सच्या मालमत्ता करापोटीचे चार कोटी रुपये हायकोर्टात जमा केले. या कंपन्यांनी मालमत्ता कराबद्दल हायकोर्टात दावा दाखल केला होता. या संदर्भात शुक्रवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने संबंधित कंपन्यांना थकीत मालमत्ता कर महापालिकेकडे भरावा असे आदेश दिले. त्यानुसार कंपन्यांनी चार कोटी रुपये हायकोर्टात जमा केले. ही माहिती कर निर्धारक व संकलक महावीर पाटणी यांनी दिल्याचे जनसंपर्क विभागाकडून कळविण्यात आले आहे. या प्रकरणात महापालिकेच्या विधी सल्लागार अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. संभाजी टोपे यांनी महापालिकेतर्फे काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदावनत केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीवर निर्णय घ्या

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पदावनत करण्यात आलेल्या याचिकाकर्त्या केंद्रप्रमुखांना नवीन नियमावलीनुसार पदोन्नती देण्यासंदर्भात १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी नगर जिल्हा परिषदेला दिले.

जिल्हा परिषद, नगर अंतर्गत पदावनत केंद्रप्रमुख दिलीप दहिफळे, सूर्यभान काळे, उदयकुमार सोनावणे आणि इतर यांनी खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. राज्य शासन सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांमधून केंद्रप्रमुखांच्या नियुक्त्या करायचे. मात्र २० फेब्रुवारी २०१८ रोजी राज्य शासनाने आधीची प्रक्रिया रद्द करून ३० टक्के सेवाज्येष्ठता, ३० टक्के विभागीय परीक्षा आणि ४० टक्के सरळ सेवा भरती याद्वारे केंद्रप्रमुखांची निवड करण्याचे आदेश दिले. तसेच १० जून २०१४ पूर्वी नियुक्त केंद्रप्रमुखाना कायम करून त्यानंतरच्या केंद्रप्रमुखानं पदावनत करून पूर्वपदावर कार्यरत करण्याचे आदेश दिले.

या शासन निर्णयाला विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सुनावणीअंती या पदावनत प्रक्रियेला स्थगितीही मिळाली. मात्र याचिकाकर्त्यांच्या पदावनती प्रक्रिया याआधीच झाल्या असल्याने ते या स्थगितीपासून वंचित राहिले आणि नाईलाजाने शिक्षक म्हणून काम करू लागले. याचिकेत म्हणणे मांडण्यात आले की याचिकाकर्ते हे ३० टक्के सेवाज्येष्ठता पदोन्नतीमध्ये मोडत असतानाही त्यांना पदावनत करण्यात आले. तसेच पदावनत करण्यापूर्वी त्यांना पूर्वसूचना, बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. याचिकाकर्त्यांतर्फे अविनाश खेडकर यांनी काम पाहिले.

\Bअसा आहे आदेश \B

याचिकांवर सुनावणीअंती खंडपीठाने ३०-३०-४० हा नियम कायम ठेवून याचिकाकर्त्यांना ३० टक्के पदोन्नती आणि ३० टक्के विभागीय परीक्षेद्वारे देण्यात येणाऱ्या पदोन्नतीत समाविष्ट करण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिचर्या प्रशिक्षण केंद्रात हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

पडेगाव येतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य किरण जाधव व इन्स्ट्रक्टर सुनीता रायपुरे यांच्यात शुक्रवारी (१२ एप्रिल) दुपारी जोरदार हाणामारी झाले. हे प्रकरण छावणी पोलिसांपर्यंत गेले आहे. दरम्यान, रायपुरे यांनी पोलिसांत जाधव यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली आहे.

पडेगाव येथे परिचर्या प्रशिक्षण केंद्र व मुलींचे वसतिगृह आहे. येथे गेल्या काही महिन्यांपासून प्राचार्य व कर्मचाऱ्यांत धुसफूस सुरू आहे. शुक्रवारी दुपारी त्याला पिण्याच्या पाण्यावरून तोंड फुटले. पिण्याचे पाणी कमी पडते त्यामुळे ते तुम्ही वापरू नये, असे म्हणत प्राचार्य जाधव यांनी भांडण उकरून काढल्याचे सुनीता रायपुरे यांनी सांगितले. त्यांनी सफाई कामगार तसलीम शेख यांच्या मदतीने मला मारहाण केली, असेही सांगितले. दरम्यान, छावणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये प्राचार्या जाधव या सतत अपमानजनक बोलतात, असेही नमूद करत शुक्रवारी झालेला घटनाक्रम व प्रशिक्षण केंद्रातील यापूर्वी झालेल्या कुरबुरीचा उल्लेख करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. 'मी वरिष्ठ असल्याने भविष्यात प्राचार्य होऊ शकते यावरून कट करून मारहाण केली,' असे रायपुरे यांनी सांगितले. त्या इतर कर्मचारी व विद्यार्थिनींना धमकावत असतात, असा आरोपही त्यांनी केली. या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये मात्र घबराट पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच्या या बेबनावामुळे विद्यार्थिनी वैतागल्या आहेत.

\Bपोलिस आयुक्तालयात प्राचार्यांची धाव \B

दरम्यान, प्राचार्य किरण जाधव यांची बाजू माहित करून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. घटनेनंतर रायपुरे छावणी पोलिस ठाण्यात, तर प्राचार्य जाधव या पोलिस आयुक्तालयात गेल्याची माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरी जलशातून व्यवस्थेवर कठोर प्रहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्य मांडत लोकशाहीर संभाजी भगत यांनी जलशातून जातीभेदपासून राजकीय, तसेच समाज व्यवस्थेतील दोषांवर प्रहार करत प्रबोधन केले.

हा कार्यक्रम पसायदान प्रतिष्ठाणतर्फे महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. 'मले भीम भेटतो बाई.., शेतात भीम पाहतो बाई, क्रांतीवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर भीमराव आंबेडकर, धन्य ते भीमराव आंबेडकर, जी जी राजे शिवबा जी,' आदी गीते, पोवाडे त्यांनी सादर केले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी.चव्हाण, आमदार संजय शिरसाट, चंद्रकांत भराट, वाल्मिक सुरासे, प्रतिष्ठाणचे राजेंद्र वाळके, राकेश गांगुर्डे, उमेश निकम, भारत चव्हाण, विष्णू देवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रुपेश मोरे यांनी केले, तर सिद्धेश्वर जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चौधरी, डॉ. लाळेंसह मोहितेंचा जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अॅट्रॉसिटी'अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ प्राचार्य डॉ. गोविंद चौधरी, उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व प्रशासकीय अधिकारी रत्नमाला मार्तंडराव मोहिते यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. के. के. सोनवणे यांनी मंजूर केला. अटकपूर्व जामीन मंजूर करताना कायद्याचे कलम १८ (अ) कशाप्रकारे विचाराधीन आहे, यासंबंधी आदेशात स्पष्ट केले आहे.

प्रशिक्षण केंद्रातील साथरोग शास्त्रज्ञ वर्ग १ अधिकारी डॉ. रेखा गोवर्धन गायकवाड यांनी कार्यालयीन वादामुळे तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रार दिली होती. तिघा अधिकाऱ्यांनी मुद्दामहून त्रास देत अपमानास्पद वागणूक दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. रजेच्या कालावधीचे पैसे वेळेवर न देऊन आर्थिक व मानसिक त्रास दिला. प्रवास भत्ता उशिरा देणे, वाहन उपलब्ध करुन न देणे, स्टेशनरी वेळेवर न देणे, वरिष्ठ कार्यालयास नेमणूक चुकीची कळविणे आदी कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले. संबंधित तक्रारीच्या आधारे वेदांतनगर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात अटकपूर्व जामिनासाठी तिघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. कायद्याच्या कलम १८ (३) नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद कायद्यात नसल्याने सत्र न्यायालयाने ५ मार्च व १३ मार्च २०१९ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्याविरोधात खंडपीठात अपील करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने सर्व बाजूंचा विचार करुन तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. तिघा अर्जदारांच्या वतीने अॅड. संभाजी टोपे, अॅड. निलेश घाणेकर व अॅड. जे. व्ही. देशपांडे यांनी बाजू मांडली. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर, तर मूळ तक्रारदार डॉ. रेखा गायकवाड यांच्यातर्फे अॅड. यू. एल. तेलगावकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी पिस्टल बाळगणारे दोघे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेकायदा गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन पिस्टलसह एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. या नुसार, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री गंगापूर पोलिसांना त्यांच्या हद्दीतील मौजे मुद्देश वडगाव आणि मांजरी शिवारातील भुसारे वस्ती येथे दोघांकडे अनाधिकृत पिस्टल असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून या दोन्ही संशयितांच्या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपी अशोक विश्वनाथ संबळे (वय ३८, रा. हकीकतपूर शिवार, मुद्देश वडगाव) आणि नामदेव रंगनाथ भुसारे (वय ३२ रा. मुद्देश वडगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक ७.६२ एमएमचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून शस्त्र जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक रामहरी चाटे, जमादार कैलास निंभोरकर, सिमोन वाघमारे, भाऊसाहेब वैद्य, सोमनाथ मुरकुटे, रिजवान शेख यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्नाला वैतागलेल्या अभियंत्यांनी मागितली बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीप्रश्नामुळे वैतागलेल्या महापालिकेच्या दोन अभियंत्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करून विभागातून बदली मागितली आहे. उपअभियंता एम. बी. खाजा आणि अशोक पद्मे अशी त्यांची नावे आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून पाणीप्रश्नाने पालिका प्रशासन त्रस्त आहे. जायकवाडीतून घटलेला पाण्याचा उपसा, नागरिकांकडून वाढू लागलेली पाण्याची मागणी आणि नियोजनाचा विचका यामुळे रोष वाढत आहे. नागरिक आपला राग पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांवर काढत आहेत. त्यामुळे उपअभियंता एम. बी. खाजा यांनी पंधरा दिवसांपूर्वीच बदलीचा अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी प्रकृती ठिक रहात नसल्यामुळे पाणीपुरवठा विभागातून बदली करावी अशी विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाणीपुरवठा विभागातीलच आणखी एक उपअभियंता अशोक पद्मे यांनी देखील बदलीसाठी विनंती केली आहे. अयोध्यानगरातील नागरिकांशी पाणी पुरवठ्याबद्दल बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या विभागातून बदली करून घेण्याच्या आपण प्रयत्नात आहोत, असे ते म्हणाले. पाणीपुरवठा विभागात अगोदरच अभियंत्यांची कमतरता आहे. चार उपअभियंत्यांची नियुक्ती करा, अशी मागणी कार्यकारी अभियंत्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत, सर्वसाधारण सभेत केली आहे. पुरेसे मनुष्यबळ मिळेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images