Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उपसा वाढल्याचा पालिकेचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंप हाऊससाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात उदभव विहिरीच्या तोंडाशी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे. मात्र, पाण्याचा नेमका किती उपसा वाढला, हे स्पष्ट केले नाही.

जायकवाडीतील पाणी घटल्यामुळे डाव्या कालव्यातील पाणी पातळी देखील घटली आहे. डाव्या कालव्यावरच पालिकेचे पंप हाऊस आहे. त्यासाठी तयार केलेल्या उद्भव विहिरीतील पाणी डाव्या कालव्यात फेकले जाऊ लागले. त्यामुळे विहिरीमधील पाणी कायम रहावे, या पाण्याची पातळी कमी होऊ नये, यासाठी विहिरीच्या तोंडावर वीस दिवस परिश्रम करून कर्मचाऱ्यांनी बंधारा बांधला. त्यामुळे उद्भव विहिरीमधील पाण्याची पातळी वाढली. त्याचा परिणाम पाण्याचा उपसा वाढण्यावर झाल्याचा दावा पालिकेतर्फे केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कचरा प्रक्रिया मशीनची चाचणी पुन्हा बारगळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज जोडणी अभावी कचरा प्रक्रिया मशीनची चाचणी पुन्हा एकदा बारगळली आहे. सोमवारपर्यंत वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मशीनची चाचणी घेण्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन कक्षाने ठरविले आहे.

चिकलठाणा येथील जागेवर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणी प्रति दिवस १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन बसवण्यात आली आहे. ९ एप्रिल रोजी हे मशीन बसवण्यात आले, १० एप्रिल रोजी मशीनची चाचणी घेवून ते लगेच सुरू करण्याचे महापालिकेने ठरवले होते. परंतु, प्रक्रिया केंद्रासाठी विजेची जोडणी मिळाली नाही. या ठिकाणी ११ केव्हीचे उपकेंद्र तयार करून कचरा प्रक्रिया मशीनसाठी एक्स्प्रेस फिडर टाकण्याची महापालिकेची योजना आहे. यासाठी महापालिकेने महावितरण कंपनीकडे पैसे देखील जमा केले, पण अद्याप वीज जोडणीचे काम झाले नाही. वीज जोडणीचे काम होईल, अशी अपेक्षा ठेवून १२ एप्रिल रोजी मशीनची चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, पण वीज जोडणी मिळालीच नाही. त्यामुळे आता वीज जोडणीसाठी सोमवारची प्रतीक्षा महापालिका प्रशासनाला आहे. सोमवारी वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यास मशीनची चाचणी घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांसाठी पालिकेची हेल्पलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक सुखद बातमी. शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्यात पालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास त्यांना आता हेल्पलाइनच्या माध्यमातून थेट आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महापालिकेच्या व शहराच्या हिताच्या दृष्टीने नवीन कल्पना मांडण्याचे आवाहन आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक दीपक जावळे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कल्पना मांडली. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे आयुक्तांनी लगेचच मान्य केले. पालिकेतर्फे शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, अग्निशमन सेवा, मालमत्ता कर, पाणीपट्टी, उद्यान, क्रीडा संकुल, बांधकाम परवानगी, अतिक्रमण, गुंठेवारी आदी सुविधांबाबत ज्येष्ठ नागरिकांना काही तक्रारी किंवा अडचणी असतील तर, तक्रार नोंदवाव्यात. त्यासाठी तक्रार नोंदविताना आपले संपूर्ण नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक, तक्रारीचे स्वरुप याचा तपशील द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

\Bयेथे साधा संपर्क

\Bज्येष्ठांना पालिकेच्या सुविधेबद्दल काही तक्रारी असल्यास त्यांनी ०२४० - २३३३५३६ ते ४० (विस्तार - २१०) या दूरध्वनी क्रमांकावर आयुक्त कार्यालयात दीपक साळवे यांच्याशी संपर्क साधावा. जावळे यांच्या ९७६५७५५५६४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून त्यांना आपल्या तक्रारी नोंदविता येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामावर शहाबाजारमध्ये कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहाबाजार - बुक्कलगुडा येथील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी कारवाई केली व बांधकाम पाडले.

महापालिकेने शहाबाजार येथील अब्दुला हाजी अली चाऊस यांना त्यांनी केलेले ३० बाय ६५ फूट आकाराचे अनधिकृत बांधकाम काढून घेण्यासाठी वारंवार नोटीस बजावली होती. मात्र, चाऊस यांनी या नोटीसला प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर हे बांधकाम पाडण्यात आले. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख पंकज पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक, संजय कोंबडे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, एस. आर. राचतवार आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ध्वज, पताकांना मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवारी (१४ एप्रिल) साजरी होत असून यानिमित्त निळे ध्वज, भीम तोरण, पताका आदींना मागणी वाढली आहे. दरम्यान, जयंतीनिमित्त नवीन कपडे खरेदीसाठी कापड बाजारात चांगलीच गर्दी उसळली आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त निळे झेंडे, पताका आदी विविध वस्तूंना मोठी मागणी असते. हे लक्षात घेत व्यापाऱ्यांनी टीव्ही सेंटर, सिटी चौक, पीरबाजार यासह शहरातील इतर बाजारपेठांत दुकाने थाटली आहेत. विविध आकाराचे निळे झेंडे बाजारात दाखल झाले आहेत. यात पाव मीटरपासून ते पाच मीटरपर्यंतच्या आकाराच्या झेंडे असून उपलब्ध असून २० रुपयांपासून ते ३५० रुपये, अशी त्याचे दर असल्याचे विक्रेते विनोद महातोले यांनी सांगितले. जयभीम तोरणही बाजारात विक्रीस उपलब्ध असून त्याची कापडी तोरण १०० रुपये, तर कागदी ३० रुपयांना आहे. आकर्षक असे रेडिमेड निळे फेटे १०० ते १५० रुपयांना असून वाहनांना लावण्यात येणारे जयभीम तसेच पंचशील ध्वजांना यासह निळे पताका, कंदील यासह सजावटीच्या साहित्यांना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नवीन वस्त्र खरेदीसाठीही बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी असून पांढऱ्या वस्त्रांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचाराचे सोडा आणि पाण्याचे बोला

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी प्रश्नामुळे सिडको-हडको भागात नगरसेवक व त्यांच्या कार्यकर्त्यांना नागरिकांनी अघोषित प्रचार बंदी केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या चरणात पोहचू लागलेला असताना सिडको-हडको भागात मात्र प्रचाराचा ज्वर अद्याप निर्माण झालेला नाही. प्रचाराचे सोडा आणि पाण्याचे बोला असे नागरिक म्हणत आहेत.

सिडको-हडको भागात पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. एक्स्प्रेस जलवाहिनीचे नियोजन केवळ सिडको-हडकोसाठी महापालिकेने केले होते, परंतु कालांतराने या जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणावर क्रॉस कनेक्शन झाले आणि सिडको-हडकोचा पाणी पुरवठा कमालीचा कमी झाला. सिडको-हडको भागात पुरेसा पाणी पुरवठा व्हायचा असेल तर किमान ३५ एमएलडी पाणी सिडको एन ५ येथील जलकुंभात येणे गरजेचे आहे, पण प्रत्यक्षात सिडको-हडको भागासाठी फक्त १७ ते १८ एमएलडी पाणीच उपलब्ध होते. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. पाचव्या, सहाव्या, सातव्या दिवशी सिडको-हडकोतील काही भागांना पाणी नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

पाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडे जाऊन लोकसभा निवडणूकीचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. सिडको-हडको भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाण्याची समस्या तीव्र बनल्यामुळे राजकीय कार्यकर्ते देखील बुचकळ्यात सापडले आहेत. प्रचारासाठी घरोघरी गेले तर अगोदर पाण्याचे बोला, त्यानंतर प्रचाराचे सांगा असे नागरिक म्हणत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौर नंदकुमार घोडेले गुरुवारी सकाळीच सिडको एन-८ येथील उद्यानात गेले होते. उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मतदान करा, असे आवाहन ते नागरिकांना करीत होते, पण नागरिकांनी त्यांना पाण्याच्या प्रश्नाने भंडावून सोडले. त्यामुळे सात ते दहा मिनीटात त्यांना उद्यानातून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी त्यांच्याबरोबर सिडको भागातील दोन नगरसेवक होते. महापौरांसारखीच परिस्थिती अन्य नगरसेवकांची होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही नगरसेवकांनी तर अद्याप प्रचाराचे साहित्यच बाहेर काढले नाही. नागरिकांना सहज भेटण्यासाठी गेल्यासारखे जाऊन ते प्रचाराचा प्रयत्न करीत आहेत, परंतु पाणीप्रश्नाला तोंड देता देता त्यांना प्रचाराचा मुद्दा सोडून द्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात जिवंत काडतुसासह दोघांना अटक

$
0
0

जालना

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. जालना शहरातील रामनगर कॉलनीत अमेरिकन बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

नीलेश भिकाजी भिंगारे असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री अचानक भिंगारेच्या घरावर छापा टाकत घराची झडती घेतली. यावेळी पोलिसांना अमेरिकन बनावटीचे पिस्तूल सापडले. भिंगारेनेही आपल्याकडे पिस्तूल असून ते मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याचा मित्र शेख हकीम उर्फ पप्पू शेकला मंठा चौफुलीमधून अटक केली. त्याच्या घराची झाडाझडती केल्यानंतर घरात अमेरिकन बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले. नीलेश भिंगारे आणि शेख हकीम (पप्पू) या दोघाला स्थानिक शाखेने अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे दुसऱ्यांच्या लग्नात नाचताहेत: मुख्यमंत्री

$
0
0

नांदेड:

मनसेची अवस्था सध्या 'उनसे' म्हणजेच उमेदवार नसलेली सेना अशी झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसऱ्यांच्या लग्नात नाचत आहेत, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. राज ठाकरे मोदी-शहाविरोधी प्रचारासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले असून शुक्रवारी नांदेड येथील पहिल्याच जाहीर सभेत त्यांनी मोदी-शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार शब्दांत हल्ला चढवला. राज्यात पाण्याची भीषण स्थिती असताना, महाराष्ट्र गोदावरीच्या पाण्यासाठी भांडत असताना, दुसऱ्या मार्गाने पाणी गुजरातला वळवलं जात आहे. यावर मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत कारण हा बसवलेला मुख्यमंत्री आहे, अशी टीका राज यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज नांदेडमधूनच प्रत्युत्तर दिले.

मी बसवलेला मुख्यमंत्री, अशी टीका राज यांनी केली मात्र मला जनतेनेच मुख्यमंत्रिपदावर बसवले असून राज यांना मात्र जनतेने घरी बसवले आहे. त्यांचा सुपडा साफ केला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रतिहल्ला केला. राज ठाकरे अभ्यास न करता आरोप करत सुटले आहेत. महाराष्ट्राचं पाणी गुजरातला दिलं असं ते म्हणताहेत. मात्र असा करार आम्ही नाही अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना केला होता, उलट तो करार आमच्या सरकारने रद्द करून राज्याचं हक्काचं पाणी आणलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारी भरू नये म्हणून टोपेंनी आणला दबाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी आमदार राजेश टोपे यांच्यामार्फत दबाव आणल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज भरू दिला नाही,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष शैला फ्रान्सीस निकाळजे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

ख्रिश्‍चन समाजावर होत असलेले अन्याय व समाजाच्या अन्य मागण्याबाबत वाचा फोडण्यासाठी शैला निकाळजे, प्रभाकर निकाळजे, फ्रान्सीस निकाळजे, शकुंतला निर्मळ, रेखा श्रीसुंदर, प्रदीप श्रीसुंदर, अरूण अंभोरे, अरूण लोखंडे, गुड्डू लालझरे, संदीप सुतार, सुरेखा पाटोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शैला निकाळजे म्हणाल्या, 'ख्रिश्‍चन समाजाला प्रतिनिधीत्व मिळून समाजाच्या महत्वपूर्ण मागण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगाने आपल्याला उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यासाठी औताडे यांनी आ. टोपे यांच्या मार्फत समाजाच्या मागण्या सोडविण्याचे वचन दिले. त्यानंतर औरंगाबाद येथील संपर्क कार्यालयात भेटण्यास बोलावून खूप दिवस ताटकळत ठेवले. महिला पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांच्यासोबत अनेक कटू अनुभव आले. काँग्रेस आघाडीसोबत एकनिष्ठ असलेल्या ख्रिश्‍चन समाजासाठी महाराष्ट्रातून एकही जागा आघाडीने दिली नाही. ख्रिस्ती समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे, समाजाला स्वतंत्र मतदार संघ राखीव ठेवावे, जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. नॉनक्रिमीलेअरची अट रद्द करावी या व अन्य महत्वपूर्ण मागण्यासाठीच आपण भांडत आलो आहोत. त्या पूर्ण होत नसल्याने काँग्रेस आघाडीच्या उमेदवारावर विश्‍वास न ठेवता समाज बांधव त्यांना धडा शिकवतील,' असे निकाळजे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जेथे राघव, तेथे सीता!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात शनिवारी श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिरवणूक, अन्नदान, कीर्तन, गीतरामायण अशा कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

किराडपुऱ्यातील श्री रामचंद्र मंदिरात पहाटेपासून भाविकांची दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सकाळी दहा वाजता भरत चौरे महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता मोठ्या उत्साहात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, श्रीरामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, उत्तमराव मनसुटे, अवधूत जगताप, दयाराम बसैये (बंधू) हेमंत जोशी, ट्रस्टी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांयकाळी मंदिर परिसरातून श्रीरामची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या मूर्ती ठेवल्या होत्या. गांधेली येथील रहिवासी हरिभाऊ रसाळ व त्यांच्या पत्नीच्या हस्ते मिरवणूक रथाचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीची सांगता श्रीराम मंदिर येथे झाली. सायंकाळी मंदिर परिसरातील सभागृहात सुंदरकांड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले होते.

कैलासनगर येथील श्रीराम देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. सायंकाळी श्रीराम प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नरेश भालेराव, नगरसेविका आशा भालेराव, राजेंद्रसिंग बग्गा, पी. बी. पैठणकर उपस्थित होते. श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे श्री संस्थान गणपती सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते आरती झाल्यावर मिर‌वणूकीस प्रारंभ झाला. यावेळी ऋषिकेश जैस्वाल, रोहित फुलवाणी, संजय पाटील, संकेत वैद्य, सौरभ यादव आदी उपस्थित होते. समर्थनगर येथील श्रीराम मंदिरातही नवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मनोहरबुवा दीक्षित यांच्या कीर्तनानंतर सकाळी आठ वाजता 'श्रीं'ची पालखी मिरवणूक समर्थनगर परिसरात काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलातर्फे सायंकाळी सहा वाजता क्रांती चौकातून मिरवणूक काढली.

\Bसाताऱ्यात मिरवणूक

\Bप्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव शनिवारी सातारा परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. बरोबर बारा वाजता मंदिरातील मूर्तीची आरती करून रामनामाचा जयघोष करण्यात आला. या प्रसंगी भाविकांना पंजिरी, टरबूज, खरबूज, शरबत व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सातारा हायकोर्ट कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातही रामकथा, पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बंबाटनगर, मार्तंडनगर, खंडोबा मंदिर, नाईकनगर, देवळाई परिसरातही रामजन्मोत्सवानिमित्त वाहन फेरी, राम, लक्ष्मण, सीता, हनुमानाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. भाविकांना बुंदी व खिचडीचा प्रसाद वाटण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्काच्या मतांपासून काँग्रेस ‘वंचित’?

$
0
0

तुषार बोडखे

Tushar.bodkhe@timesgroup.com

काँग्रेसच्या ताब्यात असलेला हिंगोली मतदारसंघ खेचून घेण्यासाठी शिवसेनेने शक्ती पणाला लावली आहे. आमदार हेमंत पाटील यांच्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे सुभाष वानखेडे सर्वाधिक प्रचारफेऱ्यातून काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांची जुळवाजुळव करीत आहेत. बहुजन वंचित आघाडीच्या मोहन राठोड यांचे आव्हान काँग्रेससाठी अडचणीचे आहे. सद्यस्थितीत शिवसेना आणि काँग्रेसची लढत एकाच 'व्होटबँके'साठी सुरू आहे.

उद्योग, कृषी विकास, सिंचन प्रकल्प, पर्यटनस्थळ विकास नसलेला हिंगोली जिल्हा 'मागास जिल्हा' ही ओळख टिकवून आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड (यवतमाळ), किनवट, हदगाव (नांदेड) आणि कळमनुरी, वसमत, हिंगोली (हिंगोली) या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत २३ उमेदवार असून १७ लाख २७ हजार मतदार येत्या १८ एप्रिलला मतदानाचा हक्क

बजावणार आहेत. शिवसेनेचे हेमंत पाटील, काँग्रेसचे सुभाष वानखेडे, बसपचे डॉ. दत्ता धनवे, वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड आणि अपक्ष उमेदवार संदेश चव्हाण यांच्यात तुल्यबळ लढत आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक होते. भाजपने इतर मतदारसंघाच्या बदल्यात हिंगोली भाजपसाठी सोडण्याची पक्षाला गळ घातली होती. मात्र, मतदारसंघ सेनेकडे राहिला आणि पाटील उमेदवार झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे यांनी मध्यंतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत वानखेडे यांनी उमेदवारी मिळवली. वर्षभरात तीन पक्षांचा अनुभव घेतलेल्या वानखेडे यांच्यामुळे कार्यकर्त्यांत काही काळ संभ्रम होता. पण, पूर्वानुभव आणि जिल्ह्यात असलेले नात्यागोत्याचे नेटवर्क वानखेडे यांच्यासाठी प्रचाराची प्रबळ बाजू ठरले आहे. हेमंत पाटील यांनी गावोगावी जाऊन भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी हेमंत पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. सद्यस्थितीत सोशल मीडिया, जनसंपर्क आणि जाहीर सभा या तीन आघाड्यांवर पाटील यांची सरशी झाली आहे. काँग्रेसचे वानखेडे प्रचारात प्रभावी दिसत नसले तरी जुना अनुभव वापरुन पारंपरिक मतदारांची गोळाबेरीज करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वानखेडे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही हिंगोलीवर विशेष लक्ष ठेवले

आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांच्याकडून वानखेडे अवघ्या १६०० मतांनी पराभूत झाले होते. मोदी लाटेत काँग्रेसचे सातव विजयी झाले होते. यावेळी कोणताही धोका पत्करण्यास वानखेडे तयार नाहीत. वैयक्तिक आणि पक्षाच्या यंत्रणेच्या बळावर त्यांनी मतदारसंघाचा प्रचार दौरा पूर्ण केला. हिंगोली मतदारसंघात मराठा आदिवासी आणि बंजारा मतदारांची सर्वाधिक संख्या आहे. बंजारा मतदार निर्णायक ठरल्याचा उमेदवारांना अनुभव आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेत वंचित बहुजन आघाडीने मोहन राठोड यांना उमेदवारी

दिली. बंजारा, दलित व मुस्लिम मतांची समीकरणे राठोड यांच्यासाठी फायद्याची ठरण्याचा अंदाज आहे. हेमंत पाटील यांचा दबदबा नांदेड जिल्ह्यात जास्त आहे. वानखेडे यांना हिंगोलीचा अनुभव जास्त आहे. ग्रामीण भागातील मतदारांचा रोष लक्षात घेऊन काँग्रेस एक पाऊल पुढे टाकत आहे. तूर्तास एकाच मतदार वर्गाला खेचण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसची रस्सीखेच सुरू आहे. पाच वर्षांत काँग्रेसच्या खासदाराने मतदारसंघात काय केले याचा उहापोह प्रचारात सेनेने केला आहे. सिंचन प्रकल्प, जिल्हा मध्यवर्ती बँक, उद्योग हे कळीचे मुद्दे आहेत. सतत घडणाऱ्या शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय असून, यावर उमेदवारांनी मौन बाळगले आहे. शेतीचा विकास नसल्याचे सांगत मतदार

उमेदवारांना जेरीस आणत आहेत. सामाजिक प्रश्नांची उकल आणि राजकीय समीकरणे जुळवण्यात उमेदवारांची दमछाक झाली आहे. माहूर -औंढा नागनाथ-नर्सी नामदेव या धार्मिक स्थळांचा विकास ठप्प आहे. येलदरी, सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावरून हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अंतर्गत धुसफूस आहे. या मुद्द्यांवर उमेदवारांनी रोखठोक भूमिका घ्यावी, असे मतदारांना वाटते. विशेषत: उदासीन राजकीय भूमिकेचा फटका बसलेले तरूण मतदार आक्रमक आहेत. सहा विधानसभा मतदारसंघ आणि तीन जिल्ह्यांच्या काही भागाचा समावेश असलेल्या हिंगोली लोकसभा निवडणूक तिरंगी आहे. मतदानाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आखाडा बाळापूर येथे प्रचार सभा घेतली. अनुभवी सुभाष वानखेडे, नवखे हेमंत पाटील आणि निर्णायक मोहन राठोड अशी तिहेरी लढत आहे. निर्णायक मतांवरच तिघे अवलंबून आहेत.

राजकीय पाठबळ कुणाचे ?

शेजारच्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उमेदवार आहेत. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर नांदेडची लढत अटीतटीची ठरणार आहे. मतदारसंघात तळ ठोकून असलेले चव्हाण हिंगोलीतही कुमक पुरवत आहेत. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार शिवाजीराव माने, आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी हेमंत पाटील यांच्या पाठिशी ताकद उभी केली आहे. उमरखेडचे माजी आमदार प्रकाश पाटील यांच्या सहकार्यावर मताधिक्य अवलंबून असेल. पक्षातील नाराज आणि प्रतिस्पर्धी पक्षातील छुपे

पाठिराखे यांची मनधरणी करताना उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. भाजपच्या नेत्यांच्या सभा झाल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या सभा का नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. येत्या १४ एप्रिलला प्रियांका गांधी यांची हदगाव येथे सभा आहे. या सभेनंतर मतांची समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे.

समर्थकांत गद्दारीचा वाद

काँग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी सुभाष वानखेडे यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेत होते. वानखेडे यांचा राजकीय प्रवास पाहून 'गद्दाराला धडा शिकवा' असा प्रचार विरोधकांनी हाती घेतला आहे. या प्रचाराला वानखेडे समर्थकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे पाठिराखे असलेल्या भाजपच्या नेत्यांची यादी देत समाचार घेण्यात आला आहे. शिवाजीराव माने, सूर्यकांता पाटील, गजानन घुगे यांचा राजकीय प्रवास मांडत गद्दार कोण असा प्रतिप्रश्न काँग्रेस समर्थकांनी विचारला आहे. सोशल मीडियावर समर्थकांचे वाद टोकाला पोहचले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या टप्प्यावर युतीचा भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर, शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे,' अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दानवे म्हणाले, 'खैरे यांच्या तिसऱ्या प्रचार टप्प्यात सोमवारपासून युतीच्या स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा सायंकाळी पाच वाजता गारखेडा येथील गजानन महाराज मंदिराच्या चौकात मुख्य रस्त्यावर होणार आहे. याच दिवशी शिवसेनेचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची जाहीर सभा सायंकाळी पाच वाजता लासूर स्टेशनला तर, सात वाजता कन्नड येथे होणार आहे. मंगळवारी (१६ एप्रिल) शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा सकाळी दहा वाजता चिंचोली लिंबाजी येथे, तर सायंकाळी पाच वाजता बजाजनगर आणि सात वाजता सातारा परिसरात होणार आहे. गुरुवारी (१७ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता शेणपुंजी रांजणगाव येथे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (१९ एप्रिल) मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी, २० एप्रिलरोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा कन्नड तालुक्यातील मेहगाव येथे दुपारी बारा वाजता, दुपारी अडीच वाजता वैजापूर शहर तर दुपारी साडेतीन वाजता गंगापूर येथे होणार आहे,' अशी माहिती दानवे यांनी दिली. पत्रकार परिषदेला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, अनिल मकरिये, युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, रिपाइंचे बाबूराव कदम, मिलींद शेळके आदी उपस्थित होते.

\Bआठवलेंना निमंत्रित करा

\B'शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निमंत्रित करा,' अशी सूचना बाबूराव कदम यांनी पत्रकार परिषदेत युतीच्या पदाधिकाऱ्यांना केली. 'जाहीर सभेसाठी आठवले आले तर मोठा फरक पडेल असे ते म्हणाले.' आठवलेंना सभेचे निमंत्रण पाठवण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नंतर मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी समस्येमुळे जनतेत रोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात निर्माण झालेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे जनतेत रोष आहे,' अशी कबुली ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शनिवारी भाजप आमदार अतुल सावे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दीड महिन्यापासून सिडको - हडको भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलकुंभावर नागरिकांचे मोर्चे निघत आहेत. रास्तारोको आंदोलन देखील नागरिक करीत आहेत. यामुळे पालिकेची यंत्रणा देखील हादरून गेली आहे. पाणीप्रश्न आटोक्यात यावा यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आमदार सावे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आणि औरंगाबादचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात द्या किंवा प्राधिकरणाचा तज्ज्ञ अधिकारी पाणी पुरवठ्यासाठी नियुक्त करा, अशी विनंती केली. सध्या निवडणूकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेता येणार नाही. पाणी पुरवठ्याबद्दल आयुक्तांशी चर्चा करतो, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी सावेंच्या मार्फत महापौरांना पाठवला. त्यानंतर सावे यांनी विभागीय आयुक्तांची सिडको - हडको भागातील पाणीप्रश्नी भेट घेतली आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नक्षत्रवाडी ते सिडको एन पाचपर्यंत पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. त्यामुळे 'एमआयडीसी'कडून टँकरसाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन दिवसांपासून सिडको जलकुंभावरील टँकर 'एमआयडीसी'च्या टँकर फिलिंग पॉइंटपासून भरले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार अतुल सावे पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होते. सावे म्हणाले, 'पाण्याच्या समस्येमुळे जनतेत रोष आहे. पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबद्दलचे फोन पहाटे पाच वाजल्यापासून सुरू व्हायचे. सिडको - हडकोच्या सर्वच भागातून फोन यायचे. मात्र, ही परिस्थिती सुधारत आहे. दोन दिवसांपासून पाणी पुरवठ्याची तक्रार करणारे नागरिकांचे फोन कमी झाले आहेत. याचा अर्थ पाणी पुरवठा सुरळीत होत. येत्या दोन - तीन दिवसांत पाणीप्रश्नावर तोडगा निघेल. शहरात आता फक्त पाण्याचीच समस्या बाकी आहे. कचऱ्याचा प्रश्न संपला आहे. लवकरच कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होतील. रस्त्यांची कामे देखील सुरू झाली आहेत,' असा उल्लेख सावे यांनी केला.

शहरात सध्या फक्त पाण्याचीच समस्या आहे. त्यामुळे जनतेत रोष आहे. कचऱ्याचा प्रश्न संपला आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पही लवकरच सुरू होईल. रस्त्यांची कामे देखील सुरू झाली आहेत. पाणीपुरवठा सुरळीत होत असून, दोन ते तीन दिवसांत यावरही तोडगा निघेल.

- अतुल सावे, आमदार, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष सोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांवर कारवाई व्हायला पाहिजे,' अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली.

औरंगाबाद लोकसभेचे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारार्थ चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर होते. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचे नेते पक्ष सोडून दुसरीकडे गेले. त्यांच्यावर पक्षाने काहीच कारवाई केली नाही. याबद्दल काय असे विचारल्यावर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले,' कारवाई व्हायला हवी. शिस्तभंगाची कारवाई तरी व्हावी. त्यामुळे पक्षातून योग्य संदेश जाईल.' यंदाच्या लोकसभेत काँग्रेस ऐवजी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसवर अधिक टीका करत आहे, असे का ? याबाबत पृथ्वीराज म्हणाले, 'बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजप थेट अधिकृत चिन्हावर लढत आहे. सुळे यांच्यासमोर अधिक अडचणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.' भाजपमध्ये काँग्रेसमधून होणाऱ्या इनकमिंगबद्दल चव्हाण म्हणाले, 'साखरपट्ट्यातून गळती सुरू आहे. या भागातील सहकारी संस्था, साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतील तर, त्यांना मदतीचे गाजर दाखवून भाजप साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून नेत्यांवर दबाव आणत आहे. सहकारात जिथे चुका झाल्या तिथे बोट दाखवून तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. 'त्यामुळे आम्ही देखील तुमचे काय आहे ते मिटवून घ्या, असा सल्ला देत आहोत,' असा टोला त्यांनी राधाकृष्ण विखेंना नाव न घेता लगावला.

\Bवंचित आघाडी भाजपची 'बी' टीम

\Bवंचित बहुजन आघाडीमुळे महाआघाडीला नुकसान होईल, असे सांगून चव्हाण म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीमुळे नुकसान होणार आहे ते किती होईल हे सांगता येत नाही. आम्ही प्रकाश आंबेडकरासोबत चर्चा केली होती. मात्र, त्यांनी वाढवून जागा मागितल्यानंतर ही भाजपाची बी टीम असल्याचे लक्षात आले. सध्या त्यांचा काही पंतप्रधान होणार नाही. ते भाजपसाठीच काम करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला.

'नागपूरमध्ये धक्कादायक निकाल लागतील,' असा दावा त्यांनी केला. यावेळी माजी मंत्री राजेंद्र दर्डा, प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, आमदार सुभाष झांबड,कल्याण काळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन गंडा; आरोपींना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोबाइल खरेदी करून मोबाइल शॉपीच्या मालकाला ऑनलाइन पैसे भरतो म्हणत २८ हजारांचा गंडा घालणाऱ्या आरोपीसह त्याच्या दोन साथीदांराना पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. आरोपींकडून मोबाइल व दुचाकी असा सुमारे एक लाख ५४ हजार ९९० रुपये किमतीचा ऐवज देखील पोलिसांनी जप्त केला.

आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले. कैलास ज्ञानदेव गाढवे (२४, रा. मासरुळ ता. जि. बुलढाणा, ह. मु. नर्सरी कॉलनी, रांजणगाव), कुंदन तुळशीराम भालेराव (२७, रा. कृष्णनगर, रांजणगाव शेणपुंजी), अमोल ताराचंद पठारे (२४, रा. एकतानगर, रांजणगाव शेणपुंजी) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात विनोद रमेश गोकलानी (४०, रा. सिंधी कॉलनी) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार गोकलानी यांचे निरालाबाजार परिसरात साईबाबा कलेक्शन नावाचे दुकान आहे. दहा एप्रिल रोजी सकाळी गोकलानी दुकानात असताना एक व्यक्ती आला. त्याने व्हिवो १५ प्रो कंपनीचा २८ हजार ९९० रुपये किमतीचा मोबाइल खरेदी केला व गोकलानी यांना मोबाइलचे पैसे बँक अकाउंटवरुन ट्रान्सफर करतो म्हणत त्यांच्याकडून बँक अकाउंटची डिटेल्स मागितली. काही वेळाने त्याव्यक्तीने गोकलानी यांना मोबाइलवर पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज दाखविला व तो दुकानाच्या बाहेर गेला. गोकलानी यांनी ऑनलाइन अकाउंट तपासले असता पैसे जमा झाले नसल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे गोकलानी हे त्या व्यक्तीला पाहण्यासाठी आले असता तो व्यक्ती दोन साथीदारांसह एका दुचाकीवर बसून पळून गेला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना तीन व्यक्ती पैठण गेट परिसरात चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. आरोपींनी दुकानदाराची फसवणूक करत मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. तिघा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवारांवरील टीकेचा आघाडीवर परिणाम नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, लातूर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी नेहरू गांधी परिवारावर टीका करीत होते. आता ते शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत, परंतु त्याची आघाडीत चर्चा होत नाही आणि काही परिणाम होत नाही,' असे मत कॉँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी लातुरात व्यक्त केले. कॉँग्रेस भवनात केतकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे सचिव, मराठवाडा विभागाचे प्रभारी संपतकुमार, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख, प्रवक्ते व्यकंटेश पुरी, हरिराम कुलकर्णी, शेकापचे उदय गवारे, यांची उपस्थिती होती. केतकर म्हणाले, 'राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला संविधानाच्या अख्तारीत आणायचे ही टीकाच मुळात चुकीची आहे. कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४८ साली जेव्हा संघावर बंदी घातली, त्यानंतर संघाने स्वतःची घटना तयार करून नोंदणीसाठी सादर केली. त्यांची नोंदणी झालेली आहे. प्रश्न फक्त एवढाच की, त्यांची धर्मदाय कार्यालयात नोंद नसताना ते देणग्या कशा घेतात. देशातील सध्याची निवडणूक ऐतिहासिक आहे. कारण १९८५नंतर प्रथमच संपूर्ण बहुमत असलेल्या एका पक्षाच्या सरकारच्या कारभारानंतर ही निवडणूक होत आहे. २०१४ साली देशातील जनतेचा नरेंद्र मोदी यांच्यावर जो विश्वास होता, तो आज राहिला नाही. कारण त्यांनी दिलेली असंख्य अश्वासने आणि घोषणात ते फसले आहेत. भाजपाचा सुद्धा आत्मविश्वास डळमळीत झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी ते २०२४पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील असे म्हणत होते. त्याच भाजपातील सोशल मीडियातील मंडळी दोन वर्षांपासून आणि तीन राज्यातील निवडणुकातील पराभवानंतर देशात 'एनडीए'चे सरकार असेल असे म्हणत आहेत. देशात पुन्हा नरेंद्र मोदी विजयी झाले तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात अराजक माजेल,' अशी भीती त्यांनी व्यक्त केली. संपत कुमार यांनी मराठवाड्यातील पाचही जागा आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. नांदेड येथे राहुल गांधी यांची सभा येत्या दोन तीन दिवसात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाचा मुद्दा नसल्याने जातीयवादावर भर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'पालकमंत्र्यांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने त्या जातीयवादावर बोलत आहेत,' अशी टीका शनिवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. 'देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. मोदी सरकारने सहा हजार रुपये देण्याची फसवी घोषणा केली आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.

बीड लोकसभ मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांच्या पाच सभांचे डोंगर पट्ट्यात आयोजन करण्यात आले आहे. वडवणी तालुक्यातील उपळी येथे त्यांची पहिली सभा झाली. काँग्रेस आघाडी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची माहिती दिली. त्यानंतर अंबाजोगाई येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 'जातीवर नाही तर विकासावर बोला,' असे आवाहन केले होते. त्या संदर्भाने मुंडे म्हणाले, 'मुख्यमंत्री महोदय हा सल्ला तुमच्या उमेदवार आणि पालकमंत्र्यांना द्या. तो बोलण्यासारखा आहे. कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यानेच त्या फक्त जातीयवादावर बोलत आहेत,' अशी टीका पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केली. मुंडे पुढे म्हणाले, 'फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी फसवी निघाली. एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली. ही घोषणा केवळ निवडणुकीसाठी आणि मते मिळवण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी दिलेले दोन हजार रुपये काढून घेतले आहेत. निवडणूक झाली की ते योजना बंद करतील.'

'डोंगरपट्ट्यातील जनता गरीब असली तर स्वाभिमानी आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने काढलेले ऊसतोड कामगार महामंडळ बंद करून केलेला अपमान ते कदापि विसरणार नाहीत,' असे माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके म्हणाले. 'बीडच्या खासदार पाच वर्षात पाच वेळा ही जिल्ह्यातील जनतेला दिसल्या नाहीत. मला संधी मिळाली तर मी पाच वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावाला पाच वेळा भेट देईन. जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू करेल. आठवड्यातून एक दिवस तालुक्याच्या ठिकाणी थांबेल,' असा शब्द उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिला. सभेस मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. सभेला माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके काँग्रेसचे अशोक हिंगे, उमेदवार बजरंग सोनवणे, मोहनराव काका सोळंके, सर्जेराव काळे, अशोकराव डक, अशोकराव हंगे, जयसिंग सोळंके यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांना पाऊण तास पाणी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रत्येक वॉर्ड किंवा वसाहतीत पंचेचाळीस मिनिटेच म्हणजे पाऊण तास पाणीपुरवठा झाला पाहिजे. जास्तवेळ पुरवठा होणाऱ्या काही खास भागातही निर्धारित वेळेतच पाणी सोडा, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सिडको - हडकोत पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ढवळून निघाली आहे. पाणी पुरवठ्यात सुसुत्रता आणण्यासाठी विभागीय आयुक्तांपासून महापालिका आयुक्तांपर्यंत सर्वच अधिकारी प्रयत्न करू लागले आहेत. पाणी पुरवठ्याच्या नियोजनाबद्दल माहिती देताना डॉ. निपुण विनायक म्हणाले, 'विभागीय आयुक्तांनी पाणी पुरवठ्याबद्दल घेतलेल्या बैठकीनंतर कामाला गती आली आहे. एमआयडीसीचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाणी पुरवठ्याच्या वेळेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्याचे महापालिकेने ठरवले आहे. तशा सूचना संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. शहराच्या सर्व वॉर्डात व वसाहतींमध्ये निर्धारित केलेल्या वेळेनुसारच पाणी पुरवठा झाला पाहिजे अशी ताकीद दिली आहे. ज्या वॉर्डात किंवा वसाहतींमध्ये जास्तवेळ पाणी पुरवठा होतो तेथील पाणी पुरवठा नियंत्रणात आणला जाणार आहे. सर्व वॉर्डांमध्ये व वसाहतींमध्ये पंचेचाळीस मिनिटे पाणीपुरवठा झाला तर संपूर्ण शहराला आहे त्या पाण्यात समान पाणी देणे शक्य होईल. पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याची वेळ येणार नाही. यासाठी पाणी पुरवठ्याच्या वेळांवर पालिकेची यंत्रणा आता लक्ष ठेवून असेल,' असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bविहिरींचे अधिग्रहण

\Bआयुक्त म्हणाले, 'सिडको येथील जलकुंभांवरील टँकर एमआयडीसीच्या फिलिंग पॉइंटवर वळवणे महत्वाचे आहे. येत्या एक दोन दिवसात टँकरवर देखील नियंत्रण प्राप्त होईल. विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय देखील महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या वॉर्ड कार्यालयाच्या क्षेत्रातील विहिरींची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत नल जोडण्यांवर देखील आता कारवाई केली जाईल. जलवाहिनीवरील मोठ्या गळत्या बंद करण्याचे नियोजन देखील केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्यास कोठडी

$
0
0

औरंगाबाद : अजंता एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी शनिवारी दिले. पवन सुरेश लगामे (१९, रा. राजनी, ता. परतूर जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात उषाताई साहेबराव ढवळे (रा. बालाजी नगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली. ढवळे या ११ एप्रिल रोजी अजंता एक्स्प्रेसने औरंगाबाद ते नांदेड प्रवास करत होत्या. दुापरी दीडच्यासुमारास रेल्वे मानवत येथे थांबली. त्यावेळी आरोपीने ढवळे यांच्या गळ्यातील तीन हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढवळे यांनी आरडा-ओरड केल्याने कर्तव्यावर असणाऱ्या दोन आरपीएफच्या जवानांनी आरोपीचा पाठलाग करून पकडले व त्याला अटक केली. या प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी मानवत व नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे बरेच चोरीचे गुन्हे घडले असून ते आरोपी किंवा त्याच्या साथीदारांनी केले आहेत का याचा तपास करणे असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'इटोपिया' फूड फेस्टिव्हलमध्ये करा 'संडे धम्माल'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील प्रोझोन मॉलमध्ये सुरू असलेल्या पहिल्या 'इटोपिया' फूड फेस्टिव्हलला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून, रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी याठिकाणी फूड कॉम्पिटिशनमध्ये विविध पदार्थ बनवण्याची तर संधी मिळणारच शिवाय खाद्यप्रेमींची देखील स्पर्धा घेण्यात येणार आहे. याशिवाय सिंगिंग परफॉर्मन्स, इन्स्टुमेंटल परफॉर्मन्स यासारख्या उपक्रमांनी संडे धम्माल साजरा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम 'टाइम्स ग्रुप'च्या सहभागाने होत आहे.

कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना प्रोझोन मॉलने एक कूल-कूल ऑफर आणली आहे. कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी प्रोझोनच्या वतीने 'इटोपिया' या पहिल्या खाद्य महोत्साला सुरुवात झाली असून, यातून अस्सल खव्वैय्येगिरी करणाऱ्यांची चंगळ होणार आहे. या निमित्ताने रेस्टॉरंट आणि इतर फूड आऊटलेटमध्ये कोणीच चुकवू नये, असे खास पदार्थ खास दरात उपलब्ध होणार आहेत. 'इटोपिया'चे खास आकर्षण हे ४९ रुपये, ९९ रुपये आणि १९९ रुपये आणि त्यावरील किंमतीच्या पदार्थाची कॉम्बो ऑफर असणार आहे. खाद्य महोत्सवासाठी सर्वच फूड आऊटलेटने खास ऑफर आणल्या आहेत. १००० रुपये आणि वरील बिलासाठी आकर्षक डिस्काऊंट आणि बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या निमित्ताने खव्वैय्यांना आपले आवडीचे पदार्थ खास किफायतशीर दरात चाखता येणार आहेत. तर हॉटेल इंडस्ट्रितील मान्यवरांकडून रेसिपी तयार करण्याचे प्रशिक्षण तसेच किचन टिप्सही मिळतील. बुधवार आणि शुक्रवारी कॉन्टेस्टमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. शहरातील या खाद्य महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रोझोनचे सेंटर हेड मोहम्मद अर्शद यांनी केले आहे.

\Bपिझ्झा, कॅपिचिनो, बरंच काही...

\B'रिवायत'मधील पराठा, 'सीसीडी'मधील कॅपेचिनो, 'करीम्स'मधील कबाब, 'एक्स्प्रेस ओह'मधील सिझलींग ब्राऊनी तर 'डोसा प्लाझा'मधील डोसा आपली वाट बघत आहे. याशिवाय तोंडाला पाणी आणारे पिझ्झे, आइस्क्रीम, ज्यूस, थाळी तुम्हाला निश्चितच आवडतील. खाद्य महोत्सवात पिझ्झा हट, एसएमएस, डोमिनोज, केएफसी, क्वालिटी वॉल्स, ग्रीन हट, करीम्स चायनीज, बार्बिक्यू नेशन, वॉव वडापाव, मारूश, स्वाद महाराष्ट्र, कॅफे बॉलिवूड, स्मोकीन जोझ, शेक्स अँड बाईट, लिंबू या खाद्य दालनांच्या वतीने खास ऑफर्सची बरसात असेल. याच्या सोबतीला नामांकित हॉटेलमधील ख्यातनाम शेफच्या उपस्थितीत खव्वैय्यांसाठी कार्यशाळा, मास्टर क्लासेस आणि बरेच काही येथे असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images