Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुचाकी चोरणाऱ्यास अटक

$
0
0

औरंगाबाद : इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी दिले. योगेश हरिकिशन लवंगे (३०, रा. जय भवानीनगर, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात 'एमएसईबी'मध्ये नोकरी करणारे नंदकिशोर जनार्धन म्हस्के (३९, रा. एमएसईबी क्वार्टर क्रमांक ८, देवगिरी इमारत, मिलकार्नर) यांनी तक्रार दिली. सहा एप्रिल रोजी म्हस्के यांनी रात्री दहा वाजता दुचाकी ते राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावली होती. संधी साधत चोरट्याने त्यांची दुचाकी लांबविली. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून आरोपी योगेश लवंगे याला अटक केली. तसेच चोरी केलेली दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोर्टात महिलेवर हल्ला, आरोपींचा जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : न्यायालयात साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिसांसमोर हल्ला करणाऱ्या कुख्यात बबलाच्या वडिलांसह एकाने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी शनिवारी फेटाळला. प्रकरणात आरोपी असद उर्फ शेख मोहसीन शेख लाल (६२, रा. सयदा कॉलनी) व शेख शमशोद्दीन शेख सैफोद्दीन (४९, रा. असेफिया कॉलनी) या दोघांना पोलिसांनी दहा एप्रिल रोजी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर आरोपींनी नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एन.ए. ताडेवार यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्याच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोवीस कोटींच्या रस्ते प्रकरणाची कागदपत्रे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या अधिकाऱ्यासमोर महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, निवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली, निवृत्त उपअभियंता एस. पी. खन्ना यांची प्राथमिक सुनावणी देखील झाली.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ कोटींचे अनुदान दिले. त्यातून काम करताना शासनाचे एक कोटी ६४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका शहर अभियंता पानझडे यांच्यासह सिकंदर अली, एस. पी. खन्ना यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याच अनुशंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली. त्यात शासनाचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात विभागीय चौकशी देखील करण्यात आली. कोर्टातही याच संदर्भात प्रकरण सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार शासनस्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नगरविकास खात्याचे सहसचिव अविनाश सुभेदार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. चौकशी करण्यासाठी त्यांना तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. चौकशीसाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शेख खमर यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

\Bतीन महिन्यांत अहवाल

\Bरस्तेप्रकरणा संदर्भात शेख खमर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, '२४ कोटी रस्त्यांच्या संदर्भातील मूळ फाइलची झेरॉक्स प्रत, त्रिसदस्यीय समितीचा अहवाल, विभागीय चौकशी अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीचा अहवाल व अन्य कागदपत्रे एक एप्रिल रोजी चौकशी अधिकारी सुभेदार यांच्याकडे देण्यात आली आहेत. कागदपत्रे दिल्यावर सुभेदार यांच्या समक्ष पानझडे, सिकंदर अली व खन्ना यांची प्राथमिक सुनावणी देखील झाली. आता पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे. तीन महिन्यात चौकशी अहवाल द्यायचा असल्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस अहवाल तयार होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद:

येथील ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आज सकाळी त्यांच्या पुंडलिकनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सुंदर लटपटे यांच्या आत्महत्येमुळे मराठवाड्यात माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘लोकपत्र’, ‘पुण्यनगरी’, ‘पुढारी’ आदी वृत्तपत्रात संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते. पत्रकारितेत सक्रिय राहून त्यांनी ‘एकलव्य प्रकाशन’ची सुरूवात केली होती. शिवाय प्रकाशन संस्थेचा राज्यभर विस्तार केला होता. परंतु या व्यवसायात नंतर तोटा झाल्यामुळे गेल्या काही वर्षापासून ते आर्थिक विंवचनेत होते. त्यातूनच त्यांनी हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यात त्यांनी त्यांच्या मेव्हण्यास आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे. लटपटे आणि त्यांच्या पत्नीत वाद सुरू होता. त्यातून त्या माहेरी गेल्या होत्या. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

सुसाइड नोट -
68875108

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवराय ते भीमराय वॉक फॉर युनिटी’ उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'शिवराय ते भीमराय वॉक फॉर युनिटी' ही अभिवादन यात्रा उत्साहात काढण्यात आली. यावेळी शिवराय व भीमराय यांच्यावरील गीते सादर करण्यात आली.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी सहा वाजता ही यात्रा निघाली. सार्वजनिक जिल्हा उत्सव समितीतर्फे आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, रिपाईचे ज्येष्ठ नेते दौलत खरात, निवृत्त पोलीस उपअधीक्षक दौलत मोरे, बाबा गाडे, वनिता मोरे, अध्यक्ष प्रवीण जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ चव्हाण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष, त्यांच्यावरील अधारित गीते सादर केली.

ही यात्रा मोठ्या उत्साहात नूतन कॉलनी, रॉक्सी सिनेमा, निराला बाजार, औरंगपुरा, खडकेशवर मार्गे भडकल गेट येथे पोचली. तेथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी निराला बाजार, औरंगपुरा येथे दहिवाल त्यांच्या सहकारी मित्रांनी अभिवादन यात्रेसाठी पिण्याच्या पाण्याचा स्टॉल उभारला होता. यासह जिल्हा परिषदेसमोर संतोष पाटील यांनी पाणी व नाश्त्याचा स्टॉल उभारला होता. यात्रेसाठी स्वागताध्यक्ष मुकेश पांडे पाटील, कार्याध्यक्ष राजपालसिंह राठोड, उपाध्यक्ष रवींद्र बोडखे, सतनामसिंग गुलाटी, प्रा. प्रशांत अवसरमल, डॉ. विलास जोंधळे, जयेश मोरे, विनोद मोरे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करकोटक यांचा काँग्रेसचा राजीनामा

$
0
0

पैठण: पैठणचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जीतसिंग करकोटक यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा व काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. 'मी मागच्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून, या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना व औरंगाबाद काँग्रेस पक्षात जे काही सुरू आहे. ते मनाला पटणारे नसून पक्षासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या सारख्या नेत्यावर व सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझा राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे,' असे करकोटक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान, जीतसिंग करकोटक यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यामुळे पैठण येथील काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. करकोटक यांच्या समर्थनार्थ पैठण शहरातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणातील महापालिकेच्या पंप हाउसला शनिवारी वादळवाऱ्यासह आलेल्या पावसात पंप हाउसवर वीज कोसळली. दरम्यान, रविवारी सायंकाळी फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला आहे. त्याची दुरुस्ती रविवारी उशिरापर्यंत पूर्ण सुरूच होती. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक सध्या कोलमडलेले आहे. जायकवाडीची पाणी पातळी कमी झाल्याने सात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. जायकवाडी धरणातील पंप हाउसचा वीज पुरवठा सुरुळीत करण्यासाठी रविवारी पहाटे अडीचपर्यंत काम सुरू होते. रविवारी पहाटे पंप हाउसमधून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. तोच रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता वाजता फारोळा येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा वीज पुरवठा बंद पडला. दोन्ही ठिकाणच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुरुस्ती करत असून वीज पुरवठा पूर्ववत केव्हा होईल, याबद्दल साशंकता आहे. हा काम सोमवारपर्यंत सुरू राहिले, तर तो पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे सोमवारी, मंगळवारी शहरात पाणीपुरवठा होण्याबद्दल साशंकता आहे. याबद्दल पालिका प्रशासनही संभ्रमात आहे. शहराला दररोज १३५ पेक्षा अधिक एमएलडी पाणी आवश्यक आहे. सध्या जायकवाडीचे पाणी मृतसाठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चळवळीवर प्रकाश टाकणारा लक्षवेधक देखावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंबेडकरी चळवळ पूर्वीची अन् आजची यावर प्रकाश टाकणारा आकर्षक देखावा शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उभारला. आजचे स्वार्थी राजकारण, प्रस्थापित पक्षांची अवस्था विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून मांडली.

शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुलांच्या वसतिगृहात हा देखावा उभारला. दहापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिवसरात्र मेहनत घेत हा देखावा उभारला आहे. यातून आंबेडकरी चळवळीला बळ देण्याची कशी गरज आहे, हे त्यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले. या देखाव्यात एक झोपडी दाखविली आहे. त्यासह एक पाण्याची टाकी, आज छोटेसे काही समाजकार्य समाजासाठी केले की, नावासाठी झटणारे नेते कसे आहेत, हे दर्शविले आले. स्वहितासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांचे झेंडे खांद्यावर घेणारी नेतेमंडळी यातून दाखविण्यात आली. आंबेडकरी चळवळ स्वाभिमानी चळवळ आहे. त्याच झोपडीवर लिहिलेले पत्र आहे.

'जाळले गेले तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, घे भीमराया घे तुला उद्ध्वस्त झालेल्या घराण्याची वंदना,' असे सांगत स्वाभिमान दाखविला. देखाव्याची सकल्पंना कैलास खानजोडे यांची आहे. देखाव्यासाठी सचिन करणकाळे, दयाल झळके, सुमित राऊत, शुभम अंभोरे, राहुल बोईवारे, नेताजी बनसोडे, राजेश शेळके यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मटा जाहीरनामा: कनेक्टिव्हिटी नसल्याने विकास खुंटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद औरंगाबादला ऐतिहासिक वारसा असून अनेक पर्यटन स्थळे अनोखी आहेत. उद्योजकांमुळे शहराला जगभरात ओळख मिळाली आहे. त्याचवेळी शहराच्या विकासाकरिता आवश्यक रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाची कनेक्टिव्हिटी पुरेशा प्रमाणात मिळालेली नाही. वाहनांच्या प्रचंड संख्येच्या तुलनेत रस्ते रूंद झाले नाहीत. याचा फटका मालवाहतूक, प्रवासी वाहतुकीला बसत आहे. शहराच्या विकासाकरिता उत्तम दर्जाच्या बाह्य व अंतर्गत रस्त्यांची

आवश्यकता आहे. शहराचे दळणवळण या विषयावर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मटा राउंड टेबल'मध्ये दळणवळण व पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होत आपली मते मांडली. औद्योगिक विकास व मराठवाड्यातून येणाऱ्या कामगारांमुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी, अपघात वाढले आहेत. अपघातांमुळे बीड बायपासवर विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने मालट्रक शहराबाहेर थांबवून ठेवाव्या लागतात. याचा परिणाम उद्योगांवर होत आहे, असे स्पष्ट मत मांडण्यात आले. शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या यंदा कमी झाली आहे. जयपूर, उदयपूर, गोवा येथून औरंगाबादला येण्यासाठी विमान, रेल्वे नाही. एक पर्यटक शहरातील ७० ते ८० जणांना व्यवसाय दोतो. त्यामुळे औरंगाबाद येथून कनेक्टिव्हिटी वाढविण्याची गरज आहे. अनेक विमान कंपन्यांनी औरंगाबादचे सर्वेक्षण केले, पण विमान सुरू केले नाही. मुंबई आणि दिल्लीकरिता पुरेशा व इतर शहरांकरिता रेल्वेगाड्या सुरू केलेल्या नाहीत. सध्या सोलापूर-धुळे महामार्गाचा एक भाग पूर्ण

केला आहे. अजिंठा लेणी, शिर्डीला जाणारे रस्ते अत्यंत वाईट असल्याने पर्यटनाला फटका बसत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचे दळणवळण सुधारणे, रस्त्यांचा विकास करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सध्या मध्यप्रदेशातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा आहे. त्या राज्याने पर्यटनस्थळांचे मार्केटिंग उत्तम पद्धतीने केलेले आहे. औरंगाबाद येथे अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे आकर्षक सुविधा निर्माण करता येऊ शकतात. या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको-हडकोमध्ये जयंतीचा उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह हडको भागातही दिसून आला. टीव्ही सेंटर चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑर्केस्ट्रॉ तसेच इतर संगीत कार्यक्रमाचा आनंद नागरिकांनी घेतला. रविवारी (१४ एप्रिल) टीव्ही सेंटर चौकामध्ये भीम गीतांच्या क्रांतीकारी मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंती महासंघाचेही स्टेज यावेळी लावण्यात आले होते. सिडको तसेच हडको परिसरात असलेल्या विविध कॉलनीमधून नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

५० फुटांचे पोस्टर ठरले आकर्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर मित्रमंडळाच्या वतीने टीव्ही सेंटर चौकामध्ये क्रेनच्या सहाय्याने डॉ. आंबेडकरांचे भव्य असे ५० फुटांचे पोस्टर लावण्यात आले. मिरवणूक पाहण्यासाठी आलेले नागरिकांना या पोस्टरसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीमसागर उसळला !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रबोधनात्मक गीतांवर ठेका धरीत हजारो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडर यांची १२८ वी जयंती जल्लोषात साजरी केली. क्रांती चौक ते भडकल गेटपर्यंत निघालेल्या मिरवणुकीत शेकडो वाहनांतून आकर्षक देखावे सादर करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी, विद्युत रोषणाई आणि डीजेच्या तालावर तरुणाईने मिरवणुकीत रंग भरले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरात वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. सायंकाळी शहरातील विविध भागातून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. क्रांती चौक ते भडकल गेट असा मिरवणुकीचा मार्ग होता.

क्रांती चौकातून सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय', 'जय भीम'चा जयघोष करीत अनुयायांचे शेकडो जथ्थे मिरवणुकीत सहभागी झाले. काही युवा खेडाळूंनी तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रात्याक्षिके सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. मैत्रेय क्रीडा मंडळाच्या ढोल पथकाने तरुणांचा उत्साह वाढवला. मिरवणुकीत चौसरनगर मित्रमंडळ, भीमज्वाला मित्रमंडळ, भीम ज्योत मित्रमंडळ, द बुद्धा युवा मित्रमंडळ, द ग्रेट बुद्धा मित्रमंडळ, संविधान मित्रमंडळ, तथागत मित्रमंडळ, त्रिरत्न मित्र मंडळ, डॉ. जितेंद्र देहाडे युवा मंडळ, भीमशक्ती यांच्यासह शहरातील विविध भागातील मंडळांनी सहभाग घेतला. लेझीम पथकांनी शिस्तबद्ध सादरीकरण केले. रोषणाई आणि डिजेने मिरवणुकीत रंग भरले. तीन भागातील मंडळांचे क्रांती चौकात आगमन झाल्यानंतर मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला. काँग्रेस, भीमशक्ती संघटना, भारतीय बौद्ध महासभा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी यूथ फोर्स, भारतीय दलित कोब्रा, पँथर्स मित्र मंडळ, समता सैनिक, भारतीय जनसंघर्ष सेना, बहुजन मुक्ती पार्टी, जनक्रांती संघटना, बहुजन समाज पक्ष आदी पक्ष, संघटनांनी ठिकठिकाणी मिरवणुकीतील पथकांचे स्वागत केले.

दरम्यान, जनजागृती करण्यासाठी काही ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले होते. मतदान जागृती, रक्तदानाचे महत्त्व, पाणी वाचवा असे संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले. संविधान, आंबेडकर यांचा जीवनप्रवास सांगणारे मोठे देखावे मिरवणुकीच्या गाडीत उभारण्यात आले होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारो अनुयायांची गर्दी उसळली होती. गर्दीची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, वाहतुकीचे नियोजन कोलमडल्यामुळे क्रांती चौक उड्डाणपुलावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक तासानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

राजकारण्यांची गर्दी

लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधत विविध पक्षाच्या नेत्यांनी मिरवणूक काळात उपस्थित राहून संवाद साधला. मिरवणुकीतील पथकांचे स्वागत करण्यात आले. क्रांती चौक ते पैठण गेट परिसरात स्वागत मंच उभारण्यात आले होते. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी राजकीय नेत्यांचा सहभाग जास्त होता. राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी स्वागत मंचाचा प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न झाला.

तरुणाईचा जल्लोष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष तरुणाईच्या सहभागाने लक्षवेधी ठरला. काही तरुणांनी फेसबुक, यू-ट्यूब चॅनलद्वारे मिरवणुकीचे लाइव्ह प्रक्षेपण केले. सेल्फी पॉइंटवर गर्दी उसळली होती. समूह नृत्य आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. मिरवणूक मार्गात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांची गैरसोय झाली.

शहरभर उत्साह

शहरातील विविध भागात आंबेडकर जयंतीचा उत्साह दिसला. जयभीमनगर, एकनाथनगर, कबीरनगर, चौसरनगर, मुकुंदवाडी, घाटी परिसर, क्रांतीनगर, शिवाजीनगर, सातारा परिसर येथे जयंती उत्साहात साजरी झाली. या भागातून सायंकाळी अनेक मंडळांनी भव्य मिरवणुका काढल्या. भडकलगेटजवळ सर्व मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरीच्या आमिषाने २४ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकोल्याच्या शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तीन जणांच्या टोळीने एकाला २४ लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून एसटी महामंडळातील चालकाने कर्ज काढून मुलीच्या नोकरीसाठी पैसे दिले. या चालकासह त्याच्या अन्य दोन नातेवाईकांची देखील याप्रकरणात फसवणूक झाली. याप्रकरणात जितेंद्र भोसले रा. खारघर, मुंबई याला अशाच प्रकरणात कोल्हापुर पोलिसांनी यापूर्वी अटक केलेली आहे.

एसटीतील चालक महादेव श्रीकृष्ण पवार (५२, रा. म्हाडा कॉलनी, महावीर चौक, बाबा पेट्रोल पंप परिसर) यांची मुलगी वैशाली नोकरीच्या शोधात होती. २०१५मध्ये पवार यांची ओळख गंगावणे नावाच्या एका व्यक्तीशी झाली. त्याने मन्नालाल प्रेमचंद बन्सवालसोबत ओळख करून दिली. यावेळी पवार यांनी बन्सवालला आपल्या मुलीसाठी नोकरी शोधण्याचे सांगितले. त्यावरून बन्सवालने मुंबईच्या खारघर येथील जितेंद्र भोसले व पंडित कौडेकरसोबत भेट घडवून आणली. भोसले व कौडेकर यांनी आपली मंत्रालयात ओळख आहे. सध्या अकोल्याच्या शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्षसेवक; तसेच कनिष्ठ लिपीकाच्या जागा रिक्त आहेत, पण त्यासाठी सात ते आठ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे पवार यांनी वैशालीच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. याशिवाय नातेवाईक नितीन तुराबसिंह सोळुंके व निलेश लक्ष्मण सोनवणे यांच्यासाठी कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरीसाठी शिफारस केली. त्यावरून भोसले व कौडेकर यांनी वैशाली, नितीन व निलेश यांची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. पवार यांनी कर्ज काढून टप्प्याटप्प्यांने तिघांना २३ लाख ९५ हजार रुपये दिले.

\Bनोकरीची बनावट दिली ऑर्डर\B

महादेव पवार यांना ११ सप्टेंबर २०१७ रोजी भोसले, कौडेकर यांनी अकोल्याच्या शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिघांना कक्षसेवक, कनिष्ठ लिपीकाची नोकरी लागल्याची ऑर्डर आणून दिली. त्यात आठ सप्टेंबर २०१७ रोजीची तारीख होती. त्यानंतर आठ दिवसांनी वैशाली, नितीन आणि निलेश अकोल्याला गेले. तेथील रुग्णालयात त्यांनी शासकीय नोकरी लागल्याची ऑर्डर दाखवली. तेव्हा अशाप्रकारच्या कोणत्याही जागा रुग्णालयात रिक्त नाहीत. ही ऑर्डर बनावट असल्याचे तिघांना सांगण्यात आले. त्यामुळे तिघांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ याची माहिती पवार यांना दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पवारांनी तिघांकडे पैशांची मागणी केली, पण तिघेही पैसे देण्यास टाळाटाळ करु लागल्याने अखेर पवार यांनी शेवटी १३ एप्रिल रोजी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत तक्रार फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.

\Bभोसलेचे कोल्हापूर कारागृहात वास्तव्य\B

भोसले याने आपली मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयांना गंडवले आहे. त्याच्याविरुद्ध कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या तो कोल्हापूर कारागृहात असल्याची माहिती क्रांतीचौक पोलिसांना मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन घराण्यांची प्रतिष्ठा पणाला

$
0
0

makarand.kulkarni@timesgroup.com

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांच्यात थेट लढाई असल्याचे बोलले जात असले तरी वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर यांनी चुरस निर्माण केली आहे. नात्या-गोत्याची जुळवाजुळव करताना बाहेरगावचे मतदार आणण्याचे आवाहन जो पेलेल तो जिंकेल, असे चित्र सध्या आहे.

बार्शी, भूम-परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा आणि औसा या विधानसभा मतदारसंघांचा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. राणा पाटील आणि ओम राजे यांची लढाई म्हणजे दोन घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुढील काळात बदल करण्याचा आणा-भाका घेऊन युती आणि आघाडी कामाला लागली आहे. पण पुढच्या विधानसभा निवडणुकीत आपली अडचण होऊ नये याची तयारी आताच करून घेतली जात आहे. लिंगायत समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा औसा येथे घेण्यात आली. त्यामुळे लातूर, उस्मानाबाद आणि बिदर मतदारसंघातील मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. ते मतदानात बदलेल की नाही हे निकालातून दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह नेत्यांच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या उस्मानाबाद मध्ये झालेल्या सभेने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंता निर्माण केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मनापासून मदत करण्याचे काँग्रेसचे आश्वासन मोदीसाठी भाजप कामाला लागल्याचे केलेले दावे वरकरणी दिलासाजनक दिसत आहेत. पण विरोधी गटांमधून त्यांचे मित्र आमचेच आहेत, असे सांगत असल्याने संभ्रम आहे. बार्शी आणि औसा मतदारसंघ काय करणार त्यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. तुळजापूरमध्ये आमदार मधुकरराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत. पण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र दुरावल्याचे बोलले जात आहेत. अशीच परिस्थिती उमरगा लोहारा परिसरात आहे. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने शिवसैनिक नाराज आहेत. भूम परंडा आणि उस्मानाबादमध्ये मात्र राणा जगजितसिंह पाटील आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यात 'कांटे की टक्कर' आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण उस्मानाबादमध्ये तळ ठोकून आहेत. एकूणच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

\Bदुष्काळ कुठाय?\B

कायम दुष्काळी असलेल्या उस्मानाबादमध्ये यंदाही भीषण दुष्काळ आहे. सत्ताधारी आणि विरोधक दुष्काळ सोडून अन्य विषय भाषणात मांडताना दिसतात. बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असून उदरनिर्वाह करण्यासाठी जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुण्यात स्थलांतरित झाले आहेत. जिल्ह्यात उद्योग वाढलेले नाहीत. पाणी नसल्याने शेतीची भरभराट झालेली नाही. शेजारच्या लातूर आणि सोलापुरात तेथील नेत्यांनी उद्योग आणले, आमच्या जिल्ह्यातील नेते फक्त राजकारण करतात, असे मतदार बोललात. दुष्काळ वगळून ही निवडणूक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनीची मृत्युशी झुंज; सरसावले हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी (मूळची मुंब्रा येथील भाजी विक्रेत्याची मुलगी) रिझवाना खान ही गंभीर आजाराने ग्रस्त असून, तिची मृत्युशी झुंज सुरू आहे. तिच्यावर घाटीच्या 'एमआयसीयू'मध्ये उपचार सुरू असतानाच तिच्या मैत्रिणींनी तिच्या मदतीसाठी तब्बल ४० हजार रुपये, तर कॉलेजच्या प्राध्यापक-अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३० हजार रुपये जमा केले आहेत. एवढेच नव्हे तर रिझवाना हिचे सर्व मित्र-मैत्रिणी तिची दिवस-रात्र सेवा करीत आहेत, हे विशेष.

रिझवाना ही अतिशय गरीब कुटुंबातून आली आहे आणि तिने आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर 'दंत'ला प्रवेश मिळवला आहे. सद्यस्थितीत ती शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. तिला अचानक त्रास सुरू झाला आणि तपासणीनंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) 'एमआयसीयू'मध्ये मागच्या आठवड्यात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीविषयी तिच्यावर उपचार करणारे घाटीच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रभाकर जिरवणकर म्हणाले, रिझवाना खान हिला गाठीचा क्षयरोग (लिम्फनोड टीबी) असल्याचे निदान झाले असून, शरीरात जंतुसंसर्ग पसरला आहे व ती श्वास घेण्यास असमर्थ असल्याने तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत तिची प्रकृती गंभीर; पण स्थिर आहे. तसेच तिच्यावर शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत व ती बरी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही डॉ. जिरवणकर म्हणाले. ताप व जंतुसंसर्गामुळे तिच्यावर प्रतीजैविकांच्या आधारे उपचार केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

\Bदानशुरांनी यावे पुढे

\Bएकीकडे तिच्यावर उपचारांची शर्थ लढविली जात आहे, तर दुसरीकडे तिच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहे. तिची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे तिच्या मदतीसाठी तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींनी सुमारे ४० हजार रुपये जमा केले आहेत, तर महाविद्यालयातील डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांनी सुमारे ३० हजार रुपये जमा केले आहेत. तिच्या मदतीसाठी दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहनur महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दानशूर व्यक्ती रिझवाना हिचे वडील मुजाद खान यांच्याकडे मदत सुपूर्द करू शकतात, असेही क‌‌ळविण्यात आले.

रिझवाना हिच्यासाठी सर्वांनी ७० हजारांपेक्षा जास्त निधी जमा केला आहे व आणखी निधी लागल्यास आणखी जमा केला जाईल. तसेच इतर काही शासकीय योजनेतूनही तिला मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तिची प्रकृती सुधारेल, अशी आशा आहे.

\Bडॉ. एस. पी. डांगे\B, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेकॉर्डेड गाणी, चित्रपटांना प्रवासी कंटाळले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एसटी प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी बसमध्ये वायफाय सुविधा देण्यात आली आहे. या वायफाय सुविधेला पहिल्या काही महिन्यात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, रेकॉर्डेड जुनी गाणी, चित्रपटांपलीकडे या सुविधेत काहीही मिळत नसल्याने एसटीच्या वायफायकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. पाच टक्केपेक्षा कमी प्रवासी याचा वापर करीत असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्व एसटींमध्ये वायफाय सुविधा देण्यात आली असून बस सुरू होताच हे वायफाय यंत्र चालू होत. मराठी गाणी, काही मराठी मालिका यासह काही मराठी चित्रपटही या वायफाय सुविधेतंर्गत देण्यात आले होते. एसटीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुरुवातीचे काही दिवस या वायफायला प्रतिसाद दिला. मात्र, सर्व रेकॉर्डेड आणि तेच ते कार्यक्रम असल्याने प्रवाशांनी याकडे पाठ फिरविली.

सध्या वर्षातून एकदा किंवा दोनदा जाणाऱ्या प्रवाशांमधीलच काहींकडून या वायफायचा वापर होत आहे. वायफायचा वापर कमी होत असल्याने एजन्सीधारकांना या वायफायद्वारे मिळणारे उत्पन्नही कमी झालेले आहे. यामुळे ही सुविधा सध्या बंद झाल्यात जमा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. …

एसटीच्या वायफाय सेवा प्रवाशांमध्ये अधिक प्रसिदध व्हावी. तसेच त्याचा वापर वाढावा यासाठी या वायफाय मध्ये कार्यक्रम वाढविण्यात येणार आहे. यासाठी काम सुरू करण्यात आलेले आहे.

किशोर सोमवंशी, विभाग नियंत्रक, औरंगाबाद एसटी विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्णय प्रक्रियेत ‘तिला’ डावलणे घातक

$
0
0

औरंगाबाद-उदयपूर-दिल्ली विमान सेवा सुरू करा दिल्ली, मुंबई, बेंगळुरूसाठी विमाने वाढवा रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढण्याची गरज औरंगाबाद शहराभोवती त्वरित रिंग रोड तयार करावेत राष्ट्रीय व समृद्धी महामार्ग जलदगतीने विकसित करावेत नागपूर-औरंगाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेचे सर्वेक्षण केले आहे, ती रेल्वे लवकर सुरू करावी घोषित केलेल्या ट्रान्सपोर्टनगरीचे काम लवकर सुरू करावे औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम जलदगतीने करावे औरंगाबादच्या पर्यटन स्थळांच्या प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करावा शहराचे पर्यटन वाढविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सतत प्रयत्न व्हावेत औरंगाबादचा समावेश बुद्धिस्ट सर्किटमध्ये करावा सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे चाळीसगावचा रस्ता लवकर पूर्ण करावा शिर्डीकडे-लासूर रस्त्याची अवस्था सुधारावी शहरातील रस्त्यांची सुधारणा, वाहतूक नियमांची जनजागृती, हेल्मेट, लेन क्रॉसिंग, सिग्नल पाळणे यावर भर द्यावा सावंगी-दौलताबाद प्रस्तावित वळण रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार साहित्यासह रोख साडेसहा लाख चित्तेगाव नाक्यावर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

राजकीय पक्षाचे चिन्ह व प्रचार साहित्य असलेल्या एका कारमध्ये आढळलेले रोख सहा लाख ५७ हजार रुपये लोकसभा निवडणूक आचारसंहिता पथकाने जप्त केली. पैठण-औरंगाबाद मार्गावर चित्तेगाव तपासणी टोल नाक्यावर ही घटना घडली.

आचारसंहिता पथकाने शनिवारी रात्री चितेगाव टोलनाका येथे एम एच २० सी झेड क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात राजकीय पक्षाचे गळ्यातील रुमाल, पॉम्पलेट व सहा लाख ५७ हजार रोख रक्कम निदर्शनास आली. कारचालक गणेश नवले याने ही रक्कम 'लेबर पेमेंट' असल्याचा दावा केला. मात्र, कारवर राजकीय पक्षाचे चिन्ह व कारमधील निवडणूक प्रचार साहित्य हा प्रकार संशयास्पद असल्याने पथकाने ही माहिती तहसीलदार महेश सावंत यांना दिली. तहसीलदारांनी तातडीने भरारी पथक घटनास्थळी पाठवून व्हिडिओ चित्रीकरण करत निवडणूक प्रचार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले. संशयित कारमधून निवडणूक साहित्य व रोख सहा लाख ५७ हजार रुपये जप्त केले आहे. याबाबत आयकर विभाग व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. याप्रकरणी कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सावंत यांनी सांगितले.

आचारसंहिता पथकात एस. आर. दिवटे, बी. बी. काळे, ए. व्ही. पोतदार, पोलिस नाईक भालेराव, जी. एम. निसर्गगंध, ए. बी. काकडे, यू. सी. भांडावे यांच्यासह पोलिस शिपाई राजेश आटोळे, आर. टी. जैस्वाल, प्रथमेश पावले यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसंकट आणखी गहिरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी येथील पंपहाउस परिसरात शनिवारच्या रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज कोसळली. त्यामुळे पंपहाउस बंद पडले. त्याची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असतानाचा वीजपुरवठाही खंडित झाला. त्याचबरोबर फारोळ्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीजपुरवठाही बंद झाल्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे दुरुस्तीची पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत औरंगाबादकरांवरील पाणीटंचाई आणखी तीव्र होणार आहे.

शहरातील अनेक भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सात दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. जायकवाडीतून मृत पाणीसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मृतसाठ्यात पाणी गेल्याने पंपहाउसची दुरुस्ती करण्यात आली. तेथे आणखी काही काम सुरू आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पंपहाउसवर वीज कोसळल्याने तेथील वीजपुरवठा बंद पडला. तो सुरळीत करण्याचे काम रात्री अडीचपर्यंत काम सुरू होते. अडीच वाजता वीजपुरवठा पूर्ववत करून पाणीपुरवठा सुरुळीत करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर रविवारी पाणीपुरवठा सुरू असताना फारोळा येथील वीजपुरवठा बंद पडला. वीजपुरवठ्यातील बिघाड दुरुस्तीची प्रक्रिया रविवारी सायंकाळपर्यंत सुरूच होती. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. फारोळ्यातून शहरातील जलकुंभावर होणारा पाणीपुरवठा थांबला आहे. त्यामुळे सोमवारी, मंगळवारी विविध भागांमध्ये नियोजमत पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा समाना करावा लागणार आहे.

सध्या शहरात अनेक भागतील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागतो आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. शहराला १५० एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी आवश्यक आहे. जायकवाडीची पाणी पातळी कमी झाल्याने औरंगाबादला शहरासाठी १३५ एमएलडीचा उपसा होतो आहे. त्यातूनही शहरात येईपर्यंत ११५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्याने शहरातील नागरिकांना थेट सात दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यात या संकटात भर पडली आहे.

टँकरही थांबले?

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने शहरातील सिडको-हडको, गारखेडा परिसर, मुकंदवाडी, चिकलठाणा, नारेगाव आदी अनेक भागांत महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात ३४ जलकुंभ आहेत. त्यावरून अनेक भागात पाणीपुरवठा होतो. जायकवाडी पंपहाउस, फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला असून, दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याला आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलकुंभावरून टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

..

जायकवाडीवरून शहरासाठी होणारा पाणीपुरवठा.. १३५ एमएलडी

प्रत्यक्ष शहरात पोचणारे पाणी.........................११५ एमएलडी

जलकुंभ.......................३४

रोज टँकरने पाणीपुरवठा....५००

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी रविवारी (१४ एप्रिल) पहाटे पुंडलिकनगर भागातील पाण्याच्या टाकीजवळील त्यांच्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती रविवारी सकाळी दहाच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सुंदर विलास लटपटे (५६, रा. योगीराज अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक २, पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीजवळ, औरंगाबाद) हे भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पत्नी त्यांच्यासमवेत राहत नव्हती. एन-चारमध्ये त्यांची बहिणी राहत होती. या बहिणीचा मुलगा अमित गर्जे (३६, रा. एन-चार, औरंगाबाद) यांने मामा सुंदर लटपटे यांच्या मोबाइलवर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फोन केला. मोबाइल फोन कोणीही उचलला नाही. त्यामुळे अमित आपल्या मामाला पाहण्यासाठी त्यांच्या घरी पोचला. त्यांने दरवाजा वाजवून मामाला आवाज दिला. आवाजाला प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यांने घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, एका वायरच्या सहाय्याने सुंदर लटपटे यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

पोलिसांनी त्यांच्या घरातील डायरी, मोबाइलसह अन्य वस्तू ताब्यात घेतले. याबाबत लटपटे यांचा भाचा अमित गर्जे यांनी सांगितले की, लटपटे आर्थिक विवंचनेत होते. त्यांना हृरविकाराचा झटका आला होता. त्यांचे हृदय २० टक्के काम करीत होते.

घाटीत शवविच्छेदनानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यावर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

\Bसुसाइड नोट पोलिसांच्या ताब्यात\B

सुंदर लटपटे यांनी मृत्युपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी,आपल्या मृत्युस त्यांचा मेहुणे संजीव उन्हाळे हे जबाबदार याला धरावे, असे लिहिले असून, त्यांनी ३० वर्षांचा संसार बायकोचे कान भरून मोडला, असाही आरोप केला.

सहा महिन्यांपासून होते अलिप्त

मराठवाडा दैनिकापासून सुंदर लटपटे यांनी आपली कारर्कीर्द सुरू केली होती. त्यांनी विविध दैनिकांत काम केले आहे. एकलव्य प्रकाशन ही संस्था त्यांनी सुरू केली होती. सुरवातीला त्यात यश आले. त्यानंतर हा व्यवसाय तोट्यात गेला होता. त्यांनी 'महाराष्ट्र आज, काल आणि उद्या' हे साप्ताहिक सुरू केले होते. यानंतर त्यांनी शहरातील विविध वर्तमान पत्रात संपादक म्हणून काम केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ज्योतिबा या वेबसाइटचे काम सुरू केले होते. त्यांच्या पत्नीसोबत कलह झाल्याने ते सहा महिन्यांपासून अलिप्त होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वारास उडवले; ३८ लाख ५० हजारांची भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको सिग्नलजवळ सिग्नल लागल्याने थांबलेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणात मृताच्या वारसांना ३८ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विजय कुलकर्णी यांनी बसचालक व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंड‌ळाला दिले. विशेष म्हणजे दावा दाखल झाल्यापासून नऊ टक्के दराने व्याज देण्याचे आदेशही कोर्टाने बजावले आहेत.

फर्निचर कारागीर बालाजी गणपती ढवारे (४१) हे त्यांचे मित्र संजय जाधव यांच्यासोबत १६ ऑक्टोबर २०१७ रोजी सिडको बसस्थानकमार्गे जयभवानीनगरकडे जाण्यासाठी दुचाकीवर (एमएच २०, सीजी २३६३) निघाले होते व सिडको बसस्थानकाजवळील सिग्नलवर सिग्नल लागल्याने थांबले होते. तेवढ्यात पाठीमागून वेगात एसटी बस (एमएच ४०, एन ९७६८) आली आणि बसने ढवारे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात बालाजी ढवारे यांचा जागीच मृत्यू झाला. प्रकरणात सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) कलमान्वये गुन्हा दाखल होऊन बसचालक सजन इंदल नायमाने याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मृत ढवारे यांच्या पत्नी मंगल बालाजी ढवारे (३८, रा. सनी सेंटर, एन-सात, पीसादेवी रोज), दोन अल्पवयीन मुले; तसेच आई व वडिलांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून बसचालक व महामंडळाविरुद्ध दावा दाखल केला होता.

\Bचालकामुळेच मृत्यू झाल्याचा युक्तिवाद

\Bखटल्यावेळ‌ी, बालाजी ढवारे हे घरातील कुटुंबप्रमुख होते; तसेच ते एक कुशल कारागीर होते. ते मासिक २५ हजार रुपये कमवीत होते व ते सरकारकडे उत्पन्न कर, परतावा भरत होते. बसचालकाच्या चुकीमुळेच त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले, असा युक्तिवाद ढवारे यांच्या वारसांच्या वतीने अॅड. पी. एस. तांदुळजे यांनी केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने वारसांना एकूण ३८ लाख ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बसचालक व महामंडळाला दिले. अॅड. तांदुळजे यांना अॅड. सुनिता तांदुळजे, अॅड. आर. टी. बावस्कर यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images