Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

चेक बा‌उन्सप्रकरणी सक्तमजुरीसह १५ लाखांची नुकसान भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हातउसने घेतलेले ११ लाख ७० हजार रुपये जवळजवळ दोन वर्षांपर्यंत दिलेच नाहीत व त्यानंतर दिलेला धनादेश वटला नाही. प्रकरणात राजीव ओमप्रकाश गुप्ता (अग्रवाल) याला एक वर्ष सक्तमजुरी व १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

या प्रकरणी व्यावसायिक अनिल यशवंत कुलकर्णी (७०, रा. समर्थनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, स्वत:च्या आर्थिक गरजेपोटी फिर्यादीशी परिचय असलेला व्यावसायिक राजीव ओमप्रकाश गुप्ता याने फिर्यादीकडून ११ लाख ७० हजार रुपये सहा महिन्यांच्या कालावधीत परत करण्याच्या बोलीवर हातउसने घेतले होते, मात्र मुदत संपून गेल्यावर फिर्यादीने गुप्ताला वारंवार पैशांची मागणी केली, परंतु त्याने पैसे दिले नाहीत.

दरम्यान, गुप्ताने फिर्यादीला जानेवारी २०१५मध्ये वरील रकमेचा धनादेश दिला, जो अपुऱ्या निधीमु‌ळे वटला नाही. त्यामुळे फिर्यादीने कोर्टात धाव घेतली. खटल्यावेळी, दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने गुप्ताला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली; तसेच तक्रारदाराला एका महिन्याच्या आत १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले. गुप्ताने नुकसान भरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत दिली नाही तर, त्याला आणखी सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. फिर्यादीच्या वतीने अॅड. पी. एस. बर्जे व अॅड. व्ही. पी. बर्जे यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीई शुल्क परतावा नाही

$
0
0

प्रवेशात अडचणी निर्माण होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीत पात्र ठरलेल्यांना २६ पर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे. त्याचवेळी शाळांना मागील तीन वर्षांपासून शुल्काचा परतावा मिळाला नसल्याने प्रवेशात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ५० टक्के निधी देण्याचे आदेश शासनाने दिले.

दुर्बल व वंचित घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची योजना आहे. यात शाळांना प्रतिपूर्ती शुल्कबाबतच्या रक्कमेचा गोंधळ कायम आहे. २०१२-१३ पासून पैसे शासनाकडून मिळाले नसल्याने मागील वर्षी शाळांनी प्रवेश न देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर शासनाने हालचाली सुरू केल्या. निधी वितरित करण्यात आला. त्यात २०१७-१८पासूनचा निधी रखडल्याचा मुद्दा यंदा समोर आला. त्यावर अनेकांनी कोर्टातही धाव घेतली. त्यामुळे पुन्हा परतावा शुल्काचा मुद्दा समोर आला. यंदा प्रवेशाची सोडत होऊन प्रत्यक्ष प्रवेशाला ११ एप्रिलपासून सुरुवात झाली. अशावेळी याच शुल्कावरून शाळांची नाराजी पालकांना सोसावी लागण्याची शक्यता आहे. अद्यापही शाळांना शुल्काचा परतावा मिळाला नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. त्यात नुकताच सरकारने आदेश काढत ५० टक्के तरी निधी तातडीने देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे काही प्रमाणात शाळांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे. निधीबाबत शासनाने आदेश दिल्यानंतरही प्रशासकीय पातळीवरून अडवूण केली जाते अशी शाळा प्रशासनाची ओरड असते.

परिपत्रकात असे आहे म्हटले

शाळांच्या थकित प्रतिपूर्तीबाबत विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यंदा निधीबाबत आदेश प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस आधी काढण्यात आला. यात २०१६-१७ पर्यंतचे ज्या शाळांचे प्रतिपूर्तीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत अशा शाळांच्या प्रलंबित रक्क्म त्या-त्या वर्षी निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावेत. २०१७-१८ शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती २०१६-१७ मधील मंजूर दराप्रमाणे करावी. २०१७-१८ मधील शाळांचे प्रतिपूर्ती रकमेपैकी ५० टक्के प्रतिपूर्तीची रक्कम तात्काळ द्यावी अशा सचना आहेत. शिक्षण विभाग यावर काय करते, याकडे शाळांचे लक्ष लागले आहे.

पात्र शाळा ५९६

पहिल्या टप्प्यात ३८३९

एवढे देणार प्रवेश ५६२७

शिक्षण विभागाकडून प्रवेश परतावा शुल्क देण्यास अनेकदा विलंब केला जातो. प्रशासकीय अडकाटीमुळे ही वेळ येते आहे. प्रत्येकवेळी संघर्ष करावा लागतो. तीन वर्षांपासूनचे थकलेली रक्कम आहे. कोर्टानेही आदेश दिल्यानंतरही प्रशासनाकडून वेळापत्रक पाळले जात नाही.

प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना. (मेस्टा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. मोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद प्रसुतीशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवडणूक होऊन अध्यक्षपदी डॉ. जयश्री मोरे, तर सचिवपदी डॉ. मनिषा काकडे-पाथ्रीकर यांची निवड झाली. तसेच २०२०-२१ या वर्षासाठी डॉ. पंडित पळसकर यांची नियोजित अध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणी अशी: उपाध्यक्ष- डॉ. अनुराधा शेवाळे, डॉ. ललिता बजाज, सहसचिव- डॉ. गुरुप्रित कौर संधू, कोषाध्यक्षपदी- डॉ. भाग्यश्री रंजनवन, क्लिनिकल सचिवपदी डॉ. अनघा दिवाण, डॉ. किरण छाबडा, डॉ. घनश्याम मगर, डॉ. विशाल चौधरी, राज्य प्रतिनिधी- डॉ. सुरेश रावते, डॉ. विक्रम लोखंडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य- डॉ. विनायक खेडकर, डॉ. अजय माने, डॉ. खुर्रम खान, डॉ. वीणा पानट, डॉ. अपर्णा राऊळ, डॉ. आशा गायकवाड, डॉ. अंजली वरे, डॉ. मनिषा राजगुरू, डॉ. अनुराधा अपसिंगेकर, डॉ. किरण छाबडा, डॉ. गौरी डंख, डॉ. ज्योती पवार, डॉ. अर्जना पाटील, डॉ. जयश्री जाधव, डॉ. प्रिया देशमुख. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. श्रद्धा पानसे यांनी काम पाहिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन ये‌ळीकर, संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, 'फोग्सी'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंग परदेशी, घाटीचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी रचकोंडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शर्व पाटील यास राष्ट्रीय शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारत सरकारच्या दिल्ली येथील 'सांस्कृतिक स्रोत एवं सांस्कृतिक मंत्रालया'च्या (सीसीआरटी) वतीने 'सांस्कृतिक गुणवत्ता शोध शिष्यवृत्ती योजना-२०१८'अंतर्गत हिंदुस्थानी वाद्य संगीतासाठी (तबला) दिली जाणारी राष्ट्रीय शिष्यवृत्ती शहरातील तापडिया इनोव्हेशन शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थी शर्व शोण पाटील याला नुकतीच प्रदान झाली आहे. ही शिष्यवृत्ती शर्व याला वयाच्या २० वर्षांपर्यंत मिळणार आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच हजार ग्रामस्थांत ‘डिप्रेशन’वर मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुमारे शंभर तरुण मानसोपचारतज्ज्ञांनी राज्यातील ४० गावांमध्ये विनाशुल्क सुरू केलेला 'गाव तिथे मानसोपचार' हा प्रकल्प अगदी पहिल्याच वेळेस पाच हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थांपर्यंत पोहोचला आहे. यानिमित्ताने नैराश्य अर्थात 'डिप्रेशन'वर ग्रामस्थांमध्ये विविध माध्यमातून मंथन घडवून आणण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामस्थदेखील मानसिक आजार समजून घेण्यासाठी उत्सुक असल्याचा अनुभवही मानसोपचारतज्ज्ञांनी शेअर केला आहे.

वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या वेगवेग‌ळ्या मानसिक आजारांवर खेडोपाडी जनजागरणाचा वसा तरुण मानसोपचारतज्ज्ञांनी घेतला आहे आणि जागतिक आरोग्य दिनापासून म्हणजेच ७ एप्रिलपासून राज्यातील सुमारे ४० खेड्यांमध्ये 'गाव तिथे मानसोपचार' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील सुमारे शंभर मानसोपचारज्ज्ञ सहभागी झाले असून, दर दोन महिन्याला त्या त्या गावात वेगवेग‌ळ्या मानसिक आजारांवर ग्रामस्थांमध्ये मंथन घडवून आणले जात आहे. 'एक गाव, एक दिवस, एक वेळ, एक विषय, एक मानसोपचारतज्ज्ञ, एक ध्येय' या पद्धतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला सुरुवात झाली ती सर्वाधिक प्रमाणात सामान्य असलेल्या नैराश्य या मानसिक आजाराच्या जनजागरणाने. यात निवडलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन पत्रके वाटण्यात आली. या पत्रकांच्या माध्यमातून नैराश्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचवेळी प्रत्येक गावात एखाद्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना निमंत्रित करुन प्रोजेक्टर किंवा इतर साहित्याच्या आधारे मुळात नैराश्य म्हणजे नेमके काय, दु:खी होणे आणि नैराश्यामध्ये नेमका काय फरक आहे, तसेच नैराश्याचा मानसिक आजारांमध्ये कोणत्या कारणामुळे समावेश होतो आणि त्यावरील विविध उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत, याविषयी ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचवेळी नैराश्याविषयीचे ग्रामस्थांमधील गैरसमजही दूर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी फिडबॅक फॉर्मदेखील भरुन घेण्यात आले, असेही या उपक्रमात सहभागी झालेले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख व डॉ. चिन्मय बाऱ्हाळे यांनी 'मटा'ला सांगितले. मराठवाड्यामध्ये पैठण, माळीवाडा व परभणी जिल्ह्यातील एका गावात हा पहिला उपक्रम राबवण्यात आल्याचेही ते म्हणाले.

\Bप्रत्येक गावात १०० ते ३०० ग्रामस्थ

\Bराज्यातील ४० गावांमध्ये ७ एप्रिल रोजी हा पहिला उपक्रम राबवण्यात आला. या प्रत्येक ठिकाणी १०० ते ३०० ग्रामस्थांची उपस्थिती होती. यामध्ये तरुण, ज्येष्ठ तसेच महिला-पुरुष अशा सगळ्यांचा समावेश होता. अर्थात, महिलांचा सहभाग काहीसा कमी होता. मात्र सहभागी झालेल्या सर्वांनी नैराश्य आजार समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही डॉ़ देशमुख म्हणाले. यानंतर दुसऱ्या मनोविकारांवर मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न असेल व यात आणखी मनोविकारतज्ज्ञ सहभागी होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोंदीनी माझी चिंता करू नये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटे आहेत, परंतु माझे घर भरलेले आहे. त्यांनी माझ्या घरची चिंता करू नये', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. 'पुलवामा हल्ल्यात आपले चाळीस जवान हुतात्मा झाले, तेव्हा ५६ इंचांची छाती कुठे गेली होती? पाकिस्तानमध्ये असलेल्या कुलभूषण जाधव यांना सोडवून आणा आणि मग ५६ इंचाची छाती दाखवा', असे आव्हान पवार यांनी मोदींना दिले.

बीड लोकसभा निवडणुकीसाठी पवार यांची आष्टी येथे सभा झाली. यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे माजी आमदार प्रा. सुनील धांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार म्हणाले, ‘आज बीड जिल्ह्यात आलो असताना अनेक सहकाऱ्यांची आठवण येते. काही जण हयात नाहीत, तर काही जण तब्येतीने खचले आहेत. बीडच्या विकासासाठी आम्ही मिळून काम केले म्हणून आज त्यांची आठवण येत आहे. गोपीनाथरावांची आठवण येत आहे. ते विरोधी बाकावर बसायचे, मी देशाचा कृषिमंत्री होतो. आमची शाब्दिक चकमक व्हायची. मात्र, आमच्यात वैयक्तिक मतभेद नव्हते. गोपीनाथराव गरिबांसाठी झटले आणि म्हणून त्यांच्या निधनानंतर आम्ही त्यांच्याप्रति आदर व्यक्त करावा, म्हणून तिथे उमेदवारी दिली नाही. बीड जिल्ह्यात ज्यावेळी उमेदवारी देण्याची वेळ आली. त्यावेळी धनंजय मुंडे यांचे मत आम्ही जाणून घेतले. पर्याय अनेक होते. मात्र, धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचे नाव पुढे केले. बीड जिल्हा हा कष्ट करणाऱ्यांचा सन्मान करणारा जिल्हा आहे. याआधीही येथील जनतेने सामान्य माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे या सामान्य शेतकऱ्याला उमेदवारी द्यावी ही त्यांची भूमिका होती.’

आरक्षणाचा मुद्दा


भाजप आणि सहकारी बाजूला सारून सर्वांनी एकत्रित येणे ही राष्ट्रीय गरज असल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘बीड जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही चिंतेची बाब आहे. फिटलं अन् मिटलं म्हणा म्हणणाऱ्या नाना पाटलांच्या जिल्ह्यातूनच देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणाले, ते अद्याप दिले नाही. मराठ्यांना आरक्षण देतो, फटाके फोडा म्हणाले, तिथेही न्यायालयाने स्थगिती दिली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही तेच. सत्ताधारी फक्त फसवतात, अशा धोका देणाऱ्या विचारसरणीच्या हातात सत्ता देऊ नका.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

(मटा कट्टा )जात-धर्मावर निवडणुका नकोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जात-धर्माच्या नावावर निवडणुका लढविणे ही निव्वळ धूळफेक आहे, अशा मुद्यांपेक्षा रोजगार, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा मुद्यांवर बोलणाऱ्या लोकप्रतिनधींची संख्या वाढणे गरजेचे आहे. राजकीय पक्षाने मोठी स्वप्न दाखवून मतदारांना प्रभावीत करण्यापेक्षा आपण काय केले, काय करायला हवे, कोणते महत्वाचे प्रश्न आहेत यावर बोलावे असे मत, चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मांडले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे ‘मटा कट्टा’ उपक्रमात ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’, औरंगाबाद शाखेतील (आयसीएआय) विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. सत्यम लांडे, तरुण पगारिया, ऐश्वर्या गंगावल, शिवानंद पेरुमला, सौरव मालू, साकेत महाजन, सागर बियाणी, श्रृती भुचाने, चैताली पाठक, गौरव भट्टड, साकेत महाजन, विपूल उपाध्याय, कार्तिक कुलकर्णी यांनी यात सहभाग घेतला. चार्टर्ड अकाउंटंटच्या विद्यार्थ्यांनी ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी), शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, कचरा प्रश्न, करदात्यांचे प्रश्न, शेती, रिअल इस्टेट, सोशल मीडिया, शिक्षणासाठीचे स्थलांतर, लोकसभा निवडणुकीतील मुद्दे याबाबत आपली मते व्यक्त केली.

कार्तिक कुलकर्णी म्हणाला, लोकसभा निवडणूक पायाभूत सुविधा, विकासाच्या मुद्यांवर होणे आवश्यक आहे. रोजगार वाढीसाठी औद्योगिक विकास हा महत्वाचा आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा तुमच्या शहरात कशा आहेत त्यावर हा विकास अवलंबून आहे. विपूल उपाध्याय म्हणाला, जातीपाती पेक्षा निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर होण्याची गरज आहे. ‘सीए’सारखे अनेक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी औरंगाबादमधून मोठ्या शहरात जात आहेत. अशाप्रकारे इतर शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. याची कारणे शोधण्याची गरज आहे. इतर शहरांच्या तुलनेत आपल्याकडे काय आवश्यक आहे. तशा प्रमाणात सोयीसुविधा देण्याची गरज आहे. शहराचा स्मार्टसिटीत सहभाग झाला. मात्र, त्या दृष्टिकोनातून शहरातील पायाभूत सुविधांचा पहायला मिळत नाही. साकेत महाजन म्हणाला, मागील चार वर्षात कर प्रणालीत आलेल्या बदलांमुळे त्याचे चांगले, वाईट परिणाम चांगले आहे. ‘जीएसटी’च्या रुपात कर उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली अन् सरकारी तिजोरीत ही रक्कम जमा झाली. औद्योगिक धोरणातही त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. गौरव भट्टड म्हणाला, जीएसटीमुळे कर प्रणालीत एक सुसूत्रता आली हे खरे आहे. असे असले तरी, रिअल इस्टेट, कृषी क्षेत्र अद्याप त्यातून सावरलेले नाही. पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांना फटका बसला तर त्याचे परिणाम अनेक घटकांवर होतात. कृषिचेही तसेच आहे. चैताली पाठक म्हणाली, कोणत्याही राजकीय पक्षांनी ज्या घोषणा पूर्ण होऊ शकतात त्याच घोषणा कराव्यात. उगाच मोठी स्वप्न दाखवून काय होणार. सुशिक्षितांची, तरुणांची संख्या मोठी आहे. येथे प्रत्येकजण काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट पाहतो. असे असले तरी, नागरिकांनी, तरुणांनी सोशल मीडियाला बळी पडता कामा नये.

श्रृती भुचाने म्हणाली, महिला सक्षमीकरणाकडे आपण अधिक लक्ष देण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत केवळ कायदे झाले की, अत्याचार थांबले असे होत नाही. अनेक घटना समोर आल्या. अशा प्रकारांना थांबविण्याचे आव्हान आहे. भारताचा यूथ हा वर्किंग यूथ आहे. मॉडलायझेशन आले, रोबोटिक्स स्विकारले.

सागर बियाणी म्हणाला, कर प्रणालीत सुधारणामुळे त्याचे चांगले परिणाम आगामी काळात दिसतील. करदात्यांची संख्या वाढेत ज्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात अधिक रक्कम जमा होईल जी पायाभूत सुविधांच्या, देशाच्या विकासासाठी महत्वाची ठरेल. याच मुद्याला अनुसरून सौरव मालू म्हणाला, जीएसटी कर प्रणालीबाबत काहीसी नाराजी होती. मात्र, जीएसटीचे आगामी काळात यशस्वी ठरलेले आपल्याला पहायला मिळेल. विविध कर भरण्यापेक्षा एकत्रित कर हे कधीची यंत्रणेतील सुधारणांसाठी चांगलेच असते. शिवानंद पेरुमला म्हणाला, करदात्यांची संख्या वाढली आणि देशाच्या तिजोरीत कर वाढला तर इतर देशांकडून विकास कामांसाठी कर्ज काढण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तरुण पगारिया म्हणाला, जीएसटी म्हणजे कर प्रणालीमध्ये करण्यात आलेली ही मोठी सुधारणा आहे. त्याचे चांगले परिणाम सुरुवातीला लगेच दिसून आले नाहीत भविष्यात ही प्रणाली यशस्वी झालेली असेल. सत्यम लांडे म्हणाला, विविध पातळीवर २० किंवा त्यापेक्षा अधिक विविध कर करदात्याला भरावे लागत आता त्यात जीएसटी आली त्यामुळे हा निर्णय चांगला ठरला.

‘पायाभूत सुविधां’चे प्रश्न

लोकसभा निवडणुका कोणत्या मुद्यांवर होणे आवश्यक आहे हे ठरवायला हवे. शहरात पायाभूत प्रश्नांवर कोण लक्ष देणार. रस्ते, पाणी, कचऱ्यासारखे प्रश्न अतिशय गंभीर झाले आहेत. त्या समस्यांवर काय झाले या प्रश्नांची उत्तरे देणे लोकप्रतिनिधींनी द्यायला हवी. औरंगाबादचा विचार केला तर पायाभूत सुविधांचे प्रश्न अद्यापही सुटू शकले नाहीत. लोकसंख्या वाढ, शहराचा विस्तार याचा विचार करून चांगल्या पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील त्या दृष्टिकोनातून रोड मॅप तयार झाल्यास शहराचा विकास अधिक गतीने होईल.

जीएसटी लागू झाल्यामुळे सगळ्या करांची जागा फक्त एकच कराने घेतली हे खरे आहे. त्यात सुरुवातीला अनेक अडचणी निर्माण झाल्या त्या पूर्णपणे सुटल्या, असे म्हणता येणार नाही, परंतु भविष्यात यातील बदल निश्चित आपल्याला दिसतील. आपल्याकडे अनेक वर्षापासून त्याबाबत चर्चा होती. मात्र, अखेर ही कर प्रणाली लागू झाली आणि कर प्रणालीच्या चर्चेला विराम मिळाला.
साकेत महाजन

राजकीय पक्षांनी निवडणुकी दरम्यान मोठी स्वप्न दाखवू नयेत. जी, स्वप्न पूर्ण होतात तीच स्वप्न दाखविणे, त्याच घोषणा करायला हव्यात. सोशल मीडियाबाबत ही प्रत्येकाने अतिशय काळजीपूर्वक वर्तन करायला हवे. त्याला फारसे बळी न पडता वाटचाल करण्याची गरज आहे.
चैताली पाठक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'न्याय'चे पैसे ५ कोटी महिलांच्या खात्यात जमा होणार: राहुल

$
0
0

नांदेड :

नोटबंदीचा सगळ्यात जास्त त्रास महिलांना झाला, म्हणूनच 'न्याय' योजनेतून दिले जाणारे आर्थिक सहाय्य कुटुंबातील महिलेच्या खात्यावर थेट जमा केले जाणार असून ५ कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेड येथील सभेत व्यक्त केला. मी मोदींसारखी खोटी आश्वासनं देणार नाही, आमचं सरकार स्थापन होताच २२ लाख सरकारी नोकऱ्यांची पदे तत्काळ भरणार, अशी घोषणाही राहुल यांनी यावेळी केली.

नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेतून राहुल गांधी यांनी न्याय योजना, रोजगार, कर्जबाजारी शेतकऱ्यास संरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले.

काय म्हणाले राहुल?

> पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत सामान्य जनतेवर अन्याय केला. काँग्रेस पक्ष सामान्यांशी 'न्याय' करेल.

> २० टक्के गरीब जनतेला दरवर्षी ७२ हजारांचे आर्थिक सहाय्य देणे सहज शक्य आहे. त्याने भारतीय अर्थव्यवस्थेचे कोणतेही नुकसान होणार नाही.

> कर्जबुडवे फरार होतात, मात्र कर्जबाजारी शेतकऱ्याला गजाआड टाकले जाते. आता हे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांवर फौजदारी खटले दाखल केले जाऊ नयेत, असा कायदा आम्ही आणणार.

> देशाच्या तिजोरीची चावी मोदींनी अनिल अंबानींसारख्या मूठभर भांडवलदार मित्रांच्या हातात दिली आहे. ती भारतीय जनतेच्या हातात देण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेतो आहे.

> मूठभर १५ लोकांचे ३ लाख ५० हजार कोटींचे कर्ज मोदींनी माफ केले, पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही.

> घोटाळेबाज पंतप्रधान जनतेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही कारण, 'चौकीदार चोर है'

नांदेडकर काँग्रेससोबतच: अशोक चव्हाण

भाजपचं सगळं मंत्रिमंडळ जरी नांदेडमध्ये आलं आणि कितीही सभा घेतल्या तरी इथली जनता काँगेससोबतच राहणार आहे. 'खोटं बोल पण रेटून बोल' ही भाजपची खरी स्थिती असून जनता भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कमलनयन’कडून घाटीला साडेपाच लाखांची औषधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील सर्वांत मोठे रुग्णालय असलेल्या घाटीमध्ये औषधांची तीव्र टंचाई लक्षात घेऊन कमलनयन बजाज रुग्णालयाच्या वतीने घाटीला सोमवारी (१५ एप्रिल) सुमारे साडेपाच लाखांची औषधी तसेच वैद्यकीय साहित्य देणगी स्वरुपात देण्यात आले. 'कमलनयन'मध्ये आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात औषधी तसेच साहित्य घाटीला सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी मराठवाडा मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित 'कमलनयन'चे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी, विश्वस्त व ज्येष्ठ उद्योजक नंदकिशोर कागलीवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आलोक श्रीवास्तव, औषधी विभागप्रमुख अमोल पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, घाटीच्या औषधी भांडारप्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 'कमलनयन'कडून देण्यात आलेल्या औषधांमध्ये श्वानदंशावरील 'एआरव्ही' इंजेक्शनसह प्लास्टरचे साहित्य, गॉज, आयोडिन आदींचा समावेश आहे. या निमित्त, गोरगरीब रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर उपचार केल्या जाणाऱ्या घाटीच्या मदतीसाठी समाजातील विविध घटकांनी पुढे यावे, असे आवाहन त्रिपाठी यांनी केले. तर, घाटीतील औषधांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विविध संस्था, संघटना, कंपन्या या 'सीएसआर'च्या माध्यमातून घाटीला मदत करू शकतात. त्यासाठीच स्वतंत्र सीएसआर खाते उघडण्यात आले आहे व या माध्यमातून मदत करणाऱ्यांना अधिकृत सवलतीही मिळतात, असे डॉ. येळीकर म्हणाल्या. या वेळी कागलीवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.

\Bसाडेसहा कोटींचे थिअटर विचाराधीन\B

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी (घाटी) अत्याधुनिक स्वरुपाचे प्रशस्त 'लेक्चर थिएटर' प्रस्तावित असून, या उपक्रमासाठी साडेसहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. हा निधी 'सीएसआर'च्या माध्यमातून देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. वरिष्ठ स्तरावरून मान्यता मिळताच, निधीचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही डॉ. त्रिपाठी म्हणाले. त्याचवेळी ग्रामीण तसेच दुर्गम भागात जाऊन दंतोपचारांच्या सेवा देण्याच्या उद्देशाने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला दोन डेंटल व्हॅन देण्याचाही विचार सरू असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव बुधवारी (१७ एप्रिल) सकल न समाजातर्फे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त अन्नदान, महारक्तदान, रथयात्रा, ध्वजवंदन, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती समितीच्या वतीने सोमवारी देण्यात आली.

पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष मुकेश साहुजी, कार्याध्यक्ष अनिल संचेती, करुणा साहुजी, ललित पाटणी, नीलेश सावळकर, भावना सेठिया, राजेश मुथा, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जन्मकल्याणक महोत्सवासाठी गुप्तीनंदी महाराज, हेमसागर महाराज, विवेकमुनी महाराज, लोकेशमुनी महाराज, प्रणवमुनी महाराज, प्रतिभाजी महाराज आदींसह जैन साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. बुधवारी सायंकाळी सात वाजता प्रज्ञायोगी ग्रुपच्यावतीने राजाबाजार जैन मंदिरात महाआरती होईल. महावीर जयंती दिवशी सकाळी सहा वाजता राजाबाजार जैन मंदिर, महावीर भवन, विमलनाथ जैन मंदिर, सराफा, टी.व्ही. सेंटर, चिकलठाणा, शिवाजीनगर, दशमेशनगर, रेल्वेस्टेशन, वाळूज, सिडको एन - नऊ तसेच शहरातील विविध भागातील युवक युवतींच्या उपस्थितीत मुख्य वाहन फेरी काढण्यात येईल. सकाळी सात वाजता सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, मुकेश साहुजी यांच्या उपस्थितीत महावीर स्तंभ येथे ध्वजवंदन होईल. त्यानंतर गुरुगणेशनगर येथे ध्वजवंदन होईल.

\Bपैठण गेट येथून रथयात्रा

\Bसकाळी आठ वाजता पैठण गेट येथून रथयात्रेस प्रारंभ होईल. त्यात शंखेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर सिडको, गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर, जोहरीवाडा, विमलनाथ जैन मंदिर जाधवमंडी यांचे रथ मिरवणुकीत असतील. याशिवाय विविध मंदिरांच्या पालख्या सहभागी होतील. पैठण गेट - टिळकपथ - मछलीखडक - सिटी चौक - शहागंज - गांधीपुतळा- राजाबाजार मार्गावरुन मिरवणूक जाईल. राजाबाजार जैनमंदिरात भगवंतांचा महामस्तकाभिषेक होईल. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती, भगवान महावीर मेडीकल फाऊंडेशनच्यावतीने सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर महारक्तदान शिबिर होईल. महोत्सवानिमित्त महिला समितीच्या वतीने देखावे सादर केले जाणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला वार्षिक योजनेत अतिरिक्त निधीचे २४८ कोटी

$
0
0

Ramchandra.Vaybhat@timesgroup.com

Tweet : @ramvaybhatMT

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्याच्या पारड्यात वित्त विभागाने जिल्हा वार्षिक योजनेचा तब्बल २४८ कोटी अतिरिक्त निधी दिला आहे. या निधीमुळे आता जिल्हांतर्गत विकासकामांसाठी आठही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेशिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी तब्बल ७६२ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. या तुलनेत २४८ कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. वाढीव निधीसंदर्भात मुंबई येथे निर्णय घेण्यात आला.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १७ जानेवारी रोजी झालेल्या नियोजन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये शासनाने कळवलेल्या आर्थिक मर्यादेनुसार प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, अधिकाऱ्यांनी आराखडा आणि अतिरिक्त मागणी सादर केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोणत्या जिल्ह्याच्या पदरात किती अतिरिक्त निधी पडतो, याची उत्सुकता होती. यानुसार आता मराठवाड्याला २४८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. शासनाने कळवलेली आर्थिक मर्यादा आणि वाढीव मिळालेला निधी असे मिळून औरंगाबाद जिल्ह्याला २८८ कोटी, जालना २१२, परभणी १५४, नांदेड २७१, बीड २५३, लातूर २३२, उस्मानाबाद २४७, हिंगोली १०४ कोटी लाख असे मराठवाड्यासाठी आता एकूण १७६१ कोटी रुपयांचा अंतिम मंजूर झाले आहेत

मागणीनुसार मिळालेला निधी

जिल्हा....... अतिरिक्त मागणी......मिळालेला निधी

औरंगाबाद...........५२.००.............२९.९८

जालना...............१५९.०९...........३६.१०

बीड...................९६.९७.............१७.१७

परभणी...............१०१.००...........१.७०

उस्मानाबाद.........८५.३९.............९०.८४

लातूर.................१३१.००...........४४.३०

हिंगोली...............४०.००.............५.२६

नांदेड.................९७.०८.............२३.०५

एकूण.................७६२.५३...........२४८.४०

(निधी कोटी रुपयांत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ आठवडी बाजार मतदानामुळे पुढे ढकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, या दिवशी जिल्ह्यातील भरवण्यात येणारे २३ ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. बाजारचा दिवस पुढे ढकलण्यास किंवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी राहणार आहे.

आठवडी बाजारांमुळे संबंधित ठिकाणी मतदानात अडचण येण्याची शक्यता आहे. भरवण्यात येणाऱ्या बाजारांमध्ये कन्नड तालुक्यातील हतनूर, शेलगाव, पिशोर, सिल्लोडमधील रेलगाव, हट्टी, पोलोद, पिंपळदरी, मंगरूळ, फुलंब्री तालुका, पैठण तालुक्यातील विहामांडवा, ढोरकीन, आडूळ, लोहगाव, औरंगाबाद तालुक्यातील मिटमिटा, गंगापूर तालुक्यातील कायगाव, सिद्धनाथ वाडगाव, दिघी, टाकळी कदीम, सोयगाव तालुक्यातील सोयगाव, गोदेगाव आणि वैजापूरमधील मनूर, धोंदलगाव या गावांचा समावेश आहे. या आठवडी बाजारांबाबत प्रशासनाने आठवडी बाजार बंद किंवा पुढे ढकलण्यास अथवा अन्य दिवशी भरवण्याची परवानगी दिली असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमसीएच विंग’साठी पुन्हा घाटीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतंत्र माता व बाल संगोपन इमारत (एमसीएच विंग) ही घाटी परिसरात होणार की दूध डेअरी परिसरात, याविषयीचा संभ्रम अजूनही पुरेसा दूर झाला नसला तरी त्याचा नव्याने प्रस्ताव घाटी प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांना सादर करण्यात आला आहे. या विंगला ४ जुलै २०१८ रोजी मंजुरी मिळाली. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उभारण्यात येणाऱ्या या विंगसाठी शासनाने चालू आर्थिक वर्षात पाच कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे कळवले. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी नव्याने ३८ कोटींचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांना सादर करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून ही विंग दूध डेअरीला हलवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ही विंग पुन्हा घाटी परिसरात उभी राहात असल्याचे समजते. त्यामुळेच नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची वक्रदृष्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ड्रायडे असूनही अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. रविवारी शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी टी. व्ही. सेंटर येथील प्यासा वाइन शॉपच्या खाली असलेल्या गाळ्यामध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करणारा आरोपी समित शेषनारायण जैस्वाल (वय १९, रा. हर्सूल) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टी.व्ही. सेंटर रोडवर संशयित दिनकर विश्वनाथ थोरात (वय ४०, रा. जाधववाडी) याला सिडको पोलिसांनी दारू विक्री करताना अटक केली. त्याच्या ताब्यातून सत्तावीसशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. क्रांतीचौक पोलिसांनी अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या ताराचंद पिराजी मालोदे (वय ६१, रा. देवगिरी हायस्कुलजवळ) याला तसेच एका महिलेला अटक केली. दोघांच्या ताब्यातून दोन हजार सहाशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांतनगर पोलिसांनी अवैध दारू विक्री करणारे आरोपी सुनील आसाराम रमंडवाल (वय २७, रा. पदमपुरा) तसेच अख्तर शहा नावाच्या आरोपीला अटक केली. दोघांच्या ताब्यातून एकतीसशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी नारेगाव परिसरात अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या महिला आरोपीला अटक केली. तिच्या ताब्यातून सव्वासातशे रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवाने ठोकले, दोघे जण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कन्नड

औरंगाबाद-धुळे महामार्गाच्या कामावरील हायवा गाडीने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार ठार झाले तर, एक चार वर्षांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. रविवारी (१४ एप्रिल) रात्रीच्या सुमारास रेलतांडा शिवारात ही घटना घडली.

शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंधानेर येथील प्रमोद अशोक गायकवाड (वय २८ ), संदीप बाळू गायकवाड ( वय २७ ) व अनसूया बाळू गायकवाड (वय ४) हे सर्व औराळा येथील यात्रेवरून अंधानेर येथे दुचाकीवरून (एमएच २० ई एम ६९८२) जात होते. सध्या सोलापूर धुळे महामार्ग २११चे काम चालू असून, या कामावरील हायवा (एमपी ३९ एच १७७२ ) गाडीचा चालक प्रदीप शिवकुमार बैश्य याने निष्काळजीपणाने गाडी चालवत तिघांना मागून ठोकले. सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता दोघांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले तर, लहान मुलीवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एम. आहेर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिची मृत्युशी झुंज संपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंब्रा येथील भाजी विक्रेत्याची मुलगी व शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी रिझवाना अंजुम शेख (२२) हिचा उपचारादरम्यान सोमवारी (१५ एप्रिल) सकाळी साडेदहाला मृत्यू झाला. तिला गंभीर आजाराने घेरले होते व गेल्या आठवड्यापासून तिची मृत्युशीच झुंज सुरू होती. ही झुंज एकदाची संपली. तिच्या उपचारासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींनी व महाविद्यालयाच्या प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी ७० हजारांपेक्षा जास्त निधी जमा केला होता व तिच्या सेवेसाठी वाहून घेतले होते.

अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या रिझवाना हिने आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर 'दंत'ला प्रवेश मिळवला होता. सध्या ती शहरातील शासकीय दंत महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेत होती. तिला त्रास सुरू झाल्यानंतर तपासणीमध्ये रिझवाना हिला गाठीचा क्षयरोग (लिम्फनोड टीबी) असल्याचे निदान झाले होते व तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) 'एमआयसीयू'मध्ये मागच्या आठवड्यापासून उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या संदर्भात, तिच्यावर उपचार करणारे घाटीच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रभाकर जिरवणकर म्हणाले, रिझवाना हिला गाठीचा क्षयरोग (लिम्फनोड टीबी) होता व तिला श्वास घेणेही शक्य होत नव्हते म्हणूनच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यातच तिचे यकृत निकामी होऊन ती कोमात गेली होती. शेवटी रक्तदाब कमी होऊन हृदयक्रिया थांबली (कार्डियाक अरेस्ट) व तिची प्राणज्योत मालवल्याचे डॉ. जिरवणकर म्हणाले.

\Bरुग्णवाहिकेसाठी जमा केला निधी

\Bरिझवानाच्या उपचारासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींनी व प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी सुमारे ७० हजार रुपयांचा निधी जमा केलाच; शिवाय तिच्या मृत्युनंतर तिचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे मुंब्रापर्यंत नेण्यासाठीही सर्वांनी ११ हजारांचा निधी जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले. तिच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; पण उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही, असे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराच्या टँकरचालकाची चालकाला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्या टँकरचालकाने सिडको एन पाच येथील जलकुंभावर महापालिकेसाठी सेवा देणाऱ्या टँकरच्या चालकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारात घडली. त्याचा निषेध करीत सुमारे ५० टँकरचालकांनी जलकुंभावरच 'चक्काजाम' आंदोलन सुरू केले, सायंकाळी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, सिडको पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.

सिडको एन पाच येथील जलकुंभावरून टँकरच्या दररोज सुमारे ३५५ खेपा होतात. या ठिकाणाहून भरले जाणारे टँकर सिडको - हडकोसह शहरातील काही भागात पोचवले जातात. तेथे पाण्याचे टँकर भरून नेण्यासाठी आमदार अतुल सावे यांचा टँकरचालक दुपारी अडीचच्या सुमारास आला. त्याच्यात आणि महापालिकेसाठी टँकरची सेवा देणाऱ्या चालकामध्ये वादावादी झाली. वादावादीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे टँकरचालकांनी 'चक्काजाम' आंदोलन करून टँकर बंद केले. जलकुंभाच्या परिसरात सुमारे ५५ टँकर उभे होते. टँकरचालकांनी जलकुंभाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून घेतले होते.

मारहाणीच्या घटनेमुळे महापालिकेसाठी सेवा देणारे टँकरचालक संतापले. सर्वांनी चिश्तिया पोलिस चौकीत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे टँकरचालक सिडको पोलिस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी रवाना झाले. मारहाणीची घटना दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. तेव्हापासून चालकांनी टँकरसेवा बंद केली होती, सायंकाळी उशिरापर्यंत टँकर बंदच होते. घटनेची माहिती मिळाल्यावरही महापालिकेचे अधिकारी जलकुंभाकडे फिरकले नाहीत.

आम्ही नागरिकांना मोफत पाणी देतो. त्यामुळे आमचा टँकरचालक व महापालिकेसाठी काम करणारे टँकरचालक यांच्यात नेहमीच वाद होतो. तुम्ही मोफत पाणी का देता, असा त्यांचा सवाल असतो. जलकुंभावर आज जी घटना घडली ती योग्य नव्हतीच, पण आमच्या टँकरचालकाने मारहाण केली नाही. जलकुंभावरील टँकरचालकांनीच त्याला मारले. त्यामुळे त्याचे डोके फुटले. एकटा माणूस इतक्या सर्वांच्या समक्ष कसे कुणाला मारेल? मारहाणीबद्दल त्याला पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास सांगितले आहे. आमच्या टँकरचालकाला त्रास होत असेल तर, आम्ही मोफत टँकर देणे बंद करून टाकू.

- आमदार अतुल सावे.

काहीही न ऐकता केली मारहाण... पान २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले

$
0
0

दंडाची नोटीस बजावलेल्या एलईडीच्या कंत्राटदाराचा प्रताप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंडाची नोटीस बजावलेल्या एलईडीच्या कंत्राटदाराने महापालिकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेनेच फिटिंग उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यामुळे काम गतीने करता आले नाही, असे कंत्राटदाराने नोटीसला उत्तर देताना म्हटले आहे.

शहरात एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने एका कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीने धिम्यागतीने काम केल्यामुळे आयुक्तांनी कंपनीला ९३ लाखांची नोटीस बजावली. या नोटीसला कंपनीने उत्तर दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने उत्तरात म्हटले आहे की, महापालिकेने दहा हजार लाईट फिटिंग उपलब्ध करून देणे गरजेचे होते, पण महापालिकेने लाईट फिटिंग उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे गतीने काम करता आले नाही. रस्ते खोदण्यासाठी कंपनीला संबंधित शासकीय यंत्रणेकडून ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. महावितरणच्या विजेच्या अनेक खांबांना आर्थिंग नाही. त्यामुळे लाईट बंद पडण्याचे प्रकार घडतात. आर्थिंगसाठी देखील कंपनीला महावितरणचे ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे. महावितरणने हे प्रमाणपत्र दिल्यास कंपनी आर्थिंगचे काम करेल आणि दिवे बंद पडणार नाहीत.

या कारणांमुळे कामाला उशीर लागत असून काम करण्यासाठी मुदतवाढ द्या, अशी विनंती कंपनीने महापालिकेकडे केली आहे. आयुक्तांनी कंपनीला नोटीस दिल्यावर विद्युत विभागाने कंपनीचे दोन महिन्याचे पेमेंट थांबवले होते. लेखा विभागाने हे पेमेंट द्यायला लावले. करारानुसार कंपनीचे पेमेंट थांबवता येत नाही. पेमेंट थांबवले तर त्यावरचे व्याज महापालिकेला द्यावे लागेल, असे लेखा विभागाने विद्युत विभागाला कळविले. त्यामुळे थांबवलेले पेमेंट कंपनीला द्यावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज यांची मदत कामी येणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेस पक्ष पूर्णपणे निराशेच्या गर्गेत सापडला आहे. मोदी, भाजपच्या विरोधात असलेली काहीजणच मजबुरी म्हणून काँग्रेसला पसंत करत आहे. सकारात्मक असे कोणतीही मते या पक्षाकडे नाहीत. 'मजबुरी का नाम काँग्रेस' पक्ष झाला आहे, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि केंद्रीय निवडणूक मंडळाचे सदस्य शाहनवाज हुसेन यांनी मारला. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे नेते राज ठाकरे यांची कितीही मदत घेतली तरी, त्याचा काहीही फायदा होणार नाही. त्यांना शून्यवरच आउट करू, असा दावा त्यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभांसाठी शाहनवाज हुसेन सोमवारी औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'देशातील अनेक भागाचा नुकताच दौरा पूर्ण केला. देशातील जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हेच हवे आहेत. मी मोदी म्हणूनच ते काम करत आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेशसह सर्वत्र चांगले यश मिळेल, इशान्येतील राज्यांत काँग्रेसचे खातेही उघडणार नाही,' असा दावा त्यांनी करत,'पराभव दिसत असल्यानेच विरोधक 'ईव्हीएम'चा मुद्दा पुढे करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला. चंद्राबाबू नायूड हे माजी मुख्यमंत्री होणारच, असा टोला त्यांनी मारला.

महाराष्ट्रातही पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांच्या केलेल्या विकासकामाच्या जोरावर जनतेची मोठी साथ मिळ‌त आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे नेते राज ठाकरे यांची कितीही साथ घेतली तरी त्यांचा फायदा होणार नाही. या आघाडीला निवडणुकीत शून्यावर बाद करू, असा दावाही शाहनवाज हुसेन यांनी केला. भाजपची ताकद मोदी आहे तर, काँग्रेसची मजुबरी म्हणजे त्यांच्याकडे राहुल गांधी आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी मारत भाजप व मित्र पक्षाला ४००च्यावर जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ही भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप होत आहे, यावर बोलताना शाहनवाज म्हणाले, 'हा चुकीचा प्रचार आहे. दोन्ही पक्षांची स्वतंत्र विचारप्रणाली आहे. 'एमआयएम'सोबत भाजप कधीही जाऊ शकत नाही. दोघेचे मार्ग वेगळे आहेत,' असा त्यांनी स्पष्ट केले.

\Bआझम खान यांच्यावर डागली तोफ\B

भाजप उमेदवार जयाप्रदांबद्दल अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर शाहनवाज हुसेन यांनी तोफ डागली. खान हे राजकीय क्षेत्रावर लागलेला एक डाग आहेत, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा समाचार घेतला. आझम यांचे विधान हे सर्व मर्यादाचे उल्लंघन करणार आहे. त्यांची विचार करण्याची पद्धतीमध्ये व्हायरस घुसला आहे. उत्तर प्रदेशसह देशातील महिला खान यास माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया हुसेन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांना व्यापारी महासंघाचे अपेक्षापत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यापाऱ्यांना पेन्शन लागू करा, शहरातील पाणी व कचरा प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढा, शांतता व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी, यांसह अन्य मागण्या, अपेक्षा व्यक्त करणारे एक पत्र जिल्हा व्यापारी महासंघाने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील सर्व उमेदवारांना सादर केले आहे.

व्यापारी महासंघात काही सदस्य हे राजकीय पक्षांशी संबंधित असले तरी, महासंघात काम करताना पक्षीय मतभेद बाजुला ठेवून व्यापारी हितासाठी, सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम केले जात असल्याचे महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव लक्ष्मीनारायण राठी, माजी अध्यक्ष अजय शहा यांनी पत्राच्या सुरुवातीलच स्पष्ट केले आहे. लोकसभा रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून त्यांनी पुढील मागण्या व अपेक्षा पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.

सर्वात जास्त रोजगार निर्मिती, लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्याकडून होते. त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे. रिटेल व्यापारासाठी राष्ट्रीय व्यापार धोरण आयोगाची स्थापना करा, ई-कॉमर्स व्यापारासाठी व थेट परकीय गुंतवणुकीसंदर्भात अंतर्गत आणि देशांतर्गत व्यापार धोरण ठरवून लहान व्यापाऱ्यांच्या अस्तित्वासाठी नियम करावेत, व्यापारी प्रतिनिधींना विश्वासात घेऊन 'ट्रेड पॉलिसी' तयार करावी.

व्यापाऱ्यांचा सुरक्षा विमा काढण्यात यावा. व्यापाऱ्यांना कमी व्याज दराने बँकांचे कर्ज उपलब्ध व्हावेत. एखाद्या व्यापाऱ्याला त्यांच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी एखादी स्थावर मालमत्ता विक्री करावी लागत असेल तर, त्यास कॅपिटल गेन करातून सूट देण्यात यावी. त्यामुळे व्यापार वाढविण्यासाठी पुन्हा चालना मि‌ळून कर्जाचा बोजा कमी होईल. व्यवसाय करताना विविध कायद्यांतर्गत येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी चर्चा करून दुरुस्ती करा, जिल्ह्यात नागरी सोयी, सुविधांची कामे करताना त्यावर होणारा खर्च याची सुसूत्रता असावी. अधिकारी व पदाधिकारी मिळून एकाच विकास कामावर जनतेचा पैसा खर्च करतात, त्यामुळे प्रत्येक कामाची नोंद नागरिकांना माहित व्हावी, यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअर विकसित करावे. विकासाच्या कामात राजकारण न करता समानता असावी, असे या पत्रात म्हटले आहे.

\B'हॉकर झोन'ची मागणी\B

शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व कचरा प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढावा, हॉकर्स झोनची जागा निश्चित करा, नवीन सिवरेज लाइन कर रद्द करा, वाहतूक व्यवस्थोची सुसूत्रता आणण्यासाठी एक आराखडा तयार करा, पाणीपट्टीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे, याचा गांभीर्याने विचार करावा; तसेच शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी, आदी मागण्या व अपेक्षा यापत्राद्वारे व्यक्त करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images