Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मद्यपींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अवैधरित्या मद्यपी ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करूण देणाऱ्या हॉटेलवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा भागातील तीन हॉटेलवर बुधवारी छापे टाकून मालक आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मुकुंदवाडी परिसरातील सोहम मोटर्स समोर असलेल्या हॉटेल शिवमराठा येथे बुधवारी रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी हॉटेलचालक मिलिंद वसंत सोनपसारे (वय ३२, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याच्यासह पाच ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. तसेच या हॉटेल शेजारी असलेल्या हॉटेल तोरणावर देखील पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हॉटेल मॅनेजर साईनाथ गणपत घुगे (वय २८, रा. शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी) तसेच वेटर नवनाथ संभाजी मोकळे (वय ४०, रा. गल्ले बोरगाव, ता. खुलताबाद) यांच्यासह सात ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. तसेच चिकलठाण्यापुढील हॉटेल नितीन येथे देखील पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी हॉटेलचालक नितीन पांडुरंग नवपुते (वय २९, रा. चौधरी कॉलनी) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्या ताब्यातून साडेबाराशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई एसीपी डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, पीएसआय विजय पवार, नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, शिवाजी झिने, मनोज चौहान, भगवान शिलोटे, हकीम पटेल, राजेंद्र सोळुंके, गजानन मांटे, सुनील धात्रक, बावस्कर, प्रभाकर राऊत, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, नंदलाल चव्हाण, लाला पठाण आणि रितेश जाधव यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजप, शिवसेना पुढेही एकत्रित लढणार : शहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

इतर मागासवर्गीय समाजाच्या आयोगाला वैधानिक दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या 'ओबीसीं'ना काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत कोणी विचारले नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ओबीसींच्या मागास आयोगाला वैधानिक दर्जा दिला आहे. सवर्ण समाजातील अर्थिंकदृष्ट्या दुर्बल मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण आम्ही दिले आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी जालन्यातील जाहीर सभेत सांगितले. 'राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तोंडाला सध्या पाणी सुटले आहे. त्यांना वाटते पुढे काय होणार? तर मी सांगतो पुढे देखील भाजप, शिवसेनेची युती एकत्रित लढणार आहे. त्यामुळे आपल्याला खूष होण्याची गरज नाही,' या शब्दांत त्यांनी शरद पवारांच्या मनसुब्याला उत्तर दिले.

यावेळी जालना लोकसभेचे उमेदवार, खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, नारायण कुचे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे आदी उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 'गरीबी हटाओ'चा नारा दिला आहे. त्यांच्या पाच पिढ्यांपासून हाच 'गरिबी हटाओ'चा नारा त्यांच्या पूर्वजांनी दिलेला आहे, पण गरिबी हटलेली नाही. नरेंद्र मोदी सरकारने यांनी सात कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, आठ कोटी गरिबांच्या घरात शौचालये बांधून दिली. अडीच कोटी गरिबांना घरे दिली. दोन कोटी ३५ लाख गरिबांच्या घरात विजेचे कनेक्शन दिले आहे. ५० कोटी लोकांना आयुष्यमान योजनेतून पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा संरक्षण दिले. कालपर्यंत २३ लाख गरिबांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले,'राहुल गांधी विचारात मोदींनी महाराष्ट्रासाठी काय केले? काँग्रेसच्या कारकिर्दीत केंद्र सरकारने पाच वर्षांत १३व्या वित्तआयोगातून महाराष्ट्राला एक लाख १५ हजार कोटी रुपये दिले. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राला चार लाख ३८ हजार ७६० कोटी रुपये दिले आहेत. आमचा हिशेब तुम्ही मागूच शकत नाहीत. शरदराव जालन्यात आलात तर, नागरिकांना जरा तुमचा हिशेब द्या. तुम्ही ७२ हजार कोटी रुपये सिंचनासाठी तुम्ही खर्च केले पण, एकाही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचले नाही. हे ७२ हजार कोटी रुपये कोणी खाल्ले सगळ्यांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने फक्त सहा हजार कोटी रुपये खर्च करून १२ हजार गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाणी पोचवले आहे.'

भास्कर दानवे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धिविनायक मुळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडकेश्वर परिसरात महिलेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खडकेश्वर परिसरातील ४३ वर्षांच्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. गौरी गौतम तांबोळी (रा. अनुराधा अपार्टमेंट) असे या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरी तांबोळी यांचे पती निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. गुरुवारी गौरी तांबोळी त्यांच्या लहान मुलीला समर कँम्पमध्ये सोडून घरी परतल्या. यानंतर त्या बेडरुममध्ये गेल्या होत्या. बराच वेळा झाला तरी पत्नी बाहेर आली नसल्याने तांबोळी यांनी बेडरुमचा दरवाजा वाजवला. आतून कोणताही प्रतिसाद आला नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले. यावेळी गौरी तांबोळी यांनी गळफास घेतल्याने दिसून आले. क्रांतीचौक पोलिसांना हा प्रकार कळवण्यात आला. पोलिसांनी गौरी तांबोळी यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तांबोळी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिस नाईक शिवाजी वाडेकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरमपाणी भागात एकाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध दोन घटनांत एकाने आत्महत्या केल्याचा तर, दुसऱ्याचा झोपेच्या गोळ्या घेतल्याने मृत्यू झाला. गरमपाणी आणि कांचनवाडी भागात बुधवारी हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गरमपाणी भागातील बाबासाहेब रावराव दाभाडे (वय ४०) याने मंगळवारी रात्री ११ वाजता छताला दोरी बांधून गळफास घेतला. दाभाडे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दाभाडे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जमादार मोरे तपास करीत आहेत.

अकस्मात मृत्यूची दुसरी घटना कांचनवाडी, कश्मिरानगर भागात घडली. येथील जगन संतोष काळे (वय ३१) याने बुधवारी दुपारी एक वाजता घरी झोपेच्या गोळ्या घेतल्या. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातील कांचनवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये आणि नंतर घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार काकडे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गँगरीन रुग्णावर हातातून अँजिओप्लास्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गँगरीनच्या किंवा रक्तवाहिन्या ब्लॉक झालेल्या रुग्णावर जांघेतून (फिमोरल) अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्याची पद्धत एव्हाना रुढ झाली असली तरी, आता हातातून (रेडिअल) अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करण्याची नवीन पद्धत विकसित झाली आहे. ज्याप्रमाणे हृदयाची अँजिओग्राफी-अँजिओप्लास्टी ही अलीकडे हातातून होते, त्याचप्रमाणे 'पेरिफेरल आर्टरी डिसीज्'मध्ये म्हणजे पायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या असतील तर हातातून ग्राफी-प्लास्टी केली जात आहे आणि या प्रकारची मराठवाड्यातील पहिली प्लास्टी नुकतीच शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी झाली आहे.

बऱ्हाणपूर येथील ५५ वर्षीय महिलेच्या पायाच्या अंगठ्याला गँगरीन झाले होते व त्यामुळे त्या महिला रुग्णाचा तो पाय थंड पडला होता आणि महिलेला तीव्र वेदना होत होत्या. महिलेचे चालणे-फिरणे बंद झाले होते. संबंधित महिला रुग्णाची हातातून अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी करणे शक्य असल्याचे लक्षात येताच 'रेडिअल' पद्धतीने तिच्यावर अँजिओप्लास्टी करुन स्टेंट टाकण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्या महिला रुग्णाची हालचाल सुरू होऊन ती महिला वेदनामुक्त झाली. ही मराठवाड्यातील या प्रकारची पहिलीच रेडिअल अँजिओप्लास्टी ठरली, असे सांगताना 'एमजीएम'चे इंटरव्हेश्नल रेडिओलॉजिस्ट डॉ. शिवाजी पोले म्हणाले, यापूर्वी किमान पाच ते सहा केसेसमध्ये 'रेडिअल अँजिओग्राफी' केली असून, 'प्लास्टी' ही पहिल्यांदाच केली व ती यशस्वी झाली. या प्रकारच्या हातातून करण्यात येणाऱ्या अँजिओप्लास्टीमध्ये आणखी कमी रक्तस्त्राव होतो व रुग्णाची अवघ्या काही तासांमध्ये हालचाल सुरू होते. तसेच उपचार प्रक्रियेनंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा कालावधीसुद्धा आणखी कमी होतो व गुंतागुंत होण्याची शक्यताही मावळते. त्या तुलनेत 'फिमोरल' पद्धतीमध्ये काहीअंशी रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते व जांघेतून प्लास्टी केल्यामुळे थोड्या उशिराने हालचाल सुरू होते. त्याचवेळी 'रेडिअल' पद्धतीला कोणताही वेगळा खर्च येत नसून, 'फिमोरल' पद्धती इतकाच खर्च येतो. विशेष म्हणजे 'रेडिअल' पद्धतीची अँजिओप्लास्टीदेखील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत होऊ शकते, असेही डॉ. पोले म्हणाले. अर्थात, गँगरीनच्या प्रत्येक केसमध्ये स्टेंट टाकावाच लागतो असे नाही, तर ८० ते ९० टक्के केसेसमध्ये 'बलून'ने पायाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉक मोकळा होऊ शकतो, असेही डॉ. पोले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\B३० टक्के केसेसमध्ये पद्धत उपयुक्त

\Bगँगरीनमुळे पाय काळा ठिक्कर पडला असेल तर ही रेडिअल पद्धत उपयोगी ठरू शकत नाही. ढोबळमानाने कमरेजवळील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असेल तर रेडिअल पद्धत उपयुक्त ठरू शकते आणि कमरेखालील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असेल तर पूर्वीची फिमोरल पद्धत वापरावी लागते. सर्वसाधारणपणे गँगरीनच्या २५ ते ३० टक्के केसेसमध्ये नवीन रेडिअल पद्धत नक्कीच उपयुक्त ठरू शकते, असेही डॉ. पोले म्हणाले.

\B५ केसेसमध्ये मेंदुची अँजिओग्राफी

\Bहातातून म्हणजेच 'रेडिअल' पद्धतीने पक्षाघाताच्या (स्ट्रोक) रुग्णांवर मेंदुची अँजिओप्लास्टी होऊ शकते. आपल्या देशात काही ठिकाणी व जगभरात या प्रकारे उपचार प्रक्रिया केल्या जात आहेत. 'एमजीएम'मध्ये पाच ते सहा केसेसमध्ये 'रेडिअल' पद्धतीने मेंदुची अँजिओग्राफी झाली असून, लवकरच मेंदुची 'रेडिएल अँजिओप्लास्टी'ही होईल. नवीन वैद्यकतंत्रज्ञानामध्ये औरंगाबाद कुठेही मागे नाही, असेही मत डॉ. पोले यांनी मांडले.

धुम्रपान किंवा कुठल्याही स्वरुपातील तंबाखुसेवन, मधुमेह ही गँगरीन होण्यामागची ज्ञात कारणे आहेत. मात्र त्याचवेळी उचारवयातील वाढलेले कोलेस्ट्रॉल हेदेखील गँगरीन होण्यामागचे कारण असू शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शरीरातील कुठल्याही रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ नयेत, यासाठी योग्य आहार-विहार व एकूणच आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारणे आणि लवकरात लवकर निदान-उपचार होणे गरजेचे आहे.

\Bडॉ. शिवाजी पोले\B, इंटरव्हेश्नल रेडिओलॉजिस्ट

पक्षाघाताच्या निवडक केसेसमध्ये मेंदुची अँजिओप्लास्टी नक्कीच उपयुक्त ठरू शकते; परंतु अशा रुग्णांची योग्य निवड महत्वाची ठरते. तसेच पक्षाघात झाल्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करणे लाभदायी ठरण्यापेक्षा त्रासदायक ठरू शकते व अशा वेळी अलीकडे विकसित झालेले इंजेक्शन्स खूप जास्त उपयुक्त ठरू शकतात. मात्र पक्षाघात पुन्हा होऊ नये म्हणून अँजिओप्लास्टी उपयुक्त ठरू शकते. अर्थात, केसनुसार उपचार पद्धत बदलू शकते.

\Bडॉ. मकरंद कांजाळकर\B, मेंदुविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी नथुरामलाही तिकीट दिले असते!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

‘नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्यावर जास्त विश्वास आहे. सावरकरांचा कडवा हिंदुत्ववाद त्यांना जास्त प्रिय आहे. १९५२मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी असते तर, त्यांनी नथुराम गोडसेला निवडणुकीचे तिकीट दिले असते,’ अशा शब्दात एमआयएम चे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी जोरदार टीका केली.

‘वंबआ’ व ‘एमआयएम’चे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ वैजापूर येथील मिल्लतनगर भागात गुरुवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला उमेदवार जलील यांच्यासह ‘वंबआ’ व ‘एमआयएम’चे पदाधिकारी उपस्थित होते. ओवेसी म्हणाले,
‘२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन ५० टक्केपर्यंत मतदार असलेल्या १८ ते २५ वयोगटातील मतदारांनी त्यांच्या हातात सत्ता दिली. मात्र, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने वर्षाला केवळ पाच लाख नोकऱ्या देऊन तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा केला. त्यांना रोजगाराबाबत विचारले तर ते एअर स्ट्राइक केले असे म्हणतात. दलितांवरील अन्यायाबाबत विचारले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधू असे सांगतात. नोटाबंदीबाबत विचारले तर ते घरात घुसून मारू असे म्हणतात, पण आज देशात नोकऱ्या नसल्याने गरीब कुटुंबात उपासमार होत असल्याची जाणीव मोदींना नाही. नोटाबंदीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मागील वीस वर्षात शिवसेनेने औरंगाबाद मतदारसंघात कोणती विकासकामे केली,’ असा प्रश्न विचारत ओवेसी यांनी खैरेंवर तोफ डागली.

शिवसेनेचे आमदार कुणामुळे पडले?
‘नरेंद्र मोदी यांना चौकीदार म्हणणारी शिवसेना आता उद्धव ठाकरेंच्या नावासमोर चौकीदार हे विशेषण का लावत नाही. शिवसेनेचे आमदार वैजापूर मतदारसंघातून कुणामुळे पडले? नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत साबेरखान कुणामुळे पडले,’ असा प्रश्न करून त्यांनी वैजापूर तालुक्यात शिवसेनेत सुरू असलेल्या गटबाजीवर निशाणा साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवे माझी मेहबुबा, त्यांचं माझ्यावर इश्क: खोतकर

$
0
0

जालना:

'रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा आहेत आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो. त्यांचंही माझ्यावर इश्क आहे,' असं वक्तव्य करून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जाहीर प्रचारसभेत धम्माल उडवून दिली. दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती घोषित होण्यापूर्वी दानवे आणि खोतकर यांचं विळ्या- भोपळ्याचं नातं होतं. जालन्याच्या जागेवर खोतकर यांनी दावा केला होता. युती झाल्यानंतर ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि दानवेंना उमेदवारी मिळाली. मात्र, आपण दानवेंविरोधात लढू आणि त्यांचा पराभव करू, असा निश्चय खोतकर यांनी बोलून दाखवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर दानवे-खोतकरांमध्ये दिलजमाई झाली. विळ्या-भोपळ्याचं नातं असलेल्या या दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण झाल्याचं खोतकर यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यातून दिसतंय.

जालन्यात दानवेंच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेला भाजप अध्यक्ष अमित शहाही उपस्थित होते. भाषणावेळी प्रस्तावना देताना खोतकर यांनी दोघांमध्ये आता 'मैत्री' झाल्याचं सांगितलं. दानवे हे माझी मेहबुबा आहेत. मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांचंही माझ्यावर इश्क आहे, असं खोतकर यांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला. यावेळी आपल्याला इतिहास घडवायचा आहे. दानवेंना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे. आम्ही दोघेही ३० वर्षांचे जोडीदार आहोत आणि ही जोडी तीस वर्षे विधानसभेपासून लोकसभेपर्यंत काम करत आहे, असंही खोतकर म्हणाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’च्या विषयात मुख्यमंत्र्यासह माझेही लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या समांतर जलवाहिनीच्या विषयात मुख्यमंत्र्यांसह माझेही लक्ष आहे, हक्काचे पाणी तुम्हाला नक्की देऊ, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत दिली.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी भाषणाच्या ओघात औरंगाबाद शहरातील पाण्याच्या प्रश्नाचा व कचऱ्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला. 'समांतर जलवाहिनीचा विषय वाढता वाढता वाढे असा झाला आहे, परंतु या प्रश्नात लक्ष घालण्याचे मी आणि मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. लवकरात लवकर हा विषय मार्गी लावून तुम्हाला तुमच्या हक्काचे पाणी देऊ', अशी ग्वाही त्यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या औरंगाबादवासियांना दिली.

कचऱ्याच्या प्रश्नाचा देखील त्यांनी उल्लेख केला. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यातही आम्ही लक्ष घालणार आहोत, असे ते म्हणाले. दुष्काळावर देखील त्यांनी भाष्य केले. निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळ उडून गेल्याचे चित्र आहे. कुणाचेच या प्रश्नाकडे लक्ष नाही. मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे हे खरे आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतर लगेच दुष्काळ निर्मुलनाच्या कामाला लागा, असे आदेश त्यांनी शिवसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांना दिले. ज्या ठिकाणी पाण्याचे टँकर व चाऱ्याची गरज आहे, त्या ठिकाणी टँकर आणि चारा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असा उल्लेख त्यांनी केला.

सभेसाठी रस्त्यावर पांघरले काँक्रिट

उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होती. खडकेश्वर येथील महापालिकेच्या वाचनालयापासून सांस्कृतिक मंडळाच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्याची दैना झाली आहे. मोठमोठे खड्डे या रस्त्यावर होते. खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहने चालविणेच काय पायी चालणे देखील कठीण होऊन बसते. असा हा दिव्य रस्ता ठाकरेंच्या सभेसाठी खड्डेविरहित करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. या रस्त्यावर इथून तीथपर्यंत काँक्रिट पसरून टाकले होते. काँक्रिटचे ताजे काम लगेच लक्षात भरणारे होते. त्यातील खडी बाहेर डोकावत होती. काहीही असले तरी एका सभेमुळे या रस्त्याचे भाग्य थोडेतरी बदलले अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करकरेंचा जीव कसा गेला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुंबई दहशतवादी हल्ल्यात लढताना हेमंत करकरे शहीद झाल्याचे अख्ख्या देशाला माहित आहे. मात्र, दहशतवादी कारवायामध्ये सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या करकरे यांचा जीव आपल्या शापामुळे गेल्याचे सांगतात. मग करकरेंचा जीव नेमका कसा गेला, याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावे,' असे आव्हान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.

जबिंदा लॉन्स येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी 'वंबआ'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण, जावेद कुरैशी यांची उपस्थिती होती. यावेळी ओवेसी म्हणाले, 'अनेक वेळा एमआयएमवर आरोप करण्यात येतो की ही रझाकारांची पार्टी आहे. ही रझाकारांची पार्टी नसून, ही दिल्लीला आव्हान देणाऱ्या मलिक अंबर यांची पार्टी आहे. शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सिद्धी इब्राहिम यांची पार्टी आहे.' ओवेसी यांनी पंतप्रधानाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, 'संसदेत आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. तेव्हा त्या ठिकाणी सामाजिक आरक्षणाच्या आधारावर संसदेत आलेले खासदारही उपस्थितीत होते. त्यांनी या घटनाबाह्य निर्णयाचा विरोध केला नाही. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवडणुकीच्याच वेळी बालाकोटबद्दल माहिती देऊन मोदींना उघडे पाडले,' असा दावा त्यांनी केला. 'मुंबईवर हल्ला झाला. तेव्हा दहशवाद्यांना मारण्यासाठी गेलेले शहीद हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्याबद्दल भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरेचे मृत्यू आपल्या शापामुळे झाल्याचे सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना या वक्तव्याचे समर्थन करणार का,' असा सवालही ओवेसी यांनी केला. 'आगामी काळात देशाच्या सत्तेवर मोदी असणार नाहीत. 'वंबआ'ही लोकसभेपुरती मर्यादित नसून, ही युती महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीत राहणार आहे. ही निवडणूक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात लढणार आहोत,' अशी घोषणाही ओवेसी यांनी केली.

\Bभुईगळांची उमेदवारी घोषित

\Bसभेला मार्गदर्शन करताना 'वंबआ'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुटुंबशाहीच्या जोखडातून बाहेर पडावे. छुपे नाही तर समोर येऊन समर्थन द्यावे.' काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पैसा कोठून आला, असा आरोप केला आहे. याचे उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, 'नांदेड लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी १०० कोटी रुपयांपर्यंत खर्च केला,' असा दावा त्यांनी केला. यावेळी आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून अमित भुईगळ यांची उमेदवारी घोषित केली.………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जिकल स्ट्राइक करणारा पंतप्रधान आम्हाला हवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशाची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. सर्जिकल स्ट्राइक करणारा पंतप्रधान आम्हाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना - भाजप - रिपाइं - रासप व शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खैरे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, प्रशांत बंब, संदिपान भुमरे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेना, भाजप, रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते.

'देश, देव आणि धर्मासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. शिवसेना अमित शहांच्या तंबूत सर्वांच्या समक्ष गेली,' असे सांगताना ठाकरे म्हणाले, 'शरद पवार आता शिवसेनेवर टीका करीत आहेत. युती का केली, असा प्रश्न विचारत आहेत. राजीव गांधी यांना शिव्या देऊन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. आता पुन्हा त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आहे. पवारांच्या अंगाला लावायला डांबर दिले पाहिजे, पण पवारांच्या अंगाला लागताना डांबरालाही लाज वाटेल. मी काळा असलो तरी, माझे मन काळे नाही असे डांबर म्हणेल. पवार पुन्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या पाठीत लाथ घातली. आता पुन्हा ते हातात वाडग घेवून काँग्रेसच्या मागे लागले आहेत. आम्ही मात्र देश, देव आणि धर्मासाठी युती केली.'

पंतप्रधानपदी मोदी नकोत तर, देशाचे तुकडे व्हावेत, असे म्हणणारा कन्हैयाकुमार पंतप्रधानपदी पाहिजे का, असा सवाल त्यांनी केला. ही देशाला वळण देणारी निवडणूक आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि तेच पंतप्रधान राहतील, त्यासाठी आणखी पाच वर्षे युतीसाठी मागितली तर काय गुन्हा केला, असे म्हणत ठाकरे यांनी उपस्थितांना साद घातली. ते म्हणाले, 'मी तुमची ताकद मागण्यासाठी आलो आहे. मला स्वत:ला काहीही नको. परंपरा घेऊन मी पुढे चाललो आहे. या वाटचालीला तुमची ताकद माझ्या मागे असली पाहिजे, या ताकदीचा मी दुरुपयोग करणार नाही.'

यावेळी चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, जयदत्त क्षीरसागर, संजय शिरसाट, अतुल सावे, प्रशांत बंब, बाबूराव कदम, एकनाथ जाधव यांची भाषणे झाली. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सूत्रसंचालन केले.

\Bशिवशाही पाहिजे की रझाकारी?

\Bसरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिली रझाकारी संपवली. दुसरी रझाकारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपवली. आता ओवेसींच्या रुपाने पुन्हा रझाकारी येत आहे. तुम्हाला शिवशाही पाहिजे की रझाकारी पाहिजे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केला. 'ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर डोके टेकवले. मला अब्दुल हमीदच्या कबरीवर डोके टेकवायला आवडेल, कारण त्याने देशासाठी सर्वस्व अर्पण केले होते,' असे ठाकरे म्हणाले.

\Bत्या आमदाराची हकालपट्टी\B

जो या भगव्याशी गद्दारी करेल त्याचे व शिवसेनेचे नाते राहणार नाही, असे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी,'शिवसेनेच्या नावावर निवडून आलेला, पण आता शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या त्या आमदाराची शिवसेनेतून हकालपट्टी करीत आहे,' जाहीर केले. यावेळी त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्या नावाचा मात्र थेट उल्लेख केला नाही, त्यांचा रोख मात्र जाधवांच्या दिशेनेच होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉजवरून पडून मृत्यू

$
0
0

फर्दापूर : येथील मुरली मनोहर लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. गजुल धनंजय (वय २४, रा. वडेर कॉलनी, प्रशांतनगर, तेलंगणा) असे मृताचे नाव आहे. धनंजय हे अजिंठा लेणी पाहून आल्यानंतर मनोहर लॉजवर थांबले होते. रात्री जेवण करून चौघे झोपले. सकाळी महिला साफसफाई करण्यासाठी आली असता त्यांचा मृतदेह दिसला. लॉज मालक वीरेंद्र वैशिष्ट्य यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, शविच्छेदन करून मृतदेह सध्या शवशीतगृहात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल राजू काकडे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसरा डोळा पोलिसांच्या मदतीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सीसीटीव्ही कॅमेरांमुळे गेल्या चार महिन्यांत २७ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये घरफोडी, चोरी; तसेच खुनाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. यापैकी २४ गुन्हे शहरातील असून, तीन गुन्हे शहराबाहेरील पोलिस ठाण्याअंतर्गत आहेत.

शहरात सेफ सिटी प्रकल्प, विविध नागरिक, प्रतिष्ठान यांच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रिकरणामुळे विविध गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना मदत होत आहे. जानेवारी ते एप्रील या चार महिन्यांत गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी तब्बल २७ गंभीर गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये ३१ आरोपींना अटक करून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्री घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी, जबरी चोरी, खून आदींचा समावेश आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंह जारवाल, पोलिस निरीक्षक अमोल देशमुख, शेख अफरोज, विजय जाधव, मारोती दासरे, अनिल वाघ, नंदकुमार भंडारे यांनी ही कारवाई केली. औरंगाबाद शहराबरोबरच …गेवराई, येवला आणि सिंदखेड राजा येथील प्रत्येकी एका गुन्ह्याची उकल सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे करण्यात पोलिसांना यश आले.

\Bचिकाटीचे काम\B

सीसीटीव्ही चित्रिकरण प्राप्त झाले तरी, गुन्हे उघडकीस आणणे हे जिकिरीचे काम आहे. अनेक वेळा चित्रिकरण व्यवस्थित येत नाही. त्याचा वापर करीत संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांचा बराच वेळ जातो. बऱ्याच वेळा गुन्ह्यामध्ये इतर सीसीटीव्ही चित्रिकरण देखील तपासून पुरावे गोळा करावे लागतात. या चिकाटीच्या कामातून गुन्हे शाखेने २७ गुन्ह्यांची उकल केली.

\Bपोलिस ठाणेनिहाय उघड झालेले गुन्हे

\Bछावणी - २, क्रांतीचौक -३, बेगमपुरा - २, वेदांतनगर - ३, जवाहरनगर - ३, सातारा - ४, सिडको एमआयडीसी - २, जिन्सी - १, सिटीचौक - १, उस्मानपुरा - १, मुकुंदवाडी - १, वाळूज - १ तसेच

\Bघरफोडीचे अधिक गुन्हे उघडकीस\B

घरफोडी : १५ गुन्हे

चोरी : ८ गुन्हे

खुन : १

जबरी चोरी : १

फसवणूक : १

वाहन पेटवणे : १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम मुद्द्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सामान्य लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे चित्र वेगळे दिसणार आहे. कारण ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे असा सूर 'सार्वत्रिक निवडणुका' या विषयावरील परिसंवादात उमटला.

कॉ. चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सार्वत्रिक निवडणुका' परिसंवाद घेण्यात आला. महसूल प्रबोधिनी सभागृहात शुक्रवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, अमेय तिरोडकर, संजय आवटे आणि कॉ. के. एन. थिगळे उपस्थित होते. '२०१९ ची निवडणूक हवेत दिसत नाही. कारण ही निवडणूक २०१४ पासूनच लढवणे सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशी उभी फूट २०१४नंतर तत्काळ पडली. अशी उभी फूट देशात प्रथमच दिसली. लोकांसमोर नॉन इश्यू उपस्थित करून सोशल मीडियावर निरर्थक चर्चा घडवून गुंग‌वण्यात आले. वेगवेगळ्या राज्यात बिगरभाजपा मतांचे राजकारण खेळण्यात आले. त्यात यश आल्यानंतर २०१९मध्ये खरी लढाई सुरू झाली', असे अमेय तिरोडकर म्हणाले.

'जमिनीवरचे वास्तव वेगळे असून लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे. नागपूर येथील निवडणूक नितीन गडकरी यांना अवघड जाईल असे कुणाला वाटले नव्हते. मात्र, नाना पटोले यांनी जनमताच्या बळावर आव्हान उभे केले. अशी लढत अनेक मतदारसंघात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरण घडवून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत', असे संजय आवटे म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात हेमंत देसाई यांनी विरोधकांच्या गाफिलपणावर टीका केली. 'नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेल्या विरोधकांची पुरेशी तयारी नाही. स्थानिक मुद्दे कसे मांडावे आणि जनमत कसे वळवावे याचे भान काँग्रेसच्या नेत्यांना नाही. अशा नेत्यांना मतदारांनी मत का द्यावे, असा प्रश्न पडतो. सामान्य मतदार आपल्या प्रश्नांवर विचार करून मतदान करतील असे चित्र आहे', असे देसाई म्हणाले. कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bजातीय ध्रुवीकरण वाढले

\B'यापूर्वीच्या लोकसभा निवडणुका प्रादेशिक, धार्मिक मुद्द्यांवर लढवल्या गेल्या. मात्र, आता विविध जातींचे समूह निवडणुकीचा कौल ठरवणार आहेत. प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे. अगदी बीड मतदारसंघात जातनिहाय मतदारांची फूट दिसली. मागील पाच वर्षे आपल्या अस्तित्वावर हल्ला झाल्याचे लक्षात आल्याने दुखावलेला शेतकरी, बहुजन वर्ग उत्स्फूर्तपणे निवडणुकीत उतरला', असे निरीक्षण तिरोडकर यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन महिन्यात २२० संसारावर दुष्काळाचा नांगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात अत्यल्प पावसामुळे यंदाही शेतकऱ्यांच्या घरादाराला दुष्काळी परिस्थितीमुळे अवकळा आली आहे. नापिकीमुळे संपूर्ण अर्थचक्र बिघडल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. २०१९ वर्षाच्या पहिल्या अवघ्या साडेतीन महिन्यामध्ये विभागाती २२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आणि डोकं सुन्न करणारी आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न मिळत नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेदिवस वाढत असल्याने बळीराजा हैराण झाला आहे. कर्ज कसे फेडरणार या विवचनेतून गेल्यावर्षी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या एक हजाराजवळ पोचली होती. आता २०१९ मध्येही आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. यंदा जानेवारी ते १४ एप्रिल पर्यंत विभागात आत्महत्यांच्या २२० प्रकरणांची सरकारी दप्तरात नोंद करण्यात आली आहे. विभागातल्या आठही जिल्ह्यात पावसाअभावी यंदाचा उन्हाळा तीव्र आहे. ऐन पावसाळ्यात कोरड्यामागून कोरडे गेलेल्या नक्षत्रांमुळे अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरा केला, परंतु पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या. ज्यांनी कापूस जगवला अशा शेतकऱ्यांचे नशीब यंदाही बोंडअळीने पोखरल्याचे चित्र आहे. दुष्काळ, बोंडअळीमुळे सरकारी तुटपुंजी मदत मिळाली. मात्र, खर्चाचे नियोजन होऊ शकत नसल्याच्या विवंचनेत मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त आहे. यावर्षीच्या पहिल्या साडेतीन महिन्यात सर्वाधिक ५२ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या असून त्या पाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातील ३९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.

५४ प्रकरणे मदतीसाठी अपात्र

चौकशीअंती आत्महत्या केलेल्या ५४ शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आले असून १८ प्रकरणांची चौकशी अद्यापही शासनदत्परी सुरू असल्यामुळे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांचे वारस मदतीपासून वंचित राहिले आहेत.

शेतकरी आत्महत्या (जानेवारी २०१९ ते १४ एप्रिल २०१९)

जिल्हा................ आत्महत्या

औरंगाबाद............२५

जालना.................२१

परभणी...................१७

हिंगोली..................१२

नांदेड...................२९

बीड......................५२

लातूर....................२५

उस्मानाबाद.............३९

एकूण..................२२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायसेक्युरिटी नंबर प्लेटच्या वाहनांचा पुरवठा सुरू

$
0
0

औरंगाबाद :

वाहनांची सुरक्षा आणि आप्तकालीन माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक एप्रिलपासून उत्पादित नवीन गाड्यांना हायसेक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार गुरुवारी (१८ एप्रिल) पहिली हाय सेक्‍युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविलेली कारची नोंदणी आरटीओ कार्यालयात करण्यात आली.

वाहन उत्पादकांकडून एप्रिल २०१९ नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांवर डिलरमार्फत टेम्पर प्रूफ हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट व परमनंट आयडेंटीफिकेशन नंबरसहित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियम १९९० च्या नियम ५० नुसार वाहनांवर हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहित नमुन्यात बसविण्याची तरतूद आहे. गेल्यावर्षी केंद्र शासनाने हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेटमुळे वाहनचोरीला आणि गैरप्रकारांना आळा बसणार आहे. सर्व देशभरात एकाच पद्धतीच्या नंबरप्लेट वाहनांवर दिसणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जी जुनी वाहने आहेत त्यांनाही या नंबरप्लेटसाठी सक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली.

टेम्परप्रुफ नंबर प्लेट

हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट्‌स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात येणार आहेत. या नंबरप्लेट्‌स टॅम्परप्रूफ असणार आहेत. एकदा हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट्‌स वाहनांवर बसविल्या की त्या पुन्हा काढता येणार नाहीत. मुख्य म्हणजे, एका विशिष्ट क्‍लिपद्वारे या नंबरप्लेट वाहनांना लावण्यात येणार आहेत. ही प्लेट अॅल्युमिनियमपासून तयार केलेली असणार आहे. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिसऱ्या डोळा पोलिसांच्या मदतीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सीसीटीव्ही कॅमेरांमुळे गेल्या चार महिन्यांत २७ गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. यामध्ये घरफोडी, चोरी; तसेच खुनाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. यापैकी २४ गुन्हे शहरातील असून, तीन गुन्हे शहराबाहेरील पोलिस ठाण्याअंतर्गत आहेत.

शहरात सेफ सिटी प्रकल्प, विविध नागरिक, प्रतिष्ठान यांच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांनी केलेल्या चित्रिकरणामुळे विविध गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना मदत होत आहे. जानेवारी ते एप्रील या चार महिन्यांत गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी तब्बल २७ गंभीर गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये ३१ आरोपींना अटक करून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्री घरफोडी, चोरी, दुचाकी चोरी, जबरी चोरी, खून आदींचा समावेश आहे. पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंह जारवाल, पोलिस निरीक्षक अमोल देशमुख, शेख अफरोज, विजय जाधव, मारोती दासरे, अनिल वाघ, नंदकुमार भंडारे यांनी ही कारवाई केली. औरंगाबाद शहराबरोबरच …गेवराई, येवला आणि सिंदखेड राजा येथील प्रत्येकी एका गुन्ह्याची उकल सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे करण्यात पोलिसांना यश आले.

\Bचिकाटीचे काम\B

सीसीटीव्ही चित्रिकरण प्राप्त झाले तरी, गुन्हे उघडकीस आणणे हे जिकिरीचे काम आहे. अनेक वेळा चित्रिकरण व्यवस्थित येत नाही. त्याचा वापर करीत संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांचा बराच वेळ जातो. बऱ्याच वेळा गुन्ह्यामध्ये इतर सीसीटीव्ही चित्रिकरण देखील तपासून पुरावे गोळा करावे लागतात. या चिकाटीच्या कामातून गुन्हे शाखेने २७ गुन्ह्यांची उकल केली.

\Bपोलिस ठाणेनिहाय उघड झालेले गुन्हे

\Bछावणी - २, क्रांतीचौक -३, बेगमपुरा - २, वेदांतनगर - ३, जवाहरनगर - ३, सातारा - ४, सिडको एमआयडीसी - २, जिन्सी - १, सिटीचौक - १, उस्मानपुरा - १, मुकुंदवाडी - १, वाळूज - १ तसेच

\Bघरफोडीचे अधिक गुन्हे उघडकीस\B

घरफोडी : १५ गुन्हे

चोरी : ८ गुन्हे

खुन : १

जबरी चोरी : १

फसवणूक : १

वाहन पेटवणे : १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरवठा अधिकाऱ्याची टाळाटाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांनी अवैध गॅस सिलिंडरचा साठा पकडल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी येण्याची विनंती केली मात्र, या अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे कारण पुढे करीत येण्यास टाळाटाळ केली. यामुळे यातील आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल न करता किरकोळ गुन्हा दाखल करावा लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी अंगुरीबाग, मोतीकारंजा येथे करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी शेख हाफीज शेख हबीब (वय ३९, रा. अंगुरीबाग) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या ताब्यातून गॅसने भरलेली ४१ सिलिंडर जप्त केले. रहिवासी परिसरात लोकांना हानी होईल अशा पद्धतीने ही गॅस सिलिंडर असुरक्षितरित्या ठेवण्यात आली होती. गॅस सिलिंडरचा साठा पकडल्यानंतर पोलिसांसोबत कारवाईसाठी जिल्हा पुरवठा विभागाला पुढील अधिकार आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी कारवाईसाठी वारंवार संपर्क साधला मात्र, त्यांना निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत टाळाटाळ केली. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतीय दंड संहितेच्या कलम २८६ नुसार गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार नंदकुमार भंडारे आणि पथकाने ही कारवाई केली होती.

शिक्षेत पडतो फरक

अवैध गॅस सिलिंडरचा साठा पकडल्यानंतर पुरवठा विभागाने तक्रार दिल्यानंतर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो. या कलमामध्ये शिक्षेची तरतूद सात वर्षांपर्यंत आहे. पोलिसांनी सोमवारी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये स्फोटक पदार्थ हयगयीने वापरण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात शिक्षेची तरतूद अत्यंत अल्प म्हणजे सहा महिन्यापर्यंत शिक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकाची फसवणूक; इन्फोसोल एनर्जीला मंचाचा दणका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद ​

इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहकास सोलर यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान व सोलार यंत्रणेतील डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्यासाठी माहिती पुस्तकात स्पष्ट केले होते. पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने कंपनीस ग्राहक कल्याण निधीत पंधरा हजार रूपये तीस दिवसात जमा करण्याचे आदेशित केले आहे. ग्राहकास झालेल्या मानसिक त्रासापोटी साडे सात हजार आणि खर्चापोटी अडीच हजार देण्याचे आदेश मंचाचा अध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी दिले आहेत. ग्राहकास तीस दिवसात डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्याचे आदेश दिले आहेत.

सिडको एन-११ उत्कर्षनगरातील सचिन सुभाषराव जाधव यांनी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीची सोलार व्यवस्था घेण्यासाठी सुतगिरी चौकातील दीपक लड्डा यांच्याकडे माहिती घेतली. कंपनीच्या वतीने ४ के. डब्ल्यू क्षमतेची सोलार रूफ टॉप ऑन ग्रीड ही यंत्रणा २ लाख ९० हजार रूपयांमध्ये बसविण्याचे निश्चित करण्यात आले. सोलार यंत्रणेत ८१ हजार रूपयांचे अनुदान ग्राहकास देण्याची तरतूद असल्याचे सांगण्यात आले. ग्राहकाने ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सिडकोतील आपल्या घरी सोलार यंत्रणा कार्यान्वित केली. त्यासाठी आरटीजीएसद्वारे २ लाख ९० हजार रूपये जमा केले. अर्जदारास अनुदानापोटी ८१ हजार परत करतील, अशी अपेक्षा होती आणि लेखी स्वरूपात सांगितल्याप्रमाणे डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांना वाटले, परंतु माहिती पुस्तिकेत उल्लेखिल्याप्रमाणे काहीच मिळत नसल्याने ग्राहकाने त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. अनुदानाच्या रक्कमेचा आपणासी संबंध नसल्याने कंपनीच्या वतीने सांगून ग्राहकाकडे ब्रॉडबाँड, इंटरनेट व वायफाय नसल्याने इक्विपमेंट बसवून देता येत नसल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर सेवेत उणीव ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आदेश दिले. ग्राहकातर्फे राहुल जोशी तर गैरअर्जदार कंपनीच्या वतीने एस. आर. मालानी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक आयोगाच्या आदेशाने मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोरगाव येथील केशरबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. राठोड यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाच्या आदेशाने बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी शिक्षकांची माहिती ऑनलाइन भरण्यास टाळाटाळ केल्याने शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीसाठी विद्यालयाच्या शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन भरण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आदेश देण्यात आले होते. ६ मार्चपर्यंत ही ऑनलाइन माहिती मुख्याध्यापक राठोड यांनी भरली नाही. तसेच पैठणचे तहसलीदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर न देता स्पीड पोस्टाने राठोड यांनी उत्तर पाठविले. पैठण येथील निवडणूक विभागाने वारंवार फोन करून माहिती ऑनलाइन भरण्याबाबत सूचना केली होती. मात्र, राठोड यांनी या सूचनेला प्राधान्य न देता टाळाटाळ केली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन झाले. याप्रकरणी पैठण येथील गटशिक्षणाधिकारी अफजाना परवीनखान यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक राठोड यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८ आणि भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव पाणीपट्टीतून नागरिकांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढीव पाणीपट्टीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणीपट्टी वाढ रद्द करण्याबद्दल महापौर आणि आयुक्तांचे मतैक्य झाले असून त्याबद्दल आयुक्त लवकरच शुद्धीपत्र काढणार आहेत.

समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पामुळे पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. महापालिका आणि समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लिमीटेड तथा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार ही वाढ करण्यात आली होती. आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होत असताना दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढ कशी, असा आक्षेप नागरिकांनी घेतला होता. पाणीच मिळत नसेल तर पाणीपट्टी कशासाठी भरायची हा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता. त्यामुळे समांतर जलवाहिनीच्या पीपीपी तत्वावरील कराराचे पुनरुज्जीवन करताना पाणीपट्टीत दरवर्षी केली जाणारी दहा टक्के वाढ रद्द करण्याचा निर्णय देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले होते, परंतु प्रशासनाने या आदेशाचे पालन केले नाही. पाणीपट्टीच्या नोटीस दहा टक्के वाढ समाविष्ट करूनच नागरिकांना देण्यात आल्या किंवा जे नागरिक पाणीपट्टी भरण्यासाठी आले त्यांच्याकडून दहा टक्के वाढीच्या हिशेबाने पाणीपट्टी वसूल करण्यात आली.

त्यातच पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व सर्व वॉर्ड अधिकारी यांच्या नावे पत्र काढून पाणीपट्टी दहा टक्के वाढ करूनच वसूल करा, असे आदेश दिले. त्यामुळे खळबळ निर्माण झाली. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार पाणीपट्टी वसूल केली जाणार की प्रशासनाच्या धोरणानुसार पाणीपट्टी वसुलीचा बडगा नागरिकांवर उगारला जाणार अशी चर्चा सुरू झाली. याच संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले आणि महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यात चर्चा झाली. सर्वसाधारण सभेने घेतलेल्या निर्णयानुसार पाणीपट्टी वसूल करा, त्यात दहा टक्के वाढ करू नका, असे महापौरांनी आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी देखील ते मान्य केल्याचे महापौर म्हणाले. पाणीपट्टी वाढ रद्द करण्याबद्दल शुद्धीपत्र काढण्याचे देखील आयुक्तांनी मान्य केल्याचे महापौर म्हणाले. 'मटा' शी बोलताना महापौर म्हणाले पाणीपट्टी पूर्ववत १८०० रुपये कशी करता येईल याचा देखील आम्ही विचार करीत आहोत. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर याबद्दलची भूमिका आम्ही स्पष्ट करू.

उपविधी रद्द करावे लागणार

पाणीपट्टी वाढ रद्द करण्याबद्दल महापौर आणि आयुक्तांचे मतैक्य झालेले असले तरी पाणीपुरवठा आणि पाणीपट्टीबद्दल तयार करण्यात आलेले उपविधी (बायलॉज) रद्द केल्या शिवाय पाणीपट्टी रद्द होणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. उपविधीला शासनाने मंजुरी दिली आहे. उपविधी राजपत्रात देखील प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे पाणीपट्टी वाढ रद्द करायची असेल तर महापालिकेला शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर झालेले उपविधी अगोदर रद्द करून घ्यावे लागतील. उपविधी रद्द न करता पाणीपट्टी वाढ रद्द केल्यास ती आर्थिक अनियमितता ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images