Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहरातील पाणी सिडकोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको-हडको भागातील पाण्याची तक्रार सोडवण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात पुरविण्यात येणारे तीन एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) पाणी सिडको-हडको भागासाठी वळविले आहे. त्याशिवाय जलकुंभावरून टँकर भरण्यासाठी वापरले जाणारे पाणी देखील आता सिडको, हडकोसाठी दिले जाणार आहे. त्यामुळे सिडको, हडकोच्या पाणीपुरवठ्यात सुमारे सहा 'एमएलडी' वाढ होईल, असे मानले जात आहे.

सिडको, हडको भागाचा पाणीप्रश्न दीड-दोन महिन्यांपासून ऐरणीवर आला आहे. चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केलेले असताना सिडको, हडको भागात मात्र पाच ते सहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जलकुंभावर, रस्त्यावर नागरिकांचे आंदोलन होत आहे. नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे नगरसेवक देखील जलकुंभाचा ताबा घेतल्याचे प्रकार घडले. यातून मार्ग काढण्यासाठी गेल्या काही दिवसात अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. शहर व सिडको, हडको भागासाठी सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

औरंगाबाद शहरासाठी जायकवाडी येथून रोज १३० ते १३५ एमएलडी पाणी उपसले जाते. त्यापैकी १२० ते १२५ एमएलडी पाणी शहरात येते. शहरात येणाऱ्या पाण्यापैकी सुमारे ३० एमएलडी पाणी नक्षत्रवाडीहून सिडको एन पाच जलकुंभाकडे एक्स्प्रेस जलवाहिनीच्या माध्यमातून वळवले जाते. प्रत्यक्षात सिडको, हडको भागासाठी केवळ १७ एमएलडी पाणीच मिळते. दहा एमएलडी पाणी मरिमाता जलकुंभासाठी दिले जाते, तर तीन एमएलडी पाणी टँकर भरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. एमआयडीसीच्या माध्यमातून टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तीन एमएलडी पाणी वाचले आहे. त्याशिवाय शहरात येणाऱ्या सुमारे १०० एमएलडी पाण्यातून तीन एमएलडी पाणी सिडको, हडकोसाठी वळविण्याचा निर्णय प्रशासनाच्या पातळीवर झाला आहे. त्यामुळे आता सहा एमएलडी पाणी सिडको, हडकोसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bपाण्याविषयीच्या तक्रारी दूर होतील\B

सिडको, हडकोसाठी सध्या १७ एमएलडी पाणी मिळते. मुख्य शहरात पुरविण्यात येणाऱ्या पाण्यापैकी तीन एमएलडी पाणी सिडको, हडकोला देण्यात येणार आहे. त्यामुळे या भागासाठी आता सहा एमएलडीची उपलब्ध होणार आहेत. या भागासाठी २३ एमएलडी उपलब्ध होईल. त्यातून पाण्याविषयीच्या तक्रारी काही प्रमाणात दूर होतील, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने नको !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाजाला दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. देशातील सांस्कृतिक पर्यावरण जेवढे निकोप राहील तेवढी विधायक कामे अधिक होतील. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्राचे दमन न करता सरकारने योग्य धोरण ठरवावे, असे मत मान्यवरांनी मांडले. चांगले सांस्कृतिक धोरण जगभरात भारताची प्रतिमा अधिक उजळ करील, असा आशावादही यावेळी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहित्य-संस्कृती विषयावर 'मटा जाहीरनामा' घेण्यात आला. या चर्चेत साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. सत्ताधारी भाजप सरकारच्या कार्यकाळात सांस्कृतिक क्षेत्राची मोठी कुचंबणा झाल्याचा मुद्दा डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी मांडला. 'मोदी सरकारच्या काळात साहित्य-संस्कृती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात दमन झाले. यापूर्वी भाजपच्या कार्यकाळात संस्कृती व वाड्मय क्षेत्रातील धुरिणांना विलक्षण प्रतिष्ठा दिली गेली. मात्र, विद्यमान सरकारला भय वाटत होते. लेखणीची ताकद सत्ता उलथवू शकते, या भयापोटी मोदी सरकारने लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजुने आणि संविधानाच्या आधाराने लेखकांना भूमिका घ्यावी लागली. सरकार योग्य दिशेने असेल तर, भय वाटण्याचे कारण नसते. तसेच निकोप सांस्कृतिक वातावरणासाठी राष्ट्रीय पातळीवर संस्थात्मक उभारणीची गरज आहे. साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट काम करीत असले तरी, बहुभाषिक साहित्य निर्मितीची व अनुवादाची गरज आहे', असे कांबळे म्हणाले.

'महाराष्ट्रात साहित्य-संस्कृती मंडळ, भाषा विभाग, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ कार्यरत आहे. या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या ज्ञानशाखांसाठी नवीन संस्थांची गरज आहे. जीवनमूल्ये अधोरेखित करण्याचे काम साहित्य करते. त्यामुळे या क्षेत्राला पोषक वातावरण तयार करणे सरकारची जबाबदारी आहे. भाषा सल्लागार समितीने राज्याला दिलेल्या मसुद्याची अंमलबजावणी कुठे अडकली ते कळले नाही', असे डॉ. ललित अधाने यांनी सांगितले. 'प्रादेशिक भाषेत रोजगाराच्या संधी नसल्यामुळे इंग्रजीचे स्तोम वाढले आहे. भारतीय भाषा टिकवण्यासाठी रोजगार वाढवणे आवश्यक आहे. मराठी दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषा संवर्धन कमी आणि काही लोकांसाठी रोजगार निर्मिती दिसते. साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ झाल्याशिवाय संधी मिळत नाही. त्यामुळे तरुण लेखकांसाठी राष्ट्रीय स्तरावर मंडळ स्थापन करुन उपक्रम राबवले पाहिजे', असे नीलेश चव्हाण यांनी सूचवले.

'भाषा संवर्धनासाठी भारतात प्रयत्न होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. इतर भाषेतील साहित्य मराठीत अधिक प्रमाणात अनुवादित होते. मात्र, मराठी साहित्य इतर भाषांत जाण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक भारतीय भाषांबाबत हाच प्रकार घडत आहे. सांस्कृतिक धोरण योग्य असल्यास जगासमोर देशाचे चांगली प्रतिमा होईल', असे डॉ. संतोष तांदळे म्हणाले. 'देशातील साहित्य-संस्कृती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. भाषा जगली पाहिजे. शिवाय, विविध पुरस्कार समित्यांवर तज्ज्ञांची नियुक्ती करुन पारदर्शी निवड करावी. नवीन लेखकाला भरघोस अनुदान द्यावे', असे डॉ. दैवत सावंत म्हणाले.

ब्रिटीशांनी केली नसेल एवढी इतिहासाची मोडतोड पंतप्रधान मोदी आणि सहकाऱ्यांच्या प्रेरणेने झाली. गुजरातच्या पाठ्यक्रमात संविधान निर्मात्याचा उल्लेखही नाही. सत्तेविरुद्ध कुणी 'ब्र' काढू नये हे हुकूमशाहीचे लक्षण असते. लेखिका नयनतारा सहगल यांचे संमेलनातील निमंत्रण रद्द करणे हे त्याचेच उदाहरण. इतरांच्या विचारांना नाकारणे म्हणजे टुंड्रा प्रदेशातील खुरट्या वनस्पतीसारख्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.

\B- डॉ. ऋषीकेश कांबळे, ज्येष्ठ समीक्षक

\B

समाजाला उन्नत आणि उदात्त दिशा देण्याचे काम लेखक-कलावंत करतात. त्यांच्या पाठिशी राज्यकर्त्यांनी उभे राहणे अपेक्षित असते. सद्यस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन लेखक-कलावंत एकाकी पडले आहेत. कलावंत, विचारवंत, लेखक यांना बोलण्याची मुभा राहिली नाही. कॉ. गोविंदराव पानसरे, एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या म्हणजे विचारांची गळचेपी करण्याचा प्रकार आहे.

\B- प्रा. डॉ. ललित अधाने, कवी

\B

सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडे सांस्कृतिक जाणिवा नसलेले नेतृत्व आहे. त्यातून देशात चांगले सांस्कृतिक धोरण उभे राहिले नाही. हे खेदनजनकच म्हणावे लागेल. सरकारच्या विरोधात ६०० कलाकार एकत्र आले तर, दुसरीकडे सरकारच्या बाजूने ९०० कलाकार एकत्र आले. हा प्रकार कलाकारातच द्वंद्व निर्माण करणारा आहे. कलाकाराने भूमिका घेऊन भाष्य करणे अपेक्षित असताना त्यांना रोखणे गैर आहे.

\B- नीलेश चव्हाण, कवी

\B

लेखकाने दिशा दाखवावी आणि राज्यकर्त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा, असा विधायक विचार देशात होता. आता नेत्यांचा सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात वाढलेला हस्तक्षेप निराशाजनक असाच म्हणावे लागते. नेते पुढे आणि लेखक मागे चालले का, असा प्रश्नही पडल्याशिवाय रहात नाही. नैतिकता, आदर्श, चरित्र निर्माण करण्याचे काम साहित्याने करावे. सरकार बदलले तरी चांगले सांस्कृतिक धोरण कायम रहावे.

\B- प्रा. डॉ. संतोष तांदळे, अनुवादक\B

शासकीय व्यवस्थेने लेखक व कलावंतांचा सन्मान राखण्याची गरज आहे. समाजाला दिशा देणाऱ्या लेखकांचे महत्त्व गौण ठरवले गेले आहे. ही दृष्टी बदलणे क्रमप्राप्त आहे. वयोवृद्ध व गरजू कलाकार-कलावंतांची काळजी घेणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. शिवाय, केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर भाषेसाठी महत्त्वाचे काम करण्याबाबत नियोजन करावे. विविध पुरस्कार समित्यांवर तज्ज्ञांची पारदर्शी निवड करावी.

\B- प्रा. डॉ. दैवत सावंत, समीक्षक

\B

\Bराजकीय हस्तक्षेप नको

\Bसाहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत शासकीय संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला. सोयीच्या विचारधारेची, पण सामान्य वकुबाच्या व्यक्ती पदांवर नेमल्या गेल्या. हा प्रकार सांस्कृतिक पर्यावरणासाठी घातक असल्याचे मान्यवरांनी सांगितले. एफटीआयआय, इतिहास संशोधन संस्था, सेन्सॉर बोर्ड अशा अनेक ठिकाणी त्याची प्रचिती आली. याला अटकाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

\Bमटा जाहीरनामा

\B- लेखक-कलावंतांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखा.

- सांस्कृतिक धोरणासाठी पुरेशी तरतूद केली जावी.

- प्रादेशिक भाषांच्या उत्थानासाठी मूलभूत उपाययोजना.

- विद्यापीठ स्तरावर भाषा समृद्धीसाठी धोरण ठरवावे.

- पुरातन वास्तूंचे संरक्षण व जतन करण्यात यावे.

- बोलीभाषांचे जतन करण्यासाठी दस्तावेजीकरण हवे.

- भारतीय भाषेतून रोजगार निर्मितीचे धोरण अवलंबावे.

\Bसरकारला दहा पैकी गुण

\B- संरक्षण व अंतर्गत सुरक्षा - ४

- परराष्ट्र धोरण - ३

- आर्थिक नीती - ३

- सामाजिक सलोखा - ३

- कृषी - ३

- वाहतूक व दळणवळण - ५

- पर्यावरण, ऊर्जा - ५

- आरोग्य, स्वच्छता - ५

- शिक्षण - ४

- महिला - ४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरणापूर फाटा येथे अपघातात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

पडेगाव : शरणापूर फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान झालेल्या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला. महादू बाबूराव मनोरे (वय ६०, रा. शरणापूर - वंजारवाडी) हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी नाशिककडून वाळूजच्या दिशेने जात असलेल्या ट्रकने (एच. आर. ५५ ए. एफ. ६८७७) त्यांना उडवले. यात मनोरे जागीच ठार झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. वाहतूक कोंडी झाली. दौलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह टू मोबाइल व्हॅनद्वारे घाटीत हलवले. मनोरे हे सरपंच नोरे वंजारवाडी यांचे चुलते होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टक्केवारीने शहराला अन् शहरवासियांनाही विकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'समांतरपासून कचऱ्यापर्यंत अक्षरश: सगळीकडे टक्केवारी आणि कमिशनखोरीने औरंगाबादला आणि औरंगाबादवासियांना विकले आहे. लाचार खासदार चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे पाय चाटण्याशिवाय काहीही केलेले नाही. आताही अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती; पण ती त्यांना न देता अख्खी निवडणूक व इतर पक्षदेखील मॅनेज करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच आतातरी लाचारांना नाही म्हणा, स्वाभीमानाने जगा आणि मला खासदार म्हणून निवडून आणा. मला खासदार म्हणून निवडून आणले तर १० दिवसांत औरंगाबाद कचरामुक्त करून दाखवेन,' अशी ग्वाही शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी दिली.

पुंडलिकनगर रोडवर शुक्रवारी (१९ एप्रिल) सायंकाळी आयोजित प्रचार सभेत मोठ्या आत्मविश्वासाने व प्रस्थापित खासदारांची पदोपदी टर उडवत आणि टीका-टिपण्णींचा जोरदार पाऊस पाडत हर्षवर्धन जाधव यांनी प्रस्थापितांचा कडक समाचार घेतला. मी स्वत: खासदाकीच्या निवडणुकीला उभे राहू नये म्हणून माझ्या सासऱ्यांकडून मला शांत करण्याचाही प्रयत्न झाला; पण परिणाम उलट झाला व आज भाजपची अख्खी ताकद माझ्या पाठीशी उभी आहे, असे सांगत, मोदींना काही दिवसांपूर्वी अफझलखान म्हणणारे खैरे आता मोदींना बाप म्हणू लागले आहेत, ते केवळ स्वत:च्या खुर्चीसाठी. मोदींना पंतप्रधान करायचे असेल तर मला निवडून आणा, असे म्हणण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे ती त्यांनी २० वर्षांत काहीच केले नाही म्हणून आणि हे अगदी शेंबड्या पोरालाही माहीत झाले आहे. मी पुंडलिकनगरच्या मंदिराला १२ लाख रुपये दिले आणि माझ्याकडून पैसे घेतले तर मंदिर तोडून टाकेल, अशी खैरेंनी धमकी दिली. हिम्मत असेल तर असे करून दाखवा, असे खुले आव्हानही जाधव यांनी खैरेंना सभेत दिले. मला शाळा नको, कॉलेज नको, टक्केवारीही नको, मला आमदार-खासदार म्हणून मिळणारा पगार पुष्कळ आहे. साधा पाणी-कचऱ्याचा प्रश्न सोडवू न शकणारे खैरे आता निवडून येणार नाहीत आणि जिथे अंतुले निवडून येऊ शकत नाही तिथे जलील काय निवडून येणार? त्यामुळे मीच निवडून येणार आणि औरंगाबादची अवस्था पाहून मी जनतेसाठी ही हिंमत करत आहे, असेही जाधव म्हणाले.

\Bकन्नड तालुक्यासाठी आणले ६५० कोटी

\Bमला नाक दाबून तोंड उघडता येते; म्हणूनच केंद्रातून मी एकट्या कन्नड तालुक्यासाठी ६५० कोटींचा निधी आणला. यामध्ये संपूर्ण ३८० कोटींमधून एकाच रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या १० टक्के दुर्बलांना आरक्षण देणाऱ्या मोदींचे मी समर्थन करतो आणि अर्थात खासदार झालो तरी मी काही चूप बसणार नाही. औरंगाबाद जिल्ह्यासाठी योजना आणल्याशिवाय राहणार नाही, असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायसेक्युरिटी नंबर प्लेटची वाहने बाजारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद वाहनांची सुरक्षा आणि आप्तकालीन माहिती उपलब्ध व्हावी यासाठी एक एप्रिलपासून उत्पादित नवीन गाड्यांना हायसेक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार गुरुवारी (१८ एप्रिल) पहिली हाय सेक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविलेली कारची नोंदणी आरटीओ कार्यालयात

करण्यात आली. वाहन उत्पादकांकडून एप्रिल २०१९ नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांवर डिलरमार्फत टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबरप्लेट व परमनंट आयडेंटीफिकेशन नंबरसहित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, केंद्रीय मोटार वाहन नियम १९९० च्या नियम ५० नुसार वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट विहित नमुन्यात बसविण्याची तरतूद आहे. गेल्यावर्षी केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या हाय सिक्युरिटी नंबरप्लेटमुळे वाहनचोरीला आणि गैरप्रकारांना आळा बसणार आहे. सर्व देशभरात एकाच पद्धतीच्या नंबरप्लेट वाहनांवर दिसणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जी जुनी

वाहने आहेत त्यांनाही या नंबरप्लेटसाठी सक्ती केली जाणार आहे, अशी

माहिती आरटीओ विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लांडग्याच्या हल्ल्यात १९ शेळ्यांचा मूत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन ते चार लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ शेळ्यांचा मृत्यू झाला. गंगापूर तालुक्यातील नारायणपूर लांजी येथे ही घटना घडली. या प्रकरणी वन खात्याने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून संबंधित पशूपालकास आर्थिक नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती वन खात्याच्या सूत्रांनी दिली.

अरुण भुजंग हे बंदिस्त पद्धती‌ने शेळी पालन करतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री २५ शेळ्या शेडमध्ये बांधल्या होत्या. पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास तीन ते चार लांडगे शेडमध्ये घुसले आणि त्यांनी शेळ्यांवर हल्ला चढविला. यात १९ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच वन विभागाच्या कर्मचारी वनपाल अनिल पाटील, वनकर्मचारी प्रभुदास हजारे, बाबुलाल गुंजाळ, मच्छिंद्र देवकर, साहेबराव तुपे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याबाबत प्रक्रीया सुरु करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा खून; जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : विवाहितेच्या खून प्रकरणातील आरोपी शुभम भाऊसाहेब बागुल याने दाखल केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला.

याप्रकरणी मृत सुनंदा वाघमारे हिची मावशी शारदा बाबासाहेब वाहूळ यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सहा डिसेंबर २०१८ रोजी सुनंदा हिच्या घराशेजारी राहणाऱ्या मयूर शेंडकेवार याने फोन करून वाघमारे यांची दोन मुले घेऊन कोणीतरी आले असल्याचे वाहूळ यांना सांगितले. त्यावरून शारदा वाहूळ यांनी धाव घेत सुनंदा वाघमारे हिचे घर गाठले. तेथे सुनंदाचा गळा चिरून खून करण्यात आला होता. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊन आरोपी शुभम भाऊसाहेब बागूल (२२, रा. सिद्धार्थ नगर) याला सात डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणीचे अपहरण, अत्याचार; जिम ट्रेनरला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणीचे अपहरण करून तिला वाशीमला पळवून नेणारा व महिनाभर डांबून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी जिम ट्रेनर अमोल संतोष थिटे याला गुरुवारी (१८ एप्रिल) मध्यरात्री अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला रविवारपर्यंत (२१ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

याप्रकरणी २० वर्षांच्या पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी ही फॅâशन डिझायनरचा कोर्स करीत असताना तिची आरोपी जिम ट्रेनर अमोल संतोष थिटे (२१, रा. नारेगाव) यांच्याशी ओळख झाली होती. त्याच काळात फिर्यादी ही आरोपी व मैत्रिणींसोबत विद्यापीठ परिसरात गेली असता, आरोपीने फिर्यादीचे जिन्स पॅट व टॉपवरील फोटो काढले होते. त्या फोटोंची फिर्यादीने आरोपीकडे वेळोवेळी मागणी केली, मात्र तो देण्यास टाळाटाळ करत होता.

दरम्यान, फिर्यादीचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर आठ मार्च २०१९ रोजी अमोलने तरुणीच्या मोबाइलवर कॉल करून फोटो देण्याच्या निमित्ताने तिला सिडको कॅâनॉट परिसरामध्ये बोलावून घेतले. तरुणी फोटो घेण्यासाठी आली असता अमोलने कारमध्ये फोटो असल्याचे सांगत तिला कारजवळ नेले आणि कारमध्ये ढकलले. त्यावेळी तरुणीने घरी कॉल करण्यासाठी मोबाइल काढला असता, अमोलचा साथीदार अफसर शहा नजीर शहा (२३, रा. नारेगाव) याने तरुणीच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यानंतर अमोलने तरुणीला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी देत तिला वाशिमला पळवून नेले व तब्बल एक महिना खोलीत डांबून अमोलने तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने दिल्यावरून दोघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bसाथीदार अजूनही पसार

\Bप्रकरणात अमोलला गुरुवारी मध्यरात्री अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, अमोलची वैद्यकीय तपासणी करावयाची असून, त्याच्याकडून चाकू जप्त करायचा आहे; तसेच अमोलचा साथीदार अफसर शहाला अटक करायची आहे. त्याच्याकडून तरुणीचा मोबाइल हस्तगत करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने अमोलला रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणांना लुबाडणारे दोन गुन्हेगार जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणाला मारहाण करून रोख रक्कम आणि मोबाइल पळवणाऱ्या दोन गुन्हेगारांना सिडको एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा प्रकार गुरुवारी रात्री चिकलठाणा एमआयडीसीमध्ये घडला होता. आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकीसह नऊ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

बळीराम मोतीलाल पळसकर (वय २८ रा. शहर पळशी, ता. औरंगाबाद) हा तरुण गुरुवारी रात्री मित्रासह दुचाकीवर सिडको बसस्टँडकडून पळशीकडे जात होता. यावेळी एनआरबी कंपनीसमोर दोघे लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी दोन आरोपींनी त्यांना मारहाण करीत त्यांच्याजवळील रोख साडेनऊ हजार आणि दोन मोबाइल असा ऐवज लुबाडला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी गुन्हे शोध पथकाने तपास केला. नारेगाव चौकाजवळील गेट लेझर कंपनीजवळ दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. आनंद उर्फ मिठ्या सुदाम भारसाखळे (वय २९) आणि अमोल उर्फ नारायण श्रीरंग ढेपे (वय ३०, दोघे रा. ब्रिजवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सातारा पोलिस ठाणे हद्दीतून चोरलेल्या एका दुचाकीसह नऊ चोरीचे मोबाइल पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अन्नलदास, सुरेश जारवाल, मुनीर पठाण, शाहेद शेख, गणेश राजपूत, दीपक शिंदे आणि नितेश सुंदर्डे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंडविणाऱ्यांची कोठडी वाढविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमीन नावावर करून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह त्याच्या भागिदाराला ४१ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणात अनिल नारायण कुलकर्णी, अजिंक्य अनिल कुलकर्णी, अमित अनिल कुलकर्णी, सुमित सुनिल कुलकर्णी व स्वयंम देविदास सिंघानिया-जोशी या पाच आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये शनिवारपर्यंत (२० एप्रिल) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

भूषण देविदास शिरोळे व सुरेश शिंगारे हे दोघेजण भागिदारीमध्ये बांधकाम व जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. एप्रिल-मे २०१८ मध्ये शिरोळे यांच्या ओळखीचे अनिल नारायण कुलकर्णी (५६), अजिंक्य अनिल कुलकर्णी (२१), अमित अनिल कुलकर्णी (२७, सर्व रा. एन-७, बजरंग चौक सिडको), सुमित सुनिल कुलकर्णी (२७, रा. चिकलठाणा) व स्वयंम देविदास सिंघानिया-जोशी (२७, रा. एन-४, सिडको, जयभवानी नगर) या आरोपींनी त्यांच्या सुंदरवाडी शिवारातील जमिनीच्या व्यवहाराबद्दल शिरोळे यांची भेट घेतली होती. तेव्हा आरोपी अनिल कुलकर्णी याने पत्नीच्या नावे वडिलोपार्जित दीड एकर जमीन असल्याचे सांगितले मात्र, सुनील कुलकर्णी व वर्षा कुलकर्णी यांनी माझ्या पत्नीचे नाव खोटे दस्ताऐवज तयार करून सात-बारातून कमी केले. त्याबाबतचे कागदपत्रदेखील आरोपींनी शिरोळे व शिंगारे यांना दाखविले. शिरोळे यांना जमिनीबाबत सत्यता वाटल्यामुळे आठ मे २०१८ रोजी आरोपींसोबत जमिनीचा दोन कोटींचा खरेदी व्यवहार केला व इसार पावती करून करार केला.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिरोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील पाच जणाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

\Bखरेदीखतास टाळाटाळ\B

इसार पावतीपोटी शिरोळे व शिंगारे यांनी धनादेशद्वारे १२ लाख ५० हजार, आरटीजीएसद्वारे चार लाख, तर विविध वेळी २५ लाख रुपये रोख, असे एकूण ४१ लाख ५० हजार रुपये दिले. २० फेब्रुवारी २०१९ रोजी जमिनीच्या सातबाऱ्यावर आरती कुलकर्णीचे नाव नोंदविण्याचे आदेश तहसीलदाराने दिले. त्यानंतर शिरोळे यांनी जमिनीचे खरेदीखत करून देण्यासाठी तगादा लावला, मात्र आरोपींनी टाळाटाळ केली; तसेच आरोपींनी संगनमत करून जमीन नावावर करण्याबाबत ५० लाखांचे आमिष दाखवून आरती कुलकर्णी यांच्याकडून जमिनीचे नोंदणीकृत दस्तऐवज तयार करून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मतीनला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

$
0
0

औरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेला नगरसेवक सय्यद मतीन (वय ३५, रा. टाउन हॉल) याला बलात्काराच्या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. महिलेला नोकरी लावून देतो; तसेच लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी १५ जानेवारी रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रशीदपुरा येथील एक महिला आधारकार्ड बनवण्यासाठी एक वर्षापूर्वी मतीनच्या कार्यालयात गेली होती. यावेळी मतीनने तिला लग्नाचे आमिष दाखवत; तसेच नोकरी लावून देतो, अशी थाप मारत बलात्कार केला हेाता. यानंतर मतीनने लग्नास नकार दिल्यामुळे या महिलेने पोलिसात गुन्हा दाखल केला होता. नगरसेवक मतीनने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती मात्र, कोर्टाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. मतीन याला शुक्रवारी सायंकाळी टाउन हॉल परिसरातून अटक करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक ए. डी. नागरे आणि पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तासाभरात शेकडो लोकांशी गाठभेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली असून, उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी पडत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासोबत घालवलेल्या एक तासात ही बाब जाणवली. त्यांनी तासाभरात शेकडो लोकांच्या गाठीभेटी घेतल्या.

शुक्रवारी सकाळी बरोबर नऊ वाजता एमआयएमचे पक्षप्रमुख असुदोद्दीन ओवेसी यांच्या प्रमुख उपस्थितीत जलील यांची प्रचारफेरी सुरू झाली. छावणीतील शांतीपुरा, ख्रिस्तनगर भागातून ही फेरी निघाली. ओवेसी हे माइकमधून नागरिकांना मतदानाचे आवाहन करीत असताना जलील यांच्या प्रत्यक्ष भेटीवर जास्त भर होता. घरोघरी जात वडीलधाऱ्या मंडळीचे आशीर्वाद घेत मतदान करण्याबाबत त्यांनी आवाहन केले. सोबत शेकडो तरुणांचा जमाव घोषणाबाजी करून उत्साह वाढवत होता. जयसिंगपुरा, बेगमपुरा, आसेफिया कॉलनी, टाऊन हॉल, जयभीमनगर मार्गे बुढीलेन भागात या प्रचार यात्रेचा समारोप झाला. ओवेसी आणि जलील यांच्या प्रचारयात्रेचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत होते. यावेळी टाऊन हॉल, जयभीमनगर भागात महिलांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले, तसेच फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी ओवेसी, जलील यांना भेटण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी झाली.

\Bसेल्फीची क्रेझ

\Bइम्तियाज जलील यांच्या प्रचारफेरीत त्यांनी वैयक्तिक भेटीवर जास्त जोर दिला. रस्त्यावरील फेरीवाल्यांपासून ते दुकानदारापर्यंत तसेच रिक्षाचालकांची देखील त्यांनी वैयक्तिक भेट घेतली. यावेळी जलील यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त करीत सेल्फीचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फीने केला घात; बोट उलटून तीन मुलांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यावरील नदीपात्रात बोटू उलटून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.


नळदुर्ग येथील किल्ल्यात बोरी नदीच्या पात्रात बोटिंगची व्यवस्था आहे. नळदुर्ग येथील एका कुटुंबातील मुले–मुली सकाळी किल्ला पाहण्यासाठी गेली. किल्ला पाहिल्यानंतर बोटिंगसाठी गेली. बोट किनाऱ्याकडे येताना एक जण सेल्फी काढण्यासाठी उठला. त्यामुळे बोटीचा तोल जाऊन बोट कलंडली. सुरक्षा जॅकेट असल्याने बोटीतील सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, मात्र तीन जण अडकले. एका मुलीला बाहेर काढून तातडीने रुग्णालयाने नेण्यात आले पण तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या दुर्घटनेत इजहान एहसान (वय ५), सानिया (वय ८) आणि अल्मास (वय ८) या बालकांचा मृत्यू झाल्याचे कळते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करकरेंचा जीव कसा गेला?ओवेसींचा मोदींना सवाल

$
0
0

औरंगाबाद:

'मुंबई दहशतवादी हल्ल्यात लढताना हेमंत करकरे शहीद झाल्याचे अख्ख्या देशाला माहित आहे. मात्र, दहशतवादी कारवायामध्ये सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या करकरे यांचा जीव आपल्या शापामुळे गेल्याचे सांगतात. मग करकरेंचा जीव नेमका कसा गेला, याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यावे,' असे आव्हान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिले.

जबिंदा लॉन्स येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी 'वंबआ'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर, आमदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण, जावेद कुरैशी यांची उपस्थिती होती. यावेळी ओवेसी म्हणाले, 'अनेक वेळा एमआयएमवर आरोप करण्यात येतो की ही रझाकारांची पार्टी आहे. ही रझाकारांची पार्टी नसून, ही दिल्लीला आव्हान देणाऱ्या मलिक अंबर यांची पार्टी आहे. शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सिद्धी इब्राहिम यांची पार्टी आहे.' ओवेसी यांनी पंतप्रधानाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, 'संसदेत आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला. तेव्हा त्या ठिकाणी सामाजिक आरक्षणाच्या आधारावर संसदेत आलेले खासदारही उपस्थितीत होते. त्यांनी या घटनाबाह्य निर्णयाचा विरोध केला नाही. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवडणुकीच्याच वेळी बालाकोटबद्दल माहिती देऊन मोदींना उघडे पाडले,' असा दावा त्यांनी केला. 'मुंबईवर हल्ला झाला. तेव्हा दहशवाद्यांना मारण्यासाठी गेलेले शहीद हेमंत करकरे शहीद झाले. त्यांच्याबद्दल भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरेचे मृत्यू आपल्या शापामुळे झाल्याचे सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना या वक्तव्याचे समर्थन करणार का,' असा सवालही ओवेसी यांनी केला. 'आगामी काळात देशाच्या सत्तेवर मोदी असणार नाहीत. 'वंबआ'ही लोकसभेपुरती मर्यादित नसून, ही युती महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकीत राहणार आहे. ही निवडणूक अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात लढणार आहोत,' अशी घोषणाही ओवेसी यांनी केली.

भुईगळांना उमेदवारी देण्याचे संकेत
सभेला मार्गदर्शन करताना 'वंबआ'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुटुंबशाहीच्या जोखडातून बाहेर पडावे. छुपे नाही तर समोर येऊन समर्थन द्यावे.' काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पैसा कोठून आला, असा आरोप केला आहे. याचे उत्तर देताना आंबेडकर म्हणाले, 'नांदेड लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी १०० कोटी रुपयांपर्यंत खर्च केला,' असा दावा त्यांनी केला. यावेळी आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून अमित भुईगळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले.…

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दानवेंना पाडण्याचा विडा उचलला: बच्चू कडू

$
0
0

जालना :

विलास औताडे यांच्या एका पैशाचा गुलाम नाही. पण, शेतकऱ्याला साल्या म्हणणाऱ्या दानवेंच्या विरोधात आपली सटकली आहे. बदला घेण्यासाठी भाजपला नव्हे तर दानवेंना पाडण्याचा विडा उचलला आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे आमदार बच्चु कडू यांनी केली.

जालन्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जालना जिल्ह्यात जाफराबाद, भोकरदन, अंबड, पैठण, या तालुक्यात प्रचार दौरा केला. पैठण येथे धरणाचे पाणी असताना ही त्या ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील नगर परिषद ही भाजप-सेनेच्या ताब्यात आहे. भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील दानवे यांचा साखर कारखाना असून, या साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांकडून सोळाशे रुपये टनाने ऊस खरेदी केला जातो व दुसरे कारखाने एकवीसशे रूपये भाव देतात ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप कडू यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्जिकल स्टाइक यशस्वीच, सैनिकांवर अविश्वास नको!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'उरी हल्ल्याचा बदला म्हणून केलेले सर्जिकल स्ट्राइक असो की, पुलवामानंतर बालाकोट एअर स्ट्राइक असो. दोन्ही ठिकाणी आपल्या सैन्यांनी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत पाकिस्तानला धडा शिकविला. दोन्ही ठिकाणी आपण यशस्वी ठरलो. सैनिक हा देशाचा असतो. त्याच्यावर अविश्वास व्यक्त करू नका,' असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी शनिवारी केले.

विवेक विचार मंच, मतदार जागृती मंचतर्फे श्रीहरी पॅव्हेलीयनमध्ये आयोजित कार्यक्रमत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सराला बेटचे महंत रामगिरी महाराज, योगीता तौर, सागर शिंदे यांची उपस्थिती होती. लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांनी 'उरी ते बालाकोट सर्जिकल स्ट्राइक ते एअर स्ट्राइक' हा विषय मांडला. ते म्हणाले, 'पाकिस्तानला आपण यापूर्वी अनेकदा त्यांची जागा दाखवून दिली. त्यांनी एक मारला तर, आपण दोन मारण्याची ताकद ठेवतो. पाकला आपण शत्रू मानत नाही. आपला खरा शत्रू चीन आहे. त्यांनाही आपण मात देण्याची ताकद देऊ शकतो. भारत १९६२सारखा नाही. हे त्यांनाही माहिती आहे. जम्मू व काश्मिरमध्ये अंतर्गत सुरक्षेसाठी ६२ हजार जवान कार्यरत आहेत. त्यामुळे दहशतवाद कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. या जवानांना कमी करण्यासह 'आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर अॅक्ट' रद्द करण्याबाबत बोलले जाते. असा विचार करणे म्हणजेही धोक्याची घंटा आहे. उरी आणि बालाकोट अशा दोन्ही ठिकाणची सर्जिकल स्ट्राइक यशस्वी करण्यात आपल्याला यश आले. १८ सप्टेंबरला हल्ला झाल्यावर २१ला आम्हाला आदेश आले. त्यानंतर लगेच आम्ही सज्ज होऊन तयारीला लागलो आणि २८ व २९ ला उरी सर्जिकल स्ट्राइक यशस्वी करू शकलो. यावेळी आपण अतिशय प्रभावीपणे गोपनीयता बाळगली. पुलवामा हल्ल्यानंतर आपण केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी पाक सैनिक दक्ष होते. तरी, आपण त्यांना मात देण्यात यशस्वी ठरलो. पाकिस्तानचा सैनिकी तळ असलेल्या रावळपिंडीपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणे उद्धवस्त करू शकलो. यामुळे आपल्या जवानांचे मनोबल उंचावले. काहीजन या सर्जिकल स्टाइकबाबत पुरावे मागतात. स्ट्राइक झाला नाही असे सांगतात. असे सांगणे चुकीचे आहे. सैनिक हा देशाचा असतो. त्याच्यावर अविश्वास व्यक्त करू नका,'असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले, 'स्वरक्षणार्थ केलेली हिंसा ही हिंसा नसते. सैनिकांविषयी सहानुभूती प्रत्यकाला असली पाहिजे. धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले सरंक्षण करेल.'

\Bनागरिकांनी आयोजकांना सुनावले

\Bकार्यक्रम दिलेल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरू झाला. त्यात आयोजकांकडून बोलणाऱ्यांची संख्या वाढत होती. ज्यांना ऐकायला आलो आहोत त्यांना बोलू देण्यापेक्षा इतरांचीच भाषणे वाढल्याने नागरिकांनी टाळ्या वाजवणे सुरू केले. किशोर शितोळे, अॅड. रोहित सर्वज्ञ यांचे भाषण झाले. यात शितोळे यांच्यानंतर अॅड. सर्वज्ञ यांचे भाषण सुरू असताना उपस्थितांचा पारा चढला. त्यांनी टाळ्या वाजवणे सुरू केले. त्यांचे भाषण संपत नाही दिसताच नागरिकांनी काय वाटलं हो, कोणाला ऐकायला आलोय असेही सुनावले. उपस्थितांचा रोष लक्षात घेत त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारचे मूठभर लोकांसाठी काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मोदींच्या राज्यात सरकारी कंपन्या तोट्यात आणल्या गेल्या. काही मूठभर लोकांसाठी मोदी सरकार काम करित आहे. देशाच्या राज्यघटनेचे संरक्षण राहुल गांधी आणि काँग्रेसच करू शकते. त्यामुळे आगामी काळात राहुल गांधी हेच देशाचे पंतप्रधान असतील,' असा विश्वास काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून कॉँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारासाठी किराडपुरा येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार एम. एम. शेख यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आयोजित सभेत नवज्योत सिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'चीन जमिनीखालून रेल्वे तयार करतोय. अमेरिका हा मंगळावर जीवनाचे अस्तित्व शोधत आहे. तर रशिया रोबोटिक्सवर काम करित आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे युवकांना चौकीदार बनवू पाहत आहे. चौकीदार हा श्रीमंत लोकांच्या घरासमोर असतो. त्या श्रीमंताकडे सर्वसामान्य तसेच गरिबांना जाता येत नाही. जाती, पाती आणि धर्माच्या आधारे मतदात्यांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींच्या राज्यात सरकारी कंपन्या तोट्यात आणल्या गेल्या असून, काही मूठभर लोकांसाठी मोदी सरकार काम करत आहे,' असा आरोपही सिद्धू यांनी केला.

\Bबजाओ टाली

\Bकिराडपुरा येथे झालेल्या सभेत सिद्धू यांनी आपल्या स्टाइलने भाषण केले. शेरोशायरी, पल्लेदार वाक्य आणि खुमासदार कोट्यांनी सिद्धू यांनी उपस्थितांची मने जिंकली. एखादा शेर किंवा चमकदार वाक्य फेकल्यानंतर त्यांचे 'बजाओ टाली' हे शब्द कानी येताच उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. सभेपूर्वी सिद्धू यांची प्रचार फेरी काढण्यात आली. पैठण गेट येथून ही फेरी निघाली. शहराच्या विविध भागातून या फेरीचा समारोप सभा स्थळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपलं सरकार घोषणा दमदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'केंद्रातील सरकारने गेल्या पाच वर्षांत नुसत्या घोषणा केल्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच केली नाही. देशात नरेंद्र, राज्यात नरेंद्र आणि आपल्या पदरी दारिद्र्य अशी परिस्थिती निर्माण केली. आपलं सरकार आणि घोषणा दमदार अशी विचित्र स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत 'अब की बार' ची घोषणा नरेंद्र मोदी करत होते. यंदा मात्र हे वाक्य उच्चारले की देशातील नागरिक म्हणत आहेत की अब की बार … बस कर यार,' अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

औरंगाबाद लोकसभेचे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारासाठी गजानन महाराज मंदिर चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. माजी मंत्री राजेंद्र दर्डा, गंगाधर गाडे, आमदार सतीश चव्हाण, अनिल पटेल, कल्याण काळे, एम.एम. शेख यांच्यासह महाआघाडीची नेतेमंडळी उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, 'मराठवाड्यात सर्वत्र बदल आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. दुपारी मी विमानतळावर उतरलो. शुकशुकाट होता. येथील विमानसेवा बंद पडली आहे. राजधानीचे शहर, औद्योगिक, पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या शहराची ही अवस्था झाली. केंद्र व राज्य सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही. मराठवाड्यात चार महिन्यात २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. भाजप सरकारला याचे काहीच घेणे देणे नाही. तुमचे खासदार इतके गोड बोलतात की ते कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नाही. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटतात. शहर व जिल्ह्याचा विकास गेल्या २० वर्षांत ठप्प झाला आहे. आता बदल घडविला पाहिजे.' मोदी सरकारवर कडाडून टीका करताना चव्हाण म्हणाले, 'नांदेडमध्ये मला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र व राज्यातील मंत्री ठाण मांडून होते, पण लोक माझ्यासोबत आहेत. राज्य सरकारने पाण्याच्या माध्यमातून विभागांमध्ये वाद निर्माण केले. राज्याच्या विभाजनाचा डाव आखला जात आहे. तो आम्ही हाणून पाडू. साडेचार वर्षे एकमेकांविरुद्ध गरळ ओकणारे एकदम गळ्यात गळे घालून मत मागत आहेत. यांना लाज कशी वाटत नाही,' अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे, अमित शहांवर टीका केली. केंद्रातील सरकारने नुसत्या घोषणा केल्या. त्याची अंमलबजावणी कुठेच दिसली नाही. सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे. देश सुखरूप नाही. राज्यातील पोलिसांची अवस्था बिकट आहे. विरोधकांना संपवण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी आखला आहे. आता जनता हे सहन करणार नाही. परिवर्तन घडलेच पाहिजे,' असे त्यांनी नमूद केले.

आमदार अब्दुल सत्तार यांच्याविषयी अशोक चव्हाण म्हणाले, 'ज्यांच्या विषयी कटकटी होत्या. त्यांना पक्षातून काढून टाकले. पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्यांना पक्षात स्थान नाही. काही अपक्ष निवडणुकीत आहेत. त्यांना महत्व देऊ नका. सासरा तिकडे आणि जावई इकडे अशी निवडणूक भाजप लढत आहे. अर्धी भाजप औरंगाबादेत आणि अर्धी भाजप जालन्यात आहे. लोक त्यांना भुलणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना सहा वेळा भेटलो. त्यांना आमच्या सोबत या असे म्हणालो होतो. पण ते आले नाहीत,' असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र साळुंके यांनी चव्हाणांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

\Bसाध्वी प्रज्ञांची उमेदवारी रद्द करावी

\Bसाध्वी प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा अशोक चव्हाण यांनी कडाडून समाचार घेतला. ते म्हणाले, 'करकरे यांनी त्यांचे काम उत्तम बजावले. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले सुरू आहेत. याच साध्वीला भाजपने उमेदवारी दिली. पंतप्रधानही त्यांचे समर्थन करतात. त्यांना लाज कशी वाटत नाही. निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरमधील मतदान केंद्र सर्वात दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद यंदा लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८५ मतदान केंद्रांची वाढ झाली असून, एकूण २०२१ मतदान केंद्रापैकी औरंगाबाद मुख्यालयापासून सर्वाधिक लांब मतदान केंद्र (८५ किलोमीटर) जि.प. प्रा. शाळा पुरणगाव (ता. वैजापूर) आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये असलेले भारत स्काऊट गाइडचे मतदान केंद्र सर्वात जवळ (१०० मीटर) ठरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाणेगाव येथे सर्वाधिक १३९१ मतदार असून कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंतूर येथे सर्वात कमी ११३ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार असलेले केंद्र मतदार संघ................... मतदान केंद्राचे नाव...................... मतदारसंख्या सिल्लोड.......................जि. प. प्रा. शाळा..................................१३८५ कन्नड..........................पंचायत समिती कार्यालय.........................१३८९ फुलंब्री .........................फुलंब्री..............................................१३३२ औरंगाबाद मध्य ..............ऑक्सफोर्ड प. स्कूल..............................१३९५ औरंगाबाद पश्चिम............कृषी अधीक्षक कार्यालय..........................१३८९ औरंगाबाद पूर्व.................गजाजन भाऊ शाळा.............................१३९२ पैठण...........................बालानगर.............................................१३९३ गंगापूर..........................घाणेगाव.............................................१३९६ वैजापूर.........................जि. प. प्रा. शाळा....................................१३९१ सर्वात कमी मतदार असलेले केंद्र मतदार संघ.................... मतदान केंद्राचे नाव...................... मतदारसंख्या सिल्लोड........................जि. प. प्रा. शाळा, महालबना..............२६८ कन्नड..........................जि. प. प्रा. शाळा, पिंप्री अंतूर..............११३ फुलंब्री .........................महाल पिंप्री...................................१६८ औरंगाबाद मध्य .............औरंगाबाद पोलिस प. स्कूल................४२३ औरंगाबाद पश्चिम............जि. प. प्रा. शाळा, शिरसमाळ.............१६१ औरंगाबाद पूर्व................विज्ञान वर्धिनी हायस्कूल....................३९८ पैठण...........................मुरादाबाद.....................................२०६ गंगापूर..........................धनगर पालटी................................२८१ वैजापूर.........................नारायणपूर....................................१५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाव्या आघाडीचा काँग्रेसला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डाव्या व लोकशाही आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी आपला पाठिंबा कॉँग्रेसला जाहीर केला. शनिवारी सीटू भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी त्यांनी काँग्रेस उमेदवारांचा स्वतंत्रपणे जाहीर प्रचार करणार असल्याचे सांगितले.

नोटाबंदी, जीएसटीमुळे गेल्या दोन वर्षांत ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लघु उद्योग, छोटे व्यापारी उद्धवस्त झाले. मोदी सरकारने जाती धर्मात विद्वेश पसरवून, सामाजिक वीण उसविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माकप नेते उद्धव भवलकर, भाकप नेते प्रा. राम बाहेती, स्वराज इंडियाचे अण्णासाहेब खंदारे यांनी यावेळी केला. भाकपचे ज्येष्ठ नेते अॅड. मनोहर टाकसाळ, अश्फाक सलामी, सत्यशोधक समाजाचे अॅड. बी. आर. शेळके, माकपचे प्रा. पंडित मुंडे, भगवान भोजने, नितीन वाहुळ, यावेळी उपस्थित होते. औरंगाबादेत चंद्रकांत खैरे हे चार टर्मपासून खासदार असतानाही पाणी प्रश्न गंभीर आहे. शहर बकाल झाले. त्यामुळे भाजप - शिवसेनेला हद्दपार करणे, हेच लक्ष डोळ्यासमोर ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्ष देशपातळीवर सक्षम पर्याय देऊ शकतो. त्यामुळेच औरंगाबाद व जालन्यात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे डावी व लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला अकोला व इतर काही ठिकाणी पांठिबा देण्यात आला आहे. मात्र, औरंगाबादेत 'एमआयएम'चा उमेदवार असल्याने पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही,' असे प्रा. बाहेती यांनी एका प्रश्नावर बोलताना नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images