Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बालनाट्य प्रशिक्षणाची चळवळ अखंड रहावी

$
0
0

\Bपृथा वीर, औरंगाबाद\B

'बालनाट्य चळवळ अखंड रहावी,' असे मत ज्येष्ठ बालरंगकर्मी लेखक-दिग्दर्शक प्रकाश पारखी यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले.

तब्बल ५० वर्षे केवळ बालनाट्याप्रती समर्पित असणारे पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मुलांनी अभिनयाचे धडे गिरवले. बालनाट्य शिकवण्याची शास्त्रशुद्ध प्रक्रिया विकसित करून त्यांनी बालकलाकार घडवले. सुजाण प्रेक्षकही निर्माण केले. एका कार्यक्रमानिमित्त ते शहरात आले होते. तेव्हा त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

\B- बालनाट्यालाच प्राधान्य का दिले?

\B- बालनाट्य केवळ अभिनयापुरतेच मर्यादित नाही. नाट्य प्रशिक्षणातून व्यक्तिमत्त्व विकास होतो. मी पहिल्यांदा शिबिर केले तेव्हा एका मुलामध्ये झालेले बदल स्वतः अनुभवले. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण म्हणूनच बालनाट्याप्रती मी समर्पित राहलो.

\B- आपला आजवरचा प्रवास कसा झाला?

\B- बालनाटिका, नाटुकल्या, सर्व वयोगटासाठी नाट्यछटा, शालेय अभ्यासक्रम समितीवर सदस्य, नकलानगरीचे शेकडो प्रयोग संपूर्ण राज्यात सादर केले. शहर फिरलो, ग्रामीण भागात गेलो. पशू-पक्षी, रेल्वे, टांगा, विविध वाद्यांचे हुबेहुब आवाज, नकला नगरीतील धमाल हा सर्वाधिक यशस्वी प्रयोग ठरला. मुलांना नकला नगरी अजूनही आवडते. भित्रा राजपुत्र या नाटिकेचे १५० एकपात्री प्रयोग केले. या पुस्तकाच्या १२ हजार प्रती विकल्या गेल्या. दोन दशकांहून अधिक काळ घालवूनही मी अजूनही बालनाट्याचे प्रशिक्षण देतो. याचा मला खूप अभिमान आहे.

\B- नाट्य प्रशिक्षणाची शास्त्रशुद्ध पद्धत असायला हवी का?

\B- बालनाट्याला चळवळ म्हणून सादर करण्याचा माझा प्रयत्न होता. त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसुत्रीवर मुलांना प्रशिक्षण देत आलो. नाट्यशास्त्र म्हणजे केवळ अभिनय नव्हे तर हे शास्त्र आहे. मुलांना उच्चार, आवाजाचे गुणधर्म, स्वर, संगीत, वाचन, रंगमंच, मेकअप सगळ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. या प्रशिक्षणाचा फायदा मुलांना व्यक्तीगत जीवनातही होतो. एकप्रकारचा आत्मविश्वास वाढतो. भित्रेपणा कमी होउन मुले धीट होतात.

\B- प्रकाशनाचे महत्त्व का वाटले?

\B- बालनाट्यात प्रकाशन असायला हवे. यामुळे मुलांना दिशा मिळते. सुरुवातीला नाट्य प्रशिक्षणात प्रकाशनाचा भाग नव्हता. पण बालनाट्यासाठी स्वतंत्र लिखाण असावे असे सारखे वाटायचे, पण मुलांसाठी कोण लिहणार. हळुहळु बालनाट्यावर पुस्तक काढण्याचा विचार केला. 'भित्रा राजपुत्र' या बाल नाटिकेचे दीडशेहून अधिक एकपात्री प्रयोग केले तेव्हा ते एक पुस्तक होते. मुलांना नाट्य, नृत्य, संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून एका मित्राकडून 'भित्रा राजपुत्र' नावाचे पुस्तक मिळाले. यातील विदुषकाच्या पात्रातून मी इतर पात्र सादर केले. दुसऱ्या दिवशी या मुलांकडून पुस्तकाची मागणी येऊ लागली. प्रत्येक वेळी मुलांना उसणे नाट्य शिकवण्यापेक्षा प्रत्येक वेळी नवे बालनाट्य असावे असे वाटले आणि आम्ही प्रकाशनासही नाट्य शिबिराचा भाग म्हणून स्वीकारला.

\B- बालनाट्य अभ्यासाला असावे असे तुम्हाला वाटते का?

\B- मी बालनाट्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण देतो. यामुळे शालेय जीवनातही मुलांना मदत मिळते. केवळ नाट्य शिबिरापुरते मर्यादित न राहता स्वतंत्र विषय म्हणूनही बालनाट्य असायला हवे असे माझे मत आहे.

\B- नवी पिढी बालनाट्याशी जोडली गेला का?

\B- नव्या पिढीनेही ही चळवळ पुढे नेली तर आनंद आहे, पण मोजकीच मंडळी बालनाट्यासाठी काम करतात. मात्र, ते प्रमाण खूप कमी आहे. बालनाट्यात सातत्य ठेवण्यासाठी नव्या पिढीने हा वारा जपायला हवा.

\B- विद्यार्थ्यांकडे पाहून कसे वाटते?

\B- शिष्य हीच माझी खरी ओळख आहे. अभिनय ही साधना आहे. ती सहज वाटत असली तरी, आजही कॅमेरासमोर बोलताना भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यामुळे अभिनयास कुणीच सहज समजू नये. माझे शेकडो विद्यार्थी आहेत. ही सगळीच मुले फक्त अभिनय क्षेत्रात नाहीत. मात्र, जिथे आहेत तिथे उत्तम आहेत. सुबोध भावेसारखे शिष्य मिळणे अवघड आहे. सुबोध आजही सन्मान देतो. त्याच्यासारखी अनेक मुले अजूनही आठवण ठेवतात, उल्लेख करतात. मेहनत त्यांचीच असते. प्रयत्न त्यांचेच असतात.

\Bबालकलाकाराचे बालपण हिरावले का?

\B- नव्या पिढीमध्ये संयम अजिबात नाही, पण त्याहीपेक्षा तो त्यांच्या पालकांकडे नसतो. पालक अधिक उतावीळ असतात. अभिनय, ग्लॅमर, प्रसिद्धीच्या नादात आपण बालपण हिरावतो का, याचे आत्मपरीक्षण पालकांनी करायचे हवे. मुलांनी थांबायचे म्हटले तर, थांबावे इतके जरी समजले तरी बालपणही जपता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडको, हडकोत प्रचंड उत्साह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नेहमीच मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडत असलेल्या सिडको, हडको भागातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठीही उत्स्फूर्त मतदान केले. सकाळी सातपासूनच मतदान केंद्रावंर मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन तासांचा टप्पा वगळता सायंकाळी सहापर्यंत मतदान केंद्रांचे चित्र सारखेच होते.

हडको एन १२ येथील महापालिका शाळा, गोदावरी पब्लिक हायस्कूल, बळीराम पाटील हायस्कूल, एन-नऊ महापालिका शाळा, महापालिका शाळा एन-सहा, सोनामाता विद्यालय आदी मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मोठी गर्दी केली होती. या मतदान केंद्रांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये गर्दी होती मात्र दुपारी एक ते तीनदरम्यान मतदानाची प्रक्रिया काहीशी संथ झाली होती. त्यानंतर मात्र पुन्हा मतदारांनी केंद्रांवर गर्दी करून मतदानाचा हक्क बजावला. दुपारी उन्हामुळे आणि मोठ्या गर्दीमुळे काही रांगेत उभे असलेल्या मतदारांनी मतदान न करता घरी जाणे पसंत करत ऊन कमी झाल्यानंतर संध्याकाळी मतदानाचा हक्क बजावला. हडको एन १२, गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये दुपारी तीन वाजताही मतदारांची गर्दी होती.

गर्दीमुळे मतदान केंद्राबाहेर असलेल्या विविध पक्षांच्या मदत केंद्रांवरील कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सिडको, हडको परिसरातील मतदान केंद्रांवर मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदानाचा आढावा घेत होते. दुपारी चारनंतर हडको भागामध्ये विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले व घरोघरी जाऊन मतदान केले काय, असे विचारून मतदान करण्याचे आवाहन करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वराचे मतदान

$
0
0

आधी लग्न कोंढाण्याचे म्हणत लग्नाची वेळ असताना देखील नियोजित वरांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मतदान केंद्रावर नारळीबाग येथील विजय शंकर कसबे या मतदाराने मतदानाचा हक्क बजावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतांचे दान भरभरून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघामध्ये मतदार राजाने मंगळवारी (२३ एप्रिल) स्वयंस्फूर्तीने मताचे भरभरून दान दिले. या मतदारासंघात सरासरी ६१.८७ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. विद्यमान खासदार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेस आघाडीचे सुभाष झांबड, एआयएमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमदेवार हर्षवर्धन जाधव यांच्यासह २३ उमदेवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

औरंगाबाद मध्य, कन्नड आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी सरासरी ६३ टक्के मतदान झाले असून, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वात कमी ५९ टक्के मतदानाचा अंदाज आहे. सर्व मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केल्याने अनेक केंद्रांवर संथ मतदान सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. सकाळी सातपासून मतदान केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागल्या. दुपारी एकनंतर रांगा काही प्रमाणात ओसरल्या मात्र, तोपर्यंत तब्बल ३५.४२ टक्के मतदान झाले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ९ टक्के, ११पर्यंत १८ टक्के, तर दुपारी एकपर्यंत मतदानाची टक्केवारी २८.७१ टक्क्यांपर्यंत पोचली. दुपारी दोननंतर पुन्हा गर्दी झाली. तीनपर्यंत ४६.४ टक्के मतदारांनी, तर सायंकाळी सहापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६१.८७ टक्के मतदान झाले. सकाळी गंगापूर, औरंगाबाद पश्चिम, वैजापूर तालुक्यात तुलनेत मतदानाचा टक्का कमी राहिला. उन्हाचा कडाका आणि संथ प्रक्रियेमुळे औरंगाबाद शहरातील अनेकजण मतदान न करता परतले. 'व्हीव्हीपॅट'मुळे प्रत्येक मतदान करून घेण्यासाठी विलंब होत असल्याचे हडको परिसरातील मतदान केंद्राध्यक्षांनी सांगितले. मध्यवर्ती शहरातलही अनेक मतदान केंद्रांवर संथ मतदान झाले.

\Bसरासरी मतदान\B

औरंगाबाद पूर्व : ५९ टक्के

औरंगाबाद पश्चिम : ६२ टक्के

औरंगाबाद मध्य : ६३ टक्के

कन्नड : ६३ टक्के

गंगापूर : ६३ टक्के

वैजापूर : ६१ टक्के

सरासरी : ६१.८७ टक्के

\B'ईव्हीएम' बंद; डोकेदुखी कायम\B

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही 'ईव्हीएम' बंद पडण्याची डोकेदुखी कायम राहिली. अभिरूप मतदानादरम्यानच २४ बॅलेट युनिट, १७ कंट्रोल युनिट, तर १८ 'व्हीव्हीपॅट' नादुरुस्त झाल्याने बदलण्यात आले. प्रत्यक्ष मतदानात १० बॅलेट युनिट, पाच कंट्रोल युनिट, तर ७ 'व्हीव्हीपॅट'मध्ये बिघाड झाला. त्या बदलून मतदान घेण्यात आले.

\Bशहीदपूरवाडीचा बहिष्कार\B

वैजापूर विधानसभा मतदारसंघातील व गंगापूर तालुक्यातील शहीदपूरवाडी येथील सर्व गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावाला रस्त्याची अनेकदा मागणी केली मात्र, ती पूर्ण होत नसल्याने बहिष्काराचा निर्णय घेतला होता. नागरिकांनी मतदान करावे यासाठी गटविकास अधिकारी, नायब तहसीलदारांनी प्रयत्न केले, मात्र अपयश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो - भाजप प्रदेशाध्यक्ष, जालन्याचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केले मतदान

$
0
0

जालना - भाजपा लोकसभा उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या परिवारासह जालना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. सोबत दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारांपुढे जालन्यात अडचणींचा डोंगर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

बंद पडणारी मतदान यंत्रे व मतदान चिठ्ठ्यांचे वाटप न होणे, या अडचणींवर मात करत जालना लोकसभा मतदारसंघात मतदारांनी मंगळवारी (२३ एप्रिल) उत्साहात मतदान केले. या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व काँग्रेसचे विलास औताडे यांच्यात प्रमुख लढत आहे. या मतदारसंघात सरासरी ६४.४३ टक्के मतदान नोंदवण्यात आले.

'मतदानाच्या प्रारंभीच अभिरूप मतदान प्रक्रियेत २२ केंद्रावर मतदान यंत्रे, २९ बॅलेट युनिट आणि ३० व्हीव्हीपॅट बंद पडल्याने बदलावे लागले. मतदान प्रक्रिया सुरू असताना ८ मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे खराब झाली, ती बदलावी लागली. ११ मतदान केन्द्रावरील व्हीव्हीपॅट बदलावे लागले,' अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. कोणताही अनूचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथे मतदान कक्षात मोबाइल कॅमेऱ्याने छायाचित्र काढल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांनी दिली. जालना शहरातील डॉ. फ्रेझर बॉईज शाळेतील मतदान केंद्रावर अर्धातास उशिरा, बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथे सकाळी नऊ वाजता मतदान सुरू झाल्याची माहिती चंद्रशेखर घन यांनी दिली.

खासदार रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दोघेजण जालना शहरात एकत्र फिरले, तर भास्कर दानवे आणि संजय खोतकर हे एकत्रितपणे सगळ्या मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची चौकशी करताना दिसले. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना, अंबड शहर व तालुक्यात दौरा केला. त्यांच्यासोबत माजी आमदार विलास खरात, हभप वाघ महाराज होते. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील विविध भागात दौरा केला. पैठण, फुलंब्री, बदनापूर व जालना विधानसभा मतदारसंघातील मतदान केद्रावर भेटी दिल्याचे विलास औताडे यांनी सांगितले.

\Bमतदान चिठ्या न मिळल्याने दमछाक \B

कडक उन्हात मतदान केंद्र शोधून यादीतील नाव आणि क्रमांक पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत जालना लोकसभा मतदारसंघातील मतदान झाले. जालना शहरातील मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप झाले नसल्याने सगळ्या मतदान केंद्राबाहेर मतदान मदत कक्षात 'बीएओ' बसले होते. मतदार त्यांना शोधत मतदान चिठ्ठ्या घेत होते. एकंदर सगळ्या मतदार केंद्राबाहेर हा गोंधळ संपूर्ण दिवसभर चालू होता. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवरून मतदान चिठ्ठ्या न मिळालेल्या मतदारांना त्यांचे नाव, क्रमांक आणि केंद्र शोधण्यासाठी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संथ मतदानामुळे प्रशासनाची डोकेदुखी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर 'ईव्हीएम'सह व्होटर व्हेरिफियेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) लावण्यात आल्यामुळे ९०पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया संथ झाली. या प्रकारामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेले अनेक मतदारांनी मतदान न करता घरी निघून गेले. संथ मतदानाच्या तक्रारी प्रशसनापर्यंत पोचल्यामुळे मतदान प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासनाने मतदान केंद्रांवर तत्काळ ९० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक पाठवून प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

औरंगाबाद मतदारसंघात २०२१ मतदान केंद्रांवर २४४५ कंट्रोल युनिट, ४९३० बॅलेट युनिट तर, २६२२ व्हीव्हीपॅट मशीनची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला, मतदान केल्यानंतर मतदाराने कुणाला मतदान केले त्या उमेदवाराचे नाव, निवडणुक चिन्ह, बॅलेट युनिटवरील उमेदवाराचा क्रमांक आदी बाबी व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीवर प्रिंट होऊन येतात व ही प्रिंट झालेली चिठ्ठी मशीनमध्ये पडण्यापूर्वी मतदाराला व्हीव्हीपॅट मशीनवरील स्क्रीनवर सात सेकंदापर्यंत दिसते. त्यानंतर स्क्रीन बंद होऊन मतदान पूर्ण होते. त्यानंतर ईव्हीएम मशीनला नवीन मतदानासाठी तयार करणे व व्हीव्हीपॅटसाठी लागणारा वेळ यामुळे प्रत्येक मतदानाला किमान १५ सेकंदाचा वेळ लागत होता. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया संथपणे सुरू होती. मतदारांची संख्या जास्त असलेल्या मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना अडचणींना समोरे जावे लागत होते. या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर संथपणे मतदान होत असलेल्या प्रत्येक केंद्रांवर तत्काळ एक अतिरिक्त कर्मचारी पाठवण्यात आला. यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.

'व्हीव्हीपॅट'मधील चिठ्ठीला लागणारा वेळ सात सेकंद असला तरी एकूणच एका मतदानासाठी लागणारा वेळ हा १५ सेकंदाचा होता. त्यामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला. अशा अडचणी आल्या तेथे तत्काळ मनुष्यबळ वाढवण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली.

- उदय चौधरी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रणरणत्या उन्हात मतदानासाठी रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रणरणत्या उन्हाची तमा न बा‌ळता अधिकाधिक नागरिकांसह महिला व वृद्धांनी रांगा लावून मोठ्या उत्साहात मतदान केल्याचे चित्र ग्रामीण भागात प्रकर्षाने दिसून आले. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असली तरी भर दुपारीही मतदान करण्यासाठी रांगा दिसून येत होत्या. अनेक केंद्रांच्या बाहेर मंडप टाकण्यात आले होते, तर बहुतेक केंद्रांवर पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध केल्याचेही दिसून आले. कडेकोट बंदोबस्तात शांततेत मतदान सुरू असल्याचे सार्वत्रिक चित्र होते.

लोकसभेसाठी मंगळवारी सकाळी सातपासूनच मतदानाला सुरुवात झाली. काही अपवाद वगळता शहरासह ग्रामीण भागातही अगदी सातपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मतदानाचा उत्साह यंदाही नक्कीच दिसून येत होता. त्यामुळेच शहरासह ग्रामीण भागात व तालुक्यांमध्ये सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. महिलांचे प्रमाणही उल्लेखनीय असेच होते. त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळींचीही मतदानासाठी लगबग दिसून येत होती. नातवंडांचा किंवा मुलाचा किंवा सुनेचा हात पकडून मतदानासाठी येणारे वृद्ध ग्रामीण भागातही जागोजागी दिसून येत होते. सूर्य डोक्यावर येऊ लागला तशी उन्हाची काहिली वाढत गेली, चटके वाढत गेले; परंतु मतदानासाठीचा उत्साह ना कमी झाला ना रांगा कमी झाल्या. ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत उन्हाचे चटके जास्त जाणवत असतानाही तीव्र तापमानावर मात करीत मतदार आणि त्यातही महिला मतदार आपल्या लेकरा-बाळांना सोबत आणून मतदान करताना दिसून येत होते. अर्थात, दुपारी एकनंतर गर्दी थोडी ओसरल्याचे चित्र होते. त्यातच काही केंद्रांमध्ये भारनियमनामुळे दिवसा उजेडी अंधार होता; परंतु तरीही मतदानाची प्रक्रिया सुरुच होती. माध्यमांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर येताच त्यांना ओळखपत्र किंवा मतदानानंतर बोटाची शाई दाखवत ग्रामीण मतदारही फोटोसाठी सहजच पोझ घेताना दिसून येत होते, तर काही तरुण मतदार आपणही फोटोत किंवा व्हिडिओ शुटमध्ये ठळकपणे दिसून यावे, यासाठी खास खटाटोप करताना दिसून येत होते. नवमतदारांचा उत्साह तर काही वेगळाच होता.

\Bओळखपत्राविना मतदानाचा आटापिटा

\Bओळखपत्राशिवाय केवळ पोलचिटवर मतदान करू द्यावे, म्हणून एका माजी सैनिकाचा आटापिटा सुरू असल्याचे पडेगावच्या मतदान केंद्रावर दिसून आले. स्वत: माजी सैनिक असल्याचे सांगत पोलचिटच्या आधारे मतदान का करू दिले जात नाही, असा सवाल उपस्थित करीत, पोलचिट ही काय अधिकृत कागपत्रांशिवाय तयार केली जाते काय, असाही प्रश्न संबंधित माजी जवानाकडून उपस्थित केला जात होता.

\Bमतदानानंतर दिले रस्त्यात सोडून

\Bमतदान करुन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी घरातून गाडीमध्ये आणले; परंतु मतदान होताच चक्क केंद्राच्या परिसरात सोडून देण्यात आल्याची तक्रार करत एक ज्येष्ठ मतदार भर उन्हात फत्कल मारुन बसला होता. आता मी घरी कसे जाऊ, असे म्हणत हा ज्येष्ठ मतदार तक्रारीचा सूर आ‌ळवत होता. अर्थातच, त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नव्हता, असेही दिसून आले.

\Bमहिलांचे वेधक सक्षम मतदार केंद्र

\Bवेरुळचे सक्षम मतदान केंद्र हे वेधक ठरले ते केवळ महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांमु‌ळे. हे केंद्र पूर्णपणे महिलांकडून नियंत्रित केले जात होते आणि तेही कुठल्याही अडचणींशिवाय, हे विशेष. या केंद्रावर महिलांचा उत्तसाह वाखाणण्यासारखाच होता. पूर्ण क्षमतेने जबाबदारी निभावताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व कर्तव्यपूर्तीचे आगळे समाधानही दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिलं मतदान लोकशाहीच्या नावानं!

$
0
0

विजय देऊळगावकर/अर्पिता शरद

Vijay.Dulagaonkar@timesgroup.com

Arpita.Sharad@timesgroup.com

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. त्यानंतर स्वत:चे बोट समोर धरून काढलेला सेल्फी व्हॉटस् अॅप आणि फेसबुकवर 'डीपी' म्हणूनही मोठ्या गर्वाने डकवला.

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुका. यासाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांमध्ये मोठा उत्साह होता. अनेक मतदान केंद्रावर सकाळी आठपासून तरुणांची गर्दी होती. औरंगपुरा, सिडको, हडको, गारखेडा येथे सकाळपासून युवकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. या तरुणांशी 'मटा'ने संवाद साधला. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया आशादायी होत्या. सर्वात प्रभावी व्यवस्था म्हणजे लोकशाही. सर्वांना सामावून घेत ती तुम्हाला सुखाने जगायला शिकवते. सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता देते. त्यामुळे आम्ही आमचे पहिले मत आज दिले, अशी प्रतिक्रिया यावेळी युवकांनी व्यक्त केली. शहरातील रस्ते, पाणी, कचरा या समस्यांवरही युवकांनी बोट ठेवले. आम्हाला माहिती आहे की, खासदार आणि आमदारांचे कोणते विषय आहेत. मात्र, या समस्यांचे प्रतिबिंबही प्रत्येक निवडणुकीत उमटणार. ते उमटले तर गैर काय, असा रोकडा सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे मतदानानंतर अनेकांनी ग्रुपसह मतदान केंद्राबाहेर सेल्फीही टिपला. राज्यभर ठिकठिकाणी मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट ठेवण्यात आले आहेत. मात्र, औरंगाबादमध्ये बहुतांश मतदान केंद्रावर असे सेल्फी पॉइंट नव्हते. त्याबद्दल युवकांनी आपली नाराजी व्यक्त केली. मतदानाचा प्रचार आणि प्रसारासाठी नवतंत्रज्ञानाचा लाभ घेतला तर, बिघडले कुठे असा सवाल त्यांनी केला.

मतदानासाठी मी माझ्या कुटुंबासह आले होते. पहिले मतदान असल्यामुळे माझ्या आणि माझ्या मित्रांच्या मनातही खूप उत्सुकता होती. उच्चशिक्षण, रोजगार, पर्यावरण संवर्धन यावर भर देणारा खासदार हवा.

- निशी बडजाते

पहिले मतदान करताना मला उत्साह होता. खूप विचारपूर्वक मी माझे मत दिले. औरंगाबादमध्ये रोजागाराची गरज आहे. कोणालाही आपले गाव फक्त नोकरीसाठी सोडावे लागू नये. पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. तो सुटावा.

- सय्यद कमरानउल्लाह

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. खूप वेगळे वाटत होते. देशासाठी काहीतरी करतोय अशी भावना माझ्या मनात होती. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माझे पहिल मत होते.

- स्वप्नील बनसोडे

यंदा माझे पहिले मतदान असल्याने मनात खूप उत्सुकता होती. आपण जबाबदार नागरिक झालो, ही भावनाही होती. माझे पहिले मत हे देशाची सुरक्षा आणि विकासासाठी होते, असे मनापासून सगळ्यांना सांगावे वाटते.

- राहुल जाधव

आपले पहिले मत आहे, ही जाणीवच काहीतरी वेगळी होती. त्याचा अनुभव आज घेता आला. उमेदवाराने आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी, विकासासाठी काम करावे या अनुषंगाने मी माझे पहिले मतदान केले.

- ओंकार कुलकर्णी

माझे पहिले मत मी केले. माझ्या अनेक मित्रांनी केले. हे मतदान करताना आपल्यावर काहीतरी जबाबदारी आहे, येऊन पडली आहे, याची जाणीव मनापासून होत होती. त्यानुसार योग्य उमेदवाला पसंती दिली.

- सुभाष बोडखे

मी आज पहिले मतदान करून प्रथम भारतीय असल्याचा हक्क बजावला. आजचे मतदान करून समाधान वाटले. एक नवीन सरकार स्थापन करण्यासाठी माझे या वेळेचे पहिले मतदान असेल, हे नक्की.

- चिन्मय कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांची बाचाबाची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

किरकोळ कारणांवरून सिडको एन परिसरातील मतदार केंद्राबाहेर विरोधी गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. तर सायंकाळी सहा वाजेनंतर केंद्रावर आलेल्या मतदारांना मतदानांची संधी द्या, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी केंद्रासमोर गर्दी केल्याची घटना किराडपुरा परिसरातील मनपा ऊर्द शाळा येथील केंद्रावर घडली. त्यावर पोलिसांनी नियमावर बोट ठेवत युवा कार्यकर्त्यांना समजावून बाहेर जाण्यास सांगितले.

सिडको एन सात परिसरातील रमाबाई आंबेडकर शाळा व त्याशेजारील महापालिका प्रशाळा या केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची चांगली रिघ लागली होती. केंद्राबाहेर इतर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना भाजप रिपाइं महायुती तसेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष असू द्या, अशी विनंती येणाऱ्या प्रत्येक मतदारांना या दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. दुपारपर्यंत सर्व काही सुरळीत असतानाच धक्का लागला या किरकोळ कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये वादवादी झाली. त्याचे पर्यावर्सन धक्काबुक्कीपर्यंत जाण्याची चिन्ह निर्माण झाले तोच काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी युवा कार्यकर्त्यांची समजूत घातल्याने हा वाद काही मिनिटातच शमला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेटशेडने दिलासा; पाणी नसल्याने कासावीस

$
0
0

सातारा जिल्हा परिषद शाळेतील स्थिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात टाकलेल्या नेटशेडमुळे मतदारांना दिलासा दिला. त्यांची तळपत्या उन्हातून त्यांची थोड्या वेळासाठी सुटका झाली. मात्र, या मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले मतदार तहानेने कासावीस झाले.

सातारा येथील जिल्हा परिषद शाळेत सहा मतदान केंद्र होते. या मतदान केंद्राच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शंभर मिटरच्या क्षेत्रात मतदाराशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शंभर मीटर क्षेत्राबाहेर मात्र प्रमुख चार उमेदवारांचे शामियाने टाकले होते. तेथे राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांनी सुद्धा उन्हापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतला. शाळेच्या पुढाकाराने शाळेच्या आवारात टाकलेल्या नेटशेडमुळे सावली राहिली; मतदार येथे काही वेळ विसावले. या मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळपासूनच लागलेली रांग दुपारपर्यंत कायम होती, असे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसाने सांगितले. दीड ते दोन तास मतदारांना रांगेत उभे रहावे लागत होते.

\Bकार्यकर्त्यांना आचारसंहितेची धास्ती \B

मतदान कर्मचाऱ्यांनी स्वत:बरोबर पाणी आणले होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांकडे ते पाण्याची मागणी करीत होते, पण आचारसंहितेच्या बडग्यामुळे कार्यकर्ते देखील पाणी देण्याबद्दल असमर्थता दाखवत होते. आम्ही पाणी दिले, तर मतदारांना आमीष दाखवल्या सारखे होईल, असे कार्यकर्ते बोलत होते.

\Bदेवळाईचा मतदार साताऱ्यात \B

बाबूराव शेळके हे देवळाई गावात रहातात. त्यांना 'बीएलओ'मार्फथ पोलचिट मिळाली. देवळाईचे रहिवासी असल्याने देवळाईच्या मतदान केंद्रावर नाव असल्याच्या अंपेक्षेने ते मतदान केंद्रात गेले. पण सातारा येथील मतदान केंद्रात नाव असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना सातारा येथील जिल्हा परिषद शाळेत यावे लागले. त्यांच्यासोबत त्यांची दोन लहान मुले होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वमध्ये मतदारांचा उत्साह शिगेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत औरंगाबाद शहरातील पूर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर उत्साह पहायला मिळाला. सकाळपासून नागरिकांच्या रांगा होत्या. ज्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सकाळी काही केंद्रावर उशिराने मतदान यंत्र सुरू होण्याच्या घटना वगळता मतदानात अडथळे आले नाहीत. नावे शोधण्यासाठी केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांकडे धांदल उडाली. अडचणी अनेक आल्या तरीदेखील मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला.

सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हामुळे नागरिक सकाळीच मतदान करण्यास बाहेर पडले. नूर ए अजीज उर्दू हायस्कूल येथे सकाळपासून रांगा पहायला मिळाल्या. किराडपुरा भागातील महापालिका शाळेतील केंद्रावर रांगा होत्या. यावेळी काहिंनी मतदान यंत्राचे बटन उशिराने दबत असल्याचे सांगितले. राम मंदिरातील बीएसएनएल ऑफीस मतदान केंद्र, परमवीर अब्दुल हमीद सांस्कृतिक सभागृहात दोन्ही केंद्रावर रांगा पहायला मिळाल्या. किराडपुऱ्यातील महापालिका माध्यमिक शाळा उर्दू-१ केंद्रावर रांगा होत्या, परंतु मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. अनेकांची नावे शोधण्यात वेळ गेला तर काहींकडे मतदान ओळखपत्र नव्हते किंवा घरी विसरल्यामुळे पुन्हा परत जाऊन ओळखपत्र घेऊन आल्यानंतर काहिंनी मतदान केले. मनपा पशु चिकित्सालय केंद्रावरही मतदान यंत्राबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. बायजीपुरा वर्कशॉप, जकातनाका मध्यवर्ती केंद्रावर उशिराने मतदान होत असल्याचे मतदारांनी सांगितले. तास तासभर ताटकळत उभे राहण्याची वेळ नागरिकांवर आली. सर सय्यद मराठी-उर्दू प्राथमिक शाळा केंद्रावर मतदानाला अर्धातास उशीर झाल्याचे मतदारांनी सांगितले. इंदिरानगर परिसरातील महापालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळा केंद्रावर मोठ्या रांगा होत्या. मात्र, मतदानाची गती अतिशय संथ होती. त्यामुळे वयोवृद्ध, महिलांचे हाल झाले. त्यासह आपल्या पालकांसोबत आलेल्या बालकांचे हाल झाले.

पाण्याची अपुरी व्यवस्था

अनेक ठिकाणी पाण्याची पुरेशी व्यवस्था नव्हती. उनं जसे जसे तापत होते तसतसे रांगांमधील चलबिचल वाढली. काही केंद्रावर मतदान केंद्रावरील मतदान केल्यानंतर यंत्राचा आवाज येत नसल्याचे काहिंनी सांगितले. क्लोवर डेल स्कूल केंद्रावर मतदान यंत्र सुरू होण्यास विलंब झाल्याने अर्धातास उशिराने प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात आले. यशवंत हायस्कूल, डॉ. वाय. एस. खेडकर, राजे संभाजी हायस्कूल, मनपा वाचनालय, सुधाकर नाईक माध्यमिक शाळा, राजचंद्र नाईक विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालयातही मतदारांच्या रांगा होत्या. अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना फार वेळ ताटकळत उभे रहावे लागले.

उन्हामुळे मतदारांचे हाल

वाढत्या उन्हामुळे मतदारांचे हाल होत आहेत. अनेक केंद्रावर उभारण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने, टेंट नसल्याने मतदानकेंद्र लगतच्या भिंतीला आडोसा करत थांबत आहेत, उन्हापासून संरक्षणासाठी पेंडॉलची व्यवस्था करण्याची मागणीही नागरिकांनी केली. यात सर्वाधिक अडचण महिला मतदारांची झाली. दिव्यांग, वयोवृद्ध यांना मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनिही मदतीचा हात दिला. अनेक मतदान केंद्रावर हिरकणी कक्ष, हेल्प डेस्कही होते. मात्र, अनेकांना त्याची कल्पना नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलच्या टॉर्चमध्ये नावे शोधण्याची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अनेक मतदान केंद्रावर सोयीसुविधांचा बोजवारा उडालेला दिसला. सर सय्यद मराठी, उर्दू शाळेतील एका केंद्रावर चक्क मोबाईलच्या टॉर्चमध्ये मतदाराचे यादीतील नाव, भाग क्रमांक तपासणीची वेळ मतदान कर्मचाऱ्याला करावी लागली.

शहरातील पूर्व विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून नागरिकांच्या रांगा होत्या. नागरिकांच्या रांगा असताना पुरेशा सोयीसुविधा केंद्रावर उपलब्ध नव्हत्या. अनेक मतदान केंद्रावर अंधार असल्याने चक्क दिवसा बल्ब लावण्याची वेळ आली. जकातनाका परिसरातील सर सय्यद मराठी-उर्दू प्राथमिक शाळेत दोन मतदान केंद्र होती. तेथे मध्ये विद्युत दिवे असतानाही अंधार पडला. त्यामुळे मोबाईलच्या टॉर्च लावत मतदान कर्मचारी आलेल्या उमेदवारांकडे असलेली पोलचीट संबंधित उमेदवाराचीच आहे की, नाही याची खात्री करत होते. धर्मवीर संभाजी विद्यालयातही लाईट लावण्याची वेळ आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग मतदारांना रिक्षांचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिव्यांग, अपंग, वृद्धांना मतदान केंद्रावर जाण्या-येण्यासाठी निवडणूक विभागाने ३०० रिक्षांची सोय केली. त्याचा लाभ सुमारे साडेचार हजारांवर मतदारांनी केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर दिव्यांग, अपंग आणि वृद्धांसाठी एक हजार रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेत प्रत्येक केंद्रावर सकाळी साडेआठपासून ते सायंकाळी सहापर्यंत या रिक्षा मतदान केंद्रावर उभ्या होत्या. सकाळी मतदान केंद्रावर आलेल्या रिक्षा चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक ड्यूटीवर येताच, मतदान केंद्र प्रमुखांची सही घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मतदान केंद्रावर आलेल्या रिक्षा चालकांना काही केंद्र प्रमुखांनी सही देण्यास नकार दिला, मात्र समजावून सांगितल्यावर त्यांनी निवडणूक प्रक्रियेला हजर होण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया संपल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर सही केली. या केंद्रावर आलेल्या रिक्षा चालकांना हेल्पलाइनवरून खूप कमी कॉल आले, मात्र अनेक प्रतिनिधींनी विनंती केल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक, अपंगांना त्यांच्या घरापर्यंत सोडले. सुमारे साडेचार हजारांवर मतदारांनी या रिक्षाच्या सुविधेचा लाभ घेतला.

\B'हेल्पलाइन'चा वापर नाही\B

शहरातील मतदान केंद्रावर लावण्यात आले. १९५० या हेल्पलाइनवर कॉल केल्यानंतर संबधित मतदान केंद्राप्रमुखांकडून संबंधित माहिती रिक्षा चालकांकडे पाठविण्यात येणार होते. अनेक मतदान केंद्रावर थांबलेल्या रिक्षा चालकांना हेल्पलाइनच्या माध्यमातून एकही संदेश मिळाला नाही, असे रिक्षा चालकांनी सांगितले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिटमिट्यात सुमारे ६० टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

औरंगाबाद पश्चिम मतदार संघात समावेश असलेल्या मिटमिटा येथील मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (२३ एप्रिल) सुमारे ६० टक्के मतदारांनी हक्क बजावला.

मिटमिटा येथील केंद्रीय प्राथमिक महानगरपालिका शाळेच्या बुथवर (क्रमांक १३४) ४६८ पुरूष व ३२८ महिला मतदारांनी मत नोंदवले. बुथ क्रमांक १३५वर ४७८ पुरूष व ३८४ महिला, बुथ क्रमांक १३६वर ३१२ पुरूष, ४३९ महिला, बुथ क्रमांक १३७ ए वर २७४ पुरूष, २४४ महिला, १३७ क्रमांकाच्या बुथवर २८० पुरूष व १८० महिलांनी मतदान नोंदवले. एकूण ५२८२ मतदारांपैकी ३३८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या मतदान केंद्रावर अपंगांसाठी उत्कृष्ट प्रकारे नियोजन करण्यात आले. परंतु, मतदारांना रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठेही दिसून आली नाही. अपंगांसाठी व्हीलचेअर आणि रॅम्प ही व्यवस्था करण्यात आली होती. बुथपासून शंभर मीटरच्या वाहने पार्क केली जात होती, पण ती हटवण्यासाठी पुरेसे पोलिस नव्हते. वाहने व इतरांच्या गर्दीमुळे मतदारांना मतदान केंद्र परिसरात प्रवेश करण्यात अडचणी निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर, जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी उत्साहात आणि शांततेत पार पडले. कोणतीही अनुचित घटना या काळात घडली नाही. शहर पोलिस दल आणि ग्रामिण पोलिस दलाने सुनियोजित पद्धतीने आखलेला बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया सुरळित पार पडली. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर २८ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली होती. जिल्ह्यात एकूण २०१२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार होती. यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत झाल्यामुळे पोलिसांवरील ताण देखील वाढला होता. दैनंदिन कामासोबतच निवडणुकीचे काम करणे आव्हानात्मक असले तरी, शहर आणि ग्रामीण पोलिस दलाने हे आव्हान लिलया पेलले. प्रचाराची रणधुमाळी, व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सभा, प्रचार फेऱ्या, रोड शो, अवैध धंद्यावर अंकुश ठेवणे, समाजकंटकावर कारवाई करणे आदी कामांचा व्याप पोलिसांवर वाढला होता. मंगळवारी लोकसभा निवडणुकीची महत्त्वाची मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी दोन्ही दलांचा मिळून नऊ हजारांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त बंदोबस्तामध्ये बाहेरील राज्ये आणि जिल्ह्यातील पोलिसांचा समावेश होता. या सर्वांच्या राहण्याची, भोजनाची चोख व्यवस्था मंगळवारी करण्यात आली होती. शहरात मतदानादरम्यान किरकोळ प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शहागंज येथील एका मतदान केंद्रावर 'बोगस' मतदान केल्याच्या संशयावरून एका मतदाराला ताब्यात घेण्यात आले होते, मात्र पडताळणीमध्ये तथ्य आढळले नसल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सिटीचौक येथील एका शाळेतील मतदान केंद्रामध्ये वेळ वाढवण्यावरून मतदार आणि पोलिसांत किरकोळ वाद झाला. जिल्ह्यात देखील कोणत्याही तालुक्यात मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मतदान केंद्रात भगवा शर्ट घालून आलेल्या एका नागरिकाला बाहेर काढून त्याच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली. पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कोणतीही अनुचीत घटना जिल्ह्यात घडली नाही.

- मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण

शहरात देखील मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. मतदारांनी निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पाडली. एका अज्ञात व्यक्तीने टिकटॉक अॅप, सोशल मीडियावर मतदानाचा व्हिडियो अपलोड केला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो - भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

$
0
0

औरंगाबाद - भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी मुलीसह औरंगाबादमधल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिंग चिटचे वाटप न झाल्याने गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मतदानयंत्र बंद पडण्याच्या घटना, पोलिंग चिट न आल्याने, मतदान कुठे करावे? अशा बुचकळ्यात मतदार, असे अडथळे पार करीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला.

लोकसभा निवडणुकीत एक खासदाराच्या विरोधात तीन आमदार निवडणूक रिंगणात आहे. यामुळे लढत चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे होती. मंगळवारी (२३ एप्रिल) रोजी सकाळी सातपासून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात भोईवाडा, भीमनगर भावसिंगपुरा, विवेकानंद कॉलेज येथील मतदान केंद्रांसह या भागातील अन्य मतदान केंद्रात मतदान प्रक्रियेला सुरवात करण्यात आली. शहरातील देवगिरी हायस्कूल, पैठण गेट, नागेश्वरवाडी, खोकडपुरा, सिटी क्लब, मौलाना आझाद हायस्कूलसह अनेक भागांत केंद्रांवर सकाळी सातपासूनच मतदारांची लगबग दिसत होती. सकाळी आठनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात अनेक मतदारांना पोलिंग चिट मिळाली नसल्याची तक्रार समोर आली. मतदान केंद्रावर असलेल्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशा मतदारांना 'एनव्हीएसपी'च्या वेबसाइटवरून त्यांची पोलिंग चिट उपलब्ध करून दिल्या.

शहरातील अनेक मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी बनावट मतदारांवरून वादावादी झाली मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले. मतदान केंद्रावर आलेल्या वृद्ध आणि अपंग मतदारांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यचा अनेकांना आधार मिळाला. सकाळच्या सत्रात चांगले मतदान औरंगाबाद मध्य मध्ये नोंदविण्यात आले. मात्र दुपारी काही प्रमाणात मतदारांची संख्या कमी झाल्याने मतदान प्रक्रियेत संथ गतीने चालली. मात्र तीन वाजेनंतर मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. शहरातील अनेक भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

रुग्णवाहिकेतून गाठले मतदान केंद्र

शहरातील नॅशनल कॉलनी भागात राहणारे अमान खान दिलदार खान (५५) यांना सोमवारी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मतदानाचा हक्क बजविण्याचा आग्रह त्यांनी केला. डॉक्टरांनी परवानगी दिली व हॉस्पिटलमघून त्यांना नाबार्डच्या कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्या मतदान केंद्रात स्ट्रेचरवरून नेण्यात आले.

अनेक केंद्रावर मतदान उशिरा सुरू

शहरातील अनेक मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणे आवश्यक होते. अनेक मतदान केंद्रावर ही प्रक्रिया १५ मिनिटे ते अर्धा तास उशिरा सुरू झाल्याचा आरोप काही भागांमध्ये करण्यात आला.

दोन ओळखपत्रे असतानाही यादीतून नाव गायब

शहरात अनेक भागात मतदार ओळखपत्र असतानाही यादीत नाव नसल्याची अनेक प्रकरणे समोर आली. बारुदगर नाला येथील मतदान केंद्रावरील काही मतदारांचा समावेश होता. महापालिकेच्या इमारत टप्पा क्रमांक तीन येथे मतदान टाकण्यासाठी शेख मुश्ताक आले होते. त्यांनी स्वत: जवळील दोन मतदार ओळखपत्रे, आधार कार्डही दाखविले. तरीही त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचे सांगण्यात आले.

……

मतदान यंत्रे पडली बंद

शहरातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. देवगिरी हायस्कूल येथे सकाळी १६ मतदारांचे मतदान झाल्यानंतर मशीन बंद पडली. १५ मिनिटांनंतर मशीन दुरुस्त करण्यात आली. दरम्यानच्या काळात नवीन मशीन बसवून मतदान घेण्यात आले. याशिवाय बारुदगर नाला भागातील तलत हायस्कूल येथे ११च्या सुमारास मतदानयंत्र बंद पडले. यामुळे जवळपास एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. सर सय्यद हॉल येथेही १५ मिनिटांसाठी मतदान यंत्र बंद पडल्याची माहिती मतदारांनी दिली.

………

त्यांना मतदानाची परवानगी द्या

सिटीचौक बुऱ्हाणी नॅशनल हायस्कूल येथे सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर तेथे काही तरूण आले. मतदार ५०० मीटर सीमेच्या आत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केंद्र प्रमुखांनी,हा नियम मतदान केंद्रात असलेल्या मतदारांसाठी लागू असल्याचे स्पष्ट केले. यावरून युवक आणि केंद्र प्रमुखांमध्ये वाद झाला. परिस्थिती बिघडू नये म्हणून तेते अतिरिक्त पोलिस दल पाचारण केले. पोलिस दल पोचण्यापूर्वीच हे तरूण मतदान केंद्र सोडून निघून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वत्र मतदारांच्या उत्स्फूर्त रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद मध्य मतदारसंघात काही मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा कायम होत्या. या केंद्रांत मतदार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी दाखल झाले होते. मतदारांनी उत्स्फूर्तपणे सकाळी मतदान केंद्र गाठले. मध्य मतदारसंघात उमेदवार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील यांनी मतदानाचा हक्क बजावला. काही केंद्रांवरील किरकोळ आक्षेप वगळता मतदान सुरळीत पार पडले.

मध्य विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी ११पर्यंत २०.३४ टक्के मतदान झाले होते. दुपारी तीनपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाले तर, सायंकाळी सहापर्यंत ही टक्केवारी ६३ टक्क्यांवर पोचली. जिल्हा परिषद मतदान केंद्रावर मतदारांच्या सकाळीच रांगा लागल्या होत्या. दुपारचा अपवाद वगळता सायंकाळपर्यंत रांगा कायम राहिल्या. टाउन हॉल परिसरातील तीन मतदान केंद्रांवर सर्वाधिक गर्दी झाली. मतदार क्रमांक जाणून घेण्यासाठी जास्त गर्दी झाली. काही मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे गोंधळ उडाला. बेगमपुरा येथील ज्ञानेश्वर हायस्कूल केंद्रावर मतदारांची गर्दी होती. भोईवाडा महापालिका शाळा, खडकेश्वर महापालिका वाचनालय, लिटिल फ्लॉवर हायस्कूल, विद्यापीठ या केंद्रावरही मतदारांच्या रांगा दिसल्या. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. केंद्र परिसरात फिरण्यास मज्जाव करण्यात आला होता. मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या. संबंधित मतदान केंद्रात नाव नसल्यास परिसरातील केंद्रावर नाव तपासण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली मात्र, त्यानंतरही काही मतदारांना मतदान करता आले नाही.

\Bखैरे यांच्या मतदानात अडथळा\B

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी कुटुंबासह जिल्हा परिषद मतदान केंद्रात सकाळी साडेनऊ वाजता मतदान केले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, माजी नगरसेवक गोपाल कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खैरे मतदान केंद्रात गेल्यानंतर ऐनवेळी मतदान यंत्र बंद पडले. या अडथळ्यामुळे खैरे यांना काही वेळ थांबावे लागले. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर खैरे यांनी मतदान केले. जनतेने नेहमीच पाठबळ दिले असून, शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे खैरे यांनी पत्रकारांना सांगितले.

\Bज्येष्ठांना सुविधा\B

मतदान केंद्रांवर वृद्ध, आजारी व्यक्तींसाठी विशेष सुविधा देण्यात आली होती. व्हीलचेअरवरून ज्येष्ठ नागरिकांना थेट मतदान कक्षात नेण्यात आले. रिक्षा आणि खासगी वाहने दरवाज्यापर्यंत नेण्याची परवानगी देण्यात आली होती. सकाळच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. काही जणांनी सायंकाळी मतदान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिष्कारास्त्र मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीमुळे बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेल्या कांचनवाडी येथील नागरिकांनी बहिष्काराचे अस्त्र अखेर मागे घेतले. त्यामुळे कांचनवाडी-नक्षत्रवाडी भागातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदवला. या दोन्ही ठिकाणच्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसल्या.

कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्प कांचनवाडी येथे सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परंतु, या प्रकल्पाच्या उभारणीचे काम फारच धिम्यागतीने सुरू असल्यामुळे व या परिसरात कचरा साचल्यामुळे कांचनवाडी-नक्षत्रवाडी भागातील नागरिकांनी १५ दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी याबद्दलचे पत्र जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यामुळे या भागातील नागरिक मतदान करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. दोन्ही गावात मिळून सुमारे २८०० मतदान आहे. मात्र, अखेर मतदानाच्या दिवशी मंगळवारी (२३ एप्रिल) मतदारांनी बहिष्कारचा निर्णय मागे घेत भरभरून मतदान केले.

कांचनवाडी-नक्षत्रवाडी येथे मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता. दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या शाळेत मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. बहुतेक सर्व मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. कांचनवाडी येथील शाळाचे आवार व इमारत तुलनेने लहान असल्यामुळे मतदारांना उन्हात रांगेत उभे रहावे लागले. हे लक्षात आल्यानंतर शाळेच्या आवारात शासकीय यंत्रणेकडून शामियाना उभारण्यात आला. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. नक्षत्रवाडी येथील महापालिकेची शाळा 'आयएसओ' मानांकनप्राप्त आहे. त्यामुळे या शाळेत आवश्यक त्या सुविधा असल्याने मतदारांना उन्हाचा सामना करावा लागला नाही.

\Bतीन महिन्यांत गॅस प्रकल्प \B

या संदर्भात जनार्दन कांबळे म्हणाले, कचऱ्याचा आम्हाला त्रास आहेच, त्यामुळे सर्वांनी बहिष्काराचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या गावात येऊन नागरिकांशी चर्चा केली आणि तीन महिन्यांत प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे आम्ही बहिष्कारचा निर्णय मागे घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images