Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

निवडणुकीसाठी १४ कोटी खर्च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीपूर्वी उमेदवार खर्चाची आकडेमोड करत असताना आता निवडणुकीनंतर निवडणुकीवर नेमका खर्च किती झाला यावर प्रशासन आकडेमोड करत आहे. आतापर्यंत औरंगाबाद मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी यांनी व्यक्त केला. अद्याप संपूर्ण गोळाबेरीज झाली नसल्याने या खर्चात वाढ होण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघामध्ये २०२१ मतदान केंद्रे होती. प्रत्येक मतदान केंद्रासाठी सुमारे ३६ हजार रुपये खर्च करण्यात आला, यासह स्टेशनरी, वाहतूक, सुरक्षाव्यवस्था, निवडणूक कर्मचारी भत्ता, प्रशिक्षण, भोजन व्यवस्था, पाणी यासह इतर बाबींसाठी १४ कोटी रुपयांचा आतापर्यंत खर्च झाल्याचा अंदाज आहे. अद्याप मतमोजणीची प्रक्रिया शिल्लक असल्यामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी कर्तव्य बजावत असलेल्या जवळपास सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण एक कोटी ४४ लाख ३७ हजार ३०० रुपये अनुदान जमा करण्यात आले असल्याचेही यावेळी श्रींगी यांनी सांगितले.

मतदान संपताच,'आम्हाला मानधन मिळाले नाही, आम्ही आंदोलन करणार,' अशी भूमिका काही शिक्षक संघटनांनी घेतली होती. प्रत्यक्षात अनेक कर्मचाऱ्यांच्या बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफसी कोड यांसंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे मानधन जमा करण्यासाठी उशीर झाला. लवकरच कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी; तसेच अंगणवाडी सेविकांना अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. यासह वृद्ध, अपंग मतदारांच्या सोईसाठी त्यांना घरापासून मतदान केद्रांपर्यंत; तसेच मतदान केंद्रापासून घरापर्यंत रिक्षाची सोय करण्यात आली होती. अशा २८९ रिक्षाचालकांनाही एक हजार रुपये प्रतिरिक्षा भत्ता देण्यात येणार आहे.

...तर कारवाई

अनेक मतदान केंद्रांवर निवडणुकीच्या दिवशी मतदारांना सोई सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. यासंदर्भात निवडणूक उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी म्हणाले की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पाणी, सावलीसाठी टेन्ट, अपंगांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. तशा संबंधितांना सूचनाही देण्यात आल्या होत्या मात्र, यामध्ये कंत्राटदार किंवा संबंधितांनी कामचुकारपणा केला असेल व त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर, निश्चित कारवाई केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ वसतिगृहात दूषित पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थी वसतिगृहात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे अनेक मुली आजारी पडल्या आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कुलगुरुंना निवेदन देण्यात आले.

विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहात दूषित व अस्वच्छ पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे अनेक मुलींना जुलाब व उलटीचा त्रास होऊन त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थिनींना दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वसतिगृहातील पाणीपुरवठ्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून वाचनालयातील पाणीप्रश्नही जैसे थे आहे. बाटलीभर पाण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विभागात फिरूनही पाणी मिळत नसल्याचा प्रकार होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. उन्हाची दाहकता त्यातच दूषित पाणीपुरवठा, अशा दुहेरी समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असून प्रशासन मात्र या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्याचा नियमितपणे पुरवठा व्हावा व व ऐन परीक्षेच्या काळात ही समस्या दूर करावी या मागणीसाठी येत्या चार दिवसांत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बाटली आंदोलन विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात येईल येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बहिर, अजय पवार, दीक्षा पवार, पूजा सोनवणे, सुषमा भगत, सचिन बोराडे, पांडुरंग नखाते, दिगंबर जाधव, स्वप्नील काळे, रमेश कळंबे, परमेश्वर काष्टे, दादाराव कांबळे, पवन राजपूत यांच्यासह वस्तीगृहातील अनेक मुला मुलींनी मिळून कुलगुरूंना निवेदन सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टीव्ही सेंटर व्यापारी संकुलाचे काम अर्धवट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाच कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकानंतरही टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाचे काम अर्धवटच राहिले आहे. चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले व्यापारी संकुलाचे काम ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, पण अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे संकुलातील दुकानांसाठी गुंतवणूक केलेल्या व्यावसायिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

सिडको एन ११ टीव्ही सेंटर येथे असलेल्या प्राकृतिक क्रीडा संकुलाच्या बाजूने व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय महापालिकेने २०१४ - १५ या वर्षी घेतला. संकुलाच्या बाजूने पन्नास दुकानांचे बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी दुकान खरेदी करू इच्छीणाऱ्या व्यावसायिकांकडूनच दुकानाची रक्कम जमा करण्यात आली. जमा झालेल्या रक्कमेतून व्यापारी संकुलाचे काम करण्यात येणार होते. दुकानांसाठी गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिकांकडून महापालिकेला बारा कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न झाले. त्यातून तीन कोटी २८ लाख ८३ हजार ४८३ रुपये खर्च करून व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन करण्यात आले. निविदा देखील काढण्यात आली. एम.ए.सिद्दिकी या कंत्राटदाराने ७.२९ एवढ्या कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली त्यामुळे या कंत्राटदाराला व्यापारी संकुलाचे काम देण्यात आले.

व्यापारी संकुलाचे विद्युत विषयक काम आणि वास्तूविशारदाचे शुल्क याचा उल्लेख बांधकामासाठीच्या अंदाजपत्रकात करण्यात आला नव्हता, त्यामुळे या दोन्हीसाठी पाच कोटी १ लाख ९६ हजार १८१ रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्यात आले. या अंदाजपत्रकाला ११ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यावर देखील अद्याप व्यापारी संकुलाचे काम पूर्ण झाले नाही. सुधारित अंदाजपत्रक मंजूर करून घेताना ३१ मार्च २०१९ पर्यंत संकुलाचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही पालिका प्रशासनाने दिली होती. ही मुदत उलटून गेल्यावरही अद्याप काम पूर्ण झाले नाही. दिवाळीच्या सुमारास व्यापारी संकुलातील काही गाळे व्यापाऱ्यांना देण्याचे नियोजन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले होते, पण प्रशासनाने हे नियोजन देखील हाणून पाडले. त्यामुले व्यापारी संकुलाचे काम केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चला मुलांनो पक्षी वाचवू या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कीटक, डास, उंदीर यांना खाऊन परिस्थितीचे (इकॉलॉजी) संतुलन साधणाऱ्या पक्ष्यांचे जीवन प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तरी मातीच्या भांड्यात पाणी आणि धान्य ठेवून पक्ष्यांना मदत करा, असे आवाहन पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित 'किडस कार्निवल'मध्ये सोमवारी मुलांनी पक्ष्यांची माहिती घेतली. गरवारे कम्युनिटी सेंटर हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. यावेळी सेंटरचे रमाकांत रौतल्ले, शिल्पा अस्वलीकर उपस्थित होत्या. डॉ. पाठक यांनी देशी आणि विदेशी पक्ष्यांच्या दुनियेची सफर घडवली.

पक्ष्यांचे अन्न, सवयी, जोडीदार निवडण्याची पद्धत, पिलांना जन्म देण्याची पद्धत, घरटी बांधण्याची गंमतजंमत ऐकून मुले चकित झाली. गिधाड, घारी, कावळे ही निसर्गाचे सफाई कामगार आहेत. चातक, पावशा पक्षी आफ्रिकेतून येतात. बुलबुल हा सामाजिक पक्षी कीटक खातो. मात्र देशी झाडे नसल्याने बुलबुल पक्ष्याला घरटे बांधण्यासाठी जागाच राहिलेली नाही. डोमकावळा म्हणजे जंगली कावळा. हा कावळा मेलेल्या प्राण्यांपासून काहीही खातो. तसाच साधा कावळा पण मिश्र आहारी असतो. सातभाई त्याच्या नावाप्रमाणेच सातच्या समूहात राहतो. सकाळी पत्रा ठोकल्यासारखा आवाज करणाऱ्या पक्षाला तांबट म्हणतात. भारद्वाज इतर पक्ष्यांची अंडी, खरकटे खावून संतुलन ठेवण्यास मदत करतो. शिक्रा पक्षी वेगवेगळे छोटे पक्षी खातो. पावश्या पक्षी पेरते व्हा, असा आवाज करतो. नितांत सुंदर फ्लेमिंगो सायबेरियातून येतो. तीन आठवडे जगणाऱ्या फुलपाखरांचे जीवन कीटकनाशकांमुळे धोक्यात आले. चिमण्यांचा निवास देशी झाडे नसल्याने धोक्यात आला आहे, असे डॉ. पाठक म्हणाले. याशिवाय सुगरण, मोर, धनेश या पक्ष्यांच्या सहजीवनाबद्दलही त्यांनी माहिती दिली.

\Bआज समारोप \B

मंगळवारी (३० एप्रिल) रोजी किडस कार्निवलचा शेवटचा दिवस आहे. आहे. सकाळी १० वाजता वाद्य वादनासह शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण मिळणार आहे. वर्षभर अभ्यासातून उसंत मिळते ती उन्हाळ्याच्या सुटीतच. मग अभ्यासाला कंटाळलेल्या मुलांना कार्निवलसाठी अवश्य पाठवा. हा उपक्रम मोफत आहे.

\Bपक्ष्यांसाठी आपण हे करू शकतो\B

- प्रत्येक घरात, सार्वजनिक ठिकाणी किमान एक फळझाग, फुलझाड लावावे

- उन्हाळ्यात गच्ची, गॅलरीत मातीच्या भांड्यात पाणी व धान्य ठेवावे

- घर बांधताना छिद्र ठेवावे, यामुळे चिमण्यांना घरटे करता येईल

या उपक्रमामुळे आपल्यासाठी पक्षी किती आवश्यक आहे हे समजले. प्रदुषणामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आल्याचे ऐकूण वाईट वाटले.

-पार्थ कटारिया

या व्याख्यानातून खूप महत्त्वाची माहिती मिळाली. पक्ष्यांसाठी झाडे किती आवश्यक आहे हे समजले. पाणी ठेवून मी पक्ष्यांना मदत करणार.

-भक्ती घाटोळ

मी घरी फुलांची आणि फळांची झाडे लावणार आहे. मुळे पक्षींचे जीवन वाचवण्यासाठी मदत होईल. शिवाय ही माहिती इतरांनाही देणार आहे.

-तन्वी काटखेडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

$
0
0

अंबाजोगाई तालुक्यातील साकुड, वरवटी येथील घटना

म. टा. प्रतिनिधी, बीड

अंबाजोगाई तालुक्यातील साकुड आणि वरवटी या दोन गावांत रविवारी मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने बावीस जणांना चावले. हे सर्वजण उकाड्याने त्रस्त होऊन घराबाहेर झोपलेले होते. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.

बीड जिल्ह्यासह राज्यभरात सूर्य आग ओकतो आहे. त्यामुळे तापमान ४५ अंशावर पोचले आहे. याबरोबरच विजेचा लपंडाव अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे घरात उकाडा होत असल्याने ग्रामस्थ रात्रीच्या वेळी घराबाहेर अंगणात झोपत आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील दोन गावाच्या ग्रामस्थांना मात्र, घराबाहेर झोपणे ग्रामस्थांना चांगलेच महागात पडले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक पिसाळलेला कुत्रा साकुड गावात शिरला आणि घराबाहेर झोपलेल्या त्याने चावा घेतला. गाढ झोपलेल्या व्यक्तींना काही कळायच्या आत कुत्र्याने १५ व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले आणि अंधारात पसार झाला. साकुड येथे अंजुम शेख, उमर पठाण, रसुलबी पठाण, फातेमाबी पठाण, जैनाबीबी पठाण, मुंजाहरी केंद्रे, गुनाबी पठाण, श्रीहरी चाटे, नारायण होळंबे, सुनील चाटे, संग्राम चाटे, रमेश गायकवाड, लिंबाजी वेडे, गंगाधर उघडे, प्रभू चाटे यांना कुत्र्यांने चावा घेतला

त्यानंतर शेजारी असलेल्या रवटी गावातील सात जणांचे लचके या पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले. यात सर्जाबाई गंगे, बालू चाटे, नीलाबाई चाटे, युवराज जाधव, अर्जुन मुंडे, संतोष माने, महादेव चाटे यांचा समावेश आहे. अन्य ग्रामस्थांनी मध्यरात्रीतून सर्व कुत्रे चावलेल्या जखमी व्यक्तींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. पिसाळलेला कुत्र्याचा शोध घेऊन सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी त्याला ठार मारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर पालिका स्थायी समितीत नव्यांना संधी

$
0
0

भाजपच्या सहा जणांची तर काँग्रेसच्या दोघांच्या वर्णी

म. टा. प्रतिनिधी, लातूर

लातूर महापालिकेच्या स्थायी समितीतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी भाजप आणि काँग्रेसने नव्यांनी संधी दिली आहे. भाजपचे सहा तर काँग्रेसच्या दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला.

सोमवारी महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उपमहापौर देवीदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, आयुक्त एम. डी. सिंह यांची उपस्थिती होती. एक मे रोजी स्थायी समितीतील भाजपाचे शैलेश गोजमगुंडे, विशाल जाधव, नितीन वाघमारे, संजय रंदाळे, अजय कोकाटे, डॉ. दीपा गिते. काँग्रेसचे पप्पु देशमुख, युनुस मोमीन असे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर नव्या सदस्यांची निवडीची जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेण्यात आली. त्यानंतर सोमवारी बैठक झाली.

या बैठकीत नव्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. भाजपच्या वतीने अॅड. दीपक मठपती, चंद्रकांत बिराजदार, व्यंकट वाघमारे, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, श्वेता लोंढे यांना संधी देण्यात आली. काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नगरसेवक रविशंकर जाधव, दिप्ती खंडागळे यांना संधी दिली आहे. नवीन सदस्यांची नावे विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर सभापतीच्या निवडीची प्रक्रिया होणार असल्याचे सांगण्यात आले. स्थायी समितीमध्ये दोन्ही पक्षाचे समान सदस्य असल्यामुळे पुन्हा चिठ्ठीच कोणाचे तरी नशीब उजळवणार हे नक्की.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान

$
0
0

नांदेड : शहरातील विविध भागात आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या लागलेल्या आगीच्या घटनेत कॉर्पोरेट बँकेचा ही समावेश आहे.

शहरातील व्हीआयपी रोडवर असलेल्या कॉर्पोरेट बँकेच्या स्ट्रँगरूमला आग लागल्याने फाइली जळून खाक झाल्या. यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. शहरालगत असलेल्या पुणेगांव जवळील नागापूर येथे घरामध्ये गॅस सिलेंडर लिकिज झाल्याने घराला आग लागली. या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाचे वाहन पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. त्यासोबतच टिळकनगर कॉर्नर जवळील ओमसाई हॉटेल समोरील दुकानाशेजारी आग लागल्याने काही काळ धावपळ उडाली होती. त्यासोबतच अबचलनगर येथील वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राचा वीज पुरवठा उतरल्याने परिसरात आग लागली होती. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. औद्योगिक वसाहती परिसरातील शिफटा कंपनी समोर ट्रक खत तयार करायचे पावडर घेवून उभा होता. त्या ट्रकला अचानक आग लागली या आगेत ट्रक जळून खाक झाला. आग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहल्याने पुढील अनर्थ टळला. शहरातील विविध भागामध्ये लागलेल्या या आगेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेडमध्ये रस्त्यावर अघोषित संचार बंदी

$
0
0

चार दिवसांपासून उष्णतेची लाट कायम

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर अघोषित संचार बंदी झाल्यासारखे वातावरण आहे.

उन्हाचा पारा वाढल्याने मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा पारा ४४.६ अंशावर पोहचला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले आहे. या उष्णतेचा लग्नसराईला सुद्धा फटका बसला आहे. शहरात ऐन दुपारच्यावेळी शांतता पसरली असल्याचे दिसून येते. ही स्थिती अजून तीन दिवस कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेयावर ताव मारत आहेत. २८ एप्रिल रोजी जिल्ह्याचे कमाल तापमान ४४.६ अंश सेल्सियस नोंदविले गेले. सोमवारीही ४४.६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले. अशास्वरुपाची परिस्थिती पुढे चार दिवस राहणार असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिक दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीड जिल्ह्यातील ९० प्रकल्प कोरडे

$
0
0

४० प्रकल्पांतील पाणी जोत्याचे खाली

म. टा. प्रतिनिधी, बीड

बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदा वरूणराजाने जिल्ह्यावर अवकृपा दाखवली आहे. या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील तब्बल नव्वदहून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. ४० प्रकल्पांतील पाणी जोत्याचे खाली गेले आहे. हे चित्र आगामी काळात पिण्याचे पाण्याचे संकट गडद झाल्याने समोर आणणारे आहे.

बीड जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे दीडशेच्या जवळपास सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. यंदा मात्र जून महिन्यात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बीड जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६६६ मिलिमीटर असताना केवळ ३३४ मिलिमीटर म्हणजे पन्नास टक्के पाऊस पडला. त्यामुळे यावर्षी नद्या नाले वाहिलेच नाहीत. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात पाणी साठ्यात घट लक्षणीय आली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ ०.८५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ९१ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यासोबतच ३९ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. ११ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. दोन प्रकल्पांत पन्नास टक्क्यापर्यंत पाणी आहे. एक प्रकल्पांत पन्नास टक्केच्यावर पाणी आहे. जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या मिळून १४४ सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ११३७ दशलक्ष घनमीटर आहे. त्या तुलनेत सध्या उपयुक्त पाणीसाठा सात दशलक्ष घनमीटर तर मृतसाठा १२० दशलक्ष घनमीटर शिल्लक आहे.

जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पाची क्षमता ४५४ दशलक्ष घनमीटर असताना ८२ दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा असून ते मृत साठ्यात गेले आहे. मांजरा प्रकल्पाची क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर असताना मांजरा धरणात आजघडीला केवळ १८ दशलक्ष घनमीटर पाणी हा मृत साठा आहे. जिल्ह्यातील मांजरा व माजलगाव या दोन मोठ्या प्रकल्पाचे महत्व तीन जिल्ह्यातील जनतेची तहान भागवणारे प्रकल्प म्हणून ओळख आहे. या दोन मोठ्या प्रकल्पावरून बीड, अंबाजोगाई, केज, लातूर, कळंब, धारूर, केज, माजलगाव या मोठ्या शहरासह अनेक खेड्यात पाणीपुरवठा होतो. आगामी काळात या जिल्ह्यातील १४४ सिंचन प्रकल्प तळाशी गेल्याने पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे. हे उपलब्ध पाणी पावसाळ्यापर्यंत पुरवणे हे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ताजी भाले रक्‍तपेढीतर्फे उद्या वार्षिक स्नेहमेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दत्ताजी भाले रक्‍तपेढीच्या वतीने बुधवारी (१ मे) सायंकाळी सहा वाजता रक्‍तपेढीच्या प्रांगणात रक्‍तदाते, शिबिर संयोजकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात शिबिर संयोजक व रक्तदात्यांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करुन रक्तदान चळवळीतील योगदानाची दखल घेत शिबिर संयोजकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घृष्णेश्‍वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष दीपक अग्निहोत्री, प्रमुख वक्‍ते म्हणून धुळे येथील ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भालेराव यांची उपस्थिती राहणार आहे. २०१८ या वर्षात रक्तपेढीमार्फत ५८२ रक्‍तदान शिबिरे घेण्यात आली असून, शिबिरातून २७०५८ रक्‍त संकलन झाले आहे. हे सर्व रक्‍तदाते, शिबिर संयोजकांच्या सहकार्यामुळेच शक्य होते व त्यामुळेच शिबिर संयोजकांना गौरवण्यात येणार असल्याचे रक्‍तपेढीच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक हात मदतीचा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील गरजू व्यक्तींसाठी महापालिका 'एक हात मदतीचा' हा उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ कामगार दिनी (१ मे) रोजी केला जाणार आहे. या उपक्रमात पालिकेचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.

गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी बऱ्याच संस्था, एनजीओ, विविध संघटना काम करीत असतात. औरंगाबाद महापालिकेने देखील गरजू व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी संकल्पना मांडली. त्यांनी अधिकारी व मेअर्स फेलो यांच्याबरोबर बैठक घेऊन शहरातील गरजू व्यक्तींसाठी काय करता येईल याबाबत चर्चा केली. त्यानंतर एक योजना तयार करण्यात आली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहयोगातून 'एक हात मदतीचा' या उपक्रमाने जन्म घेतला. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी असलेले जुने व वापरायोग्य कपडे, भांडी, चादर, बेडशीट, चपला आदी साहित्य या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन उपयाक्त मंजुषा मुथा यांनी केले आहे. या उपक्रमाची सुरुवात १ मे रोजी केली जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सुरक्षारक्षकांच्या विभागाजवळ शामियाना उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचेकडील वापरायोग्य साहित्य १ ते ८ मे च्या दरम्यान जमा करावे, असे परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. जमा झालेले साहित्य वेगवेगळे करून त्याच्या वाटपाचे नियोजन केले जाणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी आयुक्तांनी अशिता गडप्पा, राजेश जाधव, दीपा इंचेकर या मेअर्स फेलोसह उपायुक्त मंजुषा मुथा यांच्यावर सोपवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरालगत तातडीने इनर रिंगरोड आवश्यक

$
0
0

शहरालगत तातडीने

इनर रिंग रोड आवश्यक

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी अनेक उपाययोजना सूचविण्यात आल्या. औरंगाबादच्या आजूबाजूने अन्य शहरात जाणाऱ्या जडवाहनांसाठी स्वतंत्र रस्ताच नाही. त्यामुळे शहर व परिसरात वाहतुकीची समस्या तीव्र झाली आहे. यावर उपाययोजना करताना शहरालगत तातडीने इनर रिंगरोडची आवश्यकता आहे. त्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी शहरविकासासाठी पुढे येण्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणून मराठवाड्याची राजधानी औरंगाबादकडे पाहिले जाते. विदर्भ, खान्देशातून तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यातून पुणे, मुंबई, नाशिककडे जाण्यासाठी औरंगाबादहूनचा मार्ग अधिक सोयीचा आहे.

शहरालगतच्या रस्त्यांचा विचार केला तर जालना रस्त्यावर सर्वाधिक भार आहे. हा कमी करण्यासाठी सातारा परिसरातून बीडबाय पास उभारला गेला. त्यासोबतच औरंगाबाद एकात्मिक रस्ते विकास योजनेतून शहराच्या बाहेरून एक रिंग रोड प्रस्तावित केला गेला. त्याचे चार टप्पे तयार झाले. उर्वरित टप्प्यांना जमीन संपादन, निधीची अडचण आहे. गेल्या दहा वर्षांत शहर चारही बाजूंनी विस्तारले आहे. त्यामुळे या रस्त्यांना नागरी वसाहत टच झाली आहे.

वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इनर रिंग रोडचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शरणापूर फाटा - साजापूर - वाळूज-कांचनवाडी-सिंदोन -भिंदोन -परदरी -आडगाव - निपाणी - भालगाव - जालना रोड - सावंगी -मिटमिटा असा रिंगरोड करता येईल, असे सूचविले आहे. अर्थात हा प्रकल्प कागदावर वाटतो तेवढा सोपा नाही. पण त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन फॉलोअप घेणे आ‌वश्यक आहे. या इनर रिंगरोडपैकी काही टप्पे पीडब्ल्यूडीच्या हायब्रिड अॅन्यूटी प्रकल्पांतर्गत समाविष्ट करता येऊ शकतात. संपूर्ण गोल पट्टा बनवण्यासाठी आतापासून हालचाली सुरू केल्या तर पुढील काही महिन्यात त्याचे रिझल्ट सकारात्मक मिळतील, अशी शक्यता पीडब्ल्यूडीमधील सूत्रांनी वर्तविली.

इनर रिंगरोडचा फायदा

बाहेरगावाहून परस्पर दुसरीकडे जाणाऱ्या जड वाहनांना शहराला वळसा घालून जावे लागते. त्यामुळे अनेक अडचणी येतात. बीड बायपासचा वापर जड वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होतो. त्याऐवजी पुढचा टप्पा जर तयार झाला तर बीड, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड तसेच विदर्भातून येणारी वाहतूक परस्पर शहराबाहेरून मुंबई, पुणे, नाशिकला जाईल. शहरातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व शाळांत उद्या वृक्षसंवर्धन लक्षवेध दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांमधून डेन्स फॉरेस्ट निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र दिनी (१ मे) शाळेच्या प्रांगणातील, परिसरातील झांडांना पाणी देऊन वृक्षसंवर्धन लक्षवेध दिन साजरा करावा, अशी सूचना शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सूरजप्रसाद जैस्वाल यांनी काढली आहे.

यासंदर्भात सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना पत्र देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, की महाराष्ट्र दिन सर्व शाळांमधून साजरा केला जातो. शाळेतील विद्यार्थी निकाल घेण्यासाठी तसेच ध्वजवंदनासाठी शाळेत येतात. ग्रीन औरंगाबाद अँड स्कूल मोहीम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक, नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे हा दिवस वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन म्हणून साजरा करावयाचा आहे. यापूर्वी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाबाबत जाणीवजागृती होऊन १५ जून पासून औरंगाबाद शहर, वाळूज, पंढरपूर, शेंद्रा, कुंभेफळ हा औद्योगिक परिसर व तालुका मुख्यालयातील शाळांमधून राबविण्यात येणाऱ्या डेन्स फॉरेस्ट प्रकल्पात पालक व निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील.

\Bया आहेत सूचना \B

शाळेत येताना सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रांगण, परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी सोबत पाण्याचे कॅन किंवा बाटली आणावी, ध्वजवंदन, निकाल जाहीर केल्यानंतर सकाळी आठ ते नऊ या वेळेत झाडांना पाणी द्यावे, कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक व पालकांना निमंत्रित करावे, प्रत्येक शाळेने राबविलेल्या या विशेष उपक्रमाचे फोटो व अहवाल इमेल व व्हॉटसअप ग्रुपवर सादर करावे, असे सूचनेत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरड्या विहिरींनी चिंता वाढविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

उन्हाची तीव्रता वाढत चालली असून, दुष्काळही गंभीर होत आहे. परिणामी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील ६६ गावांमध्ये ९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर ३३ गावांना पाणी उपलब्ध करण्यासाठी ६२ खासगी विह्री अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजुला अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहे. दुष्काळाने रौद्ररुप धारण केल्याने गावे, वाड्या, वस्त्यातील नागरिक उपाययोजनांची मागणी करीत आहेत.

यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प, तलाव, पाझर तलाव हिवाळ्यातच कोरडे पडले असून, तालुक्यातील अनेक विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. अनेक विहिरी शेवटच्या घटका मोजत आहेत. यामुळे नागरिकांना डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुर्गम भागासह वाडी, वस्तीवरील नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत असल्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह वाडी, वस्तीवरील नागरिकांकडून उपाययोजनांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात येत आहेत.

उन्हाची तीव्रता वाढल्याने गाव व परिसरात प्रशासनाला सक्षम स्त्रोत मिळणे कठीण झाले आहे. परिणामी प्रशासनाला अधिग्रहण करण्यात अडचणी येत आहेत. दुर्गम भागात सक्षम स्त्रोत उपलब्ध झाला तरी टँकर अथवा इतर अडचणीमुळे नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. अनेक वेळा दुर्गम भागातून टँकरला ये-जा करण्यास अडचणी येत आहे. बऱ्याच अधिग्रहणातून अपेक्षित पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून ओरड होत आहे. तालुक्यात सध्या ६६ गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने ६२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून ९५ टँकरद्वारे पाणी पुरविण्याचे काम सुरू आहे.

\B

७० ते ८० किलोमीटरवरून पाणीपुरवठा\B

फुलंब्री तालुक्यात इतर तालुक्यांतून ७० ते ८० किलोमीटरवरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कन्नड तालुक्यातील नेवपूर, पिशोर, भोकरदन तालुक्यातील वाहुळखेडा, बानेगाव, चांदाई ठोंबर तर, औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा एमआयडीसीमधून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. टँकरला ७० ते ८० किलोमीटरच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

या गावांची तहान टँकरवर

आडगाव खुर्द, गेवराई पायगा, नरला, भावडी, महाल किन्होळा, नायगव्हाण, जळगाव मेटे, शेलगाव खुर्द, गिरसावळी, पिरबावडा, तळेगाव, सताळ पिंप्री, रांजणगाव, शेलगाव, जानेफळ, रिधोरा देवी, गेवराई गुंगी, आडगाव, शेलगाव खुर्द, बाभुळगाव खुर्द, गुम साताळा, बोरगाव अर्ज, शेवता खुर्द, धनशी वस्ती, पिंपळगाव वळण, बाबरा, वाघलगाव, धानोरा, हिवरा, खामगाव, आडगाव बुद्रुक, पिंपळगाव देव, टाकळी कोलते, वाकोद, शिरोडी खुर्द, पाथ्री, वडोदबाजार, बाभुळगाव तरटे, बोधेगाव खुर्द, निधोना, ममनाबाद, मुर्शिदाबाद वाडी, पेंडगाव आळंद, डोंगरगाव कवाड, साताळा बुद्रुक, कान्होरी वस्ती, मारसावळी, डोंगरगाव शिव, भालगाव, वाहेगाव, लिहा जहॉंगीर, किनगाव वस्ती, शिरोडी बुद्रुक, वाघोळा वस्ती, बोधेगाव, मालोद्याची वाडी, वारेगाव, रेलगाव, वानेगाव, पाडळी व इतर

\Bटँकरच्या मागणीत वाढ\B

उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत चालली आहे. त्याच दुपटीने दुष्काळाची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळेच विहिरीही आटत चालल्या आहे. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळेच टँकरच्या मागणीत दररोज भर पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाच्या खुनप्रकरणी दोघांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनैतिक संबंधातून ३० वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेंद्र उर्फ काभू उर्फ कारभारी कान्होजी मगरे व प्रशांत भानूदास साळवे यांना शनिवारी (२७ एप्रिल) रात्री अटक करून दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत (तीन मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांनी दिले.

या प्रकरणात मृत धम्मपाल शांतवन साळवे यांचा भाऊ संजय साळवे (२७, रा. मालुंजा खुर्द, ता. गंगापूर, ह.मु. जोगेश्वरी ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, संजयला दोन भाऊ असून धम्मपाल हा मोठा तर विजय हा लहान भाऊ आहे. १५ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास संजय याला विजयने फोन करून धम्मपालला घातपात झाल्याचे सांगितले. संजयने एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन मृतदेह धम्मपाल याचा असल्याची खात्री केली. त्यानंतर संजयने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणात आरोपी राजेंद्र उर्फ काभू उर्फ कारभारी कान्होजी मगरे (३०) व प्रशांत भानुदास साळवे (२८, दोघे रा. अशोकनगर, सिंधीबन, मसनतपूर, एमआयडीसी चिकलठाणा) या दोघांना अटक करून त्यांची चौकशी केली असता, त्यांनी १४ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर धम्मपालला दारू पाजण्याचा बहाणा करत अनैतिक संबंधाच्या कारणावरून दगडाने ठेचून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

\Bसाहित्याची जप्ती बाकी\B

दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींकडून मृताचा मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले कपडे हस्तगत करणे बाकी असल्याने, आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांच्या रुद्रावतारानंतर टँकर सुरू

$
0
0

पैसे भरूनही गुंठेवारीत टँकर न मिळाल्याने संतप्त नागरिक सिडकोच्या जलकुंभावर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैसे भरूनही गुंठेवारी भागात पाण्याचे टँकर न आल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या सिडको एन-५ येथील जलकुंभावर आंदोलन केले. पाच-सहा दिवसांपासून या नागरिकांना पाणी मिळाले नव्हते. नागरिकांनी जलकुंभाच्या परिसरातील पाण्याचे टँकर्स अडविले. आमदार अतुल सावे यांचे टँकर पाणी भरण्यासाठी जलकुंभावर आले असता या टँकरच्या चाकाची हवा सोडण्याचा प्रयत्न देखील नागरिकांनी केला. पाण्यासाठी नागरिकांनी रुद्रावतार धारण केल्याचे कळताच पालिकेच्या उपायुक्तांना जलकुंभावर दाखल झाले आणि या भागासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.

जयभवानीनगर, आनंदनगर, विश्रांतीनगर या भागातील गुंठेवारी वसाहतींना महापालिका टँकरने पाणी पुरवठा करते. त्यासाठी एका कुटुंबाकडून तीन महिन्यासाठी १८०० रुपये शुल्क भरून घेतले जाते. त्यानंतर एक दिवसआड दोनशे लिटरचा पाण्याचा ड्रम टँकरच्या सहाय्याने भरून दिला जातो. नागरिकांनी पाण्यासाठी पैसे महापालिकेत जमा केले, पण पाच-सहा दिवसांपासून त्यांच्या वसाहतीमध्ये टँकरच आले नाही. टँकर का येत नाही याची माहिती घेण्याचा काही नागरिकांनी प्रयत्न केला असता, एका नगरसेविकेच्या पतीच्या हस्तक्षेपामुळे टँकर बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. जयभवानीनगर, आनंदनगर, विश्रांतीनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने दुपारी सिडको एन-५ येथील जलकुंभावर जमा झाले. त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आंदोलन सुरू केले. जलकुंभाचा परिसर त्यांनी ताब्यात घेतला. जलकुंभाच्या परिसरातील टँकर्स त्यांनी अडवून ठेवले. जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत एकही टँकर बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. तेवढ्यात आमदार अतुल सावे यांचा पाण्याचा टँकर पाणी भरण्यासाठी जलकुंभावर आला. या टँकरच्या माध्यमातून आमदार सावे गरजूंना मोफत पाणी पुरवठा करतात. आमदारांचा टँकर आल्याचे कळाल्यावर काही नागरिकांनी या टँकरला घेतले व हवा सोडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर पालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम जलकुंभावर दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढली. टँकरद्वारे लगेचच पाणी पुरवठा सुरू केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा देखील सुरू केला. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. सुमारे एक तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलनात नीलेश ढवळे, दत्तात्रय घारे पाटील, सविता ढवळे, प्रतीभा घारे, बबीता सावळे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य जलवाहिनीवरून ३८ नळ जोडण्यांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहानूरवाडी येथील मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या ३८ नळजोडण्या महापालिकेने अंतर्गत जलवाहिनीवर स्थलांतरित केल्या. ही कारवाई करताना मुख्य जलवाहिनीवरून नळ जोडण्या घेणाऱ्यांविरुद्ध मात्र कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाच्याच आशीर्वादाने मुख्य जलवाहिनीवरून नळ जोडण्या देण्यात आल्या होत्या का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहानूरवाडी येथील उड्डाणपुलाच्या खाली मुख्य जलवाहिनीवरून ४९ नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. मुख्य जलवाहिनी फोडून यापैकी काही नळजोडण्या घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊ लागली. त्यामुळे पाच दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया गेले. या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यावर देखील त्याची दखल घेतली जात नव्हती. सोमवारी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कार्यवारी करीत ४९ पैकी ३८ नळजोडण्या मुख्य जलवाहिनीवरून हटविल्या व अंतर्गत जलवाहिनीवरुन या जोडण्या देण्यात आल्या. उर्वरित जळजोडण्या देखील अशाचप्रकारे स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे. नळ जोडण्या स्थलांतरित करताना मुख्य जलवाहिनीवरून नल जोडण्या घेणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. शहरात ज्या ज्या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरून नळजोडण्या देण्यात आल्या आहेत त्या सर्व नळजोडण्या तात्काळ तोडा, असे आदेश त्यांनी कोल्हे व उपअभियंता के. एम. फालक यांना दिले.

महापालिकेने माजी सैनिकांचे नागरिक मित्र पथक स्थापन केले आहे. एका झोन कार्यालयासाठी एक पथक याप्रमाणे नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत ही पथके घनकचरा व्यवस्थापनासाठी व प्लास्टिक बंदीसाठी प्रशासनाला मदत करीत होते. सहा झोन कार्यालयाच्या क्षेत्रात खासगीकरणाच्या माध्यमातून कचरा संकलन व वाहतुकीचे काम केले जात आहे. त्यामुळे या झोन कार्यालयासाठीची नागरिक मित्र पथके काढून घ्या आणि या पथकांना मुख्य जलवाहिनीवरील नळ जोडण्या शोधण्याचे, अनधिकृत नळजोडण्या शोधण्याचे व डबल नळकनेक्शन जोडण्या शोधण्याचे काम द्या, असे आदेश महापौरांनी उपायुक्त मंजुषा मुथा यांना दिले. दोन मे पासून नागरिक मित्र पथकांना पाणी पुरवठ्याच्या कामाला जोडा, असे ते म्हणाले.

मटा भूमिका

पालिकेच्या आशीर्वादाचाच परिणाम

मुख्य जलवाहिनीतून नळजोडण्या घेण्याची हिंमत नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये पालिकेचा आशीर्वाद असल्याशिवाय निर्माण होणे शक्य नाही. शहानूरवाडी येथील उड्डाणपुलाच्या खाली पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊ लागल्यामुळे ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनीवरील नळजोडण्या बंद केल्या आणि अंतर्गत जलवाहिन्यांवरून नळजोडण्या दिल्या. हे करताना मुख्य जलवाहिनीवरून नळजोडण्या घेणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्याचे टाळण्यात आले. ही टाळाटाळ कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. मुख्य जलवाहिनीवरुन घेण्यात आलेल्या नळजोडण्या, अनधिकृत नळजोडण्या याचे प्रमाण खूप आहे. अधिकृत नळजोडण्यांपेक्षा अशा प्रकारच्या नळजोडण्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापालिकेने हा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. याला कारण पालिकेचा आशीर्वाद असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेता अनधिकृत नळजोडण्यांवर आणि मुख्य जलवाहिनीवरील नळजोडण्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. केवळ कारवाई न करता संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यास पालिकेचा धाक देखील निर्माण होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत मुलाचा मृत्यू; दोघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मैत्रिणींसोबत लॉजवर थांबलेल्या मित्रांकडे आपल्या मैत्रिणींची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या १७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून मृत्युस कारणीभूत ठरलेले प्रशांत केशवराव म्हस्के व प्रमोद जयवंतराव निर्मल यांना साडेचार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी सोमवारी (२९ एप्रिल) ठोठावली.

याप्रकरणी मृत महेबूब गौरी याचे वडील अ‍ॅड. गुजर शाह अली गौरी (४७, रा. देवगिरी कॉलनी, क्रांतीचौक) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ३१ डिसेंबर २०१५ रोजी महेबूब गौरी हा मित्र व आरोपी प्रशांत केशवराव म्हस्के (३६, रा. न्यू नंदनवन कॉलनी), प्रमोद जयवंतराव निर्मल (३२, रा. शिऊर, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) आणि तीन मैत्रिणींसह नववर्षाची पार्टी करण्यासाठी बीड बायपास येथील आदित्य हॉटेलात गेले होते. तिथे महेबूब गौरी व दोघा आरोपींनी मद्य प्राशन केले. महेबूबला दारू जास्त झाल्याने आरोपींनी त्याला घराजवळ सोडले; तसेच महेबूब गौरीच्या मैत्रिणीलादेखील आरोपींनी घरी सोडले. त्यानंतर आरोपी व त्यांच्या दोन मैत्रिणी बसस्थानकासमोरील लॉज येथे गेल्या. महेबूबला आपली मैत्रिणदेखील आरोपींसोबत असल्याचा संशय आला व तोदेखील त्यांच्या पाठोपाठ लॉजवर गेला. तेथे त्याने आरोपींकडे आपल्या मैत्रिणीबाबत विचारपूस केली असता, आरोपींनी त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत आरोपींनी त्याला लॉजवरील जनरल रुममध्ये ठेवले. महेबूब हालचाल करत नसल्याने त्याला घाटीत दाखल करण्याचे लॉजच्या मॅनेजरने दोघा आरोपींना सांगितले. आरोपींनी महेबुबला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, समर्थनगर येथील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेलो असता तेथे अज्ञात मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यामुळे त्याला घाटीत आणल्याचा बनाव आरोपींनी केला. तपासादरम्यान घटना उघडकीस येऊन प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bविविध कलमान्वये शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात मृताची मैत्रिण, लॉजचे कर्मचारी व सीसीटीव्ही चित्रिकरण महत्त्वाचे ठरले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (दोन) अन्वये साडेचार वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, तर भारतीय दंड संहितेच्या कलम २०१ अन्वये आरोपी प्रशांत म्हस्के याला एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम १८२ अन्वये आरोपी म्हस्केला सहा महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद सिग्नलच्या दुरुस्तीला खो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एएस क्लब चौकातील वाहतूक सिग्नल हाय टेन्शन वायरला लागल्याने जळून नादुरुस्त झाले. गेल्या १५ दिवसांपासून सिग्नल बंद आहे. वाहतूक शाखेने सिग्नलच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक प्रकल्प, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांशी पत्रव्यवहार केला मात्र, हे आमचे काम नसल्याचे सांगत या चारही विभागांनी हात वर केले आहेत.

नगरमार्गावर वाहतुकीची वर्दळ जास्त असल्याने एएस क्लब चौकात सिग्नल बसवण्यात आले. १४ एप्रिल रोजी सकाळी सोसाट्याचा वारा आल्याने या सिग्नलवरून जात असलेल्या हाय टेन्शन वायरचा स्पर्श झाला. यामुळे सिग्नलच्या खांबात विद्युत प्रवाह उतरून सिग्नल जळाल्याने नादुरुस्त झाले. या मार्गावर वाहतूक जास्त असल्याने सिग्नल लवकर दुरुस्त होणे आवश्यक होते. औरंगाबाद - नगर महामार्ग जागतिक बँक प्रकल्पातून तयार करण्यात आला आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सिग्नल दुरुस्तीबाबत जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यालयात संपर्क साधला. वाहतूक शाखेचा एक कर्मचारी देखील नगर येथील कार्यालयात जाऊन आले मात्र, हे आपले काम नसल्याचे सांगत जागतिक बँक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केले. यानंतर वाहतूक शाखेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांनी, रस्ते तयार करण्याचे काम आमचे असले तरी एकदा तयार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगितले. वाहतूक शाखेने यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. यावेळी त्यांनी देखील हे काम आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगत हात झटकले. सर्वात शेवटी वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाशी सिग्नल दुरुस्तीबाबत संपर्क साधला मात्र, त्यांच्याकडूनही अद्याप सकारात्मक प्रतिसाद वाहतूक शाखेला मिळालेला नाही. याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांनी दिली.

\Bपोलिसांवरील ताण वाढला\B

एएस क्लब चौक हा अवजड वाहनांच्या वर्दळीचा चौक आहे. सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. या चौकात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याात आली आहे. सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून, दोन शिफ्टमध्ये त्यांना रात्री १२पर्यंत काम करावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुकते माप सोडाच, हक्काचे मिळण्याची मारामार!

$
0
0

\Bदिलीप वाघमारे, औरंगाबाद\B

महाराष्ट्र राज्य एक मे रोजी ६०व्या वर्षांत पदापर्ण करत आहे. फार खळखळ न करता मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला, पण मराठवाड्यासाठी लागू असलेल्या नागपूर करारानुसार, मराठवाड्याच्या पदरात या ५९ वर्षांत फार काही पडलेले नाही. मराठवाडा अविकसित राहण्याचे मूळ या अपेक्षाभंगात असून झुकते माप सोडाच, हक्काचेही फार काही मिळालेले नाही.

मराठवाड्याच्या विस्मृतीत गेलेल्या नागपूर करारातील ११ कलमे व त्यानुसार गेल्या ५९ वर्षांत काय अपेक्षापूर्ती झाली याबद्दल मराठवाड्यातील अभ्यासक व मराठवाडा जनता विकास परिषदेच्या नेत्यांसोबत चर्चा केली असता अपेक्षाभंगाचे दु:ख व्यक्त झाले. मराठवाड्यात सध्या तीन लाख कोटी रुपयांचा भौतिक अनुशेष आहे. मराठवाडा (वैधानिक) विकास मंडळाची अवस्था दात काढलेल्या वाघासारखी झाली आहे, याबद्दल मराठवाड्याच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या अनेकांनी दु:ख, संताप व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या शब्दाची 'किंमत' ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. \B

करारातील ११ पैकी ठळक कलमे \B

- खर्च करावयाच्या निधीचे वाटप, त्या प्रदेशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केले जाईल. परंतु, मराठवाड्याची अविकसित स्थिती लक्षात घेता त्या भागाच्या सर्वांगीण विकासाकडे खास लक्ष दिले जाईल. त्याचा अहवाल राज्य विधानसभेपुढे दरवर्षी ठेवण्यात येईल.

- धंदेव्यवसाय, वैज्ञानिक व इतर खास प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्थांतील प्रवेशात लोकसंख्येच्या प्रमाणात समान संधी उपलब्ध दिली जाईल.

- सरकारी किंवा सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांतील सर्व श्रेणीतील नोकऱ्या देताना त्या त्या विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्थान दिले जाईल.

नागपूर करार केवळ विदर्भापुरताच नसून मराठवाड्यालाही त्यातील प्रमुख तरतुदी लागू आहेत. याची सभागृहाला कदाचित जाणीव नसेल. नागपूर करारातील ज्या तरतुदी मराठवाड्याला उद्देशून आहेत त्या सर्व शर्तींचे देखील पूर्णत: पालन केले जाईल, असे निवेदन मी करू इच्छितो.

-\Bयशवंतराव चव्हाण \B

(त्यावेळचे मुख्यमंत्री, विधिमंडळापुढे केलेल्या निवेदनातून)

या पूर्वीच्या सरकारांकडून, तर अपेक्षापूर्ती झालीच नाही. सध्याच्या सरकारने मराठवाडा व विदर्भाचा विकास हा विषय अजेंड्यावर राहील, असे म्हटले होते. पण, या सरकारनेही निराशा केली. येथील संस्था विदर्भात नेल्या. तीन वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत जाहीर केलेल्या ४९ हजार कोटी रुपयांपैकी निम्मा निधीही मिळाला नाही.

-अॅड. प्रदीप देशमुख, माजी अध्यक्ष, मजविप

नागपूर करारानुसार नोकऱ्या मिळाल्या नाहीत. नोकरभरती करताना त्याचा आढावाच घेतला जात नाही. मराठवाड्याच्या विशेष अधिकारांबद्दल २००८पासून राज्यापालांसोबतची बैठकही झाली नाही. गेल्या ५९ वर्षांत मराठवाड्याच्या पदरी निराशाच आली आहे. मराठवाड्यातील जनता सहनशील असली, तरी सरकारनेही वचन पाळलेले नाही.

- डॉ. व्यंकटेश काब्दे, अध्यक्ष, मजविप

मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाबद्दलचा अहवाल दरवर्षी विधिमंडळासमोर ठेवला जाईल, असे नागपूर करारात स्पष्टपणे म्हटलेले आहे. पण, हे पाळलेले नाही. झुकते माप सोडाच, हक्काचेही मिळत नाही. हक्काचे पाणी न देता येथील शेती मारली, अनेक ठिकाणी एमआयडीसीचे फक्त बोर्ड असून जमीन पडीक ठेवली आहे.

- डॉ. सोमनाथ रोडे, कार्यकारी मंडळ संचालक, मजविप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images