Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

काँग्रेस सदस्यांकडून वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली

$
0
0

लोगो - चर्चा तर होणारच

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

काँग्रेससोबत असलेली जिल्हा परिषदेतील अभ्रद युती शिवसेनेने दिलेल्या वचनाप्रमाणे लवकर तोडावी, अशी मागणी भाजपने पुन्हा एकदा केली आहे. याबाबत आठवड्याभरात सेनेसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी 'मटा'शी बोलताना दिला. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या काही सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याआधीपासूनच ही आघाडी शिवसेनेने तोडावी, असा आग्रह भाजपकडून केला जात आहे. महापौर बंगल्यावर युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचा हात सोडणार, असा शब्दही दिला होता. लोकसभेसाठी जिल्ह्यात मतदान झाले असून आतातरी शिवसेनेने दिलेला शब्द पाळावा व त्यानुसार अंमलबजावणी केली पाहिजे, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी 'मटा'शी बोलताना केली.

जिल्हा परिषदेत भाजप व शिवसेनेचे संख्याबळ अधिक असून सत्ता स्थापन करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असे सांगत त्यांनी येत्या आठ दिवसांत सेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी माहिती दिली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याबाबत 'मटा'शी बोलवाता पहिली अडीच वर्षाची टर्म पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असून त्यानंतरच पुढील कार्यवाही होईल, असे नमूद केले.

दरम्यान, एकीकडे या हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार समर्थक सदस्यांनी वेगळा गट स्थापनेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. सत्तार समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव तायडे यांनी याबाबत बोलताना सुमारे दहा सदस्य सोबत असल्याचा दावा केला. आम्ही स्वतंत्र गट स्थापन करणार असून साधारणत: सप्टेंबर महिन्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होईल, त्यावेळी आमदार सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे हा तायडे व समर्थक सदस्य नेमकी काय भूमिका घेता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहाव्या दिवशी नळाला पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

आटलेल्या विहिरी, निम्म्याहून अधिक बंद पडलेले हातपंप, टँकरच्या अनियमित खेपा, विजेचे भारनियमन व लंपडाव यामुळे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठ्याचे नियोजन ढासळले आहे. गावाचा विस्तार पाहता जुन्या पाण्याच्या टाक्या व पाइपलाइन, वाढत्या नळ कनेक्शनची संख्या यामुळे काही प्रभागात जास्त तर काही प्रभागात कमी दाबाने दहाव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठ्यासाठी दोन मध्यम व दोन लघु क्षमतेच्या टाक्यासह विहिरींच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रभागात पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी हतनूर गावासाठी २४ हजार लिटर क्षमतेच्या तीन टँकरच्या हिवरखेडा ( नांदगीरवाडी) येथून ४० किलोमीटर अंतराच्या पाच फेऱ्यातून एक लाख २० हजार लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे, परंतु प्रत्यक्षात दररोज तीन ते चार फेऱ्या होत असल्याने २४ ते ४८ हजार लिटर कमी पाणी उपलब्ध होत आहे. ग्रामपंचायतच्या दोन विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. जैतापूर व अंतापूर शिवारातील अधिग्रहित विहिरींतील जेमतेम पाणी उपलब्ध आहे. गावातील दहापैकी पाच हातपंप पाण्याअभावी बंद आहेत. पाच हातपंपांवर काही प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. विजेचे भारनियमन व लंपडाव यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी ५० रुपये प्रती ड्रम व २० रुपये 'आरओ जार'साठी खर्च करावे लागत आहे. प्रथमच हतनूरच्या ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगाराचा कंपनीत संशयास्पद मृत्यू

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (एक मे) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. कुंडलिक तुळशीराम गाडेकर (४५, रा. रोशनगाव, ता. बदनापूर, जि. जालना ह. मु. नर्सरी कॉलनी रांजणगाव ता. गंगापूर) असे मृत कामगारांचे नाव असून, ते साई पॅकेजिंग कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते.

साई पॅकेजिंग (ई सेक्टर क्रमांक ११६) या कंपनीत आदर्श मॅट या नावाने चटईचे उत्पादन तयार केले जाते. गाडेकर हे मंगळवारी रात्री आठ वाजता कंपनीत कामासाठी आले होते. काही वेळाने त्यांना उलटी झाली त्यामुळे ते कंपनीतच झोपले. सकाळी तेथील कामगारांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती सकाळी कळवूनही पोलिस दोन तास उशिरा घटनास्थळी आले. त्यामुळे कामगार व नातेवाईक चिडले झाले होते. कंपनी मालक घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह हलवू नका, अशी नातेवाईक व तेथील कामगारांनी भूमिका घेतली. नातेवाईकांनी, हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले व सुमारे तासभर मृतदेह ठेवला होता. यामुळे ठाण्याच्या आवारात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी पुढील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांना कारवाईचे लेखी आश्वासन दिले.

उद्योजक संजय देशपांडे यांची साई पॅकेजिंग आदर्श मॅट या कंपनीत १२-१२ तास अशा दोन शिफ्टमध्ये चटईचे उत्पादन घेण्यात येते. मंगळवारी रात्री आठच्या शिफ्टमध्ये दहा कामगार काम करीत असताना पुंडलिक तुळसीराम गाडेकर या कामगाराचा उलट्या झाल्याने त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. गाडेकर यांचा मृत्यू झाला की, हा घातपात आहे, याचा पोलिस तपास करत आहे.

दरम्यान, पोलिस कामगाराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टेम शासकीय घाटीत घेऊन जात असताना नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करून न्याय मिळावा या मागणीसाठी ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे सुमारे तासभर मृतदेहाची हेळसांड झाली. ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोस्ट मार्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्युचे कारण कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

\Bपोलिस ठाण्यात 'ठिय्या'\B

कंपनी मालक संजय देशपांडे यांनी मृत गाडेकर यांच्या पत्नी राधा यांना, सकाळी तुमचे पती आजार असल्याचे सांगत होते. त्यांना घरी घेऊन जाण्याचे सांगितले असल्याची माहिती गाडेकर यांच्या पत्नीने दिली. कामगार दिनाच्या दिवशीच कंपनीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यावर विविध संघटनेचे व पक्षाचे कार्यकर्ते मृताच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी दिवसभर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. शेवटी या प्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची उपस्थित कामगारांत चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’ मध्ये संधी मिळाली नाही, नाराजांची धग कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये संधी मिळाली नसल्यामुळे शिवसेनेचे अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीची धग अद्याप कायम आहे. त्याचा परिणाम आगामी काळात शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणावर होताना दिसेल असे बोलले जात आहे.

पालिकेच्या स्थायी समितीचे १६ पैकी ८ सदस्य १ मे रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी २६ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. शिवसेनेचे पाच सदस्य स्थायी समितीतून निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नवीन पाच सदस्य नियुक्त करताना खासदार खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांना संधी देण्यात आली. खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे निवृत्त होणाऱ्या आठ जणांमध्ये होते. त्यामुळे स्थायी समितीतून मुलगा बाहेर पडताच पुतण्याला संधी दिली असे चित्र निर्माण झाले आहे. स्थायी समितीत पहिल्या वर्षी असलेल्या कमलाकर जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली.

स्थायी समितीवरील आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी एप्रिल महिन्याच्या पहिलाच आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सदस्यांची नियुक्ती झाली असती तर लोकसभा निवडणूकीत शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले असते. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारावर देखील परिणाम झाला असता, त्यामुळे स्थायी समितीच्या सदस्यांची निवड खुबीने पुढे ढकलण्यात आली. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यावर नियुक्त्या करण्यात आल्या. त्यातही पक्षपात केल्याचा आरोप आता नगरसेवक उघडउघड करीत आहेत. यशश्री बाखरिया यांना स्थायी समितीत संधी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी महापौरांकडे नाराजी व्यक्त केली. सीमा खरात देखील स्थायी समिती सदस्यत्वाच्या दावेदार होत्या. विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण बोलण्याची त्यांची हातोटी आहे. त्यांना देखील स्थायी समितीतून डावलण्यात आले. अन्यही काही नगरसेवक स्थायी समितीचे प्रबळ दावेदार होते. त्यांचा विचार देखील करण्यात आला नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीचे प्रकरण येत्या काळात चांगलेच गाजणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर त्याचे पडसाद उमटतील असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकलेले बिल द्या, मुलीचे लग्न मोडायची वेळ आली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

थकलेले बिल द्या, मुलीचे लग्न मोडायची वेळ आली आहे, असे म्हणत गुरुवारी एका कंत्राटदाराने थेट महापौरांना साकडे घातले. महापौरांनी देखील असमर्थता व्यक्त केली. 'मी कुणाला सांगू, आयुक्त नाहीत. मुख्य लेखाधिकारी जागेवर बसत नाहीत' असे ते त्या कंत्राटदाराला म्हणाले.

महापालिकेत काम करणाऱ्या सुमारे दीडशे कंत्राटदारांचे पेमेंट बाकी आहे. थकलेल्या पेमेंटची रक्कम सव्वादोनशे कोटींवर पोचली आहे. केलेल्या कामाचे बिल मिळावे यासाठी कंत्राटदार दिवाळीपासून प्रशासनाच्या व पदाधिकाऱ्यांच्या मागे लागले आहेत. याचसाठी कंत्राटदारांनी दोन वेळा पालिकेच्या समोर उपोषण केले. सर्वसाधारण सभेच्या वेळी आयुक्त व महापौरांना घेराव देखील घातला. आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. हे सर्व करूनही त्यांचे थकीत बिल मिळाले नाही.

गुरुवारी एक कंत्राटदार महापौरांच्या दालनात आला आणि त्याने महापौरांना आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. लग्नाला या, पण त्या अगोदर पालिकेकडे थकलेले बिल मिळवून द्या, अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. लग्नाचा खर्च कसाबसा जमवला आहे. मुलीच्या अंगावर दागीने घालण्यासाठी आता पैसे नाहीत. दागीने घातले नाहीत तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे पैसे द्या, नाहीतर मुलीचे लग्न मोडेल, असे त्या कंत्राटदाराने महापौरांना सांगितले. नंतर तो म्हणाला, तसे होणार नाही, होणाऱ्या जावयाला आम्ही सर्व परिस्थिती सांगितली आहे. जावई समजूतदार मिळाला म्हणून ठिक झाले नाहीतर मुलीचे लग्न मोडलेच असते. आता तरी आम्हाला मदत करा, अधिकाऱ्यांना सांगून बिल काढून द्या, अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी असमर्थता दाखवली. कुणाला सांगू, आयुक्त नाहीत, मुख्य लेखाधिकारी कार्यालयात बसत नाही. प्रभारी आयुक्त तेवढे लक्ष देत नाहीत असे महापौर त्या कंत्राटदाराला उद्देशून म्हणाले. तरीपण जमेल ती मदत करतो, असे सांगून त्यांनी त्या कंत्राटदाराला वाटी लावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्याच महिन्यात पालिकेच्या तिजोरीत १२ कोटी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक वर्षाच्या पहिल्यात महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात तब्बल बारा कोटी ८८ लाख रुपये जमा झाले. मालमत्ता कर अॅडव्हान्स भरल्यास त्यात सूट मिळते. त्यामुळे अनेक नागरिक स्वत:हून कर भरतात. अशा नागरिकांच्या माध्यमातून एप्रिल महिन्यात १२ कोटी ८८ लाख रुपये जमा झाले, परंतु पालिकेच्या तिजोरीची सध्याची स्थिती नाजूकच असल्याचे लेखा विभागातून सांगण्यात आले. तिजोरीत केवळ एक कोटी ७० लाख रुपये असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचडीएफसी’च्या शाखेला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोकणवाडी भागातील एचडीएफसी बँकेच्या शाखेला बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तीन बंब आणि दोन टँकरचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

बुधवारी कामगार दिनाची सुट्टी असताना देखील बँकेमध्ये दोन कर्मचारी आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते. सव्वाअकराच्या सुमरास बँकेत आग लागल्याची माहिती व्यवस्थापक विशाल गौड यांनी दिली. घटनास्थळी पद्‌मपुरा, सिडको विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला एका तासात यश आले. तोपर्यंत आगीमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या कामांचा खोळंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आयुक्तांच्या पाठोपाठ वरिष्ठ अधिकारी देखील सुट्टीवर गेल्यामुळे महापालिकेचे काम खोळंबले आहे. सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे सुरू असलेली कामे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर काही कामे अद्याप सुरुच झाली नाहीत.

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक परीक्षेसाठी सुट्टीवर गेले आहेत. त्यांची दहा दिवसांची रजा शनिवारी संपणार आहे. आयुक्त सुट्टीवर गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ पालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी देखील सुट्टीवर निघून गेले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी सर्व विभागात फेरफटका मारून अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली तेव्हा अनेकजण गैरहजर असल्याचे लक्षात आले. अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी रजेवर गेले आहेत. दक्षता विभागाचे प्रमुख तथा सिडको पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार अपर्णा थेटे हे अधिकारी देखील सुट्टीवर आहेत. अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे कार्यालयीन कामाच्या निमित्ताने मुंबईला गेले आहेत. सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्यांकडे चार-चार, पाच-पाच विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्याशिवाय काही अधिकारी निवृत्त झाले आहेत. रजेवर गेलेले अधिकारी आणि निवृत्त झालेले अधिकारी यांची जागी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे.

महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यात सव्वाशे कोटींच्या रस्त्यांची यादी, १०० कोटींच्या निधीतून सुरू करण्यात आलेली रस्त्यांची कामे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविणे, छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाचे नूतनीकरण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, बाळासाहेब ठाकरे यांचे म्युरल्स बसवण्याचे काम, पाणी पुरवठा विभागातील अत्यावश्यक कामे, रखडलेले कचरा प्रक्रिया प्रकल्प आदी कामांचा समावेश आहे. अधिकारी नसल्यामुळे ही कामे रखडली आहेत, असे आता स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, 'प्रशासनामध्ये सुसूत्रता नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे. लेखा विभागात देखील अधिकारी-कर्मचारी फारच कमी उपस्थित होते. मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे कधीच कार्यालयात नसतात. जे अधिकारी सुट्टीवर गेले आहेत त्यांच्या जागी पर्यायी अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती होणे गरजेचे आहे, पण तसे झालेले नाही. निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची पदे देखील रिक्त आहेत. त्यामुळे कार्यालयात उपस्थित असलेल्या आणि गैरहजर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबद्दलचा सविस्तर अहवाल देण्यास आस्थापना विभागाला सांगितले आहे. अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना धान्यवाटप करावे

$
0
0

औरंगाबाद: उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांना थेट डाळ, तांदूळ तेल वाटप करावे, अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे.

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ४०२८ दुष्काळी व टंचाईसदृष्य शाळांमधून उन्हाळी सुट्यात खिचडी वाटप करावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र उन्हाळ्यात ऐन सुटीच्या काळात एकही विद्यार्थी शाळेत येत नाही या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने दररोज खिचडी वाटप करण्याचा आदेश जारी आहे. विद्यार्थी नाही तरी शाळेवर जाऊन सुट्यांवर पाणी सोडायचे ही कुठली रित? असा सवाल ही मंडळी विचारत आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील २६ जिल्ह्यांतील तब्बल ४०२८ गावे दुष्काळी तथा टंचाईसदृश असून या गावच्या शाळांमधून उन्हाळी सुटीत मध्यान्ह भोजन योजना सुरु ठेवण्याबाबत १६ मार्च २०१९ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना एका पत्रकाद्वारे आदेश जारी केले आहेत. इतकेच नाही तर अपेक्षित उपस्थिती नुसार तांदूळ पुरवठाही केला आहे.

या योजनेबाबात उद्देश कितीही चांगला असला विद्यार्थी सुटीच्या काळात शाळेत येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, शिवाय गावोगाव तीव्र पाणीटंचाई असल्याने शालेय पोषण आहार शिजविणे जिकिरीचे बनले आहे. त्यासाठी अट्टाहास न करता संपूर्ण सुटीच्या कालावधीत पुरेल इतक्या प्रति विद्यार्थी विहित मोजमापानुसार तांदूळ, डाळ, तेलाचे वाटप करावे, काही शाळांमध्ये खरोखर विद्यार्थी शाळेत येणार असतील तर त्या शाळेत सुटीत काम करणाऱ्या शिक्षकांना सुटीच्या कालावधीत काम केलेल्या दिवसाइतकी अर्जित रजा मंजूर करावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे,सुनील चिपाटे,संतोष ताठे,मच्छिंद्र भराडे,मच्छिंद्र शिंदे,रमेश जाधव,राजेश भुसारी, महेंद्र बारवाल,दत्तात्रय गायकवाड,बाबासाहेब जगताप,विनोद पवार, शगुफ्ता फारुकी,सुषमा खरे,रोहिणी विद्यासागर,उर्मिला राजपूत आदींनी केली आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने पावणेपाच लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपनीसाठी दोन कोटी कुपये प्रकल्प कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत रेल्वे स्टेशन एमआयडीसी येथील उद्योजाकाला चार लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन संशयित आरोपीविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेंद्र राधेशाम मंडोरे (वय ४५, रा. रेल्वे स्टेशन एमआयडीसी) यांनी तक्रार दाखल केली. राजेंद्र आणि त्यांचा भाऊ अश्विन यांची एमआयडीसी भागात बटाट्याचे चिप्स बनवण्याची कंपनी आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये राजेंद्र मंडोरे हे मुंबईवरून औरंगाबादला येत होते. यावेळी त्यांचा परिचय चंद्रकांत राव (रा. मुंबई) नावाच्या व्यक्तीसोबत झाला. यावेळी मंडोरे यांनी त्याला आपली फॅक्टरी असल्याची माहिती दिली. यावेळी राव याने अशा प्रकारच्या फॅक्टरीला उद्योग विकास महामंडळ, मुंबई येथून प्रोजेक्ट लोन मिळवून देण्याचे काम मी करतो. माझा मित्र कृपाल कांबळे याचे काका हर्षदीप कांबळे हे उद्योग विकास आयुक्त आहेत. तुम्हाला लोनची गरज पडल्यास मला सांगा, असे म्हणत व्हिजिटिंग कार्ड दिले. राजेंद्र यांनी घरी आल्यानंतर भावासोबत चर्चा केली. व्यवसाय वाढवण्यासाठी आपण कर्ज घेऊ असा विचार त्यांनी केला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी चंद्रकांत राव याच्यासोबत संपर्क साधत त्याला बोलावून घेतले. यावेळी रावने दोन कोटी कर्ज मंजूर करून देतो, त्यात दीड कोटी रुपये सबसिडी करून देतो मात्र, त्यासाठी २५ लाख रुपये कमिशन मला द्यावे लागेल, असे सांगितले. हे कमिशन तुमचे काम टप्प्याटप्प्यांने होईल तसे द्या, असे सांगितले. यानंतर अॅडव्हान्सच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यात राव याने मंडोरे यांच्याकडून चार लाख ८० हजार रुपये उकळले. ही रक्कम त्याने रोख आणि बँक खात्यामार्फत घेतली. यानंतर देखील २० लाख २० हजार रुपये द्या अन्यथा तुमचे काम होणार नाही, असे म्हणत त्याने विश्वासघात केला. मंडोरे यांनी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला असता राव यांचा मोबाइल बंद दाखवण्यात आला. याप्रकरणी मंडोरेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंद्रकांत राव आणि कृपाल कांबळे यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक हात मदतीचा’ उपक्रमासाठी चार पेट्या साहित्य झाले जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

गरजू व्यक्तीला मदत करण्याच्या उद्देशाने महापालिकेने सामाजिक दृष्टीकोनातून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम १ मे पासून सुरू केला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पहिल्या दिवशी सुट्टी असल्यामुळे या उपक्रमाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, पण गुरुवारी चार पेट्या साहित्य जमा झाले. सात मे पर्यंत साहित्य जमा केले जाणार आहे.

आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या कल्पनेतून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना या उपक्रमासाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आहे. जुन्या कपड्यांसह उपयोगात येणारे जुने साहित्य त्यांनी यासाठी द्यावे, असे अधिकारी-कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आहे. आतापर्यंत चार ट्रक साहित्य जमा झाले. साहित्य जमा करण्यासाठी पालिका मुख्यालयात सुरक्षा रक्षकाच्या केबीन जवळ तंबू टाकण्यात आला आहे. तंबूमध्ये दोन कर्मचारी बसवण्यात आले आहेत. साहित्य जमा करण्यासाठी खोके ठेवण्यात आले आहेत. पालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होऊन एक हात मदतीचा पुढे करू शकणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणकडे पालिकेची बाकी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने महावितरणच्या विविध सुविधांवर लावलेल्या करातून थकीत बिलाचे पैसे चुकते होतील. शिवाय महावितरणलाच पालिकेकडे अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असा दावा मंगळवारी झालेल्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एन. सोरमारे उपस्थित होते. बैठकीत खासदार खैरे यांनी पालिकेकडे थकलेल्या वीज बिलाचा मुद्दा मांडला. यावेळी महापौर म्हणाले, 'महापालिकेने महावितरणाच्या विविध सुविधांवर कर लावला आहे. अनेक सुविधांवर कर लावायचा आहे.त्यामुळे थकबाकी, खड्डयांपोटी परत करायचे पैसे पालिकेला परत करण्याची गरज पडणार नाही. उलट पालिकेकडेच महावितरणला पैसे भरावे लागतील. या कराबाबत कायदेशीर कारवाईही केली जाईल,' असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी वीज सेवा खासगीकरणाचा मुद्दा निघाला. याबाबत खैरे म्हणाले, 'ऊर्जामंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहणार आहे. यापूर्वीचा वीज सेवा खासगीकरणाचा प्रयत्न फसला आहे. यामुळे ६०० कोटी रुपयांचा फटका कंपनीला बसला आहे. पुन्हा असे नुकसान करून घेऊ नका,' असा सल्ला देणार असल्याचे सांगितले. वीजेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आगामी जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटींची मागणी करा, अशी सूचना खैरे यांनी केली. तर मुख्य अभियंता गणेशकर यांनी जालना जिल्हा नियोजन समितीत दहा कोटींची मागणी केल्याचे सांगितले. त्यानुसार दहा कोटींची मागणी करू, असे खैरे म्हणाले.

\Bवीज रिडिंग न घेता बिल

\Bवीजेमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. वीज रिडिंग न घेता वीज बिल दिल्यामुळे अनेक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहितीही समोर आली. अशा एजन्सी चालकांवर कारवाई केल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. सौर कृषिपंप महापालिकेच्या उद्यान विभागाला मिळेल का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर गणेशकर यांनी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगितले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षारक्षक खून; दोघांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेंद्रा एमआयडीसी परिसरात सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याप्रकरणी आवेज खान दोस्त मोहम्मद खान व आदिल खान नादेर खान या संशयित आरोपींना गुरुवारी (२ मे) रात्री साडेनऊला अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर केले असता, त्यांना रविवारपर्यंत (५ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू. पी. देवर्षी यांनी दिले.

या प्रकरणी मृत रिजवान खान रशीद खान (वय ३६) याचा लहान भाऊ मेहराज खान रशीद खान (वय २७, रा. उस्मानपुरा) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, दोघेही सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. सिल्लेखाना येथील अब्दुल गनी कुरेशी यांच्या मालकीची नूर एंटरप्रायजेस नावाची कंपनी पाच वर्षांपासून बंद आहे. या कंपनीच्या मालकीहक्कावरून कुरेशी व त्यांचे भागीदार साजीद कुरेशी, खालेद अबू तुराब यांच्यात वाद सुरू आहे. सध्या कंपनीवर अब्दुल गनी कुरेशी यांचा मालकी हक्क आहे. या ठिकाणी मृत रिजवान खान रशीद खान हे सुरक्षारक्षक म्हणून ९ वर्षांपासून काम करीत होते, तर फिर्यादी हादेखील तीन वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहे. दोघे भाऊ बुधवारी रात्री कंपनीत असताना खालेद अबू तुराब, आवेशखान दोस्त मोहम्मद खान, आदिलखान नासेरखान, माजिद व कैसर कुरेशी हे आरोपी कंपनीत आले असता, रिझवान यांनी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला. त्यावरुन वाद होऊन खालेद तुराब याने रिझवान यांच्या पोटात चाकुने गंभीर वार केला. त्यामुळे रिझवान कोसळले. भावाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या फिर्यादीवरही आरोपींनी वार केला. त्यानंतर रिझवान यांना घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन, खालेद अबू तुराब (३९, रा. नवाबपुरा) व शेख अब्दुल माजिद शेख अब्दुल हमीद (३८, रा. मंदूरपुरा) या आरोपींना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अटक करुन गुरुवारी कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्यांना रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर आवेज खान दोस्त मोहम्मद खान (२०, रा. जामा मशिदीसमोर) व आदिल खान नादेर खान (२५, रा. कटकट गेट) या आरोपींना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अटक करण्यात आली.

\Bचाकू, चारचाकी जप्त करणे बाकी

\Bआवेज व आदिल या आरोपींना कोर्टात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेला चाकू व चारचाकी वाहन जप्त करणे बाकी असून, आरोपींचा गुन्हा करण्यामागचा नेमका उद्देश काय होता, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का आदींबाबचा तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती जरिना दुर्राणी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींनाही रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’भोवती अभूतपूर्व बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभेच्या खासदाराचे भवितव्य बंद असलेल्या मतदान यंत्रे (ईव्हीएम मशीन) चिकलठाणा 'एमआयडीसी'मधील मेल्ट्रॉन कंपनीत तयार केलेल्या स्ट्राँगरूमघध्ये ठेवण्यात आले आहेत. या स्ट्राँगरुममध्ये आणि परिसरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

औरंगाबाद लोकसभेचे मतदान २३ मे रोजी पार पडले आहे. मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन कडेकोट पोलिस बंदोबस्तात चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन कंपनीमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरुमसाठी शहर पोलिस दल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने अत्यंत कडेकोट सुरक्षायोजना तयार केली आहे. या रूमच्या आतमधल्या सर्कलमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाची सशस्त्र तुकडी तैनात करण्यात आली आहे. रूमबाहेरील सर्कलमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सशस्त्र तुकडी तैनात करण्यात आली आहे. रुमच्या बाहेरील परिसरात २४ तास बंदोबस्तासाठी चार सहायक फौजदार आणि १६ कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. त्यांना दोन शिफ्टमध्ये बंदोबस्त देण्यात आला आहे.

स्ट्राँगरुमच्या मागील आणि पुढील बाजूला या कर्मचाऱ्यांनी पहारा द्यायचा आहे; तसेच या स्ट्राँगरूममध्ये, परिसरात रात्रीच्या अंधारातही स्पष्ट चित्रिकरण केले जाईल असे 'हाय डेफिनेशन'चे कॅमेरे लावण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. त्याचबरोबर पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि दोन पोलिस निरीक्षकांची कायम गस्त ठेवण्यात आली आहे. त्याच्या नोंदी येथे केल्या जात असल्याची माहिती विशेष शाखेच्या सूत्रांनी दिली.

अधिकाऱ्यांकडूनही तपासणी

लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदानयंत्र मेल्ट्रॉन येथील स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्यात आल्या असून, स्ट्राँगरुमवर पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच अधिकाऱ्यांचेही कडक मॉनिटरिंग सुरू आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या राजपत्रित अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक चार तासाला स्ट्राँगरुमला भेट द्यावी लागत आहे. या शिवाय प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही स्ट्राँगरुमला भेट देणे बंधनकारक असल्याने हे अधिकारीही भेटी देत आहेत. स्ट्राँगरुमला अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्येक भेटीची नोंदही 'लॉक बुक'मध्ये करून ठेवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनी फोडून फुलवली शेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जालना शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे एअर व्हॉल्व्ह फोडून चोरलेल्या पाण्यातून शेत फुलवणाऱ्या १२ जणांवर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. जालना नगर पालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी जालना आणि पाचोड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

चार वर्षांपूर्वी जायकवाडी धरणातून जालना शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी अडीचशे कोटी रुपये खर्चून पाइपलाइन टाकण्यात आली होती. पाचोड ते पैठण यादरम्यान ३४ ठिकाणी या पाइपलाइनचे एअर व्हॉल्व्ह काढण्यात आले आहे. जायकवाडीतून उपसा होणाऱ्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी देखील जालन्याला मिळत नसल्याने जालना नगर पालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली. यापूर्वी जालना नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करून ४० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. गुरुवारी जालना नगर पालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात जायकवाडीतून जालना शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइप लाइनची पाहणी केली. यामध्ये लिंबगाव, थेरगाव, हर्षी, दादेगाव ते दावरवाडीपर्यंत १२ जणांनी एअर व्हॉल्व्ह फोडून पाइप लाइनद्वारे विहिरीत पाणी घेतले व या पाण्यातून शेती फुलवल्याचे दिसून आले.

पाइप लाइन उकरून काढल्याप्रकरणी जालना नगर पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी अशोक निर्मळ, बबन कर्डिले, आप्पासाहेब शेरकर, श्रीमंत लबडे, सोमनाथ निर्मळ, एकनाथ कोल्हे, अनिल भवरे, संतोष आगळे, भिसे, तळपे, हजारे व घायाळ (पूर्ण नाव उपलब्ध नाही) या १२ जणांविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेची नासधूस प्रतिरोधक अधिनियम १९८४ अन्वये कलम ४३०, ३४, भारतीय दंड संहिता कलम ३ (२)प्रमाणे गुन्हे दाखल केले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिकाम्या इमारतीमधील भंगार सामानाला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अमरप्रीत हॉटेल चौकाजवळील एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या भंगार साहित्याला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमासार घडली. इमारतीच्या खिडक्यामधून धूर येत असल्याने हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन बंबानी घटनास्थळी धाव घेतली. तळमजल्याचे कुलूप तोडून आग विझवण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला अटक, कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी संतोष रामदास गायकवाड याला बुधवारी (एक मे) रात्री अटक करून गुरुवारी कोर्टात हजर केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार; कटकटगेट परिसरातील फलकनुमा शादी हॉलमध्ये २४ एप्रिल रोजी संबंधित मुलगी नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. लग्नसोहळा सुरू असताना बाहेर थांबलेला संतोष रामदास गायकवाड (२६, रा. मुर्शीदाबादवाडी, ता. फुâलंब्री, जि. औरंगाबाद) हा तेथे आला व त्याने बोलण्याचा बहाणा करीत मुलीला हॉलबाहेर आणून रिक्षात बसून वडगाव कोल्हाटीला पळवून नेले. तिचा शोध घेऊनही ती न सापडल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आल्यानंतर, आरोपी संतोष गायकवाड याने पळवून नेऊन वडगाव कोल्हाटी येथील खोलीमध्ये सतत चार दिवस अत्याचार केल्याचे मुलीने दिलेल्या जबाबत म्हटले. या जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, मुलीला कुठे डांबून ठेवले होते, याचा तपास करावयाचा असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उधारीच्या पैशावरून तरुणावर ब्लेडने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उधारीच्या २०० रुपयांच्या वादावरून तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा प्रकार बुधवारी सकाळी ११ वाजता मुकुंदवाडी भागातील जगताप शाळेजवळ घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अजय गमतीदास काळे (वय २२, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याने तक्रार दाखल केली. अजय हा बुधवारी सकाळी जगताप शाळेजवळ बसलेला होता. यावेळी संशयित आरोपी निखिल आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी आले. निखिलने अजयला माझे उधार घेतलेले २०० रुपये परत दे, अशी मागणी केली. यावेळी अजयने सध्या माझ्याजवळ पैसे नाही नंतर देतो, असे सांगितले. यावरून वाद होऊन निखिल आणि त्याच्या मित्राने अजयला मारहाण सुरू केली. निखिलने ब्लेडने अजयच्या तोंडावर व हातावर वार केले. या घटनेत अजयच्या गालावर तीन टाके पडले. याप्रकरणी अजयच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमादार काटकर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचे वजन घटविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोट सुटणे ही पोलिसांपुढे मोठी समस्या आहे. ढेरपोटे झाल्यानंतर या पोलिसांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. पोलिसांची ही समस्या सोडवण्यासाठी आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच मनावर घेतले आहे. शहर पोलिस दलात पोट सुटलेल्या पोलिसांची यादी तयार करण्यात आली असून, यांचे वजन कमी करण्यासाठी विशेष उजळणी वर्ग घेण्यात येत आहे.

पोलिस दलात फिटनेस हा कायम असावा लागतो. गुन्हेगारांचा पाठलाग, दंगल काबू आणणे, आपत्कालीन प्रसंगी होणारी धावाधाव यासाठी हा फिटनेसपणा पाहिजे मात्र, अनेक पोलिस कर्मचारी याबाबीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांचा स्थुलपणा वाढत जाऊन ते ढेरपोटे होते. या ढेरपोटे पोलिसांकडून पोलिस दलाला साजेसे काम होत नाही. नाईलाजाने अधिकाऱ्यांना यांना बैठे काम द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शहर पोलिस दलातील स्थूल पोलिसांचे वेगळे उजळणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शहर पोलिस दलातील सर्व पोलिस ठाणी, शाखा येथील स्थूल पोलिसांची यादी मागवण्यात आली आहे. या उपक्रमाला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये या स्थूल पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांची रक्तदाब, मधुमेह आदी तपासण्यात येणार आहे. सध्या ३२ जणांची या उजळणी शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यांने आणखी स्थूल पोलिसांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या स्थूल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये त्यांना योगासने, मेडिटेशन, वैद्यकीय मार्गदर्शन तज्ज्ञामार्फत करण्यात येणार आहे.

स्थूल पोलिसांसाठी विशेष उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना मेडिटेशन, योगासने आदी तज्ज्ञांमार्फत शिकवण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये स्थूल पोलिसांचे वजन किमान पाच ते सात किलो कमी होईल, अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

- डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त, मुख्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याचा डोंगर हटवा, महापौरांकडे शेतकऱ्यांची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया प्रकल्प जेव्हा सुरू करायचा तेव्हा सुरू करा, पण तोपर्यंत चिकलठाणा येथील केंद्रावर साचलेला कचऱ्याचा डोंगर हटवा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे केली. पावसाळ्यापूर्वी कचऱ्याचा डोंगर हटला नाही तर शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. पाहणी करीत ते चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्राच्या जागेवर आले. या ठिकाणी सुरू असलेले काम पहात असतानाच त्यांना काही शेतकऱ्यांनी गाठले. कचरू कावडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा महापौरांच्या समोर मांडल्या. प्रक्रिया केंद्रावर सध्या सुमारे ३० ते ३५ हजार टन कचरा पडून आहे. पाऊस आता तोंडावर आला आहे. २४ मे रोजी रोहिण्या निघणार आहेत. त्यानंतर पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. कचऱ्याच्या डोंगरावर पाऊस पडल्यानंतर कचऱ्याचे पाणी जमिनीत मुरेल आणि चांगल्या शेतजमिनी खराब होतील. विहिरींना दूषित पाणी येईल, असे त्यांनी महापौरांना सांगितले. कचऱ्याचा डोंगर हटविण्यासाठी ६ एप्रिल ही डेडलाइन महापालिकेने आम्हाला दिली होती. आता मे महिन्याची सहा तारीख येत आहे, पण कचऱ्याचा डोंगर हटविण्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. कचऱ्याचा डोंगर हटवून जागा रिकामी करण्याचे काम युद्धपातळीवर करा, असे कावडे महापौरांना म्हणाले.

महापौरांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यावर साचलेला कचरा देखील कमी होईल, तुम्ही काळजी करू नका, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांना त्यांनी तशा सूचना दिल्या. या नंतरही शेतकरी समाधानी नव्हते. पाऊस पडल्यावर कचऱ्यामुळे शेतीचे नुकसान होणार, असे ते सतत म्हणत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images