Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

रस्त्यांच्या कामाबाबत कंत्राटदारांकडून खुलासे मागवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या निधीतून केल्या जाणाऱ्या कामाची गती फारच कमी आहे. दोन महिन्यात फक्त पाच टक्केच काम झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडून खुलासे मागवा, खुलासे समाधानकारक नसतील कर कारवाई करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी दिले.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. या निधीतून तीस रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे रस्ते चार कंत्राटदारांमध्ये वाटून देण्यात आले आहेत. तीसपैकी तेरा रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. दोन महिन्यापूर्वी ही कामे सुरू झाली, पण कामाची गती समाधानकारक नसल्याचे लक्षात आले आहे. रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौर घोडेले यांनी शुक्रवारी बैठक घेतली. यावेळी अधिकारी व संबंधित कंत्राटदार देखील उपस्थित होते. रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर सुरु करण्यात आलेल्या तेरा रस्त्यांची कामे फक्त पाच ते साडेपाच टक्केच झाल्याचे स्पष्ट झाले. कामे एवढ्या धिम्या गतीने का सुरू आहेत, असे महापौरांनी विचारले. तेव्हा वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. काही कंत्राटदारांनी वाढत्या उष्णतेचे कारण सांगितले. काहिंनी बिल मिळत नसल्याचे सांगितले. बिल लेखा विभागाला सादर केले आहे पण ते मिळाले नाही. बिल मिळेपर्यंत काम गतीने करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी दिला आहे, त्यामुळे तो निधी रस्त्यांच्या कामासाठीच वापरला पाहिजे, असे असताना कंत्राटदारांना बिलाचे पैसे का दिले जात नाहीत, असा सवाल महापौरांनी अधिकाऱ्यांना केला. धिम्यागतीने कामे सुरू असल्यामुळे कंत्राटदारांना नोटीस द्या आणि खुलासे मागवा. प्राप्त झालेले खुलासे समाधानकारक नसतील तर दंडात्मक कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलकुंभांना आता सुरक्षारक्षकांचे कवच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील महत्त्वाच्या जलकुंभांना महापालिकेने आता सुरक्षारक्षकांचे कवच पुरवले आहे. जलकुंभांवर होणारी आंदोलने, त्यातून निर्माण होणारी तणावाची स्थिती. आंदोलनामुळे विस्कळीत होणारा पाणी पुरवठा यातून मार्ग काढण्यासाठी सुरक्षारक्षकांची मदत घेतली जाणार आहे. शिवाय जलकुंभांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे.

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पाणी पुरवठ्याबद्दल नागरिक आणि नगरसेवक आंदोलन करीत आहेत. प्रामुख्याने सिडको-हडको भागात आंदोलनाचे प्रमाण जास्त आहे. सिडको एन ५ आणि एन ७ च्या जलकुंभावर आंदोलन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमा होतात. यामुळे अनेकवेळा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जलकुंभांवर सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत, अशी सूचना पदाधिकारी व काही नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. आता या सूचनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पाणी पुरवठा विभागासाठी २९ सुरक्षारक्षकांची मागणी आस्थापना विभागाकडे करण्यात आली होती. त्यापैकी २६ सुरक्षारक्षक मिळाले आहेत. मिळालेल्या सुरक्षारक्षकांपैकी काहींची नियुक्ती जायकवाडी येथील पंपहाऊसवर करण्यात आली आहे. शहरातील आठ ते दहा प्रमुख जलकुंभांवर देखील सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यात सिडको एन ५, एन ७ येथील जलकुंभांचा समावेश आहे. त्याशिवाय क्रांतीचौक, कोटलाकॉलनी, भडकलगेट, शहागंज, पुंडलिकनगर, विद्यापीठ या ठिकाणच्या जलकुंभांवर देखील सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. हनुमानटेकडी येथील जलकुंभासाठी सुरक्षारक्षकाची गरज आहे, तशी कल्पना आस्थापना विभागाला देण्यात आली आहे. सुरक्षारक्षकांमुळे जलकुंभावर शिस्तीचे वातावरण राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बुलंद छावा मराठा युवा परिषदच्या वतिने छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये विलास उबाळे यांची अध्यक्षपदी, तर स्वागताध्यक्षपदी गणेश तुपे यांची निवड करण्यात आली.

टीव्ही सेंटर येथील विभागीय कार्यालयात माजी समिती अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश सचिव सुरेश वाकडे, प्रदेश उपाध्यक्ष सतीश वेताळ, संघटक मनोज गायके यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यामध्ये शिवाजी पळसकर (स्वागताध्यक्ष), संदीप जाधव (सरचिटणीस), बाबासाहेब वेताळ, रामेश्वर राजगुरे, योगेश देशमुख, सतीश सोनवणे, अनिल तुपे, संदीप तायडे, अविनाश पगार, उमेश चव्हाण, विलास जाधव, रतन काळे (उपाध्यक्ष), संदीप शेळके, अनिकेत पवार, योगेश औताडे, संजय जाधव, रवी औताडे, बाबू चौधरी, विलास पवार, अशोक बडख, ज्ञानेश्वर हरने, कृष्णा औताडे, गिरीष झाल्टे, प्रदीप हारदे (सचिव), मनोज गायके (कोषाध्यक्ष), दिलीप जाधव, तुषार सुरासे, अंबादास सोनवणे, प्रकाश भोकरे, राजू तुपे, प्रकाश असोले, विशाल वेताळ, अशोक पवार, महेश पाटील, सचिन भागवत, मनोज खोसे, चेतन डाखोरे, कार्तिक फरकाडे (सहसचिव), तर शिवराज पाटील, संजय बनकर, गणेश जाधव, काकासाहेब जीवरख, गोपाल वाघ, गोपाल वाघ, सतीश काळे, सुनील राऊतराय, कैलास कुंटे, राजू काकडे, मिलिंद साखळे, रणजित तुरे, अभिजित काकडे, वैभव वेताळ, उमेश वाकडे, शरद पवार, विजय साखळे, रवि गायके, गिरीश मारवाडे, तुषार नरवडे, श्रीकांत गाडेकर, संदीप सपकाळ, कृष्णा बोरसे, शेखर मानकापे, संतोष शिसोदे, सुभाष पवार, सतीश राऊत, राहुल क्षीरसागर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

\Bसांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन\B

१४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त १२ ते १४ मे या दरम्यान विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीबाणीच्या विद्यापीठाला झळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दूषित पाण्याच्या मुद्द्यावर संकटात सापडलेल्या विद्यापीठ प्रशासनाला आता विस्कळीत पाणी पुरवठ्याने आता जेरीस आणले आहे. अभ्यासिकेत पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दुपारी प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार निदर्शने केली. दोन दिवसात 'आरओ प्लँट' सुरू करून पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पाच दिवसांपासून हा प्रश्न धगधगत असताना कुलगुरू प्रो. बी. आर. चोपडे यांनी एकदाही प्रशासनाला संपर्क साधलेला नाही, ते दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाणीप्रश्न कायम आहे. दूषित पाण्यामुळे तब्बल १६६ विद्यार्थिनींना बाधा झाली. वसतिगृहात दूषित पाणीपुरवठा कुणी केला याची चौकशी अजूनही प्रशासनाने केली नाही. विद्यार्थिनींना जेवणातून बाधा झाली, तीव्र उन्हामुळे त्रास झाला, अशी कारणे अधिकारी सांगत आहेत. मात्र, संबंधित विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी असल्याचे डॉक्टरांनी सांगूनही मान्य करण्यास तयार नाही. या प्रकारात पाणी पुरवठादार, स्थावर विभागाचे अधिकारी आणि वसतीगृह निरीक्षक यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रशासनाचा आटापिटा सुरू असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. मागील दोन दिवसांपासून अभ्यासिकेत पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. 'पाणी द्या पाणी द्या', अशा घोषणा देत प्रशासनाचा धिक्कार केला. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दररोज सुरळीत पाणी पुरवठा का होत नाही, शनिवारी-रविवारी वसतिगृहे-अभ्यासिकेत पाणी का नसते असे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. विद्यार्थिनींच्या वसतिगृहासह अभ्यासिकेत दोन दिवसात 'आरओ प्लँट' कार्यान्वित होईल, असे आश्वासन तेजनकर यांनी दिले. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असे विद्यार्थ्यांनी बजावले. दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या १६६ विद्यार्थिनींना विद्यापीठ प्रशासन उपचाराचा खर्च देणार आहे. संबंधित विद्यार्थिनींनी वैद्यकीय बिल रेक्टरकडे जमा केल्यानंतर तत्काळ पैसे देण्यात येतील, असे तेजनकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पाणीप्रश्नावर तेजनकर यांना निवेदन दिले. यावेळी अमोल दांडगे, दीपक बहिर, दीक्षा पवार, पूजा सोनवणे, अजय पवार, पवन राजपूत, परमेश्वर काष्टे, आकाश हिवराळे, पांडुरंग नखाते यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

\Bआंदोलनावेळी अधिकारी गायब\B

अभ्यासिकेत पाणी का नसते या प्रश्नावर प्र-कुलगुरू डॉ. तेजनकर आणि कुलसचिव डॉ. पांडे यांना ठोस उत्तर देता आले नाही. थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. विशेष म्हणजे स्थावर विभागाचे अभियंता रवींद्र काळे आणि कर्मचारी हुसे यांना तेजनकर यांनी फोन केला. मात्र, त्यांनी फोन बंद असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे आंदोलन संपताच काही मिनिटांतच काळे व हुसे हजर झाले. स्वत:च्या बचावासाठी अधिकारी अशी बनवाबनवी नेहमी करतात असा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

\Bअस्वच्छ टाकीत पाल अन् किडे \B

वसतिगृहात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अत्यंत अस्वच्छ असून तळाशी गाळ साचला आहे. नियमित स्वच्छता नसल्यामुळे विद्यार्थिनींचे आरोग्य धोक्यात आले आहे. अधिसभा सदस्य डॉ. योगिता तौर-होके यांनी टाक्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका टाकीत किडे आणि पाल आढळली. या गलथानपणाला जबाबदार कोण असा प्रश्न विद्यार्थिनींनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरच्या पाण्यावर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सरकारने मंजूर केलेल्या २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरमधून तब्बल दहा हजार लिटर पाणी माघारी नेताना एका शासकीय टँकरचालकचा सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील ग्रामस्थांनी भांडाफोड मंगळवारी (३० एप्रिल) रोजी केला. या प्रकारामुळे टँकरचालकांचा हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता याची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्प आटल्याने शिवन्यासह परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे अबाल वृद्ध, महिला यांना सध्या घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने शिवना येथे ३० टन म्हणजेच २४ हजार लिटर क्षमता असलेल्या नऊ टँकरच्या १६ फेऱ्या मंजूर केल्या आहेत. प्रत्यक्षात पुस्तकी तशी नोंद असली तरी, या प्रकारामुळे ही टँकर लॉबिंग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेले दोन महिने टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र, त्याची तपासणी केली जाते किंवा नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा आटापिटा सुरू असताना टँकरचा हा प्रकार जखमेवर मीठ चोळणारा आहे. मंगळवारी अजिंठा - बुलडाणा राज्य रस्त्यावर सखाराम धनवई, सविता सपकाळ, बबिता नेमाडे, सविता सपकाळ, सुमन धनवई, अर्चना सपकाळ, प्रमिला धनवई, सोनूबाई नेमाडे, लता दहितकर, कडूबाई सपकाळ, सविता डोंगरे, लिला धनवई, अंकुश सपकाळ, शंकर धनवई, शेख नदीम आदींनी हे टँकर अडवून हा प्रकार उघड केला. या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टँकरमध्ये उरलेले हे पाणी चालकाला विहिरीत सोडण्यास सांगितले होते. टँकरच्या फेऱ्या आपल्याकडे नियमित सुरू असून, त्यांच्यासोबत ग्रामपंचायत प्रशासनाने एकाची नियुक्ती केली आहे. अजून दोन वाढीव व टँकरचा प्रस्तावही दाखल करण्यात आला असल्याचे सरपंच संतोष जगताप यांनी सांगितले.

\Bजलवाहिनी फोडल्याने पाणीयोजना बंद\B

अजिंठा - बुलडाणा राज्य मार्गाचे काम सुरू असताना धोंडिबा महाराज मंदिरापासून भागवत वस्ती, धनवाई वस्ती, शिवाई नगर, शिक्षक कॉलनी, शिवाजीनगर, जाधव वाडी या वसाहतींना पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतची नळयोजनेची जलवाहिनीच फोडल्याने पाणीपुरवठा गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. नागरिक होरपळत असताना टँकरचे पाणी परत कसे नेले जाते, याचे उत्तर मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ सखाराम धनवई यांनी केली आहे. हा प्रकार धक्कादायक असून, यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिरण्य’मध्ये घुमले ‘हार्प’चे सूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र दिनानिमित्त हिरण्य रिसॉर्ट्सच्या हिरवळीवर रम्य सायंकाळी 'हार्प' या अनोख्या वाद्याचे सूर उमटले. 'अभिजात महाराष्ट्र'च्या मेजवानीचा आनंद रसिकांनी घेतला.

दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरण्य रिसॉर्ट येथे दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या संध्येला 'अभिजात महाराष्ट्र' या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा कार्यक्रमाचे ६वे वर्ष होते. या कार्यक्रमात मराठवाड्यातील एका युवा कलाकारांना आपल्या कलाविष्काराची संधी देण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त एखाद्या अनवट वाद्यकलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. जे वाद्य कधी औरंगाबादेतील रसिकांना पहायला, ऐकायला मिळाले नाही त्याची अनुभूती करवून देण्यात आली. यावर्षी देगलूर येथील बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांनी कला सादर केली. सुरुवातीला 'राग यमन'मधील 'विलंबीत' व 'द्रूत' रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर पहाडी वातावरणाला शोभेशी असी 'पहाडी धून' वाजवली. त्यांनी सादरीकरणाचा शेवट भीमसेन जोशींच्या 'जो भजे हरि को सदा' या लोकप्रिय सुरेल भजनाने केला. त्यांना तबल्यावर उस्मानाबादचे खंडेराव मुळे यांनी साथ दिली. बासरीवर त्यांचे चिरंजीव अनाहत वारसी यांनी संगत केली.

मेगन पंडिअन यांनी पेडल हार्प या वाद्यावर अगदी मराठी'सैराट'पासून पाश्चिमात्य सुरावटींपर्यंत विविध सांगितिक तुकडे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'ये श्याम मस्तानी मदहोश किये जाय', 'चुरा लिया है तूमने जो दिल को', 'पल पल पल पल' सारख्या गीतांच्या धून सादर केल्या. पाश्चिमात्य संगीतातील 'हवाना', 'स्पॅनिश टँगो', 'फ्लेमिंगो' सारख्या रचना अतिशय ताकदीने सादर केल्या. त्यांच्या वादनाला वन्ममोअरने देत रसिकांनी पसंतीची मोहोर उमटवली. त्यांना निशा मोकल यांनी तालवाद्यांवर साथ केली. यात ढोलक, तबला, बोंगो, दरबुका, चाईम्स अशा विविध देशी, परदेशी वाद्यांचा समावेश होता. हिरण्य रिसॉर्टच्या मेधा आठल्ये-पाध्ये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अंजली देशमुख यांनी निवेदन केले. कलाकारांचे स्वागत अजय गांधी, हमंत लव्हेकर, डॉ. मनोज सासवडे, तुलसी सासवडे यांनी केले, तर मेधा पाध्ये यांनी आभार मानले.

\Bहार्प वाद्याची ओळख \B

या वर्षीच्या मुख्य कलाकार होत्या हार्पवादक मेगन पंडिआन. मूळ गोवा येथील पंडिआन आता मुंबईला स्थायिक आहेत. सात फूट उंच हार्प हे आकाराने सगळ्यात मोठे वाद्य आहे. या वाद्याला ४७ तारा असतात. पेडल हार्प आणि लिव्हर हार्प, असे या वाद्याचे दोन प्रकार आहेत. मेगन पांडिअन या पेडल हार्प वाजवतात. या प्रकारातील भारतातील त्या एकमेक वादक आहेत. धनुष्यबाणाच्या तारेला छेडले असता त्यातून नाद निर्माण होतो हे लक्षात आल्यानंतर जास्तीच्या तारा जोडून या वाद्याची निर्मिती करण्यात आली. अगदी आदिम अशा वाद्यांमध्ये हार्पचा समावेश होतो. सध्याचे जे हार्प आहे त्या सांगितिक दृष्टीने खूप बदल केलेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारोळा २० वर्षांनंतर टँकरग्रस्त

$
0
0

नीलेश सोनटक्के, सिल्लोड

तलावातील गाळाचा उपसा केल्यामुळे गेल्या २० वर्षांपासून दुष्काळमुक्त असलेल्या सारोळा (ता. सिल्लोड) गावातही आता पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून नळाला देखील पाणी आले नसल्यामुळे सारोळावासीयांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या नियोजनाचा खोळंबा होत आहे. यामुळे दोन-तीन किलोमीटर जाऊन मिळेल त्या ठिकाणाहून ग्रामस्थ पाणी आणत आहे. उन्हाचा तडाखा सुरू असताना दिवसभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे पाण्यासाठी महिला रात्रीच्या वेळी जागरण करीत आहे. टंचाईमुळे नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. टँकर विहिरीत रिकामे करताच महिला, मुले पाण्यासाठी विहिरीवर गर्दी करीत आहेत.

पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ ग्रामीण भागातही आली आहे पाच रुपयांना हंडाभर पाणी, ७० रुपयांना ड्रमभर पाणी आणि पाचशे लिटर पाण्यासाठी साडेतीनशे रुपये मोजावे लागत आहे. दिवस उजाडताच पाण्यासाठी नागरिक बैलगाडी, सायकलीवरून भटकंती करीत आहेत. घरातील बाल-गोपाळांच्या डोक्यावर हंडे दिसत असल्याने पाण्यासाठी दिवस घालविण्याची परिस्थिती नित्याचीच झाली आहे. लहान मुलेही उन्हाची पर्वा न करता पाणी आणण्यासाठी कुटुंबाला जमेल तेवढी मदत करीत आहेत.

पाणी योजना कोरडी

भारत निर्माण योजनेतून सारोळा येथे पुरवठा योजनेंतर्गत २०१२-२०१३मध्ये ८६ लाख रुपये खर्चून वाढीव लोकसंख्येचा विचार करता पाणीपुरवठा करण्यात आली. या योजनेत पालोद येथील खेळणा प्रकल्प परिसरातून नवीन विहिरीचे खोदकाम करून पाइप लाइनच्या माध्यमातून पाणी पुरवण्यात येते मात्र, दुष्काळा देखील या योजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ तीव्र टंचाईला तोंड देत आहे.

\B२० वर्षांनंतर टंचाई\B

यावर्षी प्रथमच सरोळ्याला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सारोळा गावाशेजारील तलावातील गाळ काढण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. राधा व उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी २० वर्षांपूर्वी घेतला होता. अमृतधारा जलअभियानात गाळ काढल्यानंतर तलावातील पाणी पातळी वाढली, जमीन सुपीक झाली. तेव्हापासून सरोळ्यात पाणी टंचाई नव्हती. सारोळावासीयांनी या तलावाचे नाव राधा सागर ठेवले होते. गाळ मुक्तीचा हा पॅटर्न जिल्ह्यासह राज्यात शासनाने स्वीकारला होता. त्याच सरोळ्यात यावर्षी भीषण पाणी टंचाई आहे. दोन वर्षांपासून पाऊसच नसल्याने यावर्षी तलाव कोरडा पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाची पीएच. डी. प्रक्रिया अर्ध्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन वर्षांपासून पीएच. डी. प्रक्रिया रखडल्यामुळे अखेर काही विषयांना गाइड देण्यासाठी नवीन नियमाला मान्यता दिली आहे. संशोधन मार्गदर्शक (गाइड) नसलेल्या विषयांना समकक्ष विषयांचे गाइड देण्यात येणार आहेत. संशोधक विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी पाच मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर दोन आठवड्यात 'आरआरसी' प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच. डी. प्रक्रिया तीन वर्षांपासून रखडली आहे. बहुतेक विषयांच्या संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पूर्वनियोजन नसल्यामुळे काही विषयांसाठी गाइड देण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आले. प्रक्रिया रखडल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचा रोष वाढला होता. अनेक विषयांच्या 'आरआरसी' झाल्या नसून प्रक्रिया कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि अधिष्ठातांनी मागील आठवड्यात बैठक घेतली. संशोधन मार्गदर्शक (गाइड) नसलेल्या विषयांची यादी काढण्यात आली. विद्यार्थीसंख्या आणि गाइडची कमतरता यांचे प्रमाण लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. पेच सोडवण्यासाठी आंतरविद्याशाखीय अर्जानुसार समकक्ष विषयाचे गाइड देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पाली आणि बुद्धिझम, वृत्तपत्रविद्या, गणित, ग्रंथालयशास्त्र, संस्कृत या विषयांसह अकरा विषयांना पुरेसे गाइड नाहीत. समकक्ष विषयाचे गाइड देण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येत्या पाच मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून त्यानंतर दोन आठवड्यात 'आरआरसी' प्रक्रिया पूर्ण होईल, असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

\Bविशेष अधिकारांवर संशय\B

पीएच. डी. प्रक्रिया रखडण्यामागे अंतर्गत हितसंबंध कारणीभूत असल्याचा आरोप काही विद्यार्थी संघटनांनी केला. विशेष अधिकारात अनेकांना पीएच. डी. साठी निवडण्यात आले आहे. विशेष अधिकारांचा दुरुपयोग झाला असून हा व्यवहार संशयास्पद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक संशोधक विद्यार्थ्यांची वैधता तपासणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीवरील सराफाला लुटणाऱ्यांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीवरील पाथरी येथील सराफा व्यापाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन त्याच्या जवळील १२ लाख ९६ हजारांचा ऐवज लुटल्याप्रकरणात किरणपानसिंग हत्यारसिंग टाक, रुपसिंग चतुरसिंग टाक, गौतम भगवान आदमाने व प्रताप मधुकर म्हस्के या चार दरोडेखोरांच्या मोक्का कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (आठ मे) वाढ करण्याचे आदेश मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी शुक्रवारी (तीन मे) दिले.

याप्रकरणी सराफा व्यापारी शेख सवरव शेख अमजद (४३, रा. पाथरी, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार; फिर्यादी हा १३ फेब्रुवारी २०१९ रोजी दुकान बंद करून त्याचा मित्र श्रीकांत डहाळे यांना दुचाकीवर पाठीमागे बसवून घरी जाण्यासाठी निघाला. पाथरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळ भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघे खाली पडले. त्यामुळे डहाळे यांच्या हातातील पिशवी रस्त्यावर पडली व कारमधून उतरलेल्या ३० वर्षीय तरुणाने ती पिशवी उचलून पळ काढला. त्या पिशवीमध्ये रोख ९० हजार रुपये, आठ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे ३२५ ग्राम सोने, दोन लाख ५५ हजार रुपये किंâमतीची साडेआठ किलो चांदी, असा १२ लाख ९६ हजारांचा ऐेवज चोरट्याने हिसकावून नेला.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन ३१ मार्च २०१९ रोजी किरणपानसिंह हत्यारसिंह टाक (२९, रा. इंदिरानगर, अहमदपूर), रुपसिंह चतुरसिंह टाक (२३, रा. सरगम नगर, सोलापूर), गौतम भगवान आदमाने (२९, रा. सारोळा, पाथरी) आणि प्रताप मधुकर म्हस्के (३२ आर्वी, ता. परभणी) या चौघांना अटक करण्यात आली. तपासामध्ये चौघांनी संघटित गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे चार एप्रिल २०१९ रोजी या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्यात आला. टोळीचा म्होरक्या किरणपानसिंह टाक याच्या टोळी विरोधात गेल्या दहा वर्षांमध्ये विविध पोलिस ठाण्यांत २४ गुन्हे दाखल आहेत. २२ एप्रिल रोजी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास मान्यता मिळाल्यानंतर २५ एप्रिल रोजी त्या टोळीला पोलिसांनी कारागृहातून मोक्काअंतर्गत अटक करुन ताब्यात घेतले. त्या टोळीला मोक्का कोर्टाच्या विशेष न्यायालयाने कोठडी सुनावली होती.

\Bदागिने, रक्कम जप्त करणे बाकी

\Bमोक्का कोठडी संपल्यामुळे शुक्रवारी हजर करण्यात आले असता, कोठडीदरम्यान आरोपींनी तपासामध्ये सहकार्य केले नाही व त्यांच्या ताब्यातून दागिने व रोख रक्कम हस्तगत करावयाची आहे, तसेच दरोडेखोरांच्या चल-अचल संपत्तीची माहिती घ्यावयाची आहे. त्यामुळे आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती मोक्का कोर्टाचे विशेष वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने चौघांच्या टोळीला बुधवारपर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया केंद्राच्या नियोजनात अनेक त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा प्रक्रिया केंद्राच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे शुक्रवारी प्रकल्प केंद्रांच्या कामाची पाहणी केल्यानंतर स्पष्ट झाले. प्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची तरतूद नाही. प्रक्रिया केंद्राचे नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थापनाला कार्यालय उभारणीसाठीचा आराखडा नाही. प्रयोगशाळेची देखील तरतूद नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने तयार केलेल्या सुधारित डीपीआरमध्ये देखील याचा उल्लेख नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कचरा प्रक्रिया प्रकल्प तयार करण्यासाठी शासनाच्या सल्ल्याने महापालिकेने इंदूर येथील इको प्रो या कंपनीच्या माध्यमातून डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून घेतला. ९१ कोटींच्या या डीपीआरला शासनाने मंजुरी दिली व महापालिका निधी देखील दिला. त्यानंतर पालिका प्रशासनाने या डीपीआरचा अभ्यास करुन त्याच कंपनीकडून सुधारित डीपीआर तयार केला. सुधारित डीपीआर ५६ कोटींनी वाढला आहे. आता हा डीपीआर शासनाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे. मूळ डीपीआर मध्ये राहिलेल्या त्रुटी सुधारित डीपीआर मध्ये राहणार नाहीत अशी अपेक्षा होती, पण ही अपेक्षा फोल ठरल्याचे चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर लक्षात आले. १५० टन क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तरतूद करण्यात आली नसल्याचे अधिकारी, कंत्राटदार यांनी चर्चा करताना सांगितले. प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीला कार्यालय उभारणे गरजेचे आहे, परंतु कार्यालय उभारणीचा आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे कार्यालय कुठे उभारणार, ते कसे असणार या बद्दल काहीच स्पष्टता नाही.

कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रयोगशाळा गरजेची असते. कचऱ्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले खत हानीकारक तर नाही ना हे तपासण्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक आहे, पण प्रक्रिया केंद्रावर प्रयोगशाळेची तरतूद करण्यात आली नाही. प्रयोगशाळा उभारण्यासाठी शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. या प्रमाणपत्रासाठी देखील अद्याप हालचाल झाली नसल्याचे पाहणीच्या वेळी झालेल्या चर्चेतून लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोविंदराव पुंड महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शक्तिपाताचार्य गोविंदराव पुंड (काका) महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ६ आणि ७ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम वामन निवास, प्लॉट क्रमांक ४९ - अ, बन्सीलालनगर, औरंगाबाद येथील आश्रमात साजरे केले जाणार आहेत. सोमवारी (६ मे) संध्याकाळी सहा वाजता सामुहिक साधना केली जाणार आहे. त्यानंतर सात वाजता आरती होईल. साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान श्री गणेशबुवा रामदासी यांचे किर्तन होणार आहे. मंगळवारी (७ मे) सकाळी आठ वाजता सामुहिक साधना, साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत गीता पठण, दुपारी साडेबारा वाजता पिंड दर्शन, एक ते दोन वाजेच्या दरम्यान स्मृती सभा व ज्येष्ठांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाश कुलकर्णी,सुहास जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नांमका’तून पाणी सोडण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

वैजापूर व गंगापूर तालुक्यांत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, कालव्यातुन पाणी न सोडल्यास नऊ मे रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

गंगापूर, वैजापूर तालुके नेहमी दुष्काळाच्या छायेखाली असतात. यावर्षी शासनाने दुष्काळ घोषित केला आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बडी मंडळी पाणी सोडण्यास नेहमीप्रमाणे विरोध करून शासकीय अधिकारी पाणी शिल्लक नसल्याचा नावाखाली टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लाडगाव (ता. वैजापूर) येथे घेण्यात आलेल्या बैठकित शेतकऱ्यांनी केला. येत्या पाच मे रोजी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासोबत गंगापूर, वैजापूर तालुक्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा नऊ मे रोजी सामूहिक आत्मदहन करू असे निवेदन उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांना देण्यात आले.

सध्या तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे, अशा परिस्थितीत नागरिक व जनावरांना पिण्यासाठी पाणी पुरवणे शासनाची जबाबदारी आहे, असे जगताप यांनी सांगितले. बैठकीला अशोक सोमवंशी, संतोष सोमवंशी, शिवाजी निंबाळकर, सुधीर थोरात, संदीप खटाने, भाऊसाहेब खटाने, विकास सोमवंशी, गौरव सोमवंशी, साहेबराव रकताटे, निवृत्ती निंबाळकर, शिवाजी डोंगरे, रुस्तुम सय्यद, बन्सीलाल कुमावत, नितीन निंबाळकर, ऋतुराज सोमवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रकल्प सुरू केव्हा होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी महापौरांनी यापूर्वी दोन वेळा घनकचरा व्यवस्थापन कक्षाला डेडलाइन दिल्या, पण प्रक्रिया प्रकल्प सुरू होऊ शकला नाही. आता त्यांनी प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याची डेडलाइन दिली आहे. महापौरांच्या नवीन डेडलाइनमध्ये प्रकल्प सुरू होणार का असा प्रश्न आहे.

महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांची पाहणी शुक्रवारी केली. प्रथम त्यांनी पडेगाव येथील कामाला भेट दिली. याठिकाणी सिव्हील वर्क युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. सिव्हील वर्क पूर्ण झाल्यावर कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशीन आणल्या जाणार आहेत. या मशीन बसवून प्रक्रिया प्रकल्प सुरू होण्यास किमान सहा महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

पडेगावच्या नंतर कांचनवाडी येथील कामांना त्यांनी भेट दिली. या ठिकाणी कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाचे देखील सिव्हील वर्क सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पुढील दोन महिन्यांत गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मशीन देखील प्राप्त झाल्या आहेत. कमी वेळात जास्त काम करा आणि गॅस निर्मितीचा प्रकल्प लवकर सुरू करा, असे आदेश महापौरांनी अधिकारी व कंत्राटदार यांना दिले.

चिकलठाणा येथील प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. या ठिकाणी दररोज १५० कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन बसवण्यात येत आहे. मशीनचे चार संच प्राप्त झाले असून प्रकल्पाच्या विविध भागात ते बसवले जात आहेत. त्याशिवाय शेड उभारणीचे काम देखील युध्दपातळीवर सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होतील, असे घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी महापौर व उपमहापौरांना सांगितले. जून महिन्यात हा प्रकल्प सुरू करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे उद्घाटन करायचे आहे, त्या दृष्टीने गतीने काम करा, असे महापौरांनी अधिकारी व कंत्राटदारांना सांगितले.

तिसऱ्या दिवशी प्रकल्प सुरू होणार

वीज जोडणीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. वीज जोडणी मिळाल्यावर तिसऱ्या दिवशी प्रकल्प सुरू करता येणे शक्य आहे, असे कंत्राटदाराने महापौरांना सांगितले. एक महिन्यापासून वीज जोडणीची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महावितरणने निविदा काढली

चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी आणि हर्सूल येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कंपनीने गुरुवारी निविदा काढली. सात दिवसांची अल्प मुदतीची निविदा काढण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. वीज जोडणीच्या कामासाठी महापालिकेने साडेतीन कोटी रुपये महावितरण कंपनीकडे भरले आहेत. निविदेला प्रतिसाद मिळून काम सुरू झाले तर पंधरा दिवसात वीज जोडणीचा प्रश्न निकाली निघेल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहिरी सन्मान सोहळा रंगला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोककलावंत दु:ख दूर करून समाजाला आनंद देतात. पण, त्यांच्याकडे सन्मानाने पाहिले जात नाही. समाजाची नाडी ओळखणाऱ्या लोककलांवतांचा योग्य सन्मान करण्याची गरज आहे', असे प्रतिपादन डॉ. संजय मोहड यांनी केले. ते शाहिरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

शाहीर आत्माराम पाटील शाहिरी मंचच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त बालशाहीर पुरस्कार सांगली येथील अमोघराज आंबी यास प्रदान करण्यात आला. एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात बुधवारी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर ज्येष्ठ शाहीर अप्पासाहेब उगले, डॉ. देवदत्त म्हात्रे, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, पं. सुधीर बहिरगावकर आणि डॉ. संजय मोहड उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये व स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. मोहड यांनी लोककलावंतांच्या योगदानावर प्रकाश टाकला. 'एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला' असे संत तुकडोजी महाराज यांनी म्हटले होते. कलानिपुण मनुष्य समाजाचे दु:ख दूर करून निर्भेळ आनंद देतो. लोककलावंतांना मिळणारा सन्मान कोणत्या प्रतीचा आहे ? कलावंताला 'लोक' प्रत्यय जोडणे म्हणजे कलावंताला संपवणे आहे. लोकगायक म्हणजे किंमतच नाही. मातीतून आलेल्या लोककलेची उपेक्षा थांबवण्याची गरज आहे', असे डॉ. मोहड म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरेश लिंगायत, मंगल लिंगायत, कमल साळुंके, वासंती काळे, प्रा. गहिनीनाथ वळेकर यांनी परिश्रम घेतले.

\Bविद्यार्थ्यांकडून 'शाहिरी जागर'\B

यावेळी लोककला प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी 'शाहिरी जागर' कार्यक्रम सादर केला. शाहीर गोकुळसिंग क्षत्रिय व बाबूसिंग राजपूत यांच्या राष्ट्रीय गणाने सुरुवात झाली. संत तुकडोजी महाराज यांचे 'जागृत व्हा तरुणांनो', 'चल उठ भारता' ही गीते सादर करण्यात आली. किशोर धारासुरे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा आणि प्रचिती हासेगावकर यांनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा सादर केला. बालशाहीर रोहित काटे याने 'आई भवानीच्या कृपेने राजा झाला शिवराया' लोकगीत सादर रसिकांची दाद मिळवली. पुरस्कारमूर्ती बालशाहीर अमोघराज आंबी याने अण्णा भाऊ साठे लिखित 'माझी मैना' लावणी सादर केली. शाहीर अजिंक्य लिंगायत, कल्याण उगले, कृष्णा जाधव, शाहीर रामानंद जाधव, आकाश पाईकराव यांनी संगीत साथसंगत केली. कस्तुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्याची पावती दाखवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात दूषित पाणी पुरवठा केल्यावरून स्थायी समिती सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले. महापालिकेच्या पाण्यामुळेच विद्यार्थिनी आजारी पडल्याचा दावा प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. त्यावर 'पाणी पुरवठ्याची पावती दाखवा. लगेच कारवाई करतो', असे जंजाळ यांनी सांगताच तेजनकर आणि कुलसचिव डॉ. साधना पांडे निरुत्तर झाले. त्यामुळे प्रशासन कुणाला पाठिशी घालत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विद्यापीठाच्या सात वसतिगृहातील १६६ विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्यानंतर प्रशासनाचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याऐवजी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक व मनपा स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी शुक्रवारी शिष्टमंडळासह प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर आणि कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची भेट घेतली. प्रश्नांचा भडीमार करीत जंजाळ यांनी दोषींवर कारवाई न झाल्यास कुलगुरूंना खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा दिला. पिण्याचे पाणी महापालिकेच्या टँकरचे असल्याचा तेजनकर यांचा दावा जंजाळ यांनी खोडला. जलकुंभाच्या पाण्यात 'इसिस' संघटना विष कालवून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करण्याचा 'एटीएस'चा अहवाल होता. त्यानंतर महानगरपालिका तज्ज्ञांमार्फत दररोज चार वेळेस पाणी तपासते. त्यामुळे महापालिकेने विद्यापीठात दूषित पाणी पुरवल्याचा पुरावा द्या, अशी मागणी जंजाळ यांनी केली. पाणी पुरवठ्याची पावती उपलब्ध करण्यात प्र-कुलगुरू आणि कुलसचिव अपयशी ठरले. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेले अधिकारीसुद्धा फिरकले नाही. सर्व दोषींवर कारवाई करा. अन्यथा, कुलगुरूंना खुर्चीवर बसू देणार नाही, असा इशारा जंजाळ यांनी दिला. यावेळी डॉ. तुकाराम सराफ, अधिसभा सदस्य विजय सुबुकडे, हनुमंत शिंदे, शेखर जाधव, प्रकाश दुर्वे, अवधूत अंधारे, संकेत डोईफोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘न्युक्लिअर मेडिसिन’वरील कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिग्मा हेल्थ फाउंडेशन, सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, असोसिएशन ऑफ न्युक्लिअर मेडिसिन व औरंगाबाद फिजिशियन असोसिएशनतर्फे 'न्युक्लिअर मेडिसन'या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच 'सिग्मा'मध्ये घेण्यात आली. यात एम्स हॉस्पिटल (दिल्ली), टाटा मेमोरियल हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (मुंबई), रुबी हॉस्पिटल, इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल, स्पेक्ट लॅबच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेचे उद्घाटन फिजिशियन असोसिएशनचे शहराध्यक्ष डॉ. संजय पटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, डॉ. समीर सोनार, सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, संचालक डॉ. मनीषा टाकळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय रोटे, न्युक्लिअर मेडिसिन विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल जटाळे आदींच्या उपस्थितीत झाले. या कार्यशाळेत मराठवाडा, खान्देशातील १७५ पेक्षा जास्त डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. न्युक्लिअर मेडिसिन हे थायरॉइड, हृदय, किडनी व लिव्हरचे कार्य सांगते. आयोडिन थेरपी ही हायपरथायरॉइड व कर्करोग थायरॉइड रुग्णांच्या उपचारामध्ये उपयुक्त ठरते. स्ट्रेस थॅलियम हे अँजिओप्लास्टी किंवा बायपाससाठी मार्गदर्शक ठरते, असे सांगतानाच, न्युक्लिअर मेडिसिन व पेट-सीटीच्या विविध विषयांवरही कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. कार्यशाळेसाठी डॉ. जटाळे, धीरज तिवारी, बळवंत देशपांडे, अतिश दायमा, के. डी. कुलकर्णी, रमेश पवार, सचिन पावडे, शेखर देशमुख आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुय्यम निरीक्षकाला मारहाण; जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'ड्राय डे'च्या दिवशी देशी दारूची विक्री करीत असताना तपासणी करण्यासाठी आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी हॉटेल व्यवसायिक आरोपी भांवडांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (चार मे) फेटाळला. जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल (३९) व वीजेंद्र प्रभुलाल जैस्वाल (३७, दोघे रा. तिसगाव ता. जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मोहन चंद्रभान मातकर (४५) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार; मातकर व त्यांचे सहकारी मुंबई महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी खवड्या डोंगराजवळ एका हॉटेलवर 'ड्राय डे' असताना देखील दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार मातकर व त्यांचे सहाकारी हॉटेलवर गेले असता आरोपी जितेंद्र जैस्वाल व वीजेंद्र जैस्वाल या दोघांनी त्यांना शिवीगाळ करीत त्यांना मारहाण केली. त्यानंतर मातकर यांनी भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक गणेश इंगळे व त्यांच्या पथकाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार इंगळे व त्याच्या पथकाने हॉटेलवर कारवाई करीत चार हजार ९९२ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या ९६ बाटल्या जप्त केल्या. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दालख करण्यात आला.

दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर दोघा आरोपी भावडांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणात सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडिया यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेची फसवणूक; आरोपीला सक्तमजुरी

$
0
0

म. टा. औरंगाबाद

आरोपीच्या खात्यावर नजर चुकीने दिलेला तीन लाख ५६ हजार ८७४ रुपयांचा धनादेश बँकेला परत न करता ती रक्कम काढून बँकेसा फसविणाऱ्या व्यापाऱ्याला सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठाविली.

बाबासाहेब दामोधर कापसे (३२, रा. गजानन नगर, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभ्युदय सहकारी बँकेच्या गारखेडा शाखेचे व्यवस्थापक सुनील उमाकांत महाशब्दे (५१, रा. रा. दीप नगर, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार; अभ्युदय बँकेच्या भिवंडी येथील शाखेला सात जुलै २०१४ रोजी मेसर्स श्रीकर कॉटन कंपनीच्या येस बँकेच्या चालू खात्यावर तीन लाख ५६ हजार ८७४ रुपयांचा धनादेश भरायचा होता. नजरचुकीने तो धनादेश आरोपी कापसे याच्या अभ्युदय बँकेतील राज मुद्रा असोसिएट या खात्यावर जमा झाला. आरोपीने चौकशी न करता दहा जुलै ते १६ जुलै २०१४ या कालावधीत ती रक्कम एटीएम व धनादेशाद्वारे काढून घेतली.

चूक लक्षात येताच सुनील महाशब्दे यांनी आरोपीला नजरचुकीने तो धनादेश तुमच्या खात्यावर जमा झाला होता, त्यामुळे ती रक्कम पुन्हा बँकेत जमा करावी असे सांगितले, परंतु आरोपीने कोणाताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेने आरोपीला नोटीस पाठविली असता आरोपीने ती स्वीकारली नाही. या प्रकरणात जवाहर नगर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०३अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला कलम ४०३अन्वये सहा महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली. या प्रकरणात पैरवी अधिकारी मंजूर हुसेन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला धडा शिकवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांबद्दल तक्रारींचा पाऊस पाडला. 'भाजपने आपल्या विरोधात काम केले आहे, त्यामुळे येत्या काळात त्यांना धडा शिकवा,' अशा भावना देखील व्यक्त करण्यात आल्या.

लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर शनिवारी प्रथमच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. 'इनडोअर' बैठक असल्यामुळे अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, भाजपबद्दल यावेळी तक्रारी करण्यात आल्या. संपूर्ण मतदारसंघात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही. ज्यांनी काम केले ते देखील हात राखून काम करीत होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे, अशा भावना बहुतांश पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. विरोधात काम केलेल्यांची तक्रार वरिष्ठांना केली पाहिजे, अशी सूचनाही काहींनी केली. विरोधात काम केलेल्यांची नावे व ठोस पुरावे असतील तर द्या, पक्षश्रेष्ठींकडे ते सादर करू, असे यावेळी तक्रार करणाऱ्यांना सांगण्यात आले.

या बैठकीतील काही जाणांनी स्वकीयांवर देखील विरोधात काम केल्याचे आरोप केले. तेव्हा एका माजी महापौराने,'मोघम आरोप करू नका, कोणी कोणी विरोधात काम केले ते नाव घेऊन सांगा. वाटल्यास एकेकाला बोलावून विचारा, त्याचा जबाब घ्या,' असे सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर आरोप कसे काय करता, त्यांच्यावर शंका कशी घेता, असा सवाल त्या माजी महापौराने विचारला तेव्हा बाका प्रसंग निर्माण झाला होता. काहींनी मध्यस्थी करून तो विषय संपवला.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला झालेल्या मतदानाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बुथ निहाय, सर्कल निहाय व पंचायत समिती निहाय हा आढावा घेण्यात आला. त्यावरून शिवसेनेच्या उमेदवाराला किती मते पडतील, याचा अंदाज देखील बांधण्यात आला.

\Bपालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन\B

औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवार आणि मंगळवारी औरंगाबादमध्ये येणार आहे. पहिल्या दिवशी ते वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद या तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी उर्वरित तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. त्यांचा हा दौरा शासकीय असला तरी दुष्काळ निवारणासाठी पक्षाने केलेले कामाची माहिती पालकमंत्र्यांना शिवसेनेतर्फे दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी उपस्थित रहावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा आज…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी होत आहे. मागील वर्षीच्या घटना लक्षात घेत यंदा अनेक केंद्रावर व्यवस्था चोख ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तरी, औरंगाबाद शहरात एक केंद्र अचानक बदलण्यात आले. शहरात ४२ परीक्षा केंद्रावर १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

देशभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेली नीट रविवारी देशभरात विविध शहरांमधून होत आहे. औरंगाबाद केंद्रावरूनही परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढते आहे. मागील वर्षी पेहरावावरून काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. यंदा पूर्वीच विद्यार्थ्यांना, परीक्षा केंद्रप्रमुखांना सुचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद शहरात ४२ केंद्र असून, प्रत्येक केंद्रात ४०० ते ४५० विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षार्थींने परीक्षा केंद्रावर येताना काय काळजी घ्यायची, पेहराव कसा असावा याबाबत सूचना वेबसाइटवरही देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी परीक्षार्थीने केंद्रावर जाताना दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, हॉलतिकीट, परीक्षार्थींना साधे लाइट हाफ स्लीव्ज कपडे परिधान करायचे आहेत. त्यासह कोणत्याही डिजीटल गॅझेटला परवानगी नाही. परीक्षा दुपारी दोन ते पाच यादरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दुपारी १२ ते दीड या कालावधीत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे समन्वयकांनी केला आहे.

\Bकेंद्रात बदल…\B

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या राष्ट्रीया पात्रता प्रवेश परीक्षेत औरंगाबाद शहरातील एक केंद्र अचानक बदलण्यात आले. परीक्षेच्या काही तास आधी केंद्रात बदल करण्यात आले. दौलताबाद टी पॉइंट परिसरातील महाराष्ट्र पब्लिक स्कूल हे केंद्र होते. या केंद्रात अचानक बदल करण्यात आले. या केंद्रावरील परीक्षार्थींचे नवीन केंद्र मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कामर्स कॉलेज असे असणार आहे. या केंद्रावर ३१०४१४५८१ पासून ते ३१४१४९४० असान क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांचे हे केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन शहर समन्वयक किरणजीतसिंग पन्नू यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images