Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भाजपला घडा शिकवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांबद्दल तक्रारींचा पाऊस पाडला. 'भाजपने आपल्या विरोधात काम केले आहे, त्यामुळे येत्या काळात त्यांना धडा शिकवा,' अशा भावना देखील व्यक्त करण्यात आल्या.

लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर शनिवारी प्रथमच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. उप जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शहरप्रमुखांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. 'इनडोअर' बैठक असल्यामुळे अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.

बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, भाजपबद्दल यावेळी तक्रारी करण्यात आल्या. संपूर्ण मतदारसंघात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही. ज्यांनी काम केले ते देखील हात राखून काम करीत होते. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे, अशा भावना बहुतांश पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. विरोधात काम केलेल्यांची तक्रार वरिष्ठांना केली पाहिजे, अशी सूचनाही काहींनी केली. विरोधात काम केलेल्यांची नावे व ठोस पुरावे असतील तर द्या, पक्षश्रेष्ठींकडे ते सादर करू, असे यावेळी तक्रार करणाऱ्यांना सांगण्यात आले.

या बैठकीतील काही जाणांनी स्वकीयांवर देखील विरोधात काम केल्याचे आरोप केले. तेव्हा एका माजी महापौराने,'मोघम आरोप करू नका, कोणी कोणी विरोधात काम केले ते नाव घेऊन सांगा. वाटल्यास एकेकाला बोलावून विचारा, त्याचा जबाब घ्या,' असे सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर आरोप कसे काय करता, त्यांच्यावर शंका कशी घेता, असा सवाल त्या माजी महापौराने विचारला तेव्हा बाका प्रसंग निर्माण झाला होता. काहींनी मध्यस्थी करून तो विषय संपवला.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला झालेल्या मतदानाचा आढावा यावेळी घेण्यात आला. बुथ निहाय, सर्कल निहाय व पंचायत समिती निहाय हा आढावा घेण्यात आला. त्यावरून शिवसेनेच्या उमेदवाराला किती मते पडतील, याचा अंदाज देखील बांधण्यात आला.

\Bपालकमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन\B

औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे सोमवार आणि मंगळवारी औरंगाबादमध्ये येणार आहे. पहिल्या दिवशी ते वैजापूर, गंगापूर, कन्नड आणि खुलताबाद या तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी उर्वरित तालुक्यांचा आढावा घेणार आहेत. त्यांचा हा दौरा शासकीय असला तरी दुष्काळ निवारणासाठी पक्षाने केलेले कामाची माहिती पालकमंत्र्यांना शिवसेनेतर्फे दिली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी उपस्थित रहावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आकर्षक व्याजाच्या अमिषाने सात लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमोडिटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून एका सोसायटीच्या संचालकाला सात लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी ट्रेड आर्टचा मुख्य संचालक प्रशांत रमेश धुमाळ (रा. जाधववाडी) याच्यासह धुमाळ कुटुंब, दलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीमध्ये अनिलकुमार सुनील जैस्वाल (३०, रा. जाधववाडी) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रशांत धुमाळशी ओळख झाली होती. त्याने जानेवारी २०१४मध्ये सीटीए (कमोडीटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो, याची माहिती देत गुंतवणुकीवर जैस्वाल यांना दहा टक्के व्याज देणार असल्याचेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन एक मार्च २०१४ रोजी जैस्वाल यांनी धुमाळच्या 'सीटीए' या व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर ठरल्याप्रमाणे जैस्वाल यांना ३५ हजार रुपयांचा हप्ता काही महिने व्याजाच्या स्वरुपात देण्यात आला. त्यानंतर जैस्वाल यांनी मिळालेले व्याज व रोख अशी सात लाखांची पुन्हा गुंतवणूक केली.

ही गुंतवणूक केल्यावर मात्र, धुमाळ व दलालांनी प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे बँकेच्या खात्यात पैसे नाही. खात्याचे व्यवहार बंद करण्यात आले आहे, अशी वेगवेगळी कारणे पुढे करून पैसे देण्यास नकार दिला. अशाच प्रकारे त्याने शहरातील अनेकांना गंडविल्याचे समोर आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली. त्यावरून धुमाळसह पत्नी भावना, सख्खा भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अविनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पूर्णपात्रे यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार दुसऱ्यांदा एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्वान चोरीप्रकरणी आरोपीच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाची चोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अकबर खान रऊफ खान याच्या पोलिस कोठडीत सोमवारपर्यंत (सहा मे) वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी शनिवारी (चार) मे दिले.

आरोपी अकबर खान याने पोलिस कोठडीदरम्यान चोरी केलेले श्वान मुन्वर खान करीम खान पठाण (३२, रा. कैसर कॉलनी) याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मुन्वर खान याच्या घरून श्वानाला ताब्यात घेतले. या प्रकरणात मतीन अरमान पीरजादे (३२, रा. मिलकॉर्नर, नागेश्वरवाडी, औरंगाबाद) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत; पीरजादे हा एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक असून त्याने हॉटेलच्या दरवाजाबाहेर बांधलेला दहा हजार रुपये किंमतीचा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा सात सप्टेंबर २०१८ रोजी आरोपीने चोरी केला होता. पीरजादे याने एका वसतिगृहाचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले असता रिक्षात बसून आलेल्या तिघांनी कुत्र्याची चोरी केल्याचे दिसून आले.

दरम्यान, एक मे २०१९ रोजी रात्री आठच्या सुमारास श्वान चोरून नेणाऱ्या तिघांपैकी एक आरोपी अकबर खान रऊफ खान (४५, रा. बायजीपुरा) हा खडकेश्वर परिसरात आढळून आला असता, पीरजादे याने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्याला चार मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीच्या साथीदारांचा शोध घेणे बाकी असून, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा देखील जप्त करायची असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करून आरोपीच्या कोठडीत सहा मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल चालकास मारहाण; अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉटेल व्यावसायिकाला जुन्या वादातून रस्त्यात अडवून रिव्हॉल्व्हर लावत लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने माराहण केल्याप्रकरणी आरोपी सचिन उर्फ विठ्ठल शिवाजी शिंदे व राहुल एकनाथ पालेजा या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी शनिवारी (चार मे) फेटाळला.

या प्रकरणात हॉटेल व्यावसायिक रवींद्र बाळासाहेब तोगे (३६, रा. विष्णुनगर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत, १६ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तोगेला त्याचा मित्र घरी सोडण्यासाठी जात होता. त्यावेळी आरेापी सचिन शिंदे व इतरांनी तोगे याची गाडी अडवून त्याला रिव्हॉल्व्हर लावत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी आरोपी रतन अग्रवाल, शुभम अग्रवाल व सचिन पालेजा यांनी तोगे, त्याच्या मित्राला लोखंडी रॉड व हॉकी स्टिकने जबर मारहाण केली. तोगेची सोन्याची दहा ग्रॅम वजनाची साखळी व खिशातील साडेनऊ हजार रुपये आरोपींनी हिसकावून घेतले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सचिन उर्फ विठ्ठल शिंदे व राहुल पालेजा या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळला. प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकर्षक व्याजाच्या आमिषाने सात लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमोडिटी ट्रेड आर्टच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखवून एका सोसायटीच्या संचालकाला सात लाखांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी ट्रेड आर्टचा मुख्य संचालक प्रशांत रमेश धुमाळ (रा. जाधववाडी) याच्यासह धुमाळ कुटुंब, दलाल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोडच्या विश्वकल्याण मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटीमध्ये अनिलकुमार सुनील जैस्वाल (३०, रा. जाधववाडी) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रशांत धुमाळशी ओळख झाली होती. त्याने जानेवारी २०१४मध्ये सीटीए (कमोडीटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास कसा फायदा होतो, याची माहिती देत गुंतवणुकीवर जैस्वाल यांना दहा टक्के व्याज देणार असल्याचेही सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन एक मार्च २०१४ रोजी जैस्वाल यांनी धुमाळच्या 'सीटीए' या व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर ठरल्याप्रमाणे जैस्वाल यांना ३५ हजार रुपयांचा हप्ता काही महिने व्याजाच्या स्वरुपात देण्यात आला. त्यानंतर जैस्वाल यांनी मिळालेले व्याज व रोख अशी सात लाखांची पुन्हा गुंतवणूक केली.

ही गुंतवणूक केल्यावर मात्र, धुमाळ व दलालांनी प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरू असल्याचे कारण पुढे केले. त्यामुळे बँकेच्या खात्यात पैसे नाही. खात्याचे व्यवहार बंद करण्यात आले आहे, अशी वेगवेगळी कारणे पुढे करून पैसे देण्यास नकार दिला. अशाच प्रकारे त्याने शहरातील अनेकांना गंडविल्याचे समोर आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखा गाठत तक्रार दिली. त्यावरून धुमाळसह पत्नी भावना, सख्खा भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अविनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पूर्णपात्रे यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार दुसऱ्यांदा एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कैलासनगर ते एमजीएम’चा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कैलासनगर ते एमजीएम रस्त्याचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी दिले. या कामात येणाऱ्या अचडणी दूर करण्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या. दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम केले जात आहे, पण ते अद्याप पूर्ण झालेले नाही.

महापालिका निधीतून आणि शासनाच्या निधीतून कैलासनगर ते एमजीएम या रस्त्याचे काम केले जात आहे. या कामासाठी सुमारे ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामासाठी रुंदीकरण देखील करण्यात आले, रुंदीकरणाच्या नंतर रस्त्याचे काम लगेचच सुरू न झाल्यामुळे काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे झाली आहेत. रुंदीकरणाच्यानंतर विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत. त्यामुळे देखील रस्त्याचे काम खोळंबले आहे. दोन मालमत्ताधारकांच्या मोबदल्याचा विषय प्रलंबित होता. या प्रश्नांची दखल घेत महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, नगरसेवक कैलास गायकवाड, राखी देसरडा, नगररचना विभागाचे उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्यासह महावितरणचे अधिकाऱ्यांनी शनिवारी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली.

दोन मालमत्ताधारकांच्या मोबदल्याचा प्रश्न यावेळी महापौरांसमोर मांडण्यात आला. त्या दोन्ही मालमत्ताधारकांना दोन दिवसांत 'टीडीआर' देण्याची व्यवस्था करा, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विजेचे खांब हटविण्यासाठीची फाइल गेल्या काही महिन्यांपासून लेखा विभागात पडून आहे. सुमारे दीड कोटी रुपये महापालिकेने महावितरणकडे भरणे बाकी आहे. ही फाइल शोधून काढा व लगेचच पैसे महावितरणकडे जमा करा, असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखवली. तीन-चार दिवसांचा वेळ द्या, आम्ही आमची बांधकामे पाडून घेतो, असे त्यांनी सांगितले. हे तीन-चार प्रश्न निकाली निघताच रस्त्याचे काम सुरू करण्याची ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

\Bरस्त्याच्या नावाचा केक\B

महापौर नंदकुमार घोडेले यांचा शनिवारी वाढदिवस होता. सकाळी साडेनऊच्या सुमारास ते रस्त्याची पाहणी करण्यासाठी कैलासनगरात पोचले. उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. वाढदिवसामुळे महापौरांसाठी वेगळा केक तयार करण्यात आला होता. 'कैलासनगर-एमजीएम रस्त्यातर्फे हार्दिक शुभेच्छा' असे त्यावर लिहिले होते. हा केक महापौरांना देण्यात आला. केकच्या रुपाने रस्त्याने आपल्या व्यथा मांडल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मारकाला ६० कोटी; पाण्यासाठी २० कोटीच का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील नागरिकांसमोर पाण्याचे संकट मोठे आहे. अशावेळी शासनाकडे सत्ताधारी शिवसेना भाजपने अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाची मागणी केली. या प्रस्तावात जलसंकट दूर करण्यासाठी २० कोटी रुपयांची मागणी केली. स्मारकासाठी ६० कोटी रुपयांची मागणी करून सत्ताधारी शहरातील नागरिकांच्या पाणीप्रश्नावर गंभीर नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार इम्तियाज जलील यांनी केला. शहरातील जलसंकट पुन्हा निर्माण होऊन नये. यासाठी विशेष प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा वाल्मीकडे देण्यात यावा, अशीही मागणी जलील यांनी केली.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर १४६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावात आश्यर्चकारकरित्या सत्ताधाऱ्यांनी शहरातील जल वितरण व्यवस्थेसाठी फक्त दहा कोटी रुपये मागितले तर, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी ६० कोटी रुपयांची मागणी केली. याशिवाय टँकरमधून पाणी पुरवण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केली. शहरावर ओढावलेल्या जलसंकट गंभीर असताना या निधीत शहराची तहान भागेल का? असा प्रश्न आमदार जलील यांनी उपस्थितीत केला आहे.

स्मारकऐवजी ६० कोटी रुपये नवीन हॉस्पिटल निर्माण करून त्याला स्व. बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल, असे नाव द्यावे ती त्यांना खरी श्रद्धांजली असेल. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या सध्याच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष करावे, अशीही मागणी करण्यात आली.

\Bस्मारकासाठी वैयक्तिक निधी द्यावे\B

शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी स्मारक, पुतळे तयार करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधीचा वापर करावा. अशीही मागणी आमदार जलील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते कामांची यादी लवकरच शासन दरबारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटी रुपयांमधून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची यादी पुढील आठवड्यात शासनाकडे पाठवण्यात येईल, अशी ग्वाही महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दहा दिवसांच्या रजेनंतर आयुक्त शनिवारी प्रथमच पालिकेत आले होते.

शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्यानंतर पुन्हा सव्वाशे कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अनुदानातून कोणत्या रस्त्यांची कामे करायची याची यादी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून तयार केली आहे. या यादीत ६९ रस्त्यांचा समावेश आहे. ही यादी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्तांकडे देण्यात आली आहे. ही यादी एक महिन्यांपासून आयुक्तांकडे आहे, या यादीबद्दल पत्रकारांनी डॉ. निपुण विनायक यांना विचारले असता ते म्हणाले, 'यादीतील काही रस्त्यांची पाहणी करणे बाकी आहे. येत्या दोन दिवसांत पाहणी पूर्ण करून त्यानंतर पुढील आठवड्यात रस्त्यांची यादी शासनाकडे सादर केली जाईल.'

गरवारे क्रीडा संकुलात जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येणार आहे असे आयुक्तांनी सांगितले. यासंदर्भात नियोजन केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीपुरवठ्यात काळेबेरे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाणीपुरवठ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली. या मागणीसाठी 'एसएफआय' आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. पाणीपुरवठ्यात मोठा भ्रष्टाचार असून, काही विभागांचे पाण्याचे दरमहा बिल एक लाख रुपये कसे, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे स्थावर विभागाची चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली.

विद्यापीठातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि दूषित पाण्याचा मुद्दा चर्चेत आहे. वसतिगृहातील १६६ विद्यार्थिनींना दूषित पाण्याची बाधा झाल्यानंतरही प्रशासनाने पाणीपुरवठा यंत्रणेचा आढावा घेतला नाही. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दूषित पाणी वसतिगृहात कसे आले, याची चौकशी करण्याची मागणी करीत स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाने (एसएफआय) शनिवारी दुपारी निदर्शने केली. दूषित पाणीपुरवठा केलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, बाधित विद्यार्थिनींना वैद्यकीय खर्च द्या, योग्य तपासणी करूनच पाणीपुरवठा करा आणि वसतिगृहे, विभाग, ग्रंथालय, अभ्यासिकेत 'आरओ' यंत्रणा सुरू करा आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी लोकेश कांबळे, स्टॅलीन आडे, सत्यजीत मस्के, रवी खंदारे, समाधान बारगळ आणि भगवान श्रावणे उपस्थित होते.

पाणीपुरवठ्याला आपण जबाबदार नसल्याचे अधिकारी सांगत आहे. त्यामुळे जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, असा मुद्दा विद्यार्थ्यांनी मांडला. काही विभागात शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी पाण्याचे जार आहेत, पण विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही. ही समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने केली. याबाबत प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अमोल खरात, प्रवीण चिंतोरे, निशिकांत कांबळे, मेघना मराठे, सुरेश सानप, बळीराम पाइकराव, राम सहाणे उपस्थित होते. वसतिगृहात आणि अभ्यासिकेत दोन दिवसांत 'आरओ प्लँट' सुरू करण्यात येतील, असे तेजनकर यांनी सांगितले.

\Bबैठकीत मुद्दा गाजणार\B

येत्या दहा मे रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे. पूर्ण आढावा घेऊन दोषी निश्चित करण्यात येईल, असे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राहुल म्हस्के यांनी सांगितले. पाणीपुरवठा समितीवर काही व्यवस्थापन परिषद नियुक्त आहेत, मात्र त्यांनीही गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला; तसेच स्थावर विभागाच्या अधिकाऱ्यांवर विद्यार्थ्यांचा रोष आहे. पाणीपुरवठ्यात मोठा भ्रष्टाचार असून, स्थावर विभागाची चौकशी करा, अशी मागणी 'एसएफआय'ने केली. पाण्याच्या किती खेपा होतात, किती जार येतात याची माहिती घ्या. काही विभागांचे पिण्याचे पाण्याचे दरमहा बिल एक लाख रुपये कसे, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

\Bकुलगुरू दौऱ्यावर\B

मागील सहा दिवसांपासून विद्यापीठात पाणीप्रश्न पेटलेला असूनही कुलगुरूंनी उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला नाही. विद्यार्थिनी आजारी पडण्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दौऱ्यावर गेलेले कुलगुरू अजूनही परत आलेले नाही. कुलगुरूंना विद्यार्थ्यांचे आयुष्य महत्त्वाचे नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. केवळ शैक्षणिक जबाबादारी सांभाळणाऱ्या प्र-कुलगुरूंवर या अतिरिक्त कामाचा बोजा पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोअर-दुधना’चे पाणी परभणीला

$
0
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या प्रयत्नाला यश

परभणी : जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सततचा दुष्काळ व पाऊसमान कमी झाल्यामुळे नदीपात्र कोरडे पडले तर बोअरचे पाणी अटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे लोअर-दुधना प्रकल्पातून जिल्ह्यातील नदी पात्रात त्वरीत पाणी सोडावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला होता. त्यानंतर या प्रकरणात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून राज्य सरकारला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यानुसार प्रकल्पातून १५ दशलक्ष घनमीटर पाणी १५ मे पर्यंत सोडण्याचा निर्णय झाला.

परभणी जिल्ह्यातील दुष्काळाची अवस्था आणि पिण्याच्या पाण्याची झालेली टंचाई यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानुसार दिवाकर रावते यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांनी एक विशेष बैठक घेतली. परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रकल्पातून पाणी सोडणे आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही आदेश निर्गमित केले. रावते यांची गिरीश महाजन यांच्या सोबतही ही एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. सुनील केंद्रेकर यांच्याही सोबत त्यांची बैठक झाली. त्यात परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी १५ दशलक्ष घनमीटर पाणी विसर्ग करण्यासाठी आदेश निर्गमित करण्यात आले. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाई संदर्भात लोअर दुधना प्रकल्पाचे पाणी विसर्ग करण्यासाठी औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे देखील अनुकूल होते. त्यामुळे १५ मेपर्यंत या पाण्याचा विसर्ग होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. पाटील यांनी कळवली आहे. दरम्यान, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंत्री दिवाकर रावते यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून याबद्दल जिल्ह्यातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

या गावांना होणार फायदा

लोअर दुधना प्रकल्पातून परभणीसाठी १५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग होणार आहे. परभणी विधानसभा मतदार संघातील टाकळी, नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडीदमई, हिंगला, सुलतानपुर, पिंपळा, सनपुरी आदी गावातील नद्यांच्या पात्रात हे पाणी येणार आहे. त्यामुळे या गावातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू होतील. शिवाय नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खतमफियांवरील कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

$
0
0

दोन कंपन्यातून दीड कोटी रुपये किंमतीचे बोगस खत जप्त

म. टा. प्रतिनिधी,

खते आणि बियाणांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले जालना शहर बोगस खताचे माहेरघर म्हणून डागाळले जात आहे. जालन्यातील मोती तलावातल्या काळ्या मातीच्या वाळलेल्या गाळात लिंबाच्या काड्या, कडब्याचे पाचट आणि अशाच अनेक निव्वळ फेकून देतात तो कचरा पिठाच्या गिरणीत दळून त्यावर लिंबोणीच्या अतिशय उग्र वासाचा फवारा मारून ही ४० किलोग्रॅम वजनाची काळी माती पॉलिथिन बॅगेत भरून ७२० रुपये किंमतीत विक्री केले जात होते. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धाडी टाकून अशास्वरुपाच्या सेंद्रीय खतांच्या दोन कारखान्यावर धाड टाकून दीड कोटी रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. जालन्यातील या खतमफियांवर गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणलेले आहेत.

'वरदची द्दष्टी..हिरवीगार सृष्टी' या आकर्षित करणाऱ्या स्लोगनच्या नावाखाली जालन्यातील वरद फल्टीलायझर प्रा. लि. या रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनीत शेजारीच असलेल्या मोती तलावातील काळ्या मातीचीच पोते भरून ती अनधिकृत 'वरद डॉट निम' या ब्रँडचा लाखो पोत्यांची साठवणूक केलेला खूप मोठा साठा जप्त करण्यात आला. हा सगळा माल सेंद्रीय खताच्या नावाखाली बाजारात जाण्याच्या तयारीत असतानाच पकडल्यामुळे हजारो शेतकऱ्यांची होणारी फसवणूक वाचली.

वरद फल्टीलायझर नावाच्या रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मागील बाजूला ही काळी माती पोत्यात भरून ठेवण्याचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे चालत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारखान्याच्या बाजूलाच असलेल्या मोती तलावातील काळी माती सेंद्रीय खत म्हणून पोत्यात भरली जात होती. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे हे या कंपनीमध्ये गेले असता प्रथमतः त्यांना कोणीही ओळखले नाही. मात्र, पोलिस ताफा दिसताच समोरच्या भागातील १८:१८:१० हे मिश्र खताचे युनिट त्यांना दाखवले. याच कारखान्याच्या मागे जाण्यासाठी एक अरूंद पायवाट आहे. तिथे उघड्यावर असलेल्या दोन्ही बाजूच्या घाणेरड्या वासाचा परिसर आहे. तिकडे कोणालाही जाऊ दिले जात नाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनीही तिकडे जाऊ नये यासाठी कारखान्याच्या मालकाने विनवण्या करून खूप प्रयत्न केला. मात्र, बिनवडे यांनी कोणालाही न जुमानता त्या घाणेरड्या बोळीतून मागे असलेल्या भले मोठे गोदाम गाठले आणि त्यानंतर समोर दिसला तो भयंकर प्रकार बघून सगळ्यांचेच डोळे विस्फारून गेले.

मोती तलावातील काळ्या मातीची हजारो पोती केली, द्राक्षे, टमाटे, ऊस, फळभाज्या यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचा चकचकीत मजकूर फोटो असलेल्या पोत्यात सेंद्रीय खत म्हणून भरलेले गोदाम सगळ्यांना दिसले. या सगळ्या पोत्यांची मोजणी करण्यासाठी सहा तास लागले. पाचशे मेट्रिक टन हे सगळे बोगस सेंद्रीय खत साधारणपणे एक कोटी रुपये किंमतीत विकण्यासाठी सज्ज झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी हा काय प्रकार आहे असे विचारताच सगळ्यांची अक्षरशः बोबडी वळाली. जिल्हा कृषी अधीक्षक बी. आर. शिंदे आणि पोलिसांनी सगळी पोती मोजून वरद फल्टीलायझरच्या संचालक गोपाल मानधनी आणि इतर संचालक व व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

जालन्यातील भोकरदन रस्त्यावरील राजलक्ष्मी अॅग्रोटेक प्रा. लि. या सिंगल सुपर फॉस्फेट खत निर्मिती करणाऱ्या कारखान्यात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धाड टाकली असता या कंपनीच्या आवारातील मागच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या गोदामात जहाज छाप धरमजी मोरारजी केमिकल्स मुंबई या ब्रॅँडच्या पोत्यात काळी मातीत लिंबोणीचा अर्क काढल्यावर उरलेली टरफले, काडी कचरा, एका मोठ्या गिरणीत दळण्याचे काम चालू होते. त्याचीच हजारो पोती येथे साठवलेली सापडली. त्याची बाजारात छापील किंमत सुमारे साठ लाख रुपये आहे.

विशेष म्हणजे या राजलक्ष्मी अॅग्रोटेक कंपनीचा अधिकृत मालक कोण आहे याची कृषी अधीक्षक बी. आर. शिंदे आणि त्यांच्या कोणताही सहकाऱ्यांना माहिती नव्हती. या कारखान्यात धाड मारली तेव्हा मालक कोणीही जागेवर नव्हते आणि तेथे उपस्थित कामगार काहीही बोलायला तयार नव्हते. शेवटी या कंपनीच्या नावाने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस तपासाची गाडी रखडली

जालन्यात जबरदस्त दबदबा असलेल्या या दोन्ही खतांच्या कारखान्यावर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, पोलिस तपासात या सगळ्या प्रकरणांची चौकशी कोणत्या पध्दतीने होईल यावर वेगवेगळी मते पुढे येत आहेत. दोन्ही कारखान्याच्या मालकांची जालन्यातील आणि राज्य सरकारच्या सगळ्या वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत असलेली उठबस बघता हे सगळे प्रकरण दडपण्याचा मोठा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन दिवस उलटले तरी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिस तपासाची गाडी किंचितही पुढे सरकलेली नाही.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोणीकरांनी घेतला पाणी टंचाईचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी, लालवाडी व घनसावंगी तालुक्यातील बोधालापुरी व वडीरामसगाव या गावांना भेटी देऊन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, शिवसेना नेते हिकमत उढाण, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे सोबत होते. .

घनसावंगी येथील नृसिंह मंगल कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी तालुक्यातील टंचाईच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुरलीधर चौधरी, सुनील आर्दड, रमेश महाराज वाघ, संजय तौर, देवनाथ जाधव, दीपक ठाकूर, लक्ष्मण वडले, श्याम उढाण, उद्धव मरकड, अंकुश बोबडे, विष्णू जाधव, सर्जेराव जाधव, जीवन वगरे, अॅड. भास्कर मगरे, कृष्णा जिगे, रमेश शहाणे उपस्थितीत होते.

अंबड तालुक्यातील पाणीटंचाई २५१ गावांसाठी ४ कोटी १३ लक्ष रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एकूण ९८ गावे व वाड्यांना ८४ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ९ गावांसाठी ९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई आराखडा अंतर्गत मंजूर २९ नळ योजना, विशेष दुरुस्ती पैकी २४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ५ कामे प्रगतीपथावर आहेत. मंजूर ७ तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना पैकी ६ कामे पूर्ण करण्यात आल्या असून १ काम प्रगतीपथावर आहे. पाच चारा छावण्या मंजूर आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या एकूण १११ पैकी प्रत्यक्ष कामे सुरू असलेल्या ग्रामपंचायतची संख्या १० असून १९ कामे सुरू आहेत. ५०९ मजूर काम करत आहेत. ३० लाख ६२ हजार खर्च झाला आहे.

घनसांवगी तालुक्यातील ३३० गावात ४ कोटी ९७ लक्ष रुपयांचा आराखडा असून ६५ गाव व वाड्यांना ५० टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. १९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई आराखडा अंतर्गत मंजूर ११ नळ योजना विशेष दुरुस्ती पैकी ११ कामे पूर्ण २ छावण्या मंजूर आहेत. ९७ पैकी १० गावांत कामे सुरू आहेत. एक हजार मजूर असून १ कोटी १४ लाख ४७ हजार खर्च झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

$
0
0

वैजापूर: नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरीच्या डाव्या कालव्यातून आवर्तन देण्यासाठी दारणा व गंगापूर धरणातून रविवारी पाणी सोडले. या पाण्यातून वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या (घोयगाव) येथील साठवण तलावात पाणी साठवले जाणार असल्याने वैजापूरकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. हे पाणी साठवण तलाव व तेथून पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात येण्यास सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोयगाव येथील चारही साठवण तलावातील पाणी संपल्याने शहरवासियांना पाणी कसे पुरवावे असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता. गोदावरी डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शहराला एकाच वेळी पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल पावणे दोन कोटी लिटरची गरज भासते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या सौर ऊर्जा फिडरमधून वीजनिर्मिती सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात सौर ऊर्जा फिडर स्थापन करण्याच्या घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. चौका येथे स्थापन करण्यात आलेल्या सौर ऊर्जा फिडरद्वारे वीज निर्मिती सुरू झाली आहे. या प्रकल्पाद्वारे प्रती तास वीस एएमयू वीज निर्मिती होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

ऐन पिकाला पाणी देण्याच्या काळात ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार होतात. शिवाय लोडशेडिंगमुळेही शेतकऱ्यांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागतो. अपुऱ्या वीज पुर‌वठ्याचा थेट परिणाम शेती उत्पादन घटण्यावर होतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल होतात. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने राज्यात 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषीपंप' योजना सुरुवात केली आहे. या योजनेतून सौर ऊर्जा पंप घेण्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ही योजना कार्यान्वयीत होण्यासाठी अजून काही काळ जावा लागणार आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात सौर ऊर्जा फिडर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कृषी पंपाना महावितरणच्या ९२ पैकी ७५ उपकेंद्रांतून वीज पुरवठा केला जातो. यापैकी काही उपकेंद्राची सौर ऊर्जा फिडर करिता महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाने निवड केली आहे. सौर ऊर्जा निर्मितीसाठी तालुका पातळीवर किंवा जमीन उपलब्ध असलेल्या गावांत सौर ऊर्जा फिडर उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पाकरिता महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाद्वारे जागेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. औरंगाबाद शहराजवळ असलेल्या चौका येथे सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येत आहे. येथील उपकेंद्राच्या जागेवर १६००पेक्षआ जास्त सौर पॅनल लावण्यात आले आहेत. त्याद्वारे ५५० किलो व्हॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून सध्या महावितरणाला प्रती तासात १६ ते २० एएमयु वीज उपलब्ध होत आहे. चौका येथे सौर फिडरचा पहिला प्रयोग यशस्वी करण्यात आलेला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे.

\Bवीज खरेदीवरील खर्च होणार कमी \B

सौर ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा पुरवठा महावितरणकडून केला जात आहे. सौर ऊर्जेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वीज खरेदीवरील महावितरणाचा खर्च कमी होण्याची शक्यता आहे. या पर्यायाचा वापर वाढविण्यासाठी अधिकाधिक सौर ऊर्जा फिडर स्थापन करण्यात येणार आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना पाणी उपसाणारे ट्रॅक्टर जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातून विनापरवाना पाणी उपसा करणारी दोन ट्रॅक्टर महसूल विभागाने रविवारी जप्त केली. पुढील कार्यवाहीसाठी दोन्ही वाहने जलसंपदा विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, धरणातून विनापरवाना पाणीउपसा करणाऱ्याच्या विरोधात कडक कार्यवाही करण्याचा इशारा यावेळी जलसंपदा विभागाने दिला.

जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर भागातील ढाकेफळ व परिसरातील सहा गावांची पाणीपुरवठा योजना तयार असून, धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील चरावरती पंप बसवण्यास काही लोकांनी मज्जाव केल्याने या योजनेचे काम खोळंबळे होते. रविवारी तहसीलदार महेश सावंत व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय भार्गोदेव यांनी या ठिकाणी भेट दिली असता, त्यांना जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातून काही टॅक्टर विनापरवाना पाणी उपसा करत असल्याचे आढळून आले. यावेळी, तहसीलदार सावंत यांनी बेकायदा पाणी उपसा करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी ते जलसंपदा विभागाच्या ताब्यात दिले.

सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शून्य टक्क्यांच्या खाली गेला असून, शिल्लक पाण्याचे नियोजन व धरणातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी जलसंपदा विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. यापुढे धरणातून विनापरवाना पाणी उपसा करण्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता भार्गोदेव यांनी दिली आहे. दरम्यान, ढाकेफळ व सहा गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत असलेल्या अडचणी दूर करण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत ही योजना सुरू होणार असल्याची महिती तहसीलदार सावंत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकार न्यायालयाचा बाबांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अपात्र ठरवण्यात आलेले माजी खासदार व दहेगाव (ता. वैजापूर) येथील रामकृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेचे संस्थापक रामकृष्ण बाबा पाटील यांचे अपील राज्य सहकारी अपील न्यायालयाच्या (मुंबई) औरंगाबाद खंडपीठाने स्वीकारले आहे. रामकृष्ण बाबा यांचे बँकेच्या निवडणुकीतील विरोधक व बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांच्या अर्जावर सहकार न्यायालयाने दिलेला निकाल बाजुला सारत सहकार न्यायालयाने चार जून रोजी फेरसुनावणी घेण्याचे आदेश अपील न्यायाधिश एस. आर. पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे बाबांचे पद तूर्त कायम आहे.

सात मे २०१५ रोजी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी संस्था मतदारसंघातून वैजापूर तालुक्यातून उमेदवारी अर्ज भरलेले माजी खासदार रामकृष्ण बाबा व ज्ञानेश्वर जगताप यांच्यात सरळ लढत झाली. त्यात बाबांचा विजय झाला होता. रामकृष्ण बाबा यांनी उपसा जलसिंचन योजनेत भ्रष्टाचार केला असून, त्यांच्याकडे तीन लाख ११ हजार १७९ रुपयांची थकबाकी असताना ही बाब लपवून त्यांनी निवडणुक लढवली, असा दावा करून बाबांना अपात्र ठरवण्याची मागणी जगताप यांनी सहकार न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणात सहकार संस्था न्यायालयाने जगताप यांच्या बाजुने निकाल देत बाबांना अपात्र ठरवले होते. बाबांनी निकालाला स्थगिती द्यावी, असे अपिल केले होते, मात्र न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला होता.

२० डिसेंबर रोजी २०१८ रोजी दिलेल्या निकालाला बाबांनी आठ जानेवारी रोजी सहकार अपील न्यायालयात अॅड. उमेश बोडखे व उपाध्ये यांच्यामार्फत आव्हान दिले होते. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केल्यानंतर अपील न्यायाधिश एस. आर. पवार यांनी हे प्रकरण पुन्हा सहकार न्यायालयाकडे सोपवले असून, दोन्ही पक्षाच्या उपस्थितीत चार जून रोजी सुनावणी घ्यावी व सहा महिन्यांत निकाली काढावे, असे आदेश दिले आहेत.

\Bनिकालानंतर घेतला आक्षेप\B

जगताप हे पारळा (ता. वैजापूर) सहकारी संस्थेचे सभासद नसून त्यांना पारळा संस्थेने निवडणूक दावा लढवण्यासाठी कुठलेही अधिकारपत्र दिलेले नाही. असे असताना त्यांनी बाबा थकबाकीदार असल्याचे उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आक्षेप न घेता उमेदवारी भरल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर व निकाल लागल्यानंतर त्यांना (बाबा) अपात्र ठरवण्याचा वाद विनाकारण निर्माण करत आहेत. बाबांकडे थकबाकी असल्याचे प्रकरण अद्याप निकालस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्याचा व निवडणूक रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपनीत अपहार करणाऱ्यांना पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हरियाणातील कंपनीच्या शहर शाखेत चार लाख ३५ हजार ६४५ रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणात अक्षय मुळे, मोहित बक्तारे व रितेश साळवे या तिघांना शनिवारी (चार मे) रात्री अटक करून रविवारी कोर्टात हजर केले असता, तिघांना मंगळवारपर्यंत (सात मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी दिले.

हरियाणातील गुडगावमध्ये असलेल्या पेखम सिस्टिम लॉजिस्टिक प्रा. लि. कंâपनीची शाखा शहरातील समतानगर परिसरात आहेत. या शाखेतील अक्षय परमेश्वर मुळे (रा. गांधीनगर, महालक्ष्मीचौक), मोहित धर्माजी बक्तारे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) व रितेश राजू साळवे (रा. गुरुलॉन्स, बीड बायपास) या तिघांनी संगनमत करून ८६ ऑर्डरचा माल ग्राहकांना देऊन त्यांच्याकडून तीन लाख आठ हजार १७५ रुपये घेतले; तसेच कार्यालयातील एक लाख १६ हजार ८६२ रुपयेदेखील तिघे घेऊन गेले. याच शाखेतील योगेश कुलकर्णी यानेही जालना कार्यालयातील दहा हजार ६०८ रुपये शाखेत जमा न करता परस्पर गायब केले. या चौघांनी संगनमत करून चार लाख ३५ हजार ६४५ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार कंपनीचे मालक कर्नल संदीप यादव यांनी दिल्यावरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान अक्षय मुळे, मोहित बक्तारे व रितेश साळवे या तिघांना अटक करण्यात आली असता, तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, चौघांच्या ताब्यातून अपहाराची रक्कम जप्त करणे; तसेच आरोपी योगेशला अटक करणे बाकी आहे. त्याचवेळी प्रकरणात अन्य कोणी साथीदार आहे का, याचाही तपास करायचा असल्याने तिघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने तिघांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा, मिलींदनगर भागात २० वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी घडला. रोहित गौतम रुपटक्के (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोहित हा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. मामाच्या घरी तो आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्याच्या नात्यातल्या मुलीसोबत त्याचे लग्न ठरले होते. पुढील वर्षी हा विवाह होणार होता. रविवारी रोहितची आई मुंबईला नातेवाईकांकडे गेली होती. यावेळी रोहितने घरात साडीच्या मदतीने गळफास घेतला. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मिलिंदनगर गाठत दरवाजा तोडून रोहितचा मृतदेह बाहेर काढला. त्याला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे ऊस खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतावरून गेलेल्या महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत ऊस खाक झाला तर, मोसंबी बाग जळून गेली. पंचनामासह अन्य शासकीय कार्यवाही झाल्या मात्र, घटनेनंतर आठ दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत संबंधित शेतकऱ्यास मिळाली नाही.

रामेश्वर बाबुराव डोईफोडे असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद तालुक्यातील भालगाव येथील रहिवासी असलेल्या डोईफोडे यांचे गाव शिवारात दोन एकर शेती आहे तर, आई दगडाबाई डोईफोडे यांच्या नावे दोन एकर शेती आहे. सततच्या दुष्काळाचा सामना करत असतानाही रामेश्वर यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करत गेल्या दहा वर्षांपासून दोन एकरांत मोसंबी बाग फुलवली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी दीड एकरात ऊस लावला आहे.

त्यांच्या शेत बांधावरून विद्युत तार गेली आहे. २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली आणि काही क्षणात ती शेत परिसरात भडकली. या आगीमुळे ऊस क्षेत्र खाक झाले तर, मोसंबी बागेचे सुमारे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे रामेश्वर डोईफोडे यांनी सांगितले. दुष्काळाचे चटके सहन करत असतानाच या आगीमुळे त्यांच्यावर दुहेरी संकट कोसळले. सुमारे नऊ ते जहा लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, चिकलठाणा पोलिस ठाण्यात याबाबत त्यांनी तक्रारअर्ज दिला असून, तहसील कार्यालयातही अर्ज दाखल केल्याचे सांगितले. तलाठ्यांनी २९ एप्रिल रोजी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला, परंतु त्यानंतर आतापर्यंत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर आले नाही किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी खंत रामेश्वर डोईफोडे यांनी व्यक्त केली. वीज वितरण कंपनी, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनाही फोनद्वारे संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगून, तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ जुगाऱ्यावर सिरजापूर येथे कारवाई

$
0
0

कन्नड : सिरजापूर (ता.कन्नड) येथे जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीआधारे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने या छापा टाकत १५ जुगाऱ्यांसह एक चार चाकी, दोन दुचाकी, तब्बल १३ मोबाइल व ६१ हजार ५९५ रोख रकमेसह सहा लाख ४३ हजार ५९५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी सांयकाळी चारच्या सुमारास अप्पर अधीक्षक कार्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक ए. जी. शेख यांच्यासह पोलिस कर्मचारी राठोड, गायकवाड, शेख यांच्या पथकाने सिरजापूरात संजय हिवर्डे यांच्या घरामध्ये जुगार अड्डा चालत असल्याच्या गुप्त माहिती आधारे छापा टाकला. यात संजय हिवर्डे (सिरजापूर), बापू सोनवणे (आलापूर), रवींद्र तायडे (कन्नड), किसन वाघ (करंजखेडा), योगेश चौधरी (कन्नड), रमजान शहा (कन्नड), दिलीप शिंदे (कन्नड), गणेश पवार (कन्नड), वसंत चव्हाण (मोहर्डा), वनकर घुसिंगे (सिरसगाव), ओमकार चव्हाण (तलवाडा), ज्ञानेश्वर पवार (कन्नड), राजेंद्र पाटील (चाळीसगाव), अनिल काळे ( कन्नड) आदींना जुगार खेळताना ताब्यात घेऊन त्यांची जामिनावर मुक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images