Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य कार रॅलीचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान परशुराम जयंतीनिमित्त सोमवारी भव्य चारचाकी वाहनांच्या रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले होते. ब्राम्हण समाज समन्वय समिती आयोजित ब्राम्हण उद्योजक ग्रुप आणि नमर्देश्वर प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. बीड बायपास येथील जबिंदा लॉन्स येथून रॅलीला प्रारंभ होऊन याच ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.

सोमवारी सकाळी उद्योगपती विवेक देशपांडे यांच्या हस्ते परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच ध्वज दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. जबिंदा लॉन्स, रोपळेकर हॉस्पिटल, अमरप्रीतचौक, क्रांतीचौक, बाबा पेट्रोल पंप, वरद गणेश मंदिर, सावरकर चौक, सतीश पेट्रोल पंप, मोंढा नाका, सेव्हनहील्स, एमजीएम, चिश्तिया कॉलनी चौक, जळगाव रोड, आंबेडकर चौक, बळीराम पाटील चौक, ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालय, टीव्ही सेंटर चौक, जाधवमंडी, सिडको बसस्टँड चौक, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर चौक, गजानन मंदिर, जवाहरनगर चौक, उल्कानगरी, रोपळेकर चौक, दर्गा चौक मार्गे पुन्हा ही रॅली जबिंदा लॉन्सवर आल्यानंतर समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये ६५ चारचाकी वाहनांचा समावेश होता. रॅली सुरू असताना पोलिसांच्या मदतीला नाद वाद्य ढोल पथकातील तरुण तरुणींनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी आयोजक सतीश मंडपे, जगदीश एरंडे, सुधीर व्यास, राजेंद्र शर्मा, अक्षय कुलकर्णी, वेदांत जहागीरदार, वैभव कुलकर्णी, तसेच समन्वय समितीचे अनिल पैठणकर, मिलिंद दामोदरे, आनंद तांदूळवाडीकर, धनंजय पांडे, नगरसेविका माधुरी अदवंत, अभिषेक कादी, श्रीनिवास देव आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुल्कवाढीच्या ‘फिल्म’वर पडदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाट्यशास्त्र विभागातील 'फिल्म मेकिंग' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अचानक वाढवल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले होते. या विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेऊन समस्या सांगितली. त्यावर नियमानुसार शुल्क आकारुन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्याची सूचना तेजनकर यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात 'फिल्म मेकिंग' हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. शहरातील इतर खासगी संस्थेत जास्त शुल्क असल्यामुळे होतकरू विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतात. पुरेशा सुविधा नसतानाही विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी ३० हजार रुपये शुल्क आकारले होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावर तोडगा काढत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी फक्त पाच हजार रूपये शुल्क आकारले जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर ३० विद्यार्थ्यांनी विभागात प्रवेशघेतला होता. शुल्क कमी करण्याच्या निर्णयानंतर नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतरही कुलगुरूंचे आश्वासन नियमात बदलले नाही. या अभ्यासक्रमाची परीक्षा मे महिन्यात आहे. पूर्ण ३० हजार रुपये शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र (हॉलतिकीट) मिळणार नाही, असे विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (सहा मे) प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेतली. कुलगुरू चोपडे यांनी आश्वासन दिल्याची आठवण विद्यार्थ्यांनी करुन दिली. यावर तेजनकर यांनी नाट्यशास्त्र विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून शुल्क कमी करण्यास मान्यता घेण्याची सूचना केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील आठ दिवसांपासून विद्यार्थी अतिरिक्त शुल्काच्या तणावात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीचे तुकडे; स्वार बचावला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे येत असताना रुळावरून दुचाकी घेऊन जात असलेला दुचाकीस्वार बालंबाल बचावला. समोरून हायकोर्ट एक्स्प्रेस येत असल्याचे लक्षात येताच त्याने रुळावरच दुचाकी सोडून पळ काढला. दुचारीस्वार बचावला मात्र, रेल्वेने सुमारे अर्धा किलमीटर ओढत नेल्याने दुचाकीचे तुकडे झाले. हा धरारक प्रकार सोमवारी (६ मे) सकाळी दहाच्या सुमारास संग्रानगर रेल्वे उड्डाणपूलाखाली घडला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्वेस काही अंतरावर एक लाल रंगाची मोपेड घेऊन दुचाकीस्वार रेल्वे रूळाकडे गेला. पलिकडे जाण्यासाठी त्याने मोपेड रुळावर घातली, ती पलिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला जालन्याकडून येत असलेली रेल्वे दिसली. त्याला इशारा देण्यासाठी रेल्वे चालकाने वारंवार हॉर्न वाजवला. दुचाकीस्वार एकटाच असल्याने त्याला रुळावरून मोपेड घेऊन जाता येत नव्हती. त्यामुळे त्याने मोपेड सोडून पळ काढला. काही क्षणांचा फरक पडला असता, तर हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला असता.

दुचाकीस्वार पळून गेला, पण रेल्वेने मोपेड सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ती इंजिनात अडकल्यामुळे चालकाने अर्जंट ब्रेक लावून रेल्वे थांबविली. रेल्वे थांबल्यानंतर श्रीमंत गोर्डे पाटील यांच्यासह शिवानंद वारकर, शेख शेरू आणि राजेश खडके यांच्यासह इतर नागरिकांनी मोपेड रेल्वेखालून बाजुला काढली. यामुळे किमान १० मिनिटे रेल्वे थांबली होती. या काळात दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला. याची माहिती मेट्रो औरंगाबाद असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत गोर्डे पाटील यांनी रेल्वे विभाग, जवाहरनगर पोलिस ठाण्याला दिली. रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलिसांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. अनाधिकृत रेल्वे रूळ ओलांडल्याबद्दल दुचाकीस्वारावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे अरविंद शर्मा यांनी दिली.

\Bइंजिन नंबरवरून घेणार शोध \B

रेल्वेसमोर मोपेड टाकून पळून जाणाऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न घटनास्थळी करण्यात आला. पण, त्यात अपयश आले. मोपेडची नंबर प्लेटही सापडलेली नाही. त्यामुळे मोपेडच्या इंजिन नंबरवरून मालकाला शोधण्यात येणार आहे, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

……

\Bनिखळणाऱ्या चाव्यांकडे दुर्लक्ष \B

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील रुळाच्या चाव्या ठिकठिकाणी निखळून पडल्या आहेत. याची पाहणी स्थानिक नागरिकांनी केली असता २० ठिकाणी रेल्वे रुळाच्या चाव्या निखळून पडल्याचे स्पष्ट झाले. मोपडची घटना घडल्यानंतर या रुळावरून चेन्नई- नगरसोल आणि निजामाबाद-पुणे रेल्वे गेल्या. चाव्या निखळलेल्या असल्याने भीषण अपघात होऊ शकला असता. रेल्वेच्या चुकीमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवासही धोका असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

……

\Bभुयारी मार्गाची गरज\B

संग्रामनगर रेलवे उड्डाणपूल बांधल्यानंतर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट बंद करण्यात आले आहे. येथे भुयारी मार्ग बांधण्याबद्दल वारंवार पाठपुरावा करण्यात आला. सध्या भुयारी मार्गाचे काम रखडलेले आहे. यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून रुळ ओलांडत आहेत. भुयारी मार्ग वेळेत पूर्ण झाला असता, तर ही घटना घडली नसती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष पुजारींवर अविश्वास मंजूर

$
0
0

साठे विरुद्ध मुंदडा गटाचा फटका

बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाईचे उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांच्या विरोधात मंगळवारी अविश्‍वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. अविश्वास ठरावाची नोटीस गुरुवारी देण्यात आली होती मंगळवारी तो मांडण्यात आला.

नगरपालिकेच्या २८ पैकी २२ सदस्यांनी अविश्वास ठरावाचे पत्र दिले होते. पालिकेची एकूण सदस्य संख्या २९ आहे. एका सदस्याचे निधन झाल्याने सध्या २८ सदस्य आहेत. पैकी राष्ट्रवादी काँग्रेस १५, कॉंग्रेस ७, भाजपचे ६ असे पक्षीय बलाबल होते. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीकडे बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद पुजारी यांच्याकडे आले होते. त्यांच्याविरोधात २३ विरुद्ध ०ने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे गटाचे ९, कॉंग्रेसचे ७, भाजपचे ७ आणि नगराध्यक्ष रचना मोदी यांनी विरोधात मतदान केले. या ठरावावेळी मुंदडा गटाचे सर्व नगरसेवक गैरहजर होते. पुजारी यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. केज मतदारसंघातील साठे विरुद्ध मुंदडा गट एकमेकांसमोर आले असून या दोन गटातील वादातून अंबाजोगाई नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद गमवावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेम्पोची दुचाकीला धडक, दोन जखमी

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतून जाणाऱ्या एका टेम्पोने वळण घेणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी ( ७ मे) दुपारी दीडच्या सुमारास ऋचा इंजिनीअरिंग कंपनीजवळ घडली. श्री इंजिनीअरिंग या कंपनीचे कामगार शरद देवकर (रा. रामराई, ता. गंगापूर) व मनीष दुबे (रा. बिहार) हे दोघे दुचाकीवरून (एम एच २० ए क्यू ८५६४) जात होते. ऋचा कंपनीजवळ त्यांची दुचाकी वळताच मागून आलेल्या टेम्पोने (एम एच ०४ ई बी ९४५८) जोराची धडक दिली. या धडकेने दुचाकी दुरू फेकली जाऊन टेम्पो कामगाराच्या अंगावरून गेला. वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी जखमींना एका खासगी ऑटोमधून घाटी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी टेम्पोचालकांसह दोन्ही वाहने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंड हडपण्याचा प्रयत्न; पोलिस कोठडीत रवानगी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा परिसरातील मेहेरनगरमधील मुक्तानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिकेला दिलेला मोकळा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात संशयित आरोपी गणेश भगवान पवार याला अटक करून मंगळवारी (७ मे) न्यायालयात हजर केले असता, बुधवारपर्यंत (८ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

गारखेडा परिसरातील मेहेरनगरमध्ये मुक्तानंद (मेंटेनन्स) सहकारी गृहनिर्माण सोसायटीने मोकळा भूखंड सोडला आहे. ही जागा हक्कसोड प्रमाणपत्राद्वारे महापालिकेला हस्तांतरित केली असून, पालिकेच्या नावे पीआर कार्ड तयार झालेले आहे. सोसायटीमधील नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने येथे बांधकाम सुरू केले. काही अतिक्रमणधारकांनी ६० ते ७० नागरिकांच्या सहकार्याने २७ एप्रिलच्या रात्री त्या ठिकाणी येऊन पालिकेने बांधलेल्या व्यासपीठावरील पत्रे काढून टाकली. तसेच उद्यानाचा फलक उखडून फेकत दहशत निर्माण केली. अतिक्रमणधारकांनी सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर धावून जात व्यासपीठाचे लोखंडी अँगल चोरून नेले. या प्रकरणात अतिक्रमण विभागाचे पदनिर्देशीत अधिकारी प्रभाकर पाठक, वामन कांबळे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी गणेश पवारला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हा करतेवेळी आरोपीसोबत १० ते १५ जण होते. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करायचे असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी केली. ही विनंती मान्य करून बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टँकरवर ‘जीपीएस’ची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून शहराचे पाणी पेटले असून, जलकुंभांवरून पुरवठा करण्यात येत असलेल्या टँकरच्या अर्धवट नोंदी केल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे टँकरचे पाणी नेमके कुठे जाते, असा प्रश्न आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या (जीपीएस) मदतीने नियमित तपासणी करून पूर्ण नोंदी व पत्ते घेण्याचे आदेश दिले. यावेळी टँकरमध्ये कोणतीही अनियमितता होत नसल्याचा दावा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी केला.

महापालिकेची नळयोजना पोचेली नाही अशा भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी नागरीकांकडून आगोदर पैसे भरून घेण्यात येतात. पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागांमध्ये एक दिवसाआड पाणी दिले जात होते मात्र, टंचाई निर्माण झाल्यापासून काही भागांत महापालिकेने दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लागू केले आहे. काही भागात एक दिवसाआड पाणी देण्यात येते. गेल्या दोन महिन्यांमध्ये पैसे भरूनही एक दिवसाआड टँकरचे पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ज्यांनी पैसे भरलेले नाहीत, अशांकडून ओरड होत असल्याचे स्पष्ट केले.

सिडको एन-पाच येथील जलकुंभावरील नोंदी पाहता येथून मोठ्या प्रमाणावर टँकर भरून घेण्यात येतात मात्र, हे टँकर कोणत्या भागात जातात. कुणी टँकर मागवले याबाबत ढोबळ नोंदी आहेत. बैठकीत याकडे महापौर घोडेले यांनी लक्ष वेधले असता टँकर पुरवठ्यात अनियमितता होत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. यावर यापुढे 'जीपीएस' तंत्राद्वारे टँकरची तपासणी करावी, एकाच अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी द्यावी, टँकरच्या नोंदी घेताना संपूर्ण नाव, टँकर कोणत्या भागात जात आहे तेथील संपूर्ण पत्ता नोंद करण्याचे आदेश दिले.

सकाळी सहापासून टँकरचा भरणा

चिकलठाणा एमआयडीसीतील एन-एक व महापालिकेच्या एन-सात येथील जलकुंभांवरून आता सकाळी आठऐवजी सहापासूनच टँकर भरणे सुरू करण्याच्या सूचनाही यावेळी महापौरांनी केल्या. दोन्ही ठिकाणांहून सध्या टँकरच्या २०० खेपा होत आहेत. त्यात आता वाढ होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानसभा निवडणुकीसाठी वेळ कमी आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. भावनेच्या आहारी गेलेल्या लोकांना, मतदारांना पुन्हा परत आणा, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी कार्यकर्त्यांना केले. भावनेवर आधारित लाट, संघटना नंतर ओसरतेच. वंचित बहुजन आघाडीचीही तशीच परिस्थिती होईल, असा दावाही त्यांनी केला. 'वंचित बहुजन आघाडीशी सामना करायचा असेल तर, आधी पक्षातील वंचितांना बळ द्या,' अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा, ब्लॉक अध्यक्ष यांची मराठवाडास्तरीय बैठक मंगळवारी शहागंज येथील काँग्रेस भवनात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

शहराध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे, प्रतिमा उके, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार, सरचिटणीस रमेश साळवे, शहराध्यक्ष बाबा तायडे, जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाडे आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीचे आव्हान आहे, पण भावनेवर आधारित लाट नंतर ओसरते, तसेच या आघाडीचे होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष अंभोरे यांनी यावेळी केला. भाजप, शिवसेनेला राज्य घटना मान्य नाही. त्यांनी राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.

पक्षांच्या विचाराशी जोडलेल्या गेलेल्या, पण काही कारणांनी दूर गेलेल्या मतदारांना पुन्हा परत आणण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे. भावनेच्या आहारी जाऊ नका, अशी जनजागृती करा. त्यासाठी शेवट्या घटकापर्यंत जा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे यांनी वंचित आघाडीशी सामना करायचा असेल तर, आधी पक्षांतील वंचितांना बळ द्या, कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्या, असे नमूद केले. काँग्रेस शहराध्यक्ष पवार यांनी, 'सर्वांनी निष्ठेने, कष्टाने काम केल्यास राज्यात काँग्रेस आघाडीची निश्चित सत्ता येईल. सत्ता आली नाही तर आपण शिल्लक राहणार नाही,' असे सांगितले. बैठकीत बहुतेक कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीचा मुद्दा उपस्थित करतानाच कार्यकर्त्यांना अधिक बळ द्या, गटातटाचे राजकारण संपवत एकजूट दाखवण्याची गरज व्यक्त केली. शहराध्यक्ष बाबा तायडे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.

\Bकाळ्या फिती लावून मोदी यांचा निषेध\B

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवगंत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत अवमानकारक विधान केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी करत शहागंज येथील गांधी पुतळा येथे काळ्या फिती लावत त्याचा निषेध केला. प्रदेशाध्यक्ष अंभोरे, कार्याध्यक्ष देहाडे, शहराध्यक्ष नामदेव पवार, प्रतिमा उके, प्रशांत पवार, राजाराम बल्लाळ, डॉ. पवन डोंगरे, दिनकर घेवांदे, रावसाहेब नाडे, उत्तम दणके, सिद्धार्थ सरोदे, भिकाजी खोतकर, असमत खान, अशोक चक्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सलीम अली’च्या स्वच्छतेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक सलीम सरोवराच्या स्वच्छतेचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सरोवराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली होती. प्रशासनाने स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत १२ ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली.

ऐतिहासिक सलीम अली सरोवराची जैववैविध्य पालिकेच्या दुर्लक्षामुळे नष्ट झाले. मागील काही महिन्यांत दुर्लक्षामुळे सरोवरात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली होती. सरोवरात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढली होती. अखेर महापालिका प्रशासनाने साफसफाईचे काम हाती घेतले आहे. उद्यान विभागाच्या पुढाकाराने जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाहणी केली. यावेळी उद्यान अधीक्षक विजय पाटील यांची उपस्थिती होती. मंगळवारपर्यंत १२ ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. जलपर्णीमुळे जैवसंपदेला धोका होणार नाही, यासाठी रायगड येथील तज्ज्ञ शेखर भेडसावले यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच काही भागात औषध फवारणी केली होती. त्यानंतर अखेर जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. कुजलेल्या जलपर्णीचा खत म्हणून वापर करण्यात येईल, असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीच्या नवीन मॉच्युरी इमारतीचे भूमीपूजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटीतील नवीन शवविच्छेदनगृह सध्याच्या जागेतच होणार असल्याचे घाटी प्रशासनाने स्पष्ट केले असून, याच जागी नवीन इमारतीचे भूमीपूजन मंगळवारी (७ मे) करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. आर. एन. वासनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. एम. आय. सय्यद आदी उपस्थित होते.

यापूर्वी याच जागी नवीन शवविच्छेदनगृह उभारण्याचे नियोजन झाले होते. मात्र याच परिसरात बायामेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा व अभिलेख कक्ष आहे आणि नव्या इमारतीसाठी हा कक्ष हटविणे आवश्यक होते; परंतु ही प्रक्रिया रेंगाळली व मंजूर दीड कोटींचा निधीही परत गेला. त्यामुळे नव्या जागेची शोधाशोध सुरू झाली होती. मात्र, इतर ठिकाणी ही इमारत उभी करणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले व त्यामुळेच सध्याच्या जागेत नवीन इमारतीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा हलवण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा असून, सध्याच्या जागेतच नवीन इमारत उभी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आणि नवीन इमारतीचे भूमीपूजन मंगळवारी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळप्रश्नी फुलंब्रीत ‘प्रहार’चे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान व गावागावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा या मागणीसह इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मंगळवारी (७ मे) तहसील कार्यालयासमोर डेरा आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तहसीलदारांच्या लेखी आश्वासनांनंतर मागे घेण्यात आले.

तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ३० एप्रिल रोजी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान व गावातील पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा, अपंगांच्या मानधनात शासन निर्णयाप्रमाणे वाढ करावी, जिल्हा परिषद सर्कलनिहाय चारा छावण्या सुरू कराव्यात, ग्रामीण भागातील वृक्षतोड थांबवावी, झाडे तोडणाऱ्यावर कारवाई करावी, आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुदाम गायकवाड, रावसाहेब खिल्लारे, सांडू लहाने, दीपक चिकटे, कृष्णा गाडेकर, विष्णू ढेपले, प्रभाकर कोलते, अनिता कोलते, दिलीप शिंदे, राजेंद्र भालेराव, मोमीन शहा आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांनो, नियुक्तीच्या गावात मुक्काम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे तलाठी, ग्रामसेवक, लाइनमन, कृषी सहाय्यकांनी नियुक्ती असेल, त्याच गावात मुक्कामी थांबावे, असे आदेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काढले आहेत. गावात मुक्कामी नसणारे किंवा गैरहजर राहणाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असे या आदेशात म्हटले आहे.

दुष्काळात पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, रोहयोची कामे देणे, जनावरांसाठी चारा तसेच पाण्याची सोय करणे आदी कामांना प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे, मात्र ग्रामीण भागात क्षेत्रीयस्तरावर अनेक ठिकाणी भेट दिली असता तलाठी, ग्रामसेवक, इतर कर्मचारी गावात उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता तलाठी, ग्रामसेवक, लाइनमन, कृषी सहायकांनी नियुक्तीच्या गावात मुक्कामी राहावे व जनतेच्या अडचणी, कामे सोडविण्याला प्राधान्य द्यावे. या कामात कुचराई करणाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तातडीने शिस्तभंगांची कारवाई करावी, जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारित ग्रामस्तरावरील कर्मचारी नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी मुक्कामी राहतील याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

\Bकन्नड तालुक्यातील तलाठ्यावर कारवाई \B

कन्नड तालुक्यातील एका तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव लवकर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हळी सुटीत पोषण आहार; फुलंब्री तालुक्यात बोजवारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीत पोषण आहार देण्याचे आदेश शिक्षण विभागाने काढले असले तरी तालुक्यातील काही शाळेत शिक्षक येतच नसल्याने शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडाला आहे. योजनेवर नियंत्रण ठेवणारे पथक प्रत्येक शाळेवर पोचले नसल्याने शिक्षण विभागाच्या आदेशाला हरताळ फासला गेल्याची स्थिती आहे.

तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना राबवावी, असा आदेश शिक्षण विभागाने काढला. ही योजना जिल्हा परिषदेच्या १९३ व इतर खासगी मान्यताप्राप्त अशा एकूण २२१ शाळांत राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र दिनापासून शाळांना सुटी लागल्यानंतर काही शाळेतील शिक्षक शाळेकडे फिरकलेच नाहीत. परिणामी, त्या शाळेत खिचडी शिजवली जात नाही. योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांना तालुक्यातील प्रत्येक शाळेस भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. हे पथकही शाळेत जात नसल्याने योजनेचा बोजवारा उडाला आहे.

तालुक्यात सर्व शाळेत पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी कमी येतात, तर काही ठिकाणी विद्यार्थी येतच नाही. शिक्षक तसा अहवाल दररोज ऑनलाइन सादर करतात. आमचे पथक दररोज शाळांना भेट देत आहे. पाहणीत काही आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल.

-रवींद्र वाणी, गटशिक्षणाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी बसमधून कट्टा, काडतूस जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. पोलिसांनी बसचालक शेख बद्रुरुद्दीन शेख अलिमोद्दीन (रा. नवागाव इस्लामपुरा साजेड ऑइल चाळीसगाव) व क्लिनर समाधान दगडू मोरे (रा. देवळी ता. चाळीसगाव) या दोघांना अटक केली आहे.

एम एच २० ई जी १२७६ क्रमांकाच्या चाळीसगाव ते पुणे जाणाऱ्या सरस्वती ट्रॅव्हल्स बसमध्ये एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री बारा वाजता खुलताबाद येथील शँजरी हॉटेल चौकात या बसला थांबवून तपासणी केली. या तपासणीत एका पिवळ्या बॉक्समध्ये एक गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस सापडले. याबद्दल पोलिसांनी बस चालकाकडे चौकशी केली असता चाळीसगाव येथील उमा पेट्रोल पंपाजवळ एका व्यक्तीने हा बॉक्स पुणे येथे पार्सल म्हणून पाठवण्यासाठी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी बस चालक, क्लिनरसह एका अनोळखी इसमाविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात ३/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश मुळे, दिपेश नागझरे, नदीम शेख व बाबा नवले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर बलात्कार; दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण येथील १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिला तिच्या घरातून पळवून नेऊन तिच्यावर पाटेगाव शिवारात बलात्कार करणारा ज्ञानेश्वर अशोक गाडे याला १० वर्षे सक्तमजुरी व १९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी ठोठावली.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलाने फिर्याद दिली होती. त्यानुसार, ११ मे २०१६ रोजी ते कामानिमित्त बिडकीन येथे गेले असता पत्नी व मुले घरीच होती. ते सायंकाळी परतल्यानंतर त्याला पीडित मुलगी दिसली नाही म्हणून पत्नीकडे विचारले केली. 'गावातील ज्ञानेश्वर अशोक गाडे (वय २४, रा. पैठण) हा दुचाकीवर घरी आला व त्याने आवाज देऊन मुलीला बोलावून घेतले आणि घेऊन गेला', असे पत्नीने सांगितले. शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने १४ मे २०१६ रोजी पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान ज्ञानेश्वरला १७ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली. या प्रकरणात पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून, ज्ञानेश्वरने तिला लग्नाचे आमीष दाखवून गट क्रमांक १३३ मधील पाटेगाव शिवारात नेऊन बलात्कार केला. तसेच तिला तिथेच सोडून ज्ञानेश्वर घरी निघून गेला आणि सायंकाळी पुन्हा परतला. 'तुझ्या वडिलांनी माझ्याविरुद्ध तक्रार दिली,' असे सांगत १६ मे रोजी मुलीला पैठण परिसरात आणून सोडले, असाही जबाब मुलीने दिला होता. त्यावरून विविध कलमांन्वये गुन्हा दाखल होऊन कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले होते. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील उल्हास पवार यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली, तर दोन साक्षीदार फितूर झाले.

\Bसात कलमान्वये ठोठावली शिक्षा

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने ज्ञानेश्वर गाडे याला भारतीय दंड संहितेच्या ३६३ कलमान्वये ३ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, ३६६ कलमान्वये ३ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, ३७६ कलमान्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, पोक्सो कायद्याच्या कलम ४ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, 'पोक्सो'च्या कलम ६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, 'पोक्सो'च्या कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड, तर 'पोक्सो'च्या कलम १२ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीला एकाचवेळी भोगायच्या असून, दंड न भरल्यास आरोपीला एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेरीवाल्यांमुळे रस्ते गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्य बाजरपेठेतील रस्ते फेरीवाल्यांनी काबीज केल्यासारखी स्थिती आहे. वाहतुकीस रस्ते नसल्याचे सांगत, पोलिस प्रशासन व व्यापाऱ्यांनी महापौरांकडे 'हॉकर्स झोन' तयार करण्याची मागणी केली. 'वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने यावर काही तरी करा,' असे साकडे व्यापाऱ्यांनी घातले.

महापालिकेने पूर्वीपासूनच शहरातील फेरीवाले, हातगाडीवाडे यांना 'हॉकर्स झोन' उपलब्ध करून दिलेले नाहीत. त्यात सणांमध्ये रस्त्यावर लागणाऱ्या गाड्यांमुळे रस्तेच व्यापले जातात. आता हे नियमितपणाचे झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रमजाननिमित्त शहरातील फेरीवाले, विक्रेते आणि व्यापारी, पोलिस यांची महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली. यावेळी किशनचंद तनवाणी, सुरेंद्रसिंग सब्बरवाल, प्रभारी सहायक आयुक्त भारत काकडे, पोलिस निरीक्षक पी. एस. शिनगारे, राहुल सूर्यथळ, मंजुषा मुथा, पंकज पाटील, वामन कांबळे, प्रभाकर पाठक, मोहम्मद इत्तेखरोद्दिन सईद, शेख खालीद शेख याकूब, लक्ष्मीनारायण राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य बाजार पेठेतील हातगाडी चालक, फेरीवाले, विक्रेते यांना 'हॉकर्स झोन' निश्चित करून द्या, अशी मागणी केली. विनापरवानगी फेरीवाले एकाच ठिकाणी गाड्या उभ्या करून व्यवसाय करतात. त्यात अनेकदा व्यापारी व फेरीवाले यांच्यात वाद निर्माण होत आहे. रमजानच्या महिन्याची सुरुवात होत आहे. हे लक्षात घेत, 'हॉकर्स झोन' निश्चित करावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

\Bहातगाड्यांमुळे रस्त्ये बंद\B

शहरातील बहुतांशी भागामध्ये हातगाड्या रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जातात. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. फळ, ड्रायफूट, कपडे, गृहपयोगी वस्तू आदी साहित्याची विक्री आपल्या हात गाडीवर करतात. वाद टाळण्यासाठी फेरीवाल्यांना शहरातील महत्वाच्या बाजारपेठेत तरी किमान सणांच्या दिवसात तात्पुरते हॉकर्स झोन निश्चित करावे अशी मागणी करण्यात आली. यासह दोन फिरते शौचालय, पाण्याचे टँकरही उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे

शहरात फेरीवाल्यांची संख्या….......४२ हजार

सणानिमित्त..............................७०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवान परशुराम जयंती शोभायात्रा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थान गणपती येथून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचा समारोप औरंगपुरा परशुराम चौकात करण्यात आला. यावेळी पारंपारिक वेषभुषेत सहभागी झालेल्या ढोल पथकांनी शोभायात्रेमध्ये चांगलीच रंगत आणली.

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त गेल्या आठवड्याभरापासून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेच्या सुरुवातीला पालखीमध्ये भगवान परशुरामांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कलशधारी महिलांचा यामध्ये समावेश होता. यानंतर महिला व तरुणीचे लेझीम पथक वेगवेगळ्या आकर्षक चाली सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेत होत्या. संस्थान गणपती राजाबाजार येथून निघालेली ही शोभायात्रा गांधी पुतळा, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी मार्गे औरंगपुरा येथील भगवान परशुराम चौकात रात्री उशिरा आली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. ब्राम्हण समाज समन्वय समिती आणि भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये धनंजय पांडे, विनोद मांडे, आनंद तांदूळवाडीकर, मिलिंद दामोदरे, अनिल खंडाळकर, गोपाळ कुलकर्णी, सचिन वाडे पाटील, जगदीश एरंडे, अॅड. निनाद खोचे, विजया कुलकर्णी, राजेंद्र शर्मा, ब्रम्हरागिणीच्या गीता आचार्य, नेहाली खोचे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

ढोल पथके ठरली आकर्षण

शोभायात्रेमध्ये तरुण तरुणींचा मोठा सहभाग असलेली ढोल पथके चांगलीच आकर्षण ठरली. आकर्षक पारंपारिक वेशभूषा आणि वेगवेगळ्या रंगाचे फेटे उपस्थितांची नजर वेधून घेत होते. सुमधूर चाली या पथकांनी जल्लोषात सादर केल्या. या पथकामध्ये भार्गव केसरी, नाद गंधर्व, ब्रम्हास्त्र, ब्रम्हनाद आदी पथकांचा समावेश होता.

चोख पोलिस बंदोबस्त

या शोभायात्रेसाठी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक दादाराव शिनगारे हे पथकासह शोभायात्रेवर नजर ठेऊन होते. शोभायात्रे दरम्यान वाहतूक व्यवस्था देखील सुरळीत ठेवण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी तपासणीत दिरंगाई कुणासाठी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहातील दूषित पाण्याचा तपासणी अहवाल मंगळवारी सादर झाला नाही. विद्यापीठ प्रशासन पाठपुरावा करीत नसल्यामुळे महापालिकेने दिरंगाई केल्याचे स्पष्ट झाले. दूषित पाण्याचे नमुने घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासन अहवाल देण्याची शक्यता आहे. दोषींवर जबाबदारी निश्चित करायची नसल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.

विद्यापीठात विद्यार्थिनींच्या सात वसतिगृहात दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे १६६ विद्यार्थिनी आजारी पडल्या होत्या. ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थिनी आजारी पडल्यामुळे विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. कंत्राटदार महापालिकेचे पाणी पुरवत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, टँकरची एक खेप दूषित विहिरीतून आणली गेल्याची माहिती आहे. संबंधित टँकरचालकाने पहिल्या दिवशी कबुलीही दिली होती. विद्यापीठाचा गलथानपणा उघड झाल्यामुळे वरिष्ठ ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी प्रकरण दाबण्याचा आटापिटा कायम ठेवला आहे. दूषित पाण्याचे नमुने तत्काळ न्यायवैद्यक प्रयोगाशाळेत पाठवणे आवश्यक होते. मात्र, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी कार्यतत्परता दाखवली नाही. या दिरंगाईत पाण्याचे नमुने नाहीसे करण्यात आले. टीकेची झोड उठल्यानंतर अखेर महापालिकेला दुसऱ्याच पाण्याचे नमुने देण्यात आले. या पाण्याच्या तपासणीचा अहवाल मंगळवारी (७ मे) प्राप्त होईल, असे कुलसचिवांनी सांगितले होते. मात्र, अहवाल आला नसल्यामुळे प्रकरण दडपण्यात आल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा सुरू आहे. काही विद्यार्थी संघटनांनी अन्न व औषध विभागाच्या आयुक्तांना पाण्याचे नमुने तपासणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार विभागातील कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आहेत. आता या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींच्या आजाराचे नेमके निदान झाले नसल्याचा दावा व्यवस्थापन परिषद सदस्यांनी केला. विद्यार्थिनी ऊन लागल्यामुळे आजारी पडल्याचा अजब दावा करण्यात आला आहे. मात्र, एकावेळी १६६ विद्यार्थिनी आजारी कशा पडल्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठ प्रशासनाने पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेकडे बोट दाखवले आहे. याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असून महापालिकेची बदनामी होत असल्यास विद्यापीठाला जाब विचारण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

\B'आरओ' यंत्रणा कार्यान्वित\B

विद्यापीठ कॅम्पसमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले होते. दोन दिवसात अभ्यासिका आणि वसतिगृहात 'आरओ' लावण्यात येईल. तसेच अतिरिक्त पाणीपुर‌वठा करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले होते. त्यानुसार दोन्ही ठिकाणी 'आरओ' लावले असून जास्तीचा पाणीपुरवठा जारद्वारे करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळ निवारणात कुचराई नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'दुष्काळात लोक एकमेकांना मदत करत असताना, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांवर ढकलाढकली करू नये. जिथे पाण्याच्या टँकरची मागणी केली जाईल तिथे टँकर सुरू करा, खेपा वाढवा. मागणीप्रमाणे जनावरांच्या छावण्या सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिल्या. दुष्काळ निवारणाच्या कामात कुचराई केल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शिंदे सोमवारपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोमवारी गंगापूर, वैजापूर, कन्नड या तालुक्‍याची त्यांनी पाहणी केल्यानंतर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहातील बैठकीत टंचाईचा आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड्. देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, महापौर नंदकुमार घोडले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर उपस्थित होते.

या बैठकीत आमदारांनी दुष्काळ निवारणाच्या मुद्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी नाही, चारा नाही, हाताला काम नाही, अनेक प्रस्ताव असूनही चारा छावण्यांच्या मंजुरीत दिरंगाई केली जात आहे. छावण्या चालविणाऱ्यांना शासन देत असलेले पैसे तातडीने देण्याची सोय केली जात नाही. टँकरच्या मंजूर फेऱ्या होत नाहीत, असे मुद्दे उपस्थित करत टँकरमध्ये पाणी भरण्याचे पॉइंट वाढविण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

चर्चेनंतर मार्गदर्शन करताना पालकमंत्री शिंदे यांनी दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर असल्याचे सांगत या संकटाच्या घडीत प्रशासनातील प्रत्येकाने आपल्याकडील जबाबदारी व इतरांशी समन्वय ठेवून जनतेला दुष्काळ निवारणात दुष्काळग्रस्तांना कशी मदत करता येईल ते पहावे, असे आवाहन केले. अधिकारी, कर्मचाऱ्याने कामात कुचराई केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

\Bपालकमंत्र्यांनी केलेल्या सूचना \B

गाव पातळीवरील प्रशासनातील यंत्रणेतील घटकांनी दोन महिने मुख्यालय सोडू नये. मागणी तेथे चारा छावणी द्या, जिथे पाण्याच्या टँकरची मागणी केली जाईल तिथे टँकर सुरू करा, खेपा वाढवा, चारा छावण्याचे पैसे किमान चौथ्या दिवशी दिले जातील, अशी सोय करा, तलावातील गाळ काढण्याची मोहीम गतिमान करा, जेसीबी, पोकलेन उपलब्ध करून द्या, स्वत: होऊन तलावातील माती घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करू नका, आदी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. बैठकीनंतरच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात पुन्हा येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधी पक्षनेतेपदी बोर्डे यांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी सरिता अरुण बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाचा जमीर कादरी यांचा कार्यकाळ संपल्याने 'एमआयएम'ने ही निवड केली. त्याचे शिफारसपत्र महापौरांकडे सादर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

महापालिकेतील विरोधी पक्षनेते बदलण्यासंदर्भात 'एमआयएम'कडून महापौर नंदकुमार घोडेले यांना शिफारसपत्र देण्यात आले. पत्रात विरोधी पक्षनेत्या म्हणून नगरसेविका सरिता बोर्डे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. यावेळी आमदार इम्तियाज जलील, गटनेते नासेर सिद्दिकी, मावळते विरोधी पक्षनेता जमीर कादरी, अरुण बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिफारस करण्यात आली असली तरी, आचारसंहितेत लागेच पत्र देता येते की, नाही. याबाबत विधी विभागाकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांना निवडीचे पत्र दिले जाईल, महापौरांनी सांगितले. ती केवळ औपचारिकता असेल असेही सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images