Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिलेच्या बदनामीसाठी दहा फेसबुक अकाउंट हॅक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एका महिलेची बदनामी करण्यासाठी त्याने चक्क दहा जणांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय संशयित आरोपीने या महिलेच्या नावे बनावट अकाउंट सुरू करून त्यावर महिलेबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला. या प्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेतल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेल पथकाने आरोपीला अटक केली. याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते, पण नवऱ्यासोबत पटत नसल्याने घटस्फोट झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ती माहेरी चितेगाव येथे राहून खासगी नोकरी करते. महिलेकडे अँड्राइड मोबाइल असून त्यावर तिचे फेसबुक अकाउंट आहे. दोन महिन्यांपूर्वी तिच्या चुलत भावाने तिच्या फेसबुक अकाउंटवर तिच्या नावाने अश्लील मॅसेज असल्याची माहिती दिली. या महिलेने तपासणी केली असता हे खरे असल्याचे दिसून आले. तिने बिडकीन पोलिस ठाण्यात बनावट फेसबुक अकाउंट बंद करण्याबद्दल अर्ज दिला होता. पोलिसांनी हे अकाउंट बंद केल्यानंतर पुन्हा तिच्या नावाने दुसरे बनावट अकाउंट सुरू करून अश्लील मजकूर पोस्ट करण्यात आला. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले. सायबर सेलने तपास केला असता या महिलेच्या नावे १० बनावट फेसबुक अकाउंट सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तंत्रज्ञानाचा वापर करत सायबर सेलने संशयित आरोपी निलेश ज्ञानेश्वर दाभाडे (वय २०, रा. धुपखेडा, ता. पैठण) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी निलेशला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घुगे, उपनिरीक्षक मोहसीन सय्यद, कैलास कामठे, रवींद्र लोखंडे, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, जीवन घोलप, गजानन बनसोड यांनी केली.

फोन क्रमांकावरून अकाउंट हॅक

संशयित आरोपी निलेशने या महिलेचे बनावट फेसबुक अकाउंट सुरू करण्यासाठी शक्कल लढवली. वेगवेगळ्या व्हॉटस्‌अॅप ग्रुपमधील व्यक्तींच मोबाइल क्रमांक आणि नाव कॉपी करून घेत होता. यानंतर फेसबुकवर ज्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड हा मोबाइल क्रमांक आहे, त्यांचे अकाउंट तो हॅक करत होता. यानंतर हॅक केलेल्या अकाउंटवर तो महिलेचे नाव आणि फोटो टाकून अश्लील मॅसेज अपलोड करत होता. तसेच तिच्या खात्यावरून गावातील इतर लोकांना फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून जास्तीत जास्त बदनामी करण्याचा प्रयत्न करीत होता.

संशयित आरोपी विद्यार्थी

अटक करण्यात आलेला संशयित आरोपी निलेश हा एका नामाकिंत कॉलेजात बीएसस्सीचा विद्यार्थी आहे. तो अर्धवेळ नोकरी सुद्धा करतो. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता पीडित महिलेच्या नावाने बनावट अकाउंट तयार करणाऱ्याचे नाव, पीडितेचा फोटो तसेच अश्लील फोटो सापडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीची छेडछाड, तीन वर्षे सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत तिच्या घरात घुसून विनयभंग करणारा आणि धमक्या देणारा आदित्य बबन खाडे याला तीन वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एस. दातीर यांनी मंगळवारी (७ मे) ठोठावली.

या प्रकरणी १२ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांची मुलगी घरासमोर भांडे घासत असताना आदित्य बबन खाडे (वय २१, रा. आनंदनगर, गारखेडा) हा तेथे आला व त्याने शुकशुक करीत 'कैरी खाते का' असे विचारले. त्यामुळे मुलगी घाबरून घरात पळाली. घाबरलेल्या मुलीला पाहून फिर्यादी व त्यांची पत्नीने बाहेर आली असता, आदित्य पळून गेला होता. दरम्यान, २७ मार्च २०१७ रोजी सकाळी सव्वासहा वाजता मुलीचे वडील पत्नीला सोडायला गेल्याची संधी साधून आदित्य हा त्यांच्या घरात घुसला आणि मुलीचा हात पकडून 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत चल' असे म्हणाला. मुलीने हात सोडवायचा प्रयत्न केला असता, आदित्यने चापट मारली आणि 'आरडाओरड केली पाहून घेईन' असे धमकावले व पळून गेला. त्यानंतर काही दिवसांनी आदित्य फिर्यादीच्या घरामागे पाणी भरण्यासाठी आला असता, मुलीच्या वडिलांनी त्याला पकडून पोलिसांकडे घेऊन गेला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अजित अंकुश यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यात फिर्यादीसह पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली.

\B... तर, महिन्याची अतिरिक्त शिक्षा

\Bखटल्याच्या सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आदित्य खाडे याला भारतीय दंड संहितेच्या ४५२, ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), तसेच 'पोक्सो' कायद्याच्या ११ व १२ कलमान्वये (प्रत्येक कलमाअंतर्गत) तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक कलमात एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुलत्याचा खून; पुतण्यास पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चुलत्याचा खून करणारा संशयित आरोपी पुतण्या शेख अलीम शेख बुडन याला सोमवारी (६ मे) अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (१० मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

बांधकाम कंत्राटदार असलेल्या चुलत भावाकडे मृत शेख सत्तार शेख सांडू (वय ३९, रा. देवळाई गाव) हे बिगारी काम करत होते. पत्नी, दोन मुले, मोठी मुलगी यांच्यासोबत ते देवळाई गावात राहत होते. सत्तार यांना रविवारी सुटी असल्याने सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचा मेव्हणा शेख निसार शेख आसिफ हे देवळाई चौकातून जात असताना सत्तार यांनी त्यांना थांबवून चहा पिण्यासाठी आग्रह केला. निसार व सत्तार यांनी देवळाई चौकातील एका हॉटेलवर गप्पा मारत चहा घेतला. त्यानंतर निसार रिक्षा घेऊन निघाले, तर सत्तार घरी निघाले. त्याचदरम्यान सत्तार यांना आरोपी शेख अलीम शेख बुडन (वय २२, रा. बीड बायपास) याने चौकात अडवले व त्यांच्यावर चाकूने तीन वार करून गंभीर जखमी केले. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख अलीमला पैठण येथून अटक करण्यात आली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे व चाकू जप्त करणे बाकी असून, गुन्हा करण्यामागचा नेमका हेतू काय होता, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बटुंवर सामूदायिक उपनयन संस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सकल ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी (७ मे) अक्षयतृतीया, परशुराम जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर सामूदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले. चिकलठाणा विमानतळासमोरील नभराज ग्रुप येथे हा उपनयन सोहळा पार पडला. यावेळी २०१ बटुंवर संस्कार करण्यात आले.

राजस्थानी विप्र मंडळने या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला. सकाळी पावणेसात वाजता सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी चौल संस्कार, मातृभोजन, भगवान परशुराम पूजन, देवदर्शन, मंगलाष्टक, उपनयन संस्कार आणि भिक्षावंदन आदी विधी पार पडले. यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी करवीर पिठाचे जगतगुरू शंकराचार्य स्वामी श्री विद्या नृसिंह भारती, प. पू. अप्पा महाराज, महंत सुरेश महाराज रामदासी, पंडित दिलीप अवस्थी, भागवताचार्य विजयकुमार पल्लोड, विश्वासशास्त्री घोडजकर, कल्याणजी महाराज भोगे, दत्ताशास्त्री चौथाईवाले आदींची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी आर. बी. शर्मा, डॉ. सतीश उपाध्याय, राजेश बुटोले, राजेंद्र शर्मा, विजया पंचारिया, सुरेश पारिक, सी. एम. शर्मा, अजय शर्मा, विजय आसोपा आणि विजयकुमार गौड यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक बाऊन्स प्रकरणात शिक्षकास दंड, शिक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धनादेश अनादरप्रकरणी शिक्षक योगेश विनायकराव पाटील याला दोन महिने शिक्षेसह सव्वालाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी दिले. योगेश पाटील व बाळू कदम हे दोघे एकमेकांना ओळखतात आणि इंदिरानगर येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेवर कार्यरत आहेत. फिर्यादी कदम यांनी पाटील याला जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तीन, तर भगवान झुंबड यांच्याकडून एक लाख रुपये घेऊन पाटील याला दिले होते. परफेडीसाठी पाटील याने दिलेला ५० हजार व एक लाखाचा धनादेश खात्यात रक्कम नसल्याने परत आल्यामुळे कदम यांनी वसुलीसाठी नोटीस बजावली. त्यानंतरही दखल घेतली नाही म्हणून पाटील याच्याविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने योगेश पाटील याला दोन महिने शिक्षेसह सव्वालाख रुपये भरपाईचे आदेश दिले. फिर्यादीतर्फे अॅड. रमेश घोडके व अॅड. सुषमा पाटील यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीर्तनकाराच्या वाहनावर हल्ला; कारवाईचे आश्वासन

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

छावा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आळंदी येथील कीर्तनकार गोरख आहेर (महाराज) यांच्या वाहनावर लोणी येथे झालेल्या हल्ल्यातील आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागिय पोलिस अधिकारी गौतम पवार यांनी दिले. त्यामुळे मंगळवारचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

पारळा (ता. वैजापूर) येथील रहिवासी व सध्या आळंदी येथे वास्तव्यास असलेले गोरख महाराज आहेर हे २५ एप्रिल रोजी तालुक्यातील लोणी येथे कीर्तनाकरिता आले असता जुन्या वादातुन किशोर कुंदे, कचरू कुंदे, बाबासाहेब कुंदे, अमोल कुंदे, गजानन कुंदे व रामेश्वर कुंदे (सर्व रा. खरज) यांनी महाराजांच्या वाहनाच्या काचा फोडल्या, मारहाण करून शिविगाळ केली, अशी तक्रार शिऊर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा गुन्हा अदखलपात्र दाखल केल्याने आरोपींवर दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी महाराजांनी धरणे देण्याचा इशारा दिला. होता. उपविभागीय पोलिस अधिकारी गौतम पवार, पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी छावा कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनकर कोतकर, पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्ष गोरख महाराज, मच्छिंद्र आहेर, केदारेश्वर महाराज जाधव, सुनील महाराज चव्हाण, मारुती गोडसे, तेजस कुंदे, कडू पाटील कुंदे यांच्याशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल राऊत, रामेश्वर बावणे, सागर बिराजदार यांच्या प्रयत्नातून बोलणी यशस्वी झाल्याचे महाराजांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून वादंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठ्यात महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सिडकोतील एन-पाच, एन-सात जलकुंभांवरून सहा भागांत सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. त्याचवेळी वेदांतनगर, कोटला कॉलनी, क्रांती चौकातील जलकुंभांवरून चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होतो. या दुजाभाववरून शिवसेना-भाजपा असा सामना रंगला आहे.

औरंगाबाद शहरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्याबाबत विविध भागात आंदोलन सुरू असतानाच मंगळवारी थेट आयुक्त कार्यालयाच्या दालना समोरच पाण्यावरून राजकारण तापलेले दिसले. सिडकोतील भाजपचे नगरसेवक नितीन चित्ते यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मुंबईला असलेल्या आयुक्तांनी दुपारनंतर येत असल्याचे सांगितल्याने भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी ही चर्चेसाठी आले, मात्र आयुक्तांचे विमान रद्द झाल्याने त्यांनी दालनाबाहेरच ठिय्या दिला. संतापलेल्या नगरसेवकांनी पाणी वाटपावरून असलेला दुजाभाव दूर करण्याची आणि पाणी वाटपात समानता आणण्याची मागणी केली. महापालिका प्रशासनासमोर सात-आठ वर्षांपासून प्रश्न सातत्याने हा मुद्दा मांडत आहे. सभागृहात रितसर उत्तरे मागितली दिली जात नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

चार ते सहा दिवसांआड पाणी

शहरातील कोणत्या भागात किती दिवसांआड पाणीपुरवठा होतो याबाबत महापालिकेकडेच उत्तर नाही. अनेक भागांमध्ये चार, पाच व सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे काही भागाला वेगळा तर, काही भागांना वेगळा न्याय दिला जातो. त्याचवेळी अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठाच होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वेदांतनगर, कोटला कॉलनी व क्रांती चौकातील जलकुंभांवरून चार दिवसांआड पाणी सोडले जाते मात्र, त्याचवेळी सिडको-पाच, सिडकोत-सात या जलकुंभावरून सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. कोठे दोन दिवसांचा तर, कोठे तीन ते चार दिवसांचा खंड पडतो आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. लोकसंख्या, नळ जोडणी याबाबतही नेमकी आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नाही.

पाणीपुरवठ्याची बैठक

शहरामध्ये बऱ्याच विभागात नियोजनाअभावी पाणी वितरण व्यवस्थेमध्ये अनियमितता निर्माण झाल्याने बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक बोलावली आहे. महापौर यांच्या कक्षामध्ये सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व महत्वाचे सर्व विशेष कार्य अधिकारी उपस्थित असणार आहेत.

काही भागात तीन दिवसांआड तर, काही भागामध्ये चार किंवा सात दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. नियोजनात काय दोष आहेत. त्यातील त्रुटी कशा दूर करता येतील याबाबत बैठकीत विचार विनिमय करण्यात येईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर.

पाणीपुरवठ्यात दुजाभाव कशाला हवा. लोकसंख्या, नळ जोडणी याबाबत मी, वारंवार स्मरणपत्र दिले, मात्र केवळ थातूरमातूर उत्तरे दिले जातात. सहा दिवसांआड पाणीपुरवठा म्हणजे हद्द आहे.

- नितीन चित्ते, नगरसेवक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरभऱ्याला कमी भावामुळे संताप

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (७ मे) मोंढा मार्केटमधील बाजार समितीच्या सेल हॉलला कुलूप ठोकले. यामुळे काही काळ खरेदी विक्रीचे व्यवहार थांबले होते. नायब तहसीलदार स्वप्निल खोल्लम व बाजार समितीचे सचिव विजय सिनगर यांनी मध्यस्थी केल्यानंतर व्यवहार सुरळीत झाले.

मागील एक महिन्यांपासून येथील मोंढा मार्केटमध्ये भुसार मालाची खरेदी सुरू आहे. गहू, बाजरी, ज्वारी, मकासह हरभऱ्याची आवक होत असून हरभरा वगळता इतर मालाला बाजारपेठेत शासनाच्या हमी भावापेक्षा जास्त भाव आहेत. शासनाने हरभऱ्यासाठी प्रति क्विंटल ४६२० रुपये हा हमी भाव जाहीर केला आहे. त्यासाठी खरेदी विक्री संघातर्फे शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. मात्र आवक कमी असल्याने शेतकरी रोख खरेदीला प्राधान्य देत असून शेतमालाची व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल चार हजार ३०० रुपये ते चार हजार ९०० रुपये भाव मिळत आहे. परंतु, सेल हॉलमध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी दर्जाचे कारण पुढे करत केवळ तीन हजार ९०० रुपये ते चार हजार ३०० रुपये भाव दिल्याने शेतकरी संतापले. त्यांनी ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना माल न विकण्याचे आवाहन करत हॉलला टाळे ठोकले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर नायब तहसिलदार स्वप्निल खोल्लम व सचिव विजय सिनगर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली. दरम्यान महिनाभरात जवळपास २०० क्विंटल हरभऱ्याची आवक झाल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शुल्कवाढीच्या 'फिल्म'वर पडदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागातील 'फिल्म मेकिंग' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अचानक वाढवल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले होते. या विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेऊन समस्या सांगितली. त्यावर नियमानुसार शुल्क आकारुन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र देण्याची सूचना तेजनकर यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात 'फिल्म मेकिंग' हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे. शहरातील इतर खासगी संस्थेत जास्त शुल्क असल्यामुळे होतकरू विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतात. पुरेशा सुविधा नसतानाही विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी ३० हजार रुपये शुल्क आकारले होते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावर तोडगा काढत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी फक्त पाच हजार रूपये शुल्क आकारले जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर ३० विद्यार्थ्यांनी विभागात प्रवेशघेतला होता. शुल्क कमी करण्याच्या निर्णयानंतर नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयंत शेवतेकर यांनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतरही कुलगुरूंचे आश्वासन नियमात बदलले नाही. या अभ्यासक्रमाची परीक्षा मे महिन्यात आहे. पूर्ण ३० हजार रुपये शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र (हॉलतिकीट) मिळणार नाही, असे विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (सहा मे) प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेतली. कुलगुरू चोपडे यांनी आश्वासन दिल्याची आठवण विद्यार्थ्यांनी करुन दिली. यावर तेजनकर यांनी नाट्यशास्त्र विभागाशी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून शुल्क कमी करण्यास मान्यता घेण्याची सूचना केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील आठ दिवसांपासून विद्यार्थी अतिरिक्त शुल्काच्या तणावात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संचालकपदी डॉ. चव्हाण, डॉ. धबडगे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र कार्यान्वित केले आहे. या दोन्ही केंद्राच्या संचालकपदी अनुक्रमे डॉ. राम चव्हाण आणि डॉ. युवराज धबडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठवाड्याच्या विकासात मोलाची वाटा असलेले माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्याची मागणी मागील तीन वर्षांपासून काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. जितेंद्र देहाडे हे करत होते. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत डॉ. देहाडे यांनी अध्यासन केंद्राच्या स्थापनेचा ठराव मांडला होता. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला; तसेच या अध्यासन केंद्रासाठी अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात यावे, याची मागणी करण्यात आली होती. याविषयीचा ठरावही अधिसभेच्या बैठकीत मांडण्यात आला होता. हा ठराव बहुमताने मंजूर केला. या अध्यासन केंद्राच्या संचालपदी डॉ. युवराज धबडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी कामांचे करा ४८ तासांत निराकरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे ४८ तासात निराकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रशासनास दिले. त्यांनी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, उपाययोजना यांचा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून आढावा घेतला.

यावेळी साधलेल्या संवादात मुख्य सचिव यू. पी. एस मदान यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, यांच्यासह जवळपास ५०० जण सहभागी झाले होते. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करू आणि दुष्काळावर मात करू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, टँकरने पाणी पुरवठा करताना २०१८ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरची संख्या निश्चित करण्यात यावी, अशा सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी ठराविक रक्कम दिली जात होती आता त्या विहिरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले यावर निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गरजेनुसार चारा छावण्यांच्या अटी शिथील करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी या संवादादरम्यान सांगितले. ज्या गावात पाणी पुरवठ्याची योजना बंद पडली आहे पण तिथून गावाला पाणी मिळू शकते, अशा योजनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावेत, ती योजना दुरुस्त करून गावांना पाणी पुरवठा सुरू केला जाईल. चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी प्रती जनावर ९० रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रती जनावर ४५ रुपये दिले जातात. मुख्यमंत्र्यांनी चारा छावण्यांमधील जनावरांना टॅग करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे चारा छावण्यांमध्ये किती जनावरे आहेत याची माहिती मिळू शकेल असेही ते म्हणाले.

औरंगाबाद-जालनासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यासाठी ८८७९७३४०४५ हा व्हॉटस्ॲप क्रमांक जाहीर केला. टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात. त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार या सर्व प्रशासकीय यंत्रणेने संवादात तसेच व्हॉटस्ॲप क्रमांकावर नोंदवल्या जाणाऱ्या बाबींची नोंद घेऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच त्याचा अहवाल आपल्याला पाठवावा असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाचे आमिषाने फसला शेतकरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून मालेगावच्या शेतकऱ्याला शहरात पावणेदोन लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार ३ मे ते ७ मे दरम्यान अदालत रोडवर घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो नाशिक ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

या प्रकरणी मंसाराम यशवंत देसले (वय ३५, रा. गारेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांनी तक्रार दाखल केली. मंसाराम हे अविवाहित आहेत. त्यांची ओळख संशयित आरोपी निवृत्ती वामन भामरे तसेच एका महिलेसोबत झाली होती. या दोघांनी एका तरुणीशी मंसारामचा परिचय करून देत तिच्यासोबत विवाह लावून देण्याचे आमिष दाखवले. मंसाराम याला तयार झाला. मात्र भामरे, महिला आणि भावी वधुने औरंगाबाद शहरातील कोर्टात लग्न करू, अशी अट घातली. मंसारामने ही अट मान्य केली. मंसारामला ३ मे रोजी औरंगाबादला बोलावण्यात आले. येताना त्याला पावणेदोन लाख रुपये रोख, मंगळसूत्र, जोडवे आदी साहित्य घेऊन बोलावले. मंसाराम हे साहित्य घेऊन कोर्टाच्या आवारात पोहचला. त्याच्याकडून रोख रक्कम आणि दागिने घेऊन आरोपी भामरे, महिला आणि वधुने कोर्टाच्या आवारातून पोबारा केला. काही वेळाने हा प्रकार मंसारामच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. मात्र, घटनेची सुरुवात नाशिक ग्रामीण भागातील वडनेर खाकोडी पोलिस ठाणे हद्दीत घडलेली असल्याने पोलिसांनी हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन टाइल्स विक्रेत्या कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर परिसरातील तीन बड्या टाइल्स व सिरॅमिक विक्रेत्यांच्या दुकानाची राज्य कर विभागाने (एसजीएसटी) झाडाझडती घेतली. करचुकवेगिरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात सुमारे २८ लाख रुपयांचा कर चुकवेगिरी संबंधित व्यापाऱ्यांनी केल्याचे समोर येत असून, अधिक तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हार्डवेअर विक्रेत्यांपाठोपाठ बीड बायबास, जुना मोंढा परिसरातील दोन टाइल्स विक्रेत्यांवर विभागाने नुकतीच कारवाई करत करचुकेवेगिरीचा प्रकार उघड केला होता. दरम्यान, बीड बायबास येथील तीन टाइल्स विक्रेते करचुकवेगिरी करत असल्याचा संशय पथकास आला. त्यानुसार राज्यकर सहआयुक्त डॉ. विकास डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (अन्वेषण) संतोष श्रीवास्तव यांच्या पथकाने संबंधित दुकानावर मंगळवारी दुपारी एकाच वेळी छापे टाकले. पथकात तीन अधिकाऱ्यांसह एकूण २० कर्मचारी होते.

रिर्टन भरताना जी काही खरेदी-विक्री दाखविण्यात आली आहे, त्याप्रमाणे ती झाली किंवा नाही. झालेल्या व्यवहारावर योग्य तो जीएसटी भरला किंवा नाही, याची तपासणी पथकाने केली असून, दुकानातील स्टॉकचीही पडताळणी करण्यात आली. यासंदर्भातील खरेदी-विक्री नोंदवही, पावत्या आदी दस्तावेज पथकाने ताब्यात घेतली. तपासणीचे काम बुधवारी सायंकाळी पूर्ण झाले असून, प्राथमिक तपासात सुमारे २८ लाख रुपयांची करचुकवेगिरी झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपासासाठी आणखीन काही दिवस लागणार असून, त्यानंतरच अधिक चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळाचा इशारा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आठवडाभर उन्हाच्या झळा सहन केल्यानंतर आता ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा काहिसा झाली आहे. आता शनिवार (११ मे) आणि रविवारी (१२ मे) विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह पुणे, नगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातही वातावरणात अशा प्रकारचा बदल होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराच्या तापमानात सातत्याने बदल होत आहे. येत्या आठवाड्यात कमाल तापमान सरासरी चाळीस अंश सेल्सियस राहणार असले तरी ढगाळ वातावरणामुळे वातावरणात बदल अपेक्षित आहे.

एप्रिल महिन्यांपासून शहराच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. बुधवारी औरंगाबाद शहराचे कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सियस होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात उन्हाचा पारा सरासरी ४० अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

दोन दिवस ढगाळ वातावरण

हवामान विभागानुसार शनिवार (११ मे) आणि रविवारी (१२ मे) औरंगाबाद शहरात कमाल तापमान ३९ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. दोन्ही दिवशी ढगाळ वातावरण तसेच विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजारी विद्यार्थिनींचा खर्च विद्यापीठ देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतीगृहामध्ये दूषित पाण्यामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्या होत्या, आता या विद्यार्थिनींचा वैद्यकीय खर्च विद्यापीठ देणार आहे. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहातील विद्यार्थीनींचे वैद्यकीय खर्चाची बिले मागविली आहेत.

विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्याचा विषय विद्यापीठामध्ये गाजत आहे. ज्या विद्यार्थिनींनी दूषित पाण्यामुळे आजारी पडल्या, या कालावधीमध्ये त्यांनी विद्यापीठाबाहेर दवाखान्यात उपचार केला, अशा विद्यार्थिनींची वैद्यकीय बिले विद्यार्थी विकास विभागाने मागवली आहेत. या संदर्भात संचालकांनी विद्यार्थिनी वसतिगृहांच्या वार्डनला या संदर्भात पत्र पाठवले आहे. दूषित पाण्यासंदर्भात ही घटना घडल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांमध्ये अधिक स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या आहेत. सध्या विद्यापीठात तीन 'आरओ प्लांट'द्वारे तसेच जार द्वारे वसतिगृहाला पाणी देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जायकवाडीतून डाव्या कालव्यात पाणी सोडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळात होरपळणाऱ्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना, जनावरांना पिण्यासाठी व जनावराच्या चाऱ्यासाठी जायकवाडी धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे, यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या परभणी येथील कार्यकर्त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

परभणी जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध पाण्याचे बहुतांश स्त्रोत आटले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जनावरे जगविण्यासाठी चारा मिळत नाही. काही शेतकऱ्यांनी चारा पिके घेतली, पण ती पाण्याअभावी वाळत आहे. ही आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता जायकवाडी धरणातून एक आकस्मित पाणीपाळी डाव्या कालव्याद्वारे सोडा, अशी मागणी दहा एप्रिल रोजी विभागीय आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी करण्यात आली होती, परंतु एक महिना उलटला तरीही प्रशासनाने मागणीसंदर्भात कोणताही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन करावे लागत असल्याचे किसान सभा, जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे नेते विलास बाबर यांनी सांगितले. कामगार नेते उद्धव भवलकर, समितीचे नेते मदनराव वाघ आदी उपस्थित होते.

दुष्काळात ग्रामीण जनतेला व जनावराला पाणी मिळत नसेल तर जनतेने व पशुपालकांनी काय करावे, असा सवाल बाबर यांनी केला. उद्योगासाठी व नागरिकांना पिण्यासाठी पाणी देऊनही धरणात ४५३ दक्षलक्ष घनमीटर पाणी शिल्लक राहाते. त्यामधील १०० दशलक्ष घनमीटर पाणी परभणी, औरंगाबाद व जालना जिल्ह्यासाठी डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. जोपर्यंत पाणी सोडणार नाही, तोपर्यंत माघार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी शिवाजी सोनवणे, दत्तात्रय सुक्रे, दीपकराव बिडगर, नारायण वाघ, विनायक गवळी. तुकाराम कानडे, अरुण गवळी, भास्कर गवळी, दयानंद सुक्रे यांच्यासह परभणी येथील शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये रक्त, लघवी तपासणीची मोफत सुविधा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सर्वसामान्यांना लॅबमध्ये जाऊन महागड्या रक्त व लघवी तपासणी करणे आर्थिकदृष्ट्या परवाडणारे नाही. त्यामुळे ही सुविधा गुरुवारपासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध प्रकारच्या २६ तपासणी मोफत करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत महालॅबच्या सहकार्यातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला सात आरोग्य केंद्रात या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २६ विविध प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महालॅब्सतर्फे मनुष्यबळ, साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन दरम्यान रक्त व लघवी तपासणीसाठी घेतली जाईल व त्याचा अहवाल दुसऱ्या दिवशी दिला जाईल. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेला आणखी बळ मिळाले आहे. पालिकेच्या रुग्णालयामध्ये दररोज आरोग्य सेवेसाठी गर्दी असते. मात्र, अपुऱ्या सोयी सुविधाबाबत अनेकदा ओरड होते. या नव्या सुविधांमुळे नागरिकांना बाहेर मोठ्या लॅबमध्ये जाऊन खर्च टळणार आहे. याची सुरुवात गुरुवारी बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रातून महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या केंद्रांचा समावेश…

सुरुवातीला अंबिकानगर, नारेगाव, क्रांतीचौक, बायजीपुरा (अल्तमश कॉलनी), पीरबाजार, विजयनगर, जयभवानीनगर आदी केंद्रावर सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यानंतर शहरातील १७ केंद्रावर ही सुविधा उपलब्ध होईल. साधारण रक्त, लघवी तपासणीपासून ते किडणी, कावीळ, लीव्हर, हृदय रोग्यांसह पोटातील जंताबाबतची तपासणीची प्रक्रिया लॅबच्या माध्यमातून केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

...

पालिकेची आरोग्य केंद्र.......३३

दररोज लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या....१५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावाला मागितली २० हजारांची खंडणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचे बांधकाम करताना रस्त्याचा वापर करण्यासाठी भावालाच २० हजारांची खंडणी मागण्यात आली. हा प्रकार चार मे रोजी म्हाडा कॉलनीत घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शेरखान उस्मानखान (वय ४८, रा. चंपा चौक, म्हाडा कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली. शेरखान यांचा भाऊ मुजीबखान उस्मानखान (रा. म्हाडा कॉलनी) याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे शेरखान यांचा रहदारीचा रस्ता बंद झाला असून पाणी वाहण्यास देखील अडथळा होत आहे. या कारणामुळे शेरखान हे मुजीबखान याला समजावून सांगण्यासाठी गेले होते. यावेळी मुजीबखानने त्यांना रस्त्याचा वापर करायचा असेल, तर मला २० हजार रुपये द्यावे लागतील, तसेच जास्त हुशारी केल्यास पाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेरखान याच्या तक्रारीवरून मुजीबखान याच्याविरुद्ध खंडणी मागणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस नाईक चौथे हे तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाय घसरून जिन्यावरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आंबेडकरनगर भागात घडली. शाईन सय्यद रईस, असे या विवाहितेचे नाव आहे. काही वर्षांपासून तिचा माहेरातून पैसे आणण्याकरिता छळ सुरू होता. या प्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक केली आहे.

या प्रकरणी शाईनचे वडील शेख इस्माईल शेख इमाम (वय ५०, रा. हीनानगर, चिकलठाणा) यांनी तक्रार दाखल केली. शेख ईस्माईल यांची मुलगी शाईन हिचा विवाह मे २०१४ मध्ये सय्यद रईस सय्यद कालू (रा. आंबेडकरनगर) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर पाच महिने शाईनला चांगले वागवण्यात आले. यानंतर एलपीजी रिक्षा घेण्यासाठी ३५ हजार रुपये आणण्याची मागणी करीत छळ करण्यात आला. शाईनच्या माहेरच्या मंडळीनी तिच्या सासरच्या लोकांची समजूत काढली होती. त्यानंतरही होणाऱ्या छळाला कंटाळून शाईन दोन वेळा माहेरी येऊन राहिली होती. पाच महिन्यांपूर्वी शाईनच्या मावस सासूने मध्यस्थी केल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवले होते. सासरी गेल्यानंतरही तिचा रिक्षा घेण्यासाठी पैसे आणले नाही म्हणून छळ सुरूच होता. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता शेख ईस्माईल यांना शाईनचा चुलत सासरा सय्यद अनिस याने शाईन जिन्यावरून पडली असून तिला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती दिली. शेख ईस्माईल यांनी जावई रईस याला फोन केला असता त्याने शाईन मरण पावल्याचे सांगितले.

या प्रकरणी शेख ईस्माईल यांच्या तक्रारीवरून शाईनचा वारंवार छळ केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत पती रईस सय्यद कालू, सासू खातूनबी सय्यद कालू, नणंद सीमा शफीक, दीर सय्यद फिरोज सय्यद कालू, चुलत सासू शबानाबी अनिस सय्यद आणि चुलत सासरा अनिस सय्यद यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती रईसला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

\Bयापूवी दिल्या तक्रारी\B

शाईनला वारंवार सासरच्या मंडळीकडून मारहाण होत होती. याप्रकरणी जुलै २०१६ तसेच ऑगस्ट २०१७ मध्ये देखील तिने पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. तसेच आठ दिवसांपूर्वीच तिचा गर्भपात करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तोतया पोलिसांना एक वर्ष सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

पोलिस असल्याची बतावणी करत दुचाकीस्वारोचे पाकीट बळजबरी हिसकावून घेऊन पळण्याच्या प्रयत्नातील दोघा आरोपींना एक वर्ष सक्तमजुरी व विविध कलमांखाली तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरंदळे यांनी ठोठाविली.

विकास शंकर बनकर (वय ३६, रा. क्रांतीनगर) व भारत साळुकराम बागुल (वय २७, रा. कोकणवाडी), अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी रमेश विश्वनाथ तुपे (वय ५०, रा. संघर्षनगर) यांनी तक्रार दिली होती. तुपे हे हॉटेल व्हिटसमध्ये नोकरीस होते. १७ सप्टेबर २०११ रोजी पहाटे साडेपाच वाजता ते व मित्र दिनकर मोरे हॉटेलातील काम आटोपून एकाच दुचाकीवर घरी जात असताना विभागीय क्रीडासंकुलासमोर बुलेटवर आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. पोलिस असल्याची बतावणी करत दुचाकी चालविणारे मोरे यांच्याकडे लायसन्स व दुचाकीच्या कागदपत्रे मागितली. त्यावर मोरे यांनी लायसन्स नाही व दुचाकीची कागदपत्रे घरी असल्याचे सांगितले. तेव्हा दोघा तोतयांनी तुम्हाला आमच्या सोबत पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले. मात्र, काही वेळाने दोघांनी तुपे व मोरे यांची झडती घेत तुपे यांच्या खिशातील दोन हजार रुपये रोख असलेले पाकीट बळजबरीने काढून घेतले. ते पळून जाण्याच्या तयारीत असताना तेथे पोलिस जीप आली. तुपे यांनी जीपमधील अधिकाऱ्याला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bया गुन्ह्यांनुसार शिक्षा \B

या खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने दोघा आरोपींना कलम भादंवी कलम ३९२अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, कलम १७०अन्वये सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून मंजूर हुसेन यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images