Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विमान प्रवास करा, निम्म्या दरात

0
0
आगामी एक किंवा दोन महिन्यांत विमान प्रवासाचा विचार असल्यास, विमान कंपन्यांनी विविध ऑफरमुळे हा प्रवास अत्यंत कमी दरात उपलब्ध होऊ शकतो.

रिक्षांसाठी ‘सोळावं वरीस धोक्याचं’

0
0
शहरात अवैध वाहतुकीची समस्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून, स्क्रॅप रिक्षातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले आहे. या रिक्षा वाहतुकीला ब्रेक लागावा, यासाठी ‘आरटीए’ समितीने १६ वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षांना स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘झेडपी’तील ६ कर्मचारी दुपारीच गायब

0
0
जिल्हा परिषदेत एरव्ही कामाचे तीनतेरा वाजलेले असतात. गेल्या काही दिवसांपासून अधिकारी जागेवर नसतात, अशी ओरड सुरू होती. त्यात आता कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.

सिडको रहिवाशांना पुनर्विकासाचे आमिष

0
0
तीस-पस्तीस वर्षापूर्वी बांधून दिलेल्या घरांचा पुनर्विकास करून टुमदार कॉलनी उभारण्याचे आमीष दाखवत एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी ‘सिडको’तील गुलमोहर कॉलनीचे सर्वेक्षण करीत आहे.

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णांचे नातेवाइक वेठीला

0
0
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित घाटी हॉस्पिटलमध्ये येणार असल्याच्या कारणावरून प्रशासनाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अक्षरशः चार तास वेठीस धरले. संयमाचा बांध तुटलेल्या नातेवाइकांनी एकत्र येऊन हल्लाबोल केला आणि हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळविला.

वाढीव अनुदानापासून बालगृह वंचित

0
0
निराधार, अनाथ बालकांना मायेची छाया देणारी राज्यातील बालगृहे शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे अडचणीत सापडली आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने अशा संस्थांना वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही झाली नाही.

मराठवाड्यातील ‘तिरंगा’ देशभरात फडकणार

0
0
प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर आल्यामुळे त्यांची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. मराठवाड्यामध्ये तयार होणारा राष्ट्रध्वज देशभर फडकणार आहे.

पालिकेच्या मालमत्तांना कर लावा

0
0
महापालिकेच्या मालमत्तांना मालमत्ता कर लावा, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी केली. हा कर न लावल्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, याकडे त्यांनी सभापतींचे लक्ष वेधले.

‘रिलायन्स’चे खोदकाम थांबविणार

0
0
केबल टाकण्यासाठी ‘रिलायन्स’ कंपनीने सुरू केलेले रस्ते खादण्याचे काम तात्काळ थांबवण्यात येणार असल्याची पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. खोदून ठेवलेले रस्ते सुस्थितीत आणल्याशिवाय त्यांचे काम यापुढे सुरू करू दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पाणचक्कीत शेवाळे, मकब-यात सुविधांची प्रतीक्षा

0
0
शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांत समावेश असलेल्या असलेल्या बिबी का मकबरा, पाणचक्की आवारांत सुविधांची वानवा आहे. पाणचक्कीमध्ये अस्वच्छता पसरली असून मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे, तर मकबऱ्यातील बगीचा ओसाड झाला असून अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे.

किरकोळ कारणावरून पत्नीला पेटवले

0
0
सासऱ्याचा फोन क्रमांक ‌देण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीला पेटवल्याची घटना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता म्हाडा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय झोलला लाभणार सचिनस्पर्श

0
0
भारतीय ज्युनिअर क्रिकेट संघाचा कर्णधार विजय झोलला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा परीसस्पर्श लाभणार आहे. फेब्रुवारीत होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकण्याचे ध्येय बाळगून असलेला विजय हा सचिनच्या मार्गदर्शनासाठी प्रचंड उत्सुक आहे.

‘रिलायन्स’च्या पैशांना फुटले पाय

0
0
पालिकेने स्वतंत्र ‘अकाउंट’मध्ये ठेवलेल्या ‘रिलायन्स’ कंपनीच्या पैशांना पाय फुटले आहेत. ‘रिलायन्स’ने भरलेल्या २४ कोटी रुपयांपैकी आता फक्त सहा कोटी रुपयेच शिल्लक राहिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

आता सर्वच रस्ते व्हाइट टॉपिंगचे

0
0
रस्त्यांच्या डांबरीकरणाचे दर कमी करायला कंत्राटदार तयार नाहीत, त्यांच्याशी दोन वेळा वाटाघाटी करण्यात आल्या. त्यामुळे आता सर्वच रस्ते व्हाइट टॉपिंगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे, असे स्पष्टीकरण पालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी स्थायी समितीच्या केले.

चालकामुळे चिमुकले वाचले

0
0
जालनाच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना जायकवाडी धरण पाहण्यासाठी घेऊन चाललेल्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसचे ‌ब्रेक निकामी झाले. गाडीत विद्यार्थी आणि समोर वाहतूक अशा संभ्रमात सापडलेल्या चालकांने धैर्या गाडी नियंत्रणात आणत गाडी कर्णपुराच्या मैदानावर थांबविली.

‘रिंग’मुळे डांबरीकरण हद्दपार

0
0
व्हाइट टॉपिंगच्या ‘रिंग’मुळे रस्त्यांचे डांबरीकरण हद्दपार झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. या रिंग मध्ये काही अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे ‘इंटरेस्ट’ गुंतलेले असल्यामुळे दहा कोटी रुपयांची भर घालून सर्वच रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग करण्याचा घाट घातला जात आहे.

शेतक-यांसाठी अनोखा उपक्रम

0
0
हवामानातील बदलांमुळे शेतीच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यात 'क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क'ची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात नगर आणि पुणे जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

उपक्रमशील तरुणाई

0
0
आजच्या तरुणाईला सामाजिक जाणिवांचे भान नाही, अशा प्रकारच्या चर्चा अनेकदा होताना दिसतात ; परंतु कॉलेजच्या कट्ट्यावर तरुणाईमधील विषयांपैकी सामाजिक बांधिलकी जपणा-या विषयांची संख्या अधिक असते.

मनोहारी पक्ष्यांचे खुले दर्शन

0
0
देशातील विविधरंगी पक्ष्यांची उत्कंठावर्धक माहिती देणारा पक्षी महोत्सव गुरुवारी सुरू झाला. गोविंदभाई श्रॉफ नाट्यगृहात आयोजित पक्षी महोत्सवात स्लाइड शो, पक्षी अभ्यासकांची व्याख्याने आणि दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

जिल्हा वार्षिक योजनांच्या निश्चितीसाठी आज बैठक

0
0
मराठवाड्यातील जिल्हा वार्षिक योजनांना अंतिम स्वरूप देण्यासाठी शुक्रवारी (२३ जानेवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images