Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नगरसेवक मतीनचा जामीन अर्ज फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

महापालिकेत शिपायाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत ३० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा संशयित आरोपी नगरसेवक सय्यद मतीन याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी फेटाळला. या निर्णयामुळे मतीनला जेलमध्येच रहावे लागणार आहे.

पतीचा मृत्यू झाल्यानंतर २०१५मध्ये पीडिता परभणीहून औरंगाबादला राहण्यासाठी आली होती. पीडितेला नोकरीची आवश्यकता असल्याने तिच्या दोन परिचयाचा व्यक्तींनी तिला नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद (वय ३३, रा. असेफिया कॉलनी, टाउन हॉल) याला भेट, तो तुला नोकरी लावून देईल, असे सांगितले होते. त्यानुसार पीडिता एप्रिल २०१८ मध्ये मतीन याला भेटण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेली होती. तेव्हा मतीनने तिला महापालिकेत शिपाई म्हणून नोकरी लावून देतो म्हणत तिला आधारकार्ड आणि पासपोर्ट आणण्यास सांगितले होते. ते दिल्यानंतर १७ जून २०१८ रोजी पीडिता नोकरीबाबत चौकशी करण्यासाठी मतीनच्या टाउन हॉल येथील कार्यालयात गेली. तेव्हा आरोपीने गणेश कॉलनी येथील एका घरात नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मतीनने तिच्याकडे एक मोबाइल दिला व मी जेव्हा बोलावेल तेव्हा तुला यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bपीडितेवर दबाव आणू शकतो \B

संशयित आरोपी मतीनला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालयात मतीन याने नियमित जामीन अर्ज केला. या अर्जाला सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी विरोध केला. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो फिर्यादीवर दबाव टाकून पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली. कोर्टाने ही विनंती मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी नगरसेविका रस्त्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील विविध भागांमध्ये पाणीप्रश्न ऐरणीवर आला आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकच पाण्यासाठी आंदोलन करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पाण्यासाठी शुक्रवारी दोन नगरसेविकांसह नागरिकांना एन-सात येथील जलकुंभावर धाव घ्यावी लागली.

शुक्रवारी (दहा मे) सुरेखा खरात आणि ज्योती पिंजरकर या दोन्ही नगरसेविकांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. यावेळी एन सात पाण्याच्या टाकीवर अयोध्यानगरच्या अनेक नागरिकांनीही हजेरी लावली होती. शिवनेरी कॉलनी, अयोध्यानगरच्या काही भागांमध्ये सकाळी पाच वाजता पाणी येण्याचे नियोजन होते, ४५ मिनिटांपर्यंत पाणी सोडणे अपेक्षित असताना केवळ ३५ मिनिटे पाणी सोडण्यात आले. तेही अत्यंत कमी दाबामुळे. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाल्याचे नगरसेविका ज्योती पिंजरकर यांनी सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी टाकीवरील कर्मचाऱ्यांना जाब विचारत व्हॉल्व्ह सुरू करून घेत पाणी सोडायला भाग पाडले. जवळपास तासभर हा गोंधळ सुरू असल्याने सकाळीच जलकुंभावरील वातावरण तापले होते. यावेळी माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, गौतम खरात यांच्यासह दोन्ही वॉर्डांतील नागरिकांचा सहभाग होता.

शहरात पाण्याचा प्रश्न बिकट झाला असून, पाण्यासाठी पैसे भरत असताना देखील ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत असल्याचे चित्र शहरातील बहुतांश भागात आहे. जायकवाडी धरणात शहरापुरते पाणी असतानाही केवळ महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे सिडको, हडको भागातील नागरिकांना आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळते. पाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसोबत नगरसेवकांनाही पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. चार दिवसांपूर्वीच भाजप नगरसेवक नितिन चित्ते यांनी आयुक्त दालनासमोर पाण्यासाठी चार तास ठिय्या दिला होता.

\Bअनेक भागांना फटका\B

आंदोलनानंतर एन-सात जलकुभावरील टँकरचा पुरवठा दुपारपर्यंत बंद होता. त्यामुळे हर्सूल, एकतानगर, जटवाडा, जाधववाडी, नारेगाव, आंबेडकर, मिसारवाडीसह अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे येथील शेकडो नागरिकांना निर्जळीचा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातून विमानसेवा वाढविण्याची मागणी

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहरातून विमानसेवेची वाहतूक वाढवण्याची मागणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन केली. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातून जेट ऐअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर होऊ नये; तसेच डीएमआयसी, एमआयडीसी, ऑरिक सिटी यासारख्या नवीन विकास कामांवर परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी इतर नवीन आंतरराष्ट्रीय व खाजगी विमान वाहतूक कंपन्याची सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी यावेळी खासदार खैरे यांनी विमान वाहतूक मंत्री प्रभू यांच्याकडे केली. या निवेदनाची दखल घेत विमान कंपन्यांशी बोलणी करून लवकर विमान सेवा सुरळीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीमध्ये स्वतंत्र गटाचा निर्णय लोकसभेनंतर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेना एकत्र सत्तेत आहे. शिवसेना काँग्रेसचा हात केव्हा सोडणार, यासाठी भाजपकडून पाठपुरावा सुरू असतानाच आमदार अब्दुल सत्तार समर्थक सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बैठकांचे सत्र त्यासाठी सुरू असतानाच आमदार सत्तार यांनी मात्र लोकसभेचा निकालानंतर पुढील ठोस निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली आहे.

लोकसभेचा उमेदवार निवडीवरून नाराजी व्यक्त करत आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस विरोधात बंडचा झेंडा फडकवला. लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतर जिल्हा परिषदेतही राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. सत्ताराचे यांचे खास मर्जीतील असलेले जिल्हा उपाध्यक्ष केशव तायडे यांनी त्यासाठी खास पुढाकार घेत काँग्रेसमधील सत्तार समर्थक सदस्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा गट पुढील अध्यक्ष निवडणुकीत निर्णायक ठरले, असे नियोजन केले जात आहे. यासंदर्भात आमदार सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,'कोण कुठे आहे, याची माहिती काहीजण घेत आहेत. स्वतंत्र गटाची चर्चा आहे,' असे सांगतानाच, 'लोकसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या. त्यानंतर योग्य तो निर्णय पाहण्यास मिळेल,' असे म्हणत याबाबत अधिक भाष्य करण्यास टाळले आहे.

दरम्यान, उपाध्यक्ष केशव तायडे यांच्यासोबत सुमारे दहा सदस्य सोबत असल्याची चर्चा असून, हे सदस्य नेमकी काय भूमिका घेता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडचणी लक्षात घेऊन ई-पॉसमध्ये सुधारणा करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण लक्षात घेत खत विक्रीसाठी आवश्यक असलेल्या ई-पॉस यंत्रात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइडस् व सीड्स डिलर्स असोसिएशनने (माफदा) कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना दिले.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसाठी आयुक्त दिवसे शुक्रवारी शहरात आले असता माफदा संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सचिव विपीन कासलीवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिवसे यांची भेट घेत चर्चा केली. दुकान परवाना नूतनीकरणातील अडचणी दूर करा, नवीन परवाना, नूतनीकरणासाठी सर्व जिल्ह्यात सारखेच शुल्क आकारावे, विक्रेत्याकडून तपासणीसाठी घेतलेल्या सॅम्पलची प्रलंबित देय रक्कम अदा करा, विक्रेत्याकडून विकला जाणारा माल उत्पादक कंपनीकडून सीलबंद स्थितीमध्ये मिळत असल्याने, त्यामधील सॅम्पल फेल गेल्यास त्याबाबत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा, विक्रेत्यास त्यामध्ये साक्षीदार करावे, विक्रेत्यास मालाचा साठा रजिस्टर संगणकीय पद्धतीने ठेवण्यास मान्यता द्यावी, चालू खरीप हंगामासाठी बीटी कॉटन होलसेल विक्रेत्यास १५ मेपर्यंत, तर रिटेल विक्रेत्यास २० मेपर्यंत बीटी कॉटन बियाणे उत्पादक कंपन्याकडून विक्री करण्यास उपलब्ध व्हावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ ठरणार विवेकानंदांचा सर्वात उंच पुतळा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, बुलडाणा

शुकदास महाराज यांनी स्थापित केलेले विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले आहे. वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी आश्रमास भेट दिली आहे. आश्रमाच्यावतीने कोराडी नदीच्या जलाशयात ‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकाचे निर्माण कार्य सुरू आहे. या स्मारकावरील विवेकानंदांचा पुतळा हा तब्बल ४० फूट उंचीचा राहणार आहे. विवेकानंदांच्या आजपर्यंतच्या पुतळ्यांत हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.

कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे शुकदास महाराज यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षांच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ असे या स्मारक प्रकल्पाचे नाव असून या स्मारकावर विवेकानंदांचा भव्य असा पुतळा उभारला जात आहे. सध्या येथे १५ फूट उंचीचा पुतळा असून, त्याची उंची ४० फूट केली जाईल, असेही गोरे यांनी सांगितले. तसेच, ध्यान केंद्र, नैसर्गिक वनराई आणि नारळाच्या झाडांची बाग, असे या स्मारकाचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर बसून ध्यान करत असल्याचा अनुभव पर्यटकांना येणार आहे. विवेकानंद स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने विवेकानंद आश्रम व हरिहरतीर्थ येथे भेट देण्यासाठी येणारे पर्यटक स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटीसही आवर्जून भेट देत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर, हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारकास भेट दिली असल्याची माहितीही संतोष गोरे यांनी दिली आहे.

सरकारने सहकार्य करावे : मालपाणी

‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी’ या विवेकानंद स्मारकावर येणाऱ्या प्रत्येकाला विवेकानंदांच्या कार्याचा परिचय व्हावा. शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतील ध्यानधारणा त्यांनी करावी व नैसर्गिक वनराईच्या सानिध्यात त्यांना आत्मबोध व्हावा, यासाठी विवेकानंद आश्रम तब्बल तीन कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात हे विवेकानंद स्मारक साकारत आहे. या स्मारकासाठी राज्य सरकारनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: हळदीत नाचण्यावरून तरुणाला भोसकले

0
0

औरंगाबाद:

भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यातील एकानं तरुणाच्या छातीत चाकू भोसकला. यात त्याचा मृत्यू झाला. आकाश शेळके असं मृताचं नाव आहे.

चिखलठाणा येथील ऋषिकेशनगर येथे काल, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. संजय नगर / १६मधील मुकुंदवाडीत राहणारा आकाश मारोती शेळके (वय २०) आणि सचिन दशरथ शळके हे सख्खे चुलत भाऊ भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी ऋषिकेशनगर येथे आले होते. हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सचिननं आकाशच्या छातीत चाकू भोसकला. यात जखमी झालेल्या आकाशचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी सचिन तेथून पसार झाला, अशी माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकामगार स्वयंशिक्षकांचे मानधन थकले

0
0

म. टा, प्रतिनिधी औरंगाबाद

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील जिल्ह्यातील ५३२ बालकामगार शासनाकडून मिळणाऱ्या विद्यावेतनापासून वंचित असताना या मुलांचे स्वयंशिक्षक व अन्य कर्मचार्यांचे मानधन थकले असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. जवळपास ११ महिन्यांपासून कर्मचारी मानधनाशिवाय प्रकल्पाची सेवा बजावत आहेत.

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील विशेष प्रशिक्षण केंद्रांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. भौतिक सोयीसुविधांची, बालकामगारांच्या विद्यावेतनाचा मुद्दा तर ऐरणीवर आहेच. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. बालकामगार प्रकल्पांना आता ऑनलाइन हजेरी बंधनकारक आहे. यासाठी बालकामगार प्रकल्पाच्या पोर्टलवर मुलांची आधार नोंदणी करून छायाचित्र व आवश्यक माहिती अपलोड करावी लागते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमद्वारे (जीपीएस) रोजच्या रोज ऑनलाइन हजेरी होते. त्यामुळे प्रकल्पांवर नियंत्रण आले.

या ऑनलाइन हजेरीसाठी अँड्रॉइड मोबाइल हँडसेट, त्याचे रिचार्ज याविषयी प्रकल्पांना साहित्य मिळत नाही. प्रकल्पांना १३०० भाडे मिळतात. इतक्या कमी रकमेत भाड्याची जागा शोधणे अवघड असल्याचे स्वयंशिक्षक म्हणाले. विद्यावेतनासाठी बँकेत खाते उघडताना शून्य बँलन्सवर खाते उघडण्यास बँक सहाय्य करत नसल्याचेही स्वयंशिक्षकांनी सांगितले. एका केंद्रात पालक आणि शिक्षकांनी मिळून प्रत्येक मुलामागे २३० रुपये भरल्यानंतर खाते उघडले. पूर्वी प्रकल्पांना ऑफिस स्टाफ नव्हता. केंद्रात मुलांची पटसंख्या २१च्या आत असल्यास एक आणि ३२च्या पुढे पटसंख्या असलेल्या केंद्रांमध्ये दोन स्वयंशिक्षक, लिपिक, मदतनीस असतात. सध्या सर्वच प्रकल्पातील संपूर्ण स्टाफ ११ महिन्यांपासून मानधनाविना काम करतोय.

जिल्ह्यातील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प

- ९ स्वयंसेवी संस्थांचे १७ विशेष प्रशिक्षण केंद्र

- एकूण ५३२ बालकामगार

- ८० टक्के मुलांची आधार नोंदणी

- ७० टक्के मुलांची बँकेत खाती

- सर्व प्रशिक्षण केंद्रांवर ऑनलाइन हजेरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूखंड हडप करणाऱ्या तिसऱ्या आरोपीस अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेहेरनगरमधील मुक्तानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेने महापालिकेला दिलेला मोकळा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात पोलिसांनी दुसरा आरोपी उमेश भगवान पवार याला शनिवारी सकाळी अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला रविवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

या प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी आरोपी गणेश भगवान पवार व राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल बनकर या दोघांना अटक केली होती. पोलिसांनी गणेश पवार याच्याकडून सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गारखेडा परिसरातील मेहेरनगरमध्ये मुक्तानंद सहकारी गृहनिर्माण सोसायटीअंतर्गत असलेली मोकळी जागा सोसायटीने हक्कसोड प्रमाणपत्राद्वारे महापालिकेला हस्तांतरित केली आहे. त्यानुसार महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या ठिकाणी बांधकाम सुरू केले मात्र, काही अतिक्रमणधारकांनी ६० ते ७० नागरिकांच्या सहकाऱ्याने २७ एप्रिल रोजी रात्री त्या ठिकाणी येऊन महापालिकेने बांधलेल्या व्यासपीठावरील पत्रे काढून टाकली व उद्यानाचा लावलेला फलक उखडून फेकले; तसेच अतिक्रमणधारकांनी सोसायटीतील नागरिकांना शिवीगाळ करत व्यासपीठाचे लोखंडी अँगल चोरून नेले. या प्रकरणात पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पदनिर्देशीत अधिकारी प्रभाकर पाठक, वामन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी उमेश पवारला (२४, रा. विजयनगर, गारखेडा परिसर) याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी, गुन्हा करतेवेळी आरोपी सोबत १० - १५ जण होते. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हळदीच्या कार्यक्रमात भोसकून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चुलत बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून चुलत भावाच्या छातीत चाकू भोसकून केल्याची घटना शुक्रवारी (दहा मे) रात्री दहाच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील ऋषिकेशनगरात घडली. याप्रकरणी चुलत भाऊ सचिन दशरथ शेळके (१९, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी नवी मुंबईतून २४ तासांत अटक केले मिळाले.

मुकुंदवाडी संजयनगरातील आकाश शंकर शेळके (२३, रा. गल्ली क्रमांक १६) हा सेंट्रिंगचे काम करतो. आकाशचे वडिल वेल्डर आहेत. दहा रोजी रात्री आकाश व सचिनची चुलत बहिण ऋतुजा हिच्या हळदीचा कार्यक्रम चिकलठाणा भागातील ऋषिकेशनगरात ठेवण्यात आला होता. तेव्हा आकाश व शेळके कुटुंबीय नाचत होते. या कार्यक्रमात सचिनही तिथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या वादातून अचानक आकाशच्या छातीत चाकू भोसकला. चाकू भोसकल्यानंतर सचिनने लगेगच पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक पोलिस निरीक्षक शेख अकमल यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सचिन नवी मुंबईच्या दिशेने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक अकमल यांच्यासह जमादार रत्नाकर बोर्डे, मुनीर पठाण, गणेश राजपूत, विक्रम वाघ, शाहीद पटेल, संदीप जमधडे, नितेश सुंदर्डे, नवनाथ ढगे यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली. तांत्रिक दृष्ट्या शोध घेत सचिनला पकडले. आकाशचे वडिल मारोती शंकर शेळके (४५) यांच्या फिर्यादीवरून मारेकरी सचिनविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अकमल करत आहेत.

\Bमहिन्याभरात खुनाची तिसरी घटना\B

गेल्या महिन्याभरात शहरात खुनाची ही तिसरी घटना आहे. रहेमानिया कॉलनीत होमगार्डची हत्या करण्यात आली होती. यानंतर देवळाई चौकात एकाची हत्या रिक्षा चालकाने केली होती; तसेच चिकलठाणा परिसरात एका सुरक्षा रक्षकाची हत्या करण्याची घटना घडली होती. या तीन घटनेनंतर चाकुने भोसकून खून केल्याची ही शहरातील चौथी घटना आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला अ‍ॅसिड पाजणाऱ्या पतीला पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केल्यानंतर तिला अ‍ॅसिड पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आरोपी पती बाळू उत्तम जाधव याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी शनिवारी दिले.

या प्रकरणात विद्या बाळू जाधव (२३) या विवाहितेने तक्रार दिली होती. विद्याचे बाळू सोबत लग्न झाले असून, त्यांना दोन मुले आहेत. दरम्यान, तीन मार्च रोजी दुपारी १२ वाजता आरोपी बाळू हा दारू पिऊन आला होता. त्याने कोणतेही कारण नसताना विद्याला शिवीगाळ करून बेल्टने मारहाण केली. विद्याचे सासू, सासरे देखील तिला शिवीगाळ करीत होते. त्याच रात्री दहा वाजता विद्या झोपलेली असताना आरोपी पती बाळू व सासूने तिच्याच्या तोंडात बळजबरी अ‍ॅसिड टाकले. विद्याचा सासरा, दीर, नणंद त्यांचे पती यांनी विद्याच्या तोंडात औषध टाकत असताना तिला पकडून ठेवले होते. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी बाळूला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात वापरलेले अ‍ॅसिड कोठून आणले; तसेच गुन्ह्यातील इतर आरोपी पसार असून, त्यांचा शोध घेणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा महोत्सव सोमवारपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये १३ मे पासून पाच दिवसांचा आंबा महोत्सवास सुरुवात होत असून, नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशरसह कोकणातील हापूस आंब्याची चव यानिमित्ताने औरंगाबादकरांना चाखायला मिळणार आहे.

आंबा महोत्सवास गेल्या वर्षी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी सुमारे १२ टन आंब्याची विक्री अवघ्या तीन दिवसांत झाली होती. ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेत यंदा हा महोत्सव पाच दिवसांचा करण्यात आला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ व कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक जी. सी. वाघ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळासह जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेड आदी यावेळी उपस्थित असतील. हा महोत्सव १७ मेपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या कालावधीत सर्वांसाठी खुला राहिल, असेही त्यांनी नमूद केले.

आतापर्यंत कोकणातील १५हून अधिक हापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली असून, मराठवाड्यातील केशर उत्पादक यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृह पाडण्याचे आदेश

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन-सात येथील हरितपट्ट्यात बांधण्यात आलेले सामाजिक सभागृह पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही. नलावडे व न्या. मंगेश पाटील यांनी महापालिकेला दिले आहेत; तसेच या बेकायदा बांधकामाला प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत.

सिडको एन-सातमध्ये हरितपट्ट्यातील हे बांधकाम माजी शालेय शिक्षण मंत्री आणि माजी आमदार राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून बांधण्यात आले होते. यावर नऊ लाख ९८ हजार ३६८ रुपयांचा खर्च आला होता. हरित पट्ट्यात बांधकाम करता येत नाही म्हणून याचिकाकर्त्या अॅड. आशा दौलतराव दांडगे यांनी जिल्हाधिकारी, सिडको, महानगरपालिका यांना विनंती अर्ज केले होते, पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता हे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आशा दांडगे यांनी या अवैध बांधकामाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. २०१४मध्ये करण्यात आलेल्या या याचिकेचा निकाल २२ एप्रिल रोजी लागला.

शहर अभियंता यांनी ३० जानेवारी २०१४ रोजी या बांधकामाला ना हरतक प्रमाणपत्र दिले होती. २०० चौरस मीटरची एक मजली इमारत बांधण्यात आली, परंतु नगर रचना कार्यालयाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. किंवा त्यांनी या इमारतीसंदर्भात आपले कोणतेही मत व्यक्त केलेले नव्हते. सिडकोच्या म्हणण्यानुसार बांधकाम हे हरितपट्ट्यातच होते. या भागातील अनेक नागरिकांनी बांधकाम थांबविण्यासाठी आमदारांनाही साकडे घातले होते. तरीही हे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या बांधकामावर विधि विभागाचा सल्ला घ्यावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत झाला असतानाही या इमारतीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. आशा दांडगे यांच्यावतीने बी. एल. सगर-किल्लारीकर आणि नितीन त्रिभूवन यांनी काम पाहिले आहे. महेश कानडे यांनी त्यांना साह्य केले. शासनातर्फे एस. बी. यावलकर, सिडकोतर्फे अनिल बजाज, महापालिकेतर्फे जयंत शहा आणि राजेंद्र दर्डा यांच्यातर्फे एल. डी. वकील यांनी काम पाहिले.

\Bकायद्याचे उल्लंघन\B

महापालिका, ग्रामपंचायत आणि इतर शासनाच्या सार्वजनिक मालमत्ता बळकविण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रभावशाली व्यक्तींमध्ये राजकारण्यांचाही समावेश आहे. सार्वजनिक आणि हरितपट्टा म्हणून राखीव असलेल्या जागेवर आमदार असो की कोणी, त्यावर बांधकाम करू देणे अपेक्षित नव्हते. हे बांधकाम करताना कायद्याचे उल्लंघन झाले आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आमदाराच्या दबावाखाली येऊन बांधकामाला विरोध केला नाही. या बांधकामाला परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत; तसेच अपव्यय झालेल्या पैशांसदर्भातही चौकशी करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेखा बैजल यांना साहित्य पुरस्कार

0
0

औरंगाबाद : पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. शरदच्चंद्र चिरमुले उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार रेखा बैजल यांच्या 'ज्ञातापलिकडले' या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गुजराती साहित्यिक सितांशु यशच्चंद्र यांच्या हस्ते येत्या २६ मे रोजी पुणे येथे जाहीर कार्यक्रमात बैजल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे उपस्थित राहणार आहेत. रेखा बैजल यांची मराठी व हिंदी भाषेत ३७ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध पुररस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा विक्री करणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

गुटख्याचा साठा करून त्याची विक्री करणारा आरोपी महेंद्र सोमनाथ बियाणी याला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून दोन लाख दोन हजार ४५२ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी शनिवारी दिले.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरशे अजिंठेकर (४४) यांनी तक्रार दिली.आरोपी महेंद्र बियाणी (३४, रा. गजानन नगर, गारखेडा) याने आपल्या घरात लाखो रुपये किंमतीचा गुटखा साठवला असून, तो शहरातील पानटपरी व दुकान चालकांना गुटख्याचा पुरवठा करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकासह आरोपी बियाणी याच्या घरावर छापा मारला. घरात विविध कंपन्याचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा सुमारे दोन लाख दोन हजार ४५२ रुपये किंमतीचा साठा मिळून आला. या प्रकरणात पुंडलीक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी बियाणीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षण ऐरणीवर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणातून मिळालेले प्रवेश रद्द झाल्यानंतर आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरक्षणाचा लढा कोर्टात सुरू असून, भक्कम पुराव्यांवर आरक्षण निश्चित टिकेल, असा दावा याचिकाकर्ते करीत आहेत. नोकरी व शिक्षणात मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगत मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यभर तापला आहे. वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर रोष उफाळला असून, राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशात आरक्षण लागू राहणार का, असा प्रश्न तरुणांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नसल्याची टीका मराठा संघटना करीत आहेत. मराठा समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे गृहीत धरून १६ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले. कायद्यानुसार आरक्षणाची कार्यवाही सुरू असून हायकोर्टात सुनावणी प्रलंबित आहे. घटनात्मकदृष्ट्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याचे हायकोर्टाने म्हटल्यास आरक्षणाचा न्यायालयीन लढा दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, समर्पक युक्तीवाद आणि भक्कम पुरावे सहाय्यभूत ठरल्यास आरक्षण लागू होणे शक्य आहे. या दोन शक्यतांचा विचार करुन याचिकाकर्ते हायकोर्टात युक्तिवाद करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण लागू होत असतानाच सुप्रीम कोर्टाने राखीव कोट्यातील वैद्यकीय प्रवेश रद्द केले. त्यामुळे आरक्षण प्रश्नावरुन गदारोळ सुरू झाला आहे.

'आरक्षणाचा कायदा वैध आहे, असे ग्राह्य धरल्यास ३० नोव्हेंबरनंतर प्रक्रिया झालेले प्रवेश वैध ठरतील. ३० जूनपूर्वी झालेले प्रवेश वैध ठरणार नाहीत. यावर्षीच्या शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाची विश्वासार्हता सिद्ध होईल. उच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली तर, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे मात्र, आरक्षण टिकण्याबाबत आशावादी आहे,' असे आरक्षणाचे अभ्यासक व याचिकाकर्ते डॉ. बाळासाहेब सराटे यांनी 'मटा'ला सांगितले. या परिस्थितीत उच्च न्यायालयासमोर ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देण्याचा पेच असल्यास आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करू शकतात. या पार्श्वभूमीवर, आरक्षणाबाबत संभ्रम वाढला असून मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील झाला आहे.

समाजात संभ्रम वाढला

मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुरू असल्यामुळे १६ टक्के आरक्षणावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. या स्थितीत आरक्षणाबाबत संभ्रम वाढला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर 'एसईबीसी' प्रमाणपत्र काढण्याचे लक्षणीय प्रमाण अपेक्षित होते मात्र, न्यायालयाच्या निकालनंतरच प्रमाणपत्र घेणार असल्याचे बहुतांशी नागरिकांचे मत आहे. त्यातच वैद्यकीय व पदव्युत्तर प्रवेशाच्या निकालाने संभ्रम वाढला आहे.

आरक्षण टिकणारच नाही अशी हूल जाणीवपूर्वक उठवली गेली आहे. आरक्षण कुणा एका पक्षामुळे मिळालेले नाही. हा समाजाचा लढा होता. त्यामुळे सरकारवर टीका करण्यापेक्षा आरक्षण टिकवण्याची उमेद मराठा समाजाने ठेवावी.

- डॉ. बाळासाहेब सराटे, आरक्षण अभ्यासक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचे नियोजन होईना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाणीपुरवठ्याचे बिघडलेल्या नियोजनासाठी आठ दिवसांचा कालावधी प्रशासनाने मागितला होता. चार दिवस होत आले मात्र, परिस्थितीत सुधारणा नाही. टँकरसाठी जलकुंभावर महिलांचे येणे सुरूच असून, शनिवारी सिडको-सातमधील जलकुंभावर आंबेडकरनगरमधील महिलांनी पाण्यासाठी धाव घेतली.

शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे ४० दशलक्ष लिटर रोज (एमएलडी) पाण्याची तूट निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन अद्यापही सुरळीत नाही. समान पाणी वाटपावरून नगरसेवकांचे आंदोलन, महापौर, आमदारांनी बोलावलेली बैठक यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. पाणीपुरवठ्यात समानतेसाठी आठ दिवसांचा कालावधी द्या, अशी प्रशासनाने मागणी केली होती. आयुक्तांनी पत्र काढले, प्रशासकीय बदल्या केल्या मात्र, पाणी टंचाईचा समाना नागरिकांना करावाच लागतो आहे. शनिवारी अनेक महिला, नागरिकांनी जलकुंभावर टँकरसाठी धाव घेतली. 'पाणी द्या, टँकर द्या,' अशी मागणी महिलांनी सिडको एन-सात जलकुंभावर येऊन केली. १५ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याचा थंब नाही, असे सांगत आंबेडकनगर येथील महिला-नागरिकांनी जलकुंभावर हल्लाबोल केला. 'आम्ही कर भरतो, आम्हाला पाणी द्या,' अशी घोषणाबाजी करीत टँकरचा पाणीपुरवठा बंद पाडला. काही महिला टँकरवर पोचल्या. महिलांचा रोष पाहून टँकरचालकही टाकीवरून बाजुला गेले. सुमारे दीडतास या नागरिकांनी ठिय्या मांडला. आंदोलनात सुमन जाधव, मिना शिंदे, पुष्पा जलकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

सहा कनिष्ठ अभियंते मदतीला

पाणीपुरवठा विभागात सहा कनिष्ठ अभियंत्यांची बदली करण्यात आली. सहायक आयुक्त करणसिंह चौहान यांची पाणीपुरवठ्याचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. कनिष्ठ अभियंत्यांकडे टँकरची विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार टँकरवर देखरेख ठेवणे, खासगी टँकर न देणे आदी कामांवर लक्ष ठेवत त्यांना आयुक्तांकडे दररोज अहवाल सादर करायचा आहे. यासह पाणी गळती, वितरण व्यवस्था, दुषित पाणी, अनियमितता दूर करणे याबाबतची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे नियोजन करताना प्रशासनाची तारेवरची कसरत होते आहे.

सिडको-एक पॉइंटकडे टँकरकडे वळलेच नाहीत

टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्यात सुसूत्रपणा आणण्यासाठी टँकर सिडको एन-एक पॉइंटवरून भरण्याचे निश्चित करण्यात आले. रोज अडीच 'एमएलएडी' पाणी तेथून घेण्याची मुभा महापालिकेला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या आयुक्तांच्या बैठकीतही पुन्हा त्यावर विचारमंथन करण्यात आले. असे असले तरी अद्याप या पॉइंटवरून पूर्णपणे टँकरद्वारे पाणी घेतले जात नाही. त्यात आठ मिनिटे एका टँकरला भरायला लागतात व हे पाणी घेण्यास नकार देत असल्याने टँकर त्या पॉइंटवरून पाणी भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिना घेऊनही मोफत प्रवेश अपूर्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोफत प्रवेश योजनेत पहिला टप्प्यातील प्रवेशासाठी महिनाभर घेतल्यानंतरही शिक्षण विभागाला पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देता आलेले नाहीत. राज्यात २० हजार ८०७ जागांवर प्रवेश रिक्त राहिले आहेत तर, औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ३४२ जागा पहिल्या टप्प्यात रिक्त राहिल्या.

आर्थिक दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया यंदा फेब्रुवारीपासून सुरू झाली. मार्चमध्ये अर्ज भरल्यानंतर आठ एप्रिलला पहिली सोडत काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश दहा एप्रिलपासून सुरू झाले. यंदा प्रवेश प्रक्रियेची सोडत राज्यस्तरावर घेण्यात आली. कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्येक तालुक्याला समिती, शहर, महापालिकेत स्थानिक पातळीवर दोन समिती असे नियोजन करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या सोडतीमध्ये पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. राज्यात ६७ हजार ७०६ विद्यार्थी पात्र ठरले. दहा एप्रिल ते ३० एप्रिल मुदत होती. ही मुदत चार मे व नंतर दहा मेपर्यंत वाढिवण्यात आली. शुक्रवारी प्रक्रिया संपली तेव्हा रात्री उशिरापर्यंत राज्यात ४६ हजार ८९९ एवढे प्रवेश पूर्ण होऊ शकले. औरंगाबादमध्ये यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अर्जाची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी चढाओढ होती मात्र, पहिल्या फेरीत अनेकांना प्रवेश मिळाला नाही. तीन हजार ८३९ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी दोन हजार ४९७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.

वेळापत्रकाचे नियोजन हुकणार

प्रवेश प्रक्रियेत दहा एप्रिलपासून सुरू झालेला प्रक्रियेतील पहिला टप्पा दहा मे रोजी पूर्ण झाला. औरंगाबाद जिल्ह्यात पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकले नाहीत. यातील काहींचे अर्ज पडताळणीत बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. महिनाभराचा कालावधी प्रवेश प्रक्रियेतील पहिला टप्प्यालाच लागला. त्यातच शिक्षण विभागाला प्रवेश पूर्ण करता आलेले नाहीत. यात दोष कोणाचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळांनी अशा योजनेतील प्रवेशाबाबत अनास्था दाखविली. अशा शाळांवर शिक्षणाधिकारी कार्यालय काय कारवाई करणार, असाही प्रश्न कायम आहे. आता दुसऱ्या, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक अद्याप जाहीर नाही. त्यामुळे पुढे वेळापत्रक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील स्थिती…

शाळा संख्या…… : ९१९५

प्रवेश क्षमता… : ११६७७९

एकूण अर्ज… : २४४९३२

पहिला टप्पा… : ६७७०६

प्रत्यक्ष………… प्रवेश : ४६८९९

औरंगाबादची स्थिती

शाळा संख्या… : ५८६

प्रवेश क्षमता… : ५५४५

अर्ज…………… : १४२११

पहिला टप्पा… : ३८३९

प्रत्यक्ष………… प्रवेश : २४९७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंठा लेणीकडे पर्यटक फिरवताहेत पाठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद-सिल्लोड रस्त्याचे काम रखडल्याचा दुष्परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. खराब रस्त्यामुळे टूर संयोजक अजिंठ्याला जाण्यास नकार देत आहेत. परिणामी, अजिंठ्यात पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. रस्त्याचे काम लवकर करण्यासाठी टुरिझम प्रमोटर्स गिल्ड पर्यटन मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यानंतरही कामाला गती मिळाली नसल्यामुळे पर्यटक व व्यावसायिक हतबल झाले आहेत.

दरवर्षी देश-विदेशातील चार लाख पर्यटक वेरूळ-अजिंठा लेणीला भेट देतात. पर्यटकांशिवाय जळगावला जाणाऱ्या प्रवाशांची संख्यासुद्धा मोठी आहे. औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद ते सिल्लोड रस्ता पूर्ण खोदण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वेगाने काम झाले. रस्ता सपाटीकरण करुन पाच किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यानंतर निधी संपल्यामुळे काम बंद पडले. पूर्ण खोदलेल्या व खडी अंथरलेल्या रस्त्यावरुन प्रवास करणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे ठरले आहे. खराब रस्त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. रस्ता सुस्थितीत असताना औरंगाबाद ते अजिंठा अंतरासाठी दोन ते अडीच तास लागत होते. सध्या हा प्रवास साडेचार तासांपर्यंत गेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी अजिंठ्याकडे पाठ फिरवली असून वेरूळ लेणी पाहून ते परतत आहेत. खराब रस्त्यामुळे भाडोत्री वाहनेही अजिंठ्याचे भाडे नाकारत आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीत असणारी गर्दी यावर्षी घटली आहे. किमान ४० टक्के पर्यटक कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.

दरम्यान, औरंगाबाद ते फर्दापूर या ९९ किलोमीटर अंतरासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फक्त दीड तास वेळ अपेक्षित आहे. काम रखडल्यामुळे औरंगाबाद शहरातील टुरिझम प्रमोटर्स गिल्ड सातत्याने पर्यटन मंत्रालय, भारत सरकार व यात्रा व्यवसाय विभागाकडे पत्राद्वारे पाठपुरावा करीत आहे. यापूर्वी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनाही संघटनेने सविस्तर पत्र पाठवले होते. महामार्गाचे काम तातडीने करण्याची संघटनेची मागणी आहे.

दीर्घकालीन काम

औरंगाबाद ते फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण प्रस्तावित असून नवीन पूल आणि पादचारी मार्ग बांधण्यात येणार आहे. राज्य सरकारने २०१२ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. एकूण ७४६ कोटींच्या प्रकल्पात केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा आहे. भूसंपादन आणि इतर तांत्रिक प्रक्रियेत काम रखडल्यामुळे रस्ता तातडीने पूर्ण झाला नाही. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी रस्त्याचा आढावा घेतला होता. जुलै महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल असे सरकारने म्हटले आहे. पण, रस्ते कामाला आणखी एक वर्ष लागण्याची शक्यता आहे.

पर्यटनाची नकारात्मक प्रतिमा

अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले जगभरातील पर्यटक खराब रस्त्याबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. देशभरात रस्त्यांची कामे सुरू असून काही दिवस गैरसोय होईल. त्यानंतर पर्यटकांना अत्यंत कमी वेळेत लेणीपर्यंत पोहचता येईल, असे टूर संयोजक सांगतात. त्याला मान्यता देत काही पर्यटक लेणीपर्यंत येतात. मात्र, सोशल मीडियातून रस्त्याची आणि पर्यटनाची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर पर्यटन हंगाम सुरू होईल. त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. सध्या पर्यटक कमी आहेत. तरीसुद्धा गैरसोय होऊ नये ही काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.

जसवंतसिंग राजपूत, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटो - संभाजी महाराज

0
0

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त टी.व्ही. सेंटर चौकामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images