Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महापौरांनी पाय पडताच तुटली फरशी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत बांधलेल्या आरोग्य केंद्रांना महापौरांनी शुक्रवारी भेटी दिल्या. राहुलनगर-सादातनगर येथील आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी करताना महापौरांचा पाय एका फरशीवर पडला आणि फरशी तुटली. त्यामुळे बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत शासनाने महापालिकेसाठी आठ आरोग्य केंद्र मंजूर केले आहेत. आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेला शासनाकडून सहा कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीतून दोन आरोग्य केंद्रांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. सहा केंद्रांची कामे शिल्लक आहेत. त्यामुळे या केंद्रांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. राहुलनगर-सादातनगर येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करत असताना बांधकामासाठी आणलेल्या एका फरशीवर महापौरांचा पाय पडला आणि फरशी तुटली. या प्रकारामुळे महापौर देखील अवाक् झाले. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून आरोग्य केंद्राचे काम करा, अशी सूचना त्यांनी केली. निकृष्ट दर्जाचे साहित्य बदला, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

\Bजूनमध्ये उद्‌घाटन \B

'आरेफ कॉलनी, मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल आणि गणेश कॉलनी येथील आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. राहुलनगर-सादातनगर व कबीरनगर येथील काम शिल्लक आहे. या दोन आरोग्य केंद्राची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन १४ आणि १५ जून रोजी केले जाईल. नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापूसच्या अडीच हजार पेट्यांची विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत' या संकल्पनेतून जाधववाडी येथे आयोजित पाच दिवसांच्या आंबा महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. येथे आंब्याची हातोहात विक्री झाली.

राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जाधववाडी येथील बाजार समिती आवारातील फुल मार्केटमध्ये सोमवारपासून या आंबा महोत्सव आयोजित करण्यात आले. शुक्रवारी या महोत्सवाची सांगता करण्यात आली. या पाच दिवसांत तब्बल अडीच हडार पेट्या हापूसची विक्री झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. आंब्याचा मोसम लक्षात घेऊन आंबा उत्पादक व ग्राहकांना एकाच छताखाली आणण्यासाठी गेल्या वर्षीपासून हा महोत्सव बाजार समिती आवारात आयोजित केला जात आहे.

यंदा रत्नागिरी, चिपळूण, बेनी यासह कोकण परिसरातील १६ हापूस उत्पादक, स्थानिक दोन केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला केशर, हापूस आंब्याची चव महोत्सवानिमित्ताने चाखायला मिळत असल्याने ग्राहकांचा पहिल्या दिवसापासूनच उदंड प्रतिसाद मिळाला.

\Bपुढील वर्षी दहा दिवस \B

एका पेटीत चार डझन आंबे असून ४००, ६०० आणि ८०० रुपये डझन या दराने विक्री झाली. गुरुवारपर्यंतच बहुतेक शेतकऱ्यांना माल विकला गेला. शुक्रवारी दुपारपर्यंत सर्व आंब्याची विक्री झाली. दरम्यान, ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील वर्षी दहा दिवसांता आंबा महोत्सव घेण्याचे प्रयत्न केले जातील, अशी माहिती शिरसाठ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफारी पार्कच्या जागेवर आखणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सफारी पार्कच्या जागेवर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारतर्फे (पीएमसी) सर्व्हेअरच्या माध्यमातून आखणी सुरू केली आहे. आखणी पूर्ण झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे. 'पीएमसी'चे कर्मचारी काही दिवसांपासून आखणीच्या कामात व्यस्त आहेत.

शासनाने दिलेल्या शंभर एकर जागेवर महापालिकेतर्फे मिटमिटा शिवारात सफारी पार्क विकसित केले जाणार आहे. ही जमीन ताब्यात येऊन दोन पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही तेथे काम सुरू होत नव्हते. दोन महिन्यापूर्वी सफारी पार्कसाठी दिल्ली येथील ब्रीजराज शर्मा यांना 'पीएमसी' म्हणून नियुक्त करण्यात आले. प्राणिसंग्रहालय व सफारी पार्कच्या कामाचा त्यांना चांगला अनुभव असल्याचे सांगितले जाते. एप्रिलमध्ये शर्मा यांनी स्वत: सफारी पार्कच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर सफारी पार्कचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यानच्या काळात सर्व्हेअर्सच्या माध्यमातून आखणी सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शंभर एकर परिसरात वृक्षारोपण कोणकोणत्या भागात करायचे, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या कोठून टाकायच्या, प्राण्यांचे पिंजरे कसे असावेत, त्यांचे क्षेत्रफळ किती असावे, उंच आणि सखल भाग कुठे आहे, प्राण्यांसाठी पाणवठे कोठे तयार करता येतील, पार्कचे व्यवस्थापन कार्यालय कोठे असावे, प्राण्यांच्या दवाखान्याची जागा, अंतर्गत रस्त्यांची रुंदी आदींचे सर्वेक्षण करून आखणी करण्यात येत आहे. सर्वेक्षणानंतर त्या त्या ठिकाणी खांब लावण्यात येणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात सफारी पार्कच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालय विभागाने केले आहे. दरम्यानच्या काळात संपूर्ण जागेभोवती जेसीबीने चर खोदून त्यात बांबूची लागवड करण्यात आली आहे. शंभर एकर जागेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी खूप खर्च होणार असून वेळ जास्त लागेल. त्यामुळे संपूर्ण जागेभोवती बांबूचे कुंपण उभारण्याचे नियोजन केले आहे.

\Bजास्तीच्या शंभर एकराचा प्रस्ताव\B

सफारी पार्कसाठी शासनाने महापालिकेला शंभर एकर जागा विनामोबदला दिली आहे. या जागेशेजारीच आणखी शंभर एकर जागा मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे सादर केला आहे. या जागेवर मनोरंजन उद्यान विकसित करण्याचा महापालिकेचा विचार आहे. जास्तीच्या शंभर एकर जागेच्या प्रस्तावावर शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५० एकर जागेसाठी बाजार समितीचे प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पणन मंडळाच्या ताब्यात गेलेली ५० एकर जमीन परत मिळ‌विण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. ही जागा ताब्यात घेताना बाजार समितीची फसवणूक झाल्याचा आरोप बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी केला आहे. वेळप्रसंगी कोर्टात धाव घेण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

जाधववाडी परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण १६४ एकर जमीन होती. त्यापैकी काही जमीन ही वखार महामंडळ, कापूस फेडरेशन, वीज मंडळ, खरेदी विक्री संघ यांच्याकडे आहे, तर ५० एकर जमीन ही पणन मंडळाकडे असल्याचे सभापती पठाडे यांनी सांगितले. १९९२ मध्ये बाजार समितीने पणन मंडळाकडून एक कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. २००९-१० पर्यत व्याजासह ते कर्ज १२ कोटी रुपये झाल्याचे मंडळाने सांगत कर्जापोटी १२ एकर जमीन घेतली. १९९७-९८ मध्ये एसबीआय व इतर बँकांकडून बाजार समितीने सहा कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. २०११ पर्यंत ते व्याजासह या कर्जाची रक्कम १४ कोटी १० लाखपर्यंत गेली. बँकेने वसुलीसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यावर समितीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी पुन्हा पणनकडून १४ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज घेतले. नंतर बाजार समितीच्या ३८ एकर जागेचे मूल्यांकन करण्यात आले. ते २५ कोटी रुपये निघाले. त्यावेळी पणन मंडळाने ती ३८ एकर जमीन कर्जाच्या रक्कमेपोटी नावावर लिहून घेतली आणि उर्वरित रक्कमही बाजार समितीला परत केली नाही, असा आरोप सभापती पठाडे यांनी केला. दिलेल्या कर्जापोटी जादा पटीने पैसे लावले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

\Bपणन मंडळ उत्तर देईना \B

बाजार समितीच्या पुढील विकासकामासाठी जमिनीची आवश्यकता आहे. पणन मंडळाकडील ५० एकर जागा परत मिळावी, अशी मागणी सभापती पठाडे यांनी केली. पणन मंडळाकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळाले नाही. पाठपुरावा सुरू असून वेळप्रसंगी कोर्टात जाऊ, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८५ हजारांचा पानमसाला जप्त; दोघांचा जामीन अर्ज फेटा‌ळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जीपमधून घेऊन जात असलेला ८५ हजार ६८० रुपयांचा राजनिवास सुंगधी पानमसाला जप्त करण्यात आल्याप्रकरणात आरोपी अर्शद बशारथ बेग मिर्झा यांचा अटकपूर्व, तर आरोपी शेख आसिफ शेख महेमूद याने दुसऱ्यांदा सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी फेटाळला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशिद सिद्दीकी यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, जीपमधून सुगंधी तंबाखू -पानमसाला घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पाच एप्रिल २०१९ रोजी फुलंब्री पोलिसांनी जीप (क्रमांक एमएच ३७-जे १६२९) अडवून जीपमधून ८५ हजार ६८० रुपयांच्या राजनिवास सुगंधी पामनसाल्याची ६१२ पाकिटे व अडीच लाखांची जीप जप्त करण्यात आली होती. तसेच छाप्यात जीपचालक विठ्ठल दत्ताराम वांजळ, आकाश ज्ञानेश्वर सरोदे व शेख आसिफ शेख महेमूद यांना अटक करण्यात आली होती. तसेच जप्त करण्यात आलेला सुगंधीत पानमसाला हा आरोपी अर्शद बशारथ बेग मिर्झा (२१, रा. भोकरदन, जि. जालना) याच्याकडून मिळवल्याची कबुलीही तिघांनी दिली होती. प्रकरणात फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अर्शद याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला असता, गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून, आरोपीला जामीन मंजूर केल्यास आरोपी पुरावा नष्ट करू शकतो. त्यामु‌ळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळ‌ला. याच प्रकरणात आरोपी शेख आसिफ शेख महेमूद (४०, रा. संजयनगर बायजीपुरा) याने दुसऱ्यांदा नियमित जामीन अर्ज सादर केला असता, आरोपीला जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील पहाडिया यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालकाला साडेचार लाखांचा चुना; हॉटेल मॅमेजरला कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉटेलातील काऊंटरच्या ड्रॉव्हरमध्ये सही करून ठेवलेली स्लीप चोरून बँकेतून साडेचार लाख रुपये काढून हॉटेल मालकाला गंडा घालणारा आरोपी व्यवस्थापक शंकर उर्फ रेड्डी शिवाजी बोंबे याला गुरुवारी (१६ मे) अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (२१ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.

या प्रकरणी हॉटेल मालक किरण सुंदरराव उबाळे (४०, रा. उत्तमनगर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या हॉटेलात शंकर उर्फ रेड्डी शिवाजी बोंबे (३५, रा. विशालनगर, लातूर) हा व्यवस्थापक म्हणून कामाला होता. चार महिन्यांपूर्वी हॉटेलच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी पैशांची गरज असल्याने फिर्यादीने पिग्मी खाते असलेल्या देवगिरी बँकेतून चार लाख ४९ हजार रुपये काढण्यासाठी स्लीप भरून काऊंटरमध्ये ठेवली होती. बोंबे याने दुसऱ्या दिवशी फिर्यादी हॉटेलवर येण्यापूर्वीच काऊंटरमधून स्लीप चोरुन त्या आधारे देवगिरी बँकेतून चार लाख ४९ हजार रुपये काढले होते. त्यानंतर तो पसार झाला होता व प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीनंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी बोंबे याला गुरुवारी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीने बँकेतून काढलेले पैसे हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायायलात केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करुन लुटला ऐवज; अटकपूर्व जामीन फेटा‌ळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्ध्या किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवत लुटमार करून एक लाख अठराशे रुपये हिसकावून नेल्याप्रकरणात आरोपी बबन निजाम काळे याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शुक्रवारी (१७ मे) फेटाळला.

या प्रकरणी अनिल सुरेंद्र भुतेकर (२७, रा. टाकरवण, जि. जालना, ह. मु. बजाजनगर, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नऊ मे २०१८ रोजी फिर्यादी व त्याच्या मित्राला अर्ध्या किंमतीत सोने देण्याचे आमिष दाखवून गंगापूर-वैजापूर रस्त्यालगत असलेल्या मौजे नरहरी रांजणगाव शिवारात बोलावण्यात आले होते. त्यानुसार फिर्यादी व त्याचा मित्र गेला असता, तिथे त्यांना सात ते आठ व्यक्तींनी मारहाण करून त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल व ७० हजार रुपये रोख, असा सुमारे एक लाख एक हजार ८०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेऊन आरोपी पसार झाले होते. प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी गुन्ह्यामध्ये आरोपी कार्तिक निजाम काळे, मिजेस निजाम काळे व लाकर करमत उर्फ गजानन काळे या तिघांना अटक करण्यात आली होती. यापैकी कार्तिक व मिजेस काळे हे दोघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर आरोपी लाकर काळे हा पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, आरोपी बबन निजाम काळे (रा. नरहरी रांजणगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी प्रकरणात काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा पाय पडताच तुटली फरशी!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत बांधलेल्या आरोग्य केंद्रांना महापौरांनी शुक्रवारी भेटी दिल्या. राहुलनगर-सादातनगर येथील आरोग्य केंद्राच्या कामाची पाहणी करताना महापौरांचा पाय एका फरशीवर पडला आणि फरशी तुटली. त्यामुळे बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या साहित्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत शासनाने महापालिकेसाठी आठ आरोग्य केंद्र मंजूर केले आहेत. आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेला शासनाकडून सहा कोटी रुपये प्राप्त झाले. या निधीतून दोन आरोग्य केंद्रांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. सहा केंद्रांची कामे शिल्लक आहेत. त्यामुळे या केंद्रांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी भेट दिली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. राहुलनगर-सादातनगर येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करत असताना बांधकामासाठी आणलेल्या एका फरशीवर महापौरांचा पाय पडला आणि फरशी तुटली. या प्रकारामुळे महापौर देखील अवाक् झाले. चांगल्या दर्जाचे साहित्य वापरून आरोग्य केंद्राचे काम करा, अशी सूचना त्यांनी केली. निकृष्ट दर्जाचे साहित्य बदला, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

\Bजूनमध्ये उद्‌घाटन \B

'आरेफ कॉलनी, मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल आणि गणेश कॉलनी येथील आरोग्य केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. राहुलनगर-सादातनगर व कबीरनगर येथील काम शिल्लक आहे. या दोन आरोग्य केंद्राची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, त्या आरोग्य केंद्रांचे उद्घाटन १४ आणि १५ जून रोजी केले जाईल. नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेततळे आणि विहिरींनी तळ गाठल्यानंतर करमाड परिसरात फळबागा जळण्यास सुरुवात झाली आहे. निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेल्या डाळिंबाच्या बागा तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टँकरच्या पाण्यावर फळबागा जगविण्याचे प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केले. मात्र, हा खर्च डोईजड झाल्यानंतर अखेर बागा तोडण्यात आल्या.

फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या करमाड परिसरात दुष्काळाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. डाळींब, मोसंबी, द्राक्ष, पेरू फळबागांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. या भागातील डाळींब निर्यात होत असल्यामुळे करमाडचे देशभर नाव आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी शेततळे तयार केले आहे. या पाण्यावर फळबागा तग धरून होत्या. यावर्षी जेमतेम पाऊस झाल्यामुळे विहिरींनी डिसेंबर महिन्यात तळ गाठला. परिणामी, शेततळ्यातही पाणीसाठा शिल्लक राहिला नाही. फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाई तीव्र झाल्यानंतर शेतकऱ्यांनी टँकरच्या पाण्यावर फळबागा जगविल्या. हा खर्च वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी पाणी पुरवठा थांबविला. सध्या फळ धरणे अवघड झाले आहे. ठिबक सिंचनावर फळबाग जगवली आहे. त्यामुळे बाग टिकाव धरून आहे, असे दूधड येथील शेतकरी नारायण चौधरी यांनी सांगितले. शेततळ्यात थेंब नसल्यामुळे फळबाग तोडण्याशिवाय पर्याय नाही. बहुतेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चौधरी म्हणाले. दूधड, औरंगपूर, लाडसावंगी या गावांसह बहुतेक गावात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. पिण्यासाठी पाणी नसल्याने शेतीसाठी कसे मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी केला. सहा वर्षांपूर्वी औरंगाबाद परिसरातील नाल्याचे पाणी टँकरद्वारे आणून फळबागा जगविल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, मागील दोन वर्षांपासून शेतीत उत्पन्न नसल्याने हा खर्चसुद्धा परवडत नसल्याचे शेतकरी म्हणाले.

दरम्यान, दहा हजार हेक्टरवर फळबागा असून भाजीपाल्याचे क्षेत्र मोठे आहे. या परिसरातून औरंगाबाद शहरात फळ व भाजीपाला पुरवठा होतो. दुष्काळामुळे हा पुरवठा ठप्प झाला आहे. पावसाळ्यानंतरच परिस्थिती पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

कडक उन्हाने पाने गळतात

शेततळ्यात कमी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे फळबागा जगविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण, तापमान जास्त असल्याने फळझाडांचे फळे आणि पानेसुद्धा गळत आहेत. वातावरण प्रतिकूल असल्यामुळे फळबाग हातची जाणार असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. पाच हजार लिटर पाण्यासाठी टँकरचालकाला एक हजार रुपये द्यावे लागत आहेत. हा खर्च न झेपल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा काढण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन एक्स्प्रेसचा एक डबा वाढवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबईला जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस रेल्वेच्या कोचची संख्या वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. ही मागणी लक्षात घेऊन रेल्वे विभागाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक डबा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, नांदेड - मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि धर्माबाद - मनमाड - धर्माबाद या रेल्वेमध्ये एक डबा वाढविण्याबाबत मागणी केली जात आहे. मुंबई आणि मनमाड येथे रेल्वे फलाट कमी असल्याने या रेल्वेत कोच वाढविणे शक्य नाही. यासाठी प्रवाशांची मागणी लक्षात घेता, कोच वाढविण्यासाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यात तपोवन एक्सप्रेसमध्ये असलेले पेन्ट्री कार काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागी एक डबा (चेअर कार) वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा एक्सप्रेसमध्येही आपोआप एक डबा वाढणार आहे. यामुळे या रेल्वेमध्ये प्रवाशांना जास्त जागा उपलब्ध होणार आहे. धर्माबाद- मनमाड- धर्माबाद एक्स्प्रेससाटी हा निर्णय ३१ मेपासून तर,नांदेड- मुंबई -नांदेड तपोवन एक्स्प्रेससाठी हा निर्णय एक जूनपासून लागू होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ

0
0

एक हजार मुलांमागे ९६१ मुली

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला आहे. एक हजार मुलांमागे ९६१ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुलींच्या जन्मदराच्या बाबतीत रेड झोनमध्ये असलेला बीड जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब गौरवाची आहे.

राज्य व केंद्र सरकारने मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या आहेत. स्त्री भ्रूण हत्या विषयी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मुलींना शिक्षणाच्या अधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासकीय व स्थानिकस्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात हा जन्मदर वाढला आहे. यापूर्वी मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ७६९ इतका खालावला होता. परंतु, आता आखलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाल्याने हा जन्मदर ९६१ इतका झाला आहे. जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली, त्याच प्रमाणे 'बेटी बचाव बेटी पढाव' ही योजना देखील यशस्वी केली. काही वर्षांपूर्वी देशात बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका मुलींच्या जन्मदर बाबतीत सर्वात खाली होता व सरकारने त्यास रेडझोनमध्ये टाकले होते.

एकेकाळी बीड जिल्हा स्त्री भ्रूण हत्यामुळे कलंकित झाला होता. परंतु, आता हा कलंक पुसला गेला आहे. मुलींचा जन्मदर ९६१ इतका झाला आहे, ही निश्चितच अभिनंदनीय व गौरवाची बाब आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनत घेऊन राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी व जनजागृती केल्यामुळे हे शक्य झाले अशा शब्दांत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सर्वांचे कौतुक केले.

बीड जिल्ह्यात २०१२ मध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रकरण समोर आले. त्यानंतर पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गरोदर मातेची नोंदणी करण्यात आली. गाव पातळीवर आशा कार्यकर्ती मार्फत गरोदर महिलाना सनियंत्रण ठेवण्यात आले. पंतप्रधान महिला सुरक्षित मातृत्व योजनेत गरोदर महिलांचे मोफत औषधोपचार, सोनोग्राफी आणि बाळांतपण करण्यात येत आहे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर लिंग गुणोत्तर नोंद ठेवण्यात आली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणून जिल्ह्यातील स्त्री जन्मदर वाढला आहे.

- डॉ. राधाकिसन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळात दूषित पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या फकीरवाडी, गोकुळवाडी भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या भागातील पाण्याचे नमुने प्रायोगिकतत्वार तपासले असता ही बाब लक्षात आली.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात व ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या औरंगपुरा येथील आरोग्य केंद्राने दहा मे रोजी फकीरवाडी व गोकुळवाडी येथील काही घरांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. या भागातील नागरिकांच्या दूषित पाण्याबद्दल तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पाण्याचे नमुने घेण्यात आले. हे नमुने लगेचच प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी देण्यात आले. १४ मे रोजी तपासणीचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. जेवढे नमुने आरोग्य विभागाने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते ते सर्व नमुने दूषित असल्याचे अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट झाले. प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल आरोग्य विभागातर्फे आता पाणीपुरवठा विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागाने त्याची दखल घेऊन लगेचच कार्यवाही केली तर दूषित पाण्याचा प्रश्न संपू शकेल. पावसाळ्यात साथीचे आजार बळावतात. त्यातच दूषित पाण्याची समस्या कायम राहिली तर, नागरिकांमधून आजारपणाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दूषित पाण्याच्या तक्रारींचा निपटारा वेळीच केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---

\Bमटा भूमिका

\B---

समस्या तातडीने सोडवा

---

सध्या मराठवाड्यात दुष्काळाने ठाण मांडले आहे. औरंगाबाद परिसरात तीव्र टंचाई आहे. नागरिकांना पाणी विकत घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत आहे. अशा अस्मानी संकटात तरी, महापालिकेने दूषित पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो तातडीने सोडविला पाहिजे. कारण सध्या पालिकेचे पाणी दूषित येते म्हणून, दुसरे पाणी आणणेही नागरिकांना शक्य नाही. परिसरातील विहीर, बोअरवेल आटल्या आहेत. खासगी टँकर चालक जे पाणी पुरवतात, ते पिण्यायोग्य नसते. ते पाणी कुठले असते, हे ही अनेकदा माहित नसते. त्या पाण्याला बऱ्याचदा वेगवेगळा वास येतो. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता, पालिकेने दक्ष राहून हा प्रश्न लवकर सोडवावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पीजी सीईटी’च्या वेळापत्रकाचा पेच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या पदव्युत्तर प्रवेशाठी एकाच वेळी 'सीईटी' घेण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्याला एकाच महाविद्यालयात 'सीईटी' देता येईल. त्यामुळे प्रवेशाचे पर्याय कमी होऊन शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे.

विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १७ ते २१ जून दरम्यान प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्याला एकाच महाविद्यालयात परीक्षा देता येणार आहे. या गुणवत्ता यादीत नाव नसल्यास दुसऱ्या जिल्ह्यात 'सीईटी'ची संधी आहे. वेगवेगळ्या टप्प्यात 'सीईटी' घेतली असती तर जास्तीचे पर्याय खुले झाले असते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या ५० गुणांच्या परीक्षेसाठी एक तासाचा वेळ आहे. मात्र, एका विषयाची एकाच दिवशी परीक्षा आहे. त्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत नाव नसल्यास संबंधित विद्यार्थी दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील महाविद्यालयाचा पर्याय निवडता येणार आहे. त्या यादीतही नाव नसल्यात परजिल्ह्यात 'सीईटी' द्यावी लागणार आहे. 'सीईटी'चे वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाने तयार केले आहे. 'सीईटी' घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार वेळापत्रकाची जबाबदारीसुद्धा महाविद्यालयांवर असती तर विद्यार्थ्यांना एकाच शहरात जास्तीचे पर्याय उपलब्ध झाले असते. 'सीईटी'चा निकाल २२ जून रोजी जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया २४ जून रोजी सुरू होईल. या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन विद्यापीठ प्रशासन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऐनवेळी निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, पदव्युत्तर प्रवेशपूर्व परीक्षा एकाच दिवशी 'सीईटी' होणार आहे. विद्यार्थी कोणत्याही एकाच महाविद्यालयात परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे इतर महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळणार नाही. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून महाविद्यालयात जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी अधिसभा सदस्य शेख जहूर यांनी केली आहे.

\Bकुलगुरूंची भेट घेणार

\B'पीजी सीईटी'च्या वेळापत्रकात बदल करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे सोमवारी दौऱ्यावरुन परतणार आहेत. चोपडे यांची भेट घेऊन पीजी सीईटीच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी संघटना करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिमी’विरोधात ५८ गुन्हे दाखल

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

देशभरात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटनेवर ५८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारचे जनरल सॉलिसिटर पिंकी आनंद यांनी शनिवारी न्यायाधिकरणातील सुनावणीदरम्यान दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधिकरणासमोर पुण्यातील नागरिकांनी साक्ष नोंदविली. केंद्र सरकारने 'सिमी' संघटनेचा दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याने ३० जानेवारी २०१९ रोजी बंदी घातली. ती बंदी योग्य की अयोग्य? हे ठरविण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली न्यायधीकरणाची स्थापना करण्यात आली. 'सिमी' संघटनेने जेथे देशविघातक कृत्य केले, अशा ठिकाणी जाऊन न्यायाधीकरण साक्ष-पुरावे नोंदविण्याचे काम करते. 'सिमी' संघटनेवर जेथे गुन्हे दाखल आहेत, अशा शहरांमध्ये अथवा राज्याच्या इतर महत्वपूर्ण शहरात जाऊन साक्ष घेते. न्यायाधीकरणास सहा महिन्यात 'सिमी'वरील बंदीसंबंधी आपला अहवाल सादर करायचा आहे. 'सिमी' संघटनेवर केंद्राने घातलेल्या बंदीसंबंधी साक्षी- पुरावे तपासण्याचे काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्यासमोर दोन दिवस औरंगाबाद खंडपीठात झाले. शुक्रवारी महाराष्ट्रातील आणि तेलंगण राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. हैदराबाद शहर पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी जे राजेंद्र, करीमनगर ग्रामीण विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक टी. उषाराणी, महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांची साक्ष नोंदविण्यात आली. पुण्याच्या मुलनिवासी मुस्लिम मंच या संघटनेचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी आपली साक्ष शनिवारी नोंदवली. २०१४मध्ये पुण्यातील पसरसखान येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास महाराष्ट्र 'एटीएस'ने गुंडाळून टाकताना, 'एटीएस'ने भोपाळ येथे इनाकांऊटरमध्ये मारल्या गेलेल्या आरोपींचाचा या गुन्ह्याशी संबध असल्याचे चित्र निर्माण केला असल्याचे साक्षीमध्ये म्हटले आहे. 'सिमी' संघटना म्हणजे विशिष्ट समूहाची असल्यामुळे त्यांनांच टार्गेट केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला त्याच्या जवळ स्फोटके सापडल्यामुळे दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

\B'त्या' पुस्तकामुळे टार्गेट

\B'पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी एस. एम. मुश्रीम लिखित पुस्तक वाचल्यामुळे एकाच समुहाला टार्गेट करण्यात येत असल्याचे मत माझे झाले आहे,' असे अंजुम इनामादर यांनी दिलेल्या साक्षीत म्हटले आहे. ते पुस्तक अंजूम यांनी न्यायाधिकरणापुढे सादर केले. न्यायाधीकरणाचे जनरल सॉलिस्टर पिंकी आनंद यांनी 'सिमी' संघटना देशविघातक कारवाया करते का, अशी विचारणा केली असता अंजुम यांनी, 'माहित नाही,' असे म्हटले. 'सिमी' संघटनेच्या फिरोज पठाण यांना भेटल्याचे त्यांनी मान्य केले.

\B२० मे रोजी जबलपुरात सुनावणी

\B'सिमी'विरोधात किती गुन्हे दाखल आहेत ? याची विचारणा केली असता अंजुम इनामदारने माहित नाही म्हटल्यावर सॉलिसिटर आनंद यांनी ५८ गुन्हे दाखल असल्याचे कोर्टात सांगितले. न्यायधिकरणाने अंजुम यांची साक्ष नोंदवून घेतली. न्यायाधीकरणाने याआधी चेन्नई, पुणे, हैदराबाद येथे साक्ष पुरावे नोंदविले होते. औरंगाबादनंतर जबलपूर (मध्य प्रदेश) आणि केरळमध्ये न्यायाधीकरण जाणार असल्याचे पिंकी आनंद यांनी सांगितले. जबलपुरात २० मे रोजी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीच्या रस्ते जबाबदारी; शहर अभियंत्यांच्या खांद्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या विकासाची जबाबदारी आता महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्याकडे देण्याचे ठरविण्यात आले आहे. रस्ते विकासाबरोबरच वारसा स्थळांचे संवर्धन व सौंदर्यीकरण देखील त्यांच्यात मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे. यासाठी त्यांना 'पीएमसी'चा स्टाफ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या व येत्या काळात करावयाच्या कामांचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी घेतला. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट रोड ही संकल्पना राबवली जाणार आहे. त्यासाठी क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याची प्रथम निवड करण्यात आली आहे. सुमारे सोळा कोटी रुपये खर्च करून, या रस्त्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. शहरातील प्रमुख वारसास्थळांचे संवर्धन व सौंदर्यीकरणाचे काम देखील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी प्राथमिकस्तरावर पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते आणि वारसास्थळांच्या कामांसाठी नोडल ऑफिसर म्हणून शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आल्याचे महापौरांनी पत्रकारांना सांगितले. शहर अभियंता विभागासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्ते आणि वारसास्थळांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या 'पीएमसी'चे कर्मचारी या विभागासाठी मदतनीस म्हणून दिले जाणार आहेत. पानझडे यांच्या नियुक्तीमुळे स्मार्ट रोडची कामे लवकर मार्गी लागतील, असा दावा महापौरांनी केला. शासनाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी पाच वर्षांपूर्वी २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून काम करताना शासनाचे एक कोटी ६४ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेवला आहे. त्यात पानझडे यांच्यावर देखील ठपका आहे. असे असताना स्मार्ट रोडसाठी त्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्याचे महापौरांनी जाहीर केल्यामुळे पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

\Bसोलार प्रकल्पासाठी पाच कोटी

\Bस्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सोलार प्रकल्प उभारण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीमधून महापालिकेची कार्यालये, शाळा आणि आरोग्य केंद्र या ठिकाणी येत्या काळात सोलार पॅनल्स लावण्यात येणार आहेत. यामुळे पालिकेच्या वीज बिलात मोठी बचत होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आतड्याच्या रुग्णात झपाट्याने वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आतड्याच्या संबंधित असलेल्या 'इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज (आयबीडी)च्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये अल्सरेटि कोलायटिस व क्रॉन्हस् डिसीज असे दोन प्रकार आहेत. हा आजार होण्याची कारणे साधारणत: सारखी असल्याने त्यांना एकत्रित वर्गीकृत केले आहे,' अशी माहिती पचनसंस्था, यकृतविकार व एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉ. रमेश सातारकर यांनी दिली. ते जागतिक 'आयबीडी दिनानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

डॉ. सातारकर म्हणाले, 'अल्सरेटि कोलायटिस मुख्यत्वे मोठ्या आताड्याला तर, क्रॉन्हस् डिसीज लहान आतड्याच्या शेवटच्या भागात व मोठ्या आतड्याला होतो. दोन्ही आजारांमध्ये आतड्यांना जखमा होऊन त्यातून रक्तस्त्राव होणे हे प्रमुख लक्षणे असते. अल्सरेटि कोलायटिस भारतामध्ये गेल्या पाच दक्षकांत जास्त प्रमाणात आढळून येत आहे. औरंगाबादेत साधारणत: दोनशे लोकांमागे एक या आजाराचा रुग्ण असावा. आहार पद्धतीमधील वेगाने होणारे बदल, ताण तणावाचे वाढते प्रमाण, निदान पद्धतीत विशेषतः एन्डोस्कोपीच्या तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणा या सर्वांचा परिणाम म्हणून आजाराचे प्रमाण आणि निदानाची शक्यता वाढली आहे. अनुवंशिक व जनुकीय घटक, जंतूसंसर्ग, आहारातील घटकांप्रती, अॅलर्जी, शारिरीक, मानसिक ताणतणाव, प्रतिकार शक्तीमधील गडबड यापैकी काही किंवा सर्व घटक एकत्र आल्यास हा आजार होतो. हा आजार होण्याचे एक असे कारण नाही,' असे त्यांनी नमूद केले. 'निदानासाठी काही रक्त तपासाण्या, शौचाची तपासणी व शेवटी कोलोनोस्कोपी व बायॉप्सी करावी लागते. बायॉप्सीशिवाय अल्सरेटिव्ह कोलायटिव्हचे निदान होऊ शकत नाही. निदान पक्के झाल्यास रुग्णाला आयुष्यभरासाठी औषधी द्यावी लागतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच निदान करून घेत योग्य आहार व औषधी घेतल्यास आरोग्य सदृढ राहण्यास मदत होईल,' असे आवाहन डॉ. सातारकर यांनी केले.

\Bही आहेत लक्षणे...

\Bडॉ. सातारकर म्हणाले, 'साडेचार वर्षांपासून ते ८०व्या वर्षी या आजाराचे निदान झाल्याचे रुग्ण बघितले आहेत. मात्र, प्रामुख्याने हा आजार जास्त प्रमाणात २० ते ३० वयोगटातील नागरिकांत जास्त आढळतो. रुग्णास पोटदुखी, वारंवार शौचास जावे लागले, शौचात रक्त पडणे असे त्रास होतात. अनेक वेळा रक्तासोबत आव पडते. रक्त शौचात मिसळून पडते. आतड्याच्या त्रासाव्यतिरिक्त सांधेदुखी, कातडीवर चट्टे येणे, डोळे लाल होणे, असे इतर त्रासही उद्भवू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आचारी निघाला दुचाकी चोर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला शनिवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राहुल शेजुळ (वय ३२, रा. कांचनवाडी) असे आरोपीचे नाव असून, तो आचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूतगिरणी चौकात एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा लावला. दर्गाचौकातून मोटारसायकल स्वाराला पोलिसांनी थांबविले. त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने राहुल शेजुळ असे सांगितले. त्याच्याकडे मोटारसायकलची कागदपत्रे विचारली असता, कागदपत्रे नसल्याचे सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन शेजुळला विचारले असता, त्यांनी पाच ते सहा दिवसांपूर्वी ही मोटारसायकल कांचनवाडी येथून चोरल्याचे सांगितले. या माहितीवरून सातारा पोलिस ठाण्यातील अभिलेखांची तपासणी केली असता, ही मोटारसायकल (एमएच २० सीके ३७०६) १२ मे २०१९ रोजी चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे नंदकुमार भंडारे, संतोष सोनवणे, बापूराव बावस्कर, लालखॉँ पठाण, नंदलाल चव्हाण, योगेश गुप्ता, रितेश जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा प्लॉटची परस्पर विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुसऱ्याच्या मालकीचे दहा प्लॉट परस्पर बनावट सहीद्वारे स्वत:चे नावे करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमीद खान रफत खान, असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रशिदउल्ला मोहम्मद अजिजउल्ला सिद्धीकी (रा. रोहिला गल्ली, देवडी बाजार) यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत मोहम्मद रशिदउल्लाह यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे मिटमिटा सर्वे क्रमांक ९४मधील ६९ गुंठे जमिनीवर प्लॉटिंग केली. या जमिनीतील प्लॉट क्रमांक १२६ (क्षेत्र ३० बाय ४० एकूण १२०० स्क्वेअर फूट) हा १२ जून २०१८ रोजी एक लाख रुपयात हमीद खान रफत खान (रा. राहत कॉलनी) यांना शंभर रुपयांच्या बॉँडपेपरवर करारनामा करून विक्री केला. त्यानंतर या व्यक्तीने राहिलेली रक्कम न देता तक्रारदाराच्या मालकीच्या याच गटातील प्रत्येकी बाराशे स्क्वेअर फुटाचे १० प्लॉट मोहम्मद रशिदउल्ला यांच्या बनावट सहीचे करारनामे करून स्वत:च्या नावावर केले. हे प्लॉट दुसऱ्या व्यक्तींना विकून तक्रारदाराची १५ लाखांची फसवणूक केली. याबाबतच्या तक्रार अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली फिरोज पठाण यांनी केली.

या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या हमीद खान रफत खान याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मरण अहिंसा, शांती, मानवतावादाचे !

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धम्मयात्रा, धम्मदेसना आणि ध्वजारोहण करून शहरात गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी झाली. बुद्ध विहारात दिवसभर उपासकांनी प्रवचन ऐकण्यासाठी आणि वंदना करण्यासाठी गर्दी केली.

जगाला समता, अहिंसा, शांतता, प्रेम व मानवतावादाची शिकवणाऱ्या भगवान गौतम बुद्धाची जयंती उत्साहात साजरी झाली. शहरातील विविध बुद्ध विहारात शनिवारी सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले. औरंगाबाद लेणी परिसरात पहाटे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले. विहारात वंदना, पंचशील ध्वजारोहण आणि धम्मदेसना झाले. लेणी परिसरात दर्शनासाठी दिवसभर उपासकांची वर्दळ राहिली. सेवाभावी संस्थांनी खिरदान, अन्नदान, जलदान उपक्रम राबवले. भारतीय बौद्ध महासभेने शहरातील बुद्ध विहारात कार्यक्रम घेतले. फुलेनगर येथील मैत्री बुद्धविहारात सकाळी माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी वंदना घेण्यात आली. कबीरनगरात बुद्धवंदना पार पडली. शिवाजीनगर येथील धम्मक्रांती बुद्ध विहारात खिरदान उपक्रम झाला. बुद्धवंदना आणि ध्वजारोहणाला उपासकांची लक्षणीय उपस्थिती होती. शाक्य बुद्धविहारातही खिरदान करण्यात आले. प्रियदर्शनी इंदिरानगर येथे उपासकांनी पदयात्रा काढली. भडकल गेट ते बुद्ध लेणी अशी धम्मयात्रा काढण्यात आली. टी. व्ही. सेंटर परिसरात धम्मरत्न मित्रमंडळाच्या वतीने 'बुद्ध पहाट' हा सांगीतिक कार्यक्रम घेण्यात आला. गायक संदीप चाबूकस्वार, अमोल पवार, संगीता भावसार, जितेंद्र साळवी, संतोष खंडागळे, प्रा. समाधान इंगळे यांनी कार्यक्रम सादर केला. यावेळी राजू खरे, दौलत खरात, कॉ. अभय टाकसाळ यांच्यासह अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते.

\Bपक्ष्यांसाठी अन्नदान

\Bगौतम बुद्ध जयंतीनिमित्त फुलेनगर येथील मैत्री बुद्धविहाराचे भन्ते मेत्तानंद व भन्ते अत्तदीप यांनी शासकीय तंत्रनिकेतन येथील पक्षी विहारास भेट दिली. तसेच पक्षी अन्नछत्रावर धान्य टाकून अन्नदान केले. या परिसराची पाहणी करून पक्ष्यांसाठी सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी पक्षीमित्र रमेश राऊत, सुभाष काकडे, निवृत्ती गायकवाड, मारुती केवटे, सुदाम कोरडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

\Bसिद्धार्थ उद्यानात गर्दी

\Bसिद्धार्थ उद्यानात गौतम बुद्धाच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी धम्म उपासकांची दिवसभर गर्दी होती. सकाळी सहा वाजता धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापरित्राणपाठ, धम्मदीक्षा, धम्मदेसना कार्यक्रम झाले. शहरातील मान्यवरांनी बुद्धांना अभिवादन केले. सायंकाळी बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाणे अंमलदाराला धक्काबुक्की

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदाराला धक्काबुक्की करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी. साबळे यांनी शनिवारी दिले.

चंद्रकांत आनंद राऊत (२४, रा. प्रगती कॉलनी, बेगमपुरा) व विनित विनोद खरे (३४, रा. बेगमपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरणात हवालदार दिनेश गजेसिंह गुसाई (वय ५३) यांनी तक्रार दिली. शुक्रवारी रात्री गुसाई हे बेगमपुरा पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून काम पाहत असताना तेथे अमोल पवार व त्याची पत्नी तक्रार देण्यासाठी आले. गुसाई हे तक्रार घेत असताना आरोपी विनीत खरे, त्यांची पत्नी ज्योती व चंद्रकांत राऊत असे तिघे जण आले. त्यांनी आमची तक्रार पहिले घ्या, त्यांची घेऊ नका असे म्हणत ठाण्यात गोंधळ घालत तुम्हाला दाखवतो असे म्हणत ठाण्याच्या कक्षात असलेल्या काचेच्या टेबलावर जोर-जोरात हात आदळण्यास सुरुवात केली. तिघांनी ठाणे अंमलदारास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच राऊत याने मोबाइलमध्ये ठाणे व परिसरातील चित्रण केले. यावेळी आरोपी महिलेने ठाणे अंमलदारास तुम्ही माझी छेड काढली असल्याची खोटी तक्रार देवून तुमची वर्दी उतरविन अशी धमकी दिली. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

\Bमहिलेचा शोध सुरू

\Bअटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी आरोपी विनित खरे याच्या पत्नीचा शोध घेऊन तिला अटक करावयाचे आहे. आरोपी राऊत याने मोबाइलमध्ये पोलिस ठाण्याच्या आवारातील व कक्षातील चित्रण केले असून, तो मोबाइल जप्त करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने दोघा आरोपींना कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images