Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नेताजींची जयंती उत्साहात

$
0
0
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त पक्ष, संघटनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आयुक्तालयात आदरांजली

$
0
0
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त गुरुवारी (२३ जानेवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त विजयकुमार फड यांनी नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

‘शेंद्रा यात्रेसाठी मोकळी जागा द्या’

$
0
0
शेंद्रा परिसरातील इनामी आणि हस्तांतरित न होणाऱ्या शेतजमिनीसंदर्भात खरेदी - विक्री झालेले सर्व व्यवहार रद्द करून यात्रेसाठी मोकळी जागा देण्यात यावी, या मागण्यासाठी दलित महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले.

घरफोडी प्रकरणी कारचालकास अटक

$
0
0
वेदांतनगर येथील दहा लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी ओस्तवाल यांच्या पूर्वीच्या कारचालकाला संशयावरून अटक केली आहे. वेदांतनगर परिसरातील प्राईड पार्क येथे पारस शांतीलाल ओस्तवाल यांच्या बंगल्यात शनिवारी ही घरफोडीची घटना घडली होती.

बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न

$
0
0
बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट बळकावण्याचा प्रयत्न गारखेडा भागात नुकताच घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खड्ड्यात पडल्याने तरुण जखमी

$
0
0
मछलीखडक भागात तीस फुट खोल खड्ड्यात कोसळल्याने तरुण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. विनोद शेकूजी डोईफोडे (वय २२) असे या तरुणाचे नाव असून पतंग पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने तो खड्ड्यात कोसळला. या घटनेची मेडिकल पोलिस चौकीमध्ये नोंद करण्यात आली आहे.

उसाच्या ट्रॅक्टरखाली दबल्याने तरुणाचा मृत्यू

$
0
0
शहरातील पैठण रोड व वाळूज परिसरात गुरुवारी अपघाताच्या दोन घटना घडल्या. यामध्ये बजाजगेट समोर वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबल्याने सायकलस्वार जागीच ठार झाला, तर दुसऱ्या घटनेत वाल्मी परिसरात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

जैन समाजाच्या विकासाला वेग येणार

$
0
0
जैन समाजाला भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी १३ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्र शासनाने जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिल्यामुळे, या सामु‌ह‌िक प्रयत्नांना यश आले.

कैलासनगर भागात चोरट्यांमुळे दहशत

$
0
0
कैलासनगर भागात मध्यरात्री चोरटे येण्याचे प्रकार तीन दिवसांपासून सुरू आहेत. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना कळवूनही पोलिस उशिरा पोहोचल्याने चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला आहे. नागरिकांत यामुळे संताप निर्माण होत आहे.

आधुनिक उपचापद्धतींबाबत ‘इरकॉन’मध्ये चर्चा

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या सातव्या इरकॉन परिषदेत गुरुवारी सर्पदंशवरील उपचार, पक्षाघाताचे व्यवस्थापन, नेत्रउपचारातील आधुनिक पद्धती यासह इतर विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

मोफत अंत्यविधीसाठी पुढाकार

$
0
0
मोफत अंत्यसंस्कार योजना राबवण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेतला. वर्षभरात या योजनेवर ९० लाख रुपये खर्च केले. नागरिकांनीही या योजनेला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. पण, मदतीसाठी नागरिकांनी हात आखडता घेतला असून वर्षभरात ६४ हजार रुपयांचीच देणगी मिळाली, अशी माहिती या योजनेचे प्रणेते पालिकेचे उपमहापौर संजय जोशी यांनी गुरुवारी दिली.

‘महाराष्ट्र टाइम्स’ बँकिंग एक्स्पो आज

$
0
0
शहरात सेवा देणाऱ्या बँकांकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध कर्ज आणि ठेव योजनांची माहिती मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे तीन दिवसांचे शिरीन-निस्सान बँकिंग एक्स्पो २०१४चे आयोजन प्रोझोन मॉल येथे होणार आहे.

कॉलेजांमधील भरती प्रक्रियेचा घोळ संपला

$
0
0
संवर्गनिहाय, की विषयनिहाय आरक्षण द्यायचे, या गोंधळात अडकलेल्या कॉलेजमधील भरती प्रक्रियेचा घोळ अखेर संपला आहे. शासनाने अध्यादेश काढून संवर्गनिहाय पद मान्यतेचा निर्णय घेतला. भरतीची ही गुंतागुंत सुटल्याने बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ऑनलाइन ग्रामसभेसाठी ग्रामपंचायतींची लगबग

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत जनजागृतीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत २६ जानेवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

स‍द‍्गुरू हंसतीर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त सोहळा

$
0
0
स‍द‍्गुरू हंसतीर्थ स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळयानिमित औरंगाबाद ते सोनई पायी दिंडी गुरुवारी (२३ जानेवारी) सकाळी बीड बायपास येथील रेणुका मंदिरातून रवाना झाली. जगदंब जगंदबच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीस उत्साहात प्रारंभ झाला. २६ जानेवारी रोजी ही दिंडी सोनई येथे पोचेल.

‘सिंचना’च्या निधीसाठी प्रजासत्ताकदिनी झेडपी अध्यक्षांचे उपोषण

$
0
0
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आशा भुतेकर प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.

दुर्गंधनाशकाची कचऱ्यावर फवारणी

$
0
0
नारेगाव येथील कचरा डेपोवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर पालिका आता दुर्गंधीनाशकाची फवारणी करणार आहे. या कामासाठी पालिकेने ३५ लाख रुपयांची तरतूद केली असून ऋतू बायोसिस्टीम या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

लालफितीत अडकला सहावा वेतन आयोग

$
0
0
जीवन प्राधिकरणातील कर्मचारी, अधिकारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही सहावा वेतन आयोग मिळाला नाही. गेल्या सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असलेले हे प्रकरण लालफितीत अडकले आहे, यामुळे कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हवामानाचा परिणाम समजणार

$
0
0
हवामानातील बदलांमुळे शेतीच्या उत्पन्नावर होणाऱ्या परिणामांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्यात ‘क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क’ची स्थापना करण्यात आली आहे.

पित्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल

$
0
0
मुलांच्या नावावर प्रॉपर्टी करून दिल्यानंतर त्यांनी जन्मदात्या पित्याला वाऱ्यावर सोडले. अक्षरश: भीक मागून या जेष्ठ नागरिकाला पोट भरावे लागत होते. या प्रकरणी जेष्ठ नागरिकाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार मांडली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images