Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

थकीत पेमेंटसाठी उपोषण –

$
0
0

बिलांसाठी उपोषण

थकलेली बिले मिळावित या मागणीसाठी कंत्राटदारांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धोकादायक इमारती गुलदस्त्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यासाठी महापौरांनी दिलेली दोन दिवसांची डेडलाइन टळून गेली आहे. ही यादी अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असताना महापौरांनी मात्र सोमवारी धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

मान्सूनपूर्व कामाच्या आढ्याव्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी बैठक घेतली. यावेळी अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांसह अन्यही विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अशाच प्रकारची बैठक महापौरांनी गेल्या आठवड्यात घेतली होती. पावसाळ्यात धोकादायक इमारतींमुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे या इमारतींवर कारवाई करण्याच्या दृष्टीने अशा इमारतींची दोन दिवसांत यादी तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांनी यादीबद्दल विचारले त्यावेळी, 'यादी तयार आहे लगेच सादर करतो,' असे अधिकाऱ्यांनी सांगितले, पण प्रत्यक्षात सायंकाळपर्यंत याची महापौर कार्यालयाला प्राप्तच झाली नाही. अतिक्रमण हटाव विभाग धोकादायक इमारतींची जुळवाजुळवी करीत होता.

बैठकीत महापौरांनी धोकादायक इमारतींवरील कारवाईचा आढावा घेतला. या इमारतींच्या मालकांना दोन दिवसांत नोटीस द्या आणि योग्य ती कारवाई करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. इमारतींची यादीच तयार नसेल तर नोटीस कशी देणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

\Bनाले सफाईकडेही दुर्लक्ष\B

नाला सफाईच्या कामाचा आढावा देखील महापौरांनी घेतला. महापालिकेच्या मालकीच्या नाल्यांवर अनेकांनी इमारती बाधल्या आहेत. इमारतीखालचा नाल्याचा भाग स्वच्छ करण्याची जबाबदारी संबंधित इमारत मालकाची जबाबदारी आहे. इमारत मालकांनी नाला साफ करावा, अशी नोटीस यापूर्वी महापालिकेने बजावली आहे, पण त्याला इमारत मालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. शिवाई सेवा ट्रस्ट आणि औषधी भवन या दोन इमारतींच्या मालकांनी नाला सफाईचे काम सुरू केले आहे. अन्य इमारत मालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे या इमारत मालकांना पुन्हा नोटीस द्या, वेळप्रसंगी कठोर कारवाई करा असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उतारा शोधण्यासाठी उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात महापालिकेने ११ विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. निवडणूक निकालाच्या धामधुमीत जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळ मिळाला तर, लगेचच हा प्रस्ताव मान्य झाला तर या विहिरींचा अधिग्रहणाचे काम तातडीने होऊ शकेल, असे मानले जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रामुख्याने सिडको - हडकोभागात पाणी टंचाईच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणी प्रश्न निर्माण झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी, नगरसेवकांनी वेळोवेळी आंदोलन देखील केले आहे. निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण करण्याचे ठरविले. अधिग्रहण करणे शक्य असलेल्या विहिरींची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्त व महापौरांनी १५ ते २० दिवसांपूर्वी दिले होते. या आदेशानुसार पाणीपुरवठा विभागाने ३४ विहिरींची यादी तयार केली. त्यापैकी दहा विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सोमवारी महापौरांना दिली. दहा विहिरींच्या अधिग्रहणाला जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिल्यावर किमान वापरण्याचे पाणी नागरिकांना पुरवणे महापालिकेला शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा नावावर नसतानाही वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सादिया मार्केट येथील पार्किंगची जागा, रविवारच्या आठवडीबाजारची जागा महापालिकेच्या नावावरच झालेली नाही. जागा नावावर नसताना महापालिकतर्फे मात्र या जागांवर वसुली सुरू आहे. या जागा पालिकेच्या नावावर करून घ्या, असे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

सादिया मार्केटच्या पार्किंगची जागा आणि जाफरगेट येथील रविवारच्या आठवडी बाजाराची जागा महापालिकेच्या नावावर नाहीत हे यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट झाले आहे, पण या जागा पालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काहीच हालचाली केल्या नाहीत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीत पुन्हा हीच बाब अधिकाऱ्यांनी मांडली. सादिया मार्केटची पार्किंगची जागा पालिकेच्या नावावर नसताना देखील पालिकेने या ठिकाणच्या पार्किंगच्या जागेचे कंत्राट दिला आहे आणि कंत्राटदाराकडून वसुली देखील केली जात आहे. जाफरगेट येथील आठवडीबाजाराची देखील महापालिकेतर्फे वसुली केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याचे महापौर म्हणाले. या जागा महापालिकेच्या ताब्यात घ्या, जागांवर पालिकेचे नाव लावून घ्या असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

\B'व्यापारी गाळे भाड्याने द्या'\B

महापालिकेच्या व्यापारी संकुलांमधील ८८ गाळे रिकामे आहेत. आरक्षणाचे निकष लावून, प्रशासकीय मान्यता घेऊन रिक्त गाळ्यांची यादी प्रसिद्ध करा. गाळे भाडेतत्वाने गरजूंना द्या, अशी सूचना त्यांनी केली. महापालिकेने बांधलेले ११०० सार्वजनिक सभागृह भाडेतत्वावर देणे बाकी आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहेच, पण त्याचबरोबर सभागृहांचे देखील नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सभागृह भाड्याने देण्याचा निर्णय तातडीने घ्या, असे आदेशही त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन महिन्यानंतरही निकाल रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विधी शाखेच्या प्रथम वर्षांचे निकाल रखडले असून निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी 'एनएसयूआय'ने केली आहे. परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांनी निकालावर चर्चा केली. निकाल लवकर जाहीर न झाल्यास संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विधी शाखेच्या प्रथम वर्षाची परीक्षा घेतली. ही परीक्षा होऊन तीन महिने झाले आहेत. मात्र, अजूनही निकाल जाहीर केला नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. नियमानुसार ४५ दिवसात निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. परीक्षा विभागाच्या विस्कळीत कामकाजाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. निकाल रखडल्यामुळे सत्र परीक्षेचे परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचण आली आहे. या पार्श्वभूमीवर, 'एनएसयूआय'ने निकाल लवकर जाहीर करण्याची मागणी केली. याबाबत परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, योगेश बहादुरे,आनंद मगरे,सूर्यकांत नाईक,देव राजळे, उमेश जगदाळे,मोहन नायडू, विश्वदीप भांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ईव्हीएम’नंतरच ‘व्हीव्हीपॅट’ चिठ्ठ्यांची मोजणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वसामान्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. प्रशासनानेही निवडणूक निकालासाठी संपूर्ण नियोजन केले असले तरी, यंदा प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील 'व्हीव्हीपॅट'च्या चिठ्ठ्या मोजण्यात येणार असल्याने अंतिम निवडणूक निकालाला चार ते पाच तास विलंब होण्याची शक्यता आहे. ईव्हीएमची मतमोजणीसाठी किमान आठ ते दहा तास व त्यानंतर चार ते पाच तास लागणार असल्याने प्रशासनाकडून अधिकृत मतमोजणीचा निकाल देण्यास रात्री सात ते आठ वाजण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

यंदा सर्वच मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला असून, नियमाप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रांवरील 'व्हीव्हीपॅट'च्या चिठ्ठ्यांचीही मतमोजणी केली जाणार आहे, मात्र या चिठ्ठ्यांची मोजणी 'ईव्हीएम'सोबत करायची की सर्व 'ईव्हीएम'ची मतमोजणी झाल्यावर यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले होते, मात्र अद्यापही यासंदर्भात कोणतेही उत्तर मिळाले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; संपूर्ण ईव्हीएमची मतमोजणी झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद मतदारसंघामध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, गंगापूर, वैजापूर, कन्नड हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघामध्ये प्रत्येकी पाच यानुसार ३० मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या 'व्हीव्हीपॅट'वरील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे, सर्व ईव्हीएमचे मतमोजणीनंतर चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्यामुळे कोणता उमेदवारी विजयी होणार याचा कल जवळपास स्पष्ट होणार आहे. तरीही केवळ 'व्हीव्हीपॅट' चिठ्ठ्यांच्या मोजणीनंतर प्रशासनाला अधिकृतरित्या विजयी उमदेवारांची घोषणा करता येणार आहे. मतमोजणीसाठी सर्वाधिक फेऱ्या कन्नड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात होणार आहेत. मतमोजणीसाठी असलेल्या ८४ टेबल राहणार असून, प्रत्येक मतमोजणीच्या टेबलावर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक असे तीन कर्मचारी असतील. सर्वप्रथम टपाली मतपत्रिका व 'ईटीपीबीएस' (निवडणूक ड्यूटीवरील कर्मचारी) यांच्या मतमोजणी केली जाईल. त्यानंतर 'ईव्हीएम'च्या मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे.

\Bउद्या रंगीत तालीम\B

निवडणूक मतमोजणीसाठी राखीवसह एकूण २६५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या निवडणूक कर्मचाऱ्यांचे गेल्या आठव‌ड्यामध्ये प्रशिक्षण घेण्यात आले होते. आता प्रत्यक्ष मतमोजणीपूर्वी २२ मे रोजी मतमोजणीचे रंगीत तालीम आयोजित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मेव्हण्याला दत्तक देत नाही म्हणून जावयाने आणि मुलीने त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केला. त्याला सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या सासू सासऱ्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. शनिवारी सायंकाळी सिध्दीसिरज गायरान येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी चार आरोपीविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी यल्लापा चंद्रकांत काळे उर्फ बल्ल्या (वय ६६, रा.शिंदी शिरजगाव, गायरान ता. गंगापूर) यांनी तक्रार दाखल केली. काळे यांनी दोन विवाह केलेले असून त्यांना दुसऱ्या पत्नीला पाच मुले आणि एक मुलगी आहे. काळे यांच्या मुलीचा विवाह आवन भाना काळे याच्यासोबत झाला आहे. त्यांचा जावई आवन आणि त्यांची मुलगी हे दोघे काळे यांचा दुसरा मुलगा केवल काळे याला दत्तक मागत होते. या गोष्टीला यल्लपा काळे आणि त्यांची पत्नी दोघांनी नकार दिला होता. दरम्यान, शनिवारी सायंकाळी आवन काळे, महाशिकऱ्या भोसले आणि बुट्या काळे सर्व रा. श्रीगोंदा तालुका, शेडगाव फाटा, अहमदनगर हे सिध्दी सिरजगाव येथे आले. त्यांनी केवल काळे आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करीत त्यांना धरून वाहनामध्ये नेत होते. यावेळी केवलने आरडाओरडा केल्याने यल्लपा काळे, त्यांची पत्नी आणि वहिनी त्याला सोडविण्यासाठी मध्ये पडले. यावेळी त्यांच्यावर आरोपींनी कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये तिघेही जखमी झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय वडणे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती वादातून विवाहितेची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरगुती वादातून विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. उस्मानपुरा परिसरातील मिलिंदनगर भागात रविवारी रात्री साडेदहा वाजता हा प्रकार घडला. अलका राजू जोंधळे (वय २२) असे या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या मंडळीच्या छळामुळे अलकाने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिलिंदनगर भागात राजू हा पत्नी, आई आणि भावासोबत राहतो. १० मे २०१८ रोजी त्याचा अलकासोबत विवाह झाला होता. रविवारी अलकासोबत सासू, पती आणि दिराची कुरबूर झाली होती. यानंतर तिची सासू लग्नासाठी बाहेर गेली होती. रात्री राजू, अलका आणि दीर हे तिघे घरी होते. रात्री नऊ वाजता अलकाने माहेरी फोन केला होता. यानंतर थोड्या वेळाने राजुने फोन करून अलकाच्या वागणुकीबाबत तक्रार केली होती. त्यामुळे तिचे वडील बालाजी आसले रा. शेख राजूर जि, परभणी यांनी तिला माहेरी आणून सोडण्याबाबत सांगितले. साडेदहा वाजेच्या सुमारास राजुने आसले यांना अलकाने किचनमध्ये साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती दिली. राजुने तिला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर पती राजू घाटीतून निघून गेला. सोमवारी सकाळी सासरे आसले हे नातेवाईकासह घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सासरच्या छळाला कंटाळून अलकाने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला असून अंत्यसंस्कारानंतर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागेश्वरवाडीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागेश्वरवाडी परिसरात सोमवारी सकाळी एका ३५ वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीची ओळख पटली नसून क्रांतीचौक पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची घाटी हॉस्पिटलमध्ये रवानगी केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नागेश्वरवाडी येथील लक्ष्मी माता मंदिरासमोरील बालाजी बुक सेंटर समोर सकाळी ही व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडलेली नागरिकांना दिसली. हा प्रकार कळताच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. क्रांतीचौक पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. क्रांतीचौकाच्या टू मोबाइलच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत या व्यक्तीला घाटी हॉस्पिटलमध्ये हलवले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून रात्री उशिरापर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन परीक्षा एकाच दिवशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'यूपीएससी' आणि 'फूड कार्पोरेशन'च्या दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन्ही पैकी, एका परीक्षेवर शेकडो विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागणार आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हजारो विद्यार्थी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे परीक्षेच्या तयारीसाठी देतात. वाढत्या स्पर्धेमुळे एकही संधी सुटू नये यासाठी विद्यार्थी प्रयत्न करतात. देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी तसेच फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या असिस्टंट ग्रेड पदासाठी अर्ज भरला त्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच दिवशी आली आहे. २ जून रोजी ही परीक्षा देशभरातील विविध केंद्राहून होणार आहे. रविवारी होणाऱ्या या परीक्षेत दोन्ही परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. 'यूपीएससी'ची परीक्षा सकाळी ९.३० वाजेपासून सुरू होणार आहे. दोन टप्प्यात होणारी परीक्षा सायंकाळी ४.३० वाजता संपणार. तर फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाची परीक्षा ही सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्याने एक संधी जाणार यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.

\Bविद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह\B

दोन्ही परीक्षांचे औरंगाबाद परीक्षा केंद्र आहे. दोन्ही पदांसाठी पदवीपूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आधीच स्पर्धा परीक्षांमध्ये जागांची संख्या मर्यादित होत आहे. त्यात एखादी संधी हुकल्यास पुन्हा संबंधित पदासाठी दोन-दोन वर्ष थांबावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांचे वेळापत्रकात बदल होतील का, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परीक्षेत देशपातळीवर स्पर्धा असते. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने शेकडो विद्यार्थ्यांना एका परीक्षेच्या संधीवर पाणी सोडावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ची सोडत अडकली गोंधळात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आरटीई' कायद्यांतर्गत मोफत प्रवेशासाठी सोमवारी होणारी दुसरी सोडत शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे होऊ शकली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण असल्याने निश्चित केलेले वेळापत्रक पाळता आलेले नाही. ही दुसरी सोडत काढण्यासाठी दुपारची तीन वाजताची वेळ निश्चित केली होती. मात्र सायंकाळपर्यंत गोंधळ चालल्याने अखेर सोडत काढलीच नाही.

आर्थिक दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के जागांवर देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशाची प्रक्रियेत ८ एप्रिल रोजी पहिली सोडत झाली. १० एप्रिलपासून प्रवेश घेण्यासाठीची सुरू झालेली प्रक्रिया २० मेपर्यंत सुरूच होती. महिनाभर प्रक्रिया चालल्यानंतरही पूर्णपणे प्रवेश देण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला. त्यात सोमवारी दुसरी सोडत होणार होती. यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला असून सोडत राज्यपातळीवरून एकाच ठिकाणाहून केली जात आहे. सोमवारी दुसरी सोडत होणार असल्याने पालकांचे त्याकडे लक्ष लागले होते. दुपारी तीनच्या सुमारास ही प्रक्रिया होणार होती. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून किती जागांवर प्रवेश निश्चित झाले, प्रवेशाची काय स्थिती आहे, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे सायंकाळपर्यंत प्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत विविध जिल्हापातळीवरील अहवालच कागदावर न आल्याने सोडत होवू शकली नाही. सायंकाळी सोडत आज होणार नसल्याचे सांगण्यात आले.

\Bसोडत आज?\B

मोफत प्रवेशाची सोडत मंगळवारी होईल, असे सूत्रांनी सांगितले. सोडतीची प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हावार पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर होईल. त्यानंतर कागदपत्र तपासणी, प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया होईल. पहिली सोडत होऊनही प्रक्रियेला महिनाभर लागला. त्यात दुसऱ्या सोडतीनंतर प्रक्रिया किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सध्याच्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा सध्या भीषण दुष्काळाच्या गर्तेत सापडला असून पिण्याच्या पाण्यासाठी सर्वच जिल्ह्यातील नागरिकांना भटकावे लागत आहे. प्रशासनाकडून २०११ची लोकसंख्या विचारात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, याऐवजी सध्या अस्तित्वात असलेली लोकसंख्या व दरडोई दरदिवशी करण्यात येणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, असे पत्र शासनाने पाठवले आहे.

या पत्रानुसार पाणीपुरवठा करताना संबंधित गावे, वाड्या, नागरी क्षेत्रातील कामयस्वरुपी अस्तित्वात असलेल्या सध्याच्या लोकसंख्येनुसार दरडोई दरदिवशी टंचाई अंतर्गत निकषानुसार म्हणजेच ग्रामीण भागात २० लिटर दरडोई दरदिवशी, तसेच पशुधनासाठी असलेल्या निकषानुसार म्हणजे मोठी जनावरे ३५ लिटर, वासरे (लहान जनावरे) १० लिटर व शेळ्या, मेंढ्यांकरिता ३ लिटर प्रति जनावर एवढा दैनंदिन पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

राज्यात सुरू असलेल्या साडेपाच हजार टँकरपैकी निम्मे टँकर एकट्या मराठवाडा विभागात सुरू आहेत. सध्या २०८८ गावे व ७३६ वाड्यांमधील जवळपास ५० लाख नागरिकांची तहान भागवण्यात येत आहेत. अद्याप किमान तीन आठवडे पावसाची वाट पाहावी लागणार असल्याने टँकर संख्या साडेतीन हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या सुरू करण्यात आलेले सर्व टँकर हे २०११ची लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा करत आहेत.

टँकरवर अवलंबून लोकसंख्या

जिल्हा.................... लोकसंख्या

औरंगाबाद............... १८ लाख ६२ हजार

जालना.....................१० लाख ३५ हजार

परभणी......................९४ हजार ७७०

हिंगोली......................५५ हजार ६१६

नांदेड.........................१ लाख ९३ हजार

बीड..........................१२ लाख ५३ हजार

लातूर........................१ लाख ४४ हजार

उस्मानाबाद.................३ लाख ४३ हजार

----------------------------------

एकूण.....................४९ लाख ८३ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फार्मसी’च्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा २२ मेपासून सुरू होत आहेत. परीक्षा दोन दिवसावर आल्यानंतर सोमवारी रिड्रेसलचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला. त्यातही उत्तरपत्रिका तपासणीवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. वेगवेगळ्या कॉलेजांमधून शिक्षकांनी तपासणीत चांगले गुण पडतील, असे सांगितल्यानंतरही गुणांमध्ये बदल न झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा डिसेंबर-जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या होत्या. ३१ मार्च रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ७ एप्रिलपासून रिड्रेसलसाठी प्रक्रिया सुरू झाली. त्याच दरम्यान परीक्षेचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले. त्यानुसार २२ मेपासून सत्र परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक आले तरी, रिड्रेसलचा निकाल जाहीर झाला नव्हता. अखेर सोमवारी विद्यार्थ्यांना निकाल मिळाला. मात्र, अनेकांची निराशा झाली. रिड्रेसलनंतरही विद्यार्थ्यांच्या निकालात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिड्रेसलनंतरही निकालात ठराविक विद्यार्थ्यांच्या निकालातच बदल कसे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तीन वेळा तपासूनही बदल नाही!

उत्तरपत्रिका तपासणीत अनेकदा गोंधळ समोर आले. त्यात रिड्रेसलमध्येही निकालात बदल होत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. रिड्रेसलमध्ये विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत दिली जाते. त्यानंतर संबंधित विषयाच्या शिक्षकांकडून तपासून पुन्हा ती विद्यापीठाकडे जमा केली जाते. त्यात संबंधित विषयाचा शिक्षक उत्तरे योग्य आहेत की, नाही याबाबत आपला अहवाल सादर करतो. त्यानंतर विद्यापीठाला ही उत्तरपत्रिका सादर केल्या जाते. त्यावर विद्यापीठात पुन्हा तपासणी करून निकाल जाहीर करते. त्यावरही विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. एका विद्यार्थ्यांने सांगितले की, विविध कॉलेजमधील शिक्षकांकडून तपासून घेतली. त्यानंतरही निकालात कोणताच बदल झालेला नाही. उत्तरे योग्य सोडविल्यानंतर ही असे प्रकार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे ठरत असल्याचे सांगितले.

\Bपास की नापास\B

विद्यापीठाने ऑनलाइन निकालात एक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर असतानाही चक्क पास, असे दर्शविले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा गोंधळ विद्यार्थ्यांनाही आश्चर्यचकित करणारा ठरत आहे. संबंधित विद्यार्थी एका विषयाच्या पेपरला गैरहजर होता. मात्र, ऑनलाइन पास कसा, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. गुणपत्रिकेत मात्र पास असे नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळी मदतीसाठी काँग्रेसचा रास्ता रोको

$
0
0

दुष्काळी मदतीसाठी

काँग्रेसचा 'रास्ता रोको'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना दुष्काळी मदत मिळावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने करमाड येथे 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सेवादल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली करमाड येथे आंदोलन करण्यात आले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ मिळालेच पाहिजे, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू झालीच पाहिजे, मागील ४ वर्षांपासून सतत दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते, मोफत उपलब्ध करून दिलीच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, गुरांच्या चार छावण्या तात्काळ सुरु कराव्यात, खरीप हंगामाकरिता त्वरित पीककर्ज मंजूर झालेच पाहिजे, दुधाला ४० रुपये लिटर भाव मिळालाच पाहिजे, ठिबक सिंचन व शेततळ्याला १०० टक्के अनुदान मिळालेच पाहिजे,

श्रावणबाळ, संजयगांधी योजनेच्या प्रलंबित फाईल्स मंजूर करून त्यांना १०० रुपये महिना मिळालाच पाहिजे आदी मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी रामराव शेळके, भाऊसाहेब जगताप, विठ्ठलराव कोरडे,बाळासाहेब भोसले, कविता शिंदे, ज्ञानेश्वर दांडगे, कल्याणराव उकिर्डे, भगवान गोजे, शिवाजी चौधरी, विजय शेळके,हरी वाघ,सुरेश चौधरी, भगवान मुळे, सारंगधर पठाडे ,संजय पठाडे, गजानन मते, रामभाऊ भोसले, संजय कापसे, संतोष शेजूळ, बबन कुंडारे, श्रीमंत भोसले, रामदास मते, कैलास उकिर्डे, जहीरशेठ करमाडकर, प्रकाश जाधव, अंकुशराव चौधरी, प्रतापसिंह बहुरे, दिलीपराव मते, राहुल मते आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम काढण्यास ‘जैसे थे’चा आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकाम काढून घेण्यासंदर्भात महसूल प्रशासनाने दिलेल्या नोटीसप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे उन्हाळी सुटीतील न्या. एस. एम. गव्हाणे यांनी 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.

महसूल प्रशासनाने रांजणगाव शेणपुंजी येथील नागरिकांना ३० एप्रिल रोजी नोटीस दिली. नागरिकांनी १५ दिवसांत त्यांचे बांधकाम काढून घ्यावे, असे आदेश दिले होते. या नोटीसला दीपक उत्तमचंद राका यांच्यासह ५३ रहिवाशांनी आव्हान दिले. याचिकाकर्त्यांच्या मालमत्ता या शासकीय गायरान जागेवर नाहीत. महार हडोळा जागेवर त्यांची मिळकत आहे. या मालमत्ता नियमित करण्यासाठी गंगापूर तहसीलदारांकडे रितसर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २०१० मध्ये तहसीलदारांनी वैजापूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविला. ऑगस्ट २०१२ मध्ये हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला. विशेष म्हणजे या प्रस्तावात सदर जमीन शासकीय असल्याचा दावा करण्यात आला नसल्याचे म्हणणे याचिकाकर्त्यांनी मांडले आहे. हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची नोटीस रद्द करा आणि मालमत्ता नियमित करण्याचा प्रस्ताव निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीअंती खंडपीठाने प्रकरणात 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांची अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बाजू मांडली. त्यांना एम. एस. कराड यांनी सहकार्य केले. या याचिकेवर ४ जून रोजी सुनावणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महावितरणकडे पालिकेची बाकी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेने महावितरणच्या विविध सुविधांवर लावलेल्या करातून थकीत बिलाचे पैसे चुकते होतील. शिवाय महावितरणलाच पालिकेकडे अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, असा दावा मंगळवारी झालेल्या जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एन. सोरमारे उपस्थित होते. बैठकीत खासदार खैरे यांनी पालिकेकडे थकलेल्या वीज बिलाचा मुद्दा मांडला. यावेळी महापौर म्हणाले, 'महापालिकेने महावितरणाच्या विविध सुविधांवर कर लावला आहे. अनेक सुविधांवर कर लावायचा आहे.त्यामुळे थकबाकी, खड्डयांपोटी परत करायचे पैसे पालिकेला परत करण्याची गरज पडणार नाही. उलट पालिकेकडेच महावितरणला पैसे भरावे लागतील. या कराबाबत कायदेशीर कारवाईही केली जाईल,' असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी वीज सेवा खासगीकरणाचा मुद्दा निघाला. याबाबत खैरे म्हणाले, 'ऊर्जामंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहणार आहे. यापूर्वीचा वीज सेवा खासगीकरणाचा प्रयत्न फसला आहे. यामुळे ६०० कोटी रुपयांचा फटका कंपनीला बसला आहे. पुन्हा असे नुकसान करून घेऊ नका,' असा सल्ला देणार असल्याचे सांगितले. वीजेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आगामी जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटींची मागणी करा, अशी सूचना खैरे यांनी केली. तर मुख्य अभियंता गणेशकर यांनी जालना जिल्हा नियोजन समितीत दहा कोटींची मागणी केल्याचे सांगितले. त्यानुसार दहा कोटींची मागणी करू, असे खैरे म्हणाले.

\Bवीज रिडिंग न घेता बिल

\Bवीजेमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी सूचना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. वीज रिडिंग न घेता वीज बिल दिल्यामुळे अनेक भुर्दंड सोसावा लागत असल्याची माहितीही समोर आली. अशा एजन्सी चालकांवर कारवाई केल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. सौर कृषिपंप महापालिकेच्या उद्यान विभागाला मिळेल का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. यावर गणेशकर यांनी ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे, असे सांगितले.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणी, उस्मानाबाद, बीडमध्ये आज उष्णतेची लाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाळ्याच्या अखेरीला उन्हाचा कहर कायम असून मंगळवारी औरंगाबाद शहरात ४२.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर भागांतही सूर्य कोपल्याने तापमानाने चाळीशी पार केली. दरम्यान, बुधवारी (२२ मे) बीड, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात औरंगाबाद शहरामध्ये उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीपासूनच शहराच्या तापमानाने चाळीशी ओलांडली होती. मे महिन्यामध्येही मराठवाड्याच्या बहुतांश शहरामध्ये पारा चाळीशीच्या आसपास होता. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होत आहे. दुपार होताच उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असून, संध्याकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यात दानवेंचे लक्ष मताधिक्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

'देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच गेल्या पाच वर्षांत जालना जिल्ह्याच्या विकासाची अतिशय झपाटय़ाने कामे झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतदान झाले, तर यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारच्या झालेल्या कामाची पावती आपल्याला मिळत आहे. दोन लाख चाळीस हजार मताधिक्याने आपण विजयी होणार आहे,' असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' सोबत बोलताना केला.

या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या मतदारसंघात निवडणूकीच्या पूर्वी आपले जेवढे काही कट्टर राजकीय विरोधक होते ते सगळे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात आपले स्टार प्रचारक झाले होते. काँग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी गावोगावी दवंडी द्यावी लागली शेवटच्याक्षणी बळजबरीचा उमेदवार आपल्या विरोधात उभा केला. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला विजयाची आपल्याला शंभर टक्के खात्री आहे, असे त्यांनी सांगितले. 'भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचंड प्रमाणात नाराजी हेच आपल्या विजयाचे खरे इंगित आहे. मी ५० हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार,' असा दावा काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी केला. दानवे यांच्या नावाची जालन्यात प्रचंड दहशत असल्याचे आपल्याला जाणवले. शेतकऱ्यांना ते गृहीत धरतात, विकासाचे एकही काम दानवेंनी व्यक्तीगत मेहनत करून आणलेले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांच्या सगळ्या नातेवाईकांना कंत्राटाची कामे वाटून दिली, हा प्रचाराचाच सर्वात मोठा मुद्दा जनतेतूनच मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जालना स्टीलस् आणि सीडस् उद्योगाचे माहेर आहे. पण दोन्ही उद्योग अतिशय अडचणीत आहेत. एमआयडीसी ओस पडली आहे हे सगळे काँग्रेसच्या सत्ताकाळात सुरळीत होते. त्यामुळे आपल्याला विजयाची खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.

सिल्लोडमधून ३० हजार 'नोटा'

संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीच्या मतमोजणीतून जालन्यात एक वेगळेच वैशिष्ट्य आपल्याला दिसणार आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून तीस हजार मते 'नोटा' ला पडणार आहेत, असा दावा गौप्यस्फोट दानवे यांनी केला. लोकसभा क्षेत्रातील सगळ्याच विधानसभेच्या मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य मिळेल असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खदानीत स्फोट, दोन मुले ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

अंबड तालुक्यातील वलखेडा शिवारात गट नंबर २२ मधील काकासाहेब आत्माराम कटारे यांच्या दगडाच्या खदानीत जुन्या ब्लास्टिंगचा स्फोट होऊन मजुराची दोन मुले जागीच ठार झाली. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. शुभम रवींद्र धोत्रे (वय ८) व शिवराज रवींद्र धोत्रे (वय ६), अशी मृत मुलांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, काकासाहेब आत्माराम कटारे (रा. अंबड) यांचा वलखेडा शिवारात स्ट्रोन केशरचा व्यवसाय (खडी मशीन) आहे. तेथे त्यांच्याकडे रवींद्र धोत्रे (रा. संगमजळगाव ता. गेवराई जि. बीड) हे पत्नीसह दोन महिन्यांपासून काम करत आहेत. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास धोत्रे पती-पत्नी हे खदानीत दगड फोडत असताना त्याचे दोन मुले शुभम व शिवराज हे कडक उन्हात खदानीला खेटून असलेल्या सावलीत बसलेले होते. यावेळी अचानक जुन्या ब्लास्टिंगच्या तोट्याचा स्फोट झाला आणि ही दोन बालके दहा फुटाचे अंतरावर उडून पडून जगीच मरण पावले. ही घटना घडली तेव्हा धोत्रे पती-पत्नी हे त्याच खदानीत ट्रॅक्टरच्या दुसऱ्या बाजुला दगड भरत असल्याने ते बचावले. हा स्फोट इतका भयंकर होता की दोन्ही बालकांचे चेहरे ओळखू सुद्धा येत नव्हते.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सी. डी. शेवगण, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बलैय्या, जमादार विष्णु चव्हाण, अनिल घेवंदे, एस. बी. गोतीस, महेंद्र गायके, महेश खैरकर, दुर्गेश गोफणे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

राजकीय दबाव

दोन्ही बालकांचे प्रेत शवविच्छेदनाकिता उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात चंद्रकांत लाड यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. खदानीच्या मालकाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही, यात राजकीय दबाव आल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईचा खून; मुलगा, सुनेस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुलगा मानून आयुष्यभर सांभाळ केला, त्याला स्वत:चे नाव दिले, त्याचे लग्न लावून दिले, संसार थाटून दिला आणि त्यानेच घात केला. मालमत्तेसाठी मानलेल्या मुलाने व सुनेने आईला आधी छळले आणि नंतर डोक्यात काठी घालून लाथा-बुक्क्यांनी तुडवले. गंभीर जखमी अवस्थेत ६५ वर्षीय आईने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आणि उपचाराअंती तिचा मृत्यू झाला. प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होऊन आरोपी मुलगा संजय सोपानराव पाटील व सून मीरा संजय पाटील यांना सोमवारी अटक होऊन मंगळवारी कोर्टात हजर केले असता, त्यांना शनिवारपर्यंत (२५ मे) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी मृत सुनंदाबाई सोपानराव पाटील (६५, रा. कामगार चौक, एमआयडीसी वाळूज) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व तिचे पती सोपानराव पाटील हे सुमारे ३० वर्षांपूर्वी मुंबईत वास्तव्यास होते आणि बांधकामाचे कंत्राट घेत होते. त्यावेळी संजू जाधव हा फिर्यादी व फिर्यादीच्या पतीच्या हाताखाली काम करत होता. पाटील दाम्पत्याला मूलबाळ नव्हते म्हणूनच दाम्पत्याने संजूला मुलगा मानले व त्याचा सांभाळ केला. त्यानंतर पाटील दाम्पत्य औरंगाबादला स्थायिक झाले व येताना त्यांनी संजुलाही सोबत आणले. त्याचा सांभाळ केला, स्वत:चे नाव दिले, लग्नही लावून दिले. दरम्यान, फिर्यादीच्या पतीच्या निधनानंतर आरोपी संजय सोपानराव पाटील व त्याची पत्नी मीरा संजय पाटील हे फिर्यादी राहात असलेले घर स्वत:च्या नावावर करुन देण्यासाठी फिर्यादीला टोचून बोलू लागले. मानसिक छळही केला. दरम्यान, २० एप्रिल २०१९ रोजी सकाळी आठला फिर्यादी पाणी भरत असताना, मीरा हिने मुद्दामहून नळ बंद केला. फिर्यादीने त्याचा जाब विचारला असता, मीराने फिर्यादीच्या डोक्यात काठी मारली. त्यामुळे चक्कर येऊन फिर्यादी खाली कोसळली. फिर्यादीने आरडाओरड सुरू केल्याने दोघांनी फिर्यादीला मारहाण करीत तुडवले. शिविगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. शुद्धीत आल्यावर जखमी अवस्थेत फिर्यादीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. उपचारादरम्यान २५ एप्रिल रोजी फिर्यादीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानुसार डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या ३०२, ३२४, ३२३, ५०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना सोमवारी अटक करण्यात आली.

\Bकाठी जप्त करण्यासह तपास बाकी

\Bदोन्ही आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर केले असता, ज्या काठीने फिर्यादीला मारहाण झाली, ती काठी जप्त करणे बाकी आहे. तसेच फिर्यादीच्या मालकीचे घर स्वत:च्या नावावर करुन देण्यासाठी फिर्यादीला वेळोवेळी मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद असून, त्याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. गुन्ह्यात आणखी कुणाचा समावेश आहे का, याचाही तपास करावयाचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images