Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बुरखाधारी महिलेने लांबवला ३० हजारांचा ऐवज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा बुरखाधारी महिलेने पर्समधील ३० हजारांचा ऐवज लांबविला. मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता सिटीचौक भागातील हॉनेस्टी दुकानात हा प्रकार घडला. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोनाली विनोद मगर (रा. उस्मानपुरा) यांनी तक्रार दाखल केली. मगर या खरेदीसाठी हॉनेस्टी या कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्या खरेदी करीत असताना त्यांच्या खांद्याला त्यांची पर्स अडकवलेली होती. एका अनोळखी महिलेने त्यांच्या पर्समधील रोख आठ हजार रुपये, सोन्याचे २२ हजार पाचशे रुपयाचे दागिने असा ३० हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला. काही वेळाने हा प्रकार मगर यांच्या लक्षात आला. एका बुरखाधारी महिलेने हा प्रकार केल्याचा संशय आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार माने तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धर्माधिकारी प्रतिष्ठाननंतर आता पालिकेचे महास्वच्छता अभियान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने औरंगाबाद शहरात महास्वच्छता अभियान राबवल्यानंतर आता महापालिका तशाच प्रकारचे अभियान राबवण्यासाठी सरसावली आहे. येत्या शनिवारी महापालिका आणि शहरातील नागरिकांच्या समन्वयाने महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी दिली.

महापौर घोडेले आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची विविध विषयांवर बैठक झाली. या बैठकीच्यानंतर महापौरांनी ही माहिती दिली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. प्रतिष्ठानचे सुमारे ३० हजार स्वयंसेवक एकाच वेळी औरंगाबादच्या रस्त्यावर उतरले आणि त्यांनी मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, खुल्या जागा, उड्डाणपुल, नाले अशा विविध भागात स्वच्छता अभियान राबवून शहर चकाचक केले होते. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता अभियानाने स्वच्छतेबद्दल चांगले वातावरण निर्माण केले होते. हाच धागा पकडून महापालिकेतर्फे शहरात पुन्हा एकदा स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी मतमोजणीनंतर निवडणुकीची आचारसंहिता संपणार आहे. त्यामुळे शनिवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात महापालिकेला अडचण येणार नाही ही बाब लक्षात घेऊन महापौरांनी शनिवारी हे अभियान राबवणार असल्याचे सांगितले. आयुक्तांनी देखील स्वच्छता अभियानाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत आवश्यक ते नियोजन करून शनिवारी सकाळी सात ते ११ यादरम्यान अभियान राबवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर

$
0
0

औरंगाबाद:

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे सध्या आघाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची कडवी लढत होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या फेरीअखेर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे २४६० मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ४८३२५ मते मिळाली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी जाधव यांना ४६२७५ मते मिळाली आहेत. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ३७३२९ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना अवघी ९७२१ मतं मिळाली आहेत. अजूनही अनेक फेऱ्या बाकी असल्यानं चित्र बदलण्याचीही शक्यता आहे.

सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर

$
0
0

नांदेड

दर १५ वर्षांनी धक्कादायक निकालांची परंपरा असलेल्या नांदेडमध्ये यंदाही चुरशीची लढत होत आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ व काँग्रेसचा गड असलेल्या नांदेडमध्ये यंदा चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांतून हेच दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये चव्हाण हे पिछाडीवर गेले आहेत.

अशोक चव्हाण यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे प्रतापराव चिखलीकर सध्या येथून ५७४६ मतांनी आघाडीवर आहेत. प्रताप पाटील यांना ७१६३६ मतं मिळाली आहेत. तर, चव्हाण ६५८९० मतं मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी २१८४६ मते खेचून काँग्रेसला जोरदार धक्का दिल्याचं दिसत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हा गड राखला होता. यावेळी मात्र त्यांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्याचा परिणाम सध्यातरी निकालावर दिसून येत आहे.

सतराव्या लोकसभेसाठी देशातील ५४३ मतदारसंघात निवडणूक झाली होती. त्यापैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पैशाचा अमाप वापर झाल्याचे सिद्ध झाल्याने तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

MIMने औरंगाबाद जिंकले; खैरेंना पराभवाचा धक्का

$
0
0

औरंगाबाद :

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत अखेर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना जलील यांच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, औरंगाबादचा अधिकृत निकाल मात्र अद्याप जाहीर झालेला नाही.

जलील यांनी निसटता विजय मिळवला आहे. जलील यांना ३ लाख ८८ हजार ४२ तर खैरे यांना ३ लाख ८१ हजार ९७५ मते मिळाल्याची माहिती असून अंतिम निकाल लवकरच घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी खैरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे येथे स्पष्टपणे दिसत आहे. विशेष म्हणजे जाधव सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते तर खैरे तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र नंतर खैरे यांनी जाधव यांना मागे टाकले. संपूर्ण लढतीत खैरे यांनी एकदाच अवघ्या ८२४ मतांनी जलील यांच्यावर आघाडी घेतली. मात्र नंतर ही आघाडी मोडत जलील यांनी सात हजारांवर मतांची आघाडी मिळवली व ही आघाडी निर्णायक ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा बालेकिल्ला खालसा

$
0
0

रामचंद्र वायभट, औरंगाबाद

अगदी शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या लढतीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी मुसंडी मारून खासदार चंद्रकांत खैरे यांचा चार हजार ४९२ मतांनी पराभव करत शिवसेनेचा बालेकिल्ला खालसा केला. जलील यांना तीन लाख ८९ हजार ४२ तर, चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ८४ हजार ५५० मते मिळाली.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (२३ मे) सकाळी चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन कंपनीत सुरू झाली. २६ फेऱ्यांमध्ये ८४ टेबलवर मते मोजण्यात आली. एकूण ११ लाख …९५ हजार २४२ मतमोजणीसाठी तब्बल १३ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. जलील यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी, दोन फेऱ्या वगळता कायम राखली. पहिल्या फेरीअखेर खैरे यांना ११ हजार ३१०, हर्षवर्धन जाधव यांना १३ हजार ९९७ तर, जलील यांनी १८ हजार ४२७ मते घेऊन आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या फेरीमध्येही जलील यांनी मतांची आघाडी कायम ठेवत ती शेवटपर्यंत राखली. टप्प्याटप्प्याने मताधिक्य वाढत होते. पहिल्या दहा फेऱ्यांपर्यंत जलील पहिल्या स्थानी तर, दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव होते. आठव्या फेरीअखेर खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले. त्यावेळी खैरे यांना एक लाख नऊ हजार २८८ तर, जाधव यांना एक लाख आठ हजार ४२३ मतदान पडले. या फेरीअंती आघाडीवर असलेले जलील यांना एक लाख ३३ हजार १९० मतदान पडले होते. दरम्यान १५ फेरीनंतर खैरे आणि जलील यांच्यामधील मतांचे अंतर कमी झाले. एकविसाव्या फेरीअखेर हे अंतर आणखी कमी झाले आणि शिवसेनेच्या तंबूत उत्साहाचे वातावरण पसरले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणबाजी सुरू झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा जलील यांनी आघाडी घेतली. ती अखेरपर्यंत निर्णायक ठरली. काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. मतदानानंतरही ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरदार असल्याचे सांगण्यात येत होते. मतमोजणीत त्यात तथ्य असल्याचे दिसून आले.

भाजप पदाधिकाऱ्यांची दांडी

खैरे हे युतीचे उमेदवार असले तरी, मतामोजणी केंद्राकडे आमदार अतुल सावे वगळता भाजपच्या इतर कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्याने हजेरी लावली नाही. शहरात भाजपचे मोठ्याप्रमाणावर नगरसेवक आहेत. मात्र, त्यांनी मतमोजणी केंद्रावर येणे पसंत केले नाही. दुसरीकडे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांना लाखभर मतदानही मिळवता आले नाही. दरम्यान पहिल्या फेरीपासूनचा मतमोजणीचा ट्रेंड पाहता झांबड हे मतमोजणी केंद्रांवर फिरकलेच नाहीत. झांबड मतदान केंद्रावर आले नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.

खैरे म्हणतात, माझं बॅड लक

सर्व फेऱ्यांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच निकालाचा ट्रेंड लक्षात आल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी सायंकाळी सात वाजता मतदान केंद्र सोडले. इतर वेळा प्रसारमाध्यमांशी भरभरून बोलणाऱ्या खैरे यांनी यावेळी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. केवळ 'हे तर माझे बॅडलक आहे,' असे म्हणत त्यांनी मतदान केंद्र सोडले.

औरंगाबादमध्ये आतापर्यंत फक्त खासदार जिंकत होते आणि शहर पराभूत होत होते. आता मात्र, पहिल्यांदाच शहर जिंकले आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करू. कचरा, रस्ता प्रश्न मार्गी लावू. औद्योगिक, शैक्षणिक विस्तारासाठी पाठपुरावा करू. भाजपची केंद्रात सत्ता आली असून, शहर विकासाच्या कामात ते मदत करतील.

- इम्तियाज जलील

उमेदवारनिहाय मते

इम्तियाज जलील - ३ लाख ८९ हजार ४२

- चंद्रकांत खैरे - ३ लाख ८४ हजार ५५०

- हर्षवर्धन जाधव - २ लाख ८३ हजार ७९८

- सुभाष झांबड - ९१ हजार ७८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दीन-दलितांचा नेता दिल्लीला पाठवला’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

१७ व्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभेसाठी मोठा बदल वंचित बहुजन आघाडी-एमआयएमचे उमेदवार आमदार सय्यद इम्तियाज जलील यांनी घडवला. दीन-दलितांचा नेता दिल्लीला पाठवल्याची भावना व प्रतिक्रिया कन्नड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून ऐकावयास मिळाल्या. त्याचवेळी प्रथमच या लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शिवेसनेचा पराभव झाल्याचाही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

पन्नास वर्षांपासून सत्तेपासून वंचित असलेला समाज एकत्र झाल्यामुळे व हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव करण्याचा विडाच उचलल्याने, चौरंगी लढतीत इम्तियाज जलील वगळता तीन्ही उमेदवारांच्या मतविभागणी मुळे हा विजय सुकर झालाचे निरीक्षण तालुक्यातील जनतेने नोंदवले. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी स्थित्यंत्तरे पाहवयास मिळणार आहेत. अल्पसंख्याक व वंचितांचा चेहरा मिळाल्याने माजी मंत्री दिवंगत रफिक झकेरिया यांची आठवण या विजयाच्या निमित्ताने जनमाणसात दिसून आली. 'दोघांचे भांडण तिसऱ्याचा फायदा' हेच पालुपद सोशल मिडियावर व्यक्त झाले.

शिवसेना व शिव स्वराज्य बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यानी एकमेकांना पाण्यात पाहत जिरविण्याच्या भाषेवर समाधान मानले. यात तिसराच उमेदवार निवडून आल्याने आत्मिक समाधान मानले. जिल्ह्यामध्ये सत्तातंर होऊन अल्पसंख्य व दलितांसाठी उमदे नेतृत्व उदयास आल्याने कन्नड शहरात सांयकाळी जल्लोष पाहवयास मिळाला. येथे नगर पालिकेसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्कंठा शिगेला, रस्त्यांवर शुकशुकाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या उत्कंठेने गुरुवारी (२३ मे) दिवसभर रस्त्यांवरील गर्दी निम्म्याने घटल्याचे दिसून आले. त्यातही अनेक मुख्य रस्त्यांवर कितीतरी वेळ शुकशुकाट दिसून आला. रस्त्यांवरच नव्हे, तर विविध सरकारी-खासगी कार्यालयांमध्येही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष दिवसभर निकालाकडेच होते आणि जिथे-तिथे निकालांवरच चर्चा सुरू असल्याचेही दिसून आले.

निकालाबाबतची उत्कंठा सकाळपासूनच सर्वत्र दिसून येत होती. रस्त्यावरील छोट्या-मोठ्या टपऱ्या, दुकाने, फळ-भाजी विक्री केंद्र अशा सगळ्याच ठिकाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत निकालांवर चर्चा सुरू होती. अर्थातच, बहुतेकजणांनी मोबाइलमध्ये डोके घातल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत होते. अख्ख्या शहरामध्ये व शहरवासियांमध्ये निकालाचा मूड स्पष्टपणे जाणवत होता. याच मूडचा भाग म्हणून बहुतेक शहरवासीय आपापल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहितीची देवाण-घेवाण करण्यात, मत-मतांतरे व्यक्त करण्यात व चर्चा करण्यात मश्गुल झाल्याचे दिसून येत होते. त्यातही व्हॉट्सअॅप ग्रुपवर निरनिराळ्या चर्चा झडत होत्या आणि जसा जसा निकाल पुढे सरकत होता तसा तसा निकालाचा कैफही नागरिकांमध्ये वाढत जाऊन पार संध्याकाळपर्यंत उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

\Bउत्कंठतेचा परमोच्च बिंदू \B

औरंगाबाद मतदारसंघाच्या निकालाला तुलनेने खूप उशीर झाला आणि संध्याकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान नागरिकांच्या उत्कंठेने परमोच्च बिंदू गाठल्याचे नागरिकांच्या अस्वस्थेवरुन जाणवत होते. घरोघरी, कार्यालयांमध्ये एकतर नागरिक मोबाइलमध्ये बुडाले होते, नाहीतर टीव्हीसमोर तरी बसले होते. निकालाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम म्हणूनच शहरातील रस्त्यांवरची वर्दळ पार घटली होती आणि काही रस्त्यांवर तर चक्क शुकशुकाट दिसून येत होता. जेव्हा औरंगाबादचा निकाल स्पष्ट झाला तेव्हाच नागरिकांनी एकदाचा सुस्काराला सोडला आणि पुन्हा एकदा शहरामध्ये व शहरवासियांमध्ये हालचाल सुरू झाली, रस्त्यांवर वाहने धावू लागल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घोडेले, जैस्वालांनी कोंडून घेतले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाची वार्ता समजताच, व्यथित झालेले महापौर नंदकुमार घोडेले आणि शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी स्वत:ला युतीच्या समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात कोंडून घेतले. त्यामुळे कार्यकर्त्यांचेही अवसान गळाले.

निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यापासून खैरे पिछाडीवरच होते. दुपारी तीनपर्यंत ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आले. 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांनी पहिला क्रमांक सोडला नव्हता. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी खैरे - जाधव यांच्यात चुरस सुरू होती. सायंकाळी पाचच्या सुमारास शिवसेनेच्या गोटात आशेचा किरण निर्माण झाला. समर्थनगर येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयात महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी तळ ठोकून होते. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता आणि तेवढ्यात खैरे यांना एक हजाराचे मताधिक्य मिळाल्याची माहिती फोनवरून कुणीतरी पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अनावर झाला. त्यांनी 'खैरे अंगार है, बाकी सह भंगार है, कोण आला रे कोण आला - शिवसेनेचा वाघ आला,' अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी महापौरांना उचलून घेतले, गुलालाची उधळून करून कार्यालयासमोरच्या मुख्य रस्त्यावर मिरवणूक काढली. मिठाई वाटण्यात आली. याच दरम्यान खैरे यांना तीन हजारांचे मताधिक्य मिळाल्याची माहिती आली आणि उत्साहाला अधिकच उधाण आले. मात्र, हे चित्र फारवेळ टिकले नाही.

\B...अन् खोलीत शिरले!

\Bघोडेले, जैस्वाल मिरवणुकीतून अचानक कार्यकर्त्यांना बाजूला करीत प्रचार कार्यालयातील एका खोलीत रवाना झाले. त्यांच्याबरोबर मोजकेच पदाधिकारी होते. खोलीला बाहेरून कुलूप लावून घ्या, असे त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले. खोलीत बसून ते वरिष्ठ नेत्यांशी बोलत असतील, असे काहींना वाटले. अर्धातास झाला तरी घोडेले - जैस्वाल खोलीबाहेर येत नसल्यामुळे काहींच्या मनाच शंकेची पाल चुकचुकली. तितक्यात इम्तियाज जलील विजयी झाल्याची बातमी येवून धडकली आणि उत्साहावर पाणी फेरले गेले. त्यानंतर घोडेले - जैस्वाल खोलीच्या बाहेर आलेच नाहीत, पण कार्यालयाबाहेर पोलिसांचे दंगाकाबू पथक आले. हे पथक पाहताच खैरेंच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्री उपस्थितांना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी, कचऱ्यामुळे ३१ वर्षांपासूनची संपली सद्दी

$
0
0

Unmesh.deshpande@timesgroup.com

Tweet - @UnmeshdMT

औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिकांसह पक्षांतर्गत खदखदीमुळे चंद्रकांत खैरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. हा शिवसेनेलाही जबर हादरा आहे. खैरेंची ३१ वर्षांपासूनची सद्दी आता संपली असून, त्यासाठी शहराचा पाणी, कचरा प्रश्नही तेवढाच कारणीभूत ठरला.

अपराजित नेता ही खैरे यांची ओळख. १९८८मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर तीन वेळा आमदार, चार वेळा खासदार आणि राज्यात युतीच्या काळात पाच वर्ष विविध खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर होती. ती वेळोवेळी उघड देखील झाली. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी शिवसेनेने प्रशांत किशोर यांच्या प्रतिनिधींना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पाठवले. किशोर यांचे प्रतिनिधी दोन दिवस शहरात तळ ठोकून होते. त्यांनी जिल्हाभरातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केली. तेव्हा खैरे यांच्या विरोधात वातावरण असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही शिवसेनेने खैरे यांना उमेदवारी दिली. त्यातच शहरात निर्माण झालेला पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. पाणीप्रश्न खैरे यांच्या हस्तक्षेपामुळे २००६पासून आजपर्यंत सुटलेला नाही. 'पीपीपी'तत्वावरील समांतर जलवाहिनी योजना झालीच पाहिजे, असा खैरे यांचा अट्टहास यांचा होता. नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणारी ही योजना रद्द करा, अशी मागणी होत असताना देखील खैरे यांनी हीच योजना रेटून नेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. दीड वर्षापूर्वी शहरात कचरा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तो चर्चेने लगेच संपवता आला असता. मात्र, तो ताणला गेला. त्यालाही खैरे यांची पदड्यामागची अदृश्य शक्ती कारणीभूत ठरली. याच प्रश्नांत खैरेंच्या विजयाची चाके फसली. त्यांना शहरातून कमी मते मिळाली, त्याचे कारण देखील पाणीच असल्याचे मानले जाते. हे प्रश्न सोडवण्याचे काम खासदाराचे नाही. मात्र, ते खैरेंच्या हस्तक्षेपामुळे रेंगाळले हे देखील तेवढेच खरे. खैरेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे सुभाष झांबड यांना अपेक्षेपेक्षा कमी पडलेली मते. झांबड काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे त्यांना दलित आणि मुस्लीम समाजाची मते बऱ्यापैकी मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, झांबड यांना खूपच कमी मते मिळाली. त्यामुळे 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली. दुसरीकडे हर्षवर्धन जाधव यांनी देखील खूप मते मिळवली. त्याचा फटका खैरेंना बसला.

\B...तर गडाला घरघर

\B१९८८च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले आणि संपूर्ण मराठवाड्यात शिवसेनेचे जाळे विणले गेले. या विजयामुळे शिवसेना मुंबईनंतर प्रथमच औरंगाबाद आणि मराठवाड्यात पसरली. औरंगाबादमधील राजकीय यशापयशाचा परिणाम संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणावर होतो, असा इतिहास या निमित्ताने निर्माण झाला आहे. खैरेंच्या पराभवामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास मराठवाड्यात शिवसेनेच्या गडाला घरघर लागू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोषणाबाजी, तणाव, खैरे-जलील समर्थकात दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पहिल्या फेरीपासून चुरशीची ठरली. एमआयएमचे उमेदवार इम्तीयाज जलील आणि युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या समर्थकांत घोषणाबाजी करण्यावरून वाद निर्माण झाले. यावेळी दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तसेच एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगविला.

जलील आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे सुरुवातीपासून आघाडीवर होते तर युतीचे खैरे हे तिसऱ्या क्रमांकावर होते. यामुळे एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीपासून जल्लोष आणि घोषणाबाजी सुरू होती. नवव्या फेरीअखेर खैरे यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना पिछाडीवर टाकले. यानंतर खैरे समर्थकांची गर्दी वाढली. प्रत्येक फेरीअखेरीस दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात घोषणाबाजी सुरू होती. मतमोजणीच्या दरम्यान एकविसाव्या फेरीअखेर खैरे यांना जलीलपेक्षा आघाडी मिळाली. यानंतर शिवसैनिकाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. याला समोरील गटाकडून प्रत्यूत्तर देण्यात आले. याच दरम्यान दोन्ही गटाकडून अचानक दगडफेक आणि पळापळ सुरू झाली. याच दरम्यान एका तरुणाला अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार करीत जखमी केले. या तरुणाला मुकुंदवाडी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिवसेना नगरसेवक सचिन खैरे यांची सफारी कार यावेळी पार्किंगमध्ये उभी होती. अज्ञात तरुणाने या कारवर पाठीमागून दगडफेक करीत काचा फोडल्या. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर हा जमाव शांत झाला. दरम्यान मतमोजणी अंतिम टप्प्यात पोहचल्याने तणावाचे वातावरण वाढले होते. युतीचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या उजव्या बाजूच्या मैदानात जमा झाले होते. दरम्यान, पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद हे मतमोजणी केंद्राच्या बाहेर येऊन बंदोबस्ताचा आढावा घेऊन पुन्हा आत गेले. आयुक्त आत गेल्यानंतर दोन्ही गटाच्या वतीने पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. यावेळी दोन्ही गटाच्या वतीने पुन्हा दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत हा जमाव पांगविला.

बंदोबस्तात वाढ

दगडफेकीच्या घटना घडत असल्याने अतिरिक्त फौजफाटा मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मागवण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले. बंदोबस्त वाढवल्यानंतरही जमावाची घोषणाबाजी सुरूच होती. मात्र, विरोधी गटाचे कार्यकर्ते निघून गेल्याने नंतर हा जमाव देखील शांत झाला.

कामगारांना काढले बाहेर

लोकसभेचा निकाल ऐकण्यासाठी समर्थकांसह परिसरातील कंपन्यातील काही कामगार देखील आले होते. पार्किंगच्या मैदानातील मंडपात हे उभे होते. अचानक दगडफेक सुरू झाल्यामुळे हे कामगार घाबरले. यावेळी तेथे असलेल्या बाळासाहेब दानवे, किरण लखनानी, ज्ञानेश्वर शेळके, गणेश दायमा आदींनी या कामगारांना धीर देत मैदानाबाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मला पराभवाचा आनंद आहे !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विजयी झाल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नसता तेवढा आनंद पराभवाने झाला आहे. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी भरभरून मतदान केले. माझ्यासाठी ही समाधानकारक बाब असून, पुढील निवडणुकीत जोशाने सामोरा जाईल', या शब्दात शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी भावना व्यक्त केल्या. जाधव यांनी कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रात दिवसभर तळ ठोकत पराभवाचा हसत स्वीकार केला.

जाधव यांची उमेदवारी शिवसेनेसाठी तापदायक ठरण्याची शक्यता अखेर खरी ठरली. जाधव यांची तब्बल दोन लाख ८२ हजार १५७ मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरली. गंगापूर, वैजापूर, कन्नड या ग्रामीण भागात जाधव यांना लक्षणीय मते मिळाली. खैरे यांची पहिल्या फेरीपासून सुरू असलेली पिछेहाट शेवटपर्यंत कायम राहिली. सकाळी कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर तळ ठोकलेल्या जाधव यांनी सर्व फेऱ्यांची मोजणी झाल्यानंतरच मतदान केंद्र सोडले. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी मतदारांचे आभार मानले. 'मला मिळालेली मते म्हणजे माझ्या नेतृत्वावर जनतेने ठेवलेला विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवत नव्या जोशाने पुन्हा पुढील निवडणुकीला सामोरा जाईल. विजयी झाल्यानंतर जेवढा आनंद झाला नसता तेवढा आनंद पराभवाचा आहे', असे जाधव म्हणाले. दरम्यान, जिल्ह्याला इम्तियाज जलील यांच्या jtपाने पहिल्यांदाच सुशिक्षित लोकप्रतिनिधी मिळाला आहे, असे म्हणत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे खैरे यांच्यावर टीका केली.

\Bजावईधर्म पाळला नाही

\Bजाधव यांच्या प्रचारात भाजपने छुपी मदत केल्याची चर्चा आहे. जाधव यांचे सासरे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म न पाळता जावईधर्म पाळल्याची तक्रार खैरे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली होती. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर जाधव यांनी दानवे यांची पाठराखण केली. 'दानवे यांनी जावईधर्म पाळला असता तर निवडणुकीत पडलो नसतो. मला कुणीही मदत केली नाही', असे जाधव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इम्तियाज जलील यांचा अल्पपरिचय

$
0
0

- नाव : सय्यद इम्तियाज जलील

- शिक्षण : एमबीए मार्केटिंग, एम. कॉम, एमएमसीजे

- जन्म : १० ऑगस्ट १९६८

- जन्म गाव : औरंगाबाद

- भाषा : इंग्रजी, हिंदी, मराठी आणि उर्दू

- कामाचा अनुभव : लोकमत टाइम्स, एनडीटीव्ही २४x७ वृत्त वाहिनीत पत्रकार म्हणून काम

- राजकीय अनुभव : २०१४मध्ये 'एमआयएम'मधून आमदार म्हणून विजयी

- २०१९ मध्ये औरंगाबाद लोकसभा निवडणूकीतून विजयी

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकडेवारी

$
0
0

सुजय विखे-पाटील ६९६९६१

संग्राम जगताप ४१९३६४

सुधाकर आव्हाड ३१६४४

संजय धोत्रे ५५२८९८

प्रकाश आंबेडकर २७८२४१ वंचित बहुजन

हिदायतुल्ला पटेल २५४०९४ काँग्रेस

नवनीत रवी राणा ५०७८४४ अपक्ष

आनंदराव अडसूळ ४७०५४९

गुणवंतराव देवपारे ६४५८५वंचित बहुजन

सुप्रिया सुळे ६८६७१४

काचंन कुल ५३०९४०

नवनाथ पडळकर ४४१३४ वंचित बहुजन

डॉ. सुभाष भामरे ६१३५३३

कुणाल पाटील ३८४२९०

नवी अहमद अहमद दुल्ला ३९४४९ वंचित बहुजन

उमेश पाटील ७१३८७४

गुलाबराव देवकर ३०२२५७

अंजली रत्नाकर बाविस्कर ३७३६६ वंजित बहुजन

….

श्रीरंग बारणे ७२०६६३

पार्थ पवार ५०४७५०

राजाराम पाटील ७५९०५ वंचित बहुजन

….

अरविंद सावंत ४२१९३७

मिलिंद देवरा ३२१८७०

डॉ. अनिलकुमार ३०३४८ बंचित बहुजन

राहुल शेवाळे ४२४९१३

एकनाथ गायकवाड २७२७७४

संजय भोसले ६३४१२ वंचित बहुजन

….

डॉ. हिना गावीत ६३९१३६

के. सी. पाडवी ५४३५०७

सुशील अंतुर्लीकर २५७०२ वंचित बहुजन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रखरखीत उन आणि निकालाची उत्कंठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शहरातील सगळ्यांनाच होती. हा निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेरील मैदानात मांडव टाकण्यात आला होता. सकाळपासून या मांडवात नागरिकांनी गर्दी केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी वॉच टॉवरसह चोख बंदोबस्त ठेवला होता.

प्रशासनाच्या वतीने नागरिकांसाठी मंडप टाकण्यात आला तरी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या मंडपात तात्पुरती कॅन्टीन उभारण्यात आली हेाती. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरचाच आधार घ्यावा लागला. अंगाची लाहीलाही होत असताना समर्थक मात्र दिवसभर ठाण मांडून निकाल ऐकण्यासाठी बसले होते. सुरुवातीला जलील, हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांचे समर्थक एकत्रित होते. नंतर मात्र जशी जशी आघाडी वाढत गेली तसे समर्थकात वेगळे गट निर्माण झाले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये मतमोजणीच्या ठिकाणी एक पोलिस उपायुक्त, दोन एसीपी, दहा पोलिस निरीक्षक, ३० सहायक निरीक्षक, २०० कर्मचारी, ६० महिला कर्मचारी याच्यासह केंद्रीय राखीव दल आणि राज्य राखीव दलाचे प्रत्येकी एक प्लाटून तैनात करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी १२ कॅमेरामन देखील होते. त्याच प्रमाणे मैदानात तीन वॉच टॉवर उभारण्यात आले होते. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, निरीक्षक सुरेंद्र माळाले स्वत: मैदानावरील जमावावर लक्ष ठेऊन होते.

चौकट

पोलिस आयुक्तांची दिवसभर उपस्थिती

पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद हे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मतमोजणी केंद्रात दाखल झाले. यानंतर दिवसभर ते मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते. सायंकाळी बाहेर दगडफेकीची घटना घडल्यानंतर त्यांनी स्वत: बाहेर येऊन आढावा घेत शांततेचे आव्हान केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमआयएम’चा खुलताबादेत जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत एकदा शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्याने खुलताबादमध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र, 'एमआयएम'-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी नंतर जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आल्यानंतर 'एमआयएम'च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सलग चारवेळा खासदार राहिलेल्या खैरे यांच्या पराभवामुळे शिवसैनिकांची निराशा झाली. शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा खैरे यांना फटका बसल्याच्या प्रतिक्रिया खुलताबादमध्ये व्यक्त झाल्या. मतमोजणीचे हे चित्र शेवटच्या क्षणापर्यंत बदलते असल्यामुळे शिवसैनिक एकमेकांना मतांची आघाडी विचारताना दिसले. अखेर 'एमआयएम'च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीची संथ गती अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादमधील निकाल अक्षरश: क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा आणि कार्यकर्त्यांची परीक्षाच घेणारा ठरला. औरंगाबादची मतमोजणी राज्यात सर्वाधिक वेळ ठरली. अतिशय संथगतीने मतमोजणी होत असली तरी बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष असे वातावरण होते. प्रत्येक फेरीनंतर मतांची बेरीज मांडण्यात उमेदवार प्रतिनिधी दक्ष होते.

मतमोजणीस सकाळी पहिल्या फेरीपासून विलंब होत गेला अन् पुढच्या प्रत्येक फेरीत वेळ वाढत गेला. बाहेर मतदार संघातील निकाल जाहीर होत होते. प्रक्रिया एवढी संथ होती की, तिसरी फेरी सुरू झाली तरी पहिल्या फेरीचा प्रशासनाला निकाल जाहीर करता आला नाही. औरंगाबादच्या निकालाला वेळ लागत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. त्याच दरम्यान प्रमुख उमेदवारांची कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने गणिते लावत, एक फेरी संपली की, दुसऱ्या फेरीकडे डोळे लावून बसत. दुसऱ्या फेरीतही कमी अधिक फरकाने प्रमुख तीन उमेदवारांमध्ये लढत पहायला मिळायची. सुरुवातीपासून उत्सुकता ताणली गेली. सुरुवातीपासून जलील आघाडीवर असल्याने एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मतमोजणी केंद्राबाहेर एमआयएमचे कार्यकर्ते सकाळपासूनच गर्दी करत होते. आठव्या-नवव्या फेरीपर्यंत इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातच टस्सल होते की, काय असे चित्र होते. कमी अधिक फरकाने जाधव जलील यांच्या मताधिक्याजवळ होते. नवव्या फेरीत खैरेंनी दुसऱ्या स्थानावर उडी घेतली. तर जाधव तिसऱ्या स्थानावर गेले. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. काट्याची टक्कर झालेल्या निवडणुकीत प्रत्येक फेरीत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रचंड मेहनत घेतल्याचे चित्र होते. फेरीनिहाय मतांची बेरीज मांडण्यात उमेदवार प्रतिनिधी अतिशय दक्ष होते. २१व्या फेरीनंतर थोडा शिवसेनच्या कार्यकर्त्यांचा थोडा उत्साह वाढविला. मात्र, एक फेरी पुरताच त्यांचा उत्साह कायम राहू शकला. जलीलांची आघाडी वाढत असल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला पोहचला. मतमोजणी केंद्रात थेट प्रतिनिधींनीही जलील यांचे स्वागत केले. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव तिसऱ्या फेरीपासून मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले. चंद्रकांत खैरे सुरुवातीच्या काही फेऱ्या संपल्यानंतर मतमोजणी केंद्रावर आले. इम्तियाज जलील सोळाव्या फेरीनंतर मतमोजणी केंद्रावर पोहचले. आघाडीवर असल्याने त्यांचे केंद्राबाहेरच कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

पहिल्या फेरीपासून जलील आघाडीवर

पहिल्या फेरीपासून इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतील होती. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते, प्रतिनिधींमध्ये उत्साह होता. सुरुवातीच्या काही फेरींमध्ये चार-पाच हजारांची लीड राहिली पुढे ती २०, २२ ते ३० हजार किंवा काही फेऱ्यांमध्ये ही आघाडी ३३ हजारांपर्यंत गेली. नवव्या फेरीत खैरे हे जाधव यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानावर आले. त्यामुळे पुढच्या फेऱ्यांमध्ये खैरे आघाडी मोडित काढून पुढे येतील असे चित्र राहिल, असे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा राहिली. २१ व्या फेरीत ते जलील यांच्या पुढे राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. मात्र, पुढच्याच फेरीत जलीलांनी आघाडी घेतली ती विजयापर्यंत.

चौकट…

काय म्हणता जावई

मतमोजणी केंद्रात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संवाद होत होताच. त्याचवेळी उमेदवारही समोरा समोर आल्याने काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र, उमेदवारांनी एकमेकांचे स्वागत केले. चंद्रकांत खैरे मतमोजणीबाबत आढावा घेऊन बाहेर केंद्रात बाहेर पडले की, समोर बाहेर जाधव बसलेले होते. खैरेंनी जाधव यांना पाहताच काय म्हणता जावई असे म्हणत जाधवांची विचारपूस केली. त्यांनीही जय महाराष्ट्र घातला. कसे आहात..मजेत ना असे खैरे यांनी विचारताच मजेत आहे असे जाधवांनी सांगत आपण कसे आहात असा प्रश्न केला तर आनंदात असे उत्तर देत खैरे पुढे निघाले. मतमोजणी केंद्रात इम्तीयाज जलील आले तेव्हा त्यांनी जाधव आणि त्यांच्या मुलाची भेट शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थकांनीही लढवला अखेरपर्यंत किल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी गुरुवारी (२३ मे) सकाळपासून विविध पक्षांचे कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी झाली. मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळ झाली, मात्र कार्यकर्त्यांच्या उत्साहात तसूभरही फरक पडला नाही. अत्यंत चुरशीची निवडणूक झाल्याचे मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत स्पष्ट होत होते. त्यामुळे तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना सायंकाळी चार पर्यंत, तर शिवसेना व एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत आपल्याच बाजुने निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवली. अखेर फटाके फोडत प्रचंड घोषणा देत खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यर्त्यांनी जल्लोष केला.

यंदा औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत तीन आमदार विरूद्ध एक खासदार अशी लढत झाली. ही निवडणूक चुरशीची ठरल्यामुळे सकाळी आठ पासूनच मेल्ट्रॉल कंपनीच्या परिसरात मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सकाळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. येथे जमलेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांनाही घोषणा देण्यास सुरुवात केली. पहिल्या फेरीपासून एमआयएमचे-वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मताधिक्य असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहिला.

प्रत्येक फेरीचे आकडे जाहीर होताना कार्यकर्त्यांना धाकधूक लागून राहत होती. शेवटपर्यंत मताधिक्य सतत बदलत असल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली. शिवेसना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी २३ व्या फेरीअखेर आघाडी घेताच शिवसैनिकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. मात्र पुढच्या काही फेऱ्यांमध्ये जलील यांनी ही आघाडी कमी करत नेली. त्यामुळे एमआयएम कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू राहिला. अखेरच्या टप्प्यात विजय कोणाच्या पारड्यात पडणार, ही उत्सूकता ताणली गेली.

\Bअखेरच्या फेऱ्यांमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष \B

शिवसेनेला अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी मिळाली. ही आघाडी जाहीर होताच, शिवसैनिकांनी जल्लोष केला. शहरातील अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजर झाला. यामुळे शिवसैनिकांना खैरे यांचा विजय होईल, असे वाटून गेले, त्यामुळे अनेक शिवसैनिकांना हायसे वाटले होते. मात्र, अखेर त्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या.

\Bकाँग्रेस शहाध्यक्षांनी सोडले मतमोजणी केंद्र \B

काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार हे ही मतमोजणी केंद्रात हजर होते. मात्र, सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास ते मतमोजणी केंद्रातून बाहेर आले. त्याबद्दल विचारले असता ग्रामीण भागात एक परिचिताच्या मुलीच्या लग्नाला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसचा दारूण पराभव होत असल्यामुळे ते मतमोजणी केंद्राकडे फिरकलेच नाहीत.

\Bमतमोजणी केंद्रावर सोडला रोजा \B

सध्या रमजानचा महिना सुरू आहे. एमआयएम-वंचित बहुजन आघाडीच्या अनेक समर्थकांनी रोजा धराला होता. ते तळपत्या उन्हात मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते. निकाल जाहीर होण्यास होत असलेला उशीर व रोजा सोडण्याची होत असलेली वेळ यामुळे अनेकांची घालमेल होत होती. परंतु, अनेक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणीच खजूर खाऊन रोजा सोडला.

\Bध्वनी यंत्रणेबाबत वारंवार तक्रारी \B

मतमोजणी केंद्राबाहेरील जागा कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. प्रत्येक फेरीची माहिती देण्यासाठी येथे माईक सिस्टीम बसविली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करत असलेले प्रत्येक फेरीनिहाय मतांचे आकडे स्पष्टपणे ऐकू येत नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलील यांचा विजय, खैरेंचा पराभव कही खुशी, कही गम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांचा विजय झाला तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभवाची धूळ चाखावी लागली. जय - पराजयाच्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात कही खुशी, कही गमचे वातावरण आहे.

चंद्रकांत खैरे यांचा पराभव म्हणजे आमच्यासाठी दुर्दैवाचा आणि काळा दिवस आहे. आपसातील मतांचे विभाजन झाल्यामुळे आम्हाला ही जागा गमवावी लागली. खैरेंचा पराभव ही घटना शहरासाठी योग्य झालेली नाही. एमआयएम निवडून आल्याचा दुष्परिणाम काही दिवसात दिसू लागेल.

संजय शिरसाट (आमदार, शिवसेना)

तिरंगी लढत झाल्यामुळे व आपसातील किरकोळ मतभेदामुळे खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला. थोड्या मतांनी आमची ही जागा गेली. आता जोमाने काम करावे लागेल. शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल.

प्रदीप जैस्वाल (महानगरप्रमुख, शिवसेना)

लोकांनी मतदानाच्या रुपाने आम्हाला खूप आशीर्वाद दिले तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला पडला. या पराभवातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. चंद्रकांत खैरे यांनी शहर व जिल्ह्यासाठी खूप काम केले, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यामुळे खैरे यांचा पराभव झाला. या परिस्थितीतही जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. आम्ही आता अधिक जोमाने काम करू.

नंदकुमार घोडेले (महापौर)

हा निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहे. जातीच्या नावावर मतदान झाले. ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. जातीपातीचे राजकारण व्हायला नको. त्यामुळे विकासाला बाधा येते.

अनिल पटेल (प्रभारी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस)

या लोकसभा निवडणुकीत आलेला जनादेशाचा आम्ही आदर करतो. प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असताना आलेले निकाल निश्चित 'चकवा' देणारे व आम्हांला आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. देशातील मुलभूत प्रश्नांपेक्षा बेगडी राष्ट्रवाद, हिंदूत्व वगैरे अशा मुद्यांवर मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून तो आम्ही स्विकारतो. सध्या राज्यात दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकऱ्यांसमोरील प्रश्न फार बिकट आहेत. त्यामुळे सरकारने आता विजयाच्या जल्लोषातून लवकर बाहेर येऊन दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावेत.

सतीश चव्हाण (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

लोकसभा निवडणुकीत आलेला जनादेशाचा आदर करतो. प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असतांना आलेले निकाल निश्चित 'चकवा' देणारे व आम्हाला आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. देशातील मुलभूत प्रश्नांपेक्षा बेगडी राष्ट्रवाद, हिंदुत्व वगैरे मुद्यांवर मतांचे ध्रुवीकरण झालेले प्रथमदर्शनी दिसते. बाकी जनतेने दिलेला 'कौल' आम्हाला मान्य असून जनतेचा 'कौल' मनापासून स्वीकारतो. सध्या राज्यात दुष्काळ, पाणी टंचाई, शेतकर्‍यांसमोरील प्रश्न बिकट आहेत. त्यामुळे सरकारने आता विजयाच्या जल्लोषातून लवकर बाहेर पडून दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करावे.

सतीश चव्हाण, आमदार

देशात पुन्हा एकवार मोदी सरकार सत्तेवर आले. यांचा खूप आनंद आहे. औरंगाबाद हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे, पण यंदा हिंदू मतांचे झालेल्या विभाजनामुळे युतीचे नुकसान झाले आहे.

अतुल सावे, आमदार, भाजप

मोदी सरकार पुन्हा केंद्रात आले आहे. प्रचंड बहुमत मिळाले याचा खूप आनंद आहे, पण औरंगाबादेत आमचे यश थोडक्यात हुकले. याचे तीव्र दु:ख आहे.

- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ दिवसात वियज खेचून आणला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकांना बदलाव हवा होता. ज्या ठिकाणी दलित-मुस्लिम मतदान नाही. अशा नागरिकांनीही मदतान केले. उमदेवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या २८ दिवसांत आम्ही विजय खेचून आणला. आता माझ्यावर जबाबदारी वाढली असल्याचे सांगत सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना सांगितले.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला वंचित आघाडी औरंगाबादची जागा लढविणार की, नाही. वंचित आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटणार यावरच खलबते सुरू होती. मतदानाच्या २८ दिवस आधी वंचित आघाडीकडून एमआयएमला ही जागा देण्याचे निश्चित झाले. त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आणि लगेचच जलील यांनी तयारी सुरू केली. आपला हा विजय २८ दिवसांमधला असून कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत या बळावर आज विजय मिळविल्याचे जलील यांनी सांगितले. आशिया खंडातील वेगाने वाढणारे शहर अशी औरंगाबादची ओळख होती. मात्र, गेल्या २० वर्षांत ही ओळख संपविण्यात आली. शहरात कचरा, रस्ते यासह पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत औरंगाबादमध्ये केवळ खासदार जिंकत होते आणि शहर पराभूत होत होते. मात्र, आता पहिल्यांदाच शहर जिंकले आहे. आपल्यावरील आता जबाबदारी वाढली असल्याचे सांगत आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन काम करू. औद्योगिक, शैक्षणिक विस्तारासाठी पाठपुरवा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे केंद्रात सत्ता आली असून शहराच्या विकासाबाबतची चांगली कामे घेऊन त्यांच्याकडे जावू त्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images