Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचरा संकलकांचे पगारासाठी आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केलेल्या कामाचा मबदला मिळत नसल्यामुळे कचरा संकलन करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा सोमवारी झोन क्रमांक तीन मध्ये सुमारे चार तास काम बंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोन वेळा आंदोलन केले आहे. त्यामुळे रेड्डी कंपनीचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

घरोघरी जाऊन कचरा संकलन, रस्त्याशेजारी-दुभाजकांमध्ये साचलेल्या कचऱ्याचे संकलन, हा कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचवण्याचे काम पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. या कंपनीचे चार महिन्यापूर्वी काम सुरू केले. मात्र, कर्मचाऱ्यांचे पगार रखडत आहेत. पगाराच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी दोन-तीन वेळा आंदोलन केले. त्यावेळी पगार करण्याचे आश्वासन देऊन बोळवण करण्यात आली. सोमवारी झोन क्रमांक तीनमध्ये कर्मचाऱ्यांनी सकाळी सहा वाजता काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले हे कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. पण कर्मचाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही, पगार मिळेपर्यंत काम सुरू करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर महापौरांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्फत रेड्डी कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिली. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावे, काम बंद पडू देऊ नका, असे भोंबे यांनी कंपनीला कळ‌वले. त्यानंतर साडेदहाच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले.

\Bकर्मचाऱ्यांनी रोखली महापालिकेची वाहने \B

रेड्डी कंपनीचे कर्मचारी कचरा संकलन व वाहतुकीचे काम करीत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर महापालिकेने स्वत:च्या यंत्रणेमार्फत कचरा उचलण्याचे ठरविले. त्यासाठी तीन ट्रक लावण्यात आल्या. काम बंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही वाहने रोखली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली.

\Bमहापालिकेकडे ९० लाखांची थकबाकी \B

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीचे दीड कोटी रुपये पालिका प्रशासनाकडे थकले आहेत. यापैकी प्रशासनाने ६० लाख रुपयांचे पेमेंट केले आहे. उर्वरित पेमेंट वेळोवेळी पाठपुरावा करून देखील मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करता येत नाहीत, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालिकेच्या प्रश्नांवर जूनमध्ये मुंबईत बैठक

0
0

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचा विकास व महापालिकेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी दिली.

समांतर जलवाहिनीचा प्रकल्प, भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प, रस्ते विकास, कचरा प्रक्रिया प्रकल्प यासह महापालिकेची शासनानेकडे थकीत असलेली सुमारे सव्वाशे कोटींची रक्कम, महापालिकेतील रिक्त पदे यासह विविध प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घ्यावी व हे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा यासाठी लोकसभा निवडणूक झाल्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पत्र दिले होते. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खैरे यांना दिले होते. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही बैठक होणार आहे, तसा निरोप मिळाला आहे, असे महापौर म्हणाले. बैठकीची तारीख मात्र अद्याप महापालिकेला मुख्यमंत्री कार्यालयातर्फे कळविण्यात आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी गैरव्यवहार जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) जनश्री योजनेंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करून एलआयसीची फसवणूक केल्याप्रकरणात चार आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी सोमवारी फेटाळला.

अलीखान दाऊद खान (५३), मोईन खान रहिम खान (४३, दोघे रा. हर्सुल), शंकर लक्ष्मणराव गायकवाड (४५, रा. विष्णुनगर) व नंदा भारत बोराडे (४५, रा. सातारा परिसर) असे आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात यापूर्वी सुभान अहमद शाह व शकील शाह अहमद शाह यादोघांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव संपतराव सरवदे (६०) यांनी तक्रार दिली होती. वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिव असलेले अली खान दौड खान, मोहीन खान रहीम खान, ए. एच. श्यामकुळे, भारत डब्ल्यू बोराडे, शंकर गायकवाड, एन. एन. काकडे, सुभान अहमद शाह, शकील अहमद शाह, बाळासाहेब झाडे, महेंद्र गडवे यांनी ११ जुलै २०१४ ते नऊ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत 'एलआयसी'च्या कार्यालयातील पेन्शन व समूह विमा विभागात बनावट मृत्यू प्रमाणपत्रे, इतर कागदपत्रे सादर करून जनश्री विमा योजना व 'एलआयसी'ची समूह विमा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पॉलिसीतील समाविष्ट सदस्यांच्या मृत्यू दाव्याच्या ९९ लाख ३० हजार रुपये रकमेत गैरव्यवहार करून 'एलआयसी'ची फसवणूक केली होती.

चौघा आरोपींनी अटकपूर्व जामीनीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता गुन्हा गंभीर असून, गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला. या प्रकरणात देशपांडे यांना सिद्धर्थ वाघ यांनी सहकार्य केले.

\Bदाव्यानंतर पुन्हा उतरविला विमा\B

यातील काही प्रकरणांमध्ये आरोपींनी बनावट कागदपत्राआधारे मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्याची पॉलिसी काढल्याचा प्रकारही समोर आला होता. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राणघातक हल्ला; आरोपीचा अर्ज फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

जोगवाडा शिवारातील शेतात देखरेखीचे काम करणाऱ्या दोघांवर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणात आरोपी संतोष लक्ष्मण शिंदे याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी फेटाळला. या गुन्ह्यात पूर्वी आरोपी उत्तम नामदेव आधाने याला पोलिसांनी अटक केली होती.

या प्रकरणात अमोल दत्तात्रय लाखे (२५, रा. कांचनवाडी, गोलवाडी) याने तक्रार दिली होती. तक्रारीत, लाखे हा अ‍ॅड. तळेकर यांच्या शेताची देखरेख करतो. तो १५ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराला शेतीची देखरेख करण्यासाठी गेला असता, तेथे बालाजी मुपडे हा शेतात होता. त्यावेळी आरोपी उत्तम नामदेव आधाने (५२, रा. चिमणपरीवाडी, ता. जि. औरंगाबाद), आनंद थट्टेकर, उत्तम थट्टेकर व संतोष शिंदे (२७, सर्व रा. चिमणपीरवाडी) हे शेतात माती टाकत असताना दिसले. अमोल लाखे याने आरोपींना हटकले असता त्यांनी शिविगाळ करून अमोल याला मारहाण केली. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता आरोपी संतोष याने मुपडे याच्या मोबाइलवर फोन करून मुपडे व अमोल यांना गट क्रमांक ६८मध्ये बोलाविले. त्यानुसार अमोल व मुपडे हे गेले असता, आरोपींनी त्यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी संतोष शिंदे याने अटकपूर्व जामिनीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. प्रकरणत जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापती उमेदवारीसाठी भाजपची उद्या बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडीनंतर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सभापतिपदाचा उमेदवार निवडीसाठी भाजप शहर कोअर कमिटीची बैठक बुधवारी (२९ मे) आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे त्यांची भाजपला किती साथ मिळेल, हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

महापालिकेत शिवसेना-भाजपची युती असून महापौर व इतर पदांच्या वाटपाबद्दल दोन्ही पक्षांत करार झालेला आहे. त्यानुसार, यावेळचे सभापतिपद भाजपला मिळणार आहे. शिवसेनेचे राजू वैद्य यांचा स्थायी समिती सभापतीपदाचा कार्यकाळ एक मे रोजी संपला असून नवीन सभापतींची निवड ४ जून रोजी होणार आहे. 'उमेदवार निवडीसाठी भाजप शहर कोअर कमिटीची बुधवार किंवा गुरुवारी बैठक होणार आहे. यात सर्वानुमते नाव निश्चित होईल,' असे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी 'मटा'ला सांगितले.

या पदासाठी भाजपकडून राजू शिंदे यांचे नाव आघाडीवर असून पूनमचंद बमणे हे सुद्धा तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांत जास्त रस्सीखेच झाल्यास ऐनवेळी जयश्री कुलकर्णी यांची वर्णी लागू शकते. आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठी श्रेष्ठींचा आर्शीवाद मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

\Bशिवसेना काय करणार?\B

स्थायी समितीत भाजपचे तीन सदस्य असून शहर प्रगती आघाडीच्या दोन सदस्यांचा भाजपला पाठिंबा आहे. शिवसेनेचे सहा सदस्य आहेत. 'एआयएमआयएम'चे चार आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे. पक्षीय बलाबल पाहता युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला आहे. चंद्रकांत खैरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडून युती धर्माचे पालन झाले नाही, अशी तक्रार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे केली आहे. त्यावरून शिवसेनेच्या भूमिकेकडे पालिका वर्तुळात लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारसावंगीमध्ये डीजेबंदी, दारूबंदी

0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

बाजारसावंगी येथील ग्रामसभेत डीजेबंदी व दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सरपंच लक्ष्मीबाई नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत उपस्थित ५०० महिलांनी ग्रामसभेत दारुबंदी झालीच पाहिजे, अशा घोषणाबाजी करत ग्रामसभा दणाणून सोडली. यामुळे येथील दारुविक्रेत्याचे धाबे दणाणले आहेत. दारुंबदीचा व डीजेबंदीचा ठराव घेण्यात आला आहे.

तीन वर्षांपूर्वी बाजारसावंगी येथे दारुबंदीसाठीचा ठराव मंजूर करण्यात आला होता. बाटली आडवी की उभी यावर मतदान घेण्यात आले होते. यात स्थानिक गटातटाचे राजकारण शिरल्याने हा ठराव बारगळला होता. दारुविक्रेत्यानी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटून महिला वर्गास मतदानापासून दूर ठेवले होते. गावातील एका गटाला दारुबंदीचे श्रेय मिळू नये, यासाठी दुसऱ्या गटाने दारुविक्रेत्यांना छुपा पाठिंबा दिला होता.

\Bमहिलांचा एल्गार\B

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बाजारसावंगी गावातील दारुच्या आहारी गेलेल्या तरुणांचा होणारा अकाली मृत्यू ; तसेच दररोज दारुमुळे होणारी घराघरातील भांडणे याला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते व इतर महिला कार्यकर्त्या यांनी पुढाकार घेऊन गावातील अवैध दारुविक्रीविरुद्ध दंड थोपटले होते. दारूबंदी करण्यासाठी सोमवारी महिलांच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी चालकाला केली धक्काबुक्की

0
0

औरंगाबाद : एसटीच्या अधिकृत थांबा असलेल्या हॉटेलचालकाने चालक व वाहकाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी एसटी चालकाने थेट विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली आहे.

औरंगाबाद आगार क्रमांक दोनचे चालक के. एन. ढमाले व वाहक डी. के. राठोड हे सोमवारी (२७ मे) सुरत औरंगाबाद ही बस घेऊन औरंगाबादला येत होते. कन्नड ते वेरुळच्या जवळ असलेल्या आम्रपाली हॉटेल येथे महामंडळाने अधिकृत थांबा दिलेला आहे. या थांब्यावर बस थांबली. मात्र, त्यावेळी सर्व्हिस मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे चालक व वाहकांनी हॉटेल मालकाला विचारणा केली. मात्र, हॉटेलमालक, मॅनेजर व वेटरांनी मिळून चालक व वाहकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. हॉटेलवर बस थांबल्याची पोचपावती देण्यास नकार दिला. त्यामुळे चालक ढमाले व वाहक राठोड यांनी तातडीने फोन करून वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर बस औरंगाबादला आल्यानंतर विभागीय नियंत्रकांना रितसर तक्रार देऊन हॉटेलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी नदीपात्रात ‘जागर पाण्याचा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी गोदावरी नदीच्या पात्रात 'जागर पाण्याचा' हे आंदोलन केले. मंगळवारपर्यंत पाणी न सुटल्यास, जलसंपदा विभागाच्या कार्यलयात व अधिकाऱ्यांच्या निवासासमोर आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेने दिला आहे.

गोदावरी नदीवरील कोरड्या पडलेल्या आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील जवळपास ४० गावांतील शेतकरी व अन्नदाता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहा मेपासून विविध प्रकारचे आंदोलने करीत आहेत. सुरुवातीला जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी, त्यानंतर जलसंपदा विभागाच्या जायकवाडी व औरंगाबाद येथील कार्यालयात घुसून आंदोलन करण्यात आले. मागच्या आठवड्यात आंदोलनकारी शेतकऱ्यांनी औरंगाबादचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला होता.

आठ दिवसांच्या विरामानंतर शेतकऱ्यांनी टाकळी अंबड भागातील गोदावरी नदीच्या पात्रात पुन्हा एकदा 'जागर पाण्याचा' हे आंदोलन केले. यावेळी, आंदोलकांनी वाळवंटात भजन, कीर्तन केले. बंधाऱ्यात पाणी न सोडणाऱ्या शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनात, अशोक नरके, हनुमान बेळगे, प्रदीप नरके, द्रोर्णचार्य नरके, भाऊसाहेब नरके, सुनील कुलकर्णी, ईश्वर वाकडे, अशोक गांगले, रमेश देवा, युवराज वाकडे, ज्ञानेश्वर नरके, अमोल वाकडे, बाळू बालैय्या, सतीश नरके, अशोक गोर्डे, ज्ञानेश्वर वाकडे, प्रशांत नरके, उमेश वैद्य, देविदास वाकडे, कृष्णा चोरमले, कांता भाकड, राम वैद्य, गणेश काळे, संदीप भालेकर, साई काळे, बाबुराव बोरुडे, मगबुल पठाण, लक्ष्मण लांडगे, वाघमोडे बाबा, दादा पवार, सुनील जाधव, विकास चेके, सोनवणे, बंडू गवारे, नंदू गोर्डे, अनिल जाधव, कृष्णा भुसारे, अनिल काकडे यांच्यासह मोठ्यासाख्येने शेतकरी उपस्थित होते.

\Bआजपासून 'भजन आणि भोजन' आंदोलन\B

जायकवाडी धरणातून आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकरी व अन्नदाता शेतकरी संघटनेने सहा मेपासून विविध आंदोलने सुरू केली आहेत मात्र, प्रशासनास आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. यामुळे आम्ही सोमवारी, पाण्याविना तडफडणारे प्राणी व माणसासाठी पाणी सोडण्याची प्रशासनाला सद्बुद्धी देवो यासाठी माऊलीला साकडे घातले आहे. मंगळवारपर्यंत पाणी सुटले नाही तर, बुधवारी गोदावरी महामंडळाच्या दारात 'भजन आणि भोजन' आंदोलन केले जाईल व रात्री अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर जागरण, गोंधळ घातले जातील, असा इशारा शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबादः टंचाईसदृश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दूध, अंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये यंदा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी टंचाईसदृश परिस्थिती घोषित केली आहे. या जिल्ह्यांमधील ४,०२८ गावांमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात तसेच सध्या उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारात आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्यात यावीत, असा आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाळी सुटीत सध्या २०० जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार सुरू आहे. या ठिकाणी लगेचच व उर्वरित शाळांमध्ये १५ जून२०१९ पासून विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आदेशात म्हटल्याप्रमाणे शाळेतील पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या दुष्काळी अथवा टंचाईसदृश भागातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर शालेय पोषण आहारात आठवड्यात तीन दिवस पूरक आहार मिळावा, म्हणून प्रति विद्यार्थी १५ रुपये दर आठवड्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेचे शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, शरद शहापूरकर, विनोद पवार, मच्छिंद्र भराडे, किशोर कदम, मच्छिंद्र शिंदे, रमेश जाधव, साहेबराव धनराज, धनंजय परदेशी, मीरा जाधव, शगुफ्ता फारुकी, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, उर्मिला राजपूत आदींनी स्वागत केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...दे अनुदान, सुटे दुष्काळी गिरान!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील ३२ लाख दुष्काळी शेतकऱ्यांसाठी सरकारने अनुदान वाटपाचे तीन टप्प्यांतील अनुदानाची रक्कम दिली असली तरी, उर्वरित ७९२ कोटी रुपये आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले होते. आता आचारसंहिता संपली असून, हे अनुदान कधी मिळणार असा प्रश्न आहे.

सरकारने मदत म्हणून विभागाला यंदा २,५६४ कोटी ९१ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये १७७२ कोटी ७१ लाख रुपयांची मदत त्या- त्या जिल्ह्यांना वितरित करण्यात आली. यातील बहुतांश रकमेचे वाटपही पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित रक्कम मराठवाड्याला न मिळाल्यामुळे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा दुष्काळामुळे मराठवाड्यातील ४८ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिके करपली आहेत. ९० टक्के शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झालेल्या पाच हजार ५१७ गावांपैकी केवळ पाच हजार २२७ गावातील २९ लाख २७ हजार ९१३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी २७ लाख २२ हजार ५२२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नियमाप्रमाणे अनुदानही मिळाले असले तरी, उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप छदामही पडलेला नाही. शिल्लक अनुदान आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले होते. आता मात्र आचारसंहिता संपुष्टात आली असून आता शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहेत.

- ५५१७ - दुष्काळ घोषित गावे

- १७७२ कोटी ७१ लाख - प्राप्त अनुदान

- ७९२ कोटी २० लाख - शिल्लक अनुदान

- ३२ लाख ९८ हजार ३३७ एकूण शेतकरी

- २९ लाख २७ हजार ९१३ शेतकऱ्यांची यादी

- २७ लाख २२ हजार ५२२ शेतकऱ्यांना मिळाले पैसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोचिंग क्लासेसना बजावली नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुरत येथे दोन दिवसांपूर्वी कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाने शहरातील शैक्षणिक संस्थांबाबत कार्यवाही सुरू केली आहे. सोमवारी झालेल्या झाडाझडतीत दहा कोचिंग क्लासेसना नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिका अग्निशमन विभागाच्या कार्यक्षेत्रातील कोचिंग क्लास, शाळा, महाविद्यालय यांच्याकडे 'फायर एनओसी' संदर्भात विचारणा सुरू केली आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी फायर एनओसी घ्यावी यासाठी विद्यापीठाला, शाळांच्या फायर एनओसीसाठी जिल्हा परिषद तर तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांसाठी तंत्रशिक्षण विभागाला यापूर्वीच नोटीस बजावली आहे. सोमवारपासून अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासची झाडाझडती सुरू केली. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, शहरात किमान २०० कोचिंग क्लासेस आहेत. त्यातील ४० क्लासेसची व्याप्ती मोठी आहे. त्यांना फायर एनओसी आवश्यक असल्याचे बोलले जाते. यापैकी महापालिका अग्निशमन दलाने गायकवाड क्लासेस, बनसोड क्लासेस, निंबस अकादमी, चाटे कोचिंग क्लासेस, रिलाएबल क्लासेस, गुरुकुल आदींसह दहा कोचिंग क्लासेसना नोटीस बजावल्याचे सूत्रांनी सांगितले. या क्लासेसना नोटीस बजावून फायर एनओसीची विचारणा केली आहे. फायर एनओसी नसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

\Bयांना बजावली नोटीस

\B- गायकवाड क्लासेस

- बनसोड क्लासेस

- चाटे कोचिंग क्लासेस

- रिलाएबल क्लासेस

- गुरुकुल क्लासेस

- निंबस अकादमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार, पोलिसांत गुलमंडीवर हाणामारी

0
0

औरंगाबाद : राँगसाइड जाणाऱ्या दुचाकीस्वारास अडवल्याचा राग आल्याने दुचाकीस्वार तरुण आणि पोलिसांत जोरदार हाणामारी झाली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी गुलमंडीवरील बाजारपेठेत घडला. पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

गुलमंडीच्या बाराभाई ताजिया चौकात वाहतूक पोलिसांचा पॉइंट आहे. सोमवारी सायंकाळी वाहतूक शाखेचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी एका दुचाकीवर दोघेजण गुलमंडीकडून पैठणगेटकडे राँगसाइड जात होते. पोलिसांनी त्यांना अडवून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाले. यावेळी एका तरुणाने अचानक वाहतूक पोलिसाला मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहताच बघ्यांनी गर्दी केली. बाजारपेठेत हा प्रकार झाल्याने काही वेळातच या ठिकाणी गर्दी जमा झाली. इतर कर्मचाऱ्यांनी हा प्रकार सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र, हे तरुण एकण्याच्या मनस्थिती नव्हते. क्रांतीचौक पोलिसांना ही माहिती देण्यात आली. टू मोबाइल व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या तरुणांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार; हे तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी संबंधित कर्मचारी आणि तरुणांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमसरीत बिबट्या जेरबंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

आमसरी(ता. सिल्लोड) परिसरात पाच दिवसांपासन धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. या परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजऱ्यात कुत्र्याच्या पिल्याला भक्ष्य म्हणून ठेवण्यात आले होते. शनिवारी (२५ मे) पहाटे पाच वाजता भुंकत असलेल्या कुत्र्याच्या पिलाला पाहून भक्ष्याच्या लालचेने बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि वनविभागासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वनमजुराला पंजा मारून जखमी करून गेल्या पाच दिवसांपासून आमसरीत (ता. सिल्लोड) येथे धुमाकूळ घालणारा बिबट्याला अखेर पाच दिवसानंतर पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. आमसरी (ता. सिल्लोड) येथे सोमवारी (२० मे) रोजी बिबट्या अंबऋषी मंदिराजवळ पाणी पिण्यासाठी आला होता. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नागरिकांना पाहून बिबट्या कपारीत दडून बसला होता. या बिबट्याला हकलण्यासाठी वनमजूर दादाराव घुसळे गेले असता, बिबट्या दादाराव यांच्या डाव्या मांडीला पंजा मारून डोंगराकडे पळून गेला होता. बिबट्याच्या अधिवासाने परिसरातील ग्रामस्थ ही भयभीत झाले होते. पाच दिवसांत अधून मधून तो ग्रामस्थांना दर्शन देत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करीत होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जंगलात पिंजरा लावण्यात आला होता. पाच दिवसांनंतर पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबट्याच्या दहशतीने अंबऋषी संस्थानात येणाऱ्या भाविकांनी पाठ फिरविली होती. या बिबट्याला गौताळा अभय अरण्यात सोडण्यात येणार आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. मांगदरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्यांचा' विधानसभा निवडणुकीपूर्वी भीती पसरविण्याचा डाव

शांतता राखून विकास करणे हेच ध्येयः इम्तियाज जलील

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणूक निकालानंतर अफवा पसरवून शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी. शहरात शांतता राखून औद्योगिक विकासासह रेल्वे व विमान कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे,' अशी माहिती नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सोमवारी (२७ मे) पहिलीच पत्रकार परिषद घेऊन भूमिका पुढील वाटचाल स्पष्ट केली. अवैध व्यवसायाविरोधात पुन्हा संघर्ष करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शहरात शांतता आणि विकाससाठी अवैध धंदे बंद होण्याची गरज आहे. निवडणूक निकालानंतर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे काही पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. शहराची शांतता भंग करू पाहणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. जातीय तेढ निर्माण करणारा माझ्या किंवा कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार जलील म्हणाले की, औरंगाबाद शहरातील औद्योगिक विकासासाठी रेल्वे व विमान कनेक्टिव्हिटी वाढण्याची गरज आहे. विमान कनेक्टिव्हिटीकरिता स्पाईस जेट, इंडिगो आदी विमान कंपन्यांच्या व्यवस्थापनाची भेट घेणार आहे. त्यांना औरंगाबाद येथून जेट एअरवेजला मिळणाऱ्या प्रवाशांची संख्या, कार्गोची माहिती देऊन विमान सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. यावेळी शहराध्यक्ष समीर साजेद, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे, पालिका गटनेते सय्यद नासेर, माजी विरोधी पक्षनेते फिरोज खान, बाबा बिल्डर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. … 'समांतर' मोडित काढण्याची वेळ समांतर जलवाहिनी झाली तरच औरंगाबादकरांना पाणी मिळणार, असे चित्र उभे केले आहे. हा प्रकल्प रद्द करून, केंद्र, राज्य सरकारच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची वेळ आली आहे, असे खासदार जलील यांनी सांगितले. … गुटखा विक्री कुठे सुरू आहे, ते सांगा अवैध व्यवसायाबद्दल ते भूमिका मांडत असताना, एका पत्रकारांने शहरात गुटखा विक्री सुरू असल्याचे सांगितले. त्यावेळी तुम्ही अशा गुटखा विक्रीच्या जागा दाखवा पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू, असे त्यांनी सांगितले. खैरे आमचे मोठे बंधू… माजी खासदार चंद्रकांत खैरे हे २० वर्षांपासून माझे खासदार होते. आता मला कौल मिळाला आहे. शहराच्या विकासासाठी माजी त्यांनी आखलेले अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'येत्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज रहावे,' असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मान्सून नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद, सिंचन, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, पुरवठा व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पूर, अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटणे, दरड कोसळणे या व इतर नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडलेल्या आहेत, तसेच घडण्याची शक्यता आहे, अशा सर्व गावांमध्ये संरक्षक जॅकेट, बोटी इतर प्रतिबंधात्मक साधन सामुग्री सुस्थितीत तयार ठेवावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये ऐनवेळी कोसळणाऱ्या नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीत जीवीत तसेच वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यादृष्टीने मदतकार्य तातडीने उपलब्ध करून देणारी यंत्रणा सर्व संबंधितांनी कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीरित्या राबवाव्यात. जिल्हा तसेच तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष सुविधांसह तयार ठेवावेत. वैजापूर, पैठण, गंगापूर या तालुक्यातील नदीकाठच्या भागांमध्ये पोहण्याचा सराव असणाऱ्या जलतरणपटूंचा संघ तयार ठेवावा. त्यांना प्रशासनातर्फे ओळखपत्र आणि प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवावे. अतिवृष्टीमुळे व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये तीन महिने पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करून द्यावा. अतिवृष्टीमुळे, पुराच्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीत जीवीत संरक्षणासाठी शाळा, मंदिरे इतर सुरक्षित ठिकाणे तयार ठेवावीत. वीज, गारपीट, पाणी घरात घुसणे या दुर्घटनांचे तत्काळ पंचनामे करावेत. सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी नदीपात्राची मर्यादा रेषा (ब्लू लाइन) पार करून नदीपात्रात अतिक्रमित केलेल्या घरे, झोपड्या त्वरित हलवावेत. त्यासोबतच या काळात उत्तम आरोग्यसेवा, कायदा सुव्यवस्था आवश्यक मदतकार्य तातडीने उपलब्ध करून देण्यास प्रथम प्राधान्य द्यावे. त्यासाठी सर्व संबंधितांनी दक्षतेने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले.

\B१७७ लाइफ जॅकेट, १३ बोटी

\Bआपत्ती व्यवस्थापनामध्ये पूर परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या बोटी १३ बोटी असून, १७७ लाइफ जॅकेट आहेत. यासह इल्फाटेबल लाइटिंग टॉवर १०, सर्च लाइट १८, जेसीबी, कॉक्रीट कटर १, फोल्डिंग स्ट्रेचर ७, यासह वुडकटर, फोम जनरेटर, फायर टेंडर व इतर साधन सामुग्रीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घृष्णेश्वर’वर जप्ती

0
0

विजय चौधरी, खुलताबाद

सहकारी तत्वावर उभारण्यात आलेल्या घृष्णेश्वर साखर कारखान्याची खाजगीकरणानंतरही घरघर चालूच आहे. ऊस गाळप हंगाम २०१८-१९मधील ३९ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये थकित 'एफआरपी'प्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील घृष्णेश्वर शुगर लि. कारखान्यावर जप्तीच्या कारवाईचे आदेश काढले आहेत. साखर आयुक्तांनी थकित रक्कम जमीन महसूल प्रमाणे वसुलीसाठी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामार्फत कारखान्याला 'एफआरपी'ची थकित रक्कम त्वरित जमा करण्याची नोटीस बजावली आहे.

घृष्णेश्वर कारखान्याकडे गाळप हंगाम २०१८-१९मधील १५ फेब्रुवारी २०१९ अखेरच्या ऊसदराचे देयबाकी अहवालानुसार कारखान्याकडे १५०२.५३ टन उसाचे निव्वळ 'एफआरपी'प्रमाणे ऊस उत्पादकांचे २६ कोटी १२ लाख ५० हजार रुपये होतात. त्यापैकी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकही पैसा दिला नाही. 'एफआरपी'च्या विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, घृष्णेश्वर (खासगी ) ३९ कोटी २५ लाख ३६ हजार रुपये थकित राहिलेले आहेत. याप्रकरणी साखर आयुक्तालयाने कारखान्यांच्या सुनावण्या घेऊन म्हणणे ऐकून घेतलेले होते. थकित एफआरपी रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 'एफआरपी' रक्कमेवर १५ टक्के होणारे व्याज ही रक्कम संबंधित कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करून त्यामधून वसूल करावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्यांच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पद्धतीने विक्री करून या रक्कमेतून ऊस नियंत्रण आदेश १९६६मधील तरतुदीनुसार देयबाकी रक्कमेची खात्री करून संबंधितांना विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्यास

प्राधिकृत केल्याचेही आदेशात नमूद केले आहे.

\Bतहसीलची अकृषिक थकबाकी

\Bघृष्णेश्वर साखर कारखान्याकडे तहसील कार्यालयाची अकृषिक कराची तीन कोटी २४ लाख २३ हजार ६१० रुपये थकबाकी आहे. या वसुलीसाठी देखील तहसीलदारांनी कारखान्याला नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या कामासाठी नांदगावात ‘रास्ता रोको’

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

राष्ट्रीय महामार्गाच्या नांदगाव ते शिऊर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे थांबलेले काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी नांदगाव, चांडगाव, पानव, पानवी खंडाळा, लाख खंडाळा व परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारी नांदगाव येथे सुमारे दोन तास 'रास्ता रोको' आंदोलन केले. या आंदोलनामुळे नाशिक - औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.

हे आंदोलन तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंजाहरी गाढे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. वैजापूर शहरातून जाणाऱ्या राज्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले असून, त्याअंतर्गत नांदगाव ते शिऊर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या कंत्राटदाराने मातीकामास सुरुवात केली असून, त्याठिकाणी यंत्रसामग्री आणली आहे, परंतु मागील काही दिवसांपासून हे काम अर्धवट सोडण्यात आल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांना धुळीचा त्रास होत आहे. अपूर्ण कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे काम सुरू करण्याची मागणी उपविभागिय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्याकडे करण्यात आली होती. यावर कार्यवाही न झाल्याने सकाळी दहा वाजता नांदगाव, चांडगाव, पानव व परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.

अशोक राहणे, मोहन साळुंके, बाळासाहेब गायकवाड, अमोल बावचे, शंकर कदम, सोपान तुरकणे, राजू राहणे, जगन गायकवाड, गोविंद गायकवाड, सागर कोल्हे, प्रमोद कोल्हे, सागर थोट, दीपक बढे, ध्रुपद राहणे, मंगल राहणे, लता त्रिभुवन, चंद्रकला कोल्हे, बानुबाई पठाण आदींनी 'रास्ता रोको'त सहभाग नोंदवला. नायब तहसिलदार रमेश भालेराव यांनी निवेदन स्वीकारून आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा योजना मार्गी लावा : बागडे

0
0

औरंगाबाद : औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यांतील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करा. आवश्यकता भासल्यास पुन्हा योग्य उद्भव शोधा. त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

फुलंब्री मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसह खरीप हंगामाची तयारी, रोजगार हमी योजनांच्या कामासंबंधी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (२७ मे) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बागडे बोलत होते या बैठकीसाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले आदींसह कृषी व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मान्सून काही दिवसांवर येऊ ठेपला असल्याने खरीप हंगामाची पूर्व तयारी कृषी विभागाने कशी केली आहे, बियाणे-खतांची आवश्यकता आणि उपलब्धता, संभाव्य किडींचा प्रादूर्भाव व इतर संकटे आणि त्यावरील उपाययोजनांविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बागडे यांनी माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भादतीतून चार बालके बेपत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

भादली (ता. वैदापूर) येथील चार अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार त्याच्या पालकाने शिऊर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही मुले शनिवारी सकाळी बेपत्ता झाली असून, घरच्यांनी त्यांचा नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला. अद्याप त्यांचा ठावठिकाणा नसल्याने अखेर संतोष लक्ष्मण मोरे व सखाराम मोगल सोनवणे यांनी शिऊर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे.

बाळू संतोष मोरे (१२, इयत्ता सहावी), समाधान भानुदास सोनवणे (११, इयत्ता पाचवी), विक्रम भानुदास सोनवणे (दहा, इयत्ता चौथी), विलास सखाराम सोनवणे (१५, इयत्ता आठवी) हे जिल्हा परिषदेच्या भादली येथील शाळेत शिक्षण घेतात. हे चौघे शेळ्यांसाठी पाला आणतो, असे सांगून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत, असे संतोष मोरे यांनी सांगितले. बाळू हा संतोष मोरे यांच्या मुलगा असून, समाधान व विक्रम हे दोघेही संतोष यांच्या साडूची मुले आहेत. त्यांचे वडिलांचे निधन झाल्यापासून ती संतोष मोरे यांच्या घरीच राहतात. संतोष मोरे हे भादली येथे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात तर, विलास हा शेजारी राहणाऱ्या सखाराम सोनवणे यांचा मुलगा असून, तेही मोलमजुरी करतात.

याबाबत संतोष मोरे व सखाराम सोनवणे यांच्या फिर्यादी वरून शिऊर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गात याच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रकाश जाधव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images