Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘त्यांचा’ विधानसभा निवडणुकीपूर्वी भीती पसरविण्याचा डाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकसभा निवडणूक निकालानंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेच्या मनात भीती निर्माण करत आहेत. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे ते जनतेला घाबरवून त्यांच्यापासून दूर गेलेल्या मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत,' असा आरोप नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 'जिल्ह्यात शांतता राखून विकासासाठी प्रयत्न करेन, याकरिता गरज पडल्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे मार्गदर्शन घेण्यास कचरणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयात सोमवारी (२७ मे) सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद येथून विमान व रेल्वे सेवा वाढविणे, कौशल्य विद्यापीठ स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी विजयी झाल्यापासून अनेक अफवा पसरवून नागरिकांना घाबरविले जात आहे. पुढील निवडणुकीत मतदारांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना विकासाबाबत विचारणा करू नये यासाठी आतापासून असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थितीत करून भीती निर्माण केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना 'एआयएमआयएम'कडून मदत झाली नसल्याच्या आरोपबद्दल विचारले असता ते म्हणाले, स्वत:चा प्रचार सोडून खासदार ओवेसी यांनी सोलापूर येथे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी १० मे रोजी प्रचार केला. या सभेला मोठी गर्दी झाली होती. मात्र, मुंबई येथील काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन 'वंचितां'विरोधात प्रचार केल्याची माहिती कळाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून वंचित बहुजन आघाडी आणि 'एआयएमआयएम' चा समर्थ पर्याय मतदारांपुढे उभा केला जाईल, ही आघाडी राज्यात नवीन बदल घडवेल, असे ते म्हणाले.

\Bसर्व समाज घटकांचा पाठिंबा \B

मला मिळालेला कौल हा मुस्लिम आणि दलित समाजाची मते जास्त असल्याची चर्चा केली जात आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रत्येक भागातून मला जास्त मते मिळाली आहे. समाजातील प्रत्येक घटकांमधून मला पाठिंबा मिळाला, असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाण्यासाठी ‘टेंभापुरी’त उपोषण

0
0

वाळूज महानगर : गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी धरणात जायकवाडीचे 'बॅक वॉटर' आणण्यासाठी धरण बचाव कृती समितीने २७ मेपासून धरणात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

टेंभापुरी मध्यम प्रकल्पातून परिसरातील जवळपास २९ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय पेय जल योजना व विविध योजनेंतर्गत विहीर खोदून पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जातो मात्र, २०१२नंतर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याने या धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी राबवलेल्या योजनेतील कोट्यवधी रुपयाची यंत्रणा धूळखात पडून आहे. या धरणात पैठण धरणातील बॅक वॉटर गोदावरी नदीतून 'लिफ्ट' करून सोडण्याचा; तसेच औरंगाबादहून वाहणाऱ्या खाम नदीच्या पुराचे पाणी धरणात वळवण्याचा प्रस्ताव परिसरातील नागरिक व धारण बचाव कृती समितीने मांडला होता. यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही धरणात पाणी आणण्याचे काम होत नसल्याने सोमवारपासून धारण बचाव कृती समितीने धरणातच उपोषण सुरू केले आहे. कायगाव येथून 'बॅक वॉटर' सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे धरणात पाणी आणणे, महालक्ष्मी खेडा मांगेगाव येथील बंद पडलेली लिफ्ट योजना दुरुस्त करून पाणीपुरवठा करणे, नांदूर माधमेश्वरचे पाणी कालव्याद्वारे आणणे, नारायणपूर येथे उंच बंधारा बांधून पाइप लाइनने दाबतंत्राद्वारे पाणी आणणे, रामराई प्रकल्पातील पाणी शुद्ध करून वापरात घेणे, धरणग्रस्तांना प्रमाणपत्र देणे, परिसरातील नदी नाले खोलीकरण करून जोडणी करणे, धरणाच्या पोट चाऱ्याचे काम करणे; तसेच शाखा अभियंतांची बदली करणे आदी मागण्या कृती समितीने केल्या आहेत.

हा प्रकल्प रोजगार हमी योजनेतून १९७८मध्ये सुरू झाला होता. त्याचे काम १९९४मध्ये पूर्ण झाले. आतापर्यंत हे धरण फक्त दोन वेळा भरले. या प्रकल्पासाठी परिसरातील जवळपास ९०० एकर सुपीक जमीन संपादित केली आहे. या जमिनीचा मोबदला तुटपुंजा मिळाला असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. अनेक वेळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे मागण्याचे निवेदन दिले आंदोलन केली, परंतु आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यामुळे या धरणात पाणी उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी उपोषणार्थींनी केली आहे. यावेळी राहुल ढोले, बद्रीनाथ गुंजाळ, संतोष खवले, विशाल ढोले, रमेश गुंजाळ, कृष्णा भराड, उद्धव ढोले, शिवाजी ढोले, भरत जाधव, ज्ञानेश्वर गुंजाळ, ज्ञानेश्वर इंगळे, सुरेश ढोले, बाळू शिंदे, नानासाहेब बोरुडे, भगवान ढोले, गोपाल गुंजाळ आदींसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

\Bअधिकाऱ्यांकडून पत्र\B

नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणार्थींची भेट घेतली मात्र, या मागण्या विविध खात्यांशी संबंधित असल्याने; तसेच टेंभापुरी प्रकल्प बांधकाम विभागाकडून आमच्याकडे फक्त सिचन व्यवस्थापनासाठी हस्तांतरित केला आहे, असे लेखी पत्र दिले. यावेळी कार्यकारी अभियंता विजय लाड, उपअभियंता प्रशांत वनगुजरे, शाखा अभियंता राजन खापर्डे यांनी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भादलीतून चार बालके बेपत्ता

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

भादली (ता. वैदापूर) येथील चार अल्पवयीन मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असल्याची तक्रार त्याच्या पालकाने शिऊर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही मुले शनिवारी सकाळी बेपत्ता झाली असून, घरच्यांनी त्यांचा नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला. अद्याप त्यांचा ठावठिकाणा नसल्याने अखेर संतोष लक्ष्मण मोरे व सखाराम मोगल सोनवणे यांनी शिऊर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे.

बाळू संतोष मोरे (१२, इयत्ता सहावी), समाधान भानुदास सोनवणे (११, इयत्ता पाचवी), विक्रम भानुदास सोनवणे (दहा, इयत्ता चौथी), विलास सखाराम सोनवणे (१५, इयत्ता आठवी) हे जिल्हा परिषदेच्या भादली येथील शाळेत शिक्षण घेतात. हे चौघे शेळ्यांसाठी पाला आणतो, असे सांगून शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत, असे संतोष मोरे यांनी सांगितले. बाळू हा संतोष मोरे यांच्या मुलगा असून, समाधान व विक्रम हे दोघेही संतोष यांच्या साडूची मुले आहेत. त्यांचे वडिलांचे निधन झाल्यापासून ती संतोष मोरे यांच्या घरीच राहतात. संतोष मोरे हे भादली येथे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात तर, विलास हा शेजारी राहणाऱ्या सखाराम सोनवणे यांचा मुलगा असून, तेही मोलमजुरी करतात.

याबाबत संतोष मोरे व सखाराम सोनवणे यांच्या फिर्यादी वरून शिऊर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गात याच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रकाश जाधव करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मोहम्मद अब्दुल हक्क फारूखी

0
0

निधन वार्ता

अब्दुल हक्क फारुखी

औरंगाबाद : रोहिला गल्ली एकखाना मशिदीच्या समोरील रहिवासी मोहम्मद अब्दुल हक्क फारुखी (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटीचौक येथील मशिदीत अदा करण्यात आली. त्यांच्यावर पंचकुआ दभनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर, वाहेद कलाम उर्दू साप्ताहिकाचे संपादक वाहेद फारुखी यांचे ते सासरे होतं. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत सराफा कारागिराची सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एक लाख रुपयांसाठी सराफा बाजारातील कारागिराचे अपहरण केल्याचा प्रकार १९ मे रोजी घडला होता. सिटीचौक पोलिसांनी सोमवारी पहाटे या अपहृत कारागिराची बीड येथून सुटका केली आहे. आरोपी महेश उर्फ पप्पू राजूभाऊ टाक (वय ३१, रा. कोथळा, ता. माजलगाव) याला अटक करण्यात आली. आरोपीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी दिले.

अपहरण करण्यात आलेला संतोष गोफणे हा सराफा बाजारातील सावखेडकर ज्वेलर्समध्ये कारागिराचे काम करतो. १९ मे रोजी दुपारी चार वाजता दुकानात त्याला भेटण्यासाठी आलेल्या दोघांनी त्याला चहा पिण्याच्या बहाण्याने बाहेर नेत सोबत नेले. त्या दिवशी रात्री बारा वाजता गोफणे यांनी पत्नी स्वातीच्या मोबाइलवर कॉल करीत महेश टाक याने आपल्याला माजलगावला आणले असून, एक लाख रुपयाची मागणी करीत असल्याचे सांगितले. स्वाती यांनी ही माहिती नातेवाईकांना सांगितली. यानंतर दुसऱ्या दिवशी २० मे रोजी पहाटे आरोपी टाक याने स्वाती यांना फोन करून एक लाखाची मागणी केली. यानंतर स्वाती यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र अपहरणकर्त्यांच्या भितीपोटी गोफणे यांनी आपले अपहरण झाले नसल्याचे सांगितले. यानंतर देखील आरोपींनी स्वाती यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. सिटीचौक पेालिस ठाण्यात याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी पीएसआय पोमनाळकर यांनी रविवारी मध्यरात्री माजलगाव गाठत शेतात खोलीत डांबून ठेवलेल्या संतोष गोफणे याची सुटका केली; तसेच आरोपी महेश टाकला अटक करीत शहरात आणले.

आरोपी महेश टाक याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी गुन्हा गंभीर असून, आरोपीने गोफणे यांना साथीदारांच्या मदतीने पळवून नेले त्याचा तपास करणे आहे. गुन्ह्यात कोणते वाहन वापरले याचा तपास करायचा आहे. आरोपींनी गोफणे यांना मारहाण केली असून, त्यांची वैद्यकिय तपासणी करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची रस्त्यावर गस्त वाढवणार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तानंतर शहर पोलिस दलाची नियमित कामाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात शहरात आता रस्त्यावर पोलिसांची गस्त वाढवणार असून, कळीचे मुद्दे ठरणाऱ्या छोट्या-छोट्या बाबीवर देखील आता पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. आगामी काळात विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम देखील लवकरच वाजणार आहेत. पोलिसांना सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तामधून तात्पुरता दिलासा मिळाला आहे, मात्र पोलिसांना हा दिलासा तात्पुरता आहे. सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू आहे. यामुळे पोलिसांचा बंदेाबस्त कायम आहे. या बंदोबस्तानिमित्ताने शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. यामध्ये बीट मार्शल, पीसीआर मोबाइल आदीचा समावेश आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी ही माहिती दिली.

\Bकिरकोळ कारणावर ठेवणार लक्ष\B

गेल्या वर्षी मे महिन्यात नवाबपुरा भागात दंगल उसळली होती. या दंगलीचे एक कारण फेरीवाल्यांचे भांडण ठरले होते. शहरात अनेक ठिकाणी फेरीवाल्यांची गर्दी आहे. यामध्ये पैठणगेट, गुलमंडी, शहागंज, गजानन महाराज चौक आदीचा समावेश आहे. या ठिकाणी देखील किरकोळ वाद होऊ नये या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅकमेलला कंटाळून मुलीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतनगर भागात २४ मे रोजी सकाळी पूनम अर्जुन वाघाळे (वय १६) या दहावीतील मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. मावस भाऊ आणि गावातील तरुण ब्लॅकमेल करीत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला असून, याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनम ही मुळची रोहेगाव (ता. सेलू, जि. परभणी) येथील रहिवासी आहे. तिने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. तिला गावातीलच अक्षय आश्रुबा साळवे हा नेहमी त्रास देत होता. त्याला पूनमचा मावसभाऊ सोनू शिवाजी रगडे (रा. झरी, ता. जिंतूर) हा मदत करीत होता. या प्रकाराला कंटाळून पूनमचे वडील अर्जुन वाघाळे यांनी पुनमला १८ मे रोजी औरंगाबादला त्यांचा भाऊ राजेश वाघाळे (रा. भारतनगर) याच्याकडे राहण्यास पाठवले होते. दरम्यान, २३ मे रोजी रात्री अर्जुन वाघाळे यांनी सोनूला बोलावून पूनमला त्रास का देता, याबाबत विचारणा केली. यावेळी सोनूने अक्षयबाबत काही माहिती नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर अर्जुन वाघाळे यांनी पूनमला मोबाइल करून याबाबत विचारणा केली. यावेळी तिने अक्षय आणि सोनू त्रास देत असल्याचे सांगीतले. यावेळी सोनूने मोबाइल घेत पूनमला,'काही सांगू नकोस नाही तर आपले तिघांचे फोटो व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर टाकून बदनामी करतो,' अशी धमकी दिली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पूनमने औरंगाबादला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अर्जुन वाघाळे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अक्षय साळवे आणि सोनू रगडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएसआय कापसे तपास करीत आहेत.

\Bभाऊच ठरला घातकी\B

पूनमला अक्षय हा नेहमीच त्रास देत होता. दुसऱ्या गावी राहणारा पूनमचा भाऊ सोनू रगडे हा रोहेगावला येऊन अक्षयला या कामी मदत करीत होता. यामुळे पूनम त्रासून गेली होती. तिच्या वडिलांसमोरच सोनूने तीला ब्लॅकमेल करीत बदनामीची धमकी दिली. यामुळे हतबल झालेल्या पुनमने दुसऱ्या दिवशी पहाटेच आत्महत्येचा निर्णय घेत जीवनयात्रा संपवली.

आरोपींनी पूनमला फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली आहे. हा तांत्रिक पुरावा महत्त्वाचा आहे. तपासात हा मोबाइल जप्त करण्यात येणार असून, तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

- घनश्याम सोनवणे, सहायक पोलिस निरीक्षक, पुंडलिकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांची रस्त्यांची यादी २१५ कोटींची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सव्वाशे कोटींच्या निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाची यादी महापालिका आयुक्तांनी अंतिम केली असून, त्यांच्या यादीत तब्बल २१५ कोटी रुपये किंमतीचे रस्ते आहेत. उर्वरित रक्कमेसाठी शासनाकडे जास्तीचे अनुदान मागण्यात येणार आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्याशिवाय सव्वाशे कोटी रुपयांचे आणखीन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अनुदानातून कोणत्या रस्त्यांची कामे करायची याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत खल सुरू आहे. पदाधिकारी, गटनेत्यांनी एकत्रित येऊन ७९ रस्त्यांची यादी तयार केली. ही यादी आयुक्तांकडे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी देण्यात आली. सुमारे दीड महिन्यापासून ही यादी आयुक्तांकडे होती. मंगळवारी अखेर यादी अंतिम करून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्याबद्दल महापौरांशी चर्चा केली.

रस्त्यांची यादी तयार करण्यासाठी आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले होते. शहराच्या प्रत्येक भागात जाऊन त्यांनी रस्त्यांची पाहणी केली. रस्ते निवडण्यासाठी त्यांनी रँकिंगची पद्धत अवलंबली. रस्त्यांना शून्य ते दहा यादरम्यान गुण देण्यात आले. शून्य गुण पडलेला रस्ता सर्वात वाईट तर, दहा गुण पडलेला रस्ता थोड्या बऱ्या अवस्थेत असलेला, असे निकष ठरविण्यात आले. या रँकिंगनुसार शहराची गरज लक्षात घेऊन आयुक्तांनी रस्त्यांची यादी तयार केली. ही यादी २१५ कोटी रुपये किंमतीची झाली आहे. यादी तयार करताना त्यांनी नगरसेवकांशी देखील चर्चा केली. तयार करण्यात आलेली यादी आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सव्वाशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. आयुक्तांनी २१५ कोटींची यादी तयार केली. त्यामुळे जास्तीची रक्कम अनुदानाच्या स्वरुपात शासनाकडे मागण्यात येणार आहे.

\Bरस्त्यांची कामे बंद\B

शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून ३०पैकी १४ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. आता ही कामे बंद झाली आहे. वाढते ऊन आणि पाण्याचा प्रश्न यामुळे कामे करता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांनीच रस्त्यांची कामे तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांवर दबाव ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणी कुलगुरूंनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी भेट घेत आपली बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. दरम्यान, योगशास्त्राच्या विभागप्रमुखपदी डॉ. सुधाकर शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. योगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या पेपरला एका बाकावर दोन विद्यार्थी बसले होते. बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉपी केली. हा सामूहिक कॉपीचा प्रकार फाइन आर्ट विभागाच्या सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्यामुळे कॉपीबहाद्दरांचा शोध लागला नाही. योगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख बदलणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी जाहीर केले. तसेच कॉपीचा प्रकार घडला असल्यामुळे परीक्षेबाबत योग्य निर्णय घेण्यात असे सांगितले. या प्रकारामुळे योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंची भेट घेऊन म्हणणे मांडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे उपस्थित होते. प्रशासन चौकशी करीत असून योग्य निर्णय घेण्यात येईल. दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्र-कुलगुरू तेजनकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. योगशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांची परवानगी नसताना परीक्षा केंद्र परस्पर फाइन आर्ट विभागात हलवण्यात आले होते. परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय कुणाचा होता हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्याबाबत फाइन आर्ट विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर टाळाटाळ का करीत आहेत अशी विचारणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली. या प्रकारात डॉ. स्मिता साबळे यांचा हलगर्जीपणा दिसला आहे. मनमानी कारभार करून स्वत: परीक्षार्थी असलेले डॉ. जयंत शेवतेकर आणि डॉ. शिरीष अंबेकर यांच्यावर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी 'राविकाँ'ने केली आहे. कुलगुरुंना दिलेल्या निवेदनावर अमोल दांडगे, दीपक बहिर, आकाश हिवराळे, अक्षय गुरव, दीक्षा पवार यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा दबाव ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणी कुलगुरूंनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी भेट घेत आपली बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठ प्रशासन चौकशी करीत असून दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगशास्त्र विभागाच्या सामूहिक कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. योगशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्या पेपरला एका बाकावर दोन विद्यार्थी बसले होते. बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉपी केली. हा सामूहिक कॉपीचा प्रकार फाइन आर्ट विभागाच्या सीसीटीव्हीत चित्रीत झाला आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने अद्याप सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्यामुळे कॉपीबहाद्दरांचा शोध लागला नाही. योगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख बदलणार असल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोमवारी जाहीर केले. तसेच कॉपीचा प्रकार घडला असल्यामुळे परीक्षेबाबत योग्य निर्णय घेण्यात असे सांगितले. या प्रकारामुळे योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंची भेट घेऊन म्हणणे मांडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे उपस्थित होते. प्रशासन चौकशी करीत असून योग्य निर्णय घेण्यात येईल. दोषी नसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे प्र-कुलगुरू तेजनकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एकत्रित करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली. योगशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता साबळे यांची परवानगी नसताना परीक्षा केंद्र परस्पर फाइन आर्ट विभागात हलवण्यात आले होते. परीक्षा केंद्र बदलण्याचा निर्णय कुणाचा होता हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्याबाबत फाइन आर्ट विभागप्रमुख डॉ. शिरीष अंबेकर टाळाटाळ का करीत आहेत अशी विचारणा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली. या प्रकारात डॉ. स्मिता साबळे यांचा हलगर्जीपणा दिसला आहे. मनमानी कारभार करून स्वत: परीक्षार्थी असलेले डॉ. जयंत शेवतेकर आणि डॉ. शिरीष अंबेकर यांच्यावर संघटीत गुन्हेगारी अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी 'राविकाँ'ने केली आहे. कुलगुरुंना दिलेल्या निवेदनावर अमोल दांडगे, दीपक बहिर, आकाश हिवराळे, अक्षय गुरव, दीक्षा पवार यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभकल्याणच्या अध्यक्षाला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

गुंतवणुकदारला दोन लाख १५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणात शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आरोपी अध्यक्ष व कार्यकारी संचालक दिलीप शंकरराव आपेट याला सोमवारी रात्री पोलिसांनी बीड येथील कारागृहातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता एक जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी मंगळवारी दिले.

आरोपी दिलीप आपेटने शुभकल्याण सोसायटीद्वारे एक कोटी ६३ लाख ८७ हजार ७८९ रुपयांची अपहार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, प्रकरणात आतापर्यंत २७ गुंतवणुकदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. शुभ कल्याणच्या आपेटसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दहा जणांचा यापूर्वी अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. आपेटला २३ जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडीत रवागनी केली होती.

या प्रकरणात काकासाहेब उत्तमराव कोहकडे (५०, रा. भागवतगल्ली, ता. पैठण) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, कोहकडे यांची शुभकल्याण सोसायटीच्या पाचोड येथील शाखेचा व्यवस्थापक संतोष खरे याच्याशी पैठण येथील स्वामी समर्थ केंद्रात भेट होत होती. खरे याने नेहमी शुभकल्याणमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवा, म्हणून तगादा लावत होता. तुम्ही ठेवलेल्या रक्कमेवर योग्य व्याज मिळेल. तुमची रक्कम कुठलीही तक्रार न करता वेळेवर मिळेल, असे आमिष दाखविले होता. त्याला बळी पडून कोहकडे यांनी चार लाख पाच हजार रुपये पाचोड शाखेत फिक्स डिपॉझिट केले होते. त्यानंतर ते डिपॉझिट पैठण येथील शाखेत वर्ग करण्यात आले.

आरोपी आपेटला न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी आरोपीने दोन लाख १५ हजारांची रक्कम कुठे गुंतवली, कुठे वळवली याचा तपास करणे आहे असे सांगितले; तसेच इतर फरार आरोपींना अटक बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायलयाने आरोपीला एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. देशपांडे यांना सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

\Bनोटबंदीचे कारण\B

दरम्यानच्या काळात कोहकडे यांना प्लॉट खरेदी करायचा असल्याने ते पैठण येथील मॅनेजरला भेटले मात्र त्याने नोटबंदीचे कारण देत पैशे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कोहकडे यांच्या लक्षात आले. प्रकरणात पैठण पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलीचा आदेश याचिकेच्या निर्णयाधीन

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

पती-पत्नी एकत्रिकरण धोरणानुसार गेल्या वर्षी जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आलेल्या जोडप्यांपैकी एका शिक्षकाचे नाव पुन्हा बदलीच्या यादीत घालण्यात आले. याला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्या. आर. जी. अवचट यांनी राज्य शासनासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. शासनाने याचिकाकर्त्यांपैकी कोणाची बदली केली तर, त्या आदेशाची अंमलबजावणी या याचिकेच्या निकालाच्या अधीन राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१७च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण निश्चित केले आहे. त्यात विशेष संवर्ग भाग-दोनअंतर्गत पती-पत्नी एकत्रिकरण योजनेनुसार दोघांच्या बदलीच्या ठिकाणामध्ये ३० किलोमीटरचे अंतर असावे, असे स्पष्ट केले होते. या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आले असता खंडपीठाने त्या याचिका फेटाळल्या होत्या. त्यानंतर शासनाने १८ मे २०१८ रोजी शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानुसार संबंधित शिक्षक बदलीच्या जागी रुजू झाले होते. गेल्या वर्षांच्या बदल्यांच्या यादीत पती-पत्नीची नावे दर्शविण्यात आली होती.

शासनाने यावर्षी पुन्हा शिक्षकांच्या बदल्यांची यादी तयार केली. त्यात गेल्या वर्षी बदली केलेल्या पती-पत्नीपैकी एकाच्या नावाचा समावेश केला. २५ ते ३० मे २०१९पर्यंत प्रक्रिया पूर्ण करून ३१ मे २०१९ रोजी बदली आदेश काढावेत, असा आदेश दिला.

अहमदनगर जिल्हा परिषदेतील शिक्षक गजानन जाधव व इतर आणि त्यांचे जोडीदार अशा ३० जोडप्यांनी खंडपीठात आव्हान दिले. मागील वर्षीच त्यांची बदली झाली असल्यामुळे त्यांची नावे नवीन बदली यादीतून कमी करण्याची विनंती केली. राज्य शासनाने आठ मार्च २०१९ रोजी दुरुस्तीपत्र काढले आहे. त्यानुसार एकदा बदली केलेल्या शिक्षकाची तीन वर्षांपर्यंत बदली केली जाणार नाही, असे धोरण आहे, असा युक्तीवाद शिक्षकांचे वकील रामेश्वर तोतला यांनी केला. याचिकाकर्त्यांतर्फे रामेश्वर तोतला, राहुल तोतला, रामानंद करवा, गणेश यादव आणि पूजा विजयवर्गीय यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदनामीमुळे तरुणीची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्गमित्रांनी लॅपटॉप हॅक करून खासगी फोटो इतरांना शेअर केल्यामुळे जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजच्या (जेएनईसी) कंम्प्युटर सायन्स (संगणकशास्त्र) विभागातील विद्यार्थीनी गौरी सुशील खवसे (वय २३ रा. गारखेडा) हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गौरीने २४ मे रोजी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तिच्या आत्महत्येचे कारण गादीखाली सापडलेल्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झाले आहे. वर्गमित्रांनी तीचा लॅपटॉप हॅक करून तिचे खासगी फोटो चोरले व ते इतरांना शेअर केले. बदनामी झाल्यामुळे इतर विद्यार्थिनींनी तिच्याशी बोलणे कमी केले. यामुळे तणावात असलेल्या गौरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी सायीश कनाला, संकेत अडलक आणि पियूष डावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'जेएनईसी'च्या संगणकशास्त्र विभागाच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या गौरीचे वडील महावितरणमध्ये अधिकारी असून, भाऊ सौरभ जर्मनीला असतो. २४ मे रोजी सकाळी गौरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या काही दिवसांपासून गौरी ही मानसिक तणावात होती. कॉलेजमधील अनेक मित्र-मैत्रिणींनी तिच्याशी बोलणे सोडले होते. दरम्यान, २७ मे रोजी तिच्या वडिलांना तिच्या गादीखाली इंग्रजीमध्ये लिहिलेली एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीमध्ये तिचा वर्गमित्र सायीशने तिच्यासोबत केलेला फसवणुकीचा प्रकार, तिची कॉलेजमध्ये झालेली बदनामी, तिला मिळणारी वागणूक याचा सविस्तर उल्लेख होता. या सुसाइड नोटमुळे गौरीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले. याप्रकरणी मंगळवारी तिच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सायीश कनाला, संकेत अडलक आणि पियूष डावकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार फरताळे तपास करीत आहेत.

\Bमित्रांनेच केला विश्वासघात\B

गौरीचा सायीश हा वर्गमित्र होता. त्याने तिच्या मोबाइल आणि लॅपटॉपवरील तिचे खासगी फोटो पाहिले होते. हे फोटो त्याने चोरून घेत मित्रांसोबत शेअर केले. हा प्रकार कळाल्यानंतर गौरीला धक्काच बसला. गेल्या दोन महिन्यांपासून सायीशने दुसऱ्या मुलीशी मैत्री करीत गौरीला ब्लॅकमेल आणि छळणे सुरू केले होते.

\Bनामांकित आयटी कंपनीत होणार होती रुजू\B

गौरी ही सुशिक्षित कुटुंबातील असून, ती अभ्यासात हुशार होती. नुकतीच एका कॅम्पस मुलाखातीमध्ये तिची नामांकीत 'आयटी कंपनी'मध्ये निवड झाली होती. दोन महिन्यानंतर तिला ऑफर लेटर मिळून ती कंपनीत रुजू होणार होती मात्र, या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे गौरी तणावाखाली आली होती. तिला एका विषयात कमी मार्क मिळाल्याने तिने पुन्हा या विषयाची परीक्षा दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरिकांविरुद्धची तक्रार पालिकेने घेतली मागे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीप्रश्नावरून अभियंत्यांना मारहाण करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलिसात दिलेली तक्रार पालिका अधिकाऱ्यांनी मागे घेतली आहे. शनिवारी पाणीप्रश्नावरून सिडको एन तीन भागातील नागरिकांनी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांच्या नेतृत्वाखाली सिडको एन ५ येथील जलकुंभावर आंदोलन केले होते. यावेळी जी. बी. जगताप, ए. ए. चव्हाण यांनी मारहाण केल्याची तक्रार उपअभियंता के. एम. फालक यांनी दिली होती.

पोलिसांनी त्या दोघांच्या विरोधात कलम १८६, ३२३, ५०४, ३४नुसार गुन्हा दाखल केला. दाखल केलेला गुन्हा मान्य नसल्यामुळे सोमवारी पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून मारहाण करणाऱ्यांवर ३५३कलम दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी पोलिस आयुक्तांना देखील निवेदन दिले होते. त्यानंतर जगताप आणि चव्हाण यांच्याविरोधात ३५३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी अधिकाऱ्यांनी पोलिसात दिलेली तक्रार मागे घेतली. ही माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. ते म्हणाले, 'नागरिक आपलेच आहेत. पाणीप्रश्नामुळे त्रस्त झाल्याने त्यांच्या हातून ते कृत्य घडले. त्यांनी जाणूनबुजून ते कृत्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दिलेली तक्रार मागे घ्या अशी विनंती आम्ही अधिकारी - कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय पवार, सल्लागार सखाराम पानझडे व उपअभियंता के. एम. फालक यांना केली आहे. त्यांनी तक्रार मागे घेण्याचा शब्द दिला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचे करिअर आम्हीच ठरवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावीचा निकाल जाहीर झाला अन् त्यांनी करिअरबद्दलची ठाम मतं स्पष्टपणे सांगितली. अनेकांनी दहावीत उत्तम गुण मिळविल्यानंतरही कला शाखेला प्रवेश घेतला. वाणिज्य शाखा निवडलेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधी ओळखत प्रवेश निश्चित करून यश मिळविल्याचे सांगितले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. एकूण निकालाच्या टक्केवारी यंदा घट झाली तरी, कला व वाणिज्य विषयात चांगले गुण मिळवित विविध कॉलेजांमध्ये अव्वल राहणाऱ्यांनी आपल्या करिअरच्या वाटा पूर्वीच निश्चित केल्याचे दिसले. त्या दृष्टीकोनातून अभ्यास करून यश मिळविल्याचे या विद्यार्थ्यांनी स्षप्टपणे सांगितले. कला व वाणिज्य शाखेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विज्ञान शाखेपेक्षा वाणिज्य आणि कला शाखेत अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. कला शाखेत अनेकांना 'यूपीएससी'सह इतर स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र खुणावत आहे. वाणिज्य शाखेत 'जीएसटी' नंतर करिअरच्या संधी वाढल्याचे विद्यार्थ्यांना वाटते. त्यासह बँकिंग, चार्टर्ड अकउंटंट, सीएस करण्याबाबत पूर्वीच ठरविल्याचे सांगत या शाखेला प्रवेश घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यासह 'एमसीव्हीसी' अभ्यासक्रमातूनही अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंटसारख्या अभ्यासक्रमातूनही करिअरच्या वाटा विद्यार्थी शोधत आहेत.

\Bइंग्रजी माध्यम अन् कला शाखेतून ९४.१४ टक्के\B

दहावीला चांगले गुण मिळाले की, बहुतांशी विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी धावपळ करतात. स्वप्नजा शरदराव वालवडकर हिने दहावी परीक्षेत ९७.२ टक्के मिळवून ही कला शाखा निवडली आणि माध्यम इंग्रजी. तिने बारावी परीक्षेत ९४.१५ टक्के गुण मिळवित यशस्वी ठरली आहे. या विद्यार्थिनीने सांगितले की, सर्वजण विज्ञान शाखेला जात आहेत, तर आपणही जावे असे मला कधी वाटले नाही. 'यूपीएससी' करायचे असे दहावीनंतरच ठरवले होते. त्यासह काहीतरी नवीन आव्हानात्मक म्हणून इंग्रजीतून कला शाखेला प्रवेश घेतल्याचे तिने 'मटा'ला सांगितले.

अकरावी विज्ञान, बारावीत वाणिज्य

रेणुका गायकवाड हिने अकरावीत विज्ञान शाखा निवडली. मात्र, विज्ञान शाखेत मन रमेना. त्यामुळे शाखा बदलण्याचा निर्णय घेत वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. वर्षभर मेहनत करून अभ्यास केला. निकाल जाहीर झाला आणि ९४ टक्के गुण मिळविले आहेत. तिने आपला निर्णय सार्थ ठरविला. 'सीए' करण्याचा तिचा मानस आहे.

\Bनियमित तासिका अन् यश\B

शाळेपासून आर्थिक घडामोडींबाबत, वाणिज्य शाखेबाबत आकर्षण असलेल्या वैष्णवी आगळे हिने दहावीनंतर वाणिज्य शाखेतूनच शिक्षण घेण्याचे निश्चित केले होते. वडील वॉचमन आहेत, तर आई किराणा दुकानांमध्ये काम करते. घरच्या परिस्थितीचा बाऊ न करता कॉलेजमधील नियोजित तासिका करत वाणिज्य शाखेतून ९१.३८ टक्के गुण मिळवित यश मिळविले. बँकिंग, जीएसटीनंतर निर्माण झालेल्या संधी लक्षात घेऊन वाणिज्य शाखेतून शिक्षण घेण्याचे निश्चित केले होते, असे तिने सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॉलेज संलग्नीकरणात देवघेव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महाविद्यालय संलग्नीकरण समित्या पाहणी दौऱ्यात पैसे मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही प्राचार्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तर संलग्नीकरण समित्या रद्द करण्याची मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे. शैक्षणिक संघटना आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले.

विद्यापीठाशी संलग्नित चार जिल्ह्यातील ४१९ महाविद्यालयांची संलग्नीकरण प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी तीन सदस्यांच्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र, अपवाद वगळता बहुतेक समिती सदस्यांनी महाविद्यालयांना पैसे मागण्याचे प्रकार घडले आहेत. संस्थाचालक आणि प्राचार्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर समित्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. ही संलग्नीकरण प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे. महाविद्यालये पाहिल्यानंतर कोणत्या घटकाला किती गुण दिले याची माहिती महाविद्यालयाला कळत नव्हती. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी तक्रार केल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी तांत्रिक अडचण दूर केली. तसेच प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी करणार असल्याचे सांगितले. संलग्नीकरण पडताळणी समित्या तयार करण्यासाठी अधिष्ठातांना अधिकार दिले होते. त्यानंतर विद्या परिषदेने समिती निर्मितीसाठी डॉ. शंकर अंभोरे, प्राचार्य मधुसूदन सरनाईक आणि प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार यांची समिती नेमली. या समितीने इतर उपसमित्या नेमल्या आहेत. पारंपरिक महाविद्यालयांवर जाण्यासाठी समिती सदस्य इच्छुक नाहीत. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांची पाहणी करण्यासाठी वर्णी लावण्यावर भर आहे. त्यातून बीसीए, एमबीए, बीबीए, इंजिनिअरिंग महाविद्यालयांवर जाण्यासाठी अधिक प्राध्यापक उत्सुक आहेत. व्यावसायिक महाविद्यालये लाभदायक ठरल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. एकूण १४५ पारंपरिक महाविद्यालये असून व्यावसायिक अभ्यासक्रम असलेली २०० आहेत. कायम संलग्नीकरण असलेल्या महाविद्यालयांची संख्या १०८ आहेत. मात्र, या महाविद्यालयातही नवीन अभ्यासक्रम सुरू असल्यामुळे संलग्नीकरण बंधनकारक आहे. या महाविद्यालयांना समित्यांचा आर्थिक जाच सहन करावा लागत आहे. एका समितीत समाधानी नसलेल्या प्राध्यापकांनी संघटनांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे मनमानीपणे प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्राध्यापकांच्या गटांची मुख्य प्रशासकीय इमारतीत गर्दी वाढली आहे. उन्हाळ्याची सुटी असूनही प्राध्यापक समितीत घुसण्यासाठी दबावगट वापरत आहेत. येत्या पाच जूनपर्यंत संलग्नीकरण प्रक्रिया सुरू राहणार आहे.

\Bकॉलेजचा दर ५० हजार?

\Bमहाविद्यालय संलग्नीकरण प्रक्रियेत समितीची बडदास्त ठेवतानाच पैसे घेतले जात असल्याचा आरोप आहे. हा दर ३० हजार ते ५० हजार रुपये प्रतिसदस्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कॉलेजची पाहणी करण्यासाठी सदस्य इच्छुक आहेत. अपेक्षित सदस्य कॉलेजच्या भेटीला आणण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि संस्थाचालक यांचे संगनमत वाढले आहे. मागील वर्षीच्या संलग्नीकरणाची पत्रे अजूनही मिळाली नसल्याची महाविद्यालयांची तक्रार आहे. ही पत्रे घेण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी होण्याची शक्यता आहे. या आर्थिक देवाणघेवाणीने अनेक महाविद्यालये जेरीस आली आहेत.

अॅकॅडमिक ऑडिटच्या माध्यमातून एक आदर्श मॉडेल उभे करण्यात यश आले. मात्र, संलग्नीकरण समिती निवडीत प्रचंड हस्तक्षेप वाढला आहे. जास्तीत जास्त समित्यात वर्णी लावण्यासाठी प्राध्यापक लॉबिंग करीत आहेत. हा प्रकार चिंताजनक आहे.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

प्राचार्य, पूर्णवेळ प्राध्यापक-कर्मचारी नसलेली महाविद्यालये संलग्नीकरणात पात्र कशी ठरतात ? या प्रकारात नक्कीच आर्थिक व्यवहार असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज आहे.

- हनुमंत गुट्टे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीत आव्वाज मुलींचा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेच्या मंगळवारी लागलेल्या निकालात राज्यात पुन्हा एकदा मुलींचा दबदबा कायम आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत औरंगाबाद विभागाचा निकाल १.७५ टक्क्यांनी घसरला असून, सतत पाच वर्षांपासूनची घसरण यंदाही कायम आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. औरंगाबाद विभागातून एक लाख ६२ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख ४१ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी बारावीचा टप्पा पार केला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८७.२९ एवढी आहे. निकालात विभागाची २०१४पासून सलग घसरण पाहायला मिळाली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ५.७७ टक्क्यांनी अधिक आहे. विभागात निकालात मुलींनी मुलांच्या तुलनेत बाजी मारली असून, विभागात ६२ हजार ८४ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ५६ हजार २९५ उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९०.८६ एवढे आहे. विभागात एक लाख ५६२ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८५ हजार ४२० उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ८५.०९ एवढे आहे. मुलींच्या तुलनेत हे प्रमाण ५.७७ टक्क्यांनी कमी आहे.

निकालात औरंगाबाद जिल्ह्याने बाजी मारली असून, सर्वाधिक ८९.२२ टक्के निकाल जिल्ह्याचा आहे. त्यापाठोपाठ बीड ८८.२७ टक्के, जालना ८७.१२, परभणी ८४.५१ आणि हिंगोलीची निकालाची टक्केवारी ८०.२९ टक्के एवढी आहे.

\Bराज्याचा निकालातही घसरण

\Bराज्याच्या एकूण निकालातही अडीच टक्क्यांची घसरण झाली आहे. राज्यातून १४ लाख २१ हजार ९३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थ्यांनी बारावीचा टप्पा पूर्ण केला आहे. निकालाची टक्केवारी ८५.८८ एवढी आहे. राज्यात निकालात यंदाही कोकण पुढे आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९३.२३ टक्के एवढा निकाल आहे. त्यापाठोपाठ पुणे ८७.८८, अमरावती ८७.५५, औरंगाबाद ८७.२९, कोल्हापूर ८७.१२, लातूर ८६.०८, नाशिक ८४.७७, मुंबई ८३.८५, नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ८२.५१ एवढी आहे.

निकालातील टक्केवारी घसरण्यामागची कारणे सांगणे आवघड आहे. यंदा गैरप्रकारांची संख्या जास्तीची असून संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई निश्चित करण्यात आली. त्यात काही चौकशी सुरू असून, गैरप्रकारांमध्ये दोषी आढळलेल्यांवर कारवाई होईल.

- सुगता पुन्ने, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, औरंगाबाद

\Bवर्ष……………......... निकालाची टक्केवारी\B

२०१४…………....... ९०.९८

२०१५…………....... ९१.७७

२०१६…......……. ८७.८०

२०१७......……. ८९.८३

२०१८…………....... ८८.७४

\Bजिल्हानिहाय निकाल..

\Bजिल्हा..................निकालाची टक्केवारी

औरंगाबाद............८९.२२

बीड....................८८.२७

परभणी................८४.५१

जालना................८७.१२

हिंगोली................८०.७७

---

विभागात कनिष्ठ महाविद्यालय.....१२४०

परीक्षार्थी संख्या........................१६२३४४

उत्तीर्ण विद्यार्थी संख्या.................१४१७१५

---

मुले-मुली यांचा असा निकाल..

मुलींची उत्तीर्णतेची संख्या........५६२९५

निकालाची टक्केवारी..............९०.८६

मुलांची उत्तीर्णतेची संख्या...... ८५४२०

निकालाची टक्केवारी..............९०.८६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंवरील कारवाईसाठी लक्षवेधी मांडणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची योग्य चौकशी करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा लॉ कृती समितीने मुंबईत मंगळवारपासून (२८ मे) उपोषण सुरू केले. या गैरप्रकारातील दोषींवर कारवाई करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून आवाज उठवणार असल्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले. उपोषणार्थींशी मुंडे यांनी चर्चा करून माहिती जाणून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा लॉ कृती समितीने मुंबईच्या आझाद मैदानावर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. नियमबाह्य नियुक्त्या, आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेची चौकशी झाल्याशिवाय चोपडे यांना सेवानिवृत्तीचे लाभ आणि ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये, अशी समितीची प्रमुख मागणी आहे. कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ चार जूनला संपणार आहे. त्यापूर्वी मुंबईत उपोषण सुरू झाल्यामुळे चोपडे यांची कारकिर्द चर्चेत आली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात चोपडे यांच्या कामकाजात अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा समितीचा आरोप आहे. याबाबत राज्य सरकारने डॉ. एस. एफ. पाटील यांची चौकशी समिती नेमली होती. समितीने शासनाला अहवाल सादर केला असून, अद्याप अहवाल जाहीर करण्यात आला नाही. अहवाल जाहीर करण्याची समितीची मागणी आहे. चौकशी करूनच चोपडे यांना सेवानिवृत्तीचे लाभ व ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत समितीने अध्यक्ष नवनाथ देवकते यांनी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते. पण, दखल घेतली नसल्याने कृती समितीने उपोषण सुरू केले. २०१४-१५ व २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ झाली होती. या सात कोटी ७० लाख रुपये रकमेचा चोपडे यांनी हिशेब दिला नाही. तसेच विद्यार्थ्यांनाही रक्कम वाटप केली नाही. निविदांशिवाय 'नॅक' मूल्यांकनावर ५० कोटी रुपये खर्च केला. जाहिरात न देता विद्यापीठात नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्या, संलग्नित महाविद्यालयात प्राचार्य व उपप्राचार्यांची नियुक्ती करताना ज्येष्ठांना डावलण्यात आले. युजीसीच्या नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील प्राध्यापकांना बेकायदेशीर नियुक्त्या दिल्याचे समितीचे आरोप आहेत. या उपोषणात परमेश्वर इंगोले, नितीन माने, सुमेध आवारे, सुदर्शन धुमक, अमित तेलगोटे, कृष्णा साबळे आदी सहभागी झाले आहेत.

\Bमुंडे यांचे आश्वासन

\Bकुलगुरू चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरप्रकारातील दोषींवर कारवाई करण्यासाठी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. कृती समितीचे पदाधिकारी परमेश्वर इंगोले यांनी मुंडे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. राज्य शासनाने चौकशी समिती नेमल्यानंतरही कारवाई झाली नसल्याकडे इंगोले यांनी लक्ष वेधले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुण मिळवण्यात वाणिज्यचे विद्यार्थी सरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले, मात्र ९० टक्के किंवा यापेक्षा अधिक गुण असणाऱ्यांच्या यादीत वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. औरंगाबाद विभागात विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक ९४.४४ टक्के एवढी आहे.

बारावीचा निकाल मंगळवारी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये शाखानिहाय विद्यार्थी, निकालाची टक्केवारी लक्षात घेतली, तर सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेतील परीक्षार्थींची संख्या अधिक होती. निकालाच्या टक्केवारीतही शाखा सर्वात पुढे आहे. औरंगाबाद विभागातून ७७ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७३ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यानंतर वाणिज्य शाखेच्या निकालाची टक्केवारी ९०.६० एवढी आहे. या शाखेतून विभागातून १४ हजार १२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ७९४ विद्यार्थी पास झाले. कला शाखेतून परीक्षा दिलेल्या ६६ हजार नऊ विद्यार्थ्यांपैकी ५२ हजार ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागात कॉपी प्रकरणात ३७३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यासह एक विद्यार्थ्यावर तोतयेगिरी प्रकरणी कारवाई करण्यात आली. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना २९ मेपासून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी ७ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.

\Bस्पर्धा परीक्षांमुळे विज्ञानकडे दुर्लक्ष\B

वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठीच्या राज्य, देशपातळीवरील परीक्षांकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष असल्याने पुन्हा एकदा मंडळाच्या परीक्षेकडे विद्यार्थी कमी महत्त्व देत असल्याचे विषय तज्ज्ञांचे मत आहे. विज्ञान शाखा विविध एकूण निकालाच्या टक्केवारीत पुढे आहे. मात्र, दहावीत चांगले गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत कमी गुण मिळाल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहरातील विविध कॉलेजांमध्ये बारावी विज्ञान शाखेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणाऱ्यांपेक्षा वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

\Bपुनर्परीक्षार्थींचा निकाल ३३.७६ टक्के\B

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत पुनर्परीक्षार्थींच्या निकालाची टक्केवारी ३३.७६ एवढी आहे. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून सहा हजार ३१ पुनर्परीक्षार्थींनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी दोन हजार ३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर तालुक्याचा निकाल ८९.१२ टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

बारावीच्या परीक्षेत वैजापूर तालुक्यातील ८९.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ३० परीक्षा केंद्रावर एकूण ५२३३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ११३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, १९८२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली.

शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयाचा निकाल ८०.१५ टक्के लागला. हल्क ए दवानायक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८५.७१ टक्के, शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ३६.३६ टक्के, देवडोंगरी येथील विनायकराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय ८२.६७ टक्के, संत बहिणाबाई विद्यालय, शिऊर ९५.२५ टक्के, न्यू हायस्कूल दहेगाव ६१.५३ टक्के, विनायकराव पाटील विद्यालय, लोणी खुर्द ८८.८८ टक्के, विवेकानंद माध्यमिक विद्यालय गारज ९४.८२ टक्के, स्व. दादासाहेब पाटील विद्यालय वीरगाव ९१.९३ टक्के, भगिरथी विद्यालय नालेगाव ९०.५८टक्के, न्यू माध्यमिक विद्मालय लाडगाव ७८.२६ टक्के, संत जोसेफ माध्यमिक विद्यालय माळीघोगरगाव ७२.५० टक्के, श्रीराम कनिष्ठ विद्यालय वाकला ९७.७२ टक्के निकाल लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images