Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पगार मिळाला नाही, रेड्डीच्या कामगारांचे कामबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पगार मिळाला नाही म्हणून पी. गोपानाथ रेड्डी या कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन केले. यामुळे तीन - चार तास कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद होते. कामगार वारंवार काम बंद आंदोलन करीत असल्यामुळे महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे.

कचऱ्याच्या संकलन व वाहतुकीचे काम खासगीकरणातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन महिन्यापूर्वी या कंपनीने काम सुरू केले. तीनच महिन्यात कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला. पगार वेळेवर होत नाहीत, कामाचे तास ठरलेले नाहीत. जास्तीचे काम करावे लागते हे मुद्दे कामगारांकडून वारंवार उपस्थित केले जात होते. आता कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. सोमवारी झोन क्रमांक तीनच्या कामगारांनी चार तास काम बंद आंदोलन केले. पगार मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. मंगळवारी झोन क्रमांक दोन आणि नऊ मधील कामगारांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे या दोन्हीही झोन कार्यालयाच्या क्षेत्रात कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद होते. पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचे दीड कोटी रुपये महापालिकेकडे थकले आहेत. थकीत रकमेपोटी पालिकेने कंपनीला साठ लाख रुपयांचे पेमेंट केले आहे. त्यानंतरही कामगारांचे आंदोलन होत असल्यामुळे सोमवारी सायंकाळी आणखी पंचेवीस लाख रुपयांचे पेमेंट कंपनीला केल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. महापालिकेकडून पेमेंट मिळो किंवा न मिळो, कामगारांचा पगार कंपनीने करावा असा उल्लेख करारात आहे. असे असताना कामगार वारंवार आंदोलन का करतात, अशी विचारणा करणारी नोटीस महापालिकेने रेड्डी कंपनीला बजावल्याचे महापौर म्हणाले. कामगारांचे आंदोलन वारंवार होत असेल तर पालिकेला पर्यायी व्यवस्था करावी लागेल, असा उल्लेख महापौरांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पहिल्या बैठकीतील निर्णय अद्याप प्रलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहिल्या सर्वसाधारण सभेत झालेले निर्णय अद्याप अंमलात आलेले नाहीत. तेच ते निर्णय पुन्हा पुन्हा घ्यावे लागतात. ही बाब योग्य नाही. प्रत्येक कामासाठी 'टाइम बाउंड प्रोग्राम' ठरवा आणि ठरवल्यानुसार काम करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना दिले.

शहरातील विकास कामांसंदर्भात महापौर आणि आयुक्त यांच्यात सोमवारी सायंकाळी दीर्घ बैठक झाली. या बैठकीला सर्व विभागप्रमुख देखील उपस्थित होते. या बैठकीत झालेली चर्चा आणि घेण्यात आलेले निर्णय याबद्दल महापौरांनी मंगळवारी पत्रकारांना माहिती दिली. २०१४ - १५मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. निवडणूक झाल्यावर महापौर निवडले गेले. नवनिर्वाचित महापौरांच्या पहिल्या सर्व साधारण सभेत घेतलेल्या निर्णय व त्यानंतर वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची प्रशासनाने अद्याप अंमलबजावणी केली नाही. तेच ते निर्णय पुन:पुन्हा घ्यावे लागतात. निर्णय घेतल्यावर देखील कामे होत नाहीत, ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिली आणि प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी 'टाइम बाउंड प्रोग्राम' तयार करा आणि त्यानुसार काम करा, असे आदेश देण्यात आले.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याचे काम बुधवारपासून सुरू करण्याचे ठरले, असे महापौर म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची निविदा सादर करण्यासाठी चार जून ही शेवटची तारीख आहे. निविदा प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात चिकलठाणा येथील प्रक्रिया प्रकल्पाची चाचणी पाच जून रोजी घेण्यात येणार आहे. १५ किंवा १६ जून रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण केले जाईल, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले जाणार आहे. रस्त्यांच्या कामांना गती देणे, पाणीप्रश्न सोडवणे ही कामे देखील कालमर्यादा ठरवून पूर्ण केली जातील, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः हापूस खरेदीला ग्राहकांचा उंदड प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंबा महोत्सवास ग्राहकांचा मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर ग्राहकांच्या मागणीवरून गेल्या तीन दिवसांपासून कोकणातील शेतकरी पुन्हा एकवार हापूस विक्रीसाठी येथील जाधववाडीत दाखल झाले आहेत. ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मि‌ळत असून, येत्या एक जूनपासून जालन्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी यांनी दिली.

राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातर्फे जाधववाडी येथील बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये नुकताच पाच दिवसांच्या आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून आयोजित या महोत्सवात हापूस आंब्याच्या सुमारे अडीच हजार पेट्यांची विक्री झाली होती. ग्राहकांचा हा प्रतिसाद पाहात रत्नागिरी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण परिसरातील दापोली, संगमेश्वर, लांझा आणि रत्नागिरी येथील सुमारे दहा शेतकऱ्यांनी पुन्हा हापूस आंबा विक्रीसाठी आणला आहे. २५ मेपासून जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फूल मार्केटमध्ये या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, पुन्हा एकवार दर्जेदार हापूस आंब्याची चव चाखायला मिळत असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या चार दिवसांत हापूस आंब्याच्या शेकडो पेट्यांची विक्री झाली असून, येत्या एक जूनपासून जालना शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दळ‌वी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः चिकलठाण येथे आगीत ७ दुकाने भस्मसात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

चिकलठाण (ता. कन्नड) येथे मंगळवारी (२८ मे) सकाळी साडेसहाच्या सुमारास येथील बस स्थानकाजवळील सहा ते सात दुकानांना भीषण आग लागून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना सकाळी घडल्याने जीवितहानी टळली. आगीच कारण समजू शकले नाही.

चिकलठाण येथील ज्ञानेश्वर आत्माराम जैतमाल (मिस्त्री) यांचे लाकडाचे फर्निचरचे दुकान, सतीश वाल्मीकराव भोसले यांचे अॅटोपार्टचे दुकान, संजय विठ्ठल हिरे यांचे गणेश इंजिनीयरिंग वर्कशॉप, मन्सुरी गादीघर, बाबासाहेब दळे यांचे रसवंती गृह, अरूण गायकवाड यांचे सलूनचे दुकान या आगीत जळून भस्मसात झाले आहे. मन्सुरी यांच्या गादीघरातील गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट झाल्याने मोठी घबराट पसरली. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आग लवकर नियंत्रणात आली नाही. घटनास्थळी मंडळ अधिकारी दिनकर पाटील, तलाठी जाधव व स्थानिक पोलिस पाटील, महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून, शासनाने नुकसान झालेल्या दुकानदारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूज महानगरात बारावीचा सरासरी ९५ टक्के निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

वाळूज महानगरात परिसरातील बारावी परीक्षेचा निकाल सरासरी ९५ टक्के निकाल लागला आहे. निकिता मेहर हिने ९२.४६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर अक्षय मगरे याने ९२ टक्के गुण मिळवत व्दितीय क्रमांक मिळविला आहे.

ऑर्चीड ज्युनियर कॉलेज

येथील ऑर्चीड ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. विज्ञान शाखेतून निकिता मेहर हिने ९२.४६ टक्के, प्रियंका शिंदे, निकिता सिंग व अश्विनी पवार ९० टक्के, अंकिता पांडे, ८९ टक्के, स्नेहा शिंगाडे ८४ टक्के, तर प्रवीण ठाकूर याने ८१ टक्के गुण मिळवले़ या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास नंदमुरी, प्राचार्या रेणुका काकडे, अंजुम शेख यांनी अभिनंदन केले.

राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय

बजाजनगरातील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा सर्व शाखेचा निकाल ९२ टक्के लागला असून विज्ञान शाखेचा विद्यार्थी अक्षय मगरे याने ९२ टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून प्रथम, तर वाळूज महानगरातून व्दितीय क्रमांक मिळवला. अंजली झिरपे ८६ टक्के, तृतीय संध्या डांगे ८२ टक्के, वाणिज्य शाखेतून शालिनी ठाकूर ९०.१५ टक्के, नीता फुलझळक व अनिकेत थोरात ८८१५ टक्के, रोहित रगडे ८७.०७ टक्के, मयुरी वराडे ८६.५० टक्के, कला शाखेतून गौरी खंडाळे ८१.५३ टक्के, स्वाती दाभाडे ८०.४६ टक्के, एमसीव्हीसी शाखेतून अमृता भडाईत ८५.०७ टक्के, अमर गायसमुद्रे ८१.६९ टक्के, यशोदा शर्मा ८०.१५ टक्के, अनिकेत मेहेत्रे ८० टक्के, निकिता विधाते ८० टक्के गुण मिळवले. त्यांचे संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, प्राचार्या व्ही़ के़ जाधव, प्राचार्य डॉ़ एस़ एस़ कादरी आदींनी अभिनंदन केले़

स्व़ भैरोमल तनवाणी ज्युनियर कॉलेज

बजाजनगरातील स्व़ भैरोमल तनवाणी ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला. वाणिज्य शाखेतून वृषाली नरवडे ९० टक्के, सायली बोडखे ८९.६९ टक्के, राधिका शुक्ला ८९.२३ टक्के, विज्ञान शाखेतून प्राची निकम ८३.६९ टक्के, अजय खुंटे ८२ टक्के, वैदही पाटील व वैष्णवी किणगे यांनी ८१.०७ गुण मिळविले. ३०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष हनुमान भोंडवे, प्राचार्या अर्चना गुंजाळ यांनी अभिनंदन केले़

ज्ञान भवन ज्युनियर कॉलेज

बजाजनगर येथील ज्ञान भवन ज्युनियर कॉलेजचा विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेतून महेश चव्हाण ८६ टक्के, जागृती सिंग ७९ टक्के, तर विजय सोनवणे व शिल्पा पांडे यांनी ७८.४६ टक्के, क्षितीज लड्डाने ७८.३० टक्के गुण मिळविले. संस्था अध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्राचार्या शारदा बडे यांनी अभिनंदन केले़

पी़ एम़ ज्ञानमंदिर व सावित्रीबाई ज्युनियर कॉलेज

रांजणगाव शेणपूंजी येथील पी़ एम़ ज्ञानमंदिर ज्युनियर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल ९४.६४ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.५४, कला शाखा ८३.३३, एमसीव्हीसी शाखेचा ७५ टक्के निकाल लागला. सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. संस्थापक काकासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

शहीद भगतसिंग कनिष्ठ महाविद्यालय

रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंग कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१ टक्के लागला. कला शाखेतून दामिनी जाधव ७७.८४ टक्के, दुर्गा देशमाने ७४.६१ टक्के, स्नेहल सावते ७१.०७ टक्के, वाणिज्य शाखेतून स्वप्नाली चाळक ८०.७६ टक्के, पल्लवी पवार ७६.६१टक्के, अक्षय म्हस्के ६९.६९ टक्के, भाग्यश्री सोनावणे ७४.३० टक्के, अक्षय साखरे ७०.३० टक्के, आदित्य धुतराज ६९.२३ टक्के गुण मिळविले. प्राचार्य हर्षित हरकळ यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्वीच्या प्रियकराची कागदपत्रे पळविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिस प्रियकर जेलमध्ये गेल्यानंतर प्रेयसीने त्याच्या खोलीतून महत्त्वाची शैक्षणीक कागदपत्रे, लॅपटॉप, बँकेची कागदपत्रे आदी चोरून नेली. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी नारळीबाग येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिस कॉन्सटेबलने दिलेल्या तक्रारीवरून तरुणीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल शिवाजी सोनटक्के (रा. निलकमल हौउसिंग सोसायटी, बजाजनगर) याने तक्रार दाखल केली. सोनटक्के हा शहर पोलिस दलात कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी तो चार्ली पथकात कार्यरत होता. सोनटक्के हा फेब्रुवारी महिन्यात नारळीबाग येथे मित्रासोबत राहत होता. तो घरी नसताना त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने उघड्या घरात प्रवेश केला. या रुममधून तिने सोनटक्केचा लॅपटॉप, दहावी आणि बारावीची मूळ सनद आणि मार्कमेमो, बीएस्ससीचे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सेमिस्टरचे मार्कमेमो, नाशिक येथील बीएचे मुक्त विद्यापीठाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे मार्कमेमो, रहिवाशी, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जातवैद्यता प्रमाणपत्र, पोलिस दलातील नियुक्तीचा आदेश, दुय्यम सेवापट, इंटरमिजीएटचे चित्रकलेचे प्रमाणपत्र, अॅक्सिस, एसबीआय बँकांचे पासबूक आणि चेकबूक, पोलिस सोसायटीचे पासबूक, ड्यूटी दैनदिनी, मोबाइल, घड्याळ, भावाच्या दुचाकीचे कागदपत्र, शाळा, महाविद्यालयाचे फोटो अल्बम असे सर्व मूळ कागदपत्रे आणि साहित्य घेऊन गेल्याचे सोनटक्के याने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक आश्लेषा पाटील तपास करीत आहेत. सिटीचौक पोलिसांनी यासंदर्भात ही माहिती दिली.

\Bसोनटक्केवर बलात्काराचा गुन्हा दाखल\B

सोनटक्के हा पूर्वी चार्ली पथकात कार्यरत होता. बजाजनगर भागात त्याची या तरुणीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर या दोघात बिनसल्यामुळे तरुणीने त्याच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. सोनटक्के याला अटक होऊन त्याची कारागृहात देखील काही काळ रवानगी झाली होती.

चौकट

मित्राला दिली धमकी

ही तरुणी सोनटक्केच्या रुमवरून त्याचे साहीत्य नेत होती. यावेळी त्याचा मित्र नंदकिशोर लोखंडे याने तीला हटकले. यावेळी तरुणीने त्याला तु आमच्या मध्ये पडू नको, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करून नुकसान करीन अशी धमकी दिल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील ‘सायबर वॉर’वर गुप्तचर यंत्रणेची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीनंतर शहरात सध्या सोशल मीडियावर जोरदार एकमेकाविरुद्ध पोस्ट आणि व्हिडियो अपलोड करून सायबर वॉर सुरू आहे. या सर्व प्रकारावर गुप्तचर यंत्रणेची नजर असून, दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर सध्या सोशल मीडियावर विजय आणि पराभवावरून समर्थकामध्ये जोरदार चर्चा रंगत आहे. सोमवारी बेगमपुरा वॉर्डाचे काँग्रेसचे नगरसेवक अफसरखान यांची एक व्हिडियो क्लीप देखील व्हायरल झाली. या क्लीपला प्रत्युत्तर देणारी ऑडियो क्लिप देखील व्हायरल झाली आहे. फेसबुकवर देखील विविध उमेदवारांच्या समर्थकांत वादग्रस्त चर्चा घडत आहे. या सर्व बाबींवर शहरातील सायबर सेल, विशेष शाखा, गुन्हे शाखेसोबतच राज्यातील गुप्तचर यंत्रणाच्या विविध विभागांची देखील करडी नजर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१ कोचिंग क्लासना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुरत अग्निकांडानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील ४१ कोचिंग क्लासना नोटीस बजावली आहे. अग्निशमन उपकरणे आणि फायर एनओसीच्या संदर्भात क्लासचालकांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.

सुरत शहरात गेल्या आठवड्यात कोचिंग क्लासला आग लागल्यामुळे वीस विद्यार्थ्यी मृत्यूमुखी पडले. आगीपासून वाचण्यासाठी त्यांनी चौथ्या मजल्यावर असलेल्या क्लासमधून उड्या मारल्या. या घटनेचे पडसाद सर्वदूर उमटत आहेत. महापालिका प्रशासनाने देखील शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशमन दलाला दक्ष केले आहे. सोमवारपासून अग्निशमन दलाने त्या दृष्टीने काम सुरू केले आहे. सोमवारी दहा कोचिंग क्लासला नोटीस बजावली होती. मंगळवारी देखील नोटीस बजावण्याचे सत्र सुरू होते. दोन दिवसांत मिळून ४१ क्लासना अग्निशमन विभागाने नोटीस बजावली आहे. अग्निशमन उपकरणे व फायर एनओसीच्या संदर्भात क्लासच्या संचालकांकडून खुलासा मागवण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी दिली.

---

यांना बजावली नोटीस

---

१) गायकवाड क्लासेस - ५

२) गुरुकुल क्लासेस - ३

३) यशवीर क्लासेस - १

४) निंबस अॅकॅडमी - २

५) चाटे क्लासेस - ४

६) रिलायबल क्लासेस - २

७) बनसोड क्लासेस - १

८) स्वामी विवेकानंद क्लासेस - २

९) इऑन व्हरटेक्स - ६

१०) डॉ. वरे क्लासेस - ३

११) सिद्धांत क्लासेस - २

१२) डीएफसी

१३) प्रयास क्लासेस - २

१४) विद्यालंकार क्लासेस - ३

१५) काळे क्लासेस - १

१६) अॅपेक्स क्लासेस - १

१७) कराळे क्लासेस - १

१८) अजिंक्य क्लासेस - १

१९) अर्पण केमेस्ट्री - १

---

एकूण ----------------- ४१

---

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन संस्थाचालकांना कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करुन एलआयचीच्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणात दोन संस्थाचालकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता ३१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

अली खान दौड खान (५४, रा. जहांगीर कॉलनी, यासीन नगर, हर्सूल) व शंकर लक्ष्मण गायकवाड (४३, रा. जवाहर कॉलनी, विष्णूनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी सुभान शाह व शकील शाह या दोघांना अटक करण्यात आली होती. आयुर्विमा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव संपतराव सरवदे (६०) यांनी तक्रार दिली होती. वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते नऊ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्राआधारे मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्याची पॉलिसी काढत पुन्हा त्याला मृत दाखवून विमा कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला.या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोघा आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी, 'आरोपी अली खान हा साई बाबा सेवाभावी तर शंकर गायकवाड हा स्वराज्य मराठवाडा कामगार संघटनेचा अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेचे शिक्के, बँक खाते, पसाबुक व स्वाक्षरींचे नमुने जप्त करणे आहे. खोटे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून आरोपी अली खान याने आठ लाख ८० हजार तर, गायकवाड याने दहा लाख २० हजार रुपयांचा विमा कंपनीला गंडा घातला आहे. आरोपींनी दाव्यातील खोटे दस्ताऐवज कोठून व कोणी दिले याबाबत तपास करणे बाकी आहे; तसेच गुन्ह्यातील पसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करायचे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी द्यावी,' अशी विनंती न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपींना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः पुनाळेकर यांची मुक्तता करण्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद :

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेले संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, सीबीआयच्या भूमिकेचा तपास करावा, या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी (२८ मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

सीबीआयने केलेली ही कारवाई चुकीची असून, या सर्वप्रकारणात सीबीआयचे वागणे संशयास्पद आणि हिंदुत्ववाद्यांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे. हे सर्व हिंदुत्ववादी म्हणवणारे शासन सत्तेत असताना होत आहे. यांना षडयंत्रपूर्वक अटक करून हिंदूंचे दमन करण्याचा प्रयत्न केला जात असून, सीबीआयची ही कारवाई संविधानाचा गळा घोटणारी आहे. त्यामुळे पुनाळेकर आणि भावे यांना त्वरित मुक्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी इतर काही हिंदुत्ववादी संघटना पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येऊन सीबीआयच्या भूमिकेचाही तपास करावा, सीबीआय अधिकारी नंदकुमार नायर यांच्याकडून डॉ. दाभोलकर प्रकरणाचा तपास काढून तो अन्य निष्पक्ष अधिकाऱ्यांकडे सोपवावा. अथवा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडचा निकाल ९१.२० टक्के

$
0
0

सिल्लोड: सिल्लोड तालुक्याचा बारावीचा निकाल ९१.२० टक्के लागला आहे. ९३ टक्के मुली, तर ८९ टक्के मुले उत्तीर्ण झाली. तालुक्यात यंदा ही मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातून ३७५२ मुलांनी, तर २१६१ मुली, असे एकूण ५९१८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३३७२ मुले, तर २०२५ मुली, असे एकूण ५३९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४१ उच्च माध्यमिक विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यापेक्षा अधिक, तर १४ विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा कमी लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठण तालुक्यातील ८६ टक्के विद्यार्थी पास मंगळवारी, जाहीर करण्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,पैठण

बारावी परीक्षेच्या निकालात पैठण तालुक्यातील ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही तालुक्यात मुलींनी बाजी मारली असून ८३.८३ टक्के मुलांच्या तुलनेने ८९.९५ टक्के मुली यशस्वी ठरल्या.

तालुक्यातील २९ ज्युनिअर कॉलेज व उच्च माध्यमिक शाळेतील एकूण ५४२२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली, तर ५४१५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २९३० मुले व १७२७ मुली, असे एकूण ४६५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पाच वेगवेगळ्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिल्याने, यावर्षी सुद्धा निकाल पाहायला अडचण निर्माण झाली नाही. महामंडळाच्या वतीने मंगळवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला व साधारणतः दीड वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना निकाल माहित झाला. बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मल्टीमिडिया मोबाइल फोन व त्यात इंटरनेट सुविधा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचे विहीर अधिग्रहण फोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईतून काही प्रमाणात सुटका करून घेण्यासाठी विहीर अधिग्रहणाचा मार्ग महापालिकेने पत्करला; त्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता देखील दिली. मात्र, ज्या विहिरींचे अधिग्रहण करायचे आहे त्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे ही योजना फोल ठरली आहे. आता या विहिरींचे पाणी केवळ वापरासाठी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पाणीप्रश्नावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी तातडीची बैठक घेतली. पण या बैठकीला प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते. शनिवारी सिडको एन ५ येथील जलकुंभावर झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक रजेवर गेले आहेत. बैठकीला उपायुक्त मंजुषा मुथा, सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजू संधा, सुहास जोशी, किरण धांडे, आय. बी. खाजा, डी. पी. गायकवाड उपस्थित होते.

बैठकीनंतर महापौरांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, २९ विहिरींचे अधिग्रहण केले असून त्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रत्येक विहिरीवर 'या विहिरीमधील पाणी पिण्यायोग्य नाही' असे फलक पालिकेतर्फे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी विहिरींमधील पाणी फक्त वापरण्यासाठीच घ्यावे, असे आवाहन नागरिकांना करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पाऊस पडेपर्यंत १५ दिवस ते एक महिना पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे पाण्याबद्दलच्या तक्रारी सोडवण्यासाठी 'वॉर रूम' स्थापन करून त्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त करणकुमार चव्हाण यांना द्या, असे आदेशही त्यांनी दिले. चव्हाण यांनी 'वॉर रूम'द्वारे पाणीपुरवठा व टँकरचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे.

\Bजायकवाडीतून पाणी उपशात घट \B

जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचा परिणाम पाणी उपशावर होत आहे. १५० एमएलडी पाण्याचा उपसा केला जायचा, तो आता १३५ एमएलडीवर आला आहे. शहरात केवळ ११५ ते १२० एमएलडी पाणीच येते. एवढ्या कमी पाण्यात वितरण करण्याची कसरत करावी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणून दिले. एमआयडीसीने पालिकेला तीन एमएलडी पाणी देण्याचे मान्य केले होते, पण प्रत्यक्षात ०.३ एमएलडी एवढेच पाणी मिळत आहे, त्यामुळे दिवसाला ७० ते ८० टँकर एमआयडीसीच्या पाण्याने भरता येतात ही बाब अधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिली.

\B१६ तासांचे शटडाउन घ्यावे लागणार\B

फारोळा आणि जायकवाडी येथील पंपहाउससाठी एक्स्प्रेस फिडर बसवायचे आहे. त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. फिडर फक्त 'इन्स्टॉल' करायचे आहे. त्यासाठी १५ ते १६ तासांचे शटडाउन घ्यावे लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्याचे महापौर म्हणाले. १५ ते १६ तास शटडाउन घेतल्यास शहराचा पाणीपुरवठा ५ ते ६ दिवस विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत शटडाउन घेण्याचा निर्णय करू नका; पावसाचा अंदाज घेऊन निर्णय घेऊ, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती महापौरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी कर्मचाऱ्यांच्या चार व सहा जून रोजी बदल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या ४ व ६ जून रोजी होणार आहेत. ग्रामविकास खात्याने सर्व जिल्हा परिषदांना ७ जूनपूर्वी बदल्या करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार, जिल्हा परिषदेने दोन दिवसांचे वेळापत्रक तयार केले आहे.

प्रशासकीय, विनंती आणि आपसी अशा तीन संवर्गातील बदल्या होणार आहेत. प्रशासकीय बदलीसाठी १० वर्षे एकाच ठिकाणी सेवा बजावणारा कर्मचारी दुसरीकडे बदलून जाईल. विनंती बदलीसाठी ३ वर्षे एकाच ठिकाणी सेवा बजावलेला कर्मचारी पात्र ठरणार आहे, तर आपसी बदल्यांसाठी दोघांना ५ वर्षांची अट आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी ४ व ६ जूनच्या वेळापत्रकास बुधवारी मंजुरी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडूनही त्यास मंजुरी मिळाल्यानंतर वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचऱ्यांचा बदली कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकर-जीप धडकेत १४ वऱ्हाडी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ पाण्याच्या टँकरने लग्न समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझर जीपला धडक दिल्याने १४ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी (२९ मे) दुपारी एकच्या सुमारास घडला. या अपघातील जखमींमध्ये सहा मुली, सहा पुरूष वर दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

साईदास रायसिंह राठोड (वय २६), स्वाती विट्ठल पवार (१२), गेनुबाई राठोड (६५), हिरालाल शामराव राठोड (३०), नंदनी दासू राठोड (दहा), नंदनी विट्ठल राठोड (१२), एकनाथ काशीनाथ राठोड (२२), पायल पवार (१२), रोहिदास धनू राठोड (८०), दासूसेवा राठोड (६०) बाबिताबाई एकनाथ राठोड वय (आठ) काजल सुंदरसिंह राठोड (१४) संजय रामचंद्र राठोड (३५) पार्वतीबाई आनंदा राठोड (४५, रा सर्वजण सिरसाळा तांडा, ता. सिल्लोड) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताविषयी माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथून हे वऱ्हाडी क्रूझर जीपमधून कन्नड तालुक्यातील जैतखेडा तांडा येथे अजय भीमराव राठोड यांच्या लग्नाला जात होते. सिल्लोड - कन्नड रस्त्यावरील दिगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने लग्नासाठी जात असलेल्या क्रुझरला जोराची धडक दिली. दोन्ही वाहने ही रस्त्यावरील पुलाखाली फरफटत घसरत गेली. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हारुग्णालयात तातडीने प्रथमोपचार करून औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

अपघातात क्रुझर चक्काचूर

हा अपघात इतका भीषण होता. अपघात होताच दोन्ही वाहने ही रस्त्यावरील पुलाच्या खाली घसरत गेली. दोन्ही वाहनांच्या धडकेत जीप चक्काचूर झाली. यात जीवित हानी घटनास्थळी झाली नाही मात्र, वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोख बंदोबस्ताबद्दल मानले पोलिसांचे आभार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त सुरू होता. शहर पोलिस दलाने अत्यंत चोखपणे हा बंदोबस्त पार पाडला. शांततेता या निवडणुका पार पडल्यामुळे 'औरंगाबाद कनेक्ट टिम'ने (अॅक्ट) पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेऊन आभाराचे पत्र दिले.

गेल्या वर्षभरात शहरवासीयांना अनेक दंगलींना सामोरे जावे लागले होते. त्यामध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पाडली. या निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन कडक बंदोबस्त पार पाडला. त्यामुळे ही निवडणूक कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडली. पोलिसांच्या या मेहनतीबद्दल 'अॅक्ट'च्या 'टिम'ने आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेत आभार मानले; तसेच त्यांना पुस्तकाची भेट दिली. यावेळी समन्वयक सारंग टाकळकर, नरेंद्र मेघराजानी, जेम्स अंबिलढगे, दिगंबर गाडेकर, अभिषेक कादी, अक्षय बाहेती, शरद लासूरकर, चंद्रशेखर शर्मा, संदीप कुलकर्णी, राजेंद्र जोशी आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटकाळ टोळी ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुख्यात गुंड, वाळू माफिया लहू गटकाळ आणि त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांना हर्सूल कारागृहातून बुधवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले. या तीन आरोपींना मोक्का न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विष्णूनगर भागात १७ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता आरोपी लहू गटकाळ, रवींद्र तोगे आणि अंकुश मांडलिक यांनी रतन अग्रवाल आणि त्याच्या मुलावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला होता. लहूचे वैर असलेला सचिन पालेजा याच्यासोबत का बोलतो, म्हणून संघटितरित्या हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, या टोळीवर पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे याप्रकरणी तपास करीत आहेत. ही टोळी हर्सूल कारागृहात होती. पोलिसांनी बुधवारी या टोळीला ताब्यात घेतले. यामध्ये आरोपी लहू श्रीरंग गटकाळ, रवींद्र तोगे आणि अंकुश मांडलिक या तिघांचा समावेश आहे. शस्त्रधारी पोलिसांच्या बंदोबस्तात या तिघांना पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. दुपारी या तिघांना कोर्टापुढे हजर करण्यात आले. या आरोपींचे आणखी साथीदार आहेत का, अशा पद्धतीने या टोळीने आणखी गुन्हे केले आहेत का, बाहेरगावी या टोळीने गुन्हेगारी कृत्ये केली आहे का आदी कारणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य करीत आरोपींना सहा जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

\B२६ गुन्हे दाखल\B

टोळीचा सूत्रधार लहू गटकाळ याच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण २६ गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ. कोडे यांनी दिली. यापैकी दहा गुन्हे गेल्या दहा वर्षांतील आहे. यामध्ये दरोडा, अपहरण, खुनाचा प्रयत्न, धमकी देणे, दंगल करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे, विनयभंग, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. सातारा, चिकलठाणा, क्रांतीचौक, जवाहरनगर, वैजापुर, उस्मानपुरा, बेगमपुरा, वाळूज एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरातून मोबाइल चोरणारा गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उघड्या घरातून मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून चोरीचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहे. ही घटना २६ मे रोजी गारखेडा भागात घडली होती.

याप्रकरणी सोमनाथ अशोक बांडे (वय २१, मूळ रा. पाडळी, ता. पैठण) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या रुममधून चोरट्यानी तीन मोबाइल चोरले होते. पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून या चोरीमध्ये संशयित आरोपी सोहेल करीम सय्यद (वय १८, रा. बायजीपुरा) याचा हात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी सोहेलचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले. ही कारवाई सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, डी. जी. जाधव, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, जालींदर मांटे, शिवाजी गायकवाड, कोमल तारे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनी आत्महत्याप्रकरणी अद्याप कोणीही अटक नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गारखेडा भागात पाच दिवसांपूर्वी दोन विद्यार्थिनींनी ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात संबंधित दोषींवर गुन्हे देखील दाखल आहेत. यापैकी एक गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाकडे तपासासाठी सोपवण्यात आला असून, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पूनम वाघले या विद्यार्थिनीने गावातील तरुण आणि मावसभाऊ ब्लॅकमेल करीत असल्याने आत्महत्या केली आहे. गौरी खवसे या जेएनईसीच्या कंम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थिनीने देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरीच्या लॅपटॉपमधील तिचे खासगी फोटो चोरून तिच्या वर्गमित्रांनी ते शेअर केल्याने गौरी बदनामीमुळे तणावात होती. गौरी खवसेच्या प्रकरणात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमाचा तपास करण्याचे अधिकार पोलिस निरीक्षकांना असल्यामुळे हा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाकडे तपासासाठी सोपवण्यात आला आहे. दरम्यान, पूनम वाघलेच्या प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी पथक लवकरच रवाना होणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

ट्रान्सफॉर्मर बसवत असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने एका कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मुरमा येथे बुधवारी घडली. सुधाकर भाऊलाल टेकाळे असे मृत कंत्राटी कामगारांचे नाव आहे.

एका खाजगी कंपनीने कंपनीचे कंत्राटी कामगार सुधाकर भाऊलाल टेकाळे व चंद्रकांत टेकाळे हे मुरमा शिवारातील गणेश काटे यांच्या शेतात ट्रान्सफारमरचे वायर जोडत होते. त्यावेळी अचानक वीजपुरवठा सुरू झाला. या घटनेत सुधाकर टेकाळे यांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टेकाळे यांच्या नातेवाईकांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णलयाबाहेर गर्दी केली व यावेळी उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पाचोड पोलिस पुढील तपास करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images