Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सभापतीचा उमेदवार कोण; भाजपत होईना एकमत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका स्थायी समिती सभापतिपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली, मात्र नावाबाबत एकमत झाले नाही. त्यामुळे कमिटीतील इतर सदस्यांसोबत चर्चा करून उमेदवाराचा निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाचे संघटक भाऊराव देशमुख हे इतर सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थायी समिती सभापतींची निवड ४ जून रोजी होणार असून यंदा ते युतीतील करारानुसार, भाजपला मिळणार आहे. राजू शिंदे यांचे नाव आघाडीवर असून पूनम बमणे यांनी जोमाने तयारी केली आहे, ऐनवेळी जयश्री कुलकर्णी यांचीही वर्णी लागू शकते, अशी परिस्थिती आहे. उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला संघटक भाऊराव देशमुख, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये, प्रदेश चिटणीस मनोज पांगारकर, शहर सरचिटणीस कचरू घोडके, माजी शहराध्यक्ष भगवान घडमोडे, बसवराज मंगरुळे आदी उपस्थित होते. बैठकीत उमेदवार म्हणून राजू शिंदे यांच्यासह अन्य नावांवर चर्चा झाली. परंतु, एकमत होऊ शकले नाही.

इतर सदस्यांसोबत चर्चेनंतर निर्णय

भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर हे कोअर कमिटी सदस्य नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीला रवाना झाल्याने बैठकीस उपस्थित नव्हते. संघटन मंत्री देशमुख हे त्यांच्यासोबत चर्चा करून उमेदवार ठरवतील, असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती तनवाणी यांनी 'मटा'ला दिली. उमेदवारीचा निर्णय सर्वानुमते होईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले. भाजपच्या उमेदवारास शिवसेनेचा पाठिंबा राहील व सभापती हा युतीचा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुंडलिकनगर जलकुंभावरून पाइप हलवणार

$
0
0

औरंगाबाद: पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून सिडको एन ३, एन ४ भागात जलवाहिनी टाकण्यासाठी आणण्यात आलेले पाइप हलवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या सघर्षातून मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून सिडकोसाठी पाइपलाइन टाकावी अशी मागणी एन ३ भागातील नागरिक व नगरसेवकांची होती. त्यासाठी त्यांनी शनिवारी सिडको एन ५च्या जलकुंभावर ठिय्या आंदोलन केले होते. आठ दिवसात पाइपलाइन टाकण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी नगरसेविका अॅड. माधुरी अदवंत यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याला पुंडलिकनगर, हनुमाननगरच्या नागरिकांनी विरोध केला. संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुंडलिकनगरच्या जलकुंभाजवळ आणून ठेवलेले पाइप हलवण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले. हे पाइप विद्यापीठ परिसरात असलेल्या जलकुंभाजवळ ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी चोराकडून सहा वाहने जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हँडल लॉक करून घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरणारा आरोपी धीरज अंकुश चव्हाण याला बुधवारी (२९ मे) पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता एक जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी दिले.

या प्रकरणात शुभम प्रेमसागर दगडे (२०, रा. एन-सहा सिडको, अविष्कार कॉलनी) यांने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, सहा मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शुभमने दुचाकी (क्रमांक एमएच- २६, एएक्स ४५३६ 4536) हँडल लॉक करून घरासमोर उभी केली होती. रात्री दीडच्या सुमारास शुभम लघुशंकेसाठी उठला असता दुचाकी चोरी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. याप्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलिसांनी तपास करून आरोपी आरोपी धीरज चव्हाण (२६, रा. पाखर सांवगी, ता. जि. लातूर, ह.मु. एन-सहा, महाराणा प्रताप चौक, सिडको) याला अटक केली. त्याने चोरी केलल्या सहा दुचाकी परभणी येथील मुलांच्या एका वसतिगृहाच्या परिसरातून जप्त केल्या. आरोपीला धीरज चव्हाणला न्यायालयात हजर करण्यात आले. सहाय्यक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी, आरोपीकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, आणखी दुचाकी जप्त करणे बाकी आहे. आरोपीचे साथीदार आहेत याबाबत तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करून न्यायालयाने आरोपीला एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सूनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युकेशन फेअर’चे गुरुवारपासून आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने येत्या ३० मेपासून १ जूनपर्यंत एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या सेमिनारमध्ये सर्वांसाठी मोफत प्रवेश असला तरी नोंदणी आवश्यक आहे.

यूपीएसई, एमपीएसई, स्टडी अब्रॉड यासह स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक या फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन तर करतीलच शिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील. ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता 'यूपीएसई, एमपीएसई आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा' या विषयावर डॉ. लेफ्ट. कर्नल सतीश ढगे मार्गदर्शन करतील. त्यानंतर ७ वाजता 'तांत्रिक शिक्षणातील संधी' यावर डॉ. महेश शिवणकर संवाद साधतील. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता 'स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)' यावर अनिरुद्ध हातवाळने मार्गदर्शन करतील. तर सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)' यावर अजित थेटे प्रकाश टाकतील. १ जून रोजी सकाळी १० वाजता 'सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी' या विषयावर शिव कदम हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर काय?' यावर गोविंद काबरा हे मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२२६३०५५५, ९८२३५८३२२२ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ- एमजीएम क्लोव्हरडेल शाळेचे मैदान, एमजीएम कॅम्पस, एन-६, सिडको, औरंगाबाद

३० मे २०१९

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- यूपीएसई, एमपीएसई आणि अन्य स्पर्धात्मक परीक्षा

वक्ते- डॉ. लेफ्ट. कर्नल सतीश ढगे

..

वेळ- ७ वाजता

विषय- तांत्रिक शिक्षणातील संधी

वक्ते- डॉ. महेश शिवणकर

..

३१ मे २०१९

वेळ- सकाळी १० वाजता

विषय- स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)

वक्ते- अनिरुद्ध हातवाळने

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)

वक्ते- अजित थेटे

..

१ जून २०१९

सकाळी १० वाजता

विषय- सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी

वक्ते- शिव कदम

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर काय?

वक्ते- गोविंद काबरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका निवडणुकीसाठी सेन्सेस ब्लॉकच्या हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका निवडणुकीसाठी सेन्सेस ब्लॉक तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर वॉर्डांची रचना तयार करण्याचे काम सुरू केले जाते. यंदाची महापालिका निवडणूक प्रभागनिहाय होण्याची शक्यता असल्यामुळे त्या दृष्टीनेच वॉर्डांची रचना केली जाईल, असे बोलले जात आहे.

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणूक ऑगस्ट महिन्यात होणार आहे. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यासाठी मतदार यादी तयार करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीत मतदान करू इच्छिणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून माहिती व फोटो मागवले जात आहेत. ही निवडणूक संपल्यावर ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल असे मानले जात आहे. त्यानंतर मार्च २०२०मध्ये किंवा एप्रिल २०१२च्या पहिल्या आठवड्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणूकीच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पालिका निवडणुकीसाठी नव्याने वॉर्ड रचना होणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सेन्सेस ब्लॉक तयार केले जातात. त्यासाठी निवडणूक विभागाला सूचना प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. सेन्सेस ब्लॉक तयार झाल्यावर वॉर्ड रचना केली जाते. त्यानंतर प्रभाग रचना केली जाणार आहे. यंदा पालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे बोलले जात आहे. तीन वॉर्डांचा एक प्रभाग अशी रचना केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५मध्ये झालेली महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीनेच घेण्याचे नियोजन शासकीय पातळीवर झाले होते, पण काही नेत्यांनी ते हाणून पाडले. एवढी निवडणूक वॉर्डनिहाय होऊ द्या. पुढील निवडणूक प्रभाग रचनेनुसार घ्या, असे या नेत्यांनी सांगितल्याचे बोलले जाते. त्यामुळे यंदाची पालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीनेच होणार, असे प्रशासनाच्या पातळीवर ठामपणे सांगितले जात आहे.

\Bसेन्सेस ब्लॉक म्हणजे काय?

\Bसेन्सेस ब्लॉकचे महत्त्व लोकसंख्या ठरविण्यासाठी आहे. एका ब्लॉकमध्ये शंभर घरे असतात. त्यासाठी एक प्रगणक नेमला जातो. त्या प्रगणकाने त्याला दिलेल्या ब्लॉकमधील घरांचे सर्वेक्षण करणे, घरांच्या चतु:सीमा निश्चित करणे, त्या घरांमध्ये राहणारे स्त्री - परुष, लहान मुले यांची नोंद करणे, जातीनिहाय वर्गीकरण करणे ही कामे करायची असतात. सेन्सेस ब्लॉकच्या आधारे संपूर्ण शहराची लोकसंख्या ठरवली जाते. त्याचा उपयोग वॉर्ड रचनेसाठी होतो. वॉर्ड रचनेसाठी हे ब्लॉक्स महत्वाचे ठरतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधीपक्ष नेतेपदी बोर्डे नियुक्त; सभागृह नेतेपदाबद्दल उत्सूकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी 'एआयएमआयएम'च्या नगरसेविका सरिता बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. या पत्राची प्रत आयुक्तांना देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी पक्षाने बोर्डे यांची विरोधीपक्ष नेतेपदावर नियुक्ती करून, तसे पत्र महापौरांना दिले होते. आचारसंहिता लागू असल्याने नियुक्ती खोळंबली होती.

'एआयएमआयएम'ने विरोधीपक्ष नेता बदलल्यामुळे शिवसेना सभागृह नेता बदलणार का याची उत्सूकता पालिका वर्तुळात आहे. विकास जैन हे दीड वर्षांपासून या पदावर आहेत. सर्वांना मुख्य पदावर काम करण्यासाठी संधी मिळावी याकरिता सभागृह नेता प्रत्येक वर्षी बदलण्याचा रिवाज आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने सभागृह नेता बदलाचा विचार करावा, अशी अपेक्षा शिवसेनेचे काही नगरसेवक खासगीत व्यक्त करीत आहेत. सभागृह नेता न बदलल्यास त्याचे पडसाद येत्या काळात उमटू शकतात, असे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांकडून लेखा विभागाची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी महापालिकेच्या लेखा विभागाची झाडाझडती घेतली. विभागात ५ ते ६ कर्मचारी वगळता अन्य कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गैरहजर असलेल्यांकडून खुलासे मागवा, असे आदेश त्यांनी पालिका उपायुक्तांना दिले.

महापौरांनी बुधवारी आयोजित केलेल्या पाणीपुरवठा आढावा बैठकीत कंत्राटदारांच्या पेमेंटचा विषय निघाला. पेमेंट करण्यासाठी पैसे नसल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाहीत, असे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापौरांनी त्यावर पाणीपट्टीच्या रक्कमेतून कंत्राटदाराचे पेमेंट करा, असा तोडगा सूचवला. पाणीपट्टीची किती रक्कम जमा आहे याची माहिती लेखा विभागाकडून घेण्याचे आदेश त्यांनी स्वीय सहाय्यकांना दिले. स्वीय सहाय्यकांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याच अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे थेट लेखा विभागात जावून झाडाझडती घेण्याचे महापौरांनी ठरविले. त्यानुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास ते लेखा विभागात गेले असता मुख्य लेखाधिकारी, लेखाधिकारी, ऑडिटर हे अधिकारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. ५ ते ६ कर्मचारीच हजर असल्यामुळे महापौरांनी उपायुक्त मंजुषा मुथा यांना गैरहजर अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून खुलासे मागवण्याचे आदेश दिले. खुलासे मिळाल्यानंतर आयुक्तांकडे कारवाईची शिफारस करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; पतीला सश्रम कारावास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

​चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी मीनाच्या डोक्यात दगड टाकून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तिचा पती सुखदेव मोहन गजभीव (रा. एरंडगाव, ता. शेवगाव, हल्ली गणेशनगर, एमआयडीसी, पैठण) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी चार वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.

सुखदेव नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ आणि मारहाण करीत असे. पतीच्या या त्रासाबद्दल मीनाने एमआयडीसी, पैठण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती; तसेच नातेवाईकांना सुद्धा सांगितले होते. दहा डिसेंबर २०१५ रोजी सुखदेवने पत्नी सोबत भांडण केले. 'मुलांसह निघून जा,' अशी धमकी त्याने दिली. रात्री उशिरापर्यंत त्यांचे भांडण सुरू होते. मुले आणि पत्नी झोपले असताना रात्री साडेतीनच्या सुमारास सुखदेवने पत्नीजवळ झोपलेल्या मुलीला बाजूला करून पत्नीच्या डोक्यात मोठा दगड टाकला. गंभीर जखमी झाल्यामुळे पत्नी बेशुद्ध झाली. तिला घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान तिने पोलिसांना जबाब दिला होता. त्यावरून एमआयडीसी, पैठण पोलिस ठाण्यात सुखदेवविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती आरोप सिद्ध झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस आयुक्तांना शहरात वर्ष पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर पोलिस दलाचे कर्तव्यदक्ष आयुक्त चिरंजीवप्रसाद यांना शहराचा पदभार घेऊन बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. २९ मे २०१८ रोजी चिरंजीवप्रसाद यांनी प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.

२०१८ मध्ये जानेवारी महिन्यापासून शहरात विविध कारणांनी दंगली उसळल्या होत्या. कचऱ्याच्या प्रश्नावरून मिटमिटा येथे झालेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची उचलबांगडी केली होती. दोन महिने शहराचा पदभार विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे होता. २९ मे रोजी चिरंजीवप्रसाद यांनी पोलिस आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली. एक वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगवर विशेष भर दिला. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी देखील स्वलंबनासाठी त्यांनी विविध उपक्रम सुरू केले. सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने तरुणांमध्ये फूटबॉल आणि क्रिकेट स्पर्धाचे त्यांनी आयोजन केले. यासोबत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी कठोर पावले उचलली. आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या कार्यकाळात नऊ सराईत गुन्हेगारांवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई वर्षभरात करण्यात आली. विविध सण आणि उत्सवात देखील त्यांच्या नियोजनाखाली चोख बंदोबस्त शहरात पार पडल्याने कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्तात आणि शांततेत निवडणुका पार पडल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ लाख पुस्तके पालिकेला प्राप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले असून आठ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. उर्वरित चार लाख पुस्तके येत्या दोन दिवसांत प्राप्त होणार आहेत. १ जूनपासून शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रातील अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. पालिकेच्या क्षेत्रात ४६० अनुदानित शाळा आहेत, त्याशिवाय महापालिकेच्या ७२ शाळा आहेत. यासर्व शाळांमधून सुमारे एक लाख चाळीस हजार विद्यार्थी आठवीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाली पाहिजेत या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. आठ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. ही पुस्तके पालिकेच्या उस्मानपुरा येथील शाळेत ठेवण्यात आली आहेत. १ जूनपासून प्रत्येक शाळेला पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. १७ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके पडतील. शिक्षण विभागाकडून प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जवाहर नवोदय’साठी ८० विद्यार्थी ठरले पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देशभरातील विविध जिल्ह्यांमधील जवाहर नवोदय विद्यालयांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हानिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून, औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यालयाची ८० विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यात ७४ विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत तर, सहा विद्यार्थी शहरी भागातील आहे. एका जागेसाठी जिल्ह्यात दीडशे विद्यार्थी रांगेत होते.

केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशासाठी देशभर प्रवेश पूर्व परीक्षा सहा एप्रिल रोजी घेण्यात आली होती. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी ८० जागांसाठी १६ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी अनेक अर्ज बाद ठरले होते. तर प्रत्यक्ष ११ हजार २४२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. प्रवेशासाठी प्रचंड चुरस असते. त्यामुळे या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष असते. परीक्षेतून भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशा तीन स्तरावर विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता तपासली जाते. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविल्या जाते. प्रवर्गनिहाय निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यात ८० विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली असून, संबंधित पात्र विद्यार्थ्यांना 'एसएमएस'द्वारे कळविण्यात आले आहे. प्रवेशासाठी शहरी आणि ग्रामीण असा कोटा ठरलेला असतो. त्यात शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा असते.

\B१० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया

\Bपरीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीला प्रवेश दिला जाणार आहे. २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी १० जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्राचार्य प्राचार्य जगन्नाथ पाटील यांनी 'मटा'ला दिली. ८० जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये ५० जागांवर मुलांना तर, ३० जागांवर मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा दबदबा असल्याचे निकालातून समोर आले आहे.

\Bजिल्ह्याचे चित्र

\B- ८० प्रवेश क्षमता

- ११२४२ परीक्षार्थी

- ८० विद्यार्थी पात्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीः ४२ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी हरिबाई वरपूडकर महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर चौकशी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दहावी, बारावी परीक्षेत यंदा गैरप्रकारांनी पाचशेचा आकडा पार केला. कॉपीप्रकरणांसह अनेक कॉलेजांमध्ये सामूहिक कॉपी, जमिनीवर बसून परीक्षा देण्याचे प्रकारांसह थेट उत्तरे सांगणे असे धक्कादायक प्रकार समोर आले. या प्रकरणी दोषींवर अद्याप मंडळाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतरही कॉपी प्रकरणांसह इतर गैरप्रकारांमधील विद्यार्थ्यांची चौकशीची प्रक्रिया अपूर्ण आहे. बारावी परीक्षेत कॉपी प्रकरणात आदेश देऊनही परभणी जिल्ह्यातील संस्थेवर तेथील शिक्षणाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता. संस्थेला अभय दिला जात असल्याने शिक्षणाधिकारी व मंडळ प्रशासन यांच्यात पत्र, स्मरणपत्र असा पत्र व्यवहार सुरूच आहे. पिंगळी रोड येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयामधील गैरप्रकाराबाबत मंडळाने चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल अद्याप यायचा राहिल्याचे मंडळातील सूत्रांनी सांगितले. त्यासह पेडगाव येथील हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपी प्रकरणातील अहवालही प्रलंबित आहे. त्यावर या कॉलेजमधील संरक्षणशास्त्र पेपरला सामूहिक कॉपी प्रकरणी ४२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यावर कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रशासनाकडून शैक्षणिक संस्थांना अभय

दहावी, बारावी परीक्षेत अनेक संस्थांमध्ये गैरप्रकार समोर आले आहेत. या संस्थांवर कारवाईबाबत अद्याप विभागीय मंडळाकडून चालढकल केली जात आहे. मंडळाकडून शिक्षणाधिकारी, मंडळातील अधिकाऱ्यांच्या चौकशी समिती नेमण्यात आल्या. विभागात औरंगाबाद जिल्ह्यासह परभणीत या प्रकरणी चौकशी समित्या नेमण्यात आल्या. निकाल जाहीर झाला तरी, या समित्यांचा अहवाल मंडळाला मिळालेला नाही. अहवाल केव्हा येणार आणि कारवाई केव्हा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारावीने ओलांडला ३५०चा आकडा

बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान अपयशी ठरल्याचे समोर आले होते. महसूल विभागाची भरारी पथके अनेक केंद्रापर्यंत पोहचलेच नाही. त्यासह भरारी पथकांनी यंदा कॉपी प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर आणली. विभागात ३७३ जणांवर परीक्षेत गैरमार्ग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यातील केवळ ३३५ विद्यार्थ्यांचीच चौकशी पूर्ण होवू शकली आहे. अद्यापही ३८पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. यापैकी ३२८ विद्यार्थ्यांवर वन प्लस वन (१+१)अशी कारवाई करण्यात आली आहे.

सामूहिक कॉपी प्रकरणी वरपूडकर कॉलेजमधील ४२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. त्या कॉलेजसह इतर ठिकाणच्या परीक्षा केंद्राबाबतचे अहवाल अद्याप यायचे राहिले आहेत. दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येईल. - सुगता पुन्ने, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संसदेच्या प्रांगणातील दिवसांची खासदारांना आठवण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एनडीटीव्ही' या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिपदी निवड झाल्यानंतर पहिली असाइनमेंट संसद भवनाची होती. त्यावेळी अर्नब गोस्वामी यांच्यासोबत सेंट्रल लॉन्सवर मंत्री, खासदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या होता. औरंगाबादच्या जनतेने मला खासदार करून संसदेत पाठवले आहे. त्याच सेंट्रल लॉन्सवर उभं राहिल्यानंतर त्या पहिल्या दिवसाची आठवण झाली,' अशा भावना नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी 'मटा'जवळ व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदारांना संसदेच्या विविध कामकाजांच्या माहितीसह पास आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दिल्ली येथे बोलाविले आहे. त्यामुळे खासदार जलील हे दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी 'एआयएमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत संसदेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. त्यानंतर खासदार ओवेसींनी त्यांना दिल्लीची सफर घडविली. यावेळी खासदार ओवेसींनी सारथ्य केले. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र सदनला खासदार जलील यांनी भेट दिली. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.

दिल्लीत वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी म्हणून कामाची सुरुवात करतानाचे दिवस संसदेत पाऊल ठेवल्यानंतर आठवले. अर्नब गोस्वामी यांच्या सोबतच्या पहिल्या असाइनमेंटची आठवणही आली. पूर्वी संसदेबाहेर उभे राहून तेथील कामकाज जनतेपर्यंत पोहचवत होतो. आता या सर्वोच्च सदनात आपल्या भागातील, आपल्या जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी मोठी संधी आहे, अशा भावना खासदार जलील यांनी 'मटा'जवळ व्यक्त केल्या. महाराष्ट्रातून प्रतिनिधीत्व मिळण्याची शान औरच असल्याचा अनुभव त्यांनी घेतला.

……

\Bआंबेडकरांची भेट \B

संसदेत जाण्यापूर्वी पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यांनी राज्यात वंचित बहुजन आघाडी व 'एआयएमआयएम'च्या उमेदवारांना मिळालेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच संसदेत वंचितांचा आवाज तुम्ही असल्याचे सांगितल्याचे जलील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः ‘समृद्धी’चे काम मे २०२२ मध्ये होणार पूर्ण'

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

देशातील सर्वाधिक लांबीच्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम मे २०२२ पूर्वीच पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील ७०१ किलोमीटर लांबीच्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर गायकवाड यांनी पत्रकारांना माहिती दिली. सध्या कामाचा वेग पहाता, समृद्धी महामार्गाचे बांधकाम पूर्वनियोजित वेळेपूर्वीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपन्यांनी मुदतीआधीच काम केल्यास त्यांना बोनस देण्याची तरतूद आहे. त्यामुळेच काम वेगात सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भारतीय रस्ते परिषदेच्या नियमावलीच्या अधीन राहूनच या महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग देशातील पायाभूत सुविधांचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

नागपूर, अमरावती, बुलडाणा, औरंगाबाद आणि नाशिक या जिल्ह्यांतील काम मुदतीपूर्वी पूर्ण होईल. या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी लागणाऱ्या सर्वप्रकारच्या परवानग्या उपलब्ध आहेत. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे.

वन्यजीवांना अभय

समृद्धी महामार्ग वन्यजीव क्षेत्रातून जाणार आहे. या महामार्गामुळे त्यांच्या मुक्तसंचारावर गदा येणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. वन्यजीवांच्या हालचालीमध्ये अडथळा येणार नाही, अशा पद्धतीचे भुयारी मार्ग प्रस्तावित महामार्गावर बांधले जाणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

शंभर टक्के भूसंपादन

समृद्धी महामार्गासाठी ८ हजार ३६७ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ७ हजार ८६ हेक्टर जमीन खासगी मालकीची, तर १२८१ हेक्टर जमीन शासकीय मालकीची आहे. या जमिनीचे शंभर टक्के संपादन झालेले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत ६ हजार ७११ कोटींचा मोबदला अदा करण्यात आलेला आहे.

देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग

ताशी १५० किलोमीटर वेगाने वाहने धावणार

अपघातशून्य महामार्ग होणार

वाहतूककोंडी होऊ नये म्हणून प्रवेश आणि निर्गमन बिंदूंवर टोल स्टेशन्स

महामार्गावर २४ ठिकाणी इंटरचेंजेस

महामार्गाला ८०० कोटी लिटर पाणी लागणार

जवळपास सव्वा लाख झाडांची कत्तल

तब्बल आठ लाख झाडे नव्याने लावणार

समृद्धी महामार्ग ७०१ किलोमीटर

नागपूर-औरंगाबाद-मुंबई

१० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणारा मार्ग


नागपूर ते मुंबई प्रवास

टोल प्रतिकिलोमीटर १ रुपया ६५ पैसे

एका कारचालकाला १ हजार १५६ रुपये मोजावे लागणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसीची फसवणूक; आणखी दोघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून एलआयचीच्या जनश्री योजनेंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी एलआयसीतील सहाय्यक लिपिकासह एका आरोपीला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. दोघा आरोपींनी न्यायालयात हजर करण्यात आले असता ३१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

सहाय्यक लिपिक विनोद सखाराम बत्तीसे (५६, रा. द्वारकापुरी रो हाउस, उस्मानपुरा) व मुरलीधर विठ्ठल खाजेकर (५२, रा. रमानगर) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात यापूर्वी अली खान व शंकर गायकवाड या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव संपतराव सरवदे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत, वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते नऊ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्राआधारे एलआयसी कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दरम्यान दोघा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी बत्तीसे याने आतापर्यंत किती पॉलीसीमध्ये पडताळणी न करता रक्कम आदा केली याचा तपास करणे आहे. तर आरोपी खाजेकर याने खोटे मृत्यूपत्र कोठे व कोणाकडून बनविले तसेच त्याने किती खोटे दावे दाखल केले याचा तपास करणे आहे. सदरील कटामध्ये कोणत्या अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावशे आहे याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने दोघा आरोपींना कोठडी सुनावली.

गैरव्यवहारात सहभागाचा लिपिकावर आरोप

आरोपी विनोद बत्तीसे हा भारतीय जीवन विमा कंपनी येथे सहाय्यक लिपिक म्हणून काम करतो. समूह विमा पॉलिसीमधील 'एनजीओ' यांनी दिलेल्या कागदपत्रे पडताळणी करण्याचे काम बत्तीसे याच्याकडे आहे. त्याने 'एनजीओं'ची कागदपत्रांची पडताळणी न करता, पडताळणी केल्याचे भासवून एनजीओ व वारसदार यांच्याकडून काही रक्कम घेतली आहे, असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी मुरलीधर खाजेकर याची कोणतीही एनजीओ नसताना त्याने बत्तीसे याच्या मदतीने पॉलिसी पेपर व खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून 'एलआयसी'ला गंडा घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीच्या बालेकिल्ल्यात ट्रॅक्टर सुसाट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कवित्व अजूनही सुरूच असून, शिवसेनेच्या जिव्हारी लागलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव युतीच्या बालेकिल्ल्यात ट्रॅक्टर सुसाट धावल्याने झाल्याचे समोर येत आहे. मतदान केंद्रानिहायच्या विश्लेषणात सिडको-हडकोच्या बहुतांश वार्डांमध्ये हर्षवर्धन जाधव यांना मोठे मतदान मिळाले असून, संपूर्ण वॉर्डामध्येही जाधव यांनी खैरेंना पिछाडीवर टाकले आहे. खैरेंचा फक्त ४,४४२ मतांनी पराभव झाला. विशेष म्हणजे तेवढी मते चक्क 'नोटा'लाही मिळाली. प्रशासनाने मतदान केंद्र क्रमांकनिहाय मतदानाचे आकडे दिल्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डातील केंद्रावर किती मते शिवसेनेला मिळाली, एमआयएम तसेच अपक्ष उमेदवाराला किती मतदान झाले, याचा आढावा घेण्यात येत आहे. शिवसेना आणि भाजपचा मोठा प्रभाव असलेल्या मध्य मतदारसंघातील हर्सूल, जाधववाडी, सुरेवाडी, होनाजीनगर, टी.व्ही. सेंटर परिसर, रोजाबाग, पवन नगर, स्वामी विवेकानंदनगर डी. सेक्टर, एन ११, भारत मातानगर, सिडको एन ६, बजरंग चौक, एन ३ येथील अनेक मतदान केंद्रांवर अपक्ष उमदेवार हर्षवर्धन जाधव यांना भरघोस मतदान झाले. विशेष म्हणजे या भागामध्ये 'एमआयएम'चे इम्तियाज जलील यांनाही चांगले मतदान झाले. यातील अनेक वार्डांमध्ये शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आहेत. सिडको-हडको भागात अनेक ठिकाणी शिवसेना-भाजपचे नगरसेवक असताना खैरे यांना मताधिक्य मिळू शकले नाही. औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. सिडको टाऊन सेंटर, एन ५, एन ६ येथील अनेक मतदान केंद्रांवर चंद्रकांत खैरे यांना मतदारांनी पसंत देऊन आघाडी मिळवून दिली असली तरी, हर्षवर्धन जाधव यांनाही उल्लेखनीय मतदान झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघातून मताधिक्य मिळाले असले तरी, खैरेंना विजय मिळवता आला नाही. शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेला मोठा फटका बसला. या मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांनी मुसंडी मारत मताधिक्य मिळवले. काँग्रेस आघाडीची मोठी पिछेहाट कधीकाळी पक्षाचा खासदार असलेल्या या मतदारसंघामध्ये मतदारांनी कॉँग्रेसला सपशेल नाकारले. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीकडून आमदार सुभाष झांबड हे नशीब आजमावत होते. मात्र, त्यांना केवळ ९१ हजार ७८९ मते मिळाली. मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये झांबड यांना पहिल्या दोनशे मतदान केंद्रांवरील एकाही मतदान केंद्रावर मतदानाची तीन आकडी संख्या गाठता आली नाही. पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्येही केवळ १२ तर, पूर्व मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांवर पक्षाला शंभरपेक्षा अधिक मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मोहम्मद अब्दुल हक्क फारूखी

$
0
0

निधन वार्ता

अब्दुल हक्क फारुखी

औरंगाबाद : रोहिला गल्ली एकखाना मशिदीच्या समोरील रहिवासी मोहम्मद अब्दुल हक्क फारुखी (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटीचौक येथील मशिदीत अदा करण्यात आली. त्यांच्यावर पंचकुआ दभनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर, वाहेद कलाम उर्दू साप्ताहिकाचे संपादक वाहेद फारुखी यांचे ते सासरे होतं. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलरच्या विजेचा धक्का, ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

$
0
0

घरात खेळतांना कुलरमध्ये हात घातल्याने विजेचा धक्काचा लागून एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. रियान इश्तीयाक खान अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे.

रियान हा शहरातील सुप्रसिध्द न्युरोलॉजिस्ट डॉ. इश्तीयाक अन्सारी यांचा मुलगा होता. बुधवारी रियान संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पहिल्या मजल्यावर खेळत होता. खेळता खेळता त्याचे खेळणे कुलर मध्ये पडले. ते काढण्यासाठी त्याने थेट कुलर मध्ये हात घातला. त्यात त्याला जोराचा झटका बसला. कुटुंबियांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी थेट त्याला लांब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्का बसला. त्यातील एकाने तत्काळ वायर पिन काढली व रियानला बाजुला केले व रुग्णालयात दाखल केले. परंतु तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. गुरूवारी सकाळी रोजाबाग येथील कब्रस्तानमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला. सध्या रमजानचा महिना पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात खान कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युकेशन फेअर’चे थाटात उदघाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) आयोजित 'एज्युकेशन फेअर'चे उदघाटन महसूल उपायुक्त वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. अपर्णा कक्कड, जेएनईसीचे प्राचार्य हरिचंद्र शिंदे, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. १ जूनपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

गुरुवारी (३० मे) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते फीत कापून एज्युकेशन फेअरचे उदघाटन झाले. यावेळी एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, एमजीएम आरोग्यमच्या डॉ. अपर्णा पांडव, बायोटेक्नॉलॉजीचे प्राचार्य संजय हरके, प्राचार्या डॉ. तृप्ती देशमुख, प्रा. गिरीश बसवले, प्रा. अभय कुलकर्णी आदींसह एमजीएम परिवारातील विविध विभागांचे प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने आयोजित या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, स्टडी अब्रॉड यासह स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक या फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन तर करतीलच शिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील. ३१ मे रोजी सकाळी १० वाजता 'स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)' यावर अनिरुद्ध हातवाळने मार्गदर्शन करतील. तर सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)' यावर अजित थेटे प्रकाश टाकतील. १ जून रोजी सकाळी १० वाजता 'सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी' या विषयावर शिव कदम हे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ६ वाजता 'दहावीनंतर काय?' यावर गोविंद काबरा हे मार्गदर्शन करणार आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने आयोजित 'एज्युकेशन फेअर'च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यासह यामध्ये सहभागी होऊन भविष्याची दिशा निश्चित करता येऊ शकेल. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ देखील सेमिनारच्या रूपाने घेता येणार आहे.

- अंकुशराव कदम, सचिव, एमजीएम

...

चौकट

स्थळ- एमजीएम क्लोव्हरडेल शाळेचे मैदान, एमजीएम कॅम्पस, एन-६, सिडको, औरंगाबाद

३१ मे २०१९

वेळ- सकाळी १० वाजता

विषय- स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)

वक्ते- अनिरुद्ध हातवाळने

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)

वक्ते- अजित थेटे

..

१ जून २०१९

सकाळी १० वाजता

विषय- सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी

वक्ते- शिव कदम

...

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर काय?

वक्ते- गोविंद काबरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून गाळ काढताना मजूराचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

ताडपिंपळगाव (ता. कन्नड) ग्रामपंचायतच्या मालकीच्या विहिरीतून गाळ काढताना विषारी वायुमुळे किशोर फोतरे या कंत्राटदार मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यवस्थ असलेल्या चार मजुरांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवार (२९ मे) दुपारी घडली आहे. यामध्ये निकम यांची प्रकृती गंभीर आहे.

दुष्काळ सदृष्य परीस्थिती असल्याने ताडपिंपळगाव ग्रामपंचायतसाठी पाण्याचे टँकर मंजूर झाले. ते पाणी सार्वजनिक विहिरीत टाकून त्याचे गावात वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील हनुमान मंदिराजवळील गणपती व देवी विसर्जित करण्याच्या सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याचे काम क्रेन, मजुराच्या साहाय्याने करण्यात येत होते .विहिरीतून गाळ बाहेर काढण्यासाठी राजेंद्र बाळाजी निकम (वय २५), ज्ञानेश्वर भिमसिंह गुडांळे (२७) अनिल माणिक फोतरे (३३), विलास बाबुराव शेरटे (३३) मजूर विहिरीत उतरले होते. विहिरीतील दहा फुटांपर्यंत गाळ काढण्यात आल्यानतंर अचानक विहिरीमध्ये दुर्गंधीने सडलेले पाणी व विषारी वायू बाहेर पडू लागला. त्यानंतर विहिरीतील मजुरांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी अत्यवस्थ स्थितीत माहिती क्रेन चालक किशोर फोतरे यांना दिली. त्यांनी तात्काळ विहिरीत उतरत राजेंद्र निकम, ज्ञानेश्वर गुंडाळे व अनिल शेरटे यांना प्रयत्नाने बाहेर काढले. तिसरा मजूर विलास शेरटे यांना बाहेर काढताना कंत्राचदार किशोर फोतरे हे विहिरीतील पाण्यात पाय घसरून पाण्यात पडले. विषारी वायुमुळे विहिरीत बराच वेळ बेशुद्धावस्थेत पडले.

विषारी वायुमुळे विहिरीमध्ये कुणीही उतरण्यास धजावत नव्हते. फोतरे यांच्या नातेवाईकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी प्रथम देवगाव (रंगारी) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. यादरम्यान फोतरे यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर घाटी रुग्णालयात पोस्टमार्टेम करण्यात आले. जळगाव (घाट) येथे सांयकाळी पाच वाजता अंत्यविधी करण्यात आला. फोतरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. देवगाव (रंगारी) पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आहेर, किसन श्रीखंडे, दादासाहेब चेळेकर करत आहे.

\Bग्रामपंचायतीवर आरोप\B

ताडपिंपळगाव ग्रामपंचायतीकडून मृत फोतरे यांना बाहेर काढण्यासाठी काहीही मदत मिळाली नाही. सुरक्षेसाठी उपाययोजना न केल्याने किशोर फोतरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images