Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चमत्काराने दामदुपटीने पैसे परत देण्याच्या आमिषाने साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी जावेदखान साहेबखान पठाण (३४, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी गुरुवारी नामंजूर केला.

जावेदखान हा साहेबखान यासीनखान पठाण उर्फ सत्तार बाबाचा मुलगा आहे. फिर्यादी डोडू सत्यणारायण डोडू जंगैयम राहणार हैदराबाद यांनी सत्तार बाबा आणि त्याचा मुलगा रावेदखान यांना एकूण साडेआठ लाख रुपये दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जावेदखानच्या अटकपूर्व जामीन अर्जास विरोध करताना सहायक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जावेदखान हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारचे लोकांची फसवणूक केली आहे. त्याच्या वर्तणूकीत सुधारणा झाली नाही. त्याला जामीन मंजूर केल्यास तो पुन्हा गुन्हे करील. त्याचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग आहे. त्याच्या अटकेशिवाय या गुन्ह्याचा तपास पूर्ण होणार नाही. त्याचा जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने जावेदखानचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातीवाचक शिवीगाळ; आरोपीचा जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणात विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी आरोपी रवींद्र तोगेचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

विष्णूनगर येथील शीतल विठ्ठल उर्फ संदीप शिंदे (३०) यांनी आरोपीविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, तिचा आंतरजातीय विवाह झाला असून, १७ मार्च २०१९ रोजी मध्यरात्री लहु गटकाळ, रवींद्र तोगे व इतर सहा आरोपी पतीला मारहाण करत असल्याचे तिला दिसले. भांडण सोडविण्यासाठी तिने मध्यस्थी केली असता, आरोपींनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तिच्या गळ्यातील आठ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. तिचा गळा दाबला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. पतीची चारचाकी घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला.

या तक्रारीआधारे जवाहरनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३९४, १४३, १४७, १४८, १४९; तसेच कलम ३१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. २९ मार्च रोजी पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर आरोपी रवींद्र तोगे याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीविरोधात १५ मे २०१९ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र केले असल्याने, त्याला जामीन देण्याची विनंती आरोपीच्या वकिलांनी केली होती. आरोपीविरोधात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यात सुधारणा दिसून येत नाही. जामीन दिल्यास आरोपी फिर्यादीवर दबाव टाकू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देण्यास विशेष सरकारी वकील मधुकर आहेर यांनी विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची तिजोरी कोरडीठाक!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर विकासासाठी धोक्याची घंटा. सध्या महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला असून, एप्रिल आणि मे महिन्यात तिजोरीत ६५ कोटी ५८ लाख ५४ हजार ८५४ रुपये जमा झालेले असताना, आता फक्त ८६ लाख रुपयेच शिल्लक आहेत. पालिकेला २०१ कोटी रुपयांचे देणे आहे. त्यामुळे है पैसे कसे परत करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद महापालिकेचा अर्थसंकल्प अठराशे कोटींचा आहे. एवढा मोठा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेची तिजोरी भरलेली असेल, अशी सर्वसामान्यांची भावना असते. मात्र, पालिकेच्या लेखा विभागाचा लेखाजोखा हाती लागल्यावर सर्वसामान्यांची भावना फोल ठरल्याचेच चित्र आहे. लेखा विभागाने गुरुवारी जमा - खर्चाचा तपशील महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केला. या तपशीलातील आकडे पालिकेची आर्थिक आधोगती दाखवतात, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. जमा खर्चाच्या तपशीलाबरोबर एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या उत्पन्नाची माहिती देखील लेखा विभागाने दिली आहे. एप्रिल महिन्यात ४३ कोटी ६० लाख २१ हजार ७०५ रुपये तिजोरीत जमा झाले होते, तर मे महिन्यात २१ कोटी ९८ लाख ३३ हजार १४९ रुपये जमा झाले. दोन्ही महिन्यात मिळून पालिकेच्या तिजोरीत ६५ कोटी ५८ लाख ५४ हजार ८५४ रुपये जमा झाले होते. ३० मे रोजीच्या लेखा विभागाच्या माहितीनुसार तिजोरीत ८६ लाख रुपये जमा आहेत. २९ मे रोजी केवळ पाच लाख ६१ हजार रुपये तिजोरीत होते. पालिकेवर २०१ कोटी ३३ लाख २७ हजार ९४९ रुपयांचे देणे आहे. हे देणे प्रामुख्याने कंत्राटदारांचे आहे. एक ते दीड वर्षांपासून कंत्राटदारांचे पेमेंट करण्यात आलेले नसल्यामुळे कंत्राटदारांनी वेळोवेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे. आताही पालिका मुख्यालयाच्यासमोर कंत्राटदारांचे पेमेंटच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.

बँकेतील महापालिकेच्या ठेवी

- १०८.६४ कोटी कर्ज निवारण निधी

- २७७.२२ कोटी समांतर जलवाहिनी

- २७.५२ कोटी घरकुल योजना

- ९.३० कोटी विकास निधी (सातारा देवळाई)

- १०.६० कोटी मुलभूत सुविधा अनुदान

- ५.७० कोटी बाळासाहेब ठाकरे स्मारक

- ९५ कोटी रस्ते विकास निधी

---

मटा भूमिका

---

कर वसुली करा

---

महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे तुंबली आहेत. आर्थिक आवक वाढविण्यासाठी आयुक्त आणि महापौरांनी मालमत्ता कर वसुली आणि पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या हजारो मालमत्तांना कर लावण्यात आलेला नाही. अनेक बडे थकबाकीदार कराचे पैसे भरत नाहीत. विशेष म्हणजे याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतात. या अधिकाऱ्यांकडे आयुक्त आणि महापौर दुर्लक्ष करतात. त्यामुळे साऱ्यांचेच फावते. शहरात जवळपास सव्वालाख अनधिकृत नळजोडण्या आहेत. या नळजोडण्या अधिकृत करण्यासाठी राबविलेली अभय योजना फसली. त्यामुळे या जोडण्या अधिकृत करून त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल केली तरच पालिकेच्या तिजोरीत पैसा येईल. अन्यथा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट राहिल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात सहा हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी शहर व परिसरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करून जल्लोष केला.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली सिडको परिसरातील बजरंग चौकात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाईचे वाटप करत जल्लोष केला. 'भारत माता की जय, मोदी मोदी' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. जयभवानीनगरमध्येही आनंदोत्सव साजरा झाला. आमदार सावे, मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, मंडळ अध्यक्ष गणेश नावंदर, नगरसेवक शिवाजी दांडगे, विकास पाटील, विलास कोडे, प्रशांत नांदेडकर, कैलास राऊत, प्रदीप ठाकरे आदी उपस्थित होते. टीव्ही सेंटर परिसरातही कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. गुलमंडीवर भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. दयाराम बसैये, शहर सरचिटणीस सुरेंद्र कुलकर्णी, जगदिश सिद्ध, शहर उपाध्यक्ष जालिंदर शेडगे, सविता कुलकर्णी, लता दलाल, प्रा. राम बुधवंत, दीपक ढाकणे, अमित लोखंडे, सचिन झवेरी, सागर निळकंठ, साधना सुरडकर, सुधीर नाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पावसाला परवान्यांचे अडथळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यामध्ये यंदा पुन्हा एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, प्रत्यक्षात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेला लागणाऱ्या दीर्घ कालावधीमुळे पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असला तरी, एजन्सी नेमणे, डॉप्लर ररार बसवणे, विविध परवाने यांमुळे प्रत्यक्षात 'क्लाऊड सिडिंग'ला उशीर होण्याची शक्यता आहे.

सध्याची दुष्काळी परिस्थिती व पावसासंदर्भात हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन राज्य शासनाने मराठवाडा, विदर्भ व उर्वरित अवर्षणग्रस्त महाराष्ट्रातही कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप केवळ निर्णय झाला असून, पुढील प्रक्रियेसंदर्भात कोणतेही निर्देश प्रशासनाला मिळाले नाही. त्यामुळे एजन्सी नेमन्यापासून प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध परवान्यांच्या संथ प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात पावसाचे विमान उडण्याला विलंब होण्याची शक्यता आहे.

२०१५मध्ये मराठवाड्यासह राज्यातील इतर भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी औरंगाबाद येथे सी - बँड डॉप्लर रडार बसवण्यात आले होते या रडारच्या माध्यमातून वैमानिकाला ढगांची स्थिती, घनता, आद्रतेचे प्रमाण, अक्षांक्ष व रेखांश आदींची माहिती देण्यात आली. विमान व रडारच्या माध्यमातून तब्बल ९० दिवस प्रयोग करण्यात येणार होता मात्र, वातावरणात पाऊस पाडण्यासाठी उपयुक्त ढगच नसल्यामुळे प्रयोगाला ग्रहण लागले होते. कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग करण्यासाठी चार ऑगस्ट हा पावसाळ्याच्या उत्तरार्ध उजेडला होता.

दरम्यान, यंदाही याच पद्धतीने प्रयोग राबवण्यात येणार असला तरी, प्रत्यक्षात प्रयोगापूर्वी अनेक परवान्यांचे अडथळे पार करावे लागणार आहे. यंदा शासनाने कृत्रिम पावसाच्या निर्णयानंतर अद्याप विभागीय आयुक्त कार्यालयाला यासंदर्भात पुढील कोणतेही निर्देश मिळालेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने यापूर्वी २०१५-१६मध्ये २७ कोटी रुपये खर्च करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता मात्र, पावसाळ्याच्या शेवटी 'क्लाऊड सिडिंग'ची अंमलबजावणी झाल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नव्हता.

\Bप्रत्येक उड्डाणाला लाखाचा खर्च\B

कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी एजन्सी नेमणे, परदेशातून डॉप्लर रडार मागवण्याच्या प्रक्रिया अत्यंत संथ आहे. खाजगी विमान; तसेच विमान कोणत्याही वेळेस करण्यात येणारे टेकऑफ, विमानाची पार्किंग, कृत्रिम पावसासाठी आवश्यक असलेल्या फ्लेअर्स,च अन्य रासायनिक पदार्थ ठेवण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगीचीही आवश्यकता असते. विमानतळामध्ये विमान उतरविणे किंवा उड्डाण घेणे यांपासून विमानाला माहिती देण्यापर्यंतच्या कामासाठी दर आकारले जाते. याशिवाय विमानतळ परिसरात वस्तू ठेवण्याबाबतही भाडे आकारण्यात येते. विमानाच्या प्रत्येक उड्डाणासाठी ७० हजार ते एक लाख रुपये खर्च येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवाल गेला कुणीकडे ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर झाला आहे. हा अहवाल जाहीर करून दोषी असल्यास कुलगुरूंवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद व मुंबईत उपोषण सुरू आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राजभवन यांच्यात समन्वय नसल्याचा अनुभव उपोषणार्थींना आला. त्यामुळे चौकशी अहवाल कुठे गेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या पाच वर्षांच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद आणि मुंबईत उपोषण सुरू आहे. चोपडे यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने माजी कुलगुरू डॉ. एस. एफ पाटील समिती नियुक्त केली होती. या समितीने आठ महिन्यांपूर्वी राज्य शासनाला अहवाल सादर केला. मात्र, अहवाल जाहीर करून समितीच्या शिफारशीनुसार कारवाई करण्यात आली नाही. कुलगुरूंचा कार्यकाळ संपण्यास जेमतेम चार दिवस शिल्लक आहेत. योग्य चौकशी झाल्याशिवाय कुलगुरूंना ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये. तसेच दोषी असल्यास कडक कारवाई करावी, अशी मराठवाडा लॉ कृती समितीची मागणी आहे. या मागणीसाठी चार दिवसांपासून संघटनेचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता, नियमबाह्य नियुक्त्या, 'नॅक' मूल्यांकनावर निविदांशिवाय केलेली उधळपट्टी, अवाजवी दरातील खरेदी असे आरोप चोपडे यांच्यावर आहेत. समितीच्या अहवालानुसार कारवाई करण्यासाठी मराठवाडा विकास कृती समितीचे एक मेपासून विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरू आहे. या साखळी उपोषणात प्रा. दिगंबर गंगावणे, राहुल वडमारे, अमोल दांडगे, अॅड. शिरीष कांबळे, मनोज सरीन सहभागी झाले आहेत. तब्बल एक महिना उलटल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर सचिव सिद्धार्थ खरात यांनी आंदोलक राहुल वडमारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. चौकशी अहवाल राज्यपालांना सादर केला आहे. कारवाई करण्याचा निर्णय राज्यपालांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती खरात यांनी केली. तसेच औरंगाबाद विभागाचे सहसंचालक सतीश देशपांडे लेखी आश्वासन देतील असेही खरात यांनी सांगितले.

\Bविसंगत माहितीने प्रश्नचिन्ह

\Bमुंबईत उपोषण करीत असलेल्या मराठवाडा लॉ कृती समितीला उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राज्यपाल कार्यालयात विसंगत उत्तरे मिळाली. राज्यपालांना अहवाल सादर केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विजय स्वरुप यांनी सांगितले. तर अहवाल प्राप्त झाला नसल्याचे राजभवनचे अवर सचिव प्रताप लुबाळ आणि उज्ज्वला दांडेकर यांनी सांगितले, असे तक्रारदार नवनाथ देवकते म्हणाले. विभागात समन्वय नसल्यामुळे कुलगुरूंच्या चौकशीचा अहवाल दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संघटनांनी केला.

आम्हाला कोणतेही लेखी आश्वासन मिळाले नाही. कुलगुरू चोपडे यांच्यावरील कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देऊ नये. त्यांच्या नियमबाह्य कामाची कागदपत्रे सादर केली आहेत.

- प्रा. दिगंबर गंगावणे, मराठवाडा विकास कृती समिती

एस. एफ. पाटील चौकशी समितीचा अहवाल राज्यपाल कार्यालयाला दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विजय स्वरुप यांनी सांगितले. पण, अहवाल मिळाला नसून तांत्रिक त्रुटी असल्याचे राज्यपाल कार्यालयाचे अधिकारी सांगतात. सुसंगत उत्तर मिळेपर्यंत उपोषण सुरू राहील.

- नवनाथ देवकते, मराठवाडा लॉ कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाची जाणीव ठेवून साजरा करणार वर्धापन दिन

0
0

औरंगाबाद : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आहे. एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा करताना पाण्याचा कुठेही अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, हार, तुरे, पुष्पगुच्छ आणि आतषबाजी आदी टाळावे. दुष्काळाची जाणीव ठेवून वर्धापन दिन साजरा करावा, अशी सूचना एसटी महामंडळाने विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी यांनी केली.

एसटी महामंडळाची एक जून १९४८ रोजी अहमदनगर-पुणे मार्गावर पहिली बस धावली होती. यानिमित्त दरवर्षी एक जून हा दिवस एसटी महामंडळातर्फे वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा एसटी महामंडळ ७१वा वर्धापन दिन साजरा करीत आहे मात्र, यंदा महाराष्ट्रावर तीव्र दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हार, तुरे, पुष्पगुच्छ, आतषबाजी यांचा वापर टाळण्याची सूचना उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांनी केली आहे. त्याबरोबरच पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

विभागात सेवा ज्येष्ठतेनुसार दीर्घकाळ सेवा केलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यासह विविध सूचना करण्यात आलेल्या आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागात नियोजन केल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मोहम्मद अब्दुल हक्क फारूखी

0
0

निधन वार्ता

अब्दुल हक्क फारुखी

औरंगाबाद : रोहिला गल्ली एकखाना मशिदीच्या समोरील रहिवासी मोहम्मद अब्दुल हक्क फारुखी (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटीचौक येथील मशिदीत अदा करण्यात आली. त्यांच्यावर पंचकुआ दभनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर, वाहेद कलाम उर्दू साप्ताहिकाचे संपादक वाहेद फारुखी यांचे ते सासरे होतं. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरुजी दहा तास ताटकळले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टल गुरुवारी पूर्णत: ठप्प झाल्याने सकाळी दहापासून शेकडो विद्यार्थ्यांना अन्न,पाण्याविना उपसंचालक कार्यालयात ताटकळावे लागले. उमेदवारांची संख्या हजारात अन् दुरुस्तीसाठी फक्त दोन कर्मचारी. त्यामुळे इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

सध्या शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सुरू आहे. त्यात प्राधान्यक्रम भरण्यापासून अर्जातील दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अर्जात आवश्यक ते बदल करून अर्ज प्रमाणिकरण करून घेण्यासाठीची एक जून ही शेवटची तारीख आहे. त्यात गुरुवारी (३० मे) सकाळपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयात भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी गर्दी केली. अनेकजण सकाळी आठपासून कार्यालयात आले होते. दहानंतर गर्दी वाढत गेली. दुरुस्तीसाठी पोर्टल वारंवार हँग होत असल्याने प्रक्रिया ठप्प पडत होती. त्यात फक्त दोनच कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू होते. उन्हाचा तडाखा, पाणी पिण्याचीही व्यवस्था कार्यालयात नाही. त्यामुळे कंटाळलेल्या आणि संतापलेल्या विद्यार्थ्यांनी उपसंचालकाच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. अन्न-पाण्यावाचून कडक उन्हात उपसंचालक कार्यालयात उभे राहूनही अर्ज अपडेट होत नव्हते. पात्र ठरूनही शिक्षण विभागाच्या चुकीमुळे हजारो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागला. सुरुवातीला अर्ज प्रमाणिकरण झाले. त्यानंतर आता ड्राफ्ट असे म्हणून उल्लेख होतो. त्यात प्रमाणिकरणासाठी लागणारा विलंब, महिला आरक्षण असताना आरक्षण नाकारले, मराठी माध्यम असताना इंग्रजी, हिंदी माध्यमाच्या शाळेतील रिक्त जागा दाखवणे, शाळांच्या याद्याच न येणे अशा चुका समोर आल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक होती. काहीजण कुटुंबासह आले होते.

\Bसक्षम अधिकारी उपस्थित नाही

\Bऔरंगाबादसह नांदेड, बीड, जालना, उस्मानाबाद अशा विविध जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी उपसंचालक कार्यालयात सकाळी आले. मात्र, या विद्यार्थ्यांना योग्य माहिती देण्यासाठी, सूचना देण्यासाठी कशाचीच व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले तेव्हा सूचना फलक लावण्याची तसदीही उपसंचालक कार्यालयाने घेतली नाही. विविध जिल्ह्यातून आलेल्या भावी शिक्षकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा ही येथे नव्हती. बसण्यासाठी व्यवस्था नसल्याने अन् तासनतास ताटकळत उभे राहण्यापेक्षा उमेदवारांनी थेट जमिनीवरच ठिय्या मांडला.

\Bशिक्षणाधिकाऱ्यांचे उपसंचालकाकडे बोट

\Bअर्जातील बदल, दुरुस्तीसह विविध प्रक्रियांसाठी शिक्षणाधिकारी स्तरावरच लॉग इन उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हास्तरावरच प्रक्रिया पूर्ण करत विद्यार्थ्यांच्या अर्जातील त्रुटी दूर होणे अपेक्षित आहे. मात्र, शिक्षणाधिकारीस्तरावर अशा प्रकारची प्रक्रियाच करण्यात येत नसल्याने किंवा तेथे योग्य उत्तरे मिळत नसल्याने उमेदवारांसमोर उपसंचालक कार्यालय गाठण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगण्यात येते.

दोन वर्षांपेक्षा अधिक काळ या पोर्टलवरच गेला. आता लॉग इन न होणे इथपासून संदर्भसूची न दिसणे, माध्यमातील बदल यासाठीही ताटकळत बसावे लागते आहे. एकदा सर्व माहिती सादर केल्यानंतर त्यात बदल होतातच कसे.

- जयश्री वहाटुळे

अर्ज भरण्यापासून ते आजपर्यंत बेरोजगारांना असाच त्रास सहन करावा लागतो आहे. हे थांबावे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम शिक्षण विभागाचे आहे. त्यांनी ते तातडीने करणे अपेक्षित असते. मात्र, तसे न झाल्याने हा गोंधळ उडाला.

- आकाश लताड

मी सुरुवातीला दुरुस्ती केली होती. त्यात प्रमाणिकरण असा उल्लेख होता. त्यात आता पुन्हा बदल झाले अन् बदल करण्याची वेळ आली. त्यात प्रक्रियेला लागणारा विलंब हा आमची परीक्षा पाहणारा आहे. हे प्रचंड त्रासदायक आहे.

- सोपान राठोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावर पाण्यासारखा पैसा; २३४ कोटी खर्च!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यात दुष्काळाने ठाण मांडले आहे. प्रकल्प कोरडे ठाक असल्याने गावागावापर्यंत पाणी पोचविण्यात प्रशासनाची अडचण झाली असून, आतापर्यंत पाण्यावर चक्क २३४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

आर्थिक वर्षात खर्च करण्यात आलेल्या २३४ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक १२९ कोटींचा खर्च औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आला आहे. तर सर्वात कमी दोन कोटी रुपये लातूर जिल्ह्यामध्ये खर्च झाले आहेत. यामध्ये तात्पुरत्या नळयोजना, नळयोजनांची दुरुस्ती तसेच टँकरद्वारे पुरवण्यात आलेल्या पाण्याचा खर्चामध्ये समावेश आहे. यंदाही मराठवाड्यातील चार महापालिका, ५० नगरपालिका आणि २५ नगरपंचायतींपैकी बहुतांश शहरे तहानलेली असून, विभागातील ३३ शहरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापैकी १३ शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील संपूर्ण पाणी संपल्यामुळे येथे अतितीव्र तर, मे महिन्याअखेरपर्यंत पुरेल इतकेच पाणी शिल्लक असलेल्या २० शहरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याची आवश्यकता लक्षात घेता प्रशासनाकडून टँकर, तात्पुरत्या नळयोजना, प्रकल्पात चर घेणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, मराठवाड्यातील नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये सध्या पाणीपुरवठ्याच्या २३ योजना राखडलेल्या अवस्थेत आहेत. यातील ज्या योजना तत्काळ पूर्ण होतील, अशांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी काही योजना सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षात तब्बल चारशे कोटी रुपये फक्त टँकरवर खर्च करण्यात आल्याची नोंद शासन दप्तरी आहे.

---

पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभरात खर्च

---

जिल्हा............................ रक्कम

औरंगाबाद..................१२९ कोटी ६६ लाख

जालना......................३८ कोटी १८ लाख

परभणी.......................५कोटी ६४ लाख

हिंगोली......................३ कोटी ६२ लाख

नांदेड......................३२ कोटी ३२ लाख

बीड.........................१४ कोटी ४ लाख

लातूर.......................२ कोटी ०७ लाख

उस्मानाबाद...............८ कोटी ६३ लाख

---

एकूण.....................२३४ कोटी २० लाख

---

गेल्या पाच वर्षातील टँकर खर्च

---

वर्षे........................ रक्कम

२०१३ - १४...........७८ कोटी ५८ लाख

२०१४ - १५.............४४ कोटी ६४

२०१५ - १६...........२२९ कोटी ७२ लाख

२०१६ - १७...........२५ कोटी ३८ लाख

२०१७ - १८.............२५ कोटी ३५ लाख

----

एकूण...............४०३ कोटी ६७ लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्ट्रक्टरल ऑडिटरला जबाबदार धरणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्या इमारतींवर मोबाइल फोनच्या कंपन्यांचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत त्या इमारतींची जबाबदारी इमारत मालकासह स्ट्रक्चरल ऑडिटरवर राहणार आहे. याबद्दलचे धोरण निश्चत करून ते सर्वसाधारण सभेत ठेवले जाणार आहे.

महापालिका क्षेत्रात मोबाइल फोनच्या कंपन्यांचे ३७३ टॉवर्स असल्याची नोंद पालिकेकडे आहे. यापैकी २७३ टॉवर्स अनधिकृत असल्याची नोंद देखील पालिकेच्या दप्तरी आहे. ज्या इमारतींवर टॉवर्स उभारण्यात आले आहेत त्या इमारतींच्या मजबुतीबद्दल शंका व्यक्त केली जाते. बहुतांश इमारतींवर पालिकेच्या परवानगीशिवाय टॉवर्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही, असे मानले जात आहे. मोबाइल टॉवर्सवर कारवाई करण्यास न्यायालयाने निर्बंध घातले आहेत, त्यामुळे टॉवर्स सील करून मोबाइल फोनची सेवा खंडित करणे पालिकेला शक्य नाही, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. त्यामुळे ज्या इमारतींवर टॉवर्स लावण्यात आले आहेत त्या इमारतींचे इमारत मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिटरकडून ऑडिट करून घेणे बंधनकारक केले जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटरने इमारतीच्या मजबुतीकरणाचे ऑडिट करून शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर शपथपत्रासह इमारतीच्या मजबुतीसंदर्भात आपला अभिप्राय द्यायचा आहे. या अभिप्रायानंतर त्या इमारतीमुळे दुर्घटना घडल्यास इमारत मालकासह स्ट्रक्चरल ऑडिटरला देखील जबाबदार धरण्याबद्दलचे धोरण तयार केले जात आहे. नगररचना विभाग हे धोरण तयार करत आहे. धोरण तयार झाल्यावर ते सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवले जाणार आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपीनाथ मुंडे स्मारक; ५० कोटींची तरतूद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या कामासाठी सरकारने ५० कोटी ६१ लाखांची तरतूद केली असून, सिडको प्रशासन या स्मारकाचे बांधकाम करणार आहे. याबद्दलचा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादमध्ये भव्य स्मारक असावे, असा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. शिवसेना - भाजप नगरसेवकांनी एकमताने स्मारकाचा प्रस्ताव मंजूर केला. स्मारकाच्या बांधकामासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली होता. ही मागणी मान्य करीत राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने २९ मे रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशात नगरविकास खात्याने म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून २०१५ रोजी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार स्मारक उभारण्याचे काम शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) मार्फत करण्यात केले जाईल. स्मारक उभारण्यासाठी पन्नास कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर करण्याबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना तीन जानेवारी २०१९ रोजी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार निधी उपलब्ध होवून स्मारकाचे काम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील स्मारकाचे बांधकाम सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सिडकोने महापालिकेकडे स्मारक हस्तांतरित करावे. त्यानंतर स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेने करावे. हस्तांतरणाच्यावेळी आवश्यक तो करारनामा सिडको व महापालिका यांच्यात करण्यात यावा.

\Bठाकरे स्मारकासाठी पाच कोटी

\Bशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक 'एमजीएम' परिसरातील पालिकेच्या जागेवर उभारण्याचा प्रस्ताव देखील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. या स्मारकासाठी शासनाने ६० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत पाच कोटी ७० लाखांचा निधी या स्मारकाच्या कामासाठी महापालिकेला दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘परा‌भवाने खचू नका, विधानसभेची तयारी करा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊ नका, नव्या उमेदीने व ताकदीने विधानसभेच्या तयारीला लागा, असे आ‌वाहन काँग्रेस शहराध्यक्ष, माजी आमदार नामदेव पवार यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत केले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

शहागंज येथील गांधी भवनात गुरुवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणूक ही जातीयवादावर झाली, असा आरोप शहराध्यक्ष पवार यांनी केला. जातीयवादी विचार अधिक काळ टिकत नाहीत, काही दिवसांतच मतदार हे धर्मनिरपेक्ष विचारासाठी पुन्हा काँग्रेसला साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता ताकदीने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. आपआपल्या विभागात काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणारे कार्यकर्ते, नगरसेवकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. महापालिकेचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अय्युब खान, सरोज मसलगे, राजू नरवडे, यशवंत कदम, किशोर तुळशीबागवाले, मुनीर पटेल, सुभाष देवकर, सत्तार खान आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एज्युकेशन फेअर’चे थाटात उद्‌घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) आयोजित 'एज्युकेशन फेअरला प्रारंभ झाला आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या फेअरचे उद्घाटन विभागीय उपायुक्त वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. अपर्णा कक्कड, जेएनईसीचे प्राचार्य हरिश्चंद्र शिंदे, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. १ जूनपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्पस'च्या सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

गुरुवारी (३० मे) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते फीत कापून एज्युकेशन फेअरचे उदघाटन झाले. यावेळी एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर, एमजीएम आरोग्यमच्या डॉ. अपर्णा पांडव, बायोटेक्नॉलॉजीचे प्राचार्य संजय हरके, प्राचार्या डॉ. तृप्ती देशमुख, प्रा. अभय कुलकर्णी प्रा. गिरीश बसोले आदींसह एमजीएम परिवारातील विविध विभागांचे प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'महाराष्ट्र टाइम्स प्लॅनेट कॅम्प'च्या सहभागाने आयोजित या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, स्टडी अब्रॉड यासह स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन मिळणार आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक या फेअरमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन तर करतीलच शिवाय विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील करतील.

'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने आयोजित 'एज्युकेशन फेअर'च्या माध्यमातून विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यासह यामध्ये सहभागी होऊन भविष्याची दिशा निश्चित करता येऊ शकेल. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ देखील सेमिनारच्या रूपाने घेता येणार आहे.

- अंकुशराव कदम, सचिव, एमजीएम

हे फेअर पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणारे आहे.अनेक नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आहेत. अशी काही करिअर आहेत की ज्याची विद्यार्थी व पालकांना माहिती नाहीत त्याही करिअरची माहिती येथे मिळते.

-वर्षा ठाकूर-घुगे, विभागीय उपायुक्त (सामान्य प्रशासन )

चौकट

स्थळ- एमजीएम क्लोव्हरडेल शाळेचे मैदान, एमजीएम कॅम्पस, एन-६, सिडको, औरंगाबाद

३१ मे २०१९

वेळ- सकाळी १० वाजता

विषय- स्टडी अब्रॉड (विदेशातील शिक्षण)

वक्ते- अनिरुद्ध हातवाळने

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)

वक्ते- अजित थेटे

...

१ जून २०१९

सकाळी १० वाजता

विषय- सिनेमानिर्मिती क्षेत्रात करिअर संधी

वक्ते- शिव कदम

..

वेळ- सायंकाळी ६ वाजता

विषय- दहावीनंतर काय?

वक्ते- गोविंद काबरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

0
0

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील रामदास नारायण माळी याची सबळ पुराव्याअभावी वीजचोरीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी नुकतेच दिला आहे. रामदास माळी याने ५७१२ युनिट विजेची ४६ हजार ७८४ रुपयांची चोरी केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्याच्यावतीने अ‍ॅड. रवी पी. नगरकर यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लाचप्रकरणात पोलिसाला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

अपघाताचा गुन्हा दाखल न करता जप्त वाहन परत करण्यासाठी वाहनधारकाकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अशोक रामराव जगधने (वय ५१) यास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील सोनई येथील गोरखनाथ जगन्नाथ पठारे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर ३१ जानेवारी २०११ रोजी जगधने यास साफळा रचून पकडले होते. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सोनई येथील गोरखनाथ पठारे यांच्या मालकीची पिकअप व्हॅन (क्रमांक एमएच १७ टी ५२९६) त्यांचा चालक देशमाने हा २२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अहमदनगरला घेऊन जात होता. त्यावेळी लिंबेजळगावजवळ दुपारी १२च्या सुमारास व्हॅनचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाले होते. या अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व जप्त केलेले वाहन परत करण्यासाठी वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल अशोक जगधने यांनी पठारे यांच्याकडे २५ हजार रुपये लाच मागितली व पाच हजार रुपयांत सौदा ठरला. पठारे यांनी याबाबत औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागात तक्रार दिली. या तक्रारीची खात्री केल्यानंतर जगधने याला ३१ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साफळा रचून अटक केली. तत्कालिन पोलिस उपाधीक्षक के. एम. प्रजापती यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. साक्षीपुराव्यावरून लोकसेवकाविरुद्ध अपराध सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एम. तपकिरे यांनी कलम सात व दोननुसार आरोपी जगधने यास दोन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व कलम १३ (२)नुसार दोन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. याप्रकरणात सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकिल कैलास पवार खंडाळकर यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस उपाधीक्षक सतीष भामरे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाच्या आमिषाने गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

साडेसात कोटी रुपयाचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत कापड व्यापाऱ्याची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. २५ फेब्रुवारी ते एक एप्रिल २०१९ यादरम्यान हा प्रकार घडला. आरोपींमध्ये लोकसभेच्या पराभूत उमेदवार दीपाली मिसाळचा समावेश असून, तीन आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिद्दिकी शफी अहेमद (वय ३४, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांनी तक्रार दाखल केली. सिद्दिकी यांचा कापड व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या एका मित्राने त्यांची भेट विजय शिंदे आणि दीपाली मिसाळ यांच्यासोबत घालून दिली होती. यावेळी त्यांनी सिद्दिकी यांना प्राइम कृषी विकास निधी लिमिटेड या कंपनीची माहिती दिली होती. या कंपनीत चार लाख ८० हजार रुपये गुंतवणूक केल्यास आठ दिवसांत तुम्हाला साडेसात कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. या बोलण्यावर विश्वास ठेवत सिद्दिकी यांनी २५ फेब्रुवारी रोजी एन-दोन येथील कामगार चौकाजवळील प्राइम कृषी विकास निधीच्या कार्यालयात जाऊन चार लाख ८० हजार रुपये भरले. आठ दिवसानंतर सिद्दिकी यांनी मिसाळ आणि शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सिस्टिममध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगत एक दिवस थांबण्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सिद्दिकी यांनी फोन केला असता त्यांचा फोन उचलण्यात आला नाही. यानंतर सिद्दिकी कार्यालयात जाऊन मिसाळ आणि शिंदे यांना भेटले. यावेळी तुमच्या कर्जाची कागदपत्रे जमा करा. कर्जाचा पहिला हप्ता पावणेदहा लाख घेऊन जा, असे सांगण्यात आले. सिद्दिकी यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांना पावणेदहा लाखांचा चेक देण्यात आला. हा चेक रोजेबाग येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत सिद्दिकी यांनी वटविण्यासाठी भरला असता तो बाउन्स झाला. यानंतर सिद्दिकी यांनी वारंवार प्राईम कृषी विकास निधीच्या कार्यालयात चकरा मारल्या असता तेथे कोणीही भेटले नाही. हा प्रकार बनावट असून, आपली या कार्यालयाचे चेअरमन संतोष आव्हाळे, दीपाली मिसाळ आणि विजय शिंदे यांनी फसवणूक केल्याचे सिद्दिकी यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी संतोष आव्हाळे, दीपाली मिसाळ आणि विजय शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दीपाली मिसाळ ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभी होती. तिला अल्प मते पडली असून, आरोपींमध्ये तिचा देखील महत्त्वाचा सहभाग असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.

\Bइतर खातेदारांची देखील फसवणूक\B

या आरोपींनी जालना येथे देखील शेख अब्दुल खुद्दूस यांना प्राइम कृषी विकास निधीचे कार्यालय चालविण्यास दिले होते. त्यांच्या खातेदारांचे नऊ लाख आणि शेख अब्दुल यांचे २८ हजार ५०० रुपये घेत त्यांची देखील या तिघांनी फसवणूक केली आहे; तसेच सिद्दिकी यांचे, इतरांचे कोरे धनादेश आरोपींनी घेतले असून, त्यांना धनादेश बँकेत भरून बाउन्स करण्याची धमकी आरोपी देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लेखान्यात दोन गटांत राडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिल्लेखाना येथे जुन्या वादातून तरुणाचा कारमध्ये पाठलाग करीत तलवारीने हल्ला करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजता घडला. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. दंगा काबू पथकाने येथील परिस्थिती नियंत्रणात आणली.

क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; परमेश्वर वाघ (वय ४५, रा. आडगाव निपाणी) आणि नितीन प्रकाश जाधव (वय ४२, रा. रेणुकानगर, शिवाजीनगर) यांच्यात जुना वाद आहे. या वादातून वर्षभरापूर्वी शिवाजीनगर भागात परमेश्वर वाघने साथीदारांच्या मदतीने नितीन जाधव याच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गुरुवारी न्यायालयात सुनावणी होती. यावेळी परमेश्वर वाघ हे रामेश्वर गवारे, शार्दुल सुरेश गावंडे यांच्यासोबत कारमध्ये कोर्टात आले होते. नितीन जाधव देखील साथीदारांसोबत कोर्टात हजर होता. कोर्टाने पुढील तारीख दिल्याने परमेश्वर वाघ साथीदारासोबत कोर्टातून बाहेर पडले. महावीर चौक, वरद गणेश चौकामार्गे सिल्लेखान्यातून ते जात होते. यावेळी नितीन जाधवने त्यांचा पाठलाग करीत सिल्लेखान्यात त्यांना अडवले. यावेळी दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यावेळी तलवारीचा वापर करण्यात आला.

या घटनेत परमेश्वर वाघसह गवारे, गावंडे जखमी झाले. या हाणामारीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून जखमी झालेल्यांना उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये हलविले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एक कार, तलवार जप्त केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात सुरू होती.

\Bतरुणांनी साधली संधी\B

या ठिकाणी सुरू असलेल्या हाणामारीमुळे परिसरातील नागरिकांचा गैरसमज झाला. आपल्या लोकांसोबत हाणामारी झाल्याचे त्यांना वाटल्यामुळे काही तरुणांनी देखील यामध्ये संधी साधून घेतली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे नूतन कॉलनी येथील कार्यालयात होते. त्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत वाद मिटवण्यास पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’चा कारभार सात निरीक्षकांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सात मोटार वाहन निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. आता सात मोटार वाहन निरीक्षकांवर कार्यालयाचा कारभार असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या 'आरटीओ'तील कामांना उशीर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्याच्या गृह विभागाने राज्यातील १०९ मोटार वाहन निरीक्षकांच्या बुधवारी प्रशासकीय कारणामुळे बदल्या केल्या. यामध्ये औरंगाबाद 'आरटीओ' कार्यालयातील सात मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. औरंगाबाद विभागातून सात निरिक्षकांच्या जागी अन्य जिल्ह्यातून किंवा विभागातून सात मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक होते. परिवहन विभागाकडून सात निरीक्षकांची औरंगाबादला बदली केली नाही. केवळ जालना येथील दीपक मेहेरकर यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे. यामुळे कार्यालयातील कामकासाठी केवळ सात निरीक्षक उरले आहेत.

'आरटीओ' कार्यालयात वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग टेस्ट, परवाने देणे आदी कामे कामे मोटार वाहन निरीक्षकांकडून करण्यात येत असतात. सात वाहन निरीक्षक कमी असल्याने आरटीओ कार्यालयाचे कामकाज रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

\B'टार्गेट'वर परिणामाची शक्यता\B

आरटीओ कार्यालयाकडून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या, अवैध प्रवासी वाहतूक, नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई कारवाई करण्यात येते. यासाठी 'टार्गेट'ही दिले जात आहे. मोटार वाहन निरीक्षक कमी असल्याने या कारवायांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल विभागात बदल्यांचे वारे

0
0

औरंगाबाद : मे महिना संपण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला असून, महसूल विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरु झाले आहे. गुरुवारी (३० मे) विभागीय आयुक्त कार्यालयात बदल्यांबाबत खल सुरू होता. शुक्रवारी (३१ मे) बदल्यांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. निर्धारित कालावधी पूर्ण केलेले नायब तसहलदार; तसेच अव्वल कारकून, लघुलेखक, मंडळ अधिकारी, लिपिकासह अन्य पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. काही कर्मचाऱ्यांनी मनासारखा विभाग, ठिकाण मिळावे यासाठी काही दिवसांपासून फिल्डिंग लावून ठेवली आहे. काही वर्षांपासून एकाच जागेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचीही या बदल्यांमध्ये उचलबांगडी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images