Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठवाड्यात ६५५ गावांना पुराचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

येत्या काही दिवसांत पावसाचे आगमन होणार असून, विभागीय प्रशासनाकडून संभाव्य आपत्ती निवारणासंदर्भात सूचना देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत तब्बल ६५५ गावे पूरप्रवण म्हणून घोषित करण्यात आली असून, १४६९ गावे नदीकाठावर असल्याने ही गावांनाही पुराचा धोका राहणार आहे. पूरप्रवण गावांमध्ये सर्वाधिक १७४ नांदेड जिल्ह्यातील आहेत.

मराठवाड्यात प्रामुख्याने गोदावरी, दुधना, सिंदफणा, पूर्णा, मांजरा आणि तेरणा या प्रमुख नद्या असून, पावसाळ्यात अतिवृष्टीनंतर या नद्यांना पूर येण्याचा इतिहास आहे. अतिवृष्टीनंतर; तसेच जायकवाडी धरणात ऊर्ध्व भागातून पाणी सोडल्यानंतर अनेक गावांना पुराचा वेढा असतो. २७ जुलै २००५ रोजी अतिवृष्टीनंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये गोदावरी व दुधना नद्यांना पूर आला होता त्यावेळी १०८ गावे बाधित झाली होती, पाच आणि सात ऑगस्ट २००६ रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे औरंगाबाद, जालना व नांदेड जिल्ह्यातील ११३ गावे बाधित झाली होती. १९ आणि २२ सप्टेंबर २००८ रोजी अतिवृष्टी झाली होती. जायकवाडी धरणातील पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीस पूर आला होता यावेळीही जिल्ह्यातील २३ गावे बाधित झाली होती; तसेच २०१३मध्येही जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. २०१६मध्ये जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पातील पाणी सोडण्यात आल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील १७ तर, गंगापूर तालुक्यातील नऊ गावांना पुराने वेढले होते. यंदाही मराठवाड्यातील ६५५ गावांना पुराचा धोका असून, नदीकाठच्या ब्लू आणि रेडलाइनमध्ये समाविष्ट करण्यात आलेली अन्य १४६९ गावांनाही पुराच्या दृष्टीकोणातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रशासनांनी मान्सूनपूर्व तयारी बैठक घेतल्यानंतर विभागीय प्रशासनाकडून नुकतीच बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हानिहाय पूरप्रवण गावे

जिल्हा............ गावांची संख्या........ नदीकाठची गावे

औरंगाबाद.........४३..........................१६५

जालना.............४७..........................१७६

परभणी.............१०३.........................११८

हिंगोली.............७१...........................७०

नांदेड..............१७४.........................३३७

बीड...................५३........................३९६

लातूर...............७८...........................१५९

उस्मानाबाद.......८६..........................१३८

एकूण.................६५५.....................१४६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रवाशाच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा क्रांतीचौकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालेगाव येथील प्रवाशाचे अपहरण करून त्याला लुबाडले. त्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नाशिक ग्रामीण हद्दीतील वडनेर आकुर्डी येथे प्रवाशाच्या फिर्यादीवरून सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र, या घटनेची सुरुवात औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकापासून झाल्याने नाशिक पोलिसांना हा गुन्हा क्रांतीचौक पोलिसांना वर्ग केला आहे.

याप्रकरणी अंशुमन नथू वाघ (वय ४१ रा. सप्तश्रुंगी मंदिराजवळ, मालेगाव कॅम्प) यांनी तक्रार दिली होती. वाघ हे २३ मे रोजी औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून बसले होते. नाशिक ग्रामीण हद्दीतील वडनेर आकुर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांचे अज्ञात लोकांनी अपहरण करीत त्यांना बेदम मारहाण केली. त्यांचा ऐवज लुबाडून घेत त्यांना विषारी औषध पाजले होते. वाघ यांना बेशुद्धावस्थेत सोडल्यानंतर नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी वाघ यांच्या जबाबावरून वडनेर आकुर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरण, जबरी चोरी, विष पाजणे, मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, २५ मे रोजी वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. वाघ यांच्या जबाबावरून या गुन्ह्याची सुरुवात औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नाशिक पोलिसांनी हा गुन्हा शहर पोलिस आयुक्तालयामार्फत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात वर्ग केला. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, सहायक निरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रवेश घेतला तरच बारावीची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावीला ऑनलाइन प्रवेश घेतला, तरच त्या विद्यार्थ्याला बारावीची बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश ऑफलाइन करू नये, अशी समज शुक्रवारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला आजपासून (एक जून) सुरुवात होत आहे.

अकरावी प्रवेशासंदर्भात देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात महापालिका क्षेत्रातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची सहविचार सभा शिक्षण विभागातर्फे घेण्यात आली. या सभेला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रजनीकांत गरूड, डॉ. संभाजी कमानदार, स. भु. महाविद्यालयाचे उपप्राचार्य चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पानसरे यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली.

शून्य फेरी, नियमित फेरी, विशेष फेरी आणि एफसीएफएस फेरी (प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य) अशा चार फेऱ्यांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन प्रवेश अनिवार्य आहे. जो विद्यार्थी अकरावीत ऑनलाइन प्रवेश घेईल, त्यालाच बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही शाळा, महाविद्यालयाने ऑफलाइन प्रवेश देण्याचा प्रयत्न करू नये, असे ज्ञानेश्वर पानसरे यांनी स्पष्ट केले.

अकरावीची शुल्क आकारणी पद्धत देखील स्पष्ट करण्यात आली. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी शासनाने ठरवून दिलेले शुल्कच विद्यार्थ्यांकडून घ्यावे. विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना त्यांचे शुल्क ठरविण्याचा अधिकार आहे. पण हे शुल्क 'फी रेग्युरेटरी अॅक्ट'चा भंग करणारे नसावे. शुल्क ठरवताना पालक सभेला विश्वासात घ्यावे, असे सांगण्यात आले.

\Bअशी भरावी लागेल माहिती \B

ऑनलाइन प्रवेशासाठी पार्ट एक आणि पार्ट दोन, असे दोन अर्ज भरावे लागतात. त्यापैकी पार्ट एकच्या अर्जात विद्यार्थ्याला त्याची वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. हा वैयक्तिक माहितीचा अर्ज एक जूनपासून भरून घेण्याची प्रक्रिया शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावर सुरू केली जात आहे. पार्ट दोनच्या अर्जात दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण लिहिवे लागतात. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर पार्ट दोनचा अर्ज भरवा लागणार आहे. तोपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पार्ट एक अर्ज भरून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

\Bप्रथम पसंती नाकरल्यास सर्वात शेवटी संधी \B

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्याला एक ते दहा पसंतीक्रम देता येणार आहेत. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले, तर तेथेचे प्रवेश घ्यावा लागणार आहे. तेथे प्रवेश घेतला नाही, तर त्याला ब्लॉक केले जाईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर त्याला पुन्हा संधी दिली जाईल. तेव्हा शिल्लक राहिलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल. दोन ते दहा पसंतीक्रमामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खताची अनाधिकृत विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

फुलंब्री तालुक्यातील बाभुळगाव खुर्द परिसरातील जी. बी. अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज, गुजरात या कंपनीने एका एजंटच्या माध्यमातून ऑरगॅनिक मॅन्यूर नावाच्या खताची अनाधिकृत विक्री करत १८ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवल पाटील या एजंटासह कंपनीच्या संचालकांविरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी; तसेच दर्जेदार व प्रमाणित बी-बियाणे खत शेतकऱ्यांना मिळावे, त्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा, तालुकास्तरावर गुणनियंत्रक यंत्रणेमार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. फुलंब्री तालुक्यातील बाभुळगाव खुर्द परिसरात एक व्यक्ती अनाधिकृतपणे खतांची विक्री करत असल्याची माहिती पथकास मिळाली. त्याआधारे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, मोहीम अधिकारी प्रशांत पवार, सुदर्शन मामिडवार यांनी परिसरात गुरुवारी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी एका शेतकऱ्याने पथकातील सदस्यांना आपल्या शेतात नेले. तेथे त्याने खरेदी केलेले खत पथकास दाखवले.

जी. बी. अ‍ॅग्री इंडस्ट्रिज भरूच, गुजरात या कंपनीचे धरती रत्न ऑरगॅनिक मॅन्यूर दाणेदार खताच्या २५ बॅग कंपनीचे प्रतिनिधी नवल पाटील याकडून खरेदी केल्याचे त्या शेतकऱ्याने सांगितले. गावातील यादव चोपडे, बाळू जाधव, कैलास जाधव, देवीदास जाधव, अंबादास निकम, रमेश जाधव, सुरेश जाधव, अण्णा मोरे, जनार्दन मोरे, कारभारी मोरे, प्रकाश मोरे, आजिनाथ साळुंके, ज्ञानेश्वर साळुंके, दत्तू मोरे, पंडित मोरे यांच्यासह सुमारे १८हून अधिक शेतकऱ्यांनी हे खत खरेदी केले. नवल पाटील याने ट्रकमध्ये खत आणून थेट शेतकऱ्याना विकल्याचे; तसेच अनेकांना त्याने उधारीत खत दिल्याचेही समोर आले.

\Bपरवाना नसताना विक्री\B

पथकाने अधिक तपासणी केली असता कंपनी प्रतिनिधी असलेल्या पाटीलकडे खत विक्रीचा कोणाताही परवाना नसतानाही तो थेट शेतकऱ्यांना अनाधिकृतपणे खत विक्री करत असल्याचे आढळून आले. संबंधित उत्पादक कंपनीनेही बँगवर कायद्यानुसार आवश्यक मजूकर छापलेला नाही; तसेच शेतकऱ्यांना देण्यात आलेली खताचे बिले हे खत नियंत्रण आदेश १९८५मधील विहित करून दिलेल्या नमुन्यात नसल्याचे समोर आले. शेतकऱ्यांची फसवणूक व कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खत निरीक्षक रामराव बेंबरे यांच्या फिर्यादीवरून जी. बी. अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक व कंपनी प्रतिनिधी नवल पाटील यांच्याविरुद्ध वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खताचे काही नमुने काढून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यावरच ते बनावट आहे किंवा नाही हे समजू शकले, अशी माहिती गंजेवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगर, जिजामाता कॉलनीत पाणीबाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर आणि सिडकोच्या १३व्या योजनेतील जिजामाता कॉलनी येथील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. या आठवड्यात पाणी पुरवठ्यासाठी नववा दिवस उगवला. मात्र, कोठे एक तास, तर कोठे अर्धा तास, शिवाय अत्यंत कमी दाबाने पाणी सोडल्याने नागरिकांनी डोक्याला हात लावला.

जयभवानीनगर, सिडकोची १३ वी योजनेत सहा-सहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने टँकरचालक मनमानी पद्धतीने पैसे उकळत आहेत. पूर्ण उन्हाळ्यात केवळ तीन ते चार वेळा पाणीपुरवठा झाला आहे. जयभवानीनगरमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात या भागात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. मे महिन्यात आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात आला. काही घरांना पाणीच येत नाही. शनिवारी ११३ ते १२७ या घरांना पाणीच आले नाही. यावरही नागरिकांनी रोष व्यक्त केला. नियोजित वेळेपेक्षा उशिरा पाणी सोडणे, कमी दाबाने पाणीपुरवठा आदी प्रकार वाढले आहेत. पालिकेकडे कायदेशीररित्या नळ कनेक्शन मागितल्यास मिळत नाही. बेकायदा नळ कनेक्शन तत्काळ मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात मोटर लावून पाणी उपसा होत आहे. याकडे पालिका कर्मचारी दुर्लक्ष करत असून अवैध नळांची संख्या वाढली आहे. पाणी वाया घालवणाऱ्यांवर पालिका दंड आकारते. काही दिवस पाण्याची नासाडी करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला. सध्या ही मोहीम थंडावली आहे.

\Bकरमाड, झाल्टा फाट्याहून पाणी\B

जयभवानीनगरमध्ये ५०० लिटर पाण्यासाठी २५० ते ४०० रुपये मोजावे लागत आहेत. आम्हाला करमाड, झाल्टा फाट्याहून पाणी आणावे लागत असल्याने दर वाढल्याचे एका टँकरचालकाने 'मटा'ला सांगितले.

\Bनागरिक काय म्हणतात

\B'नगरसेविका जिजामाता कॉलनीकडे साफ दुर्लक्ष करतात. बोअर नादुरुस्त आहेत, पालिकेचे टँकर इकडे फिरकत नाहीत. मग हे पाणी नेमके कुठे जाते,' असा सवाल बालाजी हेभारे यांनी केला आहे. 'आठ-आठ दिवसांआड पाणी तेही पुरेसे मिळत नाही. पालिका पाणीपट्टी मात्र वसूल करते. मला बिल भरायला उशीर झाला, तर पालिकेने दंड आकारला,' असा उद्वेग एम. बी. चोरगडे यांनी व्यक्त केला. 'आठ दिवसांआड पाणी येऊनही आम्ही फक्त पिण्याचे पाणी भरू शकलो. जवळचा बोअर सुरू होता. तोही सुरू केला जात नाही,' अशी माहिती कचरू राजपूत यांनी दिली. '१३व्या योजनेत पाणीपुरवठ्याच्या वेळा विषम आहेत. जुन्या जलवाहिन्या खराब झाल्याने आम्हाला पाणी मिळत नाही. नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी पूर्ण होत नाही,' अशी माहिती

अशोक गांगुर्डे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने वाहनफेरी, मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी झाली.

मुकुंदवाडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक ते कोकणवाडी अशी भव्य वाहन फेरी काढण्यात आली. यावेळी शेकडो पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. जय मल्हार सेना आणि जयंती उत्सव समितीतर्फे धनगरी डफ, वाघ्या मुरळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, ढोल ताशांच्या गजरात आणि जय मल्हारच्या जयघोषात सायंकाळी पैठणगेट येथून सजवलेल्या रथात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा ठेवून मुख्य मिरवणूक काढण्यात आली. न्यू उस्मानपुरा सर्कलेमार्गे जाऊन मिरवणुकीची कोकणवाडी सांगता करण्यात आली. याप्रसंगी स्पर्धेत विजेत्यांना डॉ. सुभाषराव माने, पी. बी. कोकणे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यावेळी जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष लहुजी शेवाळे, यादव गवारे, दत्ता मेहेत्रे, किशोर कुकलारे, दयाबाई साबळे, लता शेळके, ज्ञानेश्‍वर जेठे उपस्थित होते.

\Bएस. टी कॉलनी \B

जेष्ठ नागरिक बी. आर. खानापुरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सोसायटीचे अध्यक्ष देवनाथ जाधव, मंदिर समितीचे अध्यक्ष अशोक पवार पाटील, सचिव माणिकराव निकम, सोसायटीचे कोषाध्यक्ष अशोक जगताप, एस. बी. लहाने, संदीप पगारे, एस. टी. नाचान, काकासाहेब पवार, नानासाहेब व्हरे पाटील, श्रीधर डांबे, रामचंद्र जुंबड, रंगनाथ कांबळे, लाखे पाटील, विनोद नवपुते आदी उपस्थित होते.

\Bसाताऱ्यात रक्तदान शिबिर \B

सातारा परिसरातील अहिल्यादेवी होळकर स्मारक मंदिरातील अर्धाकृती पुतळ्यास ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीच्या पूर्वसंध्येला येथे रोषणाई करण्यात आली. रक्तदान शिबिरात २५पेक्षा जास्त तरुणांनी रक्‍तदान केले. यावेळी सोमिनाथ शिराणे, सुभाष पारखे, लक्ष्मण सोलट, भाऊसाहेब चिलघर, मोहन काळे उपस्थित होते.

\Bयुवा सेना \B

युवा सेनेतर्फे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी युवा सेना राज्य सचिव नगरसेवक राजेंद्र जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल, नगरसेवक सिद्धांत शिरसाट आदी उपस्थित होते.

\Bजिवा सेना \B

अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नवनाथ घोडके, प्रा. राजकुमार गाजरे, रामेश्‍वर सवणे, सुनील वायगुडघे, भास्कर शेजूळ, चिंतामणी तारे, कृष्णा शेजूळ, रोहित क्षीरसागर, साहेबराव शेळके, धनंजय धोंडगे, नितीन मोहीते, शेखर कांबळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मोहम्मद अब्दुल हक्क फारूखी

$
0
0

निधन वार्ता

अब्दुल हक्क फारुखी

औरंगाबाद : रोहिला गल्ली एकखाना मशिदीच्या समोरील रहिवासी मोहम्मद अब्दुल हक्क फारुखी (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची नमाज ए जनाजा रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिटीचौक येथील मशिदीत अदा करण्यात आली. त्यांच्यावर पंचकुआ दभनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील ज्येष्ठ फोटोग्राफर, वाहेद कलाम उर्दू साप्ताहिकाचे संपादक वाहेद फारुखी यांचे ते सासरे होतं. त्यांच्या मागे पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादः जिओ टॉवरचे २ कोटी पालिकेत जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिलायन्स जीओच्या टॉवर्सचे दोन कोटी २७ लाख ६२ हजार ६६७ रुपये शुक्रवारी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीला संजिवनी मिळाली. गुरुवारी तिजोरीत केवळ ८६ लाख रुपये शिल्लक होते.

मोबाइल फोन टॉवरकडील थकबाकी वसूलची मोहीम हाती घेण्यात आली आहे. रिलायन्स जीओ कंपनीचे शहरात ९७ टॉवर असून यापैकी ८४ टॉवरचा दोन कोटी २७ लाख ६२ हजार ६६७ रुपये मालमत्ता कर विशेष वसुली अधिकारी शिवाजी झनझन यांनी शुक्रवारी वसूल करून महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे सुपूर्द केला. घोडेले यांनी ही रक्कम लेखा विभागाकडे जमा केली. अन्य कंपन्यांच्या टॉवरकडे सुमारे २३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी महापौरांनी 'मेअर्स फेलों'ची बैठक घेतली. 'तुम्ही कोणासाठी काम करता,' असे त्यांनी त्यांना विचारले. 'नाव 'मेअर्स फेलो' असले तरी एकही जण महापौरांसाठी काम करत नाही, सर्वजण आयुक्तांसाठी काम करतात. विविध विभागातून ते माहिती घेऊन आयुक्तांना पुरवतात. आयुक्तांचे खास दूत म्हणूनच त्यांचा वावर आहे,' अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वतःला झोकून दिले तरच करिअर शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्वतःतील क्षमता आणि आवड लक्षात घेऊन निवडलेल्या क्षेत्रात भरपूर मेहनतीची तयारी ठेवायला लागते. जोपर्यंत तुम्ही स्वतःला झोकून देत नाहीत तोपर्यंत अपेक्षित यश मिळणार नाही. सातत्याने शिकण्याची तयारी आणि नवनवीन गोष्टी आत्मसात केल्यास तुमच्या जीवनात आनंद येईल,' असे प्रतिपादन प्रा. डॉ. अजित थेटे यांनी केले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'एमजीएम'च्या वतीने आयोजित 'एज्युकेशन फेअर'मध्ये विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.

एमजीएम क्लोव्हरडेल शाळेच्या मैदानावर (एमजीएम कॅम्पस, एन-६) आयोजित तीन दिवसीय 'एज्युकेशन फेअर'ला विद्यार्थी आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी 'दहावीनंतर करिअर ऑप्शन (संपूर्ण विश्लेषण)' या विषयावर डॉ. थेटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडताना आपल्यातील क्षमता ओळखा. त्यासाठी खासगी, सरकारी यंत्रणेमार्फत बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते. त्यात सहभागी होऊन आपल्यातील योग्यता समजून घेऊन करिअर कोणत्या क्षेत्रात केल्यास यश मिळेल हे लक्षात येईल. विद्यार्थ्यांनी सातवी वी, आठवी आणि नववीमध्ये कोणत्या विषयात खोलवर अभ्यास करतो आणि त्या विषयात किती गुण मिळतात हे लक्षात घेऊन पुढील दिशा ठरवायला हवी. करिअर करताना जो विषय आपल्याला सोपा वाटतो आणि त्याची मनापासून आवड आहे, हे लक्षात घ्यावे. कितीतरी मुले तासंतास अभ्यास करत नसले तरी, एकदा वाचन करून ते चांगले गुण संपादन करतात. सायन्स, मॅथमॅटिक्स, लँग्वेज यासारख्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून नोकरी व व्यवसायाच्या संधी मिळवता येऊ शकेल. आर्ट्स आणि कॉमर्स हे मोठे क्षेत्र असूनही मुले मेडिकल-इंजिनीअरिंगकडे जातात. मॅनेजमेंट, कम्युनिकेशन, मास कम्युनिकेशन यासारख्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येकजण डॉक्टर किंवा इंजिनीअर होईल असे नाही. दिवसातील सात ते आठ तास आराम, दोन तास स्वतःच्या आवडीच्या कामाला वेळ देऊन नियमित व्यायाम आणि प्राणायाम करावा. दहावीनंतर आयटीआय, आर्ट, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, इंजिनीअरिंग, कंपनी सेक्रटरी यासारख्या संधी आहेत. तर बारावीनंतर बीकॉम, बीबीए, बीसीए, डीएड, सीए फाऊंडेशन सीएस फाऊंडेशन यासारख्या शिक्षणाच्या संधी आहेत,' असे डॉ. थेटे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भक्ती बनवसकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालकांसह एमजीएम परिवारातील विविध विभागांचे प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bविदेशातील शिक्षणाला मोठा वाव

\Bविश्वश्री कन्सल्टन्सीचे संचालक अनिरुद्ध हातवळणे म्हणाले, 'विदेशात शिक्षण घेतल्याने ग्लोबल प्रोफेशनल तयार होतात. त्याठिकाणी वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी, उत्तम शिक्षण योग्य वातावरण मिळते. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंड, जर्मनी यांसारख्या प्रगत देशातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील उत्कृष्ट शैक्षणिक सोयीसुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वाचनालये यांचे मोठय़ा प्रमाणावर भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षण असते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेत त्याचा विद्यार्थी म्हणून असलेला दर्जा संपतो. विद्यार्थ्यांकडे आवश्यक व्हिसा असूनही भागत नाही. आता त्यास ऑपरेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुविधेमुळे अधिक काळ अमेरिकेत राहता येते. परदेशातील उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमासाठी आणि कोणत्या देशात जायचे आहे, हे व्यवस्थित ठरवता यायला हवे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही विद्यार्थ्यांना जसे आपण पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अर्ज करावा की पीएच.डी.ला हे ठरवता येत नाही, तसेच पुढील शिक्षण युरोपमध्ये घ्यावे की अमेरिकेत, याचा निर्णयही त्यांना घेता येत नाही. परदेशातील उच्चशिक्षणामुळे मोठ्या पॅकेजच्या संधी उपलब्ध आहेत,' असा दावा त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’वरून भाजपमध्ये कलगीतुरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावरून भारतीय जनता पक्षातच दोन गट पडले आहेत. पक्षाने जयश्री कुलकर्णी यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले असताना त्या उमेदवारी दाखल करण्यापूर्वी राजू शिंदे यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक चार जून रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होती. शिवसेना - भाजपमध्ये झालेल्या करारानुसार यंदाचे सभापतिपद भाजपच्या वाट्याला आहे. स्थायी समितीमध्ये भाजपचे जयश्री कुलकर्णी, राजू शिंदे आणि पूनम बमने हे तीन सदस्य आहेत. हे तिन्हीही सदस्य सभापतिपदासाठी इच्छुक होते. त्यामुळे आपापसात संघर्ष होणार असे बोलले देखील जात होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचे सदस्य व पदाधिकारी दुपारी बाराच्या सुमारास महापालिकेत आले. तत्पूर्वी शिवसेनेचे स्थायी समितीमधील काही सदस्य व पदाधिकारी पालिकेत उपस्थित होते. सुरुवातीला भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची उपमहापौर विजय औताडे यांच्या दालनात काही वेळ बैठक झाली. त्यानंतर या सर्वांसह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थायी समितीमधील सदस्यांची महापौर दालनाच्या अँटीचेंबरमध्ये सुमारे एक तास बैठक झाली. दरम्यानच्या काळात पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून काही जणांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. बैठक संपल्यावर राजू शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रमोद राठोड अन्य पदाधिकाऱ्यांसह नगरसचिवांच्या दालनाकडे रवाना झाले. त्यांच्याबरोबर उपमहापौर विजय औताडे, भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, मकरंद कुलकर्णी, गजानन बारवाल हे देखील उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एका अर्जावर राजेंद्र जंजाळ आणि पूनम बमने यांची सूचक - अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे. दुसऱ्या अर्जावर पूनम बमने आणि गजानन बारवाल यांची अनुक्रमे सूचक - अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे. त्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी जयश्री कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, गजानन बारवाल, सुरेंद्र कुलकर्णी, शिल्पाराणी वाडकर, सीमा चक्रनारायण, प्रदीप बुरांडे यांच्यासह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते. जयश्री कुलकर्णी यांनी देखील दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. एका अर्जावर कमलाकर जगताप आणि सीमा चक्रनारायण यांची सूचक - अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे, तर दुसऱ्या अर्जावर शिल्पाराणी वाडकर आणि सचिन खैरे यांची सूचक - अनुमोदक म्हणून स्वाक्षरी आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी 'एमआयएम'चे नासेर सिद्दिकी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या दोन्हीही अर्जांवर सायराबानो अजमल खान आणि सय्यद सरवत बेगम आरेफ हुसैनी यांच्या सूचक - अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत.

\Bफोन करून सदस्यांना बोलावले

\Bजयश्री कुलकर्णी यांच्या उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करण्यासाठी सूचक - अनुमोदक पालिकेत उपस्थित नव्हते. त्यामुळे ऐनवेळी फोन करून सूचक - अनुमोदकांना महापालिकेत बोलावण्यात आले. त्यामुळे एकच धांदल उडाली. सूचक - अनुमोदक वेळेत दाखल झाल्यामुळे कुलकर्णी यांचा अर्ज दाखल केला गेला. उमेदवारी अर्ज भरण्यात झालेल्या गडबडीबद्दल प्रमोद राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाजपच्या स्थायी सभापतिपदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री कुलकर्णी याच आहेत. पक्षाचे संघटन मंत्री भाऊसाहेब देशमुख यांनी त्यांचे नाव निश्चत केले आहे. त्याबद्दल त्यांनी मला दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी माहिती दिली. मी लगेच ही माहिती गटनेते प्रमोद राठोड यांना कळविली. कुलकर्णी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करा असे सांगितले. उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेते विकास जैन यांनाही माहिती दिली. मात्र, राठोड यांनी राजू शिंदे यांचा अर्ज दाखल केला. मी बाहेरगावी आहे. औरंगाबादला आल्यावर राठोड यांना जाब विचारू.

\B- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजप

\B

राजू शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून मला अंधारात ठेवून स्वाक्षरी घेण्यात आली आहे. मी गटनेत्यांवर विश्वास ठेवून स्वाक्षरी केली होती. आम्ही चर्चा करीत असताना राठोड यांनी स्वाक्षरीचा अर्ज माझ्यापुढे सरकवला आणि स्वाक्षरी करण्यास सांगितले. मी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी स्वाक्षरी करण्याची भूमिका घेतली. तेव्हा तुम्ही चिंता करू नका. पक्षाच्या आदेशानुसारच उमेदवारी अर्ज भरू असे राठोड यांनी सांगितले आणि शेवटी त्यांनी शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरला. भाजपने दिलेल्या आदेशानुसारच मी वागणार आहे.

\B- गजानन बारवाल, स्थायी समिती सदस्य\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभकल्याणच्या अध्यक्षाच्या पोलिस कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुंतवणूकदारला दोन लाख १५ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणात शुभकल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष व कार्यकारी संचालक तथा आरोपी दिलीप आपेट याच्या पोलिस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी शनिवारी दिले.

या प्रकरणात काकासाहेब उत्तमराव कोहकडे (५०, रा. भागवतगल्ली, ता. पैठण) यांनी तक्रार दिली होती. कोहकडे यांनी शुभकल्याण सोसायटी पाचोड येथील शाखेत चार लाख पाच हजार रुपये फिक्स डिपॉझीट केले होते. त्यानंतर फिक्स डिपॉझीट पैठण येथील शाखेत वर्ग करण्यात आले. दरम्यानच्या काळात कोहकडे यांना प्लॉट खरेदी करायचा असल्याने ते पैठण येथील मॅनेजरला भेटले. मात्र, त्याने नोटाबंदीचे कारण देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कोहकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आपेटला २७ मे रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर न्यायालयाने आरोपीला एक जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी आरोपी अपेटला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासनाच्या समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. १७ जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात नवीन पुस्तके पडणार आहेत.

मोफत पाठ्यपुस्तके योजनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील ४७५ शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याची जबाबदारी शासनाने महापालिकेवर दिली आहे. एकूण एक लाख ३९ हजार ४३४ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी आठ लाख नऊ हजार ९२८ पुस्तकांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यापैकी पुस्तकांच्या सात लाख ५५ हजार ११४ प्रती प्राप्त झाल्या आहे. प्राप्त झालेल्या पुस्तकांचे वाटप शनिवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी सभापती राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते. दहा जूनपर्यंत सर्व शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक - पालक संघ, माता पालक संघ, संस्थेचे पदाधिकारी व शिक्षण प्रेमींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात यावे, असे प्रत्येक शाळेला कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंच्या सत्काराला विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा सेवागौरव समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, स. भु. शिक्षणसंस्था मराठवाड्याची अस्मिता असून संस्थेने आपले सभागृह कार्यक्रमाला देऊ नये अशी मागणी करीत संघटनांनी सेवागौरव समारंभाला विरोध केला आहे. त्यामुळे कार्यक्रम ऐनवेळी दुसरीकडे होण्याची शक्यता आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ तीन जून रोजी पूर्ण होणार आहे. यानिमित्त विविध संस्थांनी गोविंदभाई श्रॉफ सभागृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सेवागौरव समारंभ आयोजित केला आहे. चोपडे यांनी आपल्या कार्यकाळात एकही उल्लेखनीय काम केले नाही. उलट विद्यापीठाचे नाव बदनाम करण्यात अग्रेसर राहिले. त्यामुळे त्यांचा सेवागौरव समारंभ कशासाठी, असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे. मराठवाड्याची अस्मिता लक्षात घेऊन स. भु. शिक्षण संस्थेने सेवागौरव समारंभाला सभागृह देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर 'राविकाँ'चे अध्यक्ष अमोल दांडगे व मराठवाडा लॉ कृती समितीचे अध्यक्ष नवनाथ देवकते यांची स्वाक्षरी आहे. या सत्कारावर अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्यांनीही आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाची खरी सेवा केली असेल तर सेवागौरव करण्यास अर्थ आहे. अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या कुलगुरू चोपडे यांचा सेवागौरव कशासाठी असा प्रश्न उपस्थित करुन अनेक सदस्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. तर स्वाभिमानी मुप्टा संघटनेने कुलगुरू चोपडे यांचा स्वतंत्र सेवागौरव समारंभ आयोजित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील, सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे, प्रो. शंकर अंभोरे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, कुलगुरू चोपडे यांचा चौकशी अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद आणि मुंबईत उपोषण सुरू आहे. चौकशीनुसार कार्यवाही होईपर्यंत चोपडे यांना सेवानिवृत्तीचे लाभ व ना-हरकत प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी संघटनांनी केली आहे. याबाबत राज्यपाल कार्यालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

\Bआत्मदहनाचा इशारा

\Bकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने एस. एफ. पाटील समिती नेमली होती. या समितीने शासनाला आठ महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे. हा अहवाल जाहीर कjtन योग्य कारवाई करावी या मागणीसाठी मराठवाडा विकास कृती समितीचे एक मेपासून विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, या उपोषणाची दखल घेतली नसल्याने उपोषणार्थी राहुल वडमारे यांनी तीन जून रोजी आत्मदन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे प्रवाशांचा एसटीवर विश्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच एसटी स्पर्धेत टिकून आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निर्णयामुळे अनेक बदल आणि परिवर्तन होत आहेत. ते प्रवाशांनाही आवडत आहे. मात्र, हे बदल करताना एसटी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचा विचार करण्याची गरज आहे,' असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिवहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विभाग नियंत्रक किशोर सोमवंशी, चिकलठाणा कार्यशाळा व्यवस्थापक सहारे, यांच्यासह आगार व्यवस्थापक सुनील शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी देशाच्यासेवेत व संरक्षणात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीर शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शहिदांच्या वीर पत्नी कुसुमबाई जाधव, चंद्रभागाबाई बनसोड, सुरेखा पातोंड, कांता पवार, आशा सुरडकर, वृशाली गरज, कमलबाई गायकवाड, कडूबाई घुले, यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कर्मचारी देविदास तनपुरे, प्रभाकर मिसाळ, हनीफ शाह यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत कर्मचाऱ्यांना परिवहन दिनाच्या शुभेच्छा देत, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमावर एसटी स्पर्धेत टिकून असल्याचे सांगितले. कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मध्यवर्ती बस स्थानकासह सिडको आगार, सिल्लोड, पैठण, गंगापूर, वैजापूर, सोयगावसह कन्नड येथेही परिवहन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्रक्रियेत तरुणीचा मृत्यू; डॉक्टरविरोधात गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुळव्याधीची शस्त्रक्रिया करताना अचानक प्रकृती बिघडून तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कायदायक घटना शुक्रवारी रात्री घडली. हेमा अनिल वाघमारे (वय २३, रा. इंदिरानगर) असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी हेमा यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून सुखायू सुश्रुत हॉस्पिटलचे डॉ. शिवकुमार गोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमाने धुळे येथे डी. फार्मचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या त्या भालगाव येथील भय्यासाहेब टोपे महाविद्यालयात बी. फार्मच्या अंतिम वर्षाला होती. दोन महिन्यांपासून हेमाला मुळव्याधीचा त्रास सुरू होता. त्यामुळे तिने सुखायू सुश्रुत हॉस्पीटलचे डॉ. शिवकुमार गोरे यांच्याकडे उपचार सुरू केले. मात्र, त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉ. गोरे यांनी हेमाच्या कुटुंबियांना सांगितले. हेमाची परीक्षा सुरू असल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. दरम्यान हॉस्पिटलमार्फत शस्त्रक्रिया शिबिर होत असून त्यामध्ये कमी दरात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे कुटुंबियांनी ३१ मे रोजी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी हेमावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. मात्र, शस्त्रक्रिया सुरू होताच काही वेळात डॉक्टरांनी हेमाची प्रकृती बिघडली असून तिला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करावे लागेल असे सांगितले. कुटुंबियांनी दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तिची प्रकृती अधिकच बिघडत चालल्याने तेथील डॉक्टरांनी घाटीत दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला घाटीत घेऊन जात असताना रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

\Bहलगर्जीपणा कारणीभूत

\Bघाटीत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून आठ वाजता हेमाला मृत घोषित केले. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच हेमाचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबियांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून डॉ. शिवकुमार गोरे याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक डी. बी. कोपनार करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीस लाखांचा अपहार, शिंदेचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हडको, एन-११ मधील श्री गणपती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीत तब्बल ३० लाख ६६ हजार ९६३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात आरोपी रामदास यादवराव शिंदे (५५, शिवाजीनगर, गारखेडा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी .एस. शिंदे यांनी फेटाळला. सहकारी संस्थेचे पुरक विशेष लेखा परीक्षक सुधाकर कारभारी गायके यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणात सोसायटीच्या अध्यक्षासह सचिव, संचालक पिग्मी एजंटांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा गंभीर आहे. मोठा आर्थिक गैरव्यहार झाला आहे. तपास प्राथमिक अवस्थेत आहे. आरोपीच्या अटकेशिवाय तपास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी केली. ही विनंती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलआयसी फसवणूक; फिर्यादीच आरोपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादी तथा एलआयसी पेन्शन व समूह विमा विभाग अधिकारी भीमराव सरवदे हाच आरोपी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सरवदेला शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी शनिवारी दिले.

आरोपी सरवदे हा प्रत्येक दाव्यामागे खाजेकर याच्याकडून चार हजार रुपये घेत दावे मंजूर करीत असल्याचे तपासात समोर आले. गुन्ह्यात यापूर्वी एलआयसीतील सहाय्यक लिपीक विनोद बत्तीसे, मुरलीधर खाजेकर, अली खान, शंकर गायकवाड, सुभान शहा व शकिल शहा अशा सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना देखील तीन जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जनश्री योजनेअंतर्गत वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे (एनजीओ) अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्राआधारे एलआयसी कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

\Bगुन्हात दाखविले खोटे दावे

\Bगुन्ह्यात आरोपींनी खोटे दावे दाखवत ते मंजूर करून एलआयसीला ९९ लाख ३० हजारांचा गंडा घातला असून, या दाव्यांपैकी २०६ दाव्यांची कागदपत्रेच समोर आली आहेत. तर उर्वरित कागदपत्रे आरोपींनी गहाळ केल्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने तपास करणे आहे. आरोपी सरवदे याने अधिकारी पदावर असताना किती खोटे दावे मंजूर करून अपहार केला. याचा तपास करावयाच असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाचोळा’ कादंबरी रूपेरी पडद्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम फिल्म आर्टस विभागाने चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या 'पाचोळा' कादंबरीवर चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाला शनिवारी एमजीएम परिसरात सुरुवात झाली. ख्यातनाम तंत्रज्ञ आणि कलाकार चित्रपटानिमित्त एकत्र आले आहेत.

एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या फिल्म आर्ट्स विभागाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या 'पाचोळा' कादंबरीवर चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. एमजीएम परिसरात शूटिंग फ्लोअर तयार करण्यात आले. या फ्लोअरचे शनिवारी दुपारी उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला साहित्यिक रा. रं. बोराडे, 'एमजीएम'चे विश्वस्त सचिव अंकुशराव कदम, एमजीएम फिल्म आर्टसचे संचालक व दिग्दर्शक शिव कदम, छाया दिग्दर्शक महेश अणे, कला दिग्दर्शक संदीप इनामके, ध्वनी तंत्रज्ञ ध्रुव दत्ता, प्राचार्य डॉ. रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने काही भाग चित्रीत केला आहे. चित्रपटाच्या सरावाचा व तयारीचा हा भाग असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होईल, असे शिव कदम यांनी जाहीर केले.

'या कादंबरीवर चित्रपट करण्याची काही दिग्दर्शकांची इच्छा होती. अभिनेते गजानन जहागिरदार यांनी 'पाचोळा' वाचली होती. ही कादंबरी सत्यजित रे यांना मिळाली असती तर 'पथेर पांचाली'पेक्षा सरस कलाकृती तयार झाली असती,' असे उदगार जहागिरदार यांनी काढले होते. आता 'पाचोळा'वर घरचे लोक चित्रपट निर्मिती करीत आहेत. त्यामुळे आनंद आणि उत्सुकता आहे', असे बोराडे म्हणाले. यावेळी विद्यार्थी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्या युतीच्या ताब्यात; सभापती निवड बिनविरोध निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील पाचही विषय समित्या शिवसेना - भाजप युतीच्या ताब्यात आल्या आहेत. विषय समितींच्या सभापतिपदासाठी विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत, त्यामुळे या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध निवड झालेल्या सभापतींची अधिकृत घोषणा मंगळवारी (४ जून) केली जाणार आहे.

महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी मनीषा लोखंडे (शिवसेना) यांची निवड झाली आहे. उपसभापतिपदी शोभा बुरांडे (भाजप) यांची निवड झाली आहे. आरोग्य समितीच्या सभापतिपदी गोकुळसिंग मलके (भाजप) यांची निवड झाली आहे. शहर सुधार समितीच्या सभापतिपदी मनोज गांगवे (शिवसेना) यांची निवड झाली आहे. शिक्षण समितीच्या सभापतिपदी कमल नरोटे (भाजप) यांची तर, समाज कल्याण समितीच्या सभापतिपदी सिद्धांत शिरसाट (शिवसेना) यांची निवड झाली आहे. विषय समिती सभापतींची अधिकृत निवड निवडणूक कार्यक्रमानुसार चार जून रोजी होणार आहे. त्यामुळे याच दिवशी पिठासन अधिकारी बिनविरोध निवडल्या गेलेल्या सभापतींची घोषणा करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम्हाला स्मार्ट फोन नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट फोन सक्तीच्या निर्णयाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शनिवारी निदर्शने केली. राज्यसरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन घेतले. त्यावरून त्यांना सर्व माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

ज्यांना मोबाइल वापरता येत नाही, अशांना नोकरीतून कमी करण्याची प्रशासनाकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप करत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे पैठण गेटवर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्मार्टफोन देऊन कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ केला जात आहे. सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल बारा हजार रुपयांना विकत घेत सरकारी तिजोरीतील रकमेचा अपव्यय केल्याचा आरोपही केला. मोबाइल खराब झाला किंवा चोरीला गेल्यावर मोबाइलची किंमत कर्मचाऱ्यांकडूनच वसूल करण्यात येणार आहे. तसे हमीपत्र ही घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकारची मोबाइल सक्ती करण्यात येवू नये, अशी मागणी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी मोबाइल खोक्याची होळी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल जावळे, तारा बनसोडे, विलास शेंगुळे, अॅड. अभय टाकसाळ, शालीनी पगारे, शीला साठे, वैशाली मकासरे, लक्ष्मी लघाने, कांता वाकडे, अनिता पावडे, मनीषा भोळे, सुरेखा साळवे, आम्रपाली थोरात, सुमन वाघ, शोभा गायकवाड, उषा गवई, संगिता चव्हाण, वच्छला ढेपे, मीना साळवे, विनया गाढवे, अर्चना शिंदे, सुनीता शेजवळ, चंद्रकला नागे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images