Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पहिल्या पत्नीला मटनातून दिले विष

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पहिल्या पत्नीला मटनातून विषारी औषध दिल्यानंतर झोपेचे इंजेक्शन दिले. विशेष म्हणजे इंदूरला फिरण्यासाठी पाठवून लगेचच दुसरा विवाह करून फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पहिल्या पत्नीने पोलिसांकडे धाव घेत आपल्या पतीसह अन्य अकरा जणांविरोधात हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या पत्नीचा पती हा वन विभागात शिपाई पदावर कार्यरत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

हर्सूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकलठाणा परिसरातील २५ वर्षीय महिलेचा वन विभागातील शिपाई गणेश रामकिसन पचलोरे (वय ३०, रा. हर्सूल) याच्यासोबत चार वर्षांपूर्वी विवाह झाला. पचलोरे दाम्पत्याला अद्यापही कोणतेच अपत्य नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या आईला मटनाच्या भाजीतून गणेशने विषारी औषध दिले. त्यानंतर झोपेचे इंजेक्शनही दिले. मात्र, त्यातून दोघीही बचावल्या. याप्रकारानंतर गणेशने दोघींना त्यांच्या नातेवाईकांसह इंदूरला फिरण्यासाठी पाठवले. या दोघीही शहरात नसल्याचे पाहून ३१ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास गणेशने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला. हा प्रकार समजल्यानंतर महिलेने हर्सूलला धाव घेतली. गणेशने दुसरा विवाह केल्याने तिचा संताप अनावर झाला. त्यानंतर तिने गणेशसह सासरा राधाकिसन पचलोरे, दीर संतोष पचलोरे, काका उत्तम पचलोरे, नणंद सुरेखा हरणे, नंदोई सतीश हरणे, मित्र विशाल गवंडर, प्रशांत, हिरालाल हरणे व एका महिलेविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक पांडुरंग भागिले करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रशिक्षणार्थींच्या पाठीवर पोलिस आयुक्तांची थाप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आयुक्तालय आणि इंडो जर्मन टूल रूम यांच्या संयुक्त विदयमाने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण मिळविलेल्या उमेदवारांना पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक उमेश दाशरथी यांनी या तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले.

पोलिस आयुक्तालयात आयजीटीआर सभागृह येथे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद, उमेश दाशरथी, एच. डी. कापसे, आयजीटीआर डॉ. किशोर उढाण यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. मागील सहा महिन्यांपूर्वी कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत आयुक्तालयात विविध भागात जाऊन आयजीटीआरमधून चालविण्यात येणाऱ्या विविध कार्सेसची माहिती देण्यात आली होती. यात दोन हजार मुलांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कोर्सेस अंतर्गत १४० उमेदवारांनी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण घेतले आहे. यात सीएनसी हर्निंग, सीएनसी चिलिंग रेफ्रीजरेशन, एअर कंडिशन, यासह अन्य प्रकारात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी उमेश दाशरथी यांनी सीएमआयए आणि रूचा इंड्रस्ट्रीजच्या वतीने या प्रशिक्षणार्थींमधील अनेकांना रोजगार देण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. दरम्यान, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या प्रशिक्षणातून भविष्यात आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, यामुळे आमच्या कुटुंबांना आधार मिळेल, असे मत प्रशिक्षणार्थींनी उपस्थितांसमोर व्यक्त केले. यावेळी एपीआय घनश्याम सोनवणे, गोपाल वेलूरकर, पोलिस मित्र श्रीमंत गोर्डे पाटील, स्वप्नील विटेकर, अनिकेत देशमुख, यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

……

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सेवापूर्व परीक्षा आज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवारी घेण्यात येणार आहे. औरंगाबाद केंद्राहून ११ हजार ७१७ उमेदवार परीक्षा

देणार आहेत. परीक्षेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शनिवारच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलले आहेत.

आयोगातर्फे देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष असते. मराठवाड्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. रविवारी शहरात ३४ केंद्राहून परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. सकाळी ९.३० ते ११.३० व दुपारी २.३० ते ४.३० अशा सत्रात परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सकाळच्या सत्रासाठी ९.२० पूर्वी यावे लागणार आहे. दुपारच्या सत्रासाठी २.२० पूर्वी परीक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे लागणार आहे. प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्र, ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत यासह काळ्या व निळ्या शाईचा पेन सोबत आणायचा आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही वस्तू सोबत असू नये, अशा सूचना आहेत. परीक्षार्थींना मोबाइल, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, ब्ल्युटूथ, कॅमेराफोन किंवा कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाता येणार नाही.

\Bविद्यापीठाचे पेपर पुढे ढकलले

\Bआयोगाच्या परीक्षेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी, बीटेक, एमसीए, वास्तुविशारद अभ्यासक्रमाचे एक जूनचे पेपर पुढे ढकलले आहेत. अभियांत्रिकीचे पेपर ११ जून रोजी तर, बी. फार्मसीचा पेपर १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. यासह ऑनलाइन परीक्षेतही बदल करण्यात आला आहे. अभियांत्रिकी प्रथम वर्ष एलिमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनीअरिंग (जुना) दहा जून रोजी सकाळी दहा वाजता होणारा पेपर दुपारी दोन वाजता होणार आहे. ११ जूनचा पेपर त्याच दिवशी दुपारी दोन वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतळ्याच्या कामाचा मुहूर्त तिसऱ्यांदा हुकला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाचा मुहुर्त तिसऱ्यांदाही हुकला आहे. महापौरांनी सांगितल्यानुसार शनिवारी हे काम सुरू होणार होते, पण ते सुरूच झालेच नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी दीड वर्षापासून शिवप्रेमींची आंदोलने सुरू आहेत. मात्र, पुतळ्याची उंची वाढण्याचे काम सुरू करणे पालिकेला अद्याप शक्य झाले नाही. पालिकेने या कामाची निविदा काढली. एका कंत्राटदाराला काम देखील दिले. परंतु कंत्राटदाराने अगोदर पैसे द्या, त्यानंतर काम सुरू करतो अशी भूमिका घेतली. प्रशासनाने त्या कंत्राटदाराला नोटीस बजावली. नोटीस मिळताच काम सुरू करण्याची तयारी कंत्राटदाराने दाखवली. शुक्रवारीच काम सुरू होणार होते. त्यानंतर शनिवारी पुतळ्याचे काम सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, शनिवारी देखील काम सुरू झाले नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याची तारीख देखील महापौरांनी सांगितली. ११ जून रोजी पुतळा स्थलांतरित केला जाणार आहे. चबुतऱ्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो सिध्दार्थ उद्यानातील हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रहालयाच्या परिसरात ठेवण्यात येणार आहे. कंत्राटदाराने कामच सुरु केले नाही, त्यामुळे पुतळा स्थलांतराचा मुहूर्त देखील हुकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेसाठी युतीचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला: चंद्रकांत पाटील

0
0

औरंगाबाद: लोकसभा निवडणुकांपाठोपाठ शिवसेना-भाजप राज्यातील विधानसभा निवडणूकही एकत्र लढणार आहेत. त्यासाठी युतीचा फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. राज्यात विधानसभेसाठी भाजप १३५ आणि शिवसेना १३५ जागांवर लढेल. मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. भाजप-शिवसेना विधानसभेत एकत्रच लढेल. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ जागांवर युती लढेल. त्यातील १८ जागा या युतीतील मित्र पक्षांना सोडण्यात येतील. तर, पूर्वी ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे युतीच्या या जागावाटपात काही बदल होणार नाहीत. विधानसभेलाही शिवसेना-भाजप, मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

खैरेंच्या पराभवाला त्यांचाचा आमदार जबाबदार

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवेसनेच्याच आमदाराने केला आहे. शिवसेनेचेच आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यात भाजपचा काही प्रश्न नाही, असं सांगत पाटील यांनी खैरे यांच्या पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं. यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे आणि डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद: ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानातून तिघांना संजीवनी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टेलरकाम करणाऱ्या शहरातील ७१ वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानातून तिघांना जीवदान मिळाले आहे. त्यांचे यकृताचे पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात, तर दोन्ही मूत्रपिंडांचे मुंबईच्या वोकहार्ट रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात आले.

सुमारे सहा महिन्यांनंतर व २०१९ मधील पहिले, तर मराठवाड्यातील २३ वे अवयवदान यशस्वी ठरले. गेल्या साडेतीन वर्षांत मराठवाड्यात १०३ अवयवांचे दान होऊन त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे.

कैलासनगर येथील ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गुरुवारी (३० मे) चक्कर येऊन घरात पडल्यामुळे त्यांना तातडीने एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उच्च रक्तदाबामुळे मेंदुत रक्तस्त्राव होऊन ते ब्रेन डेड झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळ‌े सहा-सहा तासांच्या अंतराने अॅपनिया तपासण्या करण्यात आल्या, त्यांना रुग्णालयातील ब्रेन डेथ समितीने शुक्रवारी मध्यरात्री अधिकृतरित्या ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर प्रत्यारोपण समन्वयक मनोज गाडेकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

दरम्यान, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने (झेडटीसीसी) या ज्येष्ठ नागरिकाच्या एबी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयामध्ये दोन्ही मूत्रपिंड, तर पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात यकृत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवयवदानाची शस्त्रक्रिया पूर्ण होऊन शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिन्ही अवयव रस्तेमार्गाने पाठवण्यात आले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यूपीएससी’परीक्षेचा नुसताच उल्हास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेला नोंदणी करणाऱ्यांपैकी ५० टक्के उमेदवारांचीही उपस्थिती नव्हती. दोन्ही सत्रात जेमतेम ४६ टक्के उपस्थिती नोंदवण्यात आली. यंदा परीक्षार्थींची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली असली तरी परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण निम्यापेक्षा कमी राहिले.

आयोगातर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या या परीक्षेकरिता शहरात ११ हजार ७१७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यासाठी ३४ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होती. सकाळी ९.३० ते ११.३० व दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रात परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सूचनांची मोठी यादी होती. परीक्षा हॉलमध्ये वेळेच्या दहा मिनिट आधी उपस्थित रहायचे होते. परीक्षेत उपस्थितीचे प्रमाण निम्यापेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीच्या परीक्षेमध्येही उपस्थितीचे प्रमाण जेमतेम होते. रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्या सत्रात नोंदणी केलेल्या ११ हजार ७१७ उमेदवारांपैकी ५,५५४ जणांनी परीक्षा दिली, ६,१६३ गैरहजर राहिले. उपस्थितीचे हे प्रमाण ४७.४० टक्के आहे. दुपारच्या सत्रात ५,४६९ विद्यार्थी उपस्थित, तर ६,२४८ विद्यार्थी गैरहजर राहिले. दुसऱ्या सत्रात ४६.६८ टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. वाढत्या उन्हामुळे परीक्षार्थी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पालक, नातेवाईकांचे हाल झाले. काही परीक्षा केंद्रांनी परीक्षार्थींसोबत आलेल्यांना बसण्यासाठीची व्यवस्था केली होती.

पहिले सत्र...

नोंदणी…….... ११,७१७

उपस्थिती..….५,५५४

गैरहजर…….... ६,१६३

..

दुसरे सत्र..

नोंदणी…..... ११,७१७

उपस्थिती....५,४६९

गैरहजर….......६,२४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेने मागितले पाण्यासाठी १०५ कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भीषण दुष्काळामुळे शहराचा पाणीप्रश्न चिंताजनक झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता महापालिकेला १०५ कोटी रुपयांचा निधीची मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी (२ जून) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

शहरात तीव्र पाणीटंचाई असून अनेक भागांत सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. निधीची कमतरता असल्याने उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी शहरात दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त आले असता महापौर घोडेले यांनी त्यांची भेट घेऊन परिस्थिती मांडली. यावेळी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेला आहे. धरणाच्या मूळ कालव्यातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे पालिकेने आपत्कालीन पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. तरंगत्या पंपाद्वारे पाणी उपसा करून पालिकेच्या विहिरीत टाकल्यानंतर नियमित उपसा करण्यात येत आहे. शहराच्या १५ लाख लोकसंख्येला २०३ एमएलडी पाणी देणे गरजेचे आहे. पालिकेच्या दोन्ही जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे त्यांची पाणी वहन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शहराला निव्वळ ११५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. मागणी व उपलब्धतेते तूट असल्याने पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरात विंधनविहीरी कोरड्या पडल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

\Bभविष्यातील उपाययोजना\B

दरवर्षी टंचाईची वाढणारी तीव्रता लक्षात घेत भविष्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी कमी झाल्यामुळे प्रस्तावित नवीन योजनेची विहीर, बंधारा, जोडपूल, पंपगृह आदींचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

जायकवाडीवरील मुख्य योजनांचे अंशत: पंप बदलणे…...३० कोटी

मुख्य योजनांच्या उपांगाचे सक्षमीकरण………………............२० कोटी

टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक सुधारणा...५ कोटी

नवीन योजनेत विहीर, भविष्यात उर्वरित योजना.... ५० कोटी

लोकसंख्या...१५ लाख

रोजची पाण्याची आवश्यकता...२०३ एमएलडी

सध्या मिळते..........११५ एमएलडी

शहरात टँकर सुरू.....११०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कॉलिंग टू कंट्रोल... …धिस इस इर्मजन्सी…...’

0
0

- पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात बिघाड

- विमानात १५८ प्रवाशांसह सहा कर्मचारी सुखरूप

- वैमानिक, सहवैमानिकांनी प्रसंगावधान राखले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाटणाहून मुंबईला जाणारे गो एअर कंपनीचे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रविवारी दुपारी चार वाजून १९ मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. इर्मजन्सी लँडिंग सुखरूप झाल्यानंतर विमानातीव १५८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

औरंगाबाद विमानतळावरील 'एटीसी कंट्रोल रूम'मधील कर्मचारी एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाची तयारी करीत होते. सव्वाचारच्या सुमारास 'एटीसी' कार्यालयात एका वैमानिकाने संपर्क साधला. गो एअर विमानाच्या (क्रमांक ५८६) महिला वैमानिकाने 'एटीसी'ला, 'विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पुढील विमान प्रवास धोक्याचा होऊ शकते. यामुळे आम्ही विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करीत आहोत,' असा संदेश पाठविला. 'एटीसी'ने इमर्जन्सी लँडिंगबाबत विविध यंत्रणांना माहिती दिली. रविवारी सुट्टी असल्याने कर्मचारी वर्ग नव्हता मात्र, वैमानिकाकडून संदेश मिळताच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, एअर इंडियाचे अधिकारी व कर्मचारी, विमानतळ अग्निशामन दलाचे अधिकारी, सीआयएसएफ यांच्यासह हॉस्पिटल यांनाही लँडिंगची माहिती देण्यात आली होती.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी विमानतळाचा धावपट्टी रिकामी करून गो एअरच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवरून टर्मिनलवर आल्यानंतर विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या विमानात १५८ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. त्यांना औरंगाबाद विमानतळावर थांबविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून पाठविण्यात येणार असल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली. या परिस्थितीवर विमानतळ संचालक डी. जी. साळवे हे लक्ष ठेवून होते. इर्मजन्सी लँडिंगमध्ये एअर इंडियाचे अजय भोळे आणि एअर इंडियाच्या टिमने ग्राउंड क्लीअरन्ससह विमान प्रवाशांना विमानतळात थांबविण्याची सुविधा करून दिली. रात्री उशिरापर्यंत गो एअरचे विमान थांबविण्यात आले होते.

……

\Bअनेकांना गो एअरने परवानगी नाकारली\B

पाटण्याहून मुंबईला येणाऱ्या अनेक विमानप्रवाशांपैकी काही जण पुणे, सोलापूर येथील रहिवासी आहेत. या विमान प्रवाशांनी औरंगाबादहून थेट पुणे किंवा सोलापूर गाठण्याची मागणी केली मात्र, गो एअर विमान कंपनीने या प्रवाशांना सोलापूर व पुण्याकडे जाण्याची परवानगी दिली नाही.

……

\Bएअर इंडियाने केली जेवणाची व्यवस्था\B

गो एअरचे विमान हे दुपापी दोन वाजून २० मिनिटांनी पाटण्याहून मुंबईकडे निघाले होते. विमानाची इर्मजन्सी लँडिंग झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. औरंगाबाद विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या विमान प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था केली.

………

\Bइंजिनमध्ये बिघाड आल्याची माहिती\B

गो एअरचे विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत वैमानिकांनी सांगितले की, इंजिनमध्ये बिघाड आल्याचे लक्षात आले. या विमानाला कमी उंचीवर आणण्यात आले. यानंतर जवळच औरंगाबाद विमानतळ असल्याने विमान औरंगाबादला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाल्याने काही विमान प्रवाशांना उलट्यांचाही त्रास सुरू झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन - मंगल डवणे

0
0

औरंगाबाद : जाधववाडी येथील रहिवासी मंगल सुरेश डवणे (वय ४८) यांचे शनिवारी (१ जून) निधन झाले. त्यांच्यावर हडको एन- ११ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाचा चोरला मोबाइल; आरोपीला पोलिस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेच्या डब्यातील दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाच्या हाताला झटका मारून हातातील मोबाइल चोरणारा आरोपी अरबाज सुलतान बेग याला शनिवारी (१ जून) रात्री अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (४ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

या प्रकरणी नितेश नागोराव गडदे (२५, रा. जिजाऊ नगर, ता. मानवत, जि. परभणी) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा मित्र रोहितसिंग मोहितसिंग बैस याच्यासोबत २० मे रोजी नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्सप्रेसने जनरल डब्यातून परभणीकडे येत होता. रेल्वे जालना येथे काही वेळ थांबल्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र दरवाज्यात येऊन बसले. रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली असता रेल्वेबाहेर उभ्या असलेल्या चोरट्याने फिर्यादीच्या हाताला झटका मारुन त्याच्या हातातील मोबाइल हिसकावला व पळून गेला. या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरुन औरंगाबाद लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी आरोपी अरबाज सुलतान बेग (१९, रा. टिपू सुलतान चौक, जालना) याला शनिवारी रात्री अटक केली. चौकशीत अरबाजने मोबाइलची चोरी केल्याची कबुली दिली व त्याने चोरलेला मोबाइल साथीदार अलीम मुक्तार शेख याच्याकडे दिल्याचेही सांगितले. त्याचवेळी आरोपी अरबाज बेग याच्याकडून चोरीचे अन्य दोन मोबाइलही जप्त करण्यात आले. आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता, आरोपीच्या साथीदाराला अटक करणे व चोरीचा मोबाइल जप्त करणे बाकी आहे; तसेच आरोपी चोरीचा मोबाईल कुठे विकतात, सॉफ्टवेअर कुठे अपलोड करतात, याचाही तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस बदल्यामुळे कर्मचाऱ्यात नाराजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्यांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये गुन्हे शाखेत येऊन कालावधी पूर्ण झालेला नसतानाही बदली झाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांत नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांनी विनंतीनुसार बदली करण्यासाठी अर्ज दिला होता. या कर्मचाऱ्यांची विनंती देखील अमान्य केल्याने हे कर्मचारीही नाराज आहेत.

मे महिन्यात शहर पोलिस दलात अधिकारी कर्मचारी यांच्या नियमित बदल्या करण्यात येतात. ज्या कर्मचाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, असे कर्मचारी तसेच विनंती अर्जानुसार या बदल्या करण्यात येतात. यंदाच्या बदल्यामध्ये गुन्हे शाखेच्या २८ जणांची वर्णी लागली आहे. यामध्ये अनेकांना गुन्हे शाखेत बदली होऊन दोन वर्षे देखील झालेली नाही. अचानक झालेल्या बदल्यामुळे या कर्मचाऱ्यात नाराजी पसरली आहे. या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांची कामगिरी गुन्हे शाखेला साजीशी नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांचा बदलीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांची कामगिरी उल्लेखनीय असून देखील त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे पोलिस मुख्यालय तसेच इतर ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या साडेचारशे कर्मचाऱ्यांनी विनंतीनुसार बदली होण्याासाठी अर्ज केले होते. या कर्मचाऱ्यांचे देखील अर्ज अमान्य करण्यात आले आहे. हे अर्ज अमान्य करण्याचे कारण समजले नसल्यामुळे हे पोलिस कर्मचारी देखील संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरणापूर, दौलताबादवर शोककळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बेळगावजवळ कार आणि ट्रक अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांमध्ये पाच जण शरणापूर तर, दोघे दौलताबाद येथील रहिवासी आहेत. या अपघाताची बातमी येऊन धडकताच शरणापूर आणि दौलताबाद येथील वातावरण सुन्न झाले असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत तरुणामध्ये गोपी वर्कड पाटील, महेश पाडळे, अमोल निळे, अमोल चौरे, रवी वाडेकर, सुरज कान्हेरे आणि नंदू पवार यांचा समावेश आहे. यापैकी गोपी पाटील आणि महेश पाडळे दौलताबादचे रहिवासी असून, उर्वरित पाच जण शरणापूरचे रहिवासी आहेत. यापैकी काही तरुणांचा शेतीचा व्यवसाय असून, काहीजण कंपनीत कामाला होते. दुपारी त्यांच्या अपघाताची बातमी समजताच दोन्ही गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या सातही जणांचे मृतदेह आणण्यासाठी नातेवाईक बेळगावाला रवाना झाले. या तरुणापैकी गोपी पाटील हा सामाजिक कार्यकर्ता असून, माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. महेश पाडळे याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. त्याच्या मागे पत्नी आई वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे.

\Bतिघे एकुलते एक

\Bनंदू पवार हा त्याच्या आई - वडिलांना एकुलता एक असून, त्याच्या लहान भावाचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे. अमोल निळे हा देखील कंपनीत कामाला असून एकुलता एक होता. रवी वाडेकर हा पेट्रेालपंपावर कामाला असून, एकुलता एक होता. सुरेश कान्हेरे याच्या मागे दोन मुले, पत्नी आदी परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक गुणवत्ता हरवली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनेक कुलगुरूंचा कार्यकाळ पाहिला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ बऱ्यापैकी राहिला. विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांची संख्या वाढल्याचे चोपडे सांगत होते. कॉलेजांची संख्या वाढली, पण शैक्षणिक गुणवत्तेकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाटते', अशी खंत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली. ते चोपडे यांच्या सेवागौरव समारंभात बोलत होते.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे सेवागौरव समारंभ समितीच्या वतीने कुलगुरू चोपडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कुलगुरू डॉ. चोपडे, नलिनी चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, उद्योजक राम भोगले, मुनीष शर्मा, डॉ. सर्जेराव ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. बागडे यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात बागडे यांनी शैक्षणिक दर्जावर चिंता व्यक्त केली. 'पूर्वी फक्त पदवी प्रमाणपत्र दाखवले की नोकरी मिळायची. आता लेखी आणि तोंडी परीक्षा दिल्यानंतर नोकरी पक्की होते. म्हणून बौद्धिक क्षमता वाढल्याशिवाय प्रमाणपत्राला अर्थ राहिला नाही. महाविद्यालयात फक्त प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षेलाच विद्यार्थ्यांची गर्दी दिसते. त्यानंतर कधीच तास होत नाहीत. महाविद्यालये निघत राहतील. पण, विद्यार्थ्यांचे काय होईल असा प्रश्न पडतो. आपल्या सर्वांसह चोपडे यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावे', असे बागडे म्हणाले.

'मला नेहमीच राजकारणाचा त्रास झाला. पुणे विद्यापीठात तीन वेळेस संधी असूनही कुलगुरूपद नाकारले गेले. माझे संशोधन नोबेलच्या तोडीचे असूनही आपल्या विद्वत्तेचा देशाला उपयोग व्हावा म्हणून परतलो. कुलगुरू होण्याचे स्वप्न लहानपणीच पाहिले होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी पहिल्यांदा पाहिले. तेव्हाच कुलगुरू होण्याचे ठरवले. कुलगुरू झाल्यानंतर विद्यापीठाचे बजेट २४० कोटीवरुन ३५० कोटींवर नेले. पारदर्शी काम केले आणि प्राध्यापकांच्या संशोधनासाठी भरीव निधी दिला', असे चोपडे म्हणाले. डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. अनिल लहाने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सेवागौरव समितीचे डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. गजानन सानप, डॉ. संजीवनी मुळे, डॉ. वैशाली खापर्डे, संजय साळुंके यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

\Bचोपडे पुस्तक लिहिणार

\B'पाच वर्षाच्या कार्यकाळात एकही सुटी न घेता ध्येयाने काम केले. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांनी चुकीच्या बातम्या पुरवल्या, हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे. विदेशात शिकल्यानंतर तिथेच स्थायिक होण्याची संधी असूनही मी देशाच्या सेवेसाठी परतलो. या विद्यापीठाला परदेशात शिकलेला कुलगुरू मिळू शकणार नाही हे स्टॅम्पपेपरवर लिहून देतो. पाच वर्षांच्या कार्यकाळावर पुस्तक लिहिणार आहे. इथले वातावरण चांगले नाही. मला खूप त्रास झाला', असे म्हणत चोपडे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच मराठवाड्यासाठी केंद्रीय विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रसिकांनी अनुभवले अस्सल ‘लोकरंग’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लोकरंग महाराष्ट्राचे' या कार्यक्रमाने मराठमोळ्या लोककलांचे बहुरंगी दर्शन घडवत रसिकांची भरभरुन दाद मिळवली. गण, गवळण, पोवाडा, लावणी, गोंधळ, वासुदेव, पोतराज यांच्या अस्सल सादरीकरणाने कार्यक्रम विशेष रंगला. लोककला प्रशिक्षण शिबिरानंतर विद्यार्थ्यांनी प्रथमच सादरीकरणाचा अनुभव घेतला.

लोकशाहीर विश्वास साळुंके स्मृती प्रतिष्ठान आणि गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने लोककला प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा समारोप 'लोकरंग महाराष्ट्राचे' कार्यक्रमाने झाला. गरवारे बालभवनात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम रंगला. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी लोककलेचे मनोहारी दर्शन घडवले. 'दे सुबुद्धी गजानना' या गणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. गवळण, वासुदेव प्रकाराने रंगत भरली. या सादरीकरणाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. 'गरजली मराठी शाहिरी' हा शाहिरी मुजरा उपस्थितांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला. स्वच्छतेचा विषय मांडणारा सामाजिक पोतराज, वनदेवीचा गोंधळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादरीकरणात सर्व कलाकारांनी वैविध्य जपले. 'मला म्हणत्यात हो पुण्याची मैना' या लावणीला रसिकांना प्रतिसाद दिला. दिवंगत शाहीर आत्माराम पाटील लिखित 'असावा नसावा' हा शाहिरी फटका विशेष रंगला. 'सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर' या विश्वास साळुंके लिखित भारुडाने सांगता झाली. यातील बतावणीने रसिकांना खळखळून हसवले.

दरम्यान, या कार्यक्रमाला रंगकर्मी ज्ञानदा कुलकर्णी, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे आणि शिबिराचे समन्वयक शाहीर अजिंक्य लिंगायत यांची प्रमुख उपस्थिती होती. लोककलेचे संवर्धन करण्याची गरज आहे. नवीन पिढीला शिबिराच्या माध्यमातून लोककलेचे धडे मिळणे आनंदाची बाब असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

\Bशिबिरार्थींचे कौतुक

\Bलोककला प्रशिक्षण शिबिरात ३७ शिबिरार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. आठ दिवसात लोककला आत्मसात करुन त्याचे सादरीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. त्यांचा अस्सल कलाविष्कार रसिकांसाठी पर्वणी ठरला. त्यामुळे रसिकांनी शिबिरार्थींचे मनापासून कौतुक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विधानसभेसाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. भाजप १३५ व शिवसेना १३५ जागांवर लढेल आणि मित्र पक्षांसाठी १८ जागा असतील, असे भाजपचे नेते, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दोन जून) औरंगाबाद येथे सांगितले.

मराठवाड्यातील दुष्काळी भागातील कामांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. युतीबाबत ते म्हणाले, 'भाजप, शिवसेना विधानसभेत एकत्रच लढणार आहेत. त्यात कोणताही बदल होणार नाही. २८८ जागांवर युती लढेल, त्यातील १८ जागा या युतीतील मित्र पक्षांना सोडण्यात येतील. पूर्वी ठरल्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष १३५ जागांवर आपले उमेदवार उभे करेल. तेवढ्याच जागांवर शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे युतीच्या या जागावाटपात काही बदल होणार नाहीत. विधानसभेलाही शिवसेना, भाजप, मित्रपक्ष एकत्रितपणे सामोरे जातील.'

\Bखैरे यांचा परभाव त्यांच्याच आमदारने केला\B

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभवाचा ठपका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले,'खैरे यांचा पराभव भाजपने केला नसून शिवेसनेच्याच आमदारांनी केला आहे. शिवसेनेचेच आमदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे यात भाजपचा काही प्रश्न नाही.' यावेळी भाजपचे आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान ईदसाठी तरुणांना मोदी जॅकेटचे आकर्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रमजान ईद काही दिवसांवर आली असल्याने खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे. रमजान ईदच्या दिवशी परिधान करण्यासाठी तरुणांमध्ये मोदी जॅकेट, पठाणी ड्रेसला पसंती आहे. लहान मुलांकरिता पाश्चिमात्य शैलीच्या कपड्यांची खरेदी करण्यात येत आहे.

अवघ्या तीन दिवसानंतर रमजान ईद आली आहे. खरेदी करण्यासाठी सिटी चौक, रंगार गल्ली, पैठण गेट, टिळकपथ या मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. घरांना लावण्यासाठी रंगांपासून मित्र, नातेवाईकांना शिरखुर्मा, खाद्य पदार्थ देण्याकरिता कटलरी खरेदीकडे कल आहे. चप्पल, बुटांची दुकाने, महिलांच्या वस्त्रांच्या दुकानांत गर्दी आहे. लाच्छा आणि घागरा अशा कपड्यांची लहान मुलीमध्ये चांगली मागणी वाढली आहे. तरूण आणि मुलांमध्ये यंदा जीन्स, टी शर्ट यासह फॉर्मल ड्रेस, पठाणीची क्रेझ आहे. मोदी जॅकेटला तरुणांची पसंती असून जॅकेटची किंमत चारशे ते बाराशे रुपयांपर्यंत असल्याची माहिती सिटी चौक भागातील व्यापाऱ्यांनी दिली.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑडिओ क्लिप कानाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपचा तपास गुंडाळण्यात आला आहे. चोपडे यांचा कार्यकाळ सोमवारी (तीन जून) संपणार आहे. सात महिन्यांपूर्वी घडलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाचा तपास सायबर शाखा करीत आहे. विद्यापीठ प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याने तपासाला विलंब झाल्याचे उघड झाले. त्यामुळे चौकशीला विलंब लावत कुलगुरूंनी 'क्लिन चिट' मिळवल्याची चर्चा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप ११ ऑक्टोबर २०१८ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कुलगुरू चोपडे यांच्यासह चार व्यक्तींची चर्चा समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या चर्चेत विद्यार्थ्यांचे आंदोलन, कर्मचाऱ्यांचे उपोषण, व्यवस्थापन परिषद सदस्यांची भूमिका असे मुद्दे आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिस बळाचा वापर करा, अशी सूचना कुलगुरूंनी कुलसचिवांना फोनवर केली होती. न्याय्य मागण्यांसाठी उपोषण करीत असल्यामुळे कुलगुरूंचे वक्तव्य लाजिरवाणे असल्याचे म्हणत कामगार संघटनांनी निषेध केला होता. पाणी मिळत नसल्यामुळे विद्यार्थिनींनी कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर मध्यरात्री आंदोलन केले होते. या आंदोलनाला 'हौशा-गवशांचे' आंदोलन म्हणत चोपडे यांनी खिल्ली उडवली होती. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांना बैठकीत आडवे केल्याचे चोपडे हसून सांगत होते. तर 'अभाविप'च्या विद्यार्थ्यांना केबिनमधून दणके देऊन बाहेर काढले, गांधी सन्मान मार्च क्रांती चौकातून का नाही काढला अशी अनेक वादग्रस्त वक्तव्ये क्लिपमध्ये आहेत. या अवमानजनक वक्तव्यामुळे चोपडे वादात सापडले होते. विद्यापीठ विकास मंच आणि उत्कर्ष पॅनलने राज्यपाल कार्यालयाकडे तक्रार केली होती. या प्रकरणावर सारवासारव करीत कुलगुरूंनी 'माझी प्रतिमा बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून पोलिस तपासानंतर सर्व काही उघड होईल' असा दावा केला होता. याबाबत सायबर पोलिस शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी कुलसचिव पांडे यांच्यासह चोपडे यांच्या घरी उपस्थित असलेल्या सदस्यांचे मोबाइल तपासले होते. त्यानंतरही उलगडा झाला नाही. ऑडिओ क्लिप खरी असून तपासाचे नाटक करुन कुलगुरू प्रकरणावर पडदा टाकत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. सात महिन्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने तपासाचा पाठपुरावा केला नसल्याचे उघड झाले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या दाव्यात तथ्य असल्याची विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे.

ऑडिओ क्लिपमधील चर्चा घरगुती आहे. छुप्या पद्धतीने चर्चा रेकॉर्ड करून क्लिप पसरवणे गुन्हा आहे. क्लिपमध्ये छेडछाड करुन काही संवाद माझ्या तोंडी घुसवले असल्याचे चोपडे म्हणाले होते. मात्र, ऑडिओ क्लिपच्या तपासाचे काय झाले अशी विचारणा चोपडे यांनी कधीच केली नाही.

\Bप्रशासनाचे कानावर हात

\Bऑडिओ क्लिप तपासाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी स्पष्ट केले. कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ सोमवारी संपणार आहे. ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार चोपडे यांची भूमिका धक्कादायक व अवमानजनक असल्याचे स्पष्ट झाले होते. स्वत: पुढाकार घेऊन चोपडे यांनी कधीही ऑडिओ क्लिपच्या तपासावर भाष्य केले नाही.

\Bकुलगुरूंच्या पत्नीची जाहीर नाराजी

\Bऑडिओ क्लिपमधील वादग्रस्त वक्तव्यामुळे कुलगुरू चोपडे आणि त्यांची पत्नी नलिनी चोपडे यांच्यावर संघटनांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर नलिनी चोपडे यांनी रविवारी (दोन जून) नाराजी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात चोपडे यांचा स्वाभिमानी मुप्टा संघटननेने सत्कार केला. ज्यांना आम्ही विश्वासाने घरात प्रवेश दिला. त्यांनीच संभाषण रेकॉर्ड करून बाहेर पसरवले. हा विश्वासघात वेदनादायी असल्याचे चोपडे म्हणाल्या. या घटनेतील बाहेरच्या तीन व्यक्तींपैकी श्रीमती चोपडे यांनी कुणावर तोंडसुख घेतले हा चर्चेचा विषय ठरला.

विद्यापीठाच्या ऑडिओ क्लिपचा तपास सुरू आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होईल.

\B- गोरख चव्हाण, तपास अधिकारी, विशेष शाखा\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विदेशी नागरिकाला आठ कोटींचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

झिंम्बाबे येथील नागरिकांकडून दहा कोटीचे कर्ज घेऊन त्याच्या नावावर बनावट खाते उघडून आठ कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक सोमनाथ साखरे (रा. सिडको, एन तीन) यांच्या विरोधात जवाहनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम दुसऱ्या खात्यावर वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फेब्रुवारी २०१९ ते जून २०१९ या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला.

याप्रकरणी जयेश हसमुख शहा (वय ५५, रा. हरारे, झिंम्बाबे, सध्या रा. सांताक्रुझ, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसंनी सांगतले की, शहा हे अलशम ग्लोबल लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. २००८मध्ये त्यांची साखरे यांच्यासोबत ओळख झाली होती. साखरेची पुण्यात पवनसूत इन्फोटेक नावाने कंपनी आहे. शहांनी साखरेच्या कंपनीला डिसेंबर २००८मध्ये दहा कोटी रुपयाचे कर्ज दिले होते. जिनिव्हातील क्रेडिट अॅग्री कोल बँकेच्या माध्यमातून त्यांनी ही रक्कम पाठवली होती. कायदेशीर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे शहा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दहा कोटींच्या कर्जापैकी साडेसात कोटी शिल्लक असलेली रक्कम अमरप्रीत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत फिक्स डिपॉझिट करण्याचे शहा यांनी साखरे यांना सांगितले होते. ऑगस्ट २०१२मध्ये ही रक्कम शहा यांच्या नावाने 'फिक्स' देखील करण्यात आली होती; तसेच पवनसूत कंपनीकडे शहा यांची अडीच कोटीची थकबाकी होती.

दरम्यान, साखरे यांनी शहा यांच्या फॅक्सद्वारे पाठविलेल्या संदेशाचा वापर केला व बनावट सह्या करून ही फिक्स डिपॉझिटची रक्कम त्यांच्या दोन कंपन्याच्या नावावर वळवल्याचा आरोप शहा यांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमनाथ साखरे यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहार करणे, बनावट कागदपत्र तयार करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत या प्रकरणी तपास करीत आहेत.

\Bसर्व पैसे परत केले : साखरे\B

यासंदर्भात उद्योजक सोमनाथ साखरे यांनी सांगितले की, जयेश शहा यांच्याकडून २० कोटी रुपये घेतले होते. त्यापोटी मी त्यांना ५६ कोटी रुपये परत केले आहेत. पैसे परत केल्याच्या कागदपत्रांची रजिस्ट्री १८ फेब्रुवारी २०१६ रोजी करण्यात आली आहे. हा व्यवहार २०१३मधील आहे आणि २०१६मध्ये पैसे परत करून 'फायनल सेटलमेंट' केले आहे. साखरे यांच्याकडून काही येणे नाही, असे शहा यांनी रजिस्टर्ड कागदपत्रांत लिहून दिलेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन -

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images