Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘कॉलिंग टू कंट्रोल... …धिस इज इमर्जन्सी…...’

$
0
0

- पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात बिघाड

- विमानात १५८ प्रवाशांसह सहा कर्मचारी सुखरूप

- वैमानिक, सहवैमानिकांनी प्रसंगावधान राखले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाटणाहून मुंबईला जाणारे गो एअर कंपनीचे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रविवारी दुपारी चार वाजून १९ मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. इमर्जन्सी लँडिंग सुखरूप झाल्यानंतर विमानातीव १५८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

औरंगाबाद विमानतळावरील 'एटीसी कंट्रोल रूम'मधील कर्मचारी एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाची तयारी करीत होते. सव्वाचारच्या सुमारास 'एटीसी' कार्यालयात एका वैमानिकाने संपर्क साधला. गो एअर विमानाच्या (क्रमांक ५८६) महिला वैमानिकाने 'एटीसी'ला, 'विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पुढील विमान प्रवास धोक्याचा होऊ शकते. यामुळे आम्ही विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करीत आहोत,' असा संदेश पाठविला. 'एटीसी'ने इमर्जन्सी लँडिंगबाबत विविध यंत्रणांना माहिती दिली. रविवारी सुट्टी असल्याने कर्मचारी वर्ग नव्हता मात्र, वैमानिकाकडून संदेश मिळताच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, एअर इंडियाचे अधिकारी व कर्मचारी, विमानतळ अग्निशामन दलाचे अधिकारी, सीआयएसएफ यांच्यासह हॉस्पिटल यांनाही लँडिंगची माहिती देण्यात आली होती.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी विमानतळाचा धावपट्टी रिकामी करून गो एअरच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवरून टर्मिनलवर आल्यानंतर विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या विमानात १५८ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. त्यांना औरंगाबाद विमानतळावर थांबविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून पाठविण्यात येणार असल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली. या परिस्थितीवर विमानतळ संचालक डी. जी. साळवे हे लक्ष ठेवून होते. इमर्जन्सी लँडिंगमध्ये एअर इंडियाचे अजय भोळे आणि एअर इंडियाच्या टिमने ग्राउंड क्लीअरन्ससह विमान प्रवाशांना विमानतळात थांबविण्याची सुविधा करून दिली. रात्री उशिरापर्यंत गो एअरचे विमान थांबविण्यात आले होते.

……

\Bअनेकांना गो एअरने परवानगी नाकारली\B

पाटण्याहून मुंबईला येणाऱ्या अनेक विमानप्रवाशांपैकी काही जण पुणे, सोलापूर येथील रहिवासी आहेत. या विमान प्रवाशांनी औरंगाबादहून थेट पुणे किंवा सोलापूर गाठण्याची मागणी केली मात्र, गो एअर विमान कंपनीने या प्रवाशांना सोलापूर व पुण्याकडे जाण्याची परवानगी दिली नाही.

……

\Bएअर इंडियाने केली जेवणाची व्यवस्था\B

गो एअरचे विमान हे दुपापी दोन वाजून २० मिनिटांनी पाटण्याहून मुंबईकडे निघाले होते. विमानाची इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. औरंगाबाद विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या विमान प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था केली.

………

\Bइंजिनमध्ये बिघाड आल्याची माहिती\B

गो एअरचे विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत वैमानिकांनी सांगितले की, इंजिनमध्ये बिघाड आल्याचे लक्षात आले. या विमानाला कमी उंचीवर आणण्यात आले. यानंतर जवळच औरंगाबाद विमानतळ असल्याने विमान औरंगाबादला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाल्याने काही विमान प्रवाशांना उलट्यांचाही त्रास सुरू झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुष्काळावर महसूलमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी उपाययोजना राबवून मराठवाड्याला दुष्काळी गर्तेतून बाहेर काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजे जूनचा पहिला आठवडा निवडला. त्यांनी रविवारी (२ जून) विभागीय आयुक्तालयाऐवजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या गुलशन महल या शासकीय निवासस्थानी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत दुष्काळ निवारण आणि टंचाईवर बंद दाराआड चर्चा केली.

या बैठकीला विभागीय आयुक्त केंद्रेकर, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, जालना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकारण विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. महसूलमंत्रीही तुरळक मराठवाडा दौऱ्यावर असतात. त्यांनी रविवारी करमाड येथील चारा छावणीला भेट दिली. मराठवाड्यात सध्या तीव्र पाणीटंचाई असून केवळ एकमेव पर्याय असलेल्या टँकरची संख्या तीन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. चारा छावण्यांमध्येही पाच लाख जनावरे आहेत. दुष्काळी उपाययोजनांची कामे, उपलब्ध पाणीसाठ्यातील पाणी संपले तर पुढील नियोजन, नळयोजनांची स्थिती, तत्काळ पाणीपुरवठा आदींची माहिती महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईबाबत सविस्तर सादरीकरण केले. शासनाकडून दुष्काळ उपाययोजनांकरिता सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मागेल त्याला टँकर’, ‘मागेल त्याला चारा छावणी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अत्यल्प पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थती असून दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकरी, पशुपालकांसोबत खंबीरपणे उभे आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थतीत 'मागेल त्याला टँकर' आणि 'मागेल त्याला छावणी' देण्याला शासनाचे प्राधान्य आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. करमाडच्या छावणीत परिसरातील ३५ खेड्यांतील दोन हजार जनावरे आहेत.

करमाड येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चारा छावणीला त्यांनी रविवारी (२ मे) भेट देऊन पशुपालकांसोबत संवाद साधला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले की, चारा छावण्यांना शासनाकडून पाण्याचे टँकर पुरविले जात आहेत, छावणी मालकांचा पाण्याचा खर्च शासनस्तरावरून केला जात आहे. शिवाय शासनाकडून प्रति जनावर १०० रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यात केंद्र सरकारचे ७० व राज्य शासनाचे ३० रुपये आहेत. छावणीत दाखल बैलांना शेतावर पेरणीसाठी नेता येऊ शकते, असे त्यांनी पशुपालकांना सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना अल्प किमतीत भोजन दिले जात असल्याची माहिती बागडे यांनी पाटील यांना दिली.

\Bशेळ्या मेंढ्यांसाठी छावणीचे आवाहन \B

शेळ्या, मेंढ्यांच्या छावण्याही सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी महसूलमंत्र्यांनी केले. आगामी काळात सर्वांनी वृक्ष लागवड करावी, पाण्याचा जपून वापर करावा, शेतीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातम्या क्राईम

$
0
0

\Bअवैध दारूविक्रेता गजाआड\B

औरंगाबाद: अवैधरित्या देशी दारुची विक्री करणारा आरोपी कपूरकोट राजूसिंग कल्याणी (वय ४० रा. मुरलीधरनगर, उस्मानपुरा) याला सातारा पोलिसांनी अटक केली. शनिवारी रात्री आठ वाजता सातारा परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार रुपयाची दारू जप्त करण्यात आली.

\Bविद्यार्थ्यांचे मोबाइल लंपास\B

सुदाम दत्तुराव मोगल (वय १९ रा. बीड बायपास) या विद्यार्थ्याचे आणि त्याच्या मित्राचे मोबाइल आणि लॅपटॉप चोरट्यानी लंपास केला. शुक्रवारी रात्री हा प्रकार बीड बायपास येथे घडला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bभाडेकरूला शिवीगाळ\B

पाणी मागण्यासाठी गेलेला भाडेकरू सय्यद अजीमोद्दीन सय्यद निजामोद्दीन (वय ३२ रा. सीमा दुध डेअरी, रोशन गेट) याला घरमालक मोहम्मस सिद्दीकी याने अश्लील शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी दिली. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी सिद्दीकी विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bमहिलेचा विनयभंग\B

माझ्याशी लग्न का करत नाही या कारणावरून घरात घुसून महिलेचा विनयभंग करण्यात आला. शनिवारी मध्यरात्री बायजीपुरा भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आरोपी शेख बाबा (रा. किराडपुरा) याच्या विरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादच्या सात तरूणांवर काळाचा घाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बेळगाव

बेळगाव शहराजवळ पुणे - बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात सात तरूण ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेले सातही तरूण औरंगाबाद शहरालगत असलेले शरणापूर आणि दौलताबाद येथील रहिवासी आहे. कारचे टायर फुटल्याने ताबा सुटला. त्याचवेळी कारला ट्रकने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली.

गोपी\R कडुबा\R वर्कड (वय\R ३०\R वर्षे)\R, महेश\R नंदू\R पाढळे (वय\R २४,\R रा.\R गवळीवाडा,\R दौलताबाद)\R, अमोल\R हरिशचंद्र\R निळे (वय\R २४)\R, अमोल\R चौरे (वय\R २४)\R, रवी\R मछिंद्र\R वाडेकर (वय\R २५), सूरज\R कैलास\R कान्हेरे (वय २५), नंदू\R किसन\R पवार (वय\R २५\R वर्षे\R, सर्व\R रा.\R शरणापूर) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हे सर्व जण पर्यटनासाठी कारमधून रवाना झाले होते. जेजुरी गडाचे दर्शन घेऊन रात्री कोल्हापूर येथे ते मुक्कामासाठी थांबले होते. सकाळी कोल्हापूर येथील देवीचे दर्शन घेऊन ते बेळगावमार्गे गोव्याकडे जात होते. दुपारी दीडच्या सुमारास कारचे टायर फुटल्याने भरधाव वेगात असलेली ही कार दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. नेमके त्याच वेळी दुसऱ्या बाजूने येत असलेल्या ट्रकने या कारला चिरडले. या अपघातात पाचजण जागीच ठार झाले. दोन जखमींना उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या उपाधीक्षक यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. अपघातस्थळी कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह काढण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागले. अपघातात कारच्या ठोकरीमुळे ट्रकची समोरील बाजू चेपून गेली आहे. अपघातग्रस्त कार वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवून लगेच बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

संबंधित वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चापेक्षा प्रकल्पाचे मूल्य मोठे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'गेल्या दहा वर्षांत समाजाच्या प्रगतीसाठी ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्याचे काम वाढले आहे. 'गीत भीमायण' प्रकल्पावर खूप खर्च झाल्याची टीका होते. पण, खर्चापेक्षा प्रकल्पाचे मूल्य मोठे आहे. या प्रकल्पाला व्यावसायिक जोड दिल्यास त्याचे महत्त्व लक्षात येईल' असे प्रतिपादन इनक्युबेशन सेंटरचे संचालक संतोष व्यास यांनी केले. ते विद्यापीठात बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभागाच्या 'गीत भीमायन' प्रकल्पातील दहा गाण्यांच्या वेब पोर्टलचे उदघाटन करण्यात आले. विद्यापीठाच्या नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, गायिका आरती अंकलीकर, संगीत संयोजक नरेंद्र भिडे, संगीत विभागाचे समन्वयक डॉ. संजय मोहड, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शंकर अंभोरे, राहुल म्हस्के, डॉ. वाल्मिक सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 'गीत भीमायण' वेबपोर्टलचे मान्यवरांनी उदघाटन केले. या प्रकल्पावर कुलगुरू चोपडे यांनी भाष्य केले. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे जगभर पोहचवण्यासाठी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वामनदादा यांच्या दहा हजार गीतांचे विविध भाषांत भाषांतर आवश्यक आहे. ते काम पूर्ण झाल्यास रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली'सारखे नोबेल पारितोषिक मिळेल', असे चोपडे म्हणाले. दहा गाण्यांना कॉपीराइट मिळाले असून ३० गीतांची प्रक्रिया सुरू आहे. गिनीज बुकातही प्रकल्पाची नोंद होईल असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

यावेळी रोहन गावंडे यांनी 'भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी' गीत सादर केले. विद्या धनेधर यांनी 'माउलीची माया, चांदण्याची छाया' गीत गायले. यावेळी डॉ. गिरीश काळे, प्रा. मेधा लखपती, योगिनी जोशी, नितीन गायकवाड, अमोल पवार, प्रभू मते, मोहन प्रधान, नितीन कोलंबीकर, योगेश गच्छे, नीता गोसावी, ऋतुजा पोपळे, कृतिका शेगावकर, नितीन ससाणे, विद्या धनेधर, कोमल सातपुते, अमोल गवई, रोहन गावंडे या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. प्रा. संजय मोहड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रसिक व विद्यार्थी उपस्थित होते.

\Bरागदारीत भीमगीते

\B'गीत भीमायन' संगीत प्रकल्पात वामनदादा कर्डक लिखित गीते शास्त्रीय रागदारीत संगीतबद्ध केली आहे. या प्रकल्पासाठी कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, शुभा जोशी, आरती अंकलीकर, साधना सरगम, मंजुषा पाटील, सावनी शेंडे, बेला शेंडे यांनी गायन केले. डॉ. संजय मोहड यांनी शंभर गीतांना शास्त्रीय रागदारीत संगीतबद्ध केले असून, नरेंद्र भिडे यांचे संगीत संयोजन आहे. लवकरच सर्व गाणी रसिकांना उपलब्ध होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंचा कार्यकाळ संपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ सोमवारी (तीन जून) संपणार आहे. नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत हा अतिरिक्त पदभार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड किंवा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या कुलगुरूंकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे नवीन कुलगुरू नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी राजभवनकडे इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठातील बारा प्राध्यापकांचा त्यात समावेश आहे. या अर्जांची सहा ते आठ जून दरम्यान छाननी होणार आहे. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात संभाव्य पाच उमेदवारांची अंतिम मुलाखत होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. नवीन कुलगुरू जुलै महिन्यात रूजू होण्याची शक्यता आहे. चोपडे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे पदभार देण्याबाबत शनिवारपर्यंत निर्णय होऊ शकला नाही. याबाबत सोमवारी विद्यापीठ प्रशासनाला राज्यपाल कार्यालयाचे पत्र मिळण्याची शक्यता आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू किंवा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे पदभार जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कुलगुरू चोपडे मंगळवारी पदभार हस्तांतरीत करणार आहेत. त्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड, नांदेडमध्ये आज उष्णतेची लाट

$
0
0

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आग ओकत असलेल्या सूर्यामुळे येणारे काही दिवसही त्रासदायक ठरणार आहेत. सोमवारी (तीन जून) मराठवाड्यातील बीड, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील बहुतांश गावांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मे महिन्यात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे. जून महिन्यातही कमाल आणि किमान तापमानातही फारसा बदल न झाल्याने पूर्वमोसमी पावसाबाबत चिंता वाढल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विदेशी नागरिकाला आठ कोटीचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

झिंम्बाबे येथील नागरिकांकडून दहा कोटीचे कर्ज घेऊन त्याच्या नावावर बनावट खाते उघडून आठ कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उद्योजक सोमनाथ साखरे (रा. सिडको, एन तीन) यांच्या विरोधात जवाहनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिक्स डिपॉझिट केलेली रक्कम दुसऱ्या खात्यावर वळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. फेब्रुवारी २०१९ ते जून २०१९ या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत हा प्रकार घडला.

याप्रकरणी जयेश हसमुख शहा (वय ५५, रा. हरारे, झिंम्बाबे, सध्या रा. सांताक्रुझ, मुंबई) यांनी तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसंनी सांगतले की, शहा हे अलशम ग्लोबल लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. २००८मध्ये त्यांची साखरे यांच्यासोबत ओळख झाली होती. साखरेची पुण्यात पवनसूत इन्फोटेक नावाने कंपनी आहे. शहांनी साखरेच्या कंपनीला डिसेंबर २००८मध्ये दहा कोटी रुपयाचे कर्ज दिले होते. जिनिव्हातील क्रेडिट अॅग्री कोल बँकेच्या माध्यमातून त्यांनी ही रक्कम पाठवली होती. कायदेशीर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर त्याची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे शहा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दहा कोटींच्या कर्जापैकी साडेसात कोटी शिल्लक असलेली रक्कम अमरप्रीत चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत फिक्स डिपॉझिट करण्याचे शहा यांनी साखरे यांना सांगितले होते. ऑगस्ट २०१२मध्ये ही रक्कम शहा यांच्या नावाने 'फिक्स' देखील करण्यात आली होती; तसेच पवनसूत कंपनीकडे शहा यांची अडीच कोटीची थकबाकी होती.

दरम्यान, साखरे यांनी शहा यांच्या फॅक्सद्वारे पाठविलेल्या संदेशाचा वापर केला व बनावट सह्या करून ही फिक्स डिपॉझिटची रक्कम त्यांच्या दोन कंपन्याच्या नावावर वळवल्याचा आरोप शहा यांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात सोमनाथ साखरे यांच्याविरुद्ध फसवणूक, अपहार करणे, बनावट कागदपत्र तयार करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॉलिंग टू कंट्रोल... …धिस इज इर्मजन्सी…...’

$
0
0

- पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात बिघाड

- विमानात १५८ प्रवाशांसह सहा कर्मचारी सुखरूप

- वैमानिक, सहवैमानिकांनी प्रसंगावधान राखले

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाटणाहून मुंबईला जाणारे गो एअर कंपनीचे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रविवारी दुपारी चार वाजून १९ मिनिटांनी औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. इर्मजन्सी लँडिंग सुखरूप झाल्यानंतर विमानातीव १५८ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

औरंगाबाद विमानतळावरील 'एटीसी कंट्रोल रूम'मधील कर्मचारी एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाची तयारी करीत होते. सव्वाचारच्या सुमारास 'एटीसी' कार्यालयात एका वैमानिकाने संपर्क साधला. गो एअर विमानाच्या (क्रमांक ५८६) महिला वैमानिकाने 'एटीसी'ला, 'विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पुढील विमान प्रवास धोक्याचा होऊ शकते. यामुळे आम्ही विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करीत आहोत,' असा संदेश पाठविला. 'एटीसी'ने इमर्जन्सी लँडिंगबाबत विविध यंत्रणांना माहिती दिली. रविवारी सुट्टी असल्याने कर्मचारी वर्ग नव्हता मात्र, वैमानिकाकडून संदेश मिळताच विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह, एअर इंडियाचे अधिकारी व कर्मचारी, विमानतळ अग्निशामन दलाचे अधिकारी, सीआयएसएफ यांच्यासह हॉस्पिटल यांनाही लँडिंगची माहिती देण्यात आली होती.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी विमानतळाचा धावपट्टी रिकामी करून गो एअरच्या विमानाला उतरण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर हे विमान धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवरून टर्मिनलवर आल्यानंतर विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या विमानात १५८ प्रवासी आणि सहा कर्मचारी होते. त्यांना औरंगाबाद विमानतळावर थांबविण्यात आले. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून पाठविण्यात येणार असल्याची माहिती गो एअर कंपनीकडून देण्यात आली. या परिस्थितीवर विमानतळ संचालक डी. जी. साळवे हे लक्ष ठेवून होते. इर्मजन्सी लँडिंगमध्ये एअर इंडियाचे अजय भोळे आणि एअर इंडियाच्या टिमने ग्राउंड क्लीअरन्ससह विमान प्रवाशांना विमानतळात थांबविण्याची सुविधा करून दिली. रात्री उशिरापर्यंत गो एअरचे विमान थांबविण्यात आले होते.

……

\Bअनेकांना गो एअरने परवानगी नाकारली\B

पाटण्याहून मुंबईला येणाऱ्या अनेक विमानप्रवाशांपैकी काही जण पुणे, सोलापूर येथील रहिवासी आहेत. या विमान प्रवाशांनी औरंगाबादहून थेट पुणे किंवा सोलापूर गाठण्याची मागणी केली मात्र, गो एअर विमान कंपनीने या प्रवाशांना सोलापूर व पुण्याकडे जाण्याची परवानगी दिली नाही.

……

\Bएअर इंडियाने केली जेवणाची व्यवस्था\B

गो एअरचे विमान हे दुपापी दोन वाजून २० मिनिटांनी पाटण्याहून मुंबईकडे निघाले होते. विमानाची इर्मजन्सी लँडिंग झाल्यामुळे त्यांना औरंगाबाद विमानतळावर उतरविण्यात आले. औरंगाबाद विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांसाठी एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या विमान प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था केली.

………

\Bइंजिनमध्ये बिघाड आल्याची माहिती\B

गो एअरचे विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगबाबत वैमानिकांनी सांगितले की, इंजिनमध्ये बिघाड आल्याचे लक्षात आले. या विमानाला कमी उंचीवर आणण्यात आले. यानंतर जवळच औरंगाबाद विमानतळ असल्याने विमान औरंगाबादला उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानातील वातानुकूलन यंत्रणा बंद झाल्याने काही विमान प्रवाशांना उलट्यांचाही त्रास सुरू झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालन्यातील आंबा महोत्सवाला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जालना

जालना बाजार समितीच्या वतीने जुन्या मोंढ्यातील परिसरात आयोजित आंबा महोत्सवाला जालनेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सुरूवात झालेल्या या महोत्सवात पहिल्याच दिवशी दोन ट्रक आंबे जालनेकरांनी खरेदी करून एक नवीन उच्चांक केला.

राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या संकल्पनेतून या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खोतकर हे जालना बाजार समितीचे सभापती आहेत. जालना हे व्यापारी शहर असल्यामुळे येथील बाजार समितीच्या आवारात अनेक नवीन संकल्पनांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि विशेषत जालन्यातील बाजार समितीच्या वतीने स्थानिक पातळीवर व्यापारी आणि ग्राहक तसेच थेट शेतकऱ्यांना सातत्याने एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. आंबा बाजार जालन्यातील शौकीनांसाठी मोठी पर्वणी ठरला आहे.

आंबा महोत्सवाचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले यावेळी कृषीभूषण विजयआण्णा बोराडे यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले. बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले आणि संचालक, शेतकरी, आंबा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर बिझनेस सेंटरमध्ये हा आंबा महोत्सवाच्या निमित्ताने विविध जातीच्या आंब्याचे प्रदर्शन आहे. यात विशेषत्वाने रत्नागिरी, देवगड येथील हापूस आंबा, मराठवाड्यातील केशर, लंगडा, घाटी, गोट्या, कलमी, शेप्या अशा प्रकारच्या अनेक आंब्यांच्या जाती येथे बघायला मिळत आहेत.

कोकणातील हापूस आंबा जालन्यातील माळरानावरच्या केशरी आंब्यासोबत स्पर्धेत उतरला आहे. मराठवाड्यातील आंब्यासोबत ही गुणवत्तापूर्ण स्पर्धा आपण लावली आहे, असे समजू या, शेतकऱ्यांना एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. चोखंदळ आंबा शौकीनांसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

- अर्जुन खोतकर, सभापती, जालना बाजार समिती.

जालनेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय. सोमवारपर्यंत चालणाऱ्या या आंबा महोत्सवातून ग्राहकांना कोकणातील हापूस आंब्याची चव खूप आवडली आहे. बाजार समितीच्या या उपक्रमाची मदत होत आहे

- अनिता लाहोटी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळमुक्तीसाठी ‘एनजीओं’ना साकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन राज्यसरकारने आता स्वयंसेवी संस्थांना साकडे घातले आहे. दुष्काळाची दाहकता मोठी असून नियमित पावसाळा सुरू होण्यास महिनाभर आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी दुष्काळ निर्मूलनाच्या कामात पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे 'महाराष्ट्रातील दुष्काळ आणि स्वयंसेवी संस्थांची भूमिका' यावर महसूल मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आयएमए सभागृहात बैठक पार पडली. यावेळी प्रबोधिनीचे विनय सहस्त्रबुद्धे, हिवरे बाजारचे सरंपच पोपटराव पवार, रवींद्र साठे, मनोज शेवाळे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पाटील म्हणाले, यंदा दुष्काळ भयंकर आहे. राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप परिस्थिती पूर्णपणे बदलेली नाही. शासनासह स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत आपापल्या पातळीवर उपाययोजना कराव्यात, निधी लागत असेल, तर 'सीएसआर'मधून फंड देण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासह सरकारच्या योजना योग्य प्रकारे पोहचतात की, नाही यावरही लक्ष द्यावे. सरकारकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. नुकसान भरपाईची रक्कम ६७ लाख २० हजार ८६५ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. ही रक्कम चार हजार ४१२ कोटी ५७ लाख रुपये आहे. असे असले तरी, पावसानंतर ही शेतकऱ्यांसमोर प्रश्न असतील ते दूर करण्यासाठी, राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महसूल मंत्र्यांनी केले.

\B१५ हजार ४२६ गावात टँकर, बीड-उस्मानाबादसाठी स्वतंत्र योजना\B

राज्यात चार हजार ९२० गावे, १० हजार ५०६ वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत संपलेले आहेत त्याच गावात टँकर देण्यात असल्याचे सरकारचे धोरण असल्याची स्थिती आहे. बीड व उस्मनाबाद जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी योजना आखली जात आहे. त्यासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

\Bमुलींना वर्षभर मोफत पास\B

दुष्काळी भागातील मुलींच्या शिक्षण सुरू राहावे यासाठी एकदाच वर्षभराचा मोफत पास देण्याचा विचार सरकार करत आहे. त्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील अडचणीतील मुलींच्या शैक्षणिक खर्चाचे सर्वेक्षण करून सरकारला उपयुक्त ठरणारी माहिती द्यावी. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी 'सीएसआर' फंडाचीही मदत घेतली जाईल. यासह दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाकरिताचे बी-बियाणे मोफत देण्याचा विचार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

\Bचारा छावण्यांमध्ये १० लाख जनावरे \B

मराठवाड्यासह राज्यातील १५१ तालुक्यांमधील २८ हजार गावे दुष्काळाच्या छायेत आहेत. तेथे पिण्याचे पाणी, चारा आणि जनावरांसाठी पाण्याची भीषण टंचाई आहे. सरकारने राज्यात सुरू केलेल्या १५०१ चारा छावण्यांमध्ये दहा लाख चार हजार ८४ जनावरे आहेत. मराठवाडयात दुष्काळाच्या झळा सर्वाधिक शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. चार छावण्यांमध्ये गुरांची संख्या वाढत असून अनेक छावण्यांवर दूरवरून चारा आणण्याची वेळ आली आहे. तेथे टँकरद्वारेच पाण्याची व्यवस्था केली जात आहे. सरकार मोठ्या जनावरांच्या चाऱ्यासाठी शंभर व लहान जनावरांसाठी ५० रुपये सरकार अनुदान देते.

\Bमंत्र्यांपुढे केलेल्या मागण्या \B

-जालना येथील चारा छावणीला विद्युत पुरवठा नाही, महावितरणकडे गेल्यास सिंगल फेज कनेक्शन मिळत नाही, अशी तक्रार बैठकीत करण्यात आली.

-पाण्यासाठी टाक्या बांधल्या, मात्र जवळपास पाणी उपलब्ध नाही, असा प्रश्न कळंबच्या स्वयंसेवी संस्थेने उपस्थित केला.

-बीड येथील एका गावकऱ्याने सांगितले की, शासनाने शेततळे दिले, मात्र त्यात अंथरण्याचे प्लास्टिक खूप महाग आहे. ते खरेदी करणे परवडत नाही.

- चारा छावण्यात कडबा कुट्टीकरिता यंत्र देण्याची मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादेत विद्यापीठाबाहेर आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठाचे निवृत्त कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज विद्यापीठाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्नही केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

चोपडे हे कुलगुरू म्हणून निवृत्त झाले असून त्यांच्याऐवजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभार कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चोपडे हे निवृत्त झाले तरी त्यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर न केल्याने संतप्त झालेल्या काही संघटनांनी आज विद्यापीठाबाहेर जोरदार निदर्शने करत चोपडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली. त्याचवेळी एका आंदोलकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी विद्यापीठाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

डॉ. बी. ए. चोपडे यांच्याविरुद्ध विविध संघटना व व्यक्तींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने तीन महिन्यानंतर सहपत्रांसह तब्बल ८०० पानी अहवाल सादर केला होता. डॉ. चोपडे यांच्याविरुद्ध आर्थिक, प्रशासकीय आणि निवडणूक विषयक तक्रारी होत्या. विद्यापीठात गैरप्रकार करणाऱ्या कुलगुरुंची चौकशी करण्याची मागणी राज्यपाल कार्यालयाकडे करण्यात आली होती. विधान परिषदेतही विद्यापीठातील गैरव्यवहाराचा मुद्दा गाजल्यानंतर डॉ. एस. एफ. पाटील सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. बी. बी. पाटील आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुट्टे यांचा समावेश होता. या समितीने विद्यापीठात सात वेळेस येऊन डॉ. चोपडे यांच्याविरुद्धच्या तक्रारींची शहानिशा केली होती. ही चौकशी झाल्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला. प्रत्येक मुद्याचे विवरण असलेला मूळ अहवाल ७० ते ८० पानी असून सहपत्रांसह ८०० पानी आहे. दरम्यान, चौकशी सुरू असतानाही चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. काही संघटनांनी आंदोलन करुनही प्रशासनाने कार्यवाही केली नव्हती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदगाह परिसरात दहा सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीच्या ईदगाह मैदानावर रमजान ईदची विशेष नमाज अदा करण्यासाठी दोन लाखांच्या घरात भावि‌क येत असतात. यंदा नमाजासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी छावणी ईदगाह कमिटीने परिसरात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक छावणी ईदगाह मैदानावर येत असतात. जवळपास ३०० वर्षे जुनी सदर ईदगाह असून, या ईदगाहावर येणाऱ्या भाविकांची गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. ईदगाह मैदानावर आलेल्या भाविकांची ईदची नमाज व्यवस्थित व्हावी. यासाठी छावणी ईदगाह ‌कमिटीच्या माध्यमातून सोयी सुविधा उभारण्याचे काम केले जात आहे. यासाठी महापालिका; तसेच छावणी बोर्डाचीही मदत मिळत असते. छावणी ईदगाह मैदानाची, ईदच्या नमाजासाठी ईदगाह परिसराची रंगरगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ईद उल फित्रची नमाज अदा करण्यासाठी भाविकांना नमाज अदा करण्यासाठी, ईदगाहच्या दक्षिणेला जागा वाढविण्यात आली आहे. या जागेच्या कामासह ईदगाहाच्या समोरील भागाचाही विस्तार करण्यात आला. शिवाय ईदगाहच्या डाव्या बाजुला नवा चबुतरा तयार करण्यात आला आहे.

ईदगाह मैदानात मुख्य ईदगाह मैदानात एक लाख तर, नया चबुतरा येथे ५० हजार भाविकांना नमाज पडण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. दीड ते दोन लाख भाविक नमाज अदा करण्यासाठी येत आहे. यामुळे यंदाच्या वर्षी ईदगाहकडे येणाऱ्या विविध मार्गावर दहा कॅमेरे ईदगाह कमिटी आणि वक्फ बोर्डाच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे. याशिवाय पोलिसांचे दहा कॅमेरे असणार असल्याची माहितीही ईदगाह कमिटीच्या सदस्यांनी दिली. या ईदगाह कमिटीमध्ये अब्दुल वहीद यांच्यासह एकबाल खान, अश्फाक खान, एम. ए. अझहर, रफिक अहेमद यांच्यासह अन्य सदस्यांनी ईदगाह नमाजासाठी तयार करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले.

\B

रमजान नमाजाच्या वेळा\B

ईदगाह छावणी : सकाळी ८.४० वाजता

ईदगाह रोजेबाग : सकाळी ८.४५

ईदगाह उस्मानपुरा : सकाळी ०९.३०

काली मशीद चौक : सकाळी ०९.१०

‌मशीद हजरत निजामोद्दीन दर्गाह : सकाळी ९.००

मशीद ए कला शहागंज, बडी मशीद : सकाळी ९.१५

मशीद चौक : सकाळी ९.१०

जामा मशीद, उस्मानपुरा : सकाळी ९.१५

मशीद दर्गाह शहानूर मियॉ हमवी : सकाळी ८.४५

मशीद गंजेशहिदा : सकाळी ०९.१५

मशीद रेल्वे स्टेशन : सकाळी ९.०५

मशीद मोती कारंजा : सकाळी ०९.१५

मशिद शुत्तारिया मोंढा : सकाळी ८.१५

मक्का मशीद दिल्ली गेट : सकाळी ८.४५

नवाब मशीद दर्गाह कालादरवाजा : सकाळी ८.१५

दर्गाह मशीद मेन रोड नारेगाव : सकाळी ९.३०

\Bवाहतूक व्यवस्‍थेत बदल\B

ईदनिमित्त छावणी ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव नमाजासाठी येत असतात. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सकाळी सात ते ११ या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटकडे जाणारे सर्व मार्ग वाहनांसाठी बंद करण्याचे नियोजन पोलिस विभागाकडून करण्यात आले.

- छावणी ईदगाह येथे शहराच्या उत्तरेकडून टाउन हॉल, मलिक अंबर चौक, मकई गेट, बेगमपुरा येथून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्‍था डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रागणांत करण्यात आली आहे.

- ज्युबली पार्क, महेमूद दरवाजा, पाणचक्कीकडून येणाऱ्या वाहनांच्या पा‌र्किंगची व्यवस्‍था डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या प्रागणांत करण्यात आली आहे.

- मिलकॉर्नर , बारापुल्ला दरवाजाकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्‍था मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली आहे. ही वाहने आंबेडकर स्टेडियममध्ये लावण्यात येणार आहेत.

- छावणी परिसरातून मिलिंद चौकमार्गे येणाच्या वाहनाच्या पार्किंगची व्यवस्‍था मिलींद विज्ञान महाविद्यालयासमोरील वाहनतळावर करण्याचे नियोजन असल्याची माहिती शहर पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकणचे पाणी मराठवाड्याला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

'दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलेले मराठवाड्याचा सर्वांगिण विकास आणि दुष्काळमुक्तीचे स्वप्न विविध योजनांच्या माध्यमांतून पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी परळीतील गोपीनाथ गड येथे केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथगड परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, 'गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. गरीब आणि वंचिताच्या विकासासाठी ते शेवटपर्यंत झटले. मराठवाड्याच्या विकासाबरोबरच हा भाग दुष्काळमुक्त व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्याने पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी समुद्रात जाऊ नये, यासाठी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याशिवाय मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत मराठवाड्यात पाण्याचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी इस्रायलसोबत करार करण्यात आला असून, पाच विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. बंद पाइपद्वारे हे पाणी गावागावात शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल.'

बीड जिल्ह्याच्या विकासाबाबत फडणवीस म्हणाले, 'कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ बीड जिल्ह्याला होणार आहे. बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा रेल्वेचा प्रश्न लवकरच सुटणार असून, नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.'

\Bदुष्काळ निवारणाची हमी

\B'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांच्या कल्याणासाठी कामकाज करतांना अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उघडण्यात आल्या आहेत. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून १३०० कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान प्राप्त झाले आहे. या शिवाय निधी लागल्यास शासनाच्या तिजोरीतून दिला जाईल. त्यामुळे जनतेने कुठल्याही प्रकारची काळजी करू नये, राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे,' असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगप्रकरण; पोलिसाचा नियमित जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद: शहरातील ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणातील आरोपी पोलिस कर्मचारी भाऊसाहेब रहाणे याचा नियमित जामीन अर्ज तत्कालिन मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी फेटाळला.

या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार, ३० मे रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी पोलिस कर्मचारी भाऊसाहेब रहाणे हा मित्राच्या घरी गेला होता. त्यावेळी परिसरात राहणारी पीडित महिला ही छतावर पाणी टाकून खाली येत असताना, आरोपीने तिचा विनयभंग केला होता. प्रकरणात पीडितेच्या तक्रारीनंतर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीला शनिवारी (१ जून) अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, तो न्यायालयाने फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ नवीन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुजू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा व सत्र न्यायलयामध्ये सहा सह दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश व २५ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हे रुजू झाले आहेत. सह दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश या पदावर ए. ए. आयचित, व्ही. बी. बोहरा, व्ही. व्ही. पाटील, पी. आर. शिंदे, एस. डी. कुहेकर हे सहा जण रुजू झाले.

सह दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायाधीशांसह मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे (क्रांतीचौक पोलिस ठाणे), प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. सरोदिया, आय. के. सूर्यवंशी (करमाड पोलिस ठाणे), एच. एस. पुराडउपाध्ये (जिन्सी), ए. एन. माने (सिटी चौक), वाय. जी. दुबे (छावणी), पी. आय. सूर्यवंशी (बाल न्यायालय), डी. एस. वमने (एमआयडीसी सिडको), बी. डी. तेरे (बेगमपुरा), एस. यू. नायहरकर (दिवाणी), डी. आर. भंडारी (उस्मानपुरा), एस. एम. कादरी (चिकलठाणा), एस. एस. मांजरेकर (मुकुंâदवाडी), ए. एस. वाडकर (पुंडलिकनगर), ए. जी. पाटील (सातारा), व्ही. डी. शृंगारे (जवाहरनगर), रेहना अंजुम (एमआयडीसी वाळूज), ए. ए. काळे (दौलताबाद), एस. एस. दहातोंडे (हर्सूल), ए. एस. कांबळे (वेदांतनगर), एस. पी. पांडव (क्रांतीचौक), बी. एम. पोतदार (वाहतूक, अदाखल पत्र), एस. आर. गुळवे, एस. एस. निश्चल, पी. एच. पाटील, एस. एन. थेपेकर, पी.एच. जोशी (रेल्वे व सिडको पोलिस ठाणे) हे न्यायालयात रुजू झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटकाळ, साथिदारांच्या घरांची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मकोका' कारवाई अंतर्गत वाळू माफिया लहू गटकाळ सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या तिन्ही घरांची झडती घेतली. तसेच त्याच्या साथीदाराची देखील घरझडती घेण्यात आली. दरम्यान, या तिघांची कोणत्या बँकेत खाती किंवा लॉकर आहे याची विचारणा करण्यासाठी शहरातील सुमारे ४० बँकांसोबत पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे.

रतन अग्रवाल या व्यापाऱ्यावर आणि त्याच्या मुलावर आरोपी लहू गटकाळ, रवींद्र तोगे आणि अंकुश मांडलिक यांनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस आयुक्तांच्या आदेशाने या टोळीवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा तपास गुन्हे शाखेचे एसीपी डॉ. नागनाथ कोडे करित आहेत. २८ मे रोजी या तिघांना हर्सूल कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. कोर्टाने या तिघांना नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. तपासादरम्यान गटकाळच्या नाथनगर येथील घर, ज्योतीनगर येथील फ्लॅट, तसेच देवळाई येथील घराची झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरातील सर्व बँकेच्या शाखांना पत्र पाठवून तिन्ही आरोपींच्या बँक खाते व लॉकर संदर्भातील माहिती मागविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी पंपहाऊस परिसरात सोमवारी दुपारी वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले आहे.

पंपहाऊस परिसरात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास वीज तारेवर झाड पडल्यामुळे सुमारे दोन तास वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे जायकवाडीपासून औरंगाबादला होणारा पाणीपुरवठाही पूर्णपणे बंद होता. या कारणाने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक चार ते पाच तासांनी पुढे ढकलले जाऊ शकते, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. वीजपुरवठा दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर टप्प्या टप्प्याने पंपहाऊसमधील पंप व मशिनरी सुरू करून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास पंपहाऊसमधून पाणीपुरवठा सुरू झाला. जायकवाडीहून सुरू झालेला पाणीपुरवठा फारोळ्यापर्यंत येण्यासाठी साडेचार वाजले. त्यानंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. सहा ते आठ तासांनंतर शहरातील जलकुंभ भरण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर पाणी वितरणाचे काम हाती घेतले जाईल, असे पालिकेने कळविले आहे. या प्रकारामुळे पाणी पुरवठ्याचे नेहमीचे वेळापत्रक पुढे ढकलले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना झाड तोडणाल्याने महापालिकेने बजावली नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बांधकामासाठी झाड विनापरवाना तोडल्यामुळे महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी बंधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उस्मानपुरा येथील सिटी सर्वेक्षण क्रमांक १४४७६ येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामात अडथळा ठरत असल्यामुळे इमारत मालकाने झाड तोडून टाकले. हिरवेगार झाड तोडण्यात आल्याची तक्रार नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे केली. तक्रार प्राप्त होताच उद्यान विभागाचे पथक त्या ठिकाणी पोचले. त्यांनी पंचनामा केला. परवानगी न घेता झाड तोडण्यात आल्याचे त्यावेळी लक्षात आले. त्यामुळे वृक्ष अधिकाऱ्यांनी रुक्साना असलम खान, जुलेखा अरीफ खान, जेहरा मोहसीन खान यांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष जतन कायदा क्रमांक एक्स एल आय व्ही १९७५चे कलम ८(१)चे उल्लंघन केल्यामुळे आपणावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तीन दिवसांत यासंदर्भात खुलासा करण्याचेही संबंधितांना कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images